Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आकांक्षाच्या मृत्यूचे गूढ पाच दिवसानंतरही कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएम हॉस्टेलमध्ये खून झालेल्या आकांक्षा देशमुखच्या प्रकरणाला पाच दिवस उलटले, मात्र अद्याप या गुन्ह्याचे गूढ उकलण्यास सिडको पोलिस, गुन्हे शाखेला यश आलेले नाही. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता गंगा हॉस्टेलच्या रूम क्रमांक ३३४मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात जबाब घेण्याचे काम सुरू आहे.

आकांक्षा अनिल देशमुख (वय २२, रा. माजलगाव) ही तरुणी एमजीएम कॉलेजमध्ये फिजियोथेरपीचे शिक्षण घेत होती. सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता हॉस्टेलच्या रुममध्ये परतलेल्या आकांक्षाचा मृतदेह मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता आढळला होता. घाटी हॉस्पिटलमध्ये तिचे पोस्टमार्टम करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाला आहे, हा अभिप्राय देण्यात आला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोलीमध्ये आकांक्षा खाली पडलेल्या अवस्थेत होती; तसेच रुमचा दरवाजा लोटलेला होता आणि पाठीमागे केवळ खुर्ची लावलेली होती. रुममधील टेबल देखील आडव्या अवस्थेत होता. आकांक्षाच्या खुनाच्या घटनेनंतर वसतिगृह परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत तिचे रुममेट, वसतिगृहाचे अधीक्षक, सुरक्षारक्षक आदीचे जबाब नोंदवले आहे. तिचा भाऊ राहुल देशमुख याचा देखील पोलिसांनी नोंदवला आहे. दरम्यान, सोमवारी तिच्या आई, वडिलांचा जबाब घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेंढपाळाचा ८० रुपयांत दोन लाखांचा विमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात मेंढ्या; तसेच शेळी पालनावर उपजीविका करणाऱ्या मेंढपाळाची संख्या मोठी असून, विविध समस्यांना सामोरे जाणाऱ्या या मेंढपाळांसाठी लवकरच ८० रुपयामध्ये दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात येणार असल्याची माहिती पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळांतर्गत मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगाव येथे मेष, लोकर सुधार योजनेंतर्गत मेंढपाळ कार्यशाळचे आयोजन, राज्य योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या शेंळ्या-मेंढ्याचे आधुनिक शेडचे उद्घाटन व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत शेळ्या-मेंढ्यासाठी शेड बांधकामाचे भूमिपूजन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री जानकर म्हणाले की, बंदिस्त शेळी पालनासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांची राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सुरू केली आहे. या योजनेचा सर्व मेंढपाळ; तसेच धनगर समाजातील नागरिकांनी लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी. सर्व मेंढ्या-शेळ्यांचे संपूर्ण लसीकरण करून त्यांना आजारापासून दूर ठेवा त्यासोबतच आपल्या मुला-मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची गोडी लावावी.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मेंढ्याच्या लोकरीपासून तयार वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील मेंढपाळासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात शेडची उभारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळाच्या माध्यमातून सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कार्यशाळेला उपस्थित असलेल्या मेंढपाळ, शेतकऱ्यांना शेळी-मेंढ्यासाठीच्या जंतनाशक औषधीचे वाटप करण्यात आले.

यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश बनसोडे, पशूसंवर्धनचे अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण, प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. गजानन सांगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. भगत, उपविभागीय अभियंता कदीर अहमद, जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. भिकमसिंह राजपूत, कनिष्ठ उपअभियंता बी. आर. चौंडिये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिगंबर काबंळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात कामगार ‘पीएफ’पासून वंचित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अद्याप मिळालेला नाही. मागील सहा महिन्यांपासून कामगार प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. पण, ऐनवेळी याद्यातून नावे वगळण्याचा प्रकार घडल्याने कामगार संतापले आहेत.

विद्यापीठातील रोजंदारी कामगारांचा कपात केलेल्या भविष्यनिर्वाह निधीचा वाद उफाळला आहे. २०१० ते २०१२ या कार्यकाळातील 'पीएफ'बाबत प्रशासनाने नवीन दोन याद्या जाहीर केल्या आहेत. या याद्यात अनेक रोजंदारी कामगारांची नावे नाहीत. या प्रकारामुळे कामगार हक्काच्या 'पीएफ'पासून वंचित राहण्याची भीती आहे. विद्यापीठात एक मे २०१२पासून 'आयएसएफ' या 'लेबर एजन्सी'च्या पीएफ खाते क्रमांकावर प्रशासन थकित रक्कम जमा करीत आहे. हा प्रकार बेकायदा असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे असून कामगारांना वेठीस धरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीत रोजंदारी कामगारांची नावे वगळण्यात आली. मागील सात वर्षांपासून प्रलंबित प्रकरणात पाठपुरावा करीत आहे. पण, यादीत नावे समाविष्ट करण्यात आली नाही, असे भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष किरणराज पंडीत यांनी सांगितले. याबाबत कामगार कुलसचिव डॉ. साधना पांडे आणि वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र मडके यांची भेट घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भवतींवर अंधारातच उपचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील आरोग्य उपकेंद्राचा ४७ हजारांचे वीज बिल थकल्याने वीज पुरवठा आठ दिवसापूर्वी खंडित करण्यात आला. वीज, पाणी या महत्त्वाच्या सुविधांचा अभाव असल्याने आरोग्य सेविकेंसह येथे आलेल्या गर्भवती महिलांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून अंधारातच गर्भवती महिलांना उपचार द्यावे लागत आहेत. याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असून ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बाजार मैदानात आरोग्य उपकेंद्र सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीप्रमाणे आरोग्य उपकेंद्रातही सुखसुविधेअभावी रुग्णांचे हाल सुरू आहेत. याठिकाणी महिन्याकाठी १५ महिला प्रसुतीसाठी येतात. त्यासाठी एका आरोग्य सेविकेची नेमणूक करून राहण्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आले आहे. आठ दिवसांपूर्वी वीजबिल थकल्याने उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. इतकेच नव्हे येथील बोअरवेल्सच्या विद्युत मोटारीत बिघाड झाल्याने पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या महिलांच्या नातेवाईकांना बाहेरूनच पाण्याची सोय करावी लागत आहे. तब्बल १५ हजारांवर लोकसंख्येस जोडल्या गेलेल्या उपकेंद्रात आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. जीर्ण इमारतीत खंडित वीजपुरवठा व पाण्याची सोय नसताना कसे राहायचे कसे हा प्रश्न अरोग्य सेविकेला पडला आहे.
रुग्णांकडे दुर्लक्ष आरोग्य विभागाने केवळ गोवर रुबेला लसीकरणाच महत्त्व दिल्याने अन्य रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण सेवाही मिळत नसल्याचे वास्तव आहे.

