Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तहसील कार्यालयातील वाहनचालक लाचेच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तहसील कार्यालयातील शासकीय वाहनचालक अविनाश नानासाहेब जाधव (वय ४५) याला दीड लाखाची लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सोमवारी दुपारी तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. १ नोव्हेंबर रोजी आरोपी जाधवने वाळू व्यवसायिकाला वाळूच्या गाड्या चालविण्यासाठी ही लाच मागितली होती.

या प्रकरणातील तक्रारदार वाळू व्यवसायिक आहे. १९ सप्टेंबर रोजी या व्यवसायिकाच्या वाळूच्या वाहनावर महसूल विभागाने कारवाई केली होती. यामध्ये त्यांना एक लाखाचा दंड ठोठावला होता. यावेळी त्यांची वाहनचालक अविनाश जाधव याच्याशी ओळख झाली होती. यावेळी जाधव याने 'तुझा ट्रक वाळूची वाहतूक करण्यासाठी चालवायचा असेल तर तू आम्हाला हप्ता चालू कर, आम्ही तुझ्यावर केस करणार नाही, तु आम्हाला पैसे दिले नाही तर तुझ्या ट्रकवर तहसीलदारसाहेब केस करतील अशी धमकी दिली.' या प्रकरणी या व्यवसायिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. १ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यामध्ये जाधव याने तक्रारदाराला 'तुझ्या ट्रकचे तसेच तुझ्या ओळखीचे दत्ता खरात आणि सचिन सोळूंके उर्फ अंकल यांच्या गाड्याचे देखील पैसे जमा करून दीड लाख रुपये घेऊन ये' असे सांगितले. यावेळी जाधवने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी जाधवविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधिक्षक शंकर जिरगे, उपअधिक्षक बाळा कुंभार, नितीन देशमुख, बरंडवाल, रविंद्र देशमुख, अरुण उगले, मिलींद इप्पर, संदिप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोयीच्या बदलीसाठी प्रहार शिक्षक संघटनेचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रँडम राऊंड, विस्थापित मधील गरोदर शिक्षिका, स्तनदा माता तसेच एकल शिक्षिका यांना तात्काळ सोयीच्या ठिकाणी बदली देण्यात यावी, या मागणीसाठी प्रहार शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत अन्नत्याग करत सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यात काही शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी तर काहींना गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. यात रँडम राऊंड, विस्थापित मधील गरोदर शिक्षिका, स्तनदा माता शिक्षिका तसेच एकल शिक्षिकांची गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना अनेक त्रासांना सामोरे जावं लागत असून हा अन्याय दूर करून ज्या काही अशा शिक्षिकां आहेत, त्यांना सोयीच्या ठिकाणी बदली करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली. सय्यद गौसिया शौकत अली, अर्चना साळवे, सय्यज नसरीनबानो अजमत अली या उपोषणकर्त्यांसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंभीर मारहाणप्रकरणात आरोपीला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विनाकारण शिविगाळ करून मारहाण केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी सागर भागवत भारस्कर याला सोमवारी (१९ नोव्हेबर) अटक करून कोर्टात हजर केले असता, बुधवारपर्यंत (२१ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील पोलिस शिपाई अमित प्रभाकर नवगिरे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, २१ ऑक्टोबर २०१८ रोजी रात्री नवगिरे हे मित्रांसोबत नवीन मोंढा येथील हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. ते व मित्र हॉटेलबाहेर आले असता, त्यांच्या ओळखीचा सागर भागवत भारस्कर (२१, रा. जाधववाडी), प्रमोद फुलारी, राजीव निसर्गंध, अंकुश सपकाळ आणि इतर तीन ते चार व्यक्ती तिथे आल्या. त्यावेळी प्रमोद फुलारी याने त्यांचा मित्र सचिन गायकवाड व शैलेंद्र शिंदे यांना कारण नसताना शिविगाळ करून मारहाण केली. त्यानंतर फुलारी याने सात ते आठ जणांना बोलावून घेत, नवगिरेंसह त्यांच्या मित्रांना मारहाण केली. त्याचवेळी सागर भास्कर याने धारदार वस्तुने त्यांना मारहाण केली. त्यात त्यांचे डोके फुटले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयित आरोपी सागर भारस्कर याला सोमवारी अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपींच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे बाकी आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्र जप्त करावयाचे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिसी परस्पर बंद करून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विनापरवानगी पॉलिसीधारकाच्या पाच पॉलिसी बंद करून त्याच्या नावे दोन नवीन पॉलिसी परस्पर उघडून फसवणूक केल्याच्या प्रकरणात आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या पुणे येथील हेमंतकुमार सत्येंद्रनाथ पांडे, विवेक उग्रभान तिवारी, तुषार विलास कुलकर्णी व अमन राकेश श्रीवास्तव या चार कर्मचाऱ्यांना रविवारी अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर केले असता २६ नोव्हेंबर पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एन. पाटील यांनी दिले.

