Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

चतुर्थ श्रेणी कर्मचारी आंदोलन करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दोन जानेवारी २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या औरंगाबाद संघटनेची जिल्हा कार्यकारणी बैठक शनिवारी घेण्यात आली.

राज्य उपाध्यक्ष सुरेश आहेरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच २८ व २९ जानेवारी रोजी दोन दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा इशाराही शासनाला निवेदन देऊन करण्यात आला आहे. चतुर्थ श्रेणीमधून तृतीय श्रेणीमध्ये २५ टक्क्यांऐवजी ५० टक्के पदोन्नतीसाठी पदे निश्चित करू नये तसेच यासंदर्भात १४ जानेवारी रोजी काढण्यात आलेला निर्णय रद्द करावा, अनुकंपा तत्वावरील सेवाभरती विनाअट रद्द करावी, सेवानिवृत्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास शासनसेवेत सामावून घ्यावे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्तपदे तत्काळ भरण्यात यावी, खासगीकरण रद्द करावे यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दाभाडे यांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा प्रश्नाचा आढावा घेतला

$
0
0

म. टा. औरंगाबाद प्रतिनिधी

'दोन वर्षांपूर्वी आम्ही शहरवासियांना शहर बस सेवेचे आश्वासन दिले होते. ते आम्ही पूर्ण करतो आहोत. कचऱ्याची समस्याही गंभीर आहे. तो सोडविण्याबाबत आम्ही प्रयत्नशील असून आगामी काही महिन्यात हा प्रश्न मार्गी लागल्याचे दिसेल,' असे आदित्य ठाकरे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' शी बोलताना सांगितले.

शहर बससेवेच्या लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांनी शहर बस सेवेत दाखल झालेल्या बसमधील सोयीसुविधांचा आढावा घेत पाहणी केली. शहर बस कोणत्या मार्गावर अन् कशी धावेल, याबाबत त्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी ते म्हणाले, 'शहर बस सेवा सुरू होतेय याचा आनंद आहे. शहरात या बस धावतील अन् शहराच्या विकासात निश्चित त्याचा भर पडेल. कचऱ्याच्या प्रश्नाबाबत मी संपूर्ण आढावा घेतला आहे. त्यात काही ज्या अडचणी आहेत त्या दूर करून त्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू असून त्यात यश आले आहे. आगामी काही दिवसांमध्ये त्यावर अधिक लक्ष देऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्रयत्न असतील. यासह दर्जेदार शिक्षणासाठी पालिकेच्या शाळांवरही लक्ष असेल,' असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कामगार कायदे बदलावर विचार मंथन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बदलते औद्योगिक विश्व, कामगार वर्गाच्या गरजा आणि उद्योगवाढीसाठी प्रभावी आणि हातभार लावणारे बदल याचा वचार करून औद्योगिक क्षेत्राला उपयोगी असलेल्या 'कामगार कायदे-बदल, मुद्दे आणि उपाय' विषयावर 'सीएमआय', 'एनआयपीएम'तर्फे कार्यशाळा घेण्यात आली.

सीएमआयए भवनात झालेल्या कार्यशाळेचे उद्घाटन उद्योजक राम भोगले, कमलेश धूत यांच्या उपस्थितीत झाले. उद्योगांची वाटचाल, कायदे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. यासह कार्यशाळेमध्ये कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, उद्योजक मकरंद देशपांडे, एनआयपीएमचे उपाध्यक्ष अनुराग कल्याणी यांनी मार्गदर्शन केले. पोळ यांनी 'आपले सरकार' याबद्दल माहिती दिली. सरकारने केलेल्या कामगार कायद्यातील प्रभावी बदलांबाबत उपस्थितांशी चर्चा केली. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम कायदा संबंधित उद्योगांनी भरून द्यायचे अर्जबाबत मार्गदर्शन केले. ज्यामध्ये उद्योगांना ५ वर्ष कामगार अधिकारी यांच्या तपासणीपासून सूट मिळेल, मैत्री पोर्टल, वेग-वेगळे रजिस्टर संभाळून ठेवण्यापेक्षा एक ऑनलाइन रजिस्टर संभाळून ठेवण्याची मुभा, बोनस कायदा, माथाडी कायदा यावर मार्गदर्शन केले. उद्योजक मकरंद देशपांडे यांनी किमान वेतन अधिनियम कायद्याबद्दल माहिती दिली. यासह उद्योग क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या, स्थितीबद्दल वाचा फोडली. अनुराग कल्याणी यांनी औद्योगिक तक्रार कायदा, स्थायी आदेश कायदा या विषयावर प्रश्नोतरामार्फत मार्गदर्शन केले. कार्यशाळेला विविध उद्योगांमधून ४० हून अधिक एचआर व्यवस्थापक, अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुंडा घेणाऱ्याशी लग्न न करणाची घ्या शपथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अजूनही हुंडा देण्या-घेण्याची प्रथा-परंपरा काही थांबलेली नसून, अगदी उघड-उघड किंवा लपून-छपून का होईना हुंडा घेतला जातोच. त्यामुळे मी हुंडा घेणाऱ्याशी लग्न करणार नाही, अशी शपथ जोपर्यंत मुली घेणार नाहीत आणि तशी मानसिकता समाजामध्ये तयार होणार नाही, तोपर्यंत समाजाला लागलेली ही कीड काही जाणार नाही, असा सूर वंजारी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त झाला.

वंजारी समाजाचा सर्वशाखीय वधू-वर परिचय मेळावा रविवारी (२३ डिसेंबर) जयभवानीनगर चौकातील कृष्णराज मंगल कार्यालयात झाला. या वेळी मान्यवरांमधून हुंडाविरोधी सूर उमटला. या प्रसंगी माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे, निवृत्त न्यायाधीश मारुती कांगणे, वंजारी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथराव घुगे, जय भगवान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, प्राचार्य डी. एन. केंद्रे, डॉ. उज्ज्वला दहिफळे, कार्यकर्ते गोपीनाथ वाघ, मनसे जिल्हाध्यक्ष (जालना) गजानन गिते, गोपीनाथराव वाघ, डॉ. संभाजी मुंडे आदींच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमात सानप म्हणाले, 'हुंडा घेतल्याशिवाय अजूनही लग्न लागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे समाजाविषयी आपुलकीही राहिलेली नाही, असेही ते म्हणाले. हुंडा घेणाऱ्यांवर समाजानेच आता आर्थिक बंधने घातली पाहिजेत, असे मत वाघ यांनी नोंदविले. कुटुंबसंस्था टिकण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांचा शेवटपर्यंत विश्वास टिकवणे गरजेचे आहे, याचा भावी पती-पत्नीने विचार करावा, असे डॉ. घुगे म्हणाले. तर, हुंडा ही समाजाला लागलेली कीड आहे, असे डॉ. दहिफळे म्हणाल्या. त्याचवेळी, हुंडा घेणाऱ्याशी मी लग्न करणार नाही, अशी शपथ घेतल्याशिवाय ही वाईट प्रथा थांबणार नाही, असे मत कांगणे यांनी नोंदविले. विश्वनाथ घुगे यांनीही अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले.

