Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बालनाट्यात रमले चिमुरडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐतिहासिक, सामाजिक नाट्य सादरीकरणातून नेमका संदेश देत बालकलाकारांनी बालनाट्य स्पर्धा गाजवली. स्पर्धेत आठ नाटकांचे सादरीकरण झाले. औरंगाबाद केंद्रावर कमी प्रवेशिका आल्यामुळे एकाच दिवसात स्पर्धा संपली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या १६ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. या स्पर्धेचे गोविंदभाई श्रॉफ नाट्यगृहात मंगळवारी सकाळी उदघाटन करण्यात आले. यावेळी रंगकर्मी प्रा. किशोर शिरसाठ, रमाकांत मुळे आणि नंदू भुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

औरंगाबाद केंद्रावरील प्राथमिक फेरीत आठ नाटकांचे प्रयोग सादर झाले. धनंजय सरदेशपांडे लिखित 'हॅलो रोबो', अभय कुलकर्णी 'संगीत वचनपूर्ती', असिफ अन्सारी लिखित 'कस्तुरी', हरिदास घुगासे लिखित 'नवा सूर्य', अरविंद जगताप लिखित 'कंपनी', किरण लद्दे लिखित 'छोटी छोटीसी बात', नवनाथ पवार लिखित 'नमामी गंगे' आणि गो. या. सावजी लिखित 'टिल्याची करामत' या नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले. मराठवाड्यात चार केंद्रावर ही स्पर्धा पार पडली. बीड केंद्रावर ४८ नाटक, नांदेड आणि लातूर केंद्रावर १६ नाटकांच्या प्रवेशिका आहेत. मात्र, औरंगाबाद केंद्रावर सर्वात कमी प्रवेशिका आल्या. महोत्सवाला विद्यार्थी व नाट्य रसिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपा प्रदेश कार्यकारिणी सोमवारी जालन्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक येत्या सोमवारी जालना येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे; तसेच राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. राज्यातील भाजपा मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष असे सुमारे एक हजार प्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहतील. दानवे यांच्या भाषणाने बैठकीचे उद्घाटन होणार असून, समारोप तर समारोप मुख्यमंत्री फडणवीस करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका साजरा करणार लोकशाही पंधरवाडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान महापालिका लोकशाही पंधरवाडा साजरा करणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग उपस्थित होते. लोकशाही पंधरवाड्याची रुपरेषा त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महापौर या पंधरवाड्याची घोषणा करून उद्घाटन करतील. त्यानंतर निवडणूकीच्या संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने काम सुरू केले जाणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये निवडणुकीचे महत्व स्पष्ट करणारे फलक लावण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या निवडणूक सुधारणांची प्रसिद्धी या पंधरवाड्यात केली जाणार आहे. निवडणूक, सुशासन पद्धती याबद्दल नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. निवडणुकीत निर्भयपणे मतदान करा, मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहनही केले जाणार आहे. या पंधरवाड्याचे नोडल ऑफिसर म्हणून उपायुक्त रवींद्र निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला घनकचरा व्यवस्थापनकक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता डी. के. पंडित, जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत अंत्यसंस्कार योजना आजपासून पुन्हा सुरू

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेची ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. बुधवारपासून (२३ जानेवारी) ही योजना सुरू होणार आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले.
तत्कालीन उपमहापौर संजय जोशी यांच्या पुढाकाराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू करण्यात आली होती. सुमारे एक वर्ष ही योजना चालल्यावर प्रशासनाने ती बंद करून टाकली. आता पुन्हा ही योजना सुरू करण्याचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी ठरविले आहे. २३ जानेवारी हा शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस आहे, त्या निमित्ताने पुन्हा ही योजना महापालिकेतर्फे सुरू केली जाईल, असे घोडेले म्हणाले. स्मशानजोगीला प्रत्येक मृतदेहाच्या मागे दोन हजार रुपये पालिकेकडून दिले जातील, त्यातून त्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. मोफत अंत्यसंस्कार योजनेचा लाभ घेणे हे एच्छिक आहे.
महापालिकेतर्फे मोफत शवपेटी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. शवपेटीच्या मागणीसाठी संबंधिताने आपल्या वॉर्डातील नगरसेवकाचे शिफारसपत्र व आवश्यक ती कागदपत्रे महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात सादर केल्यावर शवपेटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. २३ जानेवारीपासूनच ही सुविधा दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएस’च्या आठ संशयितांना कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आयएस' या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतील मुंब्रा उपनगरातून चार, तर औरंगाबादमधून पाच अशा नऊ संशयित समर्थकांना मंगळवारी (२२ जानेवारी) अटक करण्यात आली. त्यातील एकजण अल्पवयीन असल्यामुळे त्याची बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आले, तर उर्वरित आठ आरोपींनी बुधवारी विशेष कोर्टात हजर करण्यात आले असता, सर्व आठ आरोपींना पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी दिले.

याप्रकरणी 'एटीएस'च्या औरंगाबाद विभागाचे पोलिस निरीक्षक विजयपंत शंकरलाल जैस्वाल यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबादरसह अन्य शहरांमध्ये घातपाताची कारवाई करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती 'एटीएस'ला ऑगस्ट २०१८ मध्ये मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने संबधित संशयितांच्या मोबाईलवर पाळत ठेवली होती. २४ डिसेंबर २०१८ रोजी पथकाला मुंब्रा येथे राहणारा मोहसीन खान हा औरंगाबादेत आल्याची माहिती मिळाल्यावरुन त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. मोहसीन खान व त्याच्या साथीदारांनी 'उम्मत-ए-मोहम्मदिया' नावाचा ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये मोहसीन खानने अत्यंत विश्वासातील व्यक्तींना आणि समविचारी मित्रांना समाविष्ठ केले होते. हा ग्रुप गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये सक्रीय झाल्याचे लक्षात आल्यानंतर पथकाने मंगळवारी पहाटे शहरातून मोहसीन सिराजद्दीन खान (३२, रा. दमडी महल, औरंगाबाद), मोहम्मद मुशाहिद उल इस्लाम (२३, रा. कैâसर कॉलनी, औरंगाबाद), मोहम्मद सरफराज उर्फâ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२५, रा. राहत कॉलनी, औरंगाबाद), मोहम्मद तकी उर्फ अबू खालेद सिराजोद्दीन खान (२०, रा. कैâसर कॉलनी), ठाण्यातील मुंब्रा येथील १७ वर्षांचा आरोपी, जमान नवाब खुटेउपाड (३२, रा. मुंब्रा ठाणे), सलमान सिराजद्दीन खान (२८, रा. मोतीबाग, मुंब्रा), फहाद मोहम्मद इश्तियाक अन्सारी (२५, रा. अल्माश कॉलनी, मुंब्रा), मजहर अब्दुल रशीद शेख (२१, रा. मुंब्रा) या नऊ जणांना ताब्यात घेतले. मुंब्रातील चौघांना बुधवारी सकाळी औरंगाबादला आणण्यात आले. मुंब्रा येथील आरोपी जमानच्या ताब्यातून १३ रबरी हँडग्लोव्हज, १० 'एमएल'चे पांढरे रासायनिक द्रव्य, हार्डडिस्क, मोबाइल हँडसेट जप्त करण्यात आले. आरेपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या १२० (ब) सह १८, २०, ३८, ३९ बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा १९६७ सुधारणा २००४, २००८; तसेच १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा १९६७ सुधारीत २००८ अन्वये मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bआक्षेपार्ह वस्तुंमागचा उद्देश कोणता?

\Bआरोपींना बुधवारी कोर्टात हजर केले असता, गुन्हा अत्यंत गंभीर असून देशविघातक कृत्य करण्याच्या उद्देशाने ही टोळी सक्रीय झाली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यांच्या ताब्यातून रासायनिक द्रव्य तसेच विविध आक्षेपार्ह वस्तू-साहित्य जप्त करण्यात आले असून, ते आरोपींनी कुठून आणले, कशासाठी आणले, त्याचा नेमका उद्देश कोणता होता, आरोपी देशविघातक कृत्य करणार होते का आदींचा सखोल तपास करावयाचा असल्यामुळे आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने सर्व आठ आरोपींना पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अॅड. देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ दिवसांत गायब फाइल शोधा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या लेखा विभागातून गायब झालेली फाइल आठ दिवसांत शोधा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या संदर्भात परिपत्रक काढल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे.

ज्योतीनगर वॉर्डच्या नगरसेविका सुमित्रा हळनोर यांनी वॉर्डातील रस्त्यांच्या कामाबद्दलच्या फाइल तयार केल्या होत्या. त्यात गुरूतेगबहाद्दूर शाळा ते शाह कॉलनी, मोरे हॉस्पिटल ते बापू नगर, जयनगरमधील रस्त्यांच्या कामाचा समावेश होता. या फाइल लेखा विभागात मंजुरीसाठी आल्या आणि १४ जानेवारीपासून त्या लेखा विभागातून गायब झाल्या. फाइल गायब झाल्याची तक्रार हळनोर यांनी प्रशासनाकडे केली. प्रशासन फाइलचा शोध घेत आहे. मात्र, अद्याप फाइल सापडली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फाइल शोधासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अधिकाऱ्यांसाठी परिपत्रक काढले आहेत. आठ दिवसांत फाइल शोधा असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. एखाद्या नगरसेवकाच्या वॉर्डातील विकास कामांची फाइल गहाळ होणे ही बाब गंभीर आहे. नगरसेवकांच्या परस्पर स्पर्धेतून फाइल गहाळ होण्याची घटना घडली असावी अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे.

\Bसीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घ्या : महापौर

\Bनगरसेवकांमधील स्पर्धेत पालिकेचे अधिकारी - कर्मचारी सामील होत असल्यामुळे फाइल गहाळ झाल्याचे प्रकरण आयुक्तांनी गांभीर्याने घेतले आहे. या संदर्भात बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'परिपत्रक काढल्यानंतरही फाइल सापडल्या नाहीत तर आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वत: चौकशी केली पाहिजे. फाइल गहाळ प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. त्या आधारे चौकशी करणे शक्य आहे,' अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन महिन्यांत गॅस प्रकल्प

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्यासाठी महापालिकेने गुरुवारी बॅम्को या कंपनीबरोबर करार केला. येत्या तीन महिन्यात कांचनवाडी येथील जागेवर हा प्रकल्प उभारला जाऊ शकेल असे मानले जात आहे.

कचराकोंडी फोडण्याच्या दृष्टीने शासनाने नियुक्त केलेल्या संनियंत्रण समितीने चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल आणि कांचनवाडी येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा निश्चित केल्या. यापैकी चिकलठाणा आणि पडेगाव येथील जागेवर कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हर्सूल येथे खुल्या तंत्रज्ञानावर आधारित खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर कांचनवाडी येथे कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. गॅस निर्मितीच्या प्रकल्पासाठी महापालिकेने निविदा काढली होती. निविदा प्रक्रियेत बॅम्को कंपनीची निविदा पात्र ठरली. या कंपनीबरोबर महापालिकेच्या प्रशासनाने गुरुवारी नोंदणीकृत करारनामा केला. कांचनवाडी येथील चार एकर जागा गॅस प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी अडीच एकर जागेवर गॅस निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून उर्वरित जागा प्रकल्पाच्या अन्य कामांसाठी उपयोगात आणली जाणार आहे.

