Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कुख्यात घरफोड्या सन्नी मेहुण्यासह गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेकॉर्डवरील कुख्यात घरफोड्या सन्नी जाधवला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई गुरुवारी सातारा गावात करण्यात आली. सन्नीने मेहुण्याच्या मदतीने एका घरफोडीची कबुली देत नागेश्वरवाडी येथे केलेल्या एका घरफोडीतील ८१ हजारांचा ऐवज गुन्हे शाखेच्या स्वाधीन केला.

२७ डिसेंबर २०१८ रोजी नागेश्वरवाडी येथील चिंतामणी अपार्टमेंट येथील गजानन अष्टुरकर यांचा फ्लॅट चोरट्यानी भरदिवसा फोडला होता. यामध्ये ४८ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. हा गुन्हा शहरातून हद्दपार करण्यात आलेला कुख्यात गुन्हेगार सुर्यकांत उर्फ सन्नी गोपीनाथ जाधव (रा. क्रांतीनगर) याने केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली होती. आरोपी सन्नी हा गुरुवारी सकाळी सातारा गावात येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती. पथकाने सापळा रचून आरोपी सन्नीला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने त्याचा मेहुणा दीपक चोखाजी दळवी (वय ३२, रा. सातारा गाव) याच्या मदतीने दुचाकीचा वापर करीत हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दळवी याच्या घरातून चोरीचा ऐवज आणि दुचाकी जप्त केली. पोलिसांनी सन्नी आणि दळवी या दोघांना अटक केली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय अमोल देशमुख, हेमंत तोडकर, महादेव गायकवाड, नंदकुमार भंडारे, अफसर शहा, विकास माताडे, विलास वाघ, धर्मराज गायकवाड, ओमप्रकाश बनकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आशयसंपन्न चित्रपटांना रसिकांची दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आशयसमृद्ध लेखकाचा प्रवास मांडणारा 'मंटो', कर्मठ परंपराचा वेध घेणारा 'घटश्राद्ध' व तरल नात्याची गोष्ट सांगणारा 'अबू' चित्रपट रसिकांना अंतर्मुख करणारा ठरला. चित्रपट रसिकांची लक्षणीय गर्दी आणि कलाकारांची उपस्थिती महोत्सवात उत्साह वाढवणारी होती.

सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गुरुवारी वैविध्यपूर्ण चित्रपट आणि विशेष व्याख्यान झाले. नंदिता दास दिग्दर्शित 'मंटो' चित्रपटाने सुरुवात झाली. प्रसिद्ध लेखक मंटो यांचा जीवन प्रवास मांडणारा चित्रपट रसिकांना भावला. या चित्रपटाला अभिनेत्री राजश्री देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. चित्रपटात इस्मत चुगताई यांची भूमिका करताना आलेला अनुभव त्यांनी प्रेक्षकांना सांगितला. कलात्मक चित्रपटांना रसिकांनी पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रसिद्ध कानडी दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांचा 'घटश्राद्ध' चित्रपट कर्मठ परंपरेचा वेध घेणारा होता. वेदशाळेतील लहान मुलाचे भावविश्व तरलपणे दाखवण्यात आले. प्रसिद्ध स्विडीश दिग्दर्शक इंगमार बर्गमन दिग्दर्शित 'वाइल्ड स्ट्रॉबेरीज', अर्शद खान दिग्दर्शित 'अबू', प्रतिमा जोशी दिग्दर्शित 'आम्ही दोघी' चित्रपट पाहण्यासाठी झुंबड उडाली. 'कोल्ड वॉर' चित्रपटाने सांगता करण्यात आली.

'गांधी आणि सिनेमा' या विषयावर अमृत गांगर यांचे दृकश्राव्य व्याख्यान झाले. महात्मा गांधी यांना चित्रपट आवडत नव्हते. मात्र, सर्वाधिक चित्रपट निर्मिती झालेले ते एकमेव राजकीय नेते आहेत असे गांगर यांनी सांगितले.

दरम्यान, महोत्सवात शुक्रवारी 'न्यूड', 'भोर', 'आरॉन', 'लव्हलेस थिंकींग ऑफ हिम', 'पर्सोना' चित्रपट दाखवले जाणार आहेत. तसेच एमजीएम शॉर्टफिल्म स्पर्धा होणार आहे.