याप्रकरणी रणजित पंडितराव थोरात (वय ५०, बन्सीलालनगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, थोरात यांनी सिटी बँकेतून आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून पाच पॉलिसी काढल्या होत्या. त्यातील दोन पॉलिसी थोरात, तर तीन पॉलिसी त्यांच्या पत्नीच्या नावे होत्या. तीन पॉलिसी ९९ वर्षांसाठी, दोन पॉलिसी १० व १५ वर्षांसाठी होत्या. १६ ऑक्टोबर २०१८ रोजी कंपनीच्या पुणे कार्यालयातून तुषार कुलकर्णी यांचा फोन आला. 'आता सिटी बँक व आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनीचा कोणताही करार राहिलेला नाही. यापुढे पॉलिसीबाबत आम्हीच व्यवहार करू. तसेच चर्चा करण्यासाठी आपल्याला भेटायला येऊ' असे सांगितले. २३ ऑक्टोबर रोजी कंपनीचे पुणे कार्यालयातील मार्केटिंग कर्मचारी हेमंतकुमार सत्येंद्रनाथ पांडे (२७, रा. झारखंड, ह. मु. सिल्व्हर गार्डेनिया सोसा. रावेत, पुणे), विवेक उग्रभान तिवारी (२८, रा. मध्यप्रदेश, ह.मु. नरेगाव, पुणे), तुषार विलास कुलकर्णी (२४, रा. टाकळी अमिया, ता. अष्टी, जि. बीड, ह.मु. परिजात हौ. सो. पुणे) व अमन राकेश श्रीवास्तव (२४, रा. हडपसर, पुणे) हे थोरात यांच्याकडे आले. पॉलिसीसंदर्भात सिटी बँक सेवा देणार नसल्याने पॉलिसीतील फंड व्हॅल्यू अत्यंत कमी झाल्याचे सांगत, त्याच पॉलिसीअंतर्गत इतर फंडमध्ये स्वीच करून चांगला फायदा करून देऊ, असे सांगितले. त्यावर थोरात यांनी पॉलिसी सरेन्डर करणार नसून नवीन पॉलिसीही काढणार नसल्याचे सांगितले. तेव्हा आरोपींनी फंड फक्त स्वीच करू असे सांगत त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या घेत आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स व स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे दोन धनादेश घेतले. नंतर फिर्यादीकडून मार्किंगच्या नावाखाली मूळ पॉलिसीदेखील घेतल्या.

एक नोव्हेंबर रोजी थोरात व पत्नीच्या बँक खात्यांत काही पैसे जमा झाले. त्याबाबत शंका आल्याने त्यांनी आरोपी कुलकर्णीला फोन करून चौकशी केली असता आम्ही जो फंड स्वीच करत आहोत, त्या राउंड फिगर रकमेवर असलेली रक्कम आपल्या खात्यावर जमा झाल्याचे आरोपीने सांगितले. सहा नोव्हेंबर रोजी एसबीआयकडून ३५ लाख पाच हजार काढण्यासाठी केलेल्या सहीत तफावत आढळल्याचा मेसेज आला. आपण कोणताही व्यवहार केला नसल्याचे थोरात यांनी बँकेला ईमेलद्वारे कळविले. त्यानंतर ते कंपनीच्या औरंगाबादच्या कार्यायात गेले. त्यांनी पाचही पॉलिसीबाबत विचारणा केली असता, 'त्या सरेन्डर झाल्या असून नवीन दोन पॉलिसी कुरिअरने येणार आहे' असे सांगण्यात आले. त्यानंतर थोरात यांनी आठ नोव्हेंबर रोजी कुरिअर कार्यालयात विचारपूस केली असता, 'तुमच्या कुरिअरसाठी अमन श्रीवास्तव यांचा फोन आला होता व त्याने थोरात हे गुजरातला गेले असून पॉलिसी घरी पाठवू नका, ती घेण्यासाठी आम्ही स्वत: येऊ', असे सांगितल्याचे कुरिअर कर्मचाऱ्याने सांगितले. त्यावर मीच थोरात असून ते कुरीअर माझेच असल्याचे सांगितले. थोरात यांना त्या कुरिअरमध्ये दोन नव्या पॉलिसी आढळल्या. त्यातील एक त्यांची व दुसरी पत्नीची होती. त्यावर दुसऱ्याचे मोबाइल व ई-मेल आयडी नोंदविण्यात आले होते. तसेच थोरात यांनी कोणतीही वैद्यकीय तपासणी केलेली नसताना ३० ऑक्टोबर रोजी इंदूर येथील डॉ. नेहा बन्सेरिया यांनी स्वाक्षरीने वैद्यकीय तपासणी केल्याचा बनवाट अहवालही आढळला.

\Bफसवणूक झाल्याच्या खात्रीनंतर तक्रार

\Bयाबाबत थोरात यांनी आरोपींना विचारणा केली असता, '१८ नोव्हेंबर रोजी आम्ही औरंगाबादला येऊन तुम्हाला सांगू' असे सांगितले. त्यानुसार त्यांनी फिर्यादीची भेट घेतली; परंतु ते समाधान करू शकले नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर दिलेल्या तक्रारीवरुन चारही आरोपींविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांनाही अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यावर चाकूहल्ला; चौघांकडून लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जेवण करण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अडवून त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करीत मोबाइल आणि पाकीट पळवण्यात आले. हा प्रकार रविवारी रात्री दहा वाजता पैठण रोडवरील संताजी चौकीसमोरील पाटोदा रोडवर घडला. या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, चौघांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी योगेश फकीरबा शिणगारे (वय २०, मूळ रा. वडोदबाजार, सध्या रा. सैनिक विहार कांचनवाडी) यांनी तक्रार दाखल केली. योगेश हे कांचनवाडी येथील छत्रपती शाहू कॉलेजमध्ये मॅकेनिकलच्या तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. ते रविवारी रात्री मित्र सौरभ साईनाथ ठेंगरे (वय २०, रा. कांचनवाडी) यांच्यासोबत दुचाकीवरून पाटोदा बजाजगेट रोडवरून वाळूज एमआयडीसीमध्ये जेवणासाठी जात होते. यावेळी सह्याद्री स्कूल ते चित्रकुट व्हॅली दरम्यान एका झाडाजवळ त्यांना समोरून एकाच दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवले. योगेश व सौरभ यांच्यावर चाकूने वार करत दोघांच्या खिशातील मोबाइल, पाकीट आदी ऐवज लुबाडला. या घटनेत सौरभच्या पोटाला चाकूने गंभीर जखम झाली. योगेश आणि सौरभ यांना आरडाओरड केल्यास ठार मारण्याची धमकी देत आरोपी एकाच दुचाकीवरून (एम एच २२ ए ई २३९४) बजाज कंपनीच्या दिशेने पळून गेले. या प्रकरणी योगेशच्या तक्रारीवरून चारही आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bगंभीर जखमीवर घाटीत इलाज सुरू\B

एका दुचाकीस्वाराने योगेश आणि सौरभला कांचनवाडी येथे एका हॉस्पिटलमध्ये आणून सोडले. यानंतर त्यांच्या मित्रांनी दोघांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. योगेशवर उपचार करून सोडण्यात आले असून गंभीर जखमी सौरभवर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धरणात पाणीसाठा करा’

$
0
0

वाळूज महानगर: गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी धरणात पाणी आणावे या मागणीसाठी धरण बचाव कृती समितीतर्फे सोमवारी सकाळी औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला़ या आंदोलनात तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कृती समितीचे सदस्य व शेतकऱ्यांना अटक करून सुटका करण्यात आली.

