Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बसस्थानकातून ५० ग्रॅम चरस जप्त

$
0
0

औरंगाबाद: मध्यवर्ती बसस्थानकात चरस विकणारा माजेद खान महेबुब खान (वय ४०, रा. भोईवाडा) याला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून दहा तोळे चरस जप्त करण्यात आले. हा संशयित आरोपी दुचाकीवरून चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली होती. त्यावरून सापळा रचून माजेदखानला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ दहा तोळे चरस सापडले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अमली पदार्थ द्रव्य विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारभावानुसार एक ग्रॅम चरसची किंमत पाच हजार रुपये असल्याची माहिती माजेदखानने पोलिसांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नृत्याविष्काराचे मनोहारी दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नादमाधुर्याची अनुभूती देणारे मरदल वादन, उत्तम पदलालित्याचा ओडिसी नृत्याविष्कार आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारे पेरिणी नाट्यम् रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. शारंगदेव महोत्सवाच्या पहिल्या दिवशी या तीन कलाप्रकारांनी रसिकांना खिळवून ठेवले. लक्षवेधी नृत्य, गायन आणि वादनाने सादरीकरण उठावदार झाले.

महागामी संस्थेच्या दहाव्या शारंगदेव महोत्सवाचा पहिला दिवस एमजीएम कॅम्पसच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी रंगला. दिवंगत गुरू बनमाली महाराणा यांच्या शिष्यांच्या मरदल वादनाने महोत्सवाला सुरुवात झाली. मरदल वाद्य ओरिसातील मंदिरात वाजवतात. या एकल वाद्याचे सुरेंद्र महाराणा आणि मानस सरंगी यांनी वादन केले. दुसऱ्या सत्रात पार्वती दत्ता आणि शिष्यांनी ओडिसी नृत्य सादर केले. 'वाद्य पल्लवी'द्वारे पारंपरिक रचनांचे मनोहारी दर्शन घडवले. पार्वती दत्ता यांची संकल्पना असलेल्या नृत्याला विशेष दाद मिळाली. त्यांना दर्शना कणसे, अश्विनी तिवारी, वैभवी पाठक, ऐश्वर्या मुंदडा, सिया बेंबडे, भार्गवी मेयेकर, शीतल भांबरे यांनी नृत्य साथसंगत केली. मनोज देसाई, श्रीया दीक्षित, निरंजन भालेराव आणि मनोज देसाई यांनी संगीत साथसंगत केली. पहिल्या दिवसाची सांगता हैदराबाद येथील कलाकारांच्या 'पेरिणी नाट्यम'ने झाली. पेरिणी तांडवम पुरुष कलाकारांनी आणि पेरिणी लास्यम स्त्री कलाकारांनी सादर केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बनमाली यांना मरणोत्तर पुरस्कार

यंदाचा 'शारंगदेव सन्मान' पुरस्कार भुवनेश्वर येथील प्रसिद्ध मरदल वादक गुरू बनमाली महाराणा यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांचे पुत्र सुरेंद्र महाराणा यांनी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी मंजिरी सिन्हा, पार्वती दत्ता आणि प्राचार्य प्रताप बोराडे उपस्थित होते. नोव्हेंबर महिन्यात बनमाली यांचे निधन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात्रीने खून, रवानगी न्यायालयीन कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कात्रीने घरमालकाचा खून केल्याच्या प्रकरणातील सूत्रधार व आरोपी शेख उस्मान शेख चाँद याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी शुक्रवारी (१८ जानेवारी) दिले.

या प्रकरणी मृत समदखान अहेमदखान (वय ४०, रा. कैसर कॉलनी, औरंगाबाद) यांचा चुलत भाऊ फिरोजखान मुसाखान (वय ३५, रा. बारी कॉलनी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मृत समदखान व त्यांच्या भावाची रहेमानिया कॉलनीत तीन मजली इमारत असून, त्यातील १३ खोल्या भाड्याने दिल्या आहेत. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आरोपी शेख उस्मान शेख चाँद (५२, रा. रहेमानिया कॉलनी) याचा डोळा होता. त्यातूनच आरोपी उस्मान खान हा त्याचे नातेवाईक असलेल्या दोन अल्पवयीन आरोपींना हाताशी धरुन इमारतीमध्ये राहणाऱ्या भाडेकरुंना मारहाण करुन दहशत निर्माण करीत होता. त्याचाच भाग म्हणून ८ डिसेंबर २०१८ रोजी भाडेकरू इस्माइल खान इद्रिस खान यांना दारुसाठी पैसे मागण्याच्या निमित्ताने दोन्ही अल्पवयीन आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याच मारहाणीबाबत समदखान यांनी आरोपी उस्मानखानला भेटून, 'तुझ्या माणसांना समजावून सांग', असे सुनावले होते. त्याच रागातून उस्मानखान याने दोन्ही अल्पवयीन आरोपींना हाताशी धरुन समदखान याचा काटा काढण्याचे ठरवले होते. १२ जानेवारी रोजी समदखान हे भाडेकरुला झालेल्या मारहाणीबाबत विचारपूस करण्यासाठी अल्पवयीन आरोपींना भेटायला गेले असता, अल्पवयीन आरोपींनी समदखान यांच्या छाती व पोटावर कात्रीने गंभीर वार केले होते. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भादंवि ३०२, १२० (ब) कलमन्वये जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात दोन्ही अल्पवयीन आरोपींना १२ जानेवारी रोजी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली होती, तर आरोपी उस्मानखान याला १३ जानेवारी रोजी अटक करुन त्याला शुक्रवारपर्यंत (१८ जानेवारी) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडर स्फोटातील ८ जखमी घाटीमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेवगा (ता. जि. औरंगाबाद) गावातील रहिवासी असलेल्या सिलिंडर स्फोटातील आठ जखमी महिला व मुलांना शुक्रवारी (१८ जानेवारी) सायंकाळी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ५ महिला, १६ महिन्यांचा चिमुकला आणि १० व १२ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश आहे. या रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड बायपासवर कंटेनरने चिरडल्याने एक ठार तीन जखमी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मित्राचा अंत्यविधी आटोपून घरी परतणाऱ्या चार मित्रांना कंटेनरने चिरडले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बीड बायपास रोडवरील पटेल लॉन्स समोर गुरुवारी पहाटे दोन वाजता हा भीषण अपघात घडला. सोहेलखान तालीबखान (वय २०, रा. बारुदगरनाला, जुना बाजार) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, शुक्रवारी या अपघातावर उपाययोजना करण्यासाठी संतप्त नागरिकांनी बीड बायपासवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सातारा पोलिसांनी त्यांची समजूत घातली.

