Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बांगलादेशात गुंतवणुकीला संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बांगलादेशात उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तेथील क्षमता पाहा आणि उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करा, असे आवाहन बांगलादेशाचे उच्चायुक्त सय्यद मुझ्झम अली यांनी उद्योजकांना केले आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहराबद्दल वाचून होतो, पण जागतिक दर्जाची उद्योगनगरी येथे आहे, हे औरंगाबादेत आल्यावरच कळले, असे उद्गार ही त्यांनी या‌वेळी काढले.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) आणि बांगला देशाचे उप उच्चायुक्तातर्फे शुक्रवारी हॉटेल राम इंटरनॅशनल येथे बांगलादेशातील उद्योगाच्या संधी या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी येथील उद्योजकांशी संवाद साधताना बांगलादेशचे उच्चायुक्त सय्यद मुझ्झम अली बोलत होते. 'सीएमआयए'चे अध्यक्ष राम भोगले, उपउच्चायुक्त रहेमान आदी उपस्थित होते. प्रारंभी उद्योजक भोगले यांनी उच्चायुक्तांना औरंगाबादच्या उद्योगाची डिरेक्टरी, मानचिन्ह देत त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी बोलताना उच्चायुक्त अली यांनी, बांगलादेश रेडिमेड कपडे विक्रीत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. हे केवळ भारतामुळे शक्य झाले. कारण आमच्या देशात कापूस तयार होत नाही. तो आम्ही भारतातून आयात करतो, असे नमूद केले.

भारत व बांगलादेशाची संस्कृती सारखी आहे, असे सांगतानाच त्यांनी,'आमच्या देशाकडून दहशतवादाला कधीच थारा दिल जात नाही. सुरक्षेला प्राधान्य दिले जाते,' असे नमूद केले. मी स्वातंत्र्य सैनिक आहे. त्यामुळे लिखित भाषण बाजूला ठेऊन मनापासून बोलतोय, अशी साद घालून त्यांनी,'बांगलादेशात उद्योगाच्या मोठ्या संधी आहेत, तेथील क्षमता पाहा,' असे आवाहन केले.

बांगलादेशात औषधनिर्माण उद्योग अत्यंत उच्च दर्जाचा आहे. भारत-बांगलादेश एकत्र येऊन औषधनिर्माण क्षेत्रात काम केले तर चीनला नक्कीच मागे टाकू शकतो, असेही ते म्हणाले. भोगले यांनी औरंगाबादेतील उद्योग क्षेत्राच्या विस्तारासंदर्भात माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी जमिनीवर ९८ हजार अतिक्रमणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना मराठवाडा विभागातील विविध सरकारी जमिनींवर गेल्या अनेक वर्षांपासून तब्बल ९८ हजार ५१३ घरांची अतिक्रमणे आहेत. राज्यातील अतिक्रमणांची संख्या चार लाख ७३ हजार २४७ असून, ही सर्व अतिक्रमणे ग्रामीण भागातील आहेत. मराठवाड्यातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत सर्व जिल्ह्यांचे अहवाल विभागीय प्रशासनाला प्राप्त झाले असून, ती नियमानुकूल करण्यासाठी ग्रामसभेमध्ये प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय मिळालेल्या अतिक्रमणांच्या संख्येनुसार नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेमध्ये ९८ हजार ५१३ अतिक्रमणांपैकी ९६ हजार ७०९ अतिक्रमणांची पडताळणी झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील १६७५ अतिक्रमणे नोंदीनुसार नामंजूर ठरवण्यात आली आहेत. ही घरे गायरान जमीन, वन विभाग, सिंचन, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग आदी सरकारी जमिनींवर उभारण्यात येऊन अतिक्रमण करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात कुटुंबाच्या झालेल्या विस्तारामुळे अनेक कुटुंबे विभक्त झाली आहेत. त्यामुळे गावात जमिनीची मागणी वाढली आहे. गायरान क्षेत्रातील जागा निवासी प्रयोजनाच्या वापरावर असलेल्या निर्बंधामुळे जागा उपलब्ध होत नाही, या बाबी विचारात घेऊन गावांतील दुर्बल घटकातील गरीब कुटुंब गावातील मिळेल त्या शासकीय जमिनीवर बऱ्याच कालावधीपासून अतिक्रमण करून राहत आहेत. अशा परिस्थितीत या गरीब कुटुंबांच्या अतिक्रमणाचा कालावधी व त्यांच्याकडे इतर जागा उपलब्‍ध आहे किंवा कसे या बाबी विचारात न घेता, सध्या अस्तित्वात असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. त्यासाठी सर्व जिल्ह्यांमधून अहवाल मागवण्यात आले आहेत. अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेसाठी व मालकीहक्कासाठी ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतींमधील नमुना आठ (कर आकारणी नोंदवही) स्कॅन करून प्रती ऑनलाइन प्रमाणित केल्या आहेत. ग्रामसेवकांनी तयार केलेल्या प्रपत्र 'अ' नुसार त्या-त्या ग्रामसभेमध्ये या अतिक्रमणांच्या वाचन करण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; काही ग्रामपंचायतींमध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामसभेमध्ये अतिक्रमणांवर आक्षेप मागवण्यात येऊन यावर उपविभागीय अधिकारी यांच्या प्रदत्त समिती आक्षेपावर सुनावणी घेतील. या सुनावण्यांच्या माध्यमातून अतिक्रमणे योग्य अथवा अयोग्य ठरवण्यात आल्यानंतर १५ दिवसांमध्ये अतिक्रमणांचा तपशील, अतिक्रमित जमिनीची मालकी असलेल्या विभागांना पाठवण्यात येणार आहे. यानंतर ३० दिवसांमध्ये संबंधित विभागाकडून उत्तर प्राप्त झाल्यानंतर अतिक्रमणांची यादी तयार करून शासनाकडे पाठवण्यात व यानंतर शासन अतिक्रमणांना मान्यता देणार, अशी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

