Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

केम्ब्रिज विद्यालयातून मोहिमेला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला मंगळवारी (२७ नोव्हेंबर) शहरातील केम्ब्रिज विद्यालयातून सुरुवात झाली. दिवसभरात ३९ शाळांमधून सुमारे सहा हजार बालकांना लस देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

दीड महिना चालणाऱ्या मोहिमेमध्ये नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांना लस देण्यात येणार आहे. शासकीय व खासगी शाळा, अंगणवाडी, शाळाबाह्य बालकांना ही लस विनामूल्य देण्यात येणार आहे. मोहिमेच्या उद्घाटन समारंभाला अटलांटा येथील रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अॅलन, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजीब सय्यद, केंब्रिज विद्यालयाच्या प्राचार्य फ्लेव्हिया अल्बुकर्क, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील ला‍ळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. दत्तात्रेय घोलप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत दाते, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुबिना शेख आदी उपस्थिती होते. मंगळवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत कोणत्याही बालकाला काहीही त्रास झालेला नाही, असे या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीएंच्या शुल्कावर करदात्यांचा सवाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'टीडीएस' भरण्याबाबत आम्ही तयार आहोत. मात्र, अनेकदा परिपूर्ण नाही म्हणत सीए, कर सल्लागार रग्गड शुल्क आकारतात, अशावेळी काय करावे, असा प्रश्न आयकर कार्यालयातील 'टीडीएस' विभागातर्फे आयोजित आयकर कपात कार्यशाळेत करदात्यांनी उपस्थित केला. तेव्हा अधिकारीही निरुत्तर झाले.

आयकर विभाग, टीडीएस रेंजतर्फे आयकर कपात संदर्भात मंगळवारी तापडिया नाट्यमंदिरात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाला आयकर आयुक्त टीडीएस आदर्श कुमार मोदी, अपर आयकर आयुक्त हेंमतकुमार लेऊवा, आयकर उपायुक्त अजयकुमार सिंह, आयकर अधिकारी टीडीएस एस. एस. हिरप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आहरण व वितरण अधिकारी यांनी पगारातून व इतर बिलातून आयकर कसा कापावा व त्यासंबंधीच्या ई-टीडीएस कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, टीडीएस पोर्टलवर काम कसे करावे आदींचे मार्गदर्शन केले. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित या कार्यशाळेत अडचणी मांडण्यात आल्या. त्यासह अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

\Bऑनलाइन भर देणार

\Bग्रामपंचायतस्तरावर किती रकमेपर्यंत टीडीएस भरावा, प्रक्रिया कशी करायची, कर भरला परंतु संबंधिताने कर जमा केला नाही अशा तक्रारी काहींनी मांडल्या. आयकर आयुक्त टीडीएस आदर्श कुमार मोदी यावेळी म्हणाले, 'देशात ५० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम ही टीडीएसमधून जमा होते. प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ करण्यासाठी ऑनलाइनवर भर देण्यात येणार आहे. कर कपातीला घाबरुन न जाता व्यवस्थितपणे कर भरणा करावा,' असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर शासनाला ५० हजार रुपये भरावे लागणार

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सहा डिसेंबर रोजी प्रकरण चालविले नाही, तर शासनाला खर्चापोटी पन्नास हजार रुपये जमा करावे लागतील, असा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. आर. जी. अवचट यांनी दिला आहे.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवरील तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी वारंवार पुढे ढकलण्याची विनंती शासनातर्फे करण्यात येत आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करुन तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली आहे. या दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेस तसेच या दुरुस्तीआधारे तज्ज्ञ संचालक म्हणून औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमणूक करण्यात आलेले हरीश पवार आणि सजनराव मते यांच्या नेमणुकीस संचालक संजय औताडे यांनी खंडपीठात आव्हान दिले आहे. सदर याचिका प्राथमिक सुनावणीस आली असता तज्ज्ञ संचालकांतर्फे प्रदीप देशमुख यांनी निवेदन केले होते की, पुढील तारखेपर्यंत पवार आणि मते हे तज्ज्ञ संचालक म्हणून काम करणार नाहीत. त्यानंतर ही याचिका इतर तीन याचिकांसोबत एकत्रित अंतिम सुनावणीस ठेवण्यात आली. मात्र, राज्य शासनातर्फे वोळोवेळी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली.

\Bनेमणूक दोन वर्षांपूर्वी

\Bसोमवारी सदर याचिका पुन्हा सुनावणीस निघाल्या असता शासनातर्फे शपथपत्र दाखल करण्यासाठी पुन्हा वेळ देण्याची विनंती करण्यात आली. त्यावर तज्ज्ञ संचालकांचे वकील प्रदीप देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, तज्ज्ञ संचालकांची नेमणूक होवून दोन वर्षे झाली आहेत. शासन हेतूपुरस्सर चाल ढकल करीत आहे. अंतीम सुनावणी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली असता खंडपीठाने अंतरिम आदेश दिला. अन्य याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे, सिद्धेश्वर ठोंबरे आणि पी. एस. पवार हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकचा धक्का लागल्याने खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी दोघा सख्या भावांना बेदम मारहाण केली. यात वायरमनचा खासगी व्यवसाय करणाऱ्या ३५ वर्षीय भावाचा मृत्यू झाला. सुनील बाबूराव मुंडलिक (वय ३५, रा़. पुंडलिकनगर) असे मृताचे नाव आहे.