\Bअडीच एकर जागेवर प्रकल्प

\B- कांचनवाडी येथे होणार प्रकल्प

- चार एकर जागा प्रकल्पासाठी

- अडीच एकर जागेवर प्रकल्प

- उर्वरित जागा अन्य कामांसाठी

कचऱ्यापासून गॅस निर्मित प्रकल्प उभारण्यासाठी बॅम्को कंपनीबरोबर करार झाला आहे. आता लगेचच कंपनीला कार्यारंभ आदेश दिले जातील. त्यानंतर प्रकल्प उभारण्याचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. प्रकल्प उभारणीसाठी सहा महिन्यांचा अवधी दिलेला असला तरी तीन महिन्यात प्रकल्प उभा राहणे शक्य आहे.

- नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाँगकाँगमध्ये उद्योगविस्ताराच्या जागतिक संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हाँगकाँगमध्ये उद्योग विस्ताराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जागतिक पातळीवर उद्योगाचे जाळे पसविण्यास संधीचा लाभ घ्या, असे आवाहन हाँगकाँग ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने बुधवारी उद्योजकांना करण्यात आले.

हाँगकाँग ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिल (एचकेटीडीसी), हाँगकाँग व्यापार विकास परिषद व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर( सीएमआयए) मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ)यांच्यावतीने सूक्ष्म, मध्यम आणि मोठ्या उद्योजकांसाठी विशेष या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. सेमिनारला १००हून उद्योजक, व्यापाऱ्यांनी भेट दिली. जगभरात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हाँगकाँग हे एक विकासाचे प्रवेशद्वार आहे. याशिवाय एक उत्कृष्ट मंच देखील सिद्ध होत आहे. यासाठी स्थानिक उद्योजकांना तेथे आकर्षित करावे आणि त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना वाव मिळावा या उद्देशाने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या सूक्ष्म, मध्यम आणि मोठ्या उद्योजकांनी या सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हाँगकाँगमधील उद्योग आणि विविध संधी जाणून घेतल्या. एचटीटीडीसी प्लॅटफॉर्म आणि त्यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व त्यांचा फायदा कसा करून घ्यावा, हे या सेमिनारद्वारे सांगण्यात आले. मुख्यत्वेकरून इलेक्ट्रॉनिक्स आयसीडी, वैद्यकीय आणि औषध, होम, टेक्स्टाइल आणि लाईट क्षेत्र यासाठी हा सेमिनार उपयोगी ठरला. हाँगकाँग आणि भारत यांच्या द्विपक्षीय करारात २०१७ आणि २०१८मध्ये व्यवसाय आणि उद्योजक वाढीवर भर देण्यात आला होता. हाँगकाँगच्या ३० सहकारी देशांमध्ये भारताचा सर्वात मोठा वाटा आहे. एचपीटीडीसीचे इंडियन कन्सल्टंट राजेश भगत यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सीएमआयएचे शिवप्रसाद जाजू, मासिआ अध्यक्ष किशोर राठी, सचिव मनीष गुप्ता, विक्रम डेकाटे आदींसह उद्योजक उपस्थित होते.

\Bऔरंगाबादसाठी पायघड्या

\Bउद्योजकांशी संवाद साधताना हाँगकाँग ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिलचे दक्षिण पूर्व आशिया व भारतीय प्रादेशिक संचालक पीटर वोंग म्हणाले, 'हाँगकाँग ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिल औरंगाबादमधील उद्योजकांना एचटीटीडीसीद्वारे त्यांचा उद्योग वाढवण्यासाठी विशेष ऑफर देत आहे. आम्ही औरंगाबादमधील उद्योजकांद्वारे आणि व्यापाराद्वारे उत्पादित केलेले उत्पादने आणि सेवा जागतिक स्तरावर नेऊ इच्छितो. भारतातील मोठ्या आणि लहान शहरातील छोट्या छोट्या व्यावसायिकांना आम्ही त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी हाँगकाँग हे एक मुक्त प्रवेशद्वार देऊ इच्छितो. एचटीडीसीसीद्वारे प्रदान करण्यात येणाऱ्या व्यापार सेवा व त्यांचा फायदा येथील उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी घ्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॉपी स्ट्रीटची उत्सुकता शिगेला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सकाळच्या प्रसन्न वातावरणात विविध कलाप्रकारांसोबत आपल्या आवडत्या व्यायामप्रकारांचा जोड असेल तर त्यापेक्षी मोठी पर्वणी नाही. महाराष्ट्र टाइम्सने औरंगाबादकरांना गेल्यावर्षी हॅपी स्ट्रीट संकल्पनेची ओळख करून दिली. खेळ, झुंबा, एरोबिक्स, मुक्त हस्तचित्र, विविध क्रीडा प्रकार एकाच ठिकाणी पाहण्यासाठी गेल्यावर्षी औरंगाबादकरांची गर्दी झाली होती. यंदाही ही संधी औरंगाबादकरांना येत्या रविवारी २७ जानेवारी रोजी उपलब्ध होणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या उस्मानपुरा येथील कार्यालयासमोरील रस्त्यावर हा सोहळा रंगणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स','द टाइम्स ऑफ इंडिया' यांच्या पुढाकाराने २०१८मध्ये पहिल्यांदाच हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर येथील यशस्वी आयोजनानंतर औरंगाबादकरांनी १८ फेब्रुवारीपासून पुढचे तीन रविवार गेल्यावर्षी उत्साहाने भरलेल्या रस्त्यांचा अनुभव घेतला.

