Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रस्ता दुरुस्ती जबाबदारी महावितरणवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भूमिगत केबल टाकून रस्ता दुरुस्तीची जबाबदारीही महापालिकेने आता महावितरण कंपनीवर टाकली आहे. तुम्ही काम करा आणि एकूण खर्चाच्या एक टक्का रक्कम महापालिकेला सुपरव्हिजन चार्जेस म्हणून द्या, असे पालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या आयपीडीएस योजनेअंतर्गत महावितरणतर्फे औरंगाबादमध्ये भूमिगत केबल टाकण्यात येत आहे. त्यासाठी रस्ते खोदण्याचे काम मजूरांकडून करून घेतले जाईल, असे महावितरणने पालिकेला कळविले होते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कंपनीने पालिकेकडे चार कोटीही जमा केले होते. मात्र, महावितरणकडून रस्ता खोदण्याचे काम मजुरांऐवजी जेसीबी मशीनच्या सहाय्याने सुरू होते. त्यामुळे या कामाला महापौर नंदकुमार घोडेले यांच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली. दोन महिन्यांपासून हे काम बंद आहे. याबाबत खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापालिका आणि महावितरण या संस्थांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेलेही उपस्थित होते. केंद्र सरकारच्या योजनेतून भूमिगत केबलचे काम केले जात आहे. त्यामुळे पालिकेने स्थगिती उठवावी असे खैरे यांनी सांगितले. त्यानंतर ही स्थगिती उठविण्यास पालिका तयार झाली आहे.

\Bएक टक्का घेणार

\Bकेबल टाकण्याच्या कामामुळे रस्ते खोदले जाणार आहेत. खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महावितरणने पालिकेकडे भरलेले चार कोटी पालिकेने महावितरणला परत करण्याचे ठरले. महावितरणने रस्ता खोदावा, तो दुरुस्त करावा. महापालिका दुरुस्तीचे करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. रस्ता दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी महावितरणने एक टक्का रक्कम महापालिकेला सुपव्हिजन चार्जेस म्हणून द्यावी असे बैठकीत ठरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...आणि महापालिका-महावितरणमध्ये जुंपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीज बिलाच्या थकबाकीसाठी वारंवार तगादा लावणाऱ्या महावितरणला त्याच पद्धतीने नामोहरम करण्यासाठी महापालिका सरसावली असून, वीज खांब आणि डीपी जागेचे भाडे द्या, अशी मागणी केली आहे. याबाबत नोटीस पाठवण्याचे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महापालिकेच्या जागेवर महावितरण कंपनीने वीजेचे खांब आणि डीपी बसवल्या आहेत. त्यामुळे महावितरणने या जागांचे भाडे महापालिकेला द्यावे, अशा आशयाची नोटीस ओम प्रकाश बकोरिया महापालिकेचे आयुक्त असताना महापालिकेने महावितरण कंपनीला बजावली होती. त्यानंतर या नोटीसचे प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. आता महावितरण कंपनीने पुन्हा हे प्रकरण ताजे केले आहे. शासनाने २० डिसेंबर २०१८ रोजी एक अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशानुसार वीजेचे खांब आणि डीपीच्या जागेचा कर स्थानिक स्वराज्य संस्थांना महावितरणकडून घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'शासनाने २० डिसेंबर २०१८ रोजी अध्यादेश काढला, याचा अर्थ या तारखेनंतर महापालिकेच्या जागेवर लावण्यात आलेले वीजेचे खांब आणि डीपीच्या जागेचे भाडे महापालिकेला घेता येणार नाही. मात्र, त्यापूर्वीचे भाडे महापालिकेला वसूल करता येणार आहे. त्यामुळे हा संदर्भ देत वीजेचे खांब आणि डीपीच्या जागेचे भाडे देण्याबद्दल महावितरण कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे. तसे आदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.' त्यामुळे आगामी काळात महापालिका विरुद्ध महावितरण अशी खडाजंगी जुंपणार आहे.

महापालिकेच्या वतीने वीज खांब, डीपी जागेचे भाडे वसूल करा, अशी नोटीस महावितरणला पाठविण्यात येणार आहे. तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. सरकारने अध्यादेश काढला, त्यापूर्वीच्या भाड्याची वसुली महापालिकेतर्फे केली जाणार आहे. ते भाडे महावितरणला भरावेच लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकतेविषयी आज मार्गदर्शन शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरी, ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायातील संधी कळाव्यात या हेतुने अर्जुना फाऊंडेशनतर्फे रविवारी उद्योजकता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देवगिरी अभियांत्रिकी कॉलेजच्या विश्वकर्मा सभागृहात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमामध्ये राज्य कृषी मूल्य आयोगाचे सचिव उदय देवळाणकर, एमसीईडीचे विभागीय अधिकारी सुदाम नलावडे, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाचे व्यवस्थापक आकाश अवस्थी आदी मार्गदर्शन करणार आहेत. यासह इस्कॉनचे डॉ. रोहिणीप्रिय प्रभू हे यावेळी नीतीमूल्यांची जोपासणा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. युवक-युवतींनी उपस्थित रहावे, असे आवाहन फाऊंडेशनचे श्रीकांत जोगदंड यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः सेलू-परभणी रस्त्यावरील अपघातात ३ ठार

$
0
0

औरंगाबादः सेलू-परभणी रस्त्यावरील कवडधन पाटीजवळ स्कार्पियो व मोटार सायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला आहे.

रविवारी दुपारी हा अपघात घडला. परभणीकडून येणारी स्कार्पियो गाडी व सेलूकडून येणारी मोटार सायकल एकमेकांना धडकले. या अपघातात सिद्धार्थ असाराम दवंडे (वय २८), अविनाश महादेव मकासरे (वय २८), सिद्धार्थ शेषराव मगर (वय ३०) यांचा जागीच मृत्यु झाला. तर कुलदीप आसाराम पंडागळे (वय २५) हा गंभीर जखमी झाला. जखमीला नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघात एवढा गंभीर होता की, मोटार सायकलचा चक्काचूर झाला. या घटनेचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक बलवंत जमादार करत आहेत.
सरत्या वर्षी ही घटना घडल्यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची कामे वेगात पूर्ण करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील विविध रस्त्यांची कामे प्राधान्याने लवकर अधिक गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात रविवारी घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामार्फत विभागात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.