पुंडलिकनगर गल्ली क्रमांक दोनमध्ये सुनील आणि संदीप मुंडलिक हे दोघे सख्ये भाऊ राहतात. सुनील वायरमनचे काम करतो. तर संदीप इलेक्ट्रीकल दुकानात काम करतो. रविवारी रात्री दोघे दुचाकीवरून घरी जात असताना गजानननगर जवळील स्वामी समर्थ मंदिराच्या कमानीजवळ त्यांच्या दुचाकीचा धक्का लागल्याने त्या ठिकाणी उभ्या असलेल्या शेख जाहेद शेख मकसूद उर्फ टीपू, मनोज जाधव व इतर दोघे अशा चौघांशी वाद झाला. चौघांनी दोन्ही भावांना बेदम मारहाण केली. परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. त्यानंतर सुनील व संदीप दोघेही तेथून घरी निघून गेले. …………सुनील रात्री घरी गेल्यावर झोपी गेला. सकाळी झोपेतून उटताना त्याला त्रास सुरू झाला़ डोक्याला धरून तो बसला. त्रास जास्त वाढल्याने नातेवाईकांनी सुनील यास उपचारासाठी 'एमजीएम' हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ यावेळी संदीपने आम्हाला मारहाण झाल्याचे सांगितले. दरम्यान, सुनीलचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक व पत्नीने दोन मुलांसह पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मारहाण करणाऱ्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करा आणि आरोपींना अटक करा, या मागणीसाठी ठाण्यात ठिय्या मांडला. पोलिस निरीक्षक शिनगारे यांनी तातडीने दोन टीम तयार करून एक टीम घाटी रूग्णालयात पाठविली, तर एक आरोपींच्या शोधासाठी पाठवली. आरोपींवर ३०२ खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bआरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी \B

सुनील व संदीप मुंडलीक यांना मारहाण करणारे शेख जाहेद शेख मकसूद उर्फ टीपू, मनोज जाधव व इतर दोघे यांच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे आरोपी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिनगारे यांनी दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघ आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंगप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात घुसून शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी शेख शकील शेख लाल याला एक वर्ष सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी मंगळवारी (२७ नोव्हेंबर) ठोठावली.

या प्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीच्या आईने (४५) फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी ही पान विक्रीचा व्यवसाय करते. १५ एप्रिल २०१५ रोजी दुपारी बाराला फिर्यादी घरी आली असता, घराचे गेट उघडे दिसले व दाराला बाहेरुन कडी दिसली. त्यामुळे फिर्यादी ही तिच्या मुलीला आवाज देत जिन्यावरुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी निघाली असता, तिची मुलगी जिन्यावरुन खाली ओरडत येताना दिसली. फिर्यादीने तिला ओरडण्याचे कारण विचारले असता, 'साफसफाई करताना घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपी शेख शकील शेख लाल (३५, रा. गारखेडा) हा घरात घुसला आणि माझा हात ओढू लागला. त्यामुळे मी त्याला झटका देऊन खाली आले' असे मुलीने फिर्यादीला सांगितले. 'आता तो कुठे' अशी फिर्यादीने विचारणा केली असता, आरोपी अजूनही वरच्या खोलीत असल्याचे मुलीने सांगितले. फिर्यादी व मुलीचा आरडाओरड ऐकून आसपासच्या लोकांनी फिर्यादीच्या घरात धाव घेऊन आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध भादंवि ४५२, ३५४ (अ), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) ७, ८, ११, १२ कलमान्वये जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक एम. बी. लाड यांनी प्रकरणाचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील शरद बांगर यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये पीडित मुलीचा जबाब महत्वाचा ठरला. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला ३५४ (अ)(i) कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, तर भादंवि ४५२ कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

