Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निवृत्त शाखा अभियंता टीडीआरप्रकरणी अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी महापालिकेचा सेवानिवृत्त शाखा अभियंता मोहम्मद वसीम मोहम्मद युसूफ याला अटक केली. सराफा रोड येथील जागेच्या विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) मोबदला गैरव्यवहारात मोहम्मद वसीमचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आली.

महापालिकेचे कार्यालय शाखा अभियंता प्रभाकर दत्तात्रय पाठक यांनी ३० नोव्हेंबर २०१६मध्ये सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये सराफा रोड येथील एका मालमत्तेचा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) स्वरुपात मोबदला घेतलेला असतानाही मुख्त्यारपत्रधारक (जीपीए) अब्दुल सिकंदर अब्दुल साजेद यांनी 'टीडीआर' स्वरुपात मोबदला घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. हे टीडीआर प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्याची विक्री करण्यात आली. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या संगनमताने अब्दुल सिकंदर यांनी महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास सिटीचौक पोलिसांनी केल्यानंतर फेