Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भंगार वाहनांचा लिलाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यावर धूळखात पडून असलेल्या भंगार वाहनांचा महापालिका आता लिलाव करणार असून, अशी तब्बल २६५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

शहरातील रस्त्यावर अनेक भागात ही वाहने पडून होती. त्यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे पालिका व पोलिसांनी मिळून हायकोर्टाच्या निर्देशानुसार एक ते तीन डिसेंबर दरम्यान ही कारवाई करत ही वाहने जप्त करून गरवारे मैदानावर उभी केली. या

मोहिमेसाठी नऊ पथके नेमून त्यावर १० लाखांचा खर्च आला. वाहनधारकांना ही वाहने दंड भरून परत घेऊन जावी लागणार आहेत. त्यासाठी वाहन मालकाला आठ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. अन्यथा या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. मात्र, लिलाव अथवा दंडातून मोहिमेचा खर्च निघणार की नाही, याबद्दल साशंकता आहे. जप्त केलेल्या वाहनांमध्ये दुचाकी, तीनचाकी, कार, जीप, ट्रॅक्टर, टेम्पो, चेसिसचा समावेश आहे.

जप्त केलेली वाहने ज्यांची असतील त्यांनी कागदपत्रे दाखवून जो दंड असेल तो भरून ती वाहने आठ दिवसांत घेऊन जावीत. पुढील आठवड्यात यासंबंधी जाहीर आवाहन करणार करण्यात येईल. हा कालावधी संपल्यानंतर उर्वरित वाहनांचा लिलाव करण्यात येईल.

- नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठाचा अर्थसंकल्प ३३० कोटींचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यावर्षी ३३० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाला शनिवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. येत्या १२ फेब्रुवारीला अधिसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होऊन मान्यता दिली जाणार आहे. नवीन विभाग आणि प्रस्तावित कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद वाढवण्यात आली. दुष्काळामुळे शैक्षणिक शुल्क न वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

विद्यापीठाच्या २०१९-२० या वर्षीच्या अर्थसंकल्पाला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नरेंद्र काळे, किशोर शितोळे, डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राहुल म्हस्के आदी उपस्थित होते. मागील वर्षी ३२२ कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला होता. नवीन विभाग आणि बांधकामामुळे यंदा निधी वाढवण्यात आला आहे. येत्या १२ फेब्रुवारीला अधिसभेत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. प्राधान्याक्रम असलेली कामे आणि प्रस्तावित योजनांवर सविस्तर चर्चा होणार आहे. जालना आणि अंबाजोगाई येथील प्रस्तावित कौशल्य विकास केंद्र, विद्यापीठातील दोन वसतिगृहे आणि उस्मानाबाद येथील उपकेंद्रातील नवीन इमारतीसाठी विशेष निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातील तूट ५२ कोटी रुपये होती. शितोळे यांच्या सल्ल्यावरुन तूट कमी करून ४५ कोटी करण्यात आली. मराठवाड्यातील दुष्काळाची झळ शेकडो विद्यार्थ्यांना बसली आहे. या विद्यार्थ्यांना जेवण आणि निवासाची व्यवस्था करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना मदत करण्याबाबत चर्चा झाली होती. विद्यार्थ्याला दरमहा १८०० रुपये जेवणासाठी देण्याचा प्रस्ताव दुष्काळग्रस्त सहायता समितीने प्रशासनाने दिला होता. यावर शनिवारी व्यवस्थापन परिषदेत पुन्हा चर्चा झाली. मात्र, ठोस निर्णय होऊ शकला नाही.

\Bप्रा. रमेश जाधव यांच्यावर कारवाई

\Bमराठी विभागातील प्रा. रमेश जाधव यांनी विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्याने तक्रार केली होती. या प्रकरणी डॉ. सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने प्रशासनाला अहवाल सादर केला. या अहवालातील शिफारशींवर व्यवस्थापन परिषदेत सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार जाधव यांना भविष्यात विभागप्रमुखपद व गाइडशिप देऊ नये असा निर्णय घेण्यात आला. तसेच घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजमध्ये जाधव यांची बदली करण्यात आली.

\Bनाट्यगृह भाडेतत्त्वावर देणार

\Bव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्य किशोर शितोळे यांनी नाट्यगृह, जलतरण तलाव आणि खेळाचे मैदान विद्यापीठाचे हक्क अबाधित ठेवून भाडेतत्त्वावर देण्याचा मुद्दा मांडला. दुरुस्तीचा खर्च आणि इतर तांत्रिक अडचणींवर चर्चा झाली. त्यावर शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती अभ्यास करुन प्रशासनाला अहवाल देईल असा निर्णय घेण्यात आला. तर मैदानाबाबत डॉ. सलामपुरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चरस विक्री करणाऱ्यांना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चरस विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून ५५ हजारांची चरस पोलिसांनी जप्त केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी शनिवारी दिले.