\Bकार्यकर्त्याची साक्ष ठरली महत्वाची\B

दरम्यान, या घटनेवेळी महापालिकेच्या निवडणुका सुरू होत्या व प्रचारासाठी पीडित मुलीच्या घरासमोर कार्यकर्ते प्रचारासाठी जमले होते. मुलगी व तिची आई म्हणजेच फिर्यादीचा आरडाओरड ऐकून प्रचारासाठी आलेला कार्यकर्ता विक्रांत गडवे याने घरात धाव घेऊन घरात घुसलेल्या आरोपीला पकडण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार गडवे याची साक्ष प्रकरणात सगळ्यात महत्वाची ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थाचालकांसाठी पायघड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बृहत आराखड्यानुसार नवीन महाविद्यालयांच्या आलेल्या प्रस्तावापैकी २६ प्रस्ताव फेटाळण्यात आले होते, मात्र राजकीय दबाव वाढताच विद्यापीठाने पुन्हा संस्थाचालकांसाठी पायघड्या घातल्या. अहवालातील त्रुटी दूर करून नव्याने प्रस्ताव सादर करण्यासाठी संस्थाचालकांची मंगळवारी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे सोयीसुविधांचा ठावठिकाणा नसलेल्या संस्थांना प्रस्ताव सादरीकरणाची संधी देण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे बृहत आराखड्यानुसार ९१ महाविद्यालयांचे प्रस्ताव आले होते. तांत्रिक मुद्द्यांवर २६ महाविद्यालयांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले होते. अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात झाले होते. मंजूर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार होते, मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा संस्थाचालकांना त्रुटी दूर करण्याची संधी देण्यात आली. राजकीय दबावापुढे विद्यापीठ प्रशासन नमल्याची विद्यापीठ वर्तुळात सुरू होती. बृहत आराखडा सर्वेक्षणाद्वारे उद्योग, व्यापार, शेती, सामाजिक कार्य, सांस्कृतिक क्षेत्र, विद्यार्थी, पालक अशा विविध स्तरातून दहा हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात पारंपरिक महाविद्यालयांना मान्यता देऊ नये, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले होते. यानंतर विद्यापीठाने नवीन महाविद्यालायांसाठी प्रस्ताव मागवले होते. यानुसार औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातून ५३ प्रस्ताव आले होते. बीड जिल्ह्यातून आठ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच प्रस्ताव होते. जालना जिल्ह्यातून २५ प्रस्ताव आले. प्रस्तावित महाविद्यालयांची संलग्नता समितीने पाहणी केली होती. समितीच्या अहवालानुसार काही महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा नसल्याचे आढळले. पात्र नसलेल्या २६ महाविद्यालयांचे प्रस्ताव अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत फेटाळण्यात आले होते. चार जिल्ह्यातील ६५ महाविद्यालयांचे प्रस्ताव मंजूर करुन २८ नोव्हेंबरच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवले जाणार आहेत, मात्र त्यापूर्वी मंगळवारी महाविद्यालयांना त्रुटी दूर करण्याची संधी देण्यात आली. चार जिल्ह्यांतील मातब्बर संस्थाचालक कार्यवाहीसाठी विद्यापीठात आले होते. कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिव यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली.

दरम्यान, व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी (३० नोव्हेंबर) होणार आहे. या बैठकीतील मंजुरीनंतर महाविद्यालयांचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले जाणार आहेत. संस्था मंजुरीसाठी राजकीय प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

\B'नॅक'ची पूर्वतयारी वेगात

\B'नॅक' मूल्यांकनासाठी विद्यापीठात मंगळवारी विभागनिहाय कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले. 'नॅक' समितीसमोर सादरीकरण बंधनकारक असते. या प्रक्रियेची पूर्वतयारी करण्यासाठी प्रशासनाने सादरीकरण प्रक्रिया राबविली. विभागात पाणी टंचाई असून शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने कामकाज विस्कळीत आहे, अशी वस्तुस्थिती बहुतेक विभागप्रमुखांनी मांडली, मात्र समस्यांवर न बोलता कामगिरी मांडा, असा तगादा प्रशासनाने लावला. त्यामुळे 'नॅक' मूल्यांकन विद्यापीठ पातळीवर वादग्रस्त ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीमधून मोबाइल चोरी, एकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या जीममध्ये आलेल्यांच्या बॅगेतून ३५ हजार रुपये किंमतीचे पाच मोबाइल चोरीच्या आरोपावरून शेख राजू शेख आयुब (वय २८, रा. जुना बाजार) याला सोमवारी (२६ नोव्हेंबर) अटक करून मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्याला गुरुवारपर्यंत (२९ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला अल अमोदी यांनी दिले.

या प्रकरणी प्रदीप अंबादास राठोड यांनी फिर्याद दिली होती. ते २४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास जिममध्ये जाताना जिमनॅस्टिक हॉलमध्ये बॅग ठेवली होती. त्यांच्यासह योगेश रावसाहेब धारवळे, मंगेश भागवत पवार, अनिल सुधाकर ठोकळ यांच्या बॅगमधून पाच मोबाइल चोरीस गेले होते. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन शेख राजू शेख आयुब याला अटक करून चोरीचा एक मोबाइल जप्त करण्यात आला. त्याने इतर चार मोबाइल मालेगाव येथे विकल्याचे सांगितले. याबाबत तपास, साथीदारांची माहिती घेण्यासाठी सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी पोलिस कोठडीची विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तराखंडातील बिहारी घुबडाचे औरंगाबादेत वास्तव्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हिमालयाच्या पायथ्यापासून उत्तराखंडापर्यंत आढळणाऱ्या बिहारी घुबडाचे औरंगाबाद शहरात वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षी मित्रांनी या घुबडाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. बिहारी घुबड या भागात प्रथमच आढळले आहे.

