Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कोर्टात सुरू असलेल्या दाव्यावरून विविध चार घटनांत चौघांना मारहाण

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोर्टात सुरू असलेल्या विविध प्रकरणातील दाव्यावरून आपसात वाद होऊन हाणामारीच्या चार वेगवेगळ्या घटना घडल्या. छावणी, हर्सूल, बेगमपुरा आणि पुंडलिकनगर भागात हे प्रकार घडले असून संबधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोर्टात सुरू असलेल्या वादातून मारहाणीची पहिली घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता छावणी परिसरात घडली. येथील एका महिलेने कोर्टामध्ये चार जणाविरुद्ध मारहाणीची केस दाखल केली आहे. सोमवारी सकाळी संशयित आरोपी मुशीर शेख याने 'तू केसमध्ये माझे नाव का टाकले' या कारणावरून महिलेच्या घरात शिरून मारहाण करीत अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मुशीर शेख विरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीचा दुसरा प्रकार शनिवारी सायंकाळी हर्सूल परिसरात घडला. येथील एका महिलेला संशयित आरोपी दादाराव भीका साबळे (रा. लोनवाडी, ता. सिल्लोड) याने 'तू माझ्याविरुद्ध कोर्टात दावा का दाखल केला' या कारणावरून मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी दादाराव विरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोर्टातील खटल्याच्या वादातून मारहाणीची तिसरी घटना नऊ जानेवारी रोजी दुपारी बेगमपुरा भागात घडली. राजू खान चांदखान (वय २७) याचा काही जणासोबत जुन्या वाड्याच्या इसार पावतीवरून कोर्टात वाद सुरू आहे. या कारणावरून राजू खानच्या घरात शिरून त्याला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपी उमरखान अकबरखान, वाजेदखान उमरखान आणि माजेदखान उमरखान यांच्या विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीची चौथी घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता गारखेडा भागात घडली. येथील राजपाल रघुनाथ चव्हाण (वय २६) या तरुणाला कोर्टातील भांडणाच्या कारणावरून चौघांनी रस्त्यात अडवून मारहाण केली. याप्रकरणी चव्हाणच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शरद राठोड, विकास उगवले, गोपीनाथ राठोड आणि एका महिला आरोपीवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


…कांदा वाहतुकीसाठी रेल्वे वॅगन उपलब्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून ठोक बाजारात अगदी किरकोळ भाव मिळत असल्याने राज्यातील शेतकरी हैराण आहेत. यावरून राज्य व केंद्र सरकारविरोधातही रोष व्यक्त होत आहे. ही परिस्थिती पाहता इतर राज्यात कांदा पाठवण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. परराज्यात कांदा पाठवण्यासाठी रेल्वेने वॅगन उपलब्ध करून दिल्या आहेत.

सुमारे दोन वर्षांपूर्वी औरंगाबादसह नगरसोल रेल्वे स्टेशन येथून देशाच्या विविध भागात रेल्वेने कांदा पाठवण्यात आला होता. त्या पद्धतीने यावर्षी सुद्धा कांदा पाठवण्यासाठी रेल्वे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नगरसोल रेल्वे स्टेशनवरून ४२ वॅगन कांदा घेऊन विशेष रेल्वे बिहारमध्ये पाठवण्यात आली. त्यानंतर जानेवारीमध्ये आतापर्यंत तीन रेल्वेच्या वॅगन बिहार आणि आसाममध्ये पाठवण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसात पाच ते सहा रेल्वे कांदा घेऊन आसाम आणि बिहार राज्यात जाणार आहेत. नगरसोलसह, मनमाड, नांदगाव येथून कांदा इतर राज्यात पाठवण्यात येतो.

कांदा वाहतुकीमुळे शेतकऱ्यांसह रेल्वे विभागाचाही फायदा होत आहे. कांदा वाहतुकीतून रेल्वे विभागाला आतापर्यंत अंदाजे एक कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आगामी काळात आणखी रेल्वे उपलब्ध करून देण्यात येत असल्याने हा महसूल वाढण्याची शक्यता आहे.