डेंग्यु सदृश्य तापाने येथे दीड वर्षीय बलिकेला उपचारादरम्यान जीव गमवावा लागला. दोन दिवसांपूर्वी श्रुती राऊत व धनश्री जामदार या दोन मुलींना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुस्लिम मोहल्ला (लंबी गल्ली) परिसरात या तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहे. गेले दोन महिने डेंग्युचे थैमान सुरू आहे. मात्र, आरोग्य विभागाने गोवर रुबेलाचे कारण पुढे करून अद्यापही त्यावर उपाययोजना केलेल्या नाहीत. परिणामी रुग्णांना शासकीय आरोग्यसेवा मिळत नसल्याने त्यांची परवड होत आहे.

महिन्याकाठी १५ प्रसुती
येथील आरोग्य उपकेंद्रात महिन्याकाठी १५ ते १७ महिला प्रसुतीसाठी येतात. सध्या येथे येणाऱ्या महिलांना अंधारातच उपचार देणे सुरू आहे. आठ दिवस उलटूनही आरोग्य विभागाने वीज जोडणीसाठी प्रयत्न केले नाहीत.

या ठिकाणी विजेचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात होत नाही. वीज मंडळाकडून अंदाजित बिल दिले गेले आहे. यासंदर्भात वीज मंडळाशी बोलणे झाले असले तरी सहकार्य मिळाले नाही.
डॉ. निळकंठ चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी, सिल्लोड.

रिडिंग बॅलेन्स असल्यामुळे एवढे बिल आले आहे. मात्र, याविषयी आरोग्य विभागाकडून विचारपूस झालीच नाही. तरी वीजबिलाची पडताळणी करून त्यात ३० टक्के एवढी रक्कम कपात करता येईल. शिवाय बिल अदा करण्यासाठी टप्पे दिले जातील.
इश्वर तावरे अभियंता शिवना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आकांक्षाचा खून झाल्यापासून मजूर गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एमजीएम'संस्थेच्या परिसरातील गंगा वसतिगृहात डॉ. आकांक्षा देशमुख यांचा खून झाल्यापासून या परिसरातील बांधकाम मजूर गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गायब झालेल्या मजुराचा शोध घेण्यासाठी त्याच्या वडिलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्याचा शोध घेण्यासाटी पोलिस पथक झारखंड राज्यात रवाना झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

फिजीओथेरोपीच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी डॉ. आकांक्षा देशमुख यांचा मृतदेह वसतिगृहातील खोली क्रमांक ३३४ मध्ये आढळला होता. घटनास्थळी पोलिस पोहचेपर्यंत त्यांना तेथून हलविण्यात आल्यामुळे ही आत्महत्या की हत्या, अशी चर्चा आहे. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल १२ डिसेंबर रोजी प्राप्त झाला असता गळा आवळून खून झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी सिडको पोलिसांचे तीन आणि गुन्हे शाखेच्या चार, अशा सात पथकांची स्थापना करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने गंगा वसतिगृहामागे सुरू असलेल्या बांधकामावरील मजुरांची चौकशी केली असता खून झाल्यापासून या कामावरील एक मजूर गायब असल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या वडिलाची कसून चौकशी केली, मात्र त्यांना मुलाबद्दल काहीच माहिती नसल्याचे समोर आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे एक पथक या मजुराच्या झारखंड राज्यातील गावी रवाना झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासिका तत्वावरील प्राध्यापकांना वेतन वाढले

$
0
0

महिन्यानंतर उच्च शिक्षण विभागाला आठवले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात सुधारणा करणार अध्यादेशाच्या महिनाभरानंतर अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंमलबजावणीचा प्रश्न उपस्थित करत, प्राध्यापकांची मानधनाबाबतही नाराजी समोर आली आहे. एकत्रित मानधन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते पाळले गेले नसल्याची भावना प्राध्यापकांमध्ये आहे.

कॉलेज स्तरावरील रिक्त जागा भरण्यास शासनाकडून परवानगी नव्हती. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा वाढत गेला. गुणवत्तेवर परिणाम होऊ नये या हेतुने तासिका तत्वावरील प्राध्यापक नियुक्ती केले जातात. पात्र असूनही तुटपुंजा मानधनामुळे अशा प्राध्यापकांची कुचंबना होत होती. शासनाने १४ नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढत मानधनात वाढ केली. अध्यादेशाची अंमलबजावणी करा, अशा आशयाचे प्राचार्यांना पत्र पाठविण्यास महिनाभरानंतर उच्च शिक्षण विभागाला सुचले आहे. तशा आशयाचे पत्र प्राचार्यांना पाठविण्यात आले आहे. मात्र, अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक प्राध्यापकांना हे मानधन मान्य नाही. एकत्रित महिन्याला २५ हजार रुपये वेतन देत, तासिका तत्वावरील प्राध्यापकाच्या बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी होती. त्याला शासनाने बगल देत अशा प्रकारचा मार्ग काढल्याने प्राध्यापकांमध्ये नाराजी आहे.

