Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘खूप शिका, जीवनात भरारी घ्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'चांगली शाळा आणि शिक्षण मिळणे भाग्याची गोष्ट आहे. तुम्हाला चांगले शिक्षक मिळाले आहेत. खूप शिका आणि जीवनात भरारी घ्या' या शब्दात प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी दिव्यांग व अनाथ मुलांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्या 'प्लेजर ऑफ गिव्हिंग' कार्यक्रमात बोलत होत्या.

जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने अनाथ व दिव्यांग मुलांना कपडे वाटप करण्यासाठी 'प्लेजर ऑफ गिव्हिंग' कार्यक्रम घेण्यात आला. विभागाच्या प्रांगणात मंगळवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, गायिका वैशाली सामंत आणि विभागप्रमुख डॉ. दिनकर माने यांची उपस्थिती होती. सावित्रीबाई फुले मूकबधिर विद्यालय, बाबासाई एचआयव्हीबाधित मुलांचे बालगृह, संत कबीर, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थेच्या १०० मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. लहान मुलांशी सामंत यांनी संवाद साधला. 'मला अभ्यासाचा खूप कंटाळा येत होता. तुम्हाला पण कंटाळा येत असेल. पण तुमच्या चेहऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे फक्त शाळेतच मिळू शकतात. अभ्यास करा आणि आयुष्यात चांगले नाव कमवा' असे सामंत म्हणाल्या.

या उपक्रमासाठी प्रा. राजेश चंचलानी, उद्योजक प्रकाश भोजवानी आणि ऋतुजा सोमाणी यांनी अर्थसहाय केले. डॉ. संध्या मोहिते यांनी प्रास्ताविक केले. गणेश फरताडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. प्रभू गोरे, डॉ. संजीव सावळे यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

\Bविद्यार्थ्याचेही गीत सादर \B

विद्यार्थ्यांनी वैशाली यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अक्षय पगारे या विद्यार्थ्याने मुलींसाठी लिहिलेले गाणे सादर केले. 'वक्तसे पहिले बडी होती है बेटिया, जन्नतसे आयी परी होती है बेटिया' गीत सादर करून सर्वांची मने जिंकली. वैशाली यांनी 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख' गीत सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सभु’मध्ये शुक्रवारी भरती मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरस्वती भुवन विज्ञान कॉलेजमध्ये व्यवसाय अभ्यासक्रमातील (एमसीव्हीसी) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिकाऊ भरती मेळाव्याचे शुक्रवारी (चार जानेवारी) आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात २०पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी सकाळी साडे नऊपासून प्रक्रिया सुरू होईल. साडे दहापर्यंत नावनोंदणीची प्रक्रिया होईल. कागदपत्रांसह विद्यार्थ्यांना उपस्थित रहायचे आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राम भोगले, प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे, एस. डी. जैस्वाल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी येणार २३ सिटी बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून औंरगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे सुरू केल्या जाणाऱ्या सिटी बससेवेसाठी २३ बस शनिवारी (पाच जानेवारी) शहरात दाखल होणार आहे. यापूर्वी पाच सिटी बस शहरात दाखल झाल्या आहेत, परंतु नागरिकांच्या सेवेत त्या रस्त्यावर उतरविण्यात आल्या नाहीत. शनिवारी २३ बस प्राप्त झाल्यावर ३० बस रस्त्यावर उतरविल्या जातील.

सिटी बससेवेचे उद्घाटन महापालिकेने शिवसेनेचे नेते, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २३ डिसेंबर रोजी मोठ्या धुमधडाक्यात केले. ठाकरे यांनी उद्घाटन केल्यामुळे लगेचच बससेवा सुरू होईल, असे मानले जात होते, परंतु फक्त पाच बस प्राप्त झाल्यामुळे एसटी महामंडळाने बस चालविण्यास असमर्थता दाखवली. सध्या महामंडळातर्फे १४ सिटी बस चालवल्या जातात. या सर्व बस काढून घेऊन त्यांच्या जागा स्मार्ट सिटीच्या बस सुरू करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. पुरेशा बस न आल्यामुळे व बस चालवण्याचे प्रशिक्षण चालकांना न मिळाल्यामुळे उद्घाटनाच्या नंतरही सिटी बससेवा सुरू होऊ शकली नाही.

आता २३ बस शनिवारी शहरात दाखल होतील, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. धारवाडहून या बस औरंगाबादच्या दिशेने निघाल्या आहेत. शनिवारी सकाळपर्यंत त्या दाखल होतील, त्यानंतर आरटीओची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सिटी बसची सेवा सुरू केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

\Bविद्यार्थ्यांची बसमधून सहल\B

प्राप्त झालेल्या पाच बसपैकी एका बसचे पासिंग आरटीओने केले आहे. पासिंग झालेल्या बसमधून मंगळवारी महापालिकेच्या बेगमपुरा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल काढण्यात आली. महापौरांनी सहलीच्या बसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, विरोधीपक्षनेते जमीर कादरी, नगरसेवक सचीन खैरे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उपअभियंता डी. के. पंडित उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दोन सत्रात बीबी का मकबरा, पाणचक्की, श्रीमंत छत्रपतीशिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय दाखवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिले काढण्यासाठी टक्केवारीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छोटी छोटी कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी महापालिकेच्या लेखा विभागाच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. लेखा विभागातील काही अधिकारी, कर्मचारी टक्केवारी मिळालीतरच बिल काढतात, असा आरोप कंत्राटदारांनी केला आहे.

उपोषणासंदर्भात दिलेल्या निवेदनात कंत्राटदारांनी म्हटले आहे की, महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटदारांना लेखा विभागातील काही जणांकडून योग्य वागणूक मिळत नाही. टक्केवारी घेतल्याशिवाय बिले काढली जात नाहीत. या विभागाचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे. छोट्या कंत्राटदारांची बिले देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. मोठ्या कंत्राटदारांची बिले काढली जातात. पालिकेच्या लेखा विभागाच्या अशा धोरणामुळे छोटे कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

उपोषणाला अनेक कंत्राटदार व सामाजिक संघटनांची पाठिंबा दिला आहे, असा दावाही करण्यात आला आहे. निवेदनावर पाथरूट परशुराम अण्णा, पी. एम. कंस्ट्रक्शन, बबन हिवाळे, कचरू भिंगारदेव, ए. ए. खान, सागर अलपुंडे, बाळू गायकवाड यांच्यासह २५ कंत्राटदारांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भडकल गेटच्या सुशोभिकरणासाठी पुरातत्व विभागाकडून पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐतिहासिक भडकलगेटच्या परिसरात सुशोभिकरणाचे काम करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली. सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी अपेक्षित असून, यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक अजीत खंदारे यांनी दिली.

