Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

समृद्धी महामार्ग औद्योगिक, कृषी क्षेत्रासाठी फायदेशीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औद्योगिक वाढीसाठी अनुकुल वातावरण पायाभूत सोयी सुविधा, दळणवळण महत्त्वाचे असते. तसे पोषक वातावरण येथे असून नियोजित समृद्धी महामार्ग हा औद्योगिक व कृषी क्षेत्राच्या अधिक फायद्याचा ठरेल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला. ग्लोब टेक आणि औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशन (आयसा) यांच्या वतीने अयोद्धानगरी येथे आयोजित आयसा इंजिनियरिंग एक्सपो २०१८ या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे शुक्रवारी बागडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती राजु वैद्य, माकिआ मुंबईचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, आयसाचे अध्यक्ष समीर कानडखेडकर, प्रोजेक्ट चेअरमन सतीश लोणीकर, को-चेअरमन विजय जैस्वाल आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी हरिभाऊ बागडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी प्रदर्शनाच्या विविध दालनांना भेट दिली. उद्घाटनपर भाषणात बागडे म्हणाले की, 'औरंगाबाद परिसरात कारखानदारीला फार पूर्वीपासून वाव आहे. बजाजसह अनेक नामांकित कंपन्या येथे आहेत. शेंद्रा औद्योगिक क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी स्वत:हून जमिनी दिल्या, ताबा पावती आधी दिली व नंतर पैसा घेतला. औद्योगिक वाढीसाठी अनुकुल वातावरण पायाभूत सोयी सुविधा, दळणवळण महत्त्वाचे असते. तसे पोषक वातावरण येथे असून नियोजित समृद्धी महामार्ग हा औद्योगिक व कृषी क्षेत्राच्या अधिक फायद्याचा ठरेल.'

आमदार सावे म्हणाले की, 'पूर्वी कंपनीसाठी एखादा पार्ट लागत असेल तर मुंबई, पुण्याला जावे लागत असे. इंडस्ट्रियल सप्लाययर्समुळे गेल्या काही वर्षापासून अन्यत्र जाण्याची गरज भासत नाही.'महापौर घोडेले यांनी औरंगाबाद औद्योगिक हबच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे नमूद केले.

७०० कोटीची उलाढाल

आयसाचे अध्यक्ष समीर कानडखेडकर यांनी सांगितले की, आयसा संघटनेचे २००हून अधिक सदस्य असून या इंडस्ट्रियल सप्लाय व्यवसायाची सुमारे ७०० कोटींची उलाढाल दरवर्षी होते. यातून सुमारे चार हजार जणांना रोजगार मिळाला आहे. शहराचा विकास व औद्योगिक भरभराट व्हावी, हाच या एक्सपो आयोजनाचा उद्देश आहे. संतोष मंडलेचा, सतीश लोणीकर आदींची यावेळी भाषणे झाली. विजय जैस्वाल यांनी प्रस्ताविक केले.

उद्योग आला की शेअरिंग

उद्घाटन सत्रात बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी औद्योगिक क्षेत्रासाठी सर्वात अनुकुल, सुरक्षित क्षेत्र हे औरंगाबादेत असल्याचे सांगितले. त्यानंतर भाषण करताना आमदार झांबड यांनी छोटे मोठे उद्योग येथे येत आहेत, पण डीएमआयसीला बुस्ट करणारे मोठा उद्योग आपण आणू शकलो नाही, असे सांगितले. जेव्हा येथे मोठे उद्योजक येतात, तेव्हा आपलीच काही राजकीय मंडळी त्यांच्याशी वाटाघाटी करतात, शेअरिंग मागतात, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. आयसाचे हे प्रदर्शन औद्योगिक विकासासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नामांकित कंपन्यांचा सहभाग

१७ डिसेंबरपर्यंत आयोजित या प्रदर्शनात देशभरातून अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. इंजिनिअरींग मशीनरी, मशीन टूल्स, ऑटोमेशन, रोबोटिक्स, इंस्ट्रुमेंटेशन कंट्रोल्स, केमिकल प्रोसेस मशीनरी, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स, हायड्रॉलिक्स, पॅकेजिंग, इंडस्ट्रीअल सेफ्टी व सेक्युरिटी इत्यादी संबंधित देशभरातून जवळपास २०० पेक्षाही अधिक प्रदर्शकांचा सहभाग आहे, अशी माहिती संयोजन समितीने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मिनी घाटी’त सिझेरियनचा मार्ग मोकळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिनी घाटी अर्थात चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या शल्यचिकित्सागृहाचे तिन्ही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह म्हणजेच शस्त्रक्रियागृह हे शस्त्रक्रियेसाठी अपेक्षेप्रमाणे योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे आता रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या आठवड्यात स्त्रीरोग विभागामध्ये प्रसुती सेवा सुरू झाली आहे. आतापर्यंत गेल्या सहा दिवसांत तीन महिलांची प्रसुती झाली आहे आणि सध्या रुग्णालयामध्ये काही महिला प्रसुतीसाठी दाखल आहेत. त्याचवेळी रुग्णालयामध्ये सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी शल्यचिकित्सागृहाच्या (ओटी) निर्जंतुकीकरणाची नुकतीच तपासणी करण्यात आली होती. या प्रकारच्या तिन्ही तपासण्यांचा (स्वॅब रिपोर्ट) एकत्रित अहवाल रुग्णालयाला शुक्रवारी (१४ डिसेंबर) प्राप्त झाला. हे तिन्ही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह म्हणजेच अपेक्षेप्रमाणे योग्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता रुग्णालयामध्ये कधीही सिझेरियन शस्त्रक्रिया करता येऊ शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रुग्णालयामध्ये पाच स्त्रीरोगतज्ज्ञ, पुरेशा प्रमाणात परिचारिका व कर्मचारीवर्ग तसेच औषध-साहित्य उपलब्ध असल्यामुळे यापुढील काळात कधीही सिझेरियन शस्त्रक्रिया होऊ शकणार आहे, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्धनच्या आईचा फुटला बांध

