Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मिस्तरीला मारहाण,आरोपींना अटक कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिस्तरी काम करणाऱ्याला मारहाण करत त्याच्या खिशातील तीनशे रुपये व मोबाइल बळजबरी हिसकावुन घेत धूम ठोकरणाऱ्या दोघा आरोपींना शनिवारी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

हरिदास गवणाजी म्हस्के (२४, रा. भक्तीनगर, पिसादेवी रोड, औरंगाबाद) व सागर अजिनात नलावडे (१९, रा. शिवोश्वर कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात मिस्तरी काम करणारे प्रमोद सुभाष पाचवणे (२६, रा. पळशी, पोखरी ता. फुलंब्री) यांनी तक्रार दिली. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपी हरिदास म्हस्के व सागर नलावडे या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला रॉड जप्त करणे आहे. फिर्यादीच्या खिशातून लांबविलेला मोबाइल व पैसे जप्त करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रिपाइं’चा विभागीय मेळावा फेब्रुवारीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचा मराठवाडा विभागीय मेळावा दहा फेब्रुवारीला होणार आहे. बीड बायपास परिसरातील जबिंदा लॉनवर दुपारी तीन वाजता मेळावा होईल. यावेळी पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती रिपाइंचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा आढावा घेण्यासाठी रिपाइंचा विभागीय मेळावा होणार आहे. सध्या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांचा दौरा सुरू आहे. विभागीय मेळावा व्यापक प्रमाणावर करण्याचे नियोजन आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्ध व पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. दलित, आदिवासी, भटके यांना न्याय हक्क मिळावे, प्रत्येक भूमीहीनाला पाच एकर गायरान जमीन, बेरोजगाराला पाच हजार रुपये बेकारी भत्ता, बेघरांना घर द्यावे अशी पक्षाची मागणी आहे. मेळाव्यात प्रमुख समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ सक्षम करण्याची प्रमुख मागणी आहे. या पत्रकार परिषदेला मिलिंद शेळके, दौलत खरात, किशोर थोरात, संजय ठोकळ, अरविंद अवसरमल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

sambhaji bhide यांच्या बैठकीदरम्यान निदर्शने, पोलिसांचा लाठीमार

$
0
0

जालना:

'शिवप्रतिष्ठान' संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या जालना येथे आयोजित बैठकीच्या स्थळी दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. पोलीस बंदोबस्त तोडून निदर्शक बडीसडक या भागात आर्य समाज भवनाच्या समोर पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी करून अंडी फेकण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी या वेळी बळाचा वापर करून निदर्शकांना पांगवले आहे. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचेही वृत्त आहे.

जालन्यातील आर्य समाज मंदिरात संभाजी भिडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. गेल्या आठ दिवसांपासून या बैठकीची माहिती सोशल मीडियावर फिरत होती. या बैठकीला संभाजी ब्रिगेड आणि दलित संघटनांनी विरोधही दर्शवला होता. आज सकाळी ही बैठक सुरू होत असताना कार्यक्रम स्थळाजवळ निदर्शक गोळा व्हायला सुरुवात झाली. निदर्शकांनी भिंडेंविरोधात घोषणा द्यायला सुरू केले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेल्या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता संभाजी भिडे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने अज्ञात स्थळी हलवल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोबत आलात तर जिंकून देऊ, अन्यथा आपटू: अमित शाह

$
0
0

लातूर :

'लोकसभा निवडणुकीसाठी सोबत आलात तर तुम्हाला जिंकवून देऊ नाही आलात तर आपटू,' असं वादग्रस्त वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रात येऊन केल्यामुळे राज्यातल्या शिवसेना-भाजप युतीबाबत पुन्हा एकवार प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लातूर येथे कार्यकर्त्यांच्या संमेलनात शाह बोलत होते.

'युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे,' असा इशारा शाह यांनी शिवसेनेला दिला. शाह यांनी येत्या निवडणुकीची तुलना पानिपतच्या लढाईशी केली. अहमद शाह अब्दालीने मराठ्यांचं पानिपत केलं होतं, याची आठवण त्यांनी करून दिली.

या संमेलनासाठी लातूर, नांदेड-हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी उपस्थित होते. 'स्वबळावर निवडणूक लढवून भाजप राज्यातल्या ४८ पैकी किमान ४० जागा जिंकेल,' असा दावाही शाह यांनी केला आहे. प्रत्येक बुथनिहाय तयारी करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी २०१४ पेक्षा २०१९ चा विजय मोठा असेल असा विश्वास व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोलिक अॅसिडचा अभाव करतो जिवाचा घात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकूण तीन टक्के जन्मजात विकारांपैकी एक टक्के जन्मजात विकार आणि त्याचवेळी मेंदू व मणक्याच्या जन्मजात विकारांपैकी ७० विकार हे केवळ फोलिक अॅसिडच्या अभावातून उद्भवतात आणि रोज ४०० मायक्रोग्रामच्या केवळ एक गोळीने हे जन्मजात विकार सहज टाळता येतात. त्यासाठी गर्भावस्थेच्या एक वर्ष आधीपासून आणि प्रसुतीनंतर किमान सहा महिन्यांपर्यंत फोलिक अॅसिड स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्या, असा बहुमोल सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

