Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अवैध वाळू वाहतूक; सहा वाहनांची जप्ती

$
0
0

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक व विक्री सुरू असून, गेल्या दोन दिवसांमध्ये शहर परिसरातून चार हायवा आणि दोन ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून जप्त करण्यात आली.

अपर तहसील कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी व गुरुवारी केलेल्या कारवाईत एमएच २० ईजी १६१६, एमएच २० सीटी २५१३, एमएच ०४ डीई ४५० हे तीन हायवा पकडले. पथकात अपर तहसीलदार रमेश मुंडलोड, मंडळ अधिकारी केशव डकले, एल. के. गाडेकर, तलाठी योगेश पंडित, पूनमसिंह डोंगरजाळ, धनंजय साळवे यांचा समावेश होता, तर जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्‍त केलेल्या जिल्हास्तरीय पथकाने दोन ट्रक जप्त केले. पकडलेली वाहने पुढील कारवाईसाठी अपर तहसील कार्यालय आणि तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जमिनीसाठी ‘शोले स्टाइल’ आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औद्यागिक क्षेत्रासाठी देण्यात आलेली जमीन पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात यावी, या मागणीसाठी नाथनगर, वडखा ये‌थील गावकऱ्यांनी शुक्रवारी (२१ डिसेंबर) शेंद्रा एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. दुपारी दोनपासून शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

शेंद्रा कुंभेफळ औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक सी २१ व सी २२ यातील जमिनी गटाआड गट संपादनातून वगळण्यात आल्यामुळे हा भूखंड संलग्न राहिला नाही. एमआयडीसीने हा भूखंड एका कंपनीला २००७पासून दिलेला आहे, मात्र कंपनीने या भूखंडावर कोणतीही विकासकामे केलेली नाहीत. संपादित करण्यात आलेल्या या जमिनीचा काही शेतकऱ्यांना वाढवी रक्कमही देण्यात आली आहे, मात्र आता काही शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे शेतकरी जमीन परत मागत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी अनेकदा पोलिस प्रशासन, महसूल प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. जमिनीच्या या प्रकरणामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारेही कार्यवाही करण्यात आली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, या व्यवहारांचीही चौकशी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जमीन परत करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने उपोषण सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्यास सात वर्षे शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध महिला तक्रार निवारण केंद्रात पत्नीने तक्रार केल्यामुळे तक्रार मागे घेण्यासाठी पत्नीचा छळ करून तिच्यावर हल्ला करणाऱ्या पतीला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. दिग्रसकर यांनी शुक्रवारी (२१ डिसेंबर) ठोठावली. रशीद लतीफ सुन्नी (वय ४०, मूळ रा. मध्य प्रदेश, ह.मु. भीमनगर, भावसिंगपुरा), असे त्याचे नाव आहे. त्याने मध्यरात्री पत्नीचे पोट व गुप्तांगांवर चाकूने सपासप वार करत मृत्यूच्या दाढेत लोटले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात नऊ वर्षांच्या मुलीचा साक्ष महत्त्वाची ठरली.

याप्रकरणी संबंधित विवाहितेचा भाऊ शेरशहा मिर्झा अब्दुल हमीद मिर्झा (वय ३५, रा. बेगमपुरा) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या बहिणीचे आरोपी रशीद लतीफ सुन्नी याच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना नऊ व सात वर्षांच्या मुली, तर चार वर्षांचा मुलगा आहे. आरोपी पत्नीला काही वर्षांपासून शारीरिक-मानसिक त्रास देत होता. त्यामुळे पत्नीने त्याच्याविरुद्ध महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली होती. त्यामुळे 'तक्रार मागे घे' अशी मागणी करत पती तिला वारंवार शिविगाळ व मारहाण करीत होता. १३ मार्च २०११ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास मोठा भाऊ घरी आला व बहिणीवर चाकू हल्ला झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी तिच्या घरी धाव घेतली असता बहीण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडल्याचे व मुले रडत असल्याचे दिसून आले. दोघांनी तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, '१३ मार्च रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास मी झोपलेली असताना पतीने माझ्या पोटावर तसेच गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले,' असा जबाब फिर्यादीच्या बहिणीने शुद्धीवर आल्यानंतर दिला व त्यावरून छावणी पोलिस ठाण्यात भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, तत्कालीन सहाय्यक सरकारी वकील (कै.) उदय पांडे व सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये आरोपीच्या नऊ वर्षांच्या मुलीची तसेच फिर्यादी व घाटीतील डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला भादंवि ३०७ कलमान्वये सात वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

\Bडॉक्टरांमुळेच मृत्युच्या दाढेतून बाहेर

\Bआरोपीने त्याच्या पत्नीवर चाकूने अतिशय गंभीर वार केले होते. खूप रक्तस्त्र झाल्याने विवाहिता बेशुद्ध झाली होती. तिला तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिच्या पोटामध्ये दीड लिटर रक्त साचल्याचे स्पष्ट झाले. घाटीचे डॉ. व्यंकट गिते यांनी शर्थीचे प्रयत्न करून या विवाहितेला अक्षरशः मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले. डॉ. गीते यांनी विवाहितेला वाचवण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया केली. त्यावेळी त्यांना ११ बाटल्या रक्त चढवले होते. या जीवघेण्या हल्ल्याची दखल कोर्टाने शिक्षा ठोठावताना घेतली, हे विशेष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगव्हाण योजनेसाठी पुन्हा सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्रह्मगव्हाण (ता. पैठण) उपसा सिंचन योजनेची कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केल्या आहेत. या योजनेच्या कामाची शिवतारे यांनी पाहणी केली. ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा ५५ गावांना फायदा होणार आहे.

