Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कर्जाच्या आमिषाने नऊ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील एका व्यापाऱ्याला ७० कोटींचे कर्ज मिळवून देतो असे अमिष दाखवून पाच जणांनी नऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सुरेशचंद्र बाकलीवाल (रा. भाग्यनगर) यांना के. के. जैन फायनान्स कंपनीकडून व्यापारासाठी ७० कोटी रुपये कर्ज मिळवून देतो अशी थाप दिनेश जैन, अशरफ खान, सुनील सकपाल, विपुल पांडे आणि जितू यांनी मारली. बाकलीवाल यांचा विश्वास संपादन करून एक लाख रुपये डिपॉजिट भरण्यास लावले. तसेच कर्जाच्या प्रोसेसिंग फिसच्या नावाखाली आठ लाख ८९ हजार रुपये २१ मे २०१७ पासून ते २३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत घेतले. सदर पैसे घेऊनही कर्ज मिळाले नाही. त्यामुळे बाकलीवाल यांनी तगादा लावल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणात बाकलीवाल यांनी दिनेश जैन, अशरफ खान, सुनील सकपाल, विपुल पांडे आणि जितू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

\Bबनावट कागदपत्राआधारे फसवणूक

\Bतेवीस हजारांचे कर्ज बुडवून दोघांनी कंपनीची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी राजेंद्र होनाजी इंगोले (रा. साई संकल्पना, गारखेडा) यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, साजेद खान निसार खान, शेख रेहान शेख खलीद (रा. शहाबाजार) यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे मोबाइल दुकानानतून कर्ज काढले होते. या कर्जापैकी २३ हजार ४३३ कर्ज बुडवून या दोघांनी कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bपैसे देणाऱ्याला मारहाण

\Bकर्ज मंजूर करून देतो म्हणून पैसे घेतले. त्यानंतर कामही केले नाही. उलट पैसे मागितल्यास मारहाण केली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन दिनेश आसावार (रा. कासलीवाल मार्वल) यांनी सौदागर सपकाळ (रा. चौधरी कॉलनी) यांना बँकेतून कर्ज काढण्यासाठी दोन लाख रुपये अडव्हॉन्स घेतले होते. मात्र, त्यांनी कर्ज मंजूर करून दिले नाही. तेव्हा आसावार यांनी दोन लाख रुपये परत मागितले असता २१ नोव्हेंबर रोजी दहाच्या सुमारास सौदागर सपकाळ हे पवन आसावारच्या घरी आले. पैसे परत देणार नाही म्हणत मारहाण केली. या प्रकरणी आसावार याच्या फिर्यादीवरून सपकाळ याच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिरा गोल्डचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुंतवणुकीवर दरमहा तीन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून हिरा ग्रुप आणि हिरा गोल्ड कंपनीने शहरातील पाच महिला ग्राहकांची तब्बल आठ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्याकडे वर्ग केला आहे.

हिरा गोल्डच्या मालक नौहिरा शेख सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात असून पुढील आठवड्यात आरोपीला औरंगाबाद पोलिस ताब्यात घेणार असल्याची माहिती देण्यात आली. पानदरीबा बोहरी कठडा येथील रहिवासी महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. हिराग्रुप ऑफ कंपनी ही २००४-२००५ पासून औरंगाबादेतील जुना बाजार भागात कार्यान्वित आहे. कंपनीने गुंतवणुकीवर तीन टक्के व्याज दरमहा बँकेत जमा होईल अशी योजना सुरू केली. अनेकांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत असल्यामुळे पानदरीबा येथील महिलेने एक लाख रुपये गुंतवले़ या कंपनीच्या सीईओ नौहिरा शेख या हैदराबाद येथे राहतात. मूळ कंपनीही हैदराबाद येथील आहे़ मात्र, जून २०१८ पासून ग्राहकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. हा प्रकार लक्षात येताच पानदरीबा येथील महिला ग्राहकाने सिटी चौक पोलिस ठाणे गाठून हिरा ग्रुपच्या हैदराबाद येथील सीईओ नौहिरा शेख यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली़ दुरेश हुसैन यांचे दोन लाख, नीलोफर फातेमा काझी वहिदोद्दीन यांचे एक लाख, सय्यद अब्दुल वहाव यांचे ओक लाख २५ हजार, सय्यद मेहरूख फातेमा चार लाख १० हजार आणि मसरत फातेमा ५० हजार अशा एकूण ८ लाख ८५ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली आहे.

\Bजवळपास ५०० गुंतवणूकदार

\Bगुंतवणूक केलेल्या रकमेवर घरबसल्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने, गुंतवणूकदार आकर्षित झाले. अनेकांनी घरे आणि शेती विकून या कंपनीत गुंतवणूक केली. व्याजाच्या आमिषाला बळी पडत शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर यात गुंतवणूक केली. जवळपास ५००च्या पुढे यात गुंतवणूकदार अडकले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक जाणिवेचा सच्चा कार्यकर्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मानवलोक' संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात भरीव कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. मराठवाड्यातील सामाजिक प्रश्नांवर लोहिया यांनी तळमळीने काम केले. विशेषत: ग्रामीण भागात संरचनात्मक काम केल्यामुळे लोहिया यांच्या कामाचा सर्वदूर प्रभाव पडला होता. सच्चा कार्यकर्त्याच्या आठवणींना मान्यवरांनी उजाळा दिला.

दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्याला 'मानवलोक' संस्थेने नेहमी सावरले. पाणी टंचाई, नवीन पीक पद्धती, स्वयंरोजगार, बचतगट अशा अनेक समस्यांवर डॉ. द्वारकादास लोहिया यांनी उपाययोजना शोधून काम केले. लोहिया दाम्पत्याचा अंबाजोगाईसह मराठवाड्यात सर्वदूर प्रभाव होता. संस्थात्मक काम करताना लोहिया यांनी गाव पातळीवर कार्यकर्ते घडवले. 'मानवलोक'च्या कामाचा व्याप १९७२ च्या दुष्काळापासून वाढला. डोंगराळ भागात पाणी अडविण्याचे काम देशी-विदेशी संस्थांच्या सहकार्याने केले. अवर्षण प्रवण विकास कार्यकम, महाराष्ट्र जलसंधारण परिषद, वैधानिक विकास मंडळ यासारख्या समित्यांवर लोहिया यांनी काम केले. अगदी दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळातही लोहिया कार्यरत होते. पाटोदा, कुंबेफळ या गावात 'मानवलोक'ने महत्त्वाचे काम केले होते. वेळोवेळी शिबिरे घेऊन जनजागृती करण्यावर संस्थेचा भर होता.

द्वारकादास लोहिया यांनी गेल्या ५० वर्षांपासून राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्ष आणि धर्मनिरपेक्ष समतावादी विचारांच्या चळवळी निष्ठेने चालवल्या. समर्पित कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या घडविणारे आणि शेती, शेतकरी व शेतमजूर यांच्या हितासाठी राबणारे कार्यकर्ते म्हणून ते नेहमी स्मरणात राहतील.

- प्रा. विजय दिवाण, सामाजिक कार्यकर्ते

डॉ. द्वारकादास व शैला लोहिया यांनी सामाजिक चळवळीत विविध यशस्वी प्रयोग केले. समाजवादी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या लोहिया यांना नंतर एनजीओच्या माध्यमातून काम करावे लागले. ही खंत वाटणारी गोष्ट होती. आपल्या समाजात सामाजिक कार्याचे बदलणारे स्वरुप हतबल करणारे आहे. या परिस्थितीत बदल करणे हीच लोहिया यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

- प्रा. एच. एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ

'मानवलोक' संस्थेच्या माध्यमातून डॉ. द्वारकादास लोहिया मागील ४० वर्षांपासून कार्यरत होते. पाणी, शेती या क्षेत्रात त्यांनी विधायक काम केले. मराठवाड्यासाठी ते मध्यवर्ती केंद्र होते. सध्या मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना लोहिया यांचे जाणी मोठी हानी आहे.

- अॅड. विष्णू ढोबळे, प्रदेशाध्यक्ष, समाजवादी जनपरिषद

समाजवादी विचारांचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या द्वारकादास लोहिया राष्ट्र सेवादलाच्या मुशीतून तयार झाले होते. आणीबाणीत त्यांनी १९ महिने तुरुंगवास भोगला. १९७७ नंतर त्यांनी उभे आयुष्य ग्रामीण विकासासाठी खर्ची केले. त्यांच्या रुपाने मराठवाड्याने समाजवादी विचार व समाजकार्याचा मानदंड गमावला आहे.

- सुभाष लोमटे, सरचिटणीस, राज्य हमाल मापाडी महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील रस्त्याचे काम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरातील रेणुका माता मंदिर ते अहिल्यादेवी होळकर चौक डांबरीकरणाच्या रखडलेला कामाला अखेर शनिवारी सुरुवात करण्यात आली. या रस्त्याच्या कामासाठी परिसरातील नागरिकांचा गेल्या सुमारे दीड-पावणेदोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.

सातारा परिसरात गेल्या दीड दशकांत नागरी वसाहती वेगाने वाढल्या. रेणुकामाता मंदिर कमानीपासून पुढे म्हाडा कॉलनीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार निधीतून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर वर्षभरातच रस्ता उखडला. त्यावेळी रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, रस्ता फार काळ सुस्थितीत राहिला नाही. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहने नेणे कठीण झाले. चिखलमय रस्त्यामुळे पायी चालणेही अशक्य होते. या पार्श्वभूमीवर सातारा देवळाई संघर्ष समितीच्या माध्यमातून नागरिकांनी रस्त्याच्या कामासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांनी महापालिकेवर मोर्चाही काढला. त्यानंतर या रस्त्याच्या कामाला महापालिकेने मंजुरी दिली. प्रशासकीय मान्यतेनंतरही रस्त्याचे काम दीर्घ काळासाठी निविदा प्रक्रियेत अडकून पडले. त्यामुळे गेल्या पावसाळ्यातही नागरिकांना खड्डे व चिखलमय रस्त्यातून ये-जा करावी लागली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. रस्त्यावर खडी अंथरल्यावरनंतर काम थांबविण्यात आले होते. नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर काम सुरू करण्यात आले. खडी, मुरूम यांचा थर अंथरल्यानंतर दिवाळीपूर्वी काम पुन्हा बंद करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागला. धूळग्रस्त रस्त्यामुळे नागरिक, व्यापारी, वाहनधारक यांना होत असलेल्या त्रासाकडे 'महाराष्ट्र टाइम्स'ने लक्ष वेधले होते. रस्त्याच्या कामाला शनिवारी पुन्हा सुरुवात करण्यात आली. चाटे स्कूलपासून बीड बायपासच्या दिशेने डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.