शहरातील ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धन व सुशोभिकरणासंदर्भात हायकोर्टाने आदेश दिले आहेत. त्यानंतर राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली. खंदारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी भडकलगेट परिसराची पाहणी करण्यात आली.

पाहणीबद्दल खंदारे म्हणाले, 'गेटच्या परिसरात उद्यान विकसित करण्याचा आणि लॉन लावण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय कारंजे देखील सुरू केले जातील. गेटच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत, याशिवाय आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे देखील प्रस्तावित आहे. ही सर्व कामे कशी करता येतील याचा अंदाज घेण्यासाठी पाहणी करण्यात आली. या सर्व कामांसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल. शासनाकडून मान्यता मिळाल्यावर लगेचच काम सुरू केले जाईल.'

पाहणीच्या वेळी मुख्य अभियंता प्रकाश रोकडे, कनिष्ठ अभियंता एन. एम. अन्सारी, आर्किटेक्ट सुर्वे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. राज्य पुरातत्व विभागाच्या आखत्यारीत भडकल गेटसह मकई गेट, दिल्ली गेट असे तीन दरवाजे आहेत. त्याशिवाय चौक मशीद, लाल मशीद, शहागंज मशीद देखील पुरातत्व खात्याअंतर्गत येते. या सर्व वास्तूंच्या संवर्धनाचे, सुशोभिकरणाचे नियोजन केले जात आहे असे खंदारे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतिवन संस्थेला गुरुवारी वि. वा. देसाई पुरस्कारचे वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा स्वातंत्र्य सैनिक वि. वा.देसाई (देशपांडे) स्मृती पुरस्कार यंदा बीड येथील 'शांतिवन' या संस्थेस जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण गुरुवारी (३ जानेवारी) प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वराडे हे राहणार आहेत. स. भु. शिक्षण संस्थेच्या परिसरातील गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संशोधन संस्थेचे सचिव डॉ. शरद अदवंत, कोषाध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमा कोरेगाव विजयोत्सव साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

२०१वा भीमा कोरेगाव विजयोत्सव शहरात साजरा करण्यात आला. कैलासनगर येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची लक्षणीय उपस्थिती होती. व्याख्याने, भीमगीत गायन आणि गुणवंतांच्या सत्काराने विजयोत्सव साजरा झाला.

भीमा कोरेगाव विजयोत्सवाच्या २०१व्या वर्षानिमित्त कैलासनगर येथे ४२ फूट उंच विजयस्तंभ उभारण्यात आला होता. यानिमित्त आयोजित महोत्सवाचे सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री गंगाधर गाडे, प्राचार्या सूर्यकांता गाडे, स. सो. खंडाळकर व उद्योजक विजय मगरे उपस्थित होते. या कार्यक्रमात कन्नड नगर पालिकेच्या कार्यकारी अधिकारी नंदा गायकवाड, दत्ता बनसोडे, ज्योती मगरे, नगरसेविका आशा भालेराव, अनिता साळवे, मनोज बल्लाळ, मैना बोदडे, विनिता सातदिवे, प्रा. रेखा मेश्राम, दैवशाला गवांदे, प्रा. वैशाली भोसले यांचा सत्कार करण्यात आला. 'भीमा तुझ्या जन्मामुळे' या भीमगीताच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. भावसिंगपुरा परिसरातील साकेतनगर येथे भीमा कोरेगाव सांस्कृतिक महोत्सव पार पडला. यावेळी शाहीर सीमा पाटील व जॉली मोरे यांचा शाहिरीचा कार्यक्रम झाला. यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, डॉ. अरविंद गायकवाड, कवी प्रा. फ. मुं. शिंदे, महापौर नंदकुमार घोडेले व संयोजक कृष्णा बनकर, विलास त्रिभुवन उपस्थित होते. शेकडो आंबेडकरी अनुयायांनी भीमा कोरेगाव विजयाचा जल्लोष केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधकांची फेलोशिप विद्यापीठात रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची एम. फिल आणि पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिप रखडली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे फेलोशिप रखडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तांत्रिक मुद्द्यांचे कारण दाखवून प्रशासनाने जबाबदारी झटकली असून वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या छात्रवृत्तीधारकांना मागील वर्षभरापासून पैसे मिळालेले नाही. विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागांच्या तब्बल ६०० विद्यार्थ्यांची अडवणूक सुरू आहे. याबाबत नियोजन आणि सांख्यिकी विभागात विचारणा केल्यास कर्मचारी सहकार्य करीत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. युजीसी आणि कॅनरा बँकेच्या तांत्रिक प्रक्रियेत पैसे रखडल्याचे कर्मचारी सांगत आहेत. मात्र, कोणतीही कार्यवाही करीत नसल्यामुळे प्रक्रिया ठप्प आहे. या समस्येबाबत त्रस्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले. फेलोशिपच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी चोपडे यांच्याकडे करण्यात आली. संबंधित विद्यार्थ्यांची प्रशासकीय कागदपत्रे स्कॅनिंग करुन युजीसीकडे पाठवण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. हे तांत्रिक काम वेळेत होत नसल्यामुळे पुढील सर्व प्रक्रिया खोळंबल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी भीमराव गायकवाड, समीना शेख, विलास लिहिणार, राजू सुरवसे, विनोद धनेराव, रमेश वाघ, बळीराम पाइकराव, अंकुश गायके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘फार्म. डी.’करिअर दहा वर्षांनंतरही धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'डॉक्टर ऑफ फार्मसी'च्या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करा, अशी मागणी करत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून ठिय्या दिला आहे. या अभ्यासक्रमाला सुरुवात होऊन दहा वर्ष उलटली आहेत मात्र, 'तंत्रशिक्षण', 'फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया'च्या दुर्लक्षामुळे राज्यातील या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर धोक्यात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