पक्षीमित्रांनी पक्षी निरीक्षणासाठी रविवारी (२५ नोव्हेंबर) चिकलठाणा एमआयडीसीचा परिसर गाठला. पक्षीमित्रांमध्ये डॉ. किशोर पाठक, संतोष बी. पी., केतकी पाठक, सत्यजित जोशी यांचा समावेश होता. एमआयडीसी परिसरात एका लिंबाच्या झाडावर त्यांना बिहारी घुबड आढळला. यासंदर्भात डॉ. पाठक यांनी माहिती दिली. ते म्हणाले,'आपल्या भागात पिंगळे घुबड, चित्रित घुबड, गव्हाणी घुबड, हिवाळी घुबड, शिंगळा या घुबडाच्या प्रजाती दिसतात, परंतु बिहारी घुबड प्रथमच आढळले आहे. 'ब्राऊन हॉक आऊल' असे या घुबडाचे इंग्रजी नाव आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून उत्तराखंडात दाट झाडीच्या, उंच झाडीच्या प्रदेशात त्यांचे वास्तव्य असते. त्याचे डोळे मोठे आणि पिवळे असतात. हा पक्षी निशाचर असला तरी सकाळी व सायंकाळच्या वेळी तो सक्रिय असतो. तो दिवसा दाट झाडीमध्ये बसून असतो. मोठे किटक, उंदीर, बेडूक, सरडे, छोटे पक्षी हे त्याचे खाद्य आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खरिपाच्या उत्पादनात मोठी घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तूर व कापूस वगळता मूग, उडीद, सोयाबीनसह खरिपच्या अन्य पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले असून, जिल्हास्तरावर नोंद करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेते यंदा मका, ज्वारीसह अन्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचेही समोर येत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कृषी विभागाच्या औरंगाबाद सहसंचालक कार्यालय क्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांचा समावेश येतो. अपुरा पाऊस त्यात पडलेला खंड याचा मोठा परिणाम या तीन जिल्ह्यांतील खरीप पिकांवर झाला आहे. या लागवड क्षेत्रात हेक्टरी किती उत्पादन झाले, याची मोजणी करण्यासाठी पीक कापणी प्रयोग सुरू असून, प्रत्येक महसूल मंडळात १६ पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक तसेच पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीसमोर निर्धारित प्लॉटवर पीक मोजणी करण्यात आली. मूग, उडीद पिकांचे कापणी प्रयोग जुलै, ऑगस्टमध्ये पूर्ण झाले आहेत. औरंगाबाद विभागात २०१६-१७मध्ये मुगाचे उत्पादन हेक्टरी ९३५ किलो, २०१७-१८मध्ये २५६ किलो झाले होते. यंदा पाणी टंचाईचा मोठा फटका बसल्याने गेल्या दोन वर्षांच्या तुलनेते ५० ते ६० टक्क्यांहून अधिक घट आल्याचे सूत्रांनी सांगितले. उडीद पिकाचे २०१६-१७मध्ये हेक्टरी एक हजार २०० किलो, २०१७-१८मध्ये ४५३ किलो उत्पादन झाले होते. यंदा हेक्टरी ३०० किलोपेक्षा कमी उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सोयाबीन, बाजरी, खरीप ज्वारी, मका आदी पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले असून, जिल्हास्तरावर एकत्रित नोंद केली जात आहे. हा एकत्रित अहवाल कृषी आयुक्तालय व नंतर सरकारकडे सादर होईल. यासर्व पिकांच्या उत्पादनातही प्रचंड घट आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तूर व कापूस पिकांचे कापणी प्रयोगनूसार उत्पादकता मोजण्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल.

\Bपावसाचा खंड

\Bजिल्हा : पडलेला एकूण खंड

औरंगाबाद :१०९ दिवस

जालना : ११० दिवस

बीड : ११३ दिवस

\Bखरीप पिकांची उत्पादकता\B

पीक ....सरासरी....२०१६-१७....२०१७-१८

ज्वारी.....८९८.........१७२४.........९३९

बाजरी....६५३.........१४२८.........६७०

मका......१५२४......३२४५.........१६३६

तूर.........५८४.......१५९१..........७०८

मूग........३९०........९३५..........२५६

उडीद.....४३४.......१०२२.........४५३

सोयाबीन..८३५......१५५७.........७७७

कापूस.....२५४......४९५.........१२४

(उत्पादकता किलो प्रती हेक्टर/कापूस रुई किलो प्रती हेक्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाटू’च्या परीक्षा शुक्रवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे (बाटू) घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मात्र परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले. निश्चित वेळापत्रक अद्यापही नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

'बाटू' विद्यापीठाचे हे दुसरे शैक्षणिक वर्ष असून, मराठवाड्यातील बहुतांशी कॉलेज संलग्नित आहेत. द्वितीय वर्ष व प्रथम सत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षा 'सीसीटीव्ही'च्या निगराणीत होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने कॉलेजांना पत्र लिहीत 'सीसीटीव्ही' बसविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विभागातून सहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. यामध्ये प्रथमसत्राचे अडीच हजार, द्वितीय वर्षातील साडेतीन हजार विद्यार्थी आहेत. अभियांत्रिकीसह एमटेकच्या परीक्षाही होणार आहे. परीक्षा ६०+४० पॅर्टननुसार परीक्षा होत आहेत. उत्तरपत्रिकांची तपासणीही ऑनलाइन पद्धतीने केली जाते.

\Bप्रथमसत्र लांबले

\Bअभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे वर्ग सुरू होण्यास विलंब झाला, तर त्याचा परिणाम परीक्षेच्या नियोजनावरही होतो. यंदा १५ ऑगस्टला 'कट ऑफ डे' होता. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा या द्वितीय वर्षातील आहेत. प्रथम सत्राच्या परीक्षा या ११ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. विधी अभ्यासक्रमाप्रमाणे राज्यात अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या तुलनेत पुढे जाते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची परीक्षांसाठी होम सेंटर असणार आहेत.

