Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आनंददायी स्वराविष्काराने औरंगाबादकर मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रसिकांना स्वरानुभावाची श्रीमंत अनुभूती देत चाल, संगीत, काव्य यांचा जमलेला मेळ साधत सदाबहार गायक श्रीधर फडके यांनी गाणरसिकांची शनिवारची (१० नोव्हेंबर) सायंकाळ अविस्मरणीय केली. 'देव देव्हाऱ्यात नाही', 'सखी मंद झाल्या तारखा', 'फिटे अंधाराचे जाळे', 'गंगू बाजाराला जाते', अशा विविध भावगीतांचा नजराना सादर करत श्रीधर फडके यांनी आपल्या नादमय स्वरांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

'महाराष्ट्र टाइम्स', 'आस्था जनविकास संस्था' आणि 'पीआर इम्पॅक्ट' यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी श्रीधर फडके यांच्या 'फिटे अंधाराचे जाळे' या कार्यक्रमाचे सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजन करण्यात आले. संपूर्ण नाट्यगृह प्रेक्षकांनी तुडूंब भरले होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आदर्श उद्योग समूहाचे अध्यक्ष अंबादास मानकापे, आमदार संजय शिरसाट, 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने, 'आस्था जनविकास संस्थे'च्या अध्यक्षा आरतीश्यामल जोशी, ऋचा इंजिनीअरिंगचे संचालक उमेश दाशरथी, रॅडिको एनव्ही डिस्टीलरीजचे एस. जी. पाटील, एंजल ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या योगिता शास्त्री, रूद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने रत्नाकर कुलकर्णी, रॉयल सिल्कचे उबेद खान, एस. एम. एस. एन्वायरोकेअर लिमिटेडचे संचालक गीतेश साबने आदींची उपस्थिती होती. खासदार खैरे यांनी बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला.

स्वरसूर्य सुधीर फडके यांच्या गायकीच्या आठवणी ताज्या करणाऱ्या या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी प्रत्येक गीतांची आठवण सांगत रसिकांना मैफिलीत गुंफून ठेवले. स्वरांची आकर्षक आणि तेवढीच आक्रमक आवर्तने, सरगमची वेधक पेरणी करत त्यांनी प्रत्येक रचना सादर केली. 'ऋतू हिरवा', 'धुंदी कळ्यांना' ही गीते सादर करत स्वरांचे साम्राज्य उभे केले. त्यास रसिकांनी खुल्या मनाने दाद दिली. 'देव देव्हाऱ्यात नाही', 'कानडा राजा पंढरीचा', 'ओंकार स्वरूपा' आदी भक्तीगीतांच्या माध्यमातून फडके यांचे ओथंबलेले स्वर रसिकांना भिडले. कार्यक्रमाचे शीर्षक गीत 'फिटे अंधाराचे जाळे' या लोकप्रिय गीताने रसिकांना परमोच्च श्रवण सुखाचा आनंद दिला. खास आग्रहावरून त्यांनी हे गीत पुन्हा सादर केले. गानमैफीलीच उंची वाढवली ती शिल्पा पुणतांबेकर या गायक कलावंतांनी. 'येणार नाथ आता' यासह काही नवीन रचना त्यांनी सादर केल्या. शेफाली कुलकर्णी-साकोरीकर यांची साथही तेवढीच सुरेल आणि समर्पक ठरली. फडके यांनी 'सखी मंद झाल्या तारखा', 'ऋतु हिरवा', 'धुंदी कळ्यांना', 'तोच चंद्रमा नभात' या भावगीतांनी रसिकांची मने तृप्त केली. सचिन जगताप यांच्या हुकूमी मधूर वेल्हाळ बासरीचे वादनाचे गारूड कायम राहिले. यावेळी जगताप यांची बासरी आणि तुषार आगरे यांच्या तबल्याची जुगलबंदी रंगली. राजेश भावसार यांनी तालवाद्यावर, तर अतुल माळी यांनी की-बोर्डवर साथसंगत केली.

समारोपाच्या सत्रात 'गंगू बाजारला जाते हो जाऊ द्या' या गीताला रसिकांनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला. अनेक प्रेक्षकांना या गाण्यावर नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन सुकन्या जोशी आणि वैशाली नांदगावकर यांनी केली.

\B'आस्था'च्या बोधचिन्हाचे अनावरण\B

खासदार खैरे, आमदार शिरसाट, अंबादास मानकापे, श्रीधर फडके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत 'आस्था जनविकास संस्थे'च्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. नव्या बोधचिन्हाप्रमाणेच 'आस्था'नवनवीन क्षेत्र पादांक्रत करेल, असा विश्वास व्यक्त झाला. कोडिंग व्हिजन्सचे संचालक वेदांत जहागीरदार यांनी हा डिजिटल लोगो तयार केला आहे.

\Bवाचनालयाचे उद्घाटन\B

'आस्था जनविकास संस्थे'च्या वतीने भगवानबाबा बालिकाश्रम आणि बाबासाई एड्सबाधित मुलांच्या आश्रमात वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या मालिकेत तिसरे वाचनालय उस्मानपुऱ्यातील गजानन बालकाश्रमात सुरू करण्यात आले. कार्यक्रमात आश्रमातील मुलांना शालेय साहित्य आणि वाचनालयासाठी पुस्तके भेट देण्यात आली. याप्रसंगी गजाननचे संचालक जयराज नारायणकर यांची उपस्थिती होती.

बाबूजींच्या गायनाने महाराष्ट्रावर अनेक दशके गारूड घातले. श्रीधर फडके यांनी बाबूजींचा वारसा समर्थपण वृद्धिंगत केला आहे. त्यांच्या गायनातून नवीन पिढीपर्यंत मराठीतील अजरामर गीतांचा वारसा पोहचत आहे. या आयोजनासाठी 'महाराष्ट्र टाइम्स', 'आस्था जनविकास संस्था' आणि 'पीआर इम्पॅक्ट'चे अभिनंदन.

- चंद्रकांत खैरे, खासदार

श्रीधर फडके यांनी मराठीतील अजरामर गीते सादर करून जुन्या काळाला उजाळा दिला. जुन्या सोबतच नवीन पिढीनेही मोठ्या संख्येने त्यांच्या गाण्यांचा आस्वाद घेतला. दिवाळीनंतर आयोजित हा कार्यक्रम औरंगाबादकरांसाठी पर्वणी ठरला.

- नंदकुमार घोडेले, महापौर

बाबूजींच्या स्वरांची मोहनी आजही रसिकांवर कायम असताना त्यांचा हा समृद्ध वारसा लाभलेले श्रीधर फडके यांची गीते ऐकताना देहभान हरपले. त्यास रसिकांची मिळालेली साद भरभरून आनंद देऊन गेला. भविष्यातही अशा कार्यक्रमांना सदैव सहकार्य राहील.