गुरुवारी रात्री मृत सोहेलखान आणि त्याचे मित्र शेख हमजा शेख हमीद, शेख वहीम शेख लकीब (वय १९) तसेच शेख अमेर शेख बाबू (वय १९ सर्व रा. जुनाबाजार) हे मित्राच्या अंत्यविधीसाठी दुचाकीवर बीड बायपास परिसरात गेले होते. अंत्यविधी झाल्यानंतर हे चौघे पहाटे दोन वाजता घरी परतत होते. यावेळी बीड बायपासवरील पटेल लॉन्स समोरील मिनाज हॉटेलसमोर ते लघुशंकेसाठी थांबले होते. दरम्यान बीडकडे जात असलेल्या एका भरधाव कंटेनरने त्यांना धडक देत चिरडले. यावेळी मोठा आवाज झाल्याने इतर वाहनधारकांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघात झाल्याचे लक्षात येताच कंटेनरचालक कंटेनरसहीत पसार झाला. नागरिकांनी चौघांना जखमी अवस्थेत घाटीत हलविले. यावेळी डॉक्टरांनी तपासून सोहेलला मृत घोषित केले. उर्वरीत तीनही मित्रांवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शेख हमजाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अती दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पीएसआय सागर कोते तपास करीत आहेत.

संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रोड हा मृत्युचा सापळा रचत आहे. या ठिकाणी होणाऱ्या अपघातावर अंकूश आणण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने स्पीड गन, अवजड वाहनांना गर्दीच्या वेळी बंदी आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, तरी देखील या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. सोहेलखानच्या मृत्यूनंतर शुक्रवारी सकाळी या भागातील नागरिकांनी रास्ता रोको केला. मात्र, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, वाहतूक शाखेचे निरीक्षक भारत काकडे यांनी नागरिकांची समजूत काढल्याने नागरिकांनी रास्ता रोको मागे घेतला.

चौकट

अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू

सोहेलखान आणि मित्रांना कंटेनरने चिरडले अथवा टँकरने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच हे चौघे एकाच दुचाकीवर होते का याचा देखील तपास करण्यात येणार आहे. अपघातानंतर अवजड वाहनासह चालक पसार झाला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून या पसार वाहनाचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर कोटींच्या रस्त्यांचे सोमवारपासून काम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरवासियांसाठी एक आनंदाची बातमी. इतक्या दिवस यादीवरून, निधीवरून वारंवार गाजलेल्या शंभर कोटी रस्त्यांच्या कामाला अखेर मुहूर्त लागणार असून, सोमवारपासून ही कामे सुरू होणार आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

सविस्तर पान - ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचन मर्यादांवर जगभर चिंता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुतेक देशांना शेतीसाठी पाणी टंचाईचा मुद्दा भेडसावत असल्यामुळे सूक्ष्म सिंचनाच्या पद्धतीत नवनवीन संशोधन सुरू आहे. महागडे ठिबक सिंचन तंत्रज्ञान आणि वारंवार दुरुस्तीचा खर्च या प्रमुख समस्या आहेत. जगभरातील तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ उपाय शोधण्यासाठी कार्यरत आहेत. जगभरात सूक्ष्म सिंचनाच्या समस्या सारख्याच असल्याचे मत विविध देशाच्या अभ्यासकांनी मांडले.

नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेत शेवटच्या दिवशी सिंचनातील तांत्रिक मुद्द्यांवर विविध सत्रात चर्चा झाली. हॉटेल अजंठा अॅम्बेसेडर येथे शुक्रवारी परिषद पार पडली. 'न्यू इनोव्हेशन्स अँड प्रॉडक्ट' विषयावर परिसंवाद झाला. 'आयसीआयडी'चे अध्यक्ष डॉ. ए. के. रणदेव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी, इटलीचे डॉ. मार्को आर्शिरी, प्रोफेसर वाय. इ. यिल्दिरीम, इस्माइल तास, प्रमोदकुमार सिंग, 'सीडब्ल्यूसी'चे संचालक पी. डी. राव आणि राजीव कुमार यांनी परिसंवादात सहभाग घेतला. इटलीतील सूक्ष्म सिंचन पद्धतीवर मार्को यांनी माहिती दिली. 'जर्मनीत १८६० मध्ये ठिबक सिंचनचा वापर सुरू झाला. मातीच्या पाइपद्वारे पारंपरिक पद्धतीने ठिबक करण्यात आले होते. सिमचा ब्लास यांनी जॉर्डन खोऱ्यात नव्याने ठिबकचा वापर केला. १९६० मध्ये त्यांनी प्लास्टिक पाइपद्वारे ठिबक सिंचन करण्यात यश मिळवले. इटलीचे शेतकरी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करीत आहेत. कमी किमतीच्या ठिबक साहित्य निर्मितीचे काम सुरू आहे. खत आणि पाणी बचत हे प्रमुख फायदे दृष्टिपथात आहेत. पण, सतत नळ्यांचे कोंडणे आणि क्षारयुक्त पाण्याचा अडथळा दुरुस्तीला कारणीभूत ठरत आहे. जगभरात ही समस्या दिसत आहे. त्यामुळे महागडे तंत्रज्ञान आणि दुरुस्तीवर संशोधन अपेक्षित आहे,' असे डॉ. मार्को म्हणाले.

तुर्कस्तानमधील सूक्ष्म सिंचन पद्धतीवर प्रोफेसर यिल्दिरीम यांनी भाष्य केले. 'तुर्कस्तानमध्ये पाणीपुरवठा वाढविणे मोठे आव्हान आहे. अन्न व पाणी सुरक्षेसाठी पाण्याचा जपून वापर करण्याचे धोरण अवलंबिणे गरजेचे आहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष दिले आहे. सर्व क्षेत्रांपैकी फक्त कृषी क्षेत्राला ७४ टक्के पाणी पुरविले जाते. त्यामुळे पीक उत्पादकता, पाण्याचा सुयोग्य वापर आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. पाणी बचतीसाठी ठिबक आणि तुषार सिंचनात आधुनिक प्रयोग केले आहेत' असे यिल्दिमिर यांनी सांगितले. इतर तज्ज्ञांनीही ठिबक सिंचनाच्या पारंपरिक वापराला पर्याय शोधण्याची गरज व्यक्त केली. तंत्रज्ञान तुलनेने स्वस्त आणि सुलभ झाल्यास वापर वाढेल असा मुद्दा तज्ज्ञांनी चर्चेत अधोरेखित केला.

\Bनवीन ठिबक प्रणाली वापरा\B

पारंपरिक ठिबक सिंचन पद्धतीत पाण्याचा अपव्यय जास्त आहे. 'अल्ट्रा लो ड्रिप इरिगेशन' पद्धत वापरल्यास पाणी बचत होते. या पद्धतीत पिकांना अडथळा ठरणारे गवत येत नाही. शिवाय पाणी थेट मुळापर्यंत जात असल्यामुळे या पद्धतीचा फायदा जास्त असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ठिबकच्या नळ्या उंदीर कुरतडत असल्याने नुकसान होते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. इस्रायलमध्ये शेतात घुबडांसाठी झाडावर घरटी केली आहेत. एक घुबड महिनाभरात एक हजार उंदीर खात असल्यामुळे उंदरांचा बिमोड करणे सोपे झाले. अशा पद्धती वापरून ठिबक सिंचनचा प्रभावी वापर करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

\Bसौर पंप ठरतील वरदान

\B

'सोलार पॉवर इंटिग्रेशन' विषयावरील परिसंवादात सौर पंपाचे फायदे तज्ज्ञांनी नमूद केले. या परिसंवादात ए. एन. एन. प्रसाद, 'डब्ल्यूटीसी'च्या शास्त्रज्ञ नीलम पटेल, पद्माकर वामन, पुनीत केळकर, नीरज शर्मा, वाराप्रसाद राव, चंद्रमोहनसिंग अधिकारी, अमित शर्मा सहभागी झाले. पिकांना पाणी देण्यासाठी भारतातील ५५ टक्के शेतकरी विद्युत मोटार वापरतात. सौर पंप वापरल्यास वीज बिल वाचणार असून खर्चात बचत होईल. याबाबत केंद्र सरकारने योजना जाहीर केल्या आहेत. सौर पंप खरेदी केल्यानंतर किमान तीन वर्षे दुरुस्ती आणि तांत्रिक मदत करणे संबंधित कंपनीला बंधनकारक आहे, असे नीलम पटेल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीजोड प्रकल्पांना राज्यांचा अडथळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशात सरासरी ११०० मिलिमीटर पाऊस पडत असला तरी पाण्याचा असमतोल राज्या-राज्यात वाद निर्माण करीत आहे. पिकाला ३८ टक्के पाण्याची गरज असताना अडीचपट जास्त पाणी दिले जात आहे. पाणीसाठे वाढवणे आणि कमी पाणी वापर यातून टंचाईवर मात करता येईल. राज्यात मतभेद असल्याने नदीजोड प्रकल्पासारख्या योजना लवकर पूर्णत्वास जाणे सहज शक्य नाही' असे नदी विकास विभागाचे केंद्रीय सहसचिव यू. पी. सिंग यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेच्या सांगता समारंभाला पाणीपुरवठा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे केंद्रीय सहसचिव यू. पी. सिंग, एस. मसूद हुसेन, आर. के. गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभानंतर सिंग यांनी पत्रकार परिषदेत सूक्ष्म सिंचन वाढवण्यासाठी सरकार करीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 'देशात एकूण पाण्यापैकी ८० टक्के पाणी शेतीसाठी वापरतात. पिकाच्या गरजेपेक्षा अडीचपट जास्त पाणी दिले जात आहे. या स्थितीत शेतकऱ्यांत जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. अर्थात, केंद्र आणि राज्य सरकार अनुदान देऊन प्रयत्न करीत आहे. महागडे ठिबक तंत्रज्ञान आणि त्याच्या वापराबाबत अनभिज्ञ शेतकरी या प्रमुख समस्या आहेत. पण, अनेक कंपन्या सूक्ष्म सिंचन साहित्य निर्मितीत उतरल्यामुळे उपकरणे भविष्यात स्वस्त होईल अशी अपेक्षा आहे. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन याद्वारे सिंचन होते. या तंत्रज्ञानातही बरेच बदल होत आहेत. पारंपरिक पद्धतीने पाणी दिल्याने अपव्यय होत असे. विविध राज्यात सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढणे ही अभिमानास्पद बाब आहे,' असे सिंग यांनी सांगितले. नदीजोड प्रकल्प राज्यात वाद निर्माण करणारे असल्यामुळे तातडीने पूर्ण होतील याची खात्री नाही. महाराष्ट्राला तापी नदीचे पाणी देणारी दमणगंगा योजना प्रस्तावित आहे. अशा योजना पूर्णत्वास गेल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल असे सिंग यांनी स्पष्ट केले.

