Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खुलताबाद दर्ग्याचा चेहरामोहरा बदलणार

$
0
0
सुफी संत हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष उर्फ शेख मुन्तजबोद्दिन यांच्या दर्ग्याच्या विकासासाठी योजना तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात दर्ग्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.

नाव मजूर संस्था; सभासद मात्र धनदांडगे

$
0
0
बीड जिल्ह्यातील अनेक मजूर संस्था आहेत. या मजूर संस्थाकेवळ नावापुरत्याच असून त्यांचा मजुरांशी काहीच संबध उरलेला नाही. जिल्ह्यातील अनेक मजूर संस्थाचे सभासद हे धनदांडगे असल्याचे समोर आले आहे.

थंडगार बोचरे वारे आणखी २ दिवस

$
0
0
तब्बल तीन आठवडे सुटी संपवून थंडी परतली असून, आणखी दोन दिवस थंडीचा कडाका राहील. मकर संक्रांतीनंतर थंडीचा कडाका किंचित कमी होऊ शकतो. दोन दिवसात किमान तापमान एकदम ४.७ अंश सेल्सिअसने घसरल्याने नागरिक गारठले आहेत.

घर बांधण्यासाठी विवाहितेचा छळ

$
0
0
घराच्या बांधकामासाठी माहेरून दोन लाख रुपये न आणल्यामुळे विवाहितेला सासरच्या मंडळीनी घराबाहेर हाकल्याची घटना रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.

रावसाहेब कसबे यांना मिलिंद समता पुरस्कार

$
0
0
ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांना यंदाच मिलिंद समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मिलिंद कला महाविद्यालयातर्फे हा पुरस्कार दरवर्षी नामविस्तार दिनी प्रदान केला जातो.

व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न फसला

$
0
0
वाळूज रोडवरील एएस क्लबजवळ इंडिका कारमधील व्यापाऱ्यांना दुचाकीवर आलेल्या तिघांनी तलवारीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न रविवारी सायंकाळी करण्यात आला. मात्र, तेथून जाणाऱ्या कामगार सेनेच्या नेत्यांमुळे हा प्रकार त्यांचा हा प्रयत्न फसला.

बौद्ध लेणीच्या तीर्थक्षेत्र दर्जासाठी उपोषण

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील बौद्ध लेणीला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी परिवर्तन कामगार संघटनेतर्फे भडकल गेट येथे रविवारी एका दिवसाचे उपोषण करण्यात आले.

जालना नगराध्यक्षांचे आजपासून उपोषण

$
0
0
शहरातील खंडित केलेल्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा, या मागणीसाठी नगराध्यक्षा पद्मा भरतीया या सोमवारी (१३ जानेवारी) वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालायासामोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

रस्त्यावरच्या खडीचे अपघाताला निमंत्रण

$
0
0
गारखेड्यातील विजयनगर चौकातून कालिमाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खडी अपघाताला निमंत्रण ठरू लागली आहे. खडीचा रस्ता वाहन चालकांसाठी डोकेदुखीचा ठरू लागला आहे. या रस्त्यावर पथदिवे बंद असल्यामुळे रात्री हा रस्ता धोकादायक ठरू लागला आहे.

पालिकेच्या मालमत्तांवर सवलतींची ‘छत्री’

$
0
0
सर्वसामान्य नागरिकांकडे मालमत्ताकर वसुलीसाठी सक्ती करणाऱ्या महापालिकेने स्वतःच्याच मालमत्तांना अद्याप मालमत्ताकर लावलेला नाही. त्यामुळे त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पालिकेला पाणी सोडावे लागत आहे.

खड्डे बुझवित नागरिकांची पालिकेला चपराक

$
0
0
औरंगाबाद शहरातील खड्ड्यांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून, रस्त्यांसाठी प्रशासनाकडून कोणतेच पाऊल उचलले जात नसल्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. खुद्द महापौर कला ओझा यांच्या वॉर्डातील रस्त्यांचीही दुरवस्था झाल्याकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने लक्ष वेधले.

विद्यापीठाचे १० कोटी लालफितीत

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी घोषित केलेली दहा कोटी रूपयांची रक्कम चार महिन्यानंतरही लालफितीत अडकलेली आहे. विद्यापीठाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती.

१ फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा

$
0
0
बहुचर्चित अन्न सुरक्षा योजना महाराष्ट्रात येत्या एक फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे. राज्यातील सात कोटी नागरिकांना या योजनेमुळे स्वस्तातील धान्य मिळणार आहे. राज्यात दर महिन्याला सुमारे चार लाख टन धान्य वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (१२ जानेवारी) येथे पत्रकार परिषदेत दिली.

रस्त्यांवर खड्डे, खड्ड्यांत सांडपाणी

$
0
0
सहा वर्षांपूर्वी केलेले डांबरीकरणाचे काम पूर्णपणे खड्ड्यात गेल्याचे चित्र विजयनगर चौक ते तिरुमला मंगल कार्यालय या रस्त्यावरन जाताना लक्षात येते. या प्रकारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

उमेदवारा, तुला शोधू कोठे?

$
0
0
गेल्या दोन तपापासून औरंगाबाद लोकसभेत काँग्रेसला केवळ एक वेळाच यश मिळाले आहे. यश मिळूनही आता पंधरा वर्षे उलटून गेली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे आव्हान पेलायचे असेल तर काँग्रेसला तगड्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

लेव्ही साखरेची वसुली करणार

$
0
0
केंद्र सरकारने साखरेची लेव्ही पद्धत बंद केली आहे, मात्र काही कारखान्यांकडे लेव्ही साखरेचा पूर्वीचा कोटा शिल्लक आहे. ही सर्व साखर संबंधित कारखान्यांकडून वसूल करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (१२ जानेवारी) येथे स्पष्ट केले.

नियोजित दारू दुकानाला विरोध

$
0
0
गारखेडा भागातील शिवाजीनगर, देशमुखनगर येथील आर के टॉवर येथे सुरू होणा-या देशी दारुच्या दुकानास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. या दुकानास परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करीत नागरीकांचे एक शिष्टमंडळ उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक झगडे यांना सोमवारी भेटले. या दुकानाच्या परिसरात आजुबाजूला अपार्टमेंट असून बसस्टॉप आहे.

शाहिरांनी दिली लोककलांची पर्वणी

$
0
0
‘नंदी आला रे नंदी आला’, ‘गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी’, ‘बाई माझ्या दुधात नाही पाणी’ अशा भारुड, गोंधळ, गौळण या पारंपरिक लोककलांच्या सादरीकरणातून शाहीर सुखदेव खोमणे यांनी रसिकांना अपूर्व पर्वणी दिली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी ‘लोककला आविष्कार’ या कार्यक्रमात शाहीर खोमणे यांनी तीस लोककला समरसून सादर केल्या.

सर्वांत मोठ्या ताटाने महाराजांची आरती

$
0
0
प. पू. आचार्य देवनंदिजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दशमेशनगर येथे संकल्प महोत्सव उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

युवादिल ‘दिवाना हो गया...’

$
0
0
गीत-संगीताच्या तालावर थिरकणं कसं असतं, संगीतप्रेमींचा जल्लोष कसा असतो अन् एखाद्या गायकाच्या अफलातून अदाकारीवर तरुणाई फिदा होते कशी, या सर्वांच प्रात्यक्षिकच औरंगाबादमध्ये कासलीवाल-तापडिया मैदानावर शनिवारी रात्री बघायला मिळाले. निमित्त होते ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजित केलेल्या कैलाश खेर या गीत-संगीताच्या कार्यक्रमाचे...
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images