Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिक्षण मंडळात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिक्त पदे तत्काळ भरा या मागणीसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून काम करत, मंडळ प्रशासनाचा निषेध केला.

शिक्षण मंडळात वर्ग-तीन, वर्ग-चारची ४५० पदे रिक्त आहेत. यापैकी सव्वादोनशे पदे भरण्यास दोन वर्षांपूर्वी परवानगी मिळाली. मात्र, मंडळाने ही पदे भरलेली नाही. रिक्त पदांचा आकडा वाढल्याने एक कर्मचारी दोन-दोन पदे सांभाळत आहेत. विद्यार्थी संख्या वाढत आहे. त्यावेळी कर्मचारी पदे भरली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून ही पदे तत्काळ भरली जावीत यासाठी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केले. सोमवारी काळ्या फिती लावून काम केले. दुपारच्या सत्रात सर्व कर्मचारी कार्यालयाबाहेर आले व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी, निदर्शने केले. त्यानंतर सचिवांना मागण्यांचे निवेदन दिले. दिगंबर सूर्यवंशी, सय्यद शाहेद अली, विठ्ठल साखरे, सुदाम चव्हाण, विवेक मुळे, संतोष चौधरी, वाय. जी. नरवडे, पी. ओ. बियाणी, सी. डी. देवढगळे, एस. एस. दलाल, वाय. एम. यादव, व्ही. आर. ढोकर, जी. एल. क्षीरसागर, ए. ए. धोकटे, आर. जी. हिंगे, आर. आर. कुलकर्णी, एन. एस. बेंद्रे, कांता घुसिंगे, पायल कऱ्हाळे, रुपाली काळे, योगिता गायकवाड, आर. एस. शहाणे, एन. एन. ढोके यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राप्तिकर विभागाची धर्मार्थ संस्थांवर नजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर चुकवेगिरी करणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टवर (धर्मार्थ विश्वस्त संस्था) प्राप्तिकर विभागाने करडी नजर ठेवली आहे. गेल्या चार महिन्यांत सहा धर्मादाय संस्थांवर कारवाई करण्यात आली असून तपासणीत सुमारे १३० कोटी रुपयांचे करप्राप्त उत्पन्न शोधून काढण्यात विभागाला यश मिळाले आहे.

प्राप्तिकर विभागाने २०१५-१६पासून धर्मादाय संस्थांसाठी स्वतंत्र संचालनालय सुरू केले आहे. यापूर्वी उद्योग, व्यापाऱ्यांसह अन्य करदात्यांचे विवरणपत्र, कार्यवाही करणारे अधिकारी धर्मादाय संस्थांचे प्राप्तिकर संबंधी काम पाहत असे. औरंगाबाद विभागाच्या अतिरिक्त आयुक्त संदीपकुमार साळुंके असून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यासह नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच नगर आदी १३ जिल्ह्याचा समावेश आहे.

कर चुकवेगिरी केल्याच्या संशयावरून गेल्या चार महिन्यांत विभागाने औरंगाबाद, परभणी, जालना, बीड तसेच अहमदनगर आदी जिल्ह्यातील सात धर्मादाय संस्थांची तपासणी करण्यात आली. यात सुमारे १३० कोटी रुपयांचे करपात्र उत्पन्न शोधण्यात प्राप्तिकर विभागाला यश मिळाले. एका संस्थेने ७० कोटी रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दडवून ठेवले होते. या सर्व करपात्र उत्पन्नावर आतापर्यंत २० कोटी रुपयांचा कर वसूल झाला असून वसूलीचे काम सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

\Bविवरणपत्र भरा अन्यथा कारवाई\B

धर्मादाय संस्थाअंतर्गत नोंदणी असलेल्या शैक्षणिक संस्था, धार्मिक ट्रस्ट आदींना प्राप्तिकरात सवलत दिली जाते. पण त्यांना विवरण पत्र भरणे बंधनकारक असते. अनेक संस्था विवरणपत्र दाखल करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा संस्थांनी विवरणपत्र भरावे, यासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रम विभागातर्फे हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतरही संस्थांनी विवरणपत्र दाखल केले नाही, तर नियमानूसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. काही संस्था पात्र नसतानाही कर सवलतीचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्याने प्राप्तिकर विभागाने आठ संस्थांचे सवलतीसंदर्भातील नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाग्यश्री नवटकेंविरोधात हायकोर्टात जाणारः पोटभरे

0
0

बीड

अॅट्रोसिटी करण्यासाठी आलेल्या दलित-मुस्लिम लोकांना फोडून काढण्याची भाषा करणाऱ्या आणि याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर माजलगावच्या पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांची काल पोलीस प्रशासनाने औरंगाबादला बदली केली आहे. परंतु, नवटके यांच्या बदलीवर आपण समाधानी नसून त्यांची बदली नाही तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना पदावरून निलंबित करा, अशी मागणी तक्रारदार बाबुराव पोटभरे यांनी 'मटा ऑनलाइन'शी बोलताना केली.

अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते. अनुसूचित जातीमधील २१ लोकांना मी फोडून काढले आहे, असे संतापजनक विधान डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांनी केले होते. नवटके यांच्या वादग्रस्त विधानांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काल मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी यांना नेमण्यात आले होते. परंतु, आता या प्रकणाचा तपास बीडबाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

भाग्यश्री नवटके यांच्या बदलीवर मी समाधानी नाही. त्यांच्यावर येत्या आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करा. त्यांना पदावरून निलंबित करा, त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे विधान केले आहे त्यामुळे त्यांना पदावर कायम राहण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांना पदावरून बडतर्फ करून त्यांची रवानगी जेलमध्ये करा. जर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही तर आपण हायकोर्टात याचिका दाखल करू, असा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी 'मटा ऑनलाइन'शी बोलताना दिला.