मागील काही वर्षांपासून रखडलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेची जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी आमदार संदीपान भुमरे, कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे, अमोल मुंडे, मयुरा जोशी, अभियंता एम. व्ही. नाकाडे, वाय. पी. बावस्कर, डी. जी. गर्जे उपस्थित होते. कामाचा आढावा घेतल्यानंतर शिवतारे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या योजनेतील पंपगृहाचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. यांत्रिकी व विद्युत यंत्रणेची कामे सुरू आहेत. टप्पा एकची कामे झाली आहेत. टप्पा दोनमधील कामे लवकर करण्याच्या सूचना शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पिंपळवाडी व इसारवाडी येथील ३२ भूधारकांमुळे उद्धरण नलिकेचे काम अर्धवट आहे. पण, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिस बंदोबस्तात काम करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना शिवतारे यांनी निर्देश दिले. अधिकाऱ्यांना लागणाऱ्या यंत्रणेबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना सूचित करण्यात आल्याचे शिवतारे यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक एकमधील जलवितरण कुंड पूर्ण झाले आहे. टप्पा क्रमांक दोनचे जलवितरण कुंड त्वरित सुरू करण्यात येणार आहे. कालवा क्रमांक एकची एकूण लांबी ३६.८० किलोमीटरपैकी प्रथम प्राधान्याने खेर्डा प्रकल्पापर्यंतच्या ११ किमी लांबीपैकी दहा किमीचे काम पूर्ण झाले आहे. दोन हजार ८०० हेक्टरला योजनेचा फायदा होणार आहे. सिंचन निर्मितीबरोबर टंचाईग्रस्त गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे असे शिवतारे यांनी सांगितले. दरम्यान, या योजनेअंतर्गत दोन्ही टप्प्यातील ५५ गावांना फायदा होणार आहे. मात्र, या शिवाय योजनेच्या मूळ आराखड्यात लाभक्षेत्रात समाविष्ट नसलेल्या गावांचा समाविष्ट करणे आवश्यक आहे, अशी आमदार भुमरे यांची मागणी आहे. या गावांचे सर्वेक्षण करून अहवाल पंधरा दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना शिवतारे यांनी दिल्या आहेत.

\Bयोजनेचे राजकारण सुरू

\Bब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी मागील चार वर्षांत पाच वेळेस भरीव निधीची घोषणा करण्यात आली. दीड वर्षांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वतंत्र बैठक घेऊन निधी जाहीर केला होता. प्रत्यक्षात योजनेचे काम पूर्ण झाले नाही. भाजप आणि शिवसेनेत राजकीय श्रेयवाद सुरू असल्यामुळे नागरिकांचा रोष वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट विक्रीत शेकडोंची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नारेगाव - सावंगी रोडवर महापालिकेच्या जागेवर बेकायदा प्लॉटिंग करून ते शेकडो लोकांना विकल्याचे समोर आले आहे. मार्च २०१८मध्ये हा प्रकार घडला असून, पालिकेने जागा ताब्यात घेतल्यावर तो उघडकीस आला. या प्रकरणी ४० प्लॉटधारकांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी शेख फेरोजला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

प्लॉट विक्री फसवणूक प्रकरणी कैलास नागोराव बनकर (वय ३८, रा. आंबेडकरनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. मौजे चिकलठाणा गट क्रमांक २३१ येथे नारेगाव सावंगी रोडवर महापालिकेच्या मालकीचे २७ एकर गायरान आहे. या ठिकाणी प्लॉटिंग असल्याचे सांगत वीस बाय तीसच्या प्लॉटची विक्री करण्यात आली. यात कैलास बनकर यांच्यासह अनेकांनी प्लॅाट खरेदी केले. या प्लॉटधारकांकडून आरोपींनी दहा ते तीस हजार रुपये घेत बनावट नोटरीवर खरेदीखत करारनामा करून दिला. महापालिकेने नुकतीच ही जमीन ताब्यात घेतली आहे. त्यानंतर खरेदी केलेल्या प्लॉटधारकांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी बनकर यांच्यासह सुमारे चाळीस जणांनी पोलिसात धाव घेतली. त्यानुसार पोलिस ठाण्यात प्लॉट विक्री करणारे संशयित आरोपी शेख फेरोज शेख कमरोद्दीन, शेख सालक मोहम्मद बवाजीर (रा. रहीमनगर, रहेमानिया कॉलनी) आणि एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुख्य आरोपी शेख फेरोजला अटक केली असून पोलिस नाईक कोलते तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीचा पेच सुटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. टेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या प्रकरणी वाद झाल्यानंतर अखेर विद्यापीठाने पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) बी. टेक वर्गाच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्राचा प्रश्न चिघळला होता. अनेकदा पाठपुरावा करुनही विद्यार्थ्यांना पदवी मिळत नव्हती. पदविका उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांनी दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतला होता. २०१६-१७ यावर्षी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्यासोबत बारावी उत्तीर्ण होऊन बी. टेक करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी पदवी मिळाली. पण, पदविका अभ्यासक्रमातून आलेल्या विद्यार्थ्यांना पदवी मिळाली नाही. संबंधित विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आणि स्पर्धा परीक्षेत कागदपत्र पडताळणी करताना अडचणी येत होत्या. विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नव्हती. व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवला. विद्यापीठ प्रशासन, राज्य शासन आणि व्यवस्थापन परिषदेकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा मुद्दा मांडला. या प्रश्नावर चर्चा करून अखेर प्रशासनाने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्तमुळे दुष्काळमुक्ती हा दावा पोकळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एके काळी दुष्काळी उपाययोजना करण्यामध्ये महाराष्ट्र सरकार हे देशभरात मॉडेल ठरले होते, मात्र आज नरेगाची सर्वात दयनिय अवस्था महाराष्ट्रात आहे. दुष्काळावर कायमची उपाययोजना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुरू करण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान मराठवाड्यात पोकळ ठरले आहे. अभियान यशस्वी झाले असते तर यंदा मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडलाच नसता, असे म्हणत स्वराज इंडिया अभियानचे अध्यक्ष डॉ. योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तोफ डागली.

कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानात शेतकऱ्यांऐवजी केवळ बड्या कंत्राटदारांचा फायदा झाला आहे. आज मराठवाड्यात तीव्र दुष्काळ आहे, मात्र उपाययोजना करण्यामध्ये सरकार अपयशी ठरले आहे. दुष्काळी उपाययोजनेच्या नावाखाली केवळ टँकरसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. एकीकडे पाणी नाही, असे बोलले जाते तर, दुसरीकडे बाटलीबंद पाण्याचा धंदाही जोरात सुरू आहे. दुष्काळात काय करायचे, याचे सुप्रिम कोर्टाने निकष ठरवले असून, यानुसारच प्रत्येकाच्या हाताला काम उपलब्ध करून देणे, रेशनपुरवठा करणे, शेतकऱ्यांन नवीन कर्ज उपलब्‍ध करून देणे; तसेच वेळेत दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना देणे आदींवर लक्ष दिले जात नसल्याचे यादव यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत डॉ. यादव म्हणाले की, आगामी निवडणुकीचा विषय शेतकरी आणि तरुण राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आज शेतकरी, हमीभाव आणि तरुणांना रोजगाराबाबत बोलत आहेत. शेतकरी आणि तरुणांच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या, कुणीही सत्तेमध्ये आले तर देश पुढे जाईल, मात्र हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावून निवडणुकीत कोणताही पक्ष जिंकला तरी भारत मात्र हरणार आहे.

\B'आय कॅन १९' मोहिमेची सुरुवात\B

आगामी निवडणुकीमध्ये 'आय कॅन १९' (राष्ट्रनिर्मितीसाठी लोकअभियान १९) या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून, यामध्ये देशभक्त नागरिक, युवकांना सहभागी होता येणार आहे. जे नागरिक निवडणुकीत केवळ प्रेक्षक म्हणून राहू इच्छित नाही ते या मोहिमेत सहभागी होतील. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना योग्य मुद्द्यांवर प्रचार करण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे व हेच स्वयंसेवक उमेदवार निवडतील. हे उमेदवार अपक्ष व इतर असतील स्वराज अभियानाचे उमेदवार राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी अॅड. अविक साहा, अॅड. सविता शिंदे, अण्‍णा खंदारे, सुभाष लोमटे यांची उपस्थिती होती.

\Bकांदा उत्पादकांना दिलेले अनुदान म्हणजे दक्षिणा

\Bराज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान कोणत्या हिशेबाने दिले? एक क्विंटल उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांना यासाठी ८०० रुपये खर्च करावे लागतात. सरकारने किमान १२०० रुपये अनुदान दिले पाहिजे. सरकारने दिलेले अनुदान दक्षिणा असल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामरोजगार सेवकांना पुर्णवेळ दर्जा द्या

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामरोजगार सेवकांना पूर्णवेळ दर्जा द्यावा, मासिक १८ हजार रुपये वेतन द्यावे, ग्रामसेवकाचा दर्जा द्यावा यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघाने शुक्रवारी (२१‌ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

महात्मा गांधी रोजगार हमी कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी स्वतंत्र योजना उभारण्याची तरतूद या कायद्याच्या मार्गदर्शक सूत्रात करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रासाठी एक ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक करण्यात आली आहे. ग्रामरोजगार सेवकांना जॉबकार्ड बनवणे, मजूरांची नोंद करणे, कामाची मागणी स्वीकारणे व पंचायत समितीला पाठवणे, ई मस्टर प्राप्त करणे, मजूरांची हजेरी भरणे आदी कामे करावी लागतात. पूर्णवेळ दर्जासोबतच ग्रामसेवकांचे गेल्या ११ वर्षाचे स्टेशनरी, प्रवास भत्ता, अल्पोपहार भत्ता व इतर सर्व भत्ते देण्याचे आदेश द्यावे, राज्यभरातील अतिरिक्त रोजगार सेवक नियमबाह्य निवड रद्द करावी तसेच आदेश ग्रामपंचायतीला द्यावे यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. या धरणे आंदोलनात जिल्ह्याभरातील ग्रामरोजगार सेवकांची उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनावर सखाहरी बिनोरकर यांची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरांची तहान भागेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याची दुष्काळात अक्षरश: होरपळ सुरू झाली आहे. विभागातील ५० नगरपालिका आणि २५ नगरपंचायतींपैकी बहुतांश शहरे तहानलेली असून, यापैकी अनेक शहरांना दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वात मोठे शहरत असलेल्या औरंगाबादला चार दिवसांआड तर लातूर जिल्ह्यातील शहरांना तब्बल आठ ते दहा दिवसानंतर पाणी मिळत आहे.

हिवाळ्यामध्ये बाष्पीभवनाचा दर कमी असला तरी येणारा उन्हाळ्यात मराठवाड्यात दुष्काळाचे भीषण चटके सहन करावे लागणार आहेत. या अनुषंघाने प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दररोज आढावा घेण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अहवालानुसार औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड तसेच परभणी जिल्ह्यातील काही शहरांमधील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. औरंगाबादला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे २५ टक्के पाणीसाठा असला तरी महापालिकेच्या नियोजनशून्य वितरण व्यवस्थेमुळे शहराला चार ते पाच दिवसांआड पाणी मिळते. जिल्ह्यातील पैठण, वैजापूर, खुलताबाद व सिल्लोड शहरात तीन ते पाच दिवसानंतर पाणी मिळत आहे. सर्वाधिक पाणीटंचाई असलेल्या लातूर शहरात महापालिकेकडून सध्या आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यातील औसा शहराला आठ ते दहा दिवसानंतर, निलंगा शहराला चार दिवसानंतर तर अहमदपूर शहराला नगर पालिकेकडून महिन्यातून केवळ दोन वेळेस पाणीपुरवठा करण्यात येत आहे. देवणी, शिरुर अनंतपाळ, जळकोट शहराला पाच तर रेणापूरला आठ दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या शहरांवर तीव्र पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, शिरुर व वडवणी शहरांना आठ ते बारा दिवसानंतर पाणी मिळत आहे. या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये उपलब्‍ध असलेला पाणीसाठा जूनपर्यंतचे वापरण्याचे नियोजन करण्यात येत असल्यामुळे या शहरांना आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

