Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मालमत्ता कर वसुली मोहीम पुन्हा राबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कर वसुली आणि बांधकाम नियमितीकरणाच्या संदर्भात पुन्हा एकदा विशेष मोहीम राबवा, अशी सूचना करणारे पत्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिका आयुक्तांच्या नावे दिले आहे.

आयुक्तांना दिलेल्या पत्रात घोडेले यांनी म्हटले आहे की, महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने 'थकित मालमत्ता कर वसुली व बांधकाम नियमितीकरण सप्ताह' नोव्हेंबर महिन्यात राबवण्यात आला होता. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. वसुली देखील चांगली झाली. ही बाब लक्षात घेता सात ते २५ जानेवारीच्या दरम्यान पुन्हा अशी मोहीम राबवण्यात यावी. महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १४० ब च्या तरतुदीप्रमाणे विशेष थकित कर वसुली व बांधकाम नियमितीकरण मोहीम राबवण्यात यावी. यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी योग्य ते आदेश देण्यात यावेत. समन्वयासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. मोहीमेचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केबलचालकांची निदर्शने

$
0
0

'ट्राय'ने केबल वाहिन्यांच्या दरांच्या अंमलबजावणीबद्दल दिलेल्या आदेशाच्या निषेधार्थ औरंगाबाद जिल्हा केबल ऑपरेटर असोसिएशनने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहीण-भावाने दिले जखमी कबुतराला जीवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या कबुतराला बहीण-भावाने उपचार करून जीवदान दिले. ही घटना न्यू नंदनवन कॉलनीत घडली. धोकादायक नॉयलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असताना शहरात र्रासपणे विक्री होत असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे दिसते.

सक्रांत सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पतंग शौकिनांकडून धोकादायक असलेल्या नॉयलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. या मांजामुळे पक्षी जखमी होण्याच्या अनेक घटना घडत आहेत. न्यू नंदनवन कॉलनी परिसरात देखील पाय आणि पंखात नॉयलॉन मांजा अडकल्याने एक कबुतर बनसोडे यांच्या घराच्या छतावर जखमी अवस्थेत पडला होता. हे बनसोडे यांची मुलगी हर्षा बनसोडे आणि मुलगा लोकेश बनसोडे यांन लक्षात आले. या कबुतराचे पाय व पंखातून अलगद मांजा काढत या बहीण-भावांनी त्याची सुटका केली. तसेच त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. कबुतर ठणठणित झाल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.

\Bनॉयलॉन मांजा वापरू नका \B

नॉयलॉन मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे प्रकार घडत असून पतंग शौकिनांनी नॉयलॉन मांजाचा वापर टाळावा, असे आवाहन कबुतराला जीवदान देणारे हर्षा आणि लोकेश बनसोडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीचे निकाल लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेतील तीन हजार ७०० कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांचा निवाडा करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. डॉ. नवनाथ आघाव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रक्रिया सुरू केली आहे. तर पदवी अभ्यासक्रमाचे निकाल येत्या १५ जानेवारीपर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत. निकाल रखडल्याने हजारो विद्यार्थी प्रशासनाकडे विचारणा करीत आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम निकाल आणि कॉपी प्रकरणांचा निवाडा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण तीन हजार ७०० प्रकरणांचा अभ्यास करुन अंतिम निर्णय दिला जाणार आहे. संबंधित विद्यार्थी कॉपी प्रकरणात दोषी असल्यास त्याचा संपूर्ण निकाल रद्द करुन त्या वर्षीची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. नवनाथ आघाव असून प्रा. आशा बीडकर, डॉ. भगवान साखळे, प्रा. सुरेश कागणे, प्रा. अरुण दैतकार सदस्य आहेत. परीक्षा विभाग पदवी-पदव्युत्तर वर्गाचे निकाल जाहीर करण्याचे नियोजन करीत आहे. आतापर्यंत बीसीएस अभ्यासक्रमाचे १४ निकाल जाहीर झाले आहेत. बी. ए., बी. कॉम, आणि बीएसस्सी वर्गाचे निकाल रखडले आहेत. तर एम. ए. हिंदी, मराठी आणि इतिहास विषयाचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी दिली. बीएससी कम्प्युटर सायन्सचे निकालही जाहीर होणे अपेक्षित आहे. सर्व्हिस कोर्समुळे पदवीच्या निकालास उशीर झाला आहे. ही परीक्षा स्वतंत्र झाली असून त्याची वर्गवारी करण्यात वेळ गेला. पण, निकाल लवकर लावण्याचा प्रयत्न असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

पदवी छपाई त्याच कंपनीला ?

