Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खिडकी गँगच्या दोघांना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुख्यात खिडकी गँगच्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. बीड येथील हे आरोपी असून त्यांनी चार गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या ताब्यातून चौदा तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

शहरात बंद घराच्या खिडक्याचे ग्रील काढून घरात प्रवेश करून चोऱ्या करण्याचे प्रकार घडले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने खिडकी गँगचा सूत्रधार सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (रा. हर्सूल) याला साथीदारासह अटक करून त्याच्याकडून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते. या टोळीतील इतर आरोपी पसार झाले होते. हे आरोपी माळीवेस बीड येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने बीड गाठून आरोपी शंकर तानाजी जाधव (वय ३५, रा. पाथरुड गल्ली) आणि बलबीर अमृत जाधव (वय ३६, रा. माळवेस चौक, बारदरी गल्ली, बीड) यांना अटक केली. पोलिस चौकशीत या आरोपींनी शहरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांचा तिसरा पसार साथीदार अक्षय मिठ्ठू गायकवाड उर्फ चिंटू (रा. बीड) याच्या मदतीने त्यांनी सिडको, हर्सूल आणि बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपीकडून चौदा तोळे सोने आणि एक मोबाइल हस्तगत केला. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, सुनील धात्रक, गजानन मांटे, प्रभाकर राऊत, विशाल सोनवणे, भरतसिंग बहुरे, ज्ञानेश्वर पवार, अनिल थोरे व नाना फुंदे यांनी केली.

\Bस्वतंत्र तयार केली टोळी

\Bआरोपी शंकर जाधव याला गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी देखील अटक केली होती. पुंडलिकनगर पोलिस ठाणे हद्दीतील दोन गुन्ह्याची त्याने कबुली दिली होती. टोळीचा प्रमुख सूत्रधार सय्यद सिकंदर कारागृहात गेल्यानंतर शंकरने त्याची नवीन टोळी तयार करीत शहरात घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन सदस्य निवडीसाठी २६०० मतदाते करणार मतदान

$
0
0

औरंगाबाद :

नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर साहीब मंडळाच्या तीन सदस्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (२८ डिसेंबर) मतदान होणार आहे. या मतदानासाठी शहरात पाच मतदान केंद्र तयार करण्यात येणार असून २६०० मतदार मतदान करणार आहेत.

नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर साहीब मंडळाच्या तीन सदस्य निवडीच्या निवडणूक रिंगणात एकूण २६ उमेदवार उभे आहेत. यात औरंगाबाद शहरातून ४ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. तर नांदेड येथून २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यासाठी मराठवाड्यातून १२ हजाराच्या वर मतदाते मतदान करणार आहेत. प्रत्येक सदस्याला तीन उमेदवारांसाठी मतदान करावयाचे आहे.

औरंगाबाद शहरात प्रबंधन कमिटीसाठी करण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत राजश्री शाहू विद्यालय, मुकुंदवाडी, कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोरील खोली, पाटबंधारे विभाग, सिंचन भवन, गुरूतेगबहादूर इंग्रजी शाळा, खोली क्रमांक ३, गुरूतेग बहादूर इंग्रजी शाळा खोली क्रमांक ४, ग्रामपंचायत निवडणूक विभाग, तहसील कार्यालय आणि महानगर पालिका केंद्रीय प्राथमिक शाळा, बन्सीलाल नगर येथे मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. २९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून तहसील कार्यालय, औरंगाबाद येथे मतमोजणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज संपूर्ण शहरात पाणीबाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने पाण्याचे शुल्क न भरल्यामुळे पाटबंधारे विभागाने जायकवाडी येथील महापालिकेचे पंपहाऊस दोन तास सील करून ठेवले. दरम्यान, फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात विजेचा खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि पाणी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा बंद पडली. या दोन्हीही कारणांमुळे शहरवासियांना शुक्रवारी पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसानी पुढे ढकलले आहे.

औरंगाबाद शहराला जायकवाडी येथील नाथसागरातून पाणी पुरवठा होतो. नाथसागरावर पाटबंधारे विभागाची मालकी आहे. नाथसागरातून उपसण्यात येणाऱ्या पाण्यावर पाटबंधारे विभागातर्फे शुल्क आकारले जाते. महापालिकेने गेल्या काही वर्षात शुल्काची रक्कम भरली नाही, त्यामुळे थकबाकी दहा कोटी ६८ लाख ६० हजारांवर पोहोचली. थकबाकीची रक्कम तात्काळ भरा अन्यथा २७ डिसेंबरपासून टप्प्या टप्प्याने पाणी कपात केली जाईल आणि ३१ डिसेंबररोजी जायकवाडीतून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने महापालिकेला बजावली होती. नोटीस मिळाल्यावरही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. लेखा विभागात हे प्रकरण अडकून पडले. दिलेल्या मुदतीत महापालिकेने थकबाकी न भरल्यामुळे पाटबंधारे विभागाने गुरुवारी (२७ डिसेंबर) सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत जायकवाडी येथील नवीन आणि जुने पंपहाऊस सील केले. त्यामुळे जायकवाडीतून केला जाणारा पाण्याचा उपसा पूर्णपणे बंद झाला.