या बैठकीसाठी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रशेखर, जिल्हाधिकारी उदय चौधरी तसेच मराठवाड्यातील महसूल, रस्ते व इतर विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी धुळे-सोलापूर महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी तुळजापूर गाव आणि त्यालगतच्या भागातील जमिनीबाबत असलेल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

या बैठकीमध्ये जालना रोडबद्दलही चर्चा झाली. गेल्या आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत जालना रोडच्या डांबरीकरणासाठी १०४ कोटी देण्यावर निर्णय झाल्यामुळे बैठकीत फार चर्चा झाली नाही. बीड बायपास विस्तारासाठी रक्कम देण्याबाबत विषय बैठकीत पुढे आला असता हा रस्ता 'बीओटी' तत्वावर असून 'एनएचएआय'कडे आलेला नाही, हा रस्ता सहा पदरी करता येईल त्यााठी डीपीआर तयार करायला सांगितल्याचे गडकरींनी स्पष्ट केले, अशी माहिती बैठकीला उपस्थित लोकप्रतिनिधींनी सांगितले.

\B१६ जानेवारीला स्कायबसचे सादरीकरण \B

शहरात १४ ते १७ जानेवारी २०१९ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जल परिषदेनिमित्त वीजेवर चालणाऱ्या बसचे उत्पादन करणारी ऑस्ट्रेलियन कंपनी बसचे सादरीकरण करणार आहे. या परिषदेला गडकरी स्वत: उपस्थित राहणार आहेत. केंद्र शासनाने या कंपनीसोबत करार केला असून जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींसमोर त्या कंपनीचे प्रतिनिधी सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर स्कायबसचा डीपीआर तयार करण्याबाबत निर्णय होईल. स्कायबसचा मुद्दा सध्या तरी नवीन असून १६ जानेवारी रोजी सादरीकरण होईल, असे विभागीय आयुक्त डॉ.भापकर यांनी सांगितले. जालना रोड, बीड बायपासवर फार चर्चा झाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाख विद्यार्थ्यांनी जाणून घेतले करीअर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करीअरच्या दिशा जाणून घेण्यासाठी विभागातील सव्वालाख विद्यार्थ्यांनी 'कलचाचणी व अभिक्षमता कसोटी'ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यंदा प्रथमच 'मोबाइल अॅप' द्वारे होणाऱ्या प्रक्रियेत पालकांचीच मदत शाळा घेत आहेत. अनेक पालकांनी शाळांच्या अवाहानाला प्रतिसाद दिला. तर, शिक्षण विभाग, शाळांनी नियोजनाची जबाबदारी घ्यायला हवी, अशी भूमिका पालकांची आहे. असे असले तरी विभागातील ७५ टक्के कलचाचणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

दहावीनंतर करीअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरावे या हेतुने कलचाचणी घेण्याचा निर्णय झाला. सुरुवातीला ऑफलाइन, मागील वर्षी संगणकीय तर यंदा मोबाइल अॅपद्वारे प्रक्रिया केली जात आहे. १८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या प्रक्रियेत बारा दिवसात औरंगाबाद विभागातील १ लाख ८२ हजार दहावीच्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख २६ हजार २०७ विद्यार्थ्यांनी कलचाचणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अॅप न दिसणे, पासवर्ड याबाबत सुरुवातीला अनेक शाळांमध्ये अडचणी आल्या. त्यात विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळेकडे स्मार्टफोन नसल्याने थेट विद्यार्थ्यांमार्फत पालकांना गळ घातला जात आहे. त्यामुळे प्रक्रियेसाठी पालकांचीही तारांबळ उडते आहे. शालेय शिक्षण, राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) व व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया होत आहे. यंदा प्रथमच कलचाचणीला 'अभिक्षमता चाचणी' जोडण्यात आली आहे. ज्यामध्ये आवडीचे क्षेत्रासाठी आवश्यक त्या क्षमता मानसशास्त्रीय चाचण्याद्वारे जाणून घेता येते.

या क्षेत्रातील जाणून घेता येणार कल

कला, वाणिज्य, कृषी, तांत्रिक, संरक्षण सेवा, आरोग्य विज्ञान, ललित कला अशा सात क्षेत्रातील कल विद्यार्थ्यांना जाणून घेता येत आहे. सुरुवातीला पाच क्षेत्राचा कल जाणून घेण्याबाबत ही चाचणी महत्त्वपूर्ण ठरली. मागील वर्षी यात आणखी संरक्षण आणि कृषी क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. एकूण दीड तासाच्या चाचणीत सुरुवातीला कलचाचणीत १४० प्रश्न विद्यार्थ्यांना ७५ मिनीटांमध्ये सोडवायचे आहेत. तर, 'अभिक्षमता चाचणी'साठी तेवढाच कालावधी देण्यात आला आहे. दहावीच्या निकालासह विद्यार्थ्यांना आपल्या कलचाचणी व अभिक्षमता चाचणीचा निकाल दिला जाणार आहे. २०१५-१६मध्ये १५ लाख ४७ हजार विद्यार्थ्यांनी, २०१६-१७ मध्ये १६ लाख ६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी तर २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षामध्ये १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती.

..

राज्यातील एकूण विद्यार्थी संख्या.......१७३६२७१

आजपर्यंत कलचाचणी दिलेले एकूण विद्यार्थी....९४९०१६

शाळांची संख्या.............................. १८४१२

..

औरंगाबाद विभाग ...१२६२०७

लातूर विभाग ...७३१०४

..

कलचाचणी व अभिक्षमता चाचणीमुळे विद्यार्थी त्यांच्या आवडी सोबतच त्यांच्या अंगी असणाऱ्या कोणत्या अभिक्षमता आहेत, हे ओळखू शकणार आहेत. करीअर निवडीची प्रक्रिया आवड आणि क्षमता असणाऱ्या क्षेत्रातील संधींचा शोध घेणे आहे. तर अभिक्षमता चाचणी भाषिक, सांख्यिकीय, अवकाशीय आणि तार्किक या चार क्षमतांचे मापन करणारी आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदाच होईल.

विजय पाटोदी,

मुख्याध्यापक, पी. यु. जैन माध्यमिक विद्यालय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मांध शक्तीला दूर ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत आहे. या पद्धतीला धोका निर्माण करतील अशा शक्तीला दूर लोटले पाहिजे. धर्मांध प्रवृत्ती समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सतत करीत आहेत. कारण त्यात त्यांचे हित दडले आहे,' असे प्रतिपादन साहित्यिक टी. एस. चव्हाण यांनी केले. ते साहित्य संमेलनात बोलत होते.