मागील वर्षी नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिल्यामुळे मोठा वाद झाला होता. या प्रकरणात तत्कालीन परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. दिगंबर नेटके यांना पदच्यूत करण्यात आले होते. ही चूक छपाईचे कंत्राट दिलेल्या कंपनीने केल्याचा खुलासा विद्यापीठ प्रशासाने केला होता. यावर्षी पुन्हा त्याच कंपनीला पदवी छपाईचे कंत्राट दिल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांचा अचूक डेटा भरण्यात कंपनी चूक करीत असल्यामुळे गंभीर प्रकार घडत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्क परतीसाठी ठिय्या आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परीक्षा शुल्क आणि उत्तरपत्रिका तपासणीचे अतिरिक्त शुल्क परत देण्याच्या मागणीसाठी मराठवाडा लॉ कृती समितीने विद्यापीठात ठिय्या आंदोलन केले. शुल्क परत न केल्यास जानेवारी महिन्यात मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांच्या शुल्काचा वाद कायम आहे. २०१५-१६ यावर्षी राज्य सरकारने दुष्काळामुळे परीक्षा शुल्क माफी जाहीर केली होती. पण, विद्यापीठाने परीक्षा शुल्क वसूल केले होते. हे शुल्क महाविद्यालयाने विद्यापीठास व विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परत केले नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मराठवाडा लॉ कृती समितीने प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे अखेर तेजनकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मधील परीक्षा शुल्क परत करावे, उत्तरपत्रिका पुनर्तपासणीची अतिरिक्त रक्कम परत करावी आणि पुनर्तपासणीत १० टक्के गुणवाढ झाल्यास मिळणारी ७५ टक्के शुल्क परतीची रक्कम द्यावी अशी मागणी करीत समिती सदस्यांनी तेजनकर यांना निवेदन दिले. या मागण्या मान्य न झाल्यास जानेवारी महिन्यात मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा समितीने दिला आहे. यावेळी नवनाथ देवकते, राम टकले, रवी गिते, विश्वजीत बडे, अजहर पटेल, अश्फाक पठाण, ऋषभ लोहाडे, सुदर्शन धुमक, मनोहर जाधव, मनिषा हाडे, प्रदिप तोडकर आदी विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठा सुरळीत

$
0
0

तांत्रिक बिघाडावर मात; पाटबंधारे विभागाने कारवाई थांबवली

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडावर मात करीत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठा सुरळीत केला. पाणी पुरवठा सुरळीत झाला असला तरी विस्कळीत झालेला पाणी पुरवठा पूर्वपदावर येण्यासाठी किमान दोन दिवस लागतील, असे मानले जात आहे. दरम्यान, पाणी कपातीची कारवाई पाटबंधारे विभागाने थांबवली आहे.

फारोळा जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरातील विजेचा खांब कोसळल्यामुळे गुरुवारी पहाटेपासून जलशुद्धीकरण केंद्राचे कामकाज ठप्प झाले होते. नवीन खांब उभारून वीज पुरवठा सुरू करण्यासाठी सायंकाळी साडेसात वाजले. त्यानंतर टप्प्या टप्प्याने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपहाऊसमधील पंप सुरू करण्यात आले. त्यामुळे गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शहरासाठीचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. गुरुवारी दुपारी ११ ते १ वाजेदरम्यान पाटबंधारे विभागाने जायकवाडी येथील महापालिकेचे नवे आणि जुने पंपहाऊस सील केले होते. पंपहाऊस सील केल्यावर महापालिकेने थकीत शुल्कापोटी पाटबंधारे विभागाकडे पन्नास लाख रुपये भरले. त्यामुळे पाटबंधारे विभागाने शुक्रवारी पाणी कपातीची कारवाई केली नाही.

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा सुरळीत सुरू झालेला असला तरी गुरुवारी दिवसभर संपूर्ण पाणी पुरवठा यंत्रणा बंद होती. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत शहर पूर्वपदावर येण्यासाठी आणखी किमान दोन दिवस लागतील, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निदानासाठी चिकित्सकांची ‘हिस्ट्री’ महत्वाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय निदानाचे तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी आणि अचूक निदानासाठी पॅथॉलॉजीसह सर्व संबंधित विषयांमध्ये पारंगत असणे गरजेचे असले तरी; सर्वात आधी रुग्णाची योग्य 'हिस्ट्री' योग्य पद्धतीने नोंदवणे, वैद्यकीय तपासणीचे व शस्त्रक्रियेचे सर्व तपशील नोंदविणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. ही त्या त्या संबंधित चिकित्सकांची फार मोठी जबाबदारी आहे. गरजेनुसार संबंधित चिकित्सकांचा व पॅथॉलॉजिस्ट-मायक्रोबायोलॉजिस्ट यांचा थेट संवादही नक्कीच महत्वाचा ठरतो. त्याशिवाय परीपूर्ण निदान होणे शक्य नाही, असे मत घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी 'हिस्टोटेक्निक्स' विषयावरील परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अॅनॉटॉमी व पॅथॉलॉजी विभागांच्या वतीने आणि 'आयएमए'च्या सहकार्याने 'हिस्टोटेक्निक्स' विषयावरील एक दिवसीय परिषद शुक्रवारी (२८ डिसेंबर) घाटीतील सुसज्ज 'अॅनॉटॉमी हॉल'मध्ये झाली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. येळीकर यांच्यासह उपअधिष्ठाता व अॅनॉटॉमी विभागप्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता व पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू, अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, मेंदूशल्यचिकित्सत डॉ. जीवन राजपूत, 'आयएमए'चे शहर सचिव डॉ. यशवंत गाडे, डॉ. सोमवंशी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. नर्मविनोदी शैलीतील फटकेबाजीमुळे रंगत गेलेल्या कार्यक्रमात, ''घाटीतील कामे, मग ती निधी जमा करण्याची असो की बांधकाम विभागाकडून ही कामे करुन घेण्याची असो, डॉ. सुक्रे हे ती सर्व कामे 'हुक ऑर बाय क्रुक' करुन घेतात. त्यांच्या डोक्यात एखादी कल्पना आली की सत्यात उतरवल्याशिवाय ते थांबत नाही'', अशा शब्दांत डॉ. ये‍ळीकर यांनी डॉ. सुक्रे यांचा गौरव केला. अशाच पद्धतीने पुढाकार घेणाऱ्यांची संस्थेला गरज आहे आणि तेव्हाच संस्था पुढे जाऊ शकते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात किमान पायाभूत सोयी-सुविधा असाव्यात, या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळेच घाटीचे चित्र आता पालटत असल्याचे मतही डॉ. येळीकर यांनी नोंदविले. निदानाचे तंत्रज्ञान व उपकरणांचे अद्ययावतीकरण कितीही होत गेले तरी 'पॅथॉलॉजिस्टस् आय' अर्थात पॅथॉलॉजिस्टच्या दृष्टीला पर्याय नाही. ही दृष्टी तसेच अभ्यास-अनुभव हे तंत्रज्ञानाची जागा कधीही घेऊ शकणार नाही, असे स्पष्ट मत डॉ. बिंदू यांनी नोंदविले. अशा प्रकारच्या परिषदा विद्यार्थ्यांसाठी 'अॅकेडेमिक फिस्ट' असतात आणि विद्यार्थ्यांनी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करावा. हाच सूक्ष्म अभ्यास भविष्यात फलदायी ठरतो, असे डॉ. राजपूत म्हणाले. शहरातील डॉक्टरांच्या दातृत्वामुळेच हा हॉल सुसज्ज होऊ शकल्याचे डॉ. सुक्रे म्हणाले. डॉ. प्रतिभा कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमात हॉलसाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