माजीद खान मेहबूब खान (४०, रा. भोईवाडा) व आजम खान गुलाब खान पठाण (६०, रा. हिमायत बाग) अशी आरोपींचे नाव आहेत. या प्रकरणात गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार नसीम खान शब्बीर खान (वय ५०) यांनी तक्रार दिली. बसस्थानकाजवळ दोन तस्कर आलेले असून त्यांच्याजवळ चरस आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांना मिळाली. पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात छापा मारून दुचाकीवर चरस विक्री करणाऱ्या माजीद खान व आजम खान यांना पकडले. त्या दोघांकडून ५५ हजार रुपये किमतीची ११० ग्रॅम चरस जप्त केली. या प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना शनिवारी न्यायलयात हजर केले असता आरोपींनी कोणा-कोणाला चरसची विक्री केली याचा तपास करणे आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करणे आहे. आरोपींनी चरस अजहर नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली असून त्याबाबत विचारपूस करून अजहरला अटक करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली. देशपांडे यांना सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गदिमांच्या तरल गीतांना उजाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गीतरामायण' काव्यामुळे मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ग. दि. माडगूळकर यांच्या सुश्राव्य गीतांनी रसिकांना पुन्हा मंत्रमुग्ध केले. 'गीतसंध्या'तून गदिमांची अवीट गोडीची गाणी सादर झाली. मराठी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ अनुभवताना रसिक तल्लीन झाले.

प्रसिद्ध कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने 'गीतसंध्या' कार्यक्रम घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. गायक -संगीतकार अतुल दिवे आणि सहकाऱ्यांनी गदिमांची लोकप्रिय गाणी सादर केली. पाच दशकांची वाटचाल गदिमा यांच्या गीतातून उलगडली. 'जगाच्या पाठीवर', 'लाखाची गोष्ट', 'पेडगावचे शहाणे', 'संथ वाहते कृष्णामाई' अशा अनेक दर्जेदार चित्रपटातील लोकप्रिय गाणी ऐकताना रसिकांच्या डोळ्यांसमोर मराठी संगीताचा सुवर्णकाळ तरळला. गदिमांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य सांगत कलाकारांनी 'गीतसंध्या' गाजवली. या कार्यक्रमला 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सभु’ कार्यकारिणीची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सहचिटणीसपदी डॉ. उल्हास शिऊरकर, मिलिंद रानडे व अ‍ॅड. रामेश्वर तोतला, तर सहकोषाध्यक्ष म्हणून रमेश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक डिसेंबर महिन्यात झाली होती. अध्यक्षांसह आश्रयदाता सभासदांमधून एक, हितचिंतक सभासदांमधून एक आणि सर्वसाधारण सभासदांमधून अकरा सदस्यांची निवड त्यावेळी करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी राम भोगले, सरचिटणीस म्हणून डॉ. नंदकुमार उकडगावकर यांची निवड झाली आहे. संस्थेच्या इतर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड शनिवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये सहसचिटणीसपदी तीन जणांची निवड करण्यात आली. यात डॉ. उल्हास शिऊरकर यांच्याकडे शहरातील महाविद्यालयांचा कार्यभार असणार आहे. मिलिंद रानडे यांच्याकडे शहरातील शाळांचा कार्यभार, तर अॅड. रामेश्वर तोतला यांच्याकडे ग्रामीण शाखांचा कार्यभार देण्यात आला आहे. २०२३पर्यंत ही निवड असणार आहे. यासह सहकोषाध्यक्षपदी रमेश जोशी यांची निवड करण्यात आली. यापूर्वी संस्थेच्या उपाध्यक्षपदी अ‍ॅड. दिनेश वकील तसेच डॉ. माधव गुमास्ते, तर सरचिटणीसपदी डॉ. नंदकुमार उकडगावकर तर कोषाध्यक्षपदी अरुण मेढेकर यांची निवड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरबस सेवेबाबत नव्याने करार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने स्मार्ट शहर बसबाबत एस. टी. महामंडळासोबत नव्याने करार केला आहे. आधीच्या करारात काही त्रुटी असल्याने नव्याने करार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेकडून शहरात शहर बससेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी स्मार्ट सिटी योजनेतील निधीतून शंभर बस खरेदी करण्यात येत आहेत. त्यापैकी काही बस शहरात दाखलही झाल्या आहेत. मात्र, बस चालविण्यासंदर्भात एसटी महामंडळासोबत केलेल्या आधीच्या करारात काही त्रुटी होत्या. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत शुक्रवारी महामंडळ व पालिका यांच्यात नव्याने करार झाला. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल, तर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किती जणांची नेमणूक केली? खंडपीठाने केली विचारणा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या(मॅट) आदेशाला आव्हान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या याचिकेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. ए. एम. ढवळे यांनी शासकीय सेवेत भरतीप्रक्रियेसंबंधीची माहिती शपथपत्राद्वारे सादर करण्याचे आदेश दिले.

हिंगोली जिह्यातील अजब पतंगे यांच्यासह इतर तिघांनी शासन निर्णय ४ मार्च १९९१ नुसार, सेवेत घेण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. जाहिरात प्रसिद्ध न करता त्यांना आरोग्य विभाग संवर्ग-४ मध्ये सेवेते सामावून घेण्यात आले. पुणे येथील आरोग्य सेवा उपसंचालकांनी नियुक्ती ग्राह्य न धरता याचिकाकर्त्यांना सेवेतून निलंबित केले. त्याविरोधात त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात(मॅट) धाव घेतली. मॅटने याचिकाकर्त्यांचे अर्ज फेटाळला व निलंबनाचा निर्णय कायम केला. त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली. १९९१ रोजीचा शासन निर्णय अद्यापही लागू आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांचे निलंबन रद्द करावे व त्यांना नोकरीत कायम करावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली. खंडपीठाने, राज्य शासनाने आतापर्यंत जाहिरात प्रसिद्ध न करता, किती जणांची नेमणूक केली आहे, तीच पद्धत आजही अस्तित्वात आहे का ? यासंबंधीची माहिती शपथपत्राद्वारे दाखल करण्याचे आदेश दिले. या याचिकेत अर्जदाराची बाजू अविनाश खेडकर यांनी मांडली. याचिकेवर चार फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मंदोदरी परिणय’चे अद्भूत दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकपरंपरेचे दर्शन घडवणारे 'चिंदू यक्षगानम', सुंदरी वादनाचे नादमाधुर्य आणि सूफी परंपरेच्या कव्वालीने शारंगदेव महोत्सवाची सांगता झाली. तीन परंपरांचा आनंद घेत रसिकांनी कलाकारांना भरभरुन प्रतिसाद दिला.

