Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विकास कामांसाठी भाजप नगरसेवकांचे आयुक्तांना साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रलंबित फाइल, वॉर्डातील विकास कामे यासाठी भाजप नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना साकडे घातले. लेखा विभागातर्फे देण्यात आलेल्या १८ कोटींच्या बिलांबद्दल देखील रोष व्यक्त करण्यात आला.

आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात शुक्रवारी झालेल्या बैठकीला भाजपचे उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड यांच्यासह २२ नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीतील चर्चा व निर्णयाची माहिती औताडे आणि राठोड यांनी दिली. विकास कामांच्या प्रलंबित फाइल, वॉर्डातील अपूर्ण कामे, ड्रेनेज, पाणी पुरवठा, विद्युत विभागाची रखडलेली कामे, देखभाल दुरुस्तीची कामे याबद्दल चर्चा करण्यात आली. अनेक कामांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत, पण एजन्सी ठरविण्याचे काम रखडल्याने कामे सुरू नाहीत हे आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. एजन्सी ठरविण्याचे काम लवकरच केले जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिल्याचे सांगण्यात आले. छोट्या मोठ्या कंत्राटदारांना पेमेंट केले नसल्याने कामे ठप्प आहेत, कोणताही कंत्राटदार काम करायला तयार नसल्याचेही आयुक्तांच्या लक्षात आणून देण्यात आले.

\Bकोणत्या कंत्राटदारांना १८ कोटींचे पेमेंट \B

लेखा विभागातर्फे देण्यात आलेल्या १८ कोटींच्या पेमेंटचा विषय देखील या बैठकीत भाजप नगरसेवकांनी उपस्थित केला. यापैकी किती पेमेंट भाजप नगरसेवकांच्या वॉर्डातील कामांसाठी करण्यात आले, असा सवाल प्रमोद राठोड यांनी केला. त्यावेळी सर्वच नगरसेवकांनी नकारार्थी उत्तर दिले. भाजप नगरसेवकांच्या वॉर्डात विकास कामे होऊ नयेत, असे प्रशासनाला वाटते का असे राठोड यांनी आयुक्तांना विचारले. आयुक्तांनी मुख्य लेखाधिकारी सुहास केंद्रे यांना पाचरण करून १८ कोटींचे पेमेंट कोणत्या कंत्राटदारांना केले याची माहिती शनिवारी दुपारपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामजन्मभूमीसाठी रविवारी हुंकार सभा

$
0
0

औरंगाबाद: अयोध्येच्या श्री रामजन्मभूमीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे रविवारी हुंकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोर्टात अनेक वर्ष असलेल्या अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीवरील मंदिराचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संसदेत कायदा तयार करावा, हाच पर्याय शिल्लक आहे. त्या संदर्भात जनजागृती करून केंद्र सरकारपर्यंत लोकभावना पोहचविण्यासाठी हुंकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे विहिंपचे प्रांत प्रचार प्रसिद्धी प्रमुख राजीव जहागीरदार यांनी नमूद केले आहे. सिडको एन ५ येथील संत तुकाराम नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता सभा सुरू होईल. विहिंपचे अखिल भारतीय उपाध्यक्ष हुकुमचंद सावला हे प्रमुख वक्ते असतील तसेच देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांच्यासह जिल्ह्यातील विविध संप्रदायांचे अनेक धर्माचार्य सभेला उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रांत अध्यक्ष आप्पा बारगजे, जिल्हाध्यक्ष सोमनाथराव गायकवाड, शहरमंत्री शैलेश पत्की यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातातील जखमीला सहा लाख नुकसानभरपाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपघातातील जखमीला नऊ टक्के व्याजासह सहा लाख ७७ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य सी. एस. दातीर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि चालकाला दिले. अर्जदार सचिन गणपत आडे हा मित्रांसोबत दुचाकीने आडूळ येथून औरंगाबादकडे दुचाकीने येत होता. आडूळच्या पुढे महामंडळाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. चार एप्रिल २०१६ रोजी ही घटना घडली. आडे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाचोड पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी आडे यांनी मोटार अपघात न्यायाधिकरणात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. सुनावणीअंती आडे यांना नऊ टक्के व्याजासह सहा लाख सत्याहत्तर हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायाधिकरणाने दिले. जखमीची बाजू संदीप गोरे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राण्यांच्या पैशावर पालिकेचा डल्ला !

