Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कर्तव्यात कसूर, मंत्रिपदाचा गैरवापर

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना धान्य न देता काळ्या बाजारात विक्री केल्या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी ताशेरे ओढले. मंत्री हे जनतेचे विश्वस्त आणि रक्षक असतात. मात्र, त्यांनी कर्तव्य पालनात कसूर केल्याचे या प्रकरणात स्पष्टपणे दिसून येत आहे. मंत्रीपदाचा गैरवापर करून, कायद्याची पायमल्ली केल्याचा ठपका कोर्टाने ठेवला आहे.

तहसीलदार आणि उपयुक्त (पुरवठा) यांनी चौकशीअंती दोषी ठरविलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचा आदेश राज्याचे नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी रद्द ठरविला. या आदेशाविरोधात उच्च न्यायालय खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीअंती न्या. रवींद्र घुगे यांनी मंत्र्यांचा आदेश रद्द करीत, त्यांच्या या कृतीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले. या प्रकरणी एक नागरिक साहेबराव वाघमारे (मुरंबी, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार, याचिकाकर्ते आणि इतर शिधापत्रिकाधारकांनी बिभीषण नामदेव माने यांच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. संबंधित स्वस्त धान्य दुकानदार माने हे शिधापत्रिकाधारकांना माल देत नाहीत, दिलाच तर जास्त दर लावतात, काळ्या बाजारात धान्य विकतात, असे तक्रारीत म्हटले होते.

या तक्रारीआधारे तहसीलदार (पुरवठा) अंबाजोगाई यांनी कार्डधारक तसेच दुकानदाराची चौकशी केली. त्या चौकशीच्या अहवालाआधारे स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला. या विरोधात दुकानदाराने उपयुक्त, पुरवठा यांच्याकडे अपील दाखल केले. तत्कालीन उपयुक्त (पुरवठा) यांनी प्रकरण पुन्हा चौकशीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी (बीड) यांच्याकडे पाठविले. या चौकशीतही दुकानदार दोषी आढळला. यावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ८ जून २०१६ च्या आदेशान्वये दुकानाचा परवाना रद्द केला. त्या विरोधात दुकानदाराने उपायुक्त (पुरवठा) औरंगाबाद यांच्याकडे अपील केले. त्यांनी या संदर्भात सर्व संचिका मागवून, रेकॉर्डचे अवलोकन करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा निर्णय कायम केला.

या विरोधात दुकानदाराने राज्याचे नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्याकडे अपील केले. यावर मंत्र्यांनी, दुकानदाराला व्यवसाय करण्याची आणखी एक संधी देण्यात यावी, असे नमूद करीत अपील मंजूर केले आणि दुकान तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. दुकानदाराविरुद्ध दोष सिद्ध होऊनही मंत्र्यांनी हे आदेश दिले होते.

यावर मूळ तक्रारदार वाघमारे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून निर्णयाला आव्हान दिले. याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती खंडपीठाने मंत्री गिरीश बापट यांचा आदेश रद्द करीत जिल्हा पुरवठा अधिकारी आणि उपायुक्त (पुरवठा) यांचे आदेश पुनर्स्थापित केले. या प्रकरणी याचिकाकर्त्यांच्या वतीने सिद्धेश्वर ठोंबरे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुलंब्रीत उद्यापासून दोन दिवसीय इज्तेमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

फुलंब्री-खुलताबाद रस्त्यावरील देवगिरी साखर कारखाना परिसरात शनिवारी (१९जानेवारी) पासून दोन दिवसीय तालुकास्तरीय इज्तेमाला आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला २५ ते ३० हजार भाविकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार, फुलंब्री तालुका तब्लिकी जमाततर्फे तयारी करण्यात आली आहे.

या इज्तेमासाठी सुमारे २० एकर जमिनीवर व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी दहा एकरवर शामियाना व उर्वरित दहा एकरात वजुखाना, तात्पुरती मशीद, स्वच्छतागृह, स्नानगृह, पिण्याचे पाणी, भोजन, चहा, रसवंती आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. याची तयारी एक महिन्यापासून करण्यात येत होती. धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र तब्लिकी जमातचे प्रमुख हाफीज मंजूर, औरंगाबाद जिल्हा तब्लिकी जमातचे प्रमुख हाजी मोईन, हाजी मजीद पटेल यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.

