Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

साहित्यिकांचा संमेलनावर बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यवतमाळ येथील नियोजित ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वाद टोकाला पोहचला असून, संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण ऐनवेळी संयोजकांनी रद्द केल्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या संमेलनात निमंत्रित असलेल्या मराठवाड्यातील साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार घालत झुंडशाहीचा निषेध नोंदवला आहे.

यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या संयोजकांनी उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर साहित्यिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा निषेध केला. कविसंमेलन आणि परिसंवादात निमंत्रित असलेल्या साहित्यिकांनी बहिष्कार जाहीर केला. 'प्रसारमाध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य' या विषयावरील परिसंवादात सहभागी असलेले प्रा. जयदेव डोळे यांच्यासह इतर चार वक्त्यांनी बहिष्कार घातल्याने परिसंवाद रद्द झाला आहे. कवयित्री प्रभा गणोरकर यांची मुलाखत घेणाऱ्या साहित्यिकांनीही बहिष्कार जाहीर केला. या संमेलनात कवी केशव देशमुख, रामप्रसाद तौर, बालाजी सुतार, इंद्रजित भालेराव, दासू वैद्य, सुचिता खल्लाळ, श्रीकांत देशमुख, डॉ. गणेश मोहिते, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. जयदेव डोळे हे मराठवाड्यातील साहित्यिक निमंत्रित होते. या साहित्यिकांनी जाहीर निषेध नोंदवत संमेलनात सहभागी होणार नाही असे सांगितले. नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय साहित्य महामंडळाने निमंत्रण दिले होते. मात्र, संयोजक सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्यामुळे दबाव सुरू झाला. या दबावातूनच निमंत्रण रद्द झाल्याची साहित्य वर्तुळात चर्चा आहे. स्मरणिकेत छापण्यासाठी सहगल यांचे भाषण उपलब्ध झाले होते. भाषण वाचल्यानंतर संभाव्य गैरसोय ओळखून निमंत्रण रद्द करण्यात आल्याची टीका साहित्यिकांनी केली.

\B'मसाप'ने नोंदवला निषेध

\Bसाहित्य संमेलनापूर्वी १० जानेवारीला अ. भा. साहित्य महामंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत घटकसंस्था असलेले मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी परखड भूमिका जाहीर करणार आहेत. 'निमंत्रण रद्द करण्यापूर्वी तुम्ही आमच्याशी बोलले असते तर विरोध केला असता. अर्थात, त्याचा काहीही उपयोग झाला नसता हे वेगळे. तुमच्याबरोबर निष्कारण आम्ही झोडपले जात आहोत. घेतलेला निर्णय धिक्कार करावा असाच आहे' असे 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.

झुंडशाहीच्या दबावाखाली केलेली कृती उद्वेगजनक, निषेधार्ह आहे. एका ज्येष्ठ लेखिकेचा उपमर्द होत असताना साहित्य महामंडळाने रोखठोक भूमिका घेऊन संमेलन रद्द करावे. मी संमेलनावर बहिष्कार घालत आहे.

- आसाराम लोमटे, साहित्यिक

शबरीमला मंदिर प्रवेश ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन अशा प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना रोखले जात आहे. अशा स्त्रीद्वेष्ट्या संमेलनावर बहिष्कार घालत आहे.

- प्रा. जयदेव डोळे, साहित्यिक

संमेलनातील परिसंवादात मी नियोजित वक्ता आहे. नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द केल्याने धक्का बसला. विचार दडपण्याचा हा प्रयत्न असून संमेलनात सहभागी होणार नाही.

- डॉ. रामचंद्र काळुंखे, समीक्षक

संयोजकांनी दिलगिरी व्यक्त करून नयनतारा सहगल यांना सन्मानाने निमंत्रित करावे. उद्घाटकीय भाषण ऐकण्याची संधी महाराष्ट्राला द्यावी. तूर्तास, मी 'मराठी समीक्षेची समीक्षा' परिसंवादातील निमंत्रित या नात्याने संमेलनावर बहिष्कार टाकतो.

- डॉ. गणेश मोहिते, समीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गळ टोचणीला आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील गळटोचणीसह इतर अनिष्ठ प्रथांविरोधात दाखल जनहित याचिकेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे, ए. जी. अवचट यांनी समाजकल्याण विभागाचे मुख्य सचिव, गृह सचिव औरंगाबादचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह शेंद्रा येथील मांगीरबाबा देवस्थान विश्वस्त मंडळाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

लाल सेनेचे अध्यक्ष गणपत भिसे यांनी याचिका केली आहे. शेंद्रा येथील मांगीरबाबा येथे दरवर्षी एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात सर्व जाती धर्माचे लाखो भाविक मांगीरबाबा येथे बोललेले नवस फेडण्यासाठी कोंबडे, बकरे कापून व स्वतःच्या अंगामध्ये लोखंडी गळ (हूक) टोचून घेण्यासारखे अघोरी प्रकार केले जातात. या अनिष्ठ आणि अघोरी प्रथेमुळे आजपर्यंतच्या अनुभवाप्रमाणे अनेक भक्तांना संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे लाल सेनेने प्रथेच्या विरोधात गेल्या वर्षी संस्थापक अध्यक्ष गणपत देवराव भिसे यांनी बेमुदत उपोषणही केले होते. प्रथा बंद होण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मांगीरबाबा देवस्थान ट्रस्ट यांच्याकडेही मागणी केली होती, मात्र त्यानंतरही गतवर्षी हजारो भाविकांनी अंगात लोखंडी गळ टोचून घेण्यासारख्या अघोरी प्रथेनुसार नवस फेडले होते. या पार्श्वभूमीवर याचिका दाखल करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांकडून अंगद कानडे हे काम पाहात असून, त्यांना सुभाष नाडे हे सहकार्य करीत आहेत.

