Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मनसे शहराध्यक्षानंतर तालुकाध्यक्षाला बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तपोवन एक्स्प्रेसची पॅन्ट्री बंद पाडू, अशी धमकी देत पॅन्ट्री चालकाला दोन लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात परभणीतील मनसे शहराध्यक्ष सचिन भीमराव पाटील याला अटक करुन त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आल्यानंतर, मनसे तालुकाध्यक्ष उत्तम गंगाधर चव्हाण यालाही औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपीला तालुकाध्यक्षाला सोमवारपर्यंत (७ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी शक्रवारी (४ जानेवारी) दिले.

या प्रकरणात पॅन्ट्री सुपरवायझर अशोक चतुर राठोड (४२, रा. गोपालनगर, सांगवी, नांदेड) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, ३० ऑक्टोबर २०१८ रोजी मनसेचे कार्यकर्ते तपोवन एक्स्प्रेसने आले. त्यांनी पॅन्ट्रीमधील पदार्थ जास्त दराने विक्री करुन त्याचे बिल दिले जात नाही, अशी कारणे सांगत पॅन्ट्री चालकाचा परवाना रद्द करू व आंदोलन करुन पॅन्ट्री बंद पाडू, अशी धमकी दिली. दरम्यान, ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पॅन्ट्रीचे सुपरवायझर अशोक राठोड यांना आरोपी सचिन भिमराव पाटील (३२, रा. साईप्रसाद, शिवरामनगर, परभणी) व आरोपी उत्तम गंगाधर चव्हाण (५४, रा. संतगाडगेबाबा नगर, परभणी) यांनी फोन करुन तपोवन एक्सप्रेसमधील पॅन्ट्री सुरू ठेवण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली, अशा तक्रारीवरुन औरंगाबाद रेल्वे पोलिस ठाण्यात सचिन पाटील व उत्तम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी सचिन पाटील याला गुरुवारी पहाटे तीन वाजता अटक करुन गुरुवारीच कोर्टात हजर केले असता, त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर, आरोपी उत्तम चव्हाण याला गुरुवारी रात्री नऊ वाजता अटक करुन शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यालाही सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहायक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलाचा खून, पित्याला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

१३ वर्षीय पोटच्या मुलाला काठीसह लोखंडी गजाने बेदम मारहाण करणारा आणि त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरलेला आरोपी पिता प्रभुसिंग विठ्ठलसिंग बैनाडे याला गुरुवारी (३ जानेवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास अटक करुन शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, त्याला सोमवारपर्यंत (७ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. ए. पठाण यांनी दिले.

या प्रकरणी इयत्ता सातवीतील मृत मुलगा रवी याची आई व आरोपीची पत्नी रेणुका प्रभुसिंग बैनाडे (रा. फेरनजळगाव, ता. जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १ जानेवारी रोजी रवी हा शाळेतून पळून गेला, त्याला आम्ही शोधून आणले, त्याला मारू नका, असे शाळेच्या शिक्षकांनी फिर्यादी व आरोपी प्रभुसिंग विठ्ठलसिंग बैनाडे (३५, रा. वरील प्रमाणे) यांना सांगितले होते. दोन जानेवारी रोजी आरोपी घरी असताना त्याने रवीला 'शाळेतून का पळून गेला होता' असे विचारत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीने आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने फिर्यादीला ढकलून दिले. घराबाहेर पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रवीला काठी व लोखंडी गजाने डोक्यावर, हाता-पायांवर, पोटावर बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. रवीच्या लहान भावालाही मारहाण केली आणि वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देत आरोपी पळून गेला, तर उपचारादरम्यान रवीचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भादंवि ३०२, ५०४, ५०६ कलमान्वये करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bखुनामागच्या कारणाचा होणार तपास

\Bआरोपी पित्याला गुरुवारी रात्री अटक करुन शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, प्रकरण गंभीर असून, गुन्ह्यानंतर आरोपी कुठे-कुठे पळून गेला, काय-काय केले, तसेच मुलाचा खून करण्यामागे नेमका काय उद्देश होता आदींबाबत सखोल तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील शोभा विजयसेनानी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत (७ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दा. वि. गर्गे यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद : सिडको एन-३ येथील रहिवासी, संस्कृत पंडित डॉ. दा. वि. गर्गे (वय १०२) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निवृत्त प्राचार्य डॉ. रंजन गर्गे यांचे ते वडील होत.

डॉ. दा. वि. गर्गे यांनी १९४७ मध्ये मुंबई विद्यापीठातून डॉक्‍टरेट मिळवली होती. 'शबर भाष्यातील अवतरणे : एक चिकित्सक अभ्यास' हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. १९४६ ते १९७८ या कालावधीत ते अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात प्राध्यापक, उपप्राचार्य आणि के. ई. एस. संस्थेचे सचिव होते. त्यानंतर पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात संस्कृत बृहत्कोशाच्या संपादक मंडळावर काम केले. भांडारकर संस्था व टिळक महाराष्ट्र विद्यापीठातही त्यांनी अध्यापन, संशोधन आणि मार्गदर्शन केले. औरंगाबादेत स्थायिक झाल्यानंतर अभिजात नृत्य, नाट्य, संगीत क्षेत्रातील कलाकार, ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षकांना गीता, वैदिक गणित, कुंडली वाचन, अभिजात कलांचा इतिहास, वेदाभ्यास, पौरोहीत्य इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करीत होते. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद १६ जानेवारीपासून

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याच्या राजधानीत नववी आंतररराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद १६ ते १८ जानेवारीदरम्यान होणार असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाचे संचालक गिरीराज गोयल यांनी दिली. तब्बल आठ वर्षांनंतर ही परिषद होत आहे. या आधी ही परिषद २०११मध्ये तेहरान येथे झाली होती. या परिषदेला ७८ देशांचे १५० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भारतातील ३५० प्रतिनिधींची उपस्थिती या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला केंद्रीय जल आयोगाचे संचालक अनुज कंवल, जिल्हाधिकारी उदय चौधरी, वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, 'कडा'चे मुख्य अभियंता दिलीप तवर हे उपस्थित होते. या परिषदेचे आयोजन केंद्रीय जलसंपदा मंत्रालय करणार आहे.

या परिषदेत विविध राज्यातील जलसंपदामंत्री सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या परिषदेचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र आजपर्यंत त्यांची संमती मिळालेली नाही, असे गोयल यांनी सांगितले. ही परिषद शेतकऱ्यांसाठी पर्वणी असणार आहे. या परिषदेमध्ये पाण्याचा वापर सूक्ष्म पद्धतीने कसा करता येईल यावर प्रकाश टाकला जाणार आहे. विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरी बाजारचे आयोजन करण्यात आले आहे. याला जोडून सूक्ष्म सिंचनाच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये चीन, नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी, जपान, कोरिया, अमेरिका, इस्राइल आदी ४५ देशातील कंपन्या सहभागी होणार आहेत. याशिवाय भारतातील सर्वच मोठ्या कंपन्या या प्रदर्शनामध्ये असणार आहेत.

या परिषदेच्या अनुषंगाने १५ जानेवारी रोजी 'वाल्मी'मध्ये शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत राज्यातील १०० आणि इतर राज्यातील ५० शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती 'वाल्मी'चे दीपक सिंगला यांनी दिली. या कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था 'वाल्मी'मध्ये करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे उद‌्घाटन राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि लाभक्षेत्र विकासचे सचिव राजेंद्र पवार हे या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.

\Bसूक्ष्म सिंचनात वाढ\B

नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आजपर्यंत सूक्ष्म सिंचनामध्ये सहा टक्के वाढ झाली आहे. २०१५मध्ये भारतामध्ये सूक्ष्म सिंचनाचे प्रमाण सात टक्के होते त्यात सहा टक्क्यांची भर पडून आता ते १३ टक्के झाल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाचे संचालक अनुज कंवल यांनी दिली.

\Bसूक्ष्म जलसिंचनाचे प्रमाण

७ टक्के २०१५

१३ टक्के २०१८ \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिफर्ड पेमेंट’साठी कंत्राटदार मिळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांच्या कामांसाठी कंत्राटदार मिळत नसल्यामुळे फेरनिविदा काढण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी फेरनिविदा मागविण्यात येणार आहे. ६८ कोटी रुपये किंमतीच्या २१ रस्त्यांची कामे डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले आहे. या अनुदानातून ३० रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगची कामे केली जाणार आहेत. त्याशिवाय ५० कोटी रुपये किंमतीची डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता, परंतु राज्य दरसूची आणि 'जीएसटी'चा विचार करता ५० कोटींच्या ऐवजी ६८ कोटींमधून डिफर्ड पेमेंटचे रस्ते केले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आणि त्यानुसार निविदा देखील मागविल्या. निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांसाठी एकही निविदा या काळात प्राप्त झाली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली.

निविदेच्या पहिल्या प्रयत्नात कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता सोमवारी फेर निविदा काढण्यात येणार आहे. निविदा भरण्यासाठी २५ दिवसांची मुदत असेल. डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून २१ रस्त्यांच्या व्हाईट टॉपिंगची कामे करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