\Bसमितीचा लढा

\Bरस्त्यावर डांबरीकरणाचा पहिला थर अंथरल्यानंतर चाटे स्कूल ते अहिल्यादेवी होळकर चौक या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा डांबरीकरणाचा थर अंथरण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सातारा देवळाई संघर्ष समितीचे सोमिनाथ शिराणे, संजय कुलकर्णी, आप्पासाहेब देशमुख, पद्मसिंह राजपूत, असद पटेल यांच्यासह नागरिकांनी रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक बदलांना सकारात्मकपणे सामोरे जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काळानुरूप तंत्रज्ञानात विविध बदल होत आहेत. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी हे बदल प्रभावी ठरत आहेत. यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी होऊ घातलेल्या या बदलांना सकारात्मक प्रतिसाद देत प्रगती साधावी लागेल, असे आवाहन उद्योजिका मैथिली तांबोळकर यांनी शनिवारी केले. त्या 'इन्सान'(इंडियन नॅशनल सजेशन स्कीम्स असोसिएशन) औरंगाबाद शाखा व जे.एन.ई.सीतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या.

व्यासपीठावर 'इन्सान'चे चेअरमन प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, सुधीर दाते, मदन राजपूत, सुनील सेठी उपस्थित होते. यावेळी तांबोळकर म्हणाल्या, मानव संसाधनांचा वापर फक्त साधन म्हणून न करता त्याला संपत्तीच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. उद्योगात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मताचा आणि सल्ल्याचा आदर करत ते योग्यारिता राबविले पाहिजेत. बदलत्या संकल्पनांचा स्वीकार करत आपण काम करत असलेल्या उद्योगाबद्दल आपलेपणाची भावना जपत वाटचाल करावी लागेल. या सर्वांमध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून उद्योगांनी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. 'इन्सान' त्या दृष्टीने चांगले काम करीत आहे, असेही त्या म्हणाल्या. या प्रसंगी 'इन्सान'चे चेअरमन प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, संजय वैद्य यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजलक्ष्मी भोसले तर आभार सुनील सेठी यांनी मानले. प्रास्ताविक संजय वैद्य यांनी केले. या स्पर्धेत औरंगाबाद तसेच नाशिक येथील चाळीस संघानी सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीचा आकडा सव्वा कोटीपर्यंत

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एक लाखाची गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी सहा हजारांचे व्याज देतो म्हणून फसविणाऱ्या चेतन भोपलावदविरोधात तक्रारींचा ओघ वाढला आहे. त्याने गॅलेन्ट फायनान्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून आतापर्यंत १५ जणांना जवळपास सव्वा कोटीचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

चेतनने गॅलेन्टमधील गुंतवणूकदारांचा पैसा शेअर मार्केट आणि इतर ट्रेडिंगमध्ये लावला होता. यात त्याचे नुकसान झाले. गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यासाठी त्याची आर्थिक परिस्थिती राहिली नाही. त्याच्याकडे पैसे मागणाऱ्यांचा तगादा वाढला. त्यामुळे तो तो रात्री १२ ते १ च्या दरम्यान घरी येई आणि पहाटे चारलाच घरातून बाहेर पडे. तो पत्नीसह कुठे जायचा हे कोणालाही माहित नव्हते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारीही त्याला ताब्यात घेण्यासाठी जेव्हा घरी गेले, तेव्हा त्याने त्यांनाही कामानिमित्त बाहेर गावी असल्याचे सांगितले. दोन-तीन वेळेला त्याच्या घरच्यांकडून चेतन घरी नसल्याचे सांगितले गेले. पोलिसांनी त्याच्या घरावर पाळत ठेवल्यावर चेतन रात्री उशीरा घरी येत असल्याचे लक्षात आले.

\Bमंगळवारपर्यंत पोलिस कोठडी

\Bआर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी आणि यांच्या टीमने आरोपी चेतन भोपलावदला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला मंगळवारपर्यंत (२७ नोव्हेंबर) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ‘मनसे’चा दंडुका मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळ नियोजनात आतापर्यंत अपयशी ठरलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसे सैनिकांच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी शहरात दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी तीस हजार शेतकरी आणि मनसे सैनिक जमणार आहेत, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.

पत्रकार परिषदेला मनसेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, विजय चव्हाण, सचिन पाटील, बालाजी शिंदे, बळीराम खटके, आशिष सुरडकर, शेख राज, संदिप कुलकर्णी, वैभव मिटकर, गौतम आमराव उपस्थित होते. यावेळी जावेद शेख म्हणाले, मनसेच्या वतीने मागील दीड महिन्यांपासून विविध जिल्ह्यात दुष्काळाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाचे नियोजन करण्यात आलेले नाही. यामुळे अनेक शेतकरी हे आत्महत्या करीत आहेत. शासनाला जागे करण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी पैठण गेट ते विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतात आलेले हलगट हाकलण्यासाठी दांडुक्याचा उपयोग केला जात आहे. वैजापूर येथे शेतकरी आत्महत्या झालेली असताना, तिथे सीएम चषक घेतला जातो. ही विदारक स्थिती आहे. यामुळे हा मोर्चा फक्त दंडुका दाखविण्यासाठी आहे. आगामी काळात सरकार वठणीवर आले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेख यांनी दिला.