युरोपातील देशांच्या धर्तीवर देशामध्ये 'फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया'ने (पीसीआय) २००८पासून 'डॉक्टर ऑफ फार्मसी' अभ्यासक्रम सुरू केला. सहा वर्षे कालावधीचा अभ्यासक्रमाच्या राज्यातून दोन बॅच बाहेर पडल्या. या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात औरंगाबाद, अमरावती येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. सोयी सुविधांचा अभाव, अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षक नसणे, अद्ययावत प्रयोगशाळा नसणे, अशा विविध अडचणींमुळे शैक्षणिक करिअर धोक्यात आल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी विविध मार्गाने आंदोलन केले. प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळाले. त्यानंतरही स्थितीत सुधारणा न झाल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी रामप्रसाद नागरे, गणेश गिरी, अमित गोटफोडे, रिशिक शर्मा, शिवम तिवारी, धनंजय सातपुते, सुशील जाधव, अक्षय शेलार, कुणाल देवरे, राजेश बलखंडे, राजेश घोडके, अंकेश पवार, जुबेर चौधरी, किशोरी पष्टे, वेदांती रासवे, जिनल रजानी, ऐश्वर्या साळवे, भाग्यश्री चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

\Bविद्यार्थ्यांच्या मागण्या\B

'क्लिनिकल फार्मासिस्ट' पदनिर्मिती करा, शासकीय रुग्णालयांमध्ये फार्म. डी.च्या विद्यार्थ्यांना संधी द्या, या प्रमुख मागण्या आहेत. यासह अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जावी, महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ शिक्षक नेमण्यात यावेत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा असलेला फार्मसी प्रॅक्टिस विभाग सुरू करावा, भविष्यात विद्यार्थी कुठे व काय काम करतील हे निश्चित धोरण आखण्यात यावे, पदवीपूर्व आरोग्य सेवेच्या काळात मासिक मानधन देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

'फार्म.डी.'अभ्यासक्रम सुरू करताना जो हेतू ठेवून अभ्यासक्रम सुरू केला त्याची महाविद्यालयस्तरावर पूर्तता करावी. वारंवार प्रश्नांसाठी आंदोलन करून प्रशासनाकडून ते प्रश्न सोडविण्याबाबत केवळ चालढकल केली गेली. आता, प्रश्न सुटल्याशिवाय उपोषणातून माघार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

-रामप्रसाद नागरे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्डी फर्स्टच्या रात्री वीस जणांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

एकतीस डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन रस्त्यावर गाडी चालविणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलिस विभागातील सर्व पोलिस फौज विविध चौकात लावण्यात आली होती. मात्र, या चोख पोलिस बंदोबस्तात फक्त २० वाहनधारक 'ड्रंक अण्ड ड्राइव्ह' अवस्थेत आढळल्याची व त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.

नववर्षारंभी अपघात होऊ नये किंवा रॅश ड्रायव्हिंगचा फटका इतर वाहनधारकांना बसू नये यासाठी दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी थर्टी फर्स्टच्या रात्री तीन पोलिस उपायुक्त, आठ सहाय्यक पोलिस आयुक्त, ३४ पोलिस निरिक्षक, २०० पोलिस अधिकारी तसेच २५०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. गोंधळ घालणाऱ्यांवर अंकूश लावण्यासाठी हर्सूल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड नाकासह दौलताबाद टी पॉईंट आणि वाळूज नाका यासह ६५ ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले होते. याशिवाय शहरात पेट्रोलिंग कामी आठ विशेष पेट्रोलिंग मोबाइल व्हॅन नेमण्यात आल्या होत्या.

कडेकोट बंदोबस्त लाऊन अनेक चौकांमध्ये वाहनधारकांची थांबवून तपासणी करण्यात आली. ही तपासणी ब्रिद अनालायझरद्वारे करण्यात आली. या मोहिमेत विविध चौकात फक्त २० वाहनधारक मद्यप्राशन करून गाड्या चालवित असताना आढळून आले आहेत. या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

………

एक वाजेपर्यंत सुरू होती मद्य विक्री केंद्रे

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलिस विभागाकडून एफ एल २ (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकाने) यासह अन्य प्रकारची दुकाने रात्री १ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची तसेच परमीट रूमसह या वर्गात मोडणाऱ्या दुकानांना पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याची विल्हेवाट खासगीकरणातून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा वाहतूक आणि संकलनाचे काम शनिवारपासून खासगी कंपनीच्या ताब्यात देण्याची तयारी महापालिकेने केली आहे. कंपनीच्या माध्यमातून २०० वाहने देखील याचदरम्यान शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळाकरून तो प्रक्रिया केंद्रात नेला जाणार आहे.

शहरात निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला मोठी मदत केली. इंदूर येथील एका संस्थेच्या माध्यमातून कचराकोंडी फोडण्याबद्दलचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला. 'डीपीआर'ला मंजुरी देऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी ९१ कोटी रुपयांचा विशेष निधी देखील महापालिकेला दिला. या निधीतून पालिकेतर्फे विविध कामे केली जात आहेत.

कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करण्याचे महत्त्वाचे काम कचराकोंडी फोडण्यात असणार आहे. त्यामुळे या कामाचे इंदूर पॅटर्ननुसार खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची निविदा देखील काढण्यात आली. बेंगरुळू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करण्याचे काम मिळाले आहे. शहरातील रस्ते, अंतर्गत गल्ल्यांची झाडझुड करण्याचे काम महापालिकेतर्फे केले जाणार आहे. जमा झालेला कचरा संकलित करून तो प्रक्रिया केंद्रापर्यंत नेण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे कर्मचारी घरोघर जाऊन देखील कचऱ्याचे संकलन करणार आहेत.