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

प्राणिसंग्रहालयातून महापालिकेला दरवर्षी सुमारे अडीच कोटींचे उत्पन्न होत होते. हा पैसा पालिका प्रशासन प्राणी सोडून अन्य कामांवर खर्च करत असल्यामुळे प्राणिसंग्रहालयाची दुरवस्था झाली आणि त्याची पूर्तता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता रद्द करण्यातपर्यंत येऊन ठेपली. प्राण्यांना बेशुद्ध करण्याच्या इंजक्शनचे बिल तब्बल चार महिन्यांपासून लेखा विभागात प्रलंबित आहे. हरणांसाठी बसवलेल्या स्प्रिंकलरचे बिल दोन वर्षांपासून थकले आहे, तर खाद्यांन्नांबद्दलची अवस्थाही अशीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबादला असणारे प्राणिसंग्रहालय हे मराठवाड्यातील एकमेव आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या या शहरात प्राणिसंग्रहालय असल्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक देखील मोठ्या संख्येने प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी येत. वर्षभरात पालिकेला प्राणिसंग्रहालयाच्या माध्यमातून दोन ते अडीच कोटींचे उत्पन्न होते. प्राणिसंग्रहालयातून प्राप्त झालेले उत्पन्न महापालिका प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी खर्च करत नसल्याचे उघड झाले आहे. प्राणिसंग्रहालयाचे स्वतंत्र खाते उघडून त्यात हा पैसा जमा केला तर त्यातून दरवर्षी देखभाल दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात होतील. प्राण्यांच्या देखभालीचा, औषधींचा खर्च देखील त्यातून होऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले. अडीच कोटी रुपये उत्पन्न देणाऱ्या प्राणिसंग्रहालयावर पालिका वर्षभरात पन्नास लाख रुपये देखील खर्च करीत नाही. अर्थसंकल्पात प्राणिसंग्रहालयासाठी मोठी तरतूद केलेली असते, पण प्रत्यक्षात खर्च मात्र फारच कमी होतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठीच्या इंजक्शनचे बिल चार महिन्यांपासून लेखा विभागात प्रलंबित आहे. एखादा प्राणी पिंजऱ्यातून पळाला, तर त्याला पकडण्यासाठी त्याला सर्वप्रथम बेशुद्ध करावे लागते. एखाद्या प्राण्यावर उपचार करायचे असतील, तर त्याला बेशुद्ध करूनच उपचार करावे लागतात. अशा महत्त्वाच्या कामासाठी लागणाऱ्या इंजक्शनचे बिल चार महिन्यांपासून देण्यात आले नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालयात इंजक्शनचा तुटवडा आहे. प्राणिसंग्रहालयातील हरणांना उन्हाळ्यात सुसह्य वाटावे यासाठी दोन वर्षांपूर्वी हरणांच्या पिंजऱ्यात स्प्रिंकलर लावण्यात आले. या कामाचे केवळ पन्नास हजारांचे बिल लेखा विभागाने अद्याप मंजूर केले नाही. प्राण्यांसाठीचे खाद्यान्न देखील कंत्राटदारांमार्फत खरेदी केले जाते. त्यांचेही बिल थकवले जात असल्यामुळे खाद्यान्नाचा प्रश्न निर्माण होतो. प्राणिसंग्रहालय, सिद्धार्थ उद्यान आणि पोहण्याचा तलाव या तीन उपक्रमातून महापालिकेला दरवर्षी साडेचार ते पाच कोटींचे उत्पन्न मिळते. स्वतंत्र खात्यात महापालिकेने ही रक्कम जमा केली, तर या तिन्हीही उपक्रमांच्या देखभाल दुरुस्तीचे काम परस्पर होऊ शकेल. अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्याची वेळ येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

\Bकारभाराचे वाभाडे; पालिकेत खळबळ

\Bप्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द केल्याचे पत्र शनिवारी महापालिकेला प्राप्त होताच प्रशासनात खळबळ उडाली. महापौरांनी या पत्राबद्दल सविस्तर माहिती घेत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'प्राणिसंग्रहालयातील त्रुटी दूर करण्याबाबत प्राधिकरणाकडून २०१५मध्ये पत्र मिळाले होते. त्यानंतर प्राणिसंग्रहालयात बऱ्याच सुधारणा केल्या. सिद्धार्थ उद्यानात चालणाऱ्या मीनी ट्रेनबद्दल प्राधिकरणाचा आक्षेप होता. त्यामुळे ही ट्रेन पालिकेने बंद केली. अन्य त्रुटीही दूर करण्याचा प्रयत्न केला. २०१५ ते २०१८ या काळात प्राणिसंग्रहालयात केलेल्या कामांची दखल न घेता प्राधिकरणाचे सदस्य सचिव डी. एन. सिंग यांनी परवाना रद्द करण्याचा निर्णय २८ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला. ते ३० नोव्हेंबरला ते सेवानिवृत्त झाले. त्यामुळे सूडबुद्धीने त्यांनी ही कारवाई केली,' असे महापौर म्हणाले.

प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारकडे महापालिका अपिल करणार आहे. प्राधिकरणाने हा निर्णय सूडबुद्धीने घेतला आहे. प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी तीस दिवसांचा अवधी आहे. या काळात महापालिका केंद्र सरकारकडे निश्चितपणे अपिल दाखल करेल. वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून देईल. प्राधिकरण सदस्य सचिव डी. एन. सिंग यांचा काही अधिकाऱ्यांबद्दल राग असेल. त्या रागाच्या भरात त्यांनी ही कारवाई केली असावी.

- नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमिओपॅथीतील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. शांतीलाल देसरडा यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

होमियोपॅथीचे ज्येष्ठ तज्ज्ञ, होमिओपॅथी कौन्सिलचे माजी कार्यकारिणी सदस्य, डीकेएमएम कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. शांतीलाल मोतीलाल देसरडा (वय ६२)यांचे शनिवारी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. डॉ. देसरडा यांना आजारपणामुळे उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉ. देसरडा यांचे होमिओपॅाथीच्या क्षेत्रात भरीव योगदान आहे. ते 'डीकेएमएम' महाविद्यालयाचे संस्थापक प्राचर्य म्हणून २६ वर्ष कार्यरत होते. गुरुमिश्री होमिओपॅथीक महाविद्यालय शेलगाव, बदनापूरचे स्थंस्थापक अध्यक्ष होते. डॉ. देसरडा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा सदस्य, होमिओपॅथी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्य केले. त्याचबरोबर नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. २००६मध्ये केंद्रीय होमिओपॅथीक परिषदेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची केंद्रीय होमिओपॅथिक संशोधन परिषदेवरही नेमणूक केली. त्यांच्या मागे पत्नी डॉ. कांचन देसरडा, मुलगा डॉ. योगेश, सून डॉ. कोमल, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांचे बंधू तर माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांचे ते काका होत. त्यांची अंत्ययात्रा रविवारी श्रीनेकेतन कॉलनी येथील येथून सकाळी दहा वाजता निघणार आहे. त्यांच्यावर कैलासनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादहून चीनसाठी विमान सुरू करू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंडो - चायना टुरिझम वाढीसाठी चीन उत्सुक असून, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट चीनला जाण्यासाठी स्वतंत्र विमान सुरू करण्याची देखील तयारी असल्याचे चीनच्या शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी चर्चा करताना शनिवारी सांगितले.

चीनचे उपराष्ट्रपती डिसेंबर महिन्याच्या शेवटी औरंगाबादमध्ये येणार आहेत. त्या निमित्ताने शिष्टमंडळाने पूर्व तयारीच्या दृष्टीने मंत्री बिलियन ली यांच्या नेतृत्वाखाली भेट दिली. महापालिकेतही ते सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी महापौरांशी चर्चा केली. झालेल्या चर्चेबद्दल महापौरांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'चीन औरंगाबादमध्ये पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्यास उत्सुक आहे. चीनमधून भारतात रोज ४० विमाने येतात. त्यापैकी काही विमाने औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू करण्याचे नियोजन केले जाईल, असे शिष्टमंडळाने सांगितले. चीनी बनावटीच्या वस्तूंसाठी भारतीय बाजारपेठ चांगली आहे. वर्षाला सुमारे ८४.४ मिलियन यूएस डॉलर्सचा व्यवसाय भारतात होतो असा उल्लेख चीनच्या मंत्र्यांनी केला. भारतातील बासमती तांदूळ, साखर, सोयाबीन या उत्पादनाच्या निर्यातीसाठी विशेष प्रयत्न करण्याची तयारी त्यांनी बोलून दाखवली. चीनच्या १२०० कंपन्या भारतात आहेत. त्यापैकी ४०० कंपन्या महाराष्ट्रात आहेत. मेक इन इंडियाला चीन प्रोत्साहीत करीत आहे, असा दावा त्यांनी केला. चीन सरकार औरंगाबादेत विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिते. विद्यापीठात आर्ट गार्डन तयार करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यादृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी सामंजस्य करार केला जाणार आहे,' असे बिलियन ली यांनी स्पष्ट केले. चीनच्या शिष्टमंडळात हुंग गँग, यांग ताईनवेन, सॅन कॅन, झांग जिस्किन, बांग शिकाई आदींचा समावेश होता. शिष्टमंडळ महापौरांशी चर्चा करीत असताना विरोधीपक्षनेते जमीर कादरी, उपायुक्त मंजुषा मुथा, डी. पी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपत्तीसाठी माता-पित्यांना केले बेघर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लहानपणी आजारी पडल्यानंतर रात्र-रात्र जागणारी आई...लेकरू सारखे उठते म्हणून त्याला मांडीवर घेऊन उभ्या-उभ्या झोपणारा बाबा...पोटच्या गोळ्यांसाठी आयुष्य वेचणारी ही माणसे आता संपत्तीसाठी घरातून खड्यासारखी अलगद बाहेर फेकली जात आहेत. याचे लोण औरंगाबादमध्ये पोचले असून, आपल्या मात्या-पित्यांना बेघर करणारी मुले व सुनांविरोधात याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतराव धनसिंग फतपुरे (रा. गुप्ता किराणाच्या मागे, गेडॉर कॉलनी, एन ७) सिडको येथे आपल्या मुलांसोबत राहतात. फतपुरे यांचा शेतीचा व्यवसाय होता. तर त्यांच्या पत्नी नोकरीला होत्या. त्यांना आता पेन्शन मिळत आहे. २९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फतपुरे यांना मुलगा विनोद, धीरज व दोघांच्याही पत्नींनी त्यांना अक्षरश: घराबाहेर हाकलून दिले. याबाबत फतपुरे यांना आपल्याच मुलांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याची वेळ आली आहे. फतपुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विनोद, धीरज ही दोन्ही मुले व सुनांनी तुमच्या नावावर असलेले घर आमच्या नावावर करून द्या, असा लकडा लावला होता. तसेच आईची मिळणारी पेन्शन खर्च करण्यासाठी द्या, अशी मागणी केली होती. फतपुरे यांचा मुलगा धीरज हा नेहमी आई - वडिलांशी वाद घालायचा. घर बांधण्यासाठी पत्नीच्या नातेवाईकांकडून तीन लाख रुपये दिले होते. ते मला परत करा, असे सांगून त्याने मानसिक त्रास देऊन शिवीगाळ, मारहाणही केली होती. तुम्ही दोघे वृद्धाश्रमात राहण्यासाठी गेला नाहीत आणि आमच्या नावावर घर केले नाही, तर तुम्हाला जिवंत मारून टाकू, अशीही धमकी या दोन्ही मुलांनी तसेच त्यांच्या पत्नीने दिली होती. शेवटी या मुलांनी आपल्या आई-वडिलांनाच घरातून हाकलले. या प्रकरणी विनोद अमृतराव फतपुरे, धीरज फतपुरे या दोघांसह दोन्ही सुनांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार एम. ए. पठाण हे करत आहेत.