पहिले राज्यस्तरीय भटके विमुक्त आदिवासी साहित्य संमेलन रविवारी झाले. मौलाना आझाद संशोधन केंद्रात सकाळी झालेल्या उदघाटन कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष साहित्यिक टी. एस. चव्हाण, महापौर नंदकुमार घोडेले, माधवराव बोर्डे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, के. ओ. गिऱ्हे, जनाबाई गिऱ्हे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, अंबादास रगडे, डॉ. शरदचंद्र वानखेडे, अमीनभाई जामगावकर, संजय पवार, प्राचार्य हसन इनामदार, डॉ. नारायण पंडुरे उपस्थित होते. भटक्यांच्या सद्यस्थितीवर चव्हाण यांनी भाष्य केले. 'समाजात अडाणी व अंधश्रद्धा असल्यास धर्मांधाची दुकानदारी व्यवस्थित चालते. या व्यवस्थेला छेद देणाऱ्या विचारवंतांची हत्या झाली. या घटना फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा असलेल्या महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत. या परिस्थितीत भटक्या समाजात प्रबोधनाची गरज आहे. या समाजासाठी संत तुकारामांचे साहित्य महत्त्वाचे आहे. साहित्य समजून घेतल्यास भटके विमुक्त आदिवासी खऱ्या दुनियेत पाऊल टाकतील' असे चव्हाण म्हणाले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात 'आमचं जगणं आमचं साहित्य' या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादात प्रा. द्रोपदी पंदिलवाड, डॉ. सुनीता पवार, प्रा. श्रीकांत मुद्दे, प्रा. सुनील चौगुले, प्रा. दयाराम गव्हाणे, डॉ. नवनाथ गोरे, डॉ. श्रावण रॅपनवाड, प्रा. शिवाजी वाठोरे व प्राचार्य के. जे. त्रिभुवन यांनी सहभाग घेतला. त्यानंतर प्राचार्य ग. ह. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन रंगले. आनंदा साळवे, प्रा. मनीषा पाटील व प्रा. मीना कुसाळकर यांनी कथा सादरीकरण केले. ना. तु. पोघे यांच्या अध्यक्षतेखालील कविसंमेलनात प्रभावती गोंधळी, विष्णू सलामपुरे, अय्यूब पठाण, डॉ. गजानन घोगटे, लता मुसळे, सुरेश वडर, सचिन चव्हाण आदी कवी सहभागी झाले. तर साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या उपस्थितीत सायंकाळी संमेलनाचा समारोप करण्यात आला. या संमेलनासाठी दुर्गादास गुडे, धनंजय जगताप, तोताराम जाधव, आर. जी. देठे, समाधान दहिवाळ, के. जे. त्रिभुवन, प्रा. प्रकाश वाघमारे, प्रा. रमेश जायभाये आदींनी परिश्रम घेतले. यावेळी साहित्य रसिक उपस्थित होते.

\Bभटक्यांच्या हत्या भयावह

\B'औद्योगिकरणामुळे भटक्याचे पारंपरिक व्यवसाय बंद पडले. जगण्याच्या हक्कापासून वंचित झालेला समाज हतबल झाला आहे. राईनपाडा येथे भटक्या समाजातील पाच लोकांची हत्या, पडेगाव येथे बहुरुप्याची हत्या, मनमाडला वैदू तरुणाची हत्या, लातूर येथे वडार समाजातील तरुणाची हत्या झाली. या हत्या भयावह आहेत,' असे चव्हाण भाषणात म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी संस्थेचा ‘मदती’चा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यशासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला मिळणारा कमी प्रतिसाद लक्षात घेऊन एक खासगी संस्था ही प्रक्रिया राबवून देऊ, असे सांगत पुढे आली आहे. हा प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत ठेवला जाण्याची शक्यता आहे. कागदपत्रांची पूर्तता करून नगररचना विभागाकडे प्रस्वात दाखल करण्याची प्रक्रिया ही संस्था करेल, असे सांगितले जात आहे. मात्र, कमी प्रतिसादाच्या नावे खासगी संस्थेला याप्रकारे काम देणे नागिरकांसाठी अडचणीचे ठरू शकते, अशी चर्चा पालिका वर्तुळात आहे.

शहरातील अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नवीन धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. मात्र, जनजागृतीचा अभाव आणि किचकट प्रक्रियेमुळे नागरिकांसाठी ही प्रक्रिया अडचणीची ठरत आहे. त्यामुळे या योजनेला प्रतिसाद कमी असल्याचे समोर आले आहे. आता या प्रक्रियेसाठी खासगी संस्था पुढे आली आहे. ही प्रक्रिया आम्ही सुरळीत करून देऊ, असा दावा या संस्थेने केला असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठीच्या परवानगीसाठी संस्थेने पालिकेकडे तसा प्रस्ताव दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ही संस्था कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून नगररचना विभागाकडे प्रस्ताव करेल, यामुळे नियमितीकरणाला गती मिळेल, असा दावा केला जात आहे.

खासगी संस्थेकडे काम दिल्यास त्याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. महापालिकेकडे यासाठी स्वतंत्र कक्ष असतानाही प्रक्रियेसाठी खासगी संस्थेची मदत घेणे अयोग्य असल्याची चर्चा आहे. नियमितीकरणासाठी लागणारे शुल्क हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यानेही नागरिक योजनेला प्रतिसाद देत नसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर पालिका सभागृहाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गुंठेवारीप्रमाणे नाममात्र शुल्क आकारून अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव सहा ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत घेतला. यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२-क नुसार अनाधिकृत बांधकामांना नियमित करता येते.

\Bमहापौरांकडे संस्थेचा प्रस्ताव \B

नागरिकांपर्यंत जनजागृती करण्यात पालिका प्रशासन अकार्यक्षम ठरत आहे. यावरूनच अनाधिकृत मालमत्ता अधिकृत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची मालमत्ताधारकांकडून पूर्तता करून वसाहतीनिहाय नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यासाठी राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने पालिकेकडे परवागनी मागितली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव संस्थेने महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे सादर केला असून त्यांनी नगररचनाकडे पाठविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

\Bआर्थिक लूट होण्याचा धोका\B

ही प्रक्रिया खासगी संस्थेकडे सोपविण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. अनधिकृत मालमत्ता अधिकृत करण्यासाठी करावी लागणारी सर्व कागदोपत्री कार्यवाही नागरिकांकडून पूर्ण करून त्यासंबंधीची संचिका तयार करण्यासाठी ही संस्था नागरिकांकडून शुल्क घेणार आहे. हे शुल्क जास्तीचे आकारून नागरिकांची आर्थिक लूट होण्याचा धोका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशी वाणांची शेती अन् प्रक्रिया उद्योगातूनच संपन्नता शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या सात वर्षांपासूनचा दुष्काळ व जोडीला मराठवाड्यामध्ये नेहमीच असलेली पाणीटंचाई, बियाणे-खत-किटकनाशकांसाठी करावा लागणारा भला मोठा खर्च आणि त्यातच कापूस, मका व सोयाबीन या मराठवाड्यातील प्रमुख पिकांचे प्रक्रिया उद्योग विदेशात, या एकूणच स्थितीमुळे शेती व शेतकरी कायम अडचणीत असतो. त्याऐवजी कमी पाण्यात व खत-किटकनाशकांशिवाय सहजतेने आपल्या मातीत येणाऱ्या देशी वाणांमु‍ळेच शेती टिकू शकेल आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांमुळ‍ेच खऱ्याअर्थाने अर्थ संपन्नता येऊ शकेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे सचिव उदय देवळाणकर यांनी केले.