\B१२५ कोटींमधून रस्ते करण्याची मागणी\B

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी रस्त्यांच्या कामांसाठी आणखीन १२५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. त्यामुळे डिफर्ड पेमेंटचे रस्ते नव्याने मिळणाऱ्या शासकीय अनुदानात वळते करावेत, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे. शुक्रवारी काही नगरसेवकांनी महापौरांकडे ही मागणी केली, पण त्याला महापौरांनी नकार दिला. १२५ कोटींमधून दुसऱ्या रस्त्यांची कामे हाती घेऊ, डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांना कंत्राटदार मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खेडेगाव परिवर्तनाचे तीर्थक्षेत्र करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कोणतेही काम मनापासून केले तर थकवा येते नाही. दुसऱ्यासाठी चांगले काम करण्याची वृत्ती तयार होणे गरजेचे आहे. खेडेगाव समाज परिवर्तनाचे तीर्थक्षेत्र करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न करावे,' असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी केले. ते निवासी शिबिरात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कुबेर गेवराई (ता. औरंगाबाद) हे गाव दत्तक घेतले आहे. राजीव गांधी महाविद्यालय आणि विद्याधन महाविद्यालयाच्या वतीने गेवराई येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे शुक्रवारी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी उद्घाटन करण्यात आले. यावेळी अधिसभा सदस्य नरहरी शिवपुरे, सरपंच दिगंबर कुबेर आणि रासेयो संचालक डॉ. टी. आर. पाटील उपस्थित होते. हे शिबिर चार ते दहा जानेवारी या कालावधीत होणार आहे. याअंतर्गत गावाला पाणी पुरवठा होत असलेल्या तलावातून गाळ काढण्याचे काम करण्यात येणार आहे. तब्बल ४०० ते ४५० ट्रॅक्टर गाळ शेतकरी शेतात घेऊन जाणार आहेत. या माध्यमातून जवळपास आठ लाख लिटर पाणी जास्त साठवता येणार आहे. डॉ. नानासाहेब लावंड यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रा. समाधान निकम यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला उपसरपंच दामोदर कुबेर, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामेश्वर कुबेर, बाबुराव कुबेर, बबनराव कुबेर, डॉ. एस. ए. हुंबरे, डॉ. शेख परवेझ, डॉ. भाऊसाहेब ढवळे, प्रा. सुरेश तावडे, प्राचार्य. डॉ. एस. एस. पाटोळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीड गव्हर्ननर, पासिंग विक्रेत्यांकडून वाहनधारकांची लूट

$
0
0

(फोटो घेऊ नये)

…(मोठी सिंगल बातमी)

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टॅक्सी आणि रिक्षा पासिंगसाठी आरटीओने नेमून दिलेल्या अधिकृत संस्था वाहनधारकांची लूट करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या विक्रेत्यांची मनमानी थांबवावी तसेच टॅक्सी पासिंग असताना खाजगी नंबर प्लेटचा वापर करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना शुक्रवारी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनामध्ये गेल्यावर्षी विक्रेत्यांनी स्पीड गव्हर्नर बसवून दिले त्यावेळी दिलेले ट्रेड सर्टिफिकेट पुढील वर्षी उपयोगी पडेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, सध्या हे विक्रेते रिन्युअलच्या नावाखाली सतराशे ते दोन हजार रुपये उकळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिक्षा मीटर एलपीजी गॅस टेस्टिंग करून देणाऱ्या विक्रेत्यांकडून देखील रिक्षाचालकाची लूट सुरू असून सेफ्टी सिरॉनच्या टॅक्सी चालकाकडून १२ हजार ते १५ हजार रुपयांची मागणी हेात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. न बसविल्यास टॅक्सी पासिंग होणार नसल्याची भीती दाखविण्यात येत असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. तसेच शहरात नामांकिंत कंपन्याच्या कार टॅक्सी पासिंग असून त्या खाजगी नंबर प्लेटचा वापर करीत असून त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक मनीष जोगदंडे, मारोती पातळे, दौलतराव बोंद्रे, राजू धनेधर, जाकेर पठाण, काशीनाथ सुरडकर, राहूल तिनगोटे व सागर लबडे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाणकार वाचक घडणे हे संमेलनाचे संचित !

$
0
0

औरंगाबाद : 'जाणकार वाचक घडणे हे संमेलनाचे संचित असावे,' असे मत प्रसिद्ध साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केले. चिखली (जि. बुलढाणा) येथे पाच व सहा जानेवारीला झेप राज्यस्तरीय पाचवे मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. यानिमित्त संमेलनाध्यक्ष डॉ. कांबळे यांच्याशी साधलेला संवाद…

- तुषार बोडखे

Tushar.bodkhe@timesgroup.com

\B- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर छोट्या संमेलनांच्या उपयोगितेबाबत काय सांगाल ?

\B- उत्सव आणि उत्साह असा साहित्य संमेलनात सरळ भेद आहे. मोठी साहित्य संमेलने उत्सवाचा भाग असतात. तर छोट्या संमेलनात उत्साह अधिक असतो आणि चर्चा अतिशय गंभीरपणे होते. अनुभवसंपन्नतेचे खनिज द्रव्य यातूनच साध्य केले जाऊ शकते. लेखक जीवनानुभवाचे संचित अशा लहान संमेलनातून उत्तमपणे आविष्कृत करू शकतो. ही संमेलने एका अर्थाने सृजनाची आणि लेखनाची कार्यशाळा असते. वैविध्यपूर्ण जीवनानुभवाचा कस त्यातून प्रतित होतो. ग्रामविश्व आणि मानवी मनं लेखकाच्या अभिव्यक्तीतून ठळकपणे लक्षात येतात.

\B- अशा संमेलनाद्वारे जागरुक वाचक जोडला जातो का ?

