Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘हज कमिटी’ अध्यक्षपदाच्या आमिषाने ३३ लाखांचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद : -

बांधकाम व्यावसायिकास हज कमिटीचा चेअरमन (अध्यक्ष) करून देण्याचे अमिष दाखवून ३३ लाखांचा गंडा घालत्याची घटना शहरात घडली. या प्रकरणात दिल्ली दूरदर्शनमधील अधिकारी खालेद राजीब, परवेज आलम आणि आबू साद या तीन भामट्यांविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगमपुरा भागातील जयसिंगपुरा येथे आरेफ नुरुद्दिन सिद्दिकी हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांना व्यवसाय वाढविण्यासाठी कंपनीची जाहिरात करायची होती. दूरदर्शनवर जाहिरात करायची असल्याने ते परिसरातील शिक्षक हाफीज खालेद आणि मौलाना सादेक यांच्या सोबत मुंबईला गेले. मुंबईत त्यांची दूरदर्शन येथील उच्चपदस्थ असलेले खालेद राजीब यांच्याशी ओळख झाली. जाहिरातीचा विषय संपल्यानंतर दूरदर्शनचा अधिकारी खालेद यांने या फिर्यादीला, 'माझी दिल्ली येथे राजकारणाऱ्यांशी चांगली ओळख आहे. तुम्हाला हज कमिटीचा अध्यक्ष करून देतो,' अशी बतावणी मारली. त्यासाठी ३३ लाख रुपयांचा खर्च लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हज कमिटीचा अध्यक्ष होण्यासाठी बिल्डर आरेफ सिद्दिकी यांने होकार दिला. दुसऱ्या दिवशी त्यांनी परवेज आलम यास जयसिंगपुरा येथे घरी बोलावून त्यास २२ मार्च २०१५ रोजी २३ लाख रुपये रोख दिले. चेअरमनपदाचे पत्र दिल्यानंतर दहा लाख रुपये देतो असे सांगितले. दोन महिन्यांनंतर खालेद यांनी उर्वरित पैशासाठी तगादा लावला. तुमचे काम झालेले आहे पैसे तयार ठेवा, असे सांगितले. आरेफ यांनी २२ मे रोजी पुन्हा मुलाच्या हाताने दहा लाख रुपये दिल्ली येथील खालेद यांच्या घरी पाठवले. पूर्ण रक्कम दिल्यानंतर आरेफ सिद्दिकी यांनी अध्यक्षपदाच्या नियुक्तीच्या पत्रासाठी तगादा लावला. त्यावेळी संबंधितांची उडवा उडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिद्दिकी यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. त्यावेळी तिघांनीही पैसे परत देण्यास नकार दिला.

\Bतीन वर्षांनंतर तक्रार\B

सिद्दिकी यांनी तीन वर्षांनंतर पोलिस आयुक्त चिरंजिव प्रसाद यांची भेट घेऊन या फसवणुकीबाबत तक्रार दिली. आयुक्तांनी घटनेची दखल घेत हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. सहायक निरीक्षक अमोल सातोदकर यांनी चौकशी करून दिल्लीतील खालेद राजीब, परवेज आलम आणि मुंबई येथील आबुसाद विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे करण्यात आले आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैज्ञानिक संशोधनाला चालना द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विज्ञानाच्या प्रगतीत कल्पनाशक्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणावे. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संशोधनाला चालना देणारा विचार करावा,' असे प्रतिपादन डॉ. गुलाब खेडकर यांनी केले. ते इन्स्पायर शिबिरात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 'इन्स्पायर' शिबिर सुरू आहे. या शिबिराच्या चौथ्या दिवशी, शनिवारी पहिल्या सत्रात प्रो. अशोक लगड यांनी दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व विषयावर मार्गदर्शन केले. जोसेफ प्रॉब्लेम फार्म्युला, एज प्रॉब्लेम, कॉइन पझल याद्वारे लगड यांनी रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर खेडकर यांनी मार्गदर्शन केले. 'प्रतिकूल परिस्थितीतून आइन्स्टाइन, न्यूटन, आर्यभट्ट, मेंडेल, वॅटसन यांच्या संशोधनाने विज्ञानाला नवीन आयाम प्राप्त करून दिला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत संशोधनाला चालना देणारा विचार करावा. कल्पनाशक्तीचा विस्तार होणे गरजेचे आहे,' असे खेडकर म्हणाले. शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. विक्रम खिलारे, डॉ. अनिता टिकनायक, दिनेश नलगे, अमोल कल्याणकर, डॉ. शिवाजी घोडके, डॉ. तेजनस्विनी सोनटक्के, डॉ. राजश्री देवळालीकर, अनिल सरकटे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामातील तांत्रिक अडथळे दूर करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बांधकामे आणि विकासकामातील तांत्रिक अडथळे दूर करावे. सर्वसामान्य कायदेशीर नियमांची अंमलबजावणी तात्काळ करून कामे मार्गी लावावीत, अशी मागणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विद्यापीठातील २५ लाख रुपयांपेक्षा जास्त निधीची कामे वर्ग झाल्यामुळे कामे रखडल्याचे शितोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

सध्या विद्यापीठात नवीन बांधकामे आणि विकासकामे सुरू आहेत. 'नॅक'च्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची कामे जलद पूर्ण करणे अपेक्षित आहे, मात्र तांत्रिक अडचणी असल्यामुळे कामे पूर्ण करण्याबाबत साशंकता आहे. याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामाचा व्याप पाहता विद्यापीठाची कामे वेळेवर होत नाही. परिणामी, विकासकामे रखडली आहेत. यासंदर्भात 'कॉमन स्टँच्युटी'चे नियम तयार करण्यात आलेल्या समितीसमोर सर्व विद्यापीठासाठी इमारत आणि त्यासंबंधी कामाचे सर्वसामान्य नियम तयार करून संबंधित समितीकडे पाठवले आहेत. पण, त्याची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणी करताना कामाची मर्यादा, कामाच्या परवानगीची मर्यादा २५ लाखांवरून पाच कोटी करावी. ज्यामुळे विद्यापीठ यंत्रणेमार्फत असलेली कामे पूर्ण होतील, असे शितोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