- अंबादास मानकापे, संस्थापक अध्यक्ष, आदर्श उद्योग समूह

गेल्या आठ वर्षांपासून 'आस्था जनविकास संस्था' महिला बालकल्याण, आरोग्य, कला-संस्कृती आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'मुळे पहिल्यांदाच आमच्या कार्याची माहिती औरंगाबादकरांपर्यंत पोहचवता आली. लहानपणापासून आम्ही बाबूजींची गाणी ऐकत मोठे झालो. त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे श्रीधर फडके यांच्या कार्यक्रमाची मेजवाणी शहरवासीयांना देणे हे स्वप्न होते.

- आरतीश्यामल जोशी, अध्यक्षा, आस्था जनविकास संस्था

अजरामर गायक सुधीर फडके यांच्या स्वर-साजाने अवघ्या मराठी रसिकांवर मोहिनी घातली असून श्रीधर फडके यांच्या सुरेल आवाजात तीच अनुभूती औरंगाबादकरांनी अनुभवली. या कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी मिळाली याचा अभिमान वाटतो.

- योगिता शास्त्री, अध्यक्षा, एंजल्स ग्रुप ऑफ एज्युकेशन

आमची पिढी बाबूजींची गाणी ऐकत मोठी झाली. त्यांची सर्व गाणे तोंडपाठ आहे. बाबूजींची उणीव श्रीधर फडके यांनी भरून काढली. त्यांना पाहून साक्षात बाबूजी गात असल्याचा जाणवले. हा आनंद दिल्याबद्दल 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'आस्था जनविकास संस्थे'चे आभार.

- विवेक देशपांडे, अध्यक्ष, रूद्राणी समूह

मराठीतील अजरामर गीते नवीन पिढीला फारशी माहिती नाहीत. आजच्या कार्यक्रमातून ही संधी औरंगाबादकरांना मिळाली. या आयोजनासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'चे धन्यवाद

- सचिन पगारिया, जेटकिंग

औरंगाबादकर दिवाळीच्या धामधुमीत असतानाच 'फिटे अंधाराचे जाळे' कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. श्रीधर फडकेंच्या गाण्यांनी औरंगाबादकर स्वरोत्सवात चिंब झाले.

- उमेश दाशरथी, संचालक, ऋचा इंडस्ट्रीज

महाराष्ट्रातील एक पिढी बाबूजींची गाणी ऐकत मोठी झाली आहे. श्रीधर फडके यांनी आमच्या पिढीच्या मनातली गाणी सादर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या आयोजनात सहभागी झाल्याबद्दल समाधान वाटत आहेय

-एस. जी. पाटील, रॅडिको एनव्ही डिस्टीलरीज

दिवाळी संपल्यावर श्रीधर फडके यांनी अविट स्वरांची आतषबाजी केली. तीन तासांच्या स्वरोत्सवात रसिक मंत्रमुग्ध झाला. औरंगाबादकरांनी दिवाळीनंतर परत एकदा दिवाळी साजरी केली.

- अतुल बनगीनवार, संचालक, त्रिमूर्ती फूडटेक

'महाराष्ट्र टाइम्स', 'आस्था जनविकास संस्थे'च्या वतीने आयेाजित कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शहरवासीयांना सुरेल मेजवाणी दिल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतोय. तर कार्यक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल रसिकांचे आभार.

- गीतेश साबने, संचालक, एस. एम. एस. एन्वायरोकेअर

तीन तासांच्या संगीत यात्रेने औरंगाबादकरांना तृप्त केले. जे कलाकार टीव्हीत दिसतात त्यांना प्रत्यक्षात पाहून रसिकांचे डोळ्याचे पारणे फिटले. या आनंद सोहळ्याचा एक भाग होण्याची संधी दिल्याबद्दल 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'आस्था'चे आभार.

- संदीप काळे, संचालक, संदीप्स साउंड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कन्नड बाजार समितीतून वजन मापांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून वजन काट्याच्या कार्यालयात ठेवलेले वजन मापे (धडी) व पाण्याची मोटर शनिवारी ( १० नोव्हेंबर) मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली. वजन काटा कार्यालयातील कत्राटी कर्मचारी जितेंद्र थोरात यांची ड्युटी सायंकाळी सहा ते ते सकाळी सहाच्या दरम्यान आहे. ते शनिवारी सांयकाळी सहा ते रात्री ११ दरम्यान ड्युटी केल्यानतंर कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. सकाळी सहा च्या सुमारास पाहिले असता वजन काटा कार्यालयाचा दरवाजा उघडा दिसला. दरवाजाचा कडी कोयंडा तोडून कार्यालयातील २० किलो वजनाचे लोखंडी ४९ मापे, तीन अश्वशक्तीचा प्रोटॉन कपंनीची पाणी खेचण्याचा विद्यूत पंप, असा एकूण १९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवल्याचे स्पष्ट झाले. बाजार समितीचे सचिव कोंडीबा वानखेडे व लेखापाल पवन पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी जितेंद्र थोरात यांच्या फिर्यादीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारुसाठी मारहाण करून पैसे लुटणाऱ्याला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारूसाठी मारहाण करत पावणेआठ हजार रुपये हिसकावून घेणाऱ्या चौघांपैकी शेख मतीन शेख मसूद व शेख फैज उर्फ राजू शेख युनूस या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. कोर्टात हजर केले असता, त्यांना सोमवारपर्यंत (१२ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले.

याप्रकरणी शेख जमील अहेमद गुलाम रसूल (४१, रा. पडेगाव) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आठ नोव्हेंबर रोजी फिर्यादीला अजबनगर येथे राहणाऱ्या परिचित बाबा कुरेशीचा फोन आला व त्याने फिर्यादीला भेटण्यासाठी बोलाविले. त्यामुळे फिर्यादी त्याला भेटण्यासाठी अजबनगर येथील बीएसएनएलच्या कार्यालयजवळ आला असता, आरोपी बाबा कुरेशी, विनोद नथ्थू साळुंके यांच्यासह शेख मतीन शेख मसूद (२६, रा. आसेफिया कॉलनी) व शेख फैज उर्फ राजू शेख युनूस (२१, रा. शिवाजी हायस्कूलजवळ, खोकडपुरा) शेख मतीन व राजू शेख हे तेथे होते. त्याचवेळी आरोपी विनोद साळुंके याने फिर्यादीला दारू पिण्यासाठी पैसे मागत शिविगाळ व मारहाण केली; तसेच फिर्यादीच्या दुचाकीला लाथ मारून फिर्यादीला खाली पाडले. त्यानंतर आरोपी शेख मतीन याने फिर्यादीला पकडले तर आरोपी साळुंके याने फिर्यादीच्या खिशातील सात हजार ७५० रुपये काढून घेतले. बाबा कुरेशी व राजू शेख यांनीही फिर्यादीला माराहण केली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शेख मतीन व राजू युनूस यांना अटक करण्यात आली. दोघांना कोर्टात हजर केले असता, त्यांना कोर्टाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दपारी कागदावरच; गुन्हेगार शहरातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

