Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

२८ कोटी खर्चून उभारले श्रीराम कृष्ण ध्यान मंदिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रामकृष्ण मिशन आश्रमने बीड बायपास रोडवर उभारलेल्या श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्ताने शुक्रवारपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी ३५० साधू, पाच हजार गृहस्थाश्रमी येणार आहेत, अशी माहिती औरंगाबादच्या रामकृष्ण मिशन आश्रमाचे सचिव, प्रमुख स्वामी विष्णुपादानंद यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मंदिर उभारणीसाठी तब्बल नऊ वर्षे लागले असून, त्यासाठी २८ कोटी खर्च आला आहे. हे मंदिर सार्वजनिक असल्यामुळे ते सर्व धर्मांतील स्त्री, पुरुषांसाठी खुले असणार आहे.

स्वामी विष्णुपादानंद म्हणाले, '१६ नोव्हेंबर रोजी विवेकानंददिन होणार आहे. यानिमित्त विवेकानंद यांच्यावरील नाटिका, जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात येणारे कार्यक्रम, ध्यान, मंगलारती, भजन, संकिर्तन आदी कार्यक्रम दिवसभर चालणार आहेत. सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम १७ नोव्हेंबरला आहे. या दिवशी सकाळी दहा वाजता नूतन मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील मिशनच्या केंद्रातून ३५० साधू, पाच हजार गृहस्थाश्रमी येणार आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगालमधील बेलूर येथील रामकृष्ण मठाचे तीन वरिष्ठ उपाध्यक्ष, स्वामी वागीशानंद महाराज, स्वामी गौतमानंद महाराज आणि स्वामी शिवमयानंद महाराज यांच्यासह मिशनचे सरचिटणीस स्वामी बलभद्रानंद महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले हे औरंगाबादकरांचे प्रतिनिधी म्हणून मंचावर राहतील. शिवाय महिकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र बारवाले उपस्थित राहणार आहेत.'

रोमन, गॉथिक, इस्लामी स्थापत्य

स्वामी विवेकानंदांनी जगभरातील स्थापत्य शैलींचा अभ्यास केला आणि आपल्या संकल्पनेतील मंदिराला बेलूर येथे मूर्त रूप दिले. रोमन शैलीतील कळस, गॉथिक आणि राजपूत शैलीतील घुमट, तर इस्लामी स्थापत्याचीही काही वैशिट्ये या बांधकामात आहेत. या मंदिरासाठी मिर्झापूर (वाराणसी) येथील चार हजार टन चुनार दगड, ३२० टन मार्बल, ग्रॅनाइट, सागवान लाकूड आदी साहित्य लागलेले आहे. मंदिरात श्रीरामकृष्णांची समाधी अवस्थेतील सव्वातीन फूट मूर्ती आहे. बेलूर येथील मठानंतरचे औरंगाबादेतील मंदिर सर्वात मोठे आहे. असे स्वामी विष्णुपादानंद यांनी सांगितले. सोन्याचा मुलामा असलेल्या मुख्य कळसासह ३६ कळस येथे असून, मंदिराचे बांधकाम क्षेत्र १८ हजार चौरस फूटाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोने तस्करांची जामिनावर सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एक कोटीच्या सोन्याची अबुधाबीहून तस्करी करणाऱ्या शेख फय्युम आणि शेख जावेद इस्माइल यांची २४ तासांच्या चौकशीनंतर बुधवारी जामीनावर मुक्‍तता करण्यात आली. या तस्करांकडून जप्त करण्यात आलेले तीन किलो सोने शासकीय तिजोरीत जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एअर इंडियाच्या दिल्ली - औरंगाबाद विमानातून प्रवास करणारे दोन प्रवासी सोन्याची तस्करी करत आहेत, अशी माहिती महसूल अन्वेषण संचालनालयाच्या (डीआरए) अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार 'डीआरए'च्या पुणे येथील अधिकाऱ्यांनी सीमाशुल्क विभागाच्या मदतीने सापळा रचला आणि तस्करी करणाऱ्या शैख फैयूम आणि शेख जावेद यांना औरंगाबाद विमानतळावर रात्री साडेआठ वाजता जेरबंद केले. या आरोपींकडून विदेशी बनावटीचे तीन किलो सोने जप्त करण्यात आले होते. या सोन्याचे १२ तुकडे करून ते हँडबॅगमध्ये लपवण्यात आले होते. एक किलो वजनाच्या सोन्याचे प्रत्येकी चार असे १२ तुकडे केले होते.

