Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

टीडीआर घोटाळाप्रकरणात दोघांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या नगररचना विभागातील शाखा अभियंता शिवदास भग्गू राठोड व आवक लिपिक मजहर अली महंमद अली यांचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी गजाला अल अमोदी यांनी गुरुवारी (६ डिसेंबर) फेटाळला. या प्रकरणात दोघांना बुधवारी अटक करुन कोर्टात हजर केले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

टीडीआरसाठी अब्दुल सिकंदर याने सादर केलेला कोरा अर्ज मजहर अली याने आवक रजिस्ट्ररमध्ये नोंदवून घेतला आणि शिवदास राठोड याने कसलीही शाहनिशा न करता त्यावर टीडीआर देण्यासंदर्भात शेरा लिहिला असल्याचा आरोप या दोघांवर आहे. या प्रकरणी महानगरपालिकेचे शाखा अभियंता प्रभाकर दत्तात्रय पाठक यांच्या तक्रारीवरून २१ नोव्हेंबर २०१६ रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, गुन्हा गंभीर असून, यात महापालिकेची फसवणूक करण्यात आली आहे. यात टीडीआर क्लेम फॉर्म हा कोराच होता. तसेच पडताळणी न करता आणि अधिकाऱ्यांचा अभिप्राय न घेता टीडीआर देण्यात आला. प्रकरणात प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध असल्याने आरोपींना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोन्ही आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिष्यवृत्तीधारकांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्यांना शिष्य़वृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. विविध विभागांच्या नियंत्रणाखाली शिष्यवृत्तीसाठीची प्रक्रिया 'महाडीबीटी' पोर्टलवरून सुरू आहे. तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरण्यास सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान, व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या मराठवाड्यात २५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून, त्यापैकी साडेबारा हजार अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

शिष्यवृत्तीसाठी उच्च शिक्षण विभागाने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली तर, तंत्रशिक्षण विभागाची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. मात्र, अद्याप मोठ्या प्रमाणात अर्ज भरले गेले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रानुसार ३० डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करणे, त्याच दरम्यान कॉलेजांनी प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. विद्यार्थ्यांना आधार नोंदणी क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होवू शकत नाही. या शैक्षणिक वर्षासाठीची प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करवयाची होती. शालेयस्तरापासून ते उच्च व व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील विविध ३९ शिष्यवृत्तीची प्रक्रिया याच पोर्टलवरून होत आहे.

तंत्रशिक्षणकडून साडेबारा हजार अर्ज निकाली

तंत्रशिक्षण विभागातर्फे छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता याची प्रक्रिया केली जात आहे. पोर्टलवर त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, २६ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन आलेले आहेत. त्यापैकी १२ हजार ६०८ अर्जांची छाननी करून कॉलेजांनी प्रक्रिया पूर्ण करून तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविले. त्यातून ११ हजार २४६ अर्ज पात्र करत तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. अर्ज करतांना

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या कॉलेजस्तरावरील अर्ज...२६१६८

तंत्रशिक्षण विभागाकडे आलेली संख्या..................१२६०८

प्रक्रिया पूर्ण झालेली संख्या..............................११२४६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंपा चौकात सामुदायिक अजान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

चंपा चौक येथे गुरुवारी (६ डिसेंबर) दुपारी सामुदायिक अजानने बाबरी मशीद पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. एमआयएम पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

चंपा चौक येथे रजा अकॅडमीचे साजीद रजा यांच्या नेतृत्वाखाली अजान देण्यात आली. यावेळी विविध संघटनेचे पक्षाचे तसेच सर्वसामान्यांची यावेळी उपस्थिती होती. ही अजान पाच मिनिटात संपली. या अजानाच्या कार्यक्रमानंतर विशेष दुआ मागण्यात आली.

एमआयएम

एमआयएम पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाद्वारे बाबरी मशीद पाडणाऱ्यांवर कारवाई करावी, मुस्लिमांवरील अन्याय थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात आमदार इम्तियाज जलील, मौलाना मुजीब सहाब, डॉ. गफ्फार कादरी, जिल्हाध्यक्ष अब्दुल रहिम नाईकवाडे अज्जु लिडर, गटनेते नासेर सिद्दीकी, माजी विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, एमआयएमचे शहर अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल साजीद बिल्डर यांच्यासह शेख रफिक चित्ता, डॉ. अफजाल खान यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी आंदोलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे वेष घालूनही या घटनेचा निषेध व्यक्त केला.

ऑल इंडिया इमाम कौन्सिलने केले धरणे आंदोलन वतीने रोशन गेट येथे आंदोलन करण्यात आले. मौलाना अब्दुल रहेमान नदवी, मौलाना अब्दुल अलीम कासमी, मौलाना जाकीर मिल्ली, मौलाना मोहसीन नदवी, मौलाना हारून एजाजी, यांच्यासह मुस्लिम अवामी कमीटीचे अध्यक्ष इलियास किरमाणी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना महेफुज उर रहेमान फारूखी, जावेद कुरेशी, बामसेफचे सिद्धार्थ शिंगारे, नदीम राणा, ईसा यासिन, अब्दुल अजीम यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

मिल्लत बचाव तहेरिक या सघटनेतर्फे विभागीय आयुक्तांना बाबरी मशीदीबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी नदिम राणा, ईसा यासीन, बाब फरीद, लईक शेख करीम, मोहियोद्दीन मोईस, इद्रिस खान, सादेश खान, सय्यद मिनाज यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. ‌टिपू सुल्तान ब्रिगेडच्या वतीनेही विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी मिर्झा जावेद बेग, पठाण अमजत खान, सय्यद हारून, साजीद पठाण, तसेच मोहम्मद जुबेर यांची यावेळी उपस्थिती होती.

राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन

समाजवादी पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्तांमार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. यावेळी मोहम्मद ताहेर, मोहम्मद जफर, अब्दुल रऊफ, इस्माईल मेमन, शेख उस्मान, अजमत खान, अजिम पटेल, अफसर खान, मोहम्मद शोएब यांची यावेळी उपस्थिती होती. ………जनजागरण समिती महाराष्ट्र अध्यक्ष मोहसीन अहेमद, शेख मुनाफ, मिरहिदायत अली, मेराज पटेल, आबेदा बेगम, सलमा बानो, अनिसा बेगम, शाहनवाज खान, फजलउल्लाह खान, शेख मुख्तार, शेख आरेफ यांनी विभागीय आयुक्तांद्वारे राष्ट्रपतींना निवेदन दिले. तर ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन देऊन बाबरी मशीद उभारणीची मागणी करण्यात आली. यावेळी नायब अन्सारी, उस्मान रहेमान शेख, मोहम्मद शहाबोद्दीन, नौशाद सिद्दीकी, शेख फैसल मोहम्मद एकबाल यांची उपस्थिती होती. तर मुस्लिम नुमांईदा कौन्सिलच्या वतीनेही विभागीय आयुक्तालयात निवेदन देण्यात आले. यावेळी नुमांईदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाउद्दीन सिद्दीकी व अन्य सदस्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनच्या फलाटावर दुचाकीवर गोंधळ

$
0
0

चार युवक रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

बुधवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान रेल्वे स्टेशनच्या फलाटावर येऊन गोंधळ घालणाऱ्या दोन दुचाकी चालकांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

आरपीएफचे निरिक्षक अरविंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अकरा वाजेच्या दरम्यान फलाट क्रमांक एकवरील जुन्या इमारतीच्या गेटमध्ये दुचाकी आणून काही तरुण फिरत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. यातील बुलेट (क्रमांक एमएच २० बीबी ७९९७) या मोटारसायकलवरील महिंद्र अशोक खोलकर (२०, रा. आनंद अपार्टमेंट, फायर ब्रिगेडजवळ) व महिंद्र विजय सोनवणे (२०, रा. आनंद अपार्टमेंट) या दोघांना रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.

या बुलेटस्वारांसोबत अन्य एका दुचाकीवर (एमएच २० एफ सी ९३२७) असलेले दोन तरुण पळून गेला होते. या दुचाकीवरील सागर राऊत (२०) आणि सुमीत वेलदोडे (२८, रा. नारळीबाग) दुचाकीसह गुरुवारी दुपारी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. लोहमार्ग पोलिस कोर्टासमोर या चौघांना हजर करण्यात आले असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यातही नोंद घेण्यात आली आहे.

पहाटे चार वाजेपर्यंत चालली पोलिसांची कसरत

रेल्वे स्टेशनच्या फलाटाकडे दुचाकी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या बुलेटस्वाराला पकडल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांना स्टेशनवर थांबावे लागले. या तरुणांना सोडण्याची मागणी करण्यासाठी अनेकजण स्टेशनवर आले होते. मात्र, लोहमार्ग पोलिस अधिकारी आणि आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी या लोकांची समजूत काढून त्यांना सदर कारवाई होणारच असल्याचे स्पष्ट केले.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मयुरपार्कमध्ये हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने महिलेचे मंगळसूत्र लांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मयुरपार्क परिसरात जेष्ठ नागरिक महिलेचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी लांबवले. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या प्रकरणी अलका देवीदास साळूंके (वय ५५, रा. देवप्रिया हौसिंग सोसायटी, मयुरपार्क परिसर) यांनी तक्रार दाखल केली. साळुंके या गुरुवारी सायंकाळी मयुरपार्क भागातील शेवटच्या गल्लीमध्ये फुटाणे आणण्यासाठी जात होत्या. यावेळी बौध्दविहाराच्या जवळ त्यांच्या समोरून दुचाकीवर दोनजण आले. यापैकी चालकाने डोक्यात हेल्मेट घातलेले होते. साळुंके यांच्याजवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा वेग कमी करीत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे, ४० हजार रुपये किंमतीचे गंठण हिसकावून पलायन केले. साळुंके यांनी आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले होते. हे आरोपी परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीव्ही सेंटर परिसरात गळा चिरून महिलेचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टीव्ही सेंटर, एन १२ परिसरात घरात एकट्या असलेल्या महिलेचा रेकॉर्डवरील गुन्हेगाराने गळा चिरून निघृण खून केला. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. सुनंदा वाघमारे (वय ३२) असे या महिलेचे नाव असून पलायन केलेला आरोपी शुभम भाऊसाहेब बागूल (वय ३० रा. सिद्धार्थनगर) याला काही तासात जेरबंद करण्यात आले आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टीव्ही सेंटर ते सिद्धार्थनगर जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. सुनंदा वाघमारे ही पतीपासून विभक्त राहत असून चार आणि सहा वर्षांच्या दोन मुलांसह १५ दिवसांपूर्वी या भागात किरायाने राहण्यास आली होती. शुभम बागुल हा तरुण तिच्या परिचयाचा होता. गुरुवारी दुपारी सुनंदाची दोन्ही मुले शाळेत गेलेली होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुनंदाच्या खोलीतून अचानक तिच्या ओरडण्याचा आवाज आला. यानंतर शुभम हा तिच्या घरातून पळून जाताना नागरिकांना दिसला. त्याचे हात रक्ताने माखलेले होते. सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांना ही माहिती नागरिकांनी कळविली. निरीक्षक परदेशी या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी खोलीमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत त्यांना सुनंदा आढळली. घटनास्थळी कटर पडलेले होते. परदेशी यांनी सुनंदाला घाटी हॉस्पिटलमध्ये तातडीने रवाना केले. मात्र, उपचारादरम्यान सुनंदाचा मृत्यू झाला. दरम्यान, पलायन केलेल्या शुभमचा सिडको गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेत त्याला चेतनानगर भागातून अटक केली. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. सुनंदा यांच्या खुनाचे कारण समजू शकले नसून रात्री उशिरापर्यंत शुभमची चौकशी सुरू होती. घटनास्थळी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत तसेच फॉरेंसिक लॅबच्या पथकाने भेट देत तपासणी केली.

सराईत गुन्हेगार

आरोपी शुभम बागूल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर २०१३ साली जबरी चोरीचा, २०१४ साली अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा तसेच २०१६ साली महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

दोन दिवसांपूर्वी दिली होती धमकी

पोलिसांनी सुनंदाच्या मुलांकडे याबाबत चौकशी केली. यावेळी मुलांनी पोलिसांना सांगितले की, 'शुभम दोन दिवसांपूर्वी घरी आला होता. आईला त्याने धमकी दिली. आईने मी पोलिसात तक्रार करते असे सांगितल्यावर त्याने मी जेलमध्ये राहून आलो आहे, असे सांगत आईच्या गळ्याला चाकू लाऊन निघून होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’प्रकरणी प्रतिज्ञापत्रासाठी श्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या सुधारित विकास आराखड्याबद्दल महापौर नंदकुमार घोडेले यांना पक्षश्रेष्ठींकडून अद्याप आदेश आले नाहीत. सायंकाळी उशिरा आदेश आल्यास प्रतिज्ञापत्र दाखल करण्याबद्दल रात्रीतून धोरण ठरण्याची शक्यता आहे.