तुम्ही मराठा आहात म्हणून मी केवळ तुमच्या पाठीवर मारते. जर दलित असतात तर मी त्यांना फोडून काढले असते. एका प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. त्याला अटक करण्याऐवजी मी कशी मदत केली आणि दलित जातींच्या लोकांना कसा धडा शिकवला, याविषयी त्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगताना दिसत आहे. व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सर्वच स्तरांतून टीका होत असून कारवाईची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीः मोबदल्यासाठी शेतकऱ्यानं केला आत्मदहनाचा प्रयत्न

0
0

औरंगाबाद:

समृद्धी महामार्गातील भूसंपादन प्रक्रिया अद्यापही वादात असल्याचं दिसून येत आहे. संपादित जमिनीचा मोबदला लवकरात लवकर मिळावा, यासाठी एका शेतकऱ्यानं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

स्वरुपचंद खोलवाल असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याची ४० गुंठे जमीन पळशी गावात असून, या सर्व जमिनीचे संपादन झाले आहे. मात्र, धनादेश दुसऱ्याच्या नावाने काढण्यात आला आहे, असा दावा खोलवाल यांनी केला आहे. या जमिनीवर सध्या खोलवाल यांचा ताबा आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे, असं उपविभागीय अधिकाऱ्यानं सांगितलं. मुंबई आणि नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, भूसंपादनाचा वाद कायम असल्याचं दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या वर्कऑर्डरला मुहूर्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाने अनुदान दिल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी महापालिकेने कंत्राटदारांना रस्त्यांच्या कामाच्या वर्कऑर्डर (कार्यारंभ आदेश) दिल्या आहेत. वर्कऑर्डर मिळाल्यामुळे कंत्राटदारांनी आता काम सुरू करावे, असे आयुक्त डॉ. निपुण विनायक म्हणाले. ६८ कोटींच्या डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांसाठीही निविदा मागविल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील रस्त्यांची दुर्दशा पाहून राज्य शासनाने जून २०१७मध्ये महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले. अनुदानाची रक्कम देखील पालिकेच्या तिजोरीत जमा केली. शासनाकडून अनुदान मिळाल्यावरही महापालिकेला रस्त्यांची कामे सुरू करता आली नाहीत. कोणत्या रस्त्यांची कामे करायची हे ठरविण्यात सहा ते आठ महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर निविदा काढण्यात आल्या. निविदांचे प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे रस्त्यांचे काम पुन्हा रखडले. दरम्यानच्या काळात महापालिकेने फेरनिविदा काढली. फेरनिविदेचे प्रकरण देखील न्यायालयात गेले. काही इच्छुक कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेला आव्हान दिले होते. महापौर नंदकुमार घोडेले यांनी विनंती केल्यावर त्या कंत्राटदारांनी आव्हान याचिका परत घेतली. त्यानंतर निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शंभर कोटींच्या चार निविदा मागवून चार कंत्राटदारांना त्या देण्यात आल्या. कंत्राटदारांनी निविदेत भरलेले दर आणि आयुक्तांनी ठरविलेले दर यात तफावत होती. अंदाजपत्रकीय दरापेक्षा जास्त दराने काम द्यायचे नाही, असे आयुक्तांनी ठरवल्यामुळे कंत्राटदार आणि आयुक्त यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या. चर्चेच्या नंतर कंत्राटदारांनी अंदाजपत्रकीय दरानुसार काम करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर प्रशासनाने रस्त्यांच्या कामाच्या निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या समोर ठेवल्या. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर कंत्राटदारांना वर्कऑर्डर देणे रखडले होते.

दरम्यान, हायकोर्टात रस्त्यांसंदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी सुरू असताना शंभर कोटींच्या रस्त्यांसाठी कंत्राटदारांना वर्कऑर्डर देण्याचा मुद्दा निघाला, तेव्हा लगेचच वर्कऑर्डर दिली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवारी चारही कंत्राटदारांना वर्कऑर्डर देण्यात आली. वर्कऑर्डर दिली आहे आणि तात्काळ काम सुरू करा, असे कंत्राटदारांना सांगितले आहे, असे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांसाठीही फेरनिविदा मागविल्या आहेत, असे ते म्हणाले. शंभर कोटींच्या अनुदानातून ३१ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत, तर ६८ कोटींच्या डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून १९ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

कामे सुरू करताना संबंधित रस्त्यांची माहिती असलेले फलक लावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते जमीर कादरी यांनी केली. फलकावर रस्त्याची लांबी, रुंदी, खर्च, कंत्राटदाराचे व महापालिकेच्या अभियंत्याचे नाव, काम पूर्ण करायचा कालावधी याची नोंद असली पाहिजे, असे ते म्हणाले. रस्त्यांच्या कामात दर्जाबद्दल तडजोड करू नका, अशीही मागणी त्यांनी केली.

\B२४ डिसेंबर रोजी कामाला प्रारंभ\B

रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी महापौरांनी २४ डिसेंबरचा मुहूर्त ठरवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रस्ते कामाची सुरुवात केली जाणार आहे. या दोघांनाही निमंत्रण देण्यासाठी पुढील आठवड्यात पालिकेचे पदाधिकारी मुंबईला जाणार आहेत. याचवेळी सिटी बससेवेचेही उद्घाटन केले जाणार आहे.

\Bमटा भूमिका

कामे लवकर व्हावीत

\Bमहाराष्ट्र सरकारने औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी महापालिकेला शंभर कोटी रुपये दिले. सरकारकडून निधी मिळाल्याने शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेचे दशावतार संपतील, असे वाटत होते. प्रत्यक्षात महापालिकेत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या पातळीवरील सावळ्या गोंधळात सरकारने दिलेले पैसे बँकेत पडून राहिले. रस्त्यांची निवड करण्यापासून गोंधळ सुरू होता. मुळात महापौर व अन्य पदाधिकारी हे कोण्या एका पक्षाचे किंवा एखाद्या वॉर्डापुरते मर्यादित नसतात. त्यांच्यावर संपूर्ण शहरातील कामांची जबाबदारी असते. आपण संपूर्ण शहराचे कारभाही आहोत, याचे भान त्यांना असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच असते, याचा अनुभव रस्त्यांच्या निवडीमध्ये आला. रस्त्यांच्या निवडीनंतर निविदा प्रक्रिया झाली आणि हे प्रकरण हायकोर्टात पोचले. शेवटी कोर्टाने महापालिकेचे कान उपटले. रस्त्यांच्या कामाला लवकर सुरुवात करू, असे महापालिकेला हायकोर्टात सांगावे लागले. त्यानंतर आता या कामांच्या वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत. रस्त्यांची ही कामे औरंगाबाद शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासांत मैलाचा दगड ठरणार आहेत. रस्त्यांसाठी महापालिकेला प्रथमच एवढा मोठा निधी मिळालेला आहे. त्यामुळे येत्या काळात शहरातील महत्त्वाचे रस्ते चांगले होतील, अशी आशा आहे. महापालिकेने आता रस्त्यांच्या कामांना लवकर सुरुवात केली पाहिजे.\B

