Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘मिनी घाटी’त आजपासून प्रसुती सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाण्यातील मिनी घाटी अर्थात जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मंगळवारपासून (चार डिसेंबर) प्रसुती सेवा सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे रुग्णालयामध्ये आता कधीही सिझेरियन शस्त्रक्रिया होऊ शकेल, अशा रितीने यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या नेत्र शस्त्रक्रियांसाठी सुसज्ज 'मॉड्युलर ओटी'चे कामदेखील रुग्णालयाच्या शेवटच्या मजल्यावर सुरू झाले आहे; तसेच रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मंजूर झाले आहे आणि सिटी स्कॅन रुग्णालयामध्ये बसवण्यासाठी येत्या काही आठवड्यात बांधकाम व विद्युत काम सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.

'मिनी घाटी'चे उद्घाटन रखडले असले तरी रुग्णालयातील विविध विभाग आता हळुहळु सुरू होत आहेत. आधी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू झाला आणि अलीकडेच आंतररुग्ण विभागदेखील (आयपीडी) सुरू झाला आहे. 'ओपीडी'सह 'आयपीडी'ची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, सद्यस्थितीत दोन्ही वेळच्या 'ओपीडी'साठी दररोज सुमारे ६०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत, तर रोजच्या 'आयपीडी'मध्ये सुमारे २० ते २५ रुग्ण दाखल होत आहेत. रुग्णालयामध्ये दर शुक्रवारी 'कॅन्सर ओपीडी' सुरू झाली आहे आणि 'किमोथेरपी सेंटर'च्या सेवाही प्रत्येक शुक्रवारी मिळणार आहेत. रुग्णालयामध्ये लसीकरण विभागही सुरू झाला आहे. त्याशिवाय आयुर्वेद विभागाचा बाह्यरुग्ण विभागही सुरू झाला असून, आयुर्वेदाची ओपीडी दररोज सुरू आहे. आयुर्वेद विभागासाठी दहा खाटा देण्यात आल्या आहेत आणि भविष्यात पंचकर्म व इतर सुविधाही दिल्या जाऊ शकतात, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. तसेच नेत्र शस्त्रक्रियांसाठी 'मॉड्युलर ओटी'चे बांधकाम व विद्युत काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. नेत्र शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना जंतुसंसर्ग होणार नाही, अशा अत्याधुनिक सोयी-सुविधा या शस्त्रक्रियागृहात असणार आहेत. या कामासाठी ९५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. नेत्र शस्त्रक्रियांसाठी उपयुक्त असणारी आधुनिक यंत्रसामुग्रीदेखील उपलब्ध केली जाणार आहे. रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मंजूर झाले आहे आणि सिटी स्कॅन उपकरण रुग्णालयामध्ये बसविण्यासाठी लागणारे बांधकाम व विद्युत काम दोन आठवड्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. स्त्रीरोग विभागाच्या ओपीडी सेवा यापूर्वीच सुरू झाल्या आहेत आणि मंगळवारपासून प्रसुती सेवा सुरू होतील. त्यासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे एकाचवेळी पाच प्रसुती होऊ शकतील, अशा सुविधा प्रसुती कक्षात उपलब्ध आहेत, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

\Bमार्चपर्यंत जुन्या ठिकाणीच शस्त्रक्रिया

\Bआमखास मैदानासमोरील जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा राज्य कर्करोग संस्थेला देण्यात आली असून, तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच काढला आहे. तरीही मार्चपर्यंत नेत्र विभागाच्या शस्त्रक्रिया व उपचार हे आमखास समोरील जुन्या रुग्णालयामध्ये होणार आहेत. मार्चनंतर सर्व नेत्र शस्त्रक्रिया 'मिनी घाटी'तील 'मॉड्युलर ओटी'मध्ये होतील, असेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पॉलिसीच्या नावाखाली १६ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

३७ लाखांचा बोनस देण्याचे आमीष दाखवून वेगवेगळ्या पॉलिसींच्या नावाखाली सेवानिवृत्त व्यक्तीला तब्बल १६ लाख ५४ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी १९ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी भिवंडी (मुंबई) येथील जुल्फीकार फय्याज शेख याला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला बुधवारपर्यंत (५ या डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले.