\Bअसे आणले सोने भारतात

\Bफय्युम आणि जावेद हे तस्कर एअर इंडियाच्या विमानातून अबुधाबीहून मुंबईत जाण्यासाठी बसले होते. विमानात सीटखालील पोकळ गोलआकार पाइपमध्ये त्यांनी हे सोने लपवले होते. मुंबईत उतरण्यापूर्वी एका हँडबॅगमध्ये सोने भरले होते. मुंबई येथून हे तस्कर विमानाने औरंगाबादेला रवाना झाले. औरंगाबादला जाणाऱ्या विमानातून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती 'डीआरए'च्या अधिकाऱ्याना खबऱ्याकडून समजली आणि पथकाने त्याचा पाठलाग करत ही कारवाई केली. दरम्यान, औरंगाबाद विमानतळावर पंचनामा करून सोने जप्त केल्यानंतर आरोपींना पुणे येथील 'डीआरए'च्या मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्यांची कसून चौकशी करण्यात आली. सोन्याची अबुधाबी येथून तस्करी केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी पाचवाजता त्यांची मुक्‍तता करण्यात आली. तस्करांकडून जप्त केलेले सोने सरकार खाती जमा केले जाणार असून, प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे 'डीआरए'च्या सूत्रांनी सांगितले.

\Bसोने मागवणारे रडारवर

\Bऔरंगाबाद विमानतळावर सोने तस्करी उघडकीस येण्याची ही पहिलीच घटना आहे. सोने येथे कोणाला देण्यात येणार होते किंवा येथून अन्य कुठे पोचत केले जाणार होते. याचा तपास सुरू असून, सोने मागविणारे आता 'डीआरए'च्या रडारवर आले आहेत. सोने तस्करीचे मोठे रॅकेट असावे, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलासमोरच आईवर बलात्कार; नराधमाला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तिच्या मुलासमोरच तिच्यावर अत्याचार करणारा नराधम चरण प्रेमसिंग सोणावले याला गुरुवारी (१५ नोव्हेंबर) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (१९ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले.

या प्रकरणी २४ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, पीडितेचा पती मोक्काच्या खटल्यात गेल्या तीन वर्षांपासून हर्सुल कारागृहात आहे. पीडितेचा एक मुलगी व मुलगा आहे. विवाहितेला आरोपी चरण प्रेमसिंग सोणावले (२५, रा. सुलीभंजन, ता. खुलताबाद) हा परिचित असून, आरोपी हा विवाहितेवर एकतर्फी प्रेम करत होता.

दरम्यान, ६ नोव्हेंबर रोजी विवाहिता दिवाळीनिमित्त दोन्ही मुलांसह माहेरी आली होती. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास विवाहिता मुलाला घेऊन गारखेडा परिसरात राहणाऱ्या भावाकडे भाऊबिजेसाठी आली होती. ती सायंकाळी सहाच्या सुमारास मुलाला घेऊन पतीवरील दाखल दोषारोपपत्र आणण्यासाठी जिल्हा कोर्टात पायी जात होती. तेव्हा दर्गा रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयाजवळ आरोपी चरण सोणावले हा कार घेऊन तेथे आला. 'कोर्टात सोडतो' असे म्हणत त्याने विवाहितेला गाडीत बसण्यास सांगितले. गाडीत बसल्यानंतर आरोपीने विवाहितेला व तिच्या मुलाला बाटलीतील पाणी पिण्यासाठी दिले. पाणी प्याल्यानंतर ती व तिचा मुलगा बेशुद्ध झाले. तिला शुद्ध आली तेव्हा ती एका मोडक्या घरात, अंधाऱ्या खोलीत होती. त्यावेळी आरोपीने 'तू जास्त शहराणपणा करते, माझ्याशी बोलत नाही, तुझ्या भावाने मला टिकावने मारले, मी तुझी वर्षभरापासून वाट पाहतोय' असे म्हणत शिविगाळ केली. विवाहितेने आरडा-ओरड केली, मात्र आरोपीने मुलाला मारण्याची धमकी देत तिला दोरीने बांधून गंभीर मारहाण केली व मुलासमोरच अत्याचार केला. त्यामुळे विवाहिता बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिने पाणी मागितले. आरोपी पाणी आणण्यासाठी गेला असता गळ्यातील सोन्याची पोत व चांदीचे जोडवे चोरीला गेल्याचे लक्षात आले. तिने मुलाला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांना पकडून शिऊर बंगल्याजवळील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथून तिला वरझडी येथील आत्याच्या घरी आणले. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी आरोपीने विवाहितेला तिच्या माहेरी आणून सोडले. विवाहितेने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला.

