Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कल्याणकारी मंडळ ३० नोव्हेंबरपूर्वी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीचे कल्याणकारी मंडळाची स्थापना ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात येईल, असे आश्वासन कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाने निलंगेकर यांची भेट घेत निवेदन दिले. ३० नोव्हेंबरपूर्वी कल्याणकारी मंडळ स्थापन होणार असल्याचे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी राज्य वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, संघटन सचिव संजय पावसे, सदानंद नंदूर, ठाणे वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष दत्ता घाडगे नागपूरचे अध्यक्ष रमेश नागलकर, राकेश आकरे यांची उपस्थिती होती, अशी माहिती राज्य संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप यांनी दिली. मागण्या मान्य झाल्या नाही तर डिसेंबरअखेर राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुरट्या चोराकडे सापडले अडीच लाखांचे मोबाइल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनेवाडी रेल्वे रुळाजळवळ गस्त घालताना लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या एका तरुणाकडून चोरीचे १२ मोबाइल जप्त करण्यात आले. या मोबाइलची किंमत तब्बल दोन लाख ४० हजार रुपये आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर सोमनाथ गोर्डे, गायकवाड, मुंडे तसेच अन्य पोलिस कर्मचारी हे मंगळवारी रेल्वे रुळाजवळ गस्त घालत होते. यावेळी रुळावर संदीप गौतम हिवराळे (वय २०) हा संशयितरित्या फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी हटकताच त्याने पळ काढला. त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याजवळ तीन मोबाइल सापडले. त्याबद्दल चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत त्याने हे मोबाइल उस्मानपुरा रोड आणि बनेवाडी येथून चोरल्याची माहिती दिली. त्याच्या घराची झडती घेतली असता आणखी नऊ मोबाइल सापडले. हे १२ मोबाइल जप्त करण्यात आले असून त्याला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठ्यातील धम्मपरिषदेसाठी उद्या विशेष बस

0
0

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझमतर्फे अजिंठा येथे शुक्रवारी होणाऱ्या धम्मपरिषदेसाठी एसटी महामंडळातर्फे विशेष तीन बस सोडण्यात येणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझमतर्फे शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) कार्तिक पोर्णिमेस अजिंठा लेणीच्या पायथ्याशी धम्माचल येथे १३व्या अखिल भारतीय बौद्ध परिषद होत आहे. या परिषदेसाठी राज्यातून आणि इतर राज्यांतून उपासक येणार आहेत. त्याच्यासाठी अजिंठाच्या पायथ्याशी होत असलेल्या धम्म परिषदेपर्यंत एसटी महामंडळाने बस उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती करणारे निवेदन विभागीय नियंत्रकांना देण्यात आले. विभागीय नियंत्रकांनी त्याची दखल घेऊन स्वंतत्र बस सोडण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. ही बस औरंगाबाद येथील मध्यवर्ती बस स्थानकातून सकाळी साडेआठ, नऊ, साडेनऊ आणी दहा वाजता अजिंठ्याच्या दिशेने निघेल. धम्म परिषदेपासून सायंकाळी पाच, साडेपाच, सहा आणि साडेसहा वाजता औरंगाबादकडे निघणार असल्याचे विभागीय नियंत्रकांनी सांगितले. या शिष्टमंडळात संस्थेचे सचिव डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो, सहसचिव बी. के. आदमाने, आर. के गायकवाड. एम. एन. गायकवाड यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गुटखा तस्करांना २३पर्यंत पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुटखा बाळगण्याची किंवा विक्री करण्याची परवानगी नसताना सुमारे १४ लाखांच्या गुटख्याचा साठा करून तो विक्री करण्याच्या तयारीत असलेले संशयित आरोपी शेख नदीम शेख नईम व शेख तनजीम शेख नईम यांना मंगळवारी (२० नोव्हेंबर) अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना शुक्रवारपर्यंत (२३ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठे‍वण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी सुलक्षणा त्रिंबकराव जाधवर यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनच्या विशेष पथकाला जिन्सी चौकात शेख नदीम हा गुटखा घेऊन उभा असल्याची माहिती मंगळवारी (२० नोव्हेंबर) मिळाली होती. त्याआधारे विशेष पथकाने शेख नदीमला सायंकाळी सहाच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुटख्याचा साठा सापडला. त्याची चौकशी केली असता त्याचा एक साथीदार असल्याचे तपासात समोर आले, तसेच जाफरगेट परिसरातील गोदामात व दुकानातही गुटख्याचा साठा असल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी गोदाम व दुकानावर छापा मारून १३ लाख ७६ हजार ७४० रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान शेख नदीम शेख नईम (वय ३३) व शेख तनजीम शेख नईम (वय ३०, दोघे रा. हर्सूल) या दोघांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी कोर्टात हजर केले.