\Bआधी राजीनामा द्या ना…..

\Bसत्तेमधून बाहेर पडतो असे सांगत फिरणाऱ्या शिवसैनिकांवर 'मनसे' सैनिकांनी चांगलाच घाव घातला. राजीनामा देण्याची धमकी देणारे राजीनामा खिशात ठेवून अयोद्धेत गेले आहेत. निवडणूकीपुर्वी त्यांनाही 'राम' आठवला असल्याचे सांगत आधी मंदिर नंतर सत्ता अशी घोषणा केली. मात्र शिवसेना जेव्हा सत्तेत सहभागी झाली तेव्हापासूनच हा विषय का उचलला नाही. अशी टीका जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’ लोकसभा लढविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ज्याप्रमाणे आंध्रप्रदेशमध्ये 'एमआयएम'चा गड हैदराबाद आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 'एमआयएम'चा गड औरंगाबाद राहणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत 'एमआयएम' आणि वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवेल,' अशी माहिती आमदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत जलील यांनी वंचित बहुजन आघाडी आणि 'एमआयएम' आघाडीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, 'आगामी २६ नोव्हेंबर, १२ डिसेंबरला आघाडीतर्फे राज्यात विविध सभा घेण्यात येणार आहेत. या सभेत डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत 'एमआयएम'चे नेते सहभागी होणार आहेत. वंचित आघाडीकडून सध्या विविध भागात सर्वेक्षण सुरू आहे. 'एमआयएम'कडूनही राज्यातले सर्वेक्षण डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. डिसेंबरमध्ये आघाडीत जागा वाटपाबाबत निर्णय होणार आहे. आतापर्यंत धार्मिक तेढ निर्माण करून खासदार निवडून आले. गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या आधी संबंधित खासदारही तोच मुद्दा उपस्थितीत करितात. मात्र, आता शहर आणि जिल्ह्यातील मतदारांचा कल बदलत आहे. यामुळे आगामी निवडणुका या औरंगाबादच्या विकासासाठी नवीन बदल घडवून आणणारा असतील,' असा विश्वासही जलील यांनी व्यक्त केला.

\Bमग २०१४ मध्ये का हारले?

\Bवंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसकडून खासदारकी देण्याबाबत जाहीर घोषणा केली जात आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर आतापर्यंत काँग्रेस पक्ष शांत असल्याबाबत आमदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेस पक्षावरही टीका केली. ………वंचित बहुजन आघाडी आणि 'एमआयएम' एकत्र आल्यावर भाजपला फायदा होणार असल्याची टीका केली जात आहे. यावर जलील म्हणाले, '२०१४ मध्ये एमआयएमने लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. तेव्हा काँग्रेस पक्ष हा दोन जागांवर आणि राष्ट्रवादी पक्ष चार जागांपर्यंतच सिमित का राहिला,' असा सवालही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बृहत आराखड्याला मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २६ महाविद्यालयांचे प्रस्ताव फेटाळले आहेत. बृहत आराखड्यानुसार ९१ महाविद्यालयांचे प्रस्ताव आले होते. अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंजूर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत.

विद्यापीठाने राज्यपाल कार्यालयाच्या आदेशानुसार बृहत आराखडा सर्वेक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केला होता. उद्योग, व्यापार, शेती, सामाजिक कार्य, सांस्कृतिक क्षेत्र, विद्यार्थी, पालक अशा विविध स्तरावर दहा हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. पारंपरिक महाविद्यालयांना मान्यता देऊ नये असा निष्कर्ष निघाला होता. व्यवसायाभिमुख शिक्षणावर आधारित उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना मान्यता देण्याचा निष्कर्ष निघाला होता. त्यानुसार विद्यापीठाने नवीन महाविद्यालायांसाठी प्रस्ताव मागवले होते. औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमधून ५३ महाविद्यालयांचे प्रस्ताव होते. बीड जिल्ह्यातून आठ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच प्रस्ताव होते. जालना जिल्ह्यातून २५ प्रस्ताव आले होते. या महाविद्यालयांमध्ये संलग्नता समितीने पाहणी केली. समितीच्या पाहणी अहवालानुसार अनेक महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा नसल्याचे आढळले. तसेच सर्वेक्षणातील निष्कर्षात महाविद्यालयांचे प्रस्ताव पात्र ठरत नसल्यामुळे अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत ९१ पैकी २६ प्रस्ताव फेटाळण्यात आले. चार जिल्ह्यातील ६५ महाविद्यालयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर ठेवले जाणार आहेत. व्यवस्थापन परिषदेच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवले जाणार आहेत.

\Bपायाभूत सुविधांचा अभाव

\Bबहुतांश महाविद्यालयांमध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा, मैदान आणि ग्रंथालये नव्हते. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. या बैठकीला प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. मजहर फारूकी आणि डॉ. संजीवनी मुळे यांची उपस्थिती होती. या बैठकीत मान्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेतर्फे शहरात २१ ठिकाणी आरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अयोध्येत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरयू नदीची आरती करीत असताना त्याच वेळी शिवसेनेतर्फे औरंगाबादमध्ये २१ ठिकाणी महाआरती करण्यात आली. त्यात शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले. जय श्रीरामच्या जयघोषाने आरतीसाठी निवडलेली ठिकाणे दुमदुमून गेली.

श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी व भाजप सरकारला राम मंदिर बांधण्याची आठवण करून देण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी दुपारी अयोध्येत पोहचले. त्यांनी सायंकाळी शरयू नदीची आरती केली. ठाकरे जेव्हा शरयू नदीची आरती करतील तेव्हाच विविध शहरात विविध ठिकाणी आरती करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुखांकडून देण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद शहरातही आरती करण्यात आली. या संदर्भात महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी माहिती दिली. ते म्हणाले, गुलमंडी, संस्थान गणपती राजाबाजार, टीव्ही सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, सिडको एन ७ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, किराडपुरा येथील श्रीराम मंदिर, चिकलठाणा, मुकुंदवाडी, बजाजनगर, पंढरपूर, पदमपुरा, मोंढानाका चौक, पुंडलिकनगर आदी ठिकाणे आरतीसाठी निश्चित केली होती. आरतीची जबाबदारी त्या भागातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना देण्यात आली होती,' अशी माहिती त्यांनी दिली.

\Bमहापौरही उपस्थित

\B'गुलमंडी येथे जैस्वाल यांच्यासह महापौर नंदकुमार घोडेले आरतीसाठी उपस्थित होते. संस्थान गणपती मंदिरात वैजयंती खैरे व नगरसेविका यशश्री बाखरिया यांच्या नेतृत्वाखाली आरती करण्यात आली. टीव्ही सेंटर चौकात शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आरती करण्यात आली. मुकुंदवाडी येथे बाबासाहेब डांगे, चिकलठाणा येथे रमेश दहिहंडे, मोंढानाका चौकात माजी महापौर त्र्यंबक तुपे, बजाजनगर येथे बाबा दळवी, पदमपुरा येथे सन्नी बारवाल यांच्या नेतृत्वाखाली आरती केली,' असे जैस्वाल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारांचे ‘भाजप’मध्ये इनकमिंग?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणुकीचे वारे वाहू लागताच भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा जोमाने इनकमिंग सुरू झाले आहे. शनिवारी आयोजित प्रवेश सोहळ्यात राजेंद्र साबळे पाटील, राहुल चाबुकस्वार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यातील राहुल चाबूकस्वार यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, चाबूकस्वार यांनी आरोप फेटाळले आहेत.

पुंडलिकनगर येथील तिरुमला मंगल कार्यालयात शनिवारी प्रवेश सोहळा झाला. यावेळी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी आमदार मोहन मते, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, बसवराज मंगरुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी राहुल चाबुकस्वार व राजेंद्र साबळे पाटील यांच्यासह त्यांच्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. स्थानिक नेत्यांनी भाषण करताना या दोघांसह प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत काम करणाऱ्यांना निश्चितच चांगली जबाबदारी दिली जाते, असे नमूद केले. दरम्यान, राहुल चाबुकस्वार यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना चाबूकस्वार यांनी आपण दोन प्रकरणात आपण निर्दोष सुटल्याचे सांगितले. आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले होते. समाजकार्याची आवड असल्यानेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

चाबुकस्वार, पाटील यांनी व त्यांच्या मोठ्या संख्येने आलेल्या समर्थकांनी पक्षात प्रवेश केला. कोणाची नेमकी काय पार्श्वभूमी आहे याची मला कल्पना नाही. भाजपमध्ये चांगल्या कार्यकर्त्यांना घडविण्याचे काम केले जाते.

- डॉ. भागवत कराड, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

मला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले होते. दोन प्रकरणात निर्दोष सुटलो आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

- राहुल चाबुकस्वार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहागंजच्या ऐतिहासिक टॉवरला मिळणार गतवैभव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहागंज परिसरातील ऐतिहासिक क्लॉक टॉवरला पुन्हा गतवैभव मिळणार असून, त्यासाठी दोन व्यावसायिकांनी निधी देण्याचे मान्य केले आहे, तर महापालिका आयुक्त निपुण विनायक यांच्या पुढाकाराने पालिका आणि इन्टॅकमध्ये करार झाला आहे,' अशी माहिती एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

जलील म्हणाले, 'औरंगाबादच्या इतिहासाचे तसेच बदलत्या राजकारणाचे साक्षीदार असलेले शहागंज येथील क्लॉक टॉवरला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी फेसबुकवर औरंगाबादकरांचा आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शहरातील एका खासगी संस्थेचे दोन तरुण समीर शेख आणि मोहम्मद साजीद यांनी पुढाकार घेऊन या कामासाठी निधी देण्याचे मान्य केले. क्लॉक टॉवरला वैभव मिळवून देण्यासाठी आर्किटेक्ट हारिस शेख यांनी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पालिकेकडे दिला आहे. ऐतिहासिक वास्तूंचे सवर्धन करणाऱ्या इन्टॅक संस्थेने तब्बल सहा महिने लावले. अखेर महापालिका आयुक्त निपुण विनायक यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या ऐतिहासीक टॉवरचे संवर्धन ऐतिहासिक वास्तूंच्या निर्मितीच्या नियमांमध्ये करण्याबाबत मंजुरी दिली. या टॉवरसाठी संबंधित खासगी संस्था ११ लाख खर्च करणार असून यात क्लॉक आणि इमारतीचे काम केले जाणार आहे. हे काम सहा महिन्यात पूर्ण केले जाणार असून यानंतर गुलमंडी येथील क्लॉक टॉवर अशा खासगी संस्थेकडून निधी देऊन पूर्ण करण्यात येणार आहे,' असेही जलील म्हणाले.