\B२२ कोटींची होती कमाई\B

दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद विभागातून नगरसोल आणि औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथून मका आणि कांद्याची वाहतूक रेल्वेने करण्यात आली. मार्च २०१७ पर्यंत ४० पेक्षा जास्त रेल्वे वॅगनद्वारे कांदा वाहतूक करण्यात आली. त्यातून रेल्वेला २२ कोटी १५ लाख १८ हजार ५२६ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला

$
0
0

वाळूज महानगर: गंगापूर तालुक्यातील भगतवाडी येथून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रिया सतीश सरदार (वय १४ मूळ रा. काळकेश्वर, जि. बुलडाणा) हिचा मृतदेह रविवारी सकाळी शेततळ्यात तरंगताना आढळला़ बाहेर जाऊन येते असे सांगून ती गुरुवारी घराबाहेर गेली होती. याची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली होती़ प्रिया ही बहीण जागृतीसह आजी-आजोबाकडे शेतवस्तीवर रहात होती. घटना घडली आजी आजोबा काळवेश्वर येथे गेले होते. जागृतीने त्यांना फोन करून प्रिया घरी परत आली नसल्याची माहिती दिली होती़ मुर्शिदाबाद शिवारातील शेततळ्यात कंपनीच्या सुरक्षारक्षकाला तिचा मृतदेह सापडला. तिचा खून केला असावा, असा संशय नातेवाईकांनी घेतला आहे. पोलिस तपासात शेततळ्याच्या पन्नीवर हाताचे ठसे आढळले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खा. सुप्रिया सुळे आज शहरात

$
0
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी नामविस्तार दिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे सोमवारी (१४ जानेवारी) औरंगाबाद शहरात येत आहेत. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० वा मिटमिटा येथील सरोश हायस्कूल तर सकाळी ११.१५ वाजता सिल्कमिल्क कॉलनी येथील मोईन-उल-उलूम हायस्कूल येथे त्या विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता शरीफ कॉलनी, रोशन गेटजवळ येथे जावेद खान यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या उपक्रमास त्या भेट देणार आहेत. दुपारी २ वा. गोदावरी पब्लिक स्कुल येथे सदिच्छा भेट. तर ३ वाजता मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक, सामाजिक, डॉक्टर, वकील, इंजिनअर्स आदी क्षेत्रातील व्यक्तींशी त्या संवाद साधणार आहेत. दुपारी साडेचार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खा. सुप्रिया सुळे अभिवादन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवर्तनवादी चळवळीच्या रेट्याने घडले विद्यापीठाचे नामांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरात परिवर्तनवादी चळवळींचे सर्वाधिक योगदान आहे. पण, या चळ‌वळींना अनुकूल प्रतिसाद देऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतलेला नामांतराचा निर्णयही ऐतिहासिक ठरला. सामाजिक चळवळीला राजकीय पाठबळ मिळाल्याने हा निर्णय अंमलात आल्याचे जाणकारांनी सांगितले.

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीवरुन दीड दशक मराठवाडा धुमसत होता. या मागणीला अस्मितेचे रूप मिळाल्यानंतर दलित विरुद्ध सवर्ण असा संघर्ष उभा राहिला. काही नेत्यांची फूस मिळताच संघर्ष विकोपाला गेला. विधानसभेत ठराव मंजूर झाल्यानंतरही नामांतर झाले नाही. या १६ वर्षांत जनतेने केलेला संघर्ष महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत अद्भूत ठरला. ग्रामीण भागातील दलितांना गायरान जमिनी द्या, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भरीव शिष्यवृत्ती द्या आणि मराठवाडा विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव द्या, या मागण्यांसाठी दलित पँथर सक्रिय होती. १९७४ नंतर विद्यापीठ नामांतराचा मुद्दा गाजू लागला. १९७७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नामांतराच्या मागणीला संमती दिली होती. राजकीय बदलानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी २७ जुलै १९७८ रोजी घेतलेल्या विधान परिषद व विधानसभेच्या एकत्रित बैठकीत नामविस्ताराचा ठराव मंजूर करण्यात आला. पण, या ठरावानंतर 'नामविस्तार नको, नामांतर करा' अशी मागणी होऊ लागली. या वादानंतर मराठवाड्यात दलित विरुद्ध सवर्ण संघर्ष पेटला. आत्मदहन, मोर्चे, उपोषण, तुरुंगवास यांनी वातावरण अस्थिर झाले. या स्फोटक वातावरणात १४ जानेवारी १९९४ रोजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी विद्यापीठाचा ऐतिहासिक नामविस्तार केला. या निर्णयाचे राजकीय व सामाजिक पडसाद उमटले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पवार यांच्या पक्षाला पराभव पत्करावा लागला. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. पवार यांच्या निर्णयामागे राजकीय अपरिहार्यता होती की सामाजिक चळ‌वळींचा दबाव याबाबत जाणकारांमध्ये भिन्न मतप्रवाह आहेत. शरद पवार यांनी राजकीय वर्तुळात फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा स्वीकार केल्यामुळे नामविस्तार होणे स्वाभाविक होते. हा निर्णय तातडीने घेतला नसता, तर त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते, असे जाणकारांनी सांगितले.