या प्रकरणी मोहन कडुबा सोनवणे (६०, रा. म्हाडा कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीने ८ ऑक्टोबर २०१५ रोजी बजाज लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी काढली होती. पॉलिसीचे पैसे तीन वर्ष भरल्यानंतर त्यांनी त्या पॉलिसीचे पैसे भरणे बंद केले. ११ नोव्हेंबर २०१५ रोजी फिर्यादीला पूजा देसाई हिने फोनवर 'तुमची पॉलिसीची रक्कम व कमिशन परत मिळेल, त्यासाठी तुम्हाला एक नवीन पॉलिसी काढावी लागेल' असे सांगितले व फिर्यादीकडे एजंटला पाठविले. फिर्यादीने त्याला नवीन पॉलिसीसाठी २५ हजार रुपयांचा धनादेश दिला व काही दिवसांनी फिर्यादीला पॉलिसीचे पत्र मिळाले. पुन्हा पूजा हिने फिर्यादीला फोन करुन फिर्यादीला आणखी एक पॉलिसी काढायला लाऊन ५१ हजार रुपयांचा धनादेश घेतला. २४ जुलै २०१५ रोजी स्वाती पाटील हिने फिर्यादीला फोन करुन पुन्हा पॉलिसी घेण्याचे सांगून सांगितले व त्यासाठी फिर्यादीने ९९ हजारांचा धनादेश देत रिलायन्स लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी काढली. ७ ऑक्टोबर २०१५ रोजी फिर्यादीला रूची पालकर हिने फोन करुन थर्ड पार्टी पॉलिसी घेण्याचे सांगितले व फिर्यादीने जावाईच्या नावाची पॉलिसी काढली. १४ डिसेंबर २०१५ रोजी रूची पालकरने पुन्हा फोन करुन तुम्हाला बोनसच्या रुपात डी. डी पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र तो डी.डी फिर्यादीला मिळाला नाही. २८ डिसेंबर २०१५ ते ६ जुलै २०१७ दरम्यान बजाज फायनान्स कंपनी (गुजरात) येथून विक्रम पाटील, आर. एस. काजरे, सायली माने यासह सात ते आठ जणांनी फिर्यादीला फोन, मेसेज व पत्र पाठवून आधी काढलेल्या पॉलिसीच्या बोनससाठी तसेच पॉलिसीद्वारे भरलेली रक्कम मिळविण्यासाठी विविध बँक खात्यात पैसे भरण्यास सांगत सुमारे १६ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादीने दिली होती. त्यावरुन १९ जणांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bआंतरराज्य टोळी कार्यरत असण्याची भीती

\Bप्रकरणात आरोपी जुल्फीकार फय्याज शेख (२२, रा. कोनतारी, भिवंडी रोड, भिवंडी जि. ठाणे) याला अटक करुन कोर्टात हजर केले असता, गुन्ह्यातील मुख्य आरोपी रविंद्र काजरी, त्याची पत्नी सायली माने उर्फ काजरी यांना अटक करणे बाकी आहे. आरोपींनी अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असल्याने तपास करावयाचा असून, आरोपींकडून रक्कम जप्त करावयाची आहे. यात बँक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे का याचाही तपास करणे आहे. प्रकरणात आरोपींचे आंतरराज्य रॅकेट असण्याची शक्यता असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य लेखाधिकाऱ्यांना निलंबित करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोर्टाचा अवमान करून कंत्राटदारांचे बिल काढल्याचा ठपका ठेवत मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांना निलंबित करण्याची शिफारस महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी प्रशासनाला केली. केंद्रे यांना निलंबित करून त्याचा अहवाल स्थायी समितीला सादर करा, असे आदेश सभापतींनी दिले.

कंत्राटदारांचे बिल काढल्यावरून पालिकेचा लेखा विभाग एक-दीड महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लेखा विभागाने तब्बल १८ कोटींचे बिल काढले. बिल काढताना कंत्राटदारांच्या ज्येष्ठता यादीला प्राधान्य दिले नाही, असा आरोप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. या आरोपांची दखल घेऊन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी १८ कोटींच्या बिल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली. त्यातच स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी आयुक्तांच्या नावे पत्र देवून लेखा विभागाच्या कारभारावर बोट ठेवले. नगररचना विभागाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या महसुलातून नगररचना विभागाशी संबंधित कामेच झाली पाहिजेत, असा नियम आहे; हायकोर्टाचे देखील तसेच आदेश आहेत. परंतु, लेखा विभागाने नगररचना विभागाच्या ३३ कोटींच्या महसुलातून साडेसात कोटी रुपये कंत्राटदारांना वाटले. ही बाब गंभीर असून कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करणारी व नगररचना नियमांची पायमल्ली करणाची आहे. त्यामुळे मुख्य लेखाधिकाऱ्यांसह संबंधितांवर कारवाई करा, गुन्हे दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली होती.

\Bस्थायी समिती बैठकीत लेखा विभागाचा पाढा \B

सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल नवीद यांनी लेखा विभागाच्या कारभाराचा पाढा वाचला. ते म्हणाले, लेखा विभागाशी संबंधित माहिती मिळावी म्हणून १९ नोव्हेंबर रोजी आपण मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या नावे पत्र दिले, पण अद्याप माहिती देण्यात आली नाही. मुख्य लेखाधिकारी फोन उचलत नाहीत. त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला अँटीचेंबरमध्ये बसवले आणि न भेटताच ते निघून गेले. मुख्य लेखाधिकाऱ्यांकडून नगरसेवकांना उद्धटपणाची वागणूक मिळते, असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी नगररचना विभागाच्या महसुलातून लेखा विभागाने साडेसात कोटींचे पेमेंट केल्याचा विषय काढला. त्या म्हणाल्या लेखा विभागाची ही कृती कोर्टाचा अवमान करणारी आहे. 'एमआयएम'च्या शेख नर्गीस यांनी वॉर्डात कामे होत नसल्याची तक्रार केली. यावर सभापती रेणुकादास वैद्य यांनी मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांना खुलासा करण्यास सांगितले. केंद्रे समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत. त्यामुळे वैद्य यांनी प्रशासनाला आदेश देताना मुख्य लेखाधिकारी केंद्रे यांना निलंबित करण्याची शिफारस स्थायी समिती करीत आहे, असे स्पष्ट केले. स्थायी समितीने केलेल्या शिफारशीनुसार कारवाई करून त्याचा अहवाल सादर करा, असे त्यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना सांगितले.