..

कॉलेजांकडून बगल

शासनाने निश्चित करून दिलेल्या मानधनाप्रमाणे अनेक कॉलेज वेतन देत नाहीत. त्यासह वेतनाला होणारा विलंबामुळेही तासिका तत्वावरील प्राध्यापकांची फरफट होते. त्यात आता करण्यात आलेले बदल कितपत कॉलेज स्विकारतील अन् सहसंचालक कार्यालय अंमलबजावणी कशी करते याकडे तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे लक्ष लागले आहे.

असे असेल मानधन

कला, वाणिज्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी पाचशे रुपये तासिकेचे मानधन असणार आहे. तर, प्रात्यक्षिकासाठी २०० रुपये मानधन करण्यात आले. पदव्युत्तरसाठी ६०० आणि २५०, शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणसाठी ६०० आणि २५० असे आहे. विधी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ६०० व २५० रुपये असे मानधन असणार आहे.

अनुदानित कॉलेज संख्या.......११५

तासिकातत्वावरील प्राध्यापक...९७८

शासनाने अध्यापकांच्या मानधनात सुधारणा केली. त्याप्रमाणे प्राचार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागेल.

डॉ. सतीश देशपांडे,

सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, औरंगाबाद.

मानधनवाढी संदर्भात २५ हजार रुपये मानधन करण्याची 'सीएचबी' प्राध्यापकांची होती. मात्र, सरकारने मागणीला बगल दिली. पाचशे रुपये प्रती तास देण्याचे निश्चित केले. त्याची किती कॉलेज अंमलबजावणी करणार हाच मुळात प्रश्न आहे. सीएचबी मानधनवाढ प्रत्यक्षात आंमलबजावनी होईपर्यंत शासन, प्रशासनाचा भरवसा नाही.

प्रा. हनुमान भोसले

देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रबांधणीचे श्रेय ज्येष्ठांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्र हितासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याचे ३५ ते ४० वर्ष अनेक अडचणींना तोंड देत काम केले, अशा व्यक्तींना सेवानिवृत्तीनंतर सन्मान मिळाला पाहिजे जे स्थान सैन्यातील लोकांना तसेच स्वातंत्र्यसैनिकांना दिले जाते तेच स्थान पेन्‍शनर्सलाही दिले गेले पाहिजे. खऱ्या अर्थाने राष्ट्रबांधणीचे श्रेय हे ज्येष्ठ नागरिकांना असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले. सोमवारी (१७ डिसेंबर) जिल्हा पेन्‍शनर्स असोसिएशनतर्फे 'पेन्‍शनर्स डे' निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, पोलिस उपायुक्त नितीश खाटमोडे, असोसिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस, कार्याध्यक्ष के. जी. शेरे पाटील यांनी उपस्थिती होती.

डॉ. भापकर म्हणाले की, 'ज्येष्ठ नागरिक, पेन्‍शनर्सनी देशाची जडणघडण करण्यासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रशासकीय चौकटीत काम केले आहे. एकाच विभागात अनेक वर्ष काम केले असल्यामुळे तुम्ही अनेकांना ज्ञान दिले आहे. अनुभव ही सर्वात मोठी पूंजी, तपश्चर्या आहे हा अनुभव फुकट वाया जाता कामा नये. आयुष्यात मिळालेले अनुभव शब्दबद्ध करा, नवीन पिढीला ऐकवा, जगण्याचे समाधान व्यक्त करा, शब्दबद्ध करा.' तुमचे शंभर लेख झाले तर जागतिक दर्जाचे पुस्तक निर्माण होऊ शकते, असे झाल्यास त्या पुस्तकाचे प्रकाशन मी करतो, असे आश्वासन डॉ. भापकर यांनी दिले. पेन्‍शनर्स म्हणजे नवीन अध्याय, नवीन पर्व आहे या काळामध्ये स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या, असेही डॉ. भापकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पेन्‍शनर्स सेल सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच पेन्‍शनर्स अदालतही नियमित होईल. त्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्ष वसंत सबनीस यांनी पेन्‍शनर्सच्या अडचणी सोडवण्याची मागणी केली. सेवानिवृत्त झाल्यानंतरही अनेकांना कार्यालयामध्ये विविध कामांसाठी खेट्या माराव्या लागतात. जी व्यक्ती सेवानिवृत्त होणार आहे त्या कर्मचाऱ्याची संपूर्ण माहिती संबंधित विभागाने वर्षभरापूर्वीच गोळा करून ठेवावी. जेणेकरून निवृत्त झाल्यास संबंधितास कार्यालयात खेट्या माराव्या लागणार नाहीत व योग्य वेळी लाभ घेता येईल, असे त्यांनी सांगितले. २०१३ मधील दुष्काळ, २०१५ मधील गारपीट तसेच २०१८ मधील केरळ येथील आपत्तीला पेन्‍शनर्सनी मोठा निधी दिला असल्याचे सांगत या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांच्या स्पर्धेत महापौरांचे जय श्रीराम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अयोध्याप्रश्नावरून भाजपला चेकमेट देण्यासाठी कोणत्याही कार्यक्रमात शिवसेना नेते, पदाधिकारी आता जय महाराष्ट्रच्या अगोदर जय श्रीरामचा नारा देत आहेत. सोमवारी चक्क दिव्यांगांच्या चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी जय श्रीरामचा नारा दिला, तर अन्य एका कार्यक्रमात भाजप आमदाराला प्रभू रामचंद्रांवरील आधारित पुस्तक भेट दिले.

महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी सोमवारी टाऊन हॉल येथील कला दालनात चित्रकला, हस्तकला, रंगभरणे, रांगोळी व क्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. यावेळी विरोधीपक्ष नेता जमीर कादरी, महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती सुरेखा सानप, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त रवींद्र निकम, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, कला दालनाचे क्युरेटर हंसराज बंसवाल यांची विशेष उपस्थिती होती. विविध शाळांच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन महापौरांनी केले. उद्घाटन करताना कोऱ्या कागदावर सर्वप्रथम 'जय श्रीराम' ही अक्षरे लिहिली. त्यानंतर त्याच्या खाली धनुष्यबाणाचे चित्र काढले. दरम्यान, दिव्यांग विद्यार्थ्यांना मंगळवारी सायंकाळी स्मार्टसिटी बसमध्ये बसविण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी टाऊनहॉलच्या परिसरात बस आणली जाणार आहे. सायंकाळी पाच वाजता स्पर्धेचे बक्षीस वितरण केले जाणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी काढलेल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन देखील टाऊन हॉलच्या कला दालनात भरवले जाणार आहे.

\B'भाजप'ला आठवण करून दिली...

\B'श्रीरामाची आठवण मित्रपक्ष असलेल्या भाजपला असावी आणि उपस्थितांना देखील असली पाहिजे. त्यामुळे आपण जय श्रीराम असे लिहिले,' असे महापौर म्हणाले. मात्र, हे पाहण्यासाठी भाजपचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. विभागीय ग्रंथालयात ग्रंथोत्सवाचे उद्घाटन देखील महापौरांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे आमदार अतुल सावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटनानंतर ग्रंथ प्रदर्शन पाहताना महापौरांनी श्रारामावर आधारित सुमारे पाचशे रुपये किमतीचे पुस्तक विकत घेतले आणि तेथेच ते सावे यांना भेट दिले. 'ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने सावे आणि त्यांच्या पक्षाला श्रीरामांची आठवण राहिली पाहिजे,' असा टोलाही महापौरांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोतील जागृत दत्त मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडकोतील जागृत दत्त मंदिरात रविवारपासून दत्त जयंती सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. हा सोहळा येत्या २४ डिसेंबरपर्यंत चालणार असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सिडको परिसरातून रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. भजनी मंडळ, वारकरी, परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. सायंकाळी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती झाली. उत्सव कालावधीत दररोज काकड आरती, भजन, भिक्षा फेरी, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. आज सकाळी ११ वाजता सत्यदत्त पूजन, दुपारी दोन वाजता भजन स्पर्धा, रात्री आठ वाजता शिवचरित्रावर आधारित नाटकाचे सादरीकरण होणार आहे. बुधवारपासून तीन दिवस गुरुचरित्र पारायण होणार आहे. तुलसीअर्चना, दीपअलंकार सेवा, बाबूरावजी दूधगावकर यांचे बासरी वादन, नेत्र तपासणी शिबिर, रक्‍तदान शिबिर असे विविध कार्यक्रमाचे आयोजन उत्सव काळात होणार आहेत. दरम्यान, शनिवारी (२२ डिसेंबर) श्री दत्त जन्मोत्सव निमित्ताने हभप भरतबुवा रामदासी यांचे कीर्तन होणार असून, सोमवारी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. गाणगापूरच्या धर्तीवर होत असलेल्या या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक गणेश जोशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मन्याडच्या पाण्यासाठी वैजापूरमध्ये उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

तालुक्यातील मन्याड साठवण तलावाची उंची वाढवावी, उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करून २५ गावांना सिंचनासाठी पाणी द्यावे या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषण करण्यात आले.

तालुक्यात मन्याडसारखा जीवंत पाण्याचा साठा असतांनाही शेतीला पाणी मिळू शकत नाही. तत्कालीन सहकार मंत्री दिवंगत विनायकराव पाटील यांनी मन्याड खोऱ्यात मोठे धरण बांधून ५० टक्के तालुका ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या निधनाने ते स्वप्न विरून गेले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळुंके पाटील व उपाध्यक्ष सीताराम पाटील उगले यांच्या नेतृत्वाखाली या मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले. तहसीलदार विनोद गुंडमवार व नायब तहसीलदार रमेश भालेराव यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर पाटील बिलवणे, तालुकाध्यक्ष मिनीनाथ जाधव, महिला आघाडीच्या सारिका बिलवणे, संदीप गायके, कृष्णा सरोवर, योगेश बोरनारे, साहेबराव चव्हाण, बापू सूर्यवंशी, अभिनंदन सोनवणे, अंबादास मांडवगड, समाधान त्रिभुवन आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय कागदपत्रांसह ग्रामपंचायत कार्यालय खाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

तालुक्यातील मुलानी वाडगावच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीला सोमवारी सकाळी आग लागली. या आगीत कार्यलयातील सर्व शासकीय कागदपत्रे व लाकडी व लोखंडी फर्निचरची जळून खाक झाले. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ग्रामपंचायत कार्यालयाला समोरील मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कार्यालयात आग लागल्याचे सकाळी आठ वाजता लक्षात आरे. त्यानंतर याची माहिती त्वरित पैठण एमआयडीसी भागातील अग्निशमन दलाच्या कार्यालयाला देण्यात आली. मात्र, अग्निशमन दलाचा बंब चक्क दुपारी दीड वाजता घटनास्थळी पोहोचला. परिणामी, कार्यालयातील दोन लाकडी कपाट, एक लोखंडी कपाट व कपाटातील शासकीय कागदपत्रे, एक संगणक संच, आठ खुर्च्या, पाच टेबल, पोटमाळ्यावरील फर्निचर, एक सिलिंग फॅन, एक इन्व्हर्टर, तीन बॅटऱ्या, दरवाजे, दोन खिडक्या, काचेची तावदाने जळून खाक झाले.

