Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

५१० रुग्णांवर होणार प्लास्टिक सर्जरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाकावरील बाह्य विकृती, चेहऱ्यावरील व्रण व डाग, दुभंगलेले ओठ, पडलेली पापणी आदी बाह्य विकृतींमुळे असंख्य हालअपेष्टा सोसणाऱ्या ५१० रुग्णांवर डॉ. शरदकुमार दीक्षित स्मृती ४३ व्या प्लास्टिक सर्जरी शिबिरामध्ये पूर्णपणे निःशुल्क शस्त्रक्रिया होणार आहेत. गोरगरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणाऱ्या व त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या शिबिराला गुरुवारी (१३ डिसेंबर) प्रारंभ झाला. यानिमित्त शिबिराच्या माध्यमातून डॉ. दीक्षितांनी सुरू केलेली थोर परंपरा यापुढेही सुरूच ठेवण्याचा संकल्प शिबिराच्या उद्घाटनावेळी मान्यवरांनी केला.

लायन्स क्लब चिकलठाणातर्फे व एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने डॉ. दीक्षित स्मृती ४३व्या शिबिराचे उद्घाटन गुरुवारी सिडकोतील लायन्स आय हॉस्पिटल येथे प्रख्यात उद्योजक व ऋचा ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उमेश दाशरथी यांच्या हस्ते अतिशय भारलेल्या वातावरणात झाले. या वेळी एमजीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, औरंगाबाद ड्रगिस्ट केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर, अमेरिकेहून आलेले डॉ. राज लाला, डॉ. संजय लाला, डॉ. ललिता लाला, डॉ. मालती दमाणी, डॉ. ओम अग्रवाल, डॉ. अमित बसन्नवार, डॉ. के. के. भाटिया, लायन्स इंटरनॅशनलचे संचालक डॉ. नवल मालू, संदीप मालू, विवेक अभ्यंकर, एम. के. अग्रवाल, क्लबचे अध्यक्ष राजेश साकला, प्रकल्प प्रमुख राजेश लहुरीकर, सचिव डॉ. मनोहर अग्रवाल आदी उपस्थित होते. डॉ. दीक्षित यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या प्रसंगी, समर्पण भावनेतून सातत्याने ४३ वर्षे होत असलेल्या रुग्णसेवेचा दाशरथी यांनी गौरव केला. डॉ. दीक्षित यांच्यासोबत रुग्णसेवा देण्यासाठी वर्षानुवर्षे अमेरिकेहून येणारे डॉ. राज लाला यांनी दीक्षितांचे कार्य यापुढेही सुरु ठेवण्याची हमी दिली. डॉ. सूर्यवंशी यांनी, 'लायन्स'च्या समर्पित कार्याबद्दल आनंद वक्त केला. खेडकर यांनीही संघटनेचे सेवाकार्य पुढेही सुरु राहणार असल्याचे सांगितले. सुरेश साकला यांनी प्रास्ताविक केले. डॉ. लहुरीकर यांनी शिबिरामागची भूमिका विषद केली. लायन्सचे ज्येष्ठ सदस्य रमेश पोकर्णा यांनीही मनोगत व्यक्त केले. शिबिरात सहभागी रुग्णांच्या नातेवाइकांसाठी झुणका-भाकरीची व्यवस्था करण्यात आली होती. क्लबचे अध्यक्ष चेतन अग्रवाल यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कल्याण वाघमारे व भरत भालेराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. मनोहर अग्रवाल यांनी आभार मानले. शिबिरात शुक्रवारपासून एमजीएम हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहेत. कार्यक्रमाला डॉ. स्नेहल ठाकरे, डॉ. विश्वेश मलगी, डॉ. श्रेयस सेठिया, डॉ. स्वाती पोपटानी, अलफिशर कुरेशी, श्रीमती सैफुद्दीन, समीर कबीर आदी उपस्थित होते.

\Bहाच निराळा आनंद अन् समाधान...

\Bदुसऱ्यांच्या जीवनात आणि जगण्यात आनंद निर्माण करण्याइतके पुण्यकर्म कोणतेच नाही. रुग्णांच्या सेवेतून आम्हाला ते प्राप्त होते. रुग्णसेवा हीच ईश्वराची खरी आराधना आहे, अशी उत्कट भावना डॉ. राज लाला यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलून दाखविली. रुग्णांवरील शस्त्रक्रियांमधून आम्हाला मिळणारा आनंद व समाधान निराळेच आहे, ज्याचे शब्दांत वर्णन करता येऊ शकत नाहीत, अशीही भावना त्यांनी बोलून दाखविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कवी हा द्रष्टा असतो !

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'प्रत्येक काळात कविता प्रचंड लिहिली गेली आहे. या परिस्थितीत कवीने वाहवत जाण्याची गरज नसून, शब्द सामर्थ्य ओळखण्याची गरज आहे. कवीने शब्द शस्त्रासारखे वापरावे. कारण कवी हा द्रष्टा मानला जातो,' असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांनी केले. 'मटा कविसंमेलन' उपक्रमात त्या बोलत होत्या.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या (औरंगाबाद आवृत्ती) सातव्या वर्धापनदिनानिमित्त फेसबुक 'मटा कविसंमेलन' घेण्यात आले. या उपक्रमाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल २५६ कवींनी सहभाग घेत वैविध्यपूर्ण कविता सादर केल्या. या उपक्रमातील सर्वोत्कृष्ट पाच कवितांची निवड करून कवींचा सन्मान करण्यात आला. 'मटा' कार्यालयात गुरुवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील, परीक्षक कवी श्रीधर नांदेडकर, 'साकेत' प्रकाशनच्या प्रतिमा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती. नवोदित कवींच्या कवितेवर व मांडणीवर अनुराधा पाटील यांनी भाष्य केले. 'नवोदित कवींकडून दर्जेदार कवितेच्या अपेक्षा आहेत. उत्तम कवितेसाठी विचार व चिंतनाची गरज आहे. आपल्यासमोर अनेक गोष्टी घडतात. आपल्या मध्यमवर्गीय जगण्याला पडझडीचे फार संदर्भ नसतात. तरीसुद्धा वाहवत न जाता स्वत:ची क्षमता ओळखून व्यक्त होणे आवश्यक आहे. नव्याने करता येईल, अशी फक्त कविता गोष्ट आहे. कारण भाषेत नावीन्य असते. कवीने कवितेत स्वत:ची भाषा घडवावी,' असे पाटील म्हणाल्या.

श्रीधर नांदेडकर यांनी चिंतनशील कवितेची गरज व्यक्त केली. 'कष्टपूर्वक लिहिलेली कविता छापून येणे अद्भूत गोष्ट होती. सोशल मीडियासारखे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे कविता लेखनाचा वेग वाढला आहे. ही गती कवितेसाठी फलदायी नाही. कवीला चिंतनासाठी वेळ उरला नाही. अभिव्यक्तीसाठी माध्यम उपलब्ध असले तरी संयमित आणि चांगला वापर गरजेचा आहे. भराभर लिहिण्यातून कवितेचा मूळ गाभा हातून निसटतो. खूप कविता लिहिण्यापेक्षा मोजके लेखन करा. या घाईत अनेक चांगल्या कवींची वाट चुकते' असे नांदेडकर म्हणाले. कवींसाठी लेखनाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. विविध माध्यमातून व्यक्त होण्याची गरज प्रतिमा भांड यांनी व्यक्त केली. 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

तरुण कवींनी कविता आतून फुलून द्यावी आणि नंतर लिहावी. दरवर्षी एक कवितासंग्रह प्रकाशित करावा हा दबाव कुठून येतो ? खूप लिहिण्यापेक्षा मोजकेच आणि दर्जेदार कविता लेखन महत्त्वाचे असते.

