Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पुढील ७५ दिवस मराठवाडा पिंजून काढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'चलो पंचायत अभियान' प्रत्येक गावात जाऊन यशस्वी करण्याची जबाबदारी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. तुम्ही करत असलेल्या कामाच्या प्रमाणपत्राची तुम्हाला गरज नाही. गावातील एका व्यक्तीने जरी सांगितले की, हा आमच्यासाठी धावून येतो तीच तुमच्या कामाची पावती असेल. राहुल गांधी यांचे हात अधिक मजबूत करायचे असतील, तर पुढील ७५ दिवस आपल्याला जोमाने काम करावे लागेल. त्यासाठी मराठवाडा पिंजून काढा' असे आवाहन युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मराठवाडा विभागाची बैठक बुधवारी (२६ डिसेंबर) मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा रघुवंशी, सहप्रभारी मनीष चौधरी यांसह प्रदेश पदाधिकारी, मराठवाड्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हापदाधिकारी व विधानसभा विभाग अध्यक्षांची उपस्थिती होती.

युवक काँग्रेसतर्फे आयोजित 'चलो पंचायत अभियान' व राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या युवा क्रांती यात्रेच्या पूर्वतयारीसाठी तांबे यांनी ही बैठक आयोजित केली होती. 'मराठवाडा दुष्काळाने होरपळत असून शासनाने फक्त घोषणांचा पाऊस पाडलेला आहे. यावेळी युवक कॉंग्रेसने तालुकास्तरावर आंदोलने करण्याची गरज आहे,' असे मत जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले. युवकांना रोजगाराची गरज असतांना 'सीएम चषक' ऐवजी 'रोजगार चषक' आयोजित केला असता, तर युवकांना फायदा झाला असता, अशी टीका त्यांनी केली.

या वेळी मंचावर औरंगाबाद जिल्हा प्रभारी मुक्तदीर देशमुख, आमेर अब्दुल सलीम, ब्रिज दत्त, करण ससाणे, आनंद दुबे, आदित्य पाटील, अकील पटेल, रुपेश जैस्वाल, प्रभाकर मुट्ठे, मोईन इनामदार, अथर शेख, मुजाहेद पटेल, धैर्यशील तायडे, मोसीन खान, विठ्ठल कोरडे, शेख नईम, सत्यजीत सोमवंशी, इद्रीस नवाब खान, गौरव जैस्वाल, अझहर शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष नागसेन बेरजे यांनी केले, तर शहराध्यक्ष मुजफ्फर खान यांनी आभार मानले.

\Bपाच कोटी लोकांपर्यंत पोचण्याचा संकल्प

\B

'चलो पंचायत अभियान' हे जनसंपर्क एक जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाद्वारे २५ हजार गावे, ५०० लहान व २० मोठ्या शहरांमधील पाच कोटी जनतेपर्यंत पोहचण्याचा संकल्प करण्यात आला आहे. बेरोजगार युवक आणि शेतकरी हा मुख्य मुद्दा असून त्यांच्याकडे जाऊन त्यांचे कार्ड तयार करून घेणे, त्यांना काँग्रेस सरकार आल्यानंतर पुढे कशी मदत करता येईल, या दृष्टीने माहिती जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असे सत्यजित तांबे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आकांक्षा देशमुख खूनप्रकरण; आरोपीची रवानगी कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. आकांक्षा अनिल देशमुख हिच्या खून प्रकरणातील आरोपी राहुल सुरेंद्र शर्मा याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी बुधवारी (२६ डिसेंबर) दिले.

एमजीएमच्या महाविद्यालयाच्या गंगा वसतिगृहात खोली क्रमांक ३३४ मध्ये राहणारी आकांक्षा देशमुख हिचा दहा डिसेंबर रोजी खून करून तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी राहुल सुरेंद्र शर्मा (२६, रा. दुधी, पोस्ट डुमरडोहा, जि. सोनभद्र, उत्तरप्रदेश) याला वारणसी ते मुंबई महानगर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून ताब्यात घेण्यात आले होते. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला १८ डिसेंबर रोजी रात्री अटक करून १९ डिसेंबरला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला बुधवारपर्यंत (२६ डिसेंबर) पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला बुधवारी कोर्टात हजर केले असता, गुन्ह्यातील सोनसाखळी जप्त केल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंबित कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (घाटी) निलंबित चतुर्थ श्रेणी कर्मचारी राजेंद्र पोहाल याने बुधवारी (२६ डिसेंबर) दुपारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला घाटीतील औषधवैद्यकशास्त्र विभागात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास दाखल करण्यात आले आले. सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असल्याचे घाटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थेतील अधिकाऱ्यांना सहआरोपी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आकांक्षा देशमुख खून प्रकरण हॉस्टेलच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे घडले. त्यामुळे संस्थेतील इतर अधिकाऱ्यांना सहआरोपी करा, अशी मागणी जय शिवराय जय भीमराय फाऊंडेशनच्या वतीने पोलिस आयुक्तांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