अर्जुना फाऊंडेशनच्या वतीने युवकांसाठी उद्योजकतेविषयीचे सत्र रविवारी (३० डिसेंबर) देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाचे व्यवस्थापक अनिल वाघमारे, इस्कॉनच्या शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. रोहिणीप्रिय प्रभू, अर्जुना फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत जोगदंड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. देवळाणकर म्हणाले, मराठवाड्यात ६०० ते ७०० मिलीमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना यंदा मराठवाड्यात केवळ ४५० मिलिमिटर इतका पाऊस झाला आहे. तसेच दरडोई पाण्याचे शास्त्रीय मोजमाप केले तर अतिशय काळजीची स्थिती असल्याचे लक्षात आल्याशिवाय राहात नाही. त्यातच गेल्या सात वर्षांपासून दुष्काळ आहे व त्याचा फटका मराठवाड्यासारख्या भागाला जास्तच बसतो. तसेच सद्यस्थितीत मराठवाड्यात कापूस, मका, सोयाबीन ही पिके प्रामुख्याने घेतली जातात, ज्यांचे बहुतांश प्रक्रिया उद्योग हे विदेशात आहे. त्यामुळे ज्या देशात प्रक्रिया उद्योग आहेत, ते देश संपन्न होत आहेत, तर घाम गाळणारा आपला शेतकरी अजूनही फाटकाच आहे. इंग्रजांच्या काळापासूनची ही स्थिती थोड्या-बहुत फरकाने आजही कायम आहे. पुन्हा त्यासाठी शेतकऱ्याला बियाणे-खते-किटकनाशकांसाठी भला मोठा खर्च करावा लागतो. ते सगळे करुनही मराठवाड्यातील शेती व शेतकरी अडचणीतच आहे. त्यामुळेच राई, भगर, ज्वारी, बाजरी, मूग, हुलगी, कुळीत, तीळ, जवस, करडई, भूईमूग अशा पारंपरिक व देशी पिकांकडे शेतकऱ्यांना वळण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. देशी वाणांमुळेच आपली शेती टिकू शकेल, असे एका महत्वपूर्ण राष्ट्रीय सर्वेक्षणातही समोर आले आहे. ही आपलीच पूर्वापार पिके असल्यामुळे त्यांना खत-किटकनाशकांची गरज राहणार नाही. याचा गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांनी देशी वाणांच्या शेतीकडे वळले पाहिजे, असे मतही देवळाणकर यांनी व्यक्त केले. तरुणांना मार्गदर्शन करताना डॉ. रोहिणीप्रिय प्रभू म्हणाले, आत्मविश्वास, सकारात्मकता, कष्ट, सोशिकता या गुणांच्या आधारेच तरुणांना यशस्वी आयुष्य जगता येईल. व्यसनांमध्ये न अडकता स्वतःसह कुटुंब, समाज, देशाची प्रगतीसाठी सज्ज व्हा, असेही आवाहन डॉ. रोहिणीप्रिय प्रभू म्हणाले. याच कार्यक्रम सेंद्रीय शेती, गटशेती, उद्योग क्षेत्रामध्ये योगदान देणारे भाऊसाहेब थोरात, अजय राजे जाधव, परमेश्वर साळुंके, बाळासाहेब जीवरग, शिवाटी पाटील बनकर यांचा गौरव करण्यात आला. वाघमारे तसेच जोगदंड यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. महेश अचिंतलवार

\Bजवसाचे तेल ९ हजार रुपये लिटर

\Bपंचतारांकित हॉटेलांमध्ये तसेच वेगवेगळ्या केंद्रांमध्ये मसाजसाठी जवसाचे तेल वापरले जाते. मसाजसाठी हे तेल केवळ ५० ग्राम वापरले जाते, ज्याची किंमत सुमारे ४५० रुपये असते. याचाच अर्थ ९ हजार रुपये लिटरने जवसाचे तेल विकले जाते. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे जवसाच्या तेलाचा प्रक्रिया उद्योग आपल्याकडे नाहीत. अशा तेलांचे व आपल्या देशी वाणांच्या शेतीतून तयार झालेल्या मालावर आधारित प्रक्रिया उद्योग जर आपल्या तरुणांनी सुरू केले, तर शेतकरी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही, असेही देवळाणकर आपल्या भाषणात म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ

$
0
0

\B……Abdulwajed.Shaikh@timesgroup.com

....

पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे. अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे. राज्य सरकारने यंदा ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. वृक्ष लागवड, संगोपन व एकूणच यामागील विचारधारा वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी 'मटा'कडे स्पष्ट केली.

.....

\B

\B

गेल्या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट होते, त्यात किती यश मिळाले? हे काम फक्त उद्दिष्टपूर्तीसाठीच केले जाते का?\B

-लोकसहभाग, विविध संस्था तसेच शासकीय यंत्रणेच्या पाठपुराव्यामुळे १३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करता आहे. प्रतक्षात १५ कोटी ८० लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आगामी काळात निश्चितच आणखी यश मिळेल, याची खात्री आहे.

खरे तर वृक्षरोपण किंवा वृक्ष लागवड फक्त उद्दिष्टपूर्ती करिता करू नये. शासनानेही याबद्दल ‌खूप विचार करून काही धोरण ठरवले आहे. वृक्षरोपण केलेली जागा अक्षांश-रेखांशाच्या माध्यमातून निश्चित केली आहे. लागवड केलेल्या झाडाची वाढ फोटोसह महाफॉरेस्टच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येते. या संकेतस्थळावर कोणीही झालेल्या कामाची पाहणी करू शकतो. वर्षातून दोनदा वृक्षारोपण झालेल्या जागेचे फोटो उपलब्ध करून दिले जातात. वृक्ष लागवड उपक्रमावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासन नजर ठेवत आहे.

……

\B

वृक्ष लागवडीवर कोट्यवधींचा खर्च होत असताना दुसरीकडे वृक्षतोड वाढत आहे. त्याला अटकाव का केला जात नाही?