\B

मुलींना जाऊ द्या पुढे

\Bमुलींना शिकवा, पुढे जाऊ द्या, स्वावलंबी होऊ द्या. स्वालंबन व शिक्षणाला आजच्या काळात अनन्यसाधारण महत्व आहे. मुलींनी शारीरिक-मानसिकदृष्ट्या कणखर व भावनिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच संयम, समन्वय व नियंत्रणशिवाय कुठलेही घर टिकू शकणार नाही, समृद्ध होऊ शकणार नाही, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना आपला अनुभव शेअर केला पाहिजे व मुलांनीही पालकांच्या अनुभवातून शिकले पाहिजे. त्याचवेळी आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर प्राधान्यक्रम ठरवावा लागतो, हेही लक्षात घ्या, अशा शब्दांत डॉ. दहिफळे यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थान गणपतीची दानपेटी चोरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या संस्थान गणपती मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली. रविवारी पहाटे पावणेपाच वाजता राजाबाजार भागात हा प्रकार घडला. रिक्षातून आलेल्या दोन चोरट्यांनी अवघ्या ३० सेकंदात हा डाव साधला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा पडेगाव कासंबरी दर्गा भागातून जप्त केली आहे. चोर मात्र पसार झाले आहेत. या प्रकरणी सीटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त.... ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिरुप न्यायालय स्पर्धेत एम. पी. लॉ कॉलेज संघ विजेता

$
0
0

म. टा. प्रतिनिधाी, औरंगाबाद

अभिरुप न्यायालय स्पर्धेच्या अंतिमफेरीत प्रत्येक संघातील सदस्यांनी आपल्या युक्तीवादावर परीक्षकांसह, उपस्थितांना अवाक केले. पाच संघांमध्ये अतिशय चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत एम. पी. लॉ कॉलेजच्या संघाने बाजी मारली.

तापडिया नाट्य मंदिरात सकाळी ९ वाजेपासून स्पर्धेला सुरुवात झाली. अंतिम फेरीत पोहचलेल्या पुणे येथील डीईएस श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज, एर्नाकुलम येथील शासकीय विधी महाविद्यालय, एम. पी. लॉ कॉलेज, मुंबईतील एसएनडीटी विमेन्स युनिवर्सिटी लॉ स्कूल अन् हैदराबाद पेंडेकेंटी लॉ कॉलेजमधील या पाच संघांमध्ये चुरस झाली. त्यांना देण्यात आलेल्या प्रकरणावर संघांकडून युक्तीवाद करण्यात आला. आपली बाजू मांडताना स्पर्धकांनी अतिशय उत्तमरित्या मांडणी केली. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरूण ढवळे व मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी या फेरीचे मूल्यांकन केले. त्यांच्याच हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

विधी अभ्यासक्रमाच्या देशभरातील विद्यार्थ्यांचे या स्पर्धेकडे लक्ष असते. शनिवारी या १९व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायायल स्पर्धेला सुरुवात झाली. देशभरातील विविध शहरांमधील कॉलेजच्या विद्यार्थी संघांनी सहभाग नोंदविला. अंतिम फेरीसाठी पाच संघांची निवड करण्यात आली होती. युक्तीवादासाठी देण्यात आलेल्या प्रकरणात उत्तमरित्या बाजू मांडणाऱ्या एम. पी. लॉ कॉलेजचा संघ विजेता ठरला. संघाला अॅड. सुधाकरराव देशमुख चषक देऊन गौरविण्यात आले. उपविजेता संघ एर्नाकुलम येथील शासकीय विधी महाविद्यालयाचा संघ ठरला. दोन्ही फेरींमधून सर्वोत्कृष्ट अधिवक्ता, सर्वोत्कृष्ठ वादी अमृता कौर जोहर ठरली. अधिवत्कासाठीचे घाटे फाउंडेशन चषक रइफा शेख हिने पटकाविले. बेस्ट मेमोरियल प्राईज फॉर फाईनल राउंडच हे नम्रृता गोरे व अमृता कौर यांना प्रदान करण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. जे. के. वासडीकर होते. यावेळी प्राचार्य सी. एम. राव यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन अनिकेत सावंत तर आभार मयुर सुभेदार यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानपेटी विसर्जन विहिरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामदैवत संस्थान गणपतीची दानपेटी चोरट्यांनी चक्क औरंगपुरा येथील विसर्जन विहिरीत फेकल्याची कबुली दिली आहे. या चोरट्यांना अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रिक्षाचालक मुख्य आरोपीला त्याचे घर खरेदी करण्याची थाप मारत सापळा रचून सोमवारी पहाटे पडेगाव परिसरात जेरबंद केले.

राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी दोन चोरट्यांनी रिक्षामध्ये पळवल्याची घटना रविवारी पहाटे घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याप्रकरणी रमेश घोडेले यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात या आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी पिराजी संजय सोनवणे (वय ३० रा. पडेगाव) याला रविवारी सायंकाळीच वसंत भवन येथील देशी दारूच्या अड्डयावर मारामारी करताना पोलिसांनी पकडले होते. मात्र दुसरा संशयित आरोपी रिक्षाचालक इब्राहिमखान आलमखान (वय ३२, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) हा मालकाकडे रिक्षा सोडून रविवारी पहाटे चोरी केल्यानंतर पसार होता. त्याला शोधणे जिकरीचे काम झाले होते. दरम्यान त्याने हे घर आपल्याला विक्री करायचे आहे असे त्याने शेजाऱ्यांना सांगितले होते. पोलिसांनी हा धागा हेरला. नारेगाव येथे आरोपी इब्राहीमचे नातेवाईक राहतात. पोलिसांनी मध्यस्थामार्फत त्यांना घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. नातेवाईकांनी इब्राहिमपर्यंत हा निरोप पोहचवला. इब्राहिमने या मध्यस्थाला दिवसभर बोलणी करण्यासाठी येतो असे सांगत झुलवले. शेवटी मध्यरात्री त्याने पडेगाव येथील घराजवळ आपण येत असून घर खरेदीसाठी रक्कम तयार ठेवा, असा निरोप मध्यस्थाला दिला. पहाटे अडीच वाजता इब्राहिम कासबंरी दर्गा परिसरात आला असता सापळा रचलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले. यापूर्वी त्याच्यावर आठ वर्षांपूर्वी एक खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय अफरोज शेख, जमादार सुभाष शेवाळे, राठोड, गजेंद्र शिंगाणे, सिद्धार्थ थोरात, सय्यद अशरफ, नितीन धुळे आदींनी केली.