\B- जागरुक वाचक जोडण्याची प्रक्रिया अंशत: घडते. काही वाचक लेखकाला भेटून वाचलेली पुस्तके आणि भूमिका यावर थेट चर्चा करतात असा माझा अनुभव आहे. लेखकाची एखादी भूमिका आवडली नाही, तर वाचक सांगण्याचे धाडस करतात. एका अर्थाने अशा जाणकार वाचकांनी स्पष्टवक्तेपणा जपलेला असतो. वाचक आणि श्रोता घडणे हे संमेलनाचे संचित, फलश्रुती असावी. त्यामुळे लहान संमेलनातून जागरूक वाचक घडतात या मुद्द्याशी सहमत आहे. त्यांच्यातील आवडीला कायमचे जोडण्याचे काम संमेलने करतात.

\B- लहान संमेलनांचे भाषिक योगदान काय असावे ?

\B- सृजकाची किंवा साहित्य निर्मात्याची थेट बोली साहित्यात उमटणे महत्त्वाचे असते. बोली साहित्य व्यवहारात येणे हे भाषा समृद्धीचे काम आहे. त्या दृष्टिने ही संमेलने महत्त्वाची आहेत. उत्तम साहित्यिकाचा अशा संमेलनातून शोध घेता येतो. त्यामुळे जिल्हा पातळीवर लहान संमेलने भरवणे योग्य ठरेल. लहान संमेलनावर अनुकूल-प्रतिकूल मतमतांतरे असली तरी त्यांची उपयोगिता लक्षात घेणे आवश्यक ठरते.

\B- शहरी वर्तुळात परिवर्तनवादी किंवा आंबेडकवादी साहित्य असले तरी ग्रामीण भागापर्यंत हे साहित्य झिरपण्याचे प्रमाण थंडावले आहे का ?

\B- सामाजिक अभिसरणाच्या वेगवेगळ्या चळवळी असतात. वाड्मयीन वाटचालीच्या मुळाशी सामाजिक आणि सांस्कृतिक संवेदना असतात. अशा प्रकारचे वाड्मय चळवळीच्या गतिमानतेशी संबंधित असते. प्रत्यक्षात चळवळ मंदावल्यास त्याचा अपरिहार्य परिणाम वाड्मय निर्मितीवर होतो. चळवळीत आवेश असल्यास त्याचे संस्कार निर्मितीवर होतात. तसेच चळवळीतील संभ्रमाचेही पडतात. सध्या आंबेडकरी जाणिवेची चळ‌वळ संधीप्रकाशात आहे. आतापर्यंत निर्माण झालेल्या साहित्यातील आशयसृष्टीचा झोत किमान शिक्षित रसिकांपर्यंत पोहचलेला आहे. त्यामुळे नवीन साहित्य झिरपण्याचे प्रमाण कमी असले तरी थांबलेले नाही.

\B- सद्यस्थितीत मराठी साहित्य व्यवहार क्षीण वाटतो का ?

\B- मराठी साहित्य व्यवहार अभिमानस्पद आहे. दीक्षाभूमी, चैत्यभूमी, धम्म परिषदा, नामविस्तार दिन या ठिकाणी होणारी पुस्तक विक्री पहा. ही पुस्तके चळवळीची असतील, पण त्यांची विक्री लक्ष वेधते. चळवळीशिवायच्या साहित्यकृतींनाही उत्तम मागणी आहे. जीवनानुभवाचे उत्कट दर्शन घडवणारी साहित्यकृती असेल, तर वाचकांपर्यंत निश्चित पोहचते. अशी अनेक पुस्तके आहेत. अनुवादित वाड्मयाचे स्वतंत्र विश्व आहे. मोठा वाचकवर्ग त्यांना लाभला आहे. दर्जेदार मराठी साहित्य इतर भाषांत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लेखक आणि साहित्य संस्थांची ही जबाबदारी आहे. अनुवादाकडे पुरेसे लक्ष देऊन साहित्य संस्थांनी साहित्याचा गौरव वाढवावा असे आवर्जून वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शेतीसमोर आज अनेक समस्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष करावा. मूल्यवर्धनासाठी प्रयत्न केल्यास सर्व संकटावर मात करणे शक्य होईल,' असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

देसाई शनिवारी करमाड येथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची कार्यशाळेत बोलत होते. यावेळी एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन, संजय नगरीळकर, प्रा. डॉ. स्मिता लेले, श्रीकृष्ण गांगुर्डे, विलास शिंदे, योगेश थोरात, भारत सपकाळ, सूर्याजी शिंदे, श्याम निर्मळ उपस्थित होते. यावेळी देसाई म्हणाले, 'शेती वाचवण्यासाठी शेतकरी उत्पादन कंपन्या मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाची किंमत त्याला ठरवता येत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी नव्या गोष्टींचा शोध घ्यायला पाहिजे. कृषीमालावर प्रक्रिया केली पाहिजे. सोबत मूल्यवृद्धी करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी साध्या साध्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पीक पद्धतीत बदल करण्याचाही विचार करावा. संकटात असलेला शेतकरी स्वतःच्या प्रयत्नातून बाहेर पडू शकेल,' असे देसाई म्हणाले.