\B'बामू'चे वेळापत्रक निश्चित नाही\B

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने वेळापत्रक निश्चित केले, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अद्याप आपल्या वेबसाइटवर निश्चित वेळापत्रक जाहीर केलेले नाही. तात्पुरतेच वेळापत्रक सुरुवातीपासून वेबसाइटवर आहे. त्यात तीन डिसेंबरपासून परीक्षा सुरू होतील, असे सांगण्यात आले, मात्र त्याची तयारी अद्याप दिसत नसल्याने कॉलेज प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. 'बाटू'चे द्वितीय वर्ष आहे. त्यामुळे तृतीय, चौथ्या वर्षातील सत्रांसह पूर्नपरीक्षार्थीं अद्याप 'बामू'कडेच आहेत. त्यामुळे त्यांची परीक्षा घेण्याची जबाबदारी 'बामू'कडे आहे. विद्यापीठाने वेळापत्रक निश्चित करून हॉलतिकीट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.

\Bवेळापत्रक\B

द्वितीय वर्ष परीक्षा…… : ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर

प्रथम सत्र परीक्षा……… : ११ डिसेंबर ते २० डिसेंबर

प्रथम सत्र प्रात्यक्षिक : तीन डिसेंबर ते आठ डिसेंबर

\Bविद्यार्थी संख्या\B

प्रथम सत्र : २४५०

द्वितीय वर्ष : ३५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता प्रक्रिया महिन्यात पूर्ण करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील नगर नाका ते केम्ब्रिज स्कूल रस्त्याच्या कामाकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्र शासनाकडे तत्काळ प्रस्ताव पाठवावा आणि केंद्र शासनाने महिन्यात या कामाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी बुधवारी दिले.

औरंगाबादमधील रस्त्यांची दुरवस्था आणि दुरुस्तीसंदर्भात खंडपीठातील वकील रूपेश जैस्वाल यांनी २०१२मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान शहरातील रस्त्यांच्या विविध कामांसंदर्भात खंडपीठाने प्रतिवादींना विचारणा केली. शहरातील रस्त्यांच्या कामाकरिता मंजूर झालेल्या रकमेपैकी शंभर कोटींच्या कामाचे कार्यादेशच अजून काढलेले नाहीत, असे जैस्वाल यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. यावर हा प्रस्ताव आता स्थायी समितीसमोर पाठविण्याची आवश्यकता नसून, तो थेट आयुक्तांकडे पाठवावा आणि त्या संदर्भात निर्णय घ्यावा. तसेच ही सर्व कामे थेट आयुक्तांच्या देखरेखीखालीच करण्यात यावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. या कामाकरिता मूळ मंजुरी दीडशे कोटी रुपयांची असताना यापैकी पन्नास कोटी रुपयांबाबत अजूनपर्यंत काहीही निर्णय झालेला नाही, असे जैस्वाल यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले असता, या संदर्भात शपथपत्र सादर करण्यासाठी आणि एकूणच सर्व कामासंदर्भात पालिका आयुक्तांनी गुरुवारी व्यक्तिशः हजर राहून स्पष्टीकरण करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. बुधवारी सुनावणीवेळी नगर नाका ते केम्ब्रिज स्कूल रस्त्याच्या कामासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शपथपत्र दाखल करून, हे काम करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर खंडपीठाने विचारणा केली असता, या कामासाठी निधीच मिळाला नसल्याचा खुलासा करण्यात आला. याबाबत केंद्र शासनाच्या वकिलांकडे खुलासा मागण्यात आला असता त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्राकडे प्रस्तावच सादर केला नसल्याची माहिती दिली. यावर खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निर्देश दिले, की त्यांनी या संदर्भातील प्रस्ताव तात्काळ केंद्र शासनाकडे द्यावा आणि केंद्राने महिन्यात प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश दिले. या प्रकरणात केंद्र शासनातर्फे भूषण कुलकर्णी, राज्य शासनातर्फे अमरजितसिंह गिरासे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे डी. जे. मनोरकर, महापालिकेतर्फे राजेंद्र देशमुख आणि रेल्वेतर्फे मनीष नावंदर यांनी काम पाहिले.

\Bरेल्वेकडे प्रस्ताव द्यावा

\Bशिवाजीनगर येथील प्रस्तावित रेल्वे क्रॉसिंगला भुयारी मार्ग तयार करण्याबाबत सुनावणीदरम्यान विचारणा केली असता, महापालिकेने या कामाचा प्रस्ताव रेल्वेकडे द्यायला हवा, परंतु अजून तसा तो देण्यातच आलेला नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणण्यात आले. यावर खंडपीठाने आदेश दिले, की महापालिकेने १० दिवसांत या संदर्भातील प्रस्ताव रेल्वेकडे द्यावा, पुढील पंधरा दिवसांत याची संयुक्त पाहणी करण्यात यावी या कामासाठीच खर्च रेल्वे आणि राज्य शासनाने करावा.

\B१५ दिवसांत उड्डाणपूल टेंडर

\Bगोलवाडी येथे उड्डाणपूल तयार करण्याकरिता राज्य शासनाने १९ कोटी रुपये रेल्वेला दिलेले आहेत. मात्र याकरिता अजून चार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. सुनावणीत रेल्वेतर्फे निवेदन करण्यात आले, की या उड्डाणपुलाच्या कामाचा आराखडा तयार झालेला असून, या कामासाठीचे ई टेंडर १५ दिवसांत काढण्यात येईल. याशिवाय वाढीव चार कोटी रुपयांची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. खंडपीठाने हे निवेदन हमीपत्र म्हणून स्वीकारले.