\Bचौकशीसाठी कोठडी \B

गुटखा पुरविणाऱ्या पुरवठादार व उत्पादकांबाबत तपास करणे बाकी आहे. त्याचवेळी संशयित आरोपी हा गुटखा कोणाला पुरवठा करणार होते व आणखी कोण साथीदार आहेत का, याचाही तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती विशेष सहाय्यक सरकारी वकील उद्धव वाघ यांनी केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बसचे तिकीटदर एसटीप्रमाणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटीची सिटी बस एसटी महामंडळाच्या सध्याच्या तिकीट दरानुसारच चालवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या दोन दिवसात वाहतूक समितीसमोर ठेवला जाणार आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेसाठी १५० सिटी बस खरेदी केल्या जाणार आहेत. बस बांधणीचे कंत्राट टाटा मोटर्स या कंपनीला देण्यात आले असून, धारवाड येथे बस बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १५०पैकी १०० बस जानेवारी अखेरपर्यंत प्राप्त होणार आहेत. त्यातील ५० बस डिसेंबर अखेरीस प्राप्त होतील आणि जानेवारी महिन्यात त्या सुरू केल्या जातील. त्यादृष्टीने सध्या औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे काम सुरू आहे.

स्मार्ट सिटीच्या बसचे तिकीट दर काय असतील, याबद्दल सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; एसटी महामंडळाची सिटी बससेवा सध्या सुरू आहे. या सेवेसाठी आकारण्यात येणारे दर 'स्मार्ट सिटी'च्या बससाठी कायम असतील. त्यात बदल केला जाणार नाही. तिकीट दर आणि बसचे मार्ग यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत हा प्रस्ताव स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वाहतूक समितीसमोर समोर ठेवला जाणार आहे. सध्या एसटी महामंडळाच्या २५ सिटी बस १४ मार्गांवरून चालवण्यात येतात. स्मार्ट सिटीच्या १०० सिटी बस ३० मार्गांवरून चालवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त होणाऱ्या ५० बस १५ मार्गावर चालतील, हे १५ मार्ग कोणते असावेत याबद्दल चर्चा सुरू आहे. एसटी महामंडळाच्या बस बंद करून स्मार्ट सिटीच्या बस सुरू कराव्या लागणार आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या सिटी बसचे सध्या जे मार्ग आहेत ते मार्ग पहिल्या टप्प्यातील सिटी बससाठी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

\B२५ बसचा लॉट येणार\B

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; ५०पैकी २५ बसचा पहिला लॉट डिसेंबर महिन्याच्या अखेरीस प्राप्त होईल. पाच बस नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस प्राप्त होतील, असे सांगितले जात होते, परंतु २५ बसचा पहिला लॉट प्राप्त करून घेण्यात प्रशासनला रस आहे. पाच बस घेऊन त्या कुठे आणि कशा चालवायच्या असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. २५ बस प्राप्त झाल्यावर एसटी महामंडळाच्या बस बंद करून या बस सुरू करता येणार आहेत.

\Bअशी आहे दररचना

\B- एसटी महामंडळ सिटीबस सेवेसाठी चार किलोमीटर आणि दोन किलोमीटर या दोन टप्प्यांत तिकीटदर निश्चित करते

- पहिला टप्पा चार किलोमीटरचा आहे. त्यासाठी आठ रुपये तिकीट दर आहे.

