Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेल्वेच्या धडकेत तीन बछड्यांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगल परिसरात बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजरची धडक बसल्याने वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. जुनोना जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ४१० व ४७७मध्ये ही घटना घडली. मृत बछड्यांचे वय सुमारे पाच महिने आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जुनोना जंगल परिसरातून बल्लारपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग जातो. घनदाट जंगलातून हा मार्ग जात असल्यामुहे रुळ ओलांडताना रेल्वे गाडीची धडक असून यापूर्वीही वन्य प्राण्यांचे जीव गेले आहेत. गुरुवारी सकाळी रेल्वे रुळांजवळ प्रथम दोन बछड्यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर जवळच तिसऱ्या वाघाचा मृतदेह आढळून आला. रेल्वेची धडक बसल्यानंतर वाघिणीने या बछड्याला काही अंतर दूर नेण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले.

घटनेची माहिती कळताच मुख्य वनसंरक्षक रामाराव, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापक ऋषीकेष रंजन, विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे यांच्यासह वनविभागाचे व वनविकास महामंडळाच्या इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी. डी. कडूकर, डॉ. बावणे, डॉ. पोडशेलवार यांनी रेल्वे रुळांशेजारीच तिन्ही बछड्यांचे शवविच्छेदन केले. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने प्रतिनिधी म्हणून मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे व मानद वन्यजीव रक्षक अमोल बैस उपस्थित होते.

वाघिणीचा शोध सुरू

रेल्वेच्या धडकेने तीन बछड्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची आई चिडलेली असावी आणि ती अपघात परिसरात फिरत असावी, अशी शक्यता वनविभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. वाघिणीचा माग काढण्यासाठी १० कॅमेरे ट्रप लावण्यात आले आहेत. वाघीण एकटी आहे की तिच्यासोबत आणखी बछडे आहेत, याचा शोध घेतला जात असल्याचे वनविकास महामंडळाचे व्यवस्थापक ऋषीकेष रंजन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवयवदान जागृतीसाठी ज्येष्ठांची पदयात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवयवदानाच्या सर्वांगीण जनजागृतीसाठी स्थापन झालेल्या 'द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन'च्या वतीने अवयवदान प्रत्येकाच्या मनामनामध्ये बिंबवण्यासाठी ठिकठिकाणी पदयात्रा काढण्यात येत आहेत. आतापर्यंत नाशिक ते नागपूर ही १३४० किलोमिटरची ५३ दिवसांची पहिली, तर संपूर्ण कोकण ते गोवा ही ८५० किलोमिटरची दुसरी पदयात्रा काढण्यात आली. आता औरंगाबाद ते तुळजापूर अशी तिसरी ३९ दिवसांची पदयात्रा शुक्रवारपासून (१६ नोव्हेंबर) सुरू होणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या सर्व पदयात्रांमध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिक सहभागी होत आहेत.

सहा वर्षांपासून फेडरेशनमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अवयवदानाच्या प्रचार-प्रसाराबरोबरच नेत्रदान, त्वचादान, देहदान व अवयवदान प्रत्यक्षात घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून संस्थेच्या माध्यमातून व सुनील देशपांडे यांच्या संकल्पनेतून २५ नोव्हेंबर २०१६ ते १४ जानेवारी २०१७ दरम्यान ५२ दिवसांची नाशिक ते नागपूर (आनंदवन) अशी १३४० किलोमिटरची पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांच्या नेतृत्वाखाली २३ फेब्रुवारी २०१८ रोजी मुंबईच्या के. ई. एम. हॉस्पिटलपासून कोकण ते गोवा विभागामध्ये ५२ दिवसांची सुमारे ८५० किलोमिटर पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर शुक्रवारपासून औरंगाबाद-तुळजापूर अशी पदयात्रा निघणार आहे. या पदयात्रेमध्ये गावोगावी सभा, कार्यशाळा, पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्व व गरज पटवून देण्यात येणार आहे, असे फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार, सुनील देशपांडे यांनी गुरुवारी (१५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, सुहास वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरामध्ये २१ दात्यांकडून सुमारे ६७ हृदय, यकृत, मूत्रपिंड, नेत्र अशा अवयवांचे दान झाले. त्यातील ४२ अवयवांचे शहरात, तर २५ अवयवांचे मराठवाड्याबाहेर प्रत्यारोपण झाल्याचे 'झेडटीसीसी'चे अध्यक्ष डॉ. सुधीर कलकर्णी यांनी परिषदेत सांगितले. झेडटीसीसी सदस्य राजेशसिंह सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.

\Bया ज्येष्ठांचा सहभाग

\Bसमाजोपयोगी चांगल्या कामासाठी वय कधीच आड येत नाही. त्यामुळेच आम्ही वय तसेच व्याधींवर मात करून पदयात्रेमध्ये सहभागी झालो आहोत, असे पदयात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांनी सांगितले. या पदयात्रेमध्ये वसंत चिकोडे (वय ७५), प्रियदर्शन बापट (वय ६०), अविनाश कुलकर्णी (वय ६४), सुनील देशपांडे (वय ६३, सर्व रा. नाशिक), चंद्रशेखर वसंत देशपांडे (वय ६७), शैलेश वसंत देशपांडे (वय ६३, दोघे रा. नवी मुंबई), दयानंद मठपती (वय ४४, रा. औरादशहाजनी) हे सहभागी होत आहे.