विद्यापीठ परिसरातील विविध बांधकामासंदर्भात पंचवीस लाख रुपयांपेक्षा जास्त निधीची बांधकामे ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करून घेण्याची तरतूद महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात करण्यात आली आहे. विद्यापीठातील विकासकामे विद्यापीठाच्या यंत्रणेद्वारे झाल्यास नियोजन व्यवस्थित होऊ शकते. याबाबत आवश्यक तांत्रिक सूचना करा अशी मागणी तावडे यांना करण्यात आली. दरम्यान, याबाबत एका महिन्यात अडचण दूर करत परिनियमात त्याचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले.

\Bदुरुस्तीच्या कामाने गैरसोय\B

'नॅक'च्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठातील वसतीगृहांची डागडुजी करण्यात येत आहे. फरशी बदलणे, स्वच्छतागृहांची दुरुस्ती ही कामे सुरू आहेत. या कामामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यामुळे कामे लवकर पूर्ण करा अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने केली. याबाबत संघटनेने प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांना शनिवारी निवेदन दिले. यावेळी सत्यजित म्हस्के, लोकेश कांबळे, स्टॅलिन आडे, रवी चव्हाण, रवी खंदारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक स्थैर्यासाठी धार्मिक सोहळे गरजेचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धार्मिक सोहळे झाले पाहिजेत आणि ते देखील विधिवतच. कारण त्यातून धर्माला चालना मिळते. धार्मिक अधिष्ठानाला बळ मिळते. वावटळीत माणसाला सरळ मार्गाने चालवण्यासाठी, धर्मरक्षणासाठी आजच्या युगात अशा उपासना घडाव्यात. धर्म परंपरेला चालना देणारे सोहळे समाजाला स्थैर्य देण्यासाठी गरजेचे आहेत. अण्णा स्वामींच्या जन्मशताब्दी निमित्त होणारा सहस्रचंडी याग हा यापैकीच एक आहे. अशा कार्यक्रमाचे नियोजन अवघड असते. त्यांच्याच मार्गाने ही परंपरा मार्गस्थ आहे याचा आनंद आहे, असे प्रतिपादन देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी केले.

योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज अर्थात अण्णामहाराज सोनईकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा सांगता समारंभाला शनिवारपासून बीड बायपास रोडवरील जबिंदा लॉन्सवर सुरुवात झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, ज्याने त्याने आपापले कार्य केले पाहिजे, कोण काय करतो याकडेच सगळ्यांचे लक्ष असते, त्यातही धर्म रक्षणार्थ कार्य करणे हे कठीण काम आहे. ज्या योगी पुरुषाने आयुष्यभर पायी प्रवास करून समाजातील धार्मिक वृत्तीला चालना दिली आणि प्रत्येक कार्याला सुनियोजितपणे आकार दिला त्या थोर संताच्या जन्मशताब्दीनिमित्त सहस्रचंडी याग होणे हा उच्चयोग आहे.

यावेळी अंबरीश महाराज, अनिरुद्ध महाराज आदी उपस्थित होते.

\Bमहोत्सवाला जलयात्रेने प्रारंभ

\Bसकाळी संग्रामनगर येथील रेणुकामाता मंदिरात जलपूजन झाले आणि कार्यक्रम स्थळांपर्यंत सुवासिनी, वाद्य, स्वामीची पालखी आणि रेणुका मातेच्या रथासह शेकडो भाविकांच्या उपस्थित भव्य जलयात्रा काढण्यात आली. यावेळी अप्पामहाराज, अंबरीश महाराज आणि अनिरुद्ध महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. दुपारी ही यात्रा कार्यक्रमस्थळी पोचल्यावर, मंडप पूजन, मातृका पूजन, होऊन सप्तशती पाठाला आरंभ झाला. वाराणसी, नाशिकसह औरंगाबादचे ब्रह्मवृंद या सोहळ्यासाठी विशेष उपस्थित असून, २० नोव्हेंबरपासून सहस्रचंडी शतकुंडी महायज्ञ सुरू होत आहे. शहरातील हा पहिलाच वैशिष्ट्यपूर्ण असा कार्यक्रम आहे.

\Bआज देवकी पंडित यांचे गायन\B

आजपासून तीन दिवसांच्या संगीत समारोहाला प्रारंभ झाला. नाशिक येथील कलाकारांनी शास्त्रीय नृत्य सादर केले, तर कल्याण अपार यांचे सनई वादन झाले. रविवारी रात्री आठ वाजता प्रख्यात गायिका देवकी पंडित यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

रविवारचे कार्यक्रम

सकाळी ६ : काकड आरती

सकाळी ७ : विष्णू सहस्रनाम पठण

सकाळी १० : यज्ञ मंडपात पूजनास प्रारंभ

दुपारी तीन ते सायंकाळी सहा : श्री सप्तशती पाठ

सायंकाळी ७ : आरती व महाप्रसाद

रात्री ८ वाजता : गायिका देवकी पंडित यांचे गायन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात हवेत ‘वॉटर पोलिस’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्याच्या योग्य वापरासाठी 'वॉटर पोलिस' ही संकल्पना गरजेची आहे, असे मत स्मार्टसिटी मिशनच्या ' मंथन : औरंगाबाद स्मार्टसिटी' या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले. कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शहर स्मार्ट होण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याची भावना देखील व्यक्त करण्यात आली.