महागामी संस्थेच्या दहाव्या शारंगदेव महोत्सवाची रविवारी सांगता झाली. रुक्मिणी सभागृहात सायंकाळी वारंगल (तेलंगणा) येथील श्री गड्डम सामय्या आणि सहकाऱ्यांच्या 'चिंदू यक्षगानम'ने सुरुवात झाली. लोकपरंपरेशी निगडीत या नाट्य कलेत 'भूकैलासम' सादर झाले. रावण आणि मंदोदरीच्या विवाहाची कथा कलाकारांनी उत्कटतेने सादर केली. पुरुष कलाकारांनीच स्त्री भूमिकाही साकारल्या. लोकपरंपरेशी निगडीत कलाविष्कार रसिकांना खिळवून ठेवणारा ठरला. 'चिंदू यक्षगानम' कला पौराणिक कथेच्या सादरीकरणासाठी लोकप्रिय आहे. गड्डम सोमराजू, गड्डम रघुपती, रसला प्रभाकर, गड्डम श्रीपती, गड्डम रामस्वामी, सारंगपाणी, सी. एच. व्यंकण्णा आणि मुरलीकृष्णा यांनी सादरीकरण केले.

दुसऱ्या सत्रात कपिल जाधव (सोलापूर) यांचे सुंदरी वादन झाले. राग हंसध्वनीने कपिल यांनी सादरीकरण सुरू केले. विलंबित एकताल व द्रुत एकतालातील वादन श्रवणीय ठरले. जाधव कुटुंबात मर्यादित असलेले सुंदरी वाद्य शास्त्रीय रचनांमुळे सर्वत्र लोकप्रिय झाले आहे. कपिल यांना तेजस धुमाळ, विष्णू जाधव आणि बलभीम जाधव यांनी साथसंगत केली.

उस्ताद अहसान हुसेन खान आणि आदिल हुसेन खान यांच्या सूफी कव्वालीने महोत्सवाचा समारोप झाला. तब्बल ९०० वर्षांपासून कव्वाली सूफी विचार आणि तत्त्वज्ञानाचे मूल्य सांगत आहे. याची प्रचिती खान बंधूंची कव्वाली ऐकताना आली. कादरी परंपरेतील कलाकारांनी रसिकांना पारंपरिक कव्वालीचा आनंद दिला. एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, प्राचार्य प्रताप बोराडे, महागामीच्या संचालक पार्वती दत्ता यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. महोत्सवाला रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

व्याख्यान रंगले

'शारंगदेव प्रसंग'मध्ये रविवारी सकाळी कपिल जाधव यांचे सुंदरी वादन विषयावर आणि गड्डम सामय्या यांचे 'चिंदू यक्षगानम'वर सप्रयोग व्याख्यान झाले. सुंदरी निर्मितीचा प्रवास कपिल यांनी मांडला. पणजोबांनी सुंदरी वाद्याची निर्मिती केली होती. त्यानंतर घराण्यात हा वारसा कायमचा स्थिरावला असे त्यांनी सांगितले. तर मंदोदरी परिणय आणि सामाजिक संदेशाची उकल गड्डम यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर सिटी बस धावणार बुधवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्घाटन सोहळ्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर शहराच्या रस्त्यांवरून सिटी बस धावण्याची घटिका ज‌वळ आली आहे. येत्या बुधवारपासून (२३ जानेवारी) शहरातील १४ मार्गांवर सिटी बस सेवा सुरू करण्यात येत आहे. त्याचे वेळापत्रक व भाडे जाहीर करण्यात आले आहे. सकाळी पाच ते रात्री ९.४० पर्यंतच बस सेवा मिळणार असून पाच रुपयांपासून अंतरानुसार २० रुपयांपर्यंत तिकीट राहणार आहे.

सिटी बस सेवेचे २३ डिसेंबर रोजी औपचारिक उद्घाटन करण्यात आले, तेव्हापासून प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा होती. पहिल्या टप्प्यात बुधवारपासून १४ मार्गांवरून २५ सिटी बस धावणार आहेत. शहरासोबतच वाळूज, रांजणगाव, बजाजनगर, हर्सूल-सावंगी, चिकलठाणा, नक्षत्रवाडीपर्यंत बस जाणार आहेत. दोन किलोमिटर अंतरापर्यंत फक्त पाच रुपये, तर शहरांतर्गत आठ ते १४ किलोमिटरपर्यंत १५ रुपये प्रवास भाडे द्यावे लागणार आहे. पालिका आयुक्तांनी रविवारी सकाळी ट्विट करत ही घोषणा केली. स्मार्ट सिटी योजनेतून शहरात शंभर बसद्वारे सिटी बस सेवा सुरू करण्याचे नियोजन असून तिचे वेळापत्रक सुमारे चार महिन्यापासून सतत पुढे जात होते. पालिकेला आतापर्यंत २८ बस मिळाल्या असून त्यापैकी २५ बस रस्त्यावर धावणार आहेत. बस सेवा चालवण्यासाठी पालिका व एसटी महामंडळात नुकताच करार झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात रात्री १२ पर्यंत सेवा देण्याचे नियोजन आहे.