\B

महाराष्ट्रात टंचाई अधिक\B

महाराष्ट्रात ऊस आणि धान पिकासाठी सर्वाधिक पाणी वापरतात. उसाचे सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. शेतकऱ्यांसाठी अनुदान आणि कर्ज योजनाही जाहीर केली आहे. या योजनेला यश येईल असे सिंग म्हणाले. 'प्रधानमंत्री सिंचाई योजने'त सर्वाधिक महाराष्ट्राचे सदस्य आहेत. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत जागरुकता निर्माण करणे सूक्ष्म सिंचन परिषदेचा उद्देश होता असे सिंग यांनी सांगितले. याबाबत योग्य शिफारशी सरकारला सादर करण्यात येणार आहेत.

\B'सूक्ष्म सिंचाई विकास' पुरस्कार विजेते\B

प्रथम - लोकेंदर सिंग (सफरचंद उत्पादक शेतकरी, हिमाचल प्रदेश)

द्वितीय - आयसीएआर संस्था (भुवनेश्वर, उडिसा)

तृतीय - एम. एम. सदगुरु वॉटर अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (गुजरात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपदरी बायपाससाठी रेटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या कित्येक वर्षांपासून मृत्यूचा सापळा झालेल्या बीड बायपासचे रुंदीकरण करण्यासाठी राज्य व केंद्राच्या यंत्रणांनी आजवर अनेकवेळा प्रयत्न केले, पण त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास अडचणी येतात. आता महिनाभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने बीड बायपासचे रुंदीकरण हायब्रीड अॅन्यूटीतून करण्याबाबतच प्रस्ताव मुंबईला पाठविला आहे. दोनशे कोटी रुपये या प्रकल्पासाठी अपेक्षित असून, तो मंजूर झाल्यास बीड बायपास सातपदरी होणार आहे.

शहरातून जाणाऱ्या जालना रस्त्याला पर्याय म्हणून बीड बाह्यवळण रस्ता (बायपास) बांधण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या पुढाकाराने 'बांधा - वापरा आणि हस्तांतरित करा' या पद्धतीने रस्ता बांधण्यात आला. या रस्त्यावरून जड वाहतूक वळविली गेली. गेल्या काही वर्षांत बीड बायपासच्या दक्षिणेस मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत उभी राहिली. वाहतूक वाढल्याने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वाहनांच्या अपघातात गेल्या काही वर्षांत हजारो बळी गेले. प्रत्येक वेळी रस्ता रुंदीकरण, पर्यायी भुयारी मार्ग, उड्डाणपूल उभारण्याची चर्चा झाली. तेरा किलोमीटरच्या बीड बायपासला दक्षिण - उत्तर ओलांडण्यासाठी एकही पर्यायी रस्ता नाही.

बीड बायपास रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) हा रस्ता बनविण्यात येईल, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. मात्र, महापालिकेंतर्गत असलेल्या रस्त्यांची डागडुजी व मजबुतीकरण 'एनएचएआय'कडून होत नसल्याची तांत्रिक अडचण समोर आली. त्यामुळे पुन्हा एकदा बीड बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला. बीड बायपासवरील अपघातांची मालिका काही केल्या संपत नाही. गुरुवारी मध्यरात्री कंटेनर - दुचाकीत झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. बीड बायपासलगत असलेल्या नागरिकांची अडचण दूर व्हावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक प्रस्ताव 'पीडब्ल्यूडी' मुख्यालयाला पाठविला आहे. त्यानुसार हा तेरा किलोमीटरचा रस्ता हायब्रीड अॅन्यूटीवर करण्याबाबत सादर केले आहे. त्यासाठी अंदाजे दोनशे कोटी खर्च अपेक्षित आहे. रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरणासोबत या रस्त्यावर तीन उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. बीड बायपासची रुंदी सात पदरी करण्याचेही त्यात नमूद केले आहे.

