Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मदतीच्या बहाण्याने दुचाकी, मोबाइल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपघातग्रस्त नागरिकाला मदतीचा बहाणा करत त्याची दुचाकी आणि मोबाइल ठगांनी लांबवली. हा प्रकार सहा नोव्हेंबर रोजी सकाळी आंबेडकर चौकाच्या अलिकडे घडला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तुकाराम किसन राठोड (वय ४७ रा. शिवशंकर कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली. राठोड यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. ते सहा नोव्हेंबर रोजी सकाळी मुलासोबत भाजीपाला खरेदीसाठी जाधववाडीत जात होते. यावेळी आंबेडकर चौकात त्यांच्या दुचाकीसमोर कुत्रा आल्याने राठोड यांचा तोल जाऊन ते खाली कोसळून जखमी झाले. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना मदत करण्याचा बहाणा करीत विश्वास मिळवला. यानंतर राठोड यांची दुचाकी आणि २५ हजारांचा मोबाइल घेऊन दोघे पसार झाले. राठोड यांची तब्येत बरी नसल्याने उपचार घेतल्यानंतर त्यांनी सोमवारी सिडको पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक फौजदार पठाण हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योजक जाधवविरुद्धची चौकशी प्रलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हिंगोली, खामगाव आणि बोपी येथील व्यापाऱ्यांची फसवणुकीचा आरोप असलेला उद्योजक नितीन जाधव याच्याविरुद्ध जलंब पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज आला असून हा अर्ज चौकशीकामी प्रलंबित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या संदर्भात विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, आमदार वियज वडेट्टीवार, सुनील केदार, अमर काळे, अस्लम शेख, हर्षवर्धन सपकाळ, डॉ. संतोष टारफे आणि डी. पी. सावंत यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नामध्ये ऑइल रिफायनरीचा उद्योजक नितीन जाधव याला ईडीने २२ ऑगस्ट रोजी विदेशात फरार होण्यापूर्वी अटक केली आहे का, जाधव याने व्यापारी व बँकाची सहाशे कोटी पेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक केली आहे का तसेच अमरावती येथील विविध बँकाची २० कोटींचे कर्ज घेऊन फसवणूक केली आहे का, या प्रकरणी शासनाने सखोल चौकशी केली आहे का, त्याच प्रमाणे या प्रकरणात कोणत्या व्यक्तीवर व संबधीतावर काय कारवाई केली आहे आदी मुद्द्याचा समावेश होता. या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ईडी हा विभाग केंद्र शासनाच्या अखत्यारित असून त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार २२ ऑगस्ट रोजी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. बाबुराव पांडूरंग रणगाडे (रा. कल्याण) यांनी या कंपनीविरुद्ध थकित रक्कम मिळवण्यासाठी अर्ज केला असून हा अर्ज जलंब पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. रणगाडे यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याने रणगाडे यांनी पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे नितीन जाधव याच्याविरुद्धचा तक्रार अर्ज चौकशीकामी प्रलंबित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे स्मारकात २८ मीटर उंचीचा शिवसेनाप्रमुखांचा पुतळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएम परिसरात विकसीत करण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात ठाकरे यांचा तब्बल २८ मीटर उंचीचा पुतळा बसविण्यात येणार आहे. या स्मारकाच्या कामाची निविदा १५ डिसेंबरपर्यंत काढा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या संदर्भात सोमवारी सायंकाळी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कनेते विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन, सभापती रेणुकादास वैद्य उपस्थित होते.

एमजीएमच्या परिसरात १७ एकर जागा महापालिकेच्या मालकीची आहे. या जागेवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मारकाच्या कामासाठी २८ कोटी आणि १७ कोटी अशा दोन टप्प्यात निविदा काढण्याचे महापालिकेने ठरविले होते, परंतु दोन वेगवेगळ्या निविदा न काढता एकत्रित निविदा काढा असे उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. १५ डिसेंबरपर्यंत निविदा प्रसिध्द करा, २० डिसेंबरपर्यंत निविदा अंतिम करा असे आदेश त्यांनी दिले. २३ जानेवारीच्या नंतर या स्मारकाचे भूमिपूजन करू असे ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.

स्मारकाच्या जागेवर शिवसेनाप्रमुखांचा २८ मीटर उंचीचा पुतळा बसवला जाणार आहे. त्याशिवाय वस्तुसंग्रहालय, फोटो गॅलरी, शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावरील शॉर्टफिल्म दाखवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले. यावर उद्धव ठाकरे यांनी आणखी एक सूचना केली. शिवसेनाप्रमुखांचे मराठवाड्याशी व प्रामुख्याने औरंगाबादशी वेगळे नाते होते. हे नाते स्पष्ट करणारे स्वतंत्र दालन करा, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार काम केले जाईल, असे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिकांना समाजभान देणारा प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मानवी जीवनाचे प्रयोजन काय आणि सामाजिक बांधिलकी काय असते यावर भाष्य करणारे 'रात्र मानसाळलेली' नाटक रसिकांना भारावून गेले. निसर्ग, समाज आणि जीवनशैली याचा तिरका छेद घेत कलाकारांनी विषय ताकदीने रंगवला.