टेंभापुरी प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा, जमीन संपादन केलेल्या गावांचा विकास व प्रकल्पग्रस्तांच्या पूनर्वसनासाठी नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला द्यावा, धरणग्रस्त प्रमाणपत्र तत्काळ देऊन कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी, कायगाव येथील गोदावरी नदीच्या बॅकवाटरचे पाणी लिफ्ट करून धरणात आणावे, महालक्ष्मी खेडा, मांगेगाव येथे बंद पडलेला लिफ्ट प्रकल्प दुरूस्त करून जलवाहिनीद्वारे पाणी आणावे, नांदूर-मधमेश्वरचे पाणी कालव्याद्वारे आणावे, खाम नदीचे पाणी वळवून धरणात सोडावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी तहसीदार डॉ़ अरुण जऱ्हाड, वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश टाक, एमआयडीसी पोलस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर राहुल ढोले, विलास खवले, कृष्णा ढोले, संतोष ढोले, रेवनाथ गावंडे, विजय ढोले, कारभारी जाधव, दामोधर घाडगे यांच्या सह्या आहेत. यावेळी शिवाजी बनकर, डॉ़ ज्ञानेश्वर नीळ, योगेश शेळके धामोरीकर, सूर्यकांत गरड, उमर पटेल यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते़

\Bफक्त दोन वेळा भरले धरण \B

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २४ वर्षांपूर्वी या प्रकल्पाकरिता नऊशे हेक्टर जमीन संपादित केली आहे. यामुळे भूमिहीन झालेले शेतकरी उदरनिर्वाहासाठी खासगी कंपन्यात घाम गाळत आहेत. शिवाय पूनर्वसन झालेल्या गावांचा विकास झालेला नाही. गावात पक्के घर, रस्ते, वीज, शाळा, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी या मुलभूत सुविधांपासून प्रकल्पग्रस्त वंचित आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अद्याप मिळत नाही, असे आंदोलकानी सांगितले़ या प्रकल्पामुळे जवळपासच्या गावाना पिण्याचे पाणी तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. पण, धरण बांधल्यापासून फक्त दोन वेळेस धरण भरले. त्यानंतर धरणात पाणीच आलेले नाही. परिणामी, या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे़ या धरणातून परिसरातील २९ गावांना ४० कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनांच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. धरणात पाणी नसल्याने त्यांचा वापर होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लालबावटा शेतमजूर युनियनचा कन्नडमध्ये मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

भूमिहीनांना जमीन द्या, बेरोजगारांना काम, बेघरांना घरे, भूमिहीनांना जमिनी व प्रत्येक कुटुंबाला सरसकट दरमहा ३५ किलो धान्य द्यावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे सोमवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन सबलीकरण योजनेंतून जमीन देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून एक वर्ष होत आले, त्याबद्दल चालढकल केली जात आहे. या मोर्चाला पिशोर नाक्यापासून सुरुवात करण्यात आली. मोर्चात कन्नड व खुलताबाद तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांचा समावेश होता. मोर्चाचे नेतृत्व युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉ. प्रा. राम बाहेती यांनी केले. मोर्चात जिल्हा सचिव कॉ. गणेश कसबे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अशोक जाधव, जिल्हा सचिव कॉ. कैलास कांबळे, विठ्ठल आव्हाड, विनोद गायकवाड, सोमीनाथ ढमाले, कॉ. सुनील ढमाले, राजू खरात, संजय तावरे आदींसह महिला सहभागी झाल्या.

\B'घेराओ'चा इशारा \B

जमीन खरेदीचा स्थळ पाहणी अहवाल महसूल विभागाकडून समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात आल्याचे मोर्चेकरूंना सांगण्यात आले. या मागणीसाठी सहा डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालयास घेराओ घालण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांनाही मुळव्याधीचा विळ‌खा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फास्ट फूड, जंक फूडचा वाढलेला वापर, अनियमित खाण्या-पिण्याच्या वेळा, चुकीची आहार पद्धती-जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जागरणे आदी कारणांमुळे जवळजवळ निम्म्या लोकांना वयाच्या पन्नाशीपर्यंत मुळव्याधीची कोणती ना कोणती लक्षणे आढळून येत आहे. त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे आता किशोरवयीन; तसेच पौगंडावस्थेतील मुलांमध्येही मुळव्याधीची समस्या दिसून येत आहे. या प्रकारच्या एकूण रुग्णांपैकी ३० ते ४० टक्के रुग्ण हे चक्क किशोरवयीन-पौगंडावस्थेतील मुले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अशा बहुतांश मुलांवर उपचार, तर त्यातील काहींवर शस्त्रक्रिया करण्याचीही वेळ येत असल्याचे जागतिक मूळ‍व्याध दिनानिमित्त समोर येत आहे.