फोलिक अॅसिडबाबत अजूनही पुरेशी जनजागृती नसल्याने ७ ते १४ जानेवारीदरम्यान राष्ट्रीयस्तरावर फोलिक अॅसिड जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. विशेष म्हणजे याबाबतचे महत्व ओळखूनच सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये गर्भवती व स्तनदा मातांना फोलिक अॅसिडच्या गोळ्या निःशुल्क दिल्या जातात. या संदर्भात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले, फोलिक अॅसिड म्हणजेच 'व्हिटॅमिन बी' हे हिरव्या पालेभाज्या, दही, ब्रेड, कडधान्य आदींमधून मिळते. रक्तपेशी तयार करण्याचे अतिशय महत्वाचे कार्य हे 'व्हिटॅमिन बी'मुळे घडत असते. मात्र चुकीची आहार पद्धती तसेच फास्ट फूड, जंक फूडच्या सेवनामुळे फॉलिक अॅसिडचा अभाव निर्माण होऊ शकतो, जो गर्भवती महिलांवर तसेच त्यांच्यापासून जन्मणाऱ्या बालकांवर गंभीर प्रतिकुल परिणाम करणारा ठरू शकतो. गर्भवती महिलांना गरजेच्या प्रमाणात फोलिक अॅसिड मिळाले नाही तर त्यांच्यापासून जन्मणाऱ्या बालकांमध्ये मणक्याचे कव्हर तयार न होणे किंवा कवटी तयार न होता मेंदू बाहेरच राहणे, असे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. त्याचबरोबर जन्मणाऱ्या बालकामध्ये मतीमंदत्वदेखील असू शकते. हे सर्व जन्मजात विकार फोलिक अॅसिडअभावी निर्माण होतात, ज्याला 'न्युरल ट्यूब डिफेक्टस्' (एनटीडी) असे म्हटले जाते. एवढेच नव्हे, तर पुरेशा प्रमाणातील फोलिक अॅसिडअभावी प्रसुतीवेळी रक्तस्त्राव होऊन गुंतागुंतदेखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे गर्भावस्थेच्या एक वर्ष आधीपासूनच फोलिक अॅसिडच्या गोळ्या सुरू करणे आणि प्रसुतीनंतर सहा महिन्यापर्यंत या गोळ्या सुरू ठेवणे गरजेचे आहे. यात रोज केवळ एक ४०० मायक्रोग्रामची गोळी पुरेशी ठरते. विशेष म्हणजे फोलिक अॅसिडचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने त्याबाबत कोणतीही तपासणी न करता गर्भवतींना या गोळ्या सुरू करता येऊ शकतात.

\B'एनएचएम'अंतर्गत होतो पुरवठा

\Bफोलिक अॅसिडचे महत्व ओळखूनच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) प्रत्येक सरकारी रुग्णालयाला फोलिक अॅसिडच्या गोळ्यांचा पुरवठा होत आहे आणि प्रत्येक गर्भवतीला या गोळ्या निःशुल्क दिल्या जातात. खासगीत या गोळ्यांची किंमत कमी असल्याने त्यांचा वापर करणे सहज शक्य आहे. महत्वाचे म्हणजे ज्या महिलांचे हिमोग्लोबिन हे १२ पेक्षा कमी असते त्यांनीदेखील तज्ज्ञांच्या सल्ल्याने गरजेनुसार फोलिक अॅसिड घेतले पाहिजे. खरे म्हणजे फोलिक अॅसिडचे महत्व ओळखून चिकित्सकांनी या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला पाहिजे, असेही डॉ. गडप्पा म्हणाले.

\Bऔषधांमुळ‍े घटते फोलिक अॅसिड

\B'मेगालोब्लास्टिक अॅनेमिया' या विकारात रुग्णांना फोलिक अॅसिड द्यावे लागते. तसेच संधीवाताच्या काही औषधांमुळे शरीरातील फोलिक अॅसिडची पातळी कमी होऊ शकते. अशा वेळीही रुग्णाला वरतून फोलिक अॅसिड द्यावे लागू शकते. मात्र रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच या गोळ्या घेणे हिताचे ठरते, असे फिजिशियन डॉ. अनंत कडेठाणकर यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५५ कोटी ही ‘फेक न्यूज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राजकीय हितात अडथळा ठरल्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींची हत्या केली. राष्ट्रवादाच्या आवरणाखाली खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या. पाकिस्तानला ५५ कोटी देण्यासाठी गांधींनी उपोषण केले ही सर्वात मोठी फेक न्यूज आहे. ७० वर्षांनंतरही 'फेक न्यूज' गांधीजींची पाठ सोडायला तयार नाही,' असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी केले. ते व्याख्यानात बोलत होते.

महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. संस्थेच्या सभागृहात रविवारी सायंकाळी 'महात्मा गांधी आणि खोट्या बातम्या' या विषयावर ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे उपस्थित होते. गांधीजींबाबत 'फेक न्यूज' पसरवण्याचे प्रकार कधीपासून सुरू आहे यावर तांबे यांनी भाषणात प्रकाश टाकला.