शहरातून हद्दपार केलेले असताना देखील हद्दपार गुन्हेगार शहरात वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी शनिवारी राबवलेल्या विशेष कारवाईत विविध ठिकाणांवरून सात हद्दपार गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्यावर सबंधित पोलिस ठाण्यात हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

पुंडलिकनगर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री विजयनगर भागात हद्दपार आरोपी शेख अफरोज शेख लाल उर्फ अप्पू (वय १९, रा. गारखेडा परिसर) याला अटक केली. अफरोजला दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले असताना तो शहरात राहत होता. त्याच्या विरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानपुरा पोलिसांनी अमोल मारोती वावरे (वय २५ रा. पीरबाजार) या हद्दपार आरोपीला गजाआड केले. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री पीरबाजारात करण्यात आली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिन्सी पोलिसांनी शेख अलीम शेख शौकत (वय ३३ रा. जुना बायजीपुरा) याला हद्दपार आरोपीला अटक केली. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री जुना बायजीपुऱ्यात करण्यात आली असून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिडको एमआयडीसी पोलिसांनी शेख गफार शेख सत्तार उर्फ बबलू (वय २९ रा. नारेगाव) आणि नितीन रघुनाथ हिवराळे (वय २४ रा. शहानगर, मसनतपूर) या हद्दपार आरोपींना गजाआड केले. शनिवारी एमआयडीसी सिडको परिसरात ही कारवाई करण्यात आली. दोन्ही हद्दपार आरोपीविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. सातारा पोलिसांनी संदीप रमेश ठाकूर (वय २७ रा. एकता कॉलनी, सातारा परिसर) आणि बाबासाहेब भीमराव शिंदे (वय ३४ रा. राहुलनगर) या दोन हद्दपार आरोपींना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bपोलिसांचा वचक संपला?\B

शहरातील गुन्हेगारी काबूत ठेवण्यासाठी पोलिसांकडून अट्टल गुन्हेगारांना हद्दपार केले जाते. पण, पोलिसांना गुंगारा देऊन ते शहरातच राहतात. यापूर्वी सुद्धा पोलिसांकडून अनेकवेळा हद्दपार गुन्हेगारांना शहरात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला का, अशी चर्चा होत आहे. पोलिसांचा वचक राहिल्यास हद्दपार शहरात दाखल होण्यापूर्वी दहादा विचार करतील, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाला बुजवणाऱ्याला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट दस्ताऐवजाच्या आधारे नैसर्गिक नाला बुजवून सिडको महामंडळाची फसवणूक करणारा आरोपी विजय मदनलाल अग्रवाल याला शनिवारी (दहा नोव्हेंबर) अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (१२ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले.

याप्रकरणी सिडको महामंडळाचे सहयोगी नियोजनकार अभिजीत रमेश पवार यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फत्तेपूर येथील गट क्रमांक २४ व २६ येथील जागेवर नैसर्गिक नाला असल्याबाबत जोयबा हुसेन सैफुद्दीन पेटीवाला यांनी तक्रार केली होती. तक्रारी आधारे सिडको महामंडळाने दोन नोव्हेंबर २०१७ रोजी उपअधीक्षक, भूमीअभिलेख यांचा अहवाल मागविला असता, संबंधित जागेवर नैसर्गिक नाला असल्याचे स्पष्ट झाले.

अटक आरोपी विजय मदन अग्रवाल (४२, रा. एन-१, सिडको) व पसार आरोपी गोपाल अग्रवाल या दोघांनी बनावट दस्ताऐवज सादर करून कार्यालयाकडून तत्वत: रेखांकन परवानगी मिळविली; तसेच कार्यालयाच्या तपासणीमध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदविले असून, त्यात आरोपींनी जमिनीवर नैसर्गिक नाला बुजवून त्या ठिकाणी नालाच नसल्याचे बनावट नकाशे व दस्ताऐवज भूमीअभिलेख कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून तयार करुन घेत ते खरे असल्याचे भासवून सिडको महामंडळाची फसवणूक केली. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी विजय अग्रवाल याला शनिवारी अटक करून कोर्टात हजर केले असता, आरोपीने केलेल्या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास करणे बाकी आहे. भूमीअभिलेख कार्यालयातील मोजणी करणाऱ्या कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत केले व मध्यस्थी म्हणून कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करणे आहे. नाला बुजविण्यासाठी वापरलेले जेसीबी यंत्र जप्त करावायाचे आहे. अटक आरोपीचा साथीदार पसार असून, त्याल अटक करावयाची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सच्चा सामाजिक कार्यकर्त्याला निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नंदनवन कॉलनीतील विदिशा निवासस्थानी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी…या गर्दीत विद्यार्थी, चाहते आणि आंबेडकरी अनुयायांची लक्षणीय उपस्थिती. प्रा. अविनाश डोळस यांची अंत्ययात्रा छावणी स्मशानभूमीकडे निघाली तेव्हा गर्दीतील अनेकांना अश्रू अनावर झाले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी डोळस यांना भावपूर्ण निरोप दिला. एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता गमावल्याचे दु:ख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते.

मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळ आणि प्रा. अविनाश डोळस यांचे अतूट नाते होते. दलित थिएटर, दलित युवक आघाडी, भारिप बहुजन महासंघ, विद्यापीठ नामांतर चळवळ, मराठवाडा विकास आंदोलन अशा अनेक माध्यमातून डोळस सर्वत्र आघाडीवर राहिले. आयुष्याच्या उत्तरार्धात राजकारणात प्रचंड व्यग्र असतानाही त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता जागरुक राहिला. त्यामुळे डोळस यांचा सामाजिक पिंड त्यांचे विद्यार्थी आणि चाहत्यांसाठी प्रेरणादायी होता. मूळचे नाशिक जिल्ह्यातील आंबेदिंडोरी गावचे प्रा. डोळस यांची कर्मभूमी मात्र मराठवाडा होती. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात एम. ए. (मराठी) आणि नाट्यशास्त्र विषयाचे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले होते. वाड्मयाची नेमकी जाण असलेल्या डोळस यांनी दलित रंगभूमीवर विशेष योगदान दिले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती. शेकडो विद्यार्थ्यांना उभे करण्यात ते कार्यरत असत. राजकारणातही त्यांनी हाडाचे कार्यकर्ते मनापासून सांभाळले. त्यामुळे राज्यभर त्यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. डोळस यांचे अकाली जाणे अनेकांसाठी धक्का ठरले. विदिशावर अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या अनेकांना अश्रू रोखता आले नाही. छावणी स्मशानभूमीकडे निघालेल्या अंत्ययात्रेतही अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी त्यांच्या कार्याची आणि लोकप्रियतेचे दर्शन घडले. विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार इम्तियाज जलील, सुभाष झांबड, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