या वाढत्या समस्येवर लक्ष वेधण्यासाठीच २० नोव्हेंबर रोजी जागतिक मुळव्याध दिन पाळला जातो. यासंदर्भात शहरातील प्रोक्टोलॉजिस्ट डॉ. अतुल देशपांडे म्हणाले, 'बदलती जीवनशैली, पाश्चातीकरणामुळे मागच्या ३० वर्षांत देशातील मुळव्याधीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. जवळजवळ ५० टक्के लोकांना वयाच्या ५० वर्षांपर्यंत मुळव्याधीची कोणती ना कोणती लक्षणे हमखास आढळून येतात, असेही दिसून आले आहे. विशेष म्हणजे महिला; तसेच पुरुषांमध्ये समान प्रमाणात समस्या आढळून येतात. त्यातच आता आठ ते १८-१९ वर्षांपर्यंतच्या किशोरवयीन व पौगंडावस्थेतील मुलांमध्ये, युवकांमध्येही मुळ‍व्याधीची समस्या दिसून येत आहे.'

मुलांमध्ये तसेच युवकांमध्ये जंक फूड-फास्ट फूड आणि कोल्ड्रिंक्स सेवनाचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. नियमित व वेळेवर आहार घेण्याचे प्रमाणही कमी होत असतानाच पाणी कमी पिणे किंवा पाण्याऐवजी कोल्ड्रिंक्स घेतले जात आहेत. याच दुष्टचक्रामुळे घट्ट-कठीण शौच (हार्ड स्टूल) होण्याची समस्या निर्माण होते आणि हेच मूळव्याधीचे मुख्य कारण आहे. मुळात पाण्याची जागा कोल्ड्रिंक्स किंवा इतर काहीही घेऊ शकत नाही आणि कमी पाणी पिणे, हे या समस्येला खतपाणी घालणारे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मलावरोध तसेच जागरण हेदेखील महत्त्वाचे कारण ठरत असल्याचे डॉ. देशपांडे म्हणाले.

\Bचौथ्या पायरीवर शस्त्रक्रिया अनिवार्य

\Bमूळव्याधीच्या पहिल्या-दुसऱ्या पायरीवर जीवनशैलीत योग्य बदलांबरोबरच विविध उपचार; तसेच इंजेक्शन्स उपयुक्त ठरतात, मात्र रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या पायरीमध्ये उपचारासाठी आला तर अशा वेळी शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते. आजार लपवणे व उपचारासाठी उशिरा येणे, हे या प्रकारच्या रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. मूळव्याधीबरोबरच 'फिशर' या आजाराचे मूळदेखील बद्धकोष्ठतेमध्येच आहे. अलीकडे टाक्यांच्या शस्त्रक्रियेशिवाय 'स्टेप्लर' ही वेदनाशामक शस्त्रक्रियाही लोकप्रिय झाली आहे. नजिकच्या काळात लेझर शस्त्रक्रिया उपलब्ध होतील, असेही डॉ. देशपांडे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\Bसंवेदना नष्ट होण्यातून दुष्टचक्र

\Bउशिरा झोपणे व उशिरा उठणे, या प्रकारची जीवनशैली अधिकाधिक लोकांमध्ये दिसून येत आहे. याच जीवनशैलीमुळे संवेदना नष्ट होऊन बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. त्यातच व्यायामाचा व शारीरिक हालचालींचा अभाव हेदेखील महत्वाचे कारण मूळव्याधीमागे आहे. युवकांमध्ये ही समस्या झपाट्याने वाढत असून, सद्यस्थितीत ३० ते ४० टक्के मुले; तसेच युवकांमध्ये ही समस्या दिसून येत असल्याचे प्रोक्टोलॉजिस्ट डॉ. प्रसाद वैद्य यांनी सांगितले.

\Bअशी घ्या काळजी...

\B- आहारात भरपूर तंतूमय पदार्थांचा समावेश करा

- भरपूर प्रमाणात पाणी प्या, शौच्चास जोर देऊ नका

- शौच्चकुपात मोबाईल, इतर गॅझेटस् घेऊन जाऊ नका

- घट्ट कपडे वापरू नका, आंतरभागात स्वच्छता ठेवा

- जंक फूड, फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ, कोल्ड्रिंक्स टाळा

- आहारात मसालेदार पदार्थांचा वापर कमीत कमी करा

\Bअशी आहेत आजाराची लक्षणे...

\B- गुदद्वारावाटे रक्तस्त्राव होणे

- गुदद्वारात दुखणे, आग, जळजळ

- शौच्चास करताना मांस बाहेर येणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘झेडपी स्थायी समिती सभा तहकूब का?’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सोमवारी होणारी सभा तहकूब का करण्यात आली, असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (डेमोक्रॅटिक) नेते, जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी करत पुढील सभेत यासंदर्भात लेखी म्हणणे सादर करा, अशी मागणी केली आहे.

मागील तहकूब केलेली स्थायी समितीची सभा सोमवारी घेण्यात येणार होती. दुपारी दोन वाजेच्या सूमारास अधिकारी सभागृहातही उपस्थित झाले होते. रमेश गायकवाडसह अन्य काही सदस्य सभेसाठी आले होते. परंतू त्यावेळी सभा तहकूब झाल्याचे सांगण्यात आल्याने गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभा होणार किंवा नाही यासंदर्भात सदस्यांना पत्रच देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे मात्र सभेसाठी अधिकारी सभागृहात कसे, असा प्रश्नही यानिमित्ताने समोर आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. पाणी, चारा टंचाईचा प्रश्न असून रोजगार हमीचे कामे बंद आहे, यावर चर्चा करून पुढील उपाययोजनासाठी सभा महत्त्वाची आहे, अशा स्थितीत सभा तहकूब होणे योग्य नाही, असेही गायकवाड यांनी म्हणत पुढील सभेत प्रशासनाने लेखी म्हणणे सादर करावे, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीने जोर धरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

मराठा समाजाला आरक्षण जाहीर करतानाच मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत निर्णय जाहीर करावा, अशी मागणी मुस्लिम लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर न झाल्यास राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा या नेत्यांनी दिला आहे.

