Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गांधी की सावरकर; अपरिहार्य राजकारण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये महात्मा गांधी आणि विनायक सावरकर यांच्या तसबिरी समोरासमोर आहेत. त्यामुळे गांधी स्वीकारायचे असतील, तर सावरकरांकडे पाठ फिरवावी लागेल, हे अपरिहार्य राजकीय वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारावेच लागेल, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी व्यक्त केले. पंडित नेहरु जयंतीनिमित्त बुधवारी एनएसयुआयतर्फे गांधी भवन येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर हे होते. यावेळी बोलताना टकले यांनी

आजघडीला लोकशाहीचे स्तंभ सध्याच्या सत्ताधाऱ्याकडून डळमळीत केले जात असताना नेहरुंची लोकशाहीप्रती बांधीलकी कशी होती याचा तुलनात्मक फरक समजावून सांगितला. भारताची पहिती मतदार यादी अनेक अडचणीच्या प्रसंगातून घडत गेली. जगाच्या पाठीवर अत्यंत आधुनिक व सर्व समाज घटकांचे हितरक्षण करणारी ही पहिली मतदार यादी होती. या सर्व प्रक्रियेत पंडित नेहरूंचे भरीव योगदान असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शंकाचे त्यांनी निरसन केले.

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मानस पगार, महाराष्ट्र एनएसयुआयचे उपाध्यक्ष सागर साळुंके, मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरव जैस्वाल, पूर्व विधानसभा उपाध्यक्ष मजीद पठाण, आरिफ खान हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन औरंगाबाद जिल्हा एनएसयुआयचे महासचिव प्रथमेश देशपांडे, आकाश बारहाते, जिल्हा सचिव ओंकार मुखेकर, ऋषिकेश खंडागळे, अभिषेक शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन ऋषिकेश पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेतन सल्लागार मंडळावर देशपांडे, मतेसह चौघांची निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची फेररचना करण्यात आली असून, औरंगाबादेतील मनुष्यबळ विकास विषयाचे तज्ज्ञ मकरंद देशपांडे यांची मालक प्रतिनिधी म्हणून, भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते आणि भारतीय बहुजन कामगार संघाचे सचिव दीपक ढाकणे; तसेच हरिष वाघ यांची कामगार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मंडळाच्या अध्यक्षपदी पुणे येथील रघुनाथ कुचिक यांची निवड झाली असून, मंडळात मालक आणि कामगार यांचे प्रत्येकी दबा सदस्य आहेत. स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून पाच सदस्यांची निवड करण्यात आली आहे. किमान वेतन अधिनियम १९४८च्या कलम पाच अन्वये ही समिती संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनाबाबत अभ्यास करून किमान वेतन दराबाबत आ‌वश्यक सल्ला, शिफारशी शासनाला सादर करेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेगा फूड पार्कचे आज उद्घाटन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या फूड पार्क योजनेअंतर्गत पैठणरोडवरील धनगाव येथे शंभर एकरवर उभारण्यात आलेल्या पैठण मेगा फूड पार्कचे गुरुवारी केंद्रीय मंत्री हरसमित कौर बादल यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. नाथ ग्रुप या फूड पार्कचे मुख्य प्रवर्तक असून जागतिक दर्जाच्या सर्व सुविधांनी येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा राज्यातील सर्वात मोठा फूड पार्क आहे.

शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत जाईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळेच शेतमालावर प्रक्रिया करून त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्याची संकल्पना या फूड पार्कमागे आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रावसाहेब दानवे व चंद्रकांत खैरे, आमदार संदीपान भुमरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाथ उद्योग समुहाचे चेअरमन नंदकिशोर कागलीवाल यांनी दिली.

या फूड पार्कसोबत आतापर्यंत पाचशे शेतकरी प्रत्यक्षपणे जोडले गेले आहेत. त्यांच्या माध्यमातुन पाचशे एकरवर मधु मकाची तंत्रशुद्ध लागवड करून त्यावर फूड पार्कमध्ये प्रक्रिया केली जात आहे.

उपलब्ध सुविधा

फूड पार्कमध्ये अद्ययावत मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र आहे. याशिवाय तीन प्राथमिक प्रक्रिया केंद्रे अनुक्रमे इसारवाडी, कन्नड आणि आळेफाटा येथे आहेत. पार्कमध्ये फूड टेस्टिंग लँब, फ्रोझन व कोल्ड स्टोअरेजेस, मॉडर्न वेअर हाउस, सॉर्टग व ग्रेडिंग लाइन्स, टेट्रापैक, दुध प्रक्रिया सुविधा उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांच्या शेताजवळ संकलन केंद्रे उभारली असून त्या माध्यमातून शेतमाल फूड पार्क पर्यंत पोहचवला जात आहे.

गुंतवणुकीवर सूट

अन प्रक्रिया उद्योगात फूड पार्कमध्ये गुंतवणूक केल्यास राज्य व केंद्र सरकारकडून अनेक आर्थिक सवलती व फायदे मिळणार आहेत. प्रामुख्याने भांडवली गुंतवणुकीवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत, मुदत कर्जावर साडे चार टक्केपर्यंत व्याजदर, आयकर व स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट, एसजीएसटी परतावा, वीजदरात सवलत मिळणार आहे.