\Bमी खोडकर, भिंतींवर लिहायचो....

\Bशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. गाडे हे जुन्या आठवणींमध्ये रमले. मी याच अॅनॉटॉमी हॉलमध्ये ३२ वर्षांपूर्वी अभ्यास केला आहे. पहिल्या सत्रात नापास झालो होतो व 'फायनल'लाही नापास होणार, असे माझ्या वर्ग मैत्रिणीने सांगून टाकले होते. ते आव्हान स्वीकारले आणि जिद्दीने अखंडपणे गोल्ड मेडल मिळवत गेलो. परीक्षेत क्लिष्ट-कठीण आकृत्यांचा पाऊस पाडला आणि आजही माझा तो पेपर अॅनॉटॉमी विभागात संग्रही ठेवण्यात आला आहे आणि 'डीन ऑफिस'समोरच्या गुणवत्ता यादीत आजही माझे नावही झळकत आहे. मात्र मी खूप खोडकरही होतो, चक्क भिंतींवर लिहायचो. आज डिजिटल फळा व हॉलच्या नूतनीकरणामुळे माझ्यासारख्याला ती 'संधी' राहिलेली नाही. या कॉलेजने मला भरभरुन दिले. कॉलेजसाठी खूप काही करण्याची इच्छा आहे, असेही डॉ. गाडे म्हणाले.

\B'अॅनॉटॉमी हॉल' झाला 'एबीपी हॉल'

\Bयाच कार्यक्रमात 'अॅनॉटॉमी लेक्चर हॉल'चे 'एबीपी लेक्चर हॉल' असे नामकरण डॉ. येळीकर यांनी जाहीर केले. यातील 'ए' हा या हॉलची वर्षानुवर्षे काळजी घेणाऱ्या 'अॅनॉटॉमी'चा आहे व म्हणूनच तो अग्रस्थानी आहे आणि त्याचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्या 'बायोकेमेस्ट्री'चा 'बी' व ज्याची मूळ मालकी आहे त्या 'फिजिऑलॉजी'चा 'पी' हा या नामकरणात नंतर आहे, अशा डॉ. येळीकर यांच्या शाब्दिक कोटीलाही भरभरुन दाद मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ तोळे सोने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाच्या स्वागत समारंभातून वधूच्या आईची पर्स ४२ तोळ्यांचे दागिने आणि सव्वालाखाच्या रकमेसह लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. एकूण तब्बल साडेतेरा लाखांचा ऐवज बीड बायपासवरील गुरू लॉन्स येथून पळवण्यात आला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी सायंकाळी गुरू लॉन्स येथे डॉ. जयंत दत्तात्रय तुपकरी (वय ५५, रा. सारंग हौसिंग सोसायटी, गजानन महाराज मंदिराजवळ, गारखेडा) यांच्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ सोहळा होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर पाहुणे मंडळी आली होती. डॉ. तुपकरी यांच्या पत्नी डॉ. ज्योती तुपकरी यांच्याजवळ असलेल्या पर्समध्ये दागिने, रोख रक्कम तसेच पाहुण्यांकडून आलेली आहेराच्या रक्कमेची पाकिटे ठेवण्यात आली होती. यावेळी चोरट्याने चॉकलेटी रंगाची पर्स चोरून नेली. त्यात एक मोबाइल, रोख पन्नास हजार रुपये, आहेराची आलेली ९८ पाकिटे ज्यामध्ये एकूण ६९ हजार रुपयांची रक्कम होती. तसेच राणीहार, कानातले, मनीहार, दोन मोठे मंगळसूत्र, चार लहान अंगठ्या, एक मोठी अंगठी, नेकलेस, खड्याचे पेडंट आणि मंगळसूत्र असे एकूण ४२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने होते. हा सर्व ऐवज एकूण १३ लाख ४६ हजार ६९८ रुपयांचा होता. काही वेळाने हा प्रकार तुपकरी यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी गुरुवारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. पीएसआय बांगर या प्रकरणी तपास करीत आहेत.