कचऱ्याचे संकलन करून त्याची वाहतूक करण्यासाठी विशिष्ट प्रकारची वाहने उपलब्ध करून देण्याची अट महापालिकेने घातली आहे. त्यानुसार रिक्षा, कॉम्पॅक्टर्स व अन्य आवश्यक वाहने कंपनीकडून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार; कचरा संकलन व वाहतुकीचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला शनिवारपासून करावे लागणार आहे. तसे आदेश कंपनीच्या व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत. या कामासाठी सुमारे २०० वाहने कंपनी उपलब्ध करून देणार आहे. टप्प्याटप्प्यांने ही वाहने शहरात दाखल होतील. कचऱ्याचे संकलन करणाऱ्या प्रत्येक वाहनात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवला जाणार आहे. त्याशिवाय सॅनेटरी नॅपकीन आणि प्लास्टिकच्या वस्तूंसाठी वेगळी व्यवस्था असणार आहे. वाहने चालविण्यासाठी व संकलन-वाहतुकीचे काम करण्यासाठी कंपनीचे कर्मचारी कार्यरत असतील, त्याची जबाबदारी महापालिकेवर असणार नाही. साफसफाईचे काम मात्र महापालिकेच्या सफाई कामगारांकडून करून घेतले जाणार आहे. सध्या चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्र सुरू आहे. संकलित केलेला कचरा या केंद्रावर नेला जाणार आहे.

साफसफाईसाठी महापालिका कर्मचाऱ्यांची संख्या : १६००

पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीकडून उपलब्ध होणारी वाहने : २००

कंपनीचा कमचारीवर्ग : सुमारे ६०० (वाहने चालविण्यासह अन्य व्यवस्थापनासाठी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुक्या कचऱ्यासाठी नवी मशीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुक्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने २० टन क्षमतेच्या मशीनचा उतारा शोधला आहे. मायोवेसल्स या कंपनीला तातडीने ही मशीन उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार कंपनीने चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर मशीन उतरविण्याचे काम सुरू केले आहे.

ओल्या कचऱ्यावर बायोट्रिटच्या माध्यमातून व श्रेडिंग, स्क्रिनींगच्या माध्यमातून प्रक्रिया केली जात आहे. चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर मशीनद्वारे व बायोट्रिटच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. पडेगाव येथे नागरिकांच्या विरोधामुळे मशीनद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम बंद आहे, मात्र बायोट्रिटच्या माध्यमातून या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असतानाच सुक्या कचऱ्याचा प्रश्न मात्र गंभीर बनला आहे. महापालिकेने काही खासगी कंपन्यांना सुका कचरा घेऊन जाण्याची मुभा दिली होती, परंतु दोन महिन्यांपासून या कंपन्यांनी देखील कचरा घेऊन जाणे बंद केले आहे. त्यामुळे महापालिकेने आपल्या मालकीच्या वास्तूंमध्ये सुका कचरा साठवून ठेवला आहे. साठवलेल्या कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. सुमारे एक हजार टनपेक्षा जास्त कचरा साठवला गेल्याचे मानले जात आहे.

सुक्या कचऱ्याच्या प्रश्नाबद्दल माहिती देताना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे म्हणाले, 'सुक्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे मायोवेसल्स या कंपनीला सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तातडीने बेलिंग मशीन लावण्याचे आदेश दिले आहेत. याच कंपनीला महापालिकेने ओला आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कंत्राट दिले आहे. चिकलठाणा व पडेगाव येथील प्रक्रिया केंद्रावर प्रत्येकी १५० टन क्षमतेच्या मशीन या कंपनीकडून बसविण्यात येणार आहे. त्यापैकी सुक्या कचऱ्यासाठी २० टन क्षमतेची बेलिंग मशीन चिकलठाणा केंद्रावर तातडीने लावण्याचे आदेश दिल्यामुळे कंपनीने बेलिंग मशीन आणली आहे. मशीन उतरविण्याचे व त्याचे फिटिंगचे काम दोन दिवसांत पूर्ण होईल.

सध्या चिकलठाणा येथे वेस्ट बिन सोल्युशन या कंपनीच्या बेलिंग, श्रेडिंग आणि स्क्रिनिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. या मशीनची क्षमता प्रतिदिन १६ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची होती, पण प्रत्यक्षात आठ टनांपर्यंतत प्रक्रिया केली जात असल्याचे लक्षात आल्यावर मायोवेसल्स कंपनीकडे महापालिकेने आग्रह धरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगावर भींत पडून मजुराचा मृत्यू

$
0
0

औरंगाबाद : घराच्या दुरुस्तीचे काम करताना भींत अंगावर पडून मजूर ठार झाल्याची घटना सोमवारी जयभवानीनगर चौक या भागात घडली. प्रदीप गोविंदराव पजई (३१, रा. देशमुखनगर, गारखेडा) असे या मजुराचे नाव आहे.

सोमवारी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रोडवरील जयभवानी चौकातील संतोष शिवनाई यांच्या जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. एका सहकाऱ्याच्या मदतीने दुरुस्ती करत असताना दुपारी पावणे चारच्या सुमारास अचानक भिंतीचा एक भाग प्रदीप यांच्या डोक्यावर पडून ते बेशुद्ध झाले. संतोष शिवनाई आणि सहकाऱ्याने प्रदीप यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्रदीप यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेव्हा पालकांचीच एक दिवसाची शाळा भरते...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वर्षभरात जवळपास २३० दिवस विद्यार्थ्यांची शाळा भरतच असते, परंतु पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारूपिंपळवाडीत चक्क पालकांचीच शाळा भरली. क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकरांनी पाठ घेऊन पालकांना गुरूमंत्र दिले.

तारूपिंपळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत दरवर्षी वर्षअखेरचा सप्ताह 'क्रीडा व सांस्कृतिक सप्ताह'म्हणून साजरा केला जातो. यात 'एक दिवस पालकांची शाळा' हा उपक्रम घेण्यात आला. यासाठी नगर जिल्ह्यातील शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांचे व्याख्यान झाले. शालेय शिक्षणाबरोबरच समाजातील सामाजिक, मानसिक व शारीरिक शिक्षणाचेही महत्त्व चासकरांनी दाखल्यांसह पटवून दिले. केवळ परीक्षेतील गुणांच्या,अव्यवहार्य स्पर्धेच्या शर्यतीत इतर बाजू कमकुवत होऊ शकतात याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

मुलांमधील उपजत सुप्त कलागुणांना चेतना देऊन समाजाभिमुख नागरिक निर्माण करता येतील असे मत त्यांनी नोंदवले. मुलांना धाकात, दडपणात ठेवून केवळ अभ्यास करवून न घेता खेळण्याला, इतर कलाशिक्षणालाही तितकेच महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर सरपंच शिवाजी कणसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ढोकळे, बद्रिनाथ ढोकळे, जेष्ठ शिक्षक संतोष केकते, शिक्षक सेना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे, मीनल चासकर आदींसह शेकडो पालक उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सतीश सावंत यांनी केले. अशोक पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व रवी लाटे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालरोग संघटनेला ‘बेस्ट ब्रँच अवॉर्ड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बालकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेले विविध उपक्रम, बालरोगतज्ज्ञांसाठी घेण्यात आलेल्या विविध वैद्यकीय परिषदा, व्याख्याने आदींबाबत केलेले काम लक्षात घेऊन 'भारतीय बालरोग संघटने'च्या औरंगाबाद शहर शाखेला सर्वोत्तम शाखा पुरस्कार महाबळेश्वर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत प्रदान करण्यात आला.

बालरोगशास्त्रासंबंधीची विविध शैक्षणिक सत्रे, वैद्यकीय परिषदा, व्याख्याने याबरोबरच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ओआरएस डे, मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे, मुलांमधील स्थुलपणा तपासणी, मुलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आदी उपक्रम किशोरवयीन मुलांसाठी घेण्यात आले. स्तनपान, गोवर, रुबेला, पोलिओ, ऑटिझ, आरोग्यदायी जीवनशैली आदींविषयीच्या जनजागृतीसाठी विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. या योगदानाचा विचार करून शहर शाखेला सर्वोत्तम शाखेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेष ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. मकरंद दिवाण, सचिव डॉ. रोशनी कौर, सहसचिव डॉ. सचिन देशमुख व डॉ. वर्षा वैद्य, कोषाध्यक्ष डॉ. अभय जैन आदींचे अभिनंदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कम्प्युटर टायपिंग’चे परीक्षार्थी वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मॅन्युअल टायपिंग' मुदतवाढीवरून वाद सुरू असताना 'कम्प्युटर टायपिंग'ला विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. येत्या पाच जानेवारीपासून 'कम्प्युटर टायपिंग' परीक्षा सुरू होत आहे. यंदा तब्बल परीक्षार्थींच्या संख्येत ७० हजारांची भर पडली आहे.

राज्यात 'कम्प्युटर टायपिंग'चा निर्णय २०१३मध्ये घेण्यात आला. त्याला विरोध होत असल्याने 'मॅन्युअल टायपिंग'ला मुदतवाढ देत 'कम्प्युटर टायपिंग'ची अंमलबजावणी २०१५पासून करण्यात आली. सध्या दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतली जाते. परीक्षा परिषदेने 'कम्प्युटर टायपिंग' परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. राज्य परीक्षा परिषदेतर्फे या परीक्षेचे नियोजन करण्यात येते. शासनमान्य कम्प्युटर टायपिंग संस्थामधील नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे हे नियोजन करण्यात आले आहे. '३० व ४० शब्द प्रति मिनीट'ची ही परीक्षा आहे. ही परीक्षा पाच ते २३ जानेवारीदरम्यान होणार आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षार्थींच्या संख्येत ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यात एक लाख ९३ हजार विद्यार्थी परीक्षा विविध बॅचमध्ये देणार आहेत. मागील वर्षी राज्यभरातून परीक्षार्थींची संख्या एक लाख १५ हजार एवढी होती. औरंगाबादमध्ये शिवछत्रपती कॉलेज, साई इंजिनीअरिंग कॉलेज व शुभावी इंटरप्रायझेस येथे परीक्षेचे केंद्र असणार आहेत. पाच ते ११ जानेवारीदरम्यान इंग्रजी ३० व ४० शब्द प्रति मिनिटाची परीक्षा होणार आहे. १८ ते २३ जानेवारीदरम्यान मराठी व हिंदी ३० व ४० शब्द प्रति मिनिटाची परीक्षा असेल. स्पेशल स्किल इन कम्प्युटर टायपिंग ५० शब्द प्रतिमिनीट ही परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार आहे.

\Bअशी असेल परीक्षा\B

शंभर गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी दीड तासाचा कालावधी देण्यात येतो. प्रश्नपत्रिकेत पाच टप्पे असतात यामध्ये वस्तुनिष्ठ २५ प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे ५० गुण असतात. यात २६ गुण आवश्यक आहेत. 'ई-मेल', 'लेटर' व 'स्टेटमेंट' या तिन विभागांना मिळून ३० गुण असतात यातील १४ गुण मिळविणे आवश्यक असते. 'वेग' यासाठी २० गुण असून, त्यातील दहा गुण मिळणे आवश्यक असते. शंभर गुणांच्या परीक्षेत ५० गुण मिळणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या बॅचनिहाय परीक्षा होणार आहेत. सकाळच्या सत्रात नऊ ते साडेदहा, सकाळी ११ ते दुपारी साडेबारा दुपारी एक ते अडीच, दुपारी तीन ते साडेचार अशा बॅच असतील. काही तांत्रिक अडचण आल्यास दुपारी पाच ते सायंकाळी साडेसह ही वेळ परीक्षेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. परीक्षार्थीला परीक्षा केंद्रावर ३० मिनिटे आगोदर उपस्थित रहावे लागणार आहे.

राज्यातील परीक्षार्थी : १९३०००

औरंगााबदमधील परीक्षार्थी : ८५००

शहरातील परीक्षा केंद्र : ३

परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांना संबंधित संस्थांच्या 'लॉग-इन'च्या माध्यमातून त्यांचे हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहेत. यंदा फक्त एक परीक्षा केंद्र कमी करून उपलब्ध असलेल्या केंद्रातच परीक्षार्थींची बैठक व्यवस्था केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत औरंगाबादमध्ये परीक्षार्थींच्या संख्येत वाढ झाली आहे.