\Bआई-वडिलांच्या जीवावर उठले...

\Bफतपुरे यांचा मुलगा धीरज हा आई-वडिलांशी सारखा वाद घालायचा. त्याने अनेकदा त्यांना शिवीगाळ आणि मारहाणही केली आहे. तुम्ही वद्धाश्रमात रहायला नाही गेलात आणि तुमच्या नावावरचे घर आमच्या नावावर नाही केले, तुर दोघांनाही जिवंत मारून टाकेन अशी धमकीही त्याने दिली होती, असे फतपुरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

\Bफतपुरे कुटुंबाची वाताहत...

- \Bअमृतराव धनसिंग फतपुरे - वडील

- विनोद अमृतराव फतपुरे - मुलगा

- धीरज अमृतराव फतपुरे - मुलगा

\B

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’मुळे सीए, कर सल्लागारांना संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकर प्रणाली सुटसुटीत असून करदात्यांच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरत आहे. ही करप्रणाली लागून दीड वर्ष होत असून सर्वांच्या योगदानामुळे ती यशस्वी ठरत आहे. यातून अधिकारी, सीए, व्यावसायिक आदी सर्वच नवनवीन बाबीं शिकत असून यामाध्यमातून सीए, कर सल्लागार यांनाही एक नवी संधी निर्माण झाली आहे,' असे प्रतिपादन सीजीएसटी व सेंट्रल एक्साइजचे आयुक्त के. व्ही. एस. सिंह यांनी केले.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्स्टस ऑफ इंडिया (आयसीएआय) औरंगाबाद शाखेतर्फे शुक्रवारी सातारा येथील सीए भवन येथे आयोजित महाराष्ट्र मेगा जीएसटी परिषदेचे उद्घाटन जीएसटी व सेंट्रल एक्साइजचे आयुक्त के. व्ही. एस. सिंह यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. सीजीएसटीचे अधीक्षक दीपक गुप्ता, डब्ल्यूआयआरसीचे अध्यक्ष सीए संदीप जैन, सीए सचिन लाठी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी सिंह म्हणाले, 'वेगवेगळे १७ कर रद्द करून एकच जीएसटी कर प्रणालीची अंमलबजावणी देशभरात सुरू झाली. त्यास आता दीड वर्ष होत आले असून सर्वांमु‌ळे ती यशस्वी ठरत आहे. ही प्रणाली सुटसुटीत असून करदात्यांच्या दृष्टीनेही फायद्याची ठरत आहे. करभरणा व करदात्यांची संख्या वाढत असून सीए, करसल्लागारांना यामुळे नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. जीएसटी अनुपालनावर लक्ष केंद्रित केले आणि चार्टर्ड अकाउंटंट्सकडून त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या, तर जीएसटी लागू होण्यापूर्वी व नंतरही मेळावे, चर्चासत्र आदी माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.' गुप्ता यांनी 'जीएसटीएन प्रणालीच्या तांत्रिक अडचणीबाबत पूर्वी काही तक्रारी होत, पण आता जीएसटीएन तांत्रिक दृष्ट्या अधिक सक्षम होत आहे. ३० नोव्हेंबर रोजी १८ लाख रिर्टन फाइल भरण्यात आल्या आहेत. मात्र, एकही तक्रार आली नाही,' असे त्यांनी यावेळी नमूद केले.

\Bरिपोर्ट भरताना घ्या काळजी

\Bपरिषदेत सीएस लाठी यांनी ३१ डिसेंबरपर्यंत जीएसटी वार्षिक रिर्टन फॉर्म ९ व ९ सी भरून द्यायचा आहे. हा ऑडिट रिपोर्ट भरताना काय काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. यासह परिषदेत लेखापरीक्षण, नियोजन, कागदपत्रे, लेखापरीक्षाची अपेक्षा आणि लेखापरीक्षक उत्तरदायित्व आणि जीएसटी लेखापरीक्षा अहवाल तसेच रिअल इस्टेट आणि वर्क्स कॉन्ट्रॅक्टमधील गंभीर समस्या आदी विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सीए योगेश अग्रवाल, गणेश शिल्लवंत, रेणुका देशपांडे, पंकज सोनी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमटीडीसी’मध्ये स्थानिक कलाकारांना व्यासपीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) स्थानिक कलाकारांना विना मानधनतत्वावर व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती प्रादेशिक व्यवस्थापक विजय जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

जाधव म्हणाले, 'एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये देश-विदेशातून पर्यटक येतात आणि राहतात. दिवसभर ते पर्यटन स्थळांना भेटी देतात. सायंकाळी पर्यटन निवासामध्ये आल्यावर त्यांच्या विरंगुळ्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा 'एमटीडीसी'चा मानस आहे. त्यासाठी विना मानधनतत्वावर स्थानिक कलाकारांना 'एमटीडीसी'च्या निवासामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी घेतला आहे. होतकरू कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. या माध्यमातून स्थानिक लोककला व संस्कृती जपण्याचे काम होणार आहे. गीत, नृत्य, वाद्य, चित्रकला, फोटोग्राफी आदी क्षेत्रातील कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी वाव मिळणार आहे.