\Bमहिन्यातील आठवा प्रकार\B

डिसेंबर महिन्यात लग्न समारंभातून ऐवज चोरीस जाण्याची ही आठवी घटना आहे. यापूर्वी चोरट्यांनी जबिंदा लॉन्स, पाटीदार भवन, रिगल लॉन्स, मुकुंदवाडी येथील इडन गार्डन मंगल कार्यालय आणि लॉन्स, सप्तपदी मंगल कार्यालय, सौभाग्य मंगल कार्यालय आदी ठिकाणी हात की सफाई करीत लाखोंचा ऐवज लांबवला आहे. गुरू लॉन्समध्ये घडलेला हा महिन्यातील आठवा प्रकार आहे. आतापर्यंत पोलिसांना एकाही गुन्ह्याचा तपास लावता आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीचे अपहरण, आरोपी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणातील ३० वर्षीय विवाहित आरोपी रोहिदास लक्ष्मण जाधव याला गुरुवारी (२७ डिसेंबर) अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी दिले. दरम्यान, प्रकरणातील मुलगी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाली असता, तिचा ताबा घेण्यास कुटुंबियांनी नकार दिल्याने तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १० डिसेंबर २०१८ रोजी फिर्यादी पिता हा उसतोडणी करीत असता, फिर्यादीची मुलगी पहाटे प्रातर्विधीसाठी गेली ती परतली नसल्याचे पुतण्याने फिर्यादीला फोन करून सांगितले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून १२ डिसेंबर रोजी पैठण पोलिस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी रोहिदास लक्ष्मण (३०, रा. पैठण तालुका) याने बलात्काराच्या हेतुने मुलीला लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेले, असा पुरवणी जबाब फिर्यादीने दिल्यावरून आणि पीडित मुलगी अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गातील असल्यामुळे आरोपीविरुद्ध भादंवि ३६३, ३६६, ३६६ (अ) सह 'पोक्सो' कायद्याच्या १२ कलमान्वये तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात आरोपीला गुरुवारी अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीने पीडितेला कुठे-कुठे नेले, कोणत्या उद्देशाने नेले, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का आदींची तपास करावयाचा आहे. तसेच आरोपी विवाहित असून, त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचाही तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब महेर यांनी कोर्टात केली. त्यानंतर कोर्टाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले.

\Bतिला सोडून निघून गेले कुटुंबीय

\Bप्रकरणातील पीडित मुलगी ही स्वतःहून २६ डिसेंबर रोजी पैठण पोलिस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिचा ताबा तिच्या कुटुंबियांकडे दिला असता, तिचा ताबा घेण्यास कुटुंबियांनी नकार दिला व कुटुंबीय पोलिस ठाण्यातून निघून गेले. त्यानंतर मुलीला बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षांसमोर हजर केले असता, तिची रवानगी सुधारगृहात करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची चार लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारमेंटच्या व्यवसायात मुंबई येथील महिलेची चार लाखांची फसवणूक करण्यात आली. २१ डिसेंबर २०१८ ते २७ डिसेंबर २०१८ या कालावधीत हा प्रकार रेल्वे स्टेशन भागात घडला. याप्रकरणी दोन संशयित आरोपीविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुंबई येथील ३७ वर्षांच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. या महिलेचा लेडीज कुर्ती विक्री करण्याचा व्यवसाय आहे. या महिलेसोबत तसेच तिच्या भागीदाराकडून शहरातील दोघांनी कुर्तीचा माल खरेदी केला. एकूण तीन लाख ९९ हजारांचा हा माल होता. हा माल घेतल्यानंतर या महिलेला त्याच्या बिलाची रक्कम देण्यास संशयित आरोपींनी टाळाटाळ केली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुरुवारी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विक्रम महेश्वरी आणि पीयूष धूत यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पीएसआय राहुल चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशव्यापी संपासाठी उद्या कामगार मेळावा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आठ आणि नऊ जानेवारी रोजी कामगारांचा दोन दिवसीय देशव्यापी संप होत आहे. या संपाच्या तयारीसाठी सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (३० डिसेंबर) आयोजित करण्यात आला आहे. कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी साडेदहा वाजता हा मेळावा होणार आहे. आठ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता क्रांतीचौकातून कामगारांचा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहे. नऊ जानेवारी रोजी क्रांतीचौकात सकाळी ११ ते तीन दरम्यान धरणे आंदोलन केले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांना कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कृती समितीतर्फे उद्धव भवलकर, एम. ए. गफार, रंजन दाणी, जॉन वर्गीस, अॅड. अभय टाकसाळ, देविदास कीर्तीशाही, रामकिसन शेळके आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ निवारणासाठी चळवळ उभारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्यातील भयावह दुष्काळ निवारणासाठी सामाजिक चळवळ उभारण्याची गरज आहे. त्यासाठी वृक्षारोपण करा. हे एक सामाजिक दायित्व आहे,' असे आवाहन वन सचिव विकास खारगे यांनी शनिवारी केले.