एमआयएम आमदारांचे विधानसभेत आंदोलन

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात जल्लोष साजरा करण्यासाठी तयार रहा, असे जाहीर विधान केले आहे. या वक्तव्यानंतर विधीमंडळाच्या पहिल्या दिवशी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि वारीस पठाण यांनी विधानसभेच्या प्रवेशद्वारावर मुस्लिम आरक्षणाची तारीख जाहीर करून मुस्लिमांनाही जल्लोष करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करीत आंदोलन केले.

…युवक काँग्रेसचे निवेदन

मराठा समाजाला आरक्षण देताना मुस्लीम, धनगर समाजालासुध्दा आरक्षण देण्यात यावे, या मागणीचे निवेदन औरंगाबाद शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री यांना विभागीय आयुक्त यांच्यामार्फत युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुजफ्फर खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष नीलेश अंबेवाडीकर, एनएसयुआयचे जिल्हाधक्ष मोहीत जाधव, मोहसीन खान, मुजाहेद पटेल, इरफान खान, माजेद खान, शेख शोएब अब्दुल्ला, जावेद पठाण, आमेर रफिक, अक्षय जेवरीकर, अभिषेक कुलकर्णी आदींची यावेळी उपस्थिती होती.

मुस्लिम आरक्षण मिळावे यासाठी ओरंगाबादेत पहिला मेळावा घेण्यात आला होता. आम्ही शांततेत मोर्चे काढले. मराठा समाजाला आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला आहे. मुस्लिमांच्या आरक्षणासाठी अजूनही कोणत्याच प्रकारची कार्यवाही शासन स्तरावर झालेली नाही. यामुळे मुस्लिम आरक्षणासाठी मराठवाड्यातून काही प्रमुख लोकांसोबत विधानसभेवर धरणे आंदोलन करण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत.

इलियास किरमानी, अध्यक्ष, मुस्लिम अवामी कमिटी

मुस्लिमांना विशेष मागास घटकातून शिक्षणात आरक्षण देण्याबाबत कोर्टानेही समंती दिली आहे. या प्रस्तावाला विधेयक स्वरुपात मान्यता द्यायची आहे. या मागणीसाठी आगामी काळात राज्यभर मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलन केले जाईल. डॉ. गफ्फार कादरी, एमआयएमचे ………

मुस्लिमांनाही शिक्षणात आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मुस्लिमांना आरक्षण देण्याची कार्यवाही शासनाकडून होणे आवश्यक होते. मात्र, अजुनही याबाबत काहीही झालेले नाही. शासनाने मराठा, धनगर आणि मुस्लिमांना लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे. अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे.

मोहसीन अहेमद, जनजागरण समिती महाराष्ट्र

………

मुस्लिम समाजाच्या विकासासाठी गेल्या चार वर्षात बरेच कार्य भाजपाने केले आहे. अल्पसंख्यांक समाजासाठी देण्यात येणारा निधीही दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्यांकासाठी कामे केली आहेत. राज्यातील मोठा अल्पसंख्यांक वर्ग मुख्यमंत्र्यांच्या निर्णयासोबत आहे. मुस्लिमांचा विकास फक्त भाजप करणार असून आरक्षणही भाजपाच देणार आहे.

नबी पटेल, जिल्हाध्यक्ष, भाजपा अल्पसंख्यांक विभाग

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाऊदी बोहरा समाजाचा जुलूस ए मोहम्मदी

$
0
0

औरंगाबाद ः

दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने सोमवारी (१९ नोव्हेंबर) रोजी प्रेषित पैगंबर यांच्या स्मृती प्रित्यर्थ जुलूसचे आयोजन करण्यात आले. हा जुलूस पानदरिबा येथील मस्जिद ए नजमी येथून ७.३० वाजता निघाला. ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सिटीचौक येथील सैफी मस्जिद येथे समारोप करण्यात आला. या जुलूसमध्ये आमील सहाब शेख ताहेर भाई इझ्झी, सचिव हुसैन बागवाला, जनसंपर्क अधिकारी अज्जु भाई पेटीवाला यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या जुलूसचा समारोप हजरत सैयदना यांचा संदेश व्हिडिओद्वारे दाखविण्यात आला. हजरत सैयदना साहेबांचा संदेशानंतर हा जुलूस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरला अवकाळीचा तडाखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळकळा सहन करत असलेल्या मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही महसुली मंडळांमध्ये सोमवारी अवकाळी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील निलंगा (६८ मि.मी.) व निटूर (७८ मि.मी.) मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला.

लातूरसह नांदेड व उस्मानाबाद तालुक्यातील काही मंडळांमध्ये किरकोळ ते मध्यम स्वरुपामध्ये पाऊस झाला. लातूर तालुक्यातील तांदुळजा, चिंचोली, औसा तालुक्यातील औसा, लामजना, किल्लारी, मातोळा, किनीथोट, बेलकुंड, रेणापूर तालुक्यातील पोहरे गाव, कारेपूर, पानगाव, उदगीर तालुक्यातील हेर व देवर्जन, अहमदपूर तालुक्यातील किनगाव, खंडाळा, शिरुर ताजबंद, हाडोळती, अंधोरी, तसेच चाकूर तालुक्यातील नळेगाव, शेळगाव, निलंगा तालुक्यातील अंबुलगाव, कासार शिरसी, पानचिंचोली, देवणी तालुक्यातील वलांडी, शिरुर अनंतपाळ मधील हिसामाबाद, साकोळ, शिरुर अनंतपाळ तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद शहर, बेंबळी, पाडोळी, केशेगाव, तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर, जळकोट, नळदुर्ग, सालगरा, उमरगा तालुक्यातील मुळज, लोहारा तालुक्यातील लोहारा, जेवळी, भूम तालुक्यातील मानकेश्वर, व परंडा तालुक्यातील अशु या मंडळामध्ये पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील कंधार, लोहा, माळा कोळी, कलंबर, सोनखेड, शिवडी या मंडळांमध्ये पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूरकर पुन्हा रिंगणात?