पंपहाऊस सील करण्याची कारवाई पाटबंधारे विभागाने केलेली असतानाच दुसरीकडे फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात विजेचा खांब कोसळला. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा पूर्णपणे बंद झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नवीन खांब उभारण्याची कार्यवाही सुरू केली. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास खांब उभारण्यात आला. त्यानंतर खांबावरून तारा ओढण्याचे काम सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे काम चालेल असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले. पाटबंधारे विभागाने केलेली कारवाई, फारोळा येथे कोसळलेला विजेचा खांब यामुळे शहराची पाणी पुरवठा यंत्रणा पूर्णपणे बंद पडली आहे. शहराला ७०० आणि १४०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो. या दोन्हीही जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद झाला. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाल्यावर शहराचा पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे. यामुळे शुक्रवारी शहराला पाणी पुरवठा होणार नाही, असे पाणी पुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याचेही महापालिकेने कळविले आहे.

पन्नास लाखांचा धनादेश दिला

पंपहाऊसला सील केल्यानंतर महापालिका प्रशासनाने धावाधाव करून दुपारी पाटबंधारे विभागाकडे पन्नास लाखांचा धनादेश दिला. धनादेश दिल्यामुळे आता जलसंपदा विभाग पाणी कपातीची कारवाई करणार नाही, असा दावा पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी केला आहे. फारोळा येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी पाणी पुरवठा होणार नाही, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

पैठण, जालनाचा पाणी पुरवठाही केला बंद

औंरगाबाद महापालिकेबरोबरच जालना आणि पैठण नगरपालिकेने देखील पाटबंधारे विभागाचे पाण्याचे शुल्क थकविले आहे. त्यामुळे या विभागाने औरंगाबाद शहरासह जालना आणि पैठणचा पाणी पुरवठा गुरुवारी दोन तासांसाठी बंद केला. दोन्हीही नगरपालिकांनी ३१ डिसेंबरपर्यंत थकबाकी भरली नाही तर पाणी पुरवठा पूर्णपणे बंद केला जाणार आहे. दोन तास पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई पाटबंधारे विभागाचे जायकवाडी येथील सहाय्यक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी केली. त्यानंतर पैठण नगरपालिकेने पाच लाखांचा धनादेश दिला.

पाण्याची बोंबाबोंब

महापालिकेचे प्रशासनच गलथान झाले आहे. जलसंपदा विभागाने याआधीच नोटीस देऊनही अखेरच्या दिवशी धनादेश दिला जातो, हे मुळात चुकीचे आहे. त्या खात्याची थकबाकी आहे, ती देणे बंधनकारक होते. तरी पालिकेच्या प्रशासनाने शेवटच्या घटकेपर्यंत धनादेश का रोखला? जलसंपदा विभागानेही औरंगाबादकरांची गोची केली, हेही चुकीचे आहे. दोन तास पाणी पुरवठा बंद करून त्यांनी काय मिळविले? जलसंपदा आणि पालिकेच्या भांडणामध्ये सामान्य नागरिकांना वेठीस धरण्यात आले. हा अधिकार दोन्ही संस्थांना कोणी दिला? नागरिकांची सोय प्रथम बघीतली पाहिजे. जायकवाडीत मुबलक पाणीसाठी असूनही शहरवासीयांना पाणी कमी मिळते. पालिकेची अंतर्गत कार्यप्रणाली त्याला कारणीभूत आहे. ही कार्यप्रणाली सुधारल्याशिवाय शहरवासियांना मुबलक पाणी मिळणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाऊजीला मेहुण्यांची मारहाण; एकास अटक, पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहिणीला व तिच्या दोन चिमुकल्यांना वाऱ्यावर सोडून दुसरीसोबत घरोबा केला म्हणून भाऊजीला मेहुण्यांसह पाचजणांनी बेदम मारहाण करत डांबून ठेवले व जिवे मारण्याची धमकी दिली. भाऊजीच्या आईने पोलिसांना माहिती दिल्यानंतर भाऊजीची कशीबशी सुटका झाली. त्यानंतर इतर आरोपींपैकी अब्दुल उर्फ कल्लू खालीद जहीर खान याला गुरुवारी (२७ डिसेंबर) अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (१ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी दिले.

प्रकरणात शोएब खान शेर खान (२७, रा. मिसारवाडी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. रिक्षा चालवून तो आपल्या परिवाराची उपजीविका भागवत होता. लग्नाच्या सहा वर्षांत फिर्यादीला दोन अपत्यही झाली. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून फिर्यादी हा एका विवाहित महिलेच्या संपर्कात येऊन दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फिर्यादीची पत्नी माहेरी निघून गेली. २५ डिसेंबर रोजी रात्री फिर्यादी त्याच्या दुसऱ्या पत्नीसह घरात असताना पहिल्या पत्नीचा भाऊ जुबेर खान जहीन खान, अब्दुल खालीद जहीर खान उर्फ कल्लू, खालीद चाऊस, हुसेन चाऊस व एक अनोळखी असे पाच जण फिर्यादीच्या घरात घुसले आणि त्यांनी फिर्यादीला लाकडी दांड्याने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर जुबेर खान व इतरांनी फिर्यादीला दुचाकीवर बसवून इलियास कॉलनीत आपल्या घरी आणून दोरीने बांधून घरात डांबून ठेवले. तसेच त्याची वाच्च्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकाराची माहिती फिर्यादीच्या आईने पोलिसांना दिल्यानंतर फिर्यादीची सुटका करण्यात आली. फिर्यादीवर उपचार सुरु असताना त्याने दिलेल्या जबाबावरुन आरोपींविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bशस्त्र जप्त करणे बाकीच