- सोमेश्वर हाळीघोंगडे, शासनमान्य कम्प्युटर टायपिंग संस्था संघटना, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचिकांचा डिजिटल प्रवास सुसाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातून सर्वसामान्यांच्या कामांचा तत्काळ निपटारा करणे व कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जवळपास सर्व विभागांमध्ये ई-ऑफिसच्या माध्यमातून काम करणे सुरू झाले आहे. सरकारी फायलींच्या (संचिका) डिजिटल प्रवासामुळे अवघ्या पाच महिन्यांमध्ये फाइल पेंडन्सीचा प्रकार जवळपास नाहीसा झाला आहे. २३ जुलै ते २७ डिसेंबर या कालावमध्ये प्रत्येक विभागप्रमुखांच्या टेबलावर आलेल्या एका फाइलचा निपटारा सरासरी पाच दिवसांत करण्यात येत आहे. त्यामुळे 'सरकारी काम अन् महिनाभर थांब' ही म्हण अडगळीत पडली आहे.

तत्कालीन 'टेक्नोसेव्ही' जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ई-ऑफिस करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या कामात संगणकांची संख्या, जुने संगणक व कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आदी आव्हान निर्माण झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांची बदली झाली. नवल किशोर राम यांच्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले उदय चौधरी यांनी मात्र पेपरलेस ऑफिस करण्यासाठी टप्याटप्यांने प्रवास सुरू केला असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व सरकारी कार्यालयांना 'ई-ऑफिस' प्रणालीचा वापर करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी पाऊल उचलत आहेत, औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध २४ विभागांमध्ये सध्या तयार करण्यात येत असलेल्या नव्या फायलींचा प्रवास डिजिटल स्वरुपात होतो. यामुळे एखादी फाइल अधिकाऱ्यांकडे आली, तर त्यावर किती दिवसात निर्णय घेतला, याची सर्व नोंद ठेवण्यात येत आहे. यानुसार जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्याकडे आलेल्या सर्व फायलींवर त्याच दिवशी निर्णय घेण्यात आला आहे, तर अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्याकडे आलेल्या फायलींवर सरासरी दोन दिवसांत निर्णय घेण्यात आला असल्याची नोंद आहे.

\Bअसा होतो फायलींचा प्रवास

\Bशासकीय कामकाजात कागद व फायलींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासकीय यंत्रणेत परंपरागत पद्धतीने संचिकांमधून लेखी स्वरुपात माहिती जतन केली जाते. ई-ऑफिस प्रणालीत कागद व संचिकांना महत्त्व नाही. संचिकांचा प्रवास डिजिटल माध्यमातून होतो. याप्रणालीत तयार होणाऱ्या संचिका (फाइल), विविध प्रमाणपत्रे, दाखले आणि परवाने स्वाक्षरीत करण्यासाठी डिजिटल सिग्निचरचा वापर करण्यात येतो. जुन्या संचिका असतील त्या स्कॅन करून या प्रणालीला जोडण्यात येतात. संबंधित शाखेकडून आलेली संचिका ‌डिजिटली संबंधित अधिकाऱ्यांकडे जाते आणि त्यानंतर निर्णय घेऊन सदर संचिका पुढे पाठवण्यात येते.

फायलींची स्थिती

शाखा ...........................निकाली......टक्केवारी.........प्रतिसादाचा सरासरी कालावधी

जिल्हाधिकारी...................५१५८........९८.८५...........० दिवस

अपर जिल्हाधिकारी...........१४६..........९८.६४...........२ दिवस

निवासी उपजिल्हाधिकारी....३५७५........९९.९४...........० दिवस

महसूल...........................६८५८.......७५.१२...........३ दिवस

करमणुक........................१३९..........७१.२८...........३ दिवस

गृह................................३९७०........७४.९२...........३ दिवस

पुरवठा............................३७२२.......७५.७..............५ दिवस

निवडणुक........................३३२.........८४.५..............४ दिवस

गौण खणिज.....................७६६.........७८.२४............४ दिवस

पुनवर्सन.........................११६७.......७२.५७.............६ दिवस

सामान्य प्रशासन...............४४७८......८४.७६..............३ दिवस

रोहयो.............................३२८१......८४.६१..............३ दिवस

नियोजन.........................१४६२.......८६.३६..............४ दिवस

आस्थापना.......................१०७४......७७.७१..............४ दिवस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्यल्प खर्चातील सर्वोच्च तंत्रज्ञानासाठीच संशोधन

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com

Tweet : @nnirkheeMT

'एचएएल'मधील अनुभवामुळेच मूलभूत संशोधनवृत्ती विकसित होत गेली आणि संशोधन हाच आपला मूलभूत गाभा असल्याचे लक्षात घेऊन उद्योजकीय वाटचाल सुरू केली. 'कॅलिबरेशन'च्या सेवा विदेशातून घ्याव्या लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर औरंगाबाद शहरात ही सेवा नव्वदच्या दशकात सुरू केली. आज देशभरातील ३००पेक्षा जास्त फार्मा, ऑटो, लिकर इंडस्ट्रीजसाठी गरजेनुसार 'कॅलिबरेशन'च्या सेवा देत आहोत. ब्लड बँकांनाही 'कॅलिबरेशन'च्या सेवा सर्वप्रथम आम्हीच दिल्या. अत्यल्प शुल्कात सर्वोच्च तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोचवणे, हाच आमच्या संशोधनाचा उद्देश आहे, असे मत एकाचवेळी दहा पेटंट नोंदवण्याच्या जागतिक विक्रमासह 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'वरही मोहोर उमटवणारे करणारे संशोधक पिता-पूत्र सुशील व मंदार संवत्सर यांनी व्यक्त केले.

\B- सुशीलजी, आपला संशोधनाचा प्रवास कसा होत गेला?