$
0
0

उस्मानाबादमधून इच्छूक

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल तीस वर्षे राष्ट्रीय राजकारणात राहिलेले काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. 'पक्षाने सांगितल्यास आपण निवडणूक लढवायला तयार आहोत आणि राजकारणात निवृत्तीचे वय नसते,' असे वक्तव्य त्यांनी केल्याने ते कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून शिवराज पाटील चाकूरकर निवडणूक लढवू इच्छितात; परंतु आघाडीमध्ये उस्मानाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला होता. काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीकडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचा धसका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.

चाकूरकर यांच्या समर्थकांनी चाकूरकरांच्या 'देवघर' या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या आणि उस्मानाबादमधून निवडणूक लढविण्याचा आग्रहही केला होता. या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये लिंगायत समाजाची मतदारसंख्या मोठी आहे. शिवाय, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसची ताकद जास्त आहे. औसा मतदारसंघात, तर काँग्रेसचे बसवराज पाटील निवडून आले आहेत. जातीय समीकरणे आणि पक्षाची भूमिका चाकूरकरांना अनुकूल असल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

८३ वर्षीय चाकूरकर १९७३ पासून प्रत्यक्ष राजकारणात आहेत. १९७३ ते ८० यादरम्यान ते आमदार होते. १९८० पासून लातूर लोकसभा मतदारसंघात ते सतत सात वेळा निवडून आलेले आहेत. २००४मध्ये मात्र भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, पराभूत होऊनही मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात चाकूरकरांना गृहमंत्रिपद बहाल करण्यात आले होते. जुलै २००४ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. मात्र सतत होणाऱ्या बॉम्बस्फोटांमुळे २०१० मध्ये त्यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एकाच दिवशी तीन वेगवेगळे सफारी सूट घालण्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यानंतर पंजाबचे राज्यपाल म्हणूनही पाच वर्षे त्यांनी काम पाहिले. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी ही जागा काँग्रेसला सोडेल का, हा खरा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी हॉस्पिटलमध्ये अलार्मची चाचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीतील निवासी डॉक्‍टरांच्या गेल्या महिन्यातील आंदोलनातील मागणीनुसार सेंट्रल अलार्म सिस्टीम अखेर मेडिसिन विभागात कार्यरत झाली. त्याची प्रात्यक्षिक चाचणी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, उपअधीक्षक डॉ. गजानन सुरवाडे यांनी सोमवारी (१९ नोव्हेंबर) घेतली. निवासी डॉक्टरांच्या गेल्या वेळच्या सामूहिक रजा आंदोलनावेळी सेंट्रल अलार्म सिस्टीमची मागणी लावून धरली होती. मात्र महिना उलटल्यानंतर या मागणीची पूर्तता झाली आहे आहे. घाटीतून बेगमपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेट बसवण्याची निवासींची मागणीदेखील पूर्ण झाली असून, चारचाकी वाहनांसाठी हा रस्ता नुकताच बंद करण्यात आला आहे. आता अलार्म सिस्टीमची मागणीही पूर्ण झाली आहे. या चाचणीवेळी डॉ. प्रभाकर जिरवणकर, डॉ. ममता मुळे, डॉ. सुमेध अग्रवाल, यंत्रसामुग्री विभागाचे गाधणे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या मोहितमेत २० टक्के वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या विशेष वसुली आणि नियमितीकरण सप्ताहाला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. या सप्ताहात किमान ५० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात १० कोटी ५ लाख ५२ हजार ८३४ रुपयांचीच वसुली झाली.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे १२ ते १९ नोव्हेंबरदरम्यान विशेष वसुली व नियमितीकरण सप्ताह जाहीर केला. सप्ताहाच्या काळात किमान ५० कोटी रुपयांचा कर वसुल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. कर वसुलीसाठी झोन कार्यालयनिहाय विविध पथकांची स्थापना देखील करण्यात आली, परंतु त्याला प्रशासनातर्फे सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. वसुली सप्ताहासाठी विशेष नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती सप्ताह सुरू झाल्यावर तिसऱ्या दिवशी करण्यात आली. त्यामुळे पहिले तीन दिवस वसुलीचे प्रमाण फारच कमी होते.शेवटच्या तीन - चार दिवसात प्रमाण वाढत गेले.

संपूर्ण सप्ताहात मालमत्ता कराची वसुली आठ कोटी ९५ लाख २५ हजार ९१३ रुपये झाली आहे, तर पाणीपट्टीची वसुली एक कोटी १० लाख २६ हजार ९२१ रुपये झाली आहे. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी मिळून १० कोटी ५ लाख ५२ हजार ८३४ रुपयांची वसुली झाली आहे. थकित मालमत्ताकरावरील दंड व्याजात ७५ टक्के सूट देण्यात आली होती. त्याचा लाभ १३८९ मालमत्ताधारकांची घेतला, दंड व्याजात सूट दिल्यावर ६७ लाख ५४ हजार ५७८ रुपयांचा कर वसुल झाला.