\Bया ठिकाणी मिळणार संधी

\B'एमटीडीसी'च्या मराठवाडा प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत औरंगाबाद, फर्दापूर, अजिठा टी पॉइंट, सिल्लोड, अजिंठा व्हिव पॉइंट, तुळजापूर, औंढा नागनाथ, वेरूळ, औरंगाबाद शहरातील कलाग्राम या ठिकाणी कलाकारांना कला सादर करता येणार आहे. इच्छुकांनी त्या त्या ठिकाणच्या पर्यटन निवासाशी संपर्क साधावा,' असे आवाहन विजय जाधव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विहिंप’ हुंकार सभेसाठी सज्ज!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अयोध्येच्या श्री. रामजन्मभूमीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे रविवारी सिडको एन ६ येथील संत तुकाराम नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता हुंकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जोरदार तयारी करण्यात आली असून, बजरंग दलातर्फे शनिवारी वातावरण निर्मितीसाठी वाहन फेरी काढण्यात आली.

हुंकार सभेत विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय उपाध्यक्ष हुकुमचंद सावला हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांच्यासह जिल्ह्यातील विविध संप्रदायांचे अनेक धर्माचार्य सभेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सभेनिमित्ताने भारतीय जनता पक्ष युवा मोर्चातर्फे दुपारी दोन वाजता क्रांती चौक येथून शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहन फेरी काढण्यात येणार आहे. पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज, जिल्हाधिकारी कार्यालय, टीव्ही सेंटर मार्गे काढण्यात येणाऱ्या या फेरीची सांगता संत तुकाराम नाट्यगृह येथे होणार आहे.

\Bबजरंग दलातर्फे कॉर्नर बैठका

\Bसभा आयोजनासंदर्भात नागरिकांना माहिती व्हावी, या हेतूने बजरंग दलातर्फे शनिवारी वाहनफेरी काढण्यात आली. सरस्वती भुवन येथून या फेरीला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी विविध शैक्षणिक संस्था परिसरात कॉर्नर बैठका घेत सभेची माहिती दिली. फेरीची सांगता सिडकोतील छत्रपती कॉलेज येथे करण्यात आली.

कोर्टात अनेक वर्ष असलेल्या अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीवरील मंदिराचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संसदेत कायदा तयार करावा, हाच पर्याय शिल्लक आहे. त्या संदर्भात जनजागृती करून लोकभावना केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी हुंकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

- राजीव जहागीरदार, प्रांत प्रचार प्रसिद्धी प्रमुख, विहिंप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवशी १०२ भंगार वाहने जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या विविध भागात बेवारसपणे पडलेल्या भंगार वाहनांच्या विरोधात महापालिका, पोलिस प्रशासन आणि महसूल विभाग यांनी शनिवारपासून एकत्रित कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी १०२ वाहने जप्त करण्यात आली.

रस्त्यांच्या लगत अनेक भंगार वाहने पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेवून अशी वाहने जप्त करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या उपस्थितीत झालेल्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. वाहने जप्त करण्याची जबाबदारी पालिकेवर टाकण्यात आली. जप्त केलेली वाहने गरवारे क्रीडा संकुलाच्या शेजारी असलेल्या पार्किंगच्या जागेवर जमा केली जाणार आहेत. या वाहनांची विल्हेवाट पोलिस आणि महसूल प्रशासन लावणार आहे. पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या नेतृत्वाखाली नऊ झोन कार्यालयाच्या अंतर्गत वाहने ही कारवाई सकाळी दहापासून करण्यात आली. या कारवाईसाठी दोन क्रेन आणि दोन ट्रक उपलब्ध करून देण्यात आले होते. वाहने जप्त करण्याच्या पथकात पालिकेचे अधिकारी - कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी होते.

---

जप्त केलेली वाहने

---

कार, जीप - ५३

तीनचाकी - २३

दुचाकी- १५

ट्रक, टेम्पो - ९

ट्रॅक्टर - १

ट्रक चेसीस - १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा खासगीकरणातून ८०० कर्मचारी बेरोजगार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम खासगीकरणातून सुरू केले आहे. त्यामुळे तब्बल आठशे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. दरम्यान, हे काम २० डिसेंबरपासून सुरू केले जाणार आहे.

कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम खासगीकरणआतून करण्यासाठी पालिकेने निविदा काढली होती. त्यात पी. गोपीनाथ रेड्डी यांची निविदा पात्र ठरली. त्यामुळे या कंपनीला हे काम देण्यात आले. कंपनीने डिसेंबर महिन्यापासून प्रायोगिकतत्वावर झोन क्रमांक तीन, झोन क्रमांक पाच आणि झोन क्रमांक सहामध्ये काम सुरू करावे, असे आदेश आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिले होते. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन कक्षातर्फे कंपनीला तसे कळविण्यात आले. २० डिसेंबरपासून तिन्हीही झोन कार्यालयांच्या क्षेत्रात कंपनीतर्फे कचऱ्याच्या संकलनाचे व वाहतुकीचे काम सुरू होईल, असे घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले. खासगीकरणातून कचरा संकलन व वाहतुकीचे काम केले जाणार असल्यामुळे या कामावर सध्या महापालिकेच्या माध्यमातून काम करणारे कंत्राटी कर्मचारी कमी केले जाणार आहेत. पहिल्या टप्यात कंत्राटदाराकडून नियुक्त करण्यात आलेले दोनशे कर्मचारी आणि बचत गटांच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेले ४३५ कर्मचारी कार्यमुक्त केले जाणार आहेत. एकूण किमान आठशे कर्मचारी कार्यमुक्त होतील असे भोंबे म्हणाले.

\B१५५२ कर्मचारी कायम राहणार

\Bकचरा संकलन आणि वाहतुकीसाठी महापालिकेचे १२०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्याशिवाय सिडकोतील बचतगटांचे ३५२ कर्मचारी देखील आहेत. या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले जाणार नाही. युजर्स चार्जेस गोळा करण्यासाठी, नाल्या स्वच्छ करण्यासाठी, रस्त्यांची झाडझूड करण्यासाठी या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारला धडक दिली; १५ दिवसांची कैद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालवून कारला धडक दिली. या अपघातात कारचे दीड लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणात आरोपी ट्रक चालक काशीनाथ नामदेव कलात्रे (३०, रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) याला १५ दिवस साधी कैद व विविध कलमांखाली दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी ठोठाविली.

उस्मानपुऱ्यात राहणारे संजय दिगंबर टोपे (वय ५१) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीत, ११ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास टोपे हे कारने कन्नडहून दौलताबाद मार्गे औरंगाबादला येत होते. दौलताबाद किल्ल्या जवळील मशिद येथील नमाज संपल्याने तेथे गर्दी झाली होती. म्हणून टोपे कार हळुवार चालवत होते. त्यावेळी पाठी मागून भरधाव आलेला ट्रक टोपे यांच्या कारवर आदळला. या अपघातात कारचे दीड लाख रुपये नुकसान झाले. या प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्षी-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला भादंवी कलम २७९ अन्वये १५ दिवसांची साधी कैद व एक हजार रुपये दंड व कलम ४२७ अन्वये १५ दिवसांची साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार लता दरोडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन विभाग आता सौर ऊर्जेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वन विभागाचे उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालय, परिसरातील विश्रामगृह आणि जालना येथील कार्यालय या ठिकाणी ३५ किलो वॅट क्षमतेचे पारेषण संलग्न 'सोलार रूफ टॉप' संयत्र बसविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, प्रकल्प कार्यान्वित झाल्यास वन विभागाची दरवर्षी विजेच्या बिलाची सुमारे सात लाख रुपयांची बचत होणार आहे. प्रकल्प राबवण्यिासाठी होणारा खर्च चार वर्षांत वसूल होईल, असे सांगण्यात येत आहे.

राज्यात उर्जेची वाढती मागणी लक्षात नवीन व नवीकरणीय (अपरांपरिक) ऊर्जा स्त्रोताचा विकास करणे अपरिहार्य आहे. यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या सौर व जैविक ऊर्जास्त्रोतांचा वापर करून पारेषण विरहित ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करणे गरजेचे आहे. यामुळे पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांवर पडणारा भार कमी होण्यास व हरितगृह वायुचे उत्सर्जन कमी होऊन निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे. हाच धागा पकडून शासकीय, निमशासकीय संस्था, शासकीय शैक्षणिक संस्था आदी कार्यालयाच्या इमारतींच्या छतावर, जमिनीवर आधारित पारेषण विरहित सौर विद्युत संच आस्थापित करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार वन विभागाच्या उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालय इमारत; तसेच परिसरातील विश्रामगृह आणि जालना येथील कार्यालय इमारतीवर ३५ किलो वॅट क्षमतेचे पारेषण संलग्न सोलार रूफ टॉप संयत्र बसविण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने २८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

प्रकल्प उभारणीचे काम वन खात्याने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाकडे सोपविले आहे. येथील विभागीय कार्यालयाच्या इमारतीवर २० किलो वॅट, विश्रामगृह येथे दहा आणि जालन्यातील वन क्षेत्रीय कार्यालय इमारतीवर पाच असे ३५ किलो वॅट क्षमतेचे पारेषण संलग्न सोलार रूफ टॉप संयत्र बसविण्यात येत आहे. हेकाम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

\Bगौताळ्याचा प्रकल्प यशस्वी

\Bगौताळा अभयारण्यातील विश्रामगृह येथे सौर ऊर्जा प्रकल्प चार वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आला आहे. पूर्वी वीज बिलापोटी दरमहा सुमारे दीड ते अडीच हजार रुपये द्यावे लागत होते. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे हा खर्च वाचला आहे.

३५ किलो वॅट क्षमतेचे पारेषण संलग्न सोलार रूफ टॉप संयत्र येत्या १५ दिवसांत कार्यान्वित होईल. वीज बिलापोटी वर्षाकाठी सात लाख रुपये होणारा खर्च यामुळे वाचले. प्रकल्पासाठी आलेला खर्च येत्या चार वर्षांत वसूल होईल.