\Bपोत, जोडवी जप्त करणे बाकी

\Bया प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपी हा गंड प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली कार, बेल्ट, काठी, फरशीचा तुकडा जप्त करणे व पीडितेवर कोणत्या ठिकाणी अत्याचार केला, याचा तपास करणे बाकी आहे. त्याचवेळी आरोपीने चोरलेली पोत व जोडवी जप्त करावयाची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाण्यातील कचरा प्रक्रिया प्रकल्प ढेपाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चाचणीच्या आठ दिवसांतच चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प ढेपाळला आहे. येथे दररोज सोळा टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित असताना सध्या केवळ आठ ते दहा टन कचऱ्यावरच प्रक्रिया होत आहे. त्यामुळे कचरा प्रक्रियेच्या कामात महापालिकेला किमान ५० टनांचा फटका बसला आहे. यामुळे प्रक्रियेच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बेलिंग, श्रेडिंग आणि स्क्रिनिंग मशीनचा एक समूह एका झोन कार्यालयाच्या क्षेत्रात स्थापन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार नऊ झोन कार्यालयांसाठी तीन मशीन्सचे नऊ समूह खरेदी केले जाणार आहेत. त्यापैकी एक समूह प्राप्त झाला असून त्या मशीन चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रात स्थापित केल्या आहेत. या मशीनची पाच नोव्हेंबर रोजी आयुक्त आणि महापौरांच्या उपस्थितीत चाचणी घेण्यात आली. त्यावेळी येथे दररोज सोळा टन कचऱ्यावर या मशीनद्वारे प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, चाचणीनंतरच्या आठ ते दहा दिवसांतच कचरा प्रक्रिया मशीन पूर्ण क्षमतेने चालवण्यात येत नसल्याचे लक्षात आले आहे. याबद्दल पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी गुरुवारी महापौरांना माहिती दिली. पाच नोव्हेंबरपासून आतापर्यंत १२० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित होते; प्रत्यक्षात ७० ते ८० टन कचऱ्यावरच प्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. या तिन्ही मशीन वेस्टबिन सोल्युशन्स या कंपनीच्या आहेत. या कंपनीचे औरंगाबादेतील प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला महापौरांनी फोन लावला आणि पूर्ण क्षमतेने कचरा प्रक्रियेचे काम केले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कामात प्रगती करण्याची सूचना त्यांनी केली. आठ ते दहा दिवसांतच कचरा प्रक्रिया मशीनचे काम ढेपाळल्यामुळे एकूणच कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

\Bकचरा वाहतुकीसाठी एका झोनमध्ये २५ वाहने

\B

कचरा वाहतूक आणि संकलनाकरिता महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला काम दिले आहे. ही कंपनी कचरा संकलनासाठी प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात २५ वाहने उपलब्ध करून देणार आहे. ही वाहने कशी असावीत, तिचे डिझाइन पालिकेतर्फे कंपनीला दिले जाणार आहे. या वाहनांचे डिझाइन इंदूरच्या धर्तीवर असावे, असा प्रयत्न केला जाणार असल्याचे नंदकिशोर भोंबे यांनी स्पष्ट केले.

\B१२० टन

कचऱ्यावर प्रक्रिया अपेक्षित

७० ते ८० टन

कचऱ्यावर प्रत्यक्ष प्रक्रिया \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन बांधकाम परवानगीला अल्प प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन बांधकाम परवानगी घेण्यासाठी महापालिकेला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी देखील पालिका प्रशासनाकडे नागरिकांकडून फारच कमी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

नगररचना विभागातून दिल्या जाणाऱ्या सर्व परवानग्या आणि प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनस्तरावरूनच या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जात होता. त्यामुळे दोन ऑक्टोबरपासून बांधकाम परवानगीसह अन्य परवानग्या ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे महापालिकेने ठरविले. यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांमागे लकडा लावला. नागरिकांशी संबंधित असलेली सर्व कामे ऑनलाइन झाली पाहिजेत, असा आयुक्तांचा आग्रह आहे. या आग्रहातून बांधकाम परवानगी ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे काम नगररचना विभागाने सुरू केले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन ऑक्टोबरपासून आतापर्यंत ऑनलाइन बांधकाम परवानगीसाठी केवळ १५ प्रस्ताव नगररचना विभागाला प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांची छाननी केली जात आहे. ऑनलाइनची पद्धत सुरू नसताना दर महिन्यात बांधकाम परवानगीचे प्रस्ताव जास्त संख्येने प्राप्त होत होते. त्यातून पालिकेला महसूल देखील मिळत होता. ऑनलाइन प्रक्रियेची पुरेशी माहिती नागरिकांना नसल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. ऑनलाइन परवानगीसाठी अर्ज करताना आर्किटेक्टच्या माध्यमातूनच अर्ज करावा लागतो, त्याची सवय नागरिकांना अद्याप झालेली नाही.

अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी प्रशमन शुल्क भरून घेण्याचे धोरण शासनाने आखून दिले आहे. या धोरणात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेने काही बदल करून बांधकामे अधिकृत करण्याबद्दलचे धोरण दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले. बांधकामे अधिकृत करण्याबद्दलचे १७५ प्रस्ताव नगररचना विभागाकडे आतापर्यंत प्राप्त झाले आहेत.