\Bया प्रकरणातील आरोपी अब्दुल उर्फ कल्लु खालीद जहिर खान (२४, रा. इलियास कॉलनी, हर्सूल) याला अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे तसेच दुचाकी जप्त करणे बाकी आहे. त्याचवेळी आरोपीच्या साथीदांराचा शोध घेऊन त्यांना अटक करावयाची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती विशेष सहायक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला एक जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनची नवी इमारत; बांधकामाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनच्या जुन्या इमारतीच्या काम लगेच सुरू होणार नाही. इमारतीचे डिझाइन अंतीम केल्यानंतर निविदा प्रसिद्ध होणे, तिच्याबद्दल निर्णय घेणे, कार्यारंभ आदेश दिल्यानंतर प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात होणे, असी भली मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम सुरू होण्यासाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे रेल्वे विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनला मॉडेल रेल्वे स्टेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत मॉडेल रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन अंदाजे चार ते पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याची इमारत बांधकाम प्रक्रिया चार वर्षांपासून केली जात आहे. यासाठी केंद्रीय पर्यटन विभागाकडून विशेष निधीची घोषणाही करण्यात आली होती.

साधारणत: दहा कोटी रुपयांचे अंदाजपत्रक इमारत टप्पा क्रमांक दोनसाठी ठरवण्यात आले आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांनी दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबाद येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी नवीन इमारतीचे बांधकाम महिन्याभरात सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. सध्या या रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी डिझाइन तयार करण्याचे काम सुरू आहे. दोन ते तीन डिझाइन तयार झाल्यानंतर त्यानुसार कामाला सुरुवात केली जाणार आहे. या प्रक्रियेस किमान दोन महिन्यांचा अवधी लागणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

\Bजुनी इमारत, फलाट सजवणार \B

सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून टप्पा क्रमांक तीनचे बांधकाम व जुन्या इमारतीचे सुशोभिकरण केले जाणार आहे. येथे वेरूळ व अजिंठा या जागतिक वारसा स्थळ असलेल्या लेण्यांची प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. फलाट क्रमांक तीनवर डेक्कन ओडिसी येत असल्याने हा फलाटही आकर्षक पद्धतीने सजवला जाणार आहे. याशिवाय व्हिजिटर्स रुम, इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रियेला घाई नडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा प्रक्रिया मशीन खरेदी करण्याची निविदा घाईत काढली होती. आता मशीनकरिता शेड उभारण्याचे काम करण्यासाठी कंत्राटदार पुढे येत नाहीत, अशी अजब कबुली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

स्थायी समिती बैठकीत गजानन बारवाल यांनी कचऱ्याचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले, स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी राज्य शासनाचे अधिकारी मंगळवारी, बुधवारी शहरात होते. त्यांनी कचऱ्यावरील प्रक्रियेच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. नऊ झोन कार्यालयाच्या क्षेत्रात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नऊ मशीनचे संच बसविण्यात स्थायी समितीने मंजुरी दिली होती. त्यानंतरही या मशीन अद्याप का बसविण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न त्यांनी विचारला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कचऱ्यावरील प्रक्रियेचे काम खोळंबल्याचा आरोप त्यांनी केला.

सभापती रेणुकादास वैद्य यांनी याबद्दल उपअभियंता एम. बी. काझी यांना खुलासा करण्यास सांगितले. 'मशीनसाठी रमानगर येथे शेड बांधण्याचे काम करायचे होते, पण त्याकरिता कंत्राटदार येत नसल्याने हे काम रखडले आहे. स्वामी विवेकानंदनगर वॉर्डात सॅनियेशन पार्क तयार करण्याकरिता जागेचा शोध घेण्यात येत आहे,' असा खुलासा काझी यांनी केला. 'डीपीआरनुसार काम करण्यास समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार नऊ मशीनचा संच लावण्याचे काम अद्या का झाले नाही,' अशी विचारणा वैद्य यांनी केली. त्यावर खुलासा करताना काझी म्हणाले, मशीन खरेदीची निविदा गडबडीत काढण्यात आली, त्यामुळे काही त्रुटी राहिल्या आहेत. 'डीपीआर नुसार काम करा. मोठ्या मशीन येतील तेव्हा येतील, तोपर्यंत नऊ ठिकाणी मशीन बसवा आणि काम सुरू करा,' असे आदेश वैद्य यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी उपाययोजना इंग्रजांपेक्षाही कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा जिल्ह्यात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळ पडला असून सध्याचे भाजप-शिवसेना सरकार इंग्रजांएवढ्याही उपाययोजना करत नाही, असा आरोप दुष्काळ निवारण समितीने केला आहे. परभणी जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पाचे पाणी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा, गुरांना चारा, शेतमजुरांना रोजगार आदी मागण्यांसाठी समितीतर्फे मंगळवारपासून (१ जानेवारी) विभागीय आयुक्त कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ही माहिती कॉ. राजन क्षीरसागर आणि माणिक कदम यांनी दिली