\Bजायकवाडीतून पाण्याचे प्रस्ताव

\Bबहुतांश नगरपालिकांनी टंचाईच्या कालावधीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विंधन विहीर घेणे, विहीर अधिग्रहण करणे आवश्यक असल्याचे प्रस्ताव दिले आहेत. यातील बहुतांश नगर पालिकांना; तसेच नगर पंचायतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेवराईसारख्या नगरपालिकेने पाणीपुवठा बंद झाल्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

सध्याची टँकर स्थिती

जिल्हा........ टँकर........... विहीर अधिग्रहण

औरंगाबाद...... ४६३..........२५६

जालना............९५...........९८

नांदेड...............०२...........०२

बीड ...............१३९............१४४

उस्मानाबाद.......०६..............९८

-------------------------------

एकूण..............७०५.............५९८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा चालविण्यासाठी दोन लाखांची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाळा चालवायची असेल तर दोन लाखांची खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी एका संस्थेच्या सचिवाकडे करण्यात आली. हा प्रकार बुधवारी दुपारी दशमेशनगरमध्ये घडला. या प्रकरणी चौघांविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिक्षण संस्थेचे सचिव लियाकत अलीखान मेहबुबखन (वय ६३, रा. शहा कॉलनी. उस्मानपुरा) यांनी तक्रार दाखल केली. लियाकत अली हे सरकारमान्य नुर उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेचे सचिव आहेत. ही शासनमान्य शाळा गेल्या २० वर्षांपासून दशमेशनगर येथील मराठवाडा वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जागेवर सुरू आहे. लियाकत अली हे शाळेत असताना १३ डिसेंबर रोजी संशयित आरोपी शेख सलीम शेख मस्तान (वय ६०), शेख जावेद शेख सलीम (वय २८), शेख वाजेद शेख सलीम (वय २४, सर्व रा. तारा पान सेंटर, जुन्या पोलिस चौकीमागे, उस्मानपुरा) हे परवानगी न घेता शाळेत आले. त्यातील एकाने आम्हाला शेख अहमद (वय ५५, रा. एकनाथनगर, उस्मानपुरा) यांनी पाठवले असून तुम्हाला शाळा चालवायची असल्यास दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. यानंतर ते पुन्हा बुधवारी शाळेत आले आणि दोन दिवसात पैशांची मागणी पूर्ण करा नाही, तर ठार मारण्याची धमकी देत निघून गेले. या प्रकरणी लियाकत अली यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानातून चोरी, आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुकानाचे शटर उचकटून १२२० रुपयांची रोख रक्कम चोरू नेल्याच्या प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ उर्फ सिध्या सोनाजी इंगळे (वय २२, रा. हनुमाननगर) व शेख अफरोज उर्फ अप्पू शेख लाल (२०, रा. गारखेडा) या दोघांना गुरुवारी (२० डिसेंबर) अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर केले. त्यांना सोमवारपर्यंत (२४ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले. या प्रकरणी राजू सिद्धअण्णा यादव (वय ४९, रा. गादिया विहार) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ९ डिसेंबर रोजी फिर्यादी रात्री दुकान बंद करून घरी आला असता, चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून १२२० रुपयांची रोख रक्कम चोरल्याचे स्पष्ट झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सिद्धार्थ उर्फ सिध्या सोनाजी इंगळे व शेख अफरोज उर्फ अप्पू शेख लाल यांना अटक करून कोर्टात हजर केले असता, त्यांना कोर्टाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाकारण मारहाण; हॉटेल मालकास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केबीसी हॉटेलमध्ये मित्रासोबत गेला असता विनाकारण लोखंडी झाऱ्या, लाथाबुक्यांनी मारहाण करणाऱ्या नागेश पवार यास जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. त्याला शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रोहिना अंजूम यांनी पोलिस कोठडी सुनावली.

सिडको वाळूज महानगर येथे राहणारे अंकित मनोजसिंग हा बुधवारी (१९ डिसेंबर) त्यांचा मित्र आणि बॉस मनजित सुरेश पांडे यांच्यासोबत शहनूरमियॉ दर्गा परिसरातील केबीसी हॉटेल मध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्यावर पांडे यांनी काऊंटर बसलेल्या व्यक्तीकडून हॉटेल मालक गणेश पाटील याचा मोबाइल नंबर घेऊन त्यांना फोन केला. त्यानंतर गणेश पाटील येण्याची वाट पाहत थांबले. पाटील आल्यानंतर पांडे यांनी उसने दिलेल्या चार लाखांची मागणी करताना त्याच्यात शाब्दिक चकमक उडाली आणि पाटील व त्यांच्या साथीदारांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहणीमध्ये अंकित मनोजसिंग आणि पांडे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्या दोघांना जवाहर नगर पोलिसांनी उपचारसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पांडे आणि पाटील यांच्यात समझोता झाला. मात्र अंकितने विनाकारणच मार खाल्ला आणि जखमी झाला. त्याने पांडे यांना तक्रार देण्यास सांगितल्यानंतर त्याने नकार दिल्यामुळे अंकित सिंगने मारहाण करणाऱ्या गणेश पाटीलसह पाच जणांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी नागेश सोनुबा पवार यास शुक्रवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी हॉटेल मालक गणेश पाटील, दत्ता शेलार, हॉटेलमधील दोन वेटर यांना अटक करावयाची आहे, गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाताळात दु:ख सारी विसरून जाऊ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमससाठी शहराचा बाजार फुलला असून, गुलमंडीसह अन्य बाजारपेठ, मॉलमध्ये विविध प्रकारांच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहक तोबा गर्दी करत आहेत. महागडे ख्रिसमस ट्री, सांता टोपी, बेल्स, गिफ्ट पॅकेजला मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