- पहिल्या टप्प्यानंतर दोन किलोमीटरचे टप्पे आहेत. या प्रत्येक टप्प्यासाठी दोन किंवा तीन रुपये आकारले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार भारतीचे शुक्रवारपासून महाअधिवेशन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सहकार भारतीचे मराठवाडा विभागाचे दोन दिवसीय महाअधिवेशन येत्या शुक्रवारपासून चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील सागर रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आले आहे. यात पतसंस्थासमोरील समस्या, उपाय, येऊ घातलेले नियामक मंडळ यासह अन्य विषयावर चर्चा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहकार भारतीचे अध्यक्ष शरयू हेबाळकर व महासचिव किशोर चव्हाण यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

शुक्रवारी सायंकाळी चार वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यात रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सतीश मराठे यांचा मराठवाड्यातील सर्व बँक व पतसंस्थांतर्फे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चारेगावकर, भारतीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मुकुंदराव तापकीर उपस्थित असेल, अशी माहिती हेबाळकर यांनी दिली. उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी, सहसचिव संभाजी राचुरे, संघटन प्रमुख विजय देशमुख आदी उपस्थित होते.

दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात मराठवाड्यातील पतसंस्थेची वाढ व्हावी व सहकार क्षेत्रामध्ये भरीव योगदान देऊन या विभागाचा विकास व्हावा, यासाठी कराड येथीलसहकार भारती सहकार प्रशिक्षण संस्था आणि सहकार भारती मराठवाडा प्रांततर्फे नागरी पतसंस्था, महिला पतसंस्था, बिगरशेती व पगारदार पतसंस्थांच्या प्रतिनिधींसाठी खास प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सायंकाळी सहा वाजता पतसंस्था समस्या व उपाय व त्यानंतर नियामक मंडळ व पतसंस्था, करावयाची उपाययोजना या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी नऊ वाजता सद्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पतसंस्थांचा सामाजिक सहभाग या विषयावर व त्यानंतर पतसंस्था व तंत्रज्ञान तसेच आयकर कायदा व पतसंस्था -करावयाची उपाययोजना या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी साडेबारा वाजता समारोप सत्र होणार आहे, अशी माहिती राचुरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी विद्यापीठ परीक्षा २४ पासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या सत्र परीक्षा २४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. प्रथम आणि तृतीय सत्राच्या या परीक्षा आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत परीक्षा चालणार आहेत. औरंगाबाद येथे विधी विद्यापीठाने शैक्षणिक वर्षातील सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. २०१७-१८ शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेल्या विद्यापीठात 'बीएएलएलबी' अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक असून प्रथम आणि तृतिय सत्राच्या परीक्षा आहेत. प्रथम सत्राला दोन्ही सत्रातील परीक्षार्थींची संख्या १०७ एवढी आहे. २४ ते ३० नोव्हेंबरपर्यंत लेखी तर त्यानंतर तोंडी परीक्षा असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघटना, व्यवस्थापन आमनेसामने येणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

महावितरण व्यवस्थापनाच्या वतीने कामगारांच्या कामाची फेररचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार असून यामुळे एका मंडळातील जवळपास १५० टेक्निशीयन ते प्रिसिंपल टेक्निशियन तांत्रिक कामगारांची पदे कमी होणार असल्याची भीती वीज तांत्रिक कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे. यामुळे या फेररचनेच्या निर्णयाच्या अंमलबजावणीपूर्वी व्यवस्थापनाने संघटनेसोबत चर्चा करण्याची मागणी केली आहे. यावरून संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत महावितरण कंपनीतील कामगारांच्या कामाची फेररचना झालेली नाही. आता कामाची फेररचनना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एक जानेवारी २०१९ पासून पहिल्या टप्यात पुणे, भांडूप, वाशी, कल्याण व ठाणे या पाच मंडळामध्ये कामाच्या फेररचनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. तशा स्वरुपाचे परिपत्रक महावितरण कार्यालयाकडून काढण्यात आले आहे. हा निर्णय होण्यापूर्वी या फेररचनेबाबत संघटनेला माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तसे न होता संघटनेला विश्वासात न घेता हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

पगारवाढीच्या तोंडावर

पगारवाढीबाबत बैठक ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पगारवाढीच्या तोंडावर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा निर्णय मान्य नसेल तर पगार वाढ होणार नाही, अशी भीती कामगारांत आहे. हा मार्ग महावितरण कंपनीकडून अवलंबविला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे प्रत्येक मंडळात १५० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कंपनीने ज्यांना फेररचना मान्य नसेल तर अशांनाही पगारवाढ जाहीर करावी, अशी मागणी संघटनेचे सचिव जहिरोद्दीन यांनी केली. अशा मागण्यांचे निवेदन कंपनीच्या संचालकांना पाठविण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.