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदहनाचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन केल्याने भूमिहीन झालेल्या शेतकऱ्याने मोबदल्याच्या मागणीसाठी मंगळवारी (४ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या वेळीच लक्षात आल्याने शेतकऱ्याचे प्राण वाचले. स्वरुपचंद खोलवाल, असे या शेतकऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

समृद्धी महामार्गाचे पूर्ण भूसंपादन झाल्याचा डंका प्रशासन पिटत असताना महामार्गासंबंधी शेतकऱ्यांच्या अडचणी मात्र कायम आहेत. महालपिंप्री येथील शेतकरी स्वरुपचंद खोलवाल यांची पळशी शिवारात गट क्रमांक ३०४ मध्ये शेत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ०.४० आर जमीन संपादित केली आहे. सातबारावर माझेच नाव असूनही दुसऱ्याच व्यक्तीला धनादेश देण्यात आला, असे खोलवाल यांनी सांगितले. 'या संदर्भात जिल्हा प्रशासनास अनेकदा निवेदने दिली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. सातबारा रेकॉर्ड, फेरफार रेकॉर्डप्रमाणे ताबा असलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा,' अशी त्यांची मागणी आहे.

शेतकरी आत्मदहन करणार असल्यामुळे सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस बंदोबस्त लावला होता. खोलवाल यांनी मंगळवारी सकाळी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांच्या हातातून रॉकेलची बाटली हिसकावून घेत ताब्यात घेतले. खोलवाल यांना सिटीचौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. समृद्धी महामार्गप्रकरणी धुळे येथील ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी यावर्षी जानेवारीत मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या आठवड्यातच औरंगाबाद जिल्ह्यातही शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.

\Bअधिकारी काय म्हणतात\B

या संदर्भात उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, या शेतकऱ्याची गट क्रमांक ३०४ मध्ये जमीन आहे. त्यांचे नाव सातबाऱ्यावरही आहे. मात्र त्यांच्या जमिनीचा कोणताही भाग समृद्धी महामार्गाच्या क्षेत्रामध्ये संपादित करण्यात आलेला नाही. त्यामुळे मोबदल्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय हे प्रकरण न्यायालयात होते, असे बाणापुरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरा गोल्ड ग्रुपच्या कार्यालयाची आर्थिक गुन्हे शाखेकडून झाडाझडती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आकर्षक नफ्याचे आमिष दाखवून महिलांना गंडा घालणाऱ्या हिरा गोल्ड ग्रुपच्या जुना बाजार येथील कार्यालयाची मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने झाडाझडती घेतली. या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून प्रमुख आरोपीच्या अटकेसाठी लवकरच एक पथक मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली.

जुना बाजार परिसरात पाच वर्षांपूर्वी हैदराबादच्या हिरा गोल्ड ग्रुपची नौहिरा शेख हिने कार्यालय उघडले होते. अनेक महिलांकडून तिने गुंतवणुकीपोटी लाखो रुपये उकळले होते. यावेळी तिने गुंतवणूकदारांना भागीदारी तत्त्वावर सभासद वाटून देत बँकेतील गुंतवणुकीवर नफ्याचे आमीष दिले होते. अनेक सभासदांनी या आमिषाला भुलून पावणेनऊ लाखांची रक्कम गुंतविली होती. सभासदांनी गुंतविलेल्या रकमेची जमा झालेल्या प्रतीची कॉपी देखील गुंतवणूकदारांना देण्यात येत असल्याने त्यांचा नौहिरा शेखवर विश्वास बसला होता. यानंतर अचानक नौहिरा शेख परागंदा झाली होती. याप्रकरणी तिच्या विरुद्ध गुंतवणूकदारांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता. मंगळवारी पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले आणि पथकाने जुना बाजार येथील हिरा गोल्डच्या कार्यालयाची तपासणी करीत महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरत्या पथकाद्वारे १३ हजार तपासण्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मोबाइल आयसीटीसी व्हॅन'च्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांत १२ हजार ८९९ ट्रकचालक, कामगार, मजूर व स्थलांतरित व्यक्तींची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असून, यात ३७ व्यक्ती 'एचआयव्ही'बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या व्यक्ती रुग्णालयापर्यंत येऊ शकत नाही किंवा येण्यास इच्छुक नसतात अशा व्यक्तींच्या तपासण्यांसाठी प्रयत्न होत आहेत.

'एचआयव्ही'च्या तपासण्या, निदान, समुपदेशन आदींसाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे. ही पथके जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत कार्यरत असतात आणि या पथकामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 'आयसीटीसी' केंद्र चालवले जाते. याच आयसीटीसी केंद्रांअंतर्गत तपासण्या, समुपदेशनाचे काम होते. औरंगाबाद जिल्ह्यात २३ आयसीटीसी केंद्र आहेत. त्याचबरोबर 'मोबाइल आयसीटीसी व्हॅन'देखील जिल्ह्यात कार्यरत आहे. 'मोबाइल आयसीटीसी'मार्फत ज्या व्यक्ती सतत फिरत्या असतात आणि रुग्णालयामध्ये येत नाही, अशा व्यक्तींच्या एचआयव्ही तपासण्या फिरत्या पथकामार्फत केल्या जातात. विशेषतः गावोगावी फिरणारे ट्रकचालक, उसतोडणी मजूर, इतर मजूर, कंपन्यांमधील कामगार-कर्मचारी अशांच्या तपासण्या 'मोबाइल आयसीटीसी'मार्फत करण्याचा प्रयत्न असतो. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये २०१६ पासून ही सुविधा उपलब्ध झाली आहे. २०१६ पासून ऑक्टोबर २०१८ पर्यंत १२,८९९ इतक्या व्यक्तींच्या तपासण्या झाल्या आहेत, तर याच कालावधीत ३७ व्यक्ती 'एचआयव्ही'बाधित असल्याचे निदान झाले आहे. अशा 'एचआयव्ही'बाधित व्यक्तींचे समुपदेशन करून त्यांच्यावर 'एआरटी सेंटर'मार्फत उपचार सुरू केले जातात. औरंगाबाद जिल्ह्यात तीन एआरटी सेंटर असून, या केंद्रामार्फत ५ हजार ४२३ 'एचआयव्ही'बाधितांवर उपचार केले जात आहेत. 'आयसीटीसी'मार्फत तपासण्या करून बाधित व्यक्तींना एआरटी सेंटरपर्यंत आणून सोडण्याचे महत्वपूर्ण काम केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून 'मोबाइल आयसीटीसी व्हॅन'देखील कार्यरत आहे, असे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मंगेश गायकवाड, जिल्हा पर्यवेक्षक संजय पवार यांनी सांगितले.