भूखंड उपलब्ध

फूड पार्कमध्ये दोन ते वीस हजार चौरस मिटर आकाराचे औद्योगिक भूखंड रास्त दरात उपलब्ध आहेत. छोट्या गुंतवणुकदारांसाठी तयार शेड्स आहेत. नवीन गुंतवणुकदारांसाठी सर्व प्रकारचे तांत्रिक सहाय्य, आवश्यक परवाने व आर्थिक पतपुरवठा संबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यापासून मराठा संवाद यात्रा

0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

राज्य सरकारने मराठा समाजास दिलेली आश्वासने कितपत खरी ठरली? मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शैक्षणिक शुल्कात सवलत आदी निर्णयाची अंमलबजावणी तळागाळापर्यंत कितपत पोचली याची माहिती जाणून घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा शुक्रवारपासून (१६ नोव्हेंबर) मराठा संवाद यात्रा काढणार आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात ही संवाद यात्रा काढण्यात येणार आहे.

या संवाद यात्रेदरम्यान जिल्ह्यात दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्याचेही काम करण्यात येणार असल्याचा निर्णय बुधवारी (१४ नोव्हेंबर) मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

१६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्याभरात काढण्यात येणाऱ्या संवाद यात्रेमध्ये प्रत्येक तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला असून या बैठकीमध्ये प्रत्येक तालुकानिहाय यात्रेचे नियोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्याभरातून आलेल्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले व आपापल्या तालुक्यात येणाऱ्या नियोजनाबाबत माहिती दिली. यंदा जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे मोठे संकट असून शेतकऱ्यांना आपल्या पाल्यांच्या लग्नासाठी आवश्यक असलेल्या खर्चाचा मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे बहुतांश लग्न हे कमी खर्चामध्ये करण्यासाठी सामुदायिक विवाहाच्या पर्यायाबाबतही समन्वयक शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.

या यात्रेदरम्यान नियोजन केल्याप्रमाणे त्या-त्या गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेण्यात येईल व सरकारने केलेल्या दाव्याचा किती उपयोग झाला?, शिक्षणात देण्यात येणारी शुल्क सवलत मिळते काय? सरकारने दिशाभूल केली काय? अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून कर्जपुरवठा होतो काय आदींची माहिती जाणून घेण्यात येणार आहे. बैठकीसाठी शहर, जिल्ह्यातून कार्यकर्ते, समन्वयकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

२६ नोव्हेंबरला विधानभवनावर धडकणार

राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात येणाऱ्या या संवाद यात्रेच्या दहा दिवसानंतर सदर अहवाल घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांतीमोर्चा समन्वयक २६ नोव्हेंबर रोजी विधानभवनावर धडकणार आहेत. यावेळी सरकारला जाब विचारण्यात येऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

आरक्षण ओबीसीत हवे

संवाद यात्रेच्या नियोजनासाठी असलेल्या बैठकीमध्ये अनेकांनी आरक्षणावरच बोलणे पसंत केले. बहुतांश समन्वयक, नागरिकांनी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षणाचा उपयोग होईल, स्वतंत्र आरक्षण दिल्यास राज्याबाहेर त्या आरक्षणाचा उपयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील आदी मुद्दे यावेळी मांडण्यात आले.

बैठकीत नियुक्तीवरून वाद

राज्य कार्यकारणीमध्ये शहरातील काही लोकांची निवड करण्यात आली. या निवडी आपल्याला मान्य नाही असे म्हणत निवडीवर एकाने आक्षेप घेतला. बैठकीचा विषय सोडून बोलत असल्यामुळे उपस्थितांनी यावेळी आक्षेप घेतला. यावेळी समन्वयकांनी मध्यस्ती करून सर्वांना शांत केले व बैठक पुन्हा सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात ४० हजार शेततळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फेब्रुवारी २०१६मध्ये शासनाकडून मागेल त्याला शेततळे योजना सुरू करण्यात आली. मराठवड्याला देण्यात आलेले ३९ हजार ६०० शेततळ्यांचे टार्गेट जवळपास पूर्ण झाले असून, यंदा दुष्काळी परि‌स्थिती पाहता विभागात नव्याने ४० हजार शेततळे तयार करण्याचे टार्गेट विभागीय प्रशासनाने दिले आहे.

पावसाची अनियमितेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना मुबलक पाणी त्यांच्या जवळच असावे यासाठी शासनाने शेतकऱ्यांची गरज ओळखून मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली होती. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये ३९ हजार ६०० शेततळे वाटप करण्याचे उद्दिष्ट होते. त्याच प्रमाणे यंदाही शेततळे तयार करण्यात येणार आहेत. औरंगाबाद विभागातील सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता विभागात मोठ्या प्रमाणावर शेततळी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मार्च २०१९पर्यंत ४० हजार शेततळे तयार करण्यात येणार असून, २६ जानेवारी २०१९पर्यंत पहिल्या टप्प्यात २० हजार शेततळी तयार करावीत, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी काढले आहेत.

