Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दाभोलकर हत्येशी रेगेंचा संबंध नाही

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात शस्त्र बाळगल्यासंबंधी अटकेत असलेला आरोपी रोहित रेंगे याचा हत्याप्रकरणी संबंध नसल्याचे पत्र सीबीआयने सरकारी वकिलामार्फत खंडपीठात सादर केले. त्यानंतर न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने आरोपीची ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व महिन्याच्या पहिल्या सोमवारी संबंधीत पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजुर केला.

याप्रकरणी सीबीआयचे उपअधीक्षक (बेलापूर, नवी मुंबई) मारुती शंकर पाटील यांनी २२ ऑगस्ट २०१८ रोजी तक्रार दिली होती. तक्रारीत, दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने प्रथम सचिन अंदुरे याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अंदुरे याने लपवण्यासाठी दिलेली शस्त्रे ही शुभम व अजिंक्य सुरळे यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार सीबीआयने सुरळे बंधुना अटक केली असता त्यांनी सदरील शस्त्रे ही आरोपी रोहित राजेश रेगे (२०, रा. धावणी मोहल्ला) याच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. त्यानुसार २२ ऑगस्ट २०१८ रोजी सीबीआयने आरोपी रोहित रेगेच्या घरी छापा मारत त्याच्या घराच्या गच्चीवरील एका पोत्यातून तलवार, पिस्तूल, तीन काडतुसे, एअर गन व दोन मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला. सीबीआयने तिन्ही आरोपींना ताब्यात घेत, त्यांच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान आरोपी रोहित रेगे याला २२ ते २७ ऑगस्ट २०१८दरम्यान पोलिस कोठडी दिल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी रेगेने नियमित जामिनीसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली. याचिकेच्या सुनावणी वेळी घाणेकर यांनी दाभोलकर हत्याप्रकरणाशी रोहित रेगेचा संबंध नसल्याचे सांगितले. आरोपीचा दाभोलकर हत्याप्रकरणाशी संबंध आहेत का याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतरही आरोपी रेगे विरोधात प्रकरणाशी संबंध असल्याचा पुराव मिळला नाही. २०१३मध्ये दाभोलकर यांची हत्या झाली त्यावेळी रोहित रेगे १५ वर्षांचा होता असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, तर सरकारी वकिलांनी आरोपीचा प्रकरणाशी संबंध आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी वेळ मागून घेतला होता. दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी सीबीआयने पत्र पाठवून आरोपी रोहित रेगेचा दाभोलकर हत्याप्रकरणी संबंध नसल्याचे सांगितले. या पत्राआधारे खंडपीठाने जामीन मंजूर केल्याची माहिती घाणेकर यांनी दिली. आरोपी रेगेतर्फे निलेश घाणेकर व वर्षा घाणेकर-वाघचौरे यांनी काम पाहिले. त्यांना कुलदीप कहाळकर, धनराज हिंगोले यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलशुद्धीकरण हौदातील वाळू बदलण्याचा विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी हौदातील वाळू चार वर्षांपासून बदलेली नाही. त्यामुळे वाळू बदण्याच्या कामाला मंजुरी द्या, असा प्रस्ताव महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. समितीची बैठक १४ जानेवारी रोजी होणार आहे.

फारोळा येथे शंभर दशलक्ष लिटर आणि ५६ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे दोन जलशुद्धीकरण केंद्र कार्यरत आहेत. शंभर दशलक्ष लिटर केंद्राचे १२ व ५६ दशलक्ष लिटर केंद्राचे दहा असे एकूण २२ गाळणी हौद आहेत. या गाळणी हौदात प्रामुख्याने वाळूचा (फिल्टर सँड) व गॅव्हल्सचा थर असतो. त्यातून गाळण प्रक्रिया केली जाते. दैनंदिन स्वच्छतेमुळे बारिक वाळू काही प्रमाणात वाहून जाते, त्यामुळे वाळूच्या थराची उंची कमी होत जाते. गाळणी हौद कायमस्वरुपी कार्यरत राहिल्यामुळे पाण्यातील गढुळता, चिकट मातीचे कण, रसायनातील अंश, शेवाळ यामुळे वाळू भोवती विशिष्ट प्रकराचे कोटिंग होऊन गाळणी हौदाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे पाण्याच्या गुवणत्तेवर परिणाम होतो.

गेल्या चार वर्षात गाळणी हौदातील वाळूच्या थराची उंची वाढवलेली नाही. हौदाच्या नियमित वापरामुळे हौदात गाळाचे गोळे (मड बॉल्स) तयार झाले आहेत. त्यामुळे गाळणी हौदात नवीन वाळू टाकणे गरजेचे आहे. या कामास स्थायी समितीने परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ठेवला आहे. या कामासाठी दोन कोटी ४० लाख आठ हजार ३६८ रुपये खर्च येणार आहे.

\Bसमृद्धी महामार्गासाठी 'एसटीपी'चे पाणी

\B

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी महापालिकेच्या कांचनवाडी येथील 'एसटीपी'चे पाणी देण्याचा प्रस्ताव देखील स्थायी समितीच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. पाच रुपये प्रतिहजार लिटर या दराने समृद्धी महामार्गासाठी पाणी देण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगारासाठी अडवली अतिरिक्त आयुक्तांची कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चार महिन्यांपासून पगार थकल्यामुळे बचत गटांच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी महापालिकेच्या मुख्यालयातच अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची कार अडवून घेराव घातला. थकलेला पगार तत्काळ देण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन भालसिंग यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे.