धावपळीच्या जीवनशैलीमुळे व्यायामाकडे दुर्लक्ष होते. त्यातून आरोग्यविषयक अडचणी उद्भवतात. गेल्या काही वर्षांपासून व्यायामाबाबत जनजागृती झाल्याने जीवनामध्ये व्यायामाचे महत्व, चालणे व सायकलिंग किती महत्वपूर्ण असते हे सकारात्मक पद्धतीने पटवून देण्याच्या उपक्रमातच करमणुकीचे विविध कार्यक्रमही हॅपी स्ट्रीटमध्ये सादर केले जातील. एरोबिक्स, झुंबाच्या तालावर पाहावयास मिळतील. आबालावृद्धांसाठी योग साधना, स्केटिंग, सायकलिंगची विशेष पर्वणी असेल. रॉक बँक शो, इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न क्लासिकल गीतांचे प्रकार सादर होतील. हॅपी स्ट्रीटमध्ये मित्र, मैत्रिणी, कुटुंबीयांसह सहभागी होता येईल. उस्मानपुरा चौकातील महाराष्ट्र टाइम्स कार्यालय ते क्रांतीचौक या रस्त्यावर सकाळी सहापासून हॅपी स्ट्रीटची धूम अनुभवता येईल. संडे मॉर्निंग आनंदात, उत्साहात, जल्लोषाच्या वातावरणात रविवारी (२७ जानेवारी) साजरी होणार आहे.

\Bकलाकरांना येथे संपर्क साधावा\B

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे. त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, साई स्क्वेअर, उस्मानपुरा, स्टेशन रोड येथे ०२४० - ६६३०२०० किंवा मोबाइल क्रमांक ९८२२६३०५५५ येथे संपर्क साधावा. योग्य कलाकृती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठीसुद्धा संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपले सरकार केंद्र रद्द; जिल्हाधिकाऱ्यास नोटीस

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

आपले सरकार सेवा केंद्र रद्द केल्याप्रकरणात दाखल याचिकेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने माहिती तंत्रज्ञान संचालक, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावली.

आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी पहिल्या यादीत सहा जणांची निवड केली होती, मात्र निवड झालेले सहाही जण संबंधित वॉर्डाचे रहिवासी नसल्याने त्यांची निवड रद्द करण्यात आली, मात्र याविषयी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये वॉर्ड संबंधीची अट नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाविरोधात अनिल देशमुख, गिरीष निकम, दादासाहेब सूर्यवंशी व इतर तिघांनी याचिका दाखल केली. जिल्हा प्रशासनाचा निर्णय रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.याचिकाकर्त्यांच्यावतीने देवीदास शेळके-पाटील यांनी बाजू मांडली. या याचिकेवर सहा फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू जनजागरण फेरी शहर दुमदुमले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युवा सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदू जनजागरण महारॅली'ने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. 'जय भवानी, जय शिवाजी', 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो' आदी घोषणांनी शहरातील विविध मार्ग दुमदुमून गेले होते.

युवा सेनेचे सचिव, नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी ११च्या सुमारास क्रांतीचौकातून फेरीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी युवा सेनेचे विस्तारक निखिल वालेकर यांची विशेष उपस्थिती होती. क्रांतीचौकातून निघालेली फेरी पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, मछलीखडक, दलालवाडी, निरालाबाजार, अदालतरोड, क्रांतीचौक, महर्षि दयानंद चौक, काल्डा कॉर्नर, जवाहरनगर, गजानन महाराज मंदिर चौक, जयभवानीनगर, सिडको बसस्टँड, कॅनॉट प्लेस, चिश्तिया कॉलनीमार्गे टीव्ही सेंटर चौकात आली. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. 'महारॅली'मध्ये ऋषिकेश खैरे, नितीन मेघावाले, सागर देवकर, प्रकाश धुर्वे, हनुमान शिंदे, मिथुन व्यास, किरण तुपे, शेखर जाधव, गणेश तेलुरे, ज्योतीराम पाटील, स्वप्निल डिडोरे, विशाल गायके, हेमंत दांडगे, अवधुत अंधारे, मनोज क्षिरसागर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

\Bगुलमंडी शाखेतर्फे अभिवादन\B

शिवसेनेच्या गुलमंडी शाखेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भिकाजीपंत जोशी, नगरसेवक सचिन खैरे, शिवसेना गुलमंडी शाखाप्रमुख सचिन ढोकरट, धीरज पांडे, अभिजीत खैरे, कृष्णा खडके,लक्ष्मण दिरे आदींसह शिवसेना संपर्क कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

\Bमहापालिकेत अभिवादन\B

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त महापालिका मुख्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक, उपायुक्त मंजुषा मुथा, रवींद्र निकम, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उद्यान अधीक्षक विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी जागा शोधा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद येथील 'महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठा'वर येत्या शैक्षणिक वर्षात वर्ग कोठे भरवायचे असा प्रश्न उभारणार आहे. शासकीय अध्यापक महाविद्यालयात सध्या विद्यापीठाचे वर्ग भरतात, तेथे दोन वर्षांसाठीच विद्यापीठ असेल, असे सांगण्यात आले होते. वाढती विद्यार्थी संख्या, संपणारी मुदत लक्षात घेऊन कॉलेज प्रशासनाने विद्यापीठ प्रशासनाला नवी जागा शोधण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे.