औरंगाबादमध्ये वृक्ष लागवडीचे उद्दीष्टे आणि पूर्व तयारी नियोजन बैठक घेण्यासाठी खारगे यांनी बैठक घेतल्यानंतर मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तासह नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या सीईओंची जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात बैठक घेतली. बैठकीत खारगे यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि सीईओंकडून वन लागवडीबाबत पूर्वतयारी करण्याबाबत माहिती घेतली. आगामी एक जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या दरम्यान राज्यात ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. नदीच्या दोन्ही बाजूच्या काठावर तसेच धरणाच्या कॅचमेंट एरियात वृक्षलागवड करा,' असे आवाहन केले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, प्रवीण श्रीवास्तव, मुख्य वनसंरक्षक पी. के. महाजन, वनसंरक्षक एन. बी. गुदगे, उपवनसंरक्षक सतीश वडस्कर, मराठवाड्यातील विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे वन अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमटीडीसीतर्फे ४० गाइडला ओळखपत्राचे वाटप

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) चाळीस प्रशिक्षणार्थी गाइडला शनिवारी ओळखपत्राचे वाटप केले. एमटीडीसीच्या औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, निमंत्रण अधिकारी रवींद्र पवार, प्रादेशिक व्यवस्थापक विजय जाधव यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबाद व परिसराची माहिती देण्यासाठी एमटीडीसीतर्फे ग्रामीण भागासाठी गाइड प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. बारा दिवसांचे प्रशिक्षण जानेवारी २०१८मध्ये पार पडले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. खुलताबाद, वेरूळ, कन्नड, सिल्लोड, अजिंठा, फर्दापूर, पैठण, लोणार या ठिकाणाहून प्रशिक्षणार्थी आले होते. त्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदार्थविज्ञान विभागासाठी खडाजंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद उपकेंद्र वाईट स्थितीत आहे. आतापर्यंत ५० कोटी खर्च केल्यामुळे उपकेंद्रात नवीन विभाग सुरू करणे हितावह नसल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी म्हणताच विद्या परिषदेच्या बैठकीत खडाजंगी झाली. उस्मानाबादसारख्या शैक्षणिदृष्ट्या मागास भागात नवीन उपयुक्त विभाग देण्याचा मुद्दा काही सदस्यांनी उचलून धरला. मात्र, चोपडे यांनी ठाम राहत नवीन विभागाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक शनिवारी महात्मा फुले सभागृहात पार पडली. यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्यासह अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विद्या परिषद सदस्य उपस्थित होते. एकूण ८१ विषयांवर साधकबाधक चर्चा झाली. नवीन महाविद्यालयांच्या प्रस्तावांसह 'चॉइस बेस्ड सिस्टीम' लागू करण्यावर मते जाणून घेण्यात आली. मात्र, उस्मानाबाद येथील उपकेंद्रात पत्रकारिता आणि पदार्थविज्ञान विभाग सुरू करण्यावरुन खडाजंगी झाली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी नवीन विभागाला जोरदार विरोध केला. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी नवीन विभाग सुरू करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. मागील व्यवस्थापन परिषदेत पदार्थविज्ञान विभाग सुरू करण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाला विद्या परिषदेची मंजुरी घेण्यासाठी बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला. नवीन पदे भरण्यासाठी राज्य सरकार मान्यता देत नाही. सीएचबी प्राध्यापकांची निवड करणे कठीण झाले आहे. उपकेंद्राच्या एमबीए अभ्यासक्रमाला कमी प्रतिसाद मिळाला. उपकेंद्राची स्थिती चांगली नसल्यामुळे नवीन विभागाचा अट्टाहास धरू नये, असे चोपडे यांनी सांगितले. 'नॅक'च्या पार्श्वभूमीवर बाह्य परीक्षण समितीने केलेल्या पाहणीत उपकेंद्राची वाईट स्थिती दिसली, असे चोपडे यांनी सभागृहात सांगताच अनेक सदस्यांना आश्चर्य वाटले. विद्यापीठाने उपकेंद्रावर आतापर्यंत ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. कोट्यवधी रुपयांचे नियोजन केले आहे. त्यामुळे सुरू असलेले विभाग व्यवस्थित चालवण्याबाबत गांभीर्याने विचार करावा असे चोपडे यांनी सूचवले. विद्या परिषद सदस्य डॉ. विलास खंदारे यांनीही चोपडे यांच्या सूचनेला पाठिंबा दिला. विद्यापीठाच्या निधीवर ताण पडणार असल्याने विभाग सुरू करता येणार नाही, असे सांगून चोपडे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र, प्र-कुलगुरू तेजनकर यांनी नवीन विभागात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रवेश घेतील असे सूचवले. डॉ. किशोर साळवे आणि डॉ. दादासाहेब गजहंस यांनी नवीन विभागाला विरोध केला. पदार्थविज्ञान विषयात नोकरीच्या अधिक संधी आहेत. उस्मानाबाद, उमरगा भागातील विद्यार्थी औरंगाबादला शिक्षणासाठी येऊ शकत नाही. त्यामुळे नवीन विभाग सुरू करण्यास हरकत नाही असा मुद्दा डॉ. महेंद्र शिरसाट यांनी मांडला. उपकेंद्रात सुविधा नसल्यामुळे अभ्यासक्रम सुरू करणे हितकारक नसल्याचे पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ. रामफल शर्मा म्हणाले. उपकेंद्रात पदार्थविज्ञान विभाग सुरू करण्याची गरज आहे. प्र-कुलगुरूंनी काही दिवसांपूर्वीच उपकेंद्राच्या विकासासाठी बैठक घेतली होती, असे उपकेंद्राचे संचालक डॉ. अनार साळुंके यांनी निदर्शनास आणून दिले. तर डॉ. नवनाथ आघाव यांनीही विभागासाठी आग्रही मत मांडले.