'राष्ट्रध्वजाला आणि राज्यघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. संघ परिवाराचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'ने १९४७मध्ये सविस्तर लिहिले आहे. तिरंग्यात तीन रंग असून, तीन आकडा अशुभ असतो. मनूचे कायदे लोक उत्स्फूर्तपणे पाळतात, असा गौरव केला होता. देशाची फाळणी झाल्यानंतर सर्वत्र दंगली आणि लुटालूट सुरू झाली. तिरंगा आणि राज्यघटनेला असलेला संघाचा विरोध लक्षात घेता फाळणीच्या काळात गांधीजींबाबत 'फेक न्यूज' कुणी पसरवल्या याची संगती लावता येते. महात्मा गांधी यांनी पाकिस्तानाला ५५ कोटी रुपये देण्यासाठी उपोषण केले ही सर्वात मोठी 'फेक न्यूज' होती. फाळणीच्या वेळी झालेल्या महसूलाच्या हिशेबानुसार पाकिस्तानला भारताने ७५ कोटी रुपये देणे होते. यापैकी २० कोटी रुपये दिले होते आणि ५५ कोटी देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू होती. ५५ कोटी रुपये देणे द्या, असे मत गांधीजींनी मांडले होते. याशिवाय ३०० रणगाडे आणि इतर लष्करी साहित्य भारताने पाकिस्तानला देणे अपेक्षित होते. अर्थात, ते नंतर कधीच दिले नाही. हा सगळा इतिहास कागदपत्रांसह उपलब्ध आहे. फाळणीच्या काळात गांधीजी जिथे जात तिथे दंगली थांबत असत. कोलकात्यात गुंडांनी गांधीजींच्या पायाशी शस्त्रे टाकली होती. हा अडथळा लक्षात आल्यानंतर पुण्यात हिंदुत्ववाद्यांनी बैठक घेतली आणि गांधीजींची हत्या केली. या कटातून सावरकरांची सुटका झाली असली तरी ते निर्दोष नव्हते. राष्ट्रवादाचे कारण सांगून गांधीजींबाबत खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या' असे तांबे म्हणाले. डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.

\B'फेक न्यूज' सुरूच

\B'राष्ट्रवाद ही भारतातील 'फेक न्यूज'ची प्रेरणा असून हिंदुत्ववादी संघटना सोशल मीडियाचा सुसंघटीत वापर करतात असा 'बीबीसी'चे सर्वेक्षण आहे. गोरक्षा, लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदुत्ववादी सूडाचे राजकारण करीत आहेत. दुर्दैवाने, ७० वर्षांनंतरही 'फेक न्यूज' गांधींजीची पाठ सोडायला तयार नाही. गांधी साहित्य व समकालीन साहित्याचा अभ्यास करून योग्य उत्तर देण्याची गरज असल्याचे तांबे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया तिकीट तपासणी निरीक्षकास पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची तिकीट तपासणी करणाऱ्या एका तोतया तिकीट तपासणी निरिक्षकाला खऱ्या तिकिट तपासणी निरीक्षकाने शनिवारी रात्री (५ जानेवारी) पकडले. या तोतया तिकीट तपासणी निरीक्षकाला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पकडण्यात आलेल्या तोतया टीटीईचे नाव राजेंद्र मुंडले (रा. जालना) असे आहे.

शनिवारी नागपूर ते मुंबई जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये राजेंद्र मुंडले हा व्यक्ती प्रवाशांचे तिकीट तपासणी करीत होता. सलग दुसऱ्यांदा तिकीट तपासले जात असल्याने, काही प्रवाशांनी याची माहिती या रेल्वेत ड्युटीवर असलेल्या टीटी छोटूराम मीना यांना सांगितली. त्यांनी तोतया मुंडले या पकडून औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (७ जानेवारी) मुंडले याची जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशासाठी तरुणाचे अपहरण, मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैशाच्या वादातून तरुणाचे अपहरण करीत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी दशमेशनगर भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी पाच संशयित आरोपींविरुद्ध दंगल व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पार्थ कडूचंद शेटे (रा. समर्थनगर, उस्मानपुरा) याने तक्रार दाखल केली. पार्थ हा शुक्रवारी सायंकाळी दशमेशनगर येथील वुडीज कॅफे समोर उभा होता. यावेळी त्याला पाच जणांनी रॉड, लाठ्या काठ्याने मारहाण करीत पैशांची मागणी केली. यानंतर त्याला पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पार्थच्या तक्रारीवरून संशयित आरोपी ओम शिंदे, कपील पांचाळ, गौरव जेठावाले, रोहीत खाकुर्डिया आणि हर्ष अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस नाईक भागवत हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभ्यासिकेचे विद्यार्थी वेठीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सामाजिक आणि राजकीय आंदोलनासाठी काही विद्यार्थी नेत्यांनी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढले आहेत. दररोज वेगवेगळ्या संघटना आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्ते अभ्यासिकेत घुसखोरी करीत आहे. या प्रकारात अभ्यासिकेत अडथळा आल्यामुळे शेकडो विद्यार्थी जेरीस आले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा आणि नेट-सेटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. अभ्यासिकेत जवळपास ५०० नियमित विद्यार्थी आहेत. सकाळी सात ते रात्री ११ या वेळेत अभ्यासिका सुरू असते. काही दिवसांपासून विद्यार्थी नेते आणि राजकीय युवा नेत्यांनी अभ्यासिकेतील विद्यार्थी वेठीस धरले आहेत. एक तथाकथित सामाजिक कार्यकर्ता दोन-तीन झेंडे हातात घेऊन अभ्यासिकेत प्रवेश करतो आणि विद्यार्थ्यांना बाहेर येण्याचे आवाहन करतो. हे आवाहन चढ्या आवाजातील भाषणबाजी असते. अभ्यासिकेतील प्रत्येक विद्यार्थी जागेवरुन उठत नाही तोपर्यंत नेता निघत नाही. कंटाळलेले विद्यार्थी अखेरीस अभ्यासिकेसमोरील प्रांगणात उभे राहतात. भ्रष्टाचार, बेरोजगार, शेतकरी आत्महत्या, विद्यापीठातील फोल यंत्रणा अशा वाट्टेल त्या विषयावर नेता आक्रस्ताळे भाषण ठोकून विद्यार्थ्यांना वेठीस धरीत आहे. मागील आठवड्यात सतत तीन दिवस हा प्रकार घडल्यामुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. पण, कुणी दखल घेतली नसल्यामुळे त्रास वाढला आहे. विविध विद्यार्थी संघटनांचे नेते अभ्यासिकेत घुसून विद्यार्थ्यांना बाहेर काढतात. विद्यापीठात प्रशासन महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करीत असते. पण, संघटना स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करतात. अशा कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून प्रांगणात उभे राहणे बंधनकारक ठरले आहे. प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करणे, निवेदन देणे, जाब विचारणे या कामासाठी विद्यार्थ्यांची गर्दी अभ्यासिकेतून आणतात. आंदोलनासाठी अभ्यासिका बंद करण्याचे प्रकारसुद्धा अनेकदा घडले आहेत. अभ्यासात सातत्याने अडथळा येत असल्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपासून विविध संकेतस्थळ आणि खासगी कंपन्यांचे लोक अभ्यासिकेत येत आहेत. विद्यार्थ्यांनो, दहा मिनिट वेळ द्या किंवा इकडे बघा, असे म्हणत उत्पादनाची जाहिरात करतात. फेसबुक पेज आणि व्हिडिओ लाइक करण्यास सांगतात. यू-ट्यूब चॅनल सबस्क्राइब करण्याची गळसुद्धा घालतात. या घुसखोरीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, अभ्यासिकेत बाहेरील व्यक्तींना आणि संघटनांना प्रवेश देऊ नये, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