पहिली ऑनलाइन परवानगी

पालिकेच्या इतिहासात प्रथमच नगररचना विभागातर्फे १४ नोव्हेंबररोजी ऑनलाइन बांधकाम परवानगी देण्यात आली. इशरतउन्नीसा इरफान अली कादरी यांच्या नावाने प्रगती कॉलनीच्या प्लॉट क्रमांक ३५ वर ही परवानगी देण्यात आली. शाखा अभियंता कोंबडे आणि उपअभियंता एस.एस. कुलकर्णी यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच वर्षानंतरही फाईलचा प्रवास सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या महापालिकेच्या पर्यटन माहिती केंद्राच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे बिल रखडले आहे. बिलाच्या फाईलचा प्रवास अडीच वर्षानंतरही सुरूच आहे. त्यामुळे फाइल हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हेतूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने रेल्वेस्टेशनच्या जवळ पर्यटन माहिती केंद्र सुरू केले. या केंद्राचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते २० जून २०१६ रोजी करण्यात आले होते. उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम करण्यात आला. औरंगाबादचे व प्रामुख्याने मराठवाड्याचे सांस्कृतिक वैभव स्पष्ट करण्यासाठी दिलीप खंडेराय यांच्या श्री खंडेराय कला मंडलम् पथकाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमासाठी जाधव मंडप अँड केटरर्सने मंडपाचे नियोजन केले होते, तर भक्ती आर्टस् तर्फे पर्यटन माहिती केंद्रात आणि मुख्य मंडपात विविध छायाचित्र, कटआऊटस् लावून सुशोभीकरण करण्यात आले होते. याशिवाय कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध सोई उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या सर्व उपक्रमाचे सुमारे १२ लाखांचे बिल जून २०१६ पासून प्रलंबित आहे. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांच्यासह तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे, तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह अधिकारी - पदाधिकारी उपस्थित होते.

आयुक्त - महापौरांच्या साक्षीने झालेल्या या कार्यक्रमाच्या बिलाच्या फाइलवर पालिकेच्याच अधिकाऱ्यांनी वेगवेगळे अभिप्राय लिहून फाइल अडवून ठेवली आहे. पर्यटन माहिती केंद्राच्या उद्घाटनाचे काम कशाला केले, कुणाच्या आदेशाने हे काम केले असा अभिप्राय उपायुक्तांनी फाइलवर नोंदवला आहे. या कामाची फाइल कधी जनसंपर्क विभागातून तर कधी सांस्कृतिक विभागातून सादर केली जाते, नेमके कोणत्या विभागाचे हे काम होते याचा खुलासा करा, असा अभिप्राय देखील फाइलवर पाहण्यास मिळतो. अशा अभिप्रायांमुळे फाइलचा प्रवास अद्यापही सुरूच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलदगती कालव्यातून रब्बीसाठी आवर्तन

$
0
0

वैजापूर: नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्यातून गुरुवारी सायंकाळी पाच वाजता रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले. याचा लाभ वैजापूर तालुक्यातील ४९, गंगापूर तालुक्यातील ४६ व कोपरगाव तालुक्यातील सात अशा १०२ गावांना सिंचनासाठी होणार आहे. सुरुवातील तीनशे क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले असून नंतर विसर्ग ८०० क्युसेकपर्यंत वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे पाणी शनिवारी सकाळी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत सुराळा शिवारात पोचणार आहे. या आवर्तनातून रब्बी हंगामासाठी जवळपास एक टीएमसी पाणी मिळण्याची अपेक्षा असून आवर्तन किमान २१ दिवस सुरू राहणार आहे. यापूर्वी चार ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत तब्बल ४१ दिवस खरीप हंगामाचे आवर्तन सोडण्यात आले होते. या आवर्तनामुळे तिन्ही तालुक्यातील ४३ हजार ८६० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही तालुक्यात पिकांना पाणी देण्यासाठी व पिण्यासाठी शेतकऱ्यांकडून कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी होत होती. कालव्यातून पाणी सुटत नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या भूमिगत केबलचे काम महापालिकेने थांबवले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणच्या भूमिगत केबल टाकण्याचे काम महापालिकेने गुरुवारी थांबवले. मजुरांच्या माध्यमातून खोदकाम न करता जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आल्यामुळे काम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील विजेच्या तारा भूमिगत करण्याचे काम महावितरणतर्फे सुरू करण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी रस्त्यांच्या लगत खोदकाम करावे लागणार आहे. खोदकामाची परवानगी महावितरणने महापालिकेकडून घेतली व २२ किलोमीटच्या तारा भूमिगत करण्याचे काम सुरू केले. २२ किलोमीटरपैकी पाच किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. विजेच्या तारा भूमिगत करण्यासाठी करावे लागणारे खोदकाम मजुरांच्या माध्यमातून केले जाईल, असे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले होते. मजुरांच्या सहाय्याने खोदकाम करण्याच्या अटीच्या आधीन राहून महापालिकेने परवानगी दिली. मजुरांनी खोदकाम केले तर रस्त्यांचे नुकसान होणार नाही, अशी भूमिका महापालिकेने मांडली होती. महावितरणने मात्र मजुरांच्या माध्यमातून खोदकाम न करता जेसीबी मशीनचा वापर करणे सुरू केले. त्यामुळे कमी - जास्त प्रमाणात खोदकाम होऊ लागले आणि रस्तेही खराब होऊ लागले. पालिकेचे सभागृहनेते विकास जैन आणि माजी सभापती गजानन बारवाल यांच्या वॉर्डात हा प्रकार घडला. याबद्दल त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे तक्रार केल्यावर गुरूवारी महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक महापौरांच्या दालनात झाली. बैठकीला जैन, बारवाल देखील उपस्थित होते. महावितरणने केलेल्या खोदकामाची पाहणी करून त्याचा अहवाल आठ दिवसात देण्याचे आदेश महापौरांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. अहवाल येईपर्यंत खोदकाम बंद करा, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिडकीन येथे डिफेन्स क्लस्टरसाठी प्रयत्नशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याने लवकरच मराठवाड्यात टेक्सटाइल पार्क उभारण्यात येईल, तसेच बिडकीन परिसरात डिफेन्स क्लस्टरकरिता प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