\Bपोलिसांचे आवाहन \B

-कार्यक्रमाला येताना वाहने सावकाश आणावीत

-रस्त्याचे कामे सुरू असल्याने काळजी घ्यावी

-इज्तेमा ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी करू नयेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्याप्रकरणी तीन संशयितांना न्यायालयीन कोठडी

$
0
0

कन्नड: शहरातील राजमहल हॉटेलमध्ये सावकारांच्या त्रासाला कंटाळून भाऊसाहेब घुगे या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी तिघांना अटक करून गुरुवारी (१७ जानेवारी) कन्नड न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक सतीश दिंडे, मयूर पाटील, योगेश्वर ताठे यांनी औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथून संदेश सुभाष भारुका यास ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक अस्मान शिंदे, पोलिस नाईक किरण गंडे यांनी अशोक भाऊसाहेब पानकडे यास गंगापूर व पोलिस नाईक गणेश चेळेकर, भागीनाथ आहेर, विनोद पाटील यांनी विष्णू कळागते यास अहमदनगर येथून ताब्यात घेतले. तपास आधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी संशयित आरोपींना कोर्टात हजर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंगारा देणाऱ्या चोरास १२ दिवसानंतर अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तब्बल १२ दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या संशयित मोटारसायकल चोरास पोलिसांनी अटक केली. भावाच्या मोटारसायकलचा नंबर टाकून तो चोरीची मोटारसायकल वापरत होता.

सूर्यकांत सनान्से यांनी त्यांची मोटारसायकल (एम एच २० एफ ए ९६४७) वेरूळ येथून ५ जानेवारी रोजी चोरी झाल्याची तक्रार दिली होती. ती वेरूळ येथीलच रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबासाहेब सांडू त्रिभुवन याने चोरल्याचा संशय आल्याने पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांनी त्याच्यावर पाळत ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, तो सापडत नव्हता. वेरूळ‌चे पोलिस पाटील रमेश धिवरे यांनी, त्रिभुवन घरी येण्याची शक्यता असल्याचे बुधवारी कळवले. त्यावरून खेडकर यांनी गस्त घालताना रात्री एकच्या सुमारास पोलिस हवालदार प्रकाश मोहिते, संजय जगताप, चालक गरड व पोलीस पाटील यांच्यासह त्रिभुवनच्या घराची तपासणी केली. त्यावेळी घराला कुलूप होते, पण, शंका आल्याने खिडकीतून बॅटरी मारून पाहिले असता कोणीतरी असल्याचे जाणवले. पोलिसांनी आवाज दिल्यानंतर, एका महिलने प्रतिसाद दिला. तिला दार उघडण्यास सांगतले असता त्यावेळी खिडकीची जाळी बाजुला करून पळून जाणाऱ्या बाबासाहेब त्रिभुवन याला पकडण्यात आले.

पोलिस ठाण्यात चौकशीअंती त्याने मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. ती गुरुवारी ताब्यात घेण्यात आली. त्याने नंबरप्लेट बदलून त्यावर ती भावाच्या मोटारसायकलचा नंबर टाकून वापरत होता. बनावट नंबर प्लेट तयार करणे व फसवणूक केल्याचे कलम गुन्ह्यात वाढवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्ग दुरुस्तीसाठी दहेगाव येथे रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

लासूर स्टेशन ते कोपरगाव हद्दीपर्यंत नागपूर-मुंबई महामार्गाची त्वरित दुरुस्ती करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी दहेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

लासूर स्टेशन ते कोपरगाव हद्दीपर्यंत या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. गेल्या चार वर्षांत अपघातामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून अपंगत्वही आले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा राज्यातील भाजप सरकारने केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील साळुंके, उपाध्यक्ष सीताराम उगले यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. नायब तहसीलदार खाडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनात रामेश्वर बिलवणे, मिनीनाथ जाधव, साहेबराव चव्हाण, कल्याण हुमे, संदीप गायके, कृष्णा सरोवर, समाधान त्रिभुवन आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोगेश्वरी ग्रामपंचायतीवर मोर्चा

$
0
0

वाळूज महानगर: नागरी सुविधांच्या मागणीसाठी जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयावर गुरुवारी (१७ जानेवारी) समाजवादी पार्टी तर्फे मोर्चा काढण्यात आला. न्यू आंबेडकरनगरमध्ये नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

न्यू आंबेडकरनगरमध्ये नागरी सुविधा द्याव्यात, परदेशवाडी पाझर तलावात कंपनीचे सांडपाणी सोडणे बंद करावे असी मागणी करण्यात आली. जलस्रोत दूषित झाल्याने हातपंपाला दूषित पाणी येत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेकाना विविध आजार जडल्याचे मोर्चेकरूंनी सांगितले़ या भागात ड्रेनेज लाइन झाली नसल्याने शौचालयाचे पाणी रस्त्यावर पसरून दुर्गंधी सुटली आहे. पक्क्या रस्त्यांअभावी वाहनधारकांची तारांबळ होत आहे, तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याने महिलाना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आदी अशा समस्यांचा पाढा नागरिकांनी वाचला. शासकीय गायरान जमिनीची नोंद स्थानिक ग्राम पंचायतने नमुना आठ वर घेऊन रहिवाशांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी करण्यात आली.