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वडील गमावलेल्या अवघ्या दहा वर्षांच्या असहाय वर्धनचा कट कारस्थान रचून अतिशय थंड डोक्याने खून करणाऱ्या दोन्ही मारेकऱ्यांना कोर्टाने शुक्रवारी (१४ डिसेंबर) मरेपर्यंत जन्मठेप ठोठावली आणि कोर्टरूम बाहेर येताच वर्धनच्या आईचा म्हणजेच भारती विवेक घोडे यांचा बांध फुटला. खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हजर राहणाऱ्या, प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या, सरकार पक्षाला व पोलिस यंत्रणेला सतत सहकार्य करणाऱ्या, पण कुठेही भावनाविवश न झालेल्या भारती घोडे यांना शुक्रवारी मात्र भावनांना आवर घालणे शक्य झाले नाही आणि त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. वडिलधारी मंडळी व नातेवाईकांकडून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, त्यांच्यापासून मोजून काही फुटांवर बसलेले दोन्ही मारेकरी मात्र सर्व काही निर्विकारपणे पाहात होते.

वर्धन विवेक घोडे खून खटल्याचा अंतिम निकाल शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या कोर्टात ठे‍ण्यात आला होता व बहुचर्चित निकाल ऐकण्यासाठी सकाळी ११ वाजताच संपूर्ण कोर्ट रूम गच्च भरली होती. अवघ्या दहा मिनिटांत दोन्ही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली. कोणत्या कलमांखाली किती शिक्षा ठोठावण्यात आली, हे न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना न्यायपीठाजवळ बोलावून सांगितले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत आरोपींना कोर्टरूम बाहेर आणून बसवण्यात आले, तर वर्धनचे नातेवाईकही कोर्टरूम बाहेर आले. तेवढ्यात वर्धनची आई भारती घोडे यांना अश्रू अनावर झाले व बघता-बघता त्यांचा बांध फुटला. नातेवाईकांच्या गराड्यातही त्यांचा हुंदका दूरपर्यंत ऐकू येत होता. ते पाहून कोर्टरुम बाहेर जमलेले बहुतेकजण हेलावले, मात्र मोजून काही फुटांवर बसलेले आरोपी अभिलाष मोहनपूरकर व श्याम मगरे यांच्या चेहऱ्यावर तसूभरही अपराधीपणाची भावना दिसून येत नव्हती. शिक्षा सुनावण्यापूर्वी व नंतरही आरोपी निर्विकारच होते.

\Bतांत्रिक पुराव्यांनी सिद्ध केला गुन्हा

\Bतब्बल ७५० पानी दोषारोपपत्र व सुमारे १०० पानी निकालपत्र असलेल्या प्रकरणात ४१ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते व प्रकरणात डीएनए तपासणी, मोबाइल टॉवर लोकेशन, सीसीटीव्ही चित्रिकरण आदी तांत्रिक पुराव्यांसह परिस्थितीजन्य पुरावेही महत्त्वाचे ठरले होते. सुनावणीदरम्यान वर्धनच्या लहानग्या मित्रांनीही कोर्टात सत्यपरिस्थिती कथन केली, ही बाबही लक्षणीय ठरली. एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सर्व तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे जुळवून दाखवण्यात आले व गुन्हा सिद्ध करण्यात आला, हे या प्रकरणाचे वैशिष्ट्य ठरले. त्याचवेळी परिपूर्ण तपास कसा असू शकतो, याचा वस्तुपाठ या खटल्याने घालून दिल्याचे समोर आले आहे.

\Bचार कलमांन्वये शिक्षा

\Bखटल्यात कोर्टाने शुक्रवारी चार वेगवेगळ्या कलमांन्वये शिक्षा ठोठावली. भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमान्वये दोन्ही आरोपींना आजन्म कारावास आणि आरोपी अभिलाष याला अडीच लाख रुपये दंड, तर आरोपी श्याम याला पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोघांना दोन वर्षे सक्तमजुरी, भारतीय दंड संहितेच्या ३६४ (अ) कलमान्वये दोघांना आजन्म कारावास आणि पहिल्या आरोपीला अडीच लाख रुपये दंड, तर दुसऱ्या आरोपीला पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोघांना दोन वर्षे सक्तमजुरी, भारतीय दंड संहितेच्या २०१ कलमान्वये दोघांना पाच वर्षे सक्तमजुरी आणि पहिल्या आरोपीला दहा हजार रुपये दंड, तर दुसऱ्या आरोपीला एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोघांना एक वर्ष सक्तमजुरी, तसेच भारतीय दंड संहितेच्या १२० (ब) कलमान्वये दोघांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि पहिल्या आरोपीला दहा हजार रुपये दंड, तर दुसऱ्या आरोपीला एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोघांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा कोर्टाने ठोठावली.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारांसाठी निकाल ‘आय ओपनर’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वर्धन घोडे खून प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी (आय विटनेस) नसताना पथकाने कौशल्याने तपास केला, परिस्थितीजन्य पुराव्यांवर आरोपींना शिक्षा झाली, याबद्दल विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी तपास पथकाचे कौतूक करीत आभार मानले. हा निकाल गुन्हेगारांसाठी 'आय ओपनर' असून, या निकालामुळे अशा गुन्ह्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा मिसर यांनी व्यक्त केली. निकालानंतर त्यांनी पोलिस आयुक्तालयात पत्रकारांशी संवाद साधला.

'ईझी मनी'च्या मागे लागून काही जण गुन्हेगारीकडे वळतात. सध्या सुरू असलेल्या सावधान इंडिया, क्राइम पेट्रोल अशा मालिका बघून वर्धनच्या खुनाचे कट कारस्थान रचले गेले, मात्र गुन्ह्याचा तपास शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आला. या तपासामध्ये आरोपींच्या येण्या-जाण्याच्या मार्गाचा नकाशा, त्यांचे 'टॉवर लोकेशन', अक्षांश-रेखांक्षदेखील नोंद करण्यात आले. अशा पद्धतीने तपास केल्यास गुन्हेगारीला नक्कीच आळा बसेल, असे नमूद करीत अजय मिसर यांनी नाशिक पोलिस अॅकॅडमीमध्ये या प्रकरणाच्या तपासाचा विषय घेणार असल्याचे सांगितले.

पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी देखील तपास पथकाचे कौतुक केले. गुन्हेगाराला वाटते गुन्हा केल्यानंतर तो सुटून जाईल मात्र पोलिसांच्या तपासातून तो सुटत नाही. हा निकाल त्याचे एक उदाहरण आहे. पालकांनी देखील आपली मुले काय करतात याकडे लक्ष ठेवणेही गरजेचे असल्याचे मत चिरंजीवप्रसाद यांनी व्यक्त केले. वर्धन घोडे खून प्रकरणात त्यावेळी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. या पथकामध्ये जवाहरनगरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर, अविनाश आघाव, एपीआय राहुल खटावकर, पीएसआय कैलास महांडुळे, दादाराव कोपनर, पोलिस कर्मचारी एस. आर. बडगुजर, वीरेश बने, शेख नवाब, समाधान काळे आदींचा समावेश होता. या तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी पुष्पगुच्छ देत सत्कार केला. तपास अधिकारी म्हणून मनोगत व्यक्त करताना पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी, शॉटकर्ट मारत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना ही चपराक आहे. त्यामुळे गुन्हेगारांनी सावधान होणे गरजचे आहे. या निकालामुळे वर्धन घोडेच्या आईला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसरे तपास अधिकारी अविनाश आघाव यांनी, 'या गुन्ह्याच्या तपासात सर्वांनी खूप मेहनत घेतली. या प्रकरणाच्या आरोपपत्राचा पोलिस निरीक्षकांनी अभ्यास करावा, असे सांगितले.'

\Bपश्चाताप दिसला नाही

\Bनिकाल घोषित केल्यानंतर आरोपी अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरेच्या चेहऱ्यावर पश्चातापाची भावना होती का, या प्रश्नावर विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी कोणत्याही प्रकाराचा पश्चाताच त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नसल्याचे सांगितले.

वर्धनच्या मारेकऱ्यांना फाशी झाली नाही, परंतु त्यांना आजन्म कारावासाची जन्मठेपेची शिक्षा मिळाली. या निकालाबद्दल मी समाधानी आहे. या निकालामुळे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना आळा बसेल.

- भारती घोडे, वर्धनची आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक पैलूचा सूक्ष्म तपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वर्धन घोडे खून प्रकरणात तपास पथकाने केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपींना आजन्म आत्महत्या कोठडी मिळाली. यामध्ये सीसीटीव्ही चित्रिकरण, मोबाइल टॉवर, डीएनए चाचण्या आदी तांत्रिक बाबींची पोलिसांनी योग्य सांगड घालून प्रकरण कोर्टापुढे सादर केले. प्रत्यक्षदर्शी नसताना परिस्थितीजन्य पुरावे जमा करण्यावर पोलिसांनी भर दिला होता.

वर्धन घोडे खून खटल्यात तपास पथकामध्ये पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर, अविनाश आघाव, एपीआय राहुल खटावकर, पीएसआय कैलास महांडुळे, दादाराव कोपनर, एस. आर. बडगुजर, वीरेश बने, शेख नवाब, समाधान काळे आदींचा समावेश होता. या पथकांनी बारकाईने सर्व पुरावे गोळा केले. वर्धन घोडे याला नेण्यात आलेल्या मॉडिफाय कारच्या सर्व मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे शोधून त्याचे चित्रिकरण काढण्यात आले. यामध्ये वर्धन या दोघांसोबत असल्याचे सिद्ध झाले. 'गुगल अर्थ मॅप'वरून या सर्व मार्गााचे नकाशे तयार करण्यात आले. 'मोबाइल टॉवर'द्वारे 'लोकेशन' सिद्ध करून आरोपी या मार्गावर कसे होते, कुठे होते हे अक्षांश रेखांक्षासह मांडणी करण्यात आली. कारच्या टायरच्या खुणा (टायर मार्क) पोलिसांनी अभ्यासला. आणि ते टायर मार्क आरोपी अभिलाषच्या कारचे आहेत हे पुराव्यासह मांडण्यात आले. वर्धनला मारताना अभिलाषने त्याचा टीशर्ट त्याच्या तोंडात कोंबला होता. त्यावर वर्धनची लाळ आढळली होती; तसेच प्रतिकार करताना वर्धनच्या हातात अभिलाषचे केस आले होते. डीएनए चाचण्यामध्येही लाळ वर्धनची असल्याचे; तसेच त्याच्या हातात असलेले केस अभिलाषचे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा प्रत्येक पैलूचा सूक्ष्म तपास करण्यात आला.

\Bरात्रभर थांबवले दोन कर्मचारी

\Bवर्धनचा खून केल्यानंतर दोन्ही आरोपी त्याच्या घराजवळ परत आले. यावेळी नातेवाइकांना त्यांचा संशय आला. यावेळी अभिलाष आणि श्याम त्यांच्या कारमध्ये बसून पसार झाले. कार रिर्व्हस घेत असताना एका विद्युत खांबाला अभिलाषची कार धडकली. या खांबावर कारच्या रंगाचा ठसा उमटला होता. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ही बाब देखील गांभीर्याने घेतली. हा ठसा कोणी मिटवू नये म्हणून रात्रभर दोन कर्मचारी त्या ठिकाणी नेमण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी या ठशाच्या रंगाचा नमुना आणि अभिलाषच्या कारच्या रंगाचा नमुना घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले.