इन्टॅक्टच्या कामावर प्रश्नचिन्ह

जलील म्हणाले, 'शहरातील एखादी वास्तू पडण्याच्या मार्गावर असताना, तिथे इन्टॅक्ट समिती लक्ष देत नाही. मात्र जेव्हा संवर्धन करण्यासाठी काही लोक पुढे येतात. तेव्हा मात्र ऐतिहासिक इमारत संवर्धनासाठी नियमांचा पाढा वाचला जातो. संबंधीत संस्थेने फायलीवर रिमार्क मारून ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याची वाट न पाहता या वास्तू संवर्धित कशा होतील? याचा विचार करावा.'

उदयोजकांच्या फक्त गप्पा …

'ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी स्थानिक उद्योजकांच्या संघटनेसोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत बराच वेळ चर्चा चालली. या चर्चेनंतर जेव्हा उद्योजकांना ऐतिहासिक वास्तू संवर्धन करण्यासाठी मदत करण्याबाबत विचारले असता त्यांनी शहराच्या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला नाही,' अशी खंतही जलील यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद महोत्सव पुन्हा सुरू करा

'दुष्काळाच्या नावाखाली औरंगाबाद महोत्सव यंदाही न घेण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे. औरंगाबाद महोत्सव झाल्यास या ठिकाणी पर्यटक वाढतील. त्याचा फायदा थेट शहरातील लोकांना होणार आहे. यामुळे व्यवसाय वाढेल. यामुळे प्रशासनाने आगामी चार वर्षांचे वेळापत्रक जाहीर करावा. प्रशासनाला हा महोत्सव घेता येत नसेल तर त्यांनी इव्हेंट कंपनी नियुक्त करून तो घ्यावा,' असे आवाहनही जलील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्क माफीपेक्षा हेलपाटेच जास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाच्या झळा सर्वाधिक सोसणाऱ्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफीची घोषणा कागदापुरतीच राहण्याची शक्यता आहे. परीक्षा संपल्या, शुल्क भरले परत करण्यासाठी मात्र, अद्याप प्रक्रियाच सुरू झालेली नाही. सरकारने घालून दिलेल्या अटींमुळे हेलपाटेच जास्त घालावे लागत आहेत.

राज्यातील दुष्काळी भागांतील १८० तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना उच्च शिक्षण संचालनालयाला देण्यात आल्या आहेत. 'डीटीई', 'एमएसबीटीई'च्या अखत्यारित असणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णय घेत परिपत्रक काढण्यात आले तरी, प्रत्यक्षात प्रक्रिया केव्हा पूर्ण होऊन पैसे मिळणार, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे. मराठवाड्यात सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे शुल्क विद्यापीठांनी भरून घेतले आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्क विद्यापीठांकडे जमा आहे. त्यामुळे माफीचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. त्यात हे परीक्षा शुल्क परत केव्हा मिळणार, असा प्रश्न आहे. कॉलेजांनी आकारू नये असे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, परीक्षेचे शुल्क आधीच भरल्याने हे भरलेले पैसे कधी, असा प्रश्न विद्यार्थी करत आहेत. त्यात मागील अनेक वर्षाचे अनुभव लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांचे पैसे कॉलेजांना मिळाले मात्र, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला नाही.

\Bकागदपत्रांचीच जंत्री\B

परीक्षा शुल्क माफी हवी असेल, तर विद्यार्थ्यांना मोठी कसरतच करावी लागणार आहे. दुष्काळग्रस्त गावातील रहिवासी असल्याचा पुरावा आणावा लागेल. त्यासह संबंधित संस्थेकडे अर्ज करणे आवश्यक आहे. संबंधित संस्थेने हे अर्ज तपासून त्यांच्या शिफारशीसह संबंधित विद्यापीठाकडे, मंडळाकडे पाठवायचे आहेत. यासह कोणत्याही विद्यापीठाने, तंत्रशिक्षण मंडळाने, स्वायत्त संस्थेने कोणत्याही स्वरुपाचे परीक्षा शुल्क आकारू नये, असेही स्पष्ट करण्यात आले. शुल्क आकारणी केली असेल, तर परत करण्याच्या सूचना आहेत. मात्र, अद्याप विद्यापीठ, तंत्रशिक्षण मंडळाने परीक्षा शुल्क परत केलेले नाही; ना त्याची प्रक्रिया सुरू केली. विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी ऑगस्टमध्ये तर तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबरमध्येच झाली तर, शासनाचा अद्यादेश २० नोव्हेंबरचा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शुल्क माफीचा विद्यार्थ्यांना लाभ कितपत मिळणार हा प्रश्न आहे. प्रक्रिया झालीही अन् विद्यार्थ्यांना दुष्काळग्रस्त गावातील रहिवासी असल्याचा पुरावा आणण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यांना पुन्हा प्रमाणपत्रासाठी सरकार दरबारी खेटे मारावे लागणार आहेत.