माजी सरपंच प्रवीण दुबिले यांनी मोर्चेकरूंचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. मोर्चात समाजवादी पार्टीचे फैजल खान, सय्यद मोबीन, सय्यद सरोवर, अमोल पवार, शेषराव पठारे, गणेश कांबळे, गजानन गायकवाड, प्रकाश कांबळे, सागर बत्तिसे, उषा सरदार, तारा गाडे, चंद्रकला भालेराव, नंदा सुपेकर, शांता खाजेकर, चंद्रभागा खुडे, आफरीन शेख, रंजना कांबळे, लक्ष्मी केळकर, कल्पना नाडे, संध्या पवार, रंजना गंगावणे, सागराबाई शेजूळ, सय्यद शाफिराबी आदींसह नागरिक सामील झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार गावातील नागरिकांना विषबाधा

$
0
0

खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार
म. टा. प्रितिनधी, बीड
माजलगाव तालुक्यातील उमरी, कोथ्रुळ, रोषणपुरी, छत्रबोरगाव येथे गुरुवारी ८० हून अधिक नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर माजलगाव येथील खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
गुरुवारी एकादशी असल्याने अनेक जणांचा उपवास होता. त्यात कोथरुळ, छत्र बोरगाव, रोशनपुरी व उमरी येथील नागरिकांनी उपासासाठी फराळ म्हणून अनेकांनी भगर खाल्ली. त्यानंतर काही वेळात या नागरिकांना चक्कर येणे, मळमळ होणे, उलट्या होणे असे प्रकार सुरू झाले. सुरवातीला एका घरातील दोन व्यक्तींना त्रास सुरू झाला. त्यानंतर हिच लक्षणे उमरी गावातील ३० ते ४० जणांना त्रास सुरू झाला. या गावातील अनेक नागरिकांनी भगर खाल्ल्यानेच विषबाधा झाली. यातून नागरिकांना अंबाजोगाई आणि बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. ७० ते ८० रुग्ण हे माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना देणार सौर कृषी पंप

$
0
0

चोवीस तास मिळणार कृषी पंपांना वीज; नगर परिषदांच्या पाणी पुरवठा योजनाही सौर उर्जेवर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विनाविघ्न वीज पुरवठा मिळावा यासाठी आता पारंपरिक वीज कनेक्शन न देता सौर वीज कनेक्शन दिले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महावितरणच्या वतीने शेतकऱ्यांना कृषी पंप बसवून दिले जाणार आहेत, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.
राज्यात शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपी (अश्वशक्ती) तर पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमी असलेल्या शेतकऱ्यांना ३ एचपी कृषी पंप देण्यात येणार आहे. पाच एचपी कृषीपंपाची किंमत तीन लाख ८५ हजार आहे. तर, तीन एचपी कृषीपंपाची किंमत दोन लाख ५५ हजार रुपयेआहे. हे पंप घेण्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना कृषीपंपाच्या या किंमतीच्या फक्त दहा टक्के आणि अनुसूचित जाती व अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे. महावितरण कार्यालयातर्फे पुढील पाच वर्षांसाठी कृषी पंपाची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.
औरंगाबाद विभागात सध्या ५०० आणि जालना विभागात एक हजार कृषी पंप पेंडिंग असून या योजनेतंर्गत मार्च २०१८ नंतरच्या लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना www.mahadiscom.in/solar या संकेतस्थळावर अर्ज भरावा लागणार आहे. आगामी काळात एकाही कृषी पंपाला पारंपारिक वीज कनेक्शन देण्यात येणार नाही, असेही सुरेश गणेशकर यांनी स्पष्ट केले.

महावितरणाचाही फायदा…
सौर कृषी पंप योजनेमुळे महावितरणला मोठा फायदा होणार आहे. यात वारंवार रोहित्र जळणे, तारांमुळे आगीच्या घटना तसेच वीज गळती नियंत्रणात येणार आहे. तर शेतकऱ्यांना वारंवार वीज बिलापासून मुक्ती मिळणार आहे. तसेच २४ तास वीज मिळेल. त्यामुळे पिकांना केव्हाही पाणी देता येऊ शकेल. शिवाय कृषी पंपाचे आर्थिक ओझे शेतकऱ्यावर पडणार नाही.