\Bयाचिकेची खंडपीठात गंभीर दखल\B

या याचिकेची औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतली. सुनावणीदरम्यान महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा; तसेच जादुटोणा प्रतिबंधक कायदा २०१३च्या अनुसूची तीनप्रमाणे स्वतःच्या अंगाला इजा करणे बेकायदा असून, ही अनिष्ठ प्रथा लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशी दारू विक्रेत्यांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये सहा जणांवर सबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करून दारूचा अवैध साठा जप्त करण्यात आला. विशेष बाब म्हणजे एकाच आरोपीला लागोपाठ दोन दिवस दारूची अवैध विक्री करताना अटक करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी चार वाजता भावसिंगपुरा भागात पहिली कारवाई केली. यावेळी अजित अप्पाराव जाधव (वय ३१, रा. भावसिंगपुरा) याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून दीड हजार रुपयाची अवैध दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेच्या पथकाने दुसरी कारवाई जयभवानीनगर परिसरात केली. या ठिकाणी संशयित आरोपी किशोर तुळशीराम डकले (वय २८ रा. विश्रांतीनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून रोख रक्कम व देशी दारू असा दोन हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. तिसऱ्या घटनेत रवींद्र मोहन दाभाडे व राजू किसनराव डुकले यांना शनिवारी रात्री विश्रांतीनगर भागातून अवैध दारू विक्री करताना अटक करण्यात आली. या दोघांच्या ताब्यातून रोख सात हजार ७०० रुपयासह देशी दारूच्या ४५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. चौथ्या घटनेत रविवारी दुपारी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन भागात गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये संशयित आरोपी राजकुमार उमेशराव भादे (वय २३ रा. संजयनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून पावणेनऊशे रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bएकाच आरोपी दोन दिवसांत दोनदा अटक\B

पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकाच आरोपी अवैध दारू विकताना दोन दिवसांत दोनदा अटक करण्यात आली. राजू किसनराव डुकले असे या आरोपीचे नाव आहे. शनिवारी राजूला गुन्हे शाखेच्या पथकाने साथीदारासह अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून देशी दारुच्या ४५ बाटल्या आणि रोख सात हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले होते. यानंतर रविवारी सायंकाळी त्याला विश्रांतीनगर भागातच अवैध दारुची विक्री करताना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातून ११०० रुपयाची अवैध देशी दारू जप्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सुरक्षेसाठी आता महिला चार्ली

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील महिला तरुणी आणि विद्यार्थींच्या सुरक्षीततेसाठी दामिनी पथकानंतर आता महिला चार्ली पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 'शी फॉर हर' या मोहिमेंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला. या पथकाचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शनिवारी उद्घाटन केले; तसेच पोलिस मुख्यालयात महिला व तरुणींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले.

पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या संकल्पनेतून उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांच्या मागदर्शनाखाली या दहा चार्ली पेट्रोलिंग जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चार्ली जवान शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, धार्मिक स्थळे, महिलांचा जास्त वावर असणाऱ्या सार्वजनिक जागा अशा ठिकाणी पेट्रोलींग करणार आहेत. महिला सुरक्षेबाबतीत काही अडचणी आल्यास १०९१; तसेच १०० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन पोलिस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे. 'शी फॉर हर' या घोषवाक्यांनी सुरू होणारे हे पथक छेडछाडीसंदर्भात विशेष मोहीम राबवणार असून, सर्व १५ पोलिस ठाण्यांअंतर्गत पेट्रोलिंग करणार आहे. या कार्यक्रमाला प्रा. अपर्णा कोतापल्ले, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, डॉ. अनिता जमादार, पोलिस निरीक्षक किरण पाटील, पीएसआय कुलकर्णी यांच्यासह महिला सहा कक्षातील कर्मचारी उपस्थीत होत्या.

\Bमोफत स्वसंरक्षण शिबिर\B

महिला व तरुणीसाठी पोलिस मुख्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयेाजन करण्यात आले आहे. एका बॅचमध्ये ५० विद्यार्थींनी असणार असून, १५ दिवस हे प्रशिक्षण सुरू असणार आहे. स्वसंरक्षणाचे धडे प्रशिक्षक रामेश्वर चायल आणि अश्विनी चायल हे देणार सकाळी आठ ते दहा या कालावधीत हे शिबिर असणार आहे. प्रशिक्षण घेण्यास इच्छुक महिला व तरुणींनी पोलिस आयुक्त कार्यालयातील महिला सहाय्य कक्ष येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा वाहतुकीचे वाहन न आल्याने संभ्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा वाहतूक आणि संकलनाचे काम करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने या कामासाठी वाहने आणली नसल्याने महापालिका प्रशासनासह पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत. दरम्यान, या कंत्राटदाराला चर्चा करण्यासाठी येण्याचा सांगावा पाठवण्यात आला आहे.

कचरा वाहतूक व संकलनाकरिता बेंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दहा वर्षांचे कंत्राट दिले आहे. या कामासाठी कंपनीची वाहने शनिवारपर्यंत शहरात येणार होती. त्यानंतर लगेच प्रायोगिकतत्वावर काही वॉर्डांमधून कंपनीकडून काम करून घेण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु, कंपनीने वाहने आणली नसल्याने पदाधिकारी व प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. वाहने का उपलब्ध होत नाहीत, वाहने आणण्यासाठी काही अडचणी आहेत का, हे जाणून घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना मंगळवारी (आठ जानेवारी) चर्चेकरिता बोलावले आहे. चर्चेतून मार्ग निघेल, वाहने लवकर येतील, असे त्यांनी सांगितले. नारेगाव कचरा डेपोवर आवश्यक प्रक्रिया करण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) येत्या १५ दिवसांत तयार होईल, असा दावा महापौरांनी केला. चिकलठाणा, हर्सूल येथील प्रक्रिया केंद्राच्या जागेवर करावयाच्या आवश्यक कामांचा समावेश 'डीपीआर'मध्ये नसेल तर त्याचा वेगळा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. चिकलठाणा येथील जागेवर जास्त क्षमतेचे जनरेटर उपलब्ध करून देण्याची सूचना संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना केल्याचे महापौरांनी सांगितले.