\B

-वृक्ष लागवड जेवढी महत्त्वाची, तेवढेच वृक्ष संवर्धनही महत्त्वाचे आहे. यासाठी देशभरात महाराष्ट्र शासनाने 'फॉरेस्ट इमरजन्सी' ही कल्पना अस्तित्वात आणली आहे. जसे 'इमरजन्सी'मध्ये पोलिसांना बोलावण्यासाठी १००, रुग्णवाहिकेसाठी १०८ आणि अग्निशामन दलासाठी १०१ हा फोन क्रमांक देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे 'फॉरेस्ट इमरजन्सी'साठी १९२६ हा फोन क्रमांक देण्यात आला आहे. हा टोल फ्री क्रमांक असून यावर जंगलातील आग, अवैध वृक्षतोड, चराई आणि शिकारीबद्दल थेट तक्रार करता येते. या क्रमांकावर कॉल केल्यानंतर तक्रारदाराने संबंधित घटनेची माहिती दिल्यानंतर, ती लगेच संबंधित वनक्षेत्र अधिकारी किंवा वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवण्यात येते. संबंधित प्राधिकरण किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीवर काय कारवाई केली? याची माहिती तक्रारदाराला कळवण्यात येते. यामुळे अवैध वृक्षतोड, चराईला आळा बसून धाक निर्माण होईल.

\Bनूतन वर्षात काय उद्दिष्ट आहे? मराठवाड्यातील दुष्काळ पाहता ते शक्य आहे का? \B

-नूतन वर्षात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १ जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान ही वृक्ष लागवड केली जाणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र, 'सुजलाम सुफलाम' करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. सध्या लागवड केलेले झाड, आपल्यासाठी नसते तर पुढील पिढीसाठी उपयोगी असते. यंदा नद्यांच्या दोन्ही बाजुने व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. नदीच्या दुतर्फा झाडे लावल्यास नदीकाठची गावे, शेती समृद्ध होईल. भूजल पातळीत वाढ होईल. पाण्यासोबत वाहून येणाऱ्या मातीमुळे धरणात गाळ जमा होतो. पाणलोट क्षेत्रात झाडे लावल्यामुळे गाळाचे प्रमाण कमी होईल आणि धरणात जादा पाणीसाठा होईल.

\B………

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीतून काय लाभ होऊ शकतो? \B

- होय, निश्चितच लाभ मिळेल. यंदा आम्ही शेतकऱ्यांना तुतीची झाडे लावण्याचे आवाहन करत आहोत. तुतीची पाने रेशीम किड्यांचे खाद्य असतात. यामुळे रेशीम उद्योगाला चालना मिळेल, त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल. तसेच फळझाडे लागवडीमुळे शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.

\Bसर्वसामान्य नागरिकांना वृक्ष लागवड अभियानात कसे सहभागी करून घेतले जाते? \B

-आधी सांगितल्याप्रमाणे 'फॉरेस्ट इमरजन्सी' ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. तसेच हरित सेना (ग्रीन आर्मी) स्थापन केली आहे. ही संकल्पना राबविणारे आपले राज्य पहिलेच आहे. देशाचे संरक्षण करण्यासाठी सैन्य दल आहे, त्याच प्रमाणे पर्यावरण रक्षण, वृक्षसंवर्धनासाठी हरित सेना स्थापन केली आहे. राज्यातील ५८ लाख नागरिकांनी आतापर्यंत हरित सेनेकरिता नोंदणी केली आहे. या स्वयंसेवकांमार्फत वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड केली जाणार आहे. एक कोटी स्वयंसेवक नोंदणीचे उद्दिष्ट आहे. 'महाफॉरेस्ट' या संकेतस्थळावर कोणालाही हरित सेनेसाठी नोंदणी करता येते. त्यांना प्रशिक्षण, प्रमाणपत्र देण्याची योजना आहे. या माध्यमातून नागरिकांना वृक्ष चळवळीत सामील करून घेण्याचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानकासमोरून दुचाकीची चोरी, आरोपीस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बसस्थानक परिसरातील दुकानासमोर उभी केलेली दुचाकीच्या चोरी प्रकरणातील आरोपी मोहमंद अनिस उर्फ बोक्या मोहमंद हनिफ याला शनिवारी (२९ डिसेंबर) रात्री अटक करण्यात आली. त्याला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता आरोपीला मंगळवारपर्यंत (१ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी दिले.

या प्रकरणी योगेश बाबुराव रगडे (३०, रा. गुरुसाक्षी सोसायटी, फत्तेपूर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २९ डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी हा शिर्डीला जाणाऱ्या गाडीची विचारपूस करण्यासाठी दुचाकीवर मध्यवर्ती बसस्थानकावर आला होता. त्याने आपली दुचाकी मध्यवर्ती बसस्थानकासमोरच्या भागात असलेल्या एका दुकानासमोर उभी केली आणि तो गाडीची विचारपूस करण्यासाठी बसस्थानकात गेला. तेवढ्यात फिर्यादीच्या दुचाकीची चोरी झाली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी मोहमंद अनिस उर्फ बोक्या मोहमंद हनिफ (३२, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) याला शनिवारी अटक करण्यात आली. त्याला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीने यापूर्वी दुचाकी चोरीचे काही गुन्हे केले आहेत, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का, आदींबाबत तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वत:च्या जगण्यातून लेखन उमटते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ललित लेखन स्वत:च्या जगण्यातून अभिव्यक्त होते. या आत्मपर लेखनात उसने अनुभव मांडल्यास अनेकदा फजिती होते. लेखकाने मानवी जीवनाचा अभ्यास करून स्वत:च्या दृष्टिकोनातून मांडणी करावी,' असे प्रतिपादन ज्येष्ठ कथाकार उत्तम बावस्कर यांनी केले. ते साहित्य संमेलनात बोलत होते.

साहित्य काव्यगंध प्रतिष्ठानचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवारी उत्साहात पार पडले. महसूल प्रबोधिनी सभागृहात आयोजित उदघाटन कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष कवी दुर्गेश सोनार, आमदार अतुल सावे, समीक्षक प्रा. पृथ्वीराज तौर, कवी डॉ. पी. विठ्ठल, कथाकार उत्तम बावस्कर, के. एस. अतकरे, डॉ. दैवत सावंत, सागरराजे निंबाळकर, अशोक काळे, राज रणधीर, सायराबानो चौगुले, जे. के. जाधव व मुरलीधर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. नवीन पिढीतील लेखकांच्या लेखन प्रक्रियेवर बावस्कर यांनी विचार मांडले. 'नवोदित लेखकांनी चांगल्या ग्रंथांचे वाचन करावे. 'असाध्य ते साध्य' उक्तीची आठवण ठेवून लेखन प्रवास करावा. विशेषत: माणसाच्या मनोव्यापाराचा चांगला अभ्यास करावा' असे बावस्कर म्हणाले.