\Bसामाजिक चळवळीला प्रतिसाद

\B

नामांतराचा पहिला ठराव मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनीच घेतला होता. सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे एकमताने ठराव मंजूर झाला होता. पण, जनक्षोभानंतर ठराव अंमलात आला नाही. या ठरावानंतर पवार यांना मुख्यमंत्रीपद गमावून राजकीय किंमतही मोजावी लागली. पण, पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर सामाजिक चळवळींना प्रतिसाद देणे आवश्यक होते. त्यानुसार पवार यांनी मराठवाड्यातील नामांतर विरोधक आणि विचारवंतांशी संवाद साधत नामांतराचा ठराव अंमलात आणला, असे नामांतर चळवळीचे अभ्यासक डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले. सर्व थरात पाठबळ मिळवण्यात पवार यशस्वी झाले. अर्थात, नंतरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली.

परिवर्तनवादी चळवळीच्या यशाची प्रतीकं फार कमी आहेत. विद्यापीठाचे प्रवेशद्वार अशा यशाचे ठसठशीत प्रतीक झाले आहे. देशभरातील लोक आवर्जून अभिवादन करण्यासाठी येतात. एका विद्वान माणसाचे नाव देण्यासाठी संघर्ष करावे लागणे हे चळवळीचे अपयशसुद्धा आहे. सामाजिक चळवळीचा त्याग आणि शरद पवार यांची निर्णायक भूमिका या दोघांना नामांतराचे श्रेय देणे उचित ठरेल.

-डॉ. सुधीर गव्हाणे, नामांतर चळवळीचे अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामविस्तार दिनी आठवले यांची सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राजकीय सभा, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि अभिवादन सभा होणार आहेत. विद्यापीठ गेट परिसरात सोमवारी सायंकाळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सभा होणार आहे, तर विद्यापीठाच्या नाट्यगृहात सकाळी अर्जुन डांगळे यांचे व्याख्यान होणार आहे.

विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने नाट्यगृहात सकाळी ११ वाजता आंबेडकरी नेते अर्जुन डांगळे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी सात वाजता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची जाहीर सभा होईल. या सभेला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भीमा कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी 'एक विचार एक मंच' स्थापन करण्यात आला होता. इतर संघटनांना वगळून 'रिपाइं'चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्वतंत्र सभा घेतली होती. पण, लोकांचा रोष पाहून आठवले यांना भाषण आटोपते घ्यावे लागले होते. यावर्षी सभेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा पक्षाने केला आहे.

दरम्यान, रिपब्लिकन सेना, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पँथर, पँथर सेना, दलित पँथर, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठ परिसराची सजावट करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून आंबेडकरी अनुयायांची गर्दी होणार आहे. या परिसरात पुस्तकांची शेकडो दुकाने लावण्यात आली आहेत. भीमगीतांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम ठिकठिकाणी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना लवकरच नवी घरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने लवकरच निवासासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी स्पष्ट केले. त्यांच्या हस्ते गणेश उत्सवातील शिस्तबद्ध गणेश मंडळास प्रशस्तीपत्रक व रोख बक्षीसे देऊन गौरवण्यात आले.

कन्नड शहर पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्याकरिता पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस पाटील, पदाधिकारी, शहरातील नागरिकांसोबत संवाद साधून सोशल मीडियातून पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, महिला व मुलींविषयक तक्रारी द्याव्यात, असे आवाहन केले. पोलिस कर्मचाऱ्यांच्या विविध व तांत्रिक समस्यांचा जलदगतीने निपटारा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. कार्यालयीन कामकाज पूर्णपणे पेपरलेस होण्यासाठी 'सीसीटीएनएस' प्रणाली प्रभावीपणे राबवण्यावर भर देत दैनंदिन कामकाजात 'नेल्सन मॉडेल'ची अंमलबजावनी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जामदार, बालाजी वैद्य, अस्मान शिंदे, दामिनी पथक प्रमुख उपनिरीक्षक सुनील पवार, कर्मचारी कैलास करवंदे, राजेंद्र मुळे आदींची उपस्थिती होती.