\B'हायक्युब'चा प्रस्ताव 'स्थायी'पुढे ठेवणार \B

हर्सूल येथील प्रक्रिया केंद्रात खुल्या तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी 'हायक्युब' या कंपनीचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समिती समोर ठेवला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ कॉलेजांची माहिती मागवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परीक्षा शुल्कमाफीचा लाभ विद्यार्थ्यांना न देणाऱ्या कॉलेजांची माहिती उच्च शिक्षण विभागाने मागितली आहे. त्यामुळे सहसंचालकांनी कॉलेजांनी किती विद्यार्थ्यांना शुल्क माफीची रक्कम दिली,क याची माहिती सादर करण्याते आदेश दिले आहेत.

राज्यसरकारने मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेत २०१४-१५ शैक्षणिक वर्षातमधील परीक्षा शुल्क माफ केले. या घोषणेपूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क जमा केल्याने हे शुल्क शासनाने नंतर निधी स्वरुपात परत केले. संचालकांकडून सहसंचालक, विद्यापीठ मार्गे थेट कॉलेजांना हा निधी विद्यार्थीनिहाय पाठविण्यात आला. मात्र, निधी देण्यापुरतेच लक्ष देणाऱ्या संचालक, विद्यापीठाने निधी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मिळाला की, नाही याची खातरजमा केली नाही. मात्र, हा निधी बहुतांश कॉलेजांनी विद्यार्थ्यांना परत न करताच परस्पर हडपला. हा निधी विद्यार्थ्यांना परत द्यावा, अशी मागणी पुढे आल्यानंतर उच्चशिक्षण, विद्यापीठाला जाग आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत कॉलेजांना तब्बल चार कोटी ५४ लाख रुपये वितरित करण्यात आले. हा निधी संबंधित विद्यार्थ्यांना परत केला नाही. किती विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क परत मिळाले याची आकडेवारीही विद्यापीठ व उच्च शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. कॉलेजांनी आता किती निधी जमा झाला, त्यातील किती विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केले. केले नसतील तर राज्यसरकारला परत केले की, नाही याबाबत माहिती मागविली आहे.

\Bयंदाही अशीच स्थिती

\Bयंदाही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील १८० तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी नोव्हेंबर २०१७मध्ये सुरू झाली. तोपर्यंत विधी, बीएड वगळता इतर अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांनी जमा केले होते. त्यामुळे आगामी काळातही असाच प्रकार होण्याची शक्यता आहे.

कॉलेजांना आपण विवरण पत्र देऊन याबाबतची माहिती तत्काळ देण्याच्या सूचना केल्या आहेत. परीक्षा शुल्काच्या रकमेबाबत विविध पातळीवर वेगवेगळी चर्चा आहे. त्यामुळे या माहितीनंतर आपण पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेवू.

- डॉ. सतीश देशपांडे, विभागीय उपसंचालक, उच्च शिक्षण विभाग

\Bउच्च शिक्षण विभागाकडील आकडेवारी

\Bजिल्हा............विद्यार्थी संख्या

औरंगाबाद.......५८०८

जालना............४२५०

उस्मानाबाद.......४७३१

बीड...............४०४७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेसाठी विरोधकांच्या भूमिकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

राज्यातील विरोधी पक्ष, विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसल्याने आम्हाला सत्तेत असतानाही विरोधकांचे काम करावे लागत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठण येथे केले.

विविध योजनेअंतर्गत शहरात जवळपास २२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे बांधकाम मंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे म्हणाले,'सत्ता असो किंवा नसो शिवसेनेची जनतेशी बांधिलकी आहे. यामुळेच आम्ही कधीच सत्तेसाठी राजकारण करत नाहीत.'

या कार्यक्रमात आमदार संदीपान भुमरे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा शहरात अश्वारूढ पुतळ्याचे मी शहर व तालुक्यातील जनतेची वचन दिले होते. ते वचन मी आज पूर्ण करत आहे.' विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सभापती विलास भुमरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, कृष्णा डोणगावकर, पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, तहसीलदार महेश सावंत, पाणीपुरवठा विभागाचे सुधाकर काकडे, नामदेव खराद यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शहरातील नागरिक उपस्थित होते.

\Bया विकास कामांचा उद्घाटन\B

सह्याद्री हॉटेल ते शहागड फाटा (१६ कोटी रुपये), राम मंदिर ते सह्याद्री हॉटेल चौपदरीकरण (दोन कोटी ६० लाख), छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शुशोभिकरण (५० लाख), नगरोथ्थान योजनेंतर्गत शहरात विविध विकास कामे (७५ लाख), पंचायत समिती व्यापारी गाळे, पेव्हर ब्लॉक बसवण, कृषी गोदाम (पावणेदोन कोटी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ जाहीर करण्यात भेदभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनातर्फे आतापर्यंत मराठवाड्यातील ३५० महसुली मंडळांत टप्प्याटप्प्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, लातूर जिल्ह्यातील आठ महसुली मंडळांमधील १५९ गावे निकषामध्ये बसत असूनही, त्यांचा दुष्काळी गावांत समावेश करण्यात आला नाही. विशेष म्हणजे या गावांची अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