५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत 'रात्र मानसाळलेली' नाटकाचा प्रयोग सादर झाला. तापडिया नाट्यमंदिरात मंगळवारी सायंकाळी प्रयोग रंगला. उदय कातनेश्वरकर लिखित व प्रा. विनोद दळवी दिग्दर्शित या नाटकात माणसाच्या स्वार्थी जीवनशैलीचे दर्शन घडवण्यात आले. सामाजिक बांधिलकी हरवलेल्या मानवी स्वभावाचे पैलू उलगडत नाटक समाज वास्तवावर परखड भाष्य करते. या नाटकाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकात किशोर कांबळे, तन्मय कांबळे, मंदार पाठक, उज्ज्वला गौड यांनी मुख्य भूमिका केल्या. संतोष चंदनशिवे, देवा दहे, नितीन पगारे, पूनम चाटसे, सुरभी मसनाळे, सपना शिनगारे, रोहन ससाने, प्रणय कांबळे, अनिल सरगुले व सचिन भालेराव यांनी तांत्रिक सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी शहरात २५ ठिकाणी आरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अयोध्या आणि औरंगाबाद शहरात एकाच वेळी आरती करण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे. शहरातील किमान २५ मंदिरांमध्ये आरती केली जाणार आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे श्री राम मंदिरासाठी २३ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये शिवसेनेतर्फे विविध चौकात होर्डिंग लावून 'चलो अयोध्या'चा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जास्त कार्यकर्ते अयोध्येत नेण्यापेक्षा त्यांच्या माध्यमातून शहरातच वातावरण निर्मिती करण्याचा निर्णय शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतला आहे. शिवाय महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अयोध्येत येऊ नये, असे आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत. त्यामुळे अयोध्येत उद्धव ठाकरे शरयू नदीची आरती करतील त्याचवेळी शहरातील किमान २५ मंदिरांमध्ये आरती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. खैरे म्हणाले, 'उद्धव ठाकरे २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आरती करणार आहेत. त्याचवेळी औरंगाबाद शहरातील मंदिरांमध्ये आरती केली जाईल. त्याचे नियोजन करण्यासाठी महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आरती करण्यात येणाऱ्या मंदिरांची नावे लवकरच जाहीर केली जातील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘असोसिएशन ऑफ सर्जन्स’च्या सदस्यपदी डॉ. प्रवीण सूर्यवंशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया'च्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपअधिष्ठाता व शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण सूर्यवंशी हे देशात सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. ही निवडणूक २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१८ या महिन्यात इंटरनेटच्या माध्यमातून पार पडली. देशभरातून सहभागी झालेल्या ७६ उमेदवारांमधून डॉ. सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. त्यांना आतापर्यंतची सर्वोच्च मते मिळाली आहेत. या समितीवर निवडून जाणारे ते मराठवाड्यातील पहिलेच शल्यचिकित्सक ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्युट्रीनेशन मीठ रेशन दुकानांत दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुदृढ शरिरासाठी लोह व आयोडिन यांचे प्रमाण संतुलित असणे आवश्यक असते, यादृष्टीने शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने न्युट्रीनेशन मीठ जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांवर १४ रुपये किलो या दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या प्रकारचे मीठ सर्व रेशन दुकानांवर उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागाच्या दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. कदम बोलत होते. यावेळी अशासकीय सदस्य किरण जयस्वाल, सुरैय्या बेगम, एन. डी. पाटील, लक्ष्मण औटे, रमेश शिंदे यांच्यासह के. बी. इंगळे व इतर अधिकारी उपस्थित होते. न्युट्रीनेशन मीठ हे जनतेसाठी रेशन दुकांनावर उपलब्ध करुन देण्यात आले असून नागरिकांनी त्याचा आहारात सेवन करावे, यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी समिती सदस्यांना दिली.

\Bदरफलक लावला नसल्यास कारवाई \B

रेशन दुकानांमध्ये उपलब्ध धान्याचे दर हे दुकानांच्या दर्शनी भागावर लावणे नियमानुसार बंधनकारक असून ज्या दुकांनात अशा प्रकारचे दर फलक लावण्यात येत नसतील त्याची माहिती घेऊन संबंधित दुकानदारांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरच्या उद्योगांना जानेवारीपर्यंत पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रारंभी जायकवाडीत पाणी आणण्यासाठी राजकीय वाद होत असताना आता मराठवाड्यातील मांजरा धरणातील पाण्यावरून लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारण्यांत वाद सुरू आहेत. मात्र मांजरा धरणाच्या पाण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी स्पष्टीकरण दिले असून जानेवारी २०१९ पर्यंत लातूरमधील औद्योगिक वसाहतीला मांजरा धरणातील पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये असलेल्या ८६८ प्रकल्पांमध्ये सध्या २०४२. ६० दशलक्ष घनमीटर (२५.२८ टक्के) पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणामध्ये सध्या ३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे औरंगाबाद आणि जालना औद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठा कपात करण्याची कोणतीही चर्चा नाही. पण, बीड, लातूर आणि उस्मानाबाद येथील उद्योग पाणीपुरवठ्यावरून भाजपमध्येच अंतर्गत राजकारण पेटले आहे.