\B- वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे नागपूरला प्राथमिक शिक्षण झाले व पहिल्यापासूनच अभियांत्रिकीची आवड होती. पाचगणीच्या संजीवन निवासी विद्यालयात माझे सातवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण झाले. चांगल्या गुणांमुळेच अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यावेळी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षातील स्कोअरच्या आधारे शाखा मिळत होती. मला 'इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स'मध्येच इंजिनीअरिंग करायचे होते व चांगल्या स्कोअरमुळे मला ती शाखा मिळाली, परंतु त्याकाळी केवळ पुण्याच्या 'सीओईपी'मध्ये 'इलेक्ट्रॉनिक्स' होते. त्यामुळे पुढील शिक्षण पुण्यात उत्तम गुणांनी पूर्ण केले आणि सहा महिने 'अॅफको' या प्रसिद्ध कंपनीमध्ये काम केले. त्यानंतर ज्याची मला आतुरतेने प्रतीक्षा होती, त्या हैदराबाद येथील 'हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड'मधील (एचएएल) 'आर अँड डी'मध्ये निवड झाली आणि 'डिझाइन ट्रेनी' म्हणून प्रवास सुरू झाला. वायू दल, नौदलाच्या लढाऊ विमानांसाठी लागणाऱ्या 'इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम'ची निर्मिती 'एचएएल'मध्ये होत होती आणि ही माझ्यासाठी पर्वणी ठरली. लढाऊ विमानांसाठी जगभरात कोणती नवीन इलेक्ट्रॉनिक सिस्टिम येऊ घातली आहे. याचाही अभ्यास-संशोधन 'एचएएल'मध्ये होत होते व मी त्या संशोधनाचा एक भाग होतो. मी सलग १५ वर्षे याच प्रक्रियेत घडत गेलो. मध्यल्या काळात माझ्यातली चुणूक पाहून मला आयआयटी खरगपूर येथे 'एम-टेक' करण्यासाठी खास कंपनीकडून पाठवण्यात आले. 'एम-टेक'नंतरही जवळ‍जवळ अर्धदशक मी 'एचएएल'मध्ये होतो. १९८०च्या दशकात सुरू झालेल्या 'ऑप्टिकल फायबर'च्या क्षेत्रातही भरपूर काम करायला मिळाले. व्यवस्थापकीय पातळीपर्यंत 'एचएएल'मध्ये काम केल्यानंतर मी उद्योजकीय क्षेत्रात वळण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी औरंगाबादमध्ये वाढत असलेली इंडस्ट्री व पत्नीची बँकेतील नोकरी या कारणांमुळे मी १९९१मध्ये औरंगाबादला स्थायिक झालो.

\B- औरंगाबादेत 'कॅलिबरेशन'च्या सेवांचा श्रीगणेशा कसा झाला?

\B- औरंगाबादमध्ये आल्यानंतर मी चार वर्षे जेएनईसी व एमआयटी अभियांत्रिकीमध्ये प्रोफेसरमधूनही काम केले. प्राध्यापकीचा कुठलाही अनुभव गाठीशी नव्हता, पण विद्यार्थ्यांचा मुलांचा स्कोअर वाढवण्यासाठी मी अनेक प्रयोग यशस्वी केले. मी 'जेएनईसी'मध्ये रुजू झाल्यावेळी केवळ तीन विद्यार्थी डिस्टिक्शन, १२ विद्यार्थी फर्स्ट क्लास, बाकीचे केवळ पास व अनेक विद्यार्थी एकतर नापास नाहीतर त्यांनी ड्रॉप घेतलेले होते. कुणाचे कुठे कशामुळे चुकते, याचा अभ्यास करून 'आयआयटी'च्या पद्धतीची अंमलबजावणी केली आणि एक वर्षानंतर १७ विद्यार्थी डिस्टिक्शन, ५७ विद्यार्थी फर्स्ट क्लास, १२ विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये आले, तर कधीही वर्गात न येणारे केवळ दोन विद्यार्थी नापास झाले. एक विद्यार्थिनी ५३ टक्क्यांवरून ६८ टक्क्यांवर गेली. मी उत्तम प्राध्यापक नव्हतो पण यशस्वी प्राध्यापक नक्कीच होतो. दरम्यान, अनेक कामे येत होती व म्हणूनच पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेऊन प्राध्यापकी सोडली. त्याका‍ळी 'आयएसओ १०००' मानांकनासाठी उद्योगांना कॅलिबरेशनची गरज भासू लागली व औरंगाबादमध्ये कॅलिबरेशनची कोणतीच ठोस सोय नव्हती. ही गरज लक्षात घेऊन 'एस टेक्नो सर्व्हिसेस' या रिसर्च लॅबची अधिकृत नोंदणी करून उद्योगांना कॅलिबरेशन सेवा देण्यास प्रारंभ केला. प्रत्येक उद्योगाच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन त्या गरजांनुसार कॅलिबरेशन करणाऱ्या उपकरणांची निर्मिती केली. त्याच काळात एका कंपनीचा १९ लाखांचा 'टर्न की प्रोजक्ट'ही करून दिला. 'यूएस-एफडीए'च्या मान्यतेसाठी औषधी कंपन्यांनाही कॅलिबरेशनची मोठी गरज भासू लागताच बहुतेक औषधी कंपन्यांना या सेवा दिल्या. ऑटोमोबाइल, लिकर इंडस्ट्रीला सेवा देतानाच रक्तपेढ्यांनाही सर्वप्रथम सेवा देण्याचा मान मिळाला. प्रत्येक इंडस्ट्रीसाठी कॅलिबरेशनची गरज वेगळी व म्हणूनच ते आव्हानात्मकही असते. विदेशातून या सेवा घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत होते, तर त्याच जागतिक दर्जाचे कॅलिबरेशन शहरात हजारांमध्ये मिळत होते. त्यामुळेच या सेवांचा प्रत्यक्ष मोठा वापर सुरू झाला. आज पर्किन्स, एन्ड्रेस-हाउजर, ग्रीव्हज कॉटन, कॅनपॅक, कोहलर, युनायटेड स्पिरिटस, लोंबार्डिनी यासारख्या देशातील ३०० पेक्षा जास्त उद्योगांना कॅलिबरेशनच्या सेवा दिल्या जात आहेत.

\B- मंदारजी, आपण कसे या क्षेत्राकडे वळालात?