पोलिस आयुक्तालयात एसीपी डॉ. अनिता जमादार यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदनामध्ये म्हटले आहे की, आकांक्षा देशमुख खून प्रकरणात मुख्य आरोपी राहुल शर्मासोबत एमजीएम संस्थेचे सचिव तसेच वसतिगृह अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहआरोपी करावे. एमजीएम कँपसमधील मोबाइल जॅमर तात्काळ काढावेत, वसतिगृहाच्या प्रत्येक रूममध्ये एक सिक्युरिटी अर्लाम बटन लावावे, शहरातील सर्व वसतिगृहाच्या सुरक्षेसंदर्भात वेळोवेळी आढावा घ्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर फाऊंडेशनचे धनंजय देशमुख, सुजीत आस्वार, अमित मोरे, आकाश नरवडे, संदेश पवार, विकास खरात, अन्नू शिंदे, संदीप साळवे, राहुल देशमुख आणि प्रमोद भालेराव आदींच्या सह्या आहेत.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहावा पक्षी महोत्सव ४ जानेवारीपासून

$
0
0

पक्षी जीवनावरील चित्रपट, पक्षी निरीक्षण, व्याख्याने आणि छायाचित्र स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अॅण्ड एज्युकेशनल अकॅडेमी, औरंगाबाद यांच्या वतीने आणि वनविभाग, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, औरंगाबाद यांच्या सहकार्याने ४ ते ६ जानेवारी दरम्यान सहाव्या पक्षी महोत्सवाचे (बर्ड फेस्टिवल) आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवात आयोजित सर्व कार्यक्रम पक्षीप्रेमी रसिकांसाठी निःशुल्क असून, पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

यंदा या महोत्सवामध्ये ४ जानेवारीला सकाळी दहा वाजता एमआयटी महाविद्यालयातील सभागृहात पक्षी महोत्सवाचे उदघाटन होईल. या प्रसंगी जिल्हाधिकारी उदय चौधरी, एमआयटी महाविद्यालयाचे संचालक मुनीष शर्मा, वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, विभागीय वन अधिकारी (वन्य जीव) आर. आर. काळे उपस्थित असतील.

शनिवार दुपारी ३ वाजता सरस्वती भुवन महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. रविवार सकाळी सहा वाजता जायकवाडी पक्षी अभयारण्य येथे पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जायकवाडीला जाण्याकरिता पूर्वनोंदणी आवश्यक आहे. महोत्सव यशस्वीतेकरिता सर्वानीच जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. दिलीप यार्दी, डॉ. उत्तम काळवणे, किरण परदेशी, प्रसाद कोकीळ, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी आर. आर. काळे यांनी केले आहे.

३० डिसेंबरला छायाचित्र स्पर्धा

महोत्सवानिमित्त ३० डिसेंबर २०१८ रोजी जायकवाडी पक्षी अभयारण्य येथे छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या प्रसंगी जगप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील मार्गदर्शन करणार आहेत. या स्पर्धेचे बक्षीस वितरण ४ जानेवारी रोजी केले जाईल. महोत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांना पक्षीप्रेमी नागरिक, विद्यार्थी यांना उपस्थितीचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागाकरिता ७२७६८९५९१९ किंवा ९४२२७०४२५१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारसांना पाच लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

मृत विष्णू खाडेकर यांच्या वारसांना गाडी मालक व चालक यांनी मिळून पाच लाख १३ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायाधीकरणाचे सदस्य तथा जिल्हा न्यायाधीश श्रीपाद दिग्रसकर यांनी दिले आहेत.

विष्णू यांची पत्नी सुनीता खाडेकर हिने दावा दाखल केला होता. विमा कंपनीस यातून वगळण्यात आले असून, चौकशी अधिकाऱ्याने दावेकऱ्यासमवेत संगनमत केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चौकशी अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मोटार अपघात प्रकरणी चौकशी अधिकारी दावेकऱ्याशी हातमिळणवणी करून खोटे बयान देत असल्याचे विमा कंपनीच्या वकिलांच्या वतीने सांगण्यात आले. दावेकऱ्याच्या फायद्यासाठी विष्णू यास क्लिनर म्हणून दाखविण्याचा प्रयत्न केला. तोंडी पुर‌ा‌व्यात विष्णू खाडेकर हा क्लिनर म्हणून काम करीत होता. वाहनात सोळा प्रवाशी होते. वाहन चालकाकडे प्रवासी वाहतूक करण्याचा पुरावा होता. माल वाहतूक करणाऱ्या वाहनात प्रवाशांची वाहतुक करणे हा गुन्हा असल्याचे आपणास माहिती नसल्याचे सांगण्यात आले. असा प्रकारचे गमतीशीर व विक्षिप्त विधाने केल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे. तपास अधिकारी नामदेव कातडे यांच्या विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याची मुभा देण्यात आली. चालक व मालकाकडून संबंधित रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. विमा कंपनीतर्फे केदारनाथ लोया यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तम मराठीसाठी शाळांमधून शून्य प्रयत्न; सुधीर रसाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तंत्रज्ञानापासून संशोधनापर्यंत जगात पुढे असणाऱ्या चीनमध्ये पाच टक्के लोकांनाही इंग्रजी येत नाही आणि त्यांचे संशोधन-तंत्रज्ञान हे सगळे चिनी भाषेत आहे आणि त्यांना इंग्रजीची अजिबात गरज वाटत नाही. जर्मन लोकांचे शिक्षण-प्रशिक्षण-संशोधनदेखील जर्मन भाषेत आहे. मुळात मराठी बोलल्यामुळे इंग्रजी येत नाही असा गैरसमज आहे आणि त्या भीतीतून आपण बाहेरच येण्याचा प्रयत्नच करीत नाही. मातृभाषा चांगली असणाऱ्यांची परकीय भाषाही चांगलीच असते, असे भाषातज्ज्ञांनीही सिद्ध केले आहे. तरीही मराठीची घसरण सुरुच आहे. उत्तम मराठीसाठी शाळांमधूनही शून्य प्रयत्न होतात. शिक्षकांनाच मराठी येत नाही, यापेक्षा आणखी काय दुर्दैव असू शकते, असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी नोंदविले.