संघटनेची अपेक्षा

फेररचनेची अंमलबजावणी होत असताना एकही कर्मचारी कमी होता कामा नये. एका कर्मचाऱ्याला एखाद्या कामाची जबाबदारी दिल्यानंतर त्याला दुसऱ्या कामाची जबाबदारी देण्यात येऊ नये. तसेच तांत्रिक कामगारांना २४ तास कामाचे बंधन नसावे, फक्त आठ तास काम देण्यात यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रांजणगावात फोडली सात दुकाने

0
0

वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील रांजणगाव येथे अज्ञात चोरांनी मंगळवारी रात्री सहा दुकाने फोडली. या चोऱ्यांत एकूण ५१ हजारांचा ऐवज चोरीस गेला असला तरी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमऱ्यामध्ये चोरटे कैद झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली़

रांजणगाव येथील आशापुरा फुटवेअर, जयभवानी इलेक्ट्रीकल, श्रीकृष्ण मोबाइल शॉपी, गणेश मोबाइल शॉपी दत्तनगर व कमळापूर फाट्यावरील अभय ज्वेलर्स, लोकसेवा मेडिकल व प्रांजल मेडिकल या दुकानांचे शटर उचकटवून चोरी करण्यात आली आहे. अभय ज्वेलर्समधून पाच हजार रुपये रोख व चांदीच्या अंगठ्या, चांदीची चैन, असा १३ हजार रुपये किमंतीचा ऐवज चोरीस गेला. मोबाइल शॉपीच्या गल्यातून चोरांनी २५ हजार रुपये रोख, जयभवानी इलेक्टीकमधून तीन हजार रुपये रोख आणि प्रांजल मेडिकलमधून रोख पाच हजार रुपये, असा एकूण ५१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला़

याप्रकरणी दुकान मालक संजय भगवानराव मुंडलीक (रा़ कैलासनगर औरंगाबाद), महेबूब पटेल, विनोद साहेबराव शेजवळ, विष्णू मन्सीराम मोघल, बाबुराव माधवराव मेंदाळे, बाळाराम देवासे, संदीप अशोक बडक यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल रोडे हे करत आहेत.

\Bसहा चोरटे, दोन दुचाकी \B

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्यक्तीची ओळख पटवण्यात येत आहे, चोरांना लवकरच अटक करू, अशी माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली़. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सहा चोरटे व दोन दुचाकी असल्याचे दिसते. यातील काहींची ओळख पटवण्यात आल्याची चर्चा आहे़

\Bरोख रकमेवर डल्ला \B

गेल्या काही दिवसांत दोन मेडिकल स्टोअर्समध्ये झालेल्या चोरीत चोरांनी रोख रक्कम चोरून नेली होती. या घटनेतही प्रामुख्याने गल्ल्यातील रोख रकमेवरच डल्ला मारण्यात आला आहे. यामुळे वाळूज महानगर परिसरात होणाऱ्या चोऱ्यांमागे एकच टोळी असावी, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीत पाणी, विरोधी याचिका निकाली

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडीत वरच्या धरणावरून सोडण्यात येणाऱ्या पाण्यास विरोध करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. के. के. सोनवणे यांनी निकाली काढल्या आहेत. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने सविस्तर माहिती खंडपीठात सादर करण्यात आली. हरिश्चंद्र पाणीपुरवठा संस्थेतर्फे दाखल याचिकेवर जानेवारीत सुनावणी ठेवण्यात आली आहे.