केजच्या आमदार आणि लातूरचे पालकमंत्र्यांच्या पाण्यावरून सुरू झालेल्या राजकारणात लातूरच्या उद्योगांना पाणी मिळणार की नाही असा प्रश्न होता. मात्र विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार पाणी जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले. दरम्यान आयुक्तांनी बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्ण आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

मांजरा प्रकल्पात सध्या ४० दलघमी पाणी उपलब्ध आहे. उपलब्‍ध पाणी मार्चपर्यंत देऊ शकतो, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. या शिवाय पाण्याच्या बाष्पीभवनाबाबत माहिती घेण्यात येत आहे. उपलब्ध पाण्यापैकी पिण्यासाठी किती लागणार याचाही विचार होणार आहे.

-डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कॅन्सर’चे विस्तारीत बांधकाम मार्चपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट'चा दर्जा मिळालेल्या शासकीय विभागीय कर्करुग्णालयाच्या विस्तारीत बांधकामाला मार्चपासून सुरुवात होणार असून, हे काम 'एचएससीसी इंडिया लिमिटेड' कंपनीला देण्यात आले आहे आणि या संदर्भातील करार राज्य सरकारने कंपनीशी नुकताच केला आहे. 'एचएससीसी'चा 'सविस्तर प्रकल्प आराखडा' (डीपीआर) वेळेत मंजूर झाला तर सुमारे दीड वर्षांत हे काम पूर्ण होऊन सप्टेंबर २०२०मध्ये रुग्णालय हे २६५ खाटांचे होणार आहे. विशेष म्हणजे बांधकामासाठी केंद्राचे १२ कोटी रुपये उपलब्ध आहेत, तर राज्य सरकारनेही पाच कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने हे बांधकाम विनाखंड पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

सद्यस्थितीतील १०० खाटांच्या शासकीय विभागीय कर्करुग्णालयाला सुमारे दोन वर्षांपूर्वी राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला. त्याचाच भाग म्हणून केंद्र व राज्याच्या ९७ कोटींच्या निधीतून (केंद्राचा ६० टक्के, तर राज्याचा ४० टक्के वाटा) रुग्णालयाचा विस्तार होणार आहे. त्यापैकी केंद्र व राज्य सरकारकडून उपकरणांसाठी ४३ कोटींचा निधी मागेच उपलब्ध झाला असून, 'हाफकिन'मार्फत खरेदी प्रक्रिया सुरू आहे; तसेच रुग्णालयाच्या विस्तारीत बांधकामासाठी केंद्राकडून १२ कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले आहेत, तर राज्य सरकारने ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या बांधकामाचा करार 'एचएससीसी'शी झाला असून, 'डीपीआर' मंजूर होऊन मार्चपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. यात 'बंकर'सह पुरुष-महिला वॉर्ड, डे-केअर सेंटर, आयसीयू आदी बांधकामांचा समावेश आहे. या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (२० नोव्हेंबर) रुग्णालयाची पाहणी केली. दरम्यान, ४३ कोटींच्या उपकरणांची खरेदी प्रक्रिया 'हाफकिन'मार्फत सुरू असली तरी ही प्रक्रिया लवकर होण्याच्या दृष्टीने 'टाटा मेमोरियल हॉस्पिटल'च्या धर्तीवर ही खरेदी प्रक्रिया होण्याबाबत तत्वतः मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्षात मंजुरी मिळाली तर ही खरेदी प्रक्रिया काही महिन्यात पूर्ण होऊ शकेल, असे 'टाटा'चे शैक्षणिक संचालक व राज्य सरकारचे समन्वयक डॉ. कैलास शर्मा यांनी सांगितले. या उपकरणांमध्ये लिनॅक, ब्रेकेथेरपी, सिटी स्कॅन, एमआरआर, डिजिटल मॅमोग्राफी, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमेस्ट्री प्रयोगशाळेची उपकरणे आदींचा समावेश आहे.

\Bमंजुरीच्या प्रतिक्षेत ३६२ पदांचा प्रस्ताव

\Bमहत्वाचे म्हणजे रुग्णालयासाठी ३६२ पदांचा प्रस्तावही उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आला असून, या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल, असेही डॉ. शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. हे रुग्णालय येत्या दीड ते दोन वर्षांत देशातील एक सुसज्ज कर्करुग्णालय होईल, अशी अपेक्षाही रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर दाम्पत्यांच्या हस्ते होम हवन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

योगीराज हंसतीर्थ स्वामींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सहस्रचंडी शतकुंडात्मक महायज्ञाला मंगळवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. हा शतकुंडी यज्ञ २७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. रोज १०० दाम्पत्यांच्या हस्ते हवन होत आहे.