प्रती कृषी सहाय्यक २० शेततळे करण्याचा उद्दिष्ट देऊन गावनिहाय सूक्ष्म नियोजन करावे व प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्याला आढावा घ्यावा असे निर्देश दिले आहेत.

\Bअधिकारी घेणार गाव दत्तक\B

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे यंदा विभागामध्ये मोठ्या प्रमाणार शेततळे तयार करायची आहेत. यामुळे अधिकाऱ्यांनी प्रत्येकी दोन गावे दत्तक घेऊन अशा प्रत्येक गावात १००पेक्षा जास्त शेततळी तयार करावीच. या कामाला गती देण्यासाठी लाभार्थीचा समूह करावा. संबंधित लाभार्थी, शासकीय यंत्रणा व कंत्राटदार यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करून मोहीम स्वरुपात कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. यामध्ये उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी प्रत्येकी दोन गावे दत्तक घेऊन प्रत्येक गावात शंभर शेततळी तयार करावी लागणार आहेत.

\Bजिल्हानिहाय उद्दिष्ट

\Bजिल्हा..............३१ मार्चपर्यंतचे टार्गेट

औरंगाबाद..............९५००

जालना..................६२५०

बीड......................६५००

लातूर....................४२५०

उस्मानाबाद............४०००

नांदेड....................४०००

परभणी...................३०००

हिंगोली...................२५००

एकूण.....................४००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर अत्याचार करणारे आरोपी शफीक शहा व आरोपी इमरान खान यांना मंगळावारी (१३ नोव्हेंबर) अटक करून बुधवारी कोर्टात हजर केले असता, दोघांना शुक्रवारपर्यंत (१६ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी दिले.

याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १६ वर्षांची पीडित मुलगी ही इयत्ता अकरावीत शिक्षण घेत असून, ती मुकुंदवाडी परिसरातील क्लासला जात होती. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास संबंधित मुलगी क्लासला गेली, परंतु परतली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेत मुलीच्या अपहरणाची तक्रार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. यापूर्वीही मुलीला पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. २२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मुलगी रेल्वेस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली असता तिला ताब्यात घेण्यात आले. मुलीने आई-वडिलांसोबत जाण्यास नकार दिल्याने तिला एका आश्रमात दाखल करण्यात आले.

बाल कल्याण समितीने २३ ऑक्टोबर रोजी तिची रवानगी बालगृहात केली. तिथे पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, बालगृहात मुलीचा जबाब नोंदविला असता, दोन महिन्यांपूर्वी आरोपींपैकी एकाने प्रेमाचे नाटक करीत तिच्यावर दोन वेळी अत्याचार केला, तर दुसऱ्यानेही प्रेमाचे नाटक करत अत्याचार केल्याचा जबाब तिने दिला. त्यावरून आरोपी शफीक शहा सलीम शहा (१९) व इमरान खान अजीज खान (२०, दोघे रा. हमीदिया गार्डन, बीड बायपास) यांच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bवैद्यकीय तपासणी बाकी\B

आरोपींना मंगळवारी अटक करून कोर्टात हजर केले असता, त्यांच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे व आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करणे बाकी आहे; तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी करायची असल्याने त्यांना पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील कैलास पवार यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदपत्रांमुळे रखडली चौकशी, टीडीआर घोटाळ्याचा अहवाल लांबणीवर पडणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतील टीडीआर घोटाळ्याची चौकशी कागदपत्रांमुळे रखडली आहे. त्यामुळे या घोटाळ्याचा चौकशी अहवाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. विधीमंडळात अहवाल सादर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेले असताना लालफितीच्या कारभारामुळे दुसऱ्या अधिवेशनातही अहवाल येऊ शकणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टीडीआर घोटाळ्याचे प्रकरण 'मटा' ने उघडकीस आणल्यानंतर विधीमंडळाच्या अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी महापालिकेतील टीडीआर घोटाळ्याबद्दल विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आणि या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यांची मागणी शासनाने मान्य करून नगररचना विभागाच्या सहसंचालकांच्या माध्यमातून या घोटाळ्याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. चौकशी अहवाल विधीमंडळात सादर केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. शासनाने दिलेल्या या आश्वासनानंतर अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही.

महापालिकेने टीडीआरची २२७ प्रकरणे, त्याचे रजिस्टर चौकशीसाठी सहसंचालकांच्या कार्यालयाला दिले, परंतु ज्या रस्त्यांवरच्या जागांसाठी टीडीआर देण्यात आले त्या रस्त्यांचे नकाशे, संबंधित कागदपत्रे मात्र उपलब्ध करून दिली नाहीत. ही कागदपत्रे न मिळाल्यामुळे सहसंचालकांना टीडीआर प्रकरणांची चौकशी करता आली नाही. विधीमंडळाचे अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्यामुळे सहसंचालक नरेश कावळे गेल्या आठवड्यात महापालिकेत आहे. त्यांनी रस्त्यांच्या नकाशांसह अन्य कागदपत्रांची मागणी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. दोन दिवसात सर्व कागदपत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते, परंतु प्रत्यक्षात दोन दिवसांपूर्वी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यास जेमतेम पाच दिवस शिल्लक राहिल्यामुळे पाच दिवसात चौकशी अहवाल तयार होणे अवघड असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे हा अहवाल लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.