\B...तर रेडीरेकनरनुसार दर आकरणी\B

लाभार्थींचे अतिक्रमण जर ५०० चौरस फूट जागेपेक्षा अधिक असेल, तर त्या भागातील रेडीरेकनर दरानुसार संबंधित अतिक्रमणधारकाकडून शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे लाभार्थींकडून अधिकचे दर आकारण्यात येणार आहे.

\Bजिल्हानिहाय अतिक्रमणांची स्थिती

\Bजिल्हा..................अतिक्रमण नोंदणी

औरंगाबाद................१५६०५

जालना....................१७२१९

परभणी....................५५५६

हिंगोली....................१२५६७

नांदेड......................५५२५

लातूर......................१८३५९

बीड........................१६१४४

उस्मानाबाद..............७५३८

एकूण.....................९८५१३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लंबरने पळवला ७५ हजारांचा ऐवज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नळ दुरुस्तीसाठी बोलावलेल्या प्लंबरने महिलेच्या घरातून ७५ हजारांचा ऐवज लंपास केला. चार ऑगस्ट रोजी सराफा भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराफा भागातील ४० वर्षे वयाच्या महिलेच्या घरी नळाची मोटार नादुरूस्त झाली होती. या दुरूस्तीसाठी महिलेने प्लंबर समीरखान उर्फ मोहसीनखान (रा. सराफा) याला बोलावले होते. यावेळी समीरखानने महिलेच्या घरातील कपाटातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागीने असा एकूण ७५ हजाराचा ऐवज लंपास केला. काही दिवसांनी हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. या प्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात समीरखान विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक फौजदार शिंदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पती नपुंसक म्हणून विवाहितेची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नपुंसक असल्याचे माहित असताना देखील त्याच्यासोबत विवाह लावून दिल्याप्रकरणी पीडित विवाहितेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी २७ वर्षांच्या विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. नोव्हेंबर २०११मध्ये या विवाहितेचा चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) येथील तरुणाशी विवाह झाला होता. या तरुणाच्या आई, वडील व इतर नातेवाईकांना विवाहितेचा पती नपुंसक असल्याची माहिती होती. मात्र, त्यांनी ही बाब लपवून ठेवत त्यांचा विवाह लावून दिला. लग्नानंतर हा प्रकार विवाहितेच्या लक्षात आला. या प्रकरणी विवाहितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह त्याच्या कुटुंबातील सात सदस्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जमादार शेख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दीक्षित स्मरणार्थ प्लास्टिक सर्जरी शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणा तसेच एमजीएम हॉस्पिटल व औरंगाबाद केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १३ ते १७ डिसेंबरदरम्यान ४३ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सन १९७६ मध्ये डॉ. शरदकुमार दीक्षित यांनी सुरू केलेला रुग्णसेवेचा हा महायज्ञ त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे शिष्य व अमेरिकेतील प्रख्यात सर्जन डॉ. राज लाला, डॉ. विजय मोराडिया यांनी सुरू ठेवला आहे. यंदाच्या शिबिरात डॉ. लाल, डॉ. मोराडिया यांच्यासह डॉ. ओम अग्रवाल हे रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार आहेत. शिबिरासाठी लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणातर्फे प्रकल्प प्रमुख म्हणून राजेश लहुरीकर यांची निवड झाली असून, क्लबचे अध्यक्ष सुरेश साकला, सचिव डॉ. मनोहर अग्रवाल, प्रकाश गोठी, राजेश भारूका सुरेश बापना, एम. के. अग्रवाल, प्रकाश राठी, डॉ. भागवत कराड, संजीव गुप्ता आदींनी शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही १३ डिसेंबरला लायन्स नेत्र रुग्णालय, एन १ येथे रुग्णांची तपासणी आणि निवड, तर १४ डिसेंबरपासून एमजीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया होतील, असेही कळविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रियेबद्दल उपसचिवांची नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा प्रक्रियेच्या कार्यपद्धतीबद्दल राज्य शासनाच्या उपसचिवांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यांनी याचसंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी देखील केली आहे.