दुष्काळात भेदभाव केलेल्या मंडळांमध्ये लातूर तालुक्यातील कासारखेडा, अहमदपूर तालुक्यातील किनगाव, निलंगा तालुक्यातील नीटूर, निलंगा, कासारबालकुंदा, उदगीर तालुक्यातील वाढवणा आणि रेणापूर तालुक्यातील रेणापूर व पानगाव महसुली मंडळांचा समावेश आहे. या मंडळांमधील १५९ गावांमध्ये सरासरी पाऊस ७५० मिलिमीटरपेक्षा कमी झाला आहे. शिवाय अंतिम पैसेवारीमध्येही ही गावे दुष्काळी दिसतात. मात्र, तिसऱ्या टप्प्यामध्ये या गावांचा दुष्काळात समोश करण्यात आला नाही. यामध्ये लातूर तालुक्यातील २०, रेणापूर ३७, उदगीर १७, अहमदपूर २२ तर निलंगा तालुक्यातील ६३ गावांचा समावेश आहे. शेजारच्या जिल्ह्यामध्ये ज्या मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला, त्यापेक्षाही कमी पाऊस लातूर जिल्ह्यातील या मंडळामध्ये आहे, तरीही प्रशासनाने या गावांना दुष्काळाबाहेर ठेवले आहे. त्यामुळे या गावांमध्ये दुष्काळी गावांना देण्यात येणाऱ्या सवलती तसेच येत्या काही दिवसांमध्ये देण्यात येणाऱ्या दुष्काळी अनुदानापासूनही या वंचित रहावे लागणार आहे. शासनाने पहिल्यांदाच दुष्काळ निकषांमध्ये बदल करून ट्रिगरच्या निकषानुसार आतापर्यंत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्यातील पूर्ण गावांचा समावेश झाला आहे. नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यातील अनेक महसुली मंडळांमध्ये ७५० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेला असल्यामुळे या गावांना दुष्काळी निकष लागू होत नाही.

---

\Bनिकषात बसूनही दुष्काळाबाहेर

---

\Bमंडळ.................. पडलेला पाऊस

कासारखेडा............४२२ मिमी

किनगाव................५८२ मिमी

नीटूर....................५४२ मिमी

निलंगा..................६८५ मिमी

कासार बालकुंदा.......५२७ मिमी

वाढवणा.................६४१ मिमी

रेणापूर...................५४८ मिमी

पानगाव...............५१३ मिमी

----

मराठवाड्याचे चित्र

---

पहिला टप्पा- ४७ तालुक्यांमध्ये दुष्काळ

दुसरा टप्पा - २६८ मंडळांमध्ये दुष्काळ

तिसरा टप्पा - २३३ मंडळांमध्ये दुष्काळ

दुष्काळा बाहेर मंडळे - ७१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामगार, कर्मचाऱ्यांचा आज धडक मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र व राज्य सरकारच्या कामगार, कर्मचारी धोरणाच्या विरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी देशातील दहा मध्यवर्ती कामगार संघटना आणि ५२ अखिल भारतीय फेडरेशन यांनी आजपासून दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यानिमित्त मंगळवारी क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून कामगार, कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने संपात सामील व्हावे, असे आवाहन स्थानिक समितीने केले आहे.

मोर्चाला सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार असून पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौकमार्गे तो विभागीय आयुक्तालयावर जाणार आहे. संप यशस्वी करण्यासाठी वाळूज, चिकलठाणा आदी सर्व एमआयडीसीमध्ये सभा घेण्यात आल्या, संपला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कृती समितीने व्यक्त केला आहे. सीटू, आयटक, इंटक, एचएमएस, भारतीय कामगार सेना, पँथर, श्रमिक महासंघ, बीएसएनएल कर्मचारी संघटना, विमा कामगार संघटना, जीआयसी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी, नगरपालिका, महापालिका कामगार, डाक कर्मचारी यासह विविध कामगार, कर्मचारी संघटना संपात सामील होत आहेत.

दरम्यान, कामगार कर्मचारी संघटना, स्वतंत्र मजदूर संघाने संपाला पाठिंबा दिला आहे.

\Bहल्लाबोल आंदोलन\B

ऑनलाइन फार्मसी विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा औषध विक्रेता संघटनेचे सचिव दिलीप ठोळे यांनी दिली.

\Bकामगारांच्या मागण्या\B

४४ कामगार कायदे रद्द करून मालकधर्जिने चार लेबर कोड तयार करणे थांबवा

सार्वजनिक व सरकारी क्षेत्राचे खासगीकरण रद्द करा

सरकारी क्षेत्रातील आउटसोर्सिंग करा

निश्चित काल‌वधीसाठी रोजगाराचे धोरण रद्द करा

सर्व असंघटीत कामगारांसाठी योग्य वेतन व सामाजिक सुरक्षा कायदा करा

किमान २० हजार रुपये वेतन निश्चित करा

महागाईवर आधारित महागाई भत्ता लागू करा

सर्व स्किम कर्मचाऱ्यांना नियमित करून वेतन द्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यान दुरुस्तीसाठी बेमुदत उपोषण

$
0
0

कन्नड : मुख्य रस्त्यावरील व नगर पालिका कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्यान व पुतळा परिसरातील स्वच्छता, दुरुस्ती, देखभालीकडे नगर पालिकेच्या दुर्लक्षाविरोधात विविध आंबेडकरी संघटनेतर्फे सोमवारपासून (सात जानेवारी) उद्यान परीसरात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