नगररचना विभागाच्या सहसंचालकांनी टीडीआरच्या चौकशीसाठी विकास आराखड्याच्या साक्षांकित प्रती आणि सिटीसर्व्हेच्या शिटची मागणी केली होती. ही दोन्हीही कागदपत्रे आम्ही सोमवारी त्यांच्या कार्यालयाला पाठवली आहेत. टीडीआर प्रकरणांची माहिती आणि रजिस्टर यापूर्वीच चौकशीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सुमेध खरवडकर, सहाय्यक संचालक, नगररचना, महापालिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका प्रशासनाचे वरातीमागून घोडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौरांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या विशेष वसुली सप्ताहात महापालिका 'प्रशासनाचे वराती मागून घोडे' असल्याचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले. सप्ताह सुरू झाल्यावर दोन दिवसांनी प्रशासनाने झोन निहाय नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे १२ नोव्हेंबरपासून विशेष कर वसुली सप्ताह राबवण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी १५ दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेत केली होती. या सप्ताहासाठी विशेष वसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, थकबाकीदारांची यादी अद्ययावत करा, बड्या थकबाकीदारांची यादी स्वतंत्रपणे तयार करा, असे आदेश प्रशासनाला दिले होते. वसुली सप्ताह सुरू झाल्यावरही प्रशासनाने यापैकी कोणतीच तयारी केली नाही. थकबाकीदारांच्या याद्या प्रशासनाकडे तयार नाहीत. विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली नव्हती. या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश १३ नोव्हेंबर रोजी काढण्यात आले. या आदेशाच्या प्रती पदाधिकाऱ्यांना १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्राप्त करून देण्यात आल्या. सप्ताह संपण्यासाठी सहा दिवस बाकी असताना व त्यात दोन दिवस सुट्टी असताना विशेष अधिकारी (नियंत्रण अधिकारी) किती वसुली करणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या आदेशानुसार झोन क्रमांक १ साठी लेखा अधिकारी संजय पवार, झोन क्रमांक २ साठी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, झोन क्रमांक ३ साठी प्रभारी कार्यकारी अभियंता एम. बी. काजी, झोन क्रमांक ४ साठी मुख्य लेखाधिकारी सुहास केंद्रे, झोन क्रमांक ५ साठी उद्यान अधिक्षक विजय पाटील, झोन क्रमांक ६ साठी उपायुक्त रवींद्र निकम, झोन क्रमांत ७ साठी अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे, झोन क्रमांक ८ साठी उपायुक्त मंजुषा मुथा, झोन क्रमांक ९ साठी उपायुक्त डी.पी. कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पथनाट्य सादरीकरणामुळे वीस मिनीटांत जमा झाला साडेतीन लाखांचा कर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पथनाट्य सादरीकरणासह मालमत्ता कर वसुलीसाठी काढण्यात आलेल्या फेरीमुळे २० मिनीटांत सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे धनादेश जमा झाले. फेरी व पथनाट्याचे सादरीकरण पैठणगेट ते गुलमंडी दरम्यान करण्यात आले.

विशेष वसुली सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेतर्फे संपूर्ण शहरात कर वसुली आणि अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याशिवाय अनधिकृत नळ जोडण्या देखील अधिकृत केल्या जाणार आहेत. या मोहिमेची वातावरण निर्मिती व्हावी, नागरिकांनी कर भरावा यासाठी बँड पथक, ढोल - ताशा पथकासह विविध भागात फेऱ्या काढण्याचा निर्णय घेण्यात आला. फेऱ्यांबरोबरच पथनाट्य करण्याचे देखील ठरविण्यात आले. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या आदेशानुसार सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी या कामात पुढाकार घेतला. आरती पाटणकर आणि संच यांच्याशी संपर्क साधून पथनाट्य व फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. त्याची सुरुवात बुधवारी सायंकाळी पैठणगेट ते गुलमंडी या भागात करण्यात आली. महापौरांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला. प्रत्येक दुकानाच्या समोर जाऊन कलाकारांनी बँड वाजवला व कर भरण्यासाठी व्यावसायिकांना आवाहन केले. शेवटी गुलमंडी चौकात पथनाट्य सादर करण्यात आले. २० ते २५ मिनीटांच्या या उपक्रमात व्यावसायिकांनी महापौरांकडे सुमारे साडेतीन ते चार लाखांचे धनादेश जमा केले. पैठणगेट ते गुलमंडी या मार्गावर रस्त्याच्या दोन्हीही बाजूने सुमारे २५० दुकाने आहेत. या दुकानदारांकडे चालू वर्षाच्याच मालमत्ता कराची मागणी आहे, असे वॉर्ड अधिकारी आठवले यांनी सांगितले. उद्या (गुरुवारी) सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत निरालाबाजार परिसरात फेरी आणि पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे.