दिव्यांग, ज्येष्ठांसाठी जागा आरक्षित

स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग, जेष्ठ नागरिक आणि महिलांसाठी बसमध्ये जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या बसमध्ये ३२ आसने असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, पॅनिक बटन, अग्शीशमन यंत्रणा आदी सुविधा आहेत.

सिटी बसचे मार्ग

मार्ग......................... मार्गे सुरुवात

रेल्वे स्टेशन ते शहागंज मध्यवर्ती बसस्थानक ७.४०

रेल्वे स्टेशन ते हर्सूल मध्यवर्ती बसस्थानक ७.४०

रेल्वे स्टेशन ते हर्सूल दर्गा, पुंडलिकनगर, सिडको ७.१५

रेल्वे स्टेशन ते सिडको बसस्टँड मध्यवर्ती बसस्थानक एन-२ ६.४०

औरंगपुरा ते बजाजनगर मध्यवर्ती बसस्थानक ६.१५

औरंगपुरा ते रांजणगाव मध्यवर्ती बसस्थानक ६.२१

औरंगपुरा ते हिंदुस्थान आवास मध्यवर्ती बसस्थानक ६.३५

औरंगपुरा ते वाळूज मध्यवर्ती बसस्थानक ६.२६

औरंगपुरा ते चिकलठाणा रोपळेकर हॉस्पीटल, पुंडलीकनगर ६.१५

औरंगपुरा ते शिवाजीनगर क्रांती चौक ६.३०

औरंगपुरा ते देवळाई उस्मानपुरा-दर्गा ६.४५

चिकलठाणा, मध्यवर्ती बसस्थानक क्रांती चौक, बाबा पेट्रोलपंप ७

चिकलठाण ते जागेश्वरी बाबा पेट्रोलपंप ५

हर्सूल ते नक्षत्रवाडी मध्यवर्ती बसस्थानक ७.४५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीच्या वादातून मारहाण; जेष्ठ नागरिक मृत्युमुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्लॉटच्या वादातून पत्नी आणि कुटुंबाने जेष्ठ नागरिकाला केलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारापूर्वी हा प्रकार दीराच्या लक्षात आल्याने उघडकीस आला. नारेगाव भागात रविवारी सकाळी अजीज कॉलनी गल्ली क्रमांक २० येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी पत्नी आणि मुलांसहीत चौघांना ताब्यात घेतले आहे.

शेख मंजूर शेख महेमूद (वय ६०, रा. नारेगाव) असे या जेष्ठ नागरिकाचे नाव असून, ते आचारी काम करीत होते. शेख मंजूर यांना दोन पत्नी आहेत. त्यांच्या नावावर शहरात एक प्लॉट आहे. मंजूर यांच्या पत्नीने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांचे भाऊ शेख जफर आणि शेख मुख्तार (रा. हर्सूल) यांना रविवारी सकाळी दिली. दोघांनी तात्काळ नारेगाव गाठले. या ठिकाणी मंजूर यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती.

दरम्यान, भावाच्या अचानक मृत्यूमुळे दोन्ही भावांना संशय आला. परिसरांनी नागरिकांनी त्यांना मंजूर यांच्या घरात रात्री भांडण झाले असल्याची माहिती दिली. सिडको एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. नातेवाईकांनी शेख मंजूर यांचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवला. शेख मंजूर यांच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आहेत. त्यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन रविवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आले नव्हते. सिडको पोलिसांनी संशयावरून त्यांची पत्नी, जावई आणि मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलित, बहुजन हाच लोकशाहीचा मुख्य गाभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य व्यक्ती हा औटघटकेच्या लोकशाहीचा विचार करीत आहे. अर्थात मतदानापुरता विचार करीत आहे. लोकशाहीच्या कक्षा मोठ्या आहेत. या लोकशाहीत दलित, पिढीत, बहूजन आणि कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी तयार केलेली उत्तम यंत्रणा आहे, अशा दृष्टीने याचा विचार करण्याची गरज आहे. दलित, बहुजन हाच लोकशाहीचा गाभा आहे. हे विचारात घेऊन सक्षम लोकशाहीसाठी नितीमत्तेची नितांत गरज असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले. लोकायत विचार मंचातर्फे चौथ्या विवेक जागर परिषदेचे आयोजन रविवारी (२० जानेवारी) करण्यात आले. या परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेत गोपाल गुरू यांच्यासह धम्मसंगिनी रमागोरख, वि. रा. शिंदे, देवेंद्र इंगळे, अण्णासाहेब खंदारे या मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या सत्राच्या पहिल्या भागात गोपाळ गुरू यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, लोकशाही म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संसदीय पद्धतीने संरक्षित करण्यासाठी दिलेली जबाबदारी आहे. या व्यवस्थेत सर्वात शेवटच्या घटकांनाही समान न्याय देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेवटच्या घटकांना लोकशाहीत स्थान देण्यासाठी अनेक बदल करावे लागणार आहेत. हे बदल आत्ताच झाले नाही. तर आगामी शंभर वर्ष अशा वंचितांना न्याय मिळणार नाही. बलदंड समूह विरुद्ध बहुसंख्य वंचित असे नवीन द्वंद निर्माण झाले आहे. हे लोकशाही पुढे आव्हान आहे. अमेरिकेत एक व्यक्ती केवळ दोनदाच राष्ट्राध्यक्ष होऊ शकते. त्यानंतर त्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभे राहता येत नाही. आपल्याकडे २०-२५ त्याच त्या व्यक्ती मोठमोठी पदे उपभोगतात. यात बदल व्हायला हवाच. लोकशाहीला प्रबळ नितीमत्तेचा आधार देऊन ही व्यवस्था अधिक प्रबळ करण्याची गरज आहे.

