Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महसूल विभागात प्रमोशनचे दिवस

$
0
0
नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी प्रमोशन देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारीपदी प्रमोशन देण्यात येणार आहे.

शहर अभियंतापदी सखाराम पानझडे

$
0
0
महापालिकेच्या शहर अभियंतापदी सखाराम पानझडे यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. पालिकेला चार वर्षांनंतर पूर्ण वेळ शहर अभियंता मिळाला आहे.

युरोपातील पाहुण्यांचे नाथसागरी आगमन

$
0
0
युरोपातून हिवाळी पाहुणे-पक्षी औरंगाबादजवळच्या सुखना धरण, सलीम अली सरोवरावर दाखल झाले आहेत. या पक्ष्यांच्या मुक्त विहाराने सरोवराचा परिसर प्रफुल्लित झाला असून निसर्गप्रेमी पक्षी निरीक्षणासाठी या ठिकाणी येऊ लागले आहेत.

घाटीच्या पोलिस चौकीसाठी दहा लाखांचा विशेष निधी

$
0
0
घाटी हॉस्पिटल परिसरात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, यासाठी घाटी पोलिस चौकीसाठी आमदार सतीश चव्हाण यांनी दहा लाखांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शनिवारी वृत्त प्रकाशित केले होते.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एकजण जखमी झाला. बीड बायपास रोडवरील एमआयटीसमोर शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

ठेकेदारांचा बहिष्कार मागे

$
0
0
रस्त्यांच्या टेंडरवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय औरंगाबाद हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने तात्पुरता स्थगित केला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

‘आधी रुंदीकरण; मगच रस्ता खुला करा’

$
0
0
‘पैठण रस्त्यावरील सेंट जॉन शाळा ते शेतकी शाळा हा भाग नव्या वाहतुकीचा ताण पेलण्यास सध्या असमर्थ आहे. वाढती वाहतूक आणि रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता आधी या रस्त्याचे रुंदीकरण करूनच मग तयार झालेले रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत,’ अशी मागणी ज्येष्ठ उद्योजक डॉ. उल्हास गवळी यांनी केली आहे.

डांबरीकरणासाठी झाले मोजमाप

$
0
0
गांधी पुतळा ते अभिनय टॉकीज या रस्त्याची व्यथा ‘मटा’ने ‘बिघडलेले रस्ते-उखडलेले नागरिक’ या वृत्तमालिकेतून प्रसिद्ध केल्यावर पालिकेला जाग आली असून या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अधिकाऱ्यांनी मोजमाप केले आहे.

कैलाशच्या गीतांनी औरंगाबाद धुंद

$
0
0
‘मर गई मैं, मीट गई मैं...’ , ‘रंग दी नी, रंग दी नी...’, ‘तू जाने ना...’, ‘ढोल बजदा, तुंबा बजदा...’, यांसारख्या एकाहून एक ठेका धरायला लावणाऱ्या गीतांनी कैलाश खेरने औरंगाबादकरांना शनिवारी गीतसंगीताचा अनोखा नजराणा दिला. पहिल्याच गीतापासून कैलाश खेरने आपल्या जादुई आवाजाने असा काही रंग भरला की, वातावरणातील थंडी कुठल्या कुठे पळाली आणि कार्यक्रमाला उपस्थित तरुण-तरुणींनी त्याच्यासोबत नाचत, गात कार्यक्रमाला ‘चार चॉँद’ लावले.

पंधरा वर्षांपासून रस्ता मातीचाच

$
0
0
मल्हार चौक ते जवाहरनगर पोलिस स्टेशनचा रस्ता पंधरा वर्षांपासून मातीचाच असल्यामुळे नागरिकांसाठी त्रासदायी ठरू लागला आहे. एकविसाव्या शतकात, कम्प्युटर युगातही नागरिकांना रस्त्यांवरील खड्डे, उंचवटे यांना तोंड द्यावे लागत आहे.

पालिका कर्मचाऱ्यांना कोटीचा फटका

$
0
0
पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. पगारातून कपात केलेली रक्कम जीपीएफकडे पालिकेने भरलीच नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना हा फटका बसला आहे.

मुंडेंनी लोकसभेत काय दिवे लावले?

$
0
0
बीडचे खासदारांची कार्यपद्धती बोलाचीच कढी बोलाचाच भात आहे. पाच वर्ष खासदार म्हणून काय दिवे लावले अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांचे नाव न घेता केली. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी दिलेल एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही.

लोककलेचा क्षीण आवाज

$
0
0
कलेच्या अभिसरणात कलाप्रकाराच्या मूळ स्वरुपात बदल होतो. मराठी लोककलांची सद्यस्थिती पाहिल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. या परिस्थितीतही लोककलांचा मूळ बाज जपण्याचा प्रयत्न काही कलाकार नेटाने करीत आहेत.

‘पेट’ होताहेत ‘फेवरेट’; खाताहेत ‘भरपेट’

$
0
0
‘पेट’ आता औरंगाबादेतही ‘फेवरेट’ होत असून ते ‘भरपेट’ खात आहेत. यात ‘रूबाबदार’, ‘जातीवंत’, ‘विशिष्ट ब्रीडिंग’ केलेले पेट्स, ‘परदेशी जातींचे’ पेटस यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शाहिरांनी दिली लोककलांची पर्वणी

$
0
0
‘नंदी आला रे नंदी आला’, ‘गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी’, ‘बाई माझ्या दुधात नाही पाणी’ अशा भारुड, गोंधळ, गौळण या पारंपरिक लोककलांच्या सादरीकरणातून शाहीर सुखदेव खोमणे यांनी रसिकांना अपूर्व पर्वणी दिली.

थँक यू , महाराष्ट्र टाइम्स

$
0
0
खूप सुंदर कार्यक्रम झाला. कैलाश खेरची गाणी आजपर्यंत फक्त टीव्ही, सीडीजवरच ऐकली आज स्वत: त्यांना लाइव्ह ऐकायला मिळाले. मी संपूर्ण कुटुंबासह त्याचा आनंद घेतला.

युवादिल ‘दिवाना हो गया...’

$
0
0
गीत-संगीताच्या तालावर थिरकणं कसं असतं, संगीतप्रेमींचा जल्लोष कसा असतो अन् एखाद्या गायकाच्या अफलातून अदाकारीवर तरुणाई फिदा होते कशी, या सर्वांच प्रात्यक्षिकच औरंगाबादमध्ये कासलीवाल-तापडिया मैदानावर शनिवारी रात्री बघायला मिळाले.

निनावी पत्रामुळे उलगडला मुलीच्या खुनाचा गुन्हा

$
0
0
नांदेड येथे पोटच्या मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे बदनामी होऊ नये म्हणून शिक्षक असलेल्या दांपत्याने मुलीचा खुन केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. एका निनावी पत्रामुळे या खुनास वाचा फुटली आहे.

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र केले लंपास

$
0
0
शिवाजीनगर भागात मुलाला शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलाठयास जीवे मारण्याचा प्रयत्न

$
0
0
देगलूर- मांजरा घाटातून अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस अटकाव करणाऱ्या देगलूर तहसीलच्या तलाठयाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तीन ठेकेदाराविरूद्ध देगलूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शनिवारी रात्री घडला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images