दिवसभरात ७३ लाखांची वसुली

बुधवारी दिवसभरात नऊ झोन कार्यालयांच्या माध्यमातून ७३ लाख ४ हजार रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली झाली. त्यात मालमत्ता कराची रक्कम ६० लाख ९१ हजार रुपये असून पाणीपट्टीची रक्कम १२ लाख १३ हजार रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापसावर मिली बग; उसावर लोकरी मावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

दिवसा उष्णता, रात्री थंडी तर काही वेळा ढगाळ वातावरण यामुळे कन्नड तालुक्यात कापूस पिकावर मिलीबग, तर उसावर लोकरी मावा या रोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव दिसून येत आहे. यामुळे कापसाची उभी झाडे वाळू लागली आहे, तर ऊस उत्पादक यामुळे हवालदिल झाले असून, उसाच्या वजनामध्ये मोठी घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कापूस पिकात मिलीबगचा प्रार्दुभाव हतनूर शिवारात दिसून येत आहे. कापसाच्या शेंड्याकडील भागावर दिसून येत असून, सर्व भाग पांढरा झाला आहे. चिकलठाण, वडाळी या भागात लोकरी माव्याचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. उसाच्या पानावर पांढरा थर जमा झाला असून, यामुळे उसाची वाढ थांबणार आहे. कापूस वेचणीचा हंगाम, ऊस गळित हंगाम सुरू होताच मिलीबग व लोकरी माव्याचे संकट उभे ठाकले आहे. यामुळे औषधी फवारणी वा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.

तालुक्यात सहा ते सात वर्षांपूर्वी मिलीबग व लोकरी माव्याच्या प्रार्दुभाव दिसून आला आहे. याबाबत औरंगाबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे किटक शास्त्रज्ञ एन. आर. यांनी प्रत्यक्ष बाधीत क्षेत्रावरील पिकांची पाहणी केल्यावरच मिलीबग, लोकरी मावा (पिठ्या ढेकूण) आहे का ते समजेल, कापूस पिकावरील मिलीबगचे जीवाणू झाडावरून खरडवून जमिनीत गाडणे किंवा नष्ट करणे हा उपाय असल्याचे 'मटा' शी बोलताना सांगितले. यंदाच्या हंगामात आल्याच्या पिकावरील मर रोग, उसावरील हुमणी अळी व लोकरी मावा, तर कापूस पिकावर मिलीबगच्या प्रार्दुभाव झाल्याने या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, पुन्हा नवीन संकटाच्या सामोरे शेतकऱ्यांना जावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचन भवनाचे कार्यालय जप्त करण्याचे आदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या जालना रोडवरील सिंचन भवनाच्या कार्यालयासह लाभक्षेत्र विकास प्राधिकारणाचे गजानन महाराज मंदिर रोडवरील कार्यालय जप्त करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी दिले. सुप्रिम कोर्टाने लवादाच्या निर्णयाप्रमाणे रक्कम कंत्राटदारास देण्याचे आदेश दिले होते. या रक्कमेच्या वसुलीसाठी जिल्हा कोर्टात अर्ज केला असता कार्यालय जप्तीचे आदेश देण्यात आले.

मालेगाव व गंगाखेड येथील कोठाळा कालवा बांधण्याचे ४० कि. मी. कामाचे कंत्राट शिंदे अॅण्ड सन्स कंपनीला देण्यात आले होते. कंपनीकडून हे काम करून घेण्यात आले. चालू वर्षाचे दर व डीएसआरमध्ये फरक पडल्याने कंपनीकडून जास्तीचे काम करून घेण्यात आले. असे केल्यानंतर कंत्राटदार कंपनीचे देणे मात्र संबंधित विभागाकडून अदा करण्यात आले नाही. कामासंबंधी वाद निर्माण झाल्याने त्यासाठी भारतीय लवाद कायद्यानुसार लवाद नेमण्यात आला. लवादाने महामंडळाच्या विरोधात निकाल दिल्याने त्याविरोधात महामंडळाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने साठ टक्के रक्कम कंत्राटदारास देण्याच्या आदेशाविरोधात महामंडळाने सुप्रिम कोर्टात अपील केले. सुप्रिम कोर्टाने महामंडळासंबंधीचा खंडपीठाचा निर्णय योग्य ठरवित खंडपीठाने आदेशित केल्यापेक्षा जास्त रक्कम कंत्राटदारास देण्याचे आदेश दिले. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने कार्यकारी संचालक अ. प्र. कोहीरकर, कार्यकारी अभियंता पी. बी. जाधव यांच्याविरोधात अवमानप्रकरणी नोटीस बजावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबसची पाहणी करण्यासाठी आयुक्त धारवाडमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्टसिटी मिशनमधून औरंगाबाद शहरात सुरू करण्यात येणाऱ्या सिटीबसची पाहणी स्मार्टसिटीच्या एसपीव्हीचे मुख्याधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बुधवारी धारवाड मध्ये जाऊन केली. पाच बसेस नोव्हेंबर अखेरपर्यंत शहरात दाखल होणार असून उर्वरित ५० बस डिसेंबरअखेर उपलब्ध होणार आहेत.