\Bकारवाई करता येत नाही\B

प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई महापालिका प्रशासनाला करता येत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त कारणेदाखवा नोटीस बजावता येते. फारच गंभीर आरोप त्या अधिकाऱ्यांबद्दल असतील तर ते अधिकारी शासनाच्या ज्या विभागाकडून प्रतिनियुक्तीवर आले आहेत, त्या विभागाला अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची शिफारस महापालिकेला करावी लागणार आहे. संबंधित विभागातर्फे चौकशी होऊन त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जातो. महापालिका कोणत्याही प्रकारची थेट कारवाई प्रतिनियुक्तीच्या अधिकाऱ्यावर करू शकत नाही. मुख्यलेखाधिकारी सुरेश केंद्रे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर फाइलसाठी दोन विशेषाधिकारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासन दरबारी असलेल्या 'टीडीआर'च्या (ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राइट) फाइल परत मिळाव्यात यासाठी किमान दोन अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्याचा निर्णय महापौर व आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बीड बायपास आणि जालना रोडच्या भूसंपादनासाठीचा आराखडा तयार करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेत झालेल्या 'टीडीआर' घोटाळ्याची चौकशी सध्या शासकीय पातळीवर सुरू आहे. 'टीडीआर'च्या सुमारे २२३ फाइल नगररचना विभागाच्या संचालकांनी ताब्यात घेतल्या आहेत. फाइलबरोबरच 'टीडीआर' नोंदणीचे रजिस्टर देखील ताब्यात घेतले आहे. गैरप्रकार झाला आहे, असे वाटते त्या प्रकरणाच्या फाइल संचालकांनी ठेवून घ्याव्यात व उर्वरित फाइल, रजिस्टर महापालिकेला परत करावे, अशी मागणी पालिका काही महिन्यांपासून करीत आहेत, परंतु त्याला योग्य प्रतिसाद संचालक कार्यालयाकडून मिळत नाही. त्यामुळे संचालक कार्यालयाकडे पाठपुरावा करून फाइल आणि रजिस्टर ताब्यात मिळवण्यासाठी उपअभियंता ए. बी. देशमुख व एस. एस. कुलकर्णी यांची नियुक्ती करण्याचे महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यात झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. दोन अधिकाऱ्यांची गरज नसेल तर यापैकी एकच अधिकारी नियुक्त केला जाईल, असे महापौर म्हणाले.

बीड बायपास रस्ता व केंम्ब्रिज शाळा ते नगरनाका या जालना रोडच्या भूसंपादनाचा आराखडा तयार करण्यासाठी, शिवाजीनगर रेल्वेक्रॉसिंगच्या जवळ भुयारी मार्गासाठीच्या भूसंपादनाचा तपशील तयार करण्यासाठी डी. पी. कुलकर्णी, ए. बी. देशमुख आणि एम. बी. काजी या तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे महापौर म्हणाले. हायकोर्टाने दहा दिवसांत भूसंपादनाचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कार्यवाही केली जाणार आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

\Bडी. पी. कुलकर्णींच्या नावाचाही विचार\B

'टीडीआर' फाइल परत आणण्यासाठी डी. पी. कुलकर्णी यांच्या नावाचाही विचार झाला होता, पण 'टीडीआर' प्रकरणातच त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांची याच प्रकरणात चौकशी सुरू आहे, असे लक्षात आल्यावर अन्य दोन अधिकाऱ्यांची नावे पुढे आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजंदारी कर्मचारी होणार कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोजंदारीवर गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा होत आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सूचित केले. येत्या १५ ते २० दिवसांत याबद्दल निर्णय होईल, असे ते म्हणाले. हा निर्णय झाल्यास २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, असे मानले जात आहे.

पालिका सेवेतील कंत्राटी कर्मचारी कामी करण्याचा निर्णय झाला आहे. सुमारे २०० कर्मचारी सेवेतून कमी केले जाणार आहेत. त्यांच्या जागी रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केल्यावर रिक्त होतील, त्या जागांवर रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाणार आहे. ही प्रक्रिया खरोखरच पार पडली तर २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, असे मानले जात आहे. महापालिका सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून त्यांचा लढा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणिसंग्रहालयाचे अपिल घेऊन महापौर जाणार दिल्लीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारकडे अपिल करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले दिल्लीला जाणार आहेत. प्राणिसंग्रहालय हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, असे ते म्हणाले.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने रद्द केली आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयाविरोधात केंद्र सरकारकडे अपिल करण्यासाठी महापालिकेला ३० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना महापौर म्हणाले, 'महापालिकेचे प्राणिसंग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. प्राधिकरणाने निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी दूर केल्या जात आहेत. बऱ्याच त्रुटींची पूर्तता देखील करण्यात आली आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारकडे अपिल करण्याचे ठरविण्यात आले आहे. अपिल करण्यासाठी आपण स्वत: १२ डिसेंबर रोजी दिल्लीला जाणार आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनाच्या याचिकेत केंद्र व राज्य शासनास नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