\Bगणेश मंडळांना बक्षीसे प्रदान \B

गणेशोत्सवात दहा दिवस पोलिसांच्या सूचनांचे पालन करणाऱ्या व गुलालाचा वापर टाळलेल्या गणेश मंडळांस डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार राम मंदिर गणेश मंडळ, विवेकानंद कॉलनी कन्नड, द्धितीय पुरस्कार छत्रपती गणेश मंडळ, शिवाजीनगर कन्नड, तर तृतीय पुरस्कार नवचैतण्य गणेश मंडळ, शांतीनगर कन्नड यांना देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख ‘चोर, आठवलेंच्या सभेत गोंधळ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारिप नेते अॅड. प्रकाश आंबेडकर याचा उल्लेख ‘चोर’ असा केल्यामुळे खासदार रामदास आठवले यांच्या जाहीर सभेत प्रचंड गोंधळ झाला. संतापलेल्या अनुयायांनी घोषणाबाजी करीत मिलिंद शेळके यांचे भाषण बंद पाडले. तसेच खुर्च्यांची फेकाफेक सुरू केल्यामुळे काही वेळात मैदान रिकामे झाले. या वादानंतर आठवले यांनी संयमित भाषण करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २५ व्या नामविस्तार दिनानिमित्त ‘रिपाइं’चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा झाली. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी सायंकाळी आठ वाजता सभेला सुरुवात झाली. ‘रिपाइं’चे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके यांनी आपल्या भाषणात आठवले यांनी नामांतर लढ्यात केलेल्या परिश्रमावर भाष्य केले. तसेच लढ्यात योगदान नसलेल्या नेत्यांना आठवले यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शेळके आणि संजय ठोकळ यांनी भाषणातून लक्ष्य केले. ठोकळ यांनी पाच प्रश्न उपस्थित करुन आंबेडकर यांच्यावर परखड शब्दात टीका केली. या भाषणानंतर सूत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी पुन्हा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका सुरू केली. ‘नातू म्हणवून घेणारे हे चोर’ असे शेळके यांनी म्हणताच सभेतील लोक उभे राहून घोषणाबाजी करू लागले. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक सुरू केल्यामुळे काही वेळातच गर्दी पांगली.

मंचावरील नेते आणि पोलीस लोकांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते. मात्र, गर्दी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे काही वेळ सभा थांबली. ‘कोणत्याही नेत्यावर टीका करण्याचा हा दिवस नाही. टीका करताना आमच्या नेत्यांनीही भान ठेवले पाहिजे’ असे भाषणात म्हणत आठवले यांनी वादावर पडदा टाकला. तसेच आंबेडकरी पक्षात एकी होणार असल्यास मी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यास तयार आहे असे जाहीर केले. आठवले यांना सलग दुसऱ्या वर्षी औरंगाबाद शहरात जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वंचित आघाडी तर वंचित नेत्यांची