धनगाव येथील पैठण मेगा फूड पार्कचे उद्घाटन गुरुवारी झाले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात देसाई यांनी ही माहिती दिली.

पैठणची ओळख संत एकनाथांमुळे आहे. आता या मेगा फूड पार्कमुळे नवीन ओळख निर्माण होईल. या फूड पार्कमुळे ५०० शेतकरी जोडले असून ५००पेक्षा जास्त जणांना रोजगार मिळाला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तेव्हा उद्योग येऊन रोजगारांच्या अनेक संधी येथे निर्माण होतील. येथे शंभर उद्योग आणावेत, त्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल, असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत जाईपर्यंत मोठे नुकसान होते. त्यामुळेच शेतमालावर प्रक्रिया करून योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्याची संकल्पना फूड पार्कमागे आहे. त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल. राज्यात आठ मिनी फूड पार्क उभारण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहने उचलणाऱ्या पथकाला ‘घेराओ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्या उचलून घेऊन जाणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या पथकाला औरंगपुऱ्यात गुरुवारी मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी वाहनधारकाला पथकाच्या एका तरुणाने शिवीगाळ केल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

औरंगपुरा भागाच्या रस्त्यावर लावण्यात येणारी वाहने उचलण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांचे पथक गुरुवारी (१५ नोव्हेंबर) एचडीएफसी बँकेसमोर गेले. या पथकाने रस्त्याच्या बाजुला लावलेली काही वाहने उचलली. काही दुचाकी उचलून टाकण्याचा प्रयत्न पथकाच्या कंत्राटी कामगाराला वाहनधारकाने विरोध केला, मात्र पथकातील कर्मचाऱ्याची आणि वाहनधारकाची वादावादी सुरू झाली. त्यावेळी तेथील अन्य वाहनधारकही जमा झाले. त्यांनीही गाडी उचलण्याच्या नियमांची माहिती देण्यास सुरवात केली. गाडी उचलल्यानंतर त्याची माहिती संबंधित वाहनधारकांना देणे आवश्यक आहे, असे सांगितले. गाडी वाहनधारकाच्या अंगावर घातल्याचा असल्याचा आरोप करीत पथकाली तरुणाने शिवीगाळही केल्याचा आरोप वाहनधारकांनी केला.

या प्रकरणात वाहतूक पोलिसांनी मध्यस्थी करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांचा विरोध कमी झाला नाही. यामुळे वाहतूक पोलिसांनी अन्य पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. या ठिकाणी पोलिसांनी जमावाला पांगविले. या प्रकरणात काही वाहनधारकांनी थेट क्रांतीचौक पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांकडूनही शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार देण्याबाबत चर्चा सुरू होती.

……………

\Bदर ३० मिनिटांना उचलेगिरी

\Bऔरंगपुरा भागातील एचडीएफसी बँकेच्या समोरून दर तीस मिनिटांना उचलेगिरी पथकाकडून कारवाई केली जाते. या ठिकाणी 'एटीएम'वर सर्वसामान्य नागरिक पैसे काढण्यासाठी येत असतात. त्याच वेळी ही कारवाई केली जात असते. या ठिकाणी वाहन लावण्यासाठी पार्किंग नाही. आर्थिक गुन्हे शाखेने अवैध पार्किंग फी वसुली करणाऱ्यावर कारवाई केली होती. या कारवाईनंतरही सध्या 'पे अँड पार्क' सुरू आहे. वाहनधारकांना गाड्या लावण्याची अडचण येथे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून आले, घर फोडून गेले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाशिक येथे असलेल्या एका प्राध्यापकाचे नंदनवन कॉलनीतील घर कारमधून आलेल्या चोरांनी फोडून रोख रक्कम, दागिने लंपास केल्याची घटना घडली. हा प्रकार १४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान रघुनाथ बनसोडे (रा. वृंदावन कॉलनी, नंदनवन कॉलनी) यांचे दोन मजली घर आहे. ते नाशिक येथे एका व्यवस्थापन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते दोन भाडेकरूंकडून भाडे घेण्यासाठी येत असतात. प्रा. बनसोडे यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या चोरांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या घराचे चार कुलूप तोडले. त्यानंतर बेडरुममधील लाकडी कपाट तोडून एक तोळ्याचे सोन्याच्या बांगड्या, चार हजाराचे जोडवे, पैंजण व रोख साडेतीन हजार रुपये चोरांनी लांबवले.