कोणतीही पूर्व सूचना न देता किंवा मोबदला न देता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० करीता भूसंपादन संदर्भात करण्यात आलेल्या याचिकेत केंद्र आणि राज्य शासनास नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी दिले. त्यांना १५ दिवसांत म्हणणे मांडावे लागणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामधील लालवाडी, मानुसपुरी आणि कोट बाजार येथून जाणारा 'जिल्हा मार्ग' ३३ फुटांचा होता. राज्य शासनाने या रस्त्याला 'राज्य मार्ग' म्हणून घोषित केले. या रस्त्याचे रुंदीकरण करताना ज्यांच्या जमिनी यासाठी घेण्यात आल्या त्या शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. आता नांदेड-उस्माननगर फाटा- कंधार- जांब- जळकोट-उदगीर-तोगरी ते कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंत जाणारा तोच रस्ता केंद्र शासनाने 'राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५०' म्हणून २०१७ ला घोषित केला. सध्या या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत केंद्र किंवा राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना किंवा मोबदला न देता भूसंपादन करीत आहेत.

शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांकडे रितसर अर्ज देऊन विचारपूस केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. म्हणून शंकरराव चितळे व इतर यांनी खंडपीठात याचिका केली. शेतकऱ्यांची बाजू शाम बी. पाटील -भोसीकर यांनी मांडली. या याचिकेची सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या १९ अभियंत्यांची वेतन कपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीजबिलाच्या वसुलीकडे दुर्लक्ष करणे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अंगलट आले आहे. अत्यंत कमी वसुलीमुळे औरंगाबाद परिमंडळातील १९ अभियंत्यांचे वेतन थेट एक तृतियांश करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. शिवाय ३४ कर्मचारी, अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

वीजबिल थकवणारे ग्राहकांची वीज तोडणे व अनाधिकृत वीज कनेक्शन घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. औरंगाबाद परिमंडळात ४३ हजार वीज ग्राहकांकडे १४६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एप्रिल २०१८ पासून अनेक वीज ग्राहकांनी बिल भरलेले नाही, अशी माहिती नोव्हेंबरच्या सुरुवातीला समोर आली होती. त्यामुळे वीजबिलाची वसुली करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. या आदेशानंतरही अनेक भागात आवश्यक कार्यवाही केली नसल्याचे महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे जालना तसेच औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी स्वत: आढावा घेतला.

यावेळी अनेक भागात वीज वसुली मोहीम प्रभावीरित्या राबविली नसल्याचे पुढे आहे. त्यामुळे संबंधित अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महावितरणाच्या वरिष्ठ कार्यालयातून देण्यात आले आहेत. वसुली कमी केल्याच्या प्रकरणात जालना विभागातील १५ व औरंगाबाद जिल्ह्यातील चार अभियंत्यांच्या पगारातून एक तृतियांश वेतन कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी वसुली प्रकरणी जालना विभागात १४ कर्मचारी-अधिकारी व औरंगाबाद जिल्ह्यात २० कर्मचारी व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसला वेळेत समाधान कारक उत्तर न दिल्यास मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

……………

\Bहिटलिस्टवर बडे अधिकारी \B

महावितरण विभागाच्या प्रादेशिक कार्यालय आणि मुख्य अभियंता कार्यालयातून वीजबिल वसुलीची मोहीम कडकपणे राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतरही कारवाई न करणाऱ्या किंवा हयगय करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आगामी काळात या अभियंत्यांच्या वरिष्ठांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जो अच्छा लगता है वो बोलो'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'संभाजीनगर बोलो, या औरंगाबाद', जो अच्छा लगता है वो बोलो... देश बदलला पाहिजे मी महाराष्ट्राचा आहे. मी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. मुसलमान किंवा हिंदू, असा काही विषय नाही. राम मंदिरचाही मुद्दा सध्या न्यायालयात असल्याने त्यावर काही बोलणे योग्य होणार नाही. मुस्लिम समाजापुढे शिक्षण, अन्न, नोकरी आदी महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. यावर अधिक भर दिला पाहिजे,' असे मत राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी व्यक्‍त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अल्पसंख्यांक समाजाच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने आपण सर्व जिल्ह्यांचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात हज हाउसचे बांधकाम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या कामाला गती देऊन काम चांगल्या प्रकारे व्हावे या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शहराची एअर कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी विषेश लक्ष देण्यात येईल. वक्फ बोर्डाच्या मुख्य अधिकाऱ्याचे रिक्तपद तत्काळ भरावे, असे ते म्हणाले.

हाजी अरफात यांनी शहरातील मुस्लिम, शीख, ख्रिश्‍चन, बौद्ध समाजातील शिष्टमंडळांची भेट घेऊन त्या त्या समाजातील अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अल्पसंख्याक समाजाच्या अडचणी जाणून घेण्यासाठी, तसेच अल्पसंख्याक समाजाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने राज्यातील जिल्ह्यांचा दौरा करत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा नऊ डिसेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर या दौऱ्याचा अहवाल तयार करून, मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल. त्यात दौऱ्यादरम्यान मिळालेल्या तक्रारी, अडचणी व त्यावर उपाययोजना आदींचा समावेश राहील, असेही अरफात यांनी सांगितले.