शहरात कचराकोंडी निर्माण होऊन नऊ महिन्यांचा काळ लोटला, परंतु अद्याप महापालिकेला कोंडी फोडण्यात यश आले नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रयोगच केले जात आहेत. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ९१ कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले. 'डीपीआर' (सविस्तर प्रकल्प अहवाल) देखील तयार करून दिला. त्या आधारे महापालिकेने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. नऊ महिन्यांनंतर महापालिकेने चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर बेलिंग, श्रेडिंग आणि स्क्रिनिंग मशीनचा एक संच बसवला आहे. या मशीनचे काम देखील संथ गतीने सुरू आहे. रोज १६ टन कचऱ्यावर या मशीनच्या सहाय्याने प्रक्रिया होणे अपेक्षित असताना नऊ ते दहा टन कचऱ्यावरच प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर वळणावर येऊन थांबला आहे.

सुक्या कचऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. सुका कचरा घेऊन जाण्यासाठी महापालिकेने सकलेचा कंपनीशी बोलणी केली होती. काही महिने या कंपनीने सुका कचरा नेला, परंतु १५ ते २० दिवसांपासून कचरा नेणे त्या कंपनीने बंद केले. त्यामुळे शहराच्या विविध भागात सुमारे अडीच हजार टनांवर कचरा साचला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नवीन काही कंपनींशी चर्चा करण्याचे महापालिकेने ठरविले आहे.

त्यातच दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी महापालिकेला भेट दिली. त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पाला देखील भेट दिली. या ठिकाणी सुरू असलेले काम त्यांनी पाहिले आणि नाराजी व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मात्र उपसचिव सुधाकर बोबडे यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले, अशी माहिती दिली. सुक्या कचऱ्याचा प्रश्न कायम आहे, बेलिंग मशीनचे काम पूर्ण क्षमतेने होत नाही अशी कबुली त्यांनी दिली.

\B'...तर हस्तक्षेप करावा लागेल'\B

प्रक्रिया प्रकल्पाच्या पाहणी बरोबरच बोबडे यांनी शहरात देखील फेरफटका मारला. विविध ठिकाणी साचून ठेवलेल्या कचऱ्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाचा निधी मिळालेला असताना महापालिकेकडून काम का होत नाही, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. महापालिका काम योग्य प्रकारे करीत नसेल, तर शासनाच्या स्तरावरून हस्तक्षेप करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरखाली दबल्याने महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी फुलंब्री

निमखेडा (ता. फुलंब्री) येथील शिववस्तीवर पाण्याच्या टँकरखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला. दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी हा पहिला बळी ठरला आहे. सुनिता विजय हटकर (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवार (३० नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या महिलेस सहा वर्षे व दीड वर्षे वयाची मुले आहेत.

यासंदर्भात माहिती अशी की, दहा-पंधरा घरांच्या शिववस्तीवर पाण्यान भरलेला टँकर उभा करून चालक ट्रॅक्टर घेऊन गेला. यावेळी टँकरवर पाणी भरण्यासाठी महिला आल्या. टँकर चालकाने पाणी चालू करून दिले. महिला पाणी भरत असताना वाया जाणारे पाणी टँकरच्या चाकावर व चाकाखाली येत गेले. भुसभुशीत शेत जमीन असल्याने टँकर एका बाजुस झुकत गेले. टँकरचे चाक जमिनीत रुतले व ते उलटले. त्यात सुनिता हटकर ही महिला टँकरखाली सापडली. नंतर आरडाओरड केल्यावर नागरिक जमा झाले. महिलेला टँकरखालून काढण्यात आले. फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात महिलेला आणले असता. डॉक्टरांनी या महिलेस मृत घोषित केले. याबाबद वडोद बाजार पोलिसात नोंद करण्यात आली. अद्याप यावर कुठलीही माहिती पोलिसांकडे आलेली नाही. बिट अंमलदार एस. एस. दौड हे तपास करीत आहेत. महिलेचे कुटुंब हे मोलमजुरी करणारे आहेत. त्यांना याबाबत मदत करावी, अशी मागणी गांवकऱ्यांनी केली.