\Bमाझीही सहभागी होण्याची इच्छाः कदम

\Bमराठवाड्याच्या पदयात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांचे स्वागत करत, मलासुद्धा अवयवदानासाठीच्या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याची इच्छा असून, या वेळेस नाही पण पुढे कधीतरी नक्कीच सहभागी होईल, अशा भावना अंकुशराव कदम यांनी या वेळी व्यक्त केल्या. मात्र अवयवदानासाठी नागरिकांची मानसिक होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी लोकांमधील अज्ञान दूर झाले पाहिजे, असेही मत त्यांनी नोंदिवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकेला दिलासा, सेवेत कायम

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

नांदेड जिह्यातील सायाळ या गावातील अंगणवाडी सेविका पुष्पा भगवानसिंह ठाकूर यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवेतून कमी करण्याचा दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. सुनील के. कोतवाल यांनी रद्द केला. तसेच याचिकाकर्तीला सर्व लाभ देण्याचा आदेश दिला.

याचिकाकर्तीला ३१ जुलै १९९३ साली अंगणवाडी सेविका म्हणून निुयक्ती देण्यात आली होती. शैक्षणिक पात्रता, अटी व अनुभव लक्षात घेत त्यांना नियुक्ती देण्यात आली होती. २३ वर्षे त्यांनी सदर पदावर काम केले. याचिकाकर्तीने इयत्ता ८ वी पास नसताना बोगस टीसी व कागदपत्रे जोडून नोकरी मिळविल्याची तक्रार जिल्हा परिषदकडे करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन सीईओंनी २ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांना पदमुक्त केले. त्या नाराजीने अ‍ॅड. विलास पानपट्टे यांच्यामार्फत सदर याचिका दाखल करण्यात आली. सीईओंनी काढलेले आदेश हे पूर्वलक्षी प्रभावाने काढलेले असून कायद्यातील तरतुदींशी विसंगत आहेत. एकतर्फी चौकशी आधारे याचिकाकर्तीला पदमुक्त करण्यात आले. याचिकाकर्ती विरोधात राजकीय सूडभावनेतून तक्रार करण्यात आली. याचिकाकर्तीची २२ वर्षे सेवा आहे, ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करता येत नाही, असे याचिकाकर्तीच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले. सुनावणीअंती खंडपीठाने अंगणवाडी सेविकेला सेवेतून कमी करण्याचा आदेश रद्द केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीप्रकरणी आरोपीस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराचे लॉक तोडून सोन्या-चादींच्या दागिन्यांसह ४१ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेणारा आरोपी ऋषीकेश संतोष पालोदकर याला अटक करून त्याला कोर्टात हजर केले असता आरोपीला शुक्रवारपर्यंत (१६ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी गुरुवारी (१५ नोव्हेंबर) दिले.

या प्रकरणी शेखर शेषराव धुमाळ (वय ४१, रा. पुंडलिकनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी हा नऊ नोव्हेंबर रोजी घराला कुलूप लावून गावी गेला असता, घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा सुमारे ४१ हजार ६०० रुपयांच्या ऐवजाची चोरी झाली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी ऋषीकेश पालोदकर (२०, रा. पुंडलिकनगर) याला बुधवारी (१४ नोव्हरेंबर) अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादेत संदल मिरवणूक उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुंतजिबोद्दिन जर जरी जर बक्ष यांच्या ७३२व्या उरुसाची सुरुवात संदल मिरवणुकीने गुरुवारी उत्साहात झाली. उरुसाची सांगता २० नोव्हेंबर रोजी ईद मिलादुन्नबीच्या दिवशी होणार आहे.

गुरुवारी ख्वाजा शेख बुऱ्हाणोद्दीन गरीब यांच्या दर्ग्यातून दुपारी चार वाजता संदल मिरवणुकीस सुरुवात झाली. संदलमध्ये ढोल ताशा, बँड पथकांनी खुलताबाद दणाणून गेले होते. संदल मिरवणुकीसमोरील बँड पथकाने जुन्या देशभक्तीपर गाणी वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संदल मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने भाविकांनी गर्दी केली होती. संदल मिरवणुकीत दारूगोळ्याची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष प्रभारी तहसीलदार राहुल गायकवाड, नगराध्यक्ष एस. एम. कमर, अॅड कैसरोद्दिन, दर्गा कमिटीचे अध्यक्ष मुनिबोद्दिन मुजिबोद्दिन, महंमद नईम, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील , पोलिस निरीक्षक हरिष खेडकर आदी उपस्थित होते. उरुसाची सांगता २० नोव्हेंबर रोजी होणार आहे, असे दर्गा कमिटीचे शरफोद्दिन रमजानी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून मराठा संवादयात्रा

$
0
0

औरंगाबाद :

राज्य सरकारने मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता शासनाने तळागाळापर्यंत केली की नाही याची माहिती जाणून घेण्यासाठी तसेच दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे मनौधैर्य उंचावण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे शुक्रवारी (१६ नोव्हेंबर) मराठा संवाद यात्रा काढण्यात येणार आहे.

सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना देऊन क्रांतीचौक येथून संवाद यात्रेची सुरुवात करण्याात येणार आहे. १६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्याभरात काढण्यात येणाऱ्या संवाद यात्रेमध्ये प्रत्येक तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला असून पहिल्या दिवशी संवादयात्रा क्रांती चौक, दूध डेअरी, मोढा नाका, बालाजी नगर, त्रिमूर्ती चौक, गजानन महाराज चौक, पुंडलिक नगर, जयभवानी नगर, कामगार चौक, सिडको कॅनॉट गार्डन, अविष्कार चौक, बळीराम पाटील चौक, टीव्ही सेंटर चौक, पिसादेवी, पळशी, माडकी, महाल पिंप्री, वरुड, वडखा, वरझडी येथे जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाण्यातील कचरा प्रक्रिया प्रकल्प ढेपाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चाचणीच्या आठ दिवसांतच चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प ढेपाळला आहे. येथे दररोज सोळा टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित असताना सध्या केवळ आठ ते दहा टन कचऱ्यावरच प्रक्रिया होत आहे. त्यामुळे कचरा प्रक्रियेच्या कामात महापालिकेला किमान ५० टनांचा फटका बसला आहे. यामुळे प्रक्रियेच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बेलिंग, श्रेडिंग आणि स्क्रिनिंग मशीनचा एक समूह एका झोन कार्यालयाच्या क्षेत्रात स्थापन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार नऊ झोन कार्यालयांसाठी तीन मशीन्सचे नऊ समूह खरेदी केले जाणार आहेत. त्यापैकी एक समूह प्राप्त झाला असून त्या मशीन चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रात स्थापित केल्या आहेत. या मशीनची पाच नोव्हेंबर रोजी आयुक्त आणि महापौरांच्या उपस्थितीत चाचणी घेण्यात आली. त्यावेळी येथे दररोज सोळा टन कचऱ्यावर या मशीनद्वारे प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, चाचणीनंतरच्या आठ ते दहा दिवसांतच कचरा प्रक्रिया मशीन पूर्ण क्षमतेने चालवण्यात येत नसल्याचे लक्षात आले आहे. याबद्दल पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी गुरुवारी महापौरांना माहिती दिली. पाच नोव्हेंबरपासून आतापर्यंत १२० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित होते; प्रत्यक्षात ७० ते ८० टन कचऱ्यावरच प्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. या तिन्ही मशीन वेस्टबिन सोल्युशन्स या कंपनीच्या आहेत. या कंपनीचे औरंगाबादेतील प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला महापौरांनी फोन लावला आणि पूर्ण क्षमतेने कचरा प्रक्रियेचे काम केले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कामात प्रगती करण्याची सूचना त्यांनी केली. आठ ते दहा दिवसांतच कचरा प्रक्रिया मशीनचे काम ढेपाळल्यामुळे एकूणच कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

\Bकचरा वाहतुकीसाठी एका झोनमध्ये २५ वाहने

\B

कचरा वाहतूक आणि संकलनाकरिता महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला काम दिले आहे. ही कंपनी कचरा संकलनासाठी प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात २५ वाहने उपलब्ध करून देणार आहे. ही वाहने कशी असावीत, तिचे डिझाइन पालिकेतर्फे कंपनीला दिले जाणार आहे. या वाहनांचे डिझाइन इंदूरच्या धर्तीवर असावे, असा प्रयत्न केला जाणार असल्याचे नंदकिशोर भोंबे यांनी स्पष्ट केले.

\B१२० टन

कचऱ्यावर प्रक्रिया अपेक्षित

७० ते ८० टन

कचऱ्यावर प्रत्यक्ष प्रक्रिया \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य, पाणी, शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरोग्य, पाणी तसेच शिक्षणाला प्राधान्य देत तिन्ही बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न असणार आहे, असे मत छावणी परिषदेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष पद्मश्री अनिल जैस्वाल यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. परिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यांनी गुरुवारी (१५ नोव्हेंबर) पदभार स्वीकारल्यानंतर विविध प्रश्नांबाबत संवाद साधत त्यांनी छावणीवासियांना आश्वस्त केले.

गेल्या वर्षी दुषित पाण्यामुळे छावणीवासियांना गॅस्ट्रोच्या उद्रेकाला सामोरे जावे लागले. त्यानंतरही दुषित पाण्याची समस्या छावणी परिसरात कमी-अधिक प्रमाणात होती. त्यातच कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत नवीन जलवाहिनीचे काम होण्यासाठी छावणीवासियांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. या एकूणच समस्यांमुळे छावणीवासीय त्रस्त झाले. या संदर्भात पद्मश्री जैस्वाल यांना छेडले असता, छावणीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय असल्याचे त्या म्हणाल्या. त्यातही नागरिकांना मुबलक पाणी व स्वच्छ पाणी देण्यासाठी प्राधान्य असेल. पाण्याबाबत नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी राहणार नाहीत, याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न असेल. तसेच छावणी परिषदेच्या रुग्णालयामध्ये अधिकाधिक आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मुख्य म्हणजे आरोग्य सेवा-सुविधांचा दर्जा कसा वाढेल, याकडे लक्ष देणार आहे. त्याचबरोबर छावणी परिषदेच्या शाळेमध्ये विविध सुधारणा करण्याचे ध्येय आहे. सामान्य नागरिकांच्या पाल्यांनाही या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण कसे मि‍ळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याशिवाय छावणी परिसर स्वच्छ कसा राहील, याकडेही लक्ष देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि या कामी परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांची साथ मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार अपघातात साला-मेहुणे जागीच ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