विधी विद्यापीठाला २०१७-१८ शैक्षणिक वर्षापासून औरंगाबादमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू झाले. सुरुवातीचे दोन वर्षे शासकीय अध्यापक महाविद्यालयात वर्ग भरविण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार महाविद्यालयाकडून जागा घेत कुलगुरूंचे दालन, प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र इमारत, वर्ग खोल्या, ग्रंथालय यासाठी जागा देण्यात आली. यासाठी तीन सभागृहे देण्यात आली. जागेची उपलब्धता लक्षात घेत विद्यापीठाने एकच अभ्यासक्रम सुरू केला. त्यानंतर यंदा दुसरे वर्ष असल्याने विद्यार्थी संख्या वाढली. बीएड कॉलेजलाही विद्यार्थी संख्या वाढल्याने आहे त्या जागेत तासिका घेण्याची वेळ आली. त्यामुळे विद्यार्थी संख्येच्या तुलनेत वर्गाची संख्या अपुरी पडते आहे. त्यात येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडणार. संभाव्य अडचणी लक्षात घेत महाविद्यालयाने विद्यापीठाला पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, असे सुचविले आहे. तसे पत्र विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. कुलगुरूंनी दिलेला राजीनामा, जागेचे भिजत घोंगडे यामुळे अडचणीत असलेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या अडचणीत भर पडली आहे. 'जल व भूमी व्यवस्थापन संस्था' (वाल्मी) परिसरातील शासकीय निवासस्थाने विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, कुलगुरू, प्राध्यापकांचे निवासस्थान म्हणून देण्यात आली आहेत. तेथे येत्या शैक्षणिक वर्षात जायचे की, इतर जागा शोधायची असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनाला पडला आहे.

\Bराष्ट्रीय विधी विद्यापीठाचे वर्ग एका खोलीत

\Bबीएड कॉलेजमधील पायाभूत सुविधा त्यांच्या अभ्यासक्रमानुसार आहेत. राष्ट्रीय स्तरावरच्या विद्यापीठाचा विचार करत दोन वर्षेच वर्ग भरविले जातील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. दुसरे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी, इमारत उभारणीच्या दृष्टिकोनातून कोणतीही तयारी नाही. त्यात विद्यार्थी संख्या वाढते आहे. सध्या राष्ट्रीय विधी विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या तासिका घेण्यासाठी केवळ एक वर्ग खोली उपलब्ध आहे. बीएड कॉलेजने परीक्षा विभागाची रूम, योगा सेंटर हे विद्यापीठाला दिले. तेथे ग्रंथालय, कुलसचिवांना बसण्यासाठीचे दालन उभारले. त्यामुळे जागेची उपलब्धता अतिशय मर्यादित आहे.

विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेत अनेक अडचणी निर्माण होतील. त्यात दोन वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना पुढे अडचणी निर्माण होऊ नयेत या हेतूने पर्यायी जागांचा विचार करावा, असे कॉलेजकडून कळविण्यात आले आहे.

- डॉ. संजीवनी मुळे, प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौर उर्जेद्वारे शहरातील ८०७ घरे प्रकाशमान

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील वीज ग्राहक आता मोठ्या प्रमाणावर सौर उर्जेचा वापर करत आहेत. घरांवर बसवलेल्या सौर पॅनलद्वारे निर्मित विजेद्वारे शहातील ८०७ घरे प्रकाशमान झाली आहेत.

औरंगाबाद शहरात महावितरणचे सुमारे तीन लाख वीज ग्राहक आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अनेक वीज ग्राहकांनी सौर उर्जा निर्मिती सुरू केली आहे. त्यांनी घरांवर सौर पॅनल बसवले आहेत. त्याकरिता महावितरणकडे नेट वीज मिटरिंग करण्यात आले आहे. ही संख्या २०१६मध्ये २१, २०१७ मध्ये ३२२, तर २०१८मध्ये ८०७ झाली. वर्षभरात नेट मिटरिंगबद्दल झालेली जनजागृती तसेच नेट मिटरिंगच्या ग्राहकांच्या अडचणी महावितरणकडून सोडविण्यात येत असल्याने सौर उर्जा तयार करणारे ग्राहक वाढले आहेत. २०१८मध्ये शहरात ४२२ वीज ग्राहकांनी ही योजना स्वीकारली आहे. आगमी काळात ही वाढण्याची शक्यता महावितरणने व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणीत गट्टूचे काम नव्याने सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्णपुऱ्यातील नागरिकांनी बंद पाडलेले पेव्हर ब्लॉक फुटपाथचे निकृष्ट काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. हे काम थातूर-मातूर करण्यात येत असल्याकडे 'मटा'ने लक्ष वेधले होते. 'मटा'च्या वृत्ताची दखल घेऊन हे काम पूर्णपणे नव्याने करण्यात येत आहे. या संदर्भात छावणी परिषदेच्या मंगळवारी (२२ जानेवारी) झालेल्या सर्वसाधारण बैठकीत सदस्यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे आतातरी 'वर्क ऑर्डर'मध्ये नमूद निकषांनुसार काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहराचे दैवत असलेल्या कर्णपुरा मंदिराकडे जाणारा सिमेंटचा रस्ता काही महिन्यांपूर्वी करण्यात आला असून त्याला लागून गट्टूचा (पेव्हर ब्लॉक) फुटपाथ बांधला जात आहे. छावणी परिसरातील वॉर्ड क्रमांक ७ मध्ये या भागाचा समावेश होतो. दीर्घ प्रतीक्षेनंतर हे काम तीन आठवड्यांपूर्वी सुरू करण्यात आले. हा फुटपाथ मंदिरापर्यंत बांधण्यात येणार आहे. वर्क ऑर्डरनुसार फुटपाथची लांबी १०५० फूट व रुंदी ७ फूट आहे. या कामाकरिता आधी सव्वाफूट खोदकाम, ६ इंच सोलिंग, ३ इंच मुरूम टाकून दबाई व त्यावर २ इंच काँक्रिटीकरण करून गट्टू बसवणे अपेक्षित आहे. मात्र यापूर्वीच्या कामात केवळ ६ ते ८ इंच एवढेच खोदकाम करून ६ इंच सोलिंग केले नव्हते. एवढेच नव्हे तर मुरूम न टाकता आसपासची माती वापरली होती. योग्य पद्धतीने रोलिंग न करता थातूर-मातूर पद्धतीने गट्टू बसवून मोकळे होण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. थातूर-मातूर कामाविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली.