\Bगुन्हे शाखेची झाली होती मदत\B

या गुन्ह्याच्या सुरुवातीपासून गुन्हे शाखेची पथके देखील तपासात सहभागी होती. पथकाला विविध पुरावे गोळा करून देण्यावर देखील तत्कालीन पोलिस आयुक्त मधुकर सावंत आणि कर्मचाऱ्यांनी मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तपोवन’चे इंजिन बंद; दोन तास खोळंबा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेसचे इंजिन शुक्रवारी दुपारी लासूर ते रोटेगाव दरम्यान बंद पडले. दुसरे इंजिन येण्यासाठी जवळपास दोन तास लागले. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

नांदेड तपोवन एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकातून दुपारच्या सुमारास निघाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास करंजगावजवळ रेल्वेचे इंजिन बंद पडले. यामुळे हा मार्ग बंद पडला. यावेळी येणाऱ्या कोल्हापूर-धनबाद आणि मनमाड धर्माबाद हायकोर्ट एक्स्प्रेस या गाड्या रोटेगाव येथे थांबवण्यात आल्या. तसेच कुर्ला ताडोबा ही रेल्वे तारूर रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. रोटेगावला थांबलेल्या कोल्हापूर - धनबाद एक्स्प्रेसचे इंजिन तपोवनसाठी पाठवण्यात आले. यानंतर मालगाडीचे इंजिन कोल्हापूर - धनबाद एक्स्प्रेससाठी वापरण्यात आले. या सर्व प्रकारामध्ये चारही रेल्वेमधील प्रवासी दोन तास खोळंबले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांकडून लेखा विभागाची विभागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी लेखा विभागाची विभागणी केली आहे. जमा आणि खर्चासाठी त्यांनी स्वतंत्र लेखाधिकारी नियुक्त केले आहेत. जमा - खर्च निहाय लेखाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया महापालिकेत प्रथमच झाली आहे.

पालिकेच्या लेखा विभागात दोन लेखाधिकारी व एक मुख्य लेखाधिकारी अशी महत्त्वाची पदे आहेत. संजय पवार आणि एन. जी. दुर्राणी या दोघांची लेखाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यापैकी दुर्राणी आठ महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे पवार हे एकमेव लेखाधिकारी कार्यरत होते. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी कार्यालयीन आदेश काढून वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांची लेखाधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे लेखाविभागाला पवार आणि पाटणी हे दोन लेखाधिकारी मिळाले आहेत. पवार यांच्याकडे शासकीय अनुदानासह जमा बाजूचे कामकाज देण्यात आले आहे, तर पाटणी यांच्याकडे खर्चाची बाजू देण्यात आली आहे. उत्पन्न आणि खर्चाच्या शिवाय लेखा विभागातील इतर विषय मुख्यलेखाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर दोन्ही लेखाधिकाऱ्यांमध्ये वाटून द्यावेत. दोन्हीही लेखाधिकाऱ्यांवर नियंत्रण मुख्य लेखाधिकाऱ्यांचेच असेल, असेही आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन बांधकाम प्रक्रियेची आयुक्तांकडून पाहणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन बांधकाम परवानगीच्या प्रक्रियेची पाहणी महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी केली. ही प्रक्रिया राबवताना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी वास्तूविशारदांकडून येत होत्या, त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी पाहणी केली.

नगररचना विभागातून बांधकाम परवानगी मिळवताना सामान्य नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्या या विभागाबद्दल तक्रारी होत्या. त्यातच शासनाने बांधकाम परवानगी ऑनलाइन देण्याची सक्ती सर्वच महापालिकांना केली. महापालिकेत ऑनलाइन बांधकाम परवानगी प्रक्रिया राबविण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला व दोन ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया सुरू केली. ऑनलाइन बांधकाम परवानगीसाठी आतापर्यंत १२५ अर्ज नगररचना विभागाला प्राप्त झाले. त्यापैकी २२ जणांना ऑनलाइन परवानगी देण्यात आली. ३० अर्ज फेटाळण्यात आले, ७३ अर्ज प्रलंबित आहेत. ऑनलाइन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आयुक्तांनी जाणून घेतल्या आणि त्या लवकरच दूर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सहाय्यक संचालक सुमित खरवडकर, उपअभियंता ए. बी. देशमुख, एस. एस. कुलकर्णी, अनुरेखक संजय कपाळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वाघा’ची चित्रफित ओतूरची

0
0

विजय चौधरी, खुलताबाद

गेल्या काही दिवसांपासून खुलताबाद, वेरूळ घाटातील कठड्यावर वाघाची चित्रफित (व्हिडिओ) कधी वेरूळ तर. कधी खुलताबाद घाटातील असल्याचे सांगून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुळात ही चित्रफित जुन्नर तालुक्यातील (जि. पुणे) ओतूर वनक्षेत्रात असलेल्या घाटातील असल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र या चित्रफितीमुळे वेरूळ आणि खुलताबाद परिसरातील नागरिकांमध्ये; तसेच पर्यटनासाठी बाहेरून येणाऱ्या पर्यटक, भाविकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

गेल्या आठवड्यात वाघाच्या चर्चेला उधाण आले होते. त्यातच गेल्या आठवड्यात पुन्हा हा व्हिडिओ 'खुलताबाद घाटात वाघ दिसला' असा मजकूर लिहून 'फॉरवर्ड' केला गेला आहे. त्यामुळे खुलताबादच्या घाटात 'वाघ आला वाघ' अशी चर्चा सुरू झाली. अनेकजण वेरूळ आणि खुलताबाद भागातील आपल्या नातेवाईकांना, मित्रांना हा व्हिडिओ पाठवून वाघाबाबत चौकशी करत होते. त्यामुळे खुलताबाद परिसरातील नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाघाची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे आणि भितीचे वातावरण आहे.

याबाबत खुलताबादचे वनपरिक्षेत्र अधिकारी यशपाल दीलपाक यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले की, मुळात खुलताबाद वनक्षेत्रात डोंगररांगामध्ये वाघ नाही; तसेच व्हिडिओत दिसणारा घाट हा खुलताबादचा घाट नसून, जुन्नर वनक्षेत्रात असलेल्या ओतूर येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये; तसेच हा व्हिडिओ खुलताबाद घाटातील असल्याचे सांगून कोणी सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये.