पाणीपुरवठा हा औरंगाबाद शहरातील ज्वलंत विषय आहे. या विषयावर बोलताना प्रशांत देशपांडे म्हणाले, 'पाणी वापराचे नियोजन करणे गरजेचे आहे. विदेशात यासाठी वॉटर पोलिस ही संकल्पना आहे. अशाच प्रकारची संकल्पना आपल्याकडे आणणे गरजेचे आहे. पाण्याचा फेरवापर देखील आवश्यक आहे. या क्षेत्रात आपसात विश्वासाने काम केले, तर हा प्रश्न आपण सहज सोडवू शकू.'

डॉ. राजेंद्र होलानी म्हणाले, 'राष्ट्रीय निकषांच्या ५० टक्के पाणी औरंगाबाद शहरासाठी उपलब्ध आहे. स्मार्टसिटीची संधी लक्षात घेऊन पाण्याची मागणी आणि पुरवठा यातील व्यस्त प्रमाण पाच वर्षांत आपल्याला संपवावे लागेल. यासाठी स्मार्ट मॅनेजमेंटची गरज आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्यांची कार्यक्षमता चांगली आहे. त्यांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.'

'अवर सिटी, स्मार्टसिटी' : खोले

'अवर सिटी, स्मार्टसिटी' हे ब्रीद आपण मनाशी ठरवले पाहिजे, असे आवाहन मराठवाडा इनव्हायरमेंटल केअर क्लस्टरचे (एमईसीसी) सदस्य बी. एच. खोले यांनी केले. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये एमईसीसी या संस्थेने कायापालट केला आहे. उद्योजकांनी दोन हजार टन कचरा स्वत:च्या हाताने स्वच्छ केला. औद्योगिक परिसरात एक लाखापेक्षा जास्त झाडे लावली, त्यापैकी ९९ टक्के झाले जगली आहेत. कचरा प्रक्रिया प्रकल्प येत्या काही महिन्यांत या ठिकाणी सुरू होणार आहे. जे काम वाळूजमध्ये करणे शक्य झाले आहे; तसेच काम औरंगाबाद शहरात करणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.

आपण आपली भूमिका तपासावी : गवळी

घाण आपणच केली आहे. कचरा आपणच टाकलेला असतो आणि आपणच महापालिकेला अकार्यक्षम म्हणतो. अशावेळी आपण आपली भूमिका तपासली पाहिजे, असे मत उद्योजक उल्हास गवळी यांनी व्यक्त केले. रस्त्यांची रुंदी वाढली नाही, अशी तक्रार आपली असते, पण रस्त्यांची आहे ती रुंदी आपण नीट सांभाळली आहे का याचाही विचार करावा. रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत, असे ते म्हणाले. आपल्या शहराच्या समृद्धीविषयी आपल्या भावना प्रगल्भ नाहीत, असे स्पष्ट करताना गवळी यांनी,'शाळकरी मुलांना शहराच्या समृद्धीबद्दल ज्ञान दिले गेले पाहिजे. आपला भूतकाळ संमृध्द होता, त्यातून प्रेरणा घेऊन वर्तमान आपल्याला त्यापेक्षाही समृद्ध करायचा आहे,' असा उल्लेख त्यांनी केला.

नागरिकांचा सहभाग वाढवा : कीर्ती शाह

स्मार्टसिटी हा राष्ट्रीय उपक्रम आहे. त्यात आपापल्या शहराच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण बदल केले पाहिजेत. शहरांच्या विकासासाठी नवीन दिशा या उपक्रमातून मिळणार आहे. स्मार्टसिटी हा उपक्रम अनेक हातांनी, अनेक कल्पनांनी राबवावा लागणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या भरवशावर हा उपक्रम सोडू नका. नागरिकांचा सहभाग त्यात वाढवा. औरंगाबाद स्मार्टसिटी प्रोजेक्ट कमिटीच्या माध्यमातून हा सहभाग वाढवता येईल, असे मत अहमदाबाद येथील आर्किटेक्ट कीर्ती शाह यांनी व्यक्त केले. 'करंट चॅलेंजेस इन अर्बन डेव्हलपमेंट इन इंडिया' या विषयावर त्यांनी सादरीकरण देखील केले. आपण आपल्या समोरील संधी आणि आव्हाने आताच ओळखली पाहिजेत. पर्यावरण, प्रदूषण, वृक्षारोपण आदी क्षेत्रातील समस्यांची मांडणी त्यांनी केली. आपण आपल्या शहराच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम असले असे ते म्हणाले.

नॉलेज लिंक या संस्थेचे निशीद कुमार, सुरत महापालिकेचे जिनेश पटेल, जिगर पटेल एमजीएमचे डॉ. आर.आर. देशपांडे, रवी चौधरी, मेघना बडजाते, मुकुंद कुलकर्णी, रणजीत कक्कड यांनीही कार्यशाळेत आपली मते मांडली. यानंतर हेरिटेज अँड अर्बन प्लॅनिंग, हाऊसिंग, पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते आणि वाहतुक, इ - गव्हर्नन्स, आरोग्य, शिक्षण या विषयावर गटचर्चा घेण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डांबरीकरणाची मागणी

0
0

औरंगाबाद : ए. एस. क्लब ते पैठण रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते, परंतु या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक झाला असून, अपघातास निमंत्रण देणारे खड्डे बुजविण्यात यावे, रोडवर तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजू शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांना नुकतेच निवेदनही सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला, मुलीच्या विनयभंगाचे तीन गुन्हे