या गैरप्रकाराविषयी 'मटा'ने शुक्रवारी (१८ जानेवारी) 'कर्णपुऱ्यात गट्टूचे काम अतिशय निकृष्ट' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल छावणी परिषदेने दखल घेतली आणि दोन दिवसांपासून फुटपाथचे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून जेसीबीद्वारे संपूर्ण फुटपाथचा मार्ग आणखी खोल खोदण्यात येत आहे. या मार्गाची खोली कार्यारंभ आदेशामध्ये नमूद केल्यानुसार सव्वाफूट आहे किंवा नाही, याची चाचणी पट्टी लावून केली जात असल्याचे दिसून आले. खोदकाम बुधवारपर्यंत पूर्ण होईल आणि त्यापुढे निकषानुसार दर्जेदार काम केले जाईल, अशी अपेक्षा आहे.

\Bदोन महिन्यांत रस्त्याची वाट

\Bअवघ्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी तयार केलेला सिमेंटचा रस्ता निकृष्ट पद्धतीचा तयार करण्यात आला आहे. हा रस्ता जागोजागी खडबडीत असून समतल नाही. काही ठिकाणी तर तो खचल्यासारखा दिसत आहे. हा सिमेंटचा रस्ता आहे का आणखी कशाचा, अशी शंका उपस्थित केली जात आहे. अवघ्या दोन-तीन महिन्यांत सिमेंट रस्त्याची अशी अवस्था कशी काय होऊ शकते, असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भातही मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

कर्णपुऱ्यातील फुटपाथ अपेक्षित निकषांनुसारच करण्यात येणार आहे आणि त्याच कंत्राटदाराकडून तयार करून घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने फुटपाथचे काम सुरू झाले आहे.

\Bविजयकुमार नायर\B, मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणी परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्ट फिल्मद्वारे नशेखोरीविरुद्ध जागर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नशेखोरीमुळे होणारे दुष्परिणाम व जीवाचे महत्त्व या विषयावर तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी जमात ए इस्लामी हिंदतर्फे शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. या फिल्मचा कालावधी साडे पाच मिनिट आहे. तिचा प्रसार सोशल मिडियातून केला जात आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांनी ती पाहून सोशल मिडियाच्या ग्रुपवरून शेअर करण्यात येत आहे.

नशेच्या आहारी गेल्या एका तरुणाने किराडपुऱ्यात एकाच खून करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी नशेखोरीविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस त्यांच्या पातळीवर कारवाई करतील, पण जमात ए इस्लामी हिंदतर्फे तरुणांना या धोक्यापासून सावध करण्यात येत आहे. जमात ए इस्लामीचे प्रवक्ते आदील मदनी यांनी या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले असून सय्यद तन्वीर यांची कथा आहे. त्यात नौशाद उस्मान, शादाब अली, अब्दुल कादर, अरसलान अली, शोएब अन्सारी यांनी अभिनय केला आहे.

या शॉर्ट फिल्ममध्ये पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीही तरुणांना नशेच्या आहारी जाऊन जीवन उद्धवस्त करू नका, असे आवाहन केले आहे. ही फिल्म दीड दिवसात तयार करण्यात आली. पीरगैब सहाब दर्गा मार्ग, सलीम अली सरोवर आदी भागात चित्रीकरण करण्यात आले आहे. फिल्मची लिंक हजारो तरुणांमध्ये शेअर करण्यात आल्याची माहिती आदील मदनी यांनी दिली.

……

\Bकथानक \B

नशेखोर मुलाच्या काळजीत असलेला बाप त्याला शोधण्यासाठी रात्री उशिरा घराबाहेर पडतो. नशेत असलेली मुलं दुचाकीवरून त्याला ठोस देऊन निघून जातात, असे कथानक आहे. अनेक मुलं नशा करून स्वत:चे नुकसान करून घेत असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारच्या पुतळ्याला सत्ताधारी शिवसेनेचे जोडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फसवी कर्जमाफी, कर्जमाफीवर व्याज आकारणी, पीक विमा, शेतसारा वसुली, दुष्काळी उपाययोजना यांसह शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरून शिवसेनेने बुधवारी (२३ जानेवारी) आपल्याच सरकार विरोधात विभागीय आयुक्तालयावर प्रचंड घोषणा देत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.

येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. शिवेसना आणि भाजपमध्ये युती होणार की नाही अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे औरंगाबादमध्ये शिवसेना आपल्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करत घोषणा देत असल्याचे चित्र बुधवारी होते. आंदोलन संपल्यानंतर शिवसैनिकांनी अचानक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा आंदोलनस्थळी आणला आणि या पुतळ्याल जोडे मारत तुडवले.