सिडको भागात महापालिकेसाठी १२ बचत गट काम करतात. या बचत गटांचे ३५२ कर्मचारी आहे, त्याशिवाय चालकांची संख्या वेगळी आहे. सुमारे ४०० कर्मचारी बचत गटांच्या माध्यमातून पालिकेत कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. पगार मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांनी निवेदने दिली, उपोषण केले; पण पगाराचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे बुधवारी कामगार शक्ती संघटनेचे नेते गौतम खरात यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची कार अडवली. कामगारांनी कारला घेराव घालून पगाराचे काय ते बोला, अशी विचारणा अतिरिक्त आयुक्त भालसिंग यांना केली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर पगार देण्याची व्यवस्था करतो, असे आश्वासन भालसिंग यांनी दिले, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घेराव मागे घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागण्यांसाठी एकत्रित लढा उभारा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आयुर्विमा महामंडळ देशातील सर्वात मोठी आर्थिक संस्था. महामंडळाने रेल्वे विकाससासाठी सव्वालाख कोटी दिले. मात्र, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, पेन्शन, कामावर आधारित आर्थिक लाभ देण्याची तयारी नाही. नोकरभरतीसह सर्व मागण्या तत्काळ मान्य होण्यासाठी महामंडळातील सर्व संघटनांनी एकत्रित लढा उभारावा,' असे आवाहन नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इन्शुअरन्स वर्कर्सचे अध्यक्ष अतुल देशपांडे यांनी बुधवारी केले.

नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इन्शुअरन्स वर्कर्स या संघटनेच्या त्रैवार्षिक अधिवेशनाचा समारोप झाला. या निमित्ताने आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर आयोजित द्वारसभेमध्ये देशपांडे बोलत होते. देशपांडे म्हणाले, 'वेतन पुनर्रचनेच्या संदर्भात संघटनेने एक ऑगस्ट २०१७ ला मागण्यांचे निवेदन दिलेले असून, त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. या विषयावर व्यवस्थापनाने संघटनेशी चर्चेच्या माध्यमातून लवकरात लवकर तोडगा काढावा, आयुर्विमा महामंडळामध्ये कर्मचारी भरती व्हावी, हंगामी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, कार्यक्षमता आणि उत्पादकतेशी निगडित लाभ लवकरात लवकर द्यावेत तसेच आणखी एक पेन्शन पर्याय देण्यात यावा. या मागण्यांसाठी संघटना विविध पातळ्यांवर संघर्ष करत आहे. आयुर्विमा महामंडळामध्ये कार्यरत सर्वच संघटनांनी एकत्रित येऊन सयुंक्त आघाडी करावी आणि त्या माध्यमातून सर्व मागण्या मान्य करवून घेण्यासाठी प्रयत्न करावा,' असे आवाहन केले. संघटनेचे महासचिव महादेव बापट यांनी म्हणाले, 'संघटनेची जबाबदारी आता खूप वाढली आहे. आयुर्विमा महामंडळ आणि संघटना दोन्हींच्या विकासासाठी आपल्याला मोठी भूमिका निभवायची आहे,' असे आवाहन त्यांनी केले. औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष मुकुंद मुधलवाडकर यांनी सभेचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले, तर संघटनमंत्री श्रीकांत बाबरेकर यांनी आभार मानले.

\B

नूतन कार्यकारणीची निवड

\Bअधिवेशनात पुढील तीन वर्षांच्या कार्यकाळाकरिता नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी अतुल देशपांडे (नागपूर) आणि महासचिवपदी महादेव बापट (बेळगाव) यांची फेरनिवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी अशी : कोषाध्यक्ष - जयेश मेघल (नागपूर), संघटनमंत्रीपदी हिमेश पटेल (नाडियाद), टी. सुरीकुमार (हैदराबाद), उपाध्यक्षपदी सव्यसाची भट्टाचार्य (सिल्चर), मदन देशपांडे, उमेश प्रसाद (म्हैसूर), सचिवपदी मुकुंद मुधळवाडकर (औरंगाबाद).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’साठी अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू हिशेब जुळवाजुळवीसाठी धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनी प्रकल्पासाठी आता अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. महापालिका अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी एकत्र बसून हिशेबाची जुळवाजुळव करीत आहेत. आयुक्त रुजू झाल्यावर 'समांतर'बद्दल अंतिम बैठक होणार आहे.

समांतर जलवाहिनीचे काम करण्यास 'एसपीएमएल' कंपनीने नकार दिला आहे. एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार केल्याशिवाय काम करणे शक्य नाही, असे या कंपनीने महापालिकेला शनिवारी झालेल्या बैठकीत स्पष्टपणे सांगितले. नियमानुसार एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार करता येत नाही, अशी भूमिका महापालिकेने स्पष्ट केली. त्यानंतर कंपनीने महापालिकेकडे १३५ कोटींची मागणी केली. कंपनीने खर्च केलेले १३५ कोटी रुपये द्या, आम्ही काम सोडतो, असा प्रस्ताव कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या समोर ठेवला आहे.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेली १३५ कोटींची मागणी किती योग्य आहे हे पडताळून पाहण्यासाठी मंगळवारी महापालिकेचे अधिकारी व कंपनीचे अधिकारी यांच्यात बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हिशेबाची जुळवाजुळव करण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगितले जाते. दोन-तीन दिवस या बैठका चालतील. त्यानंतर आयुक्त डॉ. निपुण विनायक रुजू झाल्यावर त्यांच्यासमोर लेखाजोखा ठेवला जाणार आहे. आयुक्त आणि महापौर अधिकारी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून १३५ कोटींबद्दल निर्णय घेतील.

\Bदौरा पुढे ढकलला

\B

समांतर जलवाहिनीसह रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी महापौरांसह पदाधिकारी बुधवारी मुंबईला जाणार होते; परंतु मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्यामुळे त्यांनी आपला मुंबई दौरा पुढे ढकलला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट महोत्सव आपल्याला घडवतो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

' कोणताही चित्रपट महोत्सव आपल्याला घडवतो. कलेला सीमा नसतात. जगातील कोणताही चित्रपट तुम्हाला भावनिकदृष्ट्या मनाला भिडतो. हेच या चित्रपट माध्यमाचे यश असते,' असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी केले. ते चित्रपट महोत्सवात बोलत होते.