- श्रीधर नांदेडकर, कवी-परीक्षक

कविता लिहिणे ही दैवी देणगी मानते. कविता लेखन हा अत्यंत अवघड प्रकार आहे. पण, कवितेसोबतच कवींनी लेखनाचे इतर प्रकार हाताळावे असे वाटते. या क्षेत्रातली प्रतिभेला मोठी संधी आहे.

- प्रतिमा भांड, प्रकाशक, 'साकेत प्रकाशन'

\B---

विजेते कवी

---

\B- शब्बीर शेख, सिल्लोड

- नम्रता फलके, औरंगाबाद

- रामप्रसाद वाव्हळ, औरंगाबाद

- नीलेश चव्हाण, औरंगाबाद

- जगदीश पवार, बीड

\B

---

क्षितीज

\B---

आता माझ्या घरावरून समोरची क्षितीजं दिसत नाहीत

त्यांची जागा आता मुक्त हवा बंदिस्त करणाऱ्या दुमजलींनी घेतली आहे...

विटा वाढविण्याच्या त्यांच्या शर्यतीत माझ्या मावळत्या सूर्याचा त्यांनी बळी

घेतलाय..

हवाही वाहते मोजकीच इथे

पावसांच्या धाराही फक्त अश्रूच गाळतात !

या जगाचा क्रूर शाप भोगतंय माझं जग

जे सोज्ज्वळ निरपेक्ष होतं काही वर्षांपूर्वी !

उसासे सोडतोय तो डोंगर जो हरलाय या शर्यतीत…

आता माझ्या घरावरून समोरची क्षितीजं दिसत नाहीत...

आधी हवा सुसाट असायची माझ्या चेहऱ्यावर

आता दबकतच शिरते या बंदिस्त छपरावर

चांदण्या मोजतानासुद्धा एखादी छत्री मोजावीच लागते आता !

त्या स्वच्छंद दृष्टिक्षेपाला कैद केलय यांच्या अहंकाराने

ज्यांना फरकच पडत नाही चिवचिवाट संपल्याने

कारण आता माझ्या घरावरून समोरची क्षितीजं दिसत नाहीत...

क्षितीजं दिसत नाहीतच आता !

काही दिवसांतच कळेल त्यांना

क्षितीजं हरविल्याची किंमत

जेव्हा शरीर असेल कोमेजलेलं त्यांच्या आर्टिफिशल प्रकाशात

आणि एअर कण्डीशनल ऑक्सिजन त्यांच्या फुफ्फुसांत तेव्हा फक्त उशीर होऊ नये,

आणि क्षितिजांनी उठाव करू नये

एवढीच प्रार्थना !

- नम्रता फलके, औरंगाबाद

---

\Bजंगल

\B---

रोज रोज भांडण होतं

माझ्यात आणि आज्जीत

बोलत असतो आम्ही

जे जे येईल मर्जीत

आज्जी म्हणते

संपत चाललंय जंगल

वाढत चाललंय शहर

मी म्हणतो

वाढत चाललंय जंगल

संपत चाललंय शहर

आज्जी म्हणते बेटा असं

बोलू नको रेटून

जंगलच जंगल असे

वस्तीला खेटून

रोज रोज पडायची

माणसाच्या कानी

चिमणीची चिवचिव

कोकिळेची गाणी

कमी झालेत पशू पक्षी

दिसत नाही झाड

कुठेच पशू पक्ष्यांचे

होत नाही लाड

मी म्हणतो आज्जी तुझं

सगळं आहे कबूल

पण एक छोटीशी

करतेस तू भूल

मनामनात जहर आहे

रोज नवीन कहर आहे

माणसाचं जिनं आज्जी

पशूपेक्षा बत्तर आहे

एकाला लागून दुसरी

गुहा आहे घर नव्हे

म्हणून म्हणतो आज्जी मी

हे जंगल आहे शहर नव्हे

- शब्बीर शेख, सिल्लोड

---

\Bगेला गेला दूर गेला

\B---

गेला कुठे पावसाळा ?

लागे मातीला तहान

गेला कुठे पावसाळा ?

सारं करपलं रान

कसा निघतो हा जाळ

ये रे परतूनी बाबा

सुनं होण्याआधी भाळ

ढग पांढरा पांढरा

ढग गेला कुठे काळा ?

लागे मातीला तहान

गेला कुठे पावसाळा ?

मन लागेना वारीत

मन आहे वावरात

पावसाळा लपला का

विठू तुझ्या रे घरात ?

विठू जळाली तुळस

तुला तुळशीच्या माळा

लागे मातीला तहान

गेला कुठे पावसाळा ?

- नीलेश चव्हाण

---

\Bतुझ्या माझ्या राखेने....

\B---

तू भिरकावलेस दगड

मीही भिरकावले दगड

त्याने आभाळाला तडे गेले

तुझे रान माझे रान

गारांनी उद्ध्वस्त केले

तू पेटविलेस बांध

मीही पेटविले बांध

आग पाताळाला गेली

तुझ्या-माझ्या मातीची

कूस जळून खाक झाली

तू तडफडून मेलास

मीही तडफडून मेलो

रानाचे स्मशान झाले

तुझ्या- माझ्या राखेने

हे शिवार अंधूक झाले....

-रामप्रसाद वाव्हळ

---

\Bउसामधली जिंदगानी

\B---

उसामंदी बांधला मी गोड गोड झुला

झोप झोप झोप, आता झोप माझ्या बाळा !!

उसामधला गोडवा राजा यावा तुझ्या जिंदगीला

अंग कापणाऱ्या पाचटाला मी सोशील रे बाळा!!

गेल्या साली याच रानी तू जन्मताना बाळा

चार ऊसाच्या चिपाडांनी मज आडोसा रे दिला!!

माझासुद्धा जन्म बाळा असा फडातच झाला

माय असून पोटोशी बाप पोट भरायाला आला !!

शिळ्या भाकरीवं रातीच्या कसं पाजणारं तुला

मी बांधतेय मोळी जीव झुल्यात गुंतला!!

पाणी कोपीतं शिरलं पाऊस अवकाळी आला

तुझ्या बाच्या खांद्यावं तू सारी रात निजला!!

म्होरच्या जन्मी नको जन्मू उसामंदी बाळा

ऊस नसतो रे गोड जगता ऊसामंदी बाळा!!

'उसामधली' जिंदगानी नसो वैऱ्याच्या वाटेला

कैक खपतात पिढ्या नसे 'गोडवा' जिंदगीला!!

- जगदीश पवार, कुसळंब, बीड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर-13डिसेंबर

0
0

व्हीआयपी रोड

धोकादायक वाहतूक

शहरातील व्हीआयपी रस्त्यावर ट्रँक्टरमधून उसाची चिपाडे अशाप्रकारे ओव्हरलोड भरून बिनधास्त नेली जात आहेत. ट्रँक्टरबाहेर ओसंडून वाहणारे उसाची चिपाटांमुळे मागील वाहनचालकांना रस्त्याचा अंदाजही येत नाही. भर वर्दळीच्या मार्गावर अपघात टाळणेसाठी जबाबदार यंत्रणेकडून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी जनता करीत आहे.

- शरद लासूरकर, औरंगाबाद.

सिद्धार्थ उद्यान

पर्यटन नगरीतील प्राणिसंग्रहालय वाचवा

झू अॅथॉरिटीच्या निकषांचे योग्यपणे पालन होत नसल्याने सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय बंद होण्याचे संकेत मिळाल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ पाहण्यासाठी पर्यटक दूरवरून औरंगाबादेत मुक्काम ठोकतात. शहरातील स्थानिक पर्यटनस्थळे पाहतात. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय आवडीने पाहतात, परंतु नैसर्गिक पद्धतीच्या पिंजऱ्याचा अभाव, सदोष संरक्षक भिंती आणि विस्तृत नैसर्गिक जागेचा अभाव यासारख्या निकषाचे पालन होत नसल्याचा ठपका ठेऊन हे एकमेव ठपका ठेवून प्राणीसंग्रहालय बंद करण्याचे संकेत मिळाल्याने औरंगाबादला येणाऱ्या पर्यटकांचा व बच्चे कंपनीचा हिरमोड होऊ नये म्हणून तात्पुरती स्थगिती मिळविण्याऐवजी कायमस्वरुपी उपाययोजना करून या पर्यटननगरीची लाज राखण्यासाठी हे एकमेव प्राणी संग्रहालय वाचण्यासाठी खुद्द लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे शहरवासीयांचे मत आहे.

- रवींद्र तायडे, हर्सूल

मुख्य डाक घर

अस्वच्छ कार्यालय

जुना बाजार येथील शहरातील मुख्य डाक विभागातील स्वच्छतागृह अस्वच्छ असून, दररोज स्वच्छता केली जात नाही, असे दिसून आले. बाहेरील ग्राहकांना याचा मोठा त्रास होतो. स्वच्छता जनजागृतीसाठी जाहरतीवर कोट्यवधी खर्च केला जातो, परंतु केंद्र शासनाच्या कार्यालयातच अस्वच्छ. यावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

- निवृत्ती दाभाडे, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वस्थ भारत यात्रा रॅली’ आज येणार शहरामध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

योग्य व संतुलित आहाराबाबत जनजागृतीसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे काढण्यात आलेली 'स्वस्थ भारत यात्रा' शुक्रवारी औरंगाबादमध्ये येत आहे. १८ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबादमध्ये शनिवारी (१५ डिसेंबर) सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेसात वाजता औरंगपुरा येथून महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही फेरी महसूल प्रबोधिनी येथे पोहचणार आहे. यावेळी शालेय विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यानंतर साडे नऊ वाजता प्रबोधनपर कार्यक्रम, अन्न वाचवा समितीचा महसूल प्रबोधिनी येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अन्न वाचवा समितीचे अनंत मोताळे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सायंकाळच्या सत्रात त्यानंतर साडे चार वाजता कॅनॉट प्लेस व सहा वाजता प्रोझोन मॉल येथे ही जनजागृती करण्यात येणार आहे. ही फेरी १६ डिसेंबरला फेरी लोणी खुर्दकडे रवाना होणार आहे. तेथे वैजापुर तालुक्याचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या उपस्थितीत स्वागत, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. १७ रोजी लोणी खुर्द येथील विनायकराव पाटील माध्यमिक विद्यालयात सकाळी ११ वाजता प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात ४ वाजता आरोग्यदायी आहार व जीवनशैलीबाबत व्हीडिओ क्लिपचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

\Bमालेगावला जाणार

\B१८ डिसेंबर रोजी सकाळी ही फेरी मालेगावकडे रवाना होणार आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन समन्वय करत आहे. यात सहआयुक्त उदय वंजारी, सहायक आयुक्त मिलिंद शाह, कॅ. नीलिमा गौर, प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे, लेफ्ट. डॉ. सुलक्षणा जाधव, मुख्याध्यापक उज्वला निकाळजे आदींच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरती मेळाव्यातून मिळाली २४० विद्यार्थ्यांना नोकरीची

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) 'बीटीआरआय' सेंटरने गुरुवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा घेतला. २९० विद्यार्थ्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला त्यातील २४० विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवार म्हणून विविध कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

अभियांत्रिकी, तंत्रनिकेतनसारख्या अभ्यासक्रमासाठी नोकरीच्या संधी फारशा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नोकरी शोधण्याची या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर येते. मात्र, गुरुवारी 'आयटीआय'मध्ये झालेल्या भरती मेळाव्यात या अभ्यासक्रमाचा कल का आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले. रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत उमेदवार निवडीसाठी गुरुवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज व रेल्वेस्टेशन परिसरातील कंपन्यांनी त्यात सहभाग घेतला. काही कंपन्यांनी ग्रुप चर्चा, प्रत्यक्ष मुलाखतीतून विद्यार्थी निवडले तर काहींनी थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली. विजतंत्री, तारतंत्री, कातारी, कम्प्यूटर ऑपरेटर, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, शीटमेटल वर्कर अशा विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सकाळपासून हजेरी लावली. सकाळी ११ नंतर मुलाखतीला सुरुवात झाली. यातून २४० विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. शिकाऊ उमेदवार म्हणून संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना किमान दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाते. मेळाव्याला इन्डोरन्स सिस्टीम, व्हेरॉक, इंजिनीअर्स, लेझर इंडिया, धूत ट्रान्समिशन, युनिकार्ड, क्लॅडमेटल इंजिनीअरिंग, शांतदीप इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांनी सहभाग घेतला. विविध अभ्यासक्रमापैकी फिटर, इलेक्ट्रिशनचे विद्यार्थी सर्वाधिक होते. मेळाव्यासाठी प्राचार्य अभिजित आलटे, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार संजय गौरशेटे, राजेंद्र भटाणकर, सुभाष बोडखे, राजू गिरबोने, बावीस्कर, गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

३५० कंपन्या, दोन हजार जागा

शिकाऊ उमेदवार म्हणून कंपन्यांना विद्यार्थ्यांची निवड करणे बंधनकारक असते. आयटीआयकडे ३५० कंपन्यांची नोंद आहे. त्या कंपन्यांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची निवड होते. दरवर्षी सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देण्यात येते. नोकरीसाठी अनेकदा विद्यार्थ्यांना अनुभव विचारला जातो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आयटीआयच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत अशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना अनेक कंपन्या पुढे नोकरीत कायम करतात.

निकाल लांबल्याने दोन वेळा प्रक्रिया

'आयटीआय'च्या विविध ट्रेडचा निकाल जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया केली जाते. या शैक्षणिक वर्षात निकाल लांबला होता. निकालाला विलंब होत असला तरी त्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा संधी देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे सप्टेंबरमध्येच निकालापूर्वी अशा प्रकारची प्रक्रिया राबविण्यात आली. आता, आठ दिवसापूर्वी निकाल जाहीर झाला. त्यामुळे त्यावेळी रिक्त राहिलेल्या शिल्लक जागांसाठी प्रक्रिया करण्यात आली.

..

एवढ्या विद्यार्थ्यांना मिळाली संधी...२४०

..

विविध पंधरा पेक्षा नामांकित कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला त्यातून ही निवड झाली आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या मेळाव्यातून संधी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. या योजनेचा विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीकोनातून चांगला फायदा होतो.

अभिजित आलटे,

प्राचार्य,

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवी हा द्रष्टा असतो !