\Bलघुपट स्पर्धा गाजली\B

चित्रपट महोत्सवात प्रथमच मराठवाड्यातील दिग्दर्शक-कलाकारांसाठी लघुपट स्पर्धा घेण्यात आली. एकूण नऊ लघुपट दाखवण्यात आले. 'सावित्री', 'ओझं', 'शेण', 'आविष्कारी', 'तरंग', 'कविता', 'झलक', 'मै और मेरी कहाणी', 'जंटलमन' या लघुपटांचा समावेश होता. नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट रसिकांनी गर्दी केली होती. स्मृतीचिन्ह देऊन दिग्दर्शकांना सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फाइव्ह एफ फार्मिंग’ संमेलनाचे उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगााबाद

एटीपीटीआर एमजीएमच्या वतीने फाइव्ह एफ फार्मिंग या तीन दिवसीय महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या महासंमेलनाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी पीपीव्ही आणि एफआर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. के. विनोद प्रभू यांच्या हस्ते झाले.

हॉटेल विट्स येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीपासून ग्राहकांपर्यंत फायबर, खाद्य, चारा, इंधन व ललित रसायनाची उपलब्धता आणि सुधारित पीक प्रजनननाच्या योगदानावर या संमेलनात प्रकाश टाकला जाणार आहे, अशी माहिती डॉ. के. के. नारायणनन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सुरेंद्रकुमार, डॉ. अपर्णा तिवारी, डॉ. मानवेंद्र काचोळे आदी यावेळी उपस्थित होते.

संमेलनात आयोजित चर्चासत्रात शेती व्यवसायासमोरील आव्हाने, तसेच नवीन बियाणे संशोधनावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पाहुण्यांचे हस्ते समंलेनाचे औपचारिक उद्घाटन होईल. कृषी संशोधक परिषदेचे महासंचालक डॉ. टी. महापात्रा, पीडीकेव्ही अकोला कृषी विद्यापीचे कुलगुरू डॉ. वी. पी. भाले यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.

\Bतज्ज्ञांचे मार्गदर्शन

\Bपौष्टिक गुणवत्तेसह अजैविक तणावांविरुद्ध पिकांच्या प्रतिकार क्षमता विकसित करणे, जीनोमिक्स आणि मेटाबॉल्विस या विषयावर युएसडीए-एआरएसचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. औटार माट्टो मार्गदर्शन करतील. यासह डॉ. उषा बारवाले, डॉ. टोल स्टॅली, डॉ. ए.के. सिंह, डॉ. जॉर्ज थॉमस, डॉ. अनिल ढाके आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे. शनिवारी मनोहर संवदम, पोपटराव पवार, डॉ. नंदकुमार कुंचगे, सुरेश अग्रवाल यांच्या अन्य तज्ज्ञ विविधविषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांचे रोस्टर अपडेट नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार आहे. एकीकडे रिक्त जागांचा आढावा घेण्यात येतो आहे. त्याचवेळी अनेक जिल्ह्यांमधील शाळांचे रोस्टर अपडेट नाहीत. नांदेड वगळता इतर जिल्ह्यांचे प्रस्ताव आयुक्तालयाच्या 'मावक'कडे नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने करावी, अशी मागणी डीटीएड, बीएडधारकांनी केली आहे.

याबाबत आयुक्त कार्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी आढावा घेत निवेदनही दिले. राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर अपडेट असणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुक्त कार्यालयाच्या 'मावक' या कक्षाकडून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. या विभागाकडे आलेल्या प्रस्तावांची लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली. स्थानिक स्वराज्यसंस्था, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अशत: अनुदानित संस्थांना बिंदू नामावली तपासून पोर्टलवर माहिती अपलोड करण्याच्या सूचना आहेत. त्यासाठी १७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली. मात्र, अद्याप प्रक्रियाच पूर्ण नसल्याने रिक्त जागांची संवर्गनिहाय माहिती भरली जाणार की, नाही. असा प्रश्न डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांना पडला आहे. विभागीय संस्थाची बिंदू नामावली तपासणी व मंजुरीची प्रक्रिया लवकरात लवकर मंजूर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, सदस्य विवेक धांडे, किरणकुमार सोनाळे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकूवर अत्याचार; पुतण्याला सक्तमजुरीम.टा.प्रतिनिधी, वैजापूरवैजापूर येथील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने काकूवर अत्याचार करणाऱ्या पुतण्यास दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गणेश उखाजी भवर (वय २६, रा. कऊटगाव ता. खुलताबाद) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस. बी..गायधनी यांनी ही शिक्षा सुनावली.

याबाबतची अधिक माहिती अशी, या घटनेतील पीडित महिला व तिचे कुटुंबीय हे ऊसतोड कामगार असून, हे सर्व कुटुंब मुक्तेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे २०१६मध्ये गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी शिवारातील एकनाथ खुणे यांच्या शेतात दोन महिन्यांपासून ऊसतोडीच्या कामासाठी आले होते. या कुटुंबातील पीडित महिला, तिचा पती, दीर, पुतण्या असे सर्व कामाच्या ठिकाणी मुक्कामाला होते. नऊ फेब्रुवारी २०१६ रोजी काम आटोपून पीडित महिला घरी गेली. तिचे पती ऊसाचे उतारे देण्यासाठी जोगेश्वरीला गेले. सर्व काम झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करत असताना घरात स्वयंपाकाचे सामान नसल्याने पीडित महिला सामान आणण्यासाठी जोगेश्वरीला पायी निघाली. काही अंतर गेल्यानंतर आरोपी गणेश याने मोटारसायकलवर तिचा पाठलाग करत मलाही जोगेश्वरीला सामान आणायला जायचे आहे दोघे जाऊ, असे म्हणून काकूला सोबत घेतले.