\Bएमआयडीसी क्षेत्रात तपासण्या

\B'मोबाइल आयसीटीसी व्हॅनच्या पथकामध्ये एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक समुपदेशक, एक चालक व एक क्लिनरचा समावेश असून, स्वयंसेवी संस्थेमार्फत वाळूज एमआयडीसी, शेंद्रा एमआयडीसी, चिकलठाणा एमआयडीसी क्षेत्रातील अधिकारी-कामगार-कर्मचाऱ्यांच्या सातत्याने तपासण्या केल्या जातात. तसेच जिल्ह्यात येणारे उसतोड कामगार-मजुरांच्या तपासण्यांसाठी शिबिरे आयोजित केली जातात. कंपन्यांनी मागणी केल्यास अशा कंपनीमध्येही शिबिर आयोजित केले जाऊ शकते,' असेही जिल्हा कार्यक्रम अधिकारी गायकवाड म्हणाले.

स्थलांतरितांच्या एचआयव्ही तपासण्या व्हाव्यात व बाधित व्यक्तींवर लवकरात लवकर उपचार सुरू व्हावेत, या उद्देशाने 'मोबाइल आयसीटीसी व्हॅन' कार्यरत आहे. या अंतर्गत आतापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त तपासण्या झाल्या आहेत. महिन्यातील सुमारे १५ दिवस अशी शिबिरे घेतली जातात. या अंतर्गत वाळूजमधील 'ट्रक टर्मिनस' परिसरात थांबलेल्या ट्रक चालकांच्याही तपासण्या केल्या जातात.

\B- डॉ. सुंदर कुलकर्णी\B, जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कैलास पाटील यांची नियुक्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या ‌निवडीनंतर तब्बल आठ महिन्यानंतर औरंगाबादला जिल्हाध्यक्ष मिळाला असून औरंगाबाद (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी कैलास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच कार्याध्यक्षपदी अभय चिकटगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीन डिसेंबर रोजी निवड जाहीर करून पत्र दिले. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचे गुऱ्हाळ सुरू होते. वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. २०१९च्या निवडणुका जवळ येत असल्याने त्यांना त्यांच्या मतदारसंघातच लक्ष घालायला वेळ कमी पडतो. त्यामुळे मला मतदारसंघातच लक्ष घालू द्या, असे म्हणत त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काढण्याचे सांगितले होती. आगामी निवडणुका लक्षात घेता या निवडी होण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ दौऱ्यापूर्वीच प्रशासनाची दमछाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक बुधवारपासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालय दुष्काळ नियोजनाच्या तयारीला लागले आहे, मात्र, कृषी विभाग तसेच इतर जिल्ह्यांकडून माहिती मिळविताना मंगळवारी (४ डिसेंबर) प्रशासनाची दमछाक उडाली.

दुष्काळाच्या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पाहणीसाठी येणारे अधिकारी बैठक घेणार आहेत. दुष्काळाचे मोजमाप करण्यासाठी जाणाऱ्या पथकाला परिस्थितीची नेमकी माहिती व्हावी यासाठी विविध विभागांकडून पीपीटी तसेच संबंधित माहिती मागविण्यात येणार आहे. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंतही कृषी विभागाकडून पीपीटी विभागीय कार्यालयाला मिळाली नव्हती. शिवाय जिल्हा प्रशासनानेही दुष्काळी पथक नेमके कोणत्या गावाला भेटी देणार आहेत याबाबतचीही माहिती पाठविली नव्हती, तर काही जिल्ह्यांमधून नियोजनामध्ये वारंवार बदल होत असल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची चिडचीड सुरू होती.

दरम्यान, बुधवारी (५ डिसेंबर) सकाळी नऊ ते साडेदहा दरम्यान विभागीय आयुक्‍तालयात या पथकासमोर दुष्काळीस्थितीची माहिती सादर करण्यात येणार आहे. यानंतर एक पथक औरंगाबाद जिल्हात भेटी देऊन जळगावकडे रवाना होईल. दुसरे पथक जालना येथून बुलडाणा येथे रवाना होईल. तर तिसरे पथक पुण्याच्या दिशेने रवाना होईल. मराठवाड्यात दोन दिवस पाहणी करण्यात आल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिन्ही पथके मुंबईत एकत्र येऊन बैठक घेतील, असे आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. यंदा अत्यल्प पावसामुळे राज्य सरकारने १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला, त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी राज्यातील २६८ महसुली मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर करुन सवलती देण्याचे जाहीर केले. यामध्ये मराठवाडा विभागाचा बहुतांश भागाचा समावेश करण्यात आला आहे, विभागात दुष्काळामुळे खरीप आणि रबी पिकांची धुळधाण उडाली असून पेरणीचा खर्च निघेल एवढेही उत्पन्न मिळाले नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले आहे. दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर निधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

मराठवाड्याची ‌स्थिती

पर्जन्यमान - ५०१.७४ मिमी (सरासरीच्या तुलनेत ६४.४१ टक्के)

५० टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान तालुके - ११,

५० ते ७५ टक्के - ४९

७५ ते १०० टक्के - ८८

१०० टक्क्यांपेक्षा अधिक - २०

पाणीसाठा

मोठे प्रकल्प - २५.९३ टक्‍क्के

लघु प्रकल्प - १४.८६ टक्के

एकुण पाणीसाठा - २२.६३ टक्के

जायकवाडी - २७.०० टक्‍के

पैसेवारी (खरीप)

हंगामी - ५० पैसे खालील गावे - २९५८ (औरंगाबाद १३३५, जालना - ९९२, बीड- ६७१)

सुधारित - ५० पैसे खालील गावे - ६४५८ (औरंगाबाद १३३९, जालना - ९७१, परभणी ७५४, नांदेड - ३०५, बीड - १४०२, लातूर ९५१, उस्मानाबाद ७३६)

टँकर

एकूण - ५१८

औरंगाबाद ४०८, जालना ६१, नांदेड २, बीड ४२, उस्मानाबाद ४.