चोरटे निघत असतानाच त्यांच्या भाडेकरून महिलेला दिसले. त्यांनी आरडा-ओरड केली, पण तोपर्यंत चोर कारने पसार झाले. या घटनेची माहिती भाडेकरू महिलेने बनसोडे यांना कळवली. दरम्यान, बनसोडे यांचे मेव्हुणे घटनास्थळी आले व त्यांनी छावणी पोलिसांना कळविले. दरम्यान, पोलिसांनी; तसेच श्वान पथकासोबत घटनास्थळ गाठले. याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे

'सीसीटीव्ही'मध्ये चित्रिकरण

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कार व त्यात काहीजण होते. ते चोरीसाठी आल्याचे स्पष्ट झाले. सिडको एन-पाच भागातही अशाच कारद्वारे येऊन व्यवस्थापकाच्या घरी चोरीचा प्रकार घडला होता. चोरट्यांची कार गँग सक्रिय असून, त्याचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उरुसावर ४५‘सीसीटीव्हीं’ची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

हजरत ख्वाजा मुन्तजबोद्दिन उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरुसावर यंदा ४५ 'सीसीटीव्ही नाईट व्हिजन कॅमेरां'च्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर असणार आहे. उरुसात कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. उरुसासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष, तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले.

तहसीलदार गायकवाड म्हणाले,'यंदा लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जादा एसटी बस, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा याचबरोबर सुरक्षिततेसाठी ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. चेंगराचेंगरीसारख्या घटना घडल्यास पाच ठिकाणी १२३ खोल्यांमध्ये २२२० लोकांच्या व्यवस्थेसाठी आपत्ती व्यवस्थापन व तात्पुरता निवारा उभारण्यात आला आहे. साडेनऊ एकर जागेवर पाच ठिकाणी पार्किंगची करण्यात आली आहे.'

पोलिस निरीक्षक हरिष खेडकर यांनी सांगितले की, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १३ ते २१ नोव्हेंबर यादरम्यान शरणापूर फाटा येथून जडवाहतूक कसाबखेडा फाटामार्गे वळविण्यात आली आहे.

दर्गा कमिटीचे अध्यक्ष मुनीबोद्दीन यांनी, १६ नोव्हेंबर कुस्ती दंगल, १८ नोव्हेंबर सांस्कृतिक कार्यक्रम, १९ नोव्हेंबर मुशायरा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष एस. एम.कमर, माजी नगराध्यक्ष कैसरोद्दिन, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यू. बी. खान आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचे फोटो काढून अत्याचार; नियमित जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

१७ वर्षीय मुलीचे फोटो काढून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी दत्ता जर्नाधन चिंचोले याने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज विशेष न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी फेटाळला.

याप्रकरणी अकोला जिल्ह्यात राहणाऱ्या १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्यानुसार पीडित मुलगी ही उन्ह्याळ्याच्या सुटीत आत्याकडे आली असता तिची ओळख आरोपी आरोपी दत्ता जर्नाधन चिंचोले (वय २२, रा. हातमाळी. ता. जि. औरंगाबाद) याच्याशी झाली होती. त्यानंतर आरोपीने मुलीला मोबाइल घेऊन दिला व दोघांचे नेहमी मोबाइलवर बोलणे होत होते. दरम्यान, २६ जून २०१८ रोजी आरोपीने मुलीला हायवे रस्त्याजवळ भेटण्यासाठी सांगितले. त्यानुसार मुलगी तिथे गेली असता आरोपीने तिचे फोटो काढले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीला तिच्या आत्याच्या घरी आणून सोडले. त्यानंतर मुलगी आरोपीच्या भितीने आपल्या गावी गेली. मात्र, आरोपी मुलीला वारंवार फोन करत होता. ही बाब मुलीने आईला सांगितली. आईने आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने मुलीसोबत काढलेले फोटो मुलीच्या नातेवाईकांना पाठविले. तसेच 'तू माझी झाली नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही' अशी धमकी मुलीला दिली. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरुन अकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तो गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. प्रकरणात आरोपीला अटक करुन कोर्टात हजर केले असता त्याची आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर आरोपीने नियमित जामीनीसाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी, आरोपीला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, तसेच गुन्ह्याचा तपास बाकी असल्याने आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील अजित अंकुश यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन फेटाळ‍ला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीवाचक शिविगाळ, मारहाण; नगरसेवकाचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तरुणाला जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी व भाजप नगरसेवक रामेश्वर भादवे व विजय लोखंडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी फेटाळला.