शुल्क माफीचा अद्यादेश परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आला आणि आता शुल्क परत करण्याच्या सूचनाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप काही सूचना नाहीत. मंडळाने निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणी होईल.

-आनंद पवार, उपसचिव, तंत्रशिक्षण मंडळ

प्रक्रियेबाबत आम्ही वरिष्ठांनाही विचारपूस करतो आहोत. आम्ही विद्यापीठांना कळविले आहे, पुढील प्रक्रियाही सुरू होईल त्याबाबत कळविले जाईल.

डॉ. सतीश देशपांडे, शिक्षण सहसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकार संघटनेतर्फे आज धरणे आंदोलन

$
0
0

औरंगाबाद : जिल्हा मराठी पत्रकार संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी (२६ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाकडून देण्यात आली आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, पत्रकार पेंन्शन सुरू करावे, छोट्या वृत्तपत्रांचे अस्तित्व संपवून टाकणारे जाहिरात धोरण मागे घ्यावे, ग्रामीण भागातील पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती द्यावी आदी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. पत्रकारांच्या हितासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी आंदोलनात २६ नोव्हेंबर सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर येथे सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव संजय वरकड, विभागीय सचिव प्रमोद माने, मुंबई प्रतिनिधी सुनीलचंद्र वाघमारे, कानिफ अन्नपूर्णे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार वर्षीय मुलीचे अपहरण

$
0
0

औरंगाबाद : ः

चार वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या चार तरुणांना केवळ दीड तासांत पाठलाग करून अटक करण्यात आली. यात लातूरच्या नातेवाईकासह चौघांचा समावेश आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता बुधवारपर्यंत (२८ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी रविवारी (२५ नोव्हेंबर) दिले.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वर महेबुब पठाण (२२), शुभम महेकले (२३, दोघे रा. शास्त्रीनगर, लातुर), कार चालक हसन नूरखान शेख (२२, रा. अंजलीनगर, लातूर) व संगमेश्वर रघुनाथ गाडे (२५, रा. रमजानपूर, लातुर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील अन्वर महेबूब पठाण पीडित मुलीचा आजोबा व तिच्या वडिलांचा मामे सासरा आहे. बायजीपुऱ्यातील पीडितेचे वडील सैय्यद झियाउद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ नोव्हेबरला सकाळी दहाच्या सुमारास मुलीचे आजोबा अन्वर पठाण घरी आले. त्याने चार वर्षीय मुलीला खुलताबाद ऊरसाला घेऊन जातो असे सांगत तिला घराबाहेरील कार (एम. एच. ०३, ए. आर. ६३७६) कडे नेले. त्याचवेळी वडिलांना मुलीच्या अपहरणाची फोनवरून धमकी देण्यात आली. धमकी देणारा संशयित शुभम महेकले कारजवळच असल्याचे मुलीच्या वडिलांना दिसले. त्यांना त्याचा व इतर तिघांचाही संशय आला, परंतु तोपर्यंत कारमधून तिच्या आजोबासह अन्य संशयितांनी तिला पळवून नेले.

सिनेस्टाईल अपहरणाचा प्रयत्न

कारमधून मुलीला पळविल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पाठोपाठ रेल्वेस्थानकापर्यंत कारचा पाठलाग केला. दरम्यान, नियंत्रण कक्षाला ही बाब कळविली. त्यानंतर सातारा पोलिसांनी संशयित कारचा पाठलाग करून एमआयटी महाविद्यालयजवळ अडविले. त्यानंतर मुलीची सुटका केली व संशयित चौघांना ताब्यात घेत अटक केली.

……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंबई हल्ल्यातील शहिदांना आज रांगोळीतून अभिवादन

$
0
0

औरंगाबाद: मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (२६/११) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. कलाशिक्षक राजेंद्र वाळके हे दरवर्षी रांगोळी कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहतात. यावर्षी क्रांतीचौकातील झांशीच्या राणी उद्यानात राष्ट्रध्वजाजवळ ही अभिवादन रांगोळी काढणार आहेत. येथे सकाळी नऊ वाजता श्रद्धांजली कार्यक्रम होणार असून जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारवृत्ती जोपासणे गरजेचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'दिवंगत नेते बाळासाहेब पवार यांचे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य होते. सद्यस्थितीत त्यांनी रुजवलेली सहकारवृत्ती जोपासणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल,' असे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्रात रविवारी बाळासाहेब पवार यांच्या १९व्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, डॉ. मदन सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार यांच्या कार्यावर शितोळे यांनी प्रकाश टाकला. 'सत्तेपेक्षा प्रदेशाच्या विकासाला बाळासाहेबांनी महत्त्व दिले. त्यांचे दिशादर्शक काम अजूनही प्रेरक आहे,' असे शितोळे म्हणाले.

'बाळासाहेबांनी राज्यभर योगदान दिले. वेगवेगळ्या सहकार संस्था स्थापन करून स्वत:च्या कुटुंबाकडे न ठेवता जनतेला सुपूर्द केल्या. समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी परिश्रम घेतले' असे डॉ. चव्हाण म्हणाले. अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी प्रास्ताविक केले. उमेश नवल यांनी सूत्रसंचालन केले आणि रवी दाभाडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेच्या पहिल्या दिवशी बुंदीचे लाडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळीच्या सुटीनंतर शहरातील शाळा आज सोमवारपासून गजबजणार असून पहिला दिवस गोड करण्यासाठी 'अन्नामृत फाउंडेशन'(इस्कॉन) तर्फे पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहारसोबत बुंदीचे लाडू मिळणार आहेत.