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'प्रत्येक काळात कविता प्रचंड लिहिली गेली आहे. या परिस्थितीत कवीने वाहवत जाण्याची गरज नसून, शब्द सामर्थ्य ओळखण्याची गरज आहे. कवीने शब्द शस्त्रासारखे वापरावे. कारण कवी हा द्रष्टा मानला जातो,' असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांनी केले. 'मटा कविसंमेलन' उपक्रमात त्या बोलत होत्या.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या (औरंगाबाद आवृत्ती) सातव्या वर्धापनदिनानिमित्त फेसबुक 'मटा कविसंमेलन' घेण्यात आले. या उपक्रमाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल २५६ कवींनी सहभाग घेत वैविध्यपूर्ण कविता सादर केल्या. या उपक्रमातील सर्वोत्कृष्ट पाच कवितांची निवड करून कवींचा सन्मान करण्यात आला. 'मटा' कार्यालयात गुरुवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील, परीक्षक कवी श्रीधर नांदेडकर, 'साकेत' प्रकाशनच्या प्रतिमा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती. नवोदित कवींच्या कवितेवर व मांडणीवर अनुराधा पाटील यांनी भाष्य केले. 'नवोदित कवींकडून दर्जेदार कवितेच्या अपेक्षा आहेत. उत्तम कवितेसाठी विचार व चिंतनाची गरज आहे. आपल्यासमोर अनेक गोष्टी घडतात. आपल्या मध्यमवर्गीय जगण्याला पडझडीचे फार संदर्भ नसतात. तरीसुद्धा वाहवत न जाता स्वत:ची क्षमता ओळखून व्यक्त होणे आवश्यक आहे. नव्याने करता येईल, अशी फक्त कविता गोष्ट आहे. कारण भाषेत नावीन्य असते. कवीने कवितेत स्वत:ची भाषा घडवावी,' असे पाटील म्हणाल्या.

श्रीधर नांदेडकर यांनी चिंतनशील कवितेची गरज व्यक्त केली. 'कष्टपूर्वक लिहिलेली कविता छापून येणे अद्भूत गोष्ट होती. सोशल मीडियासारखे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे कविता लेखनाचा वेग वाढला आहे. ही गती कवितेसाठी फलदायी नाही. कवीला चिंतनासाठी वेळ उरला नाही. अभिव्यक्तीसाठी माध्यम उपलब्ध असले तरी संयमित आणि चांगला वापर गरजेचा आहे. भराभर लिहिण्यातून कवितेचा मूळ गाभा हातून निसटतो. खूप कविता लिहिण्यापेक्षा मोजके लेखन करा. या घाईत अनेक चांगल्या कवींची वाट चुकते' असे नांदेडकर म्हणाले. कवींसाठी लेखनाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. विविध माध्यमातून व्यक्त होण्याची गरज प्रतिमा भांड यांनी व्यक्त केली. 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

तरुण कवींनी कविता आतून फुलून द्यावी आणि नंतर लिहावी. दरवर्षी एक कवितासंग्रह प्रकाशित करावा हा दबाव कुठून येतो ? खूप लिहिण्यापेक्षा मोजकेच आणि दर्जेदार कविता लेखन महत्त्वाचे असते.

- श्रीधर नांदेडकर, कवी-परीक्षक

कविता लिहिणे ही दैवी देणगी मानते. कविता लेखन हा अत्यंत अवघड प्रकार आहे. पण, कवितेसोबतच कवींनी लेखनाचे इतर प्रकार हाताळावे असे वाटते. या क्षेत्रातली प्रतिभेला मोठी संधी आहे.

- प्रतिमा भांड, प्रकाशक, 'साकेत प्रकाशन'

\B---

विजेते कवी

---

\B- शब्बीर शेख, सिल्लोड

- नम्रता फलके, औरंगाबाद

- रामप्रसाद वाव्हळ, औरंगाबाद

- नीलेश चव्हाण, औरंगाबाद

- जगदीश पवार, बीड

\B

---

क्षितीज

\B---

आता माझ्या घरावरून समोरची क्षितीजं दिसत नाहीत

त्यांची जागा आता मुक्त हवा बंदिस्त करणाऱ्या दुमजलींनी घेतली आहे...

विटा वाढविण्याच्या त्यांच्या शर्यतीत माझ्या मावळत्या सूर्याचा त्यांनी बळी

घेतलाय..

हवाही वाहते मोजकीच इथे

पावसांच्या धाराही फक्त अश्रूच गाळतात !

या जगाचा क्रूर शाप भोगतंय माझं जग

जे सोज्ज्वळ निरपेक्ष होतं काही वर्षांपूर्वी !

उसासे सोडतोय तो डोंगर जो हरलाय या शर्यतीत…

आता माझ्या घरावरून समोरची क्षितीजं दिसत नाहीत...

आधी हवा सुसाट असायची माझ्या चेहऱ्यावर

आता दबकतच शिरते या बंदिस्त छपरावर

चांदण्या मोजतानासुद्धा एखादी छत्री मोजावीच लागते आता !

त्या स्वच्छंद दृष्टिक्षेपाला कैद केलय यांच्या अहंकाराने

ज्यांना फरकच पडत नाही चिवचिवाट संपल्याने

कारण आता माझ्या घरावरून समोरची क्षितीजं दिसत नाहीत...

क्षितीजं दिसत नाहीतच आता !

काही दिवसांतच कळेल त्यांना

क्षितीजं हरविल्याची किंमत

जेव्हा शरीर असेल कोमेजलेलं त्यांच्या आर्टिफिशल प्रकाशात

आणि एअर कण्डीशनल ऑक्सिजन त्यांच्या फुफ्फुसांत तेव्हा फक्त उशीर होऊ नये,

आणि क्षितिजांनी उठाव करू नये

एवढीच प्रार्थना !

- नम्रता फलके, औरंगाबाद

---

\Bजंगल

\B---

रोज रोज भांडण होतं

माझ्यात आणि आज्जीत

बोलत असतो आम्ही

जे जे येईल मर्जीत

आज्जी म्हणते

संपत चाललंय जंगल

वाढत चाललंय शहर

मी म्हणतो

वाढत चाललंय जंगल

संपत चाललंय शहर

आज्जी म्हणते बेटा असं

बोलू नको रेटून

जंगलच जंगल असे

वस्तीला खेटून

रोज रोज पडायची

माणसाच्या कानी

चिमणीची चिवचिव

कोकिळेची गाणी

कमी झालेत पशू पक्षी

दिसत नाही झाड

कुठेच पशू पक्ष्यांचे

होत नाही लाड

मी म्हणतो आज्जी तुझं

सगळं आहे कबूल

पण एक छोटीशी

करतेस तू भूल

मनामनात जहर आहे

रोज नवीन कहर आहे

माणसाचं जिनं आज्जी

पशूपेक्षा बत्तर आहे

एकाला लागून दुसरी

गुहा आहे घर नव्हे

म्हणून म्हणतो आज्जी मी

हे जंगल आहे शहर नव्हे

- शब्बीर शेख, सिल्लोड

---

\Bगेला गेला दूर गेला

\B---

गेला कुठे पावसाळा ?

लागे मातीला तहान

गेला कुठे पावसाळा ?

सारं करपलं रान

कसा निघतो हा जाळ

ये रे परतूनी बाबा

सुनं होण्याआधी भाळ

ढग पांढरा पांढरा

ढग गेला कुठे काळा ?

लागे मातीला तहान

गेला कुठे पावसाळा ?

मन लागेना वारीत

मन आहे वावरात

पावसाळा लपला का

विठू तुझ्या रे घरात ?

विठू जळाली तुळस

तुला तुळशीच्या माळा

लागे मातीला तहान

गेला कुठे पावसाळा ?

- नीलेश चव्हाण

---

\Bतुझ्या माझ्या राखेने....

\B---

तू भिरकावलेस दगड

मीही भिरकावले दगड

त्याने आभाळाला तडे गेले

तुझे रान माझे रान

गारांनी उद्ध्वस्त केले

तू पेटविलेस बांध

मीही पेटविले बांध

आग पाताळाला गेली

तुझ्या-माझ्या मातीची

कूस जळून खाक झाली

तू तडफडून मेलास

मीही तडफडून मेलो

रानाचे स्मशान झाले

तुझ्या- माझ्या राखेने

हे शिवार अंधूक झाले....

-रामप्रसाद वाव्हळ

---

\Bउसामधली जिंदगानी

\B---

उसामंदी बांधला मी गोड गोड झुला

झोप झोप झोप, आता झोप माझ्या बाळा !!