0
0

म .टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात चार वेगवेगळ्या भागात महिला व अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहे. या प्रकरणात संबंधितांनी पोलिस ठाण्यांत तक्रारी दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

क्रांतीचौक भागात आपल्या आई आणि मुलाची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असलेल्या एक महिलेची छेडछाड काढल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एक महिला आपल्या आई व मुलाची वाट पाहत उभी होती. या ठिकाणी काळी पिवळी (क्रमांक एमएच २० डी.टी. ६०५६) व रिक्षा चालक (क्रमांक एमएच २० बीटी १६४६) यांनी अश्लील हावभाव करून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले; तसेच या महिलेचा हात धरून गाडी बसविण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर शिवीगाळ करून जिवे मारण्याचीही धमकी दिली. या प्रकरणात रिक्षा चालक आणि काळी पिवळी चालकाच्या विरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवाहरनगर भागात राहणाऱ्या एक महिलेच्या घरात १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास वाजता चेतन टाकळकर हा व्यक्ती बळजबरीने घुसली. महिलेला मिठीत घेऊन महिलेच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणात चेतन टाकळकर याच्या विरोधात जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी सिडको भागात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात शाहरूख नावाचा व्यक्ती १५ नोव्हेंबर रोजी घुसला. 'तुझा नवरा घरी आहे का? तो ड्यूटीला गेला नाही,' असे महिलेने विचारले. 'तुला काय करायचे आहे, ' असे संबंधित महिला म्हणाली. यावरून महिलेच्या पतीला शिवीगाळ केली व महिलेला मारहाण केली. या प्रकरणात शाहरूख नावाच्या व्यक्तीवर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bधमकी देऊन मुलीशी संबंध\B

छावणी भागात राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलीला रस्त्यावर अडवून,'तू खूप सुंदर दिसतेस. माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी आत्महत्या करून घेईल. तुझ्या घरच्यांना जेलमध्ये टाकेल,' अशी धमकी देऊन सागर श्रीसुंदर यांने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत पीडित मुलीची आई सागर श्रीसुंदर याच्याकडे १५ नोव्हेंबर रोजी विचारण्यास गेली असता सागर, आशू आवळेसह पाच महिलांनी पीडित मुलीच्या आईला मारहाण करून जखमी केले. याप्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराला येणार ‘अच्छे दिन’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साडेसाती संपली आहे. शहराला आता 'अच्छे दिन' येतील, असा विश्वास महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी व्यक्त केला. शहराला 'अच्छे दिन' आणण्यासाठी नागरिकांनी स्मार्टसिटी मिशनच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे 'मंथन : औरंगाबाद स्मार्टसिटी' या विषयावर एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महापालिकेचे सभागृहनेते विकास जैन, माजी सभापती दिलीप थोरात, महिला बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. माधुरी अदवंत, उपसभापती सुरेखा सानप, आयुक्त डॉ. निपुण विनायक, उद्योजक मानसिंह पवार, मुनीष शर्मा, मुकुंद कुलकर्णी, उमेश दाशरथी, बी. एच. खोले, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची विशेष उपस्थिती होती.

महापौर म्हणाले, 'शहरात कचराकोंडी निर्माण होऊन २७२ दिवस झाले आहेत आणि महापौर होऊन ३८४ दिवस झाले आहेत. त्यापैकी २७२ दिवस कचराकोंडी फोडण्यातच गेले. महापालिकेला चांगले आयुक्त मिळाल्यामुळे कचराकोंडीवर मात करणे शक्य झाले. शहराची साडेसाती संपली आहे, चांगले दिवस आता येतील. केलेली कोणतीही घोषणा आता कागदावर राहणार नाही, घोषणांची अंमलबजावणीच होईल. नागरिकांच्या सहकार्याने शहर स्मार्ट करायचे आहे.'

जागतिक वारसास्थळांच्या संवर्धनाच्या माध्यमातून येत्या काळात शहराचा विकास होणार आहे. आपले शहर बकाल नाही. स्मार्टसिटी मिशनच्या माध्यमातून विविध कामे नजिकच्या काळात सुरू होणार आहेत. शंभर कोटींचे रस्ते, सिटी बससेवा लवकरच सुरू केली जाणार आहे, असे ते म्हणाले. 'माझे शहर' अशी भावना निर्माण झाल्याशिवाय विकास शक्य नाही, असे त्यांनी नमूद केले.

अॅड. माधुरी अदवंत, विकास जैन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. स्मार्टसिटी मिशनच्या अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या सिटी बसचे डिझाइन तयार करणारे श्रीकांत मोरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

\Bकोण कोणाच्या हाताखाली काम करतो?\B

'मंथन' कार्यशाळेत महापौर नंदकुमार घोडेले आणि सभागृहनेते विकास जैन यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली त्यामुळे वेगळेच 'मंथन' उपस्थितांना अनुभवायला मिळाले. घोडेले - जैन यांची आपसातील कुरघोडी महापालिकेत नेहमीच चर्चेचा विषय असते. या चर्चेला जैन यांनी 'मंथन' कार्यशाळेत तोंड फोडले. जैन म्हणाले, 'आम्ही सर्वजण महापौरांच्या अंडर काम करतो. आमची टीम चांगली जमली आहे.' महापौरांनी आपल्या भाषणात जैन यांच्या या विधानाचा धागा पकडला आणि ते म्हणाले, 'जैन आमच्या सभागृहाचे नेते आहेत त्यामुळे कोण कुणाच्या अंडर काम करतो हे येथे बसलेल्या सर्वांना माहिती आहे.' महापौरांच्या या विधानामुळे सभागृहात हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेनेच्या गुलमंडी शाखेतर्फे व व्यापारी आघाडीतर्फे ठाकरे यांना गुलमंडी येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, नगरसेवक सचिन खैरे, व्यापारी आघाडीचे संजय लोहिया, विजय सूर्यवंशी, सचिन ढोकरट, युवासेनेचे युवराज झुंजरकर, पूनम गोरक्षक, मदन दीपवाल, बाळासाहेब वाघ, सचिन लखासे, हेमंत पालकर, सुरेश नलावडे, योगेश मिसाळ, महेश घोंगते, नरेश पुंड, करण दिपवाल, रितेश देवगीरीकर, आनंद सोनवणे, महावीर साकला, सुमित पितळे, महेंद्र संकलेचा, सुभाष तांबोळी, बाबासाहेब आगळे आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी जादा वाहतूक