जोगेश्वरी येथे सामान घेऊन परतत असताना गणेशने दुसऱ्या रस्त्याने दुचाकी नेली. याबाबत महिलेने विचारले असता तिकडचा रस्ता बंद आहे, असे सांगितले. काही अंतर गेल्यानंतर गणेशने आपल्या काकूची छेडछाड सुरू केली. काकूने नात्यांचा हवाला दिला तरी गणेश ऐकायच्या मनस्थितित नव्हता. त्याने काकूवर जबरदस्ती केली. बलात्कारामुळे भेदरलेल्या महिलेने घरी आल्यावर पतीला हकिकत सांगितली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्यात गणेशविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत सरकारी वकील बाळासाहेब महेर यांनी काम पाहिले. परसराम पगार यांनी सहकार्य केले.

\Bवैद्यकीय अहवाल ठरला महत्त्वाचा\B

याप्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक विठ्ठलसिंह राजपूत यांनी केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्या वेळी सहा जणांचे जबाब नोंदवण्यात आले. यात डॉक्टर व फोरेन्सिक अहवाल महत्त्वाचा ठरला. गणेश याच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस. बी. गायधनी यांनी आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्याखाली दहा वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी दोन महिने कैद व कलम ५०६ खाली एक वर्ष कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किती शेतकरी कर्जमुक्त झाले? शिवसेनेने विचारला बँकेला जाब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील किती शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अर्ज केले, किती अर्ज मंजूर झाले, किती शेतकरी कर्जमुक्त असा जाब शिवसेनेने गुरुवारी बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारला. बँकेच्या व्यवस्थापकाला घेराव देखील घालण्यात आला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. बँकेच्या व्यवस्थापकांना शिवसेनेने निवेदन दिले. नोव्हेंबर २०१८ या महिन्यातच शेतकऱ्यांच्या नावावर बँकेत पैसे जमा केल्याचे मंत्री सांगत आहेत, मग बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत रक्कम का जमा केली नाही. हजारो शेतकऱ्यांच्या रक्कमा बँकेत आलेल्या असताना त्याचे वाटप का केले जात नाही. शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जावर व्याज चालू आहे, असे असताना बँकेचे व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या नावाने आलेली रक्कम कुणाच्या हितासाठी वापरत आहे. सरकार खोटे बोलत आहे की बँकेची भूमिका शेतकऱ्यांची पिळवणूक करणारी आहे, असे सवाल निवेदनात करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेली कर्ज माफी फसवी आहे का याचाही खुलासा करा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.

निवेदनावर कृष्णा पाटील डोणगावकर, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, गोपाळ कुलकर्णी, दिनेश मुथा, राजू वरकड, विजय वाघचौरे, सुभाष कानडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्यापीठ गेटवर करा भारतरत्नची नोंद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी १७ वर्षे संघर्ष करण्यात आला. त्यानंतर डॉ. आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. मात्र बाबासाहेबांना ‌‌मिळालेल्या भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाची नोंद विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर घेण्यात आलेली नाही. ही नोंद तत्काळ करावी, अशी मागणी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे केली आहे. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान विद्यापीठ प्रशासनाकडून समाविष्ट केला गेला नाही, तो उल्लेख समाविष्ट करावा अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचे आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहराध्यक्ष बाबा तायडे, सुनील साळवे, प्रवीण साळवे, सिद्धार्थ सरोदे, उत्तम हनके, नितेश सूर्यतळे, धर्मेद्र जाधव, समाधान मगर, अशोक चक्रे, संजय साठे, ललीत नंदलवाल, सय्यद अजहर, शकुंतला साबळे, माया बागुल आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज महानगरात बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा चोरट्यांनी रोख दीड लाख रुपये सोन्या-चांदीच्या दागिन्यासह जवळपास अडीच लाख रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (नऊ जानेवारी) रोजी घडली.