\Bसुरक्षाव्यवस्था फक्त नावापुरती

\Bअभ्यासिकेत प्रवेश करण्यापूर्वी ओळखपत्र दाखवणे आणि नोंदवहीत नाव लिहिणे बंधनकारक आहे. मात्र, नियमाला फाटा दिल्यामुळे बाहेरील व्यक्ती अभ्यासिकेत प्रवेश करीत आहेत. सुरक्षारक्षक कुणाचीही चौकशी करीत नसल्याने उपद्रव वाढला आहे. ग्रंथालय विभागाने नियमांचे काटेकोर पालन केल्यास अभ्यासातील अडथळा थांबू शकतो. सध्या वरिष्ठ स्तरावर कुणी दखल घेतली नसल्याने अभ्यासिकेत विद्यार्थी वैतागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड महिन्यात टँकर दुप्पट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या महिन्याभरापासून मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता अधिक गडद होत आहे. दुष्काळी मराठवाड्याला आता केवळ टँकर आणि विहीर अधिग्रहणाचा आधार असल्याचे चित्र वाढलेल्या टँकर; तसेच विहीर अधिग्रहणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. विभागात गेल्या दीड महिन्यांपासून टँकरसंख्येत दुपटीने, तर विहिरी अधिग्रहणात तीपटीने वाढ झाली आहे.

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये टँकरने साडेआठशेचा आकडा पार केला आहे. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या मराठवाड्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत असून, विभागातील ६७९ गावे व ९८ वाड्यांमधील तब्बल १४ लाख २ हजार नागरिकांची तहान ८७६ टँकरद्वारे भागविण्यात येत असल्याचे भीषण वास्तव आहे. विभागात ८७१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, यातील तब्बल ४१७ विहिरी केवळ टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून टँकर, विहीर अधिग्रहण करण्याचा सपाटा सुरू आहे. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी मराठवाड्यात केवळ ३५० टँकर सुरू होते, दोन जानेवारी २०१९पर्यंत पाच जिल्ह्यांत टँकरसंख्येत ४६१ने भर पडून ही संख्या ८७६ झाली. एक नोव्हेंबर रोजी विभागामध्ये प्रशासनाकडून २६१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. आज यामध्ये तब्बल तिप्पट वाढ होऊन संख्या ८७१वर पोचली आहे.

मराठवाड्यात सध्या सुरू असलेल्या ८७६ टँकरपैकी ५१९ टँकर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत, जिल्ह्यातील सात लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातही तीन लाख नागरीकांची तहान २२२ टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. टँकर हा पाणीटंचाईवरील सर्वात शेवटचा उपाय असल्यामुळे हा पर्याय सहजतेने वापरण्यात येत असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे.

\Bमराठवाड्यातील विहीर अधिग्रहण

\Bजिल्हा........ टँकरसाठी...... टँकर व्यतिरिक्त......एकूण

औरंगाबाद........१०५............६२...................२६७

जालना............१०१............४२....................१४३

परभणी............००............१३......................१३

नांदेड.............०२.............००.....................०२

बीड................१०१...........१५९..................२६०

लातूर.............००..............३५....................३५

उस्मानाबाद.......०८...........१४३...................१५१

एकूण..........४१७.............४५४...................८७१

\Bजिल्हानिहाय टँकर

\Bजिल्हा......... टँकर.................. अवलंबून लोकसंख्या

औरंगाबाद.....५१९...................७ लाख ९३ हजार

जालना..........१२५.....................२ लाख १० हजार

नांदेड............०२....................१२ हजार ६००

बीड..............२२२...................३ लाख ७० हजार

उस्मानाबाद......०८..................१६ हजार १४९

एकूण............८७६............... १४ लाख २ हजार ४१७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअर विस्तारा सुरू करणार दिल्लीसाठी विमान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

औरंगाबाद विमानतळावरून मार्च महिन्यात औरंगाबाद ते दिल्ली विमान सेवा वाढविली जाणार आहे. 'एअर विस्तारा' कंपनीने औरंगाबादहून विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विमानतळ संचालक डी. जी. साळवे यांनी दिली. याशिवाय \Bऔरंगाबादला बुद्धिक्ट सर्किटमध्ये जोडण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.\B

औरंगाबाद विमानतळावरून सध्या दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद शहरांना जाण्यासाठी थेट विमान आहे. औरंगाबाद ते दिल्लीला जाण्यासाठी मुंबई औरंगाबाद दिल्ली असे एकच विमान आहे. यामुळे दिल्लीहून औरंगाबादला आलेल्यांना अडचण होत असते. या मार्गावर विमान सेवा वाढावी यासाठी औरंगाबाद शहरातील उद्योजकांनीही प्रयत्न केले आहेत. विमान सेवा विस्तारीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात डीजीसीएच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली. या बैठकीत विमान सेवा विस्तारीकरणासाठी तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी औरंगाबाद उदयपूर जोधपूर विमान मार्ग सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली होती.