0
0

औरंगाबाद :

कार्तिकी एकादशीसाठी पैठण येथे हजारो भाविक विविध शहरातून जात असतात. या भाविकांसाठी सोमवारी (१९ नोव्हेंबर) विविध आगारातून जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत सिबीएस येथून २, सिडकोवरून ५, सिल्लोड - ४, कन्नड - २, गंगापूर - २ अशा १५ जादा बस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून शहरातील सिडको, हर्सूल, औरंगपुरा, चिकलठाणा येथून भाविकांसाठी पंढरपूर (वळदगा), वाळूज येथे जाण्यासाठी ५ जादा बस सोडण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या दंडुका मोर्चाची तयारी सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या २७ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्तालयावर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरात प्रदीर्घ कालावधीनंतर मनसे मोर्चा काढून रस्त्यावर उतरणार आहे. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी झटून कामाला लागले असून त्याचे नियोजन सध्या सुरू आहे.

मनसे नेते अभिजित पानसे, राजू पाटील आणि राज्य उपाध्यक्ष तथा मराठवाडा निरीक्षक जावेद शेख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता पैठणगेट येथून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. या मोर्चासाठी शहरातील तसेच ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहे. शहरामध्ये विभागध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष तसेच शाखाध्यक्षांच्या बैठका घेण्यात येऊन मोर्चाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात हा मोर्चा असल्याने मराठवाडा पातळीवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्याचे प्रश्न आणि तेथील मागण्या काय आहेत याची माहिती तालुकाध्यक्षाकडून मागविण्यात येत आहे. मोर्चामध्ये शेतकरी वर्ग जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी गावपातळीवर कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावर शेतकरी प्रश्न, अडचणी याबाबत वेगवेगळ्या थीम टाकून त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मनविसेच्या पदाधिकाऱ्यांवर देखील मोर्चाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. औरंगाबादच्या मनविसेचे पदाधिकारी या संदर्भात मराठवाड्यातील मनविसेच्या इतर पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे काम करीत आहेत. औरंगाबाद शहरात ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांची मुले शिक्षणासाठी राहतात. या मुलांच्या महाविद्यालय, हॉस्टेलमध्ये जाऊन त्यांची देखील भेट घेऊन त्यांना देखील मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मनविसेच्या वतीने करण्यात येत आहे.

मराठवाडा पातळीवरचा हा मोर्चा आहे. मोर्चा संदर्भात जास्तीत जास्त जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांना या मोर्चाची माहिती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसे रस्त्यावर उतरणार असल्याने मोर्चाला मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा आहे.

वैभव मिटकर - जिल्हा संघटक

मनविसेच्या पदाधिकाऱ्यांना देखील मोर्चाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेले अनेक विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय, अभ्यासिका, हॉस्टेल आदी ठिकाणी भेट देऊन या विद्यार्थ्यांना देखील मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

राजीव जावळीकर, जिल्हाध्यक्ष, मनविसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामपाल महाराज यांच्यावरील गुन्हे मागे घ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हरियाणा येथील संत रामपाल जी महाराज यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या अशी मागणी करत औरंगाबादमध्ये राष्ट्रीय समाज सेवा समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी पायी फेरी काढण्यात आली.

महाराजांना २०१४ रोजी अटक करून त्यांच्यावर खोटे गुन्हे, दावे दाखल करण्यात आले असा आरोप करत हे गुन्हे माघारी घेऊन त्यांची मुक्तता करण्यात यावी या मागणीसाठी भारतभर प्रत्येक जिल्ह्यातील अनुयायांनी रविवारी पायी फेरी काढली. क्रांतीचौकातून निघालेली ही फेरी सिटीचौक, शहागंज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्हाभरातून आलेल्या अनुययांनी विविध आशयाचे फलक हाती घेत, घोषणा दिल्या. १८ नोव्हेंबर २०१४ मध्ये आश्रमावर पोलिसांनी कारवाई करत महाराजांना अटक केली. या कारवाईत अनेकांचे मृत्यू झाले. शिष्यावर चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असा आरोप अनुयायी करतात. त्याबाबत अनुयायी हा दिवस काळा दिवस म्हणूनही पाळतात. काळा दिवस पाळत अनुयायांनी विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या. 'खोटे गुन्हे दाखल करणे बंद करा', 'हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई धर्म नही कोई न्यारा','गुन्हे मागे घ्या' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी समितीचे अशोक आव्हाड, तुकाराम टकले, राजेंद्र जाधव, संजय यादव यांची

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक शिक्षकांचे एक डिसेंबरला आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षकांचे प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