फुलंब्री तालुक्यातील पालफाटा येथे भरधाव कार झाडावर धडकून झालेल्या अपघातात साले व मेहुणे जागीच ठार झाले. सुनील विनायक काकडे (वय ३४, रा. अयोध्यानगर, औरंगाबाद) व जगन्नाथ फकिरबा बोडखे (वय ४०, रा. डोंगरगाव कवाड), अशी त्यांची नावे आहेत. या अपघातात भीमराव बोडखे हे गंभीर जखमी झाले आहेत.

दिवाळीसाठी माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी सुनील काकडे हे डोंगरगाव कवाड येथे गेले होते. काही कामानिमित्त तिघे फुलंब्रीला आले होते. येथून परत जाताना गुरुवारी मध्यरात्री त्यांची कार (एम. एच. २०, डी. एम. ९०७६) झाडावर आदळली. कारचालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महात्मा फुले रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी तिघांना औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भीमराव बोडखे यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पोलिस निरीक्षक साम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पती-पत्नीच्या वादावर विनोदाची फोडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पती-पत्नीच्या छोट्या-मोठ्या वादावर तोडगा कसा काढला पाहिजे आणि असा तोडगा काढणे कसे-किती गरजेचे आहे, यावर विनोदी ढंगात मार्मिक टिपण्णी करणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या 'कुर्यात् सदा घटस्फोटम्' एकांकिकेने धमाल उडवून दिली. विशेष म्हणजे शहरातील डॉक्टरांनी सादर केलेल्या एकांकिकेला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

लेखकापासून ते कलावंतांपर्यंत सर्व काही डॉक्टरांनीच घडवून आणलेली ही एकांकिका शुक्रवारी (१६ नोव्हेंबर) यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर झाली. स्त्रीरोग संघटनेच्या पुढाकारातून ही एकांकिका उभी राहिली. विक्रम लोखंडे लिखित-दिग्दर्शित एकांकिकेमध्ये जयश्री मोरे, श्रद्धा पानसे, श्रद्धा परिटकर, विनायक खेडकर, सचिन चिटणिस, सचिन देशमुख, अपर्णा राऊळ, जयश्री जाधव, विक्रम लोखंडे, प्रिया देशमुख, पल्लवी लोखंडे, धीरज कोटेचा आदींनी भूमिका साकारल्या. संगीताची बाजू विशाल चौधरी, तर नेपथ्याची बाजू रवी कुलकर्णी यांनी सांभाळली. एकांकिकेला रसिकांनी भरभरुन दाद दिली. अलीकडे गंभीर प्रश्न बनलेल्या विषयाला डॉक्टरांनी विनोदी शैलीत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे कौतुक रसिकांमधून दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुयारी मार्गाची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवाजीनगर ते देवळाई चौक यादरम्यान भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी सातारा देवळाई जनसेवा कृती समितीने केली आहे.

यासंदर्भात समितीने महापालिकेला निवेदन दिले आहे. शिवाजीनगर ते देवळाई चौक हा सातारा, देवळाई परिसराला औरंगाबाद शहराशी जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथे भुयारी मार्ग करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत अपघातात नागरिकांचे बळी गेले. त्यामुळे बीड बायपासला सर्व्हिस रोड गरजेचा आहे. सर्व्हिस रोडबाबत आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. शिवाजीनगर ते बीड बायपास या रस्त्यावर भुयारी मार्ग करावा आणि देवळाई चौक ते अय्यपा मंदिर कमार यादरम्यान सर्व्हिस रोड करावा, या मागण्या समितीने निवेदनाद्वारे केल्या आहेत.

हे निवेदन बद्रीनाथ थोरात, शिवराज कडू, शिवाजी ढाकणे, टी. जी. मुंढे, एस. व्ही. ढोरे, उत्तम थोरात, सीताराम शिकारे, एस. के. बिराजदार, आर. एल. बावस्कर, गोपिनाथ कोल्हे, आबासाहेब देशमुख अभिजीत शिंदे, परमसिंह राजपूत आदींनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंजुरीपूर्वीच सुरू करता येणार टँकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदाही दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल साडेपाच लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. टँकर हाच शेवटचा पर्याय असल्यामुळे टँकरची मागणी आल्यास मंजूरीपूर्वीच तत्काळ टँकर सुरू करण्यात येणार असून त्यानंतर कार्योत्तर मंजुरी घेण्यात येणार आहे.

टँकर सुरू करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात यावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे, मात्र अद्यापही उपविभागीय अधिकारी पातळीवरूनच टँकरची परवानगी देण्यात येते.