श्री स. भु. शिक्षण संस्था व राजहंस प्रकाशनचा संयुक्त उपक्रम असलेल्या 'अक्षरमात्र तितुकें नीट' या प्रमाणभाषेवरील मार्गदर्शिकेचे प्रकाशन बुधवारी (२६ डिसेंबर) स. भु.च्या मध्यवर्ती कार्यालय सभागृहात झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे, राजहंस प्रकाशनचे श्याम देशपांडे, मार्गदर्शिकेचे संपादक डॉ. नागेश अंकुश यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. रसाळ म्हणाले, प्रमाणभाषेबाबत मार्गदर्शन करणाऱ्या या मार्गदर्शिकेप्रमाणेच अशा अनेक पुस्तकांची आज खरी गरज आहे. स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचा खऱ्याअर्थाने विकास होईल, मराठी भाषा ही व्यवसायाची भाषा होईल, कार्यालयीन भाषा होईल, ज्ञानभाषा होईल, असे वाटत असताना असे काहीही झालेले नाही. आता तर मुले इंग्रजी शाळेत शिकतात. मराठी कोणी वाचतच नाही. मराठी पुस्तकांचा खप वाढला असे म्हटले जात असले तरी ज्या प्रमाणात सुशिक्षित लोकांची संख्या वाढली आहे, त्या प्रमाणात पुस्तकांचा खप वाढला नाही. मराठीतील वैचारिक वाङ्मयाची परंपरा कन्नडमध्ये नाही, याची मला लाज वाटते असे गिरीश कर्नाड म्हणाले होते. मात्र आज ना दर्जेदार वाङ्मयाची निर्मिती होत आहे, ना वाचक आहेत. गाजलेली मासिके-पाक्षिके बंद पडत आहे. समीक्षा लिहावी तर कुठे छापावी, असा प्रश्न माझ्याहीपुढे आहे. अमर्त्यसेन यांचे आयुष्य विदेशात गेले असले तरी ते बंगालमध्ये आल्यानंतर बंगालीतच बोलतात, पण अमेरिकेत स्थायिक झालेला मराठी माणूस मराठी बोलतो का, हा प्रश्न आहे. त्यामुळेच प्रादेशिक भाषांमध्ये आजही केवळ बंगाली समृद्ध आहे, असेही निरीक्षण त्यांनी नोंदविले. डॉ. देशपांडे यांनीही, शिक्षकांनाच मराठी येत नसल्याचे मत नोंदवले आणि अशा पुस्तकांची गरज व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी निवासस्थानात घाण पाण्याची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांमधील नळाला घाण पाणी येत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी घाटी प्रशासनाकडे केली असून, याबाबत तात्काळ कार्यवाहीचे आदेश प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या गटाने डॉ. सुक्रे यांची भेट घेऊन घाणी पाण्याची तक्रार केली. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत डॉ. सुक्रे यांनी बांधकाम विभागाला विविध सूचना केल्या. या विषयी त्यांना छेडले असता, येत्या २४ तासांत घाण पाण्याचा प्रश्न मिटेल, असे डॉ. सुक्रे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबदल्यासाठी कचरा वेचकांचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात निर्माण झालेली कचराकोंडी फोडणाऱ्या कामगारांना केलेल्या कामाच्या मोबदल्यासाठी महापालिकेच्या समोर बेमुदत उपोषण सुरू करावे लागले आहे. थकीत मोबदल्यासह इतर प्रश्न प्रशासनाने सोडवले नाहीत, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