---सन्मान

अध्यक्ष - अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, नांदेड (१९९१)

अध्यक्ष - अ. भा. दलित साहित्य संमेलन, जळगाव (१९९०)

अध्यक्ष - अ. भा. आंबेडकर साहित्य संमेलन, वडसा (२००५)

अध्यक्ष - तिसऱ्या जगाचे साहित्य संमेलन, बुलडाणा (२००५)

अध्यक्ष - दलित साहित्य संमेलन, भुसावळ, (२०१०)

पुरस्कार

उत्कृष्ट दिग्दर्शन - थांबा रामराज्य येतंय

राज्य पुरस्कार - समीक्षा सौंदर्यशास्त्र महाराष्ट्र शासन (१९९४)

अण्णाभाऊ साठे पुरस्कार - लोकनाट्य लेखन

बी. रघुनाथ पुरस्कार (१९७१)

आदर्श शिक्षक पुरस्कार (१९८०)

श्रद्धांजली सभा आज व उद्या

प्रा. अविनाश डोळस यांचे साहित्य क्षेत्रात विशेष योगदान होते. डोळस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेत सोमवारी सायंकाळी सहा वाजता श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. तर सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या जालान सभागृहात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता श्रद्धांजली सभा होणार आहे. या दिवशी दुपारी बारा वाजता डोळस यांच्या निवासस्थानी पुण्यामोदन विधी होणार आहे.

कोट

सत्तरीच्या दशकातील मिलिंद कला महाविद्यालयातील दलित विद्यार्थ्यांच्या अस्मितेतुन पेटणारे विद्रोही वातावरण नुसते आठवले तरी शिक्षकांनी दिलेली स्व-अस्तित्वाची ओळख पटविणारी ऊर्जा अजूनही परिवर्तनाचे निखारे पेटवते. औपचारिक संवादातून विद्यार्थ्यांशी भातृभावी वैचारिक नाळ जोडणारे प्रा. अविनाश डोळस सर होते. मिलिंदमध्ये घोंगावणारे पुरोगामी सांस्कृतिक वादळ होते. ते केवळ विद्यार्थ्यांपुरतेच सीमित शिक्षक नव्हते. तर, ते बहुजन शोषित जातींच्या मुक्तीची प्रचंड ऊर्जा असलेला जाती-धर्मनिरपेक्ष संघटनात्मक श्वास होते.

डॉ. श्रीराम निकम, राजकीय अभ्यासक

आंबेडकरी चळवळीतील नेते व लेखक अविनाश डोळस तीन दशकांपेक्षाही अधिक काळ अविरत संघर्ष करत होते. सामाजिक न्यायाच्या लढ्यात मराठवाडा व महाराष्ट्रात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. संवेदनशील व आक्रमकतेसोबत त्यांचे व्यक्तिमत्त्व आश्वासक होते. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय व सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार

नामांतर आंदोलन, मंडल आयोग अंमलबजाणी आंदोलन, एक गाव एक पाणवठा, शिक्षणाचे खाजगीकरण विरोधी आंदोलन अशा अनेक आंदोलनात अविनाश सोबत होता. साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार असला तरी तो मुळात परिवर्तनवादी चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता होता. अविनाशच्या मांडणीत सतत फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराची पेरणी असायची. तो ज्या विचारांसाठी जगला, ते विचार पुढे घेऊन जाणे हीच खरी आदरांजली ठरेल.

साथी सुभाष लोमटे, सरचिटणीस, राज्य हमाल मापाडी महामंडळ

प्रा. अविनाश डोळस हे आंबेडकरी साहित्य आणि आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत युगपर्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळीत जेंव्हा क्षीणता आली होती तेव्हा त्यांनी दलित युवक आघाडी स्थापून चळवळीला ऊर्जितावस्था प्राप्त करुन दिली. ह्या संघटनेने दलितांचा स्वाभिमान बुलंद केला तर दुसरीकडे सवर्ण समाजाला अंतर्मुख केले. आंबेडकरी विचारांवरील प्रखर निष्ठा,संयमी, सहिष्णू आणि विवेकनिष्ठ धुरीण आणि सामर्थ्यशाली चिंतक म्हणून इतिहास त्यांच्याकडे गौरवाने पाहिल.

डॉ. ऋषीकेश कांबळे, समीक्षक

प्रा. अविनाश डोळस हे स्वच्छ मनाचे, घेतलेल्या भूमिकेशी प्रतारणा न करणारे राजकीय कार्यकर्ते होते. तसेच पारदर्शी मते मांडणारा वाड्मयीन अभ्यासक आणि प्रांजळ मित्र होते. त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील योगदान लक्षणीय ठरले.

कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद

प्रा. अविनाश डोळस हे अतिशय बुद्धिमान, वाङ्मयीन समज असलेले आणि सामाजिक-राजकीय प्रश्नाचे भान असलेले असे अल्प वयातच प्रगल्भ बनलेले विद्यार्थी होते. त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाला मी प्रस्तावना लिहिली होती. परंतु, राजकारणात आणि दलित प्रश्नात व्यस्त झालेले डोळस नंतर कथा-नाटक प्रकार हाताळू शकले नाही. प्रतिभासंपन्न लेखक-विचारवंत आपल्यातून गेला ही दु:खद गोष्ट आहे.

डॉ. सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक

प्रा. अविनाश डोळस आंबेडकरी चळवळ व विचारांचे भाष्यकार होते. नोकरीत असतानाही त्यांनी चळवळीशी आपले नाते कायम ठेवले. सामाजिक प्रबोधनात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने परिवर्तनवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

अॅड. विष्णू ढोबळे, अध्यक्ष, समाजवादी जनपरिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणोरी परिसरातून बैल जोडी चोरीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील गणोरी येथील अन्वर अली हसन अली यांच्या शेतातील बैल जोडीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. ही घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून काही महिन्यांत परिसरात बैल चोरीची ही तिसरी घटना आहे. बैल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

गणोरी येथील अन्वर अली हसन अली यांची बैल जोडी (बैलांचे वय १२ ते १४ वर्ष, रंग लाखा) शेती गट क्रमांक ५७२ मध्ये गुरुवारी सायंकाळी चरण्यासाठी सोडले होते. अली हे पाणी पिण्यासाठी गेले होते. ते परत आले असता बैल जोडी दिसली नाही. खूप शोध घेऊनही बैल सापडले नसल्याने त्यांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या मशागत करणे सुरू असून ऐन या काळात नुकसान झाले आहे. या परिसरात सर्वच शेतकरी पाळीव जनावरे शेतातच ठेवतात. या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अली यांनी पाच दिवस बैल शोध घेतला. शेवटी त्यांनी याची तक्रार फुलंब्री पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या बैल जोडीची किंमत ५० हजार रुपये आहे.