याप्रकरणी पवन सिकंदर दाभाडे (वय २६, रा. बंजारा कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. १४ एप्रिल २०१८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दाभाडे यांनी वॉर्डात मिरवणूक काढली होती. त्यानंतर नगरसेवक रामेश्वर बाबुराव भादवे व दाभाडेंची भेट झाली. त्यावेळी 'माझ्याकडून वर्गणी का घेतली नाही, माझे बॅनर गाडीवर का लावले नाही' असे भादवे म्हणाले. त्यावर 'ही राष्ट्रीय पुरुषाची जयंती आहे, कुठल्याही पक्षाची नाही' असे म्हणत दाभाडे तेथून निघून गेले. या रागातून भादवे व विजय गौरखनाथ लोखंडे (वय ४०, दोघे रा. खोकडपुरा) यांनी चार मे २०१८ रोजी रात्री साडेअकराला दाभाडेंना जातीवाचक शिविगाळ करून बेदम मारहाण केली. त्यात दाभांडेचे डोके फुटले. त्यानंतर भादवे व लोखंडे यांनी बघून घेण्याची धमकी देत तिथून निघून गेल्याच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोघांची कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असता, आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना जामीन देता येत नाही. तसेच आरोपी हा नगरसेवक आहे, त्याला जामीन दिल्यास मोठा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील अजित अंकुश यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची शिफारस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोरेगाव-भीमा दंगल आणि मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर नोंद झालेले जवळपास २३ गुन्हे सशर्त परत घेण्यास तयार असल्याचा अहवाल पोलिस प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांवरील हल्ले आणि दहा लाखांपेक्षा अधिक नुकसानीचे गुन्हे परत घेऊ नका, असेही त्यात नमूद आहे.

मराठा आंदोलन आणि कोरेगाव-भीमा दंगलीप्रकरणी पोलिसांनी नोंदविलेले गुन्हे परत घ्यावे, अशी मागणी आंदोलकांकडून शासनाकडे करण्यात आली. त्यानंतर शासनाने औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांकडून याविषयी अभिप्राय मागवला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी शासनास अहवाल नुकताच सादर केला. ज्या आंदोलकांनी दहा लाखांपर्यंतच्या खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले आहे, त्यांच्याकडून नुकसानभरपाई घ्यावी आणि नंतरच त्यांचे गुन्हे परत घ्यावे. सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण आणि दहा लाखांपेक्षा अधिक नुकसानीप्रकरणी दाखल गुन्हे परत घेऊ नये, अशी शिफारस अहवालात केली आहे.

\Bनिर्णयाचा अधिकार शासनाकडेच \B

कोरेगाव-भीमा हल्ल्यानंतर औरंगाबादेत पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी सिडको, उस्मानपुरा आणि क्रांतीचौक पोलिस ठाण्यात एकूण ३८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. मराठा आंदोलनादरम्यान रस्ता रोको, १३५ चे उल्लंघन, किरकोळ स्वरुपाची नुकसान केल्या प्रकरणी १० गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्तांनी शिफारस केली असली तरी शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार शासनालाच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीच्या लग्नाआधीच मजुराची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नारेगाव परिसरातील मजुराने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री ब्रिजवाडी भागात घडली. नागेश काशीनाथ आठवले (वय ४०), असे या मजुराचे नाव आहे. दरम्यान, येत्या १८ नोव्हेंबर रोजी नागेश आठवले यांच्या मुलीचे लग्न आहे. लग्नाच्या तीन दिवस आधीच घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश आठवले हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी रात्री घरी कोणी नसताना त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच घटनेची माहिती पोलिसांना दिली. सिडको पोलिसांनी आठवले यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ राठोड करत आहेत.

तीन दिवसानंतर लग्न

नागेश आठवले यांच्या मोठ्या मुलीचे १८ नोव्हेंबर रोजी लग्न होणार आहे. त्यासाठी आठवले कुटुंबियाकडून लग्नाची तयारी सुरू होती. मुलीचे लग्न जवळ आले तरी पैशाची अडचण दूर होत नसल्याने आठवले गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. त्यातूनच त्यांनी हे कठोर पाऊल उचलले असल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली. लग्नाच्या तीन दिवस आधीच ही घटना घडल्याने कुटुंबियांनी लग्न लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही नातेवाईकांनी लग्नाची संपूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळे नियोजित वेळेत लग्न उरकून घ्यावे, अशी समजूत काढली. याला कुटुंबियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादची जागा काँग्रेसचीच; येत्या निवडणुकीत जिंकू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभेची जागा काँग्रेसचीच आहे आणि आगामी निवडणूक लढवून ती आम्ही जिंकू, अशी ग्वाही जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी दिली.