\Bतीन आठवड्यात खड्डे बुजवा

\Bशहरातील सर्व उड्डाणपूल आणि त्याशेजारील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याचे याचिकाकर्त्यांनी खंडपीठच्या निदर्शनास आणले असता, तीन आठवड्यात हे सर्व खड्डे बुजवावेत, अन्यथा संबंधित यंत्रणेवर कारवाई करू, असे खंडपीठाने स्पष्ट केले. रस्त्यांच्या कामाकरिता जो निधी मंजूर करण्यात येतो, त्यामध्ये रस्त्याच्या साइडपट्ट्या, झेब्रा क्रॉसिंग, सौदर्यीकरण याकरिता दहा टक्के निधीचा समावेश असतो, परंतु रस्ता तयार केल्यानंतर ही कामे केलीच जात नाहीत, असे याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले असता, महापालिका आयुक्तांनी या संदर्भात म्हणणे सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासकीय इमारतीत पाण्याचा ठणठणाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळ, पाणीटंचाईच्या झळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालाही बसत असून, विद्यापीठाच्या प्रशासकीय ‌इमारतीमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. इमरतीच्या स्वच्छतागृहातही पाणी नसल्यामुळे बुधवारी व्यवस्थापन परिषद बैठकीसाठी आलेल्या सदस्यांना पाणीटंचाईचा फटका बसला.

विद्यापीठातील विद्यार्थी वसतिगृहे, विभाग, अभ्यासिका, ग्रंथालयात मागील अनेक महिन्यांपासून सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलनेही केली आहेत.

विद्यापीठाच्या नॅक तयारीसाठी आयोजित सादरीकरणामध्ये विभागप्रमुखांनी पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याची तक्रार केली होती. यावर 'मी घरून पाणी आणतो. तुम्हीही आणा,' असा सल्ला दिला होता.

दरम्यान, बुधवारी प्रशासकीय इमारतीमध्ये विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली. या इमारतीमधील स्वच्छतागृहांसह पिण्याच्या पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी दुपारनंतर पाणी नसल्याचे दिसून आले. पाणी नसल्याची ओरड झाल्यानंतर उशिरा इमारतीमध्ये पाणी उपलब्ध करुन देण्यात आले. अनेकांना स्वच्छतागृहात गेल्यानंतर पाणी नसल्यामुळे परत यावे लागले. याचवेळी कुलसचिवांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या स्वच्छतागृहाबाहेर विद्यार्थिनींनी पाणी नसल्यामुळे संतप्त भावना व्यक्त केल्या. स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्यामुळे आता तेथेही पाणी घरूनच आणायचे का? असा प्रश्न उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरणाऱ्यास सहा महिने सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेस्थानकातील विश्रामगृहात झोपलेल्या प्रवाशाची बॅग चोरणारा आरोपी कचरू सोनाची आदमाने याला सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. हुसेन यांनी बुधवारी (२८ नोव्हेंबर) ठोठावली.

या प्रकरणी रामकृष्ण बाळासाहेब नालकर यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या पत्नीची औरंगाबाद येथे मुलाखत होती. त्यामुळे १२ सप्टेंबर २०१५ रोजी फिर्यादी पत्नीसह रात्री औरंगाबाद रेल्वेस्थानकावर आले होते. ते स्थानकावरील विश्रामगृहात झोपी गेले असता, चोरट्याने फिर्यादीच्या उशाखाली ठेवलेली बॅग चोरून नेली. बॅगमध्ये फिर्यादीच्या पत्नीची पर्स, मोबाइल, घड्याळ, सोन्याची अंगठी, पेनड्राइव्ह तसेच रोख एक हजार रुपये होते. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून औरंगाबाद रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्षपुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला भादंवि ३७९ कलमान्वये सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळीनिमित्त गावाकडे गेल्याची संधी साधत पुंडलिकनगरमधील घर फोडून रोख रक्कम व दागिन्यांसह ४१ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी आरोपी अक्षय विजय वायकोस व आरोपी कृष्णा नारायण उदावंत यांना मंगळवारी (२७ नोव्हेंबर) अटक करून बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपींना गुरुवारपर्यंत (२९ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

या प्रकरणी शेखर शेषराव धुमाळ (४१, रा. पुंडलिकनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, नऊ नोव्हेंबर २०१८ रोजी फिर्यादी दिवाळीनिमित्त गावाकडे गेला होता व १२ नोव्हेंबर रोजी घरी परतला असता, घराचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच सामान अस्ताव्यस्त दिसून आले. घराची पाहणी केली असता रोख रक्कम व दागिन्यांसह ४१ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन आरोपी अक्षय विजय वायकोस (२२, रा. गजानन नगर) व आरोपी कृष्णा नारायणराव उदावंत (२३, रा. गारखेडा) यांना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपींकडून २१ हजार ६०० रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असून, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच हत्यार जप्त करणे बाकी आहे.