\Bहातपंप नादुरुस्त\B

निमखेडा शिवारातील शिववस्तीवर हातपंप आहे. त्यास चांगले पाणी आहे, मात्र हा हातपंप बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त आहे. यासाठी वस्तीवरील नागरिकांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये बऱ्याच चकरा मारल्या, मात्र हातपंप दुरुस्त झाला नाही. यामुळे या वस्तीस टँकरने पाणी दिले जाते. टँकरचा भरमसाठ खर्च प्रशासन करते, मात्र साधा हातंपप दुरुस्त करण्याचे त्यांना सुचले नाही. यावर पंचायत समिती सदस्यांनी देखील गांभिर्याने लक्ष देऊन हातपंप दुरुस्त करून घेतला नाही. अशा हलगर्जीपणामुळे महिलेचा बळी गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांत मिळेल रस्त्यांची वर्कऑर्डर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यांच्या कंत्राटदारांना येत्या दोन दिवसात वर्कऑर्डर (कार्यारंभ आदेश) दिली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केलेल्या निवेदनानुसार आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी कंत्राटदारांची बैठक घेतली. कंत्राटदारांना सायंकाळपर्यंत किंवा शनिवारी सुरक्षा अनामत भरण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

रस्त्यांच्या संदर्भात गुरुवारी खंडपीठात सुनावणी घेण्यात आली तेव्हा रस्त्यांच्या कामांच्या कंत्राटदारांची बैठक घेऊन त्यांना दोन दिवसात वर्कऑर्डर देण्याचे आयुक्तांनी सांगितले होते. त्यानुसार, त्यांनी शुक्रवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात कंत्राटदारांची बैठक घेतली. सुरक्षा अनामत सायंकाळपर्यंत भरा, सोमवारी वर्कऑर्डर दिली जाईल, असे त्यांनी कंत्राटदारांना सांगितले. कंत्राटदारांना 'डीएलपी'पोटी एकूण कामाच्या पाच टक्के, अनामत रक्कम तीन टक्के आणि बँक सुरक्षा अनामत दोन टक्के अशी एकूण दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

\Bएक वर्षाचा अवधी \B

कंत्राटदारांना वर्कऑर्डर दिल्यावर रस्त्यांचा ताबा कंत्राटदारांना दिला जाणार आहे. कंत्राटदार १५ ते २० दिवसांत रस्त्यांच्या कामाचा अभ्यास करेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांना १२ महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातारा-देवळाईचा ‘डीपीआर’ ‘एमजेपी’ तपासणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा-देवळाई परिसरात विकास कामे करण्यासाठी तयार करण्यात आलेला 'डीपीआर' महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) तपासणार आहे. 'एमजेपी'च्या तांत्रिक मान्यतेनंतर त्याला शासनाकडून मंजुरी मिळणार आहे.

सातारा-देवळाई भागात पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने यश इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स या संस्थेची 'पीएमसी' म्हणून नियुक्ती केली आहे. या संस्थेने ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने सर्वेक्षण करून 'डीपीआर' तयार केला. त्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. पाणी पुरवठ्याच्या कामासाठी ३५० कोटींचा, तर ड्रेनेज लाइनकरिता २५० कोटींचा 'डीपीआर' तयार करण्यात आला आहे. तो तांत्रिक तपासणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला जाणार आहे. प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर शासनाच्या स्तरावर त्याला मंजुरी मिळेल. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सातारा देवळाईत सध्या भाजप व शिवसेनेत स्पर्धा लागली आहे. यातून 'डीपीआर' तयार केला असून विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या सुमारास शासनाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

\Bभाजप-सेनेत स्पर्धा \B

सातारा-देवळाई भागात विकास कामे झाली पाहिजेत यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या स्पर्धा लागली आहे. या भागातून शिवसेनेचे संजय शिरसाट हे आमदार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा कायम राखण्यासाठी शिवसेना विविध विकास कामांसाठी प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्यांनी कंबर कसली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी कामगारांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, यासह अन्य मागण्यांसाठी 'सीटू' संघटनेने शुक्रवारी पैठणगेट येथे निदर्शने केले. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी देशातील २०८ शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे मोर्चा काढला आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली.

देशातील लाखो शेतकरी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र व राज्य सरकार हे प्रश्न सोडवत नसल्याने आंदोलनाचे हत्यार हाती घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, असे म्हणत आंदोलकांनी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करा, स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारसी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्या, कृषी पंपाचे संपूर्ण वीजबिल माफ करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, चारा छावण्या सुरू करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेली दीपक अहिरे, बसवराज पटणे, शंकर ननुरे, मंगल ठोंबरे, सतीश कुलकर्णी, विश्वनाथ शेळके, उद्धव भवलकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्क रुट्स हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना रोडवरील पाटीदार भवन येथे सिल्क रुट्स हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी पाटील डोणगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात १४ राज्यांतून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ८० कारागीर शहरात दाखल झालेले आहेत.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण, अतिरिक्त अप्पर उपायुक्त सरोजनी कदम, सिंडिकेट बँकेच्या शाखा व्यवस्थापिका शबनम शेख, डॉ. उज्ज्वला दहिफळे, सिल्क रुटचे संचालक साजीद अली, आयोजक अब्दुल हकीम, हर्षिता अ‍ॅडव्हटायझर्सचे संचालक मनोज पाटणी व लक्ष्मी इंटरप्रायजेसचे संचालक संतोष लेणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजकुमार झा, सैफुल इस्लाम, मोहम्मद शफी, अब्दुल रऊफ शहा हे स्टॉलधारक उपस्थित होते.