कागद, काच, पत्रा कामगार संघटनेचे सचिव सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली कचरा वेचक कामगारांनी बुधवारपासून पालिकेच्या समोर उपोषण सुरू केले आहे. शहरात कचरा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सर्वप्रथम कचरा कामगार महापालिकेच्या मदतीला धावून आले, मात्र त्यांना केलेल्या कामाचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. या कामगारांना त्वरित मोबदला दिला जाईल, असे आश्वासन महापौर व आयुक्तांनी दिले होते. पण या आश्वासनाची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही, असे लोमटे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने घनकचरा नियोजनाबद्दल २०१६मध्ये नियम तयार केले आहेत. त्यानुसार कचरा कामगारांना नियोजनात समावून घेणे, प्रत्येकाला ओळखपत्र देणे आवश्यक आहे. परंतु, या नियमांकडे देखील महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कचरा कामगार महापालिकेसमोर उपोषण करत आहेत. असे लोमटे व देविदास किर्तीशाही यांनी निवेदनात म्हटले आहे.

या उपोषणात आशाबाई डोके, चंद्रकला साठे, निर्मला साबळे, संगीता साळवे, ठकुबाई तिवरे, मालनबाई साळवे, मंदाबाई नरवडे, नंदाबाई पाईकराव, अलका पगारे, लंका बनकर, सुरेखा भालेराव, नंदाबाई पवार, आशाबाई शिराळे, सुनीता झिने, दत्ता डोके, नीलेश झिने, चंद्रकांत साठे, रामेश्वर कनघरे हे सामील झाले आहेत.

\Bतर, असंघटित कामगारही रस्यावर \B

महापालिकेने या कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर हमाल कष्टकरी व अन्य असंघटित कामगार उपोषण करणाऱ्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरतील व आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिलिंद थत्ते, निकम यांना पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळातर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रथमच दोन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार वयम् संस्थेचे संस्थापक मिलिंद थत्ते (पालघर) यांना आणि डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार 'स्वयंदीप'च्या मीनाक्षी निकम (चाळीसगाव) यांच्या घोषित करण्यात आला आहे.

या पुस्काराचे वितरण पाच जानेवारी रोजी तापडिया नाट्य मंदिरात सायंकाळी सात वाजता होणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे हे प्रमुख वक्ते, 'टीयुव्ही इंडिया'चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. डॉ. भीमराव गस्ती यांचे चिरंजीव सुरेश गस्ती हे बेरड रामोशी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळास 'आयएसओ' प्रमाणपत्र प्रदान व डॉ. गस्ती व डॉ. राऊत यांच्या कार्यावरील पुस्तिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि सावित्रीबाई फुले यांच्या १८८व्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षीपासून सेवा व प्रबोधन पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी मंडळाचे सचिव सुहास आजगांवकर, डॉ. प्रसन्ना पाटील, सविता कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर, संगीता धारूरकर, वर्षा पाटील, डॉ. योगिता तौर, प्रकाश सोनवणे, डॉ. प्रतिभा फाटक, डॉ. रमेश पांडव, प्रकाश सोनवणे, आदिती शार्दुल आदी उपस्थित होते.

\Bमानकऱ्यांचा परिचय \B

\Bमिलिंद थत्ते \B

बेरड-रामोशी, देवदासींच्या उत्थानासाठी आपले जीवन समर्पित करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक डॉ. भीमराव गस्ती यांच्या स्मरणार्थ मिलिंद थत्ते यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. वन हक्क व अन्य कायद्यांनी दिलेले संवैधानिक अधिकार, अनुसूचित जाती-जमाती व वननिवासी नागरिकांना मिळावे यासाठी उभ्या केलेल्या लोकचळवळीचे प्रणेते म्हणून थत्ते परिचित आहेत.

\Bमीनाक्षी निकम \B

अपंगत्वावर मात करून इतर अपंग महिलांना स्वावलंबी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी निकम यांची डॉ. रखमाबाई राऊत पुरस्कारासाठी निवड झाली. डॉ. रखमाबाई या बालविवाह प्रथेविरोधात पहिल्यांदा आवाज उठवणाऱ्या हिंदू महिला तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या देशातील पहिल्या महिला फिजिशियन होत्या.

या पुस्काराचे स्वरूप पुरस्कार २१ हजार रुपये रोख आणि मानपत्र, असे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत तुकाराम नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको भागातील जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. नाट्यगृहाचे खासगीकरण करून तीन वर्षांसाठी ते भाडे करारावर द्यावे, अशी शिफारस प्रशासनाने केली आहे.

महापालिकेच्या मालमत्तांबद्दल धोरण ठरविण्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी चार अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे असून उपायुक्त मंजुषा मुथा, दक्षता कक्षाचे प्रमुख एम. बी. काझी, नगररचना विभागाचे उपअभियंता ए. बी. देशमुख यांचा समितीमध्ये समावेश आहे. या समितीने महापालिकेच्या मालकीच्या दोन्ही नाट्यगृहांबद्दल निरीक्षण नोंदवले आहे.