बीड बायपासचे रुंदीकरण व मजबुतीकरण हायब्रीड अॅन्यूटीतून करता येईल, अशा आशयाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला आहे. प्रस्तावनुसार बायपास सात पदरी व त्यावर तीन उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत.

- अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

प्रस्तावात दडले काय?

- १३ किमीचा मार्ग

- ७ पदरी होणार

- ३ उड्डाणपूल बांधणार

- २०० कोटी खर्च

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यातील गव्हाली येथे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्या हस्ते महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या परिसरात दुष्काळ असल्याने शेतीची कामे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पहिल्याच दिवशी ३०९ मजुरांनी कामावर हजेरी लावली

यावेळी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी, पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती . मजुरांकडून कामाची मागणी होत असल्याने लोखंडे यांनी सेल्फ वाढवण्याच्या सूचना दिल्या. मागणी करताच रोहयोची कामे उपलब्ध करून देण्यात येतील, असे मोठे यांनी सांगितले. इद्रीस मुलतानी यांनी सरकार तुमच्या पाठिशी असून रोहयोच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून देण्याची हमी दिली. यावेळी तांत्रिक अधिकारी महेश देवगीरकर, सरपंच आसाराम शिंदे, ग्रामसेवक प्रभाकर भादवे, रोजगार सेवक राधाकृष्ण मैंद, उपसरपंच गिरजाबाई शिंदे, एकनाथ शिंदे, गणेश शिंदे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी व गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाची आई-वडिलांना संपत्तीसाठी मारहाण

$
0
0

वैजापूर:

घर व शेती माझ्या नावावर करा, असे म्हणत मुलाने सासरच्या मंडळींच्या मदतीने आई-वडील, भाऊ व घरातील इतरांना मारहाण केल्याची घटना नाईकवाडी गल्लीत घडली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाईकवाडी गल्लीतील रहिवासी सय्यद वजीर सय्यद युसूफ हे मुद्रांक विक्रेते आहेत असून त्यांनी दीड वर्षांपूर्वी मुलगा सय्यद

समी याचा विवाह बडी मशीद परिसरातील शेख आरिफ शेख बाबू यांच्या मुलीसोबत लावून दिला. लग्नाच्या काही दिवसांनंतर समी, सून आयशा व तिच्या माहेरची मंडळी वजीर यांच्यासोबत घर व शेती समीच्या नावावर करून देण्यासाठी वाद घालत आहेत. वजीर हे पत्नी जोहरा बेगम, लहान मुलगा मुहीब व मुलगी आतिया फातिमा यांच्यासह नऊ जानेवारी रोजी सकाली घरी असाताना मुलगा समी, सून आयशा, शेख आरिफ शेख बाबू, शेख आदिल शेख आरिफ, शेख अरबाज शेख अतिक, शेख अक्रम शेख बाबू, मतीन बेगम शेख आरिफ (सर्व रा. बडी मशीद) व सोनू निजाम शेख (रा. चंपा चौक, औरंगाबाद) हे दार तोडून घरात घुसले. समीच्या नावावर घर व शेती का करून देत नाही, अशी विचारणा करत मारहाण केली. समी याने लहान भाऊ मुहीब यास बुटाने मारहाण केली. सोनू निजाम शेख, शेख आरिफ शेख बाबू व शेख अक्रम शेख बाबू यांनी वजीर यांना लाथाबुक्क्या घातल्या, तर पत्नी व मुलीला सून आयशा व तिची आई मतीन बेगम या दोघांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी सय्यद वजीर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतमालाला भाव नसेल, तर शेतकऱ्याला ठिबक सिंचन कसे परवडणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शेतमालाचा भाव निश्चित असेल तरच शेतकरी ठिबक सिंचनात गुंतवणूक करण्याची जोखीम घेईल. रुपये-दोन रुपये किलो दराने कांदे विकावे लागत असतील, तर शेतकऱ्याला ठिबकचा खर्च कसा परवडणार?,' असा सवाल वैजापूर तालुक्यातील बाजाठाण येथील शेतकरी सुभाष भराडे यांनी केला. सूक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना भरीव अनुदान देणे गरजेचे आहे. फक्त अनुदानाच्या घोषणा करून उपयोग नाही, असे भराडे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सूचवले.

नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचा शुक्रवारी समारोप झाला. देशभरातील निवडक शेतकरी आणि तज्ज्ञांनी तीन दिवस सूक्ष्म सिंचनावर चर्चा केली. इच्छा असूनही ठिबक तंत्रज्ञान घेणे परवडत नसलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर पुरेशी चर्चा झाली नाही. जागरुक शेतकऱ्यांनी पाण्याचे महत्त्व ओळखून शेतात ठिबक सिंचन केले. क्षेत्र वाढवण्याची इच्छा असूनही महागड्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे कठीण झाले आहे. या परिषदेला आलेले बाजाठाण (ता. वैजापूर) येथील शेतकरी सुभाष भराडे यांचे अनुभवाचे बोल महत्त्वाचे आहेत. पूर्वी पिकांना पारंपरिक मोकाट पद्धतीने पाणी देणाऱ्या भराडे यांनी टप्प्याटप्प्याने ठिबक सिंचनचा अवलंब केला. सध्या त्यांनी १७ एकरावर ठिबक सिंचन केले आहे. २०१२ मध्ये ठिबकसाठी त्यांना ५० टक्के अनुदान मिळाले होते. या ठिबकद्वारे ते कापूस, ऊस आणि कांदा पीक घेतात.