दुष्काळ घोषित झाल्यानंतर नियमानुसार, जोखीम रक्कमेच्या २५ टक्के म्हणजे सोयाबीनसाठी ११ हजार ५०० आणि तुरीसाठी आठ हजार रुपये विमा रक्कम तत्काळ दिलेली नाही. मात्र रिलायन्स कंपनीच्या फसवणुकीनंतर इफ्फ्को टोकियो व इतर पीक विमा कंपन्यांच्या शेतकरी फसवणूक धोरणाला भाजप सरकार पाठिशी घालीत आहे, असा आरोप समितीने केला आहे. परभणी जिल्ह्यात उभ्या पिकांना पाणी देण्यात जलसंपदा मंत्री अडथळा आणत आहेत. परभणी जिल्ह्यातील १८३ गावे आणि जालना, औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील लाभक्षेत्राखाली असलेल्या जायकवाडी प्रकल्पाचे दुसरे रोटेशन देण्यास पाटबंधारे विभाग नकार देत आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

\Bसमितीच्या मागण्या \B

जायकवाडी व माजलगाव प्रकल्पातून तत्काळ पाणी द्या, दुधना आणि पूर्णा नदी पात्रात पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी द्या, दिग्रस बंधाऱ्यातील पळविलेल्या पाण्याची जायकवाडीतून भरपाई करा, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर १५ दिवसात शेतकऱ्यांना २५ टक्के उचल पीक विमा भरपाई न देणाऱ्या पीक विमा कंपन्या विरुद्ध गुन्हे दाखल, फायनान्स कंपनीसाठीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणारी घरजप्ती मोहीम रद्द करा, ठोक्या-बटाईने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना घरटी ५० हजार व ५० हजार एकरी अनुदान द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा खोटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकरी कर्ज माफीच्या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी ९० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे विधान केले होते, हे विधान कसे चूक आहे याची माहिती आकडेवारीसह जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली.

जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडलेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात दोन लाख सहा हजार ३६ शेतकऱ्यांनी आपली माहिती सरकारकडे दिली होती. त्यानुसार ७२५ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात एक लाख पाच हजार ६३६ शेतकऱ्यांचाच समावेश ग्रीनलिस्टमध्ये झाला आहे. याची रक्कम १९४ कोटी ९८ लाख एवढी होते. याचाच अर्थ कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या ५१.२७ टक्के शेतकऱ्यांचीच नावे ग्रीनलिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे कर्जमाफीच्या एकूण रक्कमेपैकी फक्त २६.८९ टक्के एवढ्या रक्कमेचीच कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरी पडली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हे प्रमाण यापेक्षा फार कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळालेली नाही हे दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

\Bबँकांसमोर शेतकरी परिषदा घेऊ \B

जिल्ह्यातील जेवढ्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सरकारकडे आपली माहिती सादर केली आहे, त्या सर्वांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी कर्जमाफीची माहिती दिली पाहिजे. माहिती न मिळाल्यास बँकांसमोर शेतकरी परिषदा घेऊ, असा इशारा दानवे यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपा कार्यकर्त्यास गुलमंडीवर मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भाईगिरी करतो का,' असा जाब विचारत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पाच जणांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी दुपारी सव्वा चार वाजता गुलमंडीवरील स्वागत मराठा हॉटेलसमोर घडला. याप्रकरणी संशयित आरोपींविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कुणाल नितीन मराठे (वय २४, रा. कोटला कॉलनी) याने तक्रार दाखल केली. कुणाल हा बुधवारी दुपारी पक्ष कार्यालयातून स्वागत मराठा हॉटेलकडे आला होता. यावेळी तेथे उभ्या असलेल्या सुधीर नाईक यांच्यासोबत गप्पा मारत असताना तेथे संशयित आरोपी अक्षय मघाडे (रा. किलेअर्क) हा पाच जणांसह आला. 'बॉस के आगे जा रहा है क्या, ज्यादा भाईगिरी कर रहा है क्या,' असे म्हणत त्यांनी कुणालला बेदम मारहाण केली. कुणाल हा तेथून जाताना आरेापींनी त्याला अडवून शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कुणालच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अक्षय मघाडे आणि साथीदारांविरुद्ध मारहाण करणे, दंगल करणे, रस्ता अडवणे आदी कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. खान तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेला नऊ लाखांचा गंडा, दुसऱ्या आरोपीस बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँक स्टेटमेंट, इन्शोरन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, रसिस्ट्रीची प्रत आदी सर्व बनावट कागदपत्रे सादर करून कारसाठी कर्ज घेऊन इंडसइंड बँकेला नऊ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणातील दुसरा आरोपी सचिन अनिलराव बेले याला गुरुवारी (२७ डिसेंबर) अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (३१ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले.