- सतीश वडस्कर, उप वनसंरक्षक, वन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांत शहरात १९६ भंगार गाड्या जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध भागांत असलेल्या भंगार गाड्या जप्त करण्याची मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत शहरातून १९६ गाड्या जप्त करण्यात आल्या असून, रविवारी (दोन डिसेंबर) ९४ भंगार गाड्या रस्त्यावरून उचलण्यात आल्या आहे.

शहरातील विविध रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात उभ्या असलेल्या भंगार गाड्या उचलण्याची कारवाई शनिवारापासून (एक डिसेंबर) सुरू करण्यात आली. ही मोहीम औरंगाबाद महापालिका, पोलिस, महसूल आणि आरटीओ आदी विभागांनी एकत्रित सुरू केली आहे. शहराच्या विविध भागांत रस्त्यांलगत गेल्या अनेक महिन्यांपासून उभ्या करून ठेवलेल्या ९४ भंगार गाड्या रविवारीही उचलण्यात आल्या. या सर्व गाड्या गरवारे स्टेडियम मैदानात जमा करण्यात आल्या आहेत. ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वकिलांची फौज उभी करणार

$
0
0

वाळूज महानगर: 'मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला यश आले आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे वकिलाची मोठी फौज उभी करणार आहे़,' अशी माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली. औरंगाबाद येथे सहा जानेवारी रोजी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत निर्धार मेळावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता मेळावा व प्रवेश सोहळा आमदार मेटे यांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव पवार, जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब जटाळ, मराठवाडा विद्यार्थी आघाडी प्रमुख सचिन मिसाळ, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र देवकर, लक्ष्मण लांडे हे उपस्थित होते.

'मराठा समाजातील तरुणांना व्यवसाय करण्याकरिता आण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन करणे व त्याकरिता पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला आहे़ कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांकडून शिवसंग्रामचे कार्यकर्ते नियमात बसणारे प्रकरण मंजूर करून देतील. एमआयडीसीमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळण्यासाठी कायदा करण्यासाठी सरकारकडे तगादा लावणार आहे. बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता, शेतकऱ्यांना किमान तीन हजार रुपये पेन्शन या मागण्या सरकारकडे करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मेळावा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र पवार, धनंजय फिसके, अमोल काळे, चंद्रकांत जाधव, के़ पी़ चव्हाण, अशोक कटारे, मंगेश पाटील, विजय मते, अशोक जेधे, चंद्रकांत धुपे, ज्ञानेश्वर दांडेकर, विजय काळे, रामू पवार यांनी परिश्रम घेतले़

\Bयांचा पक्षप्रवेश \B

उद्योगपती कुंजबिहारी अग्रवाल, मनोज जाधव, गणेश थोरात, अलका दौंड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यानी शिवसंग्रामध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा लाखांच्या ४६ मोबाइलची चोरी; दोघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सालासार असोसिएटस प्रा. लि. या मोबाइल वितरण कंपनीतून सुमारे सहा लाखांच्या ४६ मोबाइल चोरीप्रकरणात सैय्यद खिजर चिस्ती सैय्यद अनिस चिस्ती व अजय भगवान ओलेकर यांना शनिवारी (एक डिसेंबर) अटक करून रविवारी कोर्टात हजर केले असता, गुरुवारपर्यंत (सहा डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले.

याप्रकरणी रोहित देवेंद्रलाल मारिया यांनी फिर्याद दिली होती. पैठण गेट येथील सन्मित्र कॉलनीत असलेल्या सालासार असोसिएटस् प्रा. लि. या मोबाइल वितरण कंपनीचे फिर्यादी संचालक आहेत. कंपनीत दीड वर्षापासून सैय्यद खिजर चिस्ती सैय्यद अनिस चिस्ती (२८, रा. चाऊस कॉलनी, शहा बाजार) हा बिलिंग व स्टोर ऑपरेटर म्हणून काम पाहत होता. त्याच्याकडेच सर्व रेकॉर्ड होते. सैय्यद खिजर याने अचानक काम सोडले. सहा नोव्हेंबर २०१८ रोजी ऑडिट केले असता, त्यात ४६ मोबाइल गहाळ झाल्याचे समोर आले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सैय्यद खिजर चिस्ती याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेले मोबाइल अजय भगवान ओलेकर (२०, रा. मातोश्री जिजाऊ कॉलनी, जटवाडा रोड) याला विकल्याचे सांगितले. ओलेकर याला अटक केली असता, काही मोबाइल बीड येथे विकल्याचे सांगितले. दोघांनी मोबाइल कोणाला विकले, कोणी साथीदार आहेत का आदींचा तपास करावयाचा आहे. सैय्यद चिस्ती याने विकलेल्या मोबाइलचे पैसे हस्तगत करणे बाकी आहे. अजय ओलेकर याने बीडमधील कोणत्या व्यक्तीला मोबाइल विकले, याचाही तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मनीषा गंडले यांनी केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकाकडून तरुणीचे वर्षभर लैंगिक शोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावीला प्रवेश घेऊन देतो, नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत एका तरुणीचे वर्षभर लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जून २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या काळात सातारा परिसरात घडला. याप्रकरणी एका प्राध्यापकासह चौघांवर सातारा पोलिस ठाण्यात बलात्कार, विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी २६ वर्षांच्या तरुणीने तक्रार दाखल केली आहे. ती विवाहित असून पतीपासून विभक्त राहते. या तरुणीच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेमुळे तिची प्रा. संभाजी बाबुराव वाघमारे (रा. अजंठा कॉम्प्लेक्स, नंदनवन कॉलनी) याच्यासोबत ओळख झाली. वाघमारे हा २० जून २०१७ रोजी सकाळी साडेदहा वाजता तिच्या घरी आला. ते एका कॉलेजमध्ये प्राध्यापक असून तुला बारावीला प्रवेश घेऊन पास करून चांगली नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. ही तरुणी बेडरूममध्ये 'टीसी' आणण्यासाठी गेली असता वाघमारे याने तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला, तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास बदनामी, ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तरुणीने तिच्या ओळखीच्या महिलेला तसेच वाघमारे याच्या पत्नीला हा प्रकार सांगितला असता दोघींनी तिलाच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रा. संभाजी वाघमारे, राहुल तुळसे व दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक डोईफोडे हे तपास करत आहेत. दरम्यान, दुसरी बाजू माहिती करून घेण्यासाठी वाघमारे याला मोबाइल केला असता तो 'बंद' असल्याचे सांगण्यात येत होते.