नगर पालिकेने उद्यान परीसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या संरक्षणासाठी त्वरित सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. उद्यान परिसरात वृक्ष लागवड करून सुशोभिकरणाचे कामे त्वरित हाती घ्यावीत, उद्यान परिसरातील असामाजिक तत्वांचा वावर थांबवावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. उद्यानात करण्यात येत असलेले गैरप्रकार नगर पालिकेच्या निदर्शनात आणून देण्यात आले आहेत. त्यावर काहीही कार्यवाही होत नसल्याने आंबेडकरी संघटना, चळवळीतर्फे कडुबा पवार, समुद्र मोरे, मोगल वाघ, योगेश अंभोरे, विष्णू म्हस्के, खालेद शेख, कदीर मौलाना, गंगाधर सिरसाठ, राजू धनेधर, हरिभाऊ खरात, रेवजीनाथ बागूल आदी उपोषणाला बसले आहे. या आमरण उपोषणाला मराठा मावळा संघटनेने पाठिंबा दिला असून, या उपोषणात संघटनेचे कार्यकर्ते सामील होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस लाखांची बॅग पळवणाऱ्या टोळीतील सूत्रधार हाती लागेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एपीआय कॉर्नर येथून व्यापाऱ्याची ३० लाखाची बॅग पळवण्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी ठाण्याच्या आंतरराज्य टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या टोळीचा सूत्रधार सॅम्युअल परेरा हा अद्यापही शहर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी त्याची बँक खाती गोठवली असून, यामध्ये अल्प रक्कम जमा असल्याचे दिसून येत आहे.

एपीआय कॉर्नर भागातील भारत बाजार येथून तीन नोव्हेंबर रोजी कारची काच फोडून ३० लाखांची रक्कम असलेली बॅग लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी मनोज बाजीराव गटकाळ (रा. पाचोड) यांच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेने याप्रकरणी कौशल्यपूर्ण तपास करीत हा गुन्हा करणाऱ्या ठाण्याच्या आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक केली होती. यामध्ये विनय रामेश्वर राणा आणि पुष्पा सॅम्युअल परेरा यांचा समावेश होता. यापैकी पुष्पा ही या टोळीचा प्रमुख सूत्रधार सॅम्युअल परेराची पत्नी आहे.

कारमधून बॅग लंपास करणारी ही कुख्यात टोळी आहे. हे दोन आरोपी पकडल्यापासून सॅम्युअल परेरा पसार झाला आहे. पाण्याचे जार विक्री करण्याची कंपनी; तसेच एक कंन्स्ट्रक्शन कंपनी सॅम्युअलने उघडलेली आहे. पसार सॅम्युअलचा गुन्हे शाखा शोध घेत आहे. दरम्यान, त्याच्या बँक खात्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाने मागवली होती. यापैकी चार खात्यांची माहिती मिळाली असून, एक बँक खाते सील करण्यात आले आहे. या बँकखात्यामधून दोन वर्षांपूर्वीच जमा झालेली ११ लाखांची रक्कम सॅम्युअलने काढून घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरापासून हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेली सॅम्युअल परेराची पत्नी पुष्पा परेरा हिचा जामीन मंजूर झाला असून, तिची सुटका करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दम्याच्या जागृतीसाठी गावखेड्यापर्यंत मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ग्लोबल डिसीज बर्डन २०१६'नुसार दम्यामुळे होणारे मृत्यू हे चीनपेक्षा भारतात जास्त असल्याची अधिकृत नोंद झाली आहे आणि त्याचवेळी दम्यामुळे भारतात होणाऱ्या मृत्युंची संख्या ही लाखांमध्ये असू शकते, अशी भीती श्वसनविकारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्या तुलनेत दम्याविषयी अजूनही फारशी जनजागृती नाही आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागापर्यंत दम्यावरील अत्याधुनिक उपचारांची माहिती पोचलेली नाही. ही स्थिती लक्षात घेऊनच सिप्ला कंपनीतर्फे 'बेरोक जिंदगी' ही मोहीम देशभर राबविली जात आहे. त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात १५ डिसेंबर २०१८ ते १५ जानेवारी २०१९ या कालावधीत दम्याविषयी व्यापक जनजागृती केली जात आहे.

दमा (अस्थमा) हा असाध्य विकार असला तरी त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवून सामान्य क्रियाशील आयुष्य जगणे सहज शक्य आहे. दम्यावरील उपचाराच्या अनेक पद्धती उपलब्ध असून, याची औषधे श्वासाद्वारे (इन्‍हेलेशन उपचारपद्धती) आत घेणे हा सर्वोत्तम व सुरक्षित मार्ग असल्याचे जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आले आहे. श्वासाद्वारे ही औषधे थेट रुग्णाच्या फुप्फुसांपर्यंत पोहोचतात आणि रुग्णांना तात्काळ आराम मिळतो. त्या उलट सिरप किंवा गोळ्यांचा परिणाम होण्यास वेळ लागतो, कारण या पद्धतीमध्ये ती औषधे जठराच्या मार्गाने रक्तात मिसळतात आणि शेवटी फुप्फुसांपर्यंत पोचते. परिणामी, आराम उशिरा व तुलनेने कमी मिळतो आणि अतिरिक्त औषधांमुळे अनेक दुष्परिणाही होऊ शकतात. त्याचवेळी इन्‍हेलेशन उपचारपद्धतीत औषधांची मात्रा (डोसेज) सिरप्स व टॅब्लेट्सच्या तुलनेत २० पटीने कमी असते आणि अधिक प्रभावी असते हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या नवीन उपचार पद्धतीचा स्वीकार व प्रचार होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सुदास बर्दापूरकर, श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत पापीनवार व इतर तज्ज्ञांनी मंगळवारी (आठ जानेवारी) पत्रकार परिषदेत नोंदविले.