महापालिकेचे उस्मानपुऱ्यात संत एकनाथ रंगमंदिर हे एकमेव नाट्यगृह होते. सिडकोच्या हस्तांतरानंतर जगदगुरू संत तुकाराम नाट्यगृह देखील महापालिकेच्या ताब्यात आले आहे. या दोन्ही नाट्यगृहांची अवस्था फारच बिकट झाली आहे. संत एकनाथ रंगमंदिर नूतनीकरणाच्या कामासाठी सहा महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. वातानुकूलित यंत्रणेसह अद्ययावत यंत्रणा या रंगमंदिरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. नूतनीकरणाचे काम झाल्यानंतर ते भाडेतत्वावर चालविण्यासाठी द्यावे, अशी चर्चा यापूर्वी झाली आहे. परंतु, हे नाट्यगृह महापालिकेच्या अधिपत्याखालीच ठेवावे, असे मत समितीने नोंदवले आहे.

जगदगुरू संत तुकाराम नाट्यगृहाची देखील येत्या काळात दुरुस्ती करावी लागणार आहे. या नाट्यगृहाचे सिलिंग ठिकठिकाणी तुटले आहे. शंभरावर खुर्च्या देखील तुटलेल्या आहेत. नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणा नाही, पंखे लावलेले नाहीत. ग्रीन रुम्स आणि व्हीआयपी रुम्सची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे संत तुकाराम नाट्यगृहाचे खासगीकरण करून हे नाट्यगृह तीन वर्षांच्या कालावधीसाठी भाडे करार करून चालविण्यास द्यावे, असे समितीने म्हटले आहे.

\Bकाही दिवसांत प्रक्रिया \B

जगदगुरू संत तुकाराम नाट्यगृह भाडेकरारावर चालवण्यासाठी देण्याच्या उद्देशाने एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवण्याची शिफारस अधिकाऱ्यांच्या समितीने केली आहे. येत्या काही दिवसात ही प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. संत एकनाथ नाट्यगृह महापालिकेच्याच अधिपत्याखाली ठेवावे, असे मत समितीने नोंदवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांढरा वाघ ‘सचिन’ची प्रकृती नाजूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील सचिन या पांढऱ्या वाघाचा आहार कमालीचा कमी झाला आहे. त्यामुळे त्याची प्रकृती नाजूक झाली असून त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

प्राणिसंग्रहालयातील सचिन हा पांढरा वाघ ऑगस्टपासून आजारी असून त्याच्यावर प्राणिसंग्रहालयाच्या आवारातील दवाखान्यात उपचार केले जात आहेत. तो ऑगस्टपासून एका पिंजऱ्यात बंदिस्त आहे. ऑगस्टमध्ये सचिनची प्रकृती फारच नाजूक झाली होती. प्राणिसंग्रहालयाचे संचालक आणि स्थानिक डॉक्टरांकडून होत असलेल्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या सूचनेनुसार पुणे येथील प्राणिसंग्रहालयातील डॉक्टरांना उपचारासाठी बोलावले होते. त्यांनी सचिनची तपासणी करून सचिनचा मागचा पाय व कंबरेला अर्धांगवायू झाल्याचे स्पष्ट करून उपचाराची पद्धत ठरवून दिली. त्यानुसार डॉ. निती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिनवर उपचार केले जात आहेत. मात्र, दोन दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली आहे.

\Bदोन दिवसांपासून आहार झाला कमी \B

बदलेल्या उपचाराला प्रतिसाद मिळून काहीच न खाणारा सचिन दोन ते अडीच महिन्यापासून एका दिवसात चार ते पाच किलो खाद्य खात होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून त्याचा आहार एकदम कमी असून तो एक ते दोन किलो खाद्य घेत आहे, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे कार्यालयीन अधीक्षक संजय नंदन यांनी दिली. आहार कमी झाल्यामुळे त्याची प्रकृती नाजूक झाली आहे. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर आणि अन्य कर्मचारी सचिनवर लक्ष ठेवून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑनलाइन काम जमेना, पदावनत करा’

$
0
0

औरंगाबाद: ऑनलाइन काम जमत नसल्यामुळे पदावनत होण्याची संधी द्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाने केली आहे. अनेक प्राथमिक शिक्षकांनी मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकाची पदोन्नती स्वीकारली. परंतु, त्यांना ऑनलाइन काम करणे जमत नाही. काम करताना सहकारी शिक्षक व गावकऱ्यांशी सतत वाद होतो, दैनंदिन पत्रव्यवहारासाठी प्रवास करणे व शालेय पोषण आहार योजना राबवताना अडचणी येतात. काही अपंग महिला मुख्याध्यापकांची आर्थिक पिळवणूक होते. सेमी इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ वाढत असताना नवीन तंत्राशी जुळवून घेण्यात शिक्षकांची दमछाक होत आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे पदावनत करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पत्रव्यवहार केलेल्या शिक्षकांना पदावनत करा, अशी मागणी राज्य संपर्कप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे, राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, जे. के. चव्हाण, बळीराम भुमरे, संजय भुमे, हारुण शेख, प्रशांत हिवर्डे, प्रवीण पांडे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानपेटी चोरी; दोघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्री संस्थान गणपती मंदिरातील दानपेटीच्या चोरी प्रकरणातील आरोपी इब्राहिम खान आलम खान याच्या पोलिस कोठडीमध्ये शुक्रवारपर्यंत (२८ डिसेंबर) वाढ करण्याचे, तर याच प्रकरणात मंगळवारी (२५ डिसेंबर) अटक करण्यात आलेला आरोपी पीराजी संजय सोनवणे यालाही शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला अल अमुदी यांनी बुधवारी दिले.