दिवाळीच्या २१ दिवसांच्या सुटीनंतर शाळा सुरू होत आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर द्वितीय सत्रासाठी शाळा सज्जही झाल्या आहेत. सुटीमध्ये धम्माल, मस्ती केल्यानंतर शाळेचा पहिला दिवशी अनेकदा विद्यार्थ्यांना नकोसा वाटतो. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड व्हावा या हेतुने 'इस्कॉन'ने हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड करण्यासाठी पोषण आहारासोबत गोड म्हणून बुंदीचे लाडू दिले जाणार आहेत. 'अन्नामृत फाउंडेशन'तर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व संलग्नित शाळा, बालवाडीतील बालक मिळून, असे पन्नास हजार विद्यार्थ्यांना लाडू दिले जाणार आहेत. गरवारे स्टेडियमजवळील 'अन्नामृत फाउंडेशन'मध्ये हे लाडू बनिवण्याचे काम सुरू आहे. बुंदी लाडू वितरण कार्यक्रमाचे उदघाटन सोमवारी सकाळी आठ वाजता शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल, वाहतूक नियंत्रणचे सहायक आयुक्त एस. भापकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सर्व ठिकाणी हे लाडू पोहचविले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवनेरी’वर काचा फुटण्याचे संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटी महामंडळाने आरामदायी प्रवासाकरिता 'शिवनेरी' हा ब्रँड विकसित केला आहे. मात्र, आता महामंडळाचेच 'शिवनेरी'कडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या चार महिन्यांत चार शिवनेरी बसच्या पुढील काचा फुटल्याचे समोर आले आहे. याचा फटका चालकांनाच बसल्याची माहिती एसटी विभागाच्या सुत्रांकडून दिली जात आहे.

औरंगाबाद-पुणे शिवनेरी बसची पुढील काच बुधवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी साडे दहा आळंदी फाट्याजवळ वाजता अचानक फुटली. चालकाने प्रसंगावधान राखत सुरक्षितरित्या वेळीच बस थांबविली मात्र, कैलास वाडेकर शिवनेरी बसचा चालक जखमी झाल्याचे समजते. या बसमध्ये २५ प्रवासी होते. याची माहिती मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापकांना कळवण्यात आली होती. या घटनेपूर्वी तीन बसच्या काचा याचपद्धतीने फुटल्या आहेत. यात सहा जुलै २०१८ रोजी औरंगाबाद-पुणे शिवनेरी बसची काच नगरजवळ फुटली होती. त्या घटनेतही अरविंद शिंदे जखमी झाले होते. त्यांना सहा टाके घालावे लागले. तसेच, १४ जुलै रोजी एका शिवनेरी बसची काच फुटून बसचालक अरूण मोडे हे जखमी झाले. २८ ऑक्टोबर रोजी शिवनेरी बसची काच पांढरी पुलाजवळ फुटून वाहनचालक कपूरचंद राठोड यांच्या छातीवर पडली होती. या घटनेनंतर राठोड यांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते.

\Bकाच कशामुळे फुटतात?

\B

औरंगाबाद-पुणे मार्गावरील शिवनेरी बसच्या काचा कशामुळे फुटतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारांमुळे काचांची तपासणी केली जात आहे. शिवनेरी बसला दर्जाहीन काचा बसविण्यात आल्याचा आरोप एसटी चालक करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वक्फ बोर्डाने दिलेल्या एनओसीची होणार चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

राज्यभरात वक्फ बोर्डाच्या मालकीच्या असलेल्या अनेक जागांवर मोठमोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. तसेच वक्फ बोर्डाच्या एनओसीच्या आधारे अनेक ठिकाणी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. त्यामुळे वक्फ बोर्डाकडून देण्यात आलेल्या एनओसीची (ना हरकत प्रमाणपत्र) चौकशी करण्यात येणार आहे.

औरंगाबादसह मुंबई, पुणे, रत्नागिरी, तसेच राज्यातील विविध ठिकाणी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जागा आहेत. यातील काही जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहेत. तर अनेक ठिकाणी जागा मालकाने जागा ताब्यात घेतल्या आहेत. या ताब्यात घेतलेल्या जमिनीवर इमारत बांधण्यासाठी तसेच खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी वक्फ बोर्डातून एनओसी घेण्यात आली आहे. मुंबईत वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जागेवर अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. मुंबईत वक्फ बोर्डाच्या जागेवर इमारत तयार करण्यासाठी अनेक व्यवसायिकांनी बाधकाम तयार करताना बोगस नोटीस जोडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी अशा बोगस एनओसीचे प्रकरण समोर येण्याची शक्यता बोर्डाच्या सदस्यांनी वर्तविली आहे. यामुळे या प्रकरणात चौकशी करण्याचाही निर्णय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

………

मुंबईतील इमारतींबाबतत चौकशी

मुंबई येथे १०० हून अधिक इमारतींना दिलेले वक्फ बोर्डाचे एनओसी बोगस असल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. हे प्रकरण बोर्डाच्या बैठकीत मीच उचलले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार चौकशी सुरू करण्यात येणार आहे.

खालेद कुरैशी, सदस्य, महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images