विमानतळ विस्तारीकरणाबाबत औरंगाबाद विमानतळ संचालक डी. जी. साळवे यांनी नागरी उड्डायन मंत्रालयाच्या उषा प्राधी यांच्याशी चर्चा केली. लवकरच मंत्रालयातर्फे ३.० उड्डाण योजनेतंर्गत नवीन यादी प्रकाशित होणार आहे. या योजनेत औरंगाबाद विमानाला उदयपूर, जयपूर या मार्गावर विमान सुरू करण्याबाबत मान्यता देण्यास या चर्चेत अनुकूलता दर्शविण्यात आली आहे. औरंगाबाद शहराला बुद्धिस्ट सर्किटमध्ये जोडण्याबाबतही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

या योजनेतंर्गत औरंगाबाद ते दिल्ली या विमान मार्गावर एअर विस्तारा या विमान कंपनीचे विमान सुरू करण्यात येणार आहे. हे विमान मार्च महिन्यात दिल्लीकडे झेपावेल, अशी माहिती साळवे यांनी दिली.

………

जेट एअरवेजचे दिल्ली कनेक्शन वेटिंगवरच

औरंगाबाद विमानतळावरून दिल्लीसाठी जेट एअरवेजनेही विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जेट एअरवेज कंपनीने सकाळच्या सत्रात दिल्लीला विमान सुरू करण्याचा प्रस्ताव डीजीसीएकडे दिला आहे. सकाळच्या सत्रात दिल्ली विमानतळावर स्लॉट नसल्याने जेट एअरवेजचा प्रस्ताव वेटिंगवर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच विमान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

……

झूम एअर बाबतही निर्णय प्रलंबित

औरंगाबादहून दिल्लीसाठी झूम एअर कंपनीने विमान सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. झूम एअरने त्यांच्या वेबसाइटवरही याची माहिती दिली आहे. हे विमान आगामी काळात सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

……

इलेक्शन फिवर सुरू …

हे वर्ष निवडणुकीचे वर्ष राहणार आहे. यामुळे विविध कंपनीकडून विविध शहरांसाठी विमान सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. विमान कंपन्यांना या काळात चांगला व्यवसाय मिळण्याची अपेक्षा असते. यामुळे या काळात विविध ठिकाणांसाठी आणखी विमाने वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता सिटी बससाठी १५ जानेवारीची चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटी बस सेवा सुरू करण्याची संभाव्य तारीख पुन्हा हुकली आहे. तीन जानेवारी रोजी ३८ बस येणार असल्याचे महापौरांनी, तर खासदारांनी पाच जानेवारी रोजी शंभर बस येणार असल्याच्या घोषणा केल्या होत्या. त्या हवेतच विरल्या असून रविवार सायंकाळपर्यंत बस दाखल झाल्या नव्हत्या. त्यामुळे बस सेवा १५ जानेवारी किंवा २५ जानेवारीपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीत शंभर बस फेब्रुवारीच्या शेवटच्या दाखल होणार आहेत.

महापालिकेने दसरा किंवा दिवाळीच्या काळात सिटी बस सेवा सुरू करण्याचे नियोजन केलेले नियोजन आधीच हुकले आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत २३ डिसेंबर मोठ्या थाटात सिटी बस सेवेचे लोकार्पण करण्यात आले. त्याला १५ दिवस उलटूनही सेवा सुरू झालेली नाही. महापौर नंदकुमार घोडेले यांनी लोकार्पण सोहळ्यात बोलताना तीन जानेवारीपर्यंत ३८ बस येतील, अशी घोषणा केली होती, तर, पाच जानेवारीपर्यंत शंभर बस आणू असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी जाहीर केले होते. या घोषणेनुसार बस आलेल्या नाहीत. या दोघांचीही डेडलाइन हुकली आहे. बस आल्यानंतर 'आरटीओ'त नोंदणी करावी लागणार आहे. सध्या चालक-वाहकांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे प्रशासकीय, कायदेशीर प्रक्रिया झाल्याशिवाय प्रत्यक्ष रस्त्यावर सिटी बस धावू शकणार नाहीत.

\B१५ जानेवारीला २५ बस धावतील\B

नव्या वेळापत्रकाप्रमाणे १५ जानेवारीपासून २५ शहर रस्त्यावर धावतील, असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. शहरात दोन दिवसांत २५ बस येणार असून तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बसचे मार्ग व थांबे निश्चित करण्यात आले आहे. सध्यातरी एस. टी. महामंडळाकडून सुरू असलेल्या मार्गावरच नवीन बस धावणार आहेत.