मुंबई मध्ये गुरुवारी राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, दिल्लीहून आलेले पक्ष प्रभारी यांच्यासह नेते उपस्थित होते.

काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कुणालाही उतरवले तरी आम्ही एकदिलाने काम करू, असे जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी, औरंगाबाद लोकसभा लढविण्यास राष्ट्रवादी तयार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या आढावा बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी याबाबत विचारणा केली. त्यावेळी जिल्ह्यातील प्रमुख उपस्थिती नेते म्हणाले, 'ही जागा आमचीच आहे आणि काँग्रेसच लढणार. नुसती लढणार नाही तर जिंकणार.'

जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार वैयक्तिक अडचणीमुळे बैठकीलाउपस्थित नव्हते. त्याबाबत पक्षश्रेष्ठींना पूर्वकल्पना दिलेली होती, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी दिंडी शिर्डीला रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साईबाबा सेवा मंडळातर्फे औरंगाबाद ते शिर्डीपर्यंत पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पालखी दिंडी काढण्यात आले. गुरुवारी सकाळी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडी शिर्डीकडे रवाना झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, अभिजीत देशमुख, शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, किशोर नागरे, राजु खरे, नगरसेवक मोहन मेघावाले आदी उपस्थित होते. साईबाबा सेवा मंडळाचे अध्यक्ष संदीप सपकाळ, विकास जाधव, वसंत गोसावी, गजानन सावसक्के, कपिलेश गुप्ता, नितीन जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने पालखीत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलचे कुलूप तोडताना दोघांना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

आळंद (ता. फुलंब्री) येथील हॉटेल वरद बियर बारचे कुलूप तोडताना दोन जणांना पकडण्यात आले. हा प्रकार बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला.

आळंद येथील राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावर दत्तात्रय पायगव्हाण यांच्या मालकीचे वरद बियर बार आहे. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता बार बंद करून ५०० मीटरवर अंतरावरील स्वतःच्या हॉटेल मोरया येथे जेवण झाल्यावर ते तेथेच थांबले. बारचे व्यवस्थापक सुनील वाढेकर गावात गेले. त्यानंतर तेथील कामगार भगवान नामदेव फुके व संदीप प्रभाकर फुके या दोघांना हॉटेल वरद येथे झोपण्यासाठी पाठविले. त्यावेळी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन्ही कामगारांना रस्त्याने पायी जात असताना कुणी तरी दरवाजा तोडत असल्याचा आवाज आला. त्यामुळे भगवान फुके यांनी दत्तात्रय पायगव्हाण यांना फोन करून कळविले.

याबाबत माहिती मिळताच पायगव्हाण तात्काळ तेथे गेले व आम्ही चौघांनी मिळून हॉटेलवर जाऊन पहिले. त्यावेळी बारच्या पाठीमागील दरवाजा तोडण्याचा आवाज येत होता. बारच्या मागील बाजूने कडी कोयंडा तोडत असताना दोघा चोरट्यांना पकडले. याबाबत बीट जमादार सुरेश दौड यांना माहिती दिली. जमादार दौड यांनी घटनास्थळी येऊन चोरट्यांना ताब्यात घेतले. बियर बार मालक दत्तात्रय शाहुबा पायगव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी साळुबा तुकाराम बडक (२५,) व आप्पासाहेब उर्फ अमोल पंढरीनाथ बडक (२१, दोघे रा. पळशी, ता. सिल्लोड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास वडोदबाजार पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणात याचिका मागे

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांच्या कर्ज अपहार प्रकरणात बँक ऑफ हैदराबादचे (आता एसबीआय) व्यवस्थापक आणि लेखापाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिलासा मिळाला नाही. या प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी खंडपीठात धाव घेतली. मात्र, न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी त्यांची विनंती मान्य करण्यास नकार दर्शविल्याने अर्जदारांनी याचिका मागे घेतली.

परभणी जिह्यातील पाथरी येथील आत्माराम लाडाने यांनी स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या पाथरी शाखेतून ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतले होते. एकरकमी योजनेतंगत त्यांनी कर्जाची परतफेड केली. बँकेने त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले. मात्र, बँक व्यवस्थापक व लेखापालाने त्यांच्याकडून बेबाकी प्रमाणपत्र पुन्हा परत घेतले व अपहार केला अशा आशयाची तक्रार लाडाने यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हा गुन्हा रद्द करण्यासाठी दोघांनी याचिका दाखल केली होती. मूळ तक्रारकर्ते आत्माराम लाडाने यांची बाजू अजिंक्य रेड्डी यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images