गेल्या पाच वर्षातील स्थिती - २०१३-१४ - २१३६, २०१४-१५ - १४४४, २०१५-१६ - ४०१५, २०१६-१७ - ९४०

विहीर अधिग्रहण

एकुण - ३८७

औरंगाबाद २१३, जालना ७५, नांदेड २, बीड ३४, उस्मानाबाद ६३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाधिकारी जयस्वालांची झेडपी सीईओंकडे तक्रार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल हे शिक्षकांशी अरेरावीने बोलतात, अशी गंभीर तक्रार मंगळवारी काही संघटनांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली. जयस्वाल यांना पदावरून बरखास्त करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्य तक्रारदार महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रवक्ते बाळासाहेब गरुड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणाधिकारी जयस्वाल यांची वर्तणूक अत्यंत बेताल, उद्दाम आणि महिलांविषयी अत्यंत घाणेरडी आहे. दालनात आलेल्या प्रत्येकाला ते अपमानास्पद वागणूक देतात. याबाबत अनेक तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. ३० नोव्हेंबर रोजी मला याचा अनुभव आला. माझ्यासमोर एका महिलेला त्यांनी असभ्य वागणूक केली. त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून बरखास्त करण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संभाजी ब्रिगेड, महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, मराठा मावळा संघटना, शिवप्रहार, झुंझार छावा संघटना, महात्मा फुले शिक्षक परिषद आदी संघटनेचे प्रतिनिधींची उपस्थिती होते.

\Bपोलिसांत तक्रार करणार \B

हे आरोप बिनबुडाचे असून गरुड हे व्यक्तिगत द्वेषापोटी आरोप करत आहेत. गरुड यांनी सोशल मीडियावर माझ्याबाबत उलटसुलट भाषा वापरून पोस्ट टाकल्या आहेत. तज्ज्ञाचा सल्ला घेऊन पोलिसांकडे तक्रार करणार आहे, असे शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारातील आरोपी जिल्हा कोर्टात शरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील दहावीच्या विद्यार्थिनीवर (वय १६ वर्षे) म्हैसमाळ येथील हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याच्या प्रकरणातील पसार आरोपी अक्षय संजय सोळंके हा सोमवारी (३ डिसेंबर) जिल्हा कोर्टात शरण आला. तो गुन्हा घडल्यापासून पसार होता व जिल्हा कोर्ट आणि मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्याला मंगळवारी कोर्टात हजर केले असता, गुरुवारपर्यंत (६ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी दिले.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. ही मुलगी २० जुलै २०१८ रोजी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. ती नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आली नसल्याचे तिच्या वडिलांनी तिच्या आईला फोनवरून दुपारी दीड वाजता कळवले होते. त्यानंतर मुलगी दुपारी चारच्या सुमारास घरी आली. तिला दुसऱ्या दिवशी विश्वासात घेऊन विचारल्यानंतर, 'अक्षय संजय सोळंके (वय २२, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) याची तीन-चार महिन्यांपूर्वी एका लग्नात ओळख झाली होती. तो २० जुलै रोजी दुचाकीवर शाळेच्या गेटवर आला व लग्नाचे आमीष दाखवून म्हैसमाळच्या हॉटेलवर नेले व तिथे बलात्कार केला. कुणाला काही सांगितल्यास बदनामी करेन', अशी धमकी दिल्याचे मुलीने पालकांना सांगितले.

या प्रकरणी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंवि ३६६ (अ), ३७६ (३), ५०६, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) ४ व ३(२)(va) कलमान्वये सिडको पोलिस ठाण्यात ४ ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bदुचाकी, कपडे जप्त करणे बाकी

\Bया प्रकरणातील आरोपीला सोमवारी सायंकाळी साडे सात वाजता अटक करून मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. आरोपीची वैद्यकीय तपासणी, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व कपडे जप्त करावयाचे आहेत. साथीदारांचाही तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या ३३ शाळांत बहरली उद्याने

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या शाळा बालोद्यानाने बहरत आहेत. महापालिकेचा निधी न घेता शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी पुढाकार घेऊन शाळांचा चेहरामोहरा बदलला आहे. रम्य परिसरात चांगल्या दर्जेदार शिक्षणाचा अनुभव आता विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

महापालिकेच्या शहरात ७२ शाळा असून त्यापैकी ३३ शाळांमध्ये बालोद्यान तयार करण्याची कल्पना आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मांडली. या ३३ शाळांना संरक्षक भित असून पाण्याची व्यवस्था आहे, शिवाय शाळांचा परिसरही मोठा आहे. त्यामुळे या शाळांची निवड बालोद्यान प्रकल्पासाठी करण्यात आली. महापालिकेचा निधी न वापरता शिक्षकांनी विद्यार्थी, पालकांच्या मदतीने शाळा सजवावी, परिसर स्वच्छ करावा, रंगरंगोटी करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

या निवडलेल्या ३३ शाळांपैकी नऊ शाळांची पाहणी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी केली. शाळांच्या भिंती रंगात न्हाऊन निघाल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्राणी, पक्षी, वृक्ष आदी चित्रे रंगवून भिंती सजवण्यात आल्या आहेत. शाळेच्या आवारात वेगवेगळे प्रयोग करून परिसर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे पाहणीनंतर लक्षात आले. शिक्षकांनी केलेल्या कामांबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. उत्कृष्ट काम केलेल्या शाळांच्या शिक्षकांचा सन्मान केला जाईल, असे ते म्हणाले.

उपक्रमांवर भर

काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनकट्टा तयार केला आहे. काही शाळांमध्ये विज्ञानावर आधारित उपक्रम करण्यात आले आहेत. या शाळांतून हसत खेळत शिक्षणाचा प्रत्यय येतो. झाडांना बांधलेले झोके, पक्ष्यांचे घरटे, पक्ष्यांच्या दाणा-पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, अशा अनेक नवीन उपक्रमांची ओळख या शाळांमधून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूलबस चालक मालकांची बोलावणार बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्कूलबसच्या खिडकीतून मुले पडण्याची घटना शहर पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. या संदर्भात वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. पुढील आठवड्यात शहरातील स्कूल बस चालक व मालकांची बैठक पोलिस आयुक्तालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी दिली.