सुधारित विकास आराखड्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (सात डिसेंबर) सुनावणी आहे. आराखड्याबद्दल तत्कालीन महापौरांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञपत्र दाखल केले आहे. आता शिवसेनेचे नंदकुमार घोडेले हे महापौर आहेत. त्यांनी विकास आराखड्याबद्दल अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र देखील न्यायालयात सादर केले नाही. विकास आराखड्यासंदर्भात गोविंद नवपुते यांनी याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात विकास आराखड्याबद्दलचे प्रकरण चालवायचे की नाही, याबद्दल महापौरांचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. विकास आराखड्यावर फक्त तत्कालीन महापौरांचीच स्वाक्षरी आहे. आयुक्तांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे प्रतिज्ञापत्राबद्दल महापौर घोडेले यांची भूमिका काय राहणार, याकडे संबंधितांचे लक्ष आहे.

याबद्दल घोडेले यांना विचारले असता ते म्हणाले, 'खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्राचा विषय पक्षश्रेष्ठींच्या कानी घातला आहे. अद्याप श्रेष्ठींकडून आदेश आलेले नाहीत. अॅड.शिवाजी जाधव यांच्याशी चर्चा सुरू आहे. पक्षश्रेष्ठींकडून रात्री उशिरा मार्गदर्शन आले, तर त्यांना कळवले जाईल.'

\Bप्रतिज्ञापत्रावरून शिवसेनेत दोन गट\B

मिळालेल्या माहितीनुसार; शिवसेनेतील एक गट सर्वोच्च न्यायालयात महापौरांनी प्रतिज्ञापत्र दाखल करावे, या मताचा आहे, तर दुसरा गट त्याच्या विरोधात आहे. सुधारित विकास आराखडा तयार करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे महापौरांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यास शिवसेनेच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडचे हृदय गुजरातमध्ये!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील ३० वर्षीय ब्रेन डेड मूर्तिकाराच्या अवयवदानामुळेच सूरतमधील (गुजरात) ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला जीवनदान मिळाले आहे. मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये बुधवारी (सहा डिसेंबर) संबंधित गुजराती रुग्णावर प्रत्यारोपण यशस्वी झाले. त्याचबरोबर नांदेड व औरंगाबाद येथे झालेले मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणही यशस्वी झाले असून, औरंगाबादबाहेर मराठवाड्यात मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा श्रीगणेशाही यानिमित्ताने झाला आहे. आतापर्यंत गेल्या तीन वर्षांमध्ये २२ ब्रेन डेड दात्यांकडून ९८ अवयवांचे दान झाले आणि त्यांचे यशस्वी प्रत्यारोपणही झाले. यापुढील काळात मराठवाडा विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये अवयवदानाबरोबरच प्रत्यारोपण सुरू होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. किमान काही जिल्ह्यांमध्ये तरी ही सुविधा उपलब्ध होईल, अशी चिन्हे आहेत.

माळाकोळी येथील मूर्तिकाराच्या अवयवदानामुळे चौघांना जीवनदान मिळाले, तर दोघांना दृष्टीदान मिळाले. अवयवदानासह प्रत्यारोपणाच्या चार शस्त्रक्रिया बुधवारी (सहा डिसेंबर) झाल्या. अवयवदानाची शस्त्रक्रिया नांदेड येथील सनराईज ग्लोबल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाली आणि याच हॉस्पिटलमध्ये एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एका ३१ वर्षांच्या महिलेवर झाले, जे औरंगाबादनंतरचे मराठवाड्यातील पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण ठरले; तसेच हृदयाचे प्रत्यारोपण मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये, दुसरे मूत्रपिंड व यकृताचे प्रत्यारोपण औरंगाबाद येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये झाले. दोन्ही नेत्रांचे रोपण नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये लवकरच होणार असल्याचे समजते. विविध हॉस्पिटल समन्वयकांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. औरंगाबादला 'एमजीएम'मध्ये झालेल्या दुसऱ्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण हे ४९ वर्षांच्या पुरूष रुग्णावर, तर यकृताचे प्रत्यारोपण ६६ वर्षाच्या मुंबईच्या रुग्णावर झाले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नांदेड येथे झालेले हे चौथे अवयवदान ठरले आहे. यापूर्वी दोनदा नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, तर तिसऱ्यांदा 'सनराईज'मध्येच अवयवदान झाले होते, असे 'विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती'चे (झेडटीसीसी) समन्वयक मनोज गाडेकर व जयेश धबाले यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\Bबहुतांश हृदय बाहेरच

\Bमराठवाडा व खान्देशातील पहिले अवयवदान १५ जानेवारी २०१६ रोजी औरंगाबाद शहरामध्ये झाले. तेव्हापासून आतापर्यंत २२ दात्यांकडून दहा हदय, २० यकृत, ४२ मूत्रपिंड व २६ बुब्बळ (कॉर्निया) अशा ९८ अवयवांचे दान झाले. यातील केवळ एका हृदयाचे प्रत्यारोपण औरंगाबाद शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये झाले, तर इतर सर्व नऊ हृदयांचे प्रत्यारोपण मराठवाडा व राज्याबाहेर झाले आहे. २० यकृतांपैकी केवळ ५ यकृतांचे प्रत्यारोपण 'एमजीएम' व 'युनायटेड सिग्मा'मध्ये झाले व इतर १५ यकृतांचे प्रत्यारोपण मराठावाडा व राज्याबाहेर झाले आहे. त्यातही निम्म्यावेळी हृदयदान होऊ शकले नाही ते केवळ एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्यामुळेच, असेही स्पष्ट झाले आहे. जोपर्यंत अवयवदानासाठी पूर्णपणे वाहिलेली एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही तोपर्यंत दात्यांची हृदयदानाची इच्छा अपुरी राहून गरजू रुग्णांची प्रतीक्षा वाढतच राहणार, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