कलाकारांनी तयार केलेल्या सिल्क आणि कॉटनच्या विविध वस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. विविध राज्यांतून नावाजलेल्या कारागिरांनी तयार केलेले या प्रदर्शनामध्ये प्युअर सिल्क आणि कॉटन हँडलूम राजस्थानची जयपुरी कॉटन बेडशीट, कोटा साडी व टॉप, उत्तर प्रदेशातील खादी सिल्क, बनारसी साडी, जमदाणी, लखनऊवी ड्रेस, मध्य प्रदेशातील चंदेरी, महेश्वरी, जम्मू-काश्मीरमधील पश्मिना शाल, वर्क साडी, वर्क पडदे, एम्ब्रॉडयरी, कर्नाटकमधील प्रिन्टेड आणि बँगलोर सिल्क साडी, तमिळनाडूमधील कोइंम्बतूर कॉटन, कांजीवरम साडी, पश्चिम बंगालमधील बालुचारी काथा, टंगील, जामदानी, बिहारमधील भागलपुरी टसर, कोसा, पंजाबमधील फुलकारी वर्क आदी वस्त्र विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी साडेदहा ते रात्री नऊ या दरम्यान ३० नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरपर्यंत ग्राहकांसाठी सुरू असणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन सिल्क रूटचे संचालक साजीद अली व आयोजक अब्दुल हकीम यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबर मारहाण केली; तिघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहिणीला मारहाण होत असल्याचे पाहून भांडण सोडविण्यास गेलेल्या भावाला जबर मारहाण केल्याप्रकरणी सुरेश उर्फ सूरज शिवाजी मगरे, किरण शिवाजी मगरे व शिवाजी यादव मगरे यांना गुरुवारी (२९ नोव्हेंबर) अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, तिघांना शनिवारपर्यंत (१ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांनी दिले.

या प्रकरणी गजानन वसंत डुकळे (२८, रा. मुकुंदनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची बहीण ही पती व मुलीसोबत राहते. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादीच्या बहिणीची मुलगी फिर्यादीकडे पळत आली. तिने आईला तीन-चारजण मारहाण करत असल्याचे सांगितले. फिर्यादीने बहिणीच्या घरी धाव घेतली असता तिथे आरोपी सुरशे मगरे याच्यासह चारजण बहिणीला मारहाण करत होते. फिर्यादीने आरोपींना समजाविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. यात फिर्यादीची बरगडी फ्रॅक्चर झाली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सुरेश उर्फ सूरज शिवाजी मगरे (२५), किरण शिवाजी मगरे (२१) व शिवाजी यादव मगरे (५५, सर्व रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) या आरोपींना गुरुवारी अटक करुन शुक्रवारी कोर्टात हजर केले.

\Bदांडा जप्त करणे बाकी

\Bआरोपींच्या साथीदारांना अटक करणे व गुन्ह्यात वापरलेला लाकडी दांडा जप्त करणे बाकी आहे. तसेच गुन्हा करण्यामागे आरोपींचा हेतू काय होता, याबाबत तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सराकरी वकील एस. सी. दास-जोशी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर जलवाहिनीचा सोक्षमोक्ष लावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनी प्रकल्पाचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावा, असे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाला दिले. जलवाहिनीचे काम करण्यात औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून टाळाटाळ केली जात असेल, तर दुसरा पर्याय निवडा व त्याचा प्रस्ताव केंद्र व राज्य शासनाला सादर करा, असे त्यांनी सांगितले.

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, सभापती रेणुकादास वैद्य, सभागृहनेते विकास जैन यांच्यासह शिवसेनेचे काही नगरसेवक, पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक व अन्य अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती महापौरांनी दिली. ते म्हणाले, बैठकीत प्रामुख्याने समांतर जलवाहिनी प्रकल्पावर चर्चा झाली. नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, अशी भावना खासदार खैरे यांनी व्यक्त केली. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत असेल, तर दुसरा पर्याय शोधा. त्याचा प्रस्ताव शासनाला सादर करा. कोणत्याही परिस्थितीत येत्या आठ ते दहा दिवसांत समांतर जलवाहिनी प्रकल्पाचा सोक्षमोक्ष लावा, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले. कंपनीच्या भागीदार बदलाच्या मागणीबद्दल विधी विभागाचे मार्गदर्शन घेण्याची सूचना त्यांनी आयुक्तांना केली.