सोलापुरात उर्दू घराचे बंद पडलेले काम मंत्री विनोद तावडे यांच्या आदेशाने त्वरित सुरू करून घेतल्याचा दावाही त्यांनी केला. मुस्लिम समाजाला काय पाहिजे, समाजातील लोक डॉक्टर, वकिल, इंजिनीअर बनावे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जावू, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 'औरंगाबादचे नाव संभाजीनगर, असे बदलले पाहिजे काय ? या प्रश्नावर मात्र अरफात यांनी देश बदलला पाहिजे,' असे म्हणत या विषयावर बोलणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत

$
0
0

औरंगाबाद: कौटुबिक न्यायालयात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी शनिवारी (८ डिसेंबर) राष्ट्रीय लोक अदालतचे सकाळी साडेदहा वाजता आयोजन करण्यात आल्याचे प्रबंधकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत माजी सैनिकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किरकोळ कारणावरून झालेल्या वादात शेजाऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत माजी सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सातारा परिसरातील सदानंद नगर भागात रविवारी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला. बबन कुंडलिक मगरे (वय ४५) असे या माजी सैनिकाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.

बबन मगरे हे सैन्यदलात नाईक पदावरून निवृत्त झाले होते. एसबीआय बँकेमध्ये ते सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. रविवारी रात्री अकरा वाजता बबन मगरे आणि त्यांच्या पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होता. यावेळी त्यांच्या शेजारी राहणारी दणके नावाची व्यक्ती त्यांच्याकडे आली. तुमच्या नेहमी होणाऱ्या भांडणामुळे आम्हाला त्रास होतो, भांडण करायची असेल तर दुसरीकडे जाऊन रहा, असे दणके याने सांगत शिवीगाळ केली. या कारणावरून मगरे आणि दणके यांच्यात वाद झाला. यावेळी दणके याने त्याच्या पाच ते सहा साथीदारांना बोलावून लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉडने मगरे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये मगरे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. मगरेच्या नातेवाईकांनी त्यांना सुरुवातीला छावणी येथील सैन्यदलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने नंतर खासगी हॉस्पिटल व शेवटी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सोमवारी सकाळी दहा वाजता घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मगरे यांचा मृत्यू झाला. मगरे यांच्या मारेकऱ्यांवर जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मगरे यांच्या नातेवाईकांनी घेतली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यांची समजूत काढली. बबन मगरे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सोमवारी उशिरापर्यंत सुरू होती.



माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष

सैन्य दलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांची भारतीय माजी सैनिक म्हणून संघटना आहे. बबन मगरे हे मुळचे पैठण तालुक्यातील असून माजी सैनिक संघटनेचे ते पैठण तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवाने रद्द केल्यानंतर आता ऑपरेशन थांबविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइल टॉवरचे परवाने रद्द केले. आता त्यांचे ऑपरेशन बंद केले जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली.

शिवसेनेच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी मोबाइल टॉवरचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, 'प्रशासनाने मोबाइल टॉवरचे परवाने रद्द केले, परंतु मोबाइल फोनचे टॉवर उभे केले जात असतानाच त्याचे बांधकाम का थांबवण्यात येत नाही? बांधकाम सुरू असतानाच ते थांबवले पाहिजे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मिलकॉर्नर येथे टॉवरचे बांधकाम सुरू आहे, ते का थांबवण्यात येत नाही.'

सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी उपायुक्त डी. पी. कुलकर्णी यांना खुलासा करण्यास सांगितले. वैद्य म्हणाले, '४८१पैकी ३९५ टॉवर प्रशासनाने अनधिकृत ठरवले आहेत, अशा टॉवरवर प्रशासनाने आतापर्यंत काय कारवाई केली, कोणता निर्णय घेतला याची माहिती सभागृहात द्यावी.'

यावर डी.पी. कुलकर्णी म्हणाले, 'नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घ्या, असे इमारत निरीक्षकांना कळविले आहे. तसे पत्र देखील त्यांना दिले जाईल. परवाने रद्द करण्यात आलेल्या टॉवरचे ऑपरेशन बंद करण्याची कारवाई आता केली जाणार आहे.'

शिवसेनेचे नगरसेवक ऋषिकेश खैरे यांनी एलईडी दिव्यांचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, 'समर्थनगर वॉर्डात आतापर्यंत किती एलईडी दिवे लावले याचा खुलासा झाला पाहिजे. मुख्य रस्त्यांवर हे दिवे लावले आहेत, पण ते नेहमी बंदच असतात.' त्यावर सभापती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना म्हणाले, 'नगरसेविका स्वाती नागरे यांचीही अशीच तक्रार आहे. लावलेले दिवे बंद होत असतील तर त्यांचा दर्जा चांगला नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. दर्जा चांगला नसेल तर काम कसे करता?' विद्युत विभागाचे उपअभियंता के. डी. देशमुख यावर खुलासा करताना म्हणाले, 'समर्थनगर वॉर्डात किती दिवे लावण्यात आले याची माहिती स्थायी समितीच्या पुढील बैठकीत देऊ. शहरात आतापर्यंत १५ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. त्यांचा दर्जा चांगला आहे. हे दिवे कुठे कुठे लावण्यात आले याचीही माहिती पुढील बैठकीत देण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी अध्यक्ष, सीईओंनी चाखली विद्यार्थ्यांसोबत खिचडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांना इन्कॉनतर्फे मिळणारी साजूक खिचडी आता ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळत आहे. जिल्ह्यातील २१ शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. या विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन करण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, सीईओ पवनीत कौर या शाळेत हजर राहिल्या.

सुलतानपूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांसोबत या स्नेहभोजनाचा आस्वाद पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी विद्यार्थ्यांना आनंद द्विगुणीत झाला. यावेळी शिक्षण सभापती मीना शेळके, गटशिक्षणाधिकारी राकेश साळुंके, मुख्याध्यापक शेषराव दांडगे, एस. नवले, कैलास उकिरडे यांची उपस्थिती होती. शहरातील शाळांप्रमाणे आमच्याही शाळेतील विद्यार्थ्यांना अशाप्रकारची खिचड द्यावी,अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्याबाबतचा ठराव घेत जिल्हा परिषदेकडे पाठविला. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. विशेष बाब म्हणून अशा उपक्रमाला मान्यता मिळाली. त्यानंतर सोमवारपासून नियमित खिचडीची सुरू झाली. इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशनतर्फे ही खिचडी पुरविली जाते. सोमवारी हरभरा टहाळ, बोर, पेरू अशी अन्नामृत रानमेवा पोषण टोकरी देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. आजचा मेनू खिचडी, पापड, बुंदी लाडू असा होता. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, उपक्रमाचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त ‘डीवायएसपी’ची औरंगाबादला बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

अॅट्रॉसिटीविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत आलेल्या माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची औरंगाबाद येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

नवटके यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे, त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानंतर बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ही चौकशी पूर्ण करण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आहे. माजलगावचा उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा पदभार गेवराईचे पोलिस उपाधीक्षक अर्जून भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंविरुद्धचा गुन्हा खंडपीठात रद्द

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

परप्रांतियांना महाराष्ट्राबाहेर हाकलण्यावरून राज्यभरातील ठिकठिकाणी आंदोलने, बसवर दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणात बदनापूर (जि. जालना) पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. एल. वडणे यांनी सोमवारी दिला. त्यामुळे राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

'राज ठाकरे झिंदाबाद', 'राज ठाकरेंचा आदेश आहे, परप्रांतियांना हटवा' अशा घोषणा देत २१ ऑक्‍टोबर २००८ रोजी दहा ते १५ अनोळखी व्यक्तींनी राजूर-औरंगाबाद या एसटी बसवर (एम एच २० डी ३६७१) दगडफेक केली होती. याप्रकरणी बसचालक अंबादास तेलंगरे यांच्या तक्रारीवरून थेट राज ठाकरे यांच्यासह इतर दहा ते १५अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले असता न्यायालयाने ठाकरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. बदनापूर न्यायालयात गुन्हा सिद्ध होत नसल्याने दोषमुक्त करण्याची विनंती केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज ठाकरे स्वतः हजर राहत नाहीत तोपर्यंत सुनावणी होणार नाही, असे तोंडी आदेश दिले. या आदेशाविरोधात ठाकरेंनी खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणात २००९ मध्ये खंडपीठाने ठाकरेंविरोधातील दोषारोपपत्राला स्थगिती दिली.

खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेसह इतर आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वारंट (नॉन बेलेबल) जारी केले. सोमवारी हे प्रकरण अंतिम सुनावणीस आले. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला की, ठाकरे यांनी भाषणाद्वारे चिथावणी दिली. या घटनेचे पुरावे पोलिस न्यायालयात सादर करू शकले नाहीत. अंतिम सुनावणीदरम्यान खंडपीठाने राज ठाकरे यांच्याविरोधातील गुन्हा व दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. लड्डा यांना सत्यजित रहाटे, अंकित साबू, सनी खिवंसरा, गुलशन मुंदडा यांनी सहकार्य केले.

\Bत्यावेळी ठाकरे मुंबईत \B

बसवर दगडफेकीची घटना घडली त्या दिवशी राज ठाकरे हे खेरवाडी (मुंबई) पोलिसांच्या ताब्यात होते. दरम्यान, डोंबिवली पोलिसांनी ठाकरे यांचा सदर गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात ताबा घेतला होता. बदनापूर येथे घटना घडली त्या दिवशी ठाकरे हे मुंबईत होते, असा युक्तीवाद सागर लड्डा यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश

$
0
0

औरंगाबाद : अतिरिक्त शिक्षकांचे विनाअनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर समायोजन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत न्या. संभाजी शिंदे व न्या. के. के. सोनवणे यांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जयभवानी विद्यामंदिर शाळेच्या दोन शिक्षिकांच्या सेवा पुढील सुनावणीपर्यंत समाप्त करण्यात येऊ नये, असेही आदेशित केले आहे.