याचिकांवर तातडीची सुनावणी घेण्याची विनंती न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. मंगेश पाटील यांनी यापूर्वी अमान्य केली होती. जायकवाडीत २३ ऑक्टोबरला पाणी सोडण्याचा आदेश देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयात याविरोधात दाद मागितली असता सक्षम प्राधिकरणाकडे जाण्याची मागण्याची मुभा दिली होती. त्यानुसार दोन पाणीवाटप संस्थांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. मीनानाथ रखमा बारगळ व इतर, प्रभाकर एकनाथ बोरबाले यांनी पाणी सोडण्याचे आदेश रद्द करण्याची विनंती खंडपीठाकडे केली होती. हरिश्चंद्र पाणी वाटप संस्थेने बंधाऱ्यांमध्ये साचलेले पाणी सोडू नये, अशी विनंती खंडपीठाकडे याचिकेद्वारे केली होती. जायकवाडी धरणात किती पाणी आतापर्यंत पोहचले यासंबंधीची विचारणा खंडपीठाने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे केली. जायकवाडीत आतापर्यंत ४.५ टीएमसी पाणी पोहचल्याचे सांगण्यात आले. अजून पाणी प्रवाहात असून एका आठवड्यात अपेक्षित असलेले पाणी जायकवाडी धरणात पोहचणार आहे, असे सांगण्यात आले. शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने चैताली चौधरी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीनबेल्टवर केलेल्या अतिक्रमणांवर हातोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी कारवाई करीत सिडको बसस्थानक ते हर्सूल या मार्गावरील ग्रीनबेल्टमध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर हातोडा मारला. सुमारे २५ अतिक्रमणे हटविण्यात आली. ग्रीनबेल्टवरील अतिक्रमणांबद्दल वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. अतिक्रमण हटाव विभाग यावर काहीच कारवाई करीत नाही, असा आरोपही केला जात होता. या आरोपाला अतिक्रमण हटाव विभागाने कारवाईच्या माध्यमातून उत्तर दिले. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख ए. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. सुमारे २५ अतिक्रमणे पाडून ग्रीनबेल्ट मोकळा करण्यात आला. ग्रीनबेल्टच्या परिसरात पडलेले बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले. मालमत्ता अधिकारी वामन कांबळे, इमारत निरीक्षक मझर, विनोद पवार यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैरण पीक लागवडीसाठी एक रुपया भाड्याने जमीन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाने औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केली आहे. जिल्ह्यात पाणी व चारा टंचाई असल्याने जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील तलाव व जलाशयाची जमिनीवर वैरण पिके घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही जमीन एक रुपया नाममात्र भाडेपट्टीने मिळणार आहे.

जिल्ह्यात पाणी टंचाईसह जनावरांच्या चाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावातच चारा उपलब्ध व्हावा यासाठी नियोजन करण्यात येत आहे. गाळपेर क्षेत्रात चारा निर्मिती हा पर्याय म्हणून समोर आलेला आहे. ज्या प्रकल्पाला कोरड लागली आहे व बुडित क्षेत्रातील जमिनीत शेतकऱ्यांना मका, ज्वारी, बाजरीसारखी चारा पिके घ्यायला नाममात्र एक रुपया भाडेपट्टीने ही जमीन शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमण्यात आली असून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सदस्य सचिव आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

\Bचार डिसेंबरपासून अर्ज \B

चाराटंचाई निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार डिसेंबरपासून अर्ज मागविण्यात येणार असून दहा डिसेंबरला लाभार्थीची निवड करून यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १५ डिसेंबरला या लाभार्थ्यांना निविष्ठांचे वाटप करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौथीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

0
0

वाळूजमध्ये चौथीच्या

विद्यार्थ्याची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चौथीतील एका चिमुकल्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना वाळूजमध्ये बुधवारी वाळूजमध्ये घडली. विकास मछिंद्र पवार (वय ११) असे या मुलाचे नाव आहे.

सिडको महानगर १, वाळूज येथे राहणाऱ्या पवार यांचा तो एकुलता एक मुलगा होता. विकासला दोन बहिणी आहेत, पवार हे माजी सैनिक आहेत. ते व त्यांची पत्नी एका खासगी संस्थेत नोकरीला आहेत. बुधवारी नेहमीप्रमाणे ते कामावर तर बहिणी शाळेत गेल्या होत्या. सायंकाळी बहिणी घरी आल्यावर विकासने ओढणी पंख्याला अडकवून गळफास घेतल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी लगेच वडिलांना ही माहिती दिली. वडील घरी आल्यावर त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योज मालवली होती. विकासच्या आत्महत्येचे कारण कळाले नाही, मात्र टीव्हीमधील दृष्य पाहून त्याने अनुकरण केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. तथापि हा घातपात की आत्महत्या या दृष्टीने त्यांचा तपास सुरू आहे.

विकासचा थट्टामस्करी करण्याचा स्वभाव होता. त्यामुळे त्या घरी परतल्या तेव्हा त्यांना तो फाशी घेण्याचे नाटकच करीत आहे, असे प्रथम बहिणींना वाटले. तथापि, त्याने खरोखरच फाशी घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हनुमाननगरकरांचा महापौर दालनात ठिय्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या जलवाहिन्या बदलण्याच्या मागणीसाठी हनुमाननगर येथील नागरिकांनी गुरुवारी महापौरांच्या दालनात सुमारे पाच तास ठिय्या आंदोलन केले. त्यांनी दालनातच दुपारचा डब्बा खाल्ला. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास महापौर व आयुक्तांनी नागरिकांची भेट घेऊन जलवाहिनी बदलाचे काम सोमवारपासून सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले.