\B'पीक फ्लो मीटर'पासून डॉक्टर दूरच

\Bदम्याचे निदान, दम्याच्या आजाराची नेमकी पायरी, आजाराची तीव्रता, दम्याचा अटॅक आणि औषधोपचारानंतर दम्याच्या रुग्णांमध्ये नेमका किती फरक पडला अशा अनेक बाबींचा शास्त्रीय उलगडा ज्या 'पीक फ्लो मीटर'मुळे होतो, ते अवघ्या ४०० रुपयांचे 'पीक फ्लो मीटर' हे उपकरण अजूनही फिजिशियन व इतर डॉक्टरांकडे नसते. स्टेथोस्कोप, थर्मामीटर व अशी कितीतरी उपकरणे प्रत्येक डॉक्टरकडे असतात, मग दम्याचे निदान करणारे 'पीक फ्लो मीटर' का नसते, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळेच दम्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तरी हे उपकरण प्रत्येक डॉक्टर असायला हवे, असेही मत डॉ. बर्दापूरकर यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकांच्या निलंबनाविरोधात विद्यापीठात केली निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांच्या बेकायदेशीर निलंबनाविरोधात 'बामुक्टो' संघटनेने विद्यापीठ दणाणून सोडले. सतत पाठपुरावा करूनही प्रशासन कारवाई करीत नसल्यामुळे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. प्राचार्य डॉ. मेहेर पाथ्रीकर यांची पद मान्यता काढण्याच्या भूमिकेवर संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांच्या निलंबनाचा मुद्दा १४ महिन्यांपासून प्रलंबित आहे. याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने (बामुक्टो) मंगळ‌वारी दुपारी जोरदार निदर्शने केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर दोन तास घोषणा देत प्रवेशद्वारात आंदोलकांनी ठिय्या मारला. बदनापूर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शरफोद्दीन शेख हे अधिसभा निवडणुकीचे उमेदवार होते. त्यांच्या उमेदवारी अर्जावर उपप्राचार्य प्रा. महेश उंडेगावकर यांनी स्वाक्षरी केली होती. त्यामुळे प्राचार्य डॉ. मेहेर पाथ्रीकर यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात २१ नोव्हेंबर २०१७ रोजी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले. तसेच नऊ जानेवारी २०१८ रोजी नोटीस न देता सेवेतून निलंबित केले. सहसंचालक कार्यालयाची दिशाभूल करुन २१ नोव्हेंबरपासून वेतन बंद केल्याचा संघटनेचा आरोप आहे. या प्राध्यापकांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. कोणताही कर्मचारी निलंबनाच्या ९१व्या दिवसापासून निलंबनमुक्त झाला असे गृहीत धरून पुन्हा सेवेत घ्यावे. तसेच संपूर्ण आर्थिक लाभ द्यावा असे कोर्टाचे आदेश आहेत. या प्राध्यापकांवर संस्थेने ठेवलेल्या आरोपातून औरंगाबाद खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. बेकायदेशीरपणे निलंबित ठेवणे प्रशासकीय व आर्थिक गुन्हा आहे. याबाबत तातडीने रूजून करून व प्रलंबित वेतन द्यावे अशी मागणी संघटनेने केली. यावेळी डॉ. विक्रम खिलारे, डॉ. बप्पा मस्के, डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. शफी शेख, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. संजय कांबळे, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. महेश कुलथे, डॉ. सुजात कादरी यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज केंद्राचे ‘पाऊसपाड्या’ सर्वप्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६६ व्या प्राथमिक नाट्य महोत्सवात कामगार कल्याण केंद्र, वाळूज यांच्या 'पाऊसपाड्या' नाटकाने सर्वप्रथम क्रमांक पटकावला. 'खिडक्या' आणि 'दुसरा अंक' या नाटकांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.

कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ६६ वा प्राथमिक नाट्य महोत्सव घेण्यात आला. ललित कला भवन येथे औरंगाबाद केंद्रावरील १७ नाटकांचे सादरीकरण झाले. या महोत्सवाचा मंगळवारी सायंकाळी पारितोषिक वितरणाने समारोप झाला. यावेळी रंगकर्मी सुलेखा ढगे, रवी मंगलारप, विजय साळवे, सहायक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे, परीक्षक विवेद दिवटे, दत्तात्रय जाधव आणि शोभा दांडगे उपस्थित होते. व्यक्तिमत्त्व विकासात नाटकाचे मोठे योगदान असते. रंगभूमीवर कार्यरत झाल्यानंतर तुम्हाला तुमच्यातील आत्मविश्वासाची ओळख होते असे ढगे म्हणाल्या. विजय अहिरे यांनी सूत्रसंचालन केले आणि सुवर्णा कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी रंगकर्मी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bविजेते संघ

\Bप्रथम : पाऊसपाड्या (का. क. केंद्र, वाळूज)

द्वितीय : खिडक्या (का. क. केंद्र, सिडको नांदेड)

तृतीय : दुसरा अंक (का. क. केंद्र, मुदखेड)

उत्तेजनार्थ : सेकंड होम (शहाबाजार), तो क्षण (उस्मानपुरा), बिग बॉस (जालना), खेळीमेळी (लातूर)

\B

सर्वोत्कृष्ट अभिनय\B

पुरूष गट प्रथम : किशोर पुराणिक (दुसरा अंक) द्वितीय : धनंजय दाणी (पाऊसपाड्या), तृतीय गिरीश कऱ्हाडे (खिडक्या), उत्तेजनार्थ : शाम डुकरे, शंभूराजे जाधव, गजानन मुळे, रवी आघाव, रमेश मैंद, पराग कुलकर्णी, दर्शन पलोड, सिद्धार्थ सूर्यवंशी, दत्तात्रय करडे, कल्याणसिंग ठाकूर