या प्रकरणी रमेश राधाकिसन घोडेले (७२, रा. राजाबाजार) यांनी फिर्याद दिली होती. मंदिरातील दानपेटीची चोरी झाल्याचे रविवारी (२३ डिसेंबर) स्पष्ट झाले, तर चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. दरम्यान, चोरी प्रकरणातील आरोपी रिक्षाचालक इब्राहिम खान आलम खान (३२, रा. कासंबरी दर्गा) हा दारू पिऊन वसंत भवन परिसरात पडल्याची माहिती मिळाल्यानंतर सिटीचौक पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडून दानपेटीतील २२९० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. तसेच आरोपी इब्राहिम याने पिराजी संजय सोनवणे याच्या मदतीने दानपेटी चोरल्याची कबुलीही दिली होती. प्रकरणात आरोपी इब्रहिम याला सोमवारी (२४) कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला बुधवारपर्यंत (२६ डिसेंबर) पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आरोपी पीराजी सोनवणे (३२, रा. कासंबरी दर्गा) याला मंगळवारी (२५ डिसेंबर) रात्री अटक करून दोन्ही आरोपींना बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपींकडून दानपेटीतील चोरलेली उर्वरित रक्कम जप्त करणे तसेच आरोपींनी दानपेटी कुठे टाकली, याचा शोध घेणे बाकी असल्याने दोघांना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोन्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी विविध सोहळ्यात धुमाकूळ घातला असून, बीड बायपास येथील रिगल लॉन्स येथील लग्न सोहळ्यातून पावणेदोन लाखाचा ऐवज असलेली वधू मातेची पर्स चोरट्यांनी लांबवली.दुसऱ्या घटनेत पैठणगेट येथील लॉजमधून प्रवाशाची दोन लाखांची रोकड सहप्रवाशाने लॉकरमधून लांबवली.

बीड बायपासवरील लग्न सोहळ्यातील चोरीप्रकरणी कैलास गंगाराम चाटसे (वय ५०, रा. द्वारकापुरी, उस्मानपुरा) यांनी तक्रार दाखल केली. चाटसे यांच्या मुलीचा रविवारी रिगल लॉन्स येथे विवाह सोहळा होता. त्यांच्या पत्नीजवळ असलेल्या पर्समध्ये रोख पन्नास हजार, आहेराच्या पाकिटातील आलेली रोख ८४ हजार ७०० रुपये आणि तीस हजारांची सोन्याची चैन असा एक लाख ६७ हजारांचा ऐवज होता. रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास चाटसे यांची पत्नी फोटो काढण्यासाठी गेली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील पर्स बाजूला ठेवली होती. फोटो काढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांचे लक्ष नसल्याचे पाहून पर्स लंपास केली. काही वेळाने हा प्रकार चाटसे कुटुंबीयाच्या निदर्शनास आला. याप्रकरणी त्यांनी सातारा पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एपीआय बहुरे तपास करीत आहेत.

…दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी शहरात आलेल्या ठाण्याच्या प्रवाशाला दोन लाख दहा हजारांचा झटका दिला. अजय धोंडू खळे (वय ३६, रा. आनंदनगर आदर्शचाळ, कळवा, ठाणे) हे प्रवासी मार्केटिंग क्षेत्रात असून कामानिमित्त शहरात आले होते. रविवारी सकाळी ते पैठणगेट येथील डिलक्स लॉजमध्ये मुक्कामाला थांबले होते. खळे यांनी त्यांच्याजवळ असलेली रोख दोन लाखांची रक्कम, मोबाइल, एटीएम कार्ड, कपडे आदी ऐवज लॉजच्या लॉकरमध्ये ठेवला होता. लॉकरची चावी त्यांनी पँटच्या खिशात ठेवली होती. आंघोळीला जाताना त्यांनी पँट काढून बेडवर ठेवली होती. आंघोळ करून आल्यानंतर त्यांनी चावी काढून लॉकरची तपासणी केली. यावेळी त्यांना लॉकरमध्ये ठेवलेला ऐवज आढळून आला नाही. चोरट्याने त्यांची बॅग घेऊन पलायन केले होते. दरम्यान त्यांनी पाहणी केली असता त्यांच्या बेडसमोरील बेड क्रमांक दोन वरील संतोष सदरे नावाचा प्रवासी बेपत्ता असल्याचे आढळून आले. या प्रकरणी खळे यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात संशयित आरोपी संतोष सदरे याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय ताहेर पटेल तपास करीत आहेत.