\Bफेब्रुवारी अखेर शंभर बसेस\B

येत्या आठवड्यात २५ बस दाखल होतील, त्यानंतर फेब्रुवारी अखेर शंभर बस सेवेत दाखल होतील. त्याप्रमाणे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समायोजन टाळता येणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समायोजन प्रक्रियेत नियुक्ती न स्वीकारणाऱ्या शिक्षकांवरही कारवाईचा विचार शिक्षण विभाग करते आहे. २६ नोव्हेंबर रोजी प्रक्रिया करण्यात आली, मात्र ९०पैकी केवळ २० शिक्षकांचेच समायोजन झाले. शाळांच्या विरोधासह अनेक ठिकाणी शिक्षकही आपल्याला शहरातीलच शाळा हवी यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले.

राज्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोर्टाने फटकारल्यानंतर शिक्षण विभागाने समायोजनाची प्रक्रिया केली. शाळांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अनेक शाळांनी शिक्षकांना रुजू होण्यास विरोध केला. २६ नोव्हेंबर रोजी राज्यात एकाचवेळी समायोजनाची प्रक्रिया जिल्हास्तरावर करण्यात आली. दीड महिना झाल्यानंतरही अनेक ठिकाणी शिक्षक रुजू झालेले नाहीत. अनेक शिक्षक शिक्षण विभागातच खेटा मारत आहेत. यामध्ये अनेक शिक्षकही रुजू होण्याचे टाळत आहेत. मोठ्या शहरांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा यात समावेश असल्याचे कळते. त्यामुळे नवा प्रश्न समोर आला आहे. अशा प्रकारे नियुक्तीस विरोध करणाऱ्या शिक्षकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. ज्यामध्ये समायोजन नाकारणाऱ्या शिक्षकांची सेवा खंडित करण्यापर्यंत किंवा पदोन्नतीबाबत कारवाई करण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

\Bशाळांचा विरोध; शिक्षण विभाग हतबल\B

समायोजनाची प्रक्रिया प्राथमिक, माध्यमिक अन् अल्पसंख्याक अशा विविध स्तरावर करण्यात आली. प्रक्रियेला होऊन दीड महिना होत आला. त्याचवेळी तात्काळ रुजू होण्याचे आदेश शिक्षकांना होते. शाळांनी रुजू होण्यापूर्वीच समायोजनाचा विरोध सुरू केला होता. शिक्षक, संस्थाचालकस्तरावरून आक्षेपही मागण्यात आले. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतरही समायोजन रखडले आहे. केवळ २० शिक्षकच रुजू होऊ शकले आहेत. माध्यमिक स्तरावर विविध विषयांचे ५४, प्राथमिक स्तरावर ३६ यासह अल्पसंख्याक शाळांमधील २० शिक्षक जिल्ह्यात अतिरिक्त ठरल्याचे समोर आले होते. समायोजनास विरोध करणाऱ्या शाळांवर अद्यापही शिक्षण विभागाने कारवाई केली नाही.

\Bभरती प्रक्रियेवर परिणाम\B

समायोजनाची प्रक्रिया रखडत आहे. त्याचा परिणाम शिक्षक भरती प्रक्रियेवर झाला आहे. समायोजनाची प्रक्रिया पुढे जात नसल्याने रिक्त जागेचा ताळेबंद घालणे शिक्षण विभागाला अडचणीचे ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात समायोजनाबाबत अनेक शिक्षकांनी कोर्टातही दाद मागितली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपले असले तरी तातडीने प्रक्रिया केली. त्यानंतर राज्यस्तरावरही आढावा घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वंचित आघाडी सोडेल ‘एमआयएम’ची साथ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशाची राज्यघटना बदलण्यासाठी निघालेल्या जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी तयार करण्याची गरज आहे. या आघाडीत वंचित बहुजन आघाडीही सहभागी होणार आहे. यामुळे 'एमआयए' आणि बहुजन वंचित आघाडीची युती होणार नसल्याचे भाकित समाजवादी पक्षाचे आमदार अबु आसीम आझमी यांनी केले. महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेण्याबद्दल चर्चा सुरू असून तसा निर्णय झाल्यास समाजवादी पक्ष महाआघाडीबद्दल पुर्नविचार करेल, असे त्यांनी सांगितले.

आमदार आझमी औरंगाबादला आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, धर्मनिरपेक्ष पक्षांच्या आघाडीसाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू असून महाराष्ट्रातही आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. समाजवादी पक्षाला लोकसभेच्या एक किंवा दोन जागा मिळाल्यास तरी समाधान व्यक्त करत त्यांनी भिंवडीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली. आघाडीसाठी काँग्रेसने पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सपा-बसपा एकत्र येण्यास तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि 'एमआयएम' यांच्यात जागा वाटपाची बोलणी सुरू असून आघाडीला दोन जागा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही आघाडी फिस्कटल्याची बातमी येईल, असे भाकित त्यांनी केले. औरंगाबादमधील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटींचा निधी दिला, मात्र त्यातून मुस्लिमबहुल भागातील एकही रस्ता होणार नाही. हा अन्याय आहे. दलित वस्ती सुधार योजनेप्रमाणे मुस्लिम वस्ती सुधार योजना सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

आमदार जलील यांना टोला

मुस्लिम आरक्षणाबद्दल याचिका दाखल करणारे 'एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील यांना आझमी यांनी टोला लगावला. मुस्लिमांना आरक्षणाकरिता कायदा होणे आवश्यक आहे. कोर्टात जाऊन काही साध्य होणार नाही. 'मुस्लिमांना आरक्षण मिळाले नाही. तेव्हा काँग्रेसमधून राजीनामा का दिला नाही, असा सवाल त्यांनी केला होता. आताही आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे 'एमआयएम'चे आमदार राजीनामा देतील का?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'एमआयएम' हा सत्तेजवळ राहणारा पक्ष आहे. काँग्रेस सत्तेत असताना ते त्यांच्यासोबत होते. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसशी जवळीक साधतील,' असे आमदार आझमी म्हणाले.