या आगीत जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची नोंद बिडकीन पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. आगीची माहिती समजताच पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी गायके, तलाठी एस. व्ही. पाटील, ग्रामसेविका धाडगे, सरपंच सतीश शेळके हे घटनास्थळी पोहचले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे ४८ सदस्य ७२९ उमेदवार अपात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्यामुळे निवडून आलेल्या ४८ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे, त्यासोबतच ७२९ पराभूत उमेदवारांनाही पाच वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७, तसेच मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुका लढवणाऱ्या तसेच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. दरम्यानच्या काळात निवडणूक लढवलेल्या प्रत्येक उमेदवारांना ३१ मे २०१८ रोजी नोटीस बजावण्यात आली. मात्र त्यानंतरही उमदेवारांनी निवडणूक खर्चाचा अहवाल प्रशासनाला सादर केला नाही. त्यामुळे अखेर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पाच डिसेंबर रोजी या ७७७ उमेदवारांना अपात्र घोषित करण्याचे आदेश काढले. या आदेशाच्या तारखेपासून पुढील पाच वर्षे या उमेदवारांना आता निवडणूक लढवता येणार नाही. या उमेदवारांमध्ये निवडून आलेल्या ४८ ग्रामपंचायत सदस्यांचाही समावेश आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीवेळी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यापूर्वी या यादीतील नावे तपासण्यात येणार आहेत. त्यामुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना लढता येणार नाही, असे सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी सांगितले.

\Bतालुकानिहाय स्थिती\B

तालुका......... उमेदवार.......... सदस्य

औरंगाबाद..........५८................०

फुलंब्री...............५६................१३

पैठण..................१८६...........१

गंगापूर.................१८७..........८

सिल्लोड.............५१..............०

सोयगाव.............१८..............०

कन्नड..............१२१.............१३

खुलताबाद...........१३............०

वैजापूर.................८७...........१३

-----------------------------

एकूण.................७७७.............४८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बस, रस्ता शुभारंभ एकाच दिवशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर बस, रस्ते कामाच्या शुभारंभासह सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन आणि कचऱ्यापासून गॅस निर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन असे विविध कार्यक्रम रविवारी (२३ डिसेंबर) शहराच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात घेण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

स्मार्टसिटी अभियानांतर्गत शंभर शहर बस सुरू केल्या जाणार आहेत. त्यापैकी २५ बस येत्या दोन दिवसांत शहरात दाखल होत आहेत. रविवारपासून बस सेवा सुरू केली जाणार आहे. राज्य शासनाने रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले. या अनुदानातून ३१ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामाचा शुभारंभ देखील रविवारी होणार आहे. कांचनवाडी येथे महापालिकेने भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम केले आहे. त्याचे लोकार्पण आणि याच भागात कचऱ्यापासून गॅस निर्मिती केली जाणार. गॅस निर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन देखील रविवारी होणार आहे. या सर्व कार्यक्रमांच्या नियोजनासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले, 'औरंगाबादचे पूर्व, पश्चिम आणि मध्य असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तिन्हीही मतदारसंघात कार्यक्रम व्हावेत असे नियोजन केले आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासह गॅस निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम कांचनवाडीला होईल. हा भाग पश्चिम मतदारसंघात येतो. रस्त्याच्या कामाच्या शुभारंभाचा कार्यक्रम निरालाबाजार भागात घेतला जाईल. हा परिसर मध्य मतदारसंघात येतो, तर शहर बस सेवेच्या शुभारंभाचा कार्यक्रम सिडको कॅनॉट परिसरात घेण्याचे नियोजन केले जात आहे. हा परिसर पूर्व मतदारसंघात येतो. तिन्हीही मतदारसंघातील कार्यक्रमात राजशिष्टाचार पूर्णपणे पाळला जाईल,' असे महापौर म्हणाले.

\Bपालिकेसाठी टर्निंग पॉइंट

\B'विधानसभेचे अध्यक्ष, आमदार, खासदार, महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक या सर्वांना निमंत्रण दिले जाणार आहे. हे सर्व कार्यक्रम महापालिकेसाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहेत, महापालिकेबद्दल नागरिकांच्या मनात या निमित्याने विश्वास निर्माण होईल. कार्यक्रमाच्या दृष्टीने प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत,' अशी माहितीही महापौरांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथोत्सव ग्रामीण भागात भरवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहरी भागात पुस्तकांची दुकाने असून सातत्याने साहित्य उपक्रम होतात. त्यामुळे वाचनाची भूक असलेल्या ग्रामीण व निमशहरी भागात ग्रंथोत्सव घेण्याची गरज आहे' असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. ते ग्रंथोत्सवात बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विभागीय ग्रंथालय परिसरात सोमवारी सकाळी ग्रंथोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मंचावर महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, माहिती संचालक यशवंत भंडारे, लेखा व कोषागारचे सहायक संचालक प्र. शि. निंबाळकर, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, डॉ. रा. शं. बालेकर, गुलाबराव मगर, ग्रंथपाल सु. नि. मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ठाले यांनी साहित्य व्यवहारावर भाष्य केले. 'वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथोत्सव चांगला उपक्रम आहे. पण, शहरात ग्रंथोत्सव घेण्यापेक्षा वाचनाची भूक असलेल्या ग्रामीण भागात ग्रंथोत्सवाची गरज आहे. शहरात मराठी माध्यमातून शिकण्याचे प्रमाण कमी असून मराठी वाचक कमी झाले आहेत. त्यातून शहरात मराठी लेखकाचे प्रमाण कमी झाले आहे. या स्थितीत ग्रामीण भागात वाचनाचे महत्त्व व पुस्तके पोहचवण्याची गरज आहे' असे ठाले म्हणाले.

ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे म्हणाले, 'समाजाच्या प्रगल्भ वाढीसाठी वाचन संस्कृती आवश्यक आहे. मुलांच्या अभ्यासासाठी आग्रही असलेल्या पालकांनी मुलांच्या अवांतर वाचनासाठीही आग्रही रहावे. वाचनाची भावना दुर्मीळ होत आहे' असे बोराडे म्हणाले.

दरम्यान, ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. क्रांतीचौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन दिंडी निघाली. या दिंडीत मराठमोळ्या पोशाखात विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी लेझीम पथकासह सहभागी झाले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वाचक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

व्याख्यान, कविसंमेलन आज

ग्रंथोत्सवात मंगळवारी सकाळी ११ वाजता 'विश्वव्यापी व सर्वकालीन गांधी विचार' या विषयावर डॉ. दादा गोरे, प्रा. जयदेव डोळे व ज्ञानप्रकाश मोदानी यांच्या उपस्थितीत परिसंवाद होणार आहे. तर दुपारी दोन वाजता कविसंमेलन होईल. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता महोत्सवाचा समारोप होणार आहे. ग्रंथोत्सवानिमित्त पुस्तकांचे स्टॉल थाटण्यात आले आहेत.

नेत्यांनी फिरवली पाठ

जिल्हा ग्रंथोत्सवाच्या पत्रिकेत विधानसभेचे अध्यक्ष, पालकमंत्री, खासदार, आमदार अशा १७ लोकप्रतिनिधींची नावे होती. यातील १५ लोकप्रतिनिधींनी महोत्सवाकडे पाठ फिरवली. महापौर नंदकुमार घोडेले आणि आमदार अतुल सावे यांनी घाईने भाषण उरकत ग्रंथोत्सवाचे ठिकाण सोडले. हा धागा पकडत ठाले यांनी लेखकांचा शिष्टाचारही जपला पाहिजे. फक्त नेत्यांचा प्रोटोकॉल जपावा असे नाही, असे भाषणात ऐकवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवाघरच्या मुलांच्या जीवनात ‘मैत्र’ची फुले!

$
0
0

Manoj.Kulkarni@Timesgroup.com

औरंगाबाद : त्यांची काहीही चूक नसताना त्या मुलांना एड्स नावाचा भयंकर आजार मिळाला. त्यामुळं अक्षरश: दिवसभरात त्यांना चक्क मूठमूठ गोळ्या खाव्या लागतात. या औषधानं दिवसभर डोळ्यांवर झोपचे कातडे ओढलेले असते. त्यांचे केस लवकर पांढरे होतात, ते अकाली वृद्ध होतात. ही मुले केव्हातरी देवाघरी जाणारच म्हणून घरातली मंडळीही त्यांना नीट खावू-पिऊ घालत नाहीत. अशाच जवळपास १२५ मुलांच्या पाठिशी आता भक्कम आधार म्हणून मैत्र मांदियाळी उभी राहिलीय. त्यांच्या शिक्षणाच्या खर्चासह त्यांची वाढ निकोप व्हावी म्हणून त्यांना खजूर, मटकी, शेंगादाणे असा पौष्टिक आहार पुरवला जात आहे.

जालना येथील मैत्र मांदियाळीकडे एक एड्सग्रस्त मुलगी मदतनिधी नेण्यासाठी आली. पूजा (नाव बदलेले आहे) फक्त ११ वर्षांची. तिचे वजन म्हणाल, तर फक्त १४ किलो. तिला पाहूनच उपस्थितांना धक्का बसला. कुपोषण म्हणजे असते काय, हे ही समजले. बहुतांश एड्सग्रस्त मुलांना हा असाध्य रोग त्यांच्या आई-वडिलांची देण. काही जणांचे आई-वडिल त्यांना सोडून केव्हाच गेले. त्यांच्या मागे असलेले कुणीही त्यांना नीट विचारत नाही. या मुलांना दिवसभर हाय पावरच्या गोळ्यांचे डोस सुरू असतात. त्या खाल्ल्या की चक्कर येणं, मळमळनं, दिवसभर गुंगीत राहणं असं होतं. त्यामुळं या मुलांना पौष्टिक आहार द्यावा लागतो, पण त्यांना तो मिळत नाही. ही मुलं आज ना उद्या मरणारच. मग कशाला पौष्टिक वगैरे, असे अनेकजण म्हणतात. या मुलांचा इथून उलटा प्रवास सुरू होतो. हीच गोष्ट मैत्र मांदियाळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समजली. त्यांनी सुरुवातीला अशा ५६ मुलांच्या प्रवासाचा खर्च दिला. कारण त्यांना औषध घेऊन जाण्यासाठीसुद्धा प्रवास खर्च मिळत नव्हता. आता ही संख्या सव्वाशे मुलांवर गेली आहे. या मुलांच्या सकस आहाराचा खर्च जालना येथील मैत्र मांदियाळी आणि मित्र परिवार उचलत आहे. त्यामुळे या मुलांच्या आहारात पेंडखजूर, मटकी, गूळ, शेंगादाणे अशा पदार्थांचा समावेश झाला आहे. त्यासाठी दुबई, जालना, मुंबई, अंबड येथून मदतीचा ओघ सुरू आहे.