रेल्वे स्टेशन, जालना रोडसह शहरातील विविध भागात सांता टोपी विक्रीची दुकाने गेल्या काही दिवसांपासून विक्रेत्यांनी थाटली असून, विविध वस्तूंनी बाजारपेठ सज्ज झाली आहे. विविध प्रकारचे कॅडल बाजारात दाखल झाले आहेत. यात फ्लोटिंग कॅडल, डेकोरेटिव्ह कॅडल, सुवासिक तसेच चंदनयुक्त कॅडल, जेलीटेप, स्टॅँड विथ कॅडल यासह हार्डशेप आणि लायटिंग कॅडल उपलब्ध आहेत. आकर्षक अशा ख्रिसमस ट्रीला मोठी मागणी असून अर्धा फुटापासून ते पंधरा फुटापर्यंत उंचीच्या ख्रिसमस ट्री यंदा विक्रीसाठी दालनात उपलब्ध आहेत. ४० रुपये ते चार हजार रुपयांपर्यंत त्यांची किंमत असल्याचे गुलमंडी येथील विक्रेते द्वारकादास दौलताबादकर यांनी सांगितले. बच्चेकंपनीत सांताक्लॉजचे खास आकर्षण असून त्यांना चॉकलेट, गिफ्ट घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यास मोठी मागणी आहे.

\Bम्युझिकल सांताक्लॉज

\Bम्युझिकल सांताक्लॉजही बच्चेकंपनीच्या भेटीला आला असून मदर मेरी, बेल्स, प्रभू येशू यांच्या मूर्ती, छायाचित्र तसेच सांताक्लॉजचे कपडे, चांदणी, खेळणी, ख्रिसमस बॉल्स आदी खरेदी करण्याची लगबग बाजारात दिसून येत आहे. यासह ग्रिटिंग कार्ड, सजावटीचे साहित्य, गोल्डन बेल्स यासह विविध प्रकारचे गिफ्ट्स खरेदीकडे ग्राहकांचा ओढा आहे. प्रियजनांना भेट वस्तू म्हणून देण्यासाठी विविध प्रकारच्या चवीचे तसेच आकर्षक पॅकिंग केलेले चॉकलेटस् बाजारात दाखल झाली असून, त्यांची मागणी वाढली आहे. ड्रायफ्रुटस्, मिठाई बरोबरच केकला चांगली मागणी आहे.

नाताळच्या दिवशी केकला मोठी मागणी असते. लहान मुलांच्या पसंतीला पडणारा पूर्णपणे चॉकलेटने बनविलेला प्लम केक, क्रिम केक, चॉकलेट ट्रफल, ब्लॅक फॉरेस्ट, चॉकलेट केक यासह ड्राय केकला मोठी मागणी आहे. रम केकला चांगलीच डिमांड असून अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे.

- हनुमान दरक, क्रेझी बाईट रेस्टॉरंट चालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कंपन्यांची स्थानिक करातून मुक्तता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी काळात पायाभूत सुविधांचा विकास, विद्युत खांब, भूमिगत केबल किंवा वितरण रोहित्रे बसविण्यासाठी महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना महावितरण किंवा पारेषण यांना कोणतेही 'कर' भरावा लागणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे वीज कंपन्यांची स्थानिक करातून मुक्तता झाली आहे.

महावितरण पायाभूत सुविधांसाठी भरलेला कर हा कंपनीच्या खर्चात दिसतो. हा खर्च हा वीज नियामक आयोगासमोर मांडून त्यावर मंजुरी घेण्यात येते. त्यानंतर हा कर सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या वीज बिलातून वसूल केला जात आहे. सर्वसामान्यांवर पडणारा हा बोझा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून २० डिसेंबर रोजी अध्यादेश काढण्यात आला आहे. या अध्यादेशांतर्गत राज्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महापालिका यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या करातून विदयुत कंपन्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २९ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयांतर्गत ऊर्जा विभागांतर्गत शासकीय विदयुत कंपन्यांना तसेच त्यांच्या फ्रॅन्चाइझींना, त्यांच्याकडून उभारण्यात येणाऱ्या विद्युत पायाभुत सुविधांसाठी उदा. ओव्हर हेड वायर, भूमिगत केबल, वितरण रोहित्र, विद्युत खांब, विद्युत मनोरे तसेच पारेषण वाहिन्या निर्मिती करण्यासाठी किंवा या सुविधा देण्यासाठी कोणताही प्रकारचा कर आकारण्यात येणार नाही. दरम्यान, कोणत्याही शहराची निर्मिती करताना किंवा त्या ठिकाणी सोयी सुविधा पुरविताना मोकळी जागा ठेवणे आवश्यक आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी या जागा ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे लोकांची गरज वाढल्यानंतर त्या ठिकाणी वीज वितरण सुविधा वाढविण्यात येत असते. यामुळे महापालिकेने पुढील सुविधांसाठी अशी मोकळी जागा सोडावी, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

…………

\Bचार कोटी देऊनही त्रास \B

औरंगाबाद शहरात भूमिगत केबल टाकण्यावरून महापालिका आणि महावितरण यांच्यात वाद सुरू आहे. या वादामुळे 'आयपीडीएस'ची कामे होत नाहीत. महावितरणाने महापालिकेकडे चार कोटींचा कर थकित वीज बिलातून वळती केला आहे. तरीही महावितरणला महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. यानंतर अशी कामे करताना महापालिका, नगरपालिका आणि महावितरण असा संघर्ष उद्भवणार नाही.………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्तीनंतर मिशन ‘फिंगर प्रिंट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्त चिरंजिव प्रसाद यांनी उपदेशाचा डोस दिल्यानंतर निद्रिस्त झालेला पोलिस विभाग खडबडून जागा झाला असून, त्यांनी आता गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाचा पुरावा मानला जाणाऱ्या फिंगर प्रिंट मोहिमेला वेग दिला आहे.