या प्रकरणी इंडसइंड बँकेच्या अदालत रोड शाखेचे व्यवस्थापक भागवत प्रभाकर दसपुते यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, कृष्णा धनसिंग ठाकूर व सुजित सुनील देशमुख अशी स्वतःची नावे सांगून दोघांनी कारसाठी कर्जाची मागणी केली होती व सर्व आवश्यक कागदपत्रे बँकेत सादर केली होती. कागदपत्रांच्या तपासणीनंतर 'थर्ड फाइंडर सर्व्हिंसेस' या एजन्सीने सर्व कागदपत्रे योग्य असल्याचा निर्वाळा बँकेला दिला होता. त्यानंतर सहा लाख ९७ हजार रुपयांचे कर्ज हे कर्जदार कृष्णा धनसिंग ठाकूर व सहकर्जदार सुजित सुनिल देशमुख यांना ११ जून २०१८ रोजी बँकेने मंजूर केले होते. संबंधित कारचा दुसरा हप्ता मुदतीत न भरल्यामुळे बँक कर्मचाऱ्याने कृष्णा ठाकूर याच्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी कोणीही कृष्णा ठाकूर राहात नसल्याचे आढळून आले. सहकर्जदार सुजित देशमुख याच्या फोनवर संपर्क साधला असता, कृष्णा ठाकूर याला ओळखत नसल्याने देशमुख याने सांगितले. मात्र स्वतःच्या कर्जासाठी एकाकडे कागदपत्रे दिल्याचे देशमुख याने सांगितले. या प्रकरणी बँकेची फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिल्यावरुन क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी मंगेश सदन फुंगुसकर (३०, रा. सातारा परिसर) याला पाच डिसेंबर रोजी गोव्यातून ताब्यात घेण्यात आले होते आणि त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे १५ एटीएम कार्ड, तीन पेनड्राइव्ह व इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. याच प्रकरणात आरोपी सचिन अनिलराव बेले (२८, रा. अयोध्यानगर, नांदेड) याला गुरुवारी अटक करण्यात आली, तर आणखी दोन आरोपी अजूनही फरार आहेत.

\Bवाहन विकून रक्कम जप्त करणे बाकी

\Bप्रकरणातील दुसरा आरोपी सचिन बेले याला शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, गुन्ह्यात बँकेतील कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्याचा हात आहे का, आरोपींनी खोटी कागदपत्रे सादर करुन आणखी काही गुन्हे केले आहेत का, आदी बाबींच्या तपासासह फरार आरोपींना अटक करावयाची असून, फसवणूक करून घेतलेली कार जप्त करावयाची आहे आणि वाहन विकून आरोपीच्या वाट्याची रक्कम जप्त करावयाची आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षातर्फे कोर्टात करण्यात आली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलमंडीवर चार फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या मध्यभागी असलेल्या गुलमंडी येथील जेथलिया टॉवर्समध्ये शिरून चोरट्यांनी चार फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान हा प्रकार घडला. चोरट्यांना कुलूप तोडण्यात अपयश आल्याने हा प्रयत्न फसला.

गुलमंडी परिसरात जेथलिया टॉवर्स ही सहा मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये चोवीस फ्लॅट आहेत. गुरुवारी सायंकाळी चोरट्यांनी या इमारतीमध्ये प्रवेश केला. तिसऱ्या मजल्यावरील श्यामसुंदर लढ्ढा, चौथ्या मजल्यावरील दीपक लढ्ढा आणि संजय जयस्वाल तसेच पाचव्या मजल्यावरील प्रवीण भुमा यांच्या फ्लॅटच्या दरवाजांचे कडीकोयंडा तोडले. मात्र या दरवाजच्याचे सेंट्रल लॉक तुटले नसल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. श्यामसुंदर लढ्ढा यांच्या घरात चोरटे शिरले मात्र बेडरुमच्या दरवाजाचे लॉक उघडले नसल्याने चोरटे माघारी परतले. काही वेळाने हा प्रकार रहिवाशांच्या लक्षात आला. सिटीचौक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मात्र, ऐवज चोरीला गेला नसल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

\Bअनेकांची संपर्क कार्यालये

\Bजेथलिया टॉवर्स हे गुलमंडीवरील वर्दळीचे ठिकाण मानले जाते. या इमारतीच्या तळमजल्यावर भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, नगरसेवक राजू तनवाणी, बंटी तनवाणी यांची संपर्क कार्यालय आहेत. या ठिकाणी नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी असते. वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८६ लाखांचा गुटखा केला नष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अन्न औषध प्रशासनाने वर्षभराच्या काळात जप्त केलेला ८६ लाख रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखू नष्ट करण्यात आली. प्रशासनाने २०१७-१८ वर्षात औरंगाबाद जिल्ह्यात ५१ ठिकाणी कारवाई करून ८६ लाख ६९ हजार ५१ रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू जप्त केली होती. जप्त केलेला हा माल प्रशासनाने कार्यालयात साठवून ठेवला होता. साठवलेला माल नष्ट करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त मिलिंद शहा यांनी दिले. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, सुलक्षणा जाधवर, योगेश कणसे, निरुपमा महाजन, ज्योत्स्ना जाधव यांच्या उपस्थितीत गुटखा, तंबाखू, पानमसाला जाळून नष्ट करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक आयुक्त उदय वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजुरासह जेष्ठाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन वेगवेगळ्या घटनांत मजुरासह जेष्ठ नागरिकाने गळफास घेत आत्महत्या केली. उस्मानपुरा-फुलेनगर आणि शिवाजीनगर भागात हे प्रकार घडले. या प्रकरणी उस्मानपुरा आणि जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