\B'भूमिगत'चे काम जानेवारीअखेर पूर्ण

\B

भूमिगत गटार योजनेचे उर्वरित काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे कंत्राटदाराने या बैठकीत मान्य केले. अंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम वगळता अन्य प्रलंबित कामे कंत्राटदाराकडून केली जाणार आहेत. लवकरात लवकर कामे पूर्ण करा व नागरिकांना दिलासा द्या, असे खैरे यांनी आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या आमिषाने विधवेवर अत्याचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे तसेच फ्लॅट घेण्याचे आमिष दाखवून विधवेकडून साडेपाच लाख रुपये घेत व धमक्या देत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी अशोककुमार राममणी द्विवेदी याला गुरुवारी (२९ नोव्हेंबर) अटक करुन शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला रविवारपर्यंत (२ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले.

या प्रकरणी ३८ वर्षीय पीडित विधवा महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या पतीचे निधन झाले असून ती मुलासह एकटीच राहते. मार्च २०१७मध्ये फिर्यादीच्या मैत्रिणींनी आरोपी अशोककुमार राममणी द्विवेदी (४९, रा. अक्षदानगर, शेंद्रा कमंगर, ता. जि. औरंगाबाद) याची मामा म्हणून ओळख करुन दिली होती. त्यानंतर आरोपीचे फिर्यादीच्या घरी नेहमी येणे-जाणे सुरू होते. ओळख वाढून आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. आपण फ्लॅट घेऊन लग्न करू, असे सांगत आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीकडे फ्लॅटसाठी पैसे मागितले. त्यानुसार ३० मे २०१७ रोजी फिर्यादीने आरोपीला साडेचार लाख रुपये रोख दिले, तर एक लाख रुपये आरोपीच्या खात्यावर टाकले. आठ जून २०१७ रोजी सायंकाळी फिर्यादी एकटीच घरी असताना आरोपी तिच्या घरी आला. संधी साधत त्याने फिर्यादीवर अत्याचार केला. या घटनेच्या महिनाभरानंतर फिर्यादीने लग्नाचा व फ्लॅटचा विषय काढला असता आरोपीने 'तू मला शारीरिक संबंध ठेवू दिले नाही तर मी तुझे पैसे परत देणार नाही आणि तुझ्याशी लग्न करणार नाही. तसेच समाजात तुझी बदनामी करेल' अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने ऑक्टोबर २०१८ पर्यंत फिर्यादीवर अत्याचार केले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनंतर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला गुरुवारी (२९ नोव्हेंबर) रात्री अटक केली.

\Bबॅँक व्यवहाराची तपासणी

\Bआरोपीला शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीने पीडितेवर कुठे-कुठे अत्याचार केले, याचा तपास करणे बाकी आहे. तसेच आरोपीने फिर्यादीकडून घेतलेले पैसे जप्त करावयाचे आहेत. आरोपी व फिर्यादीच्या बँकेच्या व्यवहारांची तपासणी करावयाची आहे. आरोपीचे कोणी साथीदार आहेत का, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील जरीना दुर्राणी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाला रिक्षाचालकाने लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रवासी म्हणून बसवून घेत तरुणाला धाक दाखवत रिक्षाचालकाने साथीदाराच्या मदतीने नऊ हजारांचा ऐवज लुबाडला. या प्रवाशाला एटीएम सेंटरमध्ये नेऊन पैसे काढण्याचा देखील आरोपींनी प्रयत्न केला. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वास रावसाहेब गाडेकर (वय २० रा. बकवालनगर, वाळूज) याने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गाडेकर हा बुधवारी कामानिमित्त शहरात आला होता. वाळूजला जाण्यासाठी तो महावीर चौकात रात्री दहा वाजता रिक्षात (एमएच २० ईएफ ७६९४) बसला. या रिक्षामध्ये चालकासह आणखी एक तरुण बसलेला होता. या दोघांनी रिक्षा रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाकडे नेली. या ठिकाणी गाडेकरला धाक दाखवत आरोपींनी त्याचे दीड हजार रुपये असलेले पाकीट आणि मोबाइल हिसकावून घेतला. या पाकिटात एटीएम कार्ड देखील होते. यानंतर आरोपींनी गाडेकरला रिक्षामध्ये बसवत सुरुवातीला एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये व नंतर महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये नेले. त्याला एटीएम मधून पैसे काढण्यास सांगीतले. मात्र, पैसे निघत नसल्याने आरोपींनी पलायन केले. या प्रकरणी गाडेकरच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय बनकर याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरांनी सुरू केलेले रस्तेकाम उपमहापौरांनी थांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

म्हसोबानगर येथील रस्त्याचे काम महापौर नंदुकमार घोडले यांनी सुरू केले आणि ते काम उपमहापौर विजय औताडे यांनी थांबवले. महापौर व उपमहापौरांच्या एकमेकांवरील कुरघोडीच्या राजकारणामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.