महिला गट प्रथम : डॉ. अर्चना चिक्षे (खिडक्या), द्वितीय : मुग्धा देशकर (तो क्षण), तृतीय : विद्या देशमुख (सेकंड होम), उत्तजेनार्थ : अस्मिता खोडवे, जुईली तुपकरी, माधुरी लोकरे, आरती वसुमती, रेखा चव्हाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर बाजार समितीत शेतकऱ्यांत हामरीतुमरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये वजनकाट्याच्या नंबरवरून शेतकऱ्यांची मंगळवारी हमरातुमरी झाली. बाजार समितीचे नियोजन नसल्याचा आरोप करत वजनकाट्यावर बाजार समितीने स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वजनकाट्यावर कर्मचाऱ्याची नियुक्ती होत नाही तोपर्यंत कांदा वाहनांचे वजन होऊ देणार नाही, अशी भूमिका तालुक्यातील नगिनापिंपळगाव येथील शेतकरी पुरुषोत्तम साळुंके, शिवाजी सावंत, सुनील दिवटे, शिवनाथ सावंत, सतराज शेख, धनंजय सावंत, किरण मनचरे यांनी घेतली. त्यामुळे रांगेतील वाहने अडकून पडली होती. त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या मदतीने वजनकाटा पूर्ववत सुरू करण्यात आला. वैजापूर कृषी उत्पन्न समितीच्या कांदा मार्केटमध्ये सध्या कांदा खरेदी सुरू असून, कांद्याच्या भावावरून लिलाव बंद पाडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच बाजार समितीचे नियोजन नसल्यामुळे वजनकाट्यावर शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. वजनकाट्यावर कर्मचारी नसल्याने कुणीही शेतकरी आपले वाहन घुसवत असून, यातून जीवित हानी होण्याची शक्यता आहे, असे शेतकरी साळुंके यांनी सांगितले. बाजार समितीचे नियोजन नसल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

दरम्यान, याप्रकरणी बाजार समितीचे संचालक संजय पाटील निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, बाजार समितीच्या सभापतींचे नियोजन नसल्याचा आरोप केला. या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास बाजार समितीच्या कारभाराबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिस्त्रीला मारहाणीसह लुटले; दोघांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिस्त्रीला मारहाण करून त्याच्या खिशातील ३०० रुपये व मोबाइल हिसकावून घेतल्याप्रकरणातील आरोपी हरिदास गवणाजी म्हस्के व सागर आजिनाथ नलावडे यांचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी मंगळवारी (आठ जानेवारी) फेटाळला.

याप्रकरणी मिस्त्री काम करणारे प्रमोद सुभाष पाचवणे (२६, रा. पळशी पोखरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी महिन्याभरापासून सोलापूर येथे रोडचे गट्टू बसविण्याचे काम करीत होता. २५ डिसेंबर २०१८ रोजी तो फुलंब्री येथे घरी आला होता, तर तीन जानेवारी रोजी त्याना सोलापूरला जायचे असल्याने फिर्यादी रात्री साडेनऊच्या सुमारास सनी सेंटर येथून पायी टीव्ही सेंटरकडे जात होते. त्यावेळी जाधववाडी भाजी मार्केटजवळ आरोपी हरिदास गवणाजी म्हस्के (२४, रा. भक्तीनगर, पीसादेवी रोड), आरोपी सागर आजिनाथ नलावडे (१९, रा. शिवोश्वर कॉलनी) व त्यांच्या एका साथीदाराने फिर्यादीला मारहाण करून मोबाइल व ३०० रुपये हिसकावून घेतले.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक होऊन त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीवेळी, आरोपींच्या जामिनाला विरोध करत आरोपींना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोन्ही आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरणातून राबवणार मोफत अंत्यसंस्कार योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुमारे १८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेत शिवसेनेचा महापौर असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे असलेली मोफत अंत्यसंस्कार योजना खासगीकरणातून राबविण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. या कामासाठी एका संस्थेने पालिकेशी संपर्क साधला आहे.

भाजपचे तत्कालीन उपमहापौर संजय जोशी यांनी ही योजना जाहीर केली होती. त्यानंतर काही महिने सुरू राहिली. तत्कालीन आयुक्तांनी निधीचे कारण सांगून योजना बंद केली. त्यानंतर योजना सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. आता शिवसेनाचा महापौर असून त्यांनी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता खासगीकरण आणि आणि 'सीएसआर' फंडातून ती राबवण्याचा प्रयत्न ते करीत आहे, अशी माहिती त्यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, वसुधा वुडलेस क्रिमेशन ही संस्था या कामासाठी पुढे आली आहे. अकोला आणि वर्धा येथे या संस्थेचे काम सुरू आहे. यंत्राद्वारे अंत्यसंस्कार करण्याची त्यांची योजना आहे. पालिकेने यंत्र बसवून द्यावे, एका अंत्यसंस्काराकरिता दोन हजार रुपये द्यावेत, असा त्यांचा प्रस्ताव आहे. यंत्र चालवण्यासाठीचे वीज बिल आणि अन्य खर्च संस्थेतर्फे केला जाणार आहे. अंत्यसंस्काराकरिता लाकडाऐवजी गोवऱ्या वापरण्याची संस्थेची पद्धत आहे. अंत्यसंस्कारानंतर राहिलेली राख खत म्हणून वापरता येऊ शकते, असा संस्थेचा दावा असल्याचे महापौरांनी सांगितले. या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे प्रांत गोरक्षा प्रमुख राजेश जैन आणि संस्थेचे प्रतिनिधी अभिषेक ओटांगडे यांनी आपली भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.