\Bइतर जिल्ह्यांतही प्रत्यारोपण शक्य

\Bऔरंगाबाद व नांदेडशिवाय इतर जिल्ह्यांमध्येही अवयवदान व मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊ शकते. त्यातही लातूरमध्ये आता कधीही मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊ शकते, अशी चिन्हे आहेत. लातूरमध्ये यापूर्वी अवयवदान झाले आहे व तिथे प्रत्यारोपणसुद्धा होऊ शकते. त्याचप्रमाणे विभागातील प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अवयवदान शस्त्रक्रिया होऊ शकतात व तसे आवाहन करणारे पत्रदेखील 'औरंगाबाद झेडटीसीसी'ने यापूर्वी वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाला दिले होते. मात्र सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद अत्यल्प असल्याची टीका होत आहे. या संदर्भात 'झेडटीसीसी'चे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांना छेडले असता ते म्हणाले, जोपर्यंत ग्रामीण भागापर्यंत व निदान प्रत्येक जिल्ह्यात अवयवदान होत नाही, तोपर्यंत अवयवदानाची चळवळ खऱ्या अर्थाने वाढणार नाही, रुजणार नाही. त्यामुळे आता संपूर्ण मराठवाड्यात अवयवदान झाले पाहिजे आणि तेव्हाच त्याचा अधिकाधिक लाभ गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर मिळेल, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मटा’ वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या सात वर्षांत औरंगाबादकरांच्या जीवनाच्या अविभाज्य घटक बनलेल्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. येत्या रविवारी (नऊ डिसेंबर) हेरिटेज सायक्लोथॉनने कार्यक्रमांची सुरुवात होणार असून १५ डिसेंबरपर्यंत विविध विषयांवरील कार्यशाळा, उद्योजकांचे मनोगत, महिलांसाठी रेसिपी स्पर्धा आणि संगीत कार्यक्रम शहरवासियांसाठी पर्वणी ठरणार आहेत.

वाचकांच्या पाठबळावर 'महाराष्ट्र टाइम्स'ची सुरू असलेली वाटचाल सात वर्षांचा टप्पा पूर्ण करीत आहे. सातव्या वर्धापनदिनानिमित्त औरंगाबादकरांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्यासाठी हितकारक समजल्या जाणाऱ्या सायकलिंगला प्रोत्साहित करण्यासाठी रविवारी हेरिटेज सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी सात वाजता 'मटा' कार्यालयापासून सायक्लोथॉनला प्रारंभ होणार आहे. पैठणगेट, गुलमंडीमार्गे सायक्लोथॉन पाणचक्कीला पोहचणार आहे. त्यानंतर या सायक्लोथॉनचा मार्ग बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, सोनेरी महल, भडकलगेट, रंगीन दरवाजा आणि दिल्ली गेट, असा असणार आहे. दिल्ली गेटवर सायक्लोथॉनचा समारोप होईल. या उपक्रमादरम्यान, इतिहासतज्ज्ञ ऐतिहासिक वारसा स्थळांची माहिती देणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या सर्व सायकलपटूंना 'मटा'तर्फे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी औरंगाबाद जिल्हा सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, सचिव चरणजितसिंग संघा (९८९०३८३७१४) आणि नदीम अहमद (९८२२६३०५५५) यांच्याशी संपर्क साधावा.

\Bरविवारीच फेसबूक कवी संमेलन\B

'मटा'तर्फे रविवारीच (नऊ डिसेंबर) फेसबूक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत कवींना आपल्या कविता मटाच्या फेसबूक पेजवर शेअर कराव्या लागणार आहेत.

\Bविविध कार्यक्रमांचे आयोजन\B

मक्यापासून स्नॅक व स्वीट डीश बनवण्याची स्पर्धा सिडकोतील गरवारे कम्युनिटी सेंटर येथे सोमवारी (१० डिसेंबर) दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी (११ डिसेंबर) गरवारे कम्युनिटी सेंटरमध्येच केक मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. १२ डिसेंबर रोजी 'मटा संवाद'चा कार्यक्रम पीईएस इंजिनीअरिंग महाविद्यालयात रंगणार आहे. या संवादात शहरातील उद्योजक प्रशांत देशपांडे (सीईओ, एक्स्पर्ट ग्लोबल) आणि सुनील कीर्दक (व्यवस्थापकीय संचालक, टूल टेक) हे सहभागी होणार आहेत. १३ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट फोन प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. हे शिबिर सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. १४ डिसेंबर रोजी निसर्गाची विविध रुपे टिपण्याची कला शिकवण्याची अनोखी संधी मिळणार आहे. सकाळी दहा वाजता एमजीएम कॅम्पसमध्ये फोटोग्राफी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हे सर्व कार्यक्रम नि:शुल्क आहेत. आपला सहभाग नोंदवण्यासाठी ९८२२६३०५५५ आणि ०२४०-६६३०२०० या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सख्ख्या भावाचा खून, जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खिशातून पैसे चोरल्यामुळे सख्खा भावाचा डोक्यात दगड टाकून खून केल्याची कबुली देणारा आरोपी सुखदेव उत्तम संतुके याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. डिग्रसकर यांनी फेटाळला.

या प्रकरणात शकुंतला सखाराम संतुके (३५, रा. जटवाडा रोड, कोळीवाडा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व फिर्यादीचा पती (मृत) सखाराम उत्तम संतुके (३८) यांचे पटत नसल्यामुळे सखाराम हे त्यांचा भाऊ व आरोपी सुखदेव उत्तम संतुके (४५, रा. देहगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद, ह. मु. मुकुंदवाडी) याच्या घरात राहात होते, तर फिर्यादी ही तिच्या भावाच्या घरात आपल्या दोन मुलांसह राहात होती. १३ ऑगस्ट २०१८ रोजी सखाराम यांना मारहाण झाली असून, त्यांना घाटीत दाखल केल्याचा फोन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातून फिर्यादीला आला होता. फिर्यादी व तिच्या नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले होते. त्यावेळी सखराम यांना डोक्यावर, नाकावर व अनेक ठिकाणी मारहाण केल्याचे व पायाची बोटे तुटल्याचेही दिसून आले होते. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी सुखदेव याला अटक करण्यात आली होती आणि अटकेत 'खिशातून पैसे काढल्यामुळे १२ ऑगस्ट २०१८ रोजी सखारामच्या डोक्यात दगड टाकून त्याला जिवे मारले' अशी कबुली आरोपीने दिली होती. त्यानंतर आरोपीची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या प्रकरणात कोर्टात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, आरोपी हा मृताचा सख्खा भाऊ आहे व त्याला जामीन मंजूर केल्यास तो पुरावे नष्ट करू शकतो. तसेच प्रकरण गंभीर असल्याने आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटा‍ळला. जिल्हा सरकारी वकील देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिमोफिलियाग्रस्तांना घाटीत प्रमाणपत्र वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) वतीने 'यूडीआयडी'अंतर्गत हिमोफिलिया डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अर्थात हिमोफिलिया अपंगत्व प्रमाणपत्र वाटप गुरुवारपासून (सहा डिसेंबर) घाटीत सुरू करण्यात आले. घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटपाला प्रारंभ झाला.