शिवसेनेने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी जिल्हाभरातील शेतकरी व शिवसैनिकांच्या वतिने विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असून, ७० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, बँका शेतकऱ्यांकडून सरसकट व्याज वसुली करत आहे, पीक विमा काढलेला असतानाही अनेकांना त्याचा लाभ मिळाला नसून, यामध्ये मोठा घोटाळा आहे, मराठवाड्यात दुष्काळ जाहीर केला असतानाही दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी केली नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनामध्ये महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्यासह राजेंद्र जंजाळ, राजू वैद्य, जयवंत ओक, कृष्‍णा डोणगावकर, बाळासाहेब थोरात, अनिल जैस्वाल, कमलाकर जगताप, संदेश कवडे, महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप, सुनिता आऊलवार, आनंदीबाई अन्नदाते, रंजना कुलकर्णी, प्राजक्ता राजपूत, सुनिता देव आदींची उपस्थिती होती.

\Bआंदोलकांच्या मागण्या\B

- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित रक्कम भरावी

- ज्या शेतकऱ्यांची अद्याप कर्जमाफी झाली नाही, त्यांना बँक जुलै २०१७नंतर व्याज आकारणी करत असून, ही लूट थांबवावी

- पीक विम्याचे काम सरकारी किंवा निमसरकारी संस्थेस देणे आवश्यक आहे

- दुष्काळी परिस्थितीतही होत असलेली शेतसारा वसुली थांबवावी

- जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभम कल्याण मल्टीस्टेटचा संचालक गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुंतवणूकदारांची सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शुभम कल्याण मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीचा अध्यक्ष दिलीप आपेट याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याला बुधवारी सकाळी बीड येथील कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी ३० जानेवारी २०१८ रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रितेश सतिश कृपलानी (रा. सिंधी कॉलनी) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यानी शुभम कल्याण मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये खाते उघडले होते. त्यांच्यासह १९ जणांनीही सोसायटीत गुंतवणूक केली होती. या सर्व गुंतवणूकदारांची किंमत दोन कोटी १९ लाख ५२ हजार रुपये होती. मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी त्यांची रक्कम परत मागितली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. रक्कम परत मिळाली नसल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात को ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष; तसेच कार्यकारी संचालक दिलीप शंकरराव आपेट, भास्कर बजरंग शिंदे, अजय दिलीपराव आपेट, विजय दिलीपराव आपेट, अभिजित दिलीपराव आपेट, बापूराव ज्ञानोबा सोनकांबळे, शिवकुमार गंगाधर शेटे, राम महादेव रोडे यांच्यासह पाच महिला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप आपेट हा बीड येथील कारागृहात एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलीप आपेट याला ताब्यात घेत अटक केली. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल सातोदकर, जमादार अरुण वाघ, योगेश तळवंदे, विनोद खरात आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅपी स्ट्रीटची उत्सुकता शिगेला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सकाळच्या प्रसन्न वातावरणात विविध कलाप्रकारांसोबत आपल्या आवडत्या व्यायामप्रकारांचा जोड असेल तर त्यापेक्षी मोठी पर्वणी नाही. महाराष्ट्र टाइम्सने औरंगाबादकरांना गेल्यावर्षी हॅपी स्ट्रीट संकल्पनेची ओळख करून दिली. खेळ, झुंबा, एरोबिक्स, मुक्त हस्तचित्र, विविध क्रीडा प्रकार एकाच ठिकाणी पाहण्यासाठी गेल्यावर्षी औरंगाबादकरांची गर्दी झाली होती. यंदाही ही संधी औरंगाबादकरांना येत्या रविवारी २७ जानेवारी रोजी उपलब्ध होणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या उस्मानपुरा येथील कार्यालयासमोरील रस्त्यावर हा सोहळा रंगणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स','द टाइम्स ऑफ इंडिया' यांच्या पुढाकाराने २०१८मध्ये पहिल्यांदाच हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर येथील यशस्वी आयोजनानंतर औरंगाबादकरांनी १८ फेब्रुवारीपासून पुढचे तीन रविवार गेल्यावर्षी उत्साहाने भरलेल्या रस्त्यांचा अनुभव घेतला.

धावपळीच्या जीवनशैलीमुळे व्यायामाकडे दुर्लक्ष होते. त्यातून आरोग्यविषयक अडचणी उद्भवतात. गेल्या काही वर्षांपासून व्यायामाबाबत जनजागृती झाल्याने जीवनामध्ये व्यायामाचे महत्व, चालणे व सायकलिंग किती महत्वपूर्ण असते हे सकारात्मक पद्धतीने पटवून देण्याच्या उपक्रमातच करमणुकीचे विविध कार्यक्रमही हॅपी स्ट्रीटमध्ये सादर केले जातील. एरोबिक्स, झुंबाच्या तालावर पाहावयास मिळतील. आबालावृद्धांसाठी योग साधना, स्केटिंग, सायकलिंगची विशेष पर्वणी असेल. रॉक बँक शो, इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न क्लासिकल गीतांचे प्रकार सादर होतील. हॅपी स्ट्रीटमध्ये मित्र, मैत्रिणी, कुटुंबीयांसह सहभागी होता येईल. उस्मानपुरा चौकातील महाराष्ट्र टाइम्स कार्यालय ते क्रांतीचौक या रस्त्यावर सकाळी सहापासून हॅपी स्ट्रीटची धूम अनुभवता येईल. संडे मॉर्निंग आनंदात, उत्साहात, जल्लोषाच्या वातावरणात रविवारी (२७ जानेवारी) साजरी होणार आहे.