\Bपिराजीवरही गुन्हा दाखल

\Bदानपेटी चोरणारा दुसरा आरोपी पिराजी संजय सोनवणे याला रविवारी सायंकाळीच वसंत भवन भागातून अटक करण्यात आली आहे. पिराजी हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुन्हा केल्यानंतर रविवारी सायंकाळी तो वसंत भवन भागातील देशी दारुच्या गुत्त्यावर दारू पिण्यासाठी आला होता. या ठिकाणी त्याचे अनिल कौतिकराव मानकर (वय २५ रा. टाऊन हॉल) याच्यासोबत भांडण झाले. यावेळी पिराजीने अनिलच्या डोक्यात बाटली मारून त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी पिराजीवर अनिलच्या तक्रारीवरून दुसरा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bआरोपीस कोठडी

\Bश्री संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणातील आरोपी इब्राहिम खान आलम खान याला अटक करून सोमवारी कोर्टात हजर केले असता, त्याला बुधवारपर्यंत (२६ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यु. पी. देवर्षी यांनी दिले. आरोपी इब्राहिमला सोमवारी कोर्टात हजर केले असता, आरोपींकडून दानपेटीतील उर्वरित रक्कम जप्त करणे बाकी असून, आरोपींनी दानपेटी कुठे विकली किंवा टाकली, याचा शोध घ्यावयाचा आहे. तसेच आरोपीने यापूर्वी काही गुन्हे केले आहेत का, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचाही तपास करावयाचा आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमाडचे डाळिंब युरोपात

$
0
0

रवींद्र टाकसाळ, औरंगाबाद

दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदवार्ता. चक्क करमाड येथील शेतकऱ्यांची डाळिंब आता सातासमुद्रापार युरोपात पोहचली असून, त्यांना स्थानिक बाजारापेक्षा तिप्पट भाव मिळाला आहे. फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ही हनुमान उडी घेतली आहे.

गेल्या काही वर्षांत मराठवाड्यात मोसंबी, सीताफळ, डाळिंब लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यातील करमाड परिसरात ही डाळिंब लागवड वाढली आहे. मात्र, त्यांना अपेक्षित किंमत मिळत नव्हती. ही बाब पदवीधर शेतकरी भारत सपकाळ यांच्या लक्षात आली. त्यांनी स्थानिक बाजारभाव आणि निर्यात केलेल्या शेतीमालाला मिळणारी किंमत याची तुलना केली. शेतकऱ्यांच्या हाती चांगला पैसा यावा यासाठी पुढाकार घेत ९० शेतकऱ्यांनी सोबत घेत चार जुलै २०१७ रोजी करमाड फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. त्यासाठी पणन मंडळाचे कोल्ड स्टोरेज किरायाने घेतले. निर्यातक्षम डाळिंब निर्मितीवर शेतकऱ्यांनी भर द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी शेतकरी मेळावा घेतला. वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर डाळिंब निर्मितीसाठी सुमारे १०० शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. गुणवत्ता, किडनाशक, उर्वरित अंश याबाबत युरोपियन देशांचे निकष कडक आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व पाळण्यात आले. मुंबई येथील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत २७ शेतकऱ्यांचे डाळिंब चाचणीत उत्तीर्ण झाले. एक डिसेंबरपासून फळ काढणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत सुमारे शंभर टन डाळिंब युरोपला रवाना झाले आहेत.

\B'अनार नेट'वर नोंदणी

\Bकरमाड फार्मरचे संचालक भारत सपकाळ म्हणाले, 'स्थानिक ठोक बाजारात डाळिंबाला ३० ते ४० रुपये प्रतिकिलो भाव आहे. युरोपात गेलेल्या डाळिंबासाठी प्रतिकिलो ११३ ते ११७ रुपये दर मिळाला. करमाड फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या मध्यस्थीने नाशिक येथील सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी आणि मुंबई येथील के. बी. एक्स्पोर्ट कंपनी यांच्यामार्फत या शेतकऱ्यांना जागेवरच तीनपट भाव दिला. आतापर्यंत ८० टनहून अधिक डाळिंब निर्यातसाठी पाठविले आहेत. यासाठी करमाड, वाकुळणी, चिकणगाव, चारठा, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांनी 'अनार नेट'वर नोंदणी केली आहे.'

शेतकऱ्यांना फायदा करून देण्यासाठी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. डाळिंब बेल्टमधील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना ४० रुपयांऐवजी ११७ रुपये प्रतिकिलो असा उच्चांकी दर मिळाल्याचे समाधान आहे.

- भारत सपकाळ, संचालक, करमाड फार्मर प्रोड्यूसर कंपनी

स्थानिक बाजारात अपेक्षित भाव मिळत नव्हता. खर्च निघणेही अवघड जात होते. निर्यातीचा मार्ग सापडल्याने मोठा फायदा झाला. तीन पट भाव डाळिंबाला मिळाला आहे. हे पाहून बरे वाटले. पहिल्या टप्प्यात चार टन डाळिंब युरोपला गेले. आगामी काळात निर्यात वाढेल.