एक नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी. २३ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत असलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी पासून व वरिष्ठ श्रेणी प्राप्त शिक्षकांना निवड श्रेणीपासून वंचित ठेवणारा २३ ऑक्टोबर २०१७ चा शालेय शिक्षण विभागाचा अन्यायकारक शासन आदेश रद्द करावा. कमी पटाच्या नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणतीच शाळा बंद करू नये. खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत समायोजनाने नियुक्त करू नये. त्याऐवजी रिक्त जागा शिक्षण शास्त्र पदविधारक बेरोजगारांतून भरण्यात याव्यात. राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षकांना रजा रोखीकरणाचा लाभ मिळावा, यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीने नमूद केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे नितीन नवले, शाम राजपूत, शालिकराम खिस्ते, गुलाब चव्हाण, जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रंजित राठोड, विष्णू भंडारे, रऊफ पठाण, के. के. जंगले, अजय खताळ आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वक्फ’ कारभार ऑनलाइन करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या छोट्या-छोट्या कामांसाठी मुख्यालयाला चकरा माराव्या लागतात. यामुळे वक्फ बोर्डाचा कारभार ऑनलाइन करण्याची मागणी शासनाकडे करा. ही मागणी मान्य न केल्यास मुख्यमंत्र्यांना घेराओ टाकण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नेते, वक्फ बोर्डाचे सदस्य अॅड. खालेद कुरेशी यांनी वक्फ बोर्डाच्या बैठकीत दिला.

वक्फ बोर्डाची बैठक रविवारी मुंबईत इस्लाम जिमखाना येथे घेण्यात आली. या बैठकीत प्रभारी अध्यक्ष एम. एम. शेख, बोर्डाचे सदस्य खासदार हुसेन दलवाई, अॅड. खालेद कुरेशी, अॅड. आसीफ कुरेशी, मौलाना जहीर अब्बास, इम्तियाज काजी; तसेच बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. तडवी यांची उपस्थिती होती. यावेळी बोर्डात पूर्णवेळ सीईओंची नियुक्ती करावी. या मागणीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी दोन सरकारी अधिकाऱ्यांच्या नावावर चर्चाही करून त्यांची नावे शासनदरबारी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी खालेद कुरेशी यांनी, वक्फ बोर्डाची बैठक होत नसल्याने अनेकांची कामे रेंगाळलेली आहे. यामुळे दर महिन्याला बैठक घ्यावी, अशी मागणीही यावेळी आली. डिसेंबरमध्ये १५ ते २०तारखेदरम्यान वक्फ बोर्डाची बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. वक्फ बोर्डाचा कारभार आधुनिक करण्याची गरज आहे; तसेच संपूर्ण कारभार संगणकीकृत करून किरकोळ कामे; तसेच बोर्डाचे शुल्क भरण्याची सुविधा नेटबॅकिंगद्वारे करून द्यावी. ही सुविधा कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव देण्याची मागणी कुरेशी यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना घेराओ घालण्याचा इशारा बोर्डाच्या बैठकीत खालेद कुरेशी यांनी दिला.

…………

\Bअशा विषयांवर झाली चर्चा\B

- मुंबईत वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बनावट 'एनओसी'द्वारे इमारत उभारण्यात आली आहे. अशा 'एनओसी'ची तपासणी करावी. बनावट 'एनओसी' आढळल्यास पोलिसांत तक्रार नोंदवावी

- नाशिक येथे बोर्डाच्या जमिनीवर अवैध रित्या बांधकाम सुरू आहे. या बांधकामाची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी

- राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनींवर अवैध कारवाई होत असेल, तर त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी 'एफआयआर' दाखल करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला

…………

\Bमंत्र्यांमुळे बैठक\B

वर्षभरात वक्फ बोर्डाच्या फक्त तीन बैठका झालेल्या आहेत. १८ नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यासाठी काही सदस्यांना थेट राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री विनोद तावडे आणि अल्पसंख्यांक विभागाचे सचिव श्याम तांगडे यांच्यापर्यंत जावे लागले. शासनाच्या निर्देशानंतर बोर्डाची बैठक घेऊन सर्वसामान्यांच्या प्रकरणे निकाली काढण्यात आले असल्याची माहिती खालेद कुरेशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवा निवृत्तीनंतरआर्थिक लाभ द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

गेल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात सेवानिवृत्त झालेल्या पैठण नगर पालिकेच्या ४९ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक लाभ दिले नाहीत. त्यामुळे आयुष्याचा उत्तरार्धात हे कर्मचारी पूर्णपणे हतबल झाले आहे. या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

पैठण नगर पालिकेचे जवळपास ४९ कर्मचारी २००३ ते २००१८ या १५ वर्षांच्या कालावधीत सेवानिवृत्त झाले आहेत, मात्र पैठण पालिकेने अद्याप या निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती विषयक उपदान, रजा रोखीकरण, सहाव्या वेतन आयोगातील फरक, पदोन्नतीची रक्कम आदी आर्थिक लाभ दिलेले नाहीत. विशेष म्हणजे, ४९ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे लाभ पैठण पालिकेकडे देणे असतानाही, पालिकेच्या २०१८-१९च्या अर्थसंकल्पात पालिकेने ११ लाख १५ हजार २०० रुपये एवढी रक्कम शिल्लक दाखवण्यात आली असल्याचे प्रतिसाद संघटनेने सांगितले.