उसामधला गोडवा राजा यावा तुझ्या जिंदगीला

अंग कापणाऱ्या पाचटाला मी सोशील रे बाळा!!

गेल्या साली याच रानी तू जन्मताना बाळा

चार ऊसाच्या चिपाडांनी मज आडोसा रे दिला!!

माझासुद्धा जन्म बाळा असा फडातच झाला

माय असून पोटोशी बाप पोट भरायाला आला !!

शिळ्या भाकरीवं रातीच्या कसं पाजणारं तुला

मी बांधतेय मोळी जीव झुल्यात गुंतला!!

पाणी कोपीतं शिरलं पाऊस अवकाळी आला

तुझ्या बाच्या खांद्यावं तू सारी रात निजला!!

म्होरच्या जन्मी नको जन्मू उसामंदी बाळा

ऊस नसतो रे गोड जगता ऊसामंदी बाळा!!

'उसामधली' जिंदगानी नसो वैऱ्याच्या वाटेला

कैक खपतात पिढ्या नसे 'गोडवा' जिंदगीला!!

- जगदीश पवार, कुसळंब, बीड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनो, समितीसमोर सकारात्मक बोला !

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 'नॅक' मूल्यांकनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संशोधक विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला सहा गुण असून विद्यार्थ्यांनी समितीसमोर सकारात्मक बोलावे असे आर्जव प्रशासनाने केले आहे. पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्यांची मंगळवारी प्राथमिक बैठक घेण्यात आली. दुसरी बैठक शुक्रवारी सिफार्ट हॉल येथे होणार आहे.

'नॅक' समिती विद्यापीठ मूल्यांकनासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार पूर्वतयारी केली आहे. वेगवेगळ्या स्तरावर 'नॅक' नियोजन समिती बैठका घेऊन विद्यार्थी, विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. संशोधक विद्यार्थीसुद्धा 'नॅक' समितीसमोर माहिती सादर करणार आहेत. या सादरीकरणाला सहा गुण आहेत. संशोधनासाठी विद्यापीठातील पूरक वातावरण, बलस्थाने, उणिवा, अभ्यासक्रमाचे स्वरुप याबाबत समिती माहिती जाणून घेणार आहे. या समितीला सामोरे जाण्यापूर्वी 'नॅक'चे समन्वयक डॉ. एम. डी. शिरसाट आणि सहकाऱ्यांनी संशोधक विद्यार्थ्यांची बैठक घेतली. महात्मा फुले सभागृहात मंगळवारी झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. विद्यापीठाच्या मानांकनावर संशोधन प्रक्रिया आणि अनुदाने अवलंबून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समितीसमोर सकारात्मक बोलावे. विद्यापीठाच्या बलस्थानावर अधिक भर द्यावा, अशी विनंतीवजा सूचना करण्यात आली. मागील अडीच वर्षांपासून 'पेट' परीक्षेचा गोंधळ सुरू असताना थेट सकारात्मक बोलण्याची सूचना विद्यार्थ्यांना आश्चर्यचकीत करून गेली. विशेष म्हणजे याच मुद्द्यावर शुक्रवारी पुन्हा सिफार्ट सभागृहात सकाळी मार्गदर्शन बैठक होणार आहे. 'नॅक' मूल्यांकनाला सामोरे जाण्यापूर्वी विभागनिहाय त्रुटी जाणून घेण्यासाठी प्रशासनाने देशभरातील तज्ज्ञांची समिती पाचारण केली आहे. या समितीने कुलगुरूंशी चर्चा करून काही विभागांना भेटी दिल्या. त्यामुळे अनेक विभागात अचानक नियमित तासिका आणि प्रात्यक्षिके होताना दिसली. अनेकदा तासिकांसाठी विद्यार्थी ताटकळत असताना प्राध्यापक केबिनबाहेर येत नाहीत. 'नॅक'च्या धास्तीने वर्गातील फळ्यावरील धूळ झटकली गेली. प्रत्येक विभागाची रंगरंगोटी आणि डागडुजी सुरू आहे. रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून नवीन फर्निचर आल्यामुळे विभागांचा कायापालट झाला आहे.

\Bसमितीने दाखवल्या त्रुटी

\B'नॅक' मूल्यांकनापूर्वी आपल्या स्तरावर विद्यापीठाने बाह्य गुणवत्ता परीक्षण करण्याचा निर्णय घेतला. ही एक प्रकारे 'नॅक'ची रंगीत तालीम ठरणार आहे. माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद मियाँ यांच्या अध्यक्षतेखालील समितीत एस. के. चक्रवर्ती, प्रोफेसर दिलीप मोहिते, प्रोफेसर देवानंद, डॉ. पी. के. प्रियन, डॉ. वेदमूर्ती ए. बी., प्रो. गौरी दत्त शर्मा यांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी समितीसमोर गुरुवारी सकाळी 'नॅक'चे सादरीकरण केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर आणि 'नॅक'चे समन्वयक डॉ. एम. डी. शिरसाट उपस्थित होते. सादरीकरणातील त्रुटी लक्षात घेऊन समितीतील सदस्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निष्काळजीपणामुळे १५ लाख गहाळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल १५ लाखांची रक्कम असलेला कारच्या टपावर ठेवलेला बॉक्स गहाळ झाला. हा प्रकार गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजता केंम्ब्रिज चौकात घडला. ही रक्कम वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेची होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

डॉ. राजकुमार पाटणी यांची वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था आहे. त्यांनी त्यांच्या पाचोड येथील शाखेचे जमा झालेले १५ लाख रुपये त्यांच्या कारमध्ये ठेवले होते. गुरुवारी सकाळी त्यांचा भाऊ संजय पाटणी (रा. एन-एक) हा ती कार घेऊन जालन्याकडे निघाला होता. यावेळी केंम्ब्रिज चौकाजवळ त्यांना राजकुमार पाटणीचा फोन आला. त्यांनी कारमध्ये १५ लाखांची रक्कम असून, ती मुख्य शाखेत भरायची आहे, असे सांगितल्याने संजय पाटणी यांनी कार थांबवली. त्यांनी १५ लाख असलेला बॉक्स कारमधून बाहेर काढला. यानंतर कारच्या टपावर बॉक्स ठेवला. मुकुंदवाडी येथे बोलावण्यात आल्याने त्यांनी 'यूटर्न' घेतला. यावेळी वरती ठेवलेला बॉक्स घेण्यास ते विसरल्याने बॉक्स खाली पडला. काही अंतरावर गेल्यास त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी पुन्हा केंम्ब्रिज चौक गाठले. त्यावेळी त्यांचा बॉक्स एका तरुणाने पळत येऊन उचलत नेल्याची माहिती तेथील रिक्षाचालकांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाले, गुन्हे शाखेचे शेख अफरोज, सुभाष शेवाळे, सय्यद अशरफ, गजेंद्र शिंगणे आदींनी भेट दिली. दरम्यान याप्रकरणी तपास सुरू असून, सीसीटीव्ही चित्रिकरण तपासण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक माळाले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जासाठी बँकेपुढे उपोषण; शेतकऱ्याचा मृत्यू

0
0

परभणी : पाथरीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर बुधवारपासून उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा गुरुवारी दुपारी हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. वारंवार बँकेचे खेटे मारून सुद्धा कर्ज भेटत नसल्याने हा शेतकरी वैतागला होता, त्यामुळे संबंधित बँक प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला होता.