यावेळी धम्मसंगिनी रमागोरख यांनी 'भारतीय संविधन आणि बहुसांस्कृतिकता' या विषयावर मार्गदर्शन केले. धम्मसंगिनी रमागोरख यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वीपर्यंत संविधानबाबत किंवा त्याच्या विरोधात बोलणारे अनेकजण आता संविधान वाचविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. देशात अनेक धर्म, रूढी आणि पंरपरा आहेत. या पंरपरा संबंधितांनी स्वीकार करण्याची मुभा देशाच्या संविधानाने दिली आहे. हीच देशाची खरी ओळख आहे. मात्र, अशा वेगवेगळ्या रूढी परंपरांना एकाच धर्माच्या फ्रेममध्ये आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक देशात राज्यघटनेने दिलेली समानता टिकविताना त्या समुहाच्या वेगळ्या सांस्कृतिक वारशाची जपवूक होणे ही काळाची गरज आहे.

यावेळी अक्षर गाथा या त्रैमासिकाच्या 'लोकशाहीपुढे आव्हाने आणि भारतीय संविधान' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मा. मा. जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भारत सीरसाट तर आभार प्रदर्शन डॉ. नवनाथ गोरे यांनी केले.

अशोकचक्राच्या तत्त्वाचाही स्वीकार आवश्यक

आज अनेक ठिकाणी महिला अशोकचक्र असलेल्या साड्या नेसून बाहेर पडताना दिसतात. ही चांगली बाब आहे. मात्र, अशोकचक्राचे तत्वही समजून घेण्याची गरज आहे. हे चक्र सतत फिरत असते. वर खाली चक्राचे परिक्रमण होऊन बदल घडत असतात. गती, समता व नितीच्या चक्राच्या तत्वाचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचे मतही गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅग्रोबेस, आयटी, सर्व्हिस सेक्टरमधून महिलांना संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिलांना सर्व्हिस सेक्टर, केटरिंग, अॅग्रोबेस इंडस्ट्रीसह अनेक क्षेत्र खुणावत असून यात आपले कर्तुत्व सिद्ध करण्याची महिलांना संधी आहे. अॅग्रोबेस व आयटी क्षेत्राव्यतिरिक्त सर्व्हिस सेक्टरमधून आज महिलांना भरपूर उत्पन्न मिळत असतानाच त्यांचे एक अढळ स्थान निर्माण होत आहे आणि संस्कार, सेवा, समर्पण, सहयोग व संपर्क हीच पंचसुत्री यशाकडे घेऊन जाते, असे मत प्रसिद्ध उद्योजिका मोहिनी केळकर यांनी भारत विकास परिषदेच्या महिला अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले.

दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी (२० जानेवारी) हॉटेल विट्स येथे झाले. या वेळी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, परिषदेचे उमेश राठी, अविनाश शर्मा, विद्या पाटील आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या प्रसंगी केळकर म्हणाल्या, महिला संस्कार, सेवा व समर्पण देत असल्या तरी त्यांचा संपर्क व सहयोग कमी पडतो आहे. हा वाढवण्यावरच भर दिला पाहिजे. महिला उद्योजक होत असल्या तरी त्यांचा सातत्याने उद्योजक म्हणून विचार व्हायला पाहिजे आणि तसा विचार महिलांनीही केला पाहिजे, असेही केळकर म्हणाल्या. समाजातील जाणिवा नष्ट होत असल्याची खंत व्यक्त करीत धानोरकर म्हणाल्या, विविध क्षेत्रांत महिलांना जरी उच्च स्थान असले तरी आज समाजातील जाणिवा आणि संवेदना नष्ट होत आहेत. अत्याचार, अपघाताच्या घटना घडल्या तरी आज माणूस मदतीला तयार होत नाही आणि त्यामुळे महिलांनी हेच काम केले पाहिजे. जाणिवा, संवेदना जागृत करत समाजाचे कर्तव्य काय आहे, याची जाणीव समाजाला करून देणे आवश्यक आहे. समाजानेही ती जाणीव ठेवत संवेदनशीलता जपली पाहिजे, असेही धानोरकर म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजयंती नांदगावकर यांनी केले, तर मोहिनी रोजेकर यांनी आभार मानले. माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण या कार्यक्रमाच्या नियोजित प्रमुख पाहुण्या येऊ शकल्या नाहीत, म्हणून त्यांच्या भाषणाच्या प्रती महिलांना वाटण्यात आल्या. परिषदेच्या 'संस्कार सेवा' स्मरणिकेचे प्रकाशनही या वेळी झाले. द्वितीय सत्रात अॅड. चैतन्य धारूरकर यांनी 'बालक पाल संबंध-महिलांचे सामाजिक भान आणि कौटुंबिक कायदे' या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मीनाक्षी संगीत होत्या. त्यानंतर मुक्त चिंतन व समारोप झाला. अविनाश शर्मा, सुषमा पाटील-भालेराव यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती. या वेळी वसंतलाल चांडक, हनुमानदास बाहेती, डॉ. नागेश नागापूरकर, गोपाल होलानी, अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. मंजू कुलकर्णी, सचिव मंगल चव्हाण, कोषाध्यक्ष प्राजक्ता सराफ उपस्थित होत्या.