- श्रीकांत पाटील, डाळिंब उत्पादक शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफोडीत दीड लाख लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घर आणि दुकानफोडीच्या दोन घटनांत चोरट्यांनी अंदाजे एक लाखाचा ऐवज लंपास केला. नवजीवन कॉलनी आणि समर्थनगरमध्ये या घटना घडल्या. या प्रकरणी सिडको आणि क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडको एन अकरा, एन ९ येथील नवजीवन कॉलनीत सचिन कुलकर्णी (वय ४२) यांचे घर आहे. कुलकर्णी एका खासगी बँकेत अधिकारी आहेत. रविवारी दुपारी कुलकर्णी कुटुंब चिंचोली गावी नातेवाईकाकडे गेले होते. सोमवारी सकाळी ते घरी परतले. कुलकर्णी यांनी जाताना आपल्या घराच्या चॅनलगेटसह दोन्ही दरवाज्यांना कुलूप लावले होते. चोरट्यांनी ही तिन्ही कुलूप तोडून घरातील दोन्ही कपाटातील सामान बाहेर फेकले. कपाटातील रोख रक्कम आणि दागिने असा एकूण ४३ हजारांचा ऐवज लंपास केला. कुलकर्णी घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी सिडको पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र, श्वान एका हॉटेलपर्यंत माग काढून घुटमळले.

\Bदुकान फोडले

\Bचोरीची दुसरी घटना शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान समर्थनगर भागातील भावना सुपारीचे दुकान या ठिकाणी घडली. चोरट्यांनी दुकानाच्या लाकडी दाराचा कडीकोयंडा आणि दुकानातील ड्रॉवरचे कुलूप तोडून ४६ हजार लंपास केले. दुकानातील होम थिएटर, पॅराशूट तेलाच्या बाटल्या, सोपच्या पुड्या, शोभेच्या वस्तू असा एकूण ५८ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरला. रविवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दुकानमालक गणेश सुभाष ढोले-पाटील (वय २३, रा. रांजणगाव) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेने कलाकारालाही फसविले

$
0
0

Unmesh.deshpande@timesgroup.com

Tweet - @UnmeshdMT

औरंगाबाद : महापालिकेच्या कारभारावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. नुकत्याच एका ताज्या घटनेमुळे हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे. पुरेशा सिटी बस आलेल्या नसताना सिटी बस सेवेचे लोकार्पण वाजतगाजत करण्यात आले, परंतु सिटी बसचे डिझाईन तयार करणाऱ्या कलाकाराला महापालिकेचे प्रशासन व स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीचे अधिकारी सोईस्करपणे विसरले. या कलाकाराला बक्षीस म्हणून २५ हजार रुपये दिले जाणार होते, पण अद्याप ही रक्कम त्याला देण्यात आली नाही. शाल-श्रीफळ देऊन या कलाकाराची बोळवण करण्यात आली आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या एसपीव्हीच्या माध्यमातून सिटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी महापालिकेचे आयुक्त आहेत, शिवाय महापालिकेतील पदाधिकारी संचालक आहेत. त्यामुळे नाव वेगळे असले तरी ही संस्था महापालिकेचाच एक भाग म्हणून काम करीत आहे. सिटी बस सुरू करण्याचा निर्णय जेव्हा झाला तेव्हा सिटी बसचे डिझाईन कसे असावे या बद्दल स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले. ज्या स्पर्धकाचे डिझाईन सिटी बससाठी निवडले जाईल त्याला २५ हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. तशा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

सुमारे तिनशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला, त्यापैकी श्रीकांत मोरे यांनी तयार केलेले डिझाईन सिटी बससाठी निवडण्यात आले. मोरे यांचे शिक्षण औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयातून झाले. सध्या ते पुणे येथे व्यवसाय करतात. आपण तयार केलेले डिझाईन सिटी बससाठी निवडण्यात आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला, आपल्या शहरासाठी काही तरी करता आले अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे १७ नोव्हेंबररोजी 'मंथन' कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत श्रीकांत मोरे यांचा आयुक्त तथा मुख्याधिकारी डॉ. निपुण विनायक व महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या दिवशी मोरे यांना बक्षिसाची रोख रक्कम देण्यात आली नाही. सिटी बससेवेच्या शुभारंभाच्या दिवशी पाहुण्यांच्या हस्ते त्यांना बक्षिसाची रोख रक्कम दिली जाईल, असे मानले जात होते. रविवारी झालेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमात रोख रक्कमेचा विषय बाजूलाच राहिला, पण कुणी मोरे यांची साधी आठवण देखील काढली नाही.

बक्षिसाची रोख रक्कम अद्याप मला मिळाली नाही. जाहीर केलेले बक्षीस मिळावे यासाठी मी एकदा संबंधितांकडे चौकशी केली होती, त्यानंतर मीच पाठपुरावा केला नाही. बक्षिसाची रक्कम कधीतरी मिळेल, असा मला विश्वास आहे.

श्रीकांत मोरे

कलाकाराची किंमत शून्य

पालिका प्रशासनाला कोणत्याच गोष्टीची संवेदनशीलता राहिलेली नाही. कचऱ्याच्या प्रश्नावरून औरंगाबादची बदनामी झालीच आहे. आता कलाकाराला त्याच्या पारितोषिकाची रक्कम मिळू नये, हे धक्कादायकच. पालिकेच्या भोंगळ कारभाराचे हे उत्तम उदाहरण आहे. पालिकेच्या लेखी कला, क्रीडा, संस्कृती, पर्यटन या क्षेत्राला फारसे महत्त्वच नाही, नव्हे या क्षेत्राचा विकास करण्याची तसदी प्रशासनही घेत नाही आणि पदाधिकाऱ्यांचे तर बोलायलाच नको! या क्षेत्रातील लोकांना मान देण्याऐवजी त्यांचा अपमानच अनेकवेळा केला जातो. केवळ याच क्षेत्राकडे नव्हे तर पाणी, आरोग्य, कचरा याकडेही प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्षच आहे. हे कधी सुधारणार?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राफेल खरेदी प्रकरणाची चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राफेल विमान खरेदीत इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाला असून त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. या निदर्शनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केले.