\Bपीएच. डी. याद्या लावा

\B२०१६ मध्ये घेतलेल्या 'पेट' परीक्षेतील शेकडो पात्र विद्यार्थ्यांनी 'आरआरसी' प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, अंतिम गुणवत्ता यादीत मोजक्याच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यापीठ प्रशासनाने नवीन गाइड आणि जुन्या गाइडकडील रिक्त जागांचा आढावा घेऊन नवीन यादी जाहीर करावी अशी मागणी नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) केली आहे. याबाबत प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी योगेश बहादुरे, अक्षर जेवरीकर, आनंद मगरे, सूर्यकांत नाईक, गणेश आठाव, सूरज लोंढे आदी उपस्थित होते.

\Bजुन्या अभ्यासक्रमावर प्रश्न ?

\Bयांत्रिकी अभियांत्रिकीच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारले जात आहेत. मागील तीन सत्रांपासून हा प्रकार घडत आहे. मशिन ड्रॉइंग विषयाच्या पेपरमध्ये या चुका घडतात. अनेकदा निवेदने देऊनही प्रकार थांबला नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना गुण द्यावे अशी मागणी 'एसएसयूआय'ने केली आहे. याबाबत परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा शुल्क कॉलेजांनी हडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ओरंगाबाद

राज्य सरकारने शुल्कमाफीची रक्कम दिल्यानंतरही हे शुल्क विद्यार्थ्यांना न देणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करावी, अशी मागणी शनिवारी मराठवाडा लॉ कृती समितीने उच्च शिक्षण सहसंचालकांकडे केली.

मराठवाड्यात दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी पुढे आली. यंदाप्रमाणे २०१४-१५मध्येही राज्यशासनाने परीक्षा शुल्कमाफीची घोषणा केली. मात्र, शुल्कमाफीचा प्रत्यक्ष फायदा विद्यार्थ्यांना झालाच नाही. २०१५-१६ शैक्षणिक वर्षात परीक्षा शुल्क माफीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कॉलेजांना तब्बल चार कोटी ५४ लाख रुपये वितरित करण्यात आले. मात्र, कॉलेजांनी हे शुल्क विद्यार्थ्यांना परत न करता परस्पर हडपले. अशा कॉलेजांवर तत्काळ करावी. येत्या पंधरा दिवसात संबंधित विद्यार्थ्यांना हे शुल्क परत न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांनी दिला. यावेळी नवनाथ देवकते, राम टकले, रवी गीते, विश्वजित बडे, अजहर पटेल, अशफाक पठाण, ऋषभ लोहाडे, मनीषा हाडे, शिल्पा मुंडे, ऋचा कुलकर्णी, अलका मुंडे, पराग रणदिवे, अजय मरसाळे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘देवगिरी’ राज्यस्तरीय स्पर्धेची सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देवगिरी कॉलेजमध्ये विनायकराव पाटील स्मृती समारोहानिमित्त आयोजित आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय काव्यवाचन, वक्तृत्व, वादविवाद, सुगम गायन स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक सोहळा उत्साहात पार पडला.

कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी, लेखक, अनुवादक डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी पंडितराव हर्षे होते. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे, डॉ. पी. व्ही. अष्टेकर, डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. संदीप धिरडे, उपप्राचार्य डॉ. सी. एस. पाटील, डॉ. दिलीप खैरनार, डॉ. अनिल आर्दड, संयोजक प्रा. संभाजी कमानदार, प्रा. आर. बी. गरुड, मनोज जयस्वाल, प्रा. सुरेश लिपाने यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. तौर म्हणाले, 'मी या स्पर्धेचा सात वर्ष स्पर्धक होतो. या स्पर्धेने मला ओळख दिली. महाविद्यालयीन शिक्षकांनी केलेले संस्कार आयुष्यभर शिदोरी म्हणून पुरणार आहेत.' यावेळी स्पर्धक विजेते नितीन जाधव, अभय पिंगळे, भक्ती पवार, अनिकेत म्हस्के या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र पाटील, डॉ. जीजा शिंदे यांनी केले. तर आभार प्रा. कृष्णा लांडगे यांनी मानले.

\Bविजेते असे आहेत...\B

वादविवाद सांघिक.... सागर शितोळे, प्रसाद जगताप

प्रथम....................प्रसाद जगताप

द्वितीय...................दीक्षा सावंत

तृतीय....................विजय वाकळे

उत्तेजनार्थ...............सागर शितोळे, वैष्णवी मुळे

\Bवक्तृत्व स्पर्धा...\B

प्रथम..... अनिकेत म्हस्के

द्वितीय.... हर्षद औटे, दीक्षा सावंत

तृतीय..... सिद्धेश मिसाळ

उत्तेजनार्थ.. रोहित गिरी, नमिता पाटील

\Bकाव्यवाचन... \B

प्रथम...... नितीन जाधव

द्वितीय..... लक्ष्मण गोडसे, अनिल राठोड

तृतीय.......आकांक्षा साळवे, अभय पिंगळे

उत्तेजनार्थ...शंकर शिंदे, गुंजन पाटील

\Bसुगम गायन...\B

प्रथम..........भक्ती पवार

द्वितीय.........प्रज्ञा वानखेडे

तृतीय..........प्राची खोत

उत्तेजनार्थ......पायल सरकटे, श्रावणी मुधळवाडकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील बागायती शेती धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शेतीच्या सिंचनासाठी बांधलेल्या धरणांचे पाणी शहरे पळवत आहेत. धरण बांधताना पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापर विचारात नव्हता. मात्र, पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी पाणी आरक्षित करण्यात आले. या धोरणामुळे धरणाच्या लाभक्षेत्रात कोरडवाहू क्षेत्र वाढले असून, बागायती शेती धोक्यात आहे' असे प्रतिपादन जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी केले. ते कार्यशाळेत बोलत होते.

मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय दुष्काळ निवारण कार्यशाळा घेण्यात आली. मौलाना आझाद संशोधन केंद्रात शनिवारी दुपारी कार्यशाळा झाली. यावेळी मंचावर विभागीय भूजल सर्वेक्षणचे उपसंचालक पी. एल. साळवे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, प्रा. प्रदीप पुरंदरे, सुहास आजगावकर, कृषी अभ्यासक प्रकाश उगले, परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, ज्ञानेश्वर हुनवते, मनोहर सरोदे आणि जिल्हाध्यक्ष कल्पना निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. 'औरंगाबाद जिल्हा जलविकास आणि व्यवस्थापन' या विषयावर प्रा. पुरंदरे यांनी मार्गदर्शन केले. 'जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची संख्या चार हजार ५८३ आहे. मोठे, मध्यम, लघु प्रकल्प, पाझर तलावर, शेततळी, कोल्हापूर बंधारे यांचा त्यात समावेश आहे. यातून ७३६ दलघमी पाणी साठणे अपेक्षित आहे. २४९ प्रकल्प बांधकाम अधीन असून ते पूर्ण झाल्यास ४५५ दलघमी पाणीसाठा वाढणार आहे. स्वातंत्र्यानंतर जलसाठे वाढवण्यात आले. सद्यस्थितीत प्रकल्पांचे व्यवस्थापन व समन्यायी पाणी वाटप गरजेचे आहे. कारण प्रकल्पांची संख्या अधिक असली तरी पुरेसे पाणी मिळत नाही. निर्मिलेल्या प्रकल्पांकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने पाणी टंचाई आहे. जलस्रोतांचे सबलीकरण झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. जैवविविधता, सेंद्रीय शेती, सौर उर्जेचा वापर, भूजल व वाळू उपसा नियमन आवश्यक आहे' असे पुरंदरे म्हणाले. जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प, ५१ लघु प्रकल्प आमि ७९२ कोल्हापुरी बंधारे अशी भक्कम संख्या दिसत असली तरी सिंचनाची स्थिती वाईट असल्याकडे पुरंदरे यांनी लक्ष वेधले.

'मराठवाड्यात १५० दलघमी पाण्याची तूट आहे. राज्याचे जलव्यवस्थापन होणे गरजेचे होते. मात्र, जल आराखडा तयार होण्यास अधिक वेळ गेला. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करावे लागतील. १२ हजार केटी वेअरला गेट नसल्यामुळे पाणी साठवता येत नाही. या परिस्थितीत मराठवाडा पाणी परिषद ७६ तालुक्यात काम करणार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून उपाययोजना करण्यात येतील' असे नरहरी शिवपुरे म्हणाले. कार्यशाळेला जल अभ्यासक, शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

\Bधरणांचे प्रदूषण रोखा

\B'जलस्रोत टिकवण्यासाठी धरणातील गाळ व प्रदूषण रोखणे आवश्यक आहे. औरंगाबाद शहराजवळील सुखना धरणात बीअर कारखान्यांचे दूषित पाणी गेले. त्यामुळे जलसाठा प्रदूषित झाला आहे. तसेच अनेक प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात अतिक्रमण वाढले आहे. या प्रकारांना विरोध करून धरणे वाचवण्याची गरज आहे' असे आवाहन प्रा. पुरंदरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी क्षेत्रातही आरक्षण द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'खासगी क्षेत्रात केवळ गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळत नाही. जात, धर्माच्या आधारावर दलित, आदिवांसी तरुणांवर भेदभाव होतो. त्यामुळे खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे,' अशी मागणी शनिवारी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केली. ते 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडी'तर्फे आयोजित कार्यशाळेत बोलत होते.

राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या विविध प्रश्नांसह कामगार, उद्योजक, विद्यार्थी, आरक्षण, महिलांचे प्रश्न इत्यादी विषयावर हॉटेल लेमन ट्री सभागृहात ही कार्यशाळा झाली. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, डॉ. विनोद कुमार, मिलिंद आढाव, सुमित भुईगळ, चेतन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत देशविदेशातील अभ्यासकांनी केलेल्या विविध विषयांवरील चिकित्सक अभ्यासाचा अहवालही सादर करण्यात आले. डॉ. थोरात म्हणाले, 'दलित, आदिवासींमध्ये बेरोजगारीचा दर मोठा आहे. त्यामुळे गरिबी, दारिद्र्य याचे प्रमाणही अधिक आहे. रोजगार नसल्याच्या कारणांचा विचार केला तर त्यात मुख्यत्वे कौशल्याधारित शिक्षणाच्या कमी असलेल्या संधी. त्यासह नोकरीच्या संधीमध्ये होणारा भेदभाव. सरकारी क्षेत्रातील नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. खासगी क्षेत्रात दलित, आदिवासी तरुणांना अनेकदा डावलण्यात येते. खासगी क्षेत्रात गुणवत्तेवर नोकरीची संधी दिल्याचे सांगितले जाते. मात्र, हे सत्य नाही. तेथेही भेदभाव होतो हे हे अभ्यासातून समोर आले आहे. हे वास्तव सरकार, खासगी क्षेत्रासमोर आम्ही अभ्यास करून मांडले आहे. रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी खासगी क्षेत्रात आरक्षण लागू होण्याची गरज आहे,' अशी मागणी थोरात यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड हजार टन कचरा पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने चिकलठाणा येथे बसवलेल्या कचरा प्रक्रिया मशीनचा वेग मंदावल्यामुळे शहरात कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुमारे दीड हजार टन सुका कचरा शहराच्या विविध भागात पडून आहे, तर ओल्या कचऱ्याची समस्या देखील तेवढीच गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने वेस्ट बीन सोल्युशन या कंपनीला बेलिंग, श्रेडिंग आणि स्क्रिनिंग मशीन बसवण्याचे व या मशीनच्या माध्यमातून ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कंत्राट दिले होते. शहरात महापालिकेचे नऊ झोन आहेत. या कार्यालयाच्या क्षेत्रात तीन मशीनचा एक संच बसवावा, असेही स्पष्ट करण्यात आले होते. यापैकी एक संच महापालिकेने चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर बसवला. तीन मशीनच्या संचाच्या माध्यमातून रोज १६ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल, असे जाहीर करण्यात आले. मात्र, या मशीनचा प्रक्रिया करण्याचा वेग मंदावला. दिवसाला सोळा टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी सात ते आठ टन कचऱ्यावरच प्रक्रिया केली जाऊ लागली. मशीनचे काम मंदावल्यामुळे त्या कंपनीकडून अन्य संच मागण्याचा निर्णय महापालिकेने स्थगित केला. त्यामुळे चिकलठाणा येथील केंद्रावरच्या त्या तीन मशीनवरच प्रक्रियेच्या कामाचा ताण वाढला. चिकलठाणा बरोबरच पडेगाव व हर्सूल येथे ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यापैकी पडेगाव येथील जागेवर प्रक्रिया केंद्र उभारण्यास शासनाने स्थगिती दिली. हर्सूल येथील जागेवर अद्याप प्रक्रियेचे काम सुरू झाले नाही.