\Bजवानांसाठी लाकडाच्या पायाची निर्मिती

\Bभारत विकास परिषद ही १९६३मध्ये स्थापन झालेली संस्था असून संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा व समर्पण या पंचसूत्रीवर काम करते. भारत-चीन युद्धानंतर जखमी जवानांसाठी प्रथमतः लाकडाच्या पायाची निर्मिती करून परिषदेने कार्याची सुरुवात केली. या अंतर्गत देशभरातील १५०० शाखांमधून सामाजिक उपक्रम घेण्यात येतात. या अंतर्गत डॉ. हेडगेवार रुग्णालयात विकलांग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले असून, ५० रुग्णांना जयपूर फूट वितरित करण्यात आले आहेत. आजवर परिषदेचे तीन अधिवेशन अहमदाबाद, मुंबई व गोवा येथे झाले असून, चौथे अधिवेशन औरंगाबादला आयोजित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिबिरात ११४३ रक्तदात्यांचे रक्तदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शांती ग्रुपच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरामध्ये विक्रमी रक्तसंकलन करण्यात आले. उल्कानगरी येथील रिद्धीसिद्धी हॉलमध्ये रविवारी झालेल्या या शिबिरामध्ये एकूण ११४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी चार रक्त पेढ्यांनी हे रक्तसंकलन केले.

गेल्या तीन वर्षांपासून शांती ग्रुपच्या सदस्यांचा हा सामाजिक उपक्रम सुरू आहे. या चौथ्या वर्षी स्व. कचरुलाल चोपडा आणि शिवरामजी निकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा या कालावधीत हे रक्तदान शिबिर सुरू होते. यावेळी एमजीएम ब्लड बँक, घाटी हॉस्पिटल ब्लड बँक, दत्ताजी भाले रक्तपेढी आणि लायन्स ब्लड बँकेने रक्तसंकलन केले. सकाळपासून रक्तदात्यांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत एकूण एक हजार १४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमासाठी शांती ग्रुपचे अध्यक्ष केतन साहुजी, उमेश देवडा, शुभम शिंगवी, पवन कनक्रिया, मनोज शिंगवी, राहुल कासलीवाल, देवासेठ गोलवाल, शुभम गुगळे, गोपिनाथ निकम आणि प्रसाद टेकाळे यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नशेच्या गोळ्यासह विक्रेता जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नायट्रोसन या नशेच्या गोळ्याची अवैध विक्री करणाऱ्या आरोपीला जिन्सी गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले. चंपा चौकात ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून पाच हजार गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

चंपा चौक परिसरात दुचाकीवर एक आरोपी नशेच्या नायट्रोसन गोळ्या विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचला. यावेळी दुपारी दोनच्या सुमारास काळ्या बॅगसह एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या बॅगची तपासणी करण्यात आली असता आतमध्ये नायट्रोसन गोळ्याच्या ५०० स्ट्रीप (पाच हजार गोळ्या, किंमत २३ हजार रुपये) आढळून आल्या. पोलिसांनी संशयित आरोपी सय्यद झकियोद्दिन सय्यद शमशुद्दिन (वय २६, रा. नायगाव रोड, सावंगी) याला अटक केली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी गुणाजी सावंत, नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर, पीएसआय दत्ता शेळके, सहायक फौजदार अयूब पठाण, संजय गावंडे, धनंजय पाडळकर, गणेश नागरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परराज्यातील विदेशी दारूची शहरात विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दादरा नगर हवेली या परराज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी दारुची शहरात तस्करी करणाऱ्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी रात्री ११च्या सुमारास छावणी नगर नाक्याजवळ करण्यात आली. यावेळी आरोपीच्या ताब्यातून कारसह दारूचा साठा जप्त करण्यात आला.