फुलेनगर भागातील सेंट्रिंग काम करणारा मजूर बाबासाहेब पुंजाजी भिवसने (वय २८) याने गळफास घेतल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. बाबासाहेबची पत्नी माहेरी गेलेली असल्याने तो मुलांसह फुलेनगर भागात वास्तव्यास होता. काम मिळत नसल्याने त्याला पैशाची चणचण भासत होती. गुरुवारी रात्री बाबासाहेबने छताच्या हुकाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी त्याचा पुतण्या त्याला उठवण्यासाठी गेला असता हा प्रकार लक्षात आला. बाबासाहेबला घाटी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी उस्मानपुरा पेालिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

\Bपंख्याला घेतला गळफास

\Bआत्महत्येची दुसरी घटना गुरुवारी दुपारी बारा वाजता शिवाजीनगर भागात उघडकीस आली. या ठिकाणी राहत असलेले जेष्ठ नागरिक भगवान धोंडिबा शिरोळे (वय ५७, रा. शिवाजीनगर) यांनी घरात छताच्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांना सूर्यकांत शिरोळे आणि भरत नजन यांनी तातडीने घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शिरोळे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा विकास मंडळातून संगणक लांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा विकास मंडळाच्या भांडारगृहात खिडकीतून प्रवेश करून चोरट्याने पाच संगणकांचे मॉनिटर लांबवले. १० डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठवाडा विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी पुरूषोत्तम एम्पाल यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एम्पाल गुरुवारी सकाळी दहा वाजता कार्यालयात आले. दुपारी बारा वाजता ते विकास मंडळाच्या पाठीमागे असलेल्या भांडारगृहाची तसेच जुन्या वस्तुचा संग्रह ठेवलेल्या गोदामाची तपासणी करण्यासाठी गेले. यावेळी भांडारगृहाला आतून अर्धवट कडी लावलेली होती. एम्पाल यांनी दरवाजा ढकलत आतमध्ये प्रवेश केला. यावेळी खोलीच्या पाठीमागील खिडकीच्या काचा फुटलेल्या आढळल्या. खोलीमध्ये ठेवलेल्या पाच संगणकाचे मॉनिटर चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. तसेच दोन संगणकाची तोडफोड देखील केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जमादार मुजीब तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपा नगरसेवक भादवेंना सशर्त जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाचे खोकडपुरा प्रभागाचे नगरसेवक रामेश्वर भादवे आणि त्यांच्या भावाला अॅट्रासिटी अॅक्टच्या गुन्ह्यात सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. १९ डिसेंबर रोजी भादवे आणि त्यांच्या भावाला अटक करण्यात आली हेाती. पाच मे २०१८ रोजी त्यांच्यावर तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पवन सिकंदर दाभाडे (वय २६, रा. बहादुरपुरा, बंजारा कॉलनी) याने तक्रार दाखल केली होती. दाभाडे याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दाभाडे यांनी मिरवणूक काढली होती. यानंतर चार मे रोजी नगरसेवक भादवे आणि त्यांचा भाऊ विनोद भादवे यांनी दाभाडे याला अडवले होते. आमच्याकडून वर्गणी का नाही घेतली. तसेच गाडीवर माझे बॅनर का नाही लावले, असे विचारत दाभाडेला जातीवाचक शिवीगाळ करीत रॉडने मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपींवर मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर विभागाचे सहायक पोलिस आयुक्तांकडे याचा तपास देण्यात आला होता. १९ डिसेंबर रोजी नगरसेवक भादवे आणि त्यांच्या भावाने पोलिसांकडे शरणागती पत्कारली. पोलिसांनी त्यांना अटक करीत कोर्टात हजर केले. यावेळी आरोपींच्या वतीने अॅड. लक्ष्मीकांत एस. काथार यांनी बाजू मांडली.

\Bजामिनाच्या अटी \B

कोर्टाने त्यांची तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. यावेळी आरोपींनी तक्रारदाराच्या घराच्या पाचशे मीटर अंतरापर्यंत यायचे नाही, अशी अट देखील घालण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गतीमंद मुलाच्या शोधासाठी सुमोटो फौजदारी याचिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गतीमंद मुलाच्या शोधासाठी हायकोर्टाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या सुमोटो फौजदारी याचिकेत न्या. एस. एस. शिंदे व न्या. के. के. सोनवणे यांच्या खंडपीठाने उदगीर येथील निवासी मूकबधीर विद्यालय व पोलिस प्रशासनाला नोटीस बजावली. या प्रकरणात चार जानेवारी २०१९ रोजी पुढील सुनावणी होईल.

