Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

इंजिनीअरिंग झाले ‘युनिक’

$
0
0
तंत्रशास्त्र विद्यापीठाला अखेर मुहूर्त मिळाला असून लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे मुख्य केंद्र असणार आहे. औरंगाबादला हे विद्यापीठ व्हावे, अशी येथील लोकांची इच्छा पूर्ण झाली नसली, तरी येथे विभागीय केंद्र देण्यात आले आहे. यामुळे राज्यातील सर्व इंजिनीअरिंग कॉलेज एकत्र जोडली जाणार आहेत.

धनंजय मुंडेंच्या अटकेची शक्यता

$
0
0
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (बीडीसीसी) परळीच्या संत जगमित्र सहकारी सूतगिरणीला १२ कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट देण्यात आल्याच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. यू. चांदीवाल व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी बुधवारी आमदार धनंजय मुंडे व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित मुंडे यांच्यासह पंधरा संचालकांचा अर्ज फेटाळून लावला आहे.

चला पक्षी निरीक्षणाला

$
0
0
आपापल्या सोयीने मिळेल तशी माहिती जमवित पक्षी निरीक्षण करणारे अनेक जण आहेत. या भटकंतीत हौशी मंडळींना शास्त्रोक्त माहिती मिळत नाही. यंदा मात्र हौशी पक्षी निरीक्षकांची ही गैरसोय दूर होणार आहे. येत्या २३ व २४ जानेवारी रोजी शहरात पहिल्यांदाच ‘बर्ड फेस्ट’ आयोजित करण्यात आला आहे.

कुंचल्यातून साकारले जलतरंग

$
0
0
निसर्गाचे अद्भूत रुप रेखाटणारे चित्रकार गजानन शिवणकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन मिरर आर्ट गॅलरीत सुरू आहे. पाण्यावरील लहरी आणि निसर्ग वैविध्य अचूक रेखाटण्यात आले आहे. येत्या १३ जानेवारीपर्यंत चित्र प्रदर्शन सुरू राहणार आहे.

‘अश्वत्थामा हतो हतः’ची अंतिम फेरीत धडक

$
0
0
नाट्यसंपदा संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय एकांकिका सुवर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पुण्यात झालेल्या उपांत्य फेरीत बाजी मारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाची एकांकिका ‘अश्वत्थामा हतो हतः’ अंतिम फेरीत पोहचली आहे.

औरंगाबादची फॅशन कात टाकतेय

$
0
0
व्यक्तिमत्त्व उठावदार करण्यासाठी ‘एक्सक्लुझिव्ह’ कपडे खरेदी करण्याचा ट्रेंड मेट्रो शहरात वाढला आहे. तुलनेने लहान शहरात पारंपरिक कपड्यांना मागणी असली, तरी मेट्रो शहरांची फॅशन या शहरांमध्येही रुजली आहे.

डांबरीकरण, म्हणजे काय हो भाऊ?

$
0
0
पोलिस मेस ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या सिडको एन-९ रस्त्यावर २६ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावर आतापर्यंत संपूर्णपणे डांबरीकरण झालेले नाही, त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

दुरूस्तीची मलमपट्टी नको

$
0
0
पोलिस मेस ते डॉ. आंबेडकर चौक या रस्त्याची तात्पूर्ती दुरूस्ती करू नका. अशा दुरूस्तीचा काहीच उपयोग होत नाही. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

''कुंतीचे वाण'' बाजारात दाखल

$
0
0
संक्रांतीची लगबग बाजारात सुरू झाली ती बाजारात दाखल झालेल्या ''कुतींचे वाण'' खरेदीने. संक्रातीला अजून ५ दिवसांचा अवधी असला तरी चाकरमानी किंवा शहरापासून दूर असलेल्या महिलांनी संक्रातीची तयारी सुरू केली आहे.

आठवले गटाकडून लातूरवर दावा

$
0
0
‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ने (आठवले) लोकसभेच्या लातूर, वर्धा व दक्षिण-मध्य मुंबई या मतदारसंघाचा आग्रह धरला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असूनही जागावाटप होत नसल्याने ‘रिपाइं’ची अस्वस्थता वाढली आहे.

तुल्यबळ उमेदवाराचा मनसेला शोध

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे अजून निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

रिक्षा बंदमुळे शहरवासीयांचे झाले हाल

$
0
0
रिक्षाची भाडे वाढ होऊनही रिक्षाचालकांच्या संपामुळे सामान्यांची फार गैरसोय झाली. संक्रातीच्या तोंडावर रिक्षाबंदमुळे महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.

कर्ज फेडण्यासाठी चोरली दुचाकी

$
0
0
समर्थनगर भागातून पाच महिन्यांपूर्वी एका तरुणीची दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणी सायबरसेलच्या पथकाने जालना येथून दोन आरोपींना अटक केली आहे.

पहिल्या दिवशी बिहारच्या तरुणीला दामिनी पथकाची मदत

$
0
0
बिहारमधून‌ मित्राला शोधण्यासाठी एकट्या आलेल्या तरुणीला नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकाची मदत झाली. या पथकाने अपुरी माहिती असताना देखील रागावून ‌आलेल्या तिच्या मित्राचा शोध घेत त्यांची भेट घालून दिली.

राष्ट्रवादीचा ‘इलेक्टिव्ह मेरीट’ फंडा

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीचा बिगुल मुंबईत वाजवला असून, राज्य मंत्रिमंडळातील मातब्बर मंत्र्यांपेक्षा निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच निवडणूक रिंगणात उतरवण्याचे डावपेच आखले जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

लातूर फेस्टिव्हलला सुरुवात

$
0
0
यंदाच्या लातूर फेस्टिव्हलचे उदघाटन लातूर क्लबचे अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार जयवंतराव आवळे हे होते.

वेबकास्टिंगद्वारे थेट शेतकऱ्यांना मिळणार माहिती

$
0
0
नागपूर येथे कृषीवसंत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी देशभरातील विविध राज्यातून शेतकरी जाणार आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांना हे प्रदर्शनास उपस्थित राहता येणार नाही.

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

$
0
0
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी वाळूज (ता. गंगापूर) येथील आरोपीला वैजापूर सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

वैजापूर मतदारसंघात १३ हजार मतदार वाढले

$
0
0
एक जानेवारी २०१४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत नव्याने मतदारांची नोंदणी केली आहे.

बाजरीची गव्हाशी स्पर्धा सुरू

$
0
0
बाजरीने आज सव्वा दोन हजार एवढा भाव घेत चक्क गव्हाशी स्पर्धा सुरू केली. मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून हमी भावापेक्षाही अधिक दर मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images