केंद्रात युपीए सरकार असताना एका राफेल विमानाची किंमत ५२६ कोटी १० लाख रुपये निश्चित केली होती. या विमानाच्या बांधणीसाठी 'एचएएल' या शासकीय कंपनीस भागीदारी देण्याचे निश्चत झाले होते. पण सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारने व जुना व्यवहार रद्द करून तसेच कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता प्रति राफेल विमान १६७० कोटी ७० लाख रुपये किंमत ठरवून खरेदी करार केला. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या 'एचएएल'ला डावलून रिलायन्स डिफेन्स या १० ते १२ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीला कोट्यवधी रुपयाचे ऑफसेट कंत्राट दिले, असा आरोप काँग्रेसने केला. हा देशातील आतापर्यतचा सर्वात मोठा घोटाळा आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

या आंदोलनात केशवराव तायडे, सुरेखा पानकडे, रवींद्र काळे, डॉ. पवन डोंगरे, भाऊसाहेब जगताप, रवींद्र बनसोड, बाबा तायडे, अतिष पितळे, रावसाहेब नाडे, हरिभाऊ राठोड, इब्राहिम पठाण, जितेंद्र देहाडे, रामुकाका शेळके, देविदास लोखंडे, संदीप बोरसे, बाबासाहेब मोहिते, विनोद तांबे, मुजफ्फर खान, अथर शेख, कैसर आजाद, राहुल सावंत, शेख सोहेल, नाविद शेख, अश्फाक कुरेशी, मिलिंद पाटील, पंकज ठोंबरे, दामुअण्णा गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bमोदी सरकारविरोधात कार्यकर्त्यांच्या घोषणा \B

चौकशी झाली पाहिजे यासह मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई येथील धरणे आंदोलनासंदर्भात सकल ब्राह्मण समाजाची बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या २२ जानेवारी रोजी मुंबई, आझाद मैदान येथे सकल ब्राह्मण समाज विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन देणार आहे. या धरणे आंदोलनासंदर्भात शहरातील विविध ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक रविवारी बाळकृष्ण महाराज मंदिरात घेण्यात आली. यामध्ये धरणे आंदोलनासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यात आली.

जिल्हा स्तरावरील प्रत्येक संघटनेचे दोन पदाधिकारी घेऊन एक समन्वयक समिती तयार करण्यात आली आहे. यामध्ये सकल ब्राह्मण समाज या बॅनरखाली सर्व महाराष्ट्रातील ब्राह्मण संघटना एकत्र आल्या आहेत. मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रत्येक वॉर्डनिहाय बैठकांचे आयोजन समन्वयक समितीद्वारे करण्यात येत आहे. यामध्ये बॅनर, पॉम्पलेट, सोशल मीडिया आदींचा वापर करण्यात येत आहे. या धरणे आंदोलनात पुढील मागण्या करण्यात येणार आहेत. ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या महामंडळासाठी ५०० रुपये कोटींची तरतूद करावी, ब्राह्मण समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, ब्राह्मण समाजावर व महापुरुषांवर होणारी जातीय चिखलफेक रोखण्यासाठी महापुरुष बदनामी विरोधी कायदा करावा, ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करावे. यासोबतच इतर अनेक मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीला संतोष पटवर्धन, आदित्य पिलदे, युवराज दिवेकर, प्रथमेश कुलकर्णी, भीमराव कुलकर्णी, सचिन वाडे पाटील, लक्ष्मीकांत जयपुरकर, सचिन पांडव, अतुल कुलकर्णी, अजिंक्य कुलकर्णी, केदार पाटील, अनिल मुळे, सुहास जातेगावकर, कृष्णा निंभोरकर, वनिता पत्की, संध्या कापसे, सुनिल जोशी, यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एलएलबी’ परीक्षेसाठी पालिका आयुक्त रजेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एलएलबी'ची परीक्षा देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक दहा दिवसांची रजा घेतली आहे. त्यामुळे शासनाने महापालिका आयुक्तपदाची सूत्रे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे दिली आहेत. नांदेड येथे महापालिका आयुक्त असताना डॉ. विनायक यांनी तेथे विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. विधी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा देण्यासाठी ते नांदेडला रवाना झाले. डॉ. निपुण विनायक रजेवर गेल्यामुळे महापालिकेत नगरसेवक, कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक कंत्राटदारांची देयके थकल्याचा परिणाम विकास कामांवर होत आहेत. डॉ. विनायक रजेहून परतेपर्यंत देयके निघणार नाहीत, असे मानले जात आहे. नगरसेवकांच्या वॉर्डातील विकास कामांच्या संचिकादेखील प्रलंबित आहेत. प्रभारी आयुक्त या संचिका निकाली काढण्याची शक्यता नसल्याने नगरसेवक चिंतेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुल्या जागांसाठी पालिकेचा तिसरा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेखांकनातील मोकळ्या व आरक्षित जागा महापालिकेच्या नावे करून घेण्यासाठी निवृत्त तहसीलदारांची मदत घेतली जाणार आहे. महापालिका आयुक्त रजेहून परत आल्यानंतर याचा निर्णय घेतला जाणार आहे. पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या पण पालिकेच्या नावे नसलेल्या जागा पालिकेच्या नावावर निवृत्त तहसीलदारांच्या मदतीने करून घेण्याचा हा तिसरा प्रयत्न असेल. यावेळी तरी खुला व आरक्षित जागा पालिकेच्या नावे होतील का, याबद्दल चर्चा आहे.

औरंगाबाद शहराचा सुधारित विकास आराखडा २००२ मध्ये तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार विविध रेखांकनातील मोकळ्या जागा पालिकेला हस्तांतरित करण्यात आल्या, तर काही जागा आरक्षित करण्यात आल्या. या जागांची संख्या सुमारे १४७० आहे. या जागा महापालिकेच्या नावावर करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे काही जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. पालिकेला हस्तांतरित झालेल्या पण पालिकेच्या नावावर न झालेल्या जागा नावावर करून घेण्यासाठी यापूर्वी दोन वेळा प्रयत्न करण्यात आले. दोन्ही वेळेस या कामासाठी मानधनतत्वावर निवृत्त तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली. या कामासाठी त्यांना विशिष्ट कालावधी देण्यात आला. मात्र, ठरवलेले मानधन महापालिके न दिल्याने दोन-तीन महिने काम करून निवृत्त तहसीलदारांनी पालिकेचे काम सोडून दिले. आता पुन्हा तसाच प्रयत्न करण्याच्या विचारात महापालिका प्रशासन आहे.