अशोक बळीराम आव्हाळे (रा़ राजवर्धवन हौसींग सोसायटी, सिडको) हे बुधवारी सकाळी कंपनीत गेले होते. त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून महिलांसोबत गच्चीवर गप्पा मारत होत्या. चारच्या सुमारास जोत्स्ना आव्हाळे या खाली आल्या असता त्यांना दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी घरात बघितले असता कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यानी अशोक आव्हाळे यांना माहिती दिली. आव्हाळे घरी आल्यावर कपाटातील सामानाची पहाणी केली असता कंपनीच्या कामासाठी कपाटात ठेवलेले रोख एक लाख ५५ हजार रुपये व १३ ग्रॅमची सोन्याची माळ, १३ ग्रॅमची गळ्यातील सोन्याची पोत, एक ग्रॅमच्या कानातील रिंग; तसेच जोत्स्ना यांच्या पर्समधील रोख साडेतीन हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले. याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली असता पो उपनिरीक्षक राहुल रोडे, हेड कॉन्सेटबल वसंत शेळके, राजकुमार सूर्यवंशी, प्रकाश गायकवाड, मुरलीमनोहर कोलिमी यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली. या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नसल्याची माहिती पोलीसांकडून मिळाली आहे़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिजाऊ जयंतीनिमित्त शनिवारी झेडपी शाळांना सुट्टी

$
0
0

औरंगाबाद: स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांनी स्वत:च्या अधिकारामध्ये सुटी देण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शनिवारी जिल्हा परिषद शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षक सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रभाकर पवार यांनी ही मागणी केली होती. यासंदर्भात गुरुवारी पवार यांना, सर्व गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना व सर्व मुख्याध्यापकांना अधिकृत पत्र प्राप्त झाले. या परवानगीमुळे शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. यासाठी शिक्षण सभापती मीनाताई शेळके, अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी विशेष प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाळू उपशाबाबत दीड महिन्यात निर्णय घ्या

$
0
0

म. टा.विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

हर्सूल तलावातील अवैध वाळू व माती उपशाविरोधात दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना सहा आठवड्यांत प्रकरणात निर्णय घेण्याचा आदेश दिला व याचिका निकाली काढली.

सामाजिक कार्यकर्ते सुरेश बकले यांनी या वाळू उपशाविरोधात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना वारंवार निवेदन दिले. दुष्काळामुळे तलाव आटला आहे. तलावाचा तळ उघडा पडला आहे. अवैधपणे वाळू उत्खनन सुरू असून सुपीक माती वीटभट्यांसाठी वापरण्यात येत आहे. तलावाची भिंत आणि बांधही कोरण्यात आलेला आहे. त्यामुळे भिंत आणि बांध केव्हाही कोसळू शकतो, असा दावा त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवदेनात केला, पण त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी याचिका केली.

सुनावणीअंती खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना सहा आठवड्यांत प्रकरणात निर्णय घेण्याचा आदेश दिला; तसेच याविषयीचा निर्णय घेताना संबंधित विभागाकडून अभिलेख मागवू शकता; तसेच संबंधितांना सुनावणीची संधी देऊ शकतात आणि त्यानुसार याचिकाकर्त्याच्या निवेदनावर निर्णय घेऊ शकतात, असेही स्पष्ट केले. याचिकाकर्त्याची बाजू रवींद्र गोरे यांनी मांडली. त्यांना नारायण मातकर आणि चंद्रकांत बोडखे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी २८ जानेवारीला मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

सांजूळ (ता. फुलंब्री) येथील लघू तलावासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्याला गेल्या ५० वर्षांपासून मोबदल्याची वाट पाहावी लागत आहे. शिवाय ८५ एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना केवळ आगाऊ रक्कम देऊन कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ दिला गेला नसल्याने सुमारे अडीचशे शेतकरी २८ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालयावर आपल्या कुटुंबीयांसह मोर्चा काढणार असल्याचे निवेदन बुधवारी (नऊ जानेवारी) उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांजूळ लघू तलाव हा १९६६मध्ये १३५ एकर क्षेत्रांत बांधण्यात आला. यापैकी ८५ एकर क्षेत्रांतील शेतकऱ्यांना १९६७मध्ये आगाऊ रक्कम देण्यात आली, मात्र उर्वरित ५० एकरांच्या शेतमालकांना एक कवडीही मिळाली नाही. गेल्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत शासन प्रशासनाचे उंबरठे झिजवून आज मिळेल उद्या मिळेल या प्रतीक्षेत अडीचशेपैकी अनेक शेतकऱ्यांचे निधन झाले. त्यांचे वारसदार आजही या मोबदल्याची वाट पाहत आहे. त्यांना कुठलाही मोबदला मिळाला नाही, तर कुठल्याही शासनाच्या नोकरीच्या सवलती मिळाल्या नाहीत.