देश-विदेशातील दर्जेदार चित्रपटांची पर्वणी असलेल्या सहावा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडकर यांच्या हस्ते प्रोझोन आयनॉक्स येथे बुधवारी सायंकाळी उदघाटन करण्यात आले. यावेळी चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष दिग्दर्शक एन. चंद्रा, अभिनेत्री राजश्री देशपांडे, दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक समीक्षक अशोक राणे, फ्रेंच अभिनेत्री मारियाना, अजित दळवी, किरण शांताराम, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, दासू वैद्य, शिव कदम, नीलेश राऊत, सचिन मुळे, प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद आदी उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध कन्नड चित्रपट दिग्दर्शक कासारवल्ली यांना पद्मपाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. घटश्राद्ध, गुलाबी टॉकिज, अशा अनेक चित्रपटासाठी त्यांना आतापर्यंत १४ राष्ट्रीय पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. 'माझ्या एकाही चित्रपटाने कमाई केली नाही. मी फ्लॉप दिग्दर्शक आहे. पण या १४ चित्रपटांनी माणसांना पाठबळ दिले. हा पुरस्कार घेताना आनंद झाला आहे. मानवी मनाच्या विकासात चित्रपट प्रभावी माध्यम आहे. मराठी चित्रपटाला मोठे भवितव्य आहे,' असे कासारवल्ली म्हणाले.

नऊ ते १३ जानेवारी या कालावधीत चित्रपट महोत्सव होणार आहे. भारतीय सिनेमा, आशियाई सिनेमा आणि जागतिक सिनेमा या गटात गाजलेले चित्रपट दाखवले जाणार आहेत. ऑस्कर पुरस्काप्राप्त चित्रपट आणि लघुपटांचे स्वतंत्र प्रदर्शन आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वी हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील जन्मशताब्दी वर्ष असलेल्या दिग्गजांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला. गायक नीरज वैद्य आणि श्रद्धा जोशी यांनी गाणी सादर केली. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\B'कोल्ड वॉर'ने सुरुवात\B

चित्रपट महोत्सवाला 'कोल्ड वॉर' (पोलंड) या चित्रपटाने सुरुवात झाली. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आली. विविध देशातील महोत्सव गाजवलेला चित्रपट रसिकांना वेगळी अनुभूती ठरला. या महोत्सवात गुरुवारी 'मंटो', 'घटश्राद्ध', 'आम्रीत्यूम', 'आम्ही दोघी', 'वाइल्ड स्ट्रॉबेरीज', 'अब्बू', 'सिन्सीअरली युवर्स ढाका' चित्रपट दाखवले जाणार आहेत, तर दुपारी १२ वाजता 'गांधी आणि सिनेमा' या विषयावर अमरीत गांगर यांचे व्याख्यान होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचार्य डॉ. वाहुळ, शफी यांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'असोशिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर अ‍ॅन्युएटेड टिचर्स संघटने'चे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. एम. ए. वाहुळ, इतिहास विषयतज्ज्ञ प्राचार्य मोहम्मद शफी यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याचे शुक्रवारी (११ जानेवारी) आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ११.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात आहे. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची विशेष उपस्थिती असणार आहे. डॉ. वाहुळ यांनी शासकीय महाविद्यालयात प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. याशिवाय कोल्हापूर येथे उच्च शिक्षण सहसंचालक, मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही कार्य केले. सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत त्यांचा मोठा वाटा आहे. मराठाडा विद्यापीठाच्या नामांतराची सर्वप्रथम मागणी त्यांचीच होती. सेवानिवृत्त प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी संघटनेची उभारणी करत शेकडो प्राध्यापकांना न्याय मिळवून दिला. प्राचार्य मोहमंद शफी हे इतिहासतज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेत ते सचिव म्हणून कार्य करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कामांची दखल घेत त्यांच्या ७५ वर्षांच्या पूर्तीनिमित्त गौरव करण्यात येणार आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष डॉ. जे. एम. मंत्री, सदस्य प्रा. एस. बी. नाफडे, डॉ. ए. डब्ल्यू. राऊत, डॉ. एम. जी. गायकवाड, प्रा. बी. बी. देशपांडे, प्रा. व्ही. एन. इंगळे, डॉ. एम. एन. जाचक, डॉ. पी. के. भालेराव, प्रा. ए. बी. पाटील, डॉ. एम. आर. ठोसर आदी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवलतीच्या गुणांना ब्रेक?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीच्या विद्यार्थ्यांना लोककला, चित्रकला, शास्त्रीय कलेत पारंगत असल्यानंतर मिळणाऱ्या सवलत गुणांना यंदा ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत विद्यार्थ्यांना प्रस्ताव सादर करण्याची मुदत गुरुवारी संपत आहे, तर शाळांना २१ जानेवारीपर्यंत मंडळाकडे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. मात्र, अजून एकही प्रस्ताव मंडळाकडे पोहचला नाही.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले. दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. यामध्ये शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना हे गुण दिले जातात. यंदा प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. यंदा १५ डिसेंबरपर्यंत प्रमाणपत्र, गुणपत्रिकांसह शासनाने दिलेल्या अर्ज नमुन्यात शाळेकडे प्रस्ताव सादर करायचे होते. शाळांना १५ जानेवारीपर्यंत शाळांना प्रक्रिया पूर्ण करावयाची होती. डिसेंबर संपला तरी एकही प्रस्ताव मंडळाकडे आलेला नव्हता. मंडळाकडून त्याबाबत शाळांना सूचना नव्हत्या. नवीन वर्षात शाळांना सूचना देण्यात आल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी १० जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. त्याला मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. तर, शाळांना २१ जानेवारीपर्यंत मंडळाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यात प्रस्तावाची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील शैक्षणिक वर्षात औरंगाबाद विभागात पाच जिल्ह्यातून प्रस्तावांचा पाऊस पडला होता. २१ हजार ७३० विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाकडे अशा सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्याचे वेळापत्रकही थेट एप्रिलपर्यंत गेले होते. मंडळ सवलतीच्या गुण म्हणून तीन ते पंधरा गुणांपर्यंत सवलतीचे गुण देते. यंदा सवलत देण्यासाठी शास्त्रीय गायन, वादन व नृत्य या क्षेत्रातील ६२ संस्था व लोककला प्रकारातील ३१ संस्था अशा एकूण ९३ संस्थांची यादी प्रमाणपत्र देण्याकरिता निश्चित करण्यात आली आहे.