\B- 'कॅलिबरेशन'सह अनेक प्रयोग-संशोधनात पार गढून गेलेल्या वडिलांना पाहता-पाहताच आमचे शिक्षण होत गेले. दहावीपर्यंत सेंट फ्रान्सिस, तर अकरावी-बारावी देवगिरी महाविद्यालयात शिक्षण झाले. बारावीत मेरिटमध्ये होतोच व 'इलेक्ट्रॉनिक्स'मध्येच इंजिनिअरिंग करायचे ठरवले होते. फक्त आयआयटी का एनआयटी, हा प्रश्न होतो व मी 'एनआयटी'कडे लक्ष केंद्रीत केले होते. चांगल्या स्कोअरमुळे कालिकतच्या (केरळ) प्रसिद्ध 'एनआयटी'मध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्येच बी-टेक पूर्ण केले. 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट'मध्ये (आयआयएफएम) 'एमबीए'ही पूर्ण केले व कॅम्पसमध्येच 'ओलाम' या जगप्रसिद्ध कंपनीत उत्तम संधी चालून आली. सिंगापूरहून करिअरची सुरुवात झाली व त्यानंतर दोन वर्षे आफ्रिकी देशांमध्येही व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, मात्र मूळ इलेक्ट्रॉनिक्स विषयापासून दूर जात असल्याचे लक्षात येताच पुन्हा वडिलांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला व २००८मध्ये 'एस टेक्नो सर्व्हिसेस'मध्ये जॉईन झालो. विविध देशांमध्ये मिळालेले व्यवस्थापकीय कौशल्य स्वतःच्या लॅबसाठी पणाला लावले. मानांकनाचे महत्त्व ओळखून लॅबला २०१२मध्ये 'एनएबीएल' मानांकन मिळवले. त्यानंतर आम्ही दोघांनी बौद्धिक संपदेवर (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी) लक्ष केंद्रित करून उद्योजकांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांना उपयोगी पडणाऱ्या कमी खर्चातील बाबींवर संशोधन करुन दहा पेटंट स्वातंत्र्यदिनी एकाच वेळी नोंदवले, जो जागतिक विक्रम ठरला. 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्येही त्याची नोंद झाली व आजतागायत हा विक्रम मोडलेला नाही. तशी शक्यताही कमीच. यापुढच्या टप्प्यात पेटंट मिळालेल्या उपकरणांची निर्मितीही करणार आहे व कमीत कमी शुल्कात सर्वोच्च तंत्रज्ञान लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तालयासमोरच आंदोलक शेतकऱ्यांनी मांडली चूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळ निवारणासाठीच्या सुविधांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारपासून धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी कडाक्याच्या ‌थंडीतही आपली मागणी कायम ठेवत रात्र कुडकुडत काढली. बुधवारी (२ जानेवारी) सकाळीच आंदोलक शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून चहा तसेच जेवण तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयसमोरच चूल मांडली.

परभणी जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली असून शासनाच्या दुष्काळ निवारण करण्याबाबत कोणत्याही उपाययोजना अंमलात आणण्यात येत नसल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयसमोर दुष्काळ निवारण संघर्ष समितीचे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात परभणीसह औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. बुधवारी सकाळीच चहा तसेच जेवण तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: झोळी तयार करून आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून जमेल तसे दहा, पाच रुपये वर्गणी गोळा केली आणि आंदोलनस्थळीच चहा तसेच खिचडी तयार केली. जालना जिल्ह्यातून काहींनी आंदोलकांसाठी भाकरीही दिल्या असल्याचे आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी सांगितले.

दुष्काळात आम्हाला हाताला काम द्या, पिण्‍यासाठी पाणी द्या, रेशन यासह १३ दुष्काळ निवारणासाठीच्या सुविधा तत्काळ अमलात आणा, दुष्काळग्रस्त जनतेला मोफत आरोग्य सुविधा, खाजगी व सरकारी दवाखाने व हॉस्पिटल उपलब्ध करा, ठोक्या, बटईने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान द्या, शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा करा, वीज बील माफ करा आदी मागण्या दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीची मागणी

गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद शहरात येणार असून इतरत्र उद्घाटने करत बसण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, असे म्हणत प्रशासनाकडे आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची मागणी केली. यावेळी कॉ. राजन क्षीरसागर, मुक्ताराम गव्हाणे, माणिक कदम, पूजा मोरे आदींची उपस्थिती होती, अशी माहिती गजानन पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदरशांच्या नावे फसवणूक; जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्यांपासून ते कागदपत्रांपर्यंत सर्व काही बनावट सादर करून दोन मदरशांच्या नावे सरकारची सहा लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी शेख मोहम्मद नदीम गुलाम अब्बास अली याचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला-अल-अमुदी यांनी बुधवारी (दोन जानेवारी) फेटाळला.

या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता मुनव्वर अहमद नईम अहमद (वय ४३, रा. कबाडीपुरा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, संशयित आरोपी शेख मोहम्मद नदीम गुलाम अब्बास अली (वय ४३, रा. जयसिंगपुरा) याच्या लोकहित शिक्षण संस्थेअंतर्गत उम्मेहलीमा अरबी मदरसा व मरयब अरबी मदरसा, असे दोन मदरसे सुरू असल्याचे दाखवून २०१४-१५ मध्ये पहिल्या मदरशास तीन लाख ७० हजार रुपये, तर दुसऱ्या मदरशास दोन लाख ७० हजार रुपये, असा सहा लाख ४० हजार रुपयांचा निधी मिळवला. तसेच शाळेच्या इमारतीचा बनावट भाडेपट्टा करारनामा तयार करण्यात आला व ८५ विद्यार्थ्यांची बनावट यादीदेखील जोडण्यात आली. अशा प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची व जनतेची फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद देण्यात आली. त्यावरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात आरोपी शेख मोहम्मद नदीम याला सोमवारी (३१ डिसेंबर) अटक करून कोर्टात हजर केले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, प्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्थेत असून, आरोपीच्या साथीदारांचाही शोध घेणे बाकी आहे. तसेच आरोपीविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध असल्याने आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोरकट यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images