सेवानिवृत्त तहसीलदारांच्या मदतीने खुल्या जागा, आरक्षित भूखंड महापालिकेच्या नावे करून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मानधनतत्वावर त्यांची नियुक्ती केली जाईल. याबद्दल आयुक्तांच्या मान्यतेनंतर कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली. आयुक्त रजेवर गेले आहेत, ते परतल्यानंतरच यावर निर्णय होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

\Bपालिकेच्या नावे न झालेल्या जागा

जुने औरंगाबाद ५८३

सिडको ४०७

सातारा, देवळाई ४८०

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ता याद्यांवरून धुसफूस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संशोधन मार्गदर्शकाकडील एकत्रित रिक्त जागांची खात्री न करता पीएच. डी. गुणवत्ता यादी जाहीर केल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. मार्गदर्शकाचे संमती पत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांची 'प्रोव्हीजनल लेटर' घेण्यासाठी संशोधन विभागात झुंबड उडाली. तर अर्धवट यादीमुळे गैरसोय झालेल्या विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरुंकडे तक्रार केली. अखेर रिक्त जागांचा आणि संशोधन मार्गदर्शकांच्या संख्येचा आढावा घेऊन नव्याने यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच. डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) अडीच वर्षांपूर्वी झाली. मात्र, अजूनही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. 'आरआरसी'नंतर गेल्या चार महिन्यांपासून विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादीच्या प्रतिक्षेत आहेत. विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विषयांची यादी जाहीर झाली आहे. सामाजिकशास्त्रे विषयांच्या गुणवत्ता यादीत प्रचंड गोंधळ आहे. पीएच. डी. प्रवेशासाठी संशोधन विभागाने २० डिसेंबरला भूगोल विषयाची गुणवत्ता यादी जाहीर केली. ही यादी फक्त १२ जागांची आहे. भूगोलाच्या संशोधन मार्गदर्शकाकडे (गाइड) असलेल्या एकत्रित रिक्त जागांचा आढावा घेण्यात आला नाही. अर्धवट यादीमुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली. इतिहास विषयाची यादी फक्त सात जागांची आहे. जवळपास २०० विद्यार्थ्यांची 'आरआरसी' झाली आहे. उपलब्ध गाइड आणि त्यांच्याकडील रिक्त जागांचा आढावा न घेता यादी जाहीर केल्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत. तसेच नवीन संशोधन मार्गदर्शकांच्या जागांचाही यादीत विचार करण्यात आला नाही. यातून संशोधक विद्यार्थ्यांच्या जागात कमालीची घट होऊन गोंधळ उडाला.

विद्यापीठाच्या वेळखाऊ धोरणामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. पदाधिकारी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षाला विश्वासात न घेता मनमानी काम करीत आहेत. अध्यक्षाबरोबर चर्चा केली असती तर विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला नसता असे पत्र भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. गजहंस यांनी कुलगुरुंना दिले. तसेच प्रसिद्ध केलेली यादी रद्द करुन सुधारीत गुणवत्ता यादी लावण्याची मागणी केली. भूगोलाच्या एकूण १० संशोधकांकडे ४० रिक्त जागा असताना फक्त १२ जागांची यादी लावून प्रशासनाने गोंधळ केला. इतिहासाच्या यादीबाबत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश लांब यांनी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांना निवेदन दिले. बहुतेक विषयांची अशीच स्थिती असल्यामुळे विद्यार्थी भांबावले आहेत. सर्व शाखांच्या जवळपास ५०० जागा असून नवीन गाइडच्या जागा आणि रिक्त जागांचा विचार केल्यास ३०० जागा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर आढावा घेण्यात येत आहे.

लेटरसाठी उडाली झुंबड

राष्ट्रीय फेलोशिपसाठी पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्यांना 'प्रोव्हीजनल लेटर'ची आवश्यकता आहे. फेलोशिपसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. गेल्या आठवड्यात 'एसएफआय'ने संशोधन विभागासमोर ठिय्या आंदोलन केले होते. 'प्रोव्हीजनल लेटर' देण्यास सोमवारी सुरुवात झाल्यानंतर झुंबड उडाली. संशोधन विभागात आणि बाहेर गर्दी झाल्यामुळे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला. शेवटच्या विद्यार्थ्याला पत्र देईपर्यंत कामकाज सुरू ठेवा अशी सूचना तेजनकर यांनी दिली.

संशोधन विभागाचा वेळकाढूपणा

प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर नेपाळ दौऱ्यावर असल्यामुळे 'प्रोव्हीजनल लेटर' देण्यास विलंब झाला. दौऱ्यावर जाण्यापूर्वी तेजनकर यांनी संबंधित विभागाला पत्र देऊन कार्यवाही करण्यास सांगितले होते. पण, विभागाने काम केले नसल्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी झाली. दोन दिवसात सर्वांना पत्र देण्यात येईल. कर्मचाऱ्यांनीही पूर्णवेळ काम करुन विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्यात असे तेजनकर यांनी बजावले.

विषय व प्राध्यापकनिहाय रिक्त जागांची माहिती घेण्याची सूचना केली आहे. यातून किमान ३०० रिक्त जागा वाढू शकतील. प्रत्येक विषयाची परिपूर्ण यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.

डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगला माजी विद्यार्थी मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यापीठातील पदव्युत्तर वर्गाचे जुने दिवस आठवत माजी विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. रसायनशास्त्र विभागातील १९९४ मधील तुकडीच्या विद्यार्थ्यांनी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले. तत्कालीन विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव इंगळे यांनी ३५ विद्यार्थ्यांचा सोमवारी तास घेताच आठवणी दाटून आल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. विभागाच्या सभागृहात आणि वर्गात सोमवारी मेळावा पार पडला. यावेळी तत्कालीन प्राध्यापक डॉ. राम माने, प्रा. डॉ. सुदाम राजभोज, प्रा. डॉ. ज्ञानदेव इंगळे, डॉ. नंदकिशोर पळसकर, प्रा. त्र्यंबक चोंढेकर, डॉ. बाळासाहेब आरबाड, डॉ. मुरलीधर शिनगारे उपस्थित होते. १९९४ मधील विद्यार्थ्यांच्या तुकडीतील ३५ विद्यार्थी मेळाव्याला आवर्जून हजर होती. विशेष म्हणजे प्रा. इंगळे यांनी रसायनशास्त्राचा तास घेतला. तास घेताना अनेक जुन्या आठवणी जागवण्यात आल्या. माजी विद्यार्थ्यांनी धमाल किस्से आणि शैक्षणिक कामगिरी सांगून मेळाव्यात रंग भरले. सध्याचे विभागप्रमुख डॉ. सुरेश गायकवाड यांनी विभागाची वाटचाल सांगितली. यावेळी डॉ. भास्कर साठे, डॉ. बापू शिंगटे उपस्थित होते. माजी विद्यार्थी भरत सूर्यवंशी यांच्या कल्पकतेतून हा मेळावा घेण्यात आला. रसायनशास्त्र विभागाचा सुवर्ण महोत्सव आणि आमच्या तुकडीचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे माजी विद्यार्थी एकत्र आले असे शशिकांत टाकळकर यांनी सांगितले. यावेळी नवनीत काला, देवराज किन्नर, नीलेश विश्वनाथन, सुनील जाधव, सुनील शक्करवार, अनिल शक्करवार, सुषमा पिंपळगावकर, मैत्रीयी चितळे, सुषमा वैराळकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३२ लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळ जाहीर करून दोन महिने तर केंद्राच्या दुष्काळी पाहणी पथकाने पाहणी करून २० दिवस झाल्यानंतरही अद्याप शासनाकडून दुष्काळी मदतीसंदर्भात कोणतीही हालाचल दिसत नाही. वर्षभरानंतरही अनेक शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित असून आता किमान दुष्काळी मदत तरी वेळेवर मिळण्याची प्रतीक्षा बळीराजा करत आहे. मराठवाड्यातील ४८ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांची दुष्काळामुळे धूळधाण झाली असून, एकूण ३६ लाख २७ हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे.