मराठवाड्याच्या तुलनेत यंदा औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईची स्थिती आहे. कोणत्या ना कोणत्या गावामधून दररोज टँकर सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद; तसेच जिल्हा प्रशासनाकडे येत असते. यामध्ये राजकीय पुढाऱ्यांचाही रेटा मोठा असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरही टँकर सुरू करण्याबाबत दबाव असतो, मात्र कोणत्याही गावात टँकर सुरू करण्याचे अंतिम अधिकार हे उपविभागीय अधिकाऱ्यांना आहेत. आता टँकरची मागणी येताच, संबंधित ठिकाणी टँकरची गरज लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर शाहनिशा करून मंजुरीपूर्वीच टँकर सुरू करता येणार आहे. लहान गावे; तसेच वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 'एसडीओं'पर्यंत टँकर मंजूर करण्यासाठी अधिक कालावधी लागतो म्हणून हे अधिकार तहसीलदार; तसेच बीडीओ स्तरावरून देण्यात यावेत, अशी अनेक दिवसांपासून मागणी आहे. अद्यापही यावर कोणताही निर्णय झालेला नाही. यावर्षी जिल्ह्यात गंभीर स्वरुपातील दुष्काळ असून, सोयगाव वगळता सर्व तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सध्या जिल्ह्यात तब्बल २४३ गावांमधील पाच लाख ६५ हजार नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ९१ टँकर गंगापूर तालुक्यात सुरू असून, वैजापूर तालुक्यात ५७ तर, पैठण तालुक्यात ५६ टँकर सुरू आहेत. मराठवाड्याच्या इतर जिह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात यंदा जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला असल्याने अडचणी वाढल्या आहेत. सध्या औरंगाबाद तालुक्यातील १७, फुलंब्री नऊ, पैठण ५०, गंगापूर ८२, वैजापूर ४०, खुलताबाद दोन, कन्नड दहा, तर सिल्लोड तालुक्यातील ३३ गावांमध्ये टँकर सुरू आहेत.

\B१३४ विहिरींचे अधिग्रहण

\Bजिल्ह्यात आतापर्यंत १३४ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, यामध्ये ११४ विहिरी टँकरसाठी, तर २० विहिरींचे टँकरव्यतिरिक्त अधिग्रहण करण्यात आले आहे.

\Bटँकरवर अवलंबून असलेली लोकसंख्या\B

तालुका...................लोकसंख्या

औरंगाबाद................५१ हजार ५४६

फुलंब्री....................२१ हजार ५८०

पैठण......................१ लाख १२ हजार ३६२

गंगापूर....................१ लाख ५८ हजार २२६

वैजापूर....................७४ हजार ३९४

खुलताबाद...............४ हजार ५००

कन्नड....................१७ हजार २९३

सिल्लोड..................१ लाख २५ हजार ८७५

सोयगाव..................००

एकूण.....................५ लाख ६५ हजार ७७६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा परिसरात धूर फवारणी

$
0
0

औरंगाबाद : श्री रामकृष्ण मिशन येथील मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात महापालिकेतर्फे औषध फवारणी, आबेट ट्रिटमेट करण्यात आली. त्याचबरोबर डास नियंत्रणासाठी धूर फवारणी करण्यात आली.

रामकृष्ण मिशन येथे होत असलेल्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. त्यामुळे या परिसरात धूर फवारणी करावी, अशा सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी या परिसरात धूर भवारणी करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर, जीवशास्त्रज्ञ डॉ. अर्चना राणे, के. बी. मोरे, पथक प्रमुख अन्वर शेख दादाभाई आदी यावेळी उपस्थित होते. महापालिकेचे फवारणी कर्मचारी अनिल नरवडे, शेख अय्युब, मनोज जगधने, शेख अश्फाक, अमोल दाभाडे, राहुल वाकेकर, महेश नागरे आदींनी या भागात धूर फवारणी केली.

दरम्यान, महापौर घोडेले यांनी कार्यक्रमाच्या व्यवस्थेबद्दल प्रशासनाला पत्र दिले आहे. कार्यक्रमस्थळी अग्निशमन विभागाची गाडी ठेवण्यात यावी. या परिसरात नियमित औषध फवारणी करावी. कार्यक्रमाच्या परिसरातील कचरा रोज उचलावा. १७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत कार्यक्रमस्थळी पाण्याचे दोन टँकर विनाशुल्क उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर या परिसरात फिरते स्वच्छतागृह ठेवावे आदी सूचना महापौर घोडेले यांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी विधवांची वणवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. राज्य सरकार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला जुजबी मदत करीत आहे. या मदतीतून शेतकरी कुटुंब पूर्ण सावरणे शक्य नसल्याचे 'मकाम'च्या पाहणीत आढळले. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला कर्नाटकात पाच लाख रुपये, आंध्र प्रदेश व तेलंगणात साडेतीन लाख रुपये मदत मिळते. महाराष्ट्रात एक लाख रुपये मदत मिळत असल्यामुळे कुटुंब कर्जमुक्त होऊन उभे राहणे अशक्य आहे, असे निरीक्षण 'मकाम'ने नोंदवले आहे.