\Bलग्नातून ऐवज पळवण्याची पाचवी घटना

\Bचोरट्यांनी सध्या लग्न सोहळ्यातील पाहुण्यांना लक्ष्य केले आहे. गेल्या काही दिवसातील ही पाचवी घटना आहे. तीन डिसेंबर रोजी जबिंदा लॉन्स येथून बांधकाम व्यवसायिकाच्या लग्नातून २९ तोळ्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. त्यानंतर पाटीदार भवन येथून लग्नातून वरमातेची सव्वा लाखाची पर्स लांबवण्यात आली. मुकुंदवाडी भागातील इडन गार्डन लॉन्स येथून दोन घटनांत ८५ हजाराच्या मोबाइलसह महिलेची साडेसोळा हजाराची पर्स लांबवण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’कडे थकबाकी; फटका नागरिकांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीने जलसंपदा विभागाची थकबाकी भरली नाही. त्यामुळे आता महापालिका व पर्यायाने शहरातील नागरिक संकटात सापडले आहेत. पाणी शुल्काचे दहा कोटी रुपये थकल्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणी पुरवठ्यात कपात करण्याची नोटीस बजावली आहे. थकबाकी भरण्याची कार्यवाही केली जात असून पाणीपुरवठ्यात कपात करू नका, अशी विनंती करणारे पत्र महापालिकेने जलसंपदा विभागाला पाठवले आहे.

औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जायकवाडी येथील नाथ सागरातून महापालिकेला पाणी आणावे लागते. नाथ सागर जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहे. नाथ सागरातून पाणी देण्यासाठी जलसंपदा विभाग महापालिकेला शुल्क आकारते. शुल्क न भरल्यामुळे महापालिकेकडे दहा कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीची रक्कम न भरल्यास २७ डिसेंबरपासून टप्प्या टप्प्याने महापालिकेचा पाणी पुरवठा बंद केला जाईल, अशी नोटीस जलसंपदा विभागाने महापालिकेला बजावली आहे. या नोटीसनुसार थकबाकी भरण्यासाठी महापालिकेकडे एकाच दिवसाचा अवधी शिल्लक राहील्यामुळे महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग याबद्दल नेमके काय करीत आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दहा कोटींच्या थकबाकीपैकी सहा कोटींची थकबाकी समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीच्या काळातील आहे. महापालिकेने १ सप्टेंबर २०१४ पासून शहराची पाणी पुरवठा योजना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे दिली होती. १ ऑक्टोबर २०१६ पर्यंत हे काम कंपनीकडे होते. या काळात कंपनीने जलसंपदा विभागाकडे पाण्याचे शुल्क भरलेच नाही. त्यामुळे थकबाकीची रक्कम जास्त दिसत आहे.

... तर आजपासून पाणी कपात

थकबाकी न भरल्यास २७ डिसेंबरपासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली जाईल व ३१ डिसेंबर रोजी जायकवाडीतून केला जाणारा पाण्याचा उपसा पूर्णपणे बंद केला जाईल, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला कळविले आहे. या संदर्भात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलसंपदा विभागाला पत्र देऊन पाणी कपात न करण्याची विनंती केली आहे. थकबाकी भरण्याबद्दल कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे पाणी कपातीसारखी कोणतीही कारवाई करू नका, अशी विनंती जलसंपदा विभागाला करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान प्रक्रिया, मतमोजणी साहित्याचे वाटप

$
0
0

औरंगाबाद: शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या निवडणुकीसाठी २५ डिसेंबर रोजी श्री गुरु ग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी ७१ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप व मतमोजणी प्रक्रियेचे साहित्य वाटप करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीसह दीड लाखाची लूट; जामीन अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तलवार, चाकू व लाकडी दांड्यासह हॉटेलमध्ये शिरून हॉटेल मालकासह कामगारांना मारहाण करत हॉटेल खरेदीच्या कागदपत्रांसह एक लाख ६१ हजारांचा ऐवज हिसकावून नेल्याप्रकरणातील आरोपी शाहबाजखान मोहम्मद जफरखान याने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी फेटाळला.

या प्रकरणी शालिमार हॉटेलचे मुन्वर अली अन्सारी शहादात अली अन्सारी (वय ३८) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, पाच मे २०१८ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जफर खान युनूस खान, त्याचा मुलगा शहाबाज खान शाहबाजखान मोहम्मद जफरखान (२१, रा. कैसर कॉलनी), जवाई सय्यद इम्रान, रिझवान, एजाज उर्फ बाली व त्यांच्यासोबत तलवार, चाकू व लाकडी दांडे घेऊन १० ते १२ व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून हॉटेलमध्ये आले. जफर व त्याचा मुलगा शहाबाज यांनी फिर्यादीला हॉटेलची रजिस्ट्री केलेली कागदपत्रे व पैशाची मागणी करत मारहाण केली, तर इतरांनी हॉटेलमधील कामगारांना लाकडी दांडे, चाकू व तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर हॉटेलची कागदपत्रे आणि एक लाख २० हजारांची रोख, चार मोबाइल व फिर्यादीचे मनगटी घड्याळ असा सुमारे एक लाख ६१ हजारांचा ऐवज हिसकावून नेला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी शाहबाज खान याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची कोर्टाने आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