\Bकुटुंबाला मदत करणार

\Bमैत्र मांदियाळीचे अजय किंगरे म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी वाघरळ गावाची एक 'एचआयव्ही'ग्रस्त मुलगी आली. तिला नर्सिंग कॉलेजला प्रवेश हवा होता. आम्ही कॉलेजला फीसमध्ये सूट देण्याची विनंती केली. त्यांनी नकार दिला. मैत्र मांदियाळीच्या वतीने आम्ही तिची २२ हजारांची फीस भरली. या मुलीचे आई-वडील एड्सने वारले. आजी ६५ वर्षांची. तीन बहिणींचे लग्न झाले. भावाचा 'आयटीआय'ला नंबर लागला. मात्र, काम नाही केले, तर घर खर्च कोण करेल म्हणून त्याने 'आयटीआय' सोडून 'बीए'ला प्रवेश घेतला. रोजंदारी करून घरगाडा हाकतो. या कुटुंबाचा पूर्ण खर्च आम्ही उचलणार आहोत. त्याला 'आयटीआय'लाही प्रवेश देणार आहोत.'

एक नववीतला मुलगा खूप हुशार आहे. तो घनसावंगी येथील हॉस्टेलमध्ये राहतो. त्याला लहानपणी रक्तातून 'एचआयव्ही'ची बाधा झाली. आई-वडील नॉर्मल आहेत. त्यामुळे त्याच्या वडिलांच्या डोक्यावर परिणाम झाला. मुलगा मामाकडे आहे, पण मामाही गरीब म्हणून त्याची हॉस्टेलची १७ हजारांची फी मैत्र मांदियाळीने दिली.

- अजय किंगरे, मैत्र मांदियाळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षेत कॉपीबहाद्दर वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या सत्र परीक्षेत कॉपीचे तब्बल दोन हजार प्रकार घडले. तर पदव्युत्तर परीक्षेत सातशे विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी परीक्षा विभाग समिती नियुक्त करणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पदवी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होणार आहेत.

परीक्षा विभागाने पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण केली आहे. सध्या निकाल तयार करण्याचे काम सुरू असून डिसेंबर अखेरपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. बीएस्सी वर्कटेक मॅन्यूफॅक्चरींग प्रोसेस, बीएस्सी अॅनिमेशन, बीएस्सी रेफ्रीजरेशन, ऑटोमॅन्यूफॅक्चरींग, बी. एड. या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उर्दू, पाली व बुद्धिझम, लोकप्रशासन, गृहशास्त्र या विषयांचे निकाल जाहीर झाले आहेत. तुलनेने या विषयांची विद्यार्थीसंख्या कमी आहे. सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या विषयांचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. १५ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा झाली. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ३१ ऑक्टोबरपासून घेण्यात आली. सध्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा सुरू आहेत. या सत्रात पदवी परीक्षेत दोन हजार विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. पदव्युत्तर परीक्षेत ७०० विद्यार्थी कॉपी करताना आढळले. या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी परीक्षा विभाग समिती नेमणार आहे. ही समिती पाच वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे. कॉपीचे प्रकार वाढल्यामुळे परीक्षा नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषत: विद्यापीठ कार्यक्षेत्राच्या सीमावर्ती भागात कॉपीचे सर्वाधिक प्रकार घडले. जिल्ह्याच्या सीमेवरील महाविद्यालयात सर्रास कॉपी होते. किमान परीक्षेच्या कालावधीत बंदोबस्त वाढवून कडक कारवाई अपेक्षित होती. पण, निम्म्यापेक्षा अधिक परीक्षा केंद्रावर सहकेंद्रप्रमुख हजर झाले नाहीत. तसेच भरारी पथकांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक केंद्राला भेट देता आली नाही.

अंतर्गत केंद्रात कॉपी

रस्त्यालगत असलेल्या व शहरातील परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रमाण कमी होते. पण, अंतर्गत व दुर्गम भागात असलेल्या महाविद्यालयात सर्रास कॉपी करण्यात आली. भरारी पथक पोहचत नसल्यामुळे कॉपीला रोखण्यात अपयश आले. बुलडाणा व जालना जिल्ह्याच्या सीमाभागात सर्वाधिक गैरप्रकार घडले. भरारी पथकाची संख्या वाढवली असती तर कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना रोखणे शक्य झाले असते, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १५ विषयांचे निकाल तयार आहेत. पण, सर्व्हिस कोर्सची अडचण असल्यामुळे उशीर होत आहे. पदवीच्या वर्गाचे निकाल डिसेंबरच्या शेवटी जाहीर करण्यात येतील.

डॉ. जयश्री सूर्यवंशी, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सभु’ निवडणूक; आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल शंभर वर्षाची परंपरा असलेल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळ निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत औरंगपुऱ्यातील सरस्वती भुवन शाळेत मतदान होणार आहे. सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होईल, अशी माहिती निर्वाचन अधिकारी जी. के. नाईक -थिगळे यांनी दिली.