\Bवन विभागाने घेतला शोध\B

कारण या व्हिडिओत दाखवण्यात आलेल्या रस्त्याच्या कडेला ; तसेच खुलताबाद व वेरूळ घाटात डोंगर असलेल्या बाजूला वनपरिक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक यांच्या वनविभागाच्या टीमने कसून शोध घेतला, मात्र कोठेही वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले नाहीत. या व्हिडिओत सध्या घाट रस्त्याकडेचे गवत वाळलेले आहे, तर व्हिडिओत हे गवत हिरवेगार दिसत आहे. त्यामुळे दुसऱ्या अज्ञात ठिकाणचा हा व्हिडिओ वेरूळ, खुलताबाद घाटातील असल्याचे सांगून चुकीच्या पद्धतीने फॉरवर्ड केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकळ्या भूखंडावरील बांधकाम पाडा

0
0

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात जोगेश्वरी शिवारातील गट क्रमांक ९२मध्ये सुरू असलेले अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त करून तहसील कार्यालयात अहवाल सादर करण्याचे आदेश गंगापूरचे गटविकास अधिकारी व तलाठी यांना तहसीलदारांनी दिले.

जोगेश्वरी शिवारातील गट क्रमांक ९२ हा १९८४मध्ये मोकळा भूखंड सोडण्यात आला होता़, मात्र जमीन मालक, परिसरातील दोन पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगनमत करून या भूखंडाचे गावठाण प्रमाणपत्र काढले. त्यानंतर भूखंडाची अनधिकृतपणे रजिस्ट्री केली आणि या भूखंडावर रो हाउस उभारण्याचे काम सुरू केले आहे़ याप्रकरणी रांजणगाव येथील प्रदीप मुसळे यांनी नियमबाह्य सुरू असलेले बांधकामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी; तसेच झालेले बांधकाम हटविण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती़ जिल्हाधिकाऱ्यांनी गंगापूरच्या तहसील कार्यालयास व वैजापूरच्या उपविभागीय कार्यालयाला चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ तहसीलदारांनी याप्रकरणी गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी जोगेश्वरी यांना चौकशी करून अनधिकृत असलेले बांधकाम पाडून येत्या चार महिन्यांत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे़

गंगापूर तहसील कार्यालयाकडून भूखंड १९८४मध्ये अकृषिक करण्यात आले होते़ गट क्रमांक ९२ अकृषिक करताना त्यासाठी जवळपास १२ हजार ६०० चौरस फूट जागा मोकळी ठेवण्यात आली होती़ या नागरी वसाहतीमध्ये ही जवळपास १३ हजार चौरस फुटांचा भूखंड मोकळा ठेवण्यात आला होता़ मूळ मालकाने हा भूखंड एक वर्षापूर्वी विक्री केला़ काही राजकीय मंडळी, बांधकाम व्यवसायिक व जोगेश्वरी ग्रामंपचायतचे काही पदाधिकारी, अधिकारी यांनी या भूखंडावर बांधकाम परवाना दिला; तसेच या जागेची नमुना क्रमांक आठला नोंद घेण्यात आली़ या मोकळ्या भूखंडावर बांधकाम करता येत नाही, याची माहिती असतानाही, त्यांना बांधकाम परवाना देण्याचे अधिकार नसतानाही ग्रामविकास अधिकारी यांनी चुकीचा पायंडा पाडत बांधकाम व्यवसायिकाला मदत केली़ या भूखंडावर बांधकाम केल्यास कोणी खरेदी करणार नाही याची माहिती असल्यामुळे काही राजकीय पक्षाचे तालुकास्तरावरील लोकप्रतिनिधी यांनी वर्तमान पत्रात बांधकामाची जाहिरात करताना बुकिंगसाठी स्वत:ची नावे छापली आहेत़

जोगेश्वरी शिवारात सध्या जमिनीला सोन्याचे भाव आल्यामुळे अनधिकृत बांधकामाना जोर आला आहे़ या परिसरातील नागरिकांना अनेक सेवा सुविधापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे़ गावठाण प्रमाणपत्र व नमुना क्रमांक आठवर ही कामे होत आहे़, मात्र या नवीन वसाहतींना सेवा पुरविताना ग्रामपंचायतीची दमछाक होत असल्यामुळे नागरिकांसह सर्वांची परवड होत आहे़

दरम्यान, मला अद्याप तहसीलदार यांच्या आदेशाचे पत्र मिळालेले नाहीत. त्यांचे पत्र मिळताच मी भूखंडाची पाहणी करून सद्यस्थितीचा अहवाल तहसील कार्यालयात सादर करणार असल्याचे जोगेशावरीचे तलाठी वंजारे यांनी सांगितले़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात जनावरे जगवणे कठीण

0
0

गणेश जाधव, फुलंब्री

यंदा फुलंब्री तालुक्यात दुष्काळाचा सामना करणे अत्यंत कठीण झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या दुष्काळाच्या तुलनेत यंदाचा दुष्काळ गंभीर असून, तालुक्यातील ७२ हजार ८४६ जनावरांना चारा उपलब्ध करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत. तालुक्यातील जनावरांना फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंतच चारा पुरणार आहे. त्यामुळे या जनावरांना चारा आणणार कोठून? असा प्रश्न शेतकरी व प्रशासनासमोर आहे.

फुलंब्री तालुक्याला भीषण दुष्काळाच्या झळा गेल्या तीन वर्षांपासून बसत असल्याने शेतकऱ्यांबरोबर, सामान्य नागरिकही चितेत आहेत. सध्या जमिनीतील पाणी पातळीही घटली आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईसोबतच पिकेही करपून जात असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यात आता जनावरांना मोजक्याच दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुधनाचा सांभाळ करणे फार कठीण झाले आहे. पुढील काळात चारा मिळणार नाही या भीतीपोटी शेतकरी आपल्या मुलाबाळाप्रमाणे जोपासलेले पशूधन बाजारात विक्रीसाठी नेत आहे.

यंदा पावसाने दगा दिला त्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरिपाचा हंगाम हातचा गेला. जून महिन्याच्या प्रारंभी पेरणीलायक पाऊस झाला. त्यानंतर सर्वत्र पेरणी झाली. पिके उगवायला लागली. महिनाभर पावसाने दडी मारली, त्यानंतर पुन्ही दोन दिवस पाऊस बरसला आणि नंतर तो रुसला. एका पाण्यासाठी पिके हातून गेली. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांना पिके जगविणे शक्य झाले, मात्र वातावरणातील बदलामुळे पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला व पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला. पाण्याअभावी यंदा रब्बीची पेरणी फक्त २३ टक्क्यापर्यंतच झाली. भविष्यातील पाण्याची गरज बघता रब्बीचा हंगाम धोक्यात दिसत आहे.

गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या साठवलेल्या पाण्यावर रब्बीची पिके घेतली होती, परंतु यंदा तिही कोरडेठाक असल्याने आशा मावळल्या आहेत. यंदा बेमोसमी पाऊस नसल्याने अडचण आली असून, यावर्षी तालुक्यात सात हजार ४२२ हेक्टरवर रब्बीचे पीक घेण्यात येतील, असा तालुका कृषी विभागाचा अंदाज होता, परंतु प्रत्यक्षात एक हजार ७०९ हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे. यातही अनेक शेतकऱ्यांनी बेमोसमी पाऊस पडेल या आशेवर कोरड्यातच हरभरा, शाळूची पेरणी केली आहे. तिही धोक्यात आली आहे.

\Bतालुक्यातील पशूधन

\B- शेळ्या, मेंढ्या : ४८५५९,

- गायी, म्हैस, बैल : ७०८४६,

\Bचाऱ्याची गरज\B

दिवसभरात लागणार चारा : ३९८.६१२७ टन

महिनाभरात लागणार चारा : ११९५८.३८१ टन

\Bचारा उत्पादनासाठी प्रयत्न\B

तालुक्यातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला चारा हा मार्चपर्यंत पुरले, असा अंदाज फुलंब्री पशूसंवर्धन विभागाने वर्तविला आहे. शिवाय वैरण विकास उपक्रमांतर्गत तालुक्यातील २९८ लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच किलो, तर ६१० शेतकऱ्यांना प्रत्येकी चार किलोप्रमाणे मका बियाणे दिले आहे, परंतु तालुक्यातील सर्व धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने फारसा चारा मिळणार नसल्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ पाहणीची माहिती केंद्रीय पथकाने पुन्हा मागवली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने विविध गावांना भेटी देऊन गोळा केलेली माहिती आता विभागीय प्रशासनाकडून विशिष्ट नमुन्यात परत मागवला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

पाच आणि सहा डिसेंबर रोजी औरंगाबादसह मराठवाड्यातील दुष्काळाने होरपळत असलेल्या गावांना केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पीक परिस्थिती, पाणी; तसेच चाऱ्याची उपलब्‍धता विविध शेततळे, स‌िंचन विभागाची कामांचीही पाणी त्यांनी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी भेट दिलेल्या प्रत्येक गावाची माहिती, ज्या शेतकऱ्याला भेट दिली त्याचा मोबाइल क्रमांक, त्याच्या कुटुंबाची माहिती; तसेच भेटी दिलेले प्रकल्प, शेततळे, विहिरी, मनरेगाच्या कामांना दिलेल्या भेटीचा संपूर्ण तपशील प्रशासनाला पुन्हा पाठवावा लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या पथकाने दोन तासांत गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी प्रकल्प, मुरमी आणि सुलतानपूर या गावांना भेटी दिल्या होत्या. या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या होत्या. पथकाने कोरड्याठाक पडलेला टेंभापुरी प्रकल्पाची पाहणी केली होती. यावेळी पथकाने शेतकऱ्यांना पाणी कोठून मिळते, दुष्काळात स्थिती काय आहे, पाणी असताना प्रामुख्याने कोणते पीक घेता आदी प्रश्न विचारले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्राने मारहाण, आरोपीला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या भांडणाच्या कारणावरुन तिघांना धारदार शस्त्रांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी करणारे शेख आदिल शेख रफिक, शेख फारुख शेख कादर, शेख रिझवान शेख फरीद, खान शोएब खान फरद व शेख बिलाल शेख रफीक यांना अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरोपींना शनिवारपर्यंत (१५ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी शुक्रवारी (१४ डिसेंबर) दिले.

या प्रकरणी कैप अली खान (रा. जयसिंगपुरा) या युवकाने तक्रार दिली होती. फिर्यादीनुसार, १० डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र फरदीन खान हे मिलिंद महाविद्यालयाच्या गेटजवळ असताना, आरोपी शेख आदिल शेख रफिक (२०), शेख फारुख शेख कादर (२१), शेख रिझवान शेख फरिद (२०), खान शोएब खान फरद (२०) व शेख बिलाल शेख रफीक (२६, सर्व रा. गवळीपुरा, छावणी) यांनी जुन्या भांडणावरुन फिर्यादी व त्याच्या मित्राला धारदार शस्त्रासह लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्याचवेळी आलेला फिर्यादीचा आत्याभाऊ शेख फईम यालाही आरोपींनी गंभीर मारहाण केली. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपींना गुरुवारी (१३ डिसेंबर) अटक करुन कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी, राजकीय संघटना आक्रमक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आकांक्षा देशमुख खुनप्रकरणी शिवसेनेच्या महिला आघाडीने शुक्रवारी पोलिस आयुक्तांची भेट घेत नि:पक्ष तपास करण्याची मागणी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याप्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पत्राद्वारे तक्रार केली आहे. सिडको पोलिसांनी शुक्रवारी हॉस्टेलच्या दोन्ही रेक्टरसह तेथील कर्मचारी व विद्यार्थीनी अशा २० जणांचे जबाब नोंदवले.

एमजीएम कॅम्पसमधील गंगा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या आकांक्षा अनिल देशमुख या विद्यार्थिनीचा खून झाल्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉस्टेलमध्ये झालेल्या खळबळजनक घटनेमुळे सर्व हादरून गेले आहेत. दोन दिवस उलटले तरी अद्याप या गंभीर घटनेचे गुढ उकलू शकले नाही. याप्रकरणी शिवसेनेच्या महिला आघाडीने शुक्रवारी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये या गुन्ह्याचा तपास नि:पक्षपणे करावा, वरिष्ठ दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याकडे याचा तपास द्यावा, सर्व जबाब इन कॅमेरा घ्यावेत, परिसरातील सर्व सीसीटीव्हीचा डेटा जप्त करावा, आरोपीला कठोर शासन होईल, असे पुरावे जमा करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, संध्या जाधव, प्राजक्ता राजपूत, प्रतिभा जगताप, आशा दातार, राजश्री पोफळे, स्मिता जोशी, सुनिता देव, अंजली मांडवकर, देवयानी सिमंत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एमजीएम प्रशासनाला निवेदन दिले. यामध्ये आकांक्ष देशमुख खून प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी. चौकशी होत नाही तोपर्यंत वसतिगृह अधीक्षक, कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांची तात्काळ हकालपट्टी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी अभाविपचे महानगर प्रमुख शिवा देखणे, विवेक पवार, पूनम पाटील, डिंपल भोजवानी, रामेश्वर काळे, प्रभाकर माळवे, महेंद्र मुंडे आणि गोपाल खंदारे आदींची उपस्थीती होती.