'आपण पोटाचा विचार करून मर्यादित जेवतो. जास्त जेवल्यास अजीर्ण होते. हा विचार पिकाला पाणी देताना केला पाहिजे. पिकाच्या गरजेनुसार पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन उपयुक्त ठरले. अतिरिक्त पाण्यामुळे होणारे जमिनीचे नुकसान रोखले. जमीन भुसभुशीत राहून कस सुधारला. ५० टक्के खत बचत झाली आणि तण व्यवस्थापन करता आले' असे भराडे सांगतात. बाजाठाण परिसरात पाटाचे पाणी असून शेतकरी ठिबकचा वापर करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. प्रमाण वाढत असले तरी ठिबक सिंचन प्रत्येकाला परवडत नाही. शेतकऱ्यांना पुरेसे अनुदान मिळाल्यास अधिक ठिबक सिंचन होईल, असे भराडे यांना वाटते. 'कांदा रुपये-दोन रुपये किलोने विकावा लागतो. भाजीपाल्याला भाव नाही. शेतमाल बेभाव विकल्यास ठिबक सिंचन कसे परवडणार? चांगला भाव असेल तर अनुदानाची गरजसुद्धा नाही. अनुदान मागायला शेतकरी भिकारी नाही. पण, अनुदान मागण्याची वेळ का आली हा विचार करा,' असे भराडे म्हणाले. शेजारील आंध्र प्रदेशात ठिबक सिंचनासाठी ९० टक्के अनुदान आहे. महाराष्ट्रात धोरण नसल्याने सिंचनाचे प्रमाण कमी झाले आहे.

\Bठिबक एजन्सीच मालामाल\B

निकृष्ट दर्जाचे ठिबक साहित्य विकणाऱ्या कंपन्या आणि एजन्सीचे ग्रामीण भागात पेव फुटले आहे. ठिबक साहित्याची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 'आता शेतकरी जागरुक झाल्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी झाले. पूर्वी ठिबकच्या योजनेत एजन्सीच मालामाल झाल्या,' असे भराडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कुटुंबावर कोसळले आभाळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

मनमाड रोडवर कंटेनर व मोपेड मोटारसायकल अपघातात शेतकरी पती-पत्नीसह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

दुगाव (ता. चांदवड) येथील ज्ञानेश्वर हरिभाऊ सोनवणे (वय ४२) हे पत्नी आशाबाई सोनवणे (वय ३८) व मुलगा गौरव (खंडू) सोनवणे (वय ५) यांच्यासह मनमाडच्या दिशेने असणाऱ्या शेतात मोपेडवरून (एमएच १५, एफएक्स. ८५७४) कांदा काढणीसाठी चालले होते. त्यावेळी मनमाडकडून चांदवडच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने (आरजे ०१, जीबी २४४१) सोनवणे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ज्ञानेश्वर सोनवणे व मुलगा गौरव जागीच ठार झाले, तर आशाबाई सोनवणे यांना नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भयानक होता की मृतांचे शरीर अक्षरशः चिरडले गेले होते. याबाबत चांदवड पोलिस स्टेशनमध्ये कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनवणे हे तारेवरची कसरत करीत दुसऱ्याची शेती कसून घरगाडा चालवत होते. शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव व निसर्गाची अवकृपा यामध्येही धडपड करीत कांदा काढणीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घातलेला घाला दुर्दैवीच म्हणावा लागेल. सोनवणे यांना एक मुलगा अन् तीन मुली होत्या. पैकी एका मुलीचे लग्न झाले असून, दोन मुली शाळेत जातात. अशा परिस्थितीत माय-बापाचे छत्र हरपले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टपरी चालक जावेद बेग यांच्या घराला आग

$
0
0

औरंगाबाद :

जिल्हयाजवळील शेवगा गावात राहणाऱ्या टपरी चालक जावेद बेग याच्या घराला आग लागण्याची घटना १८ जानेवारी रोजी ५ वाजेच्या दरम्यान घडली. या आगीत १६ महिन्याचा चिमुकला नुर मोहम्मद जावेद बेग जळाला असून त्याचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. १६ महिन्याच्या ‘नुर’ वाचविण्यासाठी गेलेली त्याची आई जाकिरा बी जावेद बेग (३०) ही सुद्धा जळाली आहे. या घराच्या समोरील ओटयावर सायंकाळी खेळणारे अनिल बेग राजु बेग (१२), अरमान बेग राजू बेग (१०), ही मुलं ही आगीत जळाली असून आग विझविण्यासाठी आलेल्या सुरय्या इलियास बेग (३२) या सुदधा जळाल्या आहेत. आगीच्या घटनेनंतर या सर्व जखमींना घाटी रूग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत नुर मोहम्मद जावेद बेग या १६ वर्षीय मुलाचा १९ जानेवारी रोजी पहाटे ५.४५ वाजता मृत्यू झाला. तर जाकीरा बी जावेद बेग ही गंभीर जखमी आहे. या घटनेचा तपास पोलिस कर्मचारी रमेश धस हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६ महिन्यांच्या मुलाचा आगीत होरपळून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेवगा गावात एका घराला लागलेल्या आगीत सोळ्या महिन्यांच्या होरपळलेल्या मुलाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर सात जणांवर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत.

करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवगा (ता. औरंगाबाद) येथे टपरी चालविणाऱ्या जावेद बेग यांच्या घराला शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. तेव्हा जावेद बेग यांची पत्नी जाकिरा बी आणि १६ महिन्याचा मुलगा नूर मोहम्मद जावेद बेग हे घरात होते. शिवाय जावेद बेगच्या घराजवळ आसपासची मुले खेळत होती. ही आग काही क्षणातच वाढली. आगीत मुलगा सापडल्याचे पाहून मुलाची आई जाकिरा बीने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. या आगीत घराच्या जवळ खेळणारे अनिस बेग राजू बेग (१२), अरमान बेग राजू बेग (१०), महेक जावेद बेग (७), सुहाना इलियास बेग (७ वर्ष) ही चार मुलेही अडकली होती. या मुलांना वाचविण्यासाठी आशमीन राजू बेग (२८) आणि सुरैय्या इलियास बेग (३५) याही धावल्या. त्यांनी मुलांना बाहेर काढले. मात्र आगीत या महिलाही जळाल्या. अखेर आसपासच्या लोकांनी सर्व जखमींना आगीतून बाहेर काढून थेट उपचारासाठी घाटीत पाठविले. त्यानंतर आसपासच्या लोकांनी घरातील भांड्यात पाणी आणून जावेद बेग यांचे घर विझविले. उपचार सुरू असताना १६ महिन्याच्या नूर मोहम्मद जावेद बेग या मुलांचा शनिवारी पहाटे पाचच्या दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद करमाड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून, तपास पोलिस हवालदार रमेश धस हे करत आहेत. शॉट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घुंगरातून उमटले बोल…...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कथक नृत्य अनुभवताना शनिवारी रसिकांना घुंगराचे बोल ऐकण्याची संधी मिळाली. ज्येष्ठ कथक नृत्यांगणा उर्मिला नागर यांनी पारंपरिक रचनांचे प्रभावी सादरीकरण करीत महोत्सव गाजवला. पं. वेंकटेश कुमार यांचा आध्यात्मिक डूब असलेला ख्याल, कीर्तन कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

शारंगदेव महोत्सवात दुसऱ्या दिवशी गुरू उर्मिला नागर (दिल्ली) यांचे कथक नृत्य सादर झाले. कथकच्या पारंपरिक रचनांचे बहारदार सादरीकरण करीत नागर यांनी रसिकांना खिळवून ठेवले. 'शुद्ध तिहाई'चे विलोभनीय दर्शन त्यांनी घडवले. हस्त न्यासाचे महत्त्व अधोरेखित करणारा 'कलाई', पंजा आणि टाचेचा प्रभावी वापर असलेला 'निकास', बोलांचा घुंगरातून नाद उमटवणारा 'बाठ' अशा सादरीकरणाने कथक रंगले. तबल्यावर विवेक मिश्र, सारंगीवर संदीप मिश्र यांनी साथसंगत केली. बंदिशीचे सादरीकरण उज्ज्वल नागर यांनी केले. दुसऱ्या सत्रात पं. वेंकटेश कुमार (धारवाड) यांनी ख्याल, कीर्तन, वाचन आणि हरिदासकृती सादर केले. लोकसंस्कृती व अध्यात्मिक ज्ञानाचा संयोग असलेल्या सादरीकरणात रसिक गुंग झाले. लोकपरंपरेचा प्रभाव असलेल्या कुमार यांनी भक्तिरचनांचा अध्यात्मिक व मूलभूत अर्थ उलगडून दाखवला. यावेळी कला अभ्यासक मंजिरी सिन्हा, 'एमजीएम'चे सचिव अंकुशराव कदम, सौ. कदम आणि महागामीच्या संचालक पार्वती दत्ता यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, शारंगदेव महोत्सवाचा रविवारी सायंकाळी समारोप होणार आहे. कपिल जाधव यांचे सुंद्रीवादन, श्री गड्डम साम्माया आणि सहकाऱ्यांचे 'चिंदू यक्षगानम' आणि उस्ताद अहसान हुसैन खान आणि आदिल हुसैन खान सुफी कव्वाली सादर करणार आहेत. 'शारंगदेव प्रसंग'मध्ये सकाळी १० वाजता सप्रयोग व्याख्यान व 'शारंगदेव प्रवाह'मध्ये दुपारी तीन वाजता कार्यशाळा होईल. \B