\B दोन महिन्यांत तिसरी घटना

\B

पाळीव जनावरे चोरांची टोळी या परिसरात कार्यरत झाल्याचे दिसते. यापूर्वी मुर्शिदाबादवाडी येथील विटेकर यांची दुभती गाय चोरीला गेली होती. तिचा अजूनही तपास लागलेला नाही. शिवाय गणोरी येथील शेतकरी धोंडीराम भावराव जाधव यांची ७० हजार रुपये किंमतीची बैल जोडी गेल्या महिन्यात चोरीस गेली. तिचाही शोध लागलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणुसकीची दिवाळी साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा अत्यल्प पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचीही दिवाळी आनंदित व्हावी यासाठी कुलस्वामीनी प्रतिष्ठानतर्फे १५० शेतामध्ये राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांना भेट देऊन त्यांना फराळ तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. शहर परिसरातील जटवाडा, बनवाडी, शंकरपूरवाडी, घोडेगाव, सोनखेडा, गोळेगाव, खिर्डी, मावसाळा या खेड्यांमध्ये फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे, सचिव अलका कोरडे तसेच अनिल गावंडे, अतिक पठाण, कुलकर्णी मामा, चंद्रमुनी जायभाय, अतुल सावजी, घुगे मामा, प्रहलाद गायकवाड, सर्जेराव देशमुख यांनी फराळ वाटप केले. दरम्यान प्रतिष्ठानतर्फे विलास कोरडे व अलका कोरडे यांनी दोनशे सफाई कामगारांना फराळ वाटप केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृद्धाच्या खुनप्रकरणी जामीन दुसऱ्यांदा फेâटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वृद्धाने हॉटेलचालकास जेवण मागितल्यामुळे त्याला लाकडी दांड्याने मरेपर्यंत मारहाण करून खून करणाऱ्या हॉटेल व्यावसायिक अमोल शिवाजी चवरे याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. डिग्रसकर यांनी सोमवारी (१२ नोव्हेंबर) फेटाळला.

संतोषीमाता नगर येथे राहणारे मृत दिलीप उर्फ फिलीप वाघमारे हे सम्राट हॉटेलवर काम करून तिथेच झोपत होते. सात ऑगस्ट २०१८ रोजी ते मुलीच्या घरी आले आणि त्यांनी जेवणाचा डब्बा घेऊन सम्राट हॉटेलवर आले. त्यावेळी हॉटेलचालक अमोल हा पाणी भरत असताना दिलीप यांनी त्याला जेवण मागितले. त्याचा राग येऊन त्याने दिलीप यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. यात ते बेशुद्ध पडले. सकाळी त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आरोपीने दुसऱ्यांदा नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, जामीन दिल्यास आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ महिन्यांत १२ हजार विहिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी मराठवाड्यात यंदा 'मनरेगां'तर्गत अवघ्या आठ महिन्यांत १२ हजार विहिरी खोदण्यात आल्या आहेत. विहिरींचे टार्गेट पूर्ण करण्याचा हा धडाका असला, तरी त्या किती फूट खोदल्या, सध्या किती विहिरींमध्ये पाणी आहे याचा कोणताही अहवाल प्रशासनाकडे नाही.

मराठवाड्यात सध्या ३० हजार ८०६ विहिरी अपूर्ण असून, यापैकी २२ हजार ७३ विहीरी पूर्ण करण्याची तयारी संबंधित विभागाची आहे. यातील तब्बल १२ हजार ७० विहिरी आठ महिन्यांत खोदून पूर्ण करण्यात आल्या आहेत. यासाठी साडेतीनशे कोटींपेक्षा जास्ती अनुदान देण्यात आले आहे, मात्र यातील कोणत्या विहिरींमध्ये पाणी आहे, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. यंदा दुष्काळ परिस्थिती जाहीर करताना शासनाने भूजल पातळीचा विचार केला आहे. शासकीय यंत्रणा दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी बारकाईन अभ्यास करीत आहे. मग विहिरी खोदतांना भूजल पातळी आणि इतर घटकांचा विचार का होत नाही, असा प्रश्न आहे.

हिंगोलीत केवळ १९७ विहिरी

हिंगोली जिल्ह्यात तुलनेत सिंचन कमी असल्याने या भागामध्ये जास्त विहीरी खोरण्याची गरज आहे, मात्र प्रशासनाचे नेमके याच जिल्ह्याकडे दुर्लंक्ष झाले आहे. जिल्ह्यात ८९८ विहिरी खोदण्यात येणार होत्या, मात्र यातील आतापर्यंत केवळ १९७ विहिरी खोदण्यात आल्या आहेत. यातील काही ठिकाणी विहिरी पूर्ण झाल्या असल्या तरी तांत्रिक अडचणींमुळे अनुदान देण्यात आलेले नाही. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत या विहिरी खोदण्याचे काम पूर्ण होईल, असे विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

विहिरींची परिस्थिती

जिल्हा.............. लक्ष्य..........विहीरी खोदल्या

औरंगाबाद..........२३४६..........१३८४

जालना..............३९३६..........१९३३

बीड..................७२६३.........२७०३

परभणी..............३०७५..........१६३३

हिंगोली..............८९८...........१९७

नांदेड................१३२७.........१४३९

लातूर................२२३८.........१९८०

उस्मानाबाद........९९०............६०७

एकूण................२२०७३.......१२०७०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुक्मिनबाई सूर्यवंशी यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद : एसबीओए शाळेसमोरील भगतसिंगनगर रोड चौक हर्सूल परिसरातील रहिवासी रुख्मिनबाई देविदास सूर्यवंशी (वय ६५ ) यांचे सोमवारी (१२ नोव्हेंबर) निधन झाले. मंगळवारी (१३ नोव्हेंबर) त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघून सकाळी साडेदहा वाजता एन ११ ये‌थील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पती, दोन मुले, मुलगी व नातू असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोराला दहा वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोंखडी गजाची वाहतूक करणारा ट्रक अडवून लुटमार करणारा कुख्यात दरोडेखोर लक्ष्मण गाडे यास मोक्काच्या विविध कलमांतर्गत दहा वर्षे सक्तमजुरी व १५ लाख रुपये दंड, तर त्याचा आरोपी साथीदार व राज्यस्तरीय कुस्तीपटू रामदास बरडे यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा मोक्का कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी ठोठावली. त्याचवेळी पुराव्याअभावी सहाजणांना मुक्त करण्याचे आदेशही कोर्टाने बजावले.