विश्वभारती कॉलनी येथील जय भवानी विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहशिक्षिका कल्पना प्रकाश जाधव व वैशाली अरविंद तोटे यांनी खंडपीठात याचिका केली आहे. विनाअनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर समायोजन करण्यासंबंधीचा दोघींचा प्रस्ताव औरंगाबाद शिक्षणाधिकारी यांनी अमान्य केला होता. शिक्षकांची बाजू विष्णू मदन पाटील यांनी मांडली. या याचिकेची सुनावणी १८ डिसेंबरला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल बसच्या खिडकीतून पडले दोन विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोवर-रुबेला लस घेण्यासाठी शहरातील शाळेत आलेल्या स्कूलबसची मागील काच निखळून दोन विद्यार्थी थेट बसबाहेर फेकले गेले. हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून अत्यंत रहदारीच्या नगरनाका ते लोखंडीपूल या रस्त्यावर पडले तेव्हा वाहनांची संख्या कमी असल्याने अनर्थ टळला. हे विद्यार्थी रांजणगाव येथील शिवाजी हायस्कूलचे असून ४५ विद्यार्थी क्षमतेच्या बसध्ये १२२ विद्यार्थ्यांना कोंबण्यात आले होते. हा अपघात सोमवारी झाला.

रांजणगाव येथील शिवाजी हायस्कूलचे १२२ विद्यार्थी खासगी बसमधून त्याच शाळेची मुख्य शाखा असलेल्या खोकडपुऱ्यातील शाळेत आणण्यात आले होते. लस दिल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन बस दुपारी साडेतीनच्या सुमारास रांजणगावकडे रवाना झाली. नगरनाका येथून लोखंडी पुलाकडे जाताना बसच्या आपत्कालिन बाहेर पडण्याचा मार्ग असलेली काच अचानक निखळून पडली. त्यातून दोन विद्यार्थी बाहेर फेकले गेले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्याने चालकाने बस थांबवून पाहिले असता दोन विद्यार्थी रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसलो. तेजस घोंगडे व सम्राट अभंग, अशी या विद्यार्थ्यांची नावे असून त्यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोन्ही विद्यार्थी इयत्ता दुसरीचे आहेत. बसमधील सर्व विद्यार्थी प्राथमिक वर्गातील आहेत. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बस छावणी पोलिस ठाण्यात आणण्यात आली. अपघातावेळी बसमध्ये १२२ विद्यार्थी असल्याचे पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यासह बसची काच अचानक कशी निखळली, ४५ क्षमता असलेल्या बसमध्ये एवढे विद्यार्थी कसे काय बसवले याची चौकशी पोलिस करत आहेत. चालकाला ताब्यात घेतले असून पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत परोपकारी यांनी 'मटा'ला माहिती दिली.

\Bमान्यताविना शाळा\B

शासनाकडून प्रत्येक शाळेत लस देण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे रांजणगाव येथील शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना खोकडपुऱ्यातील शिवाजी हायस्कूलमध्ये का आणले, असा प्रश्न आहे. रांजणगाव येथे संस्थेच्या दुसऱ्या शाळेसाठी लसीकरणाची तारीख पाच डिसेंबर असताना शहरात आणण्यामागचे कारण गंभीर आहे. रांजणगाव येथे बेकायदा शाळा भरविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. शहरातील शाळेला पटसंख्या कमी होत असल्याने शाळा व्यवस्थापनाकडून राजंणगावात याच नावाने शाळा भरवली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालय काय करते, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांजणगावच्या शिवाजी हायस्कूलला मान्यताच नाही

$
0
0

शिक्षणाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष, बस उलटल्याच्या अफवेने पालकांमध्ये भेदरले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजंणगाव येथे भरणारी शिवाजी हायस्कूलची ही शाळाच बेकायदेशीररित्या भरविण्यात येत होती अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शाळेला औरंगाबादेत खोकडपुरा येथे परवानगी असताना पटसंख्येच्या नावाखाली शाळेनेच 'शाळा' केल्याचे अपघात प्रकरणातून समोर आल्याचे कळते. संबंधित शाळा अनेक वर्षापासून तेथे भरत असतानाही शिक्षणाधिकारी कार्यालय काय करीत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खोकडपुऱ्यात शिवाजी हायस्कूल नावाने शाळा आहे. याच नावाने रांजणगावातही शाळा भरविली जायची व हे विद्यार्थी औरंगाबादेतील शाळेत शिकत आहेत असे दाखविले जात असे. ज्यामुळे विद्यार्थी पटसंख्या पूर्ण दिसत असे, अशी माहिती या प्रकरणातून पुढे येत आहे. याबाबत पालकांनाही कल्पना नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण विभागाला याची माहिती होती. मात्र, मान्यता काढण्याची प्रक्रिया झाली नाही. बसचा अपघात झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. राजंणगाव येथील शिवाजी हायस्कूलच्या आवारात पालक आणि गावकरी जमा झाले होते. बस उलटल्याची अफवा पसरल्यामुळे सर्वच पालक भेदरून गेले होते. शाळेकडून कोणतीही योग्य माहिती न देण्यात आल्याने पालक संतापले होते.