गेल्या १५ वर्षांपासून सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळत नसल्याने आयुष्याचा उत्तरार्धात हे वृद्ध कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले असून, ते पूर्णपणे हतबल झाले आहे. याप्रकरणात पैठण पालिकेला योग्य आदेश देऊन हा प्रश्न निकाली काढण्याचीही मागणी प्रतिसाद संघटनेचे विष्णू ढवळे, अॅड. संदीप शिंदे, शेख रईस, गणेश जुंजे, विष्णू सोनार, गणेश शिंदे, डॉ. प्रीतम भस्मे, भाऊसाहेब पठाडे, राजेंद्र बडसल, संदीप वैष्णव आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातीव्यवस्थेतून ‘सिव्हील वॉर’ घडेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भारतातील कोणताही माणूस जातीव्यवस्थेत सुखी नाही. धर्माने जातीव्यवस्था तयार केली असेल तर धर्म नष्ट केला पाहिजे. जातीच्या समस्येवर वरिष्ठ पातळीवरील लोकांनी तोडगा शोधला तरच सामान्यांचे जगणे सुसह्य होईल. अन्यथा, आपण सगळे 'सिव्हील वॉर'कडे जाणार आहोत' असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले. ते 'साक्षात' उपक्रमात बोलत होते.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'साक्षात' उपक्रमात प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी लेखन प्रवास आणि समकालीन साहित्यावर भाष्य केले. 'मसाप'च्या सभागृहात रविवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे उपस्थित होते. नाट्य लेखनाचे बीज आणि अडथळे यावर गज्वी यांनी सडेतोड विचार मांडले. 'गांधी आंबेडकर' नाटकाला सेन्सॉरने ६० कट्स सूचवले होते. ज्या ग्रंथाच्या आधारावर नाटक लिहिले ते ग्रंथ घेऊन बैठकीला गेलो. तुम्ही आधी ग्रंथ मागे घ्या, मग मी नाटक मागे घेतो अशी भूमिका मांडली. अखेर नाटकाला संमती मिळाली आणि प्रयोग झाले. 'किरवंत' नाटक ब्राह्मण जातीतील सर्वात खालच्या जातीची परिस्थिती मांडणारे होते. स्मशानात काम करणारे किरवंत इतर ब्राह्मणांसाठी अस्पृश्य असतात. या किरवंतांच्या मुलाखती घेऊन, अभ्यास करुन नाटक लिहिले. १९८१ मध्ये या नाटकावरील लेख 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एकच भडका उडाला. धमक्या देण्यात आल्या. तुमच्या जातीचे प्रश्न दिसत नाही का असा प्रश्न मला ब्राह्मण व दलित दोघांनी विचारला. अशावेळी लेखकाने जायचे कुठे ? सद्यस्थितीत लेखकांची परिस्थिती अजून अ‌वघड झाली आहे' असे गज्वी म्हणाले.

आपल्या देशातील कोणताही पक्ष कायमचे प्रश्न सोडवत नाही. बेळगाव-कारवार सीमाप्रश्न अजून अधांतरी आहे. या प्रश्नावर दरवर्षी साहित्य संमेलनात ठराव घेतात. आपण तिथल्या लोकांशी बोलत नाही. बेळगावात सुखी असल्याचे लोक सांगतात. पण, महाराष्ट्र एकीकरण समितीचे राजकारण आणि साहित्य संमेलनातील ठराव गोंधळ घालतात, अशी टीका गज्वी यांनी केली. गज्वी यांनी भाषणानंतर रसिकांशी संवाद साधला. डॉ. कैलास इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मान्यवर लेखकांसह रसिक उपस्थित होते.

निवड नसल्याचे दु:ख नाही

यवतमाळ येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया झाली. या प्रक्रियेत प्रेमानंद गज्वी यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, विदर्भातील असूनही विदर्भ साहित्य संघाने आपले नाव सुचवले नाही याबद्दल गज्वी यांनी खंत व्यक्त केली. संमेलनाध्यक्ष झालो असतो तर आनंद झाला असता. पण, निवड झाली नसल्याचे दु:खसुद्धा नाही असे गज्वी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच मोबाइल लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मोबाइल चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. मोबाइल चोरीचे प्रकार वाढत असून, घरफोडीमध्ये महिलेचे ४६ हजार रुपयांचे दागिने पळवण्यासह विविध घटनांत पाच मोबाइल चोरट्यानी लांबवले. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहेत

चोरीची पहिली घटना गुरुवारी सकाळी सिडको एम-पानमधील अरुणोदय कॉलनी भागात घडली. येथील महिला गुरुवारी सकाळी आठ वाजता घरात झोपलेली हेाती. अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडा असल्याची संधी साधत घरात प्रवेश केला. या महिलेच्या उशाजवळ ठेवलला मोबाइल व टीव्हीच्या सेटअप बॉक्सवर ठेवलेले गंठण उचलत चोरटा पसार झाला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध ४८ हजारांचा ऐवज चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल चोरीची दुसरी घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता चिकलठाणा एमआयडीसी भागात घडली. कंपनीत काम करणारी एक महिला कंपनी सुटल्याने पायी घरी जात होती. यावेळी तीन अज्ञात आरोपींनी या महिलेचा १२ हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइल चोरीचा आणखी एक प्रकार शुक्रवारी सकाळी महेमूदपुरा भागातील बाबा बिल्डिंग बॉइज होस्टेलमध्ये घडला. येथील मोहम्मद आमेर अन्सारी ताहेर अन्सारी वय या तरुणाचा तीन हजारांचा मोबाइल चोरट्यांनी रुममधून लांबवला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल चोरीचा चौथा प्रकार शनिवारी सकाळी आठ वाजता मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर घडला. अनिरुद्ध ज्ञानेश्वर धुमाळ (रा. गारखेडा) या तरुणाचा दहा हजार रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी गर्दीमध्ये चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइल चोरीच्या पाचव्या घटनेत चोरट्यांनी विठ्ठलनगर एन-दोन भागातून महिलेचा सहा हजार रुपयांचा मोबाइल उघड्या घरातून लंपास केला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bउघडी घरे, वसतिगृहे लक्ष्य