तुकाराम वैजनाथराव काळे (वय ४२, रा. मरडसगाव ता. पाथरी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पाथरी येथे स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या विरोधात यापूर्वी भाकपाच्या नेतृत्वात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी विविध मार्गांनी आंदोलने केली. परंतु, प्रत्येक वेळी बँक अधिकाऱ्यांनी आश्वासनावर बोळवण केल्याने बुधवारपासून (१२ डिसेंबर) बँकेपुढे शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, या दरम्यान गुरुवारी (१३ डिसेंबर) दुपारी छातीत दुःखत असल्याने काळे यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मानवत येथील शासकिय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली.

दरम्यान, या घटनेमुळे पाथरी शहरातील बँके समोर शेतकरी मोठ्या संख्येने जमले आहेत. या दुर्घटनेस बँकेचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाकपचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी पाथरीच्या पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत ठिय्या दिला होता. ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाल्याने घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर मराठवाड्यात रेल्वेने चारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्यात जूनपर्यंत चारा कमी पडणार नाही. एकही पशुधन चाऱ्यापासून वंचित राहणार नाही. मात्र, तशीच वेळ आली तर ठाणे, पालघर येथून रेल्वेने चारा आणू,' असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्‍धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले. जानकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

जानकर म्हणाले, 'सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. गाळपेऱ्याच्या माध्यमातून चाऱ्याचा प्रश्न सुटणार असून, जूनपर्यंत चारा कमी पडणार नाही. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही प्रमाणात अडचण आहे. मात्र, ही अडचण गाळपेऱ्याच्या माध्यमातुन दूर केली जाईल, तरीही चारा कमी पडलाच तर ठाणे तसेच पालघरमध्ये डेअरीच्या मोठ्या जमिनीवर चारा उत्पादन करण्यात आले आहे. तेथून मराठवाड्याला पुरेल इतका चारा उपलब्ध होऊ शकतो. औरंगाबाद जिल्ह्यात दोन हजार हेक्टर पैकी १७०० हेक्टर गाळपेऱ्याचे नियोजन झाले असून, त्याला मंजुरीही मिळाली आहे. राज्यात पशुगणना सुरू असून सध्या ७० टक्‍के तालुक्यांमधील गणना पूर्ण झाली आहे,' असे त्यांनी सांगितले.

\Bजीओ टॅगिंगद्वारे चारा छावण्यांचे सनियंत्रण

\B'चारा कमी पडल्यास जनावरांना चारा छावण्यांद्वारे चारा पुरवण्यात येणार असून यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून चारा छावणीचे संपूर्ण सनियंत्रण जिओ टँगिंगद्वारे येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनविण्यात येणार आहे. सध्या प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मागणी आल्यास टँकर सुरू करण्यात येते. मात्र, आता जनावरांच्या पाण्यासाठीही टँकर उपलब्‍ध करून देण्यात येणार आहेत. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी जितके टँकर सुरू आहेत तेवढेच टँकर जनावरांसाठी देण्यात येतील,' असे जानकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिविगाळ, मारहाण; सहाजणांना सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या भांडणावरुन महिलेसह तिच्या मुलीला जातीवाचक शिविगाळ व मारहाण करणाऱ्या सहा आरोपींना 'अॅट्रॉसिटी'सह इतर कायद्यान्वये तीन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी ३ हजार रुपये अशा १८ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी गुरुवारी (१३ डिसेंबर) ठोठावली.

या प्रकरणी इंदुबाई अशोक दांडगे (४०, रा. डोंगरगाव, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २० फेब्रुवारी २०१६ रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी ही घरासमोर बकऱ्यांना चारत होती. त्यावेळी मोहम्मद अहमद मोहम्मद उमरशेख (३२), मोहम्मद इसाक मोहम्मद उमरशेख (४०), तकी उमरशेख (४८), जाकेर उमरशेख (३२), शाकेर उमरशेख (३०), फारुक उमरशेख (३५), शेरा उर्फ रफिक उमरशेख (४१, सर्व रा. डोंगरगाव) हे आरोपी फिर्यादीच्या घरासमोर आले व त्यांनी जुन्या भांडणावरुन फिर्यादीसह फिर्यादीच्या मुलीला जातीवाचक शिविगाळ व मारहाण केली; तसेच जिवे मारण्याची धमकीदेखील दिली. फिर्यादीच्या घराजवळ राहणारे गौतम दांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, आरोपींनी तिथून पळ काढला. या प्रकरणात अनुसुचित जाती प्रवर्गातील फिर्यादीच्या तक्रारीवरुन भादंवि ३५४, १४३, ३२३, ५०४, ५०६ सह अॅट्रॉसिटी कायद्याच्या ३(१)(१०), ३(१)(११) कलमान्वये सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी एस. बी. माने यांनी प्रकरणाचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.

\B... तर २१ दिवस अतिरिक्त शिक्षा

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील शरद बांगर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात फिर्यादीसह फिर्यादीची मुलगी व गौतम दांडगे या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब महत्वपूर्ण ठरले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने पहिल्या सहा आरोपींना भादंवि १४३, ३२३, ५०४, ५०६, १४९ सह अॅट्रॉसिटी कायद्याच्या ३(२)(va) कलमान्वये तीन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २१ दिवस अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तर, सातवा आरोपी शेरा उर्फ रफिक उमरशेख याला सबळ पुराव्याअभावी मुक्त केले. अॅड. बांगर यांना अॅड. विलास ढाकणे व हेड कॉन्स्टेबल पठाण यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीची लैंगिक छेड; आरोपीला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील सात वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणारा आरोपी करण टिल्लू घोडके याला अटक करून गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले. ११ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेसहाला आरोपी करण टिल्लू घोडके (२०, रा. औरंगाबाद) याने पीडित मुलीला आपल्या घरी बोलावून घेतले आणि तिची लैंगिक छेड काढली. या प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला बुधवारी अटक करून गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांची नोंदणी करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इमारत बांधकाम कामगारांची त्वरित नोंदणी करण्यात यावी, नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा यांसह अन्य मागण्यांसाठी छावा श्रमिक संघटनेने गुरुवारी येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

गवंडी, सेट्रिंग, सुतार, फरशी पॉलिश, वायरमन, वेल्डर आणि इतर बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान व्हावी, यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळामार्फत या असंघटित कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मंडळाकडे कोट्यवधी रुपये असताना एकाही कामगारास घरासाठी कर्ज व अनुदान का दिले जात नाही, असा सवाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शैलेशराव भिसे यांनी यावेळी केला.

कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. कामगारांची मंडळात नोंदणी, नूतनीकरण तात्काळ करा, 'बीपीएल' कार्ड देण्यात यावे, नाक्यावरील कामगारांसाठी शिबिरे घेण्यात यावी, त्यांच्यासाठी नाक्यावर व साइटवर जेवणाची व्यवस्था करण्यात यावी, सर्व इमारत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट देण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. कामगार उपायुक्तांना संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे निवेदन सादर करण्यात आले. मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्या अन्यथा तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही यावेळी संघटनेने दिला. प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, मराठवाडा कार्याध्यक्ष विजय पातुरकर, राखी सुरडकर, अंजू माने, गणेश थोरात, नितीन आजमेरा, लहू राठोड, साधना धायडे, महादेव प्रधान आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री. श्री. रवीशंकर ६ फेब्रुवारीपासून शहरात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री. रवीशंकर यांचे ६ फेब्रुवारीला औरंगाबाद व जालना शहरात आगमन होत आहे. यानिमित्ताने 'विठ्ठला' या महासत्संगाचे तसेच साधक व निमंत्रितासाठी 'अमृतधार' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर जालना जिल्ह्यातील वाटूर येथे उभारण्यात आलेल्या ध्यान केंद्राचा लोकार्पण सोहळा होणार असून शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य समन्वयक प्रभंजन महोतोले यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

बीड बायपास येथील जबिंदा इस्टेट येथे ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता 'विठ्ठला' या महासत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने २ हजार १०० वारकरी उपस्थित राहून ते भजन, कीर्तन सादर करणार आहेत. तर ७ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता याच मैदानावर 'अमृतधार' हा साधक व निमंत्रितासाठी कार्यक्रम होणार आहे. श्री. श्री. रवीशंकर यांच्यासोबत प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमही होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी नंदकुमार औटी, श्रीराम बोंद्रे, अमृत भालेकर, प्रितम गोसावी, शिवशंकर स्वामी, सुनीता औटी आदी उपस्थित होते.