शाळेने एम एच-२० डब्ल्यू ९७५० या बसस्कूलमधून विद्यार्थी लसीकरणासाठी खोकडपुऱ्यातील शिवाजी हायस्कूलमध्ये आणले होते. सायंकाळी अपघात झाल्याचे समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसह बस छावणी पोलिस ठाण्यात आणण्यात आली. सायंकाळी पाचच्या सुमारास पालकांना अपघात झाल्याचे माहिती होताच शाळेत पालक जमा झाले होते. शाळेकडून कोणतीच योग्य माहिती दिली जात नसल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यात बस उलटल्याची अफवा पसरली. त्यामुळे पालक अधिकच घाबरले. काहींनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. तीन तास विद्यार्थी गाडीत बसून होते. त्यानंतर शाळा प्रशासनाने दुसऱ्या बस बोलवित विद्यार्थ्यांना शाळेत पोहचते केले. तोपर्यंत अनेक पालक दाखल झाले होते. त्यांना आपली मुले सुखरुप असल्याचे कळताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आपली मुले पाहताच अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तीन तास गाडीतच ताटकळत बसावे लागल्याने विद्यार्थी भुकेने व्याकूळ झाले होते. घरी जाता येईना अन् काही कळत नसल्याने जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना रडू कोसळले होते. याबाबत मुख्याध्यापक पी. एस. मैंद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद होता.

...

- ४५ क्षमतेच्या गाडीत १२२ विद्यार्थी

- बसमध्ये फक्त शिक्षक होते

- विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शाळेने शांताई विद्यालयाची गाडी घेतली

- बस सुरक्षित आहे की, नाही याकडे दुर्लक्ष

- अपघातानंतर दोन बसमधून विद्यार्थ्यांना रांजणगावला नेण्यात आले

- पोलिसांनी मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली

- पालक मिळेल त्या वाहनाने घाटी आणि पोलिस ठाण्यात पोहचले

- अनेकांना आश्रू रोखता आले नाही

- विद्यार्थी तीन तास पोलिस ठाण्याबाहेर ताटकळले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट कुत्री पकडण्यासाठी कृती कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोकाट कुत्री पकडण्यासाठी झोन कार्यालयनिहाय कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. सध्या रात्री दहापर्यंत कुत्रे पकडण्याचे काम केले जाते, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी देण्यात आली.

'एमआयएम'च्या नगरसेविका शेख नर्गीस यांनी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. त्या म्हणाल्या, 'मोकाट कुत्र्यांची संख्या खूप झाली आहे. प्रशासन मात्र काहीच कारवाई करताना दिवस नाही. मोकाट कुत्र्यांची दहशत प्रामुख्याने लहान मुले व महिलांमध्ये अधिक आहे. शिवसेनेच्या नगरसेविका स्वाती नागरे व शिल्पाराणी वाडकर यांनी देखील कुत्र्यांचा विषय मांडला.

सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी डॉग व्हॅनचे प्रमुख शाहेद शेख यांना खुलासा करण्यास सांगितले. वैद्य म्हणाले, 'कुत्र्यांमुळे दोन मुलांचा मृत्यू झाला. आता तरी गांभीर्याने काम करा. कुत्र्यांबद्दलच्या तक्रारी येऊ देऊ नका.'

खुलासा करताना शाहेद शेख म्हणाले, 'मोकाट कुत्रे पकडण्यासाठी नऊ झोन कार्यालयांतर्गत कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आता काम केले जाईल. सध्या रात्री दहापर्यंत कुत्री पकडण्याचे काम केले जात आहे. प्रभावीपणे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.'

पंतप्रधान घरकुल योजनेसंदर्भातही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, 'पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत पाच हजार घरांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) शासनाला पाठवला होता. शासनाने त्यात त्रुटी काढून तो परत केला. आता नव्याने ७५० घरांचा 'डीपीआर' तयार केला असून, तो शासनाला पाठवण्यात आला आहे. निर्धोक जागांचीच योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.'

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालाजीनगरात कुंटणखान्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बालाजीनगरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत घरमालकीणीसह कुंटणखानाचालक महिलेला गजाआड केले. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात देह प्रतिबंधक विक्री कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजीनगर भागातील एका घरामध्ये गेल्या काही दिवसापासून एक कुंटणखानाचालक महिला तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी पंटर पाठवून सापळा रचला. पंटरने इशारा करताच पोलिसांनी घरावर छापा टाकला. यावेळी पीडित तरुणीसह घरमालकीण व कुंटणखानाचालक महिला घरामध्ये आढळली. पोलिसांनी साठ वर्षांची घरमालकीण आणि ३६ वर्षांच्या कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक केली. आरोपींच्या ताब्यातून ९१ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय अमोल देशमुख, नंदकुमार भंडारे, विकास माताडे, ओमप्रकाश बनकर, सरीता भोपळे, वाघ आदींनी केली.

अडीच हजार रुपयांत सौदा

कुंटणखाना चालवणारी महिला ग्राहकाकडून एका तरुणीसाठी अडीच हजार रुपये घेत होती. यापैकी पाचशे रुपये ती खोली उपलब्ध करून देणाऱ्या घरमालकीणीला तर एक हजार रुपये पीडित तरुणीला देऊन एक हजार रुपये स्वत:ची दलाली म्हणून ठेवत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images