हिमोफिलियाग्रस्तांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये सर्वांत आधी घाटीमध्ये करण्यात आली. ही प्रमाणपत्रे प्रत्येक मंगळवारी व गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी १२ या वेळेत बाह्य रुग्ण विभागामध्ये (ओपीडी) दिली जाणार आहेत. घाटीत गुरुवारी झालेल्या प्रमाणपत्र वितरणाच्या छोटेखानी कार्यक्रमाला डॉ. येळीकर यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात, वरिष्ठ ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सतीश मसलेकर डॉ. मुक्तदीर अन्सारी आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर नावावर करण्याची मागणी करीत जन्मदात्यांना घराबाहेर काढले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमच्या नावावर घर करून द्या, वृद्धाश्रमात जाऊन राहा, असे सुनावत पोटच्या मुलाने आणि सुनेने मातापित्यांना घराच्या बाहेर काढले. बुधवारी सकाळी नऊ वाजता एन १२, हडको परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी आईने दिलेल्या तक्रारीवरून मुलगा आणि सुनेविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात जेष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडको एन १२ भागात शेख कुटुंबीयाचे निवासस्थान आहे. या घरात आई वडील, मुलगा आणि सून असा परिवार राहतो. बुधवारी सकाळी मुलगा अस्लम मोहम्मद इकबाल शेख आणि त्याच्या पत्नीने आई वडिलांना घर नावावर करण्याची धमकी देत मारहाण व शिवीगाळ केली. तुम्ही दोघे हे घर खाली करा, येथून निघून जाऊन वृद्धाश्रमात राहा. नाहीतर तुमच्या नावावर असलेले घर आमच्या नावावर करून द्या असा मानसिक त्रास दिला. तसेच त्यांना घराच्या बाहेर काढून देण्यात आले. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अस्लम मोहम्मद इकबाल शेख आणि त्याच्या पत्नीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक वाघ तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेष्ठ नागरिकांसाठी आता १०९० हेल्पलाईन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी आता पोलिसांच्या वतीने हेल्पलाईन क्रमांक १०९० सुरू करण्यात आला आहे. बुधवारी उस्मानपुरा येथे झालेल्या एका कार्यक्रमात पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी या हेल्पलाईनचा शुभारंभ केला. यावेळी जेष्ठ नागरिक आणि विशेष पोलिस अधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी ज्या मुलांसाठी संघर्ष करून त्यांच्या सर्वांगीण सुखासाठी, त्यांचे संसार थाटणाऱ्या आई वडीलांना शेवटच्या काळात मिळणारी अवहेलना, अपमानास्पद वागणूक व उपेक्षेचे प्रमाण वाढत असून जेष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढील लागली आहे. असे असताना युवा पिढीकढून फक्त भावनिक आधारच त्यांना जगण्याची प्रेरणा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. निवृत्त एसीपी नरेश मेघराजानी यांनी जेष्ठ नागरिक कायदा २००७ बद्दल या कार्यशाळेत माहिती दिली. यावेळी उपायुक्त निकेश खाटमोडे, डॉ. राहुल खाडे, एसीपी रामचंद्र गायकवाड, गुणाजी सावंत, गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक हेमंत कदम, एपीआय घनश्याम सोनवणे आदींची उपस्थीती होती. कार्यशाळेसाठी जमादार पोळ, निकम, तेलुरे, नाईक, अविनाश जोशी, विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील, अनिलकुमार सोनकांबळे, बंटी देहाडे, बाबा गाडे, साबेरभाई आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन एपीआय घनश्याम सोनवणे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य, शिक्षण कार्यातून आत्मीयता मिळाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या ४० वर्षांपासून गडचिरोलीमधील हेमलकसासारख्या अतिशय दुर्गम जंगलात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींच्या उत्थानाचं कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचा जीवन प्रवास त्यांच्याच्या शब्दांत ऐकण्याची पर्वणी औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनच्या रेअर शेअर उपक्रमाच्या माध्यमातून औरंगाबादकरांना मिळाली. 'बाबांना कुष्ठरोगी दिसला आणि आंनदवनची निर्मिती झाली, तर जंगल सहलीच्या माध्यमातूनच लोकबिरादरी प्रकल्पाची निर्मिती झाली. आरोग्य व शिक्षण कार्यातून आत्मीयता मिळत गेली,' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी यावेळी केले.

देवगिरी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये गुरुवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मंदाकिनी आमटे, एक्स्पर्ट ग्लोबलचे मुकुंद कुलकर्णी, एएमएचे चेअरमन सी. पी. त्रिपाटी, प्रेसिडेंट सतीष कागलीवाल, सलीम शेख, दिगंत आमटे आदी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या जंगलातील अतिदुर्गम भागात आव्हानांचा सामना करत डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी तेथे नंदनवन फुलवले आहे. हा प्रवास डॉ. आमटे यांनी सांगताना, आपल्या मुलांनी असेच कार्य करावे, असे बाबांनी कधीच अपेक्षा केली नाही. अकरावीत असतानाच बाबांच्या कामात सहभागी व्हावे, असे वाटले. वैद्यकीय अभ्यासक्रमाचा परीक्षेचा निकाल लागण्याआधी १९७०मध्ये बाबांनी सहलीसाठी म्हणून भामरागड जंगला नेले. त्यावेळी तेथील आदिवासी बांधव आम्हाला पाहून घाबरले. पळून गेले. या जंगल सहलीच्या माध्यमातूनच लोकबिरादरी प्रकल्पाची निर्मिती झाली, असे डॉ. आमटे यांनी सांगत प्रकल्प उभारणीचा पट मांडला.