जालना येथील धनलक्ष्मी स्टील कंâपनीतून चालक लक्ष्मण शिवाजी भगत हा सात फेब्रुवारी २०१३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास १६ टन लोखंडी गज घेऊन मंचरकडे (जि. पुणे) निघाला होता. त्याच्यासोबत क्लिनर ऋषी रामेश्वर जुवे (रा. जालना) हा होता. ट्रक मंचरच्या दिशेने निघाला असता पाचोड-पैठण रस्त्यावरील दावरवाडी ते राहटगावदरम्यान ट्रॅक्स व दोन दुचाकींवर आलेल्या दरोडेखोरांनी ट्रकसमोर वाहने उभी केली. ट्रक थांबल्यानंतर दोन दुचाकीवरील सहाजणांनी ट्रकचालक भगत व क्लिनर जुवे यांना शिविगाळ व मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख ८०० रुपये व मोबाइल हिसकावून घेतला. दरोडेखोरांनी दोघांना बाजूच्या शेतात नेले. त्यांचे कपडे काढून घेतले व दरोडेखोरांनी ट्रक पळवून नेला. तीन तासांनंतर चालक-क्लिनरवर पाळत ठेवणाऱ्या दोन दरोडेखोरांनी भगत व जुवे यांना शेतात सोडून दुचाकीवरून पळ काढला. त्यानंतर ट्रकचालक भगतच्या तक्रारीवरून पैठण पोलिस ठाण्यात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पैठण-पाचोड रस्त्यावर औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील दरोडा प्रतिबंधक पथकाने २० ऑगस्ट २०१३ रोजी सापळा रचून आरोपी लक्ष्मण गाडे यास अटक केली. त्यानंतर पथकाने वैजापूर परिसरातील नांदगाव शिवारात लोखंडी गज घेऊन जाणारा ट्रक जप्त केला, त्या ट्रकमध्ये असलेले १६ टन लोखंडी गज हे नाशिक जिल्ह्यातील अंदरसूल येथील साई ट्रेडर्स, येवला, नांदगाव येथून जप्त करण्यात आले. हा गुन्हा संघटित स्वरुपाचा असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस निरीक्षकांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविला. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची परवानगी दिल्यानंतर तत्कालीन पोलिस उपअधिक्षक चंद्रकांत अलसटवार यांनी तपास करून अट्टल गुन्हेगार लक्ष्मण बाबुराव गाडे (२७, रा. भिवंडी, ता. अंबड), शेख शकील शेख हसम (२२, रा. काजी गल्ली वैजापूर), ज्ञानेश्वर शंकर थोट (३५, रा. नांदगाव वैजापूर), नकीम मन्सूर सय्यद (२२, रा. भारडी, ता. अंबड), चिमाजी दामोधर भोजने (३०, रा. शिरनेर, ता. अंबड), रमेश किसन गव्हाणे (रा. तीर्थपुरी, ता. अंबड), नरेंद्र दत्तात्रय मुळे (४३, रा. मुळे गल्ली, वैजापूर) व रामदास गणपत बरडे (रा. जालोरा, ता. अंबड) यांना अटक केली. गुन्ह्याचा तपास करून विशेष कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

\Bदंड न भरल्यास तीन वर्षांपर्यंत अतिरिक्त सक्तमजुरी

\Bखटल्यावेळी, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. कोर्टाने अट्टल गुन्हेगार लक्ष्मण गाडे यास भारतीय दंड संहितेच्या ३९५ कलमान्वये सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी, मोक्का कायद्याच्या कलम ३ (१) (२) अन्वये दहा वर्षे सक्तमुजरी व पाच लाख रुपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरी, मोक्का कायद्याच्या कलम ३ (२) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व ५ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरी, मोक्का कायद्याच्या कलम ३ (४) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व पाच लाख रुपये दंड व दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठवली; तसेच आरोपी व राज्यस्तरीय कुस्तीपट्टु रामदास बरडे यास भारतीय दंड संहितेच्या ३९५ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. उर्वरित सहाजणांना सबळ पुराव्याअभावी मुक्त करण्याचे आदेश दिले.

\Bलक्ष्मण गाडेवर १८ गंभीर गुन्हे

\Bकुख्यात गुंड लक्ष्मण गाडे यांच्यावर जालना, औरंगाबादसह राज्यात अपहरण, खंडणी, मालमत्ता बळकावणे यासारखे १८ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी गाडेचा जबाब नोंदविल्यानंतरही तो फरार झाला होता. तो सापडत नसल्यामुळे कोर्टाने त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देत गावात त्याचे फोटो लावले होते. पाचोडमध्ये दोन गटांत हाणामारी झाली असता, त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तर परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळीच्या सुटीनंतर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू झाली. मात्र, अचानक परीक्षा केंद्र बदलल्यामुळे परीक्षेला एक तास उशीर झाला. समाजकार्य विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न असल्यामुळे ऐनवेळी प्रश्नपत्रिका बदलण्यात आली. नियोजनातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा दिवाळीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. नियोजनातील त्रुटींमुळे सोमवारी विद्यार्थ्यांना तब्बल एक तास उशिर झाला. पदवी परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षा केंद्र बदलल्यामुळे गोंधळ उडाला होता. बीएसस्सीच्या तीन विषयांचा परीक्षा सोमवारी सकाळी १० वाजता होती. पण, गोपनीय राखताना तांत्रिक चूक झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका वेळेत पोहचल्या नाहीत. ही चूक लक्षात आल्यानंतर एक तासाने परीक्षा सुरू करण्यात आली. तसेच पदव्युत्तरच्या समाजकार्य अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकेत कोर्स कोड आणि विषयाचे नाव चुकीचे होते. ही प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर गोंधळ उडाला. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न अभ्यासक्रमातील नव्हते. याबाबत परीक्षा विभागाकडे तक्रार केल्यानंतर अभ्यास मंडळ अध्यक्षांना बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत प्रश्नपत्रिका रद्द करुन दुसरी प्रश्नपत्रिका देण्यात आली. या प्रकारात तासापेक्षा अधिक वेळ वाया गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

दरम्यान, बीएसस्सी अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका पाठवण्यात तांत्रिक बिघाडामुळे उशीर झाला. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला. 'एमएसडब्ल्यू'च्या चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे उडालेला गोंधळ दूर करण्यात आला असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाला धक्काबुक्की; नियमित जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत पोलिसाला शिविगाळ‍ व धक्काबुक्की करणारा आरोपी उबेद खान मजहर खान याचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी सोमवारी (१२ नोव्हेंबर) फेटाळला.