गेल्यावर्षी बोंडअळीमुळे कापसाला फटका बसला होता, तर यंदा पावसाअभावी खरीप पिके करपून गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. गेल्यावर्षी बोंडअळी बाधित शेतकऱ्यांमधील अनेकांना अद्यापही मदत मिळालेली नाही. यंदा दुष्काळ जाहीर होऊन दोन महिने झाले, नियमाप्रमाणे केंद्रीय पथकाची पाहणी होऊनही तीन आठवडे झाले. मात्र, अद्यापही निधीबाबत कोणतीही हालचाल शासनस्तरावर झालेली नाही. विभागातील ९० टक्के शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने केंद्रीय पथकासमोर सादर केला. औरंगाबाद, बीड, लातूर, जालना या जिल्ह्यामध्ये डिसेंबरमध्येच चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळाचे आव्हान पेलताना मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दुष्काळी मदत मिळाली तर काही प्रमाणात त्यावर फुंकर मारता येणार आहे. मराठवाड्यात खरिपाचे ५० लाख चार हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी हंगामात ४८ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली. १९ लाख ३३ हजार हेक्टरवर सोयाबीन तर १५.८१ लाख हेक्टरवर क्षेत्रावर कापसाची पेरणी करण्यात आली, तर ८९ लाख हेक्टरवर ज्वारी, १.०३ लाख हेक्टरवर बाजरी आणि २.५८ लाख हेक्टरवर मका हे पीक घेण्यात आले होते. मात्र, पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिके वाळून गेली.

दुष्काळामध्ये २९ लाख ६५ हजार हेक्टरवर कोरडवाहू पिके, २ लाख ८० हजार हेक्टवरील बागायती पिके तर १ लाख २६ हजार हेक्टरवरील फळबागांना मोठा फटका बसला. आता शासन निर्णयानुसार कोरडवाहू पिकांसाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८००, बागायती पिकांसाठी १३ हजार ५०० तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपयांनुसार अनुदान द्यावे लागणार आहे. राज्यामधील दुष्काळी परिस्थितीमुळे ७ हजार ९०० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी औरंगाबाद येथे सांगितले होते. यातील ७ हजार कोटी केवळ शेतकऱ्यांच्या सहाय्याकरीता आवश्यक आहेत. त्यामधील सुमारे तीन हजार कोटी रुपये मराठवाड्यातील ३२ लाख शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लागणार आहेत.

जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा..............बाधित क्षेत्र ................शेतकऱ्याची संख्या

औरंगाबाद..........७ लाख......................६ लाख ६२ हजार

जालना..............६ लाख १ हजार .........६ लाख ५२ हजार

बीड..................८ लाख ४६ हजार........८ लाख ५६ हजार

लातूर................२४ हजार...................२५ हजार

उस्मानाबाद.........४ लाख ४१ हजार.......४ लाख ७३ हजार

नांदेड................१ लाख ७१ हजार.......१ लाख ५९ हजार

परभणी..............३ लाख ४४ हजार .......२ लाख ६४ हजार

हिंगोली..............२ लाख ४५ हजार........१ लाख ६५ हजार

एकूण...............३३ लाख ७१ हजार.......३२ लाख ५५ हजार

क्षेत्रानुसार जिल्हा (लाख हेक्टरमध्ये)

जिल्हा................. कोरडवाहू.............. बागायती............. फळबागा (बारमाही पिके)

औरंगाबाद...............६.२९ ...................०.१६.......................०.५५

जालना...................५.२९.....................०.४६......................०.३३

बीड......................७.४२......................०.८२.....................०.२२

लातूर.....................०.२४......................००..........................००

उस्मानाबाद.............३.८१.....................०.५१........................०.०९

नांदेड.....................१.५४.....................०.१६......................०.०१

परभणी....................२.८५.....................०.५५.......................०.०३

हिंगोली...................२.३१........................०.१४....................२.४५

एकूण..................२८.०६......................२.९२.......................१.२६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सायबर सर्व्हायलन्स’ कर्णबधिरांसाठी उत्तम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्णबधीर मुलांना आवाजाचा त्रास होत नाही. म्हणूनच त्यांची एकाग्रता उत्तम असते. त्यांची ही गुणग्राहकता हेरून मेक्सिकोमध्ये कर्णबधीर तरुणांना कंट्रोल रूममध्ये संधी देण्यात आली. त्यामुळे तिथल्या गुन्हेगारीचा दर कमी होत असल्याचा अनुभव आला आहे. भारतातही या मुलांना गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या कामात सामावून घेतले, तर ही उत्तम संधी ठरेल, असा विश्वास राघव खडगकर (पुणे) यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट आणि रोटरी क्लब पुणे विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित 'रोटरी युथ लिडरशीप पुरस्कार', 'रायला' कार्यक्रमानिमित्त ते नुकतेच शहरात आले होते. खडगकर हे सामाजिक जबाबदारी म्हणून तरुणांना मार्गदर्शन करतात. रोटरीचा कार्यक्रम कर्णबधीर मुलांसाठी असल्याने खडगकर यांनी सायबर सर्व्हायलन्स (देखरेख) या नव्या क्षेत्राकडे कर्णबधीर तरुणांचे लक्ष वेधले. याविषयी 'महाराष्ट्र टाइम्स'शी त्यांनी बातचीत केली. ते म्हणाले, २०१०-११ मध्ये कर्णबधीर मुलांवर स्वतंत्र अभ्यास करण्यात आला. २०१३ मध्ये कर्णबधीर तरुणांना कंट्रोल रूममध्ये संधी देण्यात आली. या मुलांच्या क्षमता हेरून अमेरिका, इंग्लंडमध्ये असे प्रयोग सुरू आहेत. 'एन्जल ऑफ सायलेन्स' या कीवर्डने ही स्टोरी प्रसिद्ध आहे. रोटरीचे सदस्य दीपक कदम हे दक्षिण अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. त्यांनीही हा अभ्यास जवळून पाहला. त्यानंतर रोटरीने या विषयावर काम करण्याचे ठरवले.