शहरात अनेक प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात येते. अटकेपासून ते न्यायलयात हजर करण्यापर्यंतचा तपास पोलिसांना करावा लागतो. याशिवाय न्यायलयात हजर केल्यानंतर भक्कम पुरावे दाखल करावे लागतात. परिस्थिती जन्य पुराव्यामध्ये फिंगर प्रिंट हा महत्त्वाचा पुरावा असतो. फिंगर प्रिंट घेण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र, गेल्या वर्षात पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे असलेल्या कामाच्या व्यापामुळे अनेक पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यानी फिंगर प्रिंट घेण्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले. २०१७ ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत शहरातील एकूण १७ पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये ७३०८ आरोपींना अटक करण्यात आली. यात फक्त ११८८ आरोपींचे फिंगर प्रिंट जमा करण्यात आले होते. १७ पोलिस ठाण्याची सरासरी १६ टक्के इतकी होती. या प्रकरणात पोलिस आयुक्त चिरंजिव प्रसाद यांनी संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांशी चर्चा केली. त्यांना सदर कामाबाबत कडक तंबी देत सक्ती केली. त्यानंतर नोव्हेंबर २०१८पासून फिंगर प्रिंट घेण्याच्या प्रक्रियेत वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण ५५५ आरोपींना विविध गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या ५५५ पैकी ४४१ आरोपींचे फिंगर प्रिंट घेण्यात आली आहेत. हा आकडा एका महिन्यात ७९ टक्के पर्यंत पोहोचल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली. मागील वर्षी फिंगर प्रिंटच्या बाबत घेतलेल्या आढाव्यात वाळूज, एमआयडीसी सिडको, पुंडलिकनगर आणि वेदांतनगर पोलिस ठाण्यात एकाही आरोपींचे फिंगर प्रिंट जमा करण्यात आलेले नव्हते. मात्र नोव्हेंबर महिन्यात यातील वाळूज, एमआयडीसी सिडको आणि वेदांत नगर पोलिस ठाण्याने गेल्या महिन्यात पकडलेल्या आरोपींचे फिंगर प्रिंट जमा करून शंभर टक्के कामगिरी करून दाखविली आहे.

………

\Bविशेष सॉफ्टवेअर

\Bगुन्हे प्रकटीकरण वाढावे यासाठी गृह विभागाकडून अद्ययावत सॉफ्टवेअर फिंगर प्रिंटसाठी देण्यात आले आहे. पूर्वी आरोपींचे फिंगर प्रिंट घेण्यासाठी कागदी पद्धत स्वीकारावी लागत होती. मात्र, आता आधुनिक सॉफ्टवेअरमध्ये स्कॅनरच्या सहाय्याने फिंगर प्रिंट तयार करून स्लीप काढण्यात येत असल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.

---

\Bअशा आहेत नोंदी...

\B---

पोलिस ठाणे मागील वर्षभरातील टक्केवारी नोव्हेंबरमधील टक्केवारी

सिटीचौक २९ टक्के १०० टक्के

एमआयडीसी वाळूज २४ टक्के ७३ टक्के

छावणी २३ टक्के ९१ टक्के

जवाहरनगर ३४ टक्के ९३ टक्के

सिडको २१ टक्के ७७ टक्के

दौलताबाद १५ टक्के ५७ टक्के

वाळूज ० टक्के १०० टक्के

उस्मानपुरा ११ टक्के १२ टक्के

मुकुंदवाडी ४२ टक्के ६७ टक्के

क्रांती चौक ११ टक्के १०० टक्के

बेगमपुरा ०७ टक्के ७९ टक्के

एमआयडीसी सिडको ० टक्के १०० टक्के

हर्सूल १५ टक्के ९१ टक्के

जिन्सी ०६ टक्के ८३ टक्के

सातारा १२ टक्के १०० टक्के

पुंडलिकनगर ० टक्के ४६ टक्के

वेदांतनगर ० टक्के १०० टक्के

……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तम युक्तीवादाच्या बळावर अंतिम फेरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्तम युक्तीवाद, परखड मांडणी अन् विषयातील गांभीर्य पटवून देत अभिरूप न्यायालयात देशभरातून आलेल्या लॉ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. माणिकचंद पहाडे विधी कॉलेजमध्ये आयोजित या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे. शनिवारच्या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या पाच संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

विधी अभ्यासक्रमाच्या देशभरातील विद्यार्थ्यांचे या स्पर्धेकडे लक्ष असते. शनिवारी १९व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायायल स्पर्धेला कॉलेजच्या सभागृहात सुरुवात झाली. राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, अकोला शहरासह इंदौर, हैदराबाद, विजयवाडा, बेंगळुरू, चेन्नई अशा देशभरातील विविध शहरांमधील कॉलेजच्या विद्यार्थी संघांनी सहभाग नोंदविला. पहिला दिवसासाठी युक्तीवादासाठी देण्यात आलेल्या प्रकरणात विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने बाजू मांडली. यानंतर अंतिम फेरीसाठी पाच संघांची निवड करण्यात आली. या फेरीचे मूल्यांकन उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. के. बी. चौधरी, अॅड. संजीव देशपांडे, अॅड. एस. के. बरलोटा, अॅड. एस. जे. सांळुके, अॅड. किशोर पाटील, अॅड. अजित कडेठाणकर, अॅड. अंजली दुबे, अॅड. देवदत्त पालोदकर, अॅड. मिलिंद देशपांडे, अॅड. किशोर संत, अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे, अॅड. सचिन देशमुख, अॅड. सी. के. शिंदे, अॅड. नितीन गवारे, अॅड. पी. आर. कातनेश्वर, अॅड. शैलेश ब्राह्मे यांनी केले. स्पर्धेतील अंतिम फेरी रविवारी तापडिया नाट्यमंदिरात सकाळी नऊ वाजेपासून सुरू होणार आहे. अंतिमफेरीत पुणे येथील डीईएस श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज, एर्नाकुलम येथील शासकीय विधी महाविद्यालय, एम. पी. लॉ कॉलेज, मुंबईतील एसएनडीटी विमेन्स युनिवर्सिटी लॉ स्कूल, हैदराबाद पेंडेकेंटी लॉ कॉलेजचा समावेश आहे.