नगरपरिषदेच्या छोट्या पाणीपुरवठा योजनाही सौर पंपावर
औरंगाबाद भागात ग्रामपंचायत आणि नगरपरिषदेच्या छोट्या पाणी पुरवठा योजनांसाठी सौर पंप दिले जाणार आहेत. त्याअंतर्गत औरंगाबाद विभागातील २३४१ पैकी ७०९ पाणी पुरवठा योजनांसाठी सौर पंप मिळतील. जालना येथे साधारण ६०० नगरपरिषदेच्या योजनेसाठी सौर पंप बसविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘देवगिरी’ सुरू करण्याचा अवसायकांचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

येथील देवगिरी साखर कारखान्याची जमीन समृद्धी महामार्गात गेली असून मावेजा म्हणून आलेली रक्कम तब्बल पाच महिन्यांपासून 'डी.आर.टी.' कोर्टात पडून आहे. कारखान्यावरील कर्ज दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे जमिनीची रक्कम पडून आहे. परंतु, कारखान्याचे अवसायक 'वनटाइम सेटलमेंट'द्वारे कारखाना कर्जमुक्त करून कारखाना सुरू करणार असल्याचे सांगत आहेत.

देवगिरी सहकारी साखर कारखाना कर्जात बुडत असून कारखान्याची सावंगी येथील २१ एकर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. त्यापोटी २६ ते २७ कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आहे. तो पाच महिन्यांपूर्वीच जमा झाला आहे.

कारखाना सुरू असताना कामगार व कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून वेतन मिळाले नव्हते. त्यामुळे कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, त्यातच कारखाना बंद अवस्थेत आहे. कामगारांची अवस्था अत्यंत वाईट असून कारखाना सुरू झाल्यास त्यांना दिलासा मिळणार आहे. कारखाना सुरू व्हावा अशी कामगार, तालुक्यातील शेतकऱ्यांची इच्छा आहे. परंतु, कारखान्याच्या कर्जाचे व्याज सतत वाढत असल्याने परिस्थिती निराशाजनक आहे. मोबदल्यापोटी मिळालेल्या रकमेतून नेमके काय साध्य होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. पण, कारखाना सुरू करणार, असल्याचे अवसायक सांगत असल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

समृद्धी महामार्गाकडून मिळालेल्या रकमेतून कारखान्यावरील बँकेचे कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 'वनटाइम सेटलमेंट' योनजेचा लाभ मिळवण्यासाठी एमएससी बँकेकडे प्रयत्न सुरू आहे. कर्मचाऱ्यांनाही चार ते साडे चार कोटी रुपये द्यायचे आहे. कारखाना कर्जमुक्त करून पुढील काळात चांगला पाऊस झाल्यास कारखाना सुरू करण्यासाठी प्रयन सुरू आहे.

-शेख रशीद, अवसायक, देवगिरी सहकारी साखर कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूरमध्ये उच्छाद; सहा दुकाने फोडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

एकाच रात्री शहरातील विविध परिसरातील सहा दुकाने फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह साहित्य लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शहरातील स्टेशन रस्त्यावरील लक्ष्मी मेडिकल व श्रद्धा मेडिकल, अजंठा हार्डवेअर व गंगापूर रस्त्यालगत असलेले गौरव मेडिकल, सुयोग मेडिकल व कार्तिकी बिअर शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह साहित्य लंपास केले. काही ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. बिअर शॉपीमधून दारूच्या काही बाटल्या व मेडिकलमधून साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस नाईक राहुल थोरात, रज्जाक शेख, भरत चव्हाण आदींनी घटनास्थळी भेट दिली.

\Bचारचाकी वाहनातून आले दोन चोर \B

पोलिसांनी चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेच्यातील फुटेज तपासले असता चारचाकी वाहनातून दोन चोरट्यांनी येऊन हा प्रकार केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णमहोत्सवी संस्था

$
0
0

मराठवाडा मित्रमंडळाचा आज (दि. १९) सुवर्णमहोत्सव! मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी पुणे-मुंबईकडे वसतिगृहाची सोय असावी, या हेतूने सुरू झालेल्या संस्थेचा आता विविध महाविद्यालये असलेला मोठा वटवृक्ष झाला आहे. संस्थेचा प्रवास मांडणारा हे लेख...

- नागनाथ कोत्तापल्ले

मराठवाड्यातील कोरडवाहू शेती, अनावृष्टी आणि पुन्हा पुन्हा येणारे दुष्काळ यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थी बनारसपर्यंत शिकायला जात. स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित राहिलेला मराठवाडा राज्यातील इतर प्रांतांच्या तुलनेत कायम मागेच राहिला आहे. मेटाकुटीला आलेल्या मराठवाड्यातील जनसामान्यांना एक मोठा आधार मिळाला, तो मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठीच्या मुंबई- पुण्यातील वसतिगृहांमुळे.