\Bमित्राचीही मागणी \B

तरुणी दुसऱ्या ठिकाणी वाघमारे याच्या मित्राच्या घरी भाड्याने राहण्यास गेली होती. या ठिकाणी देखील वाघमारेचा मित्र राहुल तुळसे याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोपी पीडित तरुणीने तक्रारीत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीबीटी’ला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेशनवरील धान्य देण्याऐवजी लाभार्थींच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा करून सरकार गेल्या ६३ वर्षांपासूनची सार्वजनिक वितरण प्रणाली मोडीत काढत आहे. यामुळे रेशन व्यवस्था संपुष्टात येणार आहे. या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानदार एकवटले असून, शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (चार डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर महाधडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

क्रांतीचौक येथून मंगळवादी दुपारी १२ वाजता महामोर्चा काढण्यात येणारा महामोर्चामध्ये जिल्ह्यातील १८५० रास्तभाव दुकानदार, १३०० रॉकेल परवानाधारक आणि हजाारो शिधापत्रिकाधारकही सहभागी होणार आहेत. हा मोर्चा पैठणगेट - गुलमंडी - सिटीचौक - काळा दरवाजामार्गे आमखास मैदानावर जाईल. यावेळी मोर्चातील निवडक सदस्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर फेडरेशनचे ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी व राज्य संघटनेचे अध्यक्ष पाटील करणार आहेत. या मोर्चासाठी संघटनेचे कार्याध्यक्ष मधुकर चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशुख, सरचिटणीस चंद्रकांत यादव, सचिव विजयकुमार पंडित हे देखील उप‌िस्‍थत राहणार आहेत. रोख अनुदानाच्या विरोधात 'रोख पैसे नकोत, धान्य हवे' यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी. रोख अनुदान देण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

२१ ऑगस्ट २०१८ व २९ सप्टेंबर २०१८ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यात रोख अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर लाभार्थी महाग माल घेण्यास येणार नाहीत. त्यामुळे आमचा माल विक्री होणार नाही. या शिवाय ग्राहकांचे अनुदान जमा होणार की नाही याचीची शाश्वती नाही. आधीच राज्य दुष्काळग्रस्त असल्याने भूकबळींची संख्या वाढणार असून, जनतेवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्यात 'एईपीडीएस' योजनेंतर्गत ई-पॉस मशीनवर धान्य वितरण करण्यात येत असल्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आली आहे. काळ्या बाजाराला आधार राहिला नाही, या वितरण प्रणालींचे आम्ही स्वागतच केले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेसाठी मधुकर चव्हाण, प्रकाश निकाळजे, मिलिंद पिंपळे, गंगाधर पवार, पुंडलिक अंभारे, एन. बी. मनाळ, ए. एस. देवकर, परमेश्वर बोबडे, बी. एन. देशमुख, सचिन करोडे, दिग्विजय पाटील आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाळू वाहतूक, दोघांना अटक

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाने अटक शनिवारी सकाळी धूत हॉस्पिटलजवळ अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात चोरी व गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना रोडवरून शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यावरून शनिवारी जालना रोडवरील धूत हॉस्पिटलजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी दोन संशयास्पद हायवा ट्रक पोलिसांच्या नजरेस पडल्या. या हायवामध्ये प्रत्येकी पाच ब्रास वाळू होती. ही वाळू रॉयल्टी न भरता विकण्यासाठी आणली होती. पोलिसांनी संशयीत आरोपी हायवा चालक सुनील कडुबा अवचरमल (वय ३५, रा. कातपूर, ता. पैठण) आणि अशोक सूर्यभान शेजूळ (वय २४, रा. भालगाव, ता. पैठण) या दोघांना अटक करत वाळूसह हायवा जप्त केल्या. याप्रकरणी विनायक गिते यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार पूर्णपात्रे हे तपास करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images