\Bआरोपी दबाव आणू शकतो

\Bआरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता सुनावणीवेळी, आरोपीच्या साथीदारांना अटक करणे असून, जामीन मंजूर केल्यास आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. तसेच गुन्ह्यातील ऐवज हस्तगत करावयाचा असल्याने आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूतस्करांच्या मुसक्या आवळल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या आठवड्यात वैजापूर तालुक्यात वाळू तस्करांनी महसूल पथकावर केलेल्या हल्ल्यानंतर तस्करांभोवती फास आवळणे सुरू करण्यात आले आहे. बुधवारी (२६ डिसेंबर) शहरात तीन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये नऊ ट्रकच्या माध्यमातून ३० ब्रास वाळू जप्त करण्यात आली.

शहरातील आझाद चौकात सहा, राष्ट्रवादी भवन जवळ दोन आणि हर्सूलजवळ एक अशी एकूण नऊ ट्रक वाळु जप्त करण्यात आली. मौलाना आझाद चौक परिसरात पथकासमोर काही लोकांनी या कारवाईला लोकांनी विरोध केला. मात्र, पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. आझाद चौक परिसरामध्ये वाळूसाठ्याबाबत अनेक तक्रारी आल्या असल्यामुळे प्रशासनाच्या वतिनी ही कारवाई करण्यात आली. पथकासोबत जवळपास २० पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. जवळपास दोन तास ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी अनेक छोटे वाळू विक्रेते असून त्यांच्याकडे असलेली वाळू प्रशासनाने जप्त केली. या कारवाईत महसूलच्या पथकात मंडळ अधिकारी जी. व्ही. देवकाते, के. ए. डकले, एल. के. गाडेकर, तलाठी योगेश पंडित, ज्ञानेश्वर सोनवणे, अनिल कुलकर्णी, उदय कुलकर्णी, डी. जे. साळवे, आर. एस. शेळके, पी. बी. डोंगरजाळ यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित आघाडीने वंचितच ठेवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. या आघाडीमध्ये त्यांना डावे, नक्षलवादी, माओवादी तसेच 'एमआयएम'ही चालते; मात्र रिपब्लिकन चळवळ चालत नाही. याच कारणामुळे वंचित बहुजन आघाडीने आम्हाला वंचितच ठेवले,' अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बुधवारी (२६ डिसेंबर) पत्रकार परिषदेत केली. लोकसभेच्या सहा जागांसाठी काँग्रेसकडे प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार महामेळावा, रमाई घरकुल साहित्य विरतण व कार्यकर्ता प्रवेश सोहळ्यानिमित्त कार्यक्रमासाठी प्रा. कवाडे हे शहरात आले होते. यावेळी त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. आगामी निवडणुकीबाबत ते म्हणाले की, आम्हाला वंचित बहुजन आघाडीने सोबत घेतले नाही. त्यांना आम्ही चालत नाही. आगामी निवडणुकीमध्ये आमची काँग्रेस आघाडीसोबत बोलणी सुरू असून काही बैठकाही झाल्या आहेत. आगामी निवडणुकांमध्ये आम्ही सहा जागा लढवण्यासाठी आग्रही आहोत. त्यापैकी चार विदर्भातील व मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली. भारतीय राज्यघटनेविरोधात काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे हेच आमचे प्रमुख धोरण आहे. नुकत्याच काही राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण बदलले आहे. या निकालामुळे देशात आणि इतर राज्यातही सत्ता बदला होण्याची भीती भाजपला वाटत आहे. भाजप हे लोकशाहीला लागलेले ग्रहण आहे त्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत सत्तेतून पायउतार करण्याच्या दृष्टीने काम करण्यात येणार असल्याचे कवाडे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेसाठी गोपाळराव आठवले, गणेश पडघन, जे. के. नारायण, अनिल तुरुकमाने, अशोक जाधव, सागर कुळकर्णी, मिलिंद मोकळे, शेषराव सातपुते, विजया दाभाडे आदींची उपस्थिती होती.

\Bकोरेगाव भीमाला जाणार \B

कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी शौर्यदिनानिमित्त शहीद व विजयस्तंभाला अभिवादनाचा कार्यक्रम पक्षातर्फे घेतला जातो. अभिवादनाची ही परंपरा आम्हीच सुरू केली आहे. आम्ही येथे सभाही घेतल्या आहेत. मात्र आता प्रशासन येथे सभा घेण्याची परवानगी नाकारत आहे. सभेला परवागनी मिळाली नाही, तरी शौर्यदिन अभिवादनास जाणार आहे, असे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images