टेम्पल ऑफ नॉलेज

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे जालना जिल्ह्यातील वाटूर येथे ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे. गुरुजींच्या हस्ते ७ फेब्रुवारी रोजी दुपारी या केंद्राचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर कृषी प्रदर्शनाची पाहणी ते करतील आणि शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, वाटूर येथील ध्यान केंद्र हे ग्रामीण भागातील पहिले केंद्र आहे. पाच एकर जागेवर ते उभारण्यात आले असून यात ३०० लोकांची निवासाची व्यवस्था आहे. ग्रामीण भागातील युवकांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी निवासी प्रशिक्षण देणे, शिबिर घेणे, व्यसनमुक्ती, पर्सनल डेव्हलपमेंट, युथ लिडरशीप प्रोगाम, दिव्यसमाज का निर्माण, असे कार्यक्रम आयोजित करणे, नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेती, दुग्ध व्यवसाय, दुग्धजन्य प्रदार्थाची निर्मितीबाबत प्रशिक्षण देऊन छोटे कुटीर उद्योग उभारणीला चालना देत शेतीमालाला मार्केट उपलब्ध करून देणे हा केंद्राचा उद्देश असल्याचे महोतोले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘येळकोट, येळकोट, जय मल्हार’

0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

प्रतिजेजुरी असलेल्या सातारा येथे चंपाषष्ठी निमित्ताने यात्रा भरली असून खंडोबाच्या दर्शनासाठी गुरुवारी भाविकांनी मोठी रांग लागली होती. 'येळकोट, येळकोट, जय मल्हारच्या गजराने संपू्र्ण परिसर दुमदुमून गेला आहे. यात्रेनिमित्ताने अभिषेक, महानैवैद्य, पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

खंडोबाच्या चंपाषष्टी यात्रेनिमित्ताने पहाटेपासूनच खंडोबा मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मध्यरात्री अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहाटे प्रथेप्रमाणे भरीत व रोडगा असा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते महाआरती झाली. आमदार सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे, सायली जामदार, ऋषीकेश खैरे, राजू नरवडे श्री. खंडोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे यांच्यासह अन्य मान्यवर, भाविक उपस्थित होते. त्यानंतर पंरपरेनुसार बेल भंडारा, रेवडी उधळीत 'येळकोट...येळकोट...जय मल्हार चा जयघोषात खंडोबारायांची पालखी मंदिरातून प्रस्थान करीत दांडेकराच्या वाड्याकडे निघाली. मिरवणुकीत टाळमृदंगाच्या गजरात भजनी मंडळाने पावली खेळत भक्तीगिते सादर केले तर आणि डफ, तुनतुन्याच्या तालावर वाघ्या मुरळीचे नृत्य सादर केले. पालखी वाड्यात पोहोचल्यानंतर तेथे भक्तीभावे पूजाअर्चा झाली. दांडेकर परिवारांच्या वतीने रुद्राअभिषेक करण्यात आला तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. रात्री आठ वाजता पुन्हा वाजता गाजत व यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करत मूर्तीची मिरवणूक काढून ती मंदिरात आणण्यात आली, अशी माहिती पुजारी दिलीप धुमाळ यांनी दिली.

परिसरात चैतन्याचे वातावरण

रेवड्या व भंडारा उधळत खंडेरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेसाठी तसेच सर्वांना सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी श्री. खंडोबा देवस्थान समितीमार्फत खास व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस बंदोबस्तासह गावातील युवकांनी स्वंयसेवक म्हणून कार्य केले. वाघ्या मुरळी यांनी तुणतुणे, डफाच्या सुरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत खंडोबाचा गजर करत घातलेला गोंधळ, येळकोट, येळकोट, जय मल्हार जयघोष यामुळे परिसरातील वातावरण भक्तीमय व चैतन्यमय झाले. यात्रेनिमित्ताने फुले, प्रसादाची दुकाने, खेळण्याच्या दुकानासह मोठी जत्रा या ठिकाणी भरली असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेट्रोल नऊ पैशांनी महाग

0
0

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या दीड महिन्यापासून स्वस्त होणाऱ्या पेट्रोलच्या दरात गुरुवारी नऊ पैशांची वाढ झाली. ओपेक देशांच्या झालेल्या बैठकीत पेट्रोलचे उत्पादन वाढविण्यास या देशांनी नकार दिला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढत आहेत.

औरंगाबादमध्ये १५ नोव्हेंबर रोजी पेट्रोलचे दर ८३ रुपये ९९ पैसे प्रतीलिटर होते. बुधवारी (१२ डिसेंबर) पेट्रोलचे दर ७ रुपये १ पैशांनी कमी होऊन ७६ रुपये ८९ पैसे इतके झाले. मात्र, गुरुवारी (१३ डिसेंबर) हे दर ७६ रुपये ९८ पैसे होत त्यात ९ पैशांची वाढ झाली. डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. १५ नोव्हेंबर रोजी डिझेलचे दर ७६ रुपये ७३ पैसे इतके होते. बुधवारी (१२ डिसेंबर) हे दर ६८ रुपये ७५ पैसे प्रतिलिटर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्म संस्कार सोहळ्याला थाटात प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

श्रीक्षेत्र वेरूळ येथे १३ ते १७ डिसेंबरदरम्यान आयोजित संत जनार्दन स्वामी यांच्या २९व्या पुण्यस्मरणार्थ जय बाबाजी धर्म संस्कार सोहळ्याला गुरुवारी थाटात प्रारंभ झाला.

महामंडलेश्वर श्री श्री १००८ शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्र्यंबकेश्वर येथील श्री शंभू पंच दसनाम जुना आखाड्याचे सुखदेवगिरी महाराज, विलासगिरी महाराज, देवानंद महाराज, संत - महंत आणि जय बाबाजी भक्तांच्या उपस्थितीत वेरूळ येथे या सोहळ्याची उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली. यावेळी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय खंबायते, पंचायत समितीचे उपसभापती गणेश अधाने उपस्थित होते.

याप्रसंगी शांतिगिरी महाराज म्हणाले, 'आजकाल मुलांसाठी संपत्तीचा संचय करण्यात पालकवर्गाची धावपळ सुरू आहे. संपत्तीपेक्षा मुलांवर आज चांगले संस्कार केले तर, ते आयुष्यात उपयोगी पडतील. त्यासाठी मुलांना संस्काराची गरज आहे. या सोहळ्यात सात दिवस मौनव्रत धारण करून मुलांवर चांगले संस्कार केले जाणार आहेत. '

हजारो भक्त अनुष्ठान, जपानुष्ठान, तीन प्रकारे यज्ञ, २५१ कुंडात्मक यज्ञ सोहळा, हस्तलिखित जपानुष्ठान, सामूहिक विवाह सोहळा , राज्यस्तरीय कुस्ती, राजकारणाचे शुद्धीकरण विषयावर वक्तृत्व स्पर्धा,आंतरशालेय क्रीडा स्पर्धा अशा विविध कार्यक्रम या निमित्ताने होणार आहेत. विशेष म्हणजे भाविकांच्या मातापित्यांना हेलिकॉप्टरमधून हवाई दर्शन करण्यात येणार आहे. या सोहळ्याची सांगता २० डिसेंबर रोजी होणार असून , लाखो भाविक सांगता सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. बाबाजींनी सुरू केलेल्या परंपरा पुढे सुरू ठेवून शांतिगिरी महाराज यांनी अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक कार्य सुरू ठेवल्याची माहिती रामानंद महाराज यांनी दिली.