परराज्यात उत्पादित झालेली आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विदेशी दारू शहरात लाल रंगाच्या कारमध्ये विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.या माहितीवरून नगर नाका येथील उड्डाणपुलाजवळ सापळा रचण्यात आला. ही संशयित कार आल्यानंतर त्याला अडवून त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी कारमध्ये इंपिरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, मॅकडोवेल आदी कंपनीच्या दारूचा साठा आढळला. पोलिसांनी कारचालक विक्रम आगाजी साळुंके (रा. विजयनगर, गारखेडा) याला अटक केली. ही कारवाई अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश घायवट, जावेद कुरेशी, दुय्यम निरीक्षक राहुल रोकडे, के. पी. जाधव, मोहन मातकर, आशीष महिंद्रकर, गणेश इंगळे, शेंदरकर, कोतकर, लघाने, गुंजाळ, चाळणेवार, गायकवाड, वानखेडे, खरात, काकड आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादकरांना यंदाही ‘हॅपी स्ट्रीट’ची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध कलाप्रकारांचा आनंद एकाच ठिकाणी लुटण्याचे ठिकाण म्हणजे 'हॅपी स्ट्रीट'. 'महाराष्ट्र टाइम्स'ने गेल्यावर्षी औरंगाबादकरांना 'हॅपी स्ट्रीट'च्या माध्यमातून आगळीवेगळी पर्वणी उपलब्ध करून दिली होती. यावर्षी सुद्धा येत्या २७ जानेवारी रोजी शहरात पहिल्या 'हॅपी स्ट्रीट'चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने खेळ, झुम्बा, एरोबिक्स, मुक्त हस्तचित्र, विविध क्रीडा प्रकारात सामील होण्याची पर्वणी औरंगाबादकरांनी मिळणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स','द टाइम्स ऑफ इंडिया' यांच्या पुढाकाराने २०१८ मध्ये पहिल्यांदाच 'हॅपी स्ट्रीट' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर येथील यशस्वी आयोजनानंतर औरंगाबादकरांनी गेल्यावर्षी १८ फेब्रुवारीपासून पुढचे तीन रविवार उत्साहाने सळसळणाऱ्या रस्त्यांचा अनुभव घेतला. हाच अनुभव यंदा येत्या रविवारी (२७ जानेवारी) घेता येणार आहे. दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाचे महत्व, चालणे व सायकलिंग किती महत्त्वाचे असते हे सकारात्मक पद्धतीने पटवून देण्याच्या उपक्रमातच करमणुकीचे विविध कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या खेळांच्या मैत्रीपूर्ण लढती, एरोबिक्स, झुम्बाच्या तालावर पाहावयास मिळतील. 'हॅपी स्ट्रीट'च्या माध्यमातून आबालावृद्धांसाठी योग साधना, स्केटिंग, सायकलिंग तर असणार आहेच. सोबत रॉक बँक शो, इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न क्लासिकल गीतांचे प्रकार सादर होतील. 'हॅपी स्ट्रीट'मध्ये तुम्हाला मित्र, मैत्रिणी, कुटुंबीयांसह सहभागी होता येईल. तुमची 'संडे मॉर्निंग' आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरी होणार आहे. तर मग तयार राहा यंदाही एकदा 'हॅपी स्ट्रीट'ची पर्वणी अनुभवण्यासाठी.

\Bकलाकरांनी येथे संपर्क साधावा\B

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करावयाची इच्छा आहे. त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, साई स्क्वेअर, उस्मानपुरा, स्टेशन रोड, औरंगाबाद येथे ०२४०-६६३०२०० किंवा मोबाइल क्रमांक ९८२२६३०५५५ वर संपर्क साधावा. योग्य कलाकृती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ग्रुप अॅक्टिव्हिटी करिताही संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात महाआणीबाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

देशात नुसती आणीबाणी नव्हे तर महाआणीबाणी लागलेली आहे. संवैधानिक संस्था उद्धवस्त करण्यात येत आहेत. विकासाचे मुद्दे बाजूला टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केले जात आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी छगन भुजबळ औरंगाबादला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले की, 'देशातील सर्वोच्च न्यायलयामधील नियुक्त्यांचा वाद चव्हाट्यावर आला. याशिवाय सीबीआय, आरबीआय सारख्या संस्था केंद्र शासन मोडीत काढीत आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येप्रकरणात कोर्टाने सीबीआय आणि पोलिस यांच्यावर ताशेरे ओढले. तरीही पुढील कारवाई होत नाही. शेतकरी आत्महत्येवरही राज्य शासन शांत बसलेले आहे. मंदिर मशीद, मराठा दलित असा वाद उभा करून सामाजिक हिताला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या नावाखाली मते मिळविली. त्यानंतर मात्र विकासाचे धोरण न राबविता सर्वसामान्यांचे लक्ष्य विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

डान्सबारबाबतच्या निर्णयावर ते म्हणाले की, शिवस्मारकावर कोर्टाने बंदी घातली आहे. मात्र, डान्सबारवरील बंदी उठविली. लोकांना जे हवे ते राज्य शासन देत नाही. नको असलेल्या गोष्टी मात्र माथी मारल्या जात आहेत. ही अराजकतेची स्थिती आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

... म्हणून सवर्ण आठवले

सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिल्याबाबत विचारणा केली असता, भुजबळ म्हणाले 'मराठा आरक्षणालाही आधी विरोध नव्हता. तसेच सवर्णांनाही दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. ५० टक्के आरक्षणाची अट कोर्टाने टाकली आहे. अनेक राज्यात आरक्षण हे ७० टक्केपर्यंत पोहाचले आहे. सवर्णांनी आरक्षणाची कधी मागणी केली नाही. कधी आंदोलनही झाले नाही. फक्त राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे सपाटून मार खाताच केंद्र सरकारला सवर्ण आठवले.'

बाळासाहेबांवरील चित्रपट पाहायला आवडेल

बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत २५ वर्ष काढली आहेत. त्यांच्या जिवनावर आधारित चित्रपट येत आहे. त्यांच्या अनेक आठवणी अजूनही मनात आहेत. यामुळे सवड काढून चित्रपट पाहायला आवडेल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळांच्या विरोधात वंचित आघाडीचा उमेदवार नाही

भुजबळ यांची बहुजन वंचित आघाडीचे आ. हरिभाऊ भदे, आ. बळीराम शिरसकर, प्रा. किसन चव्हाण, अमित भुईगळ यांनी भेट घेतली. २०१९ च्या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी नाशिक येथून खासदारकीसाठी अर्ज दाखल करावा. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही, अशी घोषणा वंचित आघाडीने केली आहे. छगन भुजबळ लोकसभेचे उमेदवार नसतील तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा केला जाणार असल्याचे आघाडीतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल कारागृह पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झालेल्या योगेश राठोडला अत्यंत क्रूरपद्धतीने मारहाण झाल्याचा आरोप बंजारा समाज बांधवांनी केला आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जेल पोलिसांना मारहाणीचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित करत याबद्दल कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