पन्नास वर्षांपूर्वी माननीय शंकरराव चव्हाण यांनी पुण्यास (आणि मुंबईसही) मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती केली. जी मुले पुण्याला शिकायला येतील, त्यांची निदान राहण्याची सोय तरी व्हावी, असा मर्यादित आणि प्रमुख उद्देश होता. माझ्या स्मरणाप्रमाणे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे या वसतिगृहात राहूनच शिकले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी विभागप्रमुख तेज निवळीकरही याच वसतिगृहात होते. त्यांच्यासारखे हजारो विद्यार्थी या वसतिगृहात राहून शिकले. शंकरराव चव्हाण आणि स. मा. गर्गे यांचे मराठवाडा मित्रमंडळ वसतिगृहाचे कार्य न विसरता येण्यासारखे आहे; परंतु मराठवाडा मित्रमंडळाच्या कार्याला खरी कलाटणी मिळाली, ती मित्रमंडळाने वाणिज्य महाविद्यालय काढले, तेव्हा.

त्यानंतर मराठवाडा मित्र मंडळ केवळ वसतिगृह राहिले नाही. तर ती एक मोठी शिक्षण संस्था झाली आहे. वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून भाऊसाहेब जाधव रुजू झाले आणि संस्थेचा तोंडवळा बदलू लागला. संस्थेची घोडदौड सुरू झाली. विलासराव देशमुख संस्थेचे अध्यक्ष झाल्यानंतर या घोडदौडीला वेग आला. विलासराव देशमुख, भाऊसाहेब जाधव, शिवाजीराव गणगे आणि इतर कार्याकारिणीच्या सदस्यांमुळे संस्थेचा विस्तार होऊ लागला. वाणिज्य महाविद्यालयाच्या पाठोपाठ अनेक अभ्यासक्रम निर्माण झाले. आज तर तीन अभियांत्रिकी महाविद्यालये, लॉ कॉलेज, फार्मसी, पत्रकारिता आणि इतर अभ्यासक्रम आहे. काही शाळाही आहेत. वसतिगृहाची शिक्षणसंस्था झाली आणि तिचा विस्तार एखाद्या वटवृक्षासारखा झाला आहे. या सगळ्यांमागे संपूर्ण कार्यकारिणी तर आहेच; पण गणगे आणि प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांचे लोभस व्यक्तिमत्त्व, जिद्द आणि द्रष्टेपण आहे.

विस्ताराप्रमाणेच गुणवत्तेतही सर्वच महाविद्यालये अग्रेसर आहेत. प्रत्येक महाविद्यालय 'ए प्लस' श्रेणीत आहे. येथे प्रवेश मिळावा, अशी असंख्य विद्यार्थ्यांची इच्छा असते. मराठवाडा मित्रमंडळ हे संस्थेचे नाव असले, तरी आता केवळ मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनाच तेथे प्रवेश मिळतो, असे नाही. आता तेथे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. एकप्रकारे तेथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांपुढेही गुणवत्ता वाढवण्याचे हे मोठे आव्हान आहे. संस्थेला ५० वर्षे होत आहेत. येथून पुढे गुणवत्ता आणि विस्तार या दोन्ही दृष्टीने वाटचाल करायची आहे आणि ती नक्की होईल, अशी मला खात्री आहे.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारांनी कोणती कामे केली ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या वीस वर्षांपासून औरंगाबाद लोकसभेतून शिवसेनेचा खासदार निवडून येतो, पण आजही जिल्ह्याचे प्रश्न कायम आहेत. खासदारांचा कारभार संपूर्ण जनता पाहत आहे. त्यांनी कार्यकाळात शहरात कोणती विकासाची कामे केली, असा सवाल करत आगामी लोकसभा लढवणाऱ्या सगळ्या पक्षांच्या इच्छुकांची संख्या पाहता यावेळी खैरेंचा पराभव निश्‍चित आहे, असे दावा आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. चव्हाण म्हणाले, औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीने लढवावी, या संदर्भात शरद पवार यांनी संकेत दिले आहेत. गेल्या २० वर्षांपासून काँग्रेस औरंगाबादमधून पराभूत होत असेल, तर प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात यावी, अशी मागणी आम्ही आगोदरच केली होती. आता जागेच्या निश्चितीबद्दल अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. महापालिकेत शिवसेना २५ वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र, शहराचे प्रश्न जैसे थे आहेत. शहरातील पाणीप्रश्न मिटावा म्हणून समांतर योजनेसाठी शरद पवार यांनीच निधी मिळवून दिला. पाण्याप्रमाणेच शहरात कचऱ्याचाही मोठा प्रश्न कायम आहे. जालना रोडवर व्हीआयपींची वर्दळ असल्यामुळे हा रस्ता वगळता इतर शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे. याचा तोटा शिवसेनेला निवडणुकीत सहन करावा लागेल. शहरात तसेच जिल्ह्यात कोणतेही विकासकामे न केल्यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये रोष असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला.

\Bस्कायबस कुठल्या जन्मात होईल?