स्मार्टसिटी मिशनमधून १०० सिटीबस सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या या स्पेशल पर्पज व्हेकलच्या माध्यमातून घेण्यात आला. सिटीबस उपलब्ध करून देण्याचे कंत्राट टाटा कंपनीला देण्यात आले. १०० पैकी पहिल्या टप्प्यात ५० बस टाटा कंपनी उपलब्ध करून देणार आहे. बस बांधणीच्या कामाची पाहणी करण्यासाठी डॉ. निपुण विनायक थेट धारवाडला गेले आहेत. या ठिकाणी टाटा कंपनीचा बस बांधणीचा प्लांट आहे. बस बांधणीच्या कामाची पाहणी केल्यावर त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी संपर्क साधला. बसचे फोटोही त्यांनी महापौरांनी पाठवले. काही किरकोळ दुरुस्त्या आयुक्तांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचविल्या. त्यात प्रामुख्याने 'माझी सिटी,स्मार्ट सिटी' हे घोषवाक्य बसवर लिहीण्याची सूचना करण्यात आली. स्मार्टसिटीचा लोगो बसवर ठळकपणे लावण्याची सूचना आयुक्तांनी केली.

आयुक्तांनी सुचविलेल्या दुरुस्त्याकरून पाच सिटीबस नोव्हेंबर अखेरपर्यंत प्राप्त होतील असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. उर्वरित ४५ बसेस डिसेंबर महिन्याच्या अखेरीस प्राप्त होतील, असे महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संभाजीनगर’चा ठराव पालिकेच्या सभेत घेणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत घेणार आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी 'मटा'शी बोलताना दिली. भाजपतर्फे देशातील विविध शहरांची नावे बदलण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवेसनेने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव, असे नामांतर करण्याची जुनी मागणी लाऊन धरली आहे.

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा पहिला ठराव १२ जून १९९५ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाला होता. त्यानंतर अशाच प्रकारचा ठराव चार जानेवारी २०११ रोजी पुन्हा घेण्यात आला. परंतु, या दोन्हीही ठरावांची अंमलबजावणी झाली नाही. याबद्दल महापौर घोडेले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, यापूर्वी घेण्यात आलेल्या दोन्हीही ठरावांची वैधता विधी विभागाच्या माध्यमातून तपासली जाईल. कायदेशीरबाबी तपासल्यानंतर पूर्वीचे दोन्हीही ठराव दप्तर जमा झाले आहेत, असे लक्षात आले तर आगामी सर्वसाधारण सभेत औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा ठराव पुन्हा नव्याने घेण्यात येईल व अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठवला जाईल. सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेवून ठराव मंजूर करू, असे घोडेले यांनी सांगितले.

या शहराचे नाव 'संभाजीनगर'च असावे असे आदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. त्यांनीच या शहराचे नाव 'संभाजीनगर' असे केले आहे. त्यांच्या आदेशाचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे, असा उल्लेख घोडेले यांनी केला.

\Bशिवेसनेची तयारी \B

देशातील विविध शहरांची नावे बदलली जात असल्याने औरंगाबादच्या नामांतराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यावर स्थानिक भाजप नेत्यांनी महापालिकेने ठराव घ्यावा, असे मत व्यक्त करत शिवसेनेच्या कोर्टात चेंडू टोलावला होता. या राजकीय खेळीला उत्तर देण्याची शिवेसेनेने पूर्ण तयारी केल्याचे महापौरांच्या वक्तव्यावरून वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेगा फूड पार्कचे आज उद्घाटन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या फूड पार्क योजनेअंतर्गत पैठणरोडवरील धनगाव येथे शंभर एकरवर उभारण्यात आलेल्या पैठण मेगा फूड पार्कचे गुरुवारी केंद्रीय मंत्री हरसमित कौर बादल यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. नाथ ग्रुप या फूड पार्कचे मुख्य प्रवर्तक असून जागतिक दर्जाच्या सर्व सुविधांनी येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा राज्यातील सर्वात मोठा फूड पार्क आहे.

शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत जाईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळेच शेतमालावर प्रक्रिया करून त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्याची संकल्पना या फूड पार्कमागे आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रावसाहेब दानवे व चंद्रकांत खैरे, आमदार संदीपान भुमरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाथ उद्योग समुहाचे चेअरमन नंदकिशोर कागलीवाल यांनी दिली.

या फूड पार्कसोबत आतापर्यंत पाचशे शेतकरी प्रत्यक्षपणे जोडले गेले आहेत. त्यांच्या माध्यमातुन पाचशे एकरवर मधु मकाची तंत्रशुद्ध लागवड करून त्यावर फूड पार्कमध्ये प्रक्रिया केली जात आहे.

\Bउपलब्ध सुविधा \B

फूड पार्कमध्ये अद्ययावत मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र आहे. याशिवाय तीन प्राथमिक प्रक्रिया केंद्रे अनुक्रमे इसारवाडी, कन्नड आणि आळेफाटा येथे आहेत. पार्कमध्ये फूड टेस्टिंग लँब, फ्रोझन व कोल्ड स्टोअरेजेस, मॉडर्न वेअर हाउस, सॉर्टग व ग्रेडिंग लाइन्स, टेट्रापैक, दुध प्रक्रिया सुविधा उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांच्या शेताजवळ संकलन केंद्रे उभारली असून त्या माध्यमातून शेतमाल फूड पार्क पर्यंत पोहचवला जात आहे.