महिला किसान अधिकार मंच (मकाम) या विविध संस्थांच्या एकत्रित समूहाने आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांच्या प्रश्नांवर सप्टेंबर महिन्यात सर्वेक्षण केले. मराठवाडा व विदर्भातील ११ जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यातील सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष समोर आले. २०१२ ते २०१७ या पाच वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील ४८२ विधवांची माहिती घेण्यात आली. विविध जातीमधील कुटुंबांचा त्यात समावेश आहे. संजय गांधी निराधार पेन्शन योजना, रेशनकार्ड, अन्नसुरक्षा योजना, महात्मा फुले जीवनदायी योजना, प्रेरणा प्रकल्प, शिक्षणासंबंधी विविध योजना, वारसा हक्क कायदा या योजनांचा किती अंमलबजावणी झाली याचा आढावा घेण्यात आला. या योजना आत्महत्याग्रस्त कुटुंबापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचत नसल्याचे सर्वेक्षणात दिसले. शेतकऱ्याची आत्महत्या पात्र किंवा अपात्र हे सिद्ध झाल्यानंतर शासन व महिलेचा संवाद संपतो. कुटुंब पूर्णपणे उभे राहत नाही. अशा कुटुंबांना उभारी देण्यासाठी 'मकाम'ने शासनाला काही शिफारशी केल्या आहेत. राज्य सरकार २००५ पासून आत्महत्या झालेल्या कुटुंबाला एक लाख रुपये मदत देत आहे. तेरा वर्षानंतरही सरकारी मदत वाढली नाही. आंध्र प्रदेशात ही मदत साडेतीन लाख रुपये, तेलंगणा आणि कर्नाटकात पाच लाख रुपये आहे. त्यामुळे जुन्या कर्जातून मुक्ती मिळून कुटुंब सावरते. महाराष्ट्रातही मदत वाढवून तातडीची मदत विधवा महिलेच्या नावाने मिळावी असे 'मकाम'ने म्हटले आहे. राज्यात संजय गांधी निराधार आणि इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना मिळून विधवांना दरमहा ६०० रुपये पेन्शन मिळते. तसेच पेन्शन मिळण्यात प्रशासकीय दिरंगाई आहे. कर्नाटकात निराधार महिलांना दोन हजार रुपये आणि आंध्र प्रदेश व तेलंगणात एक हजार रुपये पेन्शन मिळते. महाराष्ट्रातही विधवा पेन्शनच्या रकमेत वाढ करुन ते वेळेत द्यावी सूचना 'मकाम' नमूद केले आहे. अकरा जिल्ह्यातील या कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण देण्याची गरज आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना कोणत्याही अर्जाशिवाय स्वतंत्र रेशन कार्ड देऊन त्यांचा प्राधान्यगटात समावेश करावा. सरकारी दवाखान्यात सेवा निशुल्क मिळावी. वारसा नोंदीसाठी विशेष मोहीम हाती घ्यावी आणि रोजगाराच्या संधी व शाश्वत शेती उभी करण्यासाठी सहाय्य करावे असे 'मकाम'ने म्हटले आहे.

\Bयोजनांचे मूल्यमापन नाही\B

देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी २० टक्के आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. १९९५ ते २०१६ पर्यंत ७० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात ९० टक्के पुरुष आहेत. त्यामुळे मागे राहिलेल्या विधवा स्त्रियांचे प्रश्न बिकट झाले आहेत. शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नांवर २००५ पासून राज्य सरकारच्या विविध विभागांनी २४ शासन निर्णय काढले. मात्र, या योजनांचे आतापर्यंत मूल्यमापन झाले नसल्याचे पाहणीत आढळले. कुटुंबातील महिलांच्या समस्यांना पूर्णत: दुर्लक्षित ठेवले आहे.

महिलांना शेतकरी म्हणून मान्यता मिळवून देणे 'मकाम'चे मुख्य काम आहे. महाराष्ट्रात दोन वर्षांपासून मकाम कार्यरत असून सर्वेक्षणात २० संस्थांचा सहभाग होता.

-पल्लवी हर्षे, 'मकाम'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडेगाव कचरा डोपोला आग

$
0
0

पालिका कर्मचाऱ्यांवर संशय

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रातील कचऱ्याला आग लागल्यामुळे अग्निशमन विभागाची धावाधाव झाली. पाच गाड्या पाठवूनही आग आटोक्यात आली नाही. आग प्रकरणी महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांवर संशय घेतला जात आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पडेगाव येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. प्रक्रिया करण्यासाठी मशीन उपलब्ध होईपर्यंत त्या जागेवर कचरा आणून टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या जागेवर कचरा डेपोच निर्माण झाला आहे. जमा झालेल्या कचऱ्याला गुरुवारी रात्री साडेअकरा - १२ वाजेच्या सुमारास आग लागली. स्थानिक नागरिकांनी त्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाच्या गाड्या आग विझवण्यासाठी रवाना करण्यात आल्या. शुक्रवारी सकाळपर्यंत तीन गाड्या पडेगावला पाठवण्यात आल्या, परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान एक आणि दुपारी तीन वाजेच्या दरम्यान एक अशा दोन गाड्या पडेगावला पाठवण्यात आल्या. सायंकाळपर्यंत काही प्रमाणात आग आटोक्यात आली. रात्री आठ वाजेच्या सुमारास पुन्हा एक गाडी पाठविण्यात आली.

पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या जागेवर कचरा टाकण्यात त्या भागातील नागरिकांचा विरोध आहेच. शिवाय कचरा प्रक्रिया मशीन लावण्यासाठी त्याच जागेवर शेड बांधण्याचे काम देखील केले जाणार आहे. शेड बांधण्यासाठी जागेवर असलेला कचरा नष्ट करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांनी जागा मोकळी करण्यासाठी कचऱ्याला आग लावली असावी अशी चर्चा होती.