\Bयंदा असे आहेत बदल...\B

२०१९पासून शास्त्रीय कला, चित्रकलामध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलत मिळेल. एखादा विद्यार्थी क्रीडा, शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलातील सहभाग यापैकी एका पेक्षा जास्त क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करत असला तरी कोणत्याही एकाच क्षेत्रासाठी सवलतीचे गुण जे उच्चतम आहेत तेच घेण्यासाठी विद्यार्थी अर्ज करू शकतो, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांद्याचे भाव पुन्हा घसरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

कांद्याच्या भावात काहीशी वाढ होत असताना अचानक आवक वाढल्याने पुन्हा एकदा भाव कमी झाले. पैठणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात रविवारी हजार रुपये क्विंटलने विकणारा कांदा बुधवारी ७०० ते ८०० रुपयांने विकण्यात आला.

पूर्ण डिसेंबर महिना व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पैठणच्या कांदा बाजारात कांद्याला १०० त ५०० रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळत होता, मात्र मागच्या काही दिवसांपासून पैठणच्या कांदा बाजारात कांद्याचे भाव वाढत होते. मागच्या रविवारी पैठण बाजारात कांद्याला हजार ते पाचशे रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला होता. दरम्यान, कांद्याचे भाव वाढले असल्याची माहिती तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाल्यावर, बुधवारी पैठणच्या कांदा बाजारात जवळपास तीन हजार कांदा गोण्या म्हणजेच दीड हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. परिणामी, रविवारी दहा रुपयाने विकणाऱ्या कांद्याला बुधवारी सात ते आठ रुपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळाला.

हलक्या दर्जाच्या कांद्याला दोन रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली. यापुढे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा बाजारात विक्री करण्यास आणल्यास कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता कमी असल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली आहे.

कांद्याला कमीतकमी १५ ते २० रुपयांचा भाव मिळावा, अशी माझी अपेक्षा होती, पण दिवसेंदिवस कांद्याचे भाव घसरत असल्याने व कांदा साठवून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने नाइलाजाने मला आज कांदा विक्रीसाठी आणावा लागला.

- सुरेश पाटील, शेतकरी, पैठण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नो नेटवर्क एरिया’वरून पालिका प्रशासन-नगरसेवकांत जुंपणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नो नेटवर्क एरिया'वरून महापालिकेचे प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळ्याची चाहुल लागल्यामुळे पाण्याची मागणी वाढत असून त्याला वेळीच आळा घालण्यासाठी 'नो नेटवर्क एरिया'त नवीन पाणी पुरवठा योजना तयार होईपर्यंत पाणी देता येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

महापालिकेच्या क्षेत्रात काही वर्षात अधिकृत अनधिकृत वसाहती वाढल्या आहेत. या वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. जलवाहिन्या टाकलेल्या नसल्याने नागरिकांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते. टँकरशिवाय बोअरच्या पाण्यावर नागरिकांना अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्याच्या तोंडावर बोअरचे पाणी संपत असल्याने नागरिकांपुढे टँकरशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जलवाहिनी टाकून पाणी पुरवठा करा अशी मागणी जोर धरत आहे. नागरिक आणि नगरसेवकांकडून त्यासाठी पालिका प्रशासनावर दबाव वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने जलवाहिन्या न टाकलेल्या भागात (नो नेटवर्क एरिया) पाणी पुरवठा करणे शक्य नाही, नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतरच तेथे पाणी पुरवठा करता येईल, असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी हा प्रस्ताव स्थगित केला. नगरसेवक व पदाधिकारी यांचे मत लक्षात घेवून या प्रस्तावाबद्दल निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

\Bनगरसेवकांचा विरोध \B

पाण्याची समस्या व मागणी आता वाढणार आहे. त्यातच प्रशासनाने 'नो नेटवर्क एरिया'त पाणी पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असे महापौरांनी दिले आहेत. प्रशासनाच्या प्रस्तावाला नगरसेवकांनी विरोध केला, तर प्रशासन आणि नगरसेवक असा संघर्ष भर उन्हाळ्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोडरोमिओंचा बंदोबस्त करा

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस ठाण्यातील शहीद तुकाराम ओंबाळे सभागृहात पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली़ यावेळी महिला सदस्यांची मोठी उपस्थिती उल्लेखनीय होती. त्यांनी परिसरात महिलांच्या सुरक्षा, शाळा, कॉलेजात जाणाऱ्या मुलींना छेडणाऱ्या रोडरोमिओचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली़

यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी परिसरात विविध समस्या मांडल्या. यामध्ये मोकळ्या भुखंडावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली़ मोरे चौक ते मोहटा देवी चौका यादरम्यान झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होते. त्याचा त्रास वाहधारक, पादचाऱ्यांना होत असल्याची माहिती यावेळी उपस्थित सदस्यांनी दिली. रस्त्यावरील अक्रिमणे काही दिवसांपूर्वी काढण्यात आली होती, मात्र हातगाडीवर फळे, भाजीपाला विक्रेते, अंडा ऑम्लेटच्या विक्रेत्यांनी रस्त्यावरच उद्योग सुरू केले आहेत. त्यांच्याकडे येणारे ग्राहक रस्त्यावरच दुचाक्या उभ्या करतात़ यातच भर म्हणून अ‍ॅपेचालक मनमानी करत रस्त्यावर प्रवाशांची वाट पाहत थांबलेले असतात. त्याचाही त्रास पादचारी व महिलांना होत आहे. अनेक मंदिरांच्या परिसरात दारू पिणे, पत्ते खेळणे असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या़