सोमवारी रांजणगाव येथील शिवाजी हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील बालकांना लसीकरणासाठी शहरात आणले होते. लसीकरणानंतर एका बसमध्ये तब्बल १२२ चिमुकल्यांना कोंबून पुन्हा रांजणगावकडे नेण्यात येत होते. नगरनाका येथे बसची मागील काच निखळल्याने दोन मुले खाली पडून गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे स्कूल बसच्या वाहतूक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत स्कूल बस चालक व मालक तसेच शाळा व्यवस्थापनांची बैठक पुढच्या आठवड्यात बोलावण्यात येणार असल्याची माहिती दीपाली धाटे घाडगे यांनी दिली. बैठकीत वाहतूक शाखेच्या शहर, सिडको, छावणी व वाळूज महानगर येथील अधिकाऱ्यांचा देखील समावेश असणार आहे. या बैठकीमध्ये स्कूल बसची वाहतुकीसाठी फिटनेस, त्यांची बांधणी, त्याचा कालावधी, बसमध्ये बसविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, सीसीटीव्ही कॅमेरे, चालक प्रशिक्षित आहे का, आदी बाबींवर चर्चा व सूचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या बसची आरटीओकडून तपासणी

दरम्यान, सोमवारी झालेल्या अपघातातील स्कूल बस छावणी पोलिस ठाण्यात उभी करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. या अपघातग्रस्त बसची तपासणी मंगळवारी आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. या संदर्भात अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ चे नामांतर; आचारसंहितेपूर्वी काम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वादग्रस्त ठरलेल्या समांतर जलवाहिनी योजनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी 'गंगा गोदावरी पेयजल योजना' असे नामांतर केले आहे. या योजनेचे काम लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

महापालिका वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर महापौर घोडेले व आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी घोडेले म्हणाले की, समांतर जलवाहिनी हे पाणीपुरवठा योजनेचे असून तिला वेगळे कोणतेही नाव दिले नव्हते. मात्र, समांतर जलवाहिनीचा विषय येताच विशिष्ट कंपनीचे नाव पुढे येते. त्यामुळे योजनाला 'गंगा गोदावरी पेयजल योजना' असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. या नावाने समांतर जलवाहिनी योजना ओळखली जाईल. काम करणाऱ्या कंपनीबद्दल मतभेद असू शकतात, पण योजनेबद्दल कुणाचेही मतभेद नाहीत. पाणीपट्टी वाढीचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडणार नाही यासाठी कटीबद्ध असल्याचे महापौरांनी सांगितले.

'जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे काम प्राधान्याने झाले पाहिजे. या कामासाठी महापालिकेकडे निधी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सरकारी वकील यांच्याकडून जलवाहिनीच्या कामाबद्दल आठ दिवसांत अभिप्राय प्राप्त होईल, त्यानंतर शासनाला व न्यायालयाला माहिती दिली जाईल. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे,' असे ते म्हणाले.

राकाज क्लब, पद्मपुरा येथील पालिकेची प्रशासकीय इमारत, गरवारे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव, आकृतीबंध, रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आदी बारा विषय ऐरणीवर आहेत. प्रत्येक विषयाला एक अधिकारी नियुक्त करण्याबद्दल आयुक्तांशी चर्चा झाली आहे. या सर्व कामांना गती दिली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

\Bनामांतर काय करता, अगोदर काम करा \B

समांतर जलवाहिनी योजनेचे नामांतर काय करता, अगोदर काम करा, असा टोला विरोधी पक्षनेते जमीर कादरी यांनी महापौरांना लगावला. 'बच्चा पैदा नहीं हुवा और नाम देनेकी बात चल रही है,' अशी शब्दात त्यांनी टोमणा मारला. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे काम प्राधान्य व वेगात झाले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवगिरी कॉलेजमध्ये शनिवारी विज्ञान प्रदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देवगिरी ज्युनिअर कॉलेजतर्फे आठ डिसेंबर रोजी (शनिवार) विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज यात सहभागी होणार आहे. एका संघात दोन ते तीन विद्यार्थी असतील. विद्यार्थ्यांना प्रयोग सादरीकरणासह संक्षिप्त गोषवारा सादर करणार आहेत. प्रदर्शनासाठी उपयोजित जीवशास्त्र, पर्यावरण, प्रदूषण, मानवी संरचना, माहिती व संदेशवहन यंत्रणा, उर्जेचे स्त्रोत, दैनंदिन जीवनातिल विज्ञान व तंत्रज्ञान त्याचा वापर अशा विषयावरील प्रयोग आहेत. शिक्षणाधीकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंडितराव हर्षे, डॉ. निलिमा सावंत, प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे, उपप्राचार्य रजनीकांत गरूड, समन्वयक प्रा. मनिषा जाधव, डॉ. के. बी. माळी यांची उपस्थिती असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशपत्राशिवाय परीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी, विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. अभियांत्रिकीत 'डिझाइन डाटा हँड बूक' वापरू न दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याचवेळी अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीटशिवाय (प्रवेशपत्र) परीक्षा द्यावी लागली. विधी अभ्यासक्रमात मराठीतून पहिल्यांदा उत्तरे लिहण्याची मुभा होती. मात्र, प्रश्नपत्रिकेवर त्याचा उल्लेख नसल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले.