'जगात कृषी क्षेत्राची उलाढाल सातशे बिलियन डॉलरची पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बदल्या काळानुसार आपल्यात बदल करून घेणे गरजेचे आहे,' असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांची शिष्टाई असफल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध मागण्यांसाठी 'डॉक्टर ऑफ फार्मसी' (फार्म. डी.) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेले उपोषण शनिवारी पाचव्या दिवशीही सुरू होते. आमदार विनायक मेटे, अतुल सावे यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेत शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल ठरला. महिनाभरात प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील फार्म.डी.च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या विविध मागण्यांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक जानेवारीपासून उपोषण सुरू केले आहे. ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. शनिवारी आमदारांपासून ते विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत पाठिंबा दिला. त्यासह संबंधित मंत्र्यांशी भेटीचे आश्वासनही विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध मागण्यांमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा, पूर्णवेळ शिक्षक भरण्यात यावेत, शिष्यवृत्ती दिली जावी, फार्मसी प्रॅक्टिस विभाग सुरू करावा, भविष्यातील नियोजन, पदवीपूर्व आरोग्य सेवेच्या काळात मासिक मानधन सुरू करण्यात यावे, अशा मागण्या आहेत. दरम्यान, तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी विद्यार्थ्यांना भेटण्यासही आले नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, प्राचार्य डॉ. मौर्य यांच्यासह इतर अधिकारी यांना आयुक्तांनी बैठकीसाठी बोलावले. त्यावेळी विद्यार्थ्यांना भेटण्यास सहसंचालकांनी नकार दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

\Bमंगळवारी मंत्र्यांना भेटणार

\Bविद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी, समस्या यापूर्वी वारंवार शासन, प्रशासनदरबारी मांडल्या. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हे विद्यार्थी उपोषणास बसले. शनिवारी आमदार अतुल सावे, विनायक मेटे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत मंगळवारी (८ जानेवारी) शिष्टमंडळाची संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी चर्चा करून आणण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हे शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे. महिनाभरात प्रश्न सोडण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलनातून माघार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

\Bविविध संघटनांचा पाठिंबा

\Bविविध विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. 'एसएसयूआय'ने पाठिंबा देत सरकार विरोधी निदर्शने केली. 'डॉक्टर ऑफ फार्मसी' अभ्यासक्रमाला कुठल्याही प्रकारचे शासकीय धोरण न ठरल्यामुळे विविध मागण्यांनसाठी सुरू असलेल्या उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करत आहे. लवकरात लवकर मागण्या मान्य करून निर्णय न घेतल्यास अधिक आक्रमकपणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. अधिसभा सदस्य जितेंद्र देहाडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने आंदोलन केले. यासह 'मनविसे', 'एएसएफ'आय, जय भगवान महासंघ, शिवसंग्रमा विद्यार्थी आघाडीनेही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरबाबत सरकारला जागरूकता नसेल, तर याला काय म्हणायचे. तंत्रशिक्षण विभागाच्या कारभाराचा ही फटका बसला. सहसंचालकांनी तर भेटायचेही टाळले ही कुठली पद्धत. जोपर्यंत ठोस आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही.

- रामप्रसाद नागरे, उपोषणार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेरच्या श्वासाने मृत्यूशी झुंज संपली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

गेल्या ऑगस्ट महिन्यापासून महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील पांढरा वाघ सचिनची मृत्यूशी सुरू असलेली झुंज शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याच्या अखेरच्या श्वासाने संपली. चार डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते.

सचिन हा पांढरा वाघ ऑगस्ट महिन्यात आजारी पडला. सुरुवातीला त्याच्या आजाराने नेमके निदान झाले नाही. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी.एस. नाईकवाडे व डॉ. जी.एन. पांडे सचिनवर उपचार करीत होते. उपचाराच्या पद्धतीत आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी हस्तक्षेप केला आणि पुणे येथील प्राणिसंग्रहालयाचे डॉ. राजकुमार जाधव यांना औरंगाबादेत बोलावले. डॉ. जाधव यांनी सचिनला तपासले आणि त्याला अर्धांगवायू झाल्याचे स्पष्ट केले. अर्धांगवायूमुळे त्याचे मागचे दोन पाय आणि कंबरेचा भाग लुळा पडला होता. त्यांनी उपचाराची पद्धत आखून दिली. त्यानंतर महापालिकेने डॉ. नीता सिंग यांना सचिनवर उपचार करण्यासाठी बोलावले. त्यांनी सुमारे तीन महिने सचिनवर उपचार केले. अखेर शनिवारी सचिनचे निधन झाले.

\B...फक्त वीर शिल्लक!