'आपल्या ठायी संवेदनशीलता असलेले लेखक चांगले लेखन करतात. कारण ज्याला माणूस कळला त्याला साहित्य कळले. मानवी जीवन मूळापासून समजून घेतल्यास साहित्याचे आकलन होईल' असे डॉ. पृथ्वीराज तौर म्हणाले. युवा जाणिवा समजून घेण्याची गरज अध्यक्ष दुर्गेश सोनार यांनी व्यक्त केली. 'युवा जाणिवा समजून घेणे आव्हानात्मक आहे. साहित्य तरुणांना आपल्या कवेत पकडते का याचा विचार झाला पाहिजे' असे सोनार म्हणाले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते डॉ. दैवत सावंत संपादित 'कथा नवलेखकांच्या' या पुस्तकाचे आणि डिजिटल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

स्व. नारायणराव डांगे स्मृती साहित्यप्रभा पुरस्काराने डॉ. पृथ्वीराज तौर यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. विद्या सुर्वे-बोरसे, डॉ. शरयू शहा, कवी आकाश देशमुख यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. या साहित्य संमेलनानिमित्त घेतलेल्या कथा व कविता लेखन स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली. संदीप ढाकणे व आशा डांगे यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनासाठी ज्योती सोनवणे, मीनाक्षी राऊत, भारती सोळंके, गजानन काळे, राजेश खाकरे, संजय घोगरे, अविनाश वाघमारे, धनराज भुमरे, अवधूत ठोंबरे व चंद्रकांत आव्हाड यांनी परिश्रम घेतले. यावेळी साहित्य रसिक उपस्थित होते.

\Bपरिसंवाद, कविसंमेलन रंगले

\B'साहित्य काव्यगंध'च्या संमेलनाला ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. दुपारच्या सत्रात 'समाजमाध्यमे व वाचन संस्कृती' या विषयावर परिसंवाद रंगला. या परिसंवादात डॉ. पी. विठ्ठल, डॉ. संध्या मोहिते, डॉ. चतुर्भुज कदम व डॉ. प्रशांत गौतम सहभागी झाले. तीन वेगवेगळ्या कविसंमेलनात प्रत्येक पिढीतील कवींनी दर्जेदार कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशव्यापी संपात सामील होण्याचा निर्धार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्या अस्तित्वात असलेले ४४ कामगार कायदे मालकांच्या दबावाखाली रद्द करून मालक धार्जिने चार लेबर कोड तयार करण्याचे षडयंत्र थांबवावे, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करू नये, यासह इतर मागण्यांसाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध देशातील दहा मध्यवर्ती कामगार संघटना आणि ५२ अखिल भारतीय फेडरेशन्सने आठ व नऊ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात सहभागी होण्याचा निर्धार रविवारी (३० डिसेंबर) मेळाव्यात घेण्यात आला.

देशव्यापी कामगार संपाच्या प्रचारासाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आयोजित कामगार मेळाव्यास निमंत्रक अॅड. उद्धव भवलकर, 'सीटू'चे लक्ष्मण साक्रुडकर, 'आयटक'चे राम बाहेती, 'इंटक'चे एम. ए. गफार तसेच अली खान, एन. एस. कांबळे, रंजन दाणी, सुरेश करपे, बस्वराज पटणे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अॅड. भवलकर यांनी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे सामान्य कामगार, मजुरांसमोर येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला. 'या संपात मजूर, शेतकरी, कर्मचाऱ्यांची एकजूट महत्त्वाची आहे. केंद्रातील मोदी सरकारने तरुणांना रोजगाराची सर्व आश्वासने फोल ठरली आहेत. आज सरकारी क्षेत्रामधील २४ लाख पदे रिक्त असून गेल्या चार वर्षांत ७० लाख जणांना रोजगार गमवावा लागला. सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण करण्यात येत आहे, याचे ठळक उदाहरण 'बीएसएनएल' आहे. आज कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांएवढेच काम करावे लागते, मात्र त्यांच्या हातात कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे 'समान काम समान वेतन' ही आमची मागणी आहे. हा देशव्यापी संप यशस्वी करावा,' असे आवाहन अॅड. भवलकर यांनी केले. देशभरात मोबाइल सेवेचा विस्तार केवळ 'बीएसएनएल'मुळे झाला. आज देशात ८० कोटी लोकांच्या हातात मोबाइल आला. मात्र यातील केवळ दहा टक्के लोकांकडे 'बीएसएनएल'चा ग्राहक आहे, असे रंजन दाणी यांनी सांगितले.

\Bविभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा\B

येत्या आठ नेवारी सकाळी ११ वाजता क्रांतीचौकातून कामगारांच्या विविध मागण्यांसदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. नऊ जानेवारी रोजी सकाळी ११ ते तीन या वेळेत क्रांतीचौकात कामगार-कर्मचाऱ्यांचे विशाल धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धम्मात प्रज्ञा करुणेचा संयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'धम्म हा जगातील मानवाच्या समस्येवरील उपाय आहे. जगात बुद्धिवादी अनेक असले तरी करुणेचा अभाव आहे. बुद्ध धम्म म्हणजे प्रज्ञा आणि करुणेचा संयोग आहे' असे प्रतिपादन प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले. ते व्याख्यनात बोलत होते.

सदधम्म उपासक संघाच्या वतीने 'आंबेडकरी धम्मक्रांती : आकलन आणि वाटचाल' या विषयावर धम्मसभा घेण्यात आली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाला प्रा. गौतमीपुत्र कांबळे, अनिलकुमार सोनकांबळे, भंते सुदत्त बोधी, दिनकर ओंकार, मुकुंद सोनवणे आणि सिद्धार्थ मोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. धम्माच्या वाटचालीवर कांबळे यांनी भाष्य केले. 'माणसाला गुलामीमुक्त, शोषणमुक्त आणि दुःखमुक्त करणे धम्माचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेले कार्य हेच खरे धम्म कार्य आहे. केवळ पूजा-पाठ करणे म्हणजे धम्माचरण नाही. बुद्धविहारे ही धम्माचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वैचारिक आयाम-व्यायाम करणारी प्रशिक्षण केंद्र झाली पाहिजे. धम्म स्वीकारणे म्हणजे विवेकी आणि नीतिमान होणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती ही तात्विक, बौद्धिक, नैतिक आणि मानसिक होती. जगातील कोणत्याही समाजात मानसिक बदल झाला तरच समाजिक बदल घडू शकतो. त्यामुळे केवळ जाणिवेतच नव्हे तर नेणिवेपर्यंत धम्मविचार पोहचविण्यासाठी प्रबोधन करण्याला दुसरा पर्याय नाही' असे कांबळे म्हणाले.