सदस्यांनी मांडलेल्या सर्व समस्या येत्या काही दिवसांत सोडवण्यात येतील, असे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले. यावेळी पोलिस निरीक्षक साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलिस उप निरीक्षक सविता तांबे, पोलिस कर्मचारी राजेश मोरे, राजेश वाघ, संजय हंबीर, पोलिस पाटील अशोक गोळे, दत्तात्रय प्रधान, रशीद खाजा, शाम फळके, अंकुश मोरे, शेख शाकील, आनंद गवळी, महिला सदस्य दुर्गा निबोंळकर, मंदा गाडेकर, पुष्पा गायकवाड, सुनीता राठोड, कल्पना व्यवहारे, सुनंदा कुदळे, स्वाती चव्हाण, वैशाली गुजर, बाळासाहेब राऊत, रुपेश कुदळे आदिंची उपस्थिती होती़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. येत्या दोन दिवसांत त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यावरण मंत्री रामदास कदम व खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात जमत नसल्याने आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. सावंत यांची आमदारकीची मुदत संपल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. परिणामी, शनिवारपासून औरंगाबाद जिल्ह्याला पालकमंत्री नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसंदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांना पालकमंत्रीपदी नेमण्याचे संकेत त्यांनी दिले. सावंत यांच्या कार्यकाळात औरंगाबाद शहर व जिल्ह्यात भाजप फोफावली. निवडणुकीच्या तोंडावर हे शिवसेनेला परवडणारे नाही. शिंदे हे भाजपला थोपवू शकत असल्याने त्यांच्याबद्दल ठाकरे यांचा कल होता. शिंदे यांच्या नियुक्तीचे आदेश दोन दिवसात आदेश निघण्याचे संकेत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकृतीबंधानंतर वाढेल पालिकेत विभागांची संख्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आकृतीबंध तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते पूर्ण झाल्यानंतर महापालिकेत विभागांची संख्या वाढणार आहे. विभागांच्या संख्येसोबतच अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढेल असे संकेत मिळत आहेत.

सध्या महापालिकेत आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरू आहे. अस्तित्वात असलेल्या ३२ विभागांपैकी १६ विभागांचा आढावा घेऊन पदांची रचना करण्यात आली आहे. या विभागांत किती अधिकारी, कर्मचारी असावेत याचेही मोजमाप करण्यात आले आहे. अद्याप १६ विभागांचा आढावा घेणे बाकी आहे. अस्थापना विभागाच्या माध्यमातून या विभागांची रचना आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संख्येबद्दल आढावा घेतला जात आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक रजेवर असल्यामुळे हे काम तूर्त थांबवण्यात आले. आयुक्त गुरुवारी रुजू झाल्यानंतर त्यांच्या वेळेनुसार आकृतीबंधाचे काम पुन्हा सुरू केले जाणार आहे.

नव्याने तयार करण्यात येणाऱ्या आकृतीबंधानुसार महापालिकेत काही विभाग वाढवण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. त्यात दिव्यांग कल्याण विभाग, पर्यावरण विभाग, हेरिटेज-वारसा विभाग, सांस्कृतिक विभाग अशा काही विभागांचा समावेश होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. या विभागांसाठी जास्तीचे अधिकारी, कर्मचारी लागतील; त्याबद्दलचे नियोजन आकृतीबंध तयार करताना केले जाणार आहे.

\Bअंतिम निर्णय शासनाचा \B

प्रशासकीय स्तरावर आकृतीबंध तयार झाल्यानंतर तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार आहे. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर तो शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवला जाईल. शासनाच्या मान्यतेनंतर आकृतीबंधाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.

\Bसध्याचे विभाग ३२

आढावा घेतला १६\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक; काम लवकर सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम लवकर सुरू करा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. कचरा आणि रस्त्यांच्या कामाबद्दलही त्यांनी आढावा घेतला.

बीड येथील सभेला जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे सकाळी विमानतळावर आगमन झाले. त्यांचे महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेते विकास जैन, स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, नगरसेवक सचिन खैरे यांनी स्वागत केले. यावेळी महापौर व सभापतींनी ठाकरे यांना महापालिकेतर्फे आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. एमजीएमच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाची नुकतीच तांत्रिक मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली. आता पालकमंत्री आणि प्रधान सचिवांची मान्यता मिळानंतर निविदेचा मार्ग मोकळा होईल, हे त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. आवश्यक त्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून स्मारकाचे काम लवकर सुरू करा, असे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले.

\Bविकास आराखड्यातील रस्त्यांना प्राधान्य द्या\B

कचरा निर्मूलनाची सध्यस्थिती ठाकरेंना सांगण्यात आली. रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केल्याचे त्यांच्या कानावर घालण्यात आले. विकास आराखड्यातील रस्त्यांना प्राधान्य द्या, कोणत्या रस्त्यांची कामे करायची हे लवकर ठरवून शासनाकडे प्रस्ताव सादर करा, असे ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्जन पॉइंटवर पोलिसांची गस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला चार्ली पोलिस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील ४० निर्जन ठिकाणे पोलिसांच्या रडारवर आहेत. या ठिकाणी महिला चार्लीसह पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढवण्यात येणार आहेत; तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यासंदर्भात पोलिस प्रशासनाने महापालिका प्रशासनाला लेखी पत्र पाठवले आहे.

