Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रशासकीय इमारतीला लोहाऱ्यात आग

$
0
0
तहसील व पंचायत समितीचे कार्यालय असलेल्या लोहारा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये रविवारी अचानक आग लागून झालेल्या घटनेत सुमारे दहा लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. पुरवठा विभागातील सुमारे २५० संचिका आगीत खाक झाल्यामुळे संशयाचे वातावरण आहे.

९६ संगणक शाळा `इंटरनेटविना`

$
0
0
केंद्र शासनाच्या आर्थिक सहयोगातून आय. सी. टी. योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात अंतर्गत नांदेड जिल्ह्यात मंजूर झालेल्या जवळपास ९६ शाळामध्ये संगणक प्रयोग शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यांना इंटरनेट जोडणी दिली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तहसील कार्यालयात शिवसैनिकांचा राडा

$
0
0
देगलूर तहसील कार्यालयात शिवसेनेचे महेश पाटील यांच्यासह दहा-बारा जणांच्या शिवसैनिकांच्या टोळक्याने कार्यालयात धुडगूस घातला. सोमवारी संतप्त कर्मचाऱ्यांनी ‘लेखणीबंद’ आंदोलन केले. महसूल विभागावर दोन दिवसात ही दुसरी संक्रात आली आहे.

परळी शहरात धाडसी दरोडा

$
0
0
बीड जिल्ह्यातील परळी येथील अभयकुमार वाकेकर यांच्या घरात प्रवेश करून जवळपास पस्तीस लाख रुपयाचा सोने, चांदीचा ऐवज चोरट्यांनी पळवला. सोमवारी पहाटे ही घटना घडली. शहरातील मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने पोलिसांचा वाचक उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मराठा आरक्षणासाठी अर्धवस्त्र पदयात्रा

$
0
0
मराठा आरक्षणासाठी सर्व मराठा संघटनांच्या वतीने छावाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट यांनी जिजाऊ जयंतीच्या दिवशी सिंदखेडराजा येथून अर्धवस्त्र पदयात्रा सुरू केली आहे.

महंमद पैगंबरांचा पोषाख सुरक्षित

$
0
0
ईद-ए-मिलाद म्हणजे 'अल्लाह' चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ' ईद-ए-मिलादुन्नबी' हा सण इस्लामी वर्ष हिजरी रब्बीअवल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो.

उरूस पोल‌िस चौकीत दिला मुलाला जन्म

$
0
0
औरंगाबाद पैठण गेट येथील रजिया शेख गफ्फार या महिलेने खुलताबाद उरुसात असलेल्या पोलीस चौकीत एका मुलाला जन्म दिल्याची घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

$
0
0
महापालिकेच्या कचरा वाहणाऱ्या ट्रकची धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी गणेश कॉलनी भागात घडली. अपघातानंतर मृतदेह बराच वेळ जागीच पडून होता.

‘आप’कडे १७ हजार नवे सभासद

$
0
0
बड्या राजकीय पक्षांना धूळ चारत दिल्लीची सत्ता काबीज करणाऱ्या आम आदमी पार्टीने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले असून या पक्षाचे सदस्यत्व घेण्यासाठी नागरिकांमध्येच चढाओढ लागली आहे.

‘संसदेतील राखीव जागांचा पुनर्विचार होण्याची गरज’

$
0
0
‘संसदेमधील ७२ राखीव जागांवरील खासदारांचा शोषित, दलितांचे व्यापक हित साधण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे संसदेमधील राखीव जागांचा पुनर्विचार व्हावा,’ असे मत ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे (आठवले) नेते प्रा. अविनाश महातेकर यांनी मांडले आहे.

धार्मिक स्थळांसंदर्भात काय कारवाई केली?

$
0
0
नियोजन प्राधिकरणाच्या अंतर्गत मंजूर विकास योजनेनुसार औरंगाबाद शहरातील रस्ते विकसीत करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. या रस्त्यांमध्ये बाधीत होणाऱ्या धार्मिक स्थळांच्या संदर्भात काय कारवाई केली अशी विचारणा करून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने पालिकेला सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

व्यापाऱ्याला लुटणारे त्याचे नोकरच

$
0
0
दुकानात पूर्वी काम करणाऱ्या नोकरांनीच मालकाला लुबाडण्याचा प्लॅन आखल्याचे ए. एस. क्लबजवळील लुटमार प्रकरणात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी दुकानात काही वर्षांपूर्वी काम करणाऱ्या दोन नोकरांना व लुबाडण्याची सुपारी घेणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या काही तासांमध्ये वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

मुंबईवरून येऊन शहरात घरफोड्या

$
0
0
मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी सायंकाळी दोन संशयित आरोपींना जयभवानीनगर भागात अटक केली. परप्रांतीय टोळीतील या आरोपींनी जयभवानीनगर परिसरात गेल्या काही दिवसात केलेल्या दुकानफोडी केल्याची कबुली दिली आहे.

एसटीत चढण्यापूर्वीच मिळणार तिकीट

$
0
0
एसटीचा कारभार सुधारण्याच्या टप्प्यातील पुढचे पाऊल टाकत एसटी महामंडळाने प्रवाशांना बसमध्ये बसण्यापूर्वीच तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवी ‘इशू अॅण्ड स्टार्ट’ योजना संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरू होत आहे.

‘समांतर’साठी खैरेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

$
0
0
समांतर जलवाहिनीची उपविधी व ‘पीपीपी’ तत्त्वावरील प्रकल्पाला मान्यता द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सोमवारी दिले. यापूर्वी अनेकवेळा पाठपुरावा केला असून, हे शेवटचे निवेदन देत असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले आहे.

८० हजार कोटींचे प्रकल्प रखडले

$
0
0
सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात अनेक मोठे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत, परंतु अनेक कारणामुळे ते वेळेत पूर्ण न झाल्याने सुमारे ८० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प अद्यापही रखडले आहेत. असे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन त्याचा लाभ जनतेला झाला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

DMIC प्रकल्पात जपानची मोठी गुंतवणूक

$
0
0
‘दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर’ (डीएमआयसी) प्रकल्पात औरंगाबादमध्ये जपानकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात करण्यात येणार आहे.

अनुशेषाचे वास्तव दूर करणार

$
0
0
‘मराठवाड्याचा अनुशेष हे एक वास्तव आहे. मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी कर्तव्यबुद्धीने काम करण्याची मी प्रतिज्ञा केली आहे. केळकर समितीचा अहवाल लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी (१३ जानेवारी) येथे दिली.

अंगणवाडी सेविकांना ‘पोलिसी प्रसाद’

$
0
0
मुंबईमध्ये मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देण्यासाठी विद्यापीठात पोहोचलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी फरफटत नेऊन अटक केली.

श्रीमंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गरिबी

$
0
0
औरंगाबाद शहराची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रस्त्याची अवस्था पुरती बकाल झाली आहे. २४ तास वर्दळ असलेल्या या रस्त्यावरून दररोज ५० हजारहून अधिक वाहने ये-जा करतात; पण या रस्त्याची एकाचवेळी डागडुजी गेल्या २५-३० वर्षांत झालेली नाही.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images