हर्सूल येथील जागांवर प्रक्रियेचे काम सुरू न झाल्यामुळे कचऱ्याची समस्या पुन्हा एकदा गंभीर वळणावर आल्याचे मानले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुक्या कचऱ्यावर कोणत्याच प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. काही कंपन्यांनी सुका कचरा घेवून जावा असा प्रयत्न महापालिकेतर्फे केला जात होता. मात्र, काही महिन्यांपासून कंपन्यांनी देखील सुका कचरा नेणे बंद केले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात दीड हजार टनाच्यावर सुका कचरा पडून आहे. ओल्या कचऱ्याची अवस्था देखील अशीच आहे. चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्राच्या जागेवर बसविण्यात आलेल्या श्रेडिंग व स्क्रिनिंग मशीनचा वेग मंदावल्यामुळे प्रक्रिया केंद्रावर साचवलेल्या ओल्या कचऱ्याचे डोंगर वाढू लागले आहेत. या कचऱ्यावर बायोकल्चरची प्रक्रिया देखील योग्य प्रकारे होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले, त्यामुळे शहरात पुन्हा माशांचा त्रास सुरू झाला आहे.

\Bआठ दिवसांत मशीन बसवणार

\B'वेस्टबीन सोल्युशन कंपनीच्या मशीनचा वेग मंदावल्याचे लक्षात आल्यामुळे मायोवेसल्स कंपनीला त्यांच्या मशीन तातडीने आणण्याचे सांगण्यात आले होते. या कंपनीच्या मशीन १५० टन क्षमतेच्या आहेत. एका दिवसात १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता त्यात आहे. या कंपनीची बेलिंग मशीन वीस टन क्षमतेची आहे. मायोवेसल्स कंपनीच्या मशीन येण्यास सुरूवात झाली आहे. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मशीन अगोदर पाठवा असे त्या कंपनीला सांगितले आहे. आठ दिवसांत ही मशीन बसवली जाईल. त्यानंतर सुक्या कचऱ्याचा प्रश्न आटोक्यात येईल. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मशीन देखील लगेचच बसवली जाणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही मशीन देखील सुरू होईल,' असा आशावाद महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बलभीमराज गोरे यांचा राष्ट्रीय सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भोजपुरी साहित्यातील महान साहित्यकार, नाट्यदिग्दर्शक भिखारी ठाकूर यांच्या १३१ व्या जन्मोत्सवानिमित्त भोजपुरी साहित्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे होणारा हा साहित्योत्सव हिंदी, मराठीतील ख्यातनाम साहित्यिक डॉ. बलभीमराज गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रथमच विभागातील साहित्यिकाला अशा प्रकारे मान मिळाला आहे.

गोरखपूर येथील दीनदयाळ उपाध्याय विश्वविद्यालयातील संवाद भवन येथे हा साहित्योत्सव होणार आहे. यावेळी प्रो. एस. के. दीक्षित, प्रो. चित्तनिरंजन मिश्र, डॉ. उपेंद्र प्रसाद, डॉ. प्रभाकर दुबे, प्रो. श्रीनिवास सिंह, कवी अयोध्याप्रसाद वर्मा, प्रो. रामदेव शुक्ल, डॉ. रवींद्र श्रीवास्तव, सूर्यदेव पाठक, प्रो. विमलेश कुमार मिश्र, भोजपुरी समाजचिंतक वशिष्ट द्विवेदी, सौदागर सिंह आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. याच कार्यक्रमातील 'भोजपुरी नाट्य संध्या संमान समारोह' अंतर्गत डॉ. गोरे यांच्या हिंदी भाषा व साहित्यातील मौलिक योगादानाप्रीत्यर्थ 'गंगा भागीरथी साहित्य-सेवा सम्मान' प्रदान करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images