औरंगाबाद शहरातील महिला आणि तरुणींच्या सुरक्षिततेसाठी शहर पोलिस दलाने पावले उचलली आहे. शहरात एकूण किती निर्जन स्थळे आहेत याची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. यामध्ये २० वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ४० निर्जन स्थळे असल्याची माहिती समोर आली आहे. या ४० ठिकाणीर आता सातत्याने महिला चार्ली; तसेच पेट्रोलिंग वाढवण्यात येणार आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने; तसेच महिलांवर होणारे अत्याचार आणि छेडछाड रोखण्यासंदर्भात चार डिसेंबर रोजी पोलिस आयुक्तालयात महिला सहाय कक्षाच्या वतीने आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये, ज्या ठिकाणी अपुरा प्रकाश, अंधाऱ्या जागा आहेत त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था असण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. या चर्चेनुसार महापालिका प्रशासनाला पोलिसांकडून निर्जन ठिकाणांची यादी देण्यात आली आली असून, प्रकाश व्यवस्था करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.

शहरातील सार्वजनिक, निर्जन स्थळे........................पोलिस ठाणे

सिग्मा हॉस्पिटलचे मैदान जवाहरनगर

अमानविश्व हायस्कुल परिसर जवाहरनगर

नेहरू कॉलेज परिसर पुंडलिकनगर

किटली गार्डन पुंडलिकनगर

वॉकींग प्लाझा आणि आयोध्यानगरी मैदान वेदांतनगर

सिल्कमील्क कॉलनी, हमालवाडा रोड सातारा

जालाननगर, उड्डाणपुलाखालील जागा सातारा

बौध्द लेणी पायथा बेगमपुरा

बीबी का मकबरा पाठीमागील रस्ता बेगमपुरा

विवेकानंद गार्डन सिडको

एम २ रोडजवळील फरशी मैदान सिडको

सलीम अली सरोवर परिसर सिटीचौक

मनपाच्या पाठीमागील भडकलगेटकडे जाणारा रस्ता सिटीचौक

शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसर सिटीचौक

कासबंरी दर्गा छावणी

गोलवाडी गावाकडे जाणारा रस्ता छावणी

हरसिध्दी माता मंदिर परिसर हर्सूल

सेंट झेवीयर्स परिसरातील रस्ते सिडको एमआयडीसी

कलाग्राम रोड सिडको एमआयडीसी

केंब्रीज चौक परिसर सिडको एमआयडीसी

पोलिस ठाणेनिहाय गस्त घालणारे महिला चार्ली पथक

पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांच्या मार्गदर्शनाखााली महिला सहाय कक्षाच्या पोलिस निरीक्षक किरण पाटील आणि पीएसआय जयश्री कुलकर्णी हे या चार्ली पथकाचे काम पाहत असून, पोलिस ठाणेनिहाय गस्त घालणारे महिला चार्ली पुढील प्रमाणे आहेत.

चार्ली पथक कर्मचारी.............................पोलिस ठाणे हद्द

रंजीता घुसिंगे,सी.बी. धोंडगे मुकुंदवाडी, पुंडलिकनगर

प्रेमा हाके, सारिका शेडूते वेदांतनगर, सातारा

मंदा सामसे, छाया सिरसे जवाहरनगर, उस्मानपुरा

सुजाता खरात, रुपा साकला बेगमपुरा, हर्सूल

व्हि.आर. वाकळे, आय.जी. कदम क्रांतीचौक

सुजाता बनकर, वर्षा पवार सिटीचौक

मंगल काळे, अरुणा गालट सिडको

निर्मला सुपारे, रत्ना सुलाने सिडको एमआयडीसी

विमल पठारे जिन्सी

महापालिकेशी पत्रव्यवहार

महिला व तरुणींच्या सुरक्षोसंदर्भात शहर पोलिस दलाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दुचाकीवर गस्त घालणाऱ्या महिला चार्ली पथकाची स्थापना करण्यात आली असून, गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांचे पेट्रोलिंग सातत्याने सुरू आहे. शहरातील निर्जन; तसेच सार्वजनिक ठिकाणाची यादी तयार करण्यात आली असून, या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यासंदर्भात महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे उपायुक्त डॉ. दीपाली घाटे घाडगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हरित पट्ट्यासाठी कचऱ्याच्या खताचा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको बसस्टँड ते हर्सूल टी पॉइंट पर्यंतच्या व्हीआयपी रस्त्याच्या दोन्हीही बाजूने महापालिकेने सुमारे नऊ हजार झाडे लाऊन ग्रीनबेल्ट विकसीत केला आहे. या झाडांसाठी आता कचऱ्यापासून तयार करण्यात आलेले खत वापरले जात आहे. प्रायोगिकतत्वावर दहा ट्रक खत सध्या टाकण्यात आले असून त्याचा परिणाम लक्षात घेऊन जास्तीचे खत टाकण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिकेने चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल आणि कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी कांचनवाडी वगळता अन्य तीन ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. सध्या चिकलठाणा आणि पडेगाव येथे कचऱ्यापासून खताची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. हर्सूल येथील प्रक्रिया केंद्राच्या उभारणीचे काम केले जात आहे. चिकलठाणा आणि पडेगाव येथे तयार झालेले खत झाडांसाठी वापरण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला. उद्यान अधिक्षक विजय पाटील यांनी तशी विनंती घनकचरा व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुखांना केली. झाडांसाठी खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय या दोन्हीही विभागांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर घेण्यात आला.