योगीराज हंसतीर्थ स्वामींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा जबिंदा लॉन्स येथे सुरू असलेल्या या सोहळ्यात सकाळी पू. अण्णास्वामी यांच्या पादुकांना अतीरुद्राभिषेक करण्यात आला. नवार्णव यंत्र पूजनानंतर, मुख्य यज्ञ मंडप तसेच शतकुंडांचे पूजन होऊन यज्ञ नारायणाचे प्रगटीकरण, अग्निप्रदीपन झाले. श्रीसुक्ताचे पठन झाल्यानंतर दुपारच्या सत्रात हवनाला सुरुवात झाली. नाना महाराज आणि अप्पा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महायज्ञास प्रारंभ झाला. दरम्यान, सकाळी मुख्य सभामंडपात अण्णा स्वामी विरचित 'शक्ती सामर्थ्य पराम्बिका'महाग्रंथाचे सामुदायिक पठण तसेच दुपारी हंसतीर्थ स्वामी चरित्र कथा निरुपण झाले. बाबरेकर गुरुजी यांनी कथा निरुपण केले. तर सायंकाळी आरती व महाप्रसाद नंतर रात्री हरिकीर्तन असा क्रम होता. रात्री आळंदी देवाची येथील ह.भ.प. आसाराम महाराज बडे यांचे कीर्तन झाले.

आचार्य गोविंददेवगिरीजी महाराज यांचे पूजन

महायज्ञाच्या पहिल्या दिवशी आचार्य गोविंददेवगिरीजी महाराज (किशोरजी व्यास) यांचे वेदमंत्रांच्या साक्षीने अंबरीश महाराज आणि सौ. राजेश्वरीदेवी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नाना महाराज, अप्पा महाराज, पुराणिक गुरुजी काशीकर आणि गायधनी गुरुजी नाशिक यांची मुख्य उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना आचार्य गोविंददेवगिरीजी महाराज यांनी सांगितले की, एक उपासना अशी गोष्ट आहे की, ज्याबद्दल शंका घेता येत नाही, असे सांगितले. उपासना ज्याला विज्ञानसुद्धा नाकारू शकत नाही, ती म्हणजे 'शक्ती'! कोणतेही कार्य शक्ती शिवाय शक्य होत नाही. शक्ती एकरूप असते पण ती भिन्न भिन्न स्वरुपात आपल्याला मिळते आणि सामन्यांच्या जीवनात अशीच एक शक्ती असते जी अनेक जागी उपयोगी ठरते ती शक्ती म्हणजे सद्गुरू. अण्णा स्वामींची जन्मशताब्दी म्हणजे एका शक्ती उपासकाला अभिवादन करण्याची वेळ आहे. वेदिक परंपरा आणि वाणीतून उपासना शास्त्र सांगणाऱ्या स्वामींचा हा सोहळा अलौकिकच! शक्ती संचय, शक्ती जागरण हे समाज कल्याण आणि राष्ट्र कल्याणाचे कार्य आहे. या सोहळ्यातून हे साध्य होत आहे,' असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराष्ट्रीय कार्गो अद्याप प्रतीक्षेतच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्यासाठी सीमा शुल्क (कस्टम) विभागाकडे कर्मचारी आणि सॉफवेअरची मागणी औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाने केली. कार्गो सुविधा सुरू करण्यासाठी तंत्रज्ञान न दिल्याने अद्याप ही सेवा सुरू झाली नसल्याची माहिती विमान तळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

औरंगाबाद विमानतळावरून शेती उत्पादित माल थेट प्रदेशात वाहतूक करण्यासाठी कार्गो सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार कार्गोची सुविधा देण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आली. विमानतळावरील प्राधिकरणाकडून देशांतर्गत कार्गो सुविधा देण्यासाठी निविदा काढण्यात आली. दिल्लीच्या एका एजन्सीला कार्गोची सुविधा चालविण्यात देण्यात आले. आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा देण्यासाठी उपकरण लावून करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कार्गो सुविधा सुरू करण्यासाठी सुरक्षा समितीकडून तपासणीही पूर्ण करण्यात आली आहे. सुरक्षा समितीच्या तपासणीनंतर कार्गो सुविधा सुरू करण्यासाठी कस्टम विभागाकडून साफ्टवेअर बसविण्याचे तसेच कार्गो पाठविण्याआधी कस्टम कर्मचाऱ्याकडून सामानाचे क्लिअरन्स घेण्यासाठी कर्मचारी आवश्यक असल्याचे पत्र विमानतळ प्राधिकरणाकडून कस्टम विभागाला पाठविण्यात आले होते. आतापर्यंत या प्रस्तावावर कस्टम विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे औरंगाबाद विमानतळावरून कार्गो सुविधा सुरू करण्याबाबत अजूनही प्रतीक्षाच सुरू असल्याची माहिती प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.

………

\B

\Bकस्टम सुविधा सुरू करण्याबाबत कस्टम विभागाला सॉफ्टवेअरबाबत पत्र देण्यात आले आहे; तसेच कर्मचाऱ्याबाबतही प्रस्ताव दिले आहे. अजूनही प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबतचा पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे सुरू आहे. आगामी काही दिवसात या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.