हा सोहळा यशस्वी होण्यासाठी शिवा अंगुलगावकर, राजेंद्र पवार, झुंबरशेठ मोडके, कृष्णा ठोंबरे, गोरख गावंडे, विजयकुमार अहिरे, जयेश दळवी, शेकनाथ होळकर, जनार्दन रिठे, जनार्दन अधाने, सोहळा समिती व नियोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

\Bयोगींसाठी प्रयत्न सुरू\B

गेल्या २९ वर्षांपासून विविध धर्म संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. २००५मध्ये सर्वात मोठा जय हनुमान धर्म संस्कार सोहळा वेरूळ येथे झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हजेरी चर्चेचा विषय होता. यावर्षी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोहळ्याच्या सांगता समारंभात उपस्थित राहावेत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर तालुक्यात ८६ उमेदवार अपात्र

0
0

वैजापूर : ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च मुदतीत सादर न केल्याने तालुक्यातील ८६ उमेदवारांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे. यात सरपंचपदाची निवडणूक लढविणारे १७ व सदस्य पदाची निवडणेक लढविणाऱ्या ६९ उमेदवारांचा समावेश आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ व मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदती संपणाऱ्या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्यात आल्या. निवडणूक झाल्यानंतर ३० दिवसांत निवडणूक खर्च सादर करणे उमेदवारांना बंधनकारक आहे. निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले व पराभूत झालेल्या उमेदवारांनाही खर्च सादर करणे आवश्यक आहे, परंतप २२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ८६ उमेदवारांना अपात्र घोषित केले आहे.

अव्वलगाव, नांदूरढोक, कोल्ही, तिडी, हिलालपूर, डागपिंपळगाव, माळी घोगरगाव, महालगाव, कनकसागज, नादी व हनुमंतगाव येथील सरपंचपदाची निवडणूक लढविणाऱ्या १७ जणांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. बाबतारा, पारळा, खरज, कविटखेडा, कोल्ही, हिलालपूर, रोटेगाव, भग्गाव, टुणकी, तिडी, गोळवाडी, डागपिंपळगाव, खिर्डी, माळी घोगरगाव, महालगाव, कनकसागज, नादी, पानवी बुद्रूक व हनुमंतगाव येथील सदस्यपदाची निवडणूक लढविणाऱ्या ६९ जणांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यात विद्यमान सरपंच व सदस्यांचाही समावेश आहे. या कारवाईमुळे ग्राम पंचायत सदस्यामध्ये खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुमखमी असेल तर चव्हाणांनी मैदानात उतरावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमदार सतीष चव्हाण यांना फारच खुमखुमी असेल तर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे, असे आव्हान खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले आहे. मैदानात उतरण्यापूर्वी शरद पवारांना विचारून घ्या, असा सल्लाही त्यांनी चव्हाण यांना दिला आहे.

सतीष चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत खैरे लोकसभा निवडणुकीत पडणार असा दावा केला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खैरे 'मटा' शी बोलत होते. खैरे म्हणाले, 'मी विकासाची कामे केल्यामुळेच औरंगाबाद शहर व जिल्ह्यात शैक्षणिक संस्था वाढल्या, शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच देवगिरी महाविद्यालयाचे साम्राज्य वाढू शकले. ज्यांनी देवगिरी कॉलेज आणि कॉलेजच्या संस्थेला मोठे केले त्यांना बाजूला सारून चव्हाण तेथे जाऊन बसले. चव्हाणांची अनेक प्रकरणे माझ्या कडे आहेत, पण मला ती काढायची नाहीत. त्यांना फारच खुमखुमी असेल तर त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे.'

औरंगाबाद हा शिवसेनेचा गड आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हिंदुंची सेवा करतो. चव्हाणांकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे, तसा पैसा आमच्याकडे नाही, असा आरोप खैरे यांनी केला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची चव्हाण यांना फारच इच्छा असेल तर त्यांनी अगोदर शरद पवारांना विचारून घ्यावे आणि त्यानंतर काय तो निर्णय घ्यावाो, असा सल्ला देखील खैरे यांनी चव्हाण यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आकांक्षा देशमुखच्या खोलीची तपासणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. आकांक्षा देशमुख खुनप्रकरणात घाटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वसतिगृहामधील खोलीची तपासणी गुरुवारी दोन तास केली. त्यांच्या अहवालाची आता पोलिसांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, याप्रकरणी आत्महत्या आणि खून; तसेच अन्य पैलूंचा विचार करून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्त्या आमदार निलम गोऱ्हे यांनी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्याशी संपर्क साधत तपासाची माहिती जाणून घेतली.

एमजीएम कँपसमधील गंगा हॉस्टेलमध्ये खोली क्रमांक ३३४ मध्ये डॉ. आकांक्षा अनिल देशमुख या तरुणीचा मृतदेह मंगळवारी रात्री आढळला होता. घाटी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेम केल्यानंतर प्राथमिक अहवालामध्ये गळा आवळल्याने मृत्यू झाला, असा अभिप्राय आला होता. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको पोलिसांनी बुधवारी तिच्या खोलीची तपासणी करून तिचे साहित्य जप्त केले होते. घाटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, निर्मला परदेशी यांनी गुरुवारी सकाळी गंगा हॉस्टेलला भेट दिली. सुमारे दोन तास तिच्या खोलीची तपासणी या पथकाने केली. यामध्ये हा खुनाचा प्रकार आहे अथवा आत्महत्या आहे याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत पत्रकारांना माहिती देताना पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी आकांक्षाच्या खुनप्रकरणात सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती दिली. गळा आवळून स्वत: अशा पद्धतीने आत्महत्या करता येऊ शकते, हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मजुराची माहिती मागवली

आकांक्षाची खोली ज्या मजल्यावर आहे, त्या खोलीसमोर बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी पत्रे लावण्यात आले आहे. यामध्ये पत्रा बाजूला करून आकांक्षाच्या मजल्यावर येता येऊ शकते. याची चाचपणी देखील पोलिसांनी केली आहे. या ठिकाणी बांधकाम करणाऱ्या मजुरांची माहिती पोलिसांनी मागवली आहे.

मृतदेह हलवल्यामुळे तपासात अडथळा

आकांक्षा तिच्या खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेली होती. तिला एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झालेला असल्याचे स्पष्ट झाले. साडेनऊ ते साडेदहा यादरम्यान हा सर्व प्रकार घडला. तेथील डॉक्टरांनी सव्वाअकरा वाजता सिडको पोलिसांना हा प्रकार कळवला. आकांक्षा तिच्या खोलीत असताना एमजीएम प्रशासनाने तातडीने सिडको पोलिसांना हा प्रकार कळवला असता तर नक्कीच तेथील परिस्थितीवरून पोलिसांना तपासात मदत झाली असती, मात्र आता तपासात अडथळा येत असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली.

डॉ. आकांक्षा देशमुख खुनप्रकरणी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्याशी संपर्क साधला. यामध्ये तपासाबाबत चर्चा करून गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत सांगण्यात आले. आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच गुन्हेगारांना शोधण्याचे आश्वासन दिले आहे.

- आमदार डॉ. निलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्त्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images