जमीन तलावात गेली मात्र ५० एकर क्षेत्र मोबदल्याअभावी संबंधित शेतकऱ्यांच्या नावे आजही तसेच पडून आहे. केवळ २५ सप्टेंबर १९९६ रोजी औरंगाबाद तत्कालीन पाटबंधारे खात्याच्या नावे संपादित करण्यात आल्याची नोंद आहे. २५ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी सतीश भोसले, कार्यकारी अभियंता अनिल अंभोरे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, भूमी उपअधीक्षक जयदीप चितोळे, हरिदास जोगदंडे व संबंधित शेतकरी यांची बैठक घेऊन भूसंपादन प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले, परंतु शंभर दिवस उलटुनही कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने आता २८ जानेवारीला विभागीय कार्यालयावर आपल्या कुटुंबीयांसह मोर्चा काढणार असल्याचे निवेदन बुधवारी उपविभीगीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमसंबधातून तलवारबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून दोन गटात भर रस्त्यात तलवारीचा वापर करीत तुंबळ हाणामारी झाली. उल्कानगरी परिसरातील महापालिका वॉर्ड कार्यालयासमोर बुधवारी रात्री साडेदहा वाजता हा थरारक प्रकार घडला. जवाहरनगर पोलिसांनी तात्काळ धाव घेत हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी दोन गटांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या अलिकडे असलेल्या उल्कानगरी परिसरातील वॉर्ड कार्यालयाच्या समोर रात्री साडेदहा वाजता दोन गटात हाणामारी सुरू असून, यामध्ये तलवारीचा वापर होत असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, समाधान काळे, सुखदेव जाधव, विजय वानखेडे, मनोज अकोले यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. यावेळी हाणामारी करणाऱ्यांना बाजूला करीत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोन तलवारीसह सर्वांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या घटनेत तीन जण जखमी झाले होते. जखमींना वैद्यकीय उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.

दरम्यान, याप्रकरणी एका गटाच्या वतीने ३५ वर्षांच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. यामध्ये प्रेम प्रकरणातून मुलाला मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला व तिच्या मुलावर अविनाश चिंधे (वय २९) योगेश चिंधे (वय २७), सचिन हावळे (वय ३५, सर्व रा. शिवाजीनगर) यांनी तलवारीने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून अविनाश, योगेश आणि सचिन हावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात दुसऱ्या गटाच्या वतीने अविनाश धुराजी चिंधे याने तक्रार दाखल केली. यामध्ये प्रेम प्रकरणातून अविनाश आणि त्याचा भाऊ योगेशला आठ जणांनी तलवार, तलवारीची म्यॅन आणि चामडी पट्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रतीक गरड, गोटू राठोड, गणेश, एक महिला आरोपी आणि चार इतर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी विश्वास राठोड, अविनाश चिंधे आणि योगेश चिंधे यांना अटक करण्यात आली आहे.

\Bबघणारे हतबल

\Bरात्रीच्या सुमारास भर रस्त्यावर हातात तलवारी घेऊन हा मारहाणीचा प्रकार सुरू होता. यावेळी लोकांची गर्दी जमली हेाती. काही जणांनी मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र तलवारीचा धाक दाखवल्यामुळे ते माघारी फिरले. काही जणांनी या मारहाणीची मोबाइल कॅमेऱ्यात शुटिंग देखील केली.

\Bतिघांना सोमवारपर्यंत कोठडी\B

याप्रकरणी तिघा आरोपींना गुरुवारी (दहा जानेवारी) कोर्टात हजर केले असता, त्यांना सोमवारपर्यंत (१४ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले. सहाय्यक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्त मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी पळवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपास येथील संत काशी विश्वनाथ संस्थानच्या दत्तमंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री बारा ते साडेबारादरम्यान घडला. चोरट्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रिकरण झाले आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मंदिरातील सेवक तुकाराम लक्ष्मण गोरे (वय ४०, रा. दत्तमंदिर) यानी तक्रार दाखल केली. बीड बायपासवरील देवळाई चौकाजवळ हे दत्तमंदिर आहे. बुधवारी रात्री नऊ वाजता गोरे याने मंदिराची साफसफाई केली. यानंतर मंदिराचे गेट बंद करून कुलूप लावून ते मंदिराच्या आवारात असलेल्या त्यांच्या खोलीकडे झोपण्यासाठी निघून गेले. पहाटे पाच वाजता गोरे मंदिर उघडण्यासाठी उठले. यावेळी त्यांना दरवाजाचा कोयंडा तुटलेला व कुलूप खाली पडलेले दिसून आले. मंदिराचे दार उघडून पाहिले असता दानपेट्या ठेवलेल्या कपाटाचे कुलूव तुटलेले आढळले. कपाटातील एक दानपेटी देखील चोरट्यांनी चोरून नेली होती. गोरे यांनी मंदिराच्या विश्वस्तांना हा प्रकार कळवला. विश्वस्तांनी भेट देत पाहणी केली असता चोरलेली दानपेटी रक्कम काढून तेथे फेकून दिल्याचे आढळले. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी पथकासह; तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देत पाहणी केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रिकरण