\Bसाथीदारांचा तपास

\Bआरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का व त्यांचे कोणी साथीदार आहेत का आदींचाही तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींचा गंडाप्रकरणी आठव्या आरोपीला बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट कागदपत्रांआधारे बँकेत खाते उघडून बनावट खाते व चेकबुकद्वारे बँकांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा म्होरक्या व टोळीतील आठवा आरोपी अशोककुमार लहेरचंद भन्साळी याला मंगळवारी (२७ नोव्हेंबर) अटक करून बुधवारी कोर्टात हजर केले असता त्याला सात डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

या प्रकरणी यापूर्वी आरोपी हरीश गोविंद गुंजाळ (रा. मानगांव, ता. कुडाळ, सिंधुदुर्ग) मनीषकुमार जयराम मौर्य उर्फ राकेश उर्फ मनीष यादव उर्फ अमित रमेश सिंग (रा. उत्तर प्रदेश), मंदीपसिंग बनारसीदास सिंग (रा. गुरुदासपुर, पंजाब), रशिद इम्तीयाज खान (रा. नालासोपारा, पालघर), डब्ल्यू शेख अरमान शेख (रा. कमलसागर, पश्चिम बंगाल), इसार खान गुलामगौस खान (रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) व ओमप्रकाश उर्फ अजय अनिल उर्फ मोहन श्रीवास्तव या सातजणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये टीजेएसबी बँकेचे व्यवस्थापक संग्राम सदानंद शिंदे (रा. समर्थनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी हरीश गुंजाळ याने मेसर्स हरीश इंटरप्रायजेस नावाने बनावट खाते गारखेडा परिसरातील पारिजातनगर भागातील टीजेएसबी बँकेत उघडले होते. एक जून रोजी गुंजाळ याने बँकेत गोजित फायनान्शियल सर्व्हिसेस आणि युनियन बँक ऑफ इंडियाचे चेक वटविण्यासाठी जमा केले. त्या बदल्यात तीन लाख ९३ हजार २६४ रुपये काढून घेतले होते. त्यानंतर गुंजाळ याने पुन्हा चार लाख ८० हजारांचा चेक बँकेत वटविण्यासाठी टाकला होता. त्यावेळी बँकेचे व्यवस्थापकाला संशय आल्याने त्यांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीवर चाकूहल्ला; आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माझ्याकडे लक्ष देत नाही असे म्हणत पत्नीवर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी करणारा पती भीमराव गणपतराव वाहुळे याला मंगळवारी (२७ नोव्हेंबर) अटक करून त्याला बुधवारी कोर्टात हजर केले असता त्याला गुरुवारपर्यंत (२९ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले.

या प्रकरणी ताराबाई वाहुळे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पती-पत्नी असून, त्यांना एक मुलगा, मुलगी व सून आहे. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घरात सर्व कुटुंब असताना आरोपी भीमराव गणपतराव वाहु‍ळे (६१, रा. गारखेडा) हा बाहेरुन आला व त्याने ताराबाई यांना गच्चीवर जेवण आणून देण्यास सांगितले. ताराबाई जेवण घेऊन गेल्या असत्या आरोपीने 'माझ्याकडे लक्ष देत नाही' असे म्हणत शिविगाळ केली व खिशातील चाकूने ताराबाई यांच्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुरन जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करून कोर्टात हजर केले असता, त्याला कोर्टाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कराव, अन्यथा कुत्रे घरात सोडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारूदगर नाला येथे नुरे मुज्जसम खालेद पिंजारी या बालकाचा मोकाट कुत्र्यांनी बळी घेतल्यानंतर महापालिका अडचणीत आली आहे. मोकाट कुत्र्यांचा १५ दिवसांत बंदोबस्त करा, अन्यथा पालिका अधिकाऱ्यांच्या घरी कुत्रे आणून सोडू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख गौतम आमराव व कार्यकर्त्यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना दिला.

मनसैनिकांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण वसंतराव भालसिंग यांची बुधवारी भेट घेतली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका सतत अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी मृत बालकाच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, संकेत शेटे, विशाल आमराव, आनंद भिसे, अशोक म्हस्के पाटील, आशुतोष सांगोले, शिवा लिंगायत आदींची उपस्थिती होती.