$
0
0

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुजन वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. वंचित आघाडी वंचित समाजाची नाही तर वंचित नेत्यांची आघाडी आहे, असे प्रतिपादन मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमानिमीत्त ते शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'सेना भाजपामध्ये जरी सुरू असेल कलगीतुरा, तरी हातात घेऊ नका सुरा' अशी शीघ्र कविता करीत सेना-भाजपा सोबत येतील असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. सेनेला सोडून भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय एकत्र लढले तर आरपीआय ३० ते ३५ जागी निवडूण येऊ शकतील, मात्र सेना सोबत आल्यास ही संध्या ४३ ते ४५ घरात जाण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाचा अप्रत्यक्ष फायदा करण्यापेक्षा भाजपासोबत यावे, प्रकाश आंबेडकर आणि आम्ही मिळून दलीत समाजाचा विकास करू शकतो, असे मत देखील आठवले यांनी यावेळी मांडले. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून यापूर्वी आपण १९९८ साली या मतदार संघातून निवडणुकीला उभे राहिलो असल्याची आठवण यावेळी आठवले यांनी सांगितली. मराठा सवर्णांना आरक्षण मिळावे अशी भूमिका आपण पूर्वीपासून मांडत आलो आहोत. हे आरक्षण देताना दलित, ओबीसी, आदिवासी घटकांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले. तसेच येणाऱ्या २०१९ मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला बाबुराव कदम यांच्यासह इतर स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवले यांच्या सभेत खुर्च्या भिरकावल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारिप नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा उल्लेख 'चोर' असा केल्यामुळे खासदार रामदास आठवले यांच्या जाहीर सभेत प्रचंड गोंधळ झाला. संतापलेल्या अनुयायांनी घोषणाबाजी करीत मिलिंद शेळके यांचे भाषण बंद पाडले. तसेच खुर्च्यांची फेकाफेक सुरू केल्यामुळे काही वेळात मैदान रिकामे झाले. या वादानंतर आठवले यांनी संयमित भाषण करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २५ व्या नामविस्तार दिनानिमित्त 'रिपाइं'चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा झाली. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी सायंकाळी आठ वाजता सभेला सुरुवात झाली. 'रिपाइं'चे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके यांनी आपल्या भाषणात आठवले यांनी नामांतर लढ्यात केलेल्या परिश्रमावर भाष्य केले. तसेच लढ्यात योगदान नसलेल्या नेत्यांना आठवले यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शेळके आणि संजय ठोकळ यांनी भाषणातून लक्ष्य केले. ठोकळ यांनी पाच प्रश्न उपस्थित करुन आंबेडकर यांच्यावर परखड शब्दात टीका केली. या भाषणानंतर सूत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी पुन्हा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका सुरू केली. 'नातू म्हणवून घेणारे हे चोर' असे शेळके यांनी म्हणताच सभेतील लोक उभे राहून घोषणाबाजी करू लागले. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक सुरू केल्यामुळे काही वेळातच गर्दी पांगली. मंचावरील नेते आणि पोलिस लोकांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते. मात्र, गर्दी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे काही वेळ सभा थांबली. 'कोणत्याही नेत्यावर टीका करण्याचा हा दिवस नाही. टीका करताना आमच्या नेत्यांनीही भान ठेवले पाहिजे' असे भाषणात म्हणत आठवले यांनी वादावर पडदा टाकला. तसेच आंबेडकरी पक्षात एकी होणार असल्यास मी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यास तयार आहे असे जाहीर केले. आठवले यांना सलग दुसऱ्या वर्षी औरंगाबाद शहरात जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच अर्जावर सुनावणी

$
0
0

औरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जानेवारी महिन्याच्या विभागीय लोकशाही दिनात पाच अर्ज दाखल झाले. या प्रकरणांमध्ये सर्व संबंधित विभागांनी तत्परतेने योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी दिले. लोकशाही दिनात विशेष पोलिस महानिरीक्षक, औरंगाबाद १, विभागीय सह निबंधक सहकार विभाग १, महापालिका १, जिल्हाधिकारी कार्यालय १, विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड १ अशा एकूण पाच प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त पारस बोथरा यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हेडगेवार’मध्ये बागला प्रयोगशाळेचे उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. हेडगेवार रुग्णालयात श्रीमती रमाबाई राजनारायण बागला प्रयोगशाळेचे नुकतेच उद्घाटन झाले. प्रसिद्ध उद्योजक ऋषी बागला यांनी या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी सहाय्य केले आहे. या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उद्योजक ऋषी बागला, किशोरकुमार लोहिया, उल्हास गवळी, मुकुंद भोगले, कमलाप्रसाद कजारिया, संदीप नागोरी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी बागला म्हणाले, इतर हॉस्पिटलच्या तुलनेत हेडगेवार रुग्णालयामध्ये जे समर्पण दिसते, ते वेगळ्या प्रकारचे आहे. त्यासाठी मी सर्व डॉक्टरांना प्रणाम करतो. फिजिओथेरपी विभागाला राजनारायण बागला यांचे, तर पॅथॉलॉजी लॅबला रमादेवी बागला यांचे नाव दिले आहे. यानिमित्ताने माझ्या माता-पित्यांचे येथे मिलन झाले आहे, असेही ते म्हणाले. लोहिया यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी रवी पाटवदकर यांनी पॅथॉलॉजी लॅबविषयी माहिती दिली. तसेच लॅबमधील गुणवंत तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अनिल भालेराव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अल फरहान’तर्फे रक्तदान शिबिर