हर्सूल परिसरातील म्हसोबानगरमध्ये विकास आराखड्यातील ५० फूट रुंदीचा रस्ता आहे. काही वर्षांपासून या रस्त्यांचे काम होत नव्हते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. याबद्दल नागरिकांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे धाव घेतली. नागरिकांची गरज लक्षात घेऊन महापौरांनी स्वत: त्या रस्त्याचे काम सुरू केले. महापौरांनी सुरू केलेले रस्त्याचे काम उपमहापौर विजय औताडे यांनी काही दिवसातच थांबवले. वारंवार पाठपुरावा करून देखील रस्त्याचे काम होत नाही, हे लक्षात आल्यानंतर शुक्रवारी नागरिकांनी महापालिकेत येऊन महापौरांची भेट घेतली. त्यानंतर उपमहापौरांनी ते काम थांबवल्याचा उलगडा सर्वांना झाला.

\Bजमीन मालकाने थांबवले काम: औताडे \B

या संदर्भात विजय औताडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपण त्या रस्त्याचे काम थांबवले नाही. जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे जमीन मालकाने रस्त्याचे काम थांबवले आहे. महापौरांनी त्या रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाचे उद्‌घाटन केले होते. आपण या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी दीड कोटी रुपये ठेवले आहेत. रस्त्याच्या कामासाठी सकारात्मक आहोत, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने अडवली खैरेंची वाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी खासदार चंद्रकांत खैरे यांची वाट अडवली. त्यामुळे आयुक्तांसोबतच्या बैठकीला खासदार खैरे तब्बल अडीच तास उशारा पोहोचले. समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, स्मार्ट सिटी मिशन हे तीन विषय बैठकीसाठी ठरविण्यात आले होते.

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खैरे यांच्या उपस्थितीतील बैठकीआधी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांबरोबर आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीची नियोजित वेळ साडे तीनची होती. त्यामुळे ही बैठक चार वाजेपर्यंत, असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात साडेपाच वाजेपर्यंत भाजप नगरसेवकांबरोबरची बैठक चालली. ही बैठक लवकर संपावी याकरिता महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेता विकास जैन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात पाच वाजेच्या सुमारास आले. भाजप नगरसेवकांबरोबर सुरू असलेल्या बैठकीच्या कक्षात ते पोचले. हे तीन पदाधिकारी येताच भाजप नगरसेवक अस्वस्थ झाले. आयुक्तांसोबतच्या चर्चेची त्यांची लाइनच बिघडली. 'चला लवकर बैठक संपवा,' असे ते म्हणत होते, तर दुसरीकडून खासदार खैरेंचा निरोप देखील येत होता. भाजप नगरसेवक गेल्याशिवाय बैठकीला येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. शेवटी साडेपाचच्या सुमारास भाजप नगरसेवकांसोबतची बैठक संपवण्यात आली. भाजप नगरसेवक साडेपाच वाजता निघून गेले, त्यानंतर साडेसहा वाजेच्या सुमारास खैरे यांचे आगमन झाले आणि त्यानंतर बैठक सुरू झाली.

\Bशिवसेना-भाजप नगरसेवकांत आयुक्तांची कोंडी \B

ही बैठक संपवण्याची घाई केली जात असल्याने काही भाजप नगरसेवक संतापले. 'आम्ही पण नगरसेवक आहोत, आम्हाला वेळ का देत नाही,' असा जाब त्यांनी आयुक्तांना विचारल्याचे सूत्रांनी सांगितले. तेवढ्यात शिवसेनेचे काही नगरसेवक बैठकस्थळी दाखल झाले. त्यांनीही आयुक्तांना घेरले. आमच्या वॉर्डातील कामे झाली नाहीत, तर आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी आयुक्तांना दिल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोई-सुविधा न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना वेळेवर सोई-सुविधा न देणाऱ्या अधिकाऱ्यांची दहा दिवसांत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत सांगितले. त्याचबरोबर वसतिगृहाच्या देखरेखीसाठी दोन आमदारांसह विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली समितीही स्थापन करण्यात येणार आहे. ती समिती देखरेख ठेवेल. शहरातील समाजकल्याणच्या वसतिगृहातील गैरसोईबद्दल आमदार सतीश चव्हाण, अतुल सावे यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांची बकाल अवस्था झाली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतात. तरी देखील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. 'महाराष्ट्र टाइम्स'ने विद्यार्थ्यांची गैरसोय वेळोवळी मांडली. वसतिगृहाचा प्रश्न गुरुवारी विधीमंडळातही गाजला. वसतिगृहांची आठ-आठ दिवस साफसफाई केल्या जात नाही. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह व आंघोळीसाठी पायऱ्या चढून सहाव्या मजल्यावर पाणी न्यावे लागते. लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही. कॅमेरे बसवले, पण ते बंद आहेत. भोजनाबाबत नेहमी तक्रारी होतात, परंतु अधिकारी दुर्लक्ष करतात, असा प्रश्न आमदार चव्हाण, सावे यांनी मांडला.