कर्नाटकमधील बिदर जिह्यातील औराद तालुक्यामधील हुलसूर (खेड) येथील भानुदास पुंडलिक कांबळे यांनी खंडपीठाला याविषयीचे पत्र लिहिले होते. त्यानुसार, त्यांचा मुलगा दीपक हा गतीमंद असून त्याला उदगीर येथील निवासी मूकबधीर विद्यालयात शिक्षणासाठी पाठविले होते. त्यांच्या गावापासून उदगीरचे अंतर ३० किलोमीटर इतके आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा थेट घरी आला होता. त्यामुळे कांबळे यांनी मूकबधीर विद्यालयाच्या प्रशासनाला जाब विचारला. प्रशासनाने दीपक महाविद्यालयातून न सांगताच गेल्याचे सांगत जबाबदारी झटकली. नंतर असा प्रकार होणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र, काही दिवसांनी २७ ऑगस्ट २०१८ रोजी महाविद्यालयातून भानुदास कांबळे यांना संपर्क साधण्यात येऊन त्यांचा मुलगा महाविद्यालयात नसल्याची माहिती देण्यात आली. याही वेळेस महाविद्यालयाने जबाबदारी झटकली. त्यामुळे कांबळे यांनी पत्नीसह उदगीर येथील पोलिस ठाणे गाठले व तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी बेपत्ता दीपकच्या शोधासाठीच काहीच हालचाल न केल्याने कांबळे यांनी हायकोर्टाला पत्र लिहिले. या पत्राआधारे खंडपीठाने सुमोटो फौजदारी याचिका दाखल करून घेत अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांची न्यायालयाचा मित्र (अ‍ॅमिकस क्युरी) म्हणून नियुक्ती केली. अ‍ॅड. थोरात यांनी निवासी मूकबधीर महाविद्यालय व पोलिसांच्या हलगर्जीपणाकडे कोर्टाचे लक्ष वेधले आहे. तसेच दीपकच्या शोधासाठी आदेश देण्याची विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुलं इंग्रजीत शिकली, तरीही आम्ही मराठीपण जपले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'माझी मुलं इंग्रजी माध्यमात शिकली आहेत, पण आम्ही पूर्णपणे मराठी वातावरण जपले आहे,' असे सांगतानाच, 'सध्याच्या परिस्थितीत मराठी टिकली पाहिजे, मराठी माध्यमाच्या शाळा वाढल्या पाहिजेत,' असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिला.

महापालिका शाळांमधील मराठी भाषेची स्थिती याबद्दल ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी मुंबई येथे महापौर निवासात बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुंबई, ठाणे, कल्याण-डोबिवली व औरंगाबाद महापालिकेचे महापौर आणि शिक्षणाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. औरंगाबाद महापालिकेचे महापौर नंदकुमार घोडेले, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, शिक्षण विभागाचे ज्ञानदेव सांगळे, किशोर दांडगे या बैठकीला उपस्थित होते.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीची माहिती श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी माध्यमाचे वर्ग असावेत. ज्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत त्या शाळांमध्ये देखील मराठी माध्यमाचे वर्ग सुरू झाले पाहिजेत. केरळ, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात या राज्यात शाळांमधून मातृभाषा सक्तीची केली आहे. महाराष्ट्रात देखील शाळांमधून मराठी ही मातृभाषा सक्तीची झाली पाहिजे. मराठी माध्यमातूनच शिक्षण दिले गेले पाहिजे. मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या कमी होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील यावेळी उपस्थित होते.

\Bपालिकेचे सादरीकरण \B

महापौर घोडेले व शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी औरंगाबाद महापालिकेच्या शाळांची स्थिती ठाकरे यांच्यासमोर मांडली. पालिका शाळेतील शिक्षकांनी लिहिलेल्या गोष्टींचे प्रकाशित 'मुठभर गोष्टी' हे पुस्तक, 'शिकु आनंदे' हे पुस्तक, शाळांमधून विकसित करण्यात आलेली बालोद्याने याचे सादरीकरण त्यांनी ठाकरे यांच्या समोर केले. हे सादरीकरण पाहून ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षकांना बळ दिले जात असल्याबद्दल त्यांनी महापौरांचेही अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा पालिका अधिकाऱ्यांना दम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना नगरसेवकांची कामे प्राधान्याने करा, लवकरात लवकर कामे झाली नाहीत, तर आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला जाब विचारू, असा दम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांना दिला.

वॉर्डांमधील विकास कामे होत नाहीत, अशी तक्रार बहुतेक नगरसेवकांची असल्याने अंबादास दानवे आणि महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या उपस्थितीत महापौर दालनात शुक्रवारी शिवसेना नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतल्यानंतर अधिकारी व नगरसेवकांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या दोन्ही बैठका सुमारे तीन तास चालल्या, दरम्यानच्या काळात महापौर दालनात इतरांना प्रवेश नाकारण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्डात कामे होत नसल्याबद्दल नगरसेवकांनी बैठकीत रोष व्यक्त केला. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेच्याच नगरसेवकांची कामे होत नाहीत. दोन- दोन वर्षे संचिका पडून राहतात, त्याची दखल घेतली जात नाही. कामांचे अंदाजपत्रक तयार केले जातात, निविदा काढली जाते, कंत्राटदाराला कार्यारंभ आदेशही दिले जातात, पण कामच सुरू केले जात नाही. बिल मिळत नसल्यामुळे कंत्राटदार काम करीत नाहीत; त्याचा फटका नगरसेवक व नागरिकांना बसतो, अशी संतप्त तक्रारी नगरसेवकांनी बैठकीत केल्या.