चोरट्याचे हे कृत्य मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. काळा टी शर्ट आणि डोक्यावर कॅप असलेला एक चोरटा १२ वाजून चार मिनिटांनी मंदिरात आल्याचे दिसत आहे. या चित्रिकरणावरून या संशयिताचा शोध घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ‘महापौर सहाय्यता निधी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी 'महापौर सहाय्यता निधी' या नावाने स्वतंत्र निधी राखून ठेवण्याची सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. या सूचनेनुसार महापौर सहाय्यता निधीसाठी बँकेत नवीन खाते उघडण्यात येणार आहे. त्यात सुरुवातीला ५० लाख रुपयांचा निधी ठेवण्यात येणार आहे.

नैसर्गिक आपत्ती व आगीच्या घटना नागरिकांचे नुकसान, पावसाळ्यात नाल्यात वाहून जाणे किंवा नाल्यात पडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. त्यासोबतच विविध क्रीडा स्पर्धांत शहरातील खेळाडू विशेष प्राविण्य मिळवतात. या सर्वांना मदत करताना प्रशासनासमोर अडचणी येतात. अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतरही संबंधितांना मदत मिळत नाही, त्यामुळे त्यांचा हिरमोड होतो. हे लक्षात घेवून 'महापौर सहाय्यता निधी' उभारण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यातून गरजूंना मदत करण्याचा उद्देश असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपटातून तत्त्वज्ञान सांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्यांना केवळ तंत्र कळून उपयोग नाही, तर चित्रपटामधून तत्त्वज्ञानही सांगता आले पाहिजे. एक विचार पडद्यावर आणायचा असल्यास शास्त्रशुद्ध शिक्षणाला पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी केले. ते एमजीएम फिल्म आर्टस विभागात बोलत होते.

एमजीएम फिल्म आर्टस् विभागाच्या चित्रपती व्ही. शांताराम थिएटरचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते किरण शांताराम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विभागात गुरुवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. यावेळी दिग्दर्शक एन. चंद्रा, दिग्दर्शक गिरीश कासरवल्ली, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, दासू वैद्य,अभिनेत्री राजश्री देशपांडे, फैझल खान, सिराज सैय्यद, मरियन बॉर्गो, अंकुशराव कदम, प्रताप बोराडे, डॉ. रेखा शेळके, शिव कदम उपस्थित होते. यावेळी आगामी 'पाचोळा' चित्रपटातील एका प्रसंगासाठी एन. चंद्रा यांनी क्लॅप दिला. अद्ययावत इन्स्टिटयूट या भागातील विद्यार्थ्यांसाठी संधी आहे. एका छताखाली विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळाल्यास चांगले फिल्ममेकर्स तयार होऊ शकतात असे चंद्रा म्हणाले. आल्फ्रेड हिचकॉक एडिटींग स्टुडिओचे कासारवल्ली यांनी उदघाटन केले.

\Bशांताराम यांची संहिता देणार\B

एमजीएम फिल्म आर्टस् विभागामधील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 'व्ही. शांताराम' यांच्या नावाने एक लाख रुपयाचे पारितोषिक किरण शांताराम जाहीर केले. तसेच व्ही. शांताराम यांनी चित्रपट निर्मितीत वापरलेला एक लाइट आणि त्यांच्या हस्तलिखिताची संहिता देण्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठाकरेंच्या स्मारकासाठी साठी कोटींची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रस्ताव घेवून महापालिकेचे पदाधिकारी शुक्रवारी मुंबईला जात आहेत. हा प्रस्ताव पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे. या स्मारकासाठी आणखी ६० कोटी रुपयांची गरज आहे.

दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी औरंगाबाद शहरात असता महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यावेळी ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडे बाळासाहेब ठाकरे स्मारकाबद्दल चौकशी करून स्मारकाचे त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालकमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौरांनी पत्रकारांना दिली. 'स्मारकाच्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. स्मारकाकरिता ६० कोटींचा निधी लागणार आहे. तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी या स्मारकाच्या कामासाठी पाच कोटींचा निधी पूर्वीच मंजूर केला आहे. त्याशिवाय ६० कोटींची गरज आहे. हा निधी शासनाकडून मिळवून द्यावा, अशी मागणी केली जाणार आहे,' अशी माहिती महापौरांनी दिली. शिंदेंकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी असल्याने ते मुख्यमंत्र्याची भेट घेवून निधी मिळवून देतील, असा विश्वास व्यक्त केला.

