Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

६६३ गावांत दुर्भिक्ष्याची चिन्हे

$
0
0
नवीन वर्ष उजाडताच मराठवाड्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकरच्या मदतीने पाणी पुरविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, यंदा मराठवाड्यातील ६६३ गावांत पाणी टंचाई निर्माण होईल, असा अंदाज आहे.

सावित्रीच्या लेकींना शिकण्याचे आवाहन

$
0
0
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये ‘लेक शिकवा’ अभियान राबवण्यात आले. शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

वक्तृत्वातून सुनावले खडे बोल

$
0
0
पाश्चिमात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, रिअॅलिटी शोचे वाढलेले प्रमाण यामध्ये गुंग होताना तरुण पिढीचे वाचनाकडे लक्ष निश्चितच कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा लागेल. वाढती स्पर्धा, धकाधकीच्या जीवनात मुले आपल्याच आई-बाबांकडे दुर्लक्ष करताहेत, त्यामुळे एका कायद्याची आवश्यकता आहे

मुंडेनी केलेला विकास दुर्बिणीतून पाहायला हवा

$
0
0
‘बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केवळ जातीपातीचे राजकारण केले. त्यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात केलेला विकास बघायचा असेल, तर दुर्बिण मागवावी लागेल,’ अशा खरपूस शब्दांत माजी मंत्री आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका केली.

‘मंठा मटक्या’चा पैठणमध्ये जोर

$
0
0
जिल्हा पोलिस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात केलेल्या कडक कारवाईमुळे जिल्हाभर अवैध धंदे बंद झाले असतानाच, पैठण शहरात गेल्या काही दिवसांपासून मंठा मटका नावाचा जुगार जोरात सुरू आहे.

घरफोडीमध्ये १.२५ लाखाचा ऐवज लंपास

$
0
0
मयुरपार्क भागामध्ये घर फोडून सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी सायंकाळी ते सोमवारी दुपारच्या दरम्यान घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पडेगाव भागात व्हॅन-दुचाकी अपघात

$
0
0
पडेगाव भागात मारोती व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या घटनेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला असून. एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोरुग्ण महिलेची मुलांसमोर आत्महत्या

$
0
0
हडको एन ११ भागात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीला आला. पती बाहेर गेला असता, दोन चिमुकली मुले घरात खेळत असताना हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चोरीची दुचाकी भाच्याला ‘भेट’

$
0
0
बँकेच्या मॅनेजरची दुचाकी चोरून माजी सैनिकाने ती चक्क भाच्याला भेट दिली. मात्र, या मामाचा हा ‘प्रताप’ बँकेच्या आवारात असलेल्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. बँक मॅनेजरने स्वतः या प्रकरणी पुढाकार घेत आरोपी शोधून काढला.

गुरुजी अधिवेशनाला, विद्यार्थी ‘झेडपी’ला

$
0
0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अधिवेशन वाई (जि. सातारा) येथे भरत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील गुरुजी सुटीवर गेले आहेत. औरंगाबाद तालुक्यात याचा सर्वाधिक फटका बसला असून, आडगाव सरक येथील सर्वच शिक्षक गायब असल्याने दोन दिवसांपासून त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी चक्क जिल्हा परिषद गाठली.

दुचाकी चोर गजाआड

$
0
0
चोरीची दुचाकी विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीला विशेष पथकाने अटक केली. एमजीएम कॉलेजच्या आवारातून दोन वर्षांपूर्वी त्याने ही दुचाकी चोरली होती. फादर प्रभाकर दत्ता पाटील यांनी मार्च २०१२ मध्ये दुचाकी चोरीला गेली होती.

गुंठेवारी भरण्याच्या परवानगीची मागणी

$
0
0
प्रभाग क्रमांक ८४ बाळकृष्णनगर मधील अजिंक्यनगर, पहाडे कॉर्नर, भुषणनगर या भागातील आरक्षण उठवून गुंठेवारी भरण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे निवेदन नगरसेवक पंकज भारसाखळे यांनी नागरिकांसह महापौर कला ओझा व स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांना दिले.

त्रस्त वीज ग्राहक तक्रार देण्यास वैतागले

$
0
0
महावितरण असो, की जीटीएल, वीज ग्राहक प्रचंड वैतागले आहेत. फॉल्टी मीटर, जास्तीचे बिल देणे, वेळेवर कनेक्शन न मिळणे, जळालेली डीपी बदलून न मिळणे, अशा एका अनेक समस्यांनी ग्राहक हैराण असतात.

सिल्लोडच्या प्रचारात लोकसभेची गणिते

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री राजेश टोपे यांनी सिल्लोड नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतली खरी; मात्र त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे गणित लक्षात ठेऊन आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही.

‘इनोव्हेशन’मुळेच ‘दुनिया मुठ्ठी में’

$
0
0
भारतातील प्रत्येक व्यक्तीमध्ये ‘इनोव्हेशन’ वृत्ती आहे. छोट्या-मोठ्या गोष्टीतून आपल्याकडे इनोव्हेशन होते, पण त्याची ओळख होत नाही.

रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक

$
0
0
नोकरीसाठी उत्सूक उमेदवारांना शासकीय तसेच खासगी क्षेत्रातील उपलब्ध रिक्त पदांची माहिती मिळावी तसेच उद्योजकांना रिक्तपदांची जाहिरात ऑनलाईन करता यावी यासाठी रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाने संकेतस्थळ सुरू केले आहे. त्याद्वारे रोजगारांच्या अनेक संधी बेरोजगारांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घरेलू कामगारांचे आज आंदोलन

$
0
0
अन्न सुरक्षा कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी मोलकरणी व घरेलू कामगार संघटनेतर्फे आज (बुधवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

दफनभूमी विटंबना : १ अटकेत

$
0
0
क्रांती चौक परिसरातील ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची विटंबना करीत अतिक्रमण केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सिंचन विभागात पाणी पुन्हा मुरले

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागात कधी काय होईल ते सांगता येत नाही, अशी उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. बंधाऱ्यांच्या दुरुस्ती, कोल्हापुरी गेट गायब होणे, टेंडरच्या गडबडी हे कमी होते की काय, आता नवीन प्रकरण समोर आले आहे. छोट्या टेंडरसाठी आकारल्या जाणाऱ्या पैशाला गेल्या तीन वर्षांत पाय फुटले.

इनोव्हेशनसाठी १ कोटी उभारणार

$
0
0
इनोव्हेशनला चालना आणि नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) एक कोटीचा ‘एन्जल इन्व्हेस्टमेंट’ निधी उभारणार आहे. ही घोषणा ‘सीएमआयए’चे अध्यक्ष मिलिंद कंक यांनी मंगळवारी ‘इनोव्हेशन समिट’मध्ये केली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images