\Bयात्रा-जत्रा, आठवडी बाजार, चित्रपटगृहे, मुख्य बाजारपेठा, मिरवणुका आदी गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरीचे प्रकार घडत होते. काही महिन्यांपासून उघडी घरे, वसतिगृहे यांकडे मोबाइल चोरांनी मोर्चा वळविला आहे. वसतिगृहांमध्ये अनेकवेळा विद्यार्थी खोलीचे दार लावत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे फावते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहांतूनही मोबाइल चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत. त्याचबरोबर काही वेळा मोबाइल चार्जिंगला लावून घरातील मंडळी कामात व्यस्त असतात व त्यावेळी घराचे दार उघडे असल्यास तो चोरून नेला जातो. अनेकांना मोबाइल खिडकीमध्ये ठेवण्याची सवय असते. उघड्या खिडकीतूनही मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार घडतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमजीएम’च्या सुदृढ बालक स्पर्धेला प्रतिसाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने बालदिनानिमित्त घेण्यात आलेल्या सुदृढ बालक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा एक महिना ते एक वर्ष, एक वर्ष ते तीन वर्षे व तीन वर्षे ते पाच वर्षे अशा तीन गटांत घेण्यात आली.

स्पर्धेमध्ये पहिल्या गटात निवाणा पंचभाई, दुसऱ्या गटात आयुषी देवडे, तर तिसऱ्या गटात अद्विका वाळंबे या बालकांनी पारितोषिके पटकाविली. या स्पर्धेत सर्व बालकांची उंची, वजन, लसीकरणपूर्तता, शारीरिक तपासणी, बौद्धिक वाढ, आई-वडिलांचा आहार, त्यांचा लसीकरणाविषयीचे ज्ञान आदी निकषांच्या आधारे विजेत्या बालकांची निवड करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभाला 'एमजीएम'चे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, डॉ. अजित श्रॉफ, डॉ. लक्ष्मी रचकोंडा, डॉ. मुदलियार आदींची उपस्थिती होती. स्पर्धेसाठी बालरोग विभागप्रमुख डॉ. अंजली काळे, डॉ. भारत गाजरे, डॉ. अजय काळे, डॉ. माधुरी नयनीथुला, डॉ. सईदा सिद्दीकी, डॉ. हसीब मोहम्मद, डॉ. माधुरी एंगडे, डॉ. काकडे आदींनी पुढाकार घेतला. डॉ. नयनीथुला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुवर्णा मगर यांनी बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन केले. तसेच पालकांच्या शंकांचे निरसनही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षण आचारसंहितेत अडकविण्याचा डाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाने राज्य सरकारला दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे सामाजिक आरोग्य बिघडवण्याचा प्रकार आहे. मतांच्या राजकारणासाठी दाखवलेले आरक्षण हा वेळकाढूपणा आहे. हे आरक्षण आचारसंहितेत अडकविण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) संस्थापक अध्यक्ष अॅड. सुरेश माने यांनी केला.

सुभेदारी विश्रामगृहात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची रविवारी (१८ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेण्यात आली. अॅड. सुरेश माने म्हणाले की, मराठा आरक्षणाची शिफारस करणाऱ्यांनी ओबीसी आयोगाच्या कक्षाही तपासण्याची गरज आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे मात्र, ते देतांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ओबीसींवर अन्याय होण्याचा धोका आहे. केंद्र सरकार एकट्या मराठ्यांचे आरक्षण स्वीकारणार नाही. कारण, पटेल, जाट, गुर्जर यांचाही आरक्षणाचा प्रश्‍न त्यांना सोडवावे लागेल. तो प्रश्‍न सोडवणे मोदी सरकारला शक्‍य नसल्याचे अॅड. माने यांनी सांगितले.

मुस्लिमांच्या पाच टक्के आरक्षणाला उच्च न्यायालयाने मान्यता दिली. बोगस आदिवासी सवलतींचा फायदा लाटताहेत त्यावरही न्यायालयाने निर्णय दिले. मात्र, त्यावर सरकार बोलायला तयार नाही. दलित-आदिवासींच्या विरोधात पद्दोन्नतीचा निर्णय काढला. धनगर व इतर आरक्षणाचे विषय प्रलंबित असतांना निवडणुका तोंडावर आल्याने मुख्यमंत्र्यांसह भाजप सामाजिक ध्रुवीकरणाची खेळी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

………

\Bवंचित आघाडी भाजपला उपयोगी \B

वंचित आघाडीची दोन ऑक्‍टोबर रोजी औरंगाबादमध्ये झालेली सभा ही राजकारणातील सुज आहे. प्रकाश आंबेडकरांचे हे राजकारण भाजपला जीवदान देणारे आहे. त्यांनी मोदी विरोधी महाआघाडीत यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे अॅड. सुरेश माने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षक भारती’तर्फे मागण्यांचे निवेदन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षणाचे आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा या मागणीसाठी शनिवारी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदने देण्यात आली. येथील जिल्हा शाखेतर्फेही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना निवेदन सादर करण्यात आले.

सर्व शिक्षक व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा मूळ दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी तसेच सर्व लाभ द्यावा, सर्वांना सातवा वेतन आयोग लागू करावा, जिल्हाअंतर्गत बदली मधील अनियमितता थांबवून सुलभता आणावी, यासह अन्य मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, राज्य संपर्क प्रमुख संतोष ताठे, अनिल देशमुख, महेंद्र बारवाल, राजेश भुसारी, मुश्ताक शेख, गणेश राठोड, दत्तात्रय गायकवाड, सुधीर सोनवणे, अनिल निलंगे, श्रीराम काथार, परमेश्वर चोरमारे, संजय पठारे, शरद जाधव, देवानंद सुरडकर, किशोर जगताप, सुषमा खरे, उर्मिला राजपूत, सुप्रिया सोसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images