या प्रकरणी वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार विलास पंडित साठे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व फिर्यादीचे सहकारी हे दहा नोव्हेंबर २०१८ रोजी आकाशवाणी सिग्नलवर ड्युटीवर असताना, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरोपी उबेद खान मजहर खान (२०, रा. उस्मानपुरा) याला त्यांनी अडवले. त्यावेळी आरोपी उबेद याने फिर्यादी व त्याचा सहकारी पोलिस हवालदार जिवडे यांना अरेरावीची भाषा वापरून शिविगाळ केली; तसेच आरोपीचे वाहन जप्त करण्याची प्रक्रिया करीत असताना आरोपीने जिवडे यांना धक्काबुक्की केली. यात जिवडे यांना मार लागला व त्यांचा चष्माही फुटला.

आरोपीने रस्त्यावरील दगड चौकीच्या दिशेने भिरकावण्याचाही प्रयत्न केल्याची तक्रार दिल्यावरून भारकीय दंड संहितेच्या ३५३, ५०४ कलमान्वये जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला अटक करून त्याला कोर्टात हजर केले असता आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, कोर्टाने त्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा करा, आयुक्तांचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका मुख्यालयातील स्वच्छतागृहांची आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी पाहणी केली. स्वच्छतागृहांची दुरवस्था पाहून त्यांनी खेद व्यक्त केला. स्वच्छतागृहांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महापालिकेने सोमवारपासून विशेष वसुली आणि नियमितीकरण सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा सकाळी ११ वाजता टाऊन हॉल परिसरात होता. या कार्यक्रमासाठी आयुक्त आले पण अन्य कोणतेच अधिकारी यावेळी हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी इमारतींमधील स्वच्छतागृहांची अवस्था पाहण्याचा निर्णय घेतला व तिन्हीही प्रशासकीय इमारतींमध्ये जाऊन स्वच्छतागृहांची पाहणी केली.

यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'महापालिकेच्या इमारतींमधील स्वच्छतागृहांबद्दल अनेक तक्रारी होत्या. प्रामुख्याने महिला कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. महिला स्वच्छतागृहांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, असे लक्षात आले. काही स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची व्यवस्था नाही. नळाला तोट्या नाहीत, स्वच्छता योग्य प्रकारे होत नाही, असे लक्षात आले. त्यामुळे स्वच्छतागृह स्वच्छ करून तेथे आवश्यक त्या सुविधा देण्याबद्दल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.' आता दर सोमवारी आपण पालिका मुख्यालयातील स्वच्छतागृहांची पाहणी करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रा. डोळस हे विशाल कर्तृत्वाचे विचारवंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'दलित युवक आघाडीच्या माध्यमातून प्रा. अविनाश डोळस यांनी प्रभावी सामाजिक काम केले. या संघटनेत दलितेतरसुद्धा सक्रिय होते. खालच्या थरातील व्यक्तींना स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, अशी करूणा वरच्या थरातील व्यक्तींच्या मनात निर्माण करण्यात चळवळ यशस्वी ठरली. डोळस यांच्या कर्तृत्वाचा पट, असा विस्तीर्ण होता' असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी केले. ते श्रद्धांजली सभेत बोलत होते.

ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्रा. अविनाश डोळस यांचे रविवारी निधन झाले. डोळस यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन मराठवाडा साहित्य परिषदेने सोमवारी सायंकाळी श्रद्धांजली सभा घेतली. या सभेत डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी डोळस यांच्या कार्याला उजाळा दिला. 'समाजात मैत्रीचे पूल बांधण्यासाठी समन्वयाची भूमिका घ्यावी लागते. ही भूमिका डोळस यांनी निभावली. जातीयतेवर टीका करताना प्रसंगी त्यांनी दलितांमधील जात रचनेवरही टीका केली. त्यांच्या सामाजिक कर्तृत्वाचा पट थक्क करणारा होता. दलितांसाठी आंदोलन करताना सवर्णांना अंतर्मुख करण्यात ते यशस्वी ठरले. राजकारणात सक्रिय असताना डोळस यांनी नियमित लेखन करणे गरजेचे होते. कारण, लिहिण्याची प्रचंड क्षमता त्यांच्या आधीच्या पुस्तकांतून दिसली होती,' असे कांबळे म्हणाले.

'प्रा. अविनाश डोळस हे नितळ मनाचे कार्यकर्ते, लेखक होते. दलित रंगभूमी आणि आंबेडकरी विचाराच्या साहित्याचे त्यांनी नेमके विश्लेषण केले होते. कुणाशी परिचय झाल्यानंतर मैत्रीतील गोडवा त्यांनी शेवटपर्यंत जपला,' असे ठाले पाटील म्हणाले. 'दलित युवक आघाडीच्या माध्यमातून डोळस यांनी युवकांच्या मनात धर्मनिरपेक्षतेचे चित्र तयार केले. निखळ विवेकवादी असलेला हा विचारवंत होता,' अशा भावना के. ई. हरिदास यांनी व्यक्त केल्या. या शोकसभेला प्रा. बाळासाहेब बोरसे, प्रा. विष्णू सुरासे, साईनाथ जाधव, गुलाबराव मगर, डॉ. कैलास अंभुरे, रमेश रावळकर, जे. के. जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुश्राव्य गायनाची ‘दिवाळी पहाट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुश्राव्य हिंदी-मराठी गीतांनी 'आलाप' दिवाळी पहाट कार्यक्रम श्रवणीय ठरला. लोकप्रिय गाण्यांचे सरस सादरीकरण दिवाळीचा आनंद द्विगुणित करुन गेले. रसिकांनी गीतांना भरभरून प्रतिसाद दिला.

दिवाळीनिमित्त अभिजित शिंदे यांनी 'आलाप'च्या माध्यमातून 'दिवाळी पहाट' कार्यक्रम सादर केला. तापडिया नाट्यमंदिरात बुधवारी सकाळी कार्यक्रम झाला. गायिका सरला शिंदे, रवींद्र खोमणे, निशांत घाटे व अंतरा शिंदे यांनी बहारदार गाणी सादर करून दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित केला. सरला शिंदे यांनी 'जिवलगा कधी रे येशील तू', 'बाई माझी करंगळी मोडली', 'मोसे छल किये जाय' अशी सरस गाणी गायली. 'काळ देहासी आला', 'तुला पाहिले मी', 'मधुबन मे राधिका नाचे रे', 'देवाक काळजी रे', 'मनमंदिरात तेजाने', 'अलबेला सजन आयो' अशी सुश्राव्य गाणी निशांत, रवींद्र यांनी सादर केली. अंतरा यांनी गायलेल्या 'केव्हा तरी पहाटे' या भावगीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली. 'कान्हा सो जा जरा', 'घुमर' या गीतांना 'वन्स मोअर' मिळाला. 'धन्यभाग सेवा का अवसर पाया' या गीताने सांगता झाली. या कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ, अतुल सावे, महावितरणचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह रसिक उपस्थित होते.