\Bसचिनचा जन्म महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात १८ जानेवारी २००४ रोजी झाला. त्याचे आई - वडील सीता आणि शामू यांचाही जन्म प्राणिसंग्रहालयात झाला होता. ओरिसा येथील अभयारण्यातून महापालिकेने भानुप्रिया आणि प्रमोद या दोन पांढऱ्या वाघांची जोडी आणली होती. सचिन हा भानुप्रिया आणि प्रमोदचा नातू होता. सचिनच्या निधनामुळे आता प्राणिसंग्रहालयात वीर हा एकच पांढरा वाघ शिल्लक राहिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन्यथा उद्योजकांचा जीएसटी परतावा रोखू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणीसाठी राज्य सरकार उद्योजकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. सरकारने राबवलेल्या उद्योग धोरणानुसार ८० टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. या धोरणाचे पालन होत नसेल तर जीएसटी परतावा रोखू,' असा इशारा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी उद्योजकांना दिला.

राज्य शासनाच्या उद्योग विभाग तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने कलाग्राम येथे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देसाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत खैरे होते. यावेळी आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, 'सीएमआयए'चे अध्यक्ष राम भोगले, पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य, 'सीआयआय'च्या अध्यक्ष मोहिनी केळकर, मसिआचे अध्यक्ष किशोर राठी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे आदींची उपस्थिती होती. यावेळी देसाई म्हणाले, 'शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिकांना न्याय देण्यासाठी लढा दिला. औद्योगिक क्षेत्रात कंपन्या उभारण्यासाठी सरकार प्लॅट, वीज, रस्ते, यासह अन्य पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देते. त्यांनी उद्योग उभारावेत, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असेच धोरण राज्य सरकारचेही आहे. या धोरणानुसार ८० टक्के स्थानिकांना रोजगार देणे आवश्यक आहे. मात्र, अलीकडे धोरण पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे, असे होत असेल तर उद्योजकांना दिल्या जीएसटी परताव्याचा विचार करावा लागेल,' असा इशारा त्यांनी दिला. 'दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत शेंद्रा, बिडकीन औद्योगिक परिसरात अनेक नवनवीत उद्योग येत आहेत. त्यामध्ये संरक्षण साहित्य बनविणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांतर्गत बिडकीनमध्ये नवीन १५ ते २० उद्योग उभारले जाणार असून, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. हा सहावा मेळावा असून अशा प्रकारच्या मेळाव्यातून आतापर्यंत १० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. औरंगाबादेतील या मेळाव्यातून शेकडो तरुणांना संधी मिळेल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात खासदार खैरे यांनी 'कंपन्यांनी सरकारच्या धोरणानुसार स्थानिकांना संधी दिला पाहिजे,' अशी भूमिका विशद केली.

\Bतरुणांची तोबा गर्दी

\Bनामांकित कंपनीत रोजगारांची संधी मिळेल, या आशेपोटी या मेळाळ्यासाठी बेरोजगार युवक, युवतींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मेळाव्यासाठी सुमारे साडेसात हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर सूमारे ९०हून अधिक उद्योजक, कंपनी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुलाखत सत्र सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. पात्र उमेदवारांना कंपन्यांकडून पत्र दिली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपात सहभागी झाल्यास ‘एस्मा’

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सात आणि आठ जानेवारी रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यांना 'एस्मा' कायदा लावू, असा इशारा मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिला आहे.

राज्य शासनाच्या अधिपत्याखालील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या वीज कंपन्यांमध्ये काम करणारे ८६००० हजार अधिकारी, कर्मचारी व अभियंते यांचे नेतृत्व करणाऱ्या सहा प्रमुख संघटनेच्या नेतृत्वात कृती समितीतर्फे २४ तासांच्या संपची हाक देण्यात आली आहे. याशिवाय पुन्हा चार वर्षानंतर औरंगाबादचे खासगीकरण करण्यासाठी एका ग्रुपकडून सर्वेक्षण सुरू आहे. या विरोधात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे वीज वितरण व्यवस्था संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मानवी अस्तित्वास आवश्यक सेवा अविरत सुरू राहाव्यात याकरिता शासनाकडून अत्यावश्यक सेवा परीक्षण अधिनियम महाराष्ट्रात लागू आहे. सदर कायदा महावितरणलाही लागू आहे. त्यामुळे विद्युत ग्राहकांना अविरत व सुरळीत वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी औरंगाबाद परिमंडलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

\B

नियंत्रण कक्षाचे क्रमांक\B

आंदोलन काळात विद्युत सेवा सुरळीत राहावी यासाठी महावितरणने नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे. या काळात गैरसोय झाल्यास वीजग्राहकांनी नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. औरंगाबाद शहर मंडल (७०६६०४२४१०, ७०६६०४२४१२), -औरंगाबाद शहर विभाग-१ (७०६६०४२२०२), औरंगाबाद शहर विभाग-२ (७०६६०४२४४५, ९८५०६३२५८०). औरंगाबाद ग्रामीण मंडल (७८७५७५६६५२), औरंगाबाद ग्रामीण विभाग-१ (०२४०-२४८५२०९, ०२४०-२४८०६८८), औरंगाबाद ग्रामीण विभाग-२ (७८७५४१४५९१), कन्नड विभाग (७८७५४३१९६४). जालना मंडल (७८७५७६४०१९, ७८७५७६४१४४), जालना-१ विभाग (७८७५७६४१७९, ७८७५७६४०१३), जालना-२ विभाग (७८७५४२७८८१, ७८७५७६४०१४).