$
0
0

औरंगाबाद : आपल्या मित्राच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अल फरहान मेडिकल फाउंडेशन स्थापन करण्यात आले आहे. या संस्थेतर्फे सलग सातव्या वर्षी रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे शिबिर युनूस कॉलनी, कटकट गेट येथे घेण्यात आले. सकाळी दहा वाजता सुरू झालेले शिबिर रात्री साडे दहा वाजता संपले. यंदा जादा प्रतिसाद मिळवण्यासाठी आधुनिक माध्यमाद्वारे प्रचार आणि प्रसार करण्यात आला होता. या रक्तदान शिबिरावेळी पोलिस उपायुक्त राहुल खाळे यांच्यासह संस्थान गणपती, राजाबाजार मित्रमंडळाचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती नोंदवली. शिबिर यशस्वी करण्यासाठी जिशान पटेल, निजाम सिद्दीकी, काजी रियाज, रजी अहेमद खान, नासेर बसमे, सय्यद ताहरेज, काजी हफिज, अन्वर खान, सय्यद माजेद, समी सिद्दीकी, अमीनोद्दीन, अहेसान खान, मोहम्मद उमर यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखा विभागात १८५ कोटींची बिले थकली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लेखा विभागात तब्बल १८५ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. त्यामुळे काम करण्यासाठी कंत्राटदार मिळत नाही, अशी कबुली अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

खासदार पुत्र तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे यांनी वॉर्डातील विकास कामांचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत मांडला. ते म्हणाले, वॉर्डातील विकास कामांच्या फाइल तयार आहेत, पण निधी नसल्याने कामे करता येत नाहीत. निधी व्यवस्थापनाची पद्धत महापालिकेत नाही का, वॉर्डातील छोट्या छोट्या कामांसाठी देखील निधी नाही का? निधी नसल्यामुळे कंत्राटदार काम करीत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी याबद्दल अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना खुलासा करण्यास सांगितले. लेखा विभागाच्या कारभाराचा अहवाल आयुक्तांना दिला आहे. आता लेखा विभागात सुधारणा होतील असे वाटते. लेखा विभागात १८५ कोटींची बिले थकलेली आहेत. त्यामुळे कंत्राटदार काम घेत नाहीत ही वस्तूस्थिती आहे. बिल थकलेले असेल व कंत्राटदार काम करण्यास तयार नसतील तर वॉर्डातील कामे कशी होणार, असा सवाल खैरे यांनी केला. आता निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी कामे होणे गरजेचे आहे. ज्या वॉर्डातून मालमत्ता कर शंभर टक्के भरला जातो त्या वॉर्डातील विकास कामांना प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे.

\B...त्यांनी माती खाल्ली

\Bभाजपच्या राखी देसरडा म्हणाल्या, माझ्याही वॉर्डात काम करण्यास कंत्राटदार तयार नाहीत. यावर सभापती म्हणाले, संपूर्ण शहरातच अशी स्थिती आहे. लेखा विभागाने माती खावून ठेवली आहे. या विभागाला शिस्त लावणे आणि करांची वसुली वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडीतील २५ मुलांना माळेगाव पिंपरीत विषबाधा

$
0
0

म. टा प्रतिनिधी, फर्दापूर

सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिंपरी येथील अंगणवाडीतील २५ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाली. या २५ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अंगणवाडीत विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी राठोड, अंगणवाडी तालुका समन्वयक वैशाली पाटील यांनी ग्रामसेवकासह घटनास्थळाला भेट दिली. अंगणवाडीमधील पोषण आहाराचा पंचनामा करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. संबंधितांवर चौकशीअंती तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. विषबाधेचा प्रकार उघडकीस असल्यानंतर गावातील नागरिकांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला. तिच्यातून विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयातील आणण्यात आले. दरम्यान, रुग्णालयात विद्यार्थी सोडून अंगणवाडी सेविका किंवा इतर कर्मचारी निघून गेल्याचा आरोप होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नशेखोरीविरोधात पोलिस आयुक्तालयावर शनिवारी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नशेखोरीमुळे रहेमानिया कॉलनीत एकाचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. ही घटना गंभीर असून नशेच्या गोळ्या, गुटखा, अवैध दारू विक्रीमुळे शहरातील अनेक तरुणांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे. या विरोधात कारवाईच्या मागणीसाठी १९ जानेवारी रोजी पोलिस आयुक्तालयावर जनमोर्चा काढण्यात येणार आहे,' अशी माहिती आमदार इम्तियाज जलील यांनी कळवले आहे.