\Bस्पर्धेचा समारोप आज

\Bस्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे. याफेरीनंतर स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा सभागृहात पार पडणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरूण ढवळे व मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा गायकांची सुश्राव्य मोहिनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शास्त्रीय रागदारीच्या उत्कट सादरीकरणाने युवा सरगम महोत्सव श्रवणीय ठरला. नवीन पिढीतील गायक आणि वादकांचे प्रभावी सादरीकरण दाद घेऊन गेले. पारंपरिक बंदिशी आणि सुगम संगीताने रसिकांना खिळवून ठेवले.

पिनाक संगीत अकादमीच्या युवा सरगम महोत्सवाला कलश मंगल कार्यालयात शनिवारी सुरुवात झाली. या मैफलीची सुरुवात शिवानी कुलकर्णी यांच्या 'जय शारदे वागेश्वरी' या गीताने झाली. सावनी गोगटे यांनी शास्त्रीय गायन केले. राग 'श्री' विलंबित ख्याल 'तीलवाडा' तालात आणि छोटा ख्याल 'द्रुत तीन' तालात सादर केला. 'वारी जाऊ रे' ही रचना श्रवणीय झाली. राग नंद' गाऊन तिने पहिल्या सत्राचा समारोप केला. तबल्यावर अद्वैत टाकळकर व हार्मोनियमवर गजानन केचे यांनी साथसंगत केली. नंतरच्या सत्रात ओंकार अग्निहोत्री यांनी मैफलीत रंग भरले. राग 'यमन'द्वारे त्यांनी रसिकांना मंत्रमुगध केले. पहिल्या दिवसाचा समारोप अंजली व नंदिनी गायकवाड यांच्या गायनाने झाला. तबल्यावर जगदिश व्यवहारे व संवादिनीवर अंगद गायकवाड यांनी साथसंगत केली. दरम्यान, या महोत्सवाचे उदघाटन महापालिका स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य, डॉ. श्रीरंग देशपांडे आणि पं. शुभदा पराडकर यांनी केले. यावेळी विनोद शिराळकर, ज्योती शिराळकर, भारती न्यायाधीश यांच्यासह रसिक उपस्थित होते.

\B'सुफियाना' आज

\Bमहोत्सवात रविवारी सायंकाळी शिष्या सई बाराबोटे यांचे तबलावादन, अमृता काळे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. तर रवींद्र खोमणे यांच्या 'सुफियाना'ने दुसऱ्या दिवसाचे सत्र संपणार आहे. रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांना ३० लाख कोटींच्या सवलती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांना ३० लाख कोटी रुपयांच्या सवलती दिल्या आहेत. काँग्रेस अशा सवलती लाजत-काजत देत होती. पण, मोदींनी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले आहे. दलित, मुस्लिम, आदिवासी यांनी एकत्रितपणे धर्मांध शक्तीला विरोध करण्याची गरज आहे. कारण जनशक्तीला कुणी हरवू शकत नाही' असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले. ते सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्य अधिवेशनात बोलत होते.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्य अधिवेशनाचा शनिवारी समारोप करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात दुपारी झालेल्या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, डॉ. अनिल सदगोपाल, प्रा. हंसराज उईके, भारिप बहुजन महासंघाचे अशोक सोनोने, महेश भारतीय व प्रकाश इंगळे उपस्थित होते. धार्मिक ध्रुवीकरणावर कोळसे-पाटील यांनी भाष्य केले. 'देशात दररोज नवनवीन वक्तव्ये केली जात आहेत. कुणी म्हणतो ताजमहालाच्या खाली मंदिर आहे. कुणी हनुमानाच्या जातीवर बोलतो. जातीवर देशभर २४ तास चर्चा घडवल्या जातात. रामासारखे आचरण नसलेल्या नेत्यांना रामाचे नावसुद्धा घेण्याचा अधिकार नाही. पण, ते दररोज रामानाचा जप करीत आहेत. जगभरात अशा धार्मिक दहशतवाद्यांनी ताबा घेतला आहे. देशभर मनुवाद आणि मनीवाद फोफावला आहे. त्यांना सत्तेतून हटविण्यासाठी तिसऱ्या फोर्सची गरज आहे. हे काम आंबेडकरवादीच करू शकतात. सत्तेची चावी मिळवण्यासाठी दलित, आदिवासी, मुस्लिम आणि बहुजनांनी एकत्र यावे. व्यवस्था शत्रू आहे, हे ओळखून नवीन विचारांची पिढी घडवणे हाच खरा विकास आहे' असे कोळसे -पाटील म्हणाले. आदर्श आठवले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

\Bनोटाबंदीने पंख छाटले

\B'नोटबंदी हे भाजपचे विरोधकांचे पंख छाटण्याचे कारस्थान होते. 'घर-घर मोदी' म्हणत आता 'घर-घर जासूस' पाठवले आहेत. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. बहुजन समाज संघटीत नसून संघर्षाला घाबरत आहे. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश यांना वीरत्व आले. आमच्यासारखी चळवळीतील माणसं धाडसाने बोलतात. तुम्हीसुद्धा धाडसाने परिस्थितीला सामोरे जा' असे कोळसे-पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावळ्या मला भेट द्या हो...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो,' असा गजर करत शनिवारी शहरात पालखी सोहळा, अभिषेक, महाआरती, भक्तिसंगीत, रक्तदान शिबिर आदींनी दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