हेमलकसाला १९७३मध्ये लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला. तेथील माडिया आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्यांची भाषा शिकतून त्यांच्याशी संपर्क साधला. मांत्रिकांनी नाकारलेल्या रुग्णांवर उपचार केले. यश मिळाले आणि खाटेवर झोपून आलेला रुग्ण नंतर खाट डोक्यावर घेऊन गेला. हिच त्या भागात नकळत झालेली जाहिरात पुढील आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी मोलाची ठरल्याचे त्यांनी नमूद करत अनेक प्रसंग सांगितले.

म्हणून गोड जेवण नाही

पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच डॉ. मंदाकिनी यांच्याशी ओळख झाली. त्यांचे प्रेमात रुपातंर केव्हा झाले हेच कळाले नाही. २४ डिसेंबर १९७२ला आनंदवनात लग्न झाले. योगायोगाने त्या दिवशी साने गुरुजी यांची जयंती होती. १५ मिनिटांत लग्न झाले. जेवणात मात्र गोड पदार्थ नव्हते. कारण त्यावेळी मराठवाड्यात भीषण दुष्काळ होता, असे यावेळी डॉ. आमटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रकल्पाला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्याचा प्रश्न, मोकाट कुत्र्यांची वाढलेली संख्या व अन्य समस्यांमुळे त्रस्त झालेल्या चिकलठाणा येथील नागरिकांनी गुरुवारी (सहा नोव्हेंबर) चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुमारे दोन तास बंद पाडले. आयुक्तांच्या आश्वासनानंतर नागरिकांचा विरोध मावळला, प्रक्रिया केंद्राचे काम पुन्हा सुरू झाले.

चिकलठाणा शिवारात महापालिकेने कचरा प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. प्रक्रिया केंद्र सुरू करताना चिकलठाणावासीयांना केंद्राच्या बाजूने रस्ता करून देण्याचे आश्वासन महापालिकेतर्फे नागरिकांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर कचरा प्रक्रियात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या देखील वाढली आहे. कुत्र्यांवर नियंत्रण मिळवा. कुत्री पकडण्याचे काम नियमितपणे करावे, अशी नागरिकांची मागणी होती. या दोन मागण्यांसह अन्य काही मागण्याही नागरिकांनी पालिका पदाधिकारी व प्रशासनाकडे केल्या होत्या. प्रक्रिया प्रकल्प सुरू होऊन एक ते दीड महिना उलटून गेला, पण प्रशासनाने नागरिकांच्या कोणत्याच मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास कचरा प्रक्रिया प्रकल्पावर धडक दिली. त्यांच्याबरोबर नगरसेवक राजू शिंदे, गोकुळसिंह मलके, माजी नगरसेवक रवी कावडे, कारभारी जाधव आदी उपस्थित होते. मागण्या मान्य होत नसल्याबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला आणि काम देखील बंद पाडले. दुपारी एकपर्यंत काम बंद होते.

नगरसेवक राजु शिंदे यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना फोन लावला व नागरिकांच्या भावना त्यांच्या कानी घातल्या. त्यामुळे नागरिकांबरोबर चर्चा करण्यास आयुक्त तयार झाले. त्यांनी चर्चा देखील केली. रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कुत्र्याचाही बंदोबस्त करू असे ते म्हणाले. १५० टनाचा प्रक्रिया प्रकल्प उभारला जात असल्यामुळे जास्तीचा जागा लागणार आहे, असे त्यांनी नागरिकांच्या लक्षात आणून दिले. आयुक्तांनी आश्वासन दिल्यावर नागरिकांनी विरोधाचे हात्यार सोडून दिले. दुपारनंतर प्रक्रिया केंद्राचे काम पुन्हा सुरू झाले. सध्या त्या ठिकाणी श्रेडिंग, बेलिंग आणि स्क्रिनिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. दिवसाला १६ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या मशीनची क्षमता आहे, परंतु प्रत्यक्षात आठ ते दहा टन कचऱ्यावरच प्रक्रिया होते, असे सांगितले जात आहे.

\Bअडीचऐवजी १५ एकरांवर प्रकल्प\B

सुमारे अडीच एकर जागेत प्रक्रिया केंद्र उभारण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात पंधरा एकर जागेवर केंद्र उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याला आमचा विरोध आहे, असे नागरिकांनी यावेळी सांगितले. रस्त्याचा प्रश्न सोडवण्याबद्दल महापालिकेची भूमिका काय आहे, असा सवाल देखील यावेळी करण्यात आला.

\Bमटा भूमिका

आश्वासनांची पूर्तता करावी\B

कचऱ्याच्या प्रश्नामुळे सुमारे एक वर्षांपासून महापालिका चिंतेत आहे. महापालिकेबरोबर औरंगाबादकर नागरिकांनाही या प्रश्नाची चिंता सतावत आहे. शहराच्या सर्व भागातील कचरा नियमितपणे उचलण्यात यावा आणि कचऱ्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया केली जावी. भविष्यात कचऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी व्यवस्था महापालिकेने उभी करावी. शहर स्वच्छ असले पाहिजे, अशा अपेक्षा शहरातील नागरिकांच्या आहेत. त्यासाठी नागरिक महापालिकेला सहकार्यही करीत आहेत. महापालिकेने कचऱ्याच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी सुरू केली आहे. ज्या भागात हे प्रकल्प उभारले जातील, तेथील नागरिकांचा विरोध होणे सहाजिक आहे. अशा वेळी महापालिकेकडून परिसरातील नागरिकांना समजावून सांगितले जाते. त्यांनी केलेल्या बहुतांश मागण्या मान्य केल्या जातात. प्रकल्प सुरू झाल्यानंतर दिलेल्या आश्वासनांचा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना विसर पडतो. असा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यातून परिसरातील नागरिकांच्या मानात चीड निर्माण होते. असाच प्रकार चिकलठाणा येथील कचरा प्रकल्पाविषयी झाला आहे. महापालिकेने चिकलठाणा परिसरातील नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत. त्याचबरोबर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जास्त क्षमतेची यंत्रणा लवकरात लवकर उभी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. कचऱ्याचा प्रश्न महापालिकेची कसोटी पाहणारा आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांना दिलेल्या आश्नासनांचा विसर पडू नये. नागरिकांच्या सहकार्याशिवाय कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी यशस्वी होणे अवघड आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट सिटीच्या ‘एसपीव्ही’ची आज बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी मिशनसाठी स्थापन करण्यात आलेल्या औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेकलची (एसपीव्ही) बैठक शुक्रवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात होणार आहे. 'एसपीव्ही'चे मेंटॉर सुनील पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. बैठकीला 'एसपीव्ही'चे संचालक, महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक उपस्थित राहणार आहेत.

ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा निधी पॅनसिटी प्रकल्पासाठी वळवण्याचा ठराव यापूर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या ठरावानुसार केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणे, सोलार सिटीच्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेणे, स्मार्ट रोड बद्दल धोरण ठरविणे, मास्टर सिस्टीम इंटीग्रेटर अंतर्गत शहरात विविध कामे करणे हे विषय बैठकीच्या विषयपत्रिकेवर असणार आहेत. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सिटी बस सेवा सुरू केली जाणार आहे. त्याचाही आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बस पूजनाला आमावस्येचा अडथळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटी बसच्या पूजनाला आमावस्येचा अडथळा आला आहे. एक सिटी बस आज शुक्रवारी शहरात दाखल होणार असली, तरी आमावस्येमुळे तिचे पूजन करण्यात येणार नाही.महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी बसचे पूजन केले जाणार आहे.

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशनतर्फे शहरात सिटी बस सेवा सुरू केली जाणार आहे. या प्रकल्पातून एकूण शंभर सिटी बस सुरू करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यापैकी २५ बस २० डिसेंबरपर्यंत पालिकेला प्राप्त होणार आहेत. या २५ पैकी पाच बस आठ डिसेंबरपर्यंत द्याव्यात, अशी विनंती टाटा मोटर्सला करण्यात आली होती. कंपनीने देखील त्याबद्दल तयारी दाखवली. त्यानुसार, पाच बस दाखल होताच शहराच्या वेशीवरच त्यांचे पूजन करण्याची योजना महापौर नंदकुमार घोडेले यांनी आखली होती. पूजनानंतर या पाच बस शहरात पाच ठिकाणी उभ्या करण्यात येतील, यामुळे नागरिकांना त्या पाहता येतील व शहरात सिटी बस सुरू होणार असल्याचा संदेश यामुळे जाईल, असे ठरवण्यात आले होते. टाटा मोटर्समध्ये पाच बस तयार असून त्यांच्या तपासणीशिवाय त्या आणायच्या नाहीत, असे पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ठरवले. एका बसची तपासणी झाली असून ती औरंगाबादला पाठवण्यास कंपनी तयार आहे. उर्वरित चार बस तपासणीनंतर लगेच पाठवण्यात येणार आहेत. ही तपासणी झालेली एक बस शुक्रवारी शहरात दाखल होणार आहे. मात्र, शुक्रवारी आमावस्या असल्यामुळे बसचे पूजन करू नये, असा निर्णय महापौरांनी घेतला. शुक्रवारी बस आणून उभी करू आणि शनिवारी पूजन करू, महापालिकेचा वर्धापन दिन शनिवारी (आठ डिसेंबर) आहे. त्यामुळे पालिकेच्या आवारात बसचे पूजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करण्यासाठी पालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला कंत्राट दिले आहे. कंपनीबरोबर करार करून प्रत्यक्ष काम सुरू करायचे आहे. कराराची कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत, परंतु आमावस्येमुळे त्यावर सह्या करण्याचे टाळण्यात आले. त्यावर शनिवारी किंवा सोमवारी सह्या होतील, असे महापौरांनी स्पष्ट केले.

\Bसिटी बसचे लोकार्पण २३ डिसेंबरला \B

सिटी बस सेवेचे लोकार्पण, रस्त्यांच्या कामांचे उद्‌घाटन आणि कांचनवाडी येथील 'एसटीपी'चे लोकार्पण हे तीन कार्यक्रम २३ डिसेंबर रोजी होतील, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. यापूर्वी २४ डिसेंबर रोजी कार्यक्रम घेण्याचा विचार होत होता. मात्र, यादिवशी शिवसेनेचा पंढरपूर येथे कार्यक्रम आहे. त्यामुळे आदल्या दिवशी लोकार्पणाचा कार्यक्रम घ्यावा, असे सर्वांचे मत आहे. या कार्यक्रमांसाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची वेळ मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत आणि स्थानिक आमदार शुक्रवारी फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैय्याकुमार यांची रविवारी जाहीर सभा

$
0
0

म. टा. प्रतनिधी, औरंगाबाद

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संसदेचे माजी अध्यक्ष, 'एआयएसएफ'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कन्हैय्याकुमार रविवारापासून (नऊ डिसेंबर) मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे 'संविधान बचाओ देश बचाओ' या मोहिमेंतर्गत औरंगाबादमध्ये रविवारी त्यांची जाहीर सभा होत आहे, अशी माहिती संयोजक आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकार सत्तेच्या माध्यमातून संविधान विरोधी शक्तींना खतपाणी घालते आहे. झुंडशाही वाढली असून, संविधान आमचे नाही म्हणून संविधानाची प्रत जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यावर सरकार प्रतिक्रिया देत नाही. म्हणून येत्या काळात समविचारी नागरिकांनी, पक्षांनी एकत्र येऊन हे थांबवावे लागेल. त्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आमखास मैदानावर सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे, अशी माहिती आमदार चव्हाण यांनी दिली.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मुस्लिम आवामी कमिटी, एआयएसएफ, बामुक्टो, बामुक्टा, मुप्टा, एसएफआय, एनएसयूआय, एआयवायएफ, बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा, गब्बर ऍक्शन कमिटी, शेतकरी कामगार विद्यार्थी संघटना, पुरोगामी शिक्षक शिक्षकेत्तर संघटना, रिपब्लिकन बहुजन सेना, भारतीय दलित पँथर युवा आघाडी, आझाद युवा ब्रिगेड, मायनॉरिटी युथ फाऊंडेशन, ऑल इंडिया तंन्जीम-ए-इन्साफ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आदींनी एकत्र येऊन सभा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सचिव प्रा. राम बाहेती, जिल्हा सचिव अश्फाक सलामी, अॅड. अभय टाकसाळ, ईलियास किरमाणी, प्रा. सुनील मगरे, डॉ. राजेश करपे, अभिजित देशमुख यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेसाठी अद्याप हिरवा कंदिल नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभांच्या जागांबाबत काँग्रेसशी बोलणी सुरू आहे. औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाणार का, याबाबत काँग्रेसनेही कोणता निर्णय घेतलेला नाही, मात्र पक्षनेते शरद पवार यांनी आदेश दिला तर, आपण लढण्यास तयार आहोत, असे आमदार सतीश चव्हाण यांनी गुरुवारी पुन्हा स्पष्ट केले. मराठा समाजासाठी ४०च्यावर बळी गेल्यावर जल्लोष करत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा फालतुपणा आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