शहरात अनेक ठिकाणी नशेच्या गोळ्या व इतर मादक पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. मुकुंदवाडी भागात दारूमुळे एकाचा मृत्यू झाल्यानंतर तेथे दारू दुकानाची तोडफोड करण्यात आली होती. नशेच्या गोळ्या व मादक पदार्थांची विक्री शहरातील सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे. या मोर्चाला जिन्सी पोलिस ठाण्यापासून सकाळी ११च्या सुमारास सुरुवात होणार आहे. तो शहागंज, सिटी चौक, ज्युबली पार्क मार्गे पोलिस आयुक्तालयावर धडकणार आहे. या मोर्चात पालकांनी सहभाग व्हावे, असे आवाहन आमदार जलील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीतील आरोपीस दीड वर्षांनंतर अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको सी सेक्टर परिसरातील घरातून ६५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी सय्यद सिराज सय्यद लियाकत (वय ३४, रा. पूरग्रस्त कॉलनी, खंडेश्वरी रोड, जिल्हा बीड) याला रविवारी (१३ जानेवारी) अटक करून सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्याला मंगळवारपर्यंत (१४ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. वमने यांनी दिले. विशेष म्हणजे घटनेच्या दीड वर्षानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे.

राहुल गजानन इंगळे (वय ३०, रा. एन १, सेक्टर सी, सिडको) यांच्या घरात १८ जून २०१७ रोजी रात्री चोरी झाली होती. लोखंडी कपाटातून ६५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने खिडकीची जाळी उघडून चोराने घरात प्रवेश करत चोरले होते. याप्रकरणी भादंवि ४५७, ३८०नुसार सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात हर्सूल कारागृहामध्ये असलेला आरोपी सय्यद सिराज सय्यद लियाकत याला रविवारी अटक करून सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले. चोरीचा ऐवज जप्त करणे, ऐवज आरोपीने कोठे ठेवला किंवा कोणाला विकला, आणखी काही गुन्हे केले आहेत का, साथीदार कोण आहेत याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरण मोहिमेसाठी एलआयसीतर्फे प्रमाणपत्रे

$
0
0

औरंगाबाद: गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या औरंगाबाद विभागातर्फे दोन लाख प्रमाणपत्रांची छपाई करण्यात आली. छपाई केलेले प्रमाणपत्र सोमवारी महापालिकेच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक, महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक कुलभूषण शर्मा यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी बोलताना शर्मा म्हणाले, एलआयसी कॉर्पोरेट पातळीवर गोल्डन ज्युबली फाउंडेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून गोवर-रुबेला लसीकरणासाठीची प्रमाणपत्र आहेत. एलआयसीतर्फे असे विविध उपक्रम राबवले जातात, असा उल्लेख त्यांनी केला. यावेळी विपणन व्यवस्थापक सुजय दत्ता, अजय सपाटे, पी अँड जीएस शाखेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक भीमराव सरवदे, व्यवस्थापक सुवर्ण राव, उप व्यवस्थापक प्रभुसिंग परदेशी, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुसूचित जातींचा निधी इतरत्र वळवू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्यातील भाजप सरकारचा अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, आदिवासींच्या कल्याणासाठी दृष्टिकोन योग्य नाही. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीपैकी तब्बल अडीच हजार कोटी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वळविले. हा निधी इतरत्र वळवू नये. यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर कायदा करावा,' अशी मागणी कॉँग्रेस प्रवक्ते आणि अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजू वाघमारे यांनी सोमवारी केली.

वाघमारे सोमवारी शहरात आले असता बोलत होते. ते म्हणाले, 'अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, आदिवासींचे कधी नव्हते एवढे हाल भाजप सरकारच्या काळात सुरू आहेत. अनुसूचित जाती-जमातींचा निधी खर्च होत नाही. अनेक योजनाच्या राबवण्यामध्ये समस्या आहेत. शिष्यवृती मिळणे, विद्यार्थ्यांची मेस, फी बाबतही समस्या आहेत. असे असताना अडीच हजार कोटींचा निधी वळविला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध नाही. मात्र स्वतंत्र तरतूद करणे गरजेचे होते. महामंडळांचे कर्ज वाटप देखील निधी अभावी बंद आहे,' असेही त्यांनी नमूद केले. शहराध्यक्ष नामदेव पवार, जितेंद्र देहाडे, डॉ. पवन डोंगरे, बाबा तायडे यांची उपस्थिती होती.