\Bसहा यंत्रांसाठी दोन कोटींचा खर्च \B

प्रतापनगर, पुष्पनगरी, कैलासनगर, सिडको एन ६, बनेवाडी आणि मुकुंदवाडी या स्मशानभूमीमध्ये प्रायोगिक तत्तावर हे यंत्र बसवण्याबद्दल चर्चा झाली आहे. सहा स्मशानभूमींसाठी सहा यंत्र लागणार असून एका यंत्राची किंमत २२ ते २३ लाख रुपये आहे. यावर एकूण सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च 'सीएसआर' फंडातून उभा करण्याची महापालिकेची योजना आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्याची सूचना आयुक्तांना पत्राच्या माध्यमातून केल्याचे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजपुरवठ्याअभावी कचरा प्रक्रिया यंत्र निरुपयोगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रात २० टनांचे यंत्र आणले आहे. मात्र, ते चालवण्यासाठी वीज कनेक्शन नसल्यामुळे सुक्या कचऱ्याचा प्रश्न 'जैसे थे' आहे.

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर मायोवेसल्स या कंपनीच्या जास्त क्षमतेचे यंत्र लावण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार एका दिवसात १५० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र बसविण्याचे काम सध्या केले जात आहे. त्याकरिता वेळ लागणार असल्याने सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र लवकर बसवून प्रक्रिया सुरू करा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार दहा दिवसांपूर्वी २० टन क्षमतेची 'बेलिंग मशीन' बसविण्यात आली. त्यापूर्वी वीजपुरवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे होते, परंतु वीजपुरवठ्या अभावी प्रक्रिया सुरू झालेली नाही.

शहरात सुमारे १५०० टनापेक्षा जास्त सुका कचरा जागोजागी साठविला असून त्याला आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमिवर केवळ वीजपुरवठ्या प्रक्रिया होत नसल्याने सुक्या कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही.

\Bमहापौरांच्या आदेशाकडे पाठ \B

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्राला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. याचवेळी बेलिंग मशीनला वीजपुरवठा नसल्याचे लक्षात आले. जनरेटरद्वारे मशीन सुरू करा, असे आदेश त्यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, अद्याप जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार व्यापारी संकुलांची पुनर्बांधणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या मालकीची सर्वात जुनी झालेली चार व्यापारी संकुले पाडून तेथे नवीन व्यापारी संकुल बांधण्याची योजना महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. या संकुलांचे काम 'बीओटी' पद्धतीने न करता व्यापाऱ्यांच्याच पैशातून बांधकाम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात अधिक माहिती देताना महापौर म्हणाले, पैठण गेट, रेल्वे स्टेशन, जाफर गेट, उस्मानपुरा येथील व्यापारी संकुले फार जुनी झाली आहेत. नगरपालिकेच्या काळात त्यांचे बांधकाम झाले होते. पैठण गेट येथील व्यापारी संकुलात ३७ गाळे आहेत, रेल्वे स्टेशन संकुलात २५, जाफर गेट संकुल २७, तर उस्मानपुरा येथील संकुलात ११ गाळे आहेत. या गाळ्यांमध्ये सध्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय सुरू आहेत. या सर्व व्यापाऱ्यांचे अधिकार अबाधित ठेवून जुने संकुल पाडून त्या ठिकाणी नवीन संकुल बांधण्याच्या संदर्भात मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली आहे. टीव्ही सेंटर येथील मैदानाच्या बाजुने महापालिकेने व्यापारी संकुल बांधले आहे. लिलाव पद्धतीने या संकुलातील दुकाने विकून व्यापाऱ्यांकडूनच बांधकामासाठीचा पैसा उभा करण्यात आला, तशाच पद्धतीने या चारही संकुलांचे बांधकाम करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

\Bसामाजिक सभागृहांना हजार रुपये भाडे \B

शहागंज आणि औरंगपुरा येथील भाजी मंडईची वसुली सन् २०१२ पासून बंद आहे, ही गंभीर बाब असून या संदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या मालकीची १७७ सामाजिक सभागृहे एक हजार रुपये भाडे आकारून भाडेतत्वावर देण्याचा निर्णय देखील अधिकाऱ्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेतल्याचे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरहजर आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोयगाव तालुक्यातील बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी आरोग्य अधिकाऱ्यासह एकही कर्मचारी हजर नसल्याने आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसूती झाली. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर गैरहजर राहणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आ. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची पोलखोल करणारे एक पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक प्राथमिक केंद्रावर आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी गैरहजर असतात. त्याचा फटका ग्रामीण भागातील रुग्‍णांना बसतो. विभागात सध्या दुष्काळी परिस्थिती असून ग्रामीण भागातील रुग्‍णांना खासगी रुग्‍णालयात आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत ऍन्टीबायोटिक, ऍन्टीडायरियल, सलाइन अशी महत्वाची औषधे उपलब्ध नाहीत. मागील वर्षभरापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर औषधी खरेदी देखील करण्यात आलेली नाही. परिणामी ग्रामीण भागातील गोरगरीब रूग्णांना स्वत:च्या खर्चाने औषधी खरेदी करावी लागते. अनेक आरोग्य केंद्रामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदे रिक्त आहेत. पावसाळी अधिवेशनामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर यापुढे ऑन ड्युटी गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात येईल अशी घोषणा सभागृहात केली होती. त्यामुळे बनोटी आरोग्य केंद्रात गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी, चव्हाण यांनी केली आहे.

\Bजिल्ह्याचे चित्र

\B- विभागात तीव्र दुष्काळ

- शेतकऱ्यांच्या खिशात दमडी नाही

- आरोग्य केंद्रात औषधी नाही

- रुग्णांना खासगी रुग्णालयाचा भुर्दंड

- आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images