…………

\Bपालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा…\B

मिल्लत बचाओ तहेरिक कमेटीतर्फे अध्यक्ष नदीम राणा, इसा यासीन, मोईनोद्दीन मोहसीन, इस्माईल खान, कलीम हाश्मी, शाहेद खान, आमेर खान, इमरान शेख यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात निष्काळीपणा केल्याने महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, मृत बालकाच्या नातेवाईकाला २५ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून कुलगुरूंच्या वक्तव्याचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नॅक सादरीकरण बैठकीदरम्यान प्राध्यापकांनी विद्यापीठाचा पाणीप्रश्न उपस्थित केला. यावर कुलगुरूंनी पाणी घरून आणण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने निषेध करून कुलगुरुंना निवेदन दिले आहे. विद्यापीठामध्ये पाणीप्रश्नावर अनेक आंदोलने झाली आहेत, पाण्यासाठी मुलींनी रात्री कुलगुरूंच्या घरासमोर आंदोलन केले होते, याचे गांभिर्य लक्षात घेणे अपेक्षित होते. पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठतील विहिरींचा योग्य वापर करावा लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अमोल दांडगे, मयूर सोनवणे, दीपक बहीर, मंगेश शेवाळे, दीक्षा पवार, रवी माने, परमेश्वर काष्टे, पांडुरंग नखाते, दादाराव कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट विकण्याच्या नावाने नौकरदाराला पाच लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराची विक्री करण्याच्या नावाखाली एका नौकरादाराला दोन जणांनी खोटी कागदपत्रे देऊन पाच लाख रूपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दोन जणांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष संभाजी मुंढे (रा. टाऊन सेंटर) यांना घर विकत घ्यायचे होते. त्यांनी याबाबत विचारपूस केली. प्रदीप शिवप्रसाद लोहिया व शिवप्रसाद लोहिया (रा. काळा गणपती मंदिर) यांनी सुभाष संभाजी मुंढे यांना प्लॉटची विक्री करण्याचे सांगितले. त्यांनी प्लॉटही दाखविले. यानंतर मुंढे यांचा विश्वास संपादन करून १२ लाखांत प्लॉटची विक्री करण्याचा व्यवहार करण्यात आला. १६ जुलै २०१८ रोजी शिवकृपा झेरॉक्स सेंटर येथे आतापर्यंत या व्यवहारापोटी पाच लाख रुपये इसार पोटी दिले. यानंतर रजिस्ट्री करून दिली नाही. सुभाष संभाजी मुंढे हे संबंधित लोहिया यांच्या घरी पैसे परत मागण्यासाठी गेले असता प्रदीप लोहिया याच्या वडिलांने मुंढे याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात लोहिया पिता पुत्राच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील शहरेही तहानलेली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी मराठवाड्यातील ग्रामीण भागाला नोव्हेंबरमध्येच टंचाईचा सामना करावा लागत असताना शहरी भागांलाही दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील चार महापालिका, ५० नगरपालिका आणि २५ नगरपंचायतींपैकी बहुतांश शहरे तहानलेली असून, यापैकी अनेक शहरांना दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने परिस्थिती बिकट आहे.

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी केवळ वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराला चार ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यातील पैठण, वैजापूर, खुलताबाद व सिल्लोड शहरात तीन ते चार दिवसानंतर पाणी मिळत आहे. लातूर, उदगीर, औसा, अहमदपूर, परभणी, आष्टी, पाटोदा, उस्मानाबाद शहरांना तीव्र पाणीटंचाईचे संकट आहे. या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये उपलब्‍ध असलेला पाणीसाठा जूनपर्यंतचे वापरण्याचे नियोजन करण्यात येत असल्यामुळे या शहरांना दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही नगरपालिकांनी टंचाईच्या कालावधीमध्ये टँकर, विहीर अधिग्रहण, विंधन विहिरी, प्रकल्पात चर खोदणे आदी प्रस्ताव दिले आहेत. यातील बहुतांश नगर पालिकांना; तसेच नगर पंचायतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, गेवराईसारख्या नगरपालिकेने पाणीपुवठा बंद झाल्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

टंचाईच्या सर्वाधिक झळा बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील शहरांना बसत आहे. बीड शहरात सध्या पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशीच अवस्था धारूर, अंबाजोगाई, केज आणि परळी शहरांची आहे. या शहरांना चार दिवसांआड, वडवणीत १२ दिवस, शिरूर आठ दिवस, तर आष्टी व पाटोदा शहरात दहा दिवसानंतर पाणी मिळत आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणारा मांजरा प्रकल्पा सध्या मृतसाठ्यामध्ये आहे. नागझरी बांधाऱ्यातही पाणी नाही. त्यामुळे शहराला आठ दिवसांआड पाणी मिळत आहे. उदगीर शहराला पाणीपुवठा करणाऱ्या भोपणी, बनशेकळी व देवर्जन तलावाने तळ गाठल्यामुळे शहराला आठवड्यानंतर पाणी मिळत आहे. रेणापूरमध्येही आठ दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा, उजनी प्रकल्पांत पाणी आहे, मात्र रुईभर व शेकारपूर तलावांतील पाणी तळाला गेले आहे. तुळजापूर, भूम, वाशी, परंडा, नळदूर्ग, कळंब, मुरूम, उमरगा लोहारा या शहरांना एक ते चार दिवसांनंतर पाणी मिळत आहे.

\Bमटा भूमिका

वॉटर ग्रीडला गती द्या\B

मराठवाड्यातील ७९ शहरांना रोज पिण्याचे पाणी मिळत नाही, हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. सरासरी साडेतीन दिवसांनंतर पिण्याचे पाणी या शहरांना मिळते. जायकवाडीत पाणीसाठा असूनही औरंगाबाद शहराला ९६ तासांनंतर पाणी मिळते. पाण्याची गळती हे सर्वात महत्त्वाचे कारण यासाठी सांगितले जाते. मुळात मराठवाडा हा प्रदेशच अतितुटीचा आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेड या पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांतही यंदा दुष्काळ आहे. आज मराठवाड्यात ४२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. यंदा २०१२पेक्षाही तीव्र दुष्काळ आहे. २०१२मध्ये टँकरची संख्या चार हजारांवर गेली होती. भविष्यात मराठवाड्याला २५९ अब्ज घनफूट पाणी लागणार आहे. त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना राबविण्यात येत आहे, परंतु या योजनेची फार वेगाने अंमलबजावणी होत नाही. जिल्हाजिल्ह्यांत पाण्याचा वाद सुरू झाला आहे. मांजरा प्रकल्पातील पाण्यावरून बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत वाद सुरू झाला आहे. भाजपच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांतही वाद झाला होता. त्यामुळे वॉटर ग्रीड योजनेला गती द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images