बडोद्याच्या तत्कालीन आयुक्तांनीही या मुलांना अशी संधी दिली आणि आता तिथेही शासकीय यंत्रणा आणि खासगी तपास संस्थात अशी संधी देण्यात येणार आहे. हाच प्रयोग अहनदनगर जिल्ह्यातही यशस्वी झाला असून शहरात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेवर निगराणीसाठी कर्णबधीर तरुणांना संधी देण्यात येईल, असे खडगकर यांनी सांगितले.

\Bएकाग्रता ही कर्णबधिरांची शक्ती \B

ही मुले कोणत्याच प्रकारच्या आवाजाने गोंधळून जात नाहीत. परिणामी यांची एकाग्रता उत्तम असते. ही मुल उत्तम 'लीप रिडिंग' करू शकतात. सीसीटीव्हीच्या निगराणीदरम्यान 'लीप रिडिंग' अतिशय महत्त्वाची सिद्ध होतात. अशावेळी सायबर गुन्हेगारीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात कर्णबधीर मुल महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. केवळ शासकीय यंत्रणाच नव्हे, तर मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मल्टीप्लेक्स इथेही या मुलांना संधी मिळू शकते. टेक्नॉलॉजी हाताळण्यातही ही मुले अतिशय हुशार असतात. त्यांच्या या विशेष गुणाकडे लक्ष दिले, तर कर्णबधिरांसाठी अतिशय उत्तम करिअरचे क्षेत्र खुले होईल, असा विश्वास राघव खडगकर यांनी बोलून दाखवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसायात संबंध जोपासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'व्यवसाय करताना संबंध जोपासा. मन लावून काम करा, अशा छोट्या छोट्या पण, मोलाच्या सूचना मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी दिल्या. अन्नामृत फाउंडेशन आणि वर्धमान सांस्कृतिक मंचतर्फे 'हर घर की अपनी खिचडी' स्पर्धेनिमित्त मुख्य परीक्षक म्हणून ते बोलत होते.

या स्पर्धेचे आयोजन 'आनंद यात्रा २०१८' अंतर्गत करण्यात आले. याच कार्यक्रमात विष्णू मनोहर यांची प्रकट मुलाखत इस्कॉन अन्नामृतचे सुदर्शन पोटभरे यांनी घेतली. त्यांनी यावेळी स्वत:चा अनुभव सांगितला. ते म्हणाले, सातवीमध्ये शिकताना आवळा सुपारी विकण्याचा व्यवसाय केला. त्यानंतर हळू हळू नवनवीन शिखरे गाठत गेलो. कोणताही व्यवसाय करताना मन लावून काम केले पाहिजे, संबंध जोपासले पाहिजेत. व्यवसायाबद्दलची सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी केल्या. मोठा पराठा ते जळगावात केलेले वांग्याचे भरीत अशा पाच विश्वविक्रमांची माहिती त्यांनी दिली. विश्वविक्रमासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांना रेसिपी विषयी त्यांनी विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिली. यावेळी वर्धमान सांस्कृतिक मंचचे डॉ. शांतीलाल सिंगी, संभाजी राचुरे उपस्थित होते. अन्नामृत फाउंडेशनचे राजन नाडकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.

\Bस्पर्धेतील विजेत्या \B

कलाग्राममध्ये झालेल्या स्पर्धेत शंभरहून अधिक जणांनी सहभाग घेतला. मुख्य परीक्षक म्हणून मनोहर यांनी काम पाहिले, तर त्यांना डॉ. जयश्री गोडसे, नंदिनी चपळगावकर, डॉ. हर्षा पोलकंम यांनी सहाय्य केले. खिचडी स्पर्धेत प्रथम क्रमांक सविता केवट, व्दितीय सुधा उपाध्याय, तर तृतीय क्रमांक वनिता आंबेकर यांनी पटकावला. या तिन्ही विजेत्यांना पैठणी बक्षीस देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नहर’ वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्ता रुंदीकरणामुळे हर्सूल परिसरातून जाणारी ऐतिहासिक नहर उद्धवस्त होण्याची शक्यता इको नीडस् फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनजागृती करत सर्व संबंधित विभागाना नहर वाचविण्यासाठी साकडे घातले आहे.

पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये मलिक अंबर यांच्या कार्यकाळात जमिनीमधून कालवे खोदून पाणी पुरवठा करण्यात येत होता. याला नहर असे म्हणतात. पाणचक्की या ऐतिहासिक पर्यटन स्थळाला हर्सूल परिसरातून जाणाऱ्या नगर ए अंबरीतून पाणी पुरवठा होतो. औरंगाबाद सिल्लोड, जळगाव रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे ही नहर बाधित होत असल्याचे प्रा. आगळे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

हर्सूल परिसरातील जळगाव रस्त्यालगत पश्चिम बाजूने नगर प्रणालीचे चार बंब (चौकोनी बांधकाम रचना) उभे आहेत आणि त्याला लागूनच ऐतिहासिक छपील भिंत आहे. रस्त्याच्या पूर्व बाजूने नहर प्रणालीचा एक बंब उभा आहे. तसेच या भागात रस्त्याखालून पूर्व पश्चिम दिशेने नगर प्रणालीमधील पाण्याची नलिका गेलेली आहे. रस्त्या रुंदीकरणामुळे हे बंब, छपील भिंत बाधित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

\Bपोस्टरद्वारे जनजागृती\B

नहर जतन करून रस्ता रुंदीकरण शक्य आहे. दुसऱ्या बाजुने मोकळी जागा असून त्याचा वापर करावा, अशी मागणी फाउंडेशने जिल्हा प्रशासन, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी हर्सूल परिसरात ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. या उपक्रमात अॅड. अत्तदीप आगळे, प्रा. प्रियानंद आगळे, गौतम राजभोज, गणेश खरात, अनिल सोनवणे, डॉ. संजय राजभोज, उमर पटेल, देविदास साठे, हेमंत हडपकर आदींनी सहभाग घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images