\Bबाजार समिती, प्रोझोनकडून प्रतिसाद नाही\B

कृषी उत्पन्न बाजार समिती आणि प्रोझोन मॉलकडे मालमत्ता कराची मोठी थकबाकी आहे. या दोन्ही संस्थांनी एकरक्कमी कर भरावा यासाठी महापौरांनी स्वत: प्रयत्न केले, परंतु सोमवारी दुपारपर्यंत या दोन्ही संस्थांना पालिकेकडे कर जमा केला नव्हता. सायंकाळपर्यंत या संस्थांनी कर भरला नाही तर त्यांना नोटीस द्या, असे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नांमका’तून पाणी चोरी; सहा शेतकऱ्यांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यातून तीन तालुक्यांसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यातून अहमदनगर, नाशिक भागातील शेतकरी पाणी चोरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाण्याची खुलेआम उचलेगिरी करणाऱ्या सहा शेतकऱ्यांवर नांदूर-मधमेश्वर सिंचन विभागाने पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वैजापूर, गंगापूर, तसेच कोपरगाव तालुक्यातील नांदूर मधमेश्वर कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरिता १५ नोव्हेंबरपासून जलदगती कालव्यातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येत आहे. निफाड जि. नाशिक येथील नांदूर-मधमेश्वर पिकअप वेअर मधून नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात ८०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लाभक्षेत्रात नसलेल्या भागातील शेतकऱ्यांनी जेसीबी मशिनद्वारे मुख्य कालव्याची तोडफोड करून पाणी चोरी करण्याचा प्रकार दक्षता पथकाच्या निर्दशनास आला. मच्छिंद्र संपत कोकाटे, गुलाब बाबासाहेब घोटेकर (रा. महालखेडा), दीपक शिवाजी लोणारी (निमगाव मढ ता. येवला जि. नाशिक), रावसाहेब निवृत्ती मढवई, भानुदास सखाहरी मढवई (रा. चिंचुडी ता. येवला), प्रभाकर पुंजीराम उकिर्डे (रा. सावळगाव, ता. कोपरगाव जि. नगर) या सहा शेतकऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सिंचन कायद्यानुसार पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कमी पाण्यामुळे 'नांमका'अडचणीत

या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ४३ हजार हेक्टर क्षेत्राकरिता पाण्याची मागणी नोंदवण्यात आली आहे. मात्र, नाशिक पाटबंधारे विभागाने रब्बी सिंचनासाठी केवळ एक टी. एम. सी. पाण्याचे नियोजन केले आहे. मागणीपेक्षा कमी प्रमाणात पाणी येणार असल्याने रब्बी सिंचनासाठी पाणी देण्यासाठी नांदूर मधमेश्वर कालवा विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या गंगापूर तालुक्यातील लाभक्षेत्राला पाणी देण्यात येत आहे. २१ दिवसाच्या पाणी आवर्तनात तालुकानिहाय पाणी वाटपाचे नियोजन करणे अवघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ कारखान्यांचे विनापरवाना गाळप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साखर आयुक्तांची परवानगी न घेता आठ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. या कारखान्यांविरोधात दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, असे विनंती पत्र प्रादेशिक सहसंचालकांनी साखर आयुक्तांना सोमवारी दिले. दरम्यान, शेतकरी संघटना व कारखाना प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत ऊस उत्पादकांना 'एफआरपी'प्रमाणे दर तसेच साखरेला चांगला भाव मिळाल्यास अधिक दोनशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

'एफआरपी' कायद्याप्रमाणे भाव, यासह इतर विषयाबाबत येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात प्रभारी सहसंचालक एस. एस. क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची बैठक सोमवारी घेण्यात आली. 'एफआरप"नुसार ऊस उत्पादकांना दर न देणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रकाश पोकळे यांनी लाऊन धरली. दुपारी बारापासून सुरू झालेली ही बैठक सायंकाळी पाच वाजता संपली. बैठकीत एका कार्यकर्त्याने सातपुडा कारखान्यासंदर्भात विधान केल्याने कारखाना प्रतिनिधी व कार्यकर्त्यांत हमरीतुमरी झाली. हे प्रकरण वाढण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावले.

गाळप हंगाम २०१६-१७ व २०१७-१८ मधील थकीत एफआरपी व त्यावरील १५ टक्के व्याज आकारणी करून देण्यात यावे, अशी मागणी ऊस उत्पादकांनी केली होती. त्यावर एकरक्कमी थकीत रक्कम अदा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले. 'एफआरपी' व साखरेला चांगला भाव मिळाल्यास अधिक २०० रुपये देण्यासंदर्भातही यावेळी निर्णय झाल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तुपकर यांनी सांगितले. कारखान्याने शब्द मोडला तर स्वाभिमानी पद्धतीने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

\Bविनापरवाना गाळप करणारे कारखाने \B

विनापरवाना गाळप करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करा, अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली. त्यावर नियमाप्रमाणे दंडात्मक व कायदेशीर (एफआयआर) कार्यवाहीचे आदेश व्हावेत, अशी विनंती पत्र साखर आयुक्तांना पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक एस. एस. क्षीरसागर यांनी दिली. यात औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना, संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, बीड येथील जयभवानी तसेच अंबेजोगाई सहकारी, माजलगाव येथील एमएसएल कारखाना, वैद्यनाथ सहकारी कारखाना तसेच जालन्यातील समृद्धी सहकारी आणि समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी अशा आठ कारखान्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रुझरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

औरंगाबाद धुळे महामार्गावरील अंधानेर फाट्यानजीक क्रुझरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी झाला. गोविंद पोकळे (वय ६०, रा. कुसूमतेल, ता. नांदगाव, हल्ली मुक्काम काळदरी, ता. सोयगाव), असे मृताचे नाव आहे. ते दुचाकीवरून (एम एच २० एफ बी ५०४८) घराकडे जात असताना अंधानेर फाट्यावर चाळीसगावकडून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझरने (एम एच २२ एच ४१९) दुचाकीला जोराची धडक दिली. यात पोकळे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कन्नड ग्रामीण रुग्णालयात प्राथमोपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. मात्र, पाणपोई नजिक त्यांचा मृत्यू झाला. कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टेम करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात गोरख लक्ष्मण मधे यांच्या फिर्यादीवरून क्रुझर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश दिंडे हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ची नेमकी वस्तुस्थिती सांगा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील समांतर जलवाहिनी प्रकल्पासंबंधीची नेमकी वस्तुस्थिती काय आहे? याचे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. आर. जी. अवचट यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत.