\Bसमितीची स्थापना\B

प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री कांबळे म्हणाले की, समाजकल्याणच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना सोई-सुविधा देण्यात येत नसतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे. आवश्यक सोई-सुविधा मिळाव्यात, वसतिगृहांची व्यवस्थित देखरेख करण्यासाठी आमदार चव्हाण, सावे यांची समिती नेमण्याची घोषणा केली. या समितीत वसतिगृहात राहणारा एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी प्रतिनिधी यांची समिती नेमण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

€क्लासमधून पैसे काढून नेले; पाचजणांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धमक्या देत शहरातील कोचिंग क्लासच्या ड्रॉव्हरमधून ३५ हजार रुपये जबरदस्ती काढून नेल्याप्रकरणी मोहम्मद वाजेद मोहम्मद इस्माइल, शेख अय्याद शेख रियाज, शेख गफ्फार शेख भिकन, शेख इनायत शेख याकुब व शेख रईस अब्दुल रहेमान पटेल या आरोपींना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १३ हजार रुपये असा ६५ हजारांचा दंड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गिरधारी यांनी ठोठावला.

या प्रकरणी बिलाल मौलाखान (३४, रा. पैठणगेट) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा 'युएसबी कोचिंग क्लास'मध्ये विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी विषयाची चाचणी घेत होता. त्यावेळी सय्यद वाजेद सय्यद याकुब हा मोहम्मद वाजेद मोहम्मद इस्माईल (२४), शेख अय्याद शेख रियाज (२२), शेख गफ्फार शेख भिकन (२८), शेख इनायत शेख याकुब (२९) व शेख रईस अब्दुल रहेमान पटेल (२१, सर्व रा. रोजाबाग) या आरोपींसह क्लासमध्ये आला. 'विद्यार्थी रोडवर उभे असतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही का, त्यांची व्यवस्था करा, नाहीतर क्लास कसे चालवता ते बघतो' असे म्हणत आणि शिविगाळ करीत आरोपींनी फिर्यादीला धमकावले. त्याचवेळी ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले फीचे ३५ हजार रुपये बळजबरी काढून नेले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भादंवि ३९५, ५०४, ४५२, ५०६ कलमान्वये सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवत शिक्षा सुनावली.

\Bदंड न भरल्यास दोन महिने कारावास

\Bदोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने सर्व पाच आरोपींना भादंवि ३९५ कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावास, भादंवि ४५२ कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावास, भादंवि ३३३ कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास, भादंवि ५०४ कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावास, तर भादंवि ५०६ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५ लाखांचा गंडा, जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मंत्रालयासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मैत्री असल्याचे भासवत रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तीन सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्येकी १५ लाख रुपये असा ४५ लाख रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणातील आरोपी अवचित पांडुरंग निर्मळ व नितीन कृष्णा वाडकर या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. टी. घाडगे यांनी शुक्रवारी (३० नोव्हेंबर) फेटाळला.

या प्रकरणी रितेश गोविंदराव राठोड (३०, रा. गणेश कॉलनी, कन्नड) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्याचे दोन मित्र नोकरीच्या शोधात होते. त्यांना रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावण्याचे आमिष दाखवत आरोपी अवचित पांडुरंग निर्मळ (५३, रा. मुंबई) व आरोपी नितीन कृष्णा वाडकर (५३, रा. मुंबई) यांनी तिघांना मुंबईपासून भुवनेश्वरपर्यंत अनेक ठिकाणी बोलावून घेतले व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत अनेकांच्या भेटीही करून दिल्या. तसेच त्यांची वैद्यकीय चाचणी करून घेत त्यांच्याकडून वेगवेगळे अर्जदेखील भरून घेतले आणि टप्प्याटप्प्याने प्रत्येकाकडून १५ लाख रुपये घेतले. तिघांना बनावट ऑर्डरदेखील दिली. दरम्यान, तिघांना प्रशिक्षण केंद्राची ऑर्डर देऊनही त्यांना प्रशिक्षणासाठी बसू न देता गावी पाठवण्यात आले. त्याच सुमारास फिर्यादीसह तिघांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून व्यवहारामध्ये मध्यस्थी करणारा भूषण देशमुख याला रेल्वे भरती घोटाळ्यात अटक करण्यात आली आणि आपलीही फसवणूक झाल्याची फिर्यादीची खात्री पटली. त्यानंतर फिर्यादीने तक्रार दिल्यावरुन कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bमोठे रॅकेट कार्यरत

\Bफसवणूक प्रकरणात दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, हे एक मोठे रॅकेट असून, या प्रकरणात आणखी आरोपी उघड होऊ शकतात. प्रकरणाच्या तपासासाठी आरोपींच्या अटकेची गरज असून, त्यांना जामीन मंजूर केल्यास तपासामध्ये अडथळे येऊ शकतात. त्याचवेळी आरोपींकडून रक्कम जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images