काही ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांचे अनुभव बैठकीत सांगितले. गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास आता अधिकाऱ्यांकडून होत आहे. अधिकारी काम ऐकतच नाहीत. शिवसेनेची सत्ता असूनही आम्हाला काहीच उपयोग होत नाही, अशा तक्रारी ज्येष्ठांनी केल्या. कामे होत नसल्याचे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. विशिष्ट नगरसेवकांचीच कामे केली जातात, असे यावेळी जिल्हाप्रमुख व महानगरप्रमुखांच्या लक्षात आणून देण्यात आले.

नगरसेवकांच्या बैठकीनंतर अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हाप्रमुखांनी नगरसेवकांची कामे मार्गी लावा, लवकरात लवकर कामे करा अन्यथा आमच्या पद्धतीने जाब विचारू, असा इशारा दिला. शिवसेना नगरसेवकांना त्रास होऊ देऊ नका. विकास कामांबद्दलच्या त्यांच्या तक्रारी आता सहन केल्या जाणार नाहीत, अशी समज अधिकाऱ्यांना देण्यात आली.

\Bकाही तुपाशी, काही उपाशी\B

शिवसेनेच्या काही नगरसेवकांची कामे होतात. त्यामुळे काही नगरसेवक तुपाशी आणि काही उपाशी अशी स्थिती असल्याच्या भावना बैठकीस उपस्थित असलेल्या नगरसेवकांपैकी काही जणांनी व्यक्त केल्या. तोंड पाहून काम केले जाते, धनादेश काढले जातात, हे किती दिवस आणि कसे सहन करायचे, असा सवाल नगरसेवकांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासन मान्यतेच्या अधीन राहून रिक्त पदे भरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासन मान्यतेच्या आधीन राहून रिक्त पदे भरा, अशी मागणी महापालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन आयुक्तांच्या नावे देण्यात आले आहे. सर्वसाधारण सभेने मंजूर केलेले सेवाभरती नियम शासनाकडे तातडीने मान्यतेसाठी पाठवावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

आयुक्तांच्या नावे दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, सेवाभरती नियम शासनाकडे न पाठवल्यामुळे शासनाची त्यास अद्याप मान्यता मिळू शकलेली नाही. त्यामुळे सरळ सेवा, पदोन्नतीने भरावयाची रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रारुप सेवाभरती नियमांच्या आधारे रिक्त पदे भरता येऊ शकतात. त्यानुसार सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या सेवाभरती नियमांचा अवलंब करून शासन मान्यतेच्या आधीन राहून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्यास हरकत नाही. आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांची स्वाक्षरी आहे.

\Bपदोन्नतीपासून वंचित \B

ही प्रक्रिया राबवली जात नसल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पात्रता असूनही सेवाभरती नियमाच्या अभावी पदोन्नतीपासून वंचित रहावे लागत आहे. कर्मचाऱ्यांचे हित जोपासणे इतकी माफक अपेक्षा कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून असते. रिक्त पदे भरण्याच्या प्रकरणात कोणतीही विधी विषयक प्रक्रिया प्रलंबित नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुस्मृतीने सामाजिक विषमता पेरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मनुस्मृती ग्रंथाने वर्णजाती व्यवस्थेवर आधारीत सामाजिक विषमता पेरली. शूद्रातिशूद्रांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हक्कांपासून वंचित ठेवले. अस्पृश्यांवर बहिष्कार लादून महिलांना स्वातंत्र्य नाकारले. त्यामुळे देश मागास राहून महासत्ता झाला नाही' असे प्रतिपादन माजी न्यायाधीश डी. आर. शेळके यांनी केले. ते परिसंवादात बोलत होते.

सत्यशोधक स्टुडंटस फेरडेशनच्या वतीने मनुस्मृती दहन दिनानिमित्त 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती का जाळली' या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. मौलाना आझाद संशोधन केंद्रात हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर जी. एस. कांबळे, मारोतीराव सावळे, प्रा. सुमीत रणदवे, संघपाल भन्ते, डी. बी. खिल्लारे, अनिल लष्करे उपस्थित होते. मनुस्मृतीच्या सामाजिक समताविरोधी आशयावर शेळके यांनी भाष्य केले. 'मनुस्मृतीमुळे सामाजिक विषमता हजारो वर्षे जोपासली गेली. दाहक विषमता नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीची जाहीर होळी केली. १९५० मध्ये बाबासाहेबांनी राज्यघटना लिहून व लागू करुन स्त्री-पुरुषांना समान सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हक्क बहाल केले. यातून अस्पृश्यतेचे उच्चाटन करुन मनुस्मृतीला मूठमाती दिली' असे शेळके म्हणाले.

'मनुस्मृती संस्कृतीचे अवशेष अद्याप शिल्लक आहेत. भीमा कोरेगाव येथे झालेल्या दलित समूहावरील हल्ल्यातून आणि देशातील अनेक भागात दलितांवर सुरू असलेल्या अत्याचारातून त्याची प्रचिती येते' असे जी. एस. कांबळे म्हणाले. सोमनाथ वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आम्रपाली गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी प्रा. अरुण कांबळे, बी. जी. किनाळकर, श्रावण गायकवाड, अॅड. सागर मोडे, लक्ष्मण पवार, प्रा. श्रीमंत कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images