\B...अशी पाखरे येती

\Bज्येष्ठ गीतकार व संगीतकार यशवंत देव यांचे नुकतेच निधन झाले. देव यांची गाणी सादर करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. 'अशी पाखरे येती' या गाण्याने अवघे वातावरण भावुक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक फौजदाराला लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य राखीव दलातील जवानाविरुद्ध कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना सातारा पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार नारायण भराटे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी सातारा पोलिस ठाण्यासमोर करण्यात आली.

सातारा येथील भारत बटालयीनच्या एका जवानाविरुद्ध त्याच्या पत्नीने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाची चौकशी सहायक फौजदार नारायण भराटे याच्याकडे होती. भारत बटालीयनच्या समादेशकाला रिपोर्ट सादर न करण्यासाठी भराटे याने जवानाकड ५० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने या जवानाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. भराटे (वय ५५ रा. पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर) याच्या विरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळा कुंभार, गणेश धोकरट, गणेश पंडुरे, रवींद्र देशमुख, अश्वलिंग होनराव, सुनील पाटील, संदीप चिंचोले आदींनी केली.

\Bचहा टपरीवर सापळा \B

भराटे याने सोमवारी तडजोड करीत वीस हजारांची रक्कम घेऊन या जवानाला सातारा पोलिस ठाण्यासमोरील चहाच्या टपरीवर बोलावले होते. येथे पथकाने सापळा रचला होता. भराटे याला वीस हजारांची लाच घेताना पथकाने अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढिसाळ प्रशासनाचा महापौरांनाच झटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोणत्याही प्रकारचा गृहपाठ न केलेल्या ढिसाळ प्रशासनाच्या भरवशावर महापौरांनी विशेष कर वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पहिल्याच दिवशी रिकाम्या हाताने माघारी निघण्याची वेळ आली. महापालिका प्रशासनाकडे कर वसुलीबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे ही मोहीम कशी राबवली जाईल व ती यशस्वी होईल का? या बद्दल शंका व्यक्त होत आहेत.

महापालिकेच्या विशेष कर वसुली आणि नियमितीकरण सप्ताहाचे उद्घाटन सोमवारी सकाळी अकरा वाजता टाउन हॉल परिसरातून करण्याचे ठरवले होते. परंतु, साडेबारा वाजेपर्यंत उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होऊ शकला नाही. सप्ताहाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रोझोन मॉल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जावून त्यांच्याकडील मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी ठरविले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांचा ताफा घेऊन ते दुपारी तीनच्या सुमारास प्रोझोन मॉलमध्ये दाखल झाले. मॉलच्या व्यवस्थापनाशी त्यांनी कराच्या संदर्भात चर्चा केली. महापालिकेच्या लेखी प्रोझोन मॉलकडे सहा कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे, तर प्रोझन मॉलच्या व्यवस्थापनाच्या दाव्यानुसार, थकबाकीची रक्कम तीन कोटी ९० लाख रुपये आहे. महापालिकेकडील नोंद आणि मॉल व्यवस्थापनाकडील नोंद याबद्दल २०१६ या वर्षापासून दोन्हीही संस्थांमध्ये पत्रव्यवहार सुरू आहे. महापालिका प्रशासनाने अद्याप त्यात मार्ग काढला नाही. महापालिकेने कर आकारणीच्या वादात तोडगा काढावा आम्ही दोन दिवसांत सर्व रक्कम भरू, असे आश्वासन मॉल व्यवस्थापनाने दिले. त्यामुळे त्यांना दोन दिवसांची मुदत देऊन माघारी फिरलो, असे महापौरांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी शहरात नसल्यामुळे त्यांच्याकडे कर वसुलीसाठी जाता आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

\Bबड्या थकबाकीदारांची यादी गुलदस्त्यात

\B

महापालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाकडे निवासी मालमत्ता कराची थकबाकी, व्यावसायिक मालमत्ता कराची थकबाकी याबाबत अद्ययावत माहिती नाही. एक लाख ते पाच लाख रुपये कर थकलेल्यांवर कारवाईचे अधिकार वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पाच लाखांपेक्षा जास्त थकबाकी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे महापौर व आयुक्त स्वत: कर वसुलीसाठी जाणार आहेत. परंतु, या बड्या थकबाकीदारांची यादी देखील कर वसुली विभागाकडे नाही. विशेष वसुली सप्ताहाचे उद्घाटन झाल्यानंतर अधिकारी एकमेकांना फोन करून ही माहिती जमा करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना सायंकाळपर्यंत ही माहिती जमवता आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळमध्ये गोशाळेचे भूमिपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि चारा टंचाईच्या चिंतेने शेतकरी त्रस्त असतांना वेरूळ येथील एलोरा हेरिटेज रिसॉर्टचे संचालक, उद्योजक इम्रान पठाण यांच्या पुढाकाराने गोशाळा स्थापन करण्यात आली आहे. या गोशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले.

वेरूळ येथील एलोरा हेरिटेज रिसॉर्टची गोशाळा ही जनावरांची आधार संस्था ठरणार असून, शेकडो जनावरे या ठिकाणी अतिशय काळजीने जोपासली जाणार आहेत. इम्रान पठाण यांच्या संकल्पनेतून या गोशाळेची स्थापना करण्यात आली. सामाजिक जाणिवेतून इम्रान पठाण यांच्या पुढाकाराने या गोशाळेची स्थापना झाली. उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना; तसेच संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही वेरूळ याठिकाणी जनावरांची खूप चांगल्या प्रकारे निगा राखली जावी, यासाठी याठिकाणी गायी, बैल, गोऱ्हे, म्हशी, अपंग जनावरे यांचे संगोपन करण्यात येणार आहे. सध्या पाण्याची टंचाई जरी जाणवत असली तरी विहिरीच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आपण आपल्या कुटुंबाची ज्याप्रकारे काळजी घेतात त्याप्रमाणे या मुक्या गायींची काळजी घेतली जावी ही भावना मनात होती. गोशाळेमार्फत येथे जनावरांची पाण्याची वेगळी व्यवस्था व वासरांची वेगळी व्यवस्था करण्यात आली असून, रोजच्या रोज या ठिकाणी डॉक्टरकडून जनावरांची तपासणी करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर जनावरांसाठी या गोशाळेसाठी सेवेकरी माणसे काम पाहणार आहेत. शेकडो जनावरांचा सांभाळ करणारी ही गोशाळा दिमाखात उभी राहत आहे. या गोशाळेत गायींना चारा, पाणी व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावलीची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images