विधी, अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांच्या पदवी परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल शाखेतील तृतीयवर्षातील विद्यार्थ्यांचा 'डिझाइन ऑफ मशिन इलिमेंट्स' विषयाची मंगळवारी सकाळी परीक्षा होती. या विषयासाठी विद्यार्थ्यांना 'डिझाइन डाटा हँड बूक' वापरू दिले जाते. प्रश्नाचे उत्तर शोधताना त्याचा उपयोग होतो. ज्यामध्ये फार्मुला नसतो केवळ डाटा असतो. मंगळवारी झालेल्या पहिल्याच पेपरला औरंगाबाद येथील श्रीयश अभियांत्रिकी केंद्रावर काही विद्यार्थ्यांनी 'डिझाइन डाटा हँड बूक' वापरू दिले जात नसल्याचा आरोप केला. त्याबाबत काही विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडेही धाव घेतली. मात्र, तोपर्यंत परीक्षा संपली होती. तर, प्राचार्यांनी हे 'डाटा बूक' नव्हते, तर त्यात थेट फार्मुले होते. त्यामुळे ही पुस्तके ताब्यात घेतल्याचे सांगितले. विद्यार्थी कॉपीसाठी अशा प्रकारची शक्कल लढवते, असे प्राचार्य डॉ. आर. एस. पवार यांनी 'मटा'ला सांगितले. त्यामुळे पहिल्याच पेपरनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

\Bहॉलतिकीटविना परीक्षा\B

अभियांत्रिकी परीक्षा हॉलतिकीट शिवाय देण्याची वेळ काही विद्यार्थ्यांवर आली. विद्यापीठाने परीक्षेच्या तोंडावर रिड्रेसलचा निकाल जाहीर केला. परीक्षा मंगळवार सुरू होणार होती अन् रविवारी सायंकाळी रिड्रेसलचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर नापास विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही कॉलेजांनी रविवारीच परीक्षा शुल्क भरून विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या नोंदी केल्या. विद्यापीठाच्या या कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तयार होऊ शकले नाहीत. त्यांच्याकडे प्रवेशावेळी विद्यापीठाने दिलेला 'पीएनआर नंबर'वर परीक्षेला बसविण्यात आले. अशा विद्यार्थ्यांची संख्या एका केंद्रावर ६० ते ७०च्या आसपास असल्याचे प्राचार्यांनी 'मटा'ला सांगितले.

\B'विधी'त पहिल्यांदाच मराठी, विद्यार्थ्यांना संभ्रम\B

विधी अभ्यासक्रमाची परीक्षाही मंगळवारपासून सुरू झाली. यंदापासून विद्यार्थ्यांना मराठीत उत्तरे लिहण्याची मुभा देण्यात आली आहे. उत्तीर्णतेच्या टक्केवारीची अट शिथील करणे, मराठीत उत्तरे लिहण्याची मुभा देणे, असे निर्णय विद्यापीठाने घेतले आहेत. परीक्षा इंग्रजीसह मराठी भाषेत देण्यात येणार, असे परिपत्रक विद्यापीठाने काढले होते. मात्र, मराठीबाबतचा कुठलाही उल्लेख प्रश्नपत्रिकेवर किंवा उत्तरपत्रिकेवर करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मराठीमध्ये उत्तरे लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

\Bअभियांत्रिकीचे परीक्षार्थी ३५६५४

औषधनिर्माणशास्त्रचे परीक्षार्थी ६८३५

विधी अभ्यासक्रमाचे परीक्षार्थी २६८५\B

सर्व परीक्षा केंद्राचा आढावा घेतला असून परीक्षा सुरळीत सुरू झाल्या आहेत. कोठेही अनूचित प्रकार घडला नाही. 'डाटा हँड बूक'बाबत काही कल्पना नाही. तशा प्रकारची तक्रार ही आलेली नाही.

-डॉ. जयश्री सूर्यवंशी संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ स्कूलबसचा परवाना तात्पुरता रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

स्कूलबसच्या अपघातात दोन मुले जखमी झाल्याच्या घटनेनंतर आरटीओच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह मोटार वाहन अधिकाऱ्यांनी या स्कूल बसची (एमएच- २० डब्लू ९७५०) तपासणी केली. त्यानंतर या बसचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.

ही बस बजाजनगर येथील शांताई विद्यानिकेतन शाळेची आहे. सोमवारी (३ डिसेंबर) शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना रूबेला लसीकरणास नेण्यासाठी ही बस देण्यात आली होती. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते, मोटार वाहन निरीक्षक रवींद्र यादव, आरती देसाई यांच्या पथकाने मंगळवारी (४ डिसेंबर) छावणी पोलिस ठाण्यासमोर उभ्या केलेल्या या बसची तांत्रिक तपासणी केली. दहा वर्षांपूर्वी (वर्ष २००८) तयार करण्यात आलेल्या या बसची ऑगस्टमध्ये फिटनेस तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत बसच्या काचांचे रबर झिजलेले आढळले. अपघातग्रस्त बसच्या याच काचेवर विद्यार्थ्यांनी दाब दिल्याने ही काच निखळून पडली, असा प्राथमिक निष्कर्ष या पथकाने काढला. या पथकाने बसचा परवाना तातडीने निलंबित केला. बसच्या सर्व खिडक्‍यांच्या काचांचे रबर बदलण्याबाबतही संबंधित मालकाला सूचना करण्यात आली.

………

पोलिसांच्या अहवालानंतर कारवाई करणार

या स्कूल बसमध्ये १२२ विद्यार्थी होते. क्षमतेपेक्षा खूप जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक या बसमधून होत होती. त्यासंदर्भात पोलिसांचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती नखाते यांनी दिली.

शहातील स्कूल बसची सद्यस्थिती

शाळांच्या मालकीच्या बस - ३३२

खासगी मालकीच्या बस - ११५५

……

७० स्कूल बस विनापरवाना

शहरात आणि जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या स्कूल बसची पाहणी तसेच त्याची तपासणी आरटीओ विभागाकडून करण्यात आली होती. या कारवाईत १०६ स्कूल बसचे फिटनेस प्रमाणपत्र घेतले नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्या स्कूलचा परवाने रद्द करण्यात आले होते. या १०६ स्कूल बसपैकी ७० पेक्षा अधिक स्कूल बस विनापरवाना धावत असल्याची शक्यता आरटीओ विभागाने व्यक्त केली.

सोमवारच्या घटनेनंतर लवकरच शहरातील सर्व स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या तपासणीत बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आढळल्यास संबंधित स्कूलबसची नोंदणी रद्द करण्यात येईल.