अभ्यासपूर्ण व्याख्याने\B

'शारंगदेव प्रसंग' सत्रात शनिवारी सकाळी जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ नृत्यांगणा गुरू उर्मिला नागर यांनी सप्रयोग व्याख्यान दिले. बोल, तोडे, परमेलू, तिहाई या माध्यमातून जयपूर घराण्याची वैशिष्ट्ये उलगडून सांगितली. तर दुपारी 'नृत्य शिल्प' सत्रात शिल्पातील नृत्यभाव यावर अभ्यासक डॉ. करुणा विजयेंद्र आणि वाचिक अभिनयावर पियाल भट्टाचार्य यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९ तोळे सोने, ११ किलो चांदी लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या सुराणानगर येथील व्यापाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी हातसफाई करत तब्बल नऊ तोळे सोने, ११ किलो चांदीसह ३८ हजारांची रोकड असा पावणे आठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, पतंजली साहित्याचे वितरक घनश्‍याम रामनारायण राठी (रा. सुराणानगर) यांचा रस्त्याच्या समोरील बाजूस त्यांचे भाऊ मनोज राठी हे बंगल्याच्या पाठीमागील भागात राहतात. भाचीचे लग्न असल्याने राठी कुटुंबीय बुधवारी सोलापूरला गेले होते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी चार ते सहाच्या सुमारास नातेवाईकाच्या मुलाने शिकवणी घेतल्यानंतर तो गेटला बाहेरुन कुलूप लावून निघून गेला. यानंतर घरात शिरून कडप्पा फोडून व बेडरूमचे कुलूप तोडत चोरट्यांनी ऐवज लंपास केला. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास गावाहून परतलेल्या घनश्‍याम राठी व त्यांचा मुलगा आशिष असे दोघे कंपाउंडच्या गेटजवळ आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. राठी यांच्या बंगल्यासमोरील अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी रात्री अकरा वाजेपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर मध्यरात्री ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

\Bतारेने बंद केले गेट

\Bघनश्याम राठी व त्यांचा मुलगा शनिवारी सकाळी बंगल्याच्या गेटजवळ आले. त्यावेळी बाहेरून लावलेले कुलूप उघडले. मात्र, गेट उघडले नाही. शेवटी राठीचा यांचा मुलगा हा कंपाऊंड वॉल वरून आत गेला. तेव्हा त्यांना गेटला तार बांधल्याचे दिसले. तेव्हा त्यांना शंका आली. त्यांनी घरात प्रवेश केला असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन घटनांमध्ये दोघांच्या आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद : शहराच्या विविध भागात राहणाऱ्या दोन जणांनी शनिवारी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनांची नोंद संबंधीत पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, दोघांनी आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास भागाजी बनकर (वय ४८, रा. अहमदाबाद, ता. कन्नड, ह. मु. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कैलास बनकर याने राहत्या घरी छताला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार बनकर याच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास दुपारी बाराच्या सुमारास उपचारासाठी बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. कैलास बनकर यांच्यावर कर्ज होते. या कर्जापोटीच त्यांनी आत्महत्या केल्याचे मृताच्या भावाने सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत, मिस्त्री काम करणाऱ्या श्रीधर किसन ताकवाले (वय ६०, रा. पिंपळवाडी, पैठण, ह. मु. पुणे) यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. श्रीधर ताकवाले हे गारखेड परिसरातील भारतनगरात राहणाऱ्या आपल्या भावाच्या घरी आले होते. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ताकवाले यांनी आपल्या खोलीत असलेल्या छताच्या पाइपला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार ताकवाले यांच्या भावाच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकाचा आत्मदहनाचा इशारा

$
0
0

औरंगाबाद : महापालिका प्रशासन दलित वस्तीविरोधी भूमिका घेऊन विकास कामे करत नसल्याचा आरोप नगरसेवक राहुल सोनवणे यांनी केला आहे. पालिकेने २५ जानेवारीपर्यंत वॉर्डातील कामे सुरू न केल्यास प्रजासत्तादिनी अत्मदहन करू, असा इशारा त्यांनी शनिवारी दिला. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कबीरनगर वार्डातील समस्या आयुक्तांना वारंवार सांगूनही सुटल्या नाहीत. मागील तीन वर्षांपासून वार्डात दूषित पाण्याची समस्या आहे. नाला दुरुस्तीचे काम होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक बेटे कात टाकणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेकडून दुर्लक्षित झालेली शहरातील वाहतूक बेटे पुन्हा चकाकणार आहेत. शंभरपेक्षा अधिक वाहतूक बेटांचे काम करून देण्यासाठी ४५ उद्योजकांनी पुढाकार दाखविला आहे.

शहराच्या सुशोभिकरणात वाहतूक बेटे, दुभाजक भर घालतात. त्याची नियमितपणे साफसफाई, स्वच्छता राखली जायला हवी. मात्र, शहरातील अनेक वाहतूक बेटे दुर्लक्षित आहेत. दुभाजकांकडेही दुर्लक्ष होते. पालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्च पालिकेला परवडत नाही. त्यात आता, या वाहतूक बेटांच्या सुशोभिकरणासाठी कंपन्यांना साद घालण्यात आली होती. याला प्रतिसाद देत शहरातील वाहतूक बेटे, रस्ते दुभाजकाच्या सुशोभिकरणासाठी सामाजिक संस्था, कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत कामाचे स्वरूप, सौंदरीकरण्याच्या कल्पना याचे संस्थांकडून शनिवारी सादरीकरण करण्यात आले. पाच वर्षांसाठी हा करार असणार आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. दरम्यान, स्मार्ट सिटी संदर्भात झालेल्या चर्चासत्रात यापूर्वी यावर चर्चा झाली होती. त्यावेळी शहरातील उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय केले पाहिजे यासाठी पालिकेकडे मागण्या व सूचना केल्या होत्या. वाहतूक बेटे आणि दुभाजके सुशोभिकरण करण्याची तयारी उद्योजक, व्यापारी आणि संस्थांनी दर्शवली होती. त्यानुसार प्रत्येक उद्योगांकडे सुशोभिकरणासाठी दोन ते तीन वाहतूक बेटे देण्यात येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images