विद्यार्थी नेते कन्हैय्याकुमार यांच्या जाहीर सभेच्या आयोजनाबाबत पत्रकारांशी चव्हाण यांनी संवाद साधला. औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून, त्यासाठी आमदार सतीश चव्हाण उमेदवार असतील अशी चर्चा जिल्ह्यात आहे. या होणाऱ्या सभेनिमित्त तुम्ही लोकसभेची तयारी करता आहात का, या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, 'काँग्रेसने याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रवादीने ही जागा लढवावी, अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसकडे केली आहे, मात्र निर्णय झालेला नाही. मराठा आरक्षण हा समाजाचा विजय आहे. राष्ट्रवादी, भाजप किंवा कोणत्याही पक्षाने याचे क्षेय घेण्याचा प्रयत्न करू नये. ५७ मोर्चे शांततेत निघाल्यानंतरही सरकारला जाग आली नाही. नंतर तरुणाई रस्त्यावर उतरली त्यानंतर ४०पेक्षा अधिक जणांनी आत्महत्या केली. त्यानंतर आरक्षणाबाबतची प्रक्रिया झाली आणि त्यात आता भाजपचे नेते, कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत, हे चुकीचे आहे. बळी गेलेल्यांचा हा जल्लोष साजरा करत आहेत का, की काय?'

\Bधनगर समाजालाही सरकारने झुलवले

\Bधनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले, मात्र त्या समाजाबाबत अद्यापही निर्णय घेतला गेला नाही. बारामतीला धनगर समाजाने उपोषण केले, तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीस गेले होते. त्यांनी आश्वासन दिले होते. साडेचार वर्षे झाली तरी, त्यांचा 'एसटी' प्रवर्गात समावेश केला नाही. आता सांगात आहेत की, कायदेशीर अडचणी आहेत. त्या समाजाचाही सरकारने विश्वासघात केल्याचे आमदार चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आली रे आली, शहर परी आली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरवासियांसाठी एक आनंदवार्ता. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपपमेंट कार्पोरेशनतर्फे शहरात सुरू होणाऱ्या सिटी बस सेवेची पहिली अत्याधुनिक सिटी बस शुक्रवारी अमावस्या संपल्यानंतर दुपारी १२ वाजून ४९ मिनिटानंतर दाखल झाली. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव तथा योजनेचे मेंटॉर सुनील पोरवाल यांच्या हस्ते या बसची पूजा करण्यात आली. २३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बस सेवेचा नारळ फुटणार आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार या प्रकल्पातून ३६ कोटी रुपयांच्या शंभर बस सुरू करण्यात येणार आहेत. बससेवेसाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या. मात्र, पहिली बस शहरात येण्यासाठी डिसेंबर उजाडला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येकी २५, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये ५० बस देण्यात येणार आहेत. पाच बस शहरात आणण्याची योजना असली, तरी एकाच बसची तांत्रिक तपासणी झाली. शुक्रवारी अमावस्या असल्याने महापौरांनी बसचे पूजन एक दिवस पुढे म्हणजे शनिवारी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र स्मार्ट सिटीचे मेंटॉर सुनील पोरवाल शुक्रवारी बैठकीसाठी शहरात आले होते. त्यांच्या हस्ते अमावस्या संपल्यानंतर या बसचे पूजन करण्यात आले. यावेळी नव्या कोऱ्या बसला फुले, फुग्यांनी सजवण्यात आले. महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रामध्ये बसचे पूजन करण्यात आले. यावेळी महापौर नंदकुमार घोडले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन, नगरसेविका माधुरी अदवंत यांच्यासह स्मार्ट सिटी संचालक मंडळातील पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, भास्कर मुंडे, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती.

\B...म्हणून अमावस्या टाळली\B

ही बस कायम सुरू रहावी यासाठी आपण अमावस्या टाळून बसचे स्वागत केल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 'एएमटी बंद होण्याची अनेक कारणे होती. मात्र आता या बससेवेसाठी अतिशय सूक्ष्म नियोजन केले असून, ज्यांना बस चालवण्याचा अनुभव आहे अशा एसटीसोबत आम्ही पाच वर्षांचा हा करार केला आहे. या बससेवेमुळे शहरातील नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे,' असेही महापौर म्हणाले.

\Bस्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थ्यांना सवलती

\B'शहरात सुरू करण्यात येणाऱ्या या बस सेवेमध्ये स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती तसेच महिलांसाठी सवलत देण्यात येणार आहे,' असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. संशोधन केंद्रामध्ये बसचे पूजन केल्यानंतर सदर बस जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बसमध्ये बसून बसची पाहणी केली. यानंतर बस विभागीय आयुक्त कार्यालयात नेण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बसची पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त निपुण विनायक यांनी डॉ. भापकर यांना बसबाबत संपूर्ण माहिती दिली.

\Bबसमध्ये या आहेत सुविधा\B

- अत्याधुनिक सुविधांनी सज्ज, सुरक्षित

- बसच्या बाहेरच्या बाजूने पर्यटनस्थळांची चित्रे

- ३२ आसनी बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे

-हायड्रोलिक पद्धतीची बसला दोन दरवाजे

- दरवाजांचे कंट्रोल ड्रायव्हरच्या हाती

- थांब्याची माहिती देणारा डिजिटल डिस्‍प्ले

- बसमध्ये बसचा मार्ग दर्शवनारा डिजिटल डिस्‍प्ले

- प्रवाशांना सूचना देण्यासाठी माइक, साऊंड सिस्टिम

- बसमध्ये प्रथमोपचार किट, अग्निशमन यंत्र, डस्टबी

- बसमध्ये मोठ्या आकाराच्या स्लायडिंग विंडो

- आपातकालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी खिडकी

- बसमध्ये प्लास्टिकचे सीट

- पहिल्या टप्प्यात १४ मार्गांवर २५ बस सुरू होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images