श्रीकृष्ण नकाते, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीबीटी’विरुद्ध एल्गार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेशनवरील धान्य देण्याऐवजी लाभार्थींच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा करून सरकार गेल्या ६३ वर्षांपासूनची सार्वजनिक वितरण प्रणाली मोडीत काढत आहे. यामुळे रेशन व्यवस्था संपुष्टात येणार असल्याने सरकारच्या 'डीबीटी' धोरणाविरोधात मंगळवारी (चार डिसेंबर) औरंगाबाद जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर फेडरेशनचे अध्यक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केले. आमखास मैदानात आयोजित सभेमध्ये मोदी यांनी 'डीबीटी', रोख सबसीडी म्हणजे मृत्यूदंड असून, सरकारने यावर विचार करावा अन्यथा आगामी निवडणुकीमध्ये संघटनेची शक्ती दाखवू, असा इशारा दिला.

दुपारी बारा वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील रेशन दुकानदार; तसेच लाभधारकांनी क्रांतीचौकात मोर्चासाठी मोठी गर्दी केली होती. प्रल्हाद मोदी, डी. एन. पाटील, विश्वंभर बसू, चंद्रकांत यादव, आर. एल. आंबुलकर यांची उपस्थिती होती. मोर्चा क्रांतीचौक, पैठणगेट, किलेअर्कमार्गे आमखास मदौनावर गेल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले. यावेळी सभेसाठी आमदार अब्दुल सत्तार, कृष्‍णा पाटील डोणगावकर, संतोष माने आदींची उपस्थिती होती.

यावेळी मोदी म्हणाले की, सरकारला वाटत असेल की रेशन दुकानदार काळाबाजार करतात, तर सरकारने रेशन दुकानदारांना प्रतिमहिना ५० हजार रुपये पगार द्यावा. थेट लाभाची योजना राबवल्यास मृत्युदंड दिल्यासारखे होईल. लाभार्थींनी बँकेचे खातेच दिले नसते, तर ही योजनाच सुरू झाली नसती. या निर्णयामुळे कुपोषण वाढेल, घराघरात भांडणे वाढतील.

रेशन दुकानांवर बायोमेट्रिक प्रणाली राबवण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारचे ३० हजार कोटी रुपये वाचले असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांनी ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना सहभागी करुन घेतले होते. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांना दिलेल्या निवेदनामध्ये शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध करून द्यावे, केरोसीनचा कोटा पूर्ववत सुरू करावा, देशभरातील पवानाधारकांना ३०० रुपये प्रतिक्विंटल कमिशन द्यावे, दुकानाच्या जागेचे भाडे देण्यात यावे, यासह इतर मागण्या करण्यात आल्या.

सभेमध्ये अध्यक्ष डी. एन. पाटील, विश्वंभर बसू, आर. एल. आंबुलगेकर यांची भाषणे झाली.

\Bमोर्चात राजकीय खिचडी; सत्तारांचा सभेतून काढता पाय\B

स्वस्त धान्‍य दुकानदार, सर्वसामान्य लाभार्थींसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनीही हजेरी लावली होती, सभेमध्ये भाषण करताना शिवेसनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधी टीका करण्यास सुरुवात केली व मोदी सरकार चुकीची धोरणे राबवत असल्याचे सांगितले. यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाषण केले. 'ते मोदी आश्वासन देतात. अनेकदा खोटे बोलतात, पण हे मोदी तसे नाहीत, हे खरे बोलतील. एक खरा मोदी आपल्यात आला आहे,' असे म्हणत त्यांनी सरकारविरुद्ध भाषण केले. एकीकडे निर्णयाला विरोध करणारेच कायदा बदलू नये, असे म्हणतात व त्याला पाठिंबा देतात, असे म्हणत, 'केवळ फुकटच्या पाठिंब्याचा काहीच उपयोग नाही,' असे म्हणत सत्तार यांनी सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही चिमटे काढले. सरकारवरील ही टीका मात्र प्रल्हाद मोदींना आवडली नाही, 'त्यांनी आपल्या भाषणामध्ये सत्तार यांच्या भाषणाचा चांगलाच समाचार घेतला व म्हणाले की, बहुदा सत्तार यांना राजकीय भाषणासाठी मंच मिळत नाही. हा राजकीय मंच नाही. तुम्ही मंत्री राहिला आहात. येथे राजकारण करून घरात फूट पाडायचा प्रयत्न करत आहात. 'डीबीटी'चा प्रस्ताव केंद्रातील आघाडी सरकारने आणला होता, हे विसरू नका, असे मोदी यांनी सत्तार यांना सुनावताच सत्तार यांना राग आला आणि त्यांनी सभा सोडून निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वस्त भारत यात्रा’ १५ रोजी शहरात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

योग्य व संतुलित आहार, शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृतीसाठी देशभरात 'स्वस्थ भारत यात्रा' ही सायकल फेरी काढण्यात आली आहे. ही सायकल फेरी १५ डिसेंबर रोजी शहरात दाखल होत आहे. या फेरीची शहरातील जबाबदारी अन्न वाचवा समितीकडे सोपविण्यात आली.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ही फेरी काढण्यात आली आहे. यात सहभागी सायकलपटू हे देशातील नागरिकांना योग्य, संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन व जनजागृती करत आहेत. ही फेरी १५ डिसेंबर रोजी अहमदनगर मार्गे शहरात दाखल होत आहे. औरंगपुरा येथून महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी साडे सात वाजता प्रभातफेरी निघणार आहे. त्यानंतर साडे नऊ वाजता प्रबोधनपर कार्यक्रम, अन्न वाचवा समितीचा महसूल प्रबोधिनी येथे कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर साडे चार वाजता कॅनॉट प्लेस व सहा वाजता प्रोझोन मॉल येथे ही जनजागृती करण्यात येणार आहे. ही फेरी १६ डिसेंबरला पुढे रवाना होणार आहे.

\Bअन्न नासाडी टाळण्यासाठी जनजागृती\B

अन्न वाचवा समितीतर्फे सहभागी सायकलपटूंना अन्न नासाडी टाळण्यासाठी कशाप्रकारे जनजागृती करता येईल, याचे मार्गदर्शन करणार आहे. या उपक्रमासाठी अनंत मोताळे, चंद्रकांत वाजपेयी, अॅड. श्रीचंद जग्ग्यासी, नंदकुमार कुलकर्णी, राजेंद्र वाव्हुळे, सुधीर लाखकर, आनंद लोणकर, दिलीप आसबे, चंद्रकांत लासूकर, असलम शेख, लता कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, रुपाली वाव्हळे, रितु अग्रवाल, किरणूशर्मा, किरण काळे, स्वाती सोनार, मेघा आचार्य परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images