निवडणुकीत १४ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात साधारण सभासद गटातून ११ आणि अध्यक्ष, आश्रयदाते गट, हितचिंतक गटातून प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अध्यक्षपदासाठी बॅ. जवाहर गांधी आणि उद्योजक राम भोगले यांच्यात लढत होत आहे. एकूण ८४ सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. आश्रयदाता आणि हितचिंतक गटातून एक एक सदस्य नियामक मंडळावर निवडला जाईल. आश्रयदाते गटाची लढत ज्ञानप्रकाश मोदाणी आणि डॉ. उल्हास शिऊरकर यांच्यात होणार आहे. हितचिंतक गटात प्रशांत देशपांडे आणि ओमप्रकाश राठी या दोन उद्योजकांमध्ये लढत होईल, साधारण सभासद गटात डॉ. सुहास बर्दापूरकर, अमोल भाले, डॉ. रश्मी बोरीकर, सेवानिवृत्त न्या. नरेद्र चपळगावकर, डॉ. श्रीरंग देशपांडे, जुगलकिशोर धूत, रमेश गुमास्ते, डॉ. बाळकृष्ण क्षीरसागर, अरूण मेढेकर, काशिनाथ नानकर, प्रा. सुहास पानसे, डॉ. मिलिंद रानडे, डॉ. सुधीर रसाळ, अॅड. रामेश्वर तोतला, डॉ. नंदकुमार उकडगावकर हे रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीप्रश्नी घाटी प्रशासन असंवेदनशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी परिसरातील कर्मचारी निवासस्थान 'बी विंग' जवळील अस्वच्छतेमुळेच डेंगीची लागण होऊन १४ वर्षीय शीतल कीर्तीकरचा मृत्यू झाल्याचा आरोप ऑल इंडिया यूथ फेडरेशनने केला आहे. याबाबत विविध मागण्यांचे निवेदन घाटी हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, घाटी रुगाणालय परिसरात असलेल्या मेडिसिन विभागासमोरील 'बी-विंग'मधील शासकीय निवासस्थान परिसरात अनेक वर्षापासून ड्रेनेज लाइन फुटलेली आहे. त्यामुळे परिसरात मैला पसरलेला आहे, त्या ठिकाणी कचरा साचलेला आहे. घंटागाडी येत नाही, इमारतीच्या भिंतीवर झाडे उगवलेली आहेत. येथील इमारतीमध्ये साप निघतात, प्रचंड अस्वच्छतेमुळे डेंगी होऊन शीतल साईनाथ कीर्तीकर या विद्यार्थिनीचे निधन झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. यास प्रशासन जबाबदार असून प्रशासन असंवेदनशील असल्याचाही आरोप करण्यात आला. जबाबदारी स्वीकारून शीतलच्या बहिणीला शासकीय नोकरीत घ्यावे, कुटुंबाला दहा लाख रुपयाचे नुकसान भरपाई द्यावी, 'बी-विंग' परिसरातील कचरा तत्काळ उचलून या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करावे व नागरिकांचे प्राण वाचवावे, ड्रेनेज लाइनची दुरुस्ती करून नवीन ड्रेनेज लाइनचे काम करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर ॲड. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, सिद्धार्थ मोगली, सुनील खरात, सीमा दाभाडे, शबाना शेख वसीम, कल्पना सुरडकर, विजया गायकवाड, दीपा कागडा, शोभा जाधव, गयाबाई सुरडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएमआयसीचे पाणी शहराला

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील काही भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत, डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. आर. जी. अवचट यांनी दिले. शासनाला डीएमआयसीच्या जलवाहिनीवरुन शहराला पाणी पुरवठा करण्याविषयी माहिती सादर करण्यास सांगितले.

दिवाण देवडी येथील माजी सैनिक इर्षाद मोहम्मद खान यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, पाणी पुरवठा करताना अन्याय करण्यात येतो. काही भागात तीन तास तर इतर ठिकाणी २० मिनिटे पाणी पुरवठा होतो. पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने, विद्युत मोटार लाऊनही पाणी येत नाही. काही भागांना एक/ दोन / चार / सहा दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येतो. शहरातील अनेक भागात कायम जलसंकट आहे, तर काही भागात दूषित पाणीपुरवठा होतो. त्यांनी पालिकेकडे याविषयीची तक्रार दिली. तसेच समस्या सोडविण्याची विनंती केली. मात्र, काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी याचिकेद्वारे शहरातील पाणी पुरवठा समस्येकडे न्यायपालिकेचे लक्ष वेधले.

डीएमआयसीला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र ३०० दलघमी जलवाहिनीचे काम करण्यात आले आहे. सध्या डीएमआयसीचे काम पुर्ण व्हायला वेळ असून, तोपर्यंत सदर जलवाहिनीद्वारे शहराला पाणी पुरवठा करता येऊ शकतो. त्यामुळे फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापासून ही जलवाहिनी जोडल्यास शहराला पाणी पुरवठा करता येईल, असे पालिकेने सुनावणीदरम्यान निदर्शनास आणून दिले. ही माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुशखबर; दोन किलोमीटरला द्या फक्त पाच रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे, ती अशी की, लवकरच सुरू होणाऱ्या सिटी बस सेवेत तुम्हाला अत्यंत स्वस्त दरात शहरात प्रवास करता येणार आहे. पहिल्या दोन किलोमीटरसाठी नागरिकांना केवळ दोन रुपये तिकीट आकारले जाणार आहे. तर दहा किलोमीटरपर्यंतचा दर हा केवळ १५ रुपये असणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी औरंगाबादवासियांनी आता तयार व्हायला हरकत नाही.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सिटीबसचे तिकीट दर ठरविण्यात आले आहेत. पहिल्या दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी नागरिकांना फक्त पाच रुपये मोजावे लागणार आहेत. एसटी महामंडळाच्या सिटी बसच्या तिकीट दरापेक्षा स्मार्ट सिटी बसचे तिकीट दर कमी असावेत असा प्रयत्न करण्यात आला आहे.

सिटी बसचे तिकीट दर दर्शविणारा तक्ता

अंतर (किलोमीटर मध्ये) मोठ्यांसाठी तिकीट दर लहानांसाठी तिकीट दर (रुपये)

० ते २ ५ ५

२.१ ते ४ १० ५

४.१ ते ६ १० ५

६.१ ते ८ १० ५

८.१ ते १० १५ १०

१०.१ ते १२ १५ १०

१२.१ ते १४ १५ १०

१४.१ ते १६ २० १०

१६.१ ते १८ २५ १५

१८.१ ते २० ३० १५

२०.१ ते २२ ३० १५

२२.१ ते २४ ३० १५

२४.१ ते २६ ३० १५

२६.१ ते २८ ३५ १५

२८.१ ते ३० ३५ १५

३०.१ ते ३२ ४० २०

३२.१ ते ३४ ४० २०

----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images