समांतर जलवाहिनी पाणीपुरवठ्याच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात एकूण ४ याचिका करण्यात आल्या आहेत. पाण्याच्या खासगीकरणाविरुद्ध स्थापन झालेल्या नागरी कृती समितीतर्फे प्रा. विजय दिवाण यांनी २०१५ मध्ये जनहित याचिका केली होती. या याचिकेशिवाय सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील, जलाधिकार कृती समितीचे विजय शिरसाठ व सचिन भोजणे, राजेंद्र लोखंडे यांच्या याचिका प्रलंबित आहेत. प्रा. दिवाण यांनी त्यांच्या जनहित याचिकेत समांतर योजनेचे पुनरुज्जीवन केल्याच्या ठरावाला दिवाणी अर्जाद्वारे आव्हान दिले आहे.

पालिकेने १ ऑक्टोबर २०१६ रोजी 'औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी' कंपनीबरोबरचा करार रद्द केला होता. या कंपनीने नियोजनबद्ध व कालबद्ध मर्यादेत काम केले नाही. अकार्यक्षमतेचा आणि आर्थिक नियोजनाचा अभाव असल्याचा ठपका पालिकेने कंपनीविरोधात ठेवला होता. औरंगाबाद शहराची लोकसंख्या १५ लाख असून आज पाणीपुरवठ्याची अवस्था बिकट झाली आहे. शहरामध्ये ३ दिवसांआड किंवा काही भागांत ४ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. जनहित आणि नगरसेवकांच्या भावना लक्षात घेता या समांतर पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याबाबतचा ठराव पालिका आयुक्तांनी २४ जुलै २०१८ रोजी सादर केला होता; परंतु या ठरावावर ६, ११ आणि १७ ऑगस्ट रोजी विविध कारणांमुळे सर्वसाधारण सभेत चर्चा झाली नाही. अखेर ४ सप्टेंबर २०१८ रोजी समांतर जलवाहिनी प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याचा ठराव औरंगाबाद महापालिकेने मंजूर केला. या ठरावालाच प्रा. दिवाण यांनी आव्हान दिले आहे. याच महापालिकेने करारही केला आणि रद्दही केला. आता दुसऱ्या एका भागीदारासह करार करण्याचा घाट पालिकेने घातला आहे. यालाच याचिकाकर्त्याने आक्षेप घेतला आहे. महापालिकेने कंपनीविरुद्ध लवादासमोर १६८० कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये २३ ऑगस्टला या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. या आणि अनेक घटना पालिकेत आणि कोर्टाबाहेर घडत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याची माहिती कोर्टात शपथपत्राद्वारे सादर करावी, असा युक्तिवाद दिवाण यांचे वकील उदय बोपशेट्टी यांनी केला आहे. कोर्टाने पालिकेच्या आयुक्तांना समांतर जलवाहिनी प्रकल्पाची आजची वस्तुस्थिती काय आहे, नेमके काय घडत आहे, याविषयीची माहिती शपथपत्राद्वारे सादर करावी, असे आदेश दिले आहेत.

मुंबई प्रांतिक अधिनियमाच्या ६३ व्या नियमानुसार पाणीपुरवठा करणे हे नगरपालिका आणि महापालिकेचेच बंधनकारक कर्तव्य आहे. पाण्याचा हक्क हा जगण्याच्या हक्काचाच एक भाग आहे. त्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे खासगीकरण हे पूर्णपणे बेकायदेशीर तर आहेच; शिवाय ते घटनाविरोधी आहे, असा आक्षेपही दिवाण यांनी जनहित याचिकेत घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी उपसणाऱ्यांस अभय?देवगाव धरणातुन अवैध पाणी उपसा, पथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील देवगाव (रंगारी) धरणातील विहिरी तसेच बोअरमधून ट्रॅक्टरच्या साह्याने दिवसरात्र अवैधरित्या पाणी उपसा होत असल्याने देवगावला पाणीटंचाईच्या सामोरे जावे लागत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना कळवूनही प्रशासन ढिम्म आहे. या पाणी उपसणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, जनरेटरव्दारे वीज निर्माण करून पाणी उपसणाऱ्या ट्रॅक्टरला गावकऱ्यांना पकडून दिले. पण, हा ट्रॅक्टरला पथकाने पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तालुकात तीव्र पाणीटंचाई असून धरणक्षेत्रातून होणारा अवैध पाणी उपसा थांबवण्यासाठी विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेले पथक नेमण्यात आले. हे पथक फक्त कागदावरच आहे. याबाबत १७ नोव्हेंबर रोजी गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे बुडीत झेत्रातील विहिरी पासून ग्रामपंयातीच्या विहिरीपर्यत जलवाहिनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी सरपंचांचे पती काकासाहेब सोनवणे, ललीत सुरासे, प्रदीप दिवेकर, संदीप गोरे, बाबुराव धनुरे, असिफ पठाण, माजीद मुल्ला, सलीम काजी यांच्यासह ग्रामस्थ धरणाकडे गेले होते. त्यावेळी त्यांना बुडीत क्षेत्रातील विहीर व बोअर जवळ टँक्टरचलीत यंत्रावर वीज निर्मिती करून पाणी उपसा करताना ताडपिंपळगाव येथील ग्रामस्थ तथा शेतकरी आढळून आले. याबाबत देवगावच्या ग्रामस्थांनी पथकास कळवले. पथकातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी येथे धाव घेतली. हा ट्रॅक्टर गावकऱ्यांनी या पथकाला पकडून दिला.

पोलिसांत तक्रार

गावकऱ्यांनी पकडलेला ट्रॅक्टर तलाठ्यांकडे सोपवल्यानंतर सदर ट्रॅक्टर फरार केल्याचे ग्रामपंचायत सदस्य संदीप गोरे, प्रदीप दिवेकर, काकासाहेब सोनवणे, निलेश घोडके यांच्या निर्दशनास आले. त्यांनी याबाबत देवगाव पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. तहसीलस्तरावरून नियुक्त पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी याबाबत कठोर भूमिका घेण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images