योगेश रोहिदास राठोड (वय २९ मूळ रा.भारंबा तांडा, सध्या रा. घृष्णेश्वर कॉलनी, मयूर पार्क) याला कोर्टाच्या अटक वॉरंटनंतर गुरुवारी अटक केली होती. कोर्टाने त्याची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. हर्सूल पोलिसांनी त्याला शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता गंभीर जखमी अवस्थेत घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हजर केले. यावेळी त्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ होते. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास योगेशचा मृत्यू झाला. ही माहिती समजल्यानंतर रविवारी सकाळपासून योगेशचे नातेवाईक तसेच गोर बंजारा समाजाच्या नागरिकांनी घाटी हॉस्पिटलच्या पोस्टमार्टम विभागासमोर ठिय्या मांडला. योगेशचा मृत्यू हा नैसर्गिक नसून कारागृह पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा दावा त्यांनी केला. कारागृह पोलिस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, त्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करावे, योगेशच्या कुटुंबीयाला तत्काळ ५० लाखांची मदत करावी, योगेशच्या पत्नीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या प्रकरणाची चौकशी तत्काळ 'सीआयडी'कडे वर्ग करावी, आरोपपत्र दाखल फाल होण्याआधी हे प्रकरण अॅड. उज्वल निकम यांच्याकडे वर्ग करावे, आदी मागण्या यावेळी संतप्त नागरिकांनी केल्या. यावेळी गोर बंजारा समाजाचे राजपालसिंह राठोड, डॉ. कृष्णा राठोड, रविकांत राठोड, राजेंद्र जाधव, बाबुराव पवार, विकास जाधव, गजानन जाधव यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

राजकीय नेत्यांची भेट

गोर बंजारा समाजाचे रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत घाटी हॉस्पिटलमध्ये ठिय्या आंदोलन सुरू होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार हर्षवर्धन जाधव आदींनी भेट दिली. 'मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. नातेवाईकांनी दाखविलेले काही फोटोही पाहिलेत. योगेशला अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण झाल्याचे त्यावरून दिसते. जेल पोलिसांना मारहाणीचे अधिकार कोणी दिले हा प्रश्न असून बाबत कारवाई केली जाईल,' अशी प्रतिक्रिया बागडे यांनी दिली. तसेच उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी देखील राठोड कुटुंबाची भेट घेत कारवाईची मागणी केली.

मोठा बंदोबस्त तैनात

घाटी हॉस्पिटलच्या पोस्टमार्टम विभागात यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दंगा काबू नियंत्रण पथकाचा यामध्ये समावेश होता. पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी गुणाजी सावंत, गोवर्धन कोळेकेर, पोलिस निरीक्षक अनिल आडे, राजश्री आडे, पीएसआय गोरख चव्हाण, कल्याण चाबुकस्वार यांच्यासह इतर कर्मचारी रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवी प्रमाणपत्राचा दंड विद्यापीठाकडून माफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांचा दंड माफ करण्यात येणार आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. व्यवस्थापन परीषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी दंड माफ करण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागातून अनेक विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र काढलेले नाही. उशिरा प्रमाणपत्र काढल्यास प्रतिवर्षानुसार दंड आकारण्यात येते. सहा महिन्यांसाठी दंड माफ करण्यात यावा असा ठराव डॉ. नरेंद्र काळे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडला होता. त्यावर चर्चा होऊन सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला. त्यानुसार ३० जूनपर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज व फक्त पदवी प्रमाणपत्रासाठीचे शुल्क (दंड वगळून) भरून पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे. मराठवाडयातील पदवीधरांनी प्रमाणपत्र काढून घ्यावे असे आवाहन नरेंद्र काळे काळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलमधील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या योगेश राठोड या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे कारागृह पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेम विभागासमोर नातेवाईक व बंजारा समाज बांधवांनी रविवारी (२० जानेवारी) ठिय्या दिला. रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात आला नव्हता.

योगेश रोहीदास राठोड (वय २९, मूळ रा. भारंबा तांडा, सध्या रा. घृष्णेश्वर कॉलनी, मयूर पार्क), याच्यावर तीन वर्षांपूर्वी मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. तो कोर्टात हजर राहत नसल्याने कोर्टाने त्याचे अजामीनपात्र वॉरंट काढले होते. हर्सूल पोलिसांनी त्याला गुरुवारी अटक करून कोर्टापुढे हजर केले असता त्याची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर हर्सूल पोलिसांनी त्याला शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता गंभीर जखमी अवस्थेत घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. यावेळी त्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ होते. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास योगेशचा मृत्यू झाला. पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

मारहाणीचा अधिकार कोणी दिला?

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह राजकीय नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये भेट दिली. 'नातेवाईकांनी दाखवलेले फोटो मी पाहिले आहेत, त्यावरून क्रूर पद्धतीने मारहाण झाल्याचे दिसते, जेल पोलिसांना मारहाणीचा अधिकार कोणी दिला,' असा प्रश्न विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

'जेलमध्ये मारहाण झाली नाही'

योगेश राठोड याला हर्सूल कारागृहात कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचे स्पष्टीकरण कारागृह अधीक्षक अनुपकुमार उमरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images