\Bसरकारमधील मंत्री मोठ्या प्रमाणावर परदेशवाऱ्या करत असतात. तिकडची कोणतीही गोष्ट बघितली तर आपल्याकडे आणायचा विचार करतात. स्कायबसही त्यातलाच प्रकार असून, ही स्कायबस औरंगाबाद शहरात कुठल्या जन्मात होणार हे माहित नसल्याचे सांगत सरकारच्या घोषणांची खिल्ली उडवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नशेच्या गोळया विकणारे सात जण ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

नशेच्या आहारी गेलेल्या एका मुलाने पोटात कात्री खुपसून रहेमानिया कॉलनीत एकाचा खून केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी नशेच्या गोळ्या विकणाऱ्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी गुरुवारी मध्यरात्री विविध ठिकाणी कारवाई करत 'नायट्रोसीन'च्या दीड हजार गोळ्यांचा साठा जप्त करत सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.

शहरात अल्पवयीन मुलांकडून नशेच्या गोळ्या, व्हाइटनर आदींचा वापर नशा करण्यासाठी होत आहे. या मुलांना ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले. शहरातील जिन्सी, मुकुंदवाडी, रामनगर, प्रकाशनगर, टाऊन हॉल, आंबेडकरनगर, मिसारवाडी, ब्रिजवाडी, रांजणगाव, काबरानगर या सारख्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या नशेच्या गोळ्या विकरण्यात येतात. रहेमानिया कॉलनी येथील खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी या अवैध विक्रेत्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. पोलिस उपायुक्त डॉ. खाडे यांनी पथके स्थापन करून नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांच्या घरांवर छापे मारून साठी जप्त करत सात संशयितांना ताब्यात घेतले.

…प्रकाशनगर, मुकुंदवाडी भागात पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार अनिल माळवे हा अवैधरित्या 'नायट्रोसन' या गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्याच्या घरी छापा मारला असता त्याची पत्नी घरात होती. घरझडतीत किचन ओट्याखाली नायट्रोसन गोळ्याच्या ४४ स्ट्रीप सापडल्या. अन्न आणि औषधी निरीक्षक वर्षा महाजन यांनी या गोळ्यांची तपासणी केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात माळवे पती-पत्नी विरुद्ध औषधे आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. यामध्ये काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तसेच जवळपास दीड हजार गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. यापुढे देखील नशेची साधने विकणाऱ्यांवर कारवाईची सुरूच राहणार आहे.

-डॉ. राहुल खाडे, पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजा भवानी मंदिरात चोरी, मंगळसुत्रासह ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

चोरांनी मंदिरांना पुन्हा लक्ष्य केले असून गारखेडा-पुंडलिकनगर भागातील तुळजाभवानीचे मंदिर फोडून मंगळसूत्रासह साडेबारा हजारांचा ऐवज गुरुवारी रात्री चोरून नेला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरात मंदिर फोडून ऐवज लांबवण्याचा हा तिसरा प्रकार आहे. यापूर्वी राजाबाजार येथील संस्थान गणपती व बीड बायपास येथील दत्त मंदिरात चोऱ्या झाल्या आहेत.

याप्रकरणी शोभा प्रकाशराव गोरे (वय ६५, रा. गिरीजादेवी हौसिंग सोसायटी, पुंडलिकनगर रोड, गारखेडा) यांनी तक्रार दिली आहे. गोरे याच्या सोसायटीत तुळजाभवानीचे मंदिर आहे. येथे प्रवीण कुलकर्णी यांची पुजारी म्हणून नियुक्ती केली आहे. आरतीनंतर गुरुवारी रात्री आठ वाजता मंदिराच्या गेटला दोन कुलूप लावून महिला घरी गेल्या. पुजारी कुलकर्णी हे शुक्रवारी पहाटे मंदिर उघडण्यासाठी चावी घेऊन गेले, पण त्यांना दुसरीच कुलपे दिसली. त्यांनी ही माहिती सोसायटीमधील रहिवाशांना दिली. भाविकांनी पाहिले असता गेटचे कुलूप सहज उघडले. चोरांनी एक ग्रॅमचे मंगळसूत्र, दोन पितळी समया, पितळी घंट्या, दानपेटीतील नाणी आणि नोटा, तांब्याचे भांडे, ताट, पंचपाळ आदी साडेबारा हजारांचा ऐवज चोरल्याचे निष्पन्न झाले.