\Bगुंतवणुकीवर सूट \B

अन प्रक्रिया उद्योगात फूड पार्कमध्ये गुंतवणूक केल्यास राज्य व केंद्र सरकारकडून अनेक आर्थिक सवलती व फायदे मिळणार आहेत. प्रामुख्याने भांडवली गुंतवणुकीवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत, मुदत कर्जावर साडे चार टक्केपर्यंत व्याजदर, आयकर व स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट, एसजीएसटी परतावा, वीजदरात सवलत मिळणार आहे.

\Bभूखंड उपलब्ध \B

फूड पार्कमध्ये दोन ते वीस हजार चौरस मिटर आकाराचे औद्योगिक भूखंड रास्त दरात उपलब्ध आहेत. छोट्या गुंतवणुकदारांसाठी तयार शेड्स आहेत. नवीन गुंतवणुकदारांसाठी सर्व प्रकारचे तांत्रिक सहाय्य, आवश्यक परवाने व आर्थिक पतपुरवठा संबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी महामंडळावर लक्ष्मी प्रसन्न

0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

दिवाळीच्या काळात प्रवाशांना विविध बस उपलब्ध करून दिल्यामुळे एस. टी. महामंडळावर लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा महामंडळाने यंदा दोन कोटी रुपयांची अधिक कमाई केल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली.

दिवाळीनिमित्त शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची बस स्थानकावर चांगलीच गर्दी होती. गर्दीचा अंदाज घेऊन औरंगाबाद विभागाने पुणे, मेहकर, जळगाव, नागपूरसह इतर मार्गावर जादा बस उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात भर पडली.

गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात औरंगाबाद विभागाने २२ लाख किलो मिटर बस चालवली. त्यातून महामंडळाला सहा कोटी ८४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा २५ लाख २१ हजार किलो मिटर बस चालवली आहे. यातून आठ कोटी ८३ लाख २१ हजारांचे उत्पन्न मिळाले. या शिवाय मध्यवर्ती बसस्थानकाला गेल्या दिवाळीत आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा येथून १९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली. जादा उत्पन्न आणणाऱ्या वाहक चालकांसह पर्यवेक्षक, अन्य अधिकाऱ्यांचा विभाग नियंत्रकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

\Bअजिंठ्यात जादा वाहतूक \B

दिवाळीच्या सुट्यांत अजिंठा लेणीत पर्यटकांची विक्रमी गर्दी झाली. येथून प्रवासी वाहतुकीसाठी जादा दहा बस उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून दोन लाख ६३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

\Bएस. टी. ची धाव

गेल्या वर्षी

२२ लाख कि. मी.

अंतर

६ कोटी ८४ लाख रुपये

उत्पन्न

यंदा

२५ लाख २१ हजार कि. मी.

अंतर

८ कोटी ८३ लाख रुपये

उत्पन्न \B

………

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यसनापोटी चोरले ११ तोळ्यांचे दागिने

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तरुण वयात गांजाच्या व्यसनाने पछाडले, मित्रांची सव्याज उधारी, यातून तरुणाचे चक्क दिवाळी सणाच्या काळात घरातील ११ तोळयांच्या दागिन्यावर डल्ला मारला. घराच्या मागच्या गार्डनमध्ये त्याने हे दागिने लपवून ठेवले, मात्र सिडको पोलिसांनी बारकाईने तपास करूत हा गुन्हा उघडकीस आणला. या मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सिडको परिसरातील एन सहा भागात गेल्या मंगळवारी एका कुटुंबात चोरीची घटना घडली होती. या घरातून चोरट्यांनी सणासुदीच्या काळात ११ तोळ्यांचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिडको गुन्हे प्रकटीकरण पथक या प्रकरणाचा तपास करीत होते. या कुटुंबात एक १७ वर्षांचा, बारावीत शिकत असलेला तरुण होता. या तरुणाच्या वागणुकीवर पोलिसांना संशय येत होता. बाहेरगावी असलेल्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी पथकाला या तरुणाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. निरीक्षक परदेशी हजर झाल्यानंतर त्यांनी या तरुणाला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. निरीक्षक परदेशी यांनी या मुलाची स्वत: चौकशी केली. यामध्ये या मुलानेच आपण घरी चोरी केल्याची कबुली दिली. या मुलाच्या ताब्यातून ११ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी गुणाजी सावंत, निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भारत पाचोळे, पूनम पाटील, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, स्वप्नील रत्नपारखी, किशोर गाढे विशेष पोलिस अधिकारी विजय तुपे, साळोबा जाधव आदींनी केली.