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चॉकलेटच्या आमिषाने चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चॉकलेटचे आमिष दाखवत एका चार वर्षीय मुलीवर अज्ञाताने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद चौकाजवळ असलेल्या एका प्री प्रायमरी प्ले ग्रुपच्या ज्यूनिअर केजीमध्ये या भागात राहणारी एक चार वर्षांची मुलगी शिक्षण घेते. शुक्रवारी चारच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने या मुलीला चॉकलेट देण्याचे अमिष दाखवून शाळेच्या जवळील परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही मुलगी शाळेतून घरी आली. घरी आल्यानंतर तिने आपल्याला त्रास होत असल्याचे आईला सांगितले. आईने मुलीला जेव्हा महिला डॉक्टरकडे नेले, तेव्हा तिच्यावर अतिप्रसंग झाल्याची माहिती समोर आली. या मुलीच्या आई - वडिलांनी सिडको पोलिस ठाणे गाठून याची माहिती दिली.

पोलिसांकडून नराधमाचा तपास सुरू

सदर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात नेण्यात आले. घाटी रूग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानंतर सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी सिडको पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी या शाळेला तसेच आसपासच्या परिसराला भेट दिली. या प्रकरणाचा तपास सिडको पोलिसांकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेतर्फे आज ‘ममता दिना’चे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेतर्फे मीनाताई ठाकरे यांचा जन्मदिवस ममता दिन म्हणून साजरा केला जातो. रविवारी (६ जानेवारी) शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेतर्फे मीनाताई ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी ममता दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुलमंडी येथील चौकात सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आपाल ग्रुपचा भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास खासदार चंद्रकांत खैरे, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांनी देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे, आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आविष्कार’ची जल्लोषात सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नावीन्यपूर्ण संकल्पना असलेल्या 'आविष्कार' तंत्रज्ञान महोत्सव विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी ठरला. सहा विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या महोत्सवाचा शनिवारी सायंकाळी समारोप करण्यात आला. राज्यस्तरीय महोत्सवात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ४८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आविष्कार तंत्रज्ञान महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. तीन वर्षांपासून प्रशासन जिल्हा, विद्यापीठ आणि राज्यस्तरीय महोत्सव घेत आहे. सहा विद्याशाखा सहभागी असलेल्या महोत्सवात २५७ विद्यार्थ्यांनी कल्पक संकल्पना सादर केल्या. पदवी, पदव्युत्तरचे विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आणि संशोधक प्राध्यापकांनी सहभाग घेतला. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नवीन उद्योजकीय संकल्पना मांडल्या. यातील सर्वोत्कृष्ट संकल्पना असलेल्या विद्यार्थ्यांना गडचिरोली येथे १५ जानेवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळाली आहे. एकूण ४८ विद्यार्थी राज्यस्तरीय महोत्सवात सहभागी होतील. या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, समन्वयक डॉ. भारती गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यस्तरीय आविष्कारसाठी चार गटातील प्रत्येकी १२ असे ४८ विद्यार्थी निवडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहुण्याचा खून करणाऱ्यास जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीला नांदायला का पाठवत नाही असे म्हणत मेहुण्याचा (बायकोचा भाऊ) चाकूने भोसकून खून करणान्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सिल्लोड येथील पंचायत समितीच्या क्वार्टरमध्ये राजेंद्र सखाराम वानखेडे (वय ४२) हा आपल्या कुटुंबीयासोबत राहत होता. त्यांच्या बहिणीचे लग्न भोकरदन तालुक्यातील सुरगळी येथील रत्नाकर दत्तू जाधव (वय ४८)सोबत झाले होते. या पती - पत्नीमध्ये खटके उडत असल्यामुळे त्या भावाकडे येऊन राहत असत. याचा जाब विचारण्यासाठी रत्नाकर जाधव चार ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आला. घरामध्ये राजेंद्र वानखेडेची पत्नी लक्ष्मीबाई असल्यामुळे रत्नाकरने माझ्या पत्नीला नांदायला का पाठवत नाही?, येथे का ठेवून घेता ?असे म्हणत वाद घातला. दरम्यान घरी भांडण सुरू असल्याची माहिती राजेंद्र वानखेडेला सांगितल्यामुळे तो धावत घरी आला त्यावेळी पत्नी लक्ष्मीबाई रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेली दिसली. राजेंद्र आला असल्याचे रत्नाकरला दिसताच त्याच्या दिशेने धावून गेला त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये झटपाट झाली आणि राजेंद्रच्या हातावर आणि पोटात रत्नाकरने चाकूने सपासप वार केले. भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणारा शेजारी देविदास जाधव यांच्यावर देखील चाकूने वार करून जखमी केले.