महापालिकेच्या उद्यान विभागाने सिडको बसस्टँड ते हर्सूल टी पॉइंट या व्हिआयपी रस्त्याच्या दोन्हीही बाजूने हरितपट्टा (ग्रीनबेल्ट) विकसीत केला आहे. दोन्हीही बाजूला मिळून नऊ हजार झाडे लावण्यात आली आहेत. लावण्यात आलेल्या झाडांमध्ये लिंब, पिंपळ, वड, गुलमोहर, काशीद, सप्तपर्णी, अमलतास, बकुळ आदी विविध प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. ही झाडे जगावीत आणि चांगल्याप्रकारे वाढावीत म्हणून खताची आवश्यकता असल्यामुळे कचऱ्यापासून तयार झालेले खत प्रायोगिक तत्त्वावर झाडांच्यासाठी वापरण्याचे धोरण निश्चित करून दहा दिवसांपूर्वी सुमारे दहा ट्रक खत दोनशे मीटरच्या पॅचमध्ये टाकण्यात आले. टाकण्यात आलेल्या खताचा परिणाम लक्षात घेवून संपूर्ण ग्रीनबेल्टमध्ये खत टाकण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

सिडको बसस्टँड ते हर्सूल टी पॉइंट पर्यंतच्या रस्त्याच्या बाजूने ग्रीनबेल्ट विकसीत करण्यात आला आहे. ग्रीबेल्टची जमीन मुरमाड आहे. या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी खताची गरज होती. चिकलठाणा आणि पडेगावला कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. हेच खत झाडांसाठी द्या अशी विनंती आम्ही केली. सुरुवातीला सुमारे दहा ट्रक (दोन हायवा) खत टाकण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर खत उपलब्ध करून द्या, संपूर्ण ग्रीनबेल्टमध्ये टप्प्या टप्प्याने खत टाकण्याची आमची तयारी आहे, असे पत्र घनकचरा व्यवस्थापन विभागाला नुकतेच दिले आहे.

विजय पाटील, उद्यान अधिक्षक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेपूर्वी आयुक्तांची बदली ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीपूर्वी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची बदली होणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू झालीआहे. विशेष म्हणजे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये या चर्चेला उधाण आल्यामुळे आयुक्तांची खरोखरच बदली होणार का, याबद्दल तर्क वितर्क लढवले जात आहेत.

'एल. एल. एम.'ची परीक्षा देण्यासाठी डॉ. विनायक यांनी घेतलेली दहा दिवसांची रजा शनिवारी संपणार होती. मात्र, त्यांनी बुधवारपर्यंत रजा वाढवली. अचानक रजा वाढवल्यामुळे पालिका वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मूळ गावी चंदीगडला जाण्यासाठी रजा वाढवली की अन्य काही कारणांसाठी रजा वाढवली, अशी चर्चा सुरू झाली आहे. आयुक्त बंगळुरूला मुलांना भेटायला गेल्याचे काही जण सांगत होते.

आयुक्तांच्या रजा वाढीबद्दल विविधांगांने चर्चा सुरू असताना बुधवारी त्यांच्या बदलीच्या चर्चेने जोर धरला. तीन दिवस रजा वाढवून आयुक्तांनी बदलीसाठी काही वरिष्ठांच्या गाठीभेटी घेतल्याचे बोलले जात आहे. शासनाने डॉ. विनायक यांना औरंगाबाद महापालिकेत तीन कामे तडीस लावण्यासाठी पाठवल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यापैकी पहिले काम कचराकोंडी फोडण्याचे होते. कचराकोंडी फोडण्याचे काम त्यांनी ७० टक्क्यांपर्यंत केले आहे. उर्वरित ३० टक्के काम मार्गी लागावे, अशा पद्धतीने नियोजन देखील करून ठेवले आहे. कचराकोंडीनंतर शंभर कोटींच्या रस्त्यांचे काम मार्गी लावण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. कोर्टबाजीत अडकलेले रस्ते त्यांनी मुक्त केले आणि रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या रस्त्यांची कामे जानेवारीच्या अखेरीस प्रत्यक्ष सुरू होतील. समांतर जलवाहिनीचा प्रश्न सोडवण्याचा 'टास्क' आयुक्तांना देण्यात आला होता, असे बोलले जात आहे. समांतर जलवाहिनीच्या कामाचा तिढा देखील सुटण्याच्या मार्गावर आहे. येत्या काही दिवसात या विषयात वेगळा मार्ग निघण्याची शक्यता आहे.

\Bतिन्ही कामे मार्गी \B

शासनाने आयुक्तांना तीन कामे मार्गी लावण्यासाठी प्रामुख्याने बोलले जात आहे. कचराकोंडी, रस्ते आणि समांतर जलवाहिनी हे तिन्ही विषय मार्गी लागत असल्यामुळे पालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी बदलीच्या हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाभोलकर हत्येशी रेंगेचा संबंध नाही

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात शस्त्र बाळगल्यासंबंधी अटकेत असलेला आरोपी रोहित रेंगे याचा हत्याप्रकरणी संबंध नसल्याचे पत्र सीबीआयने सरकारी वकिलामार्फत खंडपीठात सादर केले. त्यानंतर न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने आरोपीची ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व महिन्याच्या पहिल्या सोमवारी संबंधीत पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजुर केला.

याप्रकरणी सीबीआयचे उपअधीक्षक (बेलापूर, नवी मुंबई) मारुती शंकर पाटील यांनी २२ ऑगस्ट २०१८ रोजी तक्रार दिली होती. तक्रारीत, दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने प्रथम सचिन अंदुरे याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अंदुरे याने लपवण्यासाठी दिलेली शस्त्रे ही शुभम व अजिंक्य सुरळे यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार सीबीआयने सुरळे बंधुना अटक केली असता त्यांनी सदरील शस्त्रे ही आरोपी रोहित राजेश रेगे (२०, रा. धावणी मोहल्ला) याच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. त्यानुसार २२ ऑगस्ट २०१८ रोजी सीबीआयने आरोपी रोहित रेगेच्या घरी छापा मारत त्याच्या घराच्या गच्चीवरील एका पोत्यातून तलवार, पिस्तूल, तीन काडतुसे, एअर गन व दोन मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला. सीबीआयने तिन्ही आरोपींना ताब्यात घेत, त्यांच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान आरोपी रोहित रेगे याला २२ ते २७ ऑगस्ट २०१८दरम्यान पोलिस कोठडी दिल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी रेगेने नियमित जामिनीसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली. याचिकेच्या सुनावणी वेळी घाणेकर यांनी दाभोलकर हत्याप्रकरणाशी रोहित रेगेचा संबंध नसल्याचे सांगितले. आरोपीचा दाभोलकर हत्याप्रकरणाशी संबंध आहेत का याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतरही आरोपी रेगे विरोधात प्रकरणाशी संबंध असल्याचा पुराव मिळला नाही. २०१३मध्ये दाभोलकर यांची हत्या झाली त्यावेळी रोहित रेगे १५ वर्षांचा होता असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, तर सरकारी वकिलांनी आरोपीचा प्रकरणाशी संबंध आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी वेळ मागून घेतला होता. दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी सीबीआयने पत्र पाठवून आरोपी रोहित रेगेचा दाभोलकर हत्याप्रकरणी संबंध नसल्याचे सांगितले. या पत्राआधारे खंडपीठाने जामीन मंजूर केल्याची माहिती घाणेकर यांनी दिली. आरोपी रेगेतर्फे निलेश घाणेकर व वर्षा घाणेकर-वाघचौरे यांनी काम पाहिले. त्यांना कुलदीप कहाळकर, धनराज हिंगोले यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तहसील अंधारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तहसील कार्यालयाच्या विजेचे बिल सप्टेंबर २०१८पासून थकले आहे. महावितरण कंपनीने तहसील कार्यालयाला वीजबिल भरणा करण्यासाठी वेळोवेळी पत्र पाठवले, परंतु बिल भरणा करण्यात आला नाही. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अखेर मंगळवार (आठ जानेवारी) तहसील कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. परिणामी तहसील कार्यालयाची सर्व कामे खोळंबली असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