- डी. जी. साळवे, संचालक, औरंगाबाद विमानतळ प्राधिकरण

……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्हाला कामातून मुक्त करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आम्हाला कामातून मुक्त करा,' असे पत्र भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने महापालिकेला दिले आहे. या पत्राच्या अनुशंगाने आयुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराबरोबर (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, पीएमसी) चर्चा करणार आहेत.

भूमिगत गटार योजनेच्या कामाबद्दल मंगळवारी महापौरांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह आयुक्त डॉ. निपुण विनायक, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, भूमिगत गटार योजनेचे कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर महापौरांनी पत्रकारांना माहिती दिली.

महापौर म्हणाले, 'भूमिगत गटार योजनेच्या कामातून मुक्त करा, असे पत्र कंत्राटदाराने महापालिकेला दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील भूमिगत गटार योजनेचे काम 'फोरक्लोज' करा, असे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त बुधवारी 'पीएमसी'च्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करणार आहेत. भूमिगत गटार योजनेचे बरेच काम बाकी आहे. गोलवाडी आणि पडेगाव येथे कंत्राटदाराने जागा खरेदी केल्या आहेत. या जागेचा मोबदला महापालिकेने द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

कंत्राटदाराचे ३७ कोटी रुपयांचे बिल महापालिकेकडे प्रलंबित आहे, हे बिल मिळावे अशी कंत्राटदाराची मागणी आहे. ७० किलोमीटर अंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम बाकी आहे. महापालिकेने पैसे दिले तरच अंतर्गत ड्रेनेज लाइन टाकणे शक्य होणार आहे, असे कंत्राटदाराने कळविले आहे. या सर्व मुद्यांबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. यासर्व मुद्यांसंदर्भात आयुक्त 'पीएमसी'च्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील असे महापौर म्हणाले. जी कामे अपूर्ण राहिलेली आहेत ती कामे कंत्राटदार कशी पूर्ण करणार हा खरा प्रश्न आहे असा उल्लेख महापौरांनी केला.

\Bअसा होता प्रकल्प...\B

- केंद्र सरकारच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किममधून (यूआयडीएसएसएमटी) औरंगाबाद शहरासाठी चार वर्षांपूर्वी भूमिगत गटार योजना मंजूर

- योजनेसाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि राज्य सरकार, महापालिका यांनी प्रत्येकी २० टक्के खर्च

- शासनाने ३६५ कोटींच्या योजनेला मंजुरी, निविदा प्रक्रिया केल्यावर या योजनेचे काम ४६४ कोटी रुपयांवर गेले

- ड्रेनेज लाइन टाकून शहरातून वाहणारे सर्व नाले भूमिगत करण्याची ही मूळ योजना आहे

- शहरातील ५४४ किलोमीटर लांबीच्या ड्रेनेज वाहिन्यांपैकी २७२ किलोमीटर ड्रेनेज वाहिन्या बदलणे प्रस्तावित होते

- सहा ठिकाणी 'सिवरेज ट्रिटमेंट प्लांट' प्रस्तावित होते. त्यापैकी दोन प्रकल्प सुरू झाले

- सिद्धार्थ उद्यान व बनेवाडी येथील 'सिवरेज ट्रिटमेंट प्लांट' रद्द करण्यात आले

- झाल्टा व पडेगाव येथील प्रकल्पांसाठी जागेचा वाद सुरू आहे

\Bशिल्लक राहिलेली प्रमुख कामे\B

- बनेवाडी येथील रेल्वेक्रॉसिंगचे काम

- पडेगाव येथे मेनहोलचे काम

- जयभवानीनगर येथे कामाची दिशा बदलणे

- ५० ठिकाणी क्रॉस कनेक्शन घेणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतपीठाला दर्जाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण येथील नियोजित संतपीठाला स्वतंत्र विद्यापीठाचा किंवा राष्ट्रीय उपकेंद्राचा दर्जा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संतपीठाचा आराखडा राज्य सरकारला लवकरच सादर करणार आहे. या अहवालावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय निर्णय घेईल. येत्या शैक्षणिक वर्षात संतपीठ कार्यान्वित करण्याचे प्रयत्न आहेत, मात्र केंद्राकडून मान्यता मिळवण्यात विलंब झाल्यास राज्य सरकार पुढाकाराने संतपीठ सुरू करण्याची शक्यता आहे.