\B…तिसरी घटना\B

२३ डिसेंबर रोजी शहराचे दैवत संस्थान गणपतीची दानपेटी दोन चोरट्यांनी पळवली, दुसऱ्या दिवशी हे आरोपी पोलिसांच्या हाती लागले. यानंतर १० जानेवारी रोजी बीड बायपास वरील दत्त मंदिरात शिरून दानपेटी लंपास केली. या चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यानंतर ही तिसरी चोरी करून चोरांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेसमोर उडी घेत तरुणाची आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद: रेल्वे समोर उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी नगरनाका जवळील रेल्वे उड्डाणपुलाखाली घडला. या तरुणाच्या खिशात राम पांडुरंग घोडके (वय ३८) नावाचे आधार कार्ड सापडले असून धानोरा अहमदपूर येथील रहिवासी असल्याचे दिसून येत आहे. या तरुणाच्या खिशात पनवेल-लातूर रोड एक्स्प्रेसचे गुरुवार दुपारचे रेल्वे तिकीट आढळले आहे. या तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोवंश मांस, जनावरे वैजापूरमध्ये जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

हैदराबाद येथे गोवंश मांस विकण्यासाठी मिल्लतनगर भागात गायींची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा मारला. यावेळी पोलिसांनी २५ जीवंत जनावरे, १५ क्विंटल गोवंश मांस व कत्तलीचे साहित्य, असे दोन लाख ९५ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी एकाला अटक केली असून दोन जण पळून गेले.

मुसा कुरेशी यांच्या वाड्यात जनावरे ठेवली असून तेथे कत्तल केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, एपीआय भगवान डांगे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय खोकड, शेख, थोरात, तमनर, चव्हाण, पठारे, जऱ्हाड, गिते यांच्या पथकाने रात्री साडे दहाच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी तेथे शासनाने बंदी घातलेले गोवंश मांस सापडले. या कारवाईत वसीम उस्मान कुरेशी (वय ३३) याला अटक केली असून शाहेद उस्मान कुरेशी व शोएब उस्मान कुरेशी (सर्व रा. खान गल्ली) हे दोघे पळून गेले. वसीम याला दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी एपीआय डांगे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्व वैजापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर उतरले रस्त्यावर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इतक्या दिवस आपला संताप मुकाट आत पचवणारे सर शुक्रवारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होत रस्त्यावर उतरले. जुनी पेन्‍शन योजना लागू करा, कायम विनाअनुदानित तत्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ट महाविद्यालयाची यादी घोषित करून अनुदान द्या, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानित करा यासह इतर मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

संघटनेने यापूर्वी या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलने केली. या पार्श्वभूमीवर गेल्या साडेचार वर्षात शिक्षणमंत्र्यांनी बैठकीमध्ये मागण्या मान्य केल्या, तसेच लेखी आश्वासनही संघटनेस दिले. विधिमंडळामध्ये निवेदनही दिले. मात्र, गेल्या दहा महिन्यांत सातत्याने पाठपुरावा करूनही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना निवडश्रेणी फक्त २० टक्के शिक्षकांना देण्याची अट असल्यामुळे त्याचा लाभ सर्वांना मिळत नाही. ही अट शिथिल करण्यात यावी आणि सातव्या वेतन आयोगामध्ये राज्य सराकरी कर्मचाऱ्यांना लागू केलेली दहा, वीस व तीस वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांनाही लागू करावी, सहाव्या वेतन आयोगात ग्रेडपे संदर्भातील अन्याय दूर करून सातवा वेतन आयोग लागू करावा. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची शैक्षणिक अर्हता पदव्युत्तर पदवी व बीएड असल्याने त्यांना सेवाकालावधी कमी मिळतो. त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय तातडीने ६० वर्षे करण्यात यावे, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. अनेक आंदोलने करूनही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्य महासंघाने टप्प्या टप्प्याने राज्यभर आंदोलने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ११ जानेवारी रोजी राज्यातील सर्व तालुक्यातील तहसील, तर १८ जानेवारी रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे करण्यात आली. आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ३० जानेवारी रोजी मूकमोर्चा काढण्यात येणार असून शिक्षण उपसंचालक, विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्षांमार्फत शासनाला निवेदन पाठवण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील तसेच सहचिटणीस प्रा. संभाजी कमानदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

\Bआंदोलकांच्या मागण्या

\B- जुनी पेन्शन योजना लागू करा

- सातवा वेतन आयोग लागू करा

- निवडश्रेणी अट रद्द करावी

- आश्वासित प्रगती योजना लागू करा

- सेवानिवृत्ती वय ६० वर्षे करावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल जेलजवळून आरोपीचे पलायन