फुलंब्री तहसील कार्यालयाचे सप्टेंबर २०१८पासून आजपर्यंतचे एक लाख चार हजार ८८३ रुपये ७४ पैसे वीज बिलापोटी थकित आहेत. त्यामुळे महावितरण कार्यालयाला तहसील कार्यालयाचा विद्युत पुरवठा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे. तालुक्यातील असंख्य नागरिकांचे काम तहसील कार्यालयात असते. त्यामुळे दैनंदिन कामकाजाच्या दिवशी तालुक्यातील नागरिक आपले काम घेऊन तहसील कार्यालय गाठतात, परंतु मंगळवारपासून तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे कामे होत नाही. डिजिटल इंडियाच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालये डिजिटल होत आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयाचा सर्व कारभार डिजिटल स्वरुपात होत आहे. त्यामुळे छोटे-मोठे काम म्हटले की, ते कम्प्युटरशिवाय होणे शक्य राहिलेले नाही. वीज गेल्यानंतर सर्व कार्यालयाने इन्व्हटरची सुविधा ठेवलेली आहे. परंतु ते वीज गेल्यानंतर केवळ पाच ते सहा तास विद्युत पुरवठा पुरवू शकेल जास्त वेळ सहज चालवणे शक्य नाही. तहसील कार्यालयात शैक्षणिक कामासाठी; तसेच मराठा समाजाचे विद्यार्थी नुकत्याच लागू झालेल्या आरक्षणाच्या जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी शेकडो विद्यार्थी येत आहे. तहसील कार्यालयात विविध कामासाठी असंख्य नागरिक येतात, परंतु वीजपुरवठा बंद असल्याने सर्व कामे बंदझाली आहे.

थकबाकी यादीत फुलंब्री तहसील कार्यालयाचे नाव आले आहे. आमच्या वरिष्ठां कार्यालया मार्फत तहसील कार्यालयाला पत्र व्यवहार केलेला आहे. परंतु बिल भरले नसल्या कारणाने मंगळवारी तहसील कार्यालयाचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. बिल भरल्यानंतरच तहसील कार्यालयाचा विज पुरवठा सुरळीत केला जाईल.

- रवी मिरगणे, कनिष्ठ अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायनांस कंपनीला कर्मचाऱ्याचा पावणेतीन लाखाला गंडा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्टेशनरी पुरवण्यासंदर्भात खोटा ई-मेल तयार करून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने कंपनीला दोन लाख ८६ हजार रुपयाचा गंडा घातला. ३० ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत हा प्रकार महेंद्र रुरल हौसिंग फायनांस कंपनीच्या अदालत रोडवरील विभागीय कार्यालयात घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी फायनांस कंपनीचे सहायक व्यवस्थापक प्रमोद मनोहर लांडगे यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये कांतीलाल लक्ष्मण शिंदे (रा. अशोकनगर, एमआयडीसी चिकलठाणा) याला कंपनीने स्टेशनरी पुरवण्यासाठी नियुक्त केले होते. शिंदे याने सिद्धार्थ पांढरे या कर्मचाऱ्याने कंपनीच्या उमरगा शाखेसाठी स्टेशनरी साहित्य मागवल्याचा बनावट ई-मेल तयार करून त्यासोबत यादी जोडून कंपनीला पाठवला होता, मात्र सिद्धार्थ पांढरे याने ३१ ऑगस्ट २०१८ रोजीच त्याच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे कंपनीच्या आयटी विभागाने दोन सप्टेंबर २०१८ रोजीच त्याचा ई-मेल आयडी बंद केला होता. लांडगे यांनी या मेलची शहानिशा केली असता पांढरे यांच्या ई-मेल आयडीवरून तो मेल आलेला नसून कांतीलाल शिंदे याने तो बनावट तयार केल्याचे निष्पन्न झाले; तसेच स्टेशनरी विक्रेत्यांच्या बिलाची तपासणी लांडगे यांनी केली असता कोणतेही साहित्य उमरगा शाखेला पाठवण्यात आले नव्हते. कंपनीच्या स्टेशनरी रेकॉर्डची तपासणी करण्यात आली असता शिंदे याने खुलताबाद, जळकोट, माहूर, देवणी, उदगीर आणि नांदेड या शाखेला स्टेशनरी पाठवल्याचे दाखवून दोन लाख ८६ हजार रुपयाचे बिल उचलून अपहार केल्याचे दिसून आले. याप्रकरणी लांडगे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात आरोपी कांतीलाल शिंदेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी सहायक फौजदार देशमुख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images