पैठण येथील संतपीठात जून महिन्यापासून वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनात संतपीठावर उच्चस्तरीय बैठकीचे नियोजन करण्यात आले होते, मात्र ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आली. संतपीठाचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्यामुळे थेट प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आता उच्च शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणार आहे. संतपीठाला राष्ट्रीय किंवा स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देण्याची मागणी आहे. दुसरीकडे संतपीठ 'बामू'चे उपकेंद्र राहणार असल्याची चर्चा आहे. विद्यापीठ संतपीठाचा कारभार कसा सांभाळणार असा सवाल उपस्थित झाल्यामुळे स्वतंत्र विद्यापीठ मान्यतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय मान्यता देत नसल्यास येत्या जूनपासून राज्य सरकार संतपीठ कार्यान्वित करण्याची शक्यता आहे. हा मुद्दा राजकीय पातळीवर महत्त्वाचा ठरला आहे. मागील युती सरकारने संतपीठाची इमारत उभारली होती. सध्याच्या युती सरकारच्या काळात संतपीठ सुरू करण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. अभ्यासक्रम आणि तांत्रिक मुद्द्याला मान्यता देऊन राज्य सरकार संतपीठ सुरू करण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय 'उपकेंद्र' दर्जा मिळवण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. संतपीठ मागील ३५ वर्षांपासून रखडले आहे. विद्यापीठाने संतपीठाचा शैक्षणिक आराखडा तयार केला आहे. सर्वधर्मीय पंथातील विवेकवादी आणि समताधिष्ठीत साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश आहे.

\Bनवीन अभ्यासक्रम राबविणार

\Bसंतपीठात पदविका, पदवी आणि पदव्युत्तर या तीन स्तरावर अभ्यासक्रम आहे. गायन, वादन, संत साहित्य अभ्यास याचे पदविका अभ्यासक्रमही आहेत. विद्यार्थी कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन रोजगार संधीसाठी पात्र ठरतील असा प्रशासनाला विश्वास आहे. संतपीठासाठी प्राध्यापक, कर्मचारी यांची नियुक्ती आणि परीक्षा नियोजन, दैनंदिन कामाचा आराखडा निश्चित होणार आहे. शासकीय मान्यता मिळाल्यानंतर नियुक्त्यांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

संतपीठाचा अहवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी राज्याकडून प्रयत्न केले जातील. जूनपासून अभ्यासक्रम निश्चितपणे सुरू होईल.

- संजय जोशी, समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाधववाडीत दीड महिन्यांत २१ हजार क्विंटल मक्याची आवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात ऑक्टोबर महिन्यापासून मका आवक सुरू आहे. आतापर्यंत २१ हजारांच्यावर आवक झाली असून अद्याप शासनाला खरेदी केंद्र सुरू करायला मात्र मुहुर्त सापडलेला नाही.

अपुरा पाऊस त्यात पडलेला मोठा खंड यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनाही मोठी घट आली आहे. दरम्यान, मका जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पीक असून गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून जाधववाडी येथील बाजार समिती आवारात मक्याची आवक सुरू झाली आहे. त्यास किमान दर १०११ रुपये, तर कमाल १४३४ रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे. सुरुवातील बाजारात २०० ते ३०० क्विंटल आवक झाली, ऑक्टोबरअखेर पर्यंत ती प्रती दिन हजार क्विंटलच्या घरात पोहचली होती. पण गेल्या काही दिवसात आवक कमी झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. यंदा उत्पादन कमी झाल्याने गेल्या काही दिवसात आवक मंदावले, अशी शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली. आतापर्यंत २१ हजार ३२९ क्विंटल आवक झाली, तर गेल्या वर्षी ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर याच काळात २४ हजार ४३४ क्विंटल आवक झाली होती. दरम्यान, शेतकऱ्याचा मका बाजारात येत असतानाही शासनाचे खरेदी केंद्र कागदावरच आहे. करमाड येथे येत्या तीन चार दिवसात खरेदी केंद्र सुरू होतील, अशी शक्यता मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूहल्ला करणारा मुकुंदवाडीतून जेरबंद

$
0
0

वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसीतील झांबड चौकात दुचाकीला कट का मारला, अशी विचारणा करत चाकूहल्ला करणाऱ्यास मंगळवारी हत्यारासह जेरबंद करण्यात आले. धीरज अशोक गायकवाड (रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद), असे त्याचे नाव आहे.

आकाश एकनाथ वाकडे व किशोर बन्सोडे (दोघे रा. बौद्धविहार साजापूर) हे दोन नोव्हेबर रोजी दुचाकीवरून जात असताना झांबड चौकात पाठीमागून दुचाकी वरून आलेल्या दोघांनी त्याना कट का मारला म्हणत चाकूने वार केले होते़ यावरून पोलिसांनी अज्ञान हल्लेखोरावर गुन्हा दाखल केला होता़ घटना घडलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता हल्लेखोरांची माहिती समोर आली़ सीसीटीव्हीच्या फुटेजवरून तपास करून धीरज अशोक गायकवाड (रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद) याला ताब्यात घेवून चौकशी केली असता जुन्या वादातून मारहाण केल्याची कबुली दिली़ त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून हल्ल्यात वापरलेला चाकू व दुचाकी (एम एच २० ई ए २८६१) त्याच्या घरातून जप्त केली. गायकवाड याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास करण्यात येत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल रोडे, पोहेकॉ वसंत शेळके, फकीरचंद फडे, प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, शैलेद्र आडियाल, देविदास इंदोरे, एम़ पी. कोलीमी, बंडू गोरे, राजकुमार सूर्यवंशी, बाळासाहेब आधंळे, प्रदीप कुटे यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाडेकरूकडून सव्वा आठ लाखांची फसवणूक