\Bकलाकरांना येथे संपर्क साधावा\B

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे. त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, साई स्क्वेअर, उस्मानपुरा, स्टेशन रोड येथे ०२४० - ६६३०२०० किंवा मोबाइल क्रमांक ९८२२६३०५५५ येथे संपर्क साधावा. योग्य कलाकृती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठीसुद्धा संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौर कृषिपंप योजनेची संजीवनी

0
0

\Bऔरंगाबाद :\B सरकारच्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमुळे अतिशय कमी किमतीत शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीवर वीज उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवरील स्वतंत्र पोर्टलवर मागील दहा दिवसांत राज्यातील १८८०, तर औरंगाबाद परिमंडलातील ८०३ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. यात जालना जिल्ह्यातील ७३२, तर औरंगाबाद जिल्ह्यातील ७१ शेतकऱ्यांचे अर्ज आहेत. या योजनेचा घेतलेला हा धांडोळा...

\Bवैशिष्ट्ये \B

- शेतीला पाणी देता यावे यासाठी योजना

- वीजपुरवठा खंडित, रोहित्र बिघाडपासून मुक्ती

- ५ एकरपर्यंत शेती असल्यास ३ अश्वशक्तीचा सौरपंप

- ५ एकरपेक्षा जास्त जमीन ५ अश्वशक्तीचा सौरपंप

- सर्वसाधारण लाभार्थ्यांना १० टक्के रक्कम भरावी लागेल

- अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के हिस्सा

\Bफायदे

- \Bवीजबिल भरण्यापासून कायमची मुक्ती

- ५ वर्षांसाठी सौरपंपाची देखभाल मोफत

- दुरुस्ती कृषी पंप कंपनी करणार

- सौरपंप संचाचा ५ वर्षांचा विमा काढणार

- २ एलईडी बल्ब, मोबाइल, बॅटरी मिळणार

- www.mahadiscom.in/solar पोर्टलवर ऑनलाईन अर्ज

\Bपात्रता\B

- जलस्त्रोत आहे, पण वीज जोडणी नसलेला शेतकरी

- ज्यांनी कृषिपंप वीजजोडणीसाठी ३१ मार्च २०१८ पूर्वी अर्ज केले

- अर्ज करताना केवळ ७/१२ चा उतारा व आधार कार्डची गरज

- लाभार्थ्यांना किमतीत सूट मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक

- पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना-हरकत दाखला

- पाण्याचा पंप सामायीक असल्यास भागीदाराचे ना-हरकत प्रतिज्ञापत्र

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकत्याच सुरू झालेल्या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे झाले आहे. या पोर्टलवर सौर कृषिपंपासाठी अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच या वेबपोर्टलवर योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहेत. पोर्टलवर योजनेअंतर्गत सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे.

\B- सुरेश गणेशकर, मुख्यअभियंता, महावितरण\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधा दारात मात्र; माहितीची आवशक्यता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महानगरपालिकेच्या वतीने बुधवारपासून सिटी बस सेवेला प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये औरंगपुरा ते चिकलठाणा मार्गे गारखेडा पुंडलिकनगर अशी फेरी आहे. शहरातील अंतर्गत भागापर्यंत ही सुविधा पुरविण्याात आली आहे. मात्र, नागरिकांना याची माहिती होण्यास अद्याप कालावधी असल्याने सध्या या बसमध्ये अत्यंत कमी प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले.

औरंगपुरा बसस्थानकापासून सकाळी पावणेअकरा वाजता औरंगपुरा ते चिकलठाणा या बसने तिसरी फेरी सुरू केली. औरंगपुरा येथून महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधीसह केवळ एक प्रवासी बसमध्ये बसला. अमरप्रित, काल्डा कॉर्नर, रोपळेकर चौक, जवाहरनगर पोलिस चौक, विजयनगर, पुंडलिकनगर, जयभवानीनगर चौक, कामगार चौक, एन - २ ठाकरेनगर, एपीआय कॉर्नर, मुकुंदवाडी, रामनगर मार्गे चिकलठाणा असा या बसचा मार्ग आहे. बस सेवेचा पहिलाच दिवस असल्याने नागरिकांना या सेवेची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे शाळेचे विद्यार्थी सोडल्यास बसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. चिकलठाणा येथून ही बस याच मार्गे औरंगपुऱ्याकडे रवाना झाली. यावेळी रामनगर येथून एक प्रवासी आणि पुंडलिकनगर येथून एक प्रवासी बसमध्ये बसला.

नियोजन हवे

मनपाने सिटी बस सेवा सुरू केली असली तरी त्याचे नियोजन करण्यात आलेले नसल्याचे दिसून आले. औरंगपुरा ते चिकलठाणा मार्गे गारखेडा या मार्गावर नेमके बस थांबे कुठे ठेवायचे हेच अद्याप निश्चित नाही. त्यामुळे प्रवाशांची देखील ताराबंळ उडणार आहे. हे थांबे लवकर निश्चित करून या ठिकाणी बसच्या मार्गाचे आणि वेळापत्रकाचे टाईम-टेबल लावणे आवश्यक आहे.

रिक्षाचालकाची मुजोरी

औरंगपुरा ते चिकलठाणा मार्गे गारखेडा या मार्गावरून बसमध्ये प्रवास करताना मुख्यत: रिक्षाचालकांच्या मुजोरी दिसून आले. पुंडलिकनगर भागात रिक्षाचालकांनी बसला जाणीवपूर्वक साइड देणे टाळले. चिकलठाणा येथे देखील बसला यु टर्न घ्यायचा होता. मात्र, रिक्षाचालकांनी रिक्षा पुढे घेणे टाळल्याने या ठिकाणी देखील बसचालकाला अडचणीचा सामना करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images