\B'एमआयएम' भाजपची बी टीम

\Bवंचित बहुजन आघाडीच्या बाबत विचारले असता वाघमारे म्हणाले, 'छत्तीसगडमध्ये अजित जोगी आणि मायावती यांनी एकत्रित निवडणूक लढवली. मात्र, तेथील आदिवासी बांधवांनी त्यांना मतदान केले नाही. राज्यातील दलित आणि मुस्लिम समाज छत्तीसगडपेक्षा आधिक सुशिक्षीत आहे. त्यामुळे एमआयएमला ते मतदान करणार नाहीत. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे भाजपाला फायदा होईल अशाच पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत असते, असा आरोपही वाघमारे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान पीक विमा योजना कंपन्यांसाठीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पंतप्रधान पीक विमा योजना' शेतकऱ्यांसाठी नसून विमा कंपन्यांसाठी आहे. तीन वर्षात कंपन्यांना प्रिमियम पोटी तब्बल ६८ हजार कोटी रुपये मिळाले. पहिल्या दोन वर्षांत ४४ हजार कोटी रुपये कंपन्यांच्या खिशात गेले. त्यावर कंपन्यांनी १५ हजार ७९५ कोटी रुपयांचा नफा मिळवला. मात्र, शेतकऱ्याला शून्य रुपये मिळाले,' असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शेतीविषयक अभ्यासक पी. साईनाथ यांनी केले. 'विवेकानंद कॉलेज व्याख्यानमालेत' ते सोमवारी ते बोलत होते. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यावर आत्महतेची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला.

कॉलेजतर्फे पंढरीनाथ पाटील (भाऊ) ढाकेफळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पहिल्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. श्याम सिरसाट, अक्षय शिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पी. साईनाथ यांनी 'शेतीसंकट, बदलता ग्रामीण भारत व शेतकरी आत्महत्या' विषयावर व्याख्यान दिले. 'नवीन आर्थिक धोरणांमुळे देशातील शेतकऱ्यासमोर शेती संकट उभे राहिले आहे. शेती परवडत नसल्याने अर्थकारण कोलमडलेले असून शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागले आहेत. शेतीवरील खर्च, बी-बियाणे, खते, औषधांची किंमतीत तीनशे ते सहाशे पटीने वाढ झाली अन् सरकार शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या गप्पा मारते. हे आर्थिक गणित कसे जुळवायचे. कृषीवरील खर्च करून कृषी व्यवसायाकडे निधी वळविला आणि त्यात कंपन्यांचेच भले झाले,'असे परखड मत त्यांनी मांडले.

'पाण्याची पातळी प्रचंड कमी झाली तरी, टँकर आणि बोअरिंगचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात होते. त्याचवेळी दुष्काळासारख्या महाभयंकर संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत मिळत नाही. आर्थिक अडचणीती शेतकऱ्याला बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले त्याचबरोबर कृषी विद्यापीठांकडूनही २५ वर्षांत शेतकऱ्याला फायदेशीर संशोधन झाले नाही. ही विद्यापीठेही बियाणे कंपन्यांच्या हातात गेल्याचे चित्र आहे,' असा आरोप त्यांनी केला.

डॉ. स्वामीनाथन आयोगाने २००४ साली शेतकऱ्यांबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल दिला. त्यावर मागील १४ वर्षांत अहवालावर तासभरही चर्चा संसदेत होऊ शकली नाही. त्याचवेळी कॉर्पोरेट जगतासाठीचे 'जीएसटी'सारखे बिल चार तासात मंजूर करून घेतले जाते. १४ वर्षांत तासभरही चर्चा करावी असे न वाटणाऱ्या सरकारांनी कार्पोरेटसाठी पायघड्या घातल्या. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नी चर्चा होत नाही. यासारखे दुर्दैव कृषीप्रधान देशात दुसरे नसावे, असेही पी. साईनाथ म्हणाले.

\Bफक्त १२१ जणांकडे देशातील २२ टक्के संपत्ती\B

१९९५ ते २०१५ पर्यंत देशभरात ३ लाख १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील ६५ हजार शेतकरी आहेत. हे सरकारी आकडे असले तरी ते कमी आहेत. सरकार वेगवेगळ्या प्रकारे आत्महत्येची आकडेवारी समोर येऊ देत नाही. अब्जोपतींमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. देशातील १२१ जणांकडे देशातील एकूण संपत्तीच्या २२ टक्के संपत्ती आहे. त्यात एका उद्योगपतीची १२ महिन्यातील कमाई एक लाख पाच हजार कोटी रुपये एवढी आहे. जी, कर्जमाफीच्या तीन पट अधिक आहे. त्याचवेळी देशातील सर्वात मोठा घटक असलेल्या शेतकऱ्याच्या पाच जणांच्या कुटुंबाचा उत्पन्न पाच हजार रुपये आहे. एवढी मोठी विषमता देशात निर्माण झाली आहे, अशी माहिती पी. साईनाथ यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञारेश्वर सूर्यवंशी यांनी केले.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images