बौद्ध धम्मात शिरकाव करू पाहणाऱ्या अनिष्ट प्रवृत्तींना रोखण्यासाठी समाजातील सज्जनांनी पुढे यावे असे आवाहन दिनकर ओंकार यांनी केले. प्रा. अनिल हाडगेकर यांनी प्रास्ताविक केले. राहुल साळवे यांनी सूत्रसंचालन केले आणि सिद्धार्थ मोकळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण हडसनकर, सचिन निकम, अतुल कांबळे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरघोस निधी वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागासाठी आगामी वार्षिक अर्थसंकल्पात १२ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे. नवीन सॉफ्टवेअर खरेदीसाठी बजेट प्रस्तावित आहे. मात्र, पाच कोटी रुपये पुरेसे असून एका विभागासाठी एवढा खर्च करणे असमतोल निर्माण करील असे व्यवस्थापन परिषद सदस्यांनी सूचवले. या सूचनेला संमती दाखवून प्रशासनाने ऐनवेळी निधी वाढवून १२ कोटी रुपये मंजूर केले.

विद्यापीठाच्या वार्षिक अर्थसंकल्पासाठी पूर्वबैठक घेण्यात आली. विद्यार्थीकेंद्रीत अर्थसंकल्प तयार करण्याबाबत काही पदाधिकाऱ्यांनी सूचना केली होती. त्यानुसार वसतिगृह, अभ्यासिका, वर्गखोल्या, संगणक, प्रयोगशाळा अशा सुविधांसाठी विशेष तरतूद करण्यात आली. क्रीडा उपक्रमांसाठी निधी वाढवण्यात आला. वसतिगृहासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, परीक्षा विभागाला भरमसाठ निधी देण्यास व्यवस्थापन परिषद किशोर शितोळे यांनी असमहती दाखवली. एका विभागासाठी एवढा खर्च केल्यास असमतोल निर्माण होईल असे शितोळे यांनी लक्षात आणून दिले. परीक्षा विभागासाठी १६ कोटी रुपये निधी देण्याबाबत चर्चा झाली होती. या चर्चेनंतर निधीत कपात करुन पाच कोटी करण्यात आला. पण, दुसऱ्या दिवशी पुन्हा १२ कोटी रुपये प्रस्तावित निधी करण्यात आला. तसेच उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिकचे बजेट वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. विद्यापीठ अनुदान आयोगाचा निधी, रुसाचा निधी, राज्य सरकारचे अनुदान या माध्यमातून तूट भरुन काढू असे प्रशासकीय स्तरावर सांगण्यात आले. पण, ९० कोटी रूपये तूट संभाव्य अनुदानावर बजेटमध्ये समाविष्ट करणे योग्य नसल्याचे शितोळे यांनी सांगितले. त्यामुळे ही तूट ऐनवेळी ४५ कोटी रुपये करण्यात आली. उत्पन्नाचे स्त्रोत नसताना अतिरिक्त निधीचा प्रस्ताव कशासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रत्येक विभागाचा निधी प्रस्तावित करण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न होता. प्रत्यक्षात निधी नसल्यास विभाग आणि प्रशासनात वाद उफाळण्याची शक्यता आहे. काही विभागांना निधी दिल्यानंतर इतर विभाग निधीसाठी विचारणा करू शकतात. हा आर्थिक पेच कसा सोडवणार याचे प्रशासनाकडे ठोस उत्तर नाही.

----सॉफ्टवेअर खरेदी करणार ?

परीक्षा प्रक्रियेचे व्यवस्थापन नेहमी कोलडमत असल्यामुळे परीक्षा विभागावर टीका होते. या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रक्रिया सुरळीत करणे आणि कामकाज गतिमान करण्यासाठी विभाग सॉफ्टवेअर खरेदी करणार आहे. तब्बल बारा कोटी रुपये खर्च करुन विभाग अद्ययावत करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या निधीला अर्थसंकल्पाच्या बैठकीत विरोध होण्याची शक्यता आहे. सध्या परीक्षा विभागातील आर्थिक व्यवहार चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेत तक्रार डिस्पले बोर्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत सर्वसामान्यांना आपल्या कामासाठी वारंवार खेटे मारावे लागतात. अनेकदा तक्रारी करूनही त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही. मात्र, नववर्षात नागरिकांनी केलेल्या तक्रारी महापालिका मुख्यालयात डिजीटल डिस्प्ले बोर्डवर झळकणार आहेत. त्यामुळे कामकाजात गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद महापालिकेत तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अनेकदा वॉर्ड कार्यालयात तक्रारींचा निपटारा न झाल्यास नागरिकांना मुख्यालयात धाव घ्यावी लागते. आता, स्मार्ट सिटी अंतर्गत अशा तक्रारी डिस्प्ले बोर्डवर झळकणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची वेळीच दखल पालिका प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. पालिकेतील आवक-जावक विभागात असंख्य तक्रारी रोजच्या येतात. त्या सर्व या डिस्प्ले बोर्डवर प्रकाशित करण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यालयातील या बोर्डवर तक्रार काय आहे, कोणत्या विभागाशी संबंधित आहे, याबाबतचा तपशील राहील, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी इतरांनाही पाहता येणार आहेत.

अनेकदा महापालिकेत तक्रार करूनही त्यांची वेळीच दखल घेतली जात नाही. परिणामी, पालिकेत खेट्या मारण्यात नागरिकांचा वेळ तर जातोच त्याशिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागतो. मात्र, नववर्षातील हा बदल नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जात आहेत. शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. बदल्या काळानुसार प्रशासकीय यंत्रणेनेही अत्याधुनिक स्वरूप प्राप्त करून घेणे, अभिप्रेत आहे. ते नागरिकांना आणि गतीने काम करण्यासाठी आवश्यकही आहे. मात्र, स्मार्टसिटीतील डिजीटलच्या संकल्पना अद्याप कागदावरच आहेत.

\Bमहापौरांचा आदेश \B

'नागरिकांच्या तक्रारींचा वेळीच निपटारा होण्यासाठी डिस्ल्पे बोर्ड ही संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. याचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी करावे,' असे आदेश महापौर नंदकुमार घोडले यांनी आस्थापना-२च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन दिवसांपूर्वीच महापौरांनी महापालिकेच्या संगणक विभागात भेट दिली. त्यावेळी त्यांनी संगणक कक्षप्रमुखांना नागरिकांच्या तक्रारी निदर्शनास आणून देण्यासाठी नववर्षापासून 'कम्प्लेन डिस्प्ले बोर्ड' लावण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्लिनिकल फार्मासिस्ट’ पदनिर्मिती करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'क्लिनिकल फार्मासिस्ट' पदनिर्मिती करा, शासकीय रूग्णालयांमध्ये फार्म. डी. च्या विद्यार्थ्यांना संधी द्या, अशी मागणी करत 'डॉक्टर ऑफ फार्मसी' (फार्म.डी.) अभ्यासक्रमाचे विद्यार्थी नवीन वर्षात रस्त्यावर उतरणार आहेत. १ जानेवारीपासून आपल्या मागण्यांसाठी हे विद्यार्थी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडणार आहेत.

'फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया'ने (पीसीआय) २००८पासून आरोग्यसेवेत बदल घडवून आणण्याकरीता परदेशात चालवला जाणारा हा अभ्यासक्रम देशात सुरू केला. अनेक राज्यांमध्ये अभ्यासक्रम सुरू झाला. मात्र, दहा वर्षानंतरही निश्चित धोरणांप्रमाणे अंमलबजावणी न झाल्याने अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात औरंगाबाद व अमरावती अशा दोन शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. दोन बॅच बाहेर पडल्या तरी, विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे. वारंवार आंदोलन केल्यानंतरही प्रश्न पूर्णपणे न सुटल्याने अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासून हे विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. शैक्षणिक नुकसानीस फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, तंत्रशिक्षण संचालनालय जबाबदार असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. आंदोलन करूनही प्रश्न सुटत नसल्याने अन् तंत्रशिक्षणच्या प्रशासकीय पातळीवरून कुठलीच ठोस कार्यवाही न झाल्याने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे रामप्रसाद नागरे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या अशा आहेत समस्या

अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही, विद्यार्थ्यांना आजतागायत शिकवायला एकही पूर्णवेळ शिक्षक नाहीत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्वाचा असलेला फार्मसी प्रॅक्टिस विभाग अजूनपर्यंत चालू झालेला नाही, भविष्यात विद्यार्थी कुठे व काय काम करतील हे निश्चित करण्यात आलेले नाही. पदवीपूर्व आरोग्य सेवेच्या काळात मासिक मानधन देण्यात येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा वाहतुकीसाठी रेल्वे उपलब्‍ध करून द्या: पाशा पटेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कांद्याचे दर घसरल्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून निर्यातीचे प्रमाण पाच टक्क्यांहुन दहा टक्क्यांपर्यंत नेण्यात आले, मात्र सध्या कांदा उत्पादकांचा प्रश्न साठवणुकीसंदर्भात आहे. त्यामुळे रेल्वेने कांदा वाहतूक करण्यासाठी रॅक उपलब्‍ध करून द्यावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

विभागीय आयुक्त कार्यालयात गडकरी यांनी रविवारी (३० डिसेंबर) मराठवाड्यातील विविध रस्‍त्यांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पाशा पटेल यांनी त्यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला. कांद्याचा प्रश्न समजून घेण्यासाठी पाशा पटेल हे रविवारी नाशिक येथे गेले होते. तेथील कांदा साठवणुकीचा आढावा घेतल्यानंतर तातडीने तो बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची आवश्यकता असल्याचे पटेल यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात नाशिक जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखाने बंद पडल्यामुळे नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी कांदा पिकाकडे वळाले. कधी काळी चार राज्यात उत्पादन घेणारा कांदा पीक आज २५ राज्यात घेतले जाते. याच काळात परराज्यातील कांदाही बाजारपेठेत आल्यामुळे कांद्याचे दर घसरले. त्यावर उपाययोजना करण्यासाठी निर्यात वाढवणे आवश्यक आहे. तशी मुभाही सरकारने दिली आहे. दुधाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत निर्यातीच्या परवानगी नव्हती, कांदा केवळ पाच टक्के निर्यात केला जायचा, त्यात पाच टक्के भर टाकण्याचा निर्णय सरकारने केला होता. कांदा उत्पादकांना साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रेल्वेचे रॅक उपलब्‍ध झाल्यास सध्या असलेला जुना कांदा व नवा कांदा देशातील विविध बाजारपेठांमध्ये जाऊ शकेल. त्यामुळी ही मागणी गडकरी यांच्याकडे केली असल्याचे पटेल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिसांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात ड्रंक अँड ड्राइव्हची मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या सहाजणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

शुक्रवारी रात्री मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथे पुंडलिकनगर पोलिसांनी ही मोहीम राबवली. यामध्ये मद्यपी वाहनचालक गोपीनाथ माणिक जाधव (वय ३२, रा. जयभवानीनगर) आणि ज्ञानेश्वर पांडुरंग डोंगरे (वय ३२, रा. मुकुंदनगर) यांच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. हर्सूल पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सात वाजता मयूरपार्क भागात कारवाई केली. यावेळी मद्यप्राशन केलेला दुचाकीस्वार सोमेश दादाराव शिंदे (वय २१, रा. चौका घाटाजवळ) याच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिडको पोलिसांनी शुक्रवारी रात्री दहा वाजता प्यासा वाइन शॉप, हडको भागात कारवाई केली. यावेळी दारू पिऊन वाहन चालवणारे बबन मुक्तीराम बोर्डे (वय ३०, रा. मिसारवाडी), खलीलखान हमीदखान (वय ४०, रा. जहांगीर कॉलनी, हर्सूल) आणि सोमीनाथ श्रीमंत हिवराळे (वय ३०, रा. जटवाडा) यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया पोलिसाने जेष्ठाला लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका तोतयाने जेष्ठ नागरिकाला पोलिस असल्याची थाप मारीत ३५ हजारांच्या दोन अंगठ्या लांबवल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजता मुकुंदवाडी परिसरात घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा अर्जुन सोन्नीस (वय ६८, रा. प्लॉट क्रमांक ३४, एस. टी. कॉलनी, एन २, सिडको) यांनी तक्रार दाखल केली. सोन्नीस हे शनिवारी दुपारी चार वाजता त्यांचे दुकान उघडण्यासाठी जात होते. यावेळी मुकुंदवाडी परिसरातील कासलीवाल अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ एक अनोळखी व्यक्ती उभी होती. या व्यक्तीने त्यांना अडवले. आपण पोलिस असल्याची बतावणी केली. शहरात चोऱ्या होत असून तुम्ही हातात अंगठ्या घालून फिरू नका, चोर लुबाडतील. अंगठ्या काढून रुमालात ठेवा असे सांगितले. भामटयाने सोन्नीस यांना हातातील दोन्ही अंगठ्या काढायला लावल्या. या अंगठ्या त्यांच्या रुमालात ठेवण्याचे नाटक करीत त्याने हातचलाखीने या अंगठ्या लांबवल्या. दुकानात गेल्यावर रुमाल उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये अंगठ्या नसल्याचे सोन्नीस यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएसआय भदरगे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images