जलकुंभात पाणीच नव्हते

अग्निशमन विभागाच्या गाड्या कोटला कॉलनी येथील जलकुंभावरून भरून घेतल्या जातात. शुक्रवारी दुपारी अग्निशमन विभागाची गाडी जलकुंभावर गेली असता तेथे पाणीच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे गाडी अग्निशमन विभागात आणण्यात आली आणि पाणी भरून गाडी पडेगावला पाठवण्यात आली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवरून कनेक्शन घेण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुटखा, पान मसाला जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाई करीत २६ हजार ५९८ रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखु जप्त करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुक्तार सय्यद भाई सय्यद आपल्या दुचाकी गाडीवरून (एमएच २० इक्यु ७३९८) गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखु घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी ज्योत्स्ना जाधव, निरुपमा महाजन, सुलक्षणा जाधवर, बिडकीन येथील पोलिस हेड कॉनस्टेबल जी. जी. राऊत यांनी कारवाई करून मुद्देमालासह दुचाकी वाहन जप्त केले व मुक्तार सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी मार्गामुळे वाहनधारक वैतागले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. संबंधित विभाग व कंत्राटदार यांनी काढलेल्या पर्यायी रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना त्रास होत असून, अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. अनेक वाहन खिळखिळी झाली आहेत. अशीच परिस्थिती काही दिवस राहिली, तर प्रवाशांना मणक्याचा आजार नक्कीच जडेल. त्यामुळे हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा, अशी मागणी प्रवाशी व वाहनधारकातून होत आहे.

औरंगाबादकडून सिल्लोडकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. दोन ते तीन किलोमीटर अंतर सोडल्यास ठिकठिकाणी या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. खडे वाचविण्याच्या नादात दुचाकी वाहनधारक दुसऱ्या वाहनावर धडकत आहेत. हे प्रकार दररोज घडताना दिसत आहे. या रस्त्यावरून वाहन जात असताना धुळीचे लोट पसरत असून, मागच्या वाहनांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

\B छोट्या वाहनाचा थरथराट

\Bसावंगीपासून चौका घाटापर्यंत दोन्ही बाजूने कामे सुरू आहेत. एका मार्गावरून जाताना कंत्राटदाराने तयार केलेला रस्ता छोट्या वाहनासाठी धोकादायक आहे. असंख्य खड्डे असल्याने छोटी वाहने थरथरत पुढे जातात. त्यामुळे ही वाहने खिळखिळी होत आहेत. सबंधित कंत्राटदाराने या मार्गावर रोलर फिरविणे आवश्यक आहे किवा मुरूम टाकवा, असे वाहनधारकांचे मत आहे. सिल्लोड, फुलंब्रीसह अनेक ठिकाणची शेकडो वाहने या रस्त्यांनी रोज ये-जा करतात. या वाहनाची दयनीय अवस्था होत असून, बऱ्याच दुचाकी व चारचाकी छोट्या कार खिळखिल्या होत आहे असून, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ मालकावर येत आहे. महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मार्गावर पर्यायी रस्ता करताना दुर्लक्ष करण्यात येत आहे. हा पर्यायी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वाहनधारकांसह प्रवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचनाचे प्रश्न सोडविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या नांदूर मधमेश्वर प्रकल्पासोबतच तालुक्यातील मन्याड साठवण तलाव, नारंगी मध्यम प्रकल्प, रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना, शिवना टाकळी या प्रकल्पांचे सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकरी मित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करू, असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव डोंगरे यांनी केले.

मागील दीड महिन्यापासून शेतकरी मित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेली जनजागृती व कायदेशीर पाठपुरावा केल्यामुळे जलसंपदा विभागाने नांदूर मधमेश्वर कालव्यास पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून शासकीय स्तरावर कालवा सल्लागार समितीची बैठकीसाठी मुहूर्त सापडत नव्हता. कालवा सल्लागार समितीची बैठक होत नसल्यामुळे जलसंपदा विभागास पाणी सोडण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या, परंतु शेतकरी मित्र प्रतिष्ठानचे डॉ. डोंगरे यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत पाणी न सोडल्यास सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन १६ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची गंभीर दाखल घेत जलसंपदा विभागाने गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पाणी सोडले. त्यामुळे वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेतकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