\Bकुलकर्णींची नियुक्ती\B

शहराच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडे सादर करावयाच्या अन्य प्रस्तावांसाठी उपायुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सव्वाशे कोटींचा रस्त्यांचा प्रस्ताव, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाच्या प्रस्तावासह अन्य प्रस्ताव डॉ. कुलकर्णी एकत्रितपणे तयार करणार आहेत. त्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांना सादर केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनी बंद केल्याने २५० कामगारांचा ठिय्या

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील विप्रो कंपनीचे साफल्य इंडस्ट्रिज फर्निचर युनिटमध्ये व्यवस्थापन व कामगारा यांच्या वादामुळे बुधवारी व्यवस्थापनाने हा प्रकल्प बंद केला. या निर्णयामुळे कंपनीत काम करणाऱ्या २५० कामगारांनी बेरोजगार झाल्यामुळे कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

वाळूज एमआयडीसीतील विप्रो इंटरप्रायजेस प्रा.लि.चे सात वर्षांपूर्वी साफल्य इंडस्ट्रिज हे युनिट सुरू आहे. यामध्ये विविध प्रकाराचे फर्निचर तयार करण्यात येते. या युनिटमध्ये जवळपास २५० कामगार काम करतात. काही दिवसांपूर्वी कंपनीतील १६१ पुरुष व ६९ महिला कामगारांनी महाराष्टÑ कामगार विकास संघटनेचे सभासदत्व स्वीकारले होते. कामगार व व्यवस्थापनात होत असलेल्या संघर्षामुळे व्यवस्थापनाने ३० डिसेंबरपासून उत्पादन प्रकिया थांबवली होती, मात्र सर्व कामगार शिफ्टप्रमाणे दररोज कंपनीत कामावर हजर राहत होते. बुधवारी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कंपनीत प्रवेश करण्यास मज्जाव करीत टाळे लावले. त्यामुळे संतप्त कामगारांनी दोन दिवसापासून कंपनी आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कामगाराना कामावर घ्यावे यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे महाराष्टÑ कामगार विकास संघटनेचे संस्थापक सचिव रामकिसन शेळके, गणेश घोरपडे, शिवशंकर सगट यांनी सांगितले. कंपनी सुरू होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कामगार प्रतिनिधींतर्फे राजेंद्र गवतवाड, शिवाजी कऱ्हाळे, अशोक काळे, सोमनाथ शेळके, बाळू रणवीर आदींनी दिला आहे.

कंपनी व्यवस्थापक सुमित बंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ करून महिला कामगारांना मारहाण केल्याचा आरोप करत कामगारानी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी व्यवस्थापक बंड यांच्या तक्रारीवरून कामगारांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींनी भरला मूठभर उद्योजकांचा खजिना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशातील मूठभर उद्योजकांचा खजिना भरण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले,' असा आरोप अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी केला. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी, 'शाह-मोदी म्हणजे रंगा-बिल्लाची जोडी असल्याची उपरोधिक टीका करत 'अच्छे दिन' जाऊ द्या, जुने दिवस वापस द्या, अशी मागणी जनतेकडून होत आहे,' असा टोला मारला.

अखिल भारतीय युवक काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या कन्याकुमारी ते काश्‍मीर 'युवा क्रांती यात्रे'चे गुरुवारी शहरात आगमन झाले. यानिमित्त जालना रोडवरील सागर लॉन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघुवंशी, सहप्रभारी मनीष चौधरी, उत्कर्षा रुपवते, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी यादव म्हणाले, की लोकशाहीच्या सर्वोच्च संस्थांवर कब्जा मिळविण्याचे भाजपचे प्रयत्न चिंताजनक आहेत. शांती, एकता असेल तरच देशाची प्रगती वेगात होते. पण, मोदी सरकारने केवळ दोन धर्म व समाजात तेढ निर्माण करत राजकीय खेळी केली, हेच आता जनतेला सांगावे, असे आ‌वाहन कार्यकर्त्यांना केले. 'दोन कोटी रोजगार, नोकऱ्या देण्याचे आश्वासन कुठे गेले,' असा सवाल श्रीनिवास बी. व्ही. यांनी केला. 'चहा विकला की नाही हे माहिती नाही पण, देश विकण्याचे काम केले,' असा टोला त्यांनी लगावला. 'भाषण ऐकून, टाळ्या वाजवून काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत, तर त्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक मेहनत घ्यावी, भाजपाने दिलेली आश्वासने कशी खोटी आहेत, याचा प्रचार करावा,' असे आवाहन त्यांनी केले. निवडणूका आल्यानंतरच भाजपला श्रीरामाची आठवण कशी येते, असा टोमणा प्रतिभा रघुवंशी यांनी मारला.