$
0
0

वाळूज महानगर: पंढरपूर येथील हॉटेल भाड्याने घेऊन मालकाच्या नावावर साहित्याची खरेदी करून भाडेकरूने सव्वा आठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मंगळवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जमशेद मरोलिया (रा. जालना) यांचे पंढरपुरात चॉइस नावाचे परमीट रुम व बिअर बार आहे. त्यांनी २१ वर्षांपूर्वी हे हॉटेल पुथिया विटील उर्फ सुरेश कृष्णा बाबू (रा़ औरंगाबाद) याला १५ हजार रुपये प्रती महिनाप्रमाणे साडेतीन लाख रुपये अनामत रक्कम घेऊन भाड्याने चालविण्यासाठी दिले होते. हॉटेलमालक मरोलिया हे आजारी असल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश बाबू याने त्यांच्याशी जवळीक वाढविली. २०१३ मध्ये मरोलिया यांनी भाडे वाढवून ४० हजार रुपये प्रति महिनाप्रमाणे वसूल करण्यास सुरुवात केली. मात्र मरोलिया सतत आजारी राहत असल्याचा फायदा घेत सुरेश बाबू याने हॉटेलच्या नावे विविध एजन्सीकडून मद्य खरेदी करून त्याची रक्कम संबधितांना दिली नाही. हॉटेलवर कब्जा करण्याच्या उद्देशाने वीज बिल थकविणे, शासकीय कराचा भरणा न करणे आदी प्रकार केले. साडेतीन लाख रुपये अनामत दिलेली असताना १२ लाख २० हजार रुपये अनामत रक्कम दिल्याचे सांगत हॉटेल मालकाविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता. ११ सप्टेंबर २०१६ रोजी हॉटेलमालकाचे आजारपणामुळे निधन झाले. याचा फायदा उठवत बाबु याने भाडे देणे थांबविले, तसेच मद्य खरेदीची बिले अदा केलेली नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जमशेद मरोलिया यांच्या पत्नी शिरीन व मुलगा अरनोज यांनी बाबू यांच्याकडे भाड्याची थकबाकी व मद्य खरेदीचे पैसे देण्याचा तगादा लावला होता.

\Bधमक्या, शिविगाळ \B

भाडेकरू बाबू याने हॉटेलमालकाची पत्नी व मुलाला शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार आहे. याप्रकरणी हॉटेलमालकाची पत्नी शिरीन मरोलिया यांच्या फिर्यादीवरुन पुथिया विटील उर्फ सुरेश बाबू याच्याविरुज्झ वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाप्रसादाने गणोरीत चातुर्मास समाप्ती सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील गणोरी येथे चातुर्मास समाप्ती सोहळा व सात दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती काल्याचे कीर्तन, ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता मंगळवारी भंडारा महाप्रसादाने करण्यात आली. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती होती.

यावेळी माजी मंत्री डॉ. नामदेराव गाडेकर, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण, औरंगाबादचे उपमहापौर विजय औताडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, औरंगाबादचे नगरसेवक रामेश्वर भादवे भेट दिली. संत गाडगेबाबा यांचे शिष्य संत रामलालबाबा यांनी हा चातुर्मास व सप्ताह सोहळा सुरू केला होता. आजही तो कबीर मठाचे मठाधिपती महंत शांतिदास सुखदेवदास शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जातो. हा सोहळा ८१ वर्षांपासून सुरू आहे. मंगळवारी सकाळी काकड आरतीनंतर दिंडी मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रत्येक घरासमोर महिलांनी सडा, रांगोळीने अंगण सजवले. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण, तर मुलांनी फटाके फोडून दिंडींचे स्वागत केले. दिंडीत सहभागी साधुंनी भजन, सोंगी भारुड, फुगड्या, पाऊल्या सादर केल्या. दिंडी मिरवणुकीनंतर हभप बाळकृष्ण महाराज मोगल वैरागड यांचे कीर्तन झाले, त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. सोनगडच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी कबीर मठाचे मठाधिपती महंत शांतीदास सुखदेवदास शास्त्री, तारमळी संस्थानचे हभप शिवाजी महाराज यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरल मानवी संवेदनांचा ‘ब्रेथलेस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चाकोरीबाह्य चित्रपटांचा सक्षम प्रवाह आणणारा 'ब्रेथलेस' चित्रपट प्रेक्षकांसाठी नावीन्यपूर्ण अनुभूती ठरला. दिग्दर्शक गोदार्द यांच्या फ्रेंच चित्रपटाने मानवी भावनांची तरल मांडणी दाखवली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित 'चित्रपट चावडी' उपक्रमात 'ब्रेथलेस' हा फ्रेंच चित्रपट दाखवण्यात आला. एमजीएम कॅम्पसमधील आइन्स्टाइन सभागृहात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता हा उपक्रम झाला. १९६० मध्ये जीन लुक गोदार्द दिग्दर्शित 'ब्रेथलेस' प्रदर्शित झाला होता. पाश्चात्य चित्रपटसृष्टीत 'ब्रेथलेस'ने वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा प्रवाह आणला. जीन पॉल बेल्मोन्डो चित्रपटातील प्रमुख पात्र आहे. बोगार्ट, जीन सेबर्ग या भूमिकांच्या माध्यमातून मानवी संबंधाच्या पैलूंवर गोदार्द परखड भाष्य करतो. संपूर्ण चित्रपट प्रेरक स्तरावर घडतो. विशेषत: प्रेम भावनेची उजळ मांडणी 'ब्रेथलेस'मध्ये सक्षमपणे करण्यात आली. हॉलिवूडच्या तुलनेत प्रयोगशील चित्रपट निर्मिती करणारे दिग्दर्शक अशी गोदार्द यांची ओळख आहे. रसिकांना चित्रपट प्रयोगशीलतेचा आनंद देणारा ठरला.

श्रीकांत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. उपक्रमासाठी एमजीएम फिल्म आर्ट इन्स्टिट्यूटचे शिव कदम, प्रतिष्ठानचे सुबोध जाधव यांनी सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागात साडेनऊ लाख टन उसाचे गाळप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय क्षेत्रातील ३७ पैकी २० साखर कारखान्यांत उसाचे गाळप सुरू झाले आहे. आतापर्यंत नऊ लाख ४७ हजार २१० टन उसाचे गाळप झाले आहे. या हंगामात सुमारे ८५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे.

येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात अंतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, धुळे, जळगाव, नंदूरबार या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात चार खासगी व सहा सहकारी, असे दहा कारखाने आहेत. त्यापैकी संत एकनाथ, पैठण येथील शरद, संभाजी राजे, कन्नड येथील बारामती अॅग्रो तसेच मुक्तेश्वर शुगर अशा दोन सहकारी व तीन खासगी साखर कारखान्यामध्ये गाळप सुरू आहे. या कारखान्यात आतापर्यंत दोन लाख टन ऊसाचे गाळप झाले असून एक लाख ७५ हजार क्विंटलहून अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. जालना जिल्ह्यातील समर्थ युनिट १, युनिट २ (सागर), रामेश्वर हे तीन सहकारी, तर समृद्धी व श्रद्धा एनर्जी अॅन्ड इन्फा (बागेश्वरी) या दोन खासगी, अशा पाच साखर कारखान्याचे बॉयलर ऑक्टोबर अखेरपासून पेटले. आतापर्यंत तीन लाख २९ हजार टन गाळप झाले असून साखरेचे उत्पादन तीन लाख क्विंटल पेक्षा अधिक आहे. बीड जिल्ह्यात दहा कारखाने असून त्यापैकी अंबेजोगाई व जयभवानी, छत्रपती या सहकारी, तसेच जय महेश एनएसएल व येडेश्वरी शुगर अशा एकूण पाच कारखान्यात दोन लाख ७१ हजार टनापेक्षा जास्त गाळप झाले. वैद्यनाथचेही बॉयलर पेटल्याचे समजते. जळगाव जिल्ह्यातील सात पैकी दोन कारखान्यांचे गाळप सुरू असून धुळे जिल्ह्यात दोन सहकारी कारखाने बंद आहेत.

\Bविभागातील कारखाने ३७

गाळप सुरू झालेले कारखाने

सहकारी ११

खासगी ९

आतापर्यंत साखर उत्पादन ८ लाख क्विंटल

यंदा अपेक्षित उत्पादन ८५ लाख क्विंटल\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर वसुलीच्या कुचराई; जनसंपर्क अधिकारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कर वसुलीच्या कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवून महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहेमद यांना तडकाफडकी निलंबित केले. यापूर्वी आयुक्तांनी याच कारणावरून विशेष वसुली अधिकारी संजय जक्कल यांना देखील निलंबित केले आहे.

मालमत्ता कर वसुलीच्या कामावर आयुक्त डॉ. विनायक यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी त्यांनी विशेष वसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. तौसीफ अहेमद यांची देखील विशेष वसुली अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु या कामात त्यांना चमक दाखवता आली नाही. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा वसुलीचे काम फारच कमी असल्यामुळे त्यांनी कारणेदाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती, त्यानंतरही कामत सुधारणा न झाल्यामुळे मंगळवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

महापालिकेसाठी एकच जनसंपर्क संस्था असावी, अशी आयुक्तांची कल्पना आहे. या संस्थेच्या नियुक्तीसाठी निविदा काढण्याचे काम देखील आयुक्तांनी तौसीफ अहेमद यांना दिले होते. हे काम करण्यात देखील त्यांना यश आले नाही. निलंबनाच्या कारवाईचे हे देखील दुसरे कारण असल्याचे सांगितले जात आहे. कर वसुलीच्या कामात कुचराई केल्याबद्दल आयुक्तांनी यापूर्वी विशेष वसुली अधिकारी संजय जक्कल यांना निलंबित केले आहे. त्याअगोदर प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना आयुक्तांनी निलंबित केले. डॉ. नाईकवाडे यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images