$
0
0

औरंगाबाद: न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेला मोटारसायकल चोरी प्रकरणातील संशयित आरोपी बाबासाहेब सांडू त्रिभुवन (वय २८, रा. वेरूळ) हा हर्सूल जेलच्या कमानीजवळून पळून गेला. त्याला हर्सूल जेलमध्ये दाखल करण्यासाठी खुलताबाद पोलिस ठाण्याचे एएसआय शंकर लक्ष्मण भोसले व शिपाई सुभाष खरमुटे हे मोटारसायकलवरून घेऊन आले होते. त्यावेळी तो उडी मारून पळून गेला. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती. त्रिभुवन याला खुलताबाद पोलिसांनी वेरूळमध्ये बुधवारी रात्री गुन्हा घडल्याच्या १२ दिवसानंतर पकडले होते. त्यानंतर खुलताबाद न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याचे मोबाइलवर चित्रिकरण करून बदनामीची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी आकाश उर्फ सचिन सतीश साबळे (वय २१, रा. आंबेडकरनगर) याला शुक्रवारी (१८ जानेवारी) अटक करून कोर्टात हजर केले. आरोपीला शुक्रवारपर्यंत (२५ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दिले. याच गुन्ह्यात यापूर्वी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाची रवानगी बुधवारी (१६ जानेवारी) रिमांड होममध्ये करण्यात आली आहे.

पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, मुलीचे शिक्षण आठवीपर्यंत झाले असून तिची आई आजारी असल्याने तिने शाळा सोडली आहे. सोमवारी (१४ जानेवारी) सायंकाळी मुलगी शौचासाठी एमआयडीसी सिडको परिसरातील ग्रीव्हज कॉटन कंपनी शेजारच्या मैदानात गेली असता आकाश उर्फ सचिन सतीश साबळे व त्याचा अल्पवयीन मित्र तेथे दुचाकीवरून आले. त्यांनी मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अंधारात नेले व जिवे मारण्याची धमकी देत दोघांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. तसेच दोघांनी तिच्यावर अत्याचार करताना मोबाइलवर चित्रण केले. त्यानंतर दोघांनी मुलीला बळजबरी बिअर पाजून मिसारवाडी रस्त्यावर सोडले. तसेच 'तू जर घरी घडलेला प्रकार सांगितला तर तुझे काढलेला व्हिडिओ सर्वांना दाखवू व तुझी बदनामी करू' अशी धमकी देत पळून गेले. प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी आकाश याला अटक करण्यात आली.

\Bमोबाइल जप्त करणे बाकी

\Bअत्याचार करताना चित्रीकरण केलेला मोबाइल जप्त करणे, आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे, त्याच्या साथीदाराचा शोध घ्यायचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच कंपन्यांना मनपाचे टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कराच्या थकित वसुलीसाठी महानगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी चिकलठाणा एमआयडीसी येथील पाच बंद कंपन्यांना सील करून टाळे ठोकले. गोल्डन ड्रिम्स, एम. के. पॅकेजिंग, प्रकल्प प्रा. लि. वैशाली अॅरोमॅटीक्स आणि तरवडे ट्रान्सपोर्ट या कंपन्याचा यामध्ये समावेश आहे. या कंपन्याकडे ३० लाख ६५ हजारांचा कर थकला आहे.

मनपाचे मालमत्ता करापोटी सुमारे ३४२ कोटी रुपये थकित आहे. यामध्ये निव्वळ थकबाकी २२२ कोटींची असून १२० कोटी रुपये व्याज आणि दंडाची थकित रक्कम आहे. मालमत्ता धारकांकडून हा कर भरण्यासंदर्भात टाळाटाळ होत आहे. वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे मनपाच्या तिजोरीत खडखडाट असून आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. कंत्राटदारांची देखील १८५ कोटी रुपयांची देयके थकल्याने विकासकामे रखडली आहेत. थकित कराची वसुली विविध मोहीम राबवूनही होत नसल्याचे दिसत आहे. या प्रकरणी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी वॉर्ड कार्यालयांना कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देत कारवाईचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी मनपाच्या वॉर्ड कार्यालय क्रमांक पाचच्या वसुली पथकाने चिकलठाणा एमआयडीसीत जप्तीची कारवाई केली. या पाच कंपन्यांना मनपाच्या पथकाने टाळे ठोकत जप्ती केली. २०१४ पासून या कंपन्याकडे एकूण ३० लाख ६५ हजार ३७४ रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. वारंवार नोटीस देऊनही प्रतिसाद दिला नसल्याने ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती वॉर्ड अधिकारी कमलाकर ज्ञाते यांनी दिली. उपायुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या आदेशाने कर निर्धारक महावीर पाटणी, पथक प्रमुख नंदकुमार विसपुते, व्यंकट जाधव, रमेश मोरताळे, योगेश डुकळे, शेख सलाऊद्दीन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चौकट

सील केलेली कंपनी थकित कर

गोल्डन ड्रिम्स टेक्नोपार्क २६ लाख ६४ हजार ८१३ रुपये

ए.के. पॅकेजिंग १ लाख ३१ हजार ९०० रुपये

प्रकल्प प्रा.लि. १ लाख ३ हजार ९१४ रुपये

वैशाली अ‍ॅरोमॅटीक्स १ लाख ३९ हजार ९४० रुपये

तरवडे ट्रान्सपोर्ट २४ हजार ८०७ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images