\B'दुष्काळात सीएम चषक का?'\B

दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त असून चारा, पिण्याचे पाणी असे अनेक प्रश्न तीव्र झाले आहेत. यावेळी राज्यात 'सीएम चषक' कसा काय आयोजित केला जातो, असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष तांबे यांनी उपस्थित केला. सध्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गटबाजी, नेते दिसत नाहीत, तर केवळ राहुल गांधी हे पंतप्रधान कसे होतील, एवढेच दिसत आहे, असा दावा त्यांनी केला. सत्ता मिळविण्यात युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त करत सत्ता आल्यानंतर 'युकाँ'ला खारीचा वाटा तरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मंत्री झाल्यानंतर ज्येष्ठ मंडळी दिसत नाहीत, अशी जाहीर नाराजी तांबे यांनी व्यक्त केली.

\Bपित्याने टोचले कान! \B

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर सत्तार यांनी प्रास्ताविक करताना भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. पण, हे भाषण रोखत त्यांचे वडील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी, 'तुम्ही काय काम करणार, काय करत आहात ते सांगा,' असा सल्ला दिला. त्यानंतर समीर यांनी निवडणूक तयारी व संघटन बांधणीची माहिती दिली. युवक काँग्रेसचा कार्यक्रम असल्याने आमदार सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेव पवार, जितेंद्र देहाडे हे पदाधिकारी मंचासमोर खाली बसले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोदावरी’ महाराष्ट्राची जननी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गोदावरी नदी ही सर्वांची आई आहे. तिच्या माध्यमातूनच संस्कृतीचा जन्म होतो. गोदावरी नदी महाराष्ट्राची जननी आहे,' असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. जी. के. माने यांनी केले. ते व्याख्यानात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागाच्या वतीने डॉ. आर. एस. गुप्ते व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. इतिहास वस्तूसंग्रहालयाच्या सभागृहात गुरुवारी दुपारी व्याख्यान झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर आणि विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 'महाराष्ट्रातील ताम्रपाषाणकालीन संस्कृती' या विषयावर माने यांनी विचार मांडले. 'गोदावरी नदीला बारमाही पाणी असल्यामुळे नागरी वस्ती निर्माण होऊन संस्कृती विकसित झाली. ताम्रपाषाणकालीन संस्कृतीच्या २२० पेक्षा जास्त नागरी वसाहती उजेडात आल्या आहेत. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद ही खऱ्या अर्थाने ताम्रपाषाणयुगाची सर्वसमावेशक अशी वसाहत आहे. नदीला बारमाही पाणी आणि लगतच शेतीला उपयुक्त जमीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वसाहती वाढल्या आहेत. महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या वसाहतीत तापी, गिरणा, भीमा, कृष्णा निरा, कऱ्हा, प्रवरा, गोदावरी आणि वैनगंगा खोरे उजेडात आले असे माने म्हणाले.

डॉ. अशोक तेजनकर म्हणाले, 'वस्तूसंग्रहालयातून आपल्या संकृतीची ओळख होते. त्यामुळे वस्तुसंग्रहाचा आपल्या देशात विकास घडला आहे'. डॉ. पुष्पा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सुनीता सावरकर यांनी सूत्रसंचालन केले आणि अमोल खरात यांनी आभार मानले. यावेळी डॉ. गीतांजली बोराडे, डॉ. अमोल कुलकर्णी, सुधीर बलखंडे, प्रा. संजय पाईकराव, सोनाली म्हस्के, प्रबुद्ध म्हस्के, रवी खिल्लारे, बळीराम पाईकराव यांच्यासह संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविद्यालयातील रिक्त जागा भरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या रिक्त ४० टक्के जागा भरण्यात येणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार संलग्नित महाविद्यालयांचा रोस्टर कॅम्प १५ ते १८ जानेवारी या कालावधीत होणार आहे.

विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या रिक्त जागा भरण्याचे परिपत्रकाद्वारे शिक्षणमंत्र्याने आदेश दिले होते. त्यानुसार रिक्त जागांची भरती होणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या प्रतिनिधीची बैठक पार पडली. या बैठकीत ४० टक्के जागा भरण्यासाठीचे आदेश देण्यात आले. संलग्नित एकूण ११० महाविद्यालयातील ४० टक्के जागा भरण्यात येणार आहे. प्राध्यापक, ग्रंथपाल आणि इतर जागांचा समावेश आहे. यासाठी १५ ते १८ जानेवारी दरम्यान रोस्टर कॅम्प होणार आहे. महाविद्यालयांच्या रिक्त जागाचा आढावा घेतला जाणार आहे. आढावा घेतल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. विषयनिहाय रिक्त जागा भरण्याचा निर्णय शिक्षण विभाग घेणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात एकूण रिक्त जागांपैकी ४० टक्के रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 'बामू'मध्ये २५ फेब्रुवारीपर्यंत रिक्त जागांचे अर्ज आणि मुलाखतीचे अर्ज घेतले जाणार आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images