\Bमुख्यमंत्र्यांना पत्र\B

याप्रकरणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार निलम गोऱ्हे यांनी देखील लक्ष घातले आहे. याप्रकरणी त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र पाठवले. यामध्ये आकांक्षाच्या मृत्युमुळे वसतिगृहातील इतर मुलींच्या सरंक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तीन दिवस उलटले तरी आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. आपण लक्ष घालून खुनाची चौकशी लवकरात लवकर करून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

\Bजबाब नोंदविण्यासाठी तीन पथके\B

या प्रकरणात शुक्रवारपासून जबाब घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. याकरिता सिडको पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. शुक्रवारी या पथकांनी रेक्टर प्रेरणा दळवी, मंजिरी जगताप यांच्यासह तेथील कर्मचारी, सुरक्षा रक्षक; तसेच आकांक्षासोबत राहणाऱ्या विद्यार्थिनी यांचे जबाब घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. दरम्यान, पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेश उपायुक्त राहुल खाडे, सिडको पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आदींची उपस्थीती होती. यावेळी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना तपास अधिकाऱ्यांना दिल्या.

हे प्रकरण संवेदनशील आहे. याबाबत जास्त बोलता येणार नाही. याप्रकरणी सर्व बाजूने तपास करण्यात येत असून, योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

- चिरंजीवप्रसाद, पोलिस आयुक्त, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय सचिवांची होणार साक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शालेय पोषण आहार योजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीसमोर शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिवांची साक्ष होणार आहे. त्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (प्राथमिक) पोषण आहारसंदर्भात तातडीने माहती सादर करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. यात धान्य व इतर डाळी मालाचा विहित मुदतीत पुरवठा केला नाही, निकृष्ठ माल पुरवठा केला, अशी किती प्रकरणे आढळून आली. सदरील प्रकरणामध्ये कंत्राटदारांकडून किती दंड वसूल केला. शालेय पोषण आहारात पुरविण्यात येणारा माल व विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारा पोषण आहार इत्यादी तपासणीचे निकष काय आहेत. प्रत्यक्षात काय कार्यवाही करण्यात येत आहे. २०१६ पासून आजपर्यंत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी शालेय पोषण आहार योजनेच्या पाककृतींना दिलेल्या मान्यतेचे आदेश समितीस उपलब्ध करुन द्यावेत. २०१० पासून आहार योजनेत शाळांना अधिक प्रमाणात वाटाणा पुरवठा करण्याची कारणे काय आहेत? यासह नऊ मुद्यांसदर्भातील माहिती तातडीने सादर करा, असे निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंगीने मुलीचा घाटीत मृत्यू

0
0

औरंगाबाद : डेंगीमुळे १४ वर्षीय शीतल साईनाथ किर्तीकर या मुलीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. संबंधित मृत मुलगी ही घाटीतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची मुलगी असून, कर्मचाऱ्याचे कुटुंब हे घाटीच्या शासकीय निवासस्थानांमध्ये राहाते. या निमित्त, निवासस्थानांच्या परिसरातील घाण-अस्वच्छतेने मुलीचा बळी घेतला, असा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला. शीतलला गुरुवारी सकाळी घाटीत दाखल केले होते. उपचारादरम्यान तिची प्रकृती खालावली व शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात, तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीने प्रयत्न केले, असे घाटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, स्वर्गरथ नेण्याचे कारण देत घाटीकडून बेगपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कॉलम तोडून टाकल्याचेही स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस हजार दिवे लावण्याची पालिकेत व्यूहरचना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एलईडी प्रकल्पाबद्दल संशयकल्लोळ निर्माण झालेला असताना या प्रकल्पाबद्दल नगरसेवकांच्या, नागरिकांच्या तक्रारी असताना याच प्रकल्पाच्या कंत्राटदाराकडून आणखी ३० हजार पथदिवे आणि दहा हजार पोल लावण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. या कामाचा डीपीआर तयार केला जाणार असून याबद्दल आयुक्तांशी चर्चा झाली असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.

महापालिकेने शहराच्या विविध रस्त्यांवर एलईडी दिवे बसवण्याचे काम इलेक्ट्रॉन एनर्जी इफिसियन्सी सर्व्हिसेस या कंपनीला ११२ कोटी रुपयांत दिले आहे. या दिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचे कंत्राट देखील याच कंपनीला पुढील आठ वर्षांसाठी देण्यात आले आहे. यासाठी वेगळे आठ कोटी रुपये कंपनीला दिले जाणार आहेत. ४० हजार दिवे आणि १५ हजार पोल लावण्यासाठी कंपनीला १ सप्टेंबर २०१६ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले. आतापर्यंत १५ हजार दिवे कंपनीकडून बसविण्यात आले आहेत. दिवे बसवल्यावर १५ दिवसात ते बंद पडतात, त्यांचा प्रकाश देखील योग्य प्रकारे पडत नाही, अशा तक्रारी नगरसेवक व नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. मुख्यलेखापरीक्षकांनी एलईडी दिव्यांच्या कारभाराचे ऑडिट केले व गंभीर स्वरुपाच्या त्रुटी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे एलईडीचा प्रकल्प संशयाच्या फेऱ्यात सापडल्याचे बोलले जात आहे.