मुलायम सिंह, अखिलेश सिंह ९ फेब्रुवारी रोजी शहरात

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची ९ फेब्रुवारी रोजी आमखाम मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार आझमी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फार्मडी’ विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सलग सहा दिवसांपासून सुरू असलेले औषधनिर्माणशास्त्र विद्यार्थ्यांनी रविवारी सायंकाळी उपोषण मागे घेतले. प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांची खालावणारी तब्बेत यामुळे उपोषण मागे घेत असून कायदेशीर लढा देऊ, असे विद्यार्थ्यांनी 'मटा'ला सांगितले.

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या 'डॉक्टर ऑफ फार्मसी' अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी एक जानेवारीपासून आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. अभ्यासक्रमाबाबत निश्चित धोरण नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर धोक्यात आल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सहा दिवसांत विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. त्यात शनिवारी निदर्शनेही करण्यात आली. शनिवारी एका विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी उपोषण मागे घेत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. इतर दोघांच्या प्रकृतीचा विचार करत आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. रामप्रसाद नागरे, गणेश गिरी, अमित गोटफोडे, रिशिक शर्मा, शिवम तिवारी, धनंजय सातपुते, सुशील जाधव, अक्षय शेलार, कुणाल देवरे, राजेश बलखंडे, राजेश घोडके, अंकेश पवार, जुबेर चौधरी, किशोरी पष्टे, वेदांती रासवे, जिनल रजानी, ऐश्वर्या साळवे, भाग्यश्री चव्हाण यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

\Bपालिकेकडून खोडसाळपणा!

\Bविभागीय आयुक्तालयासमोर हे विद्यार्थी उपोषणास बसलेले आहे. त्याच ठिकाणाहून नाला जातो. रविवारी नाल्याचे झाकण आज घडण्यात आले. त्यामुळे सगळे सांडपाणी मंडपात शिरले. ड्रेनेजमधील पाणी सगळीकडे पसरल्याने उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा त्रास जाणवला. विद्यार्थ्यांच्या जीवाशी घाणेरडी खेळी असून, प्रशासाकडून विद्यार्थ्यांच्या उपोषणावर गदा आणण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी प्रकाराचा निषेध व्यक्त केला.

उपोषण करत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. त्यानंतरही प्रशासनाने काडीमात्र दखल घेतली नाही. या जाड कातडीच्या प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या जिविताशी काही घेणेदेणे नसेल, स्वतःची जबाबदारी पार पाडत नसेल तर आम्ही सर्व विद्यार्थी मुलांच्या जीवनाशी खेळू इच्छित नाही म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी सदर उपोषण मागे घेत आहोत. प्रशासन किती असंवेदनशील आहे. कायदेशीर मार्गोनेही आमचा लढा सुरूच राहिल.

- रामप्रसाद नागरे, विद्यार्थी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरात घुसून चोरी, एक वर्ष सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात घुसून कपाट फोडण्याचा प्रयत्न करणारा आणि पँटच्या खिशातील ७ हजार २०० रुपयांची चोरी करणारा आरोपी आदील हमीद चाऊस याला एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला-अल-अमुदी यांनी ठोठावली.

या प्रकरणी जोहरा खान एजाज खान (४३, रा. शहाबाजार, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २२ जानेवारी २०१८ रोजी फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा रात्री जेवण करुन घरात झोपले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास घरात आवाज आल्यामुळे फिर्यादी व तिच्या मुलाला जाग आली असता, आरोपी आदील हमीद चाऊस (२८, रा. शहाबाजार) हा चाकूसह कपाट उघडण्याच्या प्रयत्नात दिसून आला. दोघांनी आरडाओरड केल्यामुळे शेजारी फिर्यादीच्या घराच्या दिशेने धा‍व घेण्याच्या तयारीत असल्याचे पाहून आरोपी पळून गेला. त्यावेळी फिर्यादीच्या मुलाच्या पँटच्या खिशातील ७ हजार २०० रुपयांची चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भादंवि ३८०, ४५८, तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या ४ व २५ कलमान्वये सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वरील एस. आर. ढोकरट यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात फिर्यादी व तिच्या मुलाची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला भादंवि ४५१ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावास, तर भादंवि ३८० कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

\Bवर्षाच्या आत निकाल

\Bया गुन्ह्यातील शिक्षा घटनेनंतर एका वर्षाच्या आत सुनावण्यात आली, हेही विशेष. प्रकरणातील आरोपीला घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ जानेवारी रोजी अटक करण्यात आली आणि अटकेनंतर निकाल लागेपर्यंत तो कारागृहातच होता, असेही समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यप्राशनासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेलचालकांवर गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारू पिण्यासाठी अवैधरित्या जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेलचालकासह २४ जणांवर मुंकुंदवाडी आणि पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. शनिवारी रात्री गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी ही कारवाई केली.