औरंगपुऱ्यातील मंदिरात दत्त जन्मोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांचा जनसागर दर्शनासाठी लोटला होता. सकाळी गुरू चरित्राचे पारायण संपन्न होऊन दहा वाजता आरती झाली. शहरातील पुरातन असलेल्या दत्त मंदिराची सहा ते सात पिढ्यान पासूनची परंपरा जपत हा पारंपरिक आणि धार्मिक सोहळा पार पडल्याची माहिती पुजारी भाऊसाहेब गुरुजी यांनी दिली. गेल्या सात दिवसांपासून येथे विविध भजनी मंडळाचे भजन, शोभना कुलकर्णी यांचे भक्ती गीताचे कार्यक्रम झाले. शनिवारी विनोद शास्त्री पाठक यांनी जन्मोत्सवाचे कीर्तन केले. रविवारी महाप्रसाद आणि सोमवारी गोपाळ काल्याने या उत्सवाची सांगता होणार आहे. सिडको एन-सातमधील जागृत दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा उत्साहात पार पडला. सकाळी भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीस महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर दत्तात्रयांची महापूजा झाली आणि ५६ भोग नैवैद्य दाखविण्यात आला. दत्त जन्मोत्सव निमित्ताने सायंकाळी चार वाजता भरतबुवा रामदासी यांचे कीर्तन झाले. त्यांनी समाजातील दुष्प्रवृतीवर प्रहार करीत समाजमन चांगले राहण्याची आवश्यकता प्रकट केली. त्यानंतर सायंकाळी फटाक्याची आतषबाजी करत आणि वेदमंत्राच्या जयघोषात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर परिसरातून मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात पालखी काढण्यात आली. यानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. दरम्यान, सोमवारपासून जयंती महोत्सवातंर्गत नेत्र तपासणी, दीपोत्सव, पुष्पार्चन, अच्युतानंद सरस्वती स्वामी महाराज रचित गुरुचरित्र पारायण आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उद्धव जोशी, पद्माकर दिवाण, संतोष लगामे, राजू इंजे, गणेश बागुल, सुधीर पोतदार, बजरंग मालोदे, मयूर जांभोरकर, सागर अमृतकर, निवृत्ती गाडगीळ, धनंजय चिटणीस, शिवकुमार थारेवाल, सागर गुरुजी आदीनी प्रयत्न केले. दरम्यान, हडको एन ११ येथील श्री दत्त मंदिर, एम २ आणि गारखेडा येथील स्वामी समर्थ केंद्र येथेही दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला.

\Bदेवळाईत उत्साह शिगेला

\Bबीड बायपास, देवळाई चौक येथील संत काशीविश्‍वनाथ बाबा संस्थान येथे दत्त जयंतीनिमित्त सकाळी सहा ते आठ या वेळेत श्री गणेश, रेणुकामाता, भगवान श्री दत्तात्रय आणि सुवर्णपादुकांची पूजा, महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर प्रा. राजेश सरकटे यांच्या भक्‍तिगीतांचा कार्यक्रम झाला. दुपारी बारा वाजता महाआरती, दिवसभर महाप्रसाद वाटप झाल्याचे विश्‍वस्त सोपानराव देशमुख यांनी सांगितले. यावेळी श्री संत काशीविश्‍वनाथ बाबांच्या मूर्ती स्थापनेचा १९वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. गुरुचरित्र, सद‍्गुरू माहात्म्य पोथीचे पारायण करणाऱ्यांसाठी मंदिर संस्थानतर्फे व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळी पालखी मिरवणूक, श्रीनिवासबुवा कानिटकर यांचे गुरूमहिमा यावर प्रवचन झाले, अशी माहिती रामकृष्ण वाघ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'शिवसेना नेत्यांनी झोळ्या भरल्या'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, तुमच्या स्थानिक नेत्यांना कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचे हे ही माहित नाही. त्यांच्या दृष्टीने सत्तेत असणे म्हणजे केवळ झोळ्या भरणे. शहराचे वाटोळे झाले तरी चालेल. शिवसेनेमुळे शहराचा विकास खुंटला आहे. तुम्ही तुमच्या नेत्यांना स्वत:च्या शहराची काळजी घ्यायला शिकवा,' असे तिखट खुले पत्र एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना लिहिले आहे.

ठाकरे रविवारी शहर बस सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाला येणार आहेत. हा मौका साधून जलील यांनी चौका लगावल्याची चर्चा आहे. जलील यांनी पत्रात म्हटले आहे की, 'शिवसेनाच शहराच्या बकालीकरणाला जबाबदार आहे. शहरात रस्ते, वीज, पाणी नाही. प्रदूषणाच्या दृष्टीने परिस्थिती वाईट आहे. या बकाल अवस्थेमुळेच औरंगाबादचे नाव 'कचराबाद' झाले आहे. पालिकेच्या शाळांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. औद्योगिकदृष्ट्या व जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने एकेकाळी प्रगत असलेले शहर, आज प्रगत शहरांच्या क्रमवारीत खालच्या स्थानावर आहे. पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. हे असे का होत आहे? तुमच्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे याचे भान नाही. त्याची किती जबाबदारी घ्यायची? याचे देखील भान नाही. आमदार म्हणून पालिकेच्या शाळांत चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी पालिकेच्या खुल्या जागा विकसित करण्यासाठी, गरिबांना आरोग्यसुविधा सुलभ आणि अखंडितपणे मिळावी ह्यासाठी गल्लोगल्ली रुग्णालय सुरू करावे यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे. मात्र या प्रयत्नाला खोडा घालून जनतेला सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे,' असा आरोप जलील यांनी केला आहे.

\Bबाळासाहेबांचे नाव रुग्णालयाला द्या

\B'बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कॅन्सर रुग्णालयाला दयावे. किंवा एखादे मोठे हॉस्पिटल काढून दयावे. त्यांच्या नावावर स्मारक तयार करून जनतेला किती फायदा होईल ? रुग्णावर उपचार झाल्यास बाळासाहेबांच्या कार्याची आठवण सदैव जनतेच्या मनात राहील,' अशी भावना जलील यांनी व्यक्त केली.


\Bपुतळ्याची उंची वाढवून काय उपयोग?

\B'छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उंच करण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिवाजी महाराज तमाम महाराष्ट्राच्या ह्रद्यात आहेत. यामुळे हा खर्च योग्य आहे का? याबाबत पुनर्विचार करावा. हाच निधी महापालिकेच्या शाळेच्या विकासासाठी वापरल्यास निश्चित याचा फायदा गरिबांना होईल,' असे आवाहन जलील यांनी केले आहे. ………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images