या घटनेची माहिती मिळतच सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. जोगदंड आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले जखमी झालेल्या राजेंद्र, त्याची पत्नी लक्ष्मीबाई आणि शेजारी देविदास या तिघांना सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या तिघांवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता आठ ऑगस्ट रोजी उपचार दरम्यान राजेंद्र वानखेडचा मृत्यू झाला. वानखेडेच्या जबावरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात रत्नाकर जाधव विरोधात भादंवि ३०७, ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या समोर झाली. त्यांनी आरोपीला जन्मठेप ठोठावली.

\B१४ साक्षीदारांचे जबाब

\Bमुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी १४ साक्षीदरांचे जबाब नोंदविले. यामध्ये लक्ष्मीबाई, देविदास जाधव या दोघांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब गृहित धरून न्यायालयाने भादंवि ३०२ कलमान्वे जन्मठेप, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे सक्तमजुरी, भादंवि ३०७ कलमान्वये सात वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाईपोटी जखमी लक्ष्मीबाईला दंडातील १५ हजार रुपये द्यावे असे आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाव्या आरोपीला अटक; कोठडीत रवानगी

$
0
0

म. टा.प्रतिनिधी,औरंगाबाद

मुलाला मारल्याचा जाब विचारणाऱ्यार चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहाव्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना शनिवारी यश आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले. शेख आयूब शेख महेबूब (४८, रा. आलाना गेवराई, ता. जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे.

या प्रकरणात मज्जीत चंदू शेख (४५, रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) यांनी तक्रार दिली. मज्जीत शेख यांचा मुलगा समीर शेख हा ब्रूकबॉन्डमध्ये मौलाना असून तो मशीदमधील मुलांना शिकवतो. नऊ डिसेंबर रोजी सकाळी समीरचा मज्जीत यांना फोन आला. त्याने मुलांना शिकवताना एका मुलाला चापट मारली, म्हणून त्या मुलाच्या नातेवाईकांनी मला मारहाण केली, मला घ्यायला या असे समीरने सांगीतले. त्यानंतर मज्जीत शेख हे शेजारी राहणाऱ्या दोन मुलांसह दुचाकीवर समीरला आणण्यासाठी मशीदमध्ये गेले असता त्यांना अन्सार अकबर पठाण व एजाज अकबर पठाण यांनी चाकू काढून समीर, वसीम व मज्जीत यांच्यासोबत असलेल्या फरहाण शेख यांच्यावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रज्जाक पठाण, मन्सूर पठाण, अजहर शेख व शेख शाहरुख यांनी काठ्यांनी मारहाण केली. या प्रकरणात सहा जणांवर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपी शेख आयूबला अटक करून न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटणाऱ्या दोन आरोपींना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुराला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये बळजबरी हिसकावून घेणाऱ्या आणखी दोघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुंरदळे यांनी दिले.

लक्ष्मीकांत संदीपान कसबे (३५) व पोपट संदीपान कसबे (३३, दोघे रा. प्रियदर्शनी कॉलनी, इंद्रानगर) असे आरोपींचे नाव आहे. या पूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी अक्षय म्हसा जाधव व मनोज श्रीरंग कसबे यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्या पोलिस कोठडीत देखील सोमवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात मजुरी काम करणारे फेरोजखान शौकत खान (३२, रा. इंदिरानगर, औरंगाबाद) यांनी तक्रार दिली होती. फेरोजखान हे आठ नोव्हेंबर २०१८ रोजी पायी घरी परतत होते. इंदिरानगरच्या पुंजाबाई चौकात सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी अक्षय जाधव (२२), मनोज, लक्ष्मीकांत व पोपट कसबे अशा चौघांनी फेरोजखान यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता त्यांनी नकार दिला. त्यामुळे आरोपींनी फेरोजखान यांच्या गळ्याला चाकू लावून मारहाण करत त्यांच्या खिशातील दोन हजा रुपये हिसकावुन घेत धूम ठोकली. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने चौघा आरोपींविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bहत्यार जप्त करणे बाकी

\Bतपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एस.एन. कांबळे यांनी आरोपी लक्ष्मीकांत व पोपट कसबे या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करणे आहे. फिर्यादीच्या खिशातून बळजबरी हिसकावलेली रक्कम हस्तगत करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती विशेष सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला नुकसानभरपाई देण्याचे दिले आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

लासूरजवळील अंबेगाव फाट्यावर दुचाकी आणि पिक-अप व्हॅनमध्ये अपघात झाला होता. त्यात किसन प्रधान यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला तीन लाख ४९ हजार ७४९ रुपये नऊ टक्के व्याजासह नुकसान भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य ए. आर. कुरेशी यांनी दिला.

प्रधान हे दुचाकीने जात असताना वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात प्रधान गंभीर जखमी झाले. सात एप्रिल २०१६ रोजी हा अपघात झाला. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान एक आठवड्यानंतर १३ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी यांनी व्हॅन चालक-मालक व आयसीआयसीआय लोमबार्ड इन्शुरन्स कंपनीविरोधात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. प्रधान हे शेतकरी होते व ते कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचे, असा युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीअंती न्यायाधीकरणाने पत्नीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. अर्जदारातर्फे संदीप राजेभोसले यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images