\Bगार्डनमध्ये ठेवले लपवून

\Bया मुलाला गांजाचे व्यसन लागले आहे. त्यामध्ये मित्राकडून उधार पैसे घेतल्यास त्याचे दामदुप्पट त्याला द्यावे लागत होते. त्यामुळे त्याने घरातच चोरीचा मार्ग पत्कारला. चोरलेले दागिने त्याने घराच्या मागे असलेल्या उद्यानातील एका पाण्याच्या पाइपमध्ये लपवून ठेवले. या दागिन्याची त्याला विल्हेवाट लावायची होती, मात्र त्यापूर्वी त्याच्या पालकांनी त्याला बाहेरगावी पाठवले होते. त्यामुळे त्याची योजना फसली आणि त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

चौकट

कुलूप तुटले नसल्याने संशय

या घरफोड्याची गुन्ह्यामध्ये चोरट्याने चॅनल गेटपासून ते मुख्य दरवाजा, कपाटाचा दरवाजा, आतमधील ड्रॉव्हर आदींचे कुलूप चावीने उघडले होते. एकही कुलूप तुटलेल्या स्थितीत नसल्याने पोलिसांना या चोरीमागे घरातील व्यक्ती असल्याचा संशय आला होता. त्यामुळे त्यानी या मुलावर पाळत ठेवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साजापूरमध्ये दहा लाखांची चोरी

0
0

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथील शेख जमीन शेख गुलाब यांच्या घरात चोरट्यांनी मागील बाजूने प्रवेश करून कपाटातील पाच लाखाच्या रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून अंदाजे दहा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख जमील शेख गुलाब यांची साजापूर येथे घराजवळच एक छोटी पान टपरी आहे. रात्री टपरी बंद करून साधारण १२च्या सुमारास घरी गेले. त्यानंतर जेवण करून कुटुंबासोबत अंदाजे एक वाजता शेजारील खोलीत झोपी गेले. सकाळी पुन्हा टपरी उघडायची असल्याने जमील शेख अंघोळ करण्यासाठी गेले व पत्नी सुलतानाला टॉवेल, कपडे आणण्यास सांगितले. सुलताना खोलीच्या कुलुपाची किल्ली घेऊन दरवाजा उघडण्यासाठी गेल्या असता कुलूप तोडलेले दिसल्याने खोलीत पहिले असता कपात उघडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पती जमील याना आवाज देऊन आत बोलवून घेतले. घरात चोरी झाल्याचे जमील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ मोठा भाऊ संजापूरचे ग्राम पंचायत सदस्य मुसा शेख याना फोन केला. मुसा शेख यांनी घरी येऊन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यास चोरी झाल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतीगुरू साळवे यांना अभिवादन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीगुरू लहुजी साळवे यांना जयंतीनिमित्त विविध पक्ष, संघटनांनी बळीराम पाटील शाळेसमोरील असलेल्या त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सोपान शेजवळ यांच्या हस्ते क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबुराव खरात, फुलचंद जाधव, दशरथ मानवतकर यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उत्तम असबे यांनी केले. क्रांतीगुरू साळवे यांच्या जीवनाकार्यावर प्रा. बी.आर. पारसकर यांनी प्रकाश टाकला. तान्हाजी गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाचण डोणगावकर, कैलास गजहंस यांनी परिश्रम घेतले. क्रांतीगुरू लहुजी साळवे यांची जनसामान्यांपर्यंत ओळख व्हावी यासाठी त्यांच्या जीवनावरील माहिती पुस्तिका पुरवण्यासाठी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी सहकार्य केले. यावेळी क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या जयजयकाराने परिसर दणाणुन गेला होता.

बळीराम पाटील शाळेसमोरील चौकात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात क्रांती संघटनाप्रमुख राहुल साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ए. आर. वासनकर, रोहित यादव, सचिन दाभाडे, तुषार आदके, किशोर बागुल, अक्षय कांबळे, रेखाताई भिंगारदेवे, अॅड. श्वेता भिंगारदेवे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणारा गजाआड; ३८ हजाराचा ऐवज जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेडा भागात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपीने दिवाळीच्या काळात केलेल्या घरफोडीची कबुली देत ३८ हजार रुपयाचा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला.

नऊ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत गारखेडा भागात घरफोडीची घटना घडली होती. चोरट्यांनी तीन स्टीलच्या डब्यातील १७ हजारांची नाणी व दागिने असा ऐवज लंपास केला होता. या चोरीमागे संशयित आरोपी ऋषिकेश संतोष पालोदकर (वय २०, रा. पुंडलिकनगर) याचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने पालोदकर याला अटक केली. त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी रामचंद्र गायकवाड, पोलिस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रभाकर सोनवणे, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, विकास चव्हाण, रजुसिंह सुलाणे, कल्याण निकम, शिवाजी गायकवाड, कल्पना जांबोटकर, शिवाजी बुट्टे, अशोक जाधव आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर थकला, चंपावती हॉटेलला सील

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील चंपावती लॉन्स या हॉटेलकडे मालमत्ता कराची २२ लाख ७२ हजार रुपयांची थकबाकी असल्यामुळे महापालिकेच्या झोन क्रमांक ६ च्या झोनअधिकाऱ्यांनी या हॉटेलला बुधवारी सील ठोकले. हॉटेल मालकाकडे २०१२ या वर्षापासून मालमत्ता कराची थकबाकी होती. वारंवार पाठपुरावा करूनही कर भरण्यात येत नसल्यामुळे हॉटेल सील करण्याची कारवाई करण्यात आली. वसुली नियंत्रण अधिकारी रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झोन अधिकारी मीरा चव्हाण व अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. हॉटेलला सील करण्याची कारवाई सुरू असताना माजी महापौरांच्या मुलाने पालिकेच्या पथकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images