पुंडलिकनगर आणि मुकुंदवाडी पोलिस ठाणे हद्दीत काही हॉटेलमध्ये हॉटेलचालक विनापरवाना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकांनी या ठिकाणी छापा मारला. यावेळी हॉटेल शिव मराठा तसेच हॉटेल गुगली येथे अवैधरित्या मद्यप्राशन करीत असलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये सतीश नारायण दिवेकर, ज्ञानेश्वर शिवाजी लोखंडे, नारायण तुकाराम काथार, रमेश दिगंबर गजभोर, आकाश देवाजी उराडे, वाल्मीक धनराज बागुल, उदय सांडू केदारे, कल्याण विनायक काळे, नवनाथ मुरलीधर वाडेकर, दीपक राजाराम काथार तसेच राजू डुकले यांच्यासह इतरांचा समावेश आहे. या मद्यपींच्या ताब्यातून विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी बाळाराम चौरे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय अजबसिंग जारवाल, पीएसआय अनिल वाघ यांच्या पथकानी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाल्मीच्या अधिकाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोषारोप पत्रामध्ये खाडाखोड केल्याप्रकरणी वाल्मीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांचनवाडी वाल्मी येथे हा प्रकार घडला.

या प्रकरणी सूर्यकांत श्रीमंत धनशेट्टी (वय ५७, रा. वाल्मी वसाहत) यांनी तक्रार दाखल केली. वाल्मी संस्थेमध्ये डॉ. वृक्षसेन पुरुषोत्तम पवार (रा. पारिजातनगर, एन चार, सिडको) हे कार्यरत आहेत. डॉ. पवार यांच्या विरुद्ध गैरकारभार केल्याप्रकरणी सध्या विभागीय चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात आले आहे. डॉ. पवार यांनी त्यांच्या फायद्यासाठी दोषारोपपत्रामध्ये फेरफार करीत खाडाखोड केली. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी धनशेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी डॉ. पवार यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएसआय डोईफोडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाजलपुऱ्यात महिलेचे मंगळसूत्र लांबवले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी लंपास केले. रविवारी सकाळी अकरा वाजता फाजलपुरा, एसटी कॉलनी भागात हा प्रकार घडला. चोरटे परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगीता सुरेश बागले (वय २४ रा. काचीवाडा, चेलीपुरा) ही महिला मुलाला शिकवणीसाठी घेऊन जात होती. फाजलपुरा येथील स्वस्त धान्य दुकानासमोरून त्या जात असताना विना क्रमांकांच्या दुचाकीवर दोन तरुण त्यांच्या जवळ आले. या तरुणांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावत पलायन केले. सिटीचौक पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीएसआय प्रविण पाथरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली असता जॅकेट आणि कानटोपी घातलेले दोन चोर आढळले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय पाथरकर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इस्कॉन’ रथयात्रेतून स्वच्छता, एकतेचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'इस्कॉन'तर्फे रविवारी रथयात्रा काढण्यात आली. 'हरे कृष्णा हरे रामा'चा जयघोष, रथ ओढण्यासाठी भक्तांची लागलेली रीघ, ठिकठिकाणी रांगोळी काढत होणारे स्वागत अशा वातावरणात रथयात्रा उत्साहात पार पडली. यानिमित्ताने स्वच्छता व एकतेचा संदेश देण्यात आला.

राजाबाजारमधील संस्थान गणपती येथून रथयात्रेस सुरुवात झाली. सजलेल्या रथात भगवान जगन्नाथ यांची मूर्ती सोबतीला भजनात रममाण झालेले भक्तगण रथाला ओढत पुढे नेत होते. 'हरे कृष्णा हरे रामा' असा निनाद करत ही रथयात्रा सराफा बाजार, सिटी चौक मार्गे गुलमंडीकडे निघाली. तेथे भजनाच्या तालावर नृत्य करणारे भक्तगण, ज्या मार्गावरून रथयात्रा जाणार त्या मार्गावर काढली जाणारी रांगोळी, फुलांचा वर्षाव, भक्तांकडून दिला जाणारा स्वच्छतेचा संदेश अशा वातावरणाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. गुलमंडीमार्गे गोमटेश मार्केट, टिकळपथ, पैठण गेट, निराला बाजार, औरंगपुरा मार्गे खडकेश्वर येथील मैदानावर रथयात्रा विसर्जित करण्यात आली. ठिकठिकाणी भक्तांना नागरिकांकडून प्रसाद, पिण्याच्या पाण्याचे वाटपही करण्यात आले. प्रारंभी रथयात्रेची सुरुवात खासदार चंद्रकांत खैरे, रोहिणी प्रीय प्रभू, डॉ. नंदकुमार गुरडे, सुभाष पन्हाळे, शिवाजी चाटे, अॅड. ऋषीकेश आनंद प्रभू, राजेश भारुका, जय हनुमान प्रभू, डॉ. प्रेमचंद, श्रीकांत जोगदंड, प्रा. युवराज आचार्य, विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी खडकेश्वर मंदिराच्या मैदानावर पंडाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कीर्तन, कथा, बोधप्रथ नाटिका, सांस्कृतिक कार्यक्रम, महाआरती होणार आहे. यामध्ये रोहिणी प्रीय प्रभू हे मार्गदर्शन करणार आहेत. 'दैनंदिन जीवनात अध्यात्मिक मार्गाचा अवलंब' विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याच वेळी गोपाल फन स्कूलचे विद्यार्थी श्लोक पठण सादर करणार आहेत.

\Bरथयात्रेतून स्वच्छतेचा संदेश\B

सामाजिक एकता आणि स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न रथयात्रेतून करण्यात आला. स्वच्छतेचा संदेश देत असताना सहभागी नागरिक, तरूण, महिलांनी रस्त्याची साफसफाई करत होते. काहींनी सामाजिक एकतेचा संदेश देणारे फलक, घोषणा दिल्या. यामध्ये सहभागी मान्यवरांसह भक्तांनी साफसफाई करत सहभाग नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images