पुंडलिकनगर येथील जलकुंभावरून हनुमाननगरमध्ये पाणीपुरवठा केला जातो. मात्र, जुनाट जलवाहिन्यांमुळे काही गल्ल्यांमध्ये योग्य प्रकारे पाणी पुरवठा होत नाही. अनेकवेळा दूषित पाणी मिळत असल्याने काही वर्षांपासून नागरिक त्रस्त आहेत. नवीन जलवाहिन्या टाकण्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेकवेळा आंदोलन करूनही मार्ग निघाला नाही. त्यामुळे शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सकाळी ११च्या सुमारास महापौरांच्या दालनाचा ताबा घेतला. त्यावेळी महापौर नंदकुमार घोडेले आढावा बैठकीत व्यस्त होते. सायंकाळी पाच वाजता महापौर घोडेले हे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह नागरिकांच्या भेटीला आले. नवीन जलवाहिन्या टाकण्याचे आयुक्तांनी यावेळी मान्य केले. यावेळी सभागृहनेते विकास जैन, नगरसेवक आत्माराम पवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे कर्मचारी जिलानी यांचे निधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या झोन क्रमांक पाच कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी इकबाल जिलानी यांचे गुरुवारी ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महापालिकेत हळहळ व्यक्त केली जात होती. जिलानी यांना मालमत्ता कर वसुलीचे काम देण्यात आले होते. या कामात त्यांची प्रगती समाधानकारक नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे जिलानी यांच्यावर ताण आला व त्यांचा मृत्यू झाला, असे पालिकेच्या वर्तुळात बोलले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटी बसला डिसेंबरचा मुहूर्त

0
0

२४ बस धावणार १४ मार्गांवर, एक बस पर्यटकांसाठी राखीव

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत औरंगाबाद शहरात सिटी बस सुरू करण्यासाठी डिसेंबर महिन्याचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २५ बस प्राप्त होणार आहेत. त्यापैकी २४ बस १४ मार्गांवर चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक बस पर्यटकांसाठी राखीव असेल. 'औरंगाबाद दर्शन' बस असा उल्लेख या बसचा केला जाणार आहे.

सिटी बसचे मार्ग ठरविण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात परिवहन समितीची बैठक झाली. या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेते विकास जैन, महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती महापौरांनी दिली. एकूण १०० सिटी बस प्राप्त होणार आहेत. त्यापैकी ९० बस रस्त्यांवर धावतील, दहा बस राखीव ठेवण्यात येणार आहेत. सुरुवातीला २५ बस प्राप्त होतील. त्यापैकी २४ बस १४ मार्गांवर चालवल्या जातील. एक बस 'औरंगाबाद दर्शन'साठी टुरिस्ट बस म्हणून चालवली जाणार आहे. १०० सिटी बस ३० मार्गांवर चालविण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

स्मार्ट बसथांबे करण्याचे नियोजन आहे, परंतु या बसथांब्यांचे काम होईपर्यंत सध्या अस्तित्वात असलेले बसथांबे वापरले जाणार आहेत. या बसथांब्यांपैकी काही बसथांब्यांची दुरूस्ती करायची असेल तर ती औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून केली जाईल. रेल्वेस्टेशन येथे बसडेपो तयार केला जाणार आहे, तर शहागंज येथे बसथांबा असणार आहे. स्मार्ट सिटीच्या सिटी बसचे तिकीट दर एसटी महामंडळाच्या तिकीट दराप्रमाणे किंवा त्यापेक्षा कमी असतील. सिटी बससाठी वर्षाला ३७ कोटी रुपयांचा खर्च येणार असून उत्पन्न २८ कोटी रुपये मिळेल, असे गृहित धरण्यात आले आहे. महिन्याला ४० लाखांचा तोटा होईल, असेही गृहित धरण्यात आले आहे.

तिकीट दरात अशी दिली जाणार सूट

विद्यार्थी - ६६.६६ टक्के सूट

दिव्यांग - ७५ टक्के सूट

अंशत: दिव्यांग - ५० टक्के सूट

ज्येष्ठ नागरिक व स्वातंत्र्य सैनिकांना देखील विशेष सूट

संबंधित वृत्त : २

.........................................................................................................................