\Bशेतकऱ्यांचा आनंदोत्सव\B

लाभधारक शेतकऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महत्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. डोंगरे, पंडित शिंदे, चांगदेव पाटील गायकवाड, धोंडिराम ठाकूर यांची भाषणे झाली. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी जलसंपदा कार्यालात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कालवा, चाऱ्या, पोटचाऱ्या यांच्या दुरुस्तीसाठी जेसीबी व पोकलनची मागणी केली. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला; तसेच आवर्तनाचे नियोजन ठरवण्यात आले. सर्वांनी पाण्याचा योग्य वापर करावा; तसेच सर्व लाभार्थींना पाणी मिळण्यास सहकार्य करावे, असे आवाहन शेतकरी मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष व हृदयरोगतज्ञ डॉ. डोंगरे, पंडित शिंदे, युनूस देशमुख, अशोक थोरात आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटक म्हणजे आयुष्य अनुभवणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आपल्या आयुष्यात जगायच्या ज्या गोष्टी राहून गेल्या, त्या गोष्टी समजून घेण्याचे क्षेत्र म्हणजे नाटक. दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींना झुंजत कलाकार रंगंमंचावर आयुष्य उभे करतात. हे आयुष्य अनुभवण्यासाठी रसिक जमतात,' असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. दिलीप महालिंगे यांनी केले. ते नाट्य महोत्सवात बोलत होते.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाची ५८ वी राज्य हौशी नाट्य स्पर्धा शुक्रवारी सुरू झाली. तापडिया नाट्यमंदिरात सायंकाळी स्पर्धेचे उद्घा‌टन करण्यात आले. यावेळी रंगकर्मी प्रा. दिलीप महालिंगे, प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे, परीक्षक संजय पाटील, सुहास जोशी व अरुण शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. 'राज्य नाट्य स्पर्धा ही भारतातील एकमेव वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा आहे. कलाकार घडवण्याची परंपरा स्पर्धेने जपली. मराठ‌वाड्यातून नावाजलेले कलाकार याच माध्यमातून कला क्षेत्रात पोहचले,' असे डॉ. जब्दे म्हणाले. स्पर्धेच्या उद्‌घाटन कार्यक्रमानंतर अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा परळी निर्मित 'सत्यदास' नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. मनोज महाजन लिखित व कल्याण वाघमारे दिग्दर्शित या नाटकात सत्यदास या गूढ व्यक्तीचे अंतरंग उलगडताना सामाजिक आशय मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेटके नेपथ्य आणि साध्या कथानकाचा प्रयोग रसिकांच्या पसंतीस उतरला. या नाटकासाठी राजेश मुंडे, दयानंद सरबाळे, सुधीर राजहंस, यशस्वी खोसे, वैजनाथ फड, वाल्मिक नागरगोजे, नागनाथ पांचाळ यांनी तांत्रिक सहाय्य केले. यावेळी स्पर्धेचे समन्वयक रमाकांत भालेराव आहेत. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बस धावणार २० किमीच्या परिघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्टसिटी मिशनच्या सिटी बस औरंगाबाद शहराच्या २० किलोमीटरच्या परिघात धावणार आहेत. बस प्रवासासाठी किमान दहा ते कमाल २५ रुपये भाडे आकारले जाईल, असे संकेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत मिळाले.

सिटी बसचे मार्ग व संभाव्य भाडे यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त तथा औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निपुण विनायक, एसटी महामंडळाच्या वाहतुक विभागाचे महाव्यवस्थापक कॅप्टन आर. आर. पाटील, मध्यवर्ती कार्यालयाचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, औरंगाबादचे विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

डॉ. विनायक यांनी बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, डिसेंबर अखेरीपर्यंत ५० बस, तर जानेवारी अखेर पर्यंत उर्वरित ५० बस उपलब्ध होणार आहेत. या शंभर बस चालवण्याबद्दल एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. 'एसटी'च्या सध्याच्या सिटी बस बंद करून स्मार्टसिटीच्या बस सुरू होणार आहेत. ही सेवा चालवण्यासाठी एसटी महामंडळाकडील सध्याचे कर्मचारी डिसेंबरमध्ये मिळणाऱ्या ५० बस चालवण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे बस मिळताच त्या शहरात धावतील. उर्वरित ५० बससाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल. सिटी बसचे मार्ग व प्रवास भाड्याचा प्रस्ताव एका आठवड्यात स्टेट ट्रांसपोर्ट ऑथॅरिटीकडे पाठण्यात येणार आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर मार्ग आणि भाड्यावर शिक्कामोर्तब होईल. एसटी महामंडळातर्फे सध्या आकारले जाणारे प्रवास भाडे स्मार्टसिटीच्या बससाठी असावे, अशी आमची भूमिका आहे. प्रस्ताव पाठवल्यानंतर पुन्हा एक बैठक मुंबईत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांसोबत होणार असून त्यात बसडेपो आणि इतर मुद्यांवर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

'एसटी'च्या सध्या २५ सिटी बस १४ मार्गांवरून धावत असून स्मार्टसिटीच्या शंभर बस ३० मार्गांवरून धावणार आहेत. शहरापासून किती अंतरापर्यंत सिटी बस जाऊ शकेल, या प्रश्नावर कॅप्टन पाटील म्हणाले, शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे अंतर ठरवले जाते. औरंगाबादची लोकसंख्या लक्षात घेता ही सेवा २० किलोमीटरपर्यंत देता येऊ शकेल. 'एसटी'चेच भाडे कायम ठेवल्यास किमान दहा ते कमाल २५ रुपये भाडे आकारले जाईल, असे संकेत त्यांनी दिले.

\Bसिटी बसमधील सुविधा\B

- बस कुठेही थांबवण्यासाठी पॅनिक बटन

- बसमध्ये उभे राहण्यासाठी प्रशस्त जागा

- व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम

- पुढील बसस्टॉपची माहिती देण्यासाठी साउंड सिस्टीम

- एलइडी स्क्रिन

- हायड्रॉलिक दरवाजा

----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images