Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तरुणींना निनावी कॉल करून त्रास देणारा गजाआड

0
0
सिडको भागातील एका महाविद्यालयाच्या आठ ते दहा तरुणींना निनावी कॉल करून मैत्रीची मागणी करणाऱ्या आरोपीला सायबरसेलने शुक्रवारी अटक केली.

गणेश दुधगावकरांना शिवसेना डच्चू देणार

0
0
परभणीचे खासदार अॅड. गणेश दुधगावकर यांना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय शिवसेनेने जवळपास पक्का केला आहे. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते सुभाष देसाई यांना पत्रकारांनी त्याबद्दल विचारणा केली असता ‘परभणीमध्ये उमेदवार रिपीट होत नाही, असा इतिहास आहे,’ असे सांगितले.

चौथ्या मजल्यावरून पडल्याने नागरिकाचा मृत्यू

0
0
चौथ्या मजल्यावरील गॅलरीत उभे असताना चक्कर आल्याने पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी औरंगपुरा भागात घडली. औरंगपुरा भागातील पोलिस चौकीसमोर मिठ्ठे निवास ही पाच मजली इमारत आहे.

विजेच्या खांबावर चिकटून कामगाराचा जागीच मृत्यू

0
0
साइटवर उपस्थित असलेल्या ‘जीटीएल’चे कोणी पाटील नावाच्या इंजिनीअरने ‘हो’ असे सांगितल्यावर तो पोलवर चढला व कामसाठी हात लावताच इलेक्ट्रिक वायरला चिकटून मरण पावला.

मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू

0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पूर्वतयारी शिक्षणक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विलंब शुल्कविना ही प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

संवेदनशील मतदान केंद्रांवर नजर

0
0
नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून बंदोबस्तासाठी पोलिस दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी विक्रम कुमार व जिल्हा पोलिस अधीक्षक इशू सिंधू हे निवडणूक कामांवर लक्ष ठेवून आहेत.

सहकारचा नाका बंद पाडला

0
0
पालिकेशी केलेल्या कराराच्या व्यतिरिक्त सुरू केलेला सहकार एजन्सीचा ट्रांझिट शुल्क वसुलीचा अनधिकृत नाका पालिकेने गुरुवारी बंद पाडला. त्यानंतर पालिका प्रशासनाने ‘सहकार एजन्सी’ला नोटीसही बजावली.

सव्वादोन लाखांचा ऐवज हस्तगत

0
0
मुकुंदवाडी पोलिसांनी सिडको भागात घरफोड्या करणाऱ्या आरोपीला गजाआड केले आहे.

शेतातील पाण्याच्या वादातून खून

0
0
शेतातील सामूहिक विहिरीच्या पाण्यावरून मनोहर जमादार यांने मुलाच्या मदतीने भावाचा खून केला. ही घटना उमरगा तालुक्यातील दाबका येथे बुधवारी रात्री घडली.

आज कैलाश खेरची मैफल

0
0
प्रसिद्ध पॉप, रॉक गायक कैलाश खेरच्या गीतांची मैफल आज महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने औरंगाबादकरांसाठी एक सुरमधूर नजराणा ठरणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून औरंगाबादच्या संगीत प्रेमींची उत्कंठाही आता शिगेला पोचली आहे. या कार्यक्रमाच्या मोफत पासचे वाटप झाले असून, कार्यक्रम केवळ पासधारकांसाठीच आहे.

उद्योगांसाठी ७२ एलएलडी पाणी

0
0
शेंद्रा-बिडकीन परिसरात उभारण्यात येत असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आणखी एक पाऊल टाकले आहे.

तुळजाभवानी मंदिरातील फलकाची मोडतोड

0
0
देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात देवस्थानच्यावतीने जनहितार्थ लावलेल्या महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती देणाऱ्या फलकांची ७ जानेवारी रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मोडतोड केली होती.

नोंदणीसाठी एफडीएत अन्न व्यावसायिकांची गर्दी

0
0
परवाने व नोंदणी करण्यासाठी अन्न व्यावसायिकांनी शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात (एफडीए) मोठी गर्दी केली. दिवसभरात विभागात १३०० जणांनी नोंदणी केली तर १०० व्यावयासिकांनी परवाने घेतले आहेत, अशी माहिती सहआयुक्त (अन्न) चंद्रशेखर साळुंके यांनी दिली.

खुलताबाद उरुसाला सुरुवात

0
0
हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष उर्फ शेख मुन्तजबोद्दिन यांच्या ७२७ व्या उरुसाला संदल मिरवणुकीने मोठया उत्साहाने सुरुवात झाली. राज्यातील कानाकोपऱ्यातून खास उरुसासाठी आलेल्या फकिराच्या वेगवेगळ्या पुरख-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बचत गट निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनास प्रतिसाद

0
0
महिलांच्या उपजत कलागुणांना उपयुक्त व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महिलांच्या बचतगट निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून तीन दिवसांचे प्रदर्शन कलश मंगल कार्यालयात सुरू आहे.

तीळगूळ घ्या, जागांचे बोला!

0
0
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी शिवसेना-भाजप-रिपब्लिकन महायुतीची बैठक येत्या मकरसंक्रातीला, १४ तारखेस वांद्रे येथील रंगशारदात होणार आहे.

एकादशीनिमित्त पैठणमध्ये भाविकांची गर्दी

0
0
पुत्रदा एकादशी निमित्त शनिवारी जवळपास एक लाख भाविकांनी पैठणमध्ये नाथ समाधीचे दर्शन घेतले. जायकवाडी धरणातून गोदापात्रात पाणी सोडल्याने एक वर्षाच्या कालावधी नंतर भाविक व वारकऱ्यांना गोदावरी नदीच्या शुद्ध पाण्यात स्नान करायला मिळाले. यामुळे भाविक व वारकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते.

रुग्णांबाबत आस्था असणे गरजेचे

0
0
रुग्णसेवा करताना संयम बाळगावा लागतो आणि त्यासाठी योगा व मेडिटेशन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या मनात रुग्णांविषयी आस्था असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात काम करताना नियमांचेही पालन झाले पाहिजे, असे मत योगतज्ज्ञ डॉ. चारूलता रोजेकर यांनी व्यक्त केले.

स्मार्ट कार्ड जमा करून घ्या हो!

0
0
एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडून मिळालेले स्मार्ट कार्ड कुठे ठेवावे ? असा प्रश्न एसटीच्या कर्मचाऱ्यांना पडला आहे. पुर्वीच्या पासेसच्या जागी आता स्मार्ट कार्ड प्रवाशांना देण्यात येणार असून पासची महत्त्वाची जबाबदारी स्वतःकडे ठेवता येत नसल्यामूळे पासेस जमा करावे कोणाकडे हा प्रश्न एसटीच्या कर्मचाऱ्यांसमोर पडला आहे.

महायुतीमध्ये बंडखोरीची शक्यता

0
0
उस्मानाबाद लोकसभेची जागा सेनेने भाजपाला द्यावी, भाजपाने या जागेसाठीची उमेदवारी आपणाला द्यावी यासाठीचे आपली वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न चालू आहेत. जागा न सोडल्यास अपक्ष म्हणूनही निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images