पहिल्या टप्प्यातील २४ सिटी बससाठीचे मार्ग

मार्ग - मार्गाची लांबी (किलोमीटर)

औरंगपुरा - बजाजनगर - १३.९

औरंगपुरा - रांजणगाव - १३.८

औरंगपुरा - वाळुज - १६.३

चिकलठाणा - जोगेश्वरी - २७.७

शहागंज - रेल्वेस्टेशन - ७

रेल्वेस्टेशन - सिडको (एम २ मार्गे) - १९

शिवाजीनगर - औरंगपुरा - ९.८

चिकलठाणा - मध्यवर्ती बसस्थानक - १२.३

औरंगपुरा - हिंदुस्थान आवास - ९.९

हर्सुल - रेल्वेस्टेशन (सीबीएस मार्गे) - १०.२

चिकलठाणा - औरंगपुरा - १२.७

रेल्वेस्टेशन - हर्सुल टी पॉइंट (गजानन महाराज मंदिर मार्गे) - १३.८

सिडको - औरंगपुरा - एसआरपीएफ कँप - ११.१

हर्सुल - नक्षत्रवाडी - १४.१

दुसऱ्या टप्प्यातील सिटी बसचे मार्ग ( ९० + १०)

मार्ग - मार्गाची लांबी (किलोमीटर)

चिकलठाणा - बजाजनगर - २२

सिडको - सीबीएस (एम २ मार्गे) - १०.३

चिकलठाणा - रांजणगाव - २१.२

सिडको - रेल्वेस्टेशन ( पीरबाजार मार्गे) - ८.९

औरंगपुरा - भावसिंगपुरा - ४.२

रेल्वेस्टेशन - भावसिंगपुरा - ६.००

चिकलठाणा - हर्सुल - १०

औरंगपुरा - हनुमान टेकडी - ६.२

औरंगपुरा - मिटमिटा - ९.२

रेल्वेस्टेशन - विद्यापीठ - ६.६

रेल्वेस्टेशन - शिवाजीनगर - ९.००

रेल्वेस्टेशन - रेल्वेस्टेशन (रिंगरुट) - २३.१

औरंगपुरा - औरंगपुरा (रिंगरुट) - १४.८

सातारा - सीबीएस (रेल्वेस्टेशन मार्गे) - ९.६

औरंगपुरा - रेणुकामाता मंदिर - १२.४

जटवाडा - रेल्वेस्टेशन - २९.००

हर्सुल - रेल्वेस्टेशन - १३.७

रेल्वेस्टेशन - सिडको - ६.८

रेल्वेस्टेशन - बजाजनगर - १४

रेल्वेस्टेशन - करमाड - २५

----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीचे निकाल डिसेंबरमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेगात सुरू आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पदवी वर्गाचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी दिली. काही विषयांसाठी उत्तरपत्रिका तपासणी केंद्र नसल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. घाईत पेपर तपासल्यामुळे मागील वर्षी उत्तरपत्रिकात तब्बल ४५ हजार चुका झाल्याचे निदर्शनास आले होते.

पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या उत्तरपत्रिका तपासणी सुरू झाली आहे. एम. ए., एम. कॉम विषयाचे उत्तरपत्रिका तपासणी केंद्र कार्यरत आहेत. काही विषयांची अडचण असल्यामुळे परीक्षा विभाग तातडीने नियोजन करीत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पदवीचे निकाल जाहीर करण्याचे प्रयत्न आहेत. बीसीए, बीबीए अभ्यासक्रमाच्या बहुतेक उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. इतर विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी उत्तरपत्रिका तपासणीसाठी मानधन वाढवण्यात आले. एका पेपरसाठी सात रुपये मानधन दिले जाणार आहे. संबंधित प्राध्यापकाने दिवसभरात किमान ४० उत्तरपत्रिका तपासणे आवश्यक आहे. मात्र, तपासणीत चुका टाळण्यासाठी दंड आकारण्यात येणार आहे. मागील वर्षी कला व वाणिज्य शाखेच्या कस्टोडीयनने उत्तरपत्रिकात तब्बल ४५ हजार चुका निश्चित केल्या होत्या. एका चुकीसाठी १८ रुपये दंड आकारण्यात आला होता. निष्काळजीपणे पेपर तपासल्यास पुन्हा विद्यार्थी विद्यापीठाला दोषी धरतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या दंडामुळे चूका कमी होतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात निधाराधारांना आधार नाहीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत प्रशासनाकडे गेल्या दोन वर्षांपासून ८००पेक्षा अर्ज प्रलंबित असल्याची कबुली सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले विधीमंडळाच्या अधिवेशनात दिली.