आता नव्याने ३० हजार एलईडी दिवे व दहा हजार पोल बसविण्याचा डीपीआर तयार केला जाणार आहे, हे काम त्याच कंपनीकडून करून घेतले जाणार आहे, असे महापौर म्हणाले. १२० कोटींच्या प्रकल्पात शहराचा जो भाग समाविष्ट करण्यात आला नाही त्या भागाचा समावेश नवीन कामात केला जाणार आहे. ३० हजारांपैकी दहा हजार दिवे या भागात लावले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर सौंदर्यीकरणासाठी संस्था, संघटनांचा पुढाकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींनी पुढाकार घेण्याची तयारी शुक्रवारी दाखविली आहे. आम्ही सौंदर्यीकरणाचे काम करण्यास तयार आहोत, पण आमच्याबरोबर पाच वर्षांसाठी करार करा, अशी मागणी त्यांनी केली.

शहर सौंदर्यीकरण, वाहतूक बेटांचा विकास या संदर्भात महापालिकेने जेएनईसीच्या सभागृहात शहरातील व्यापारी, उद्योजक, बँकांचे प्रतिनिधी, संस्था - संघटनांचे प्रतिनिधी यांची व्यापक बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदकुमार घोडेले होते. स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजु) वैद्य, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती.

बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल महापौरांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'बैठकीला सुमारे २०० प्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील उद्याने, चौक, रस्ता दुभाजक, स्मशानभूमी, वाहतूक बेटांचा विकास करण्याची तयारी बहुतेक सर्वांनी दाखविली. 'आम्ही विकास करतो, पण महापालिकेने आमच्या बरोबर पाच वर्षांसाठी करार केला पाहिजे', असे मत प्रतिनिधींनी व्यक्त केले. आयुक्त बदलल्यावर धोरण बदलतात, त्याचा फटका शहर सौंदर्यीकरणाच्या कामाला बसू नये अशा भावना देखील यावेळी व्यक्त करण्यात आल्या. पोस्टर्स आणि होर्डिंगबद्दल बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'भाऊ - दादांना' आवार घाला, त्यांच्या पोस्टर - बॅनर्सवर निर्बंध घाला, अशी मागणी देखील करण्यात आली. या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याचे आम्ही ठरविले आहे, असे महापौर म्हणाले. ज्या चौकाचे किंवा वाहतूक बेटाचे आम्ही सौंदर्यीकरण करणार आहोत त्या ठिकाणी आमची जाहिरात लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी देखील उपस्थित प्रतिनिधींची होती.

महापौर म्हणाले, 'ज्या व्यक्ती, संस्था, व्यावसायिक शहर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी पुढे येतील त्यांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेतला जाईल. इच्छुकांकडून आम्ही प्रस्ताव मागविणार असून त्यांना एका महिन्याच्या आत करारनाम्याची प्रत घरपोच दिली जाईल, महापालिकेत त्यांना चकरा माराव्या लागणार नाहीत. शहर सौंदर्यीकरणाबद्दलची सर्व प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण केली जाईल. बैठकीला बांधकाम व्यावसायिक देवानंद कोडगिरे, प्रमोद खैरनार, उद्योजक उमेश दाशरथी, नितीन बगाडिया यांच्यासह प्रेषित रुद्रावार, राजू बागडे, उदय भोईर, सुहास वैद्य, आर्किटेक्ट असोसिएशन, लायन्स क्लबचे पदाधिकारी यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालाभार्थी वेबपोर्टल पात्रता पडताळणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३०० हून अधिक शासकीय योजनांसाठी महालाभार्थी वेबपोर्टलच्या माध्यमातून व्यक्तिअनुरूप पात्रता पडताळून पाहता येणार आहे,' अशी माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

सावंत म्हणाले, 'महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय आणि 'एमकेसीएल'च्या सहकार्याने महालाभार्थी वेबपोर्टल विकसित केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची, त्यासाठी करायवयाची अर्ज प्रक्रिया आदी बाबतची माहिती महालाभार्थीमध्ये आहे. वेबपोर्टलची सेवा ही पूर्णपणे मोफत आहे. 'एमकेसीएल' मागील अनेक वर्षांपासून तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे. राज्यासह संपूर्ण देशात संस्थेने झेप घेतली आहे. लोकांपर्यत माहिती पुरविणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आता 'एमकेसीएल' नव्या रूपात समोर येत आहे. यामध्ये इयत्ता ५ ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या युगाच्या स्पर्धेत उपयुक्त ठरणारे 'एमकेसीएल ई-स्कूल' हे नवीन शैक्षणिक दालन सुरू केले आहे. नावीन्यपूर्ण प्रश्‍न प्रकार, सराव परीक्षा, नियमित मूल्यांकन व सर्व विषयांच्या परिक्षांची उत्तम तयारी विद्यार्थ्यांना या ई स्कूलमुळे करता येणार आहे. त्याचबरोबर विविध वर्गाचे अभ्यासक्रम बदलत जातात. परीक्षा पद्धती बदलत असून या सर्व नाविण्यपूर्ण बाबींचा समावेश ई-स्कूल या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. आजचे युग हे विज्ञान युग व इंग्रजीचे युग मानले जाते. त्यामुळे 'एमकेसीएल'ने घरबसल्या इंग्रजी कशी शिकावी, याचे अवलोकन करून इंग्रजी संवाद कौशल्य कोर्सेस देखील विकसित केले आहे,' असेही त्यांनी नमूद केले. एका प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, '२०१४मध्ये सरकार बदलल्यानंतर दोन वर्षे 'एमकेसीएल' व राज्यसरकारच्या करारामध्ये अनेक अडचणी आल्या. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेऊन 'एमकेसीएल'चा गौरव केला. बिहारमध्ये आम्हाला मोठे सहकार्य मिळाले,' असे त्यांनी सांगितले. यावेळी विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरे पकडली, आरोपीला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याच्या प्रकरणात आरोपी सय्यद जुबेर सय्यद जिलानी (२२, रा. सादातनगर) याला अटक करुन शुक्रवारी (१४ डिसेंबर) हजर करण्यात आले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (१८ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले. या प्रकरणी सुमेरसिंग हलुराम डुलगज (४४, रा. गांधीनगर) यांनी फिर्याद दिली होती. सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images