यासंदर्भात आमदार सतीश व विक्रम काळे यांच्या तारांकीत प्रश्नाचा खुलासा बडोले यांनी केला. पदाधिकारी, अधिकारी याांच्या वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून यासंदर्भात बैठका झाल्या नाहीत; तसेच काही लाभार्थी वयोवृद्ध असल्यामुळे त्यांच्या बोटाचे ठसे जुळत नसल्याने निराधार योजनेंतर्गत खात्यावर रक्कम जमा असूनही बँक लाभार्थींना पैसे देत नाहीत, असा प्रश्न दोन्ही आमदारांनी विचारला होता. यावर बडोले यांनी औरंगाबाद शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली असल्याचे सांगत या बैठकीत प्रलंबित अर्जांपैकी २३२ अर्ज मंजूर, तर ६०० अर्ज नामंजूर करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय बोटाचे ठसे जुळत नसलेल्या लाभार्थींनाही अनुदानाचे वाटप करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे उत्तर बडोले यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरपण हरवलेले ‘बिग बॉस’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइल, संगणक, इंटरनेट, टीव्ही या तंत्रज्ञानाने जग जवळ आले. पण, जवळची माणसे दुरावली. हरवलेल्या संवादाची गोष्ट सांगणारे 'बिग बॉस' नाटक रसिकांना अंतर्मुख करुन गेले. तंत्रज्ञानाचा नेमका वापर करुनही घरपण टिकवण्याचे सूत्र नाटकाने मांडले.

५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत 'बिग बॉस' नाटकाचा प्रयोग सादर झाला. तापडिया नाट्यमंदिरात गुरुवारी प्रयोग रंगला. सतीश लिंगडे लिखित व सुमीत शर्मा दिग्दर्शित नाटकात तंत्रज्ञानाचे फायदे-तोटे प्रभावीपणे मांडण्यात आले. माहिती-तंत्रज्ञानातून जग जवळ आले. पण, घरातील संवाद हरवला. सर्वांना एकत्र आणून घराला घरपण देण्याची धडपड नायिका करीत असते. तिच्या धडपडीची आणि विरोधाभासाची कथा नाटकात अत्यंत उत्कंठावर्धक पद्धतीने मांडण्यात आली. काही ठिकाणी नाटक रेंगाळत असले तरी नेमक्या संवादामुळे आशयाचे वेगळेपण लक्षात येते. रसिकांनी नाटकाला चांगला प्रतिसाद दिला. या नाटकात सतीश लिंगडे, रेखा चव्हाण, प्रेरणा सराफ-कुलकर्णी व ओंकार बिनीवाले यांनी भूमिका केल्या. गणेश लोखंडे, पवन राजळे, पवन खांदे, राम गाडेकर, अथांग लिंगडे, श्रुती देहेडकर व शिवानी राजूरकर यांनी तांत्रिक सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांना येत्या पंधरवड्यात पदोन्नती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षकांना येत्या पंधरवड्यात पदोन्नती दिली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभापती मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी शिक्षण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीत निमंत्रित सदस्य प्रभाकर पवार यांनी इतर जिल्हा परिषदांप्रमाणे केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक पदांसाठी पदोन्नती करण्याची मागणी केली. यावर चर्चा जोरदार चर्चा झाली. त्यानंतर शिक्षण समितीने येत्या पंधरवड्यात पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा ठराव घेण्यात आला. सदस्य सुरेश सोनवणे, सीमा गव्हाणे, बळीराम भुमरे, कल्याण चव्हाण, शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल उपस्थित होते.

दरम्यान, शिक्षिकांच्या बालसंगोपन रजा जाणीवपूर्वक मंजूर करण्यात चालढकल होत असल्याचा आरोप यावेळी पवार यांनी केला. बैठकीत डिसेंबर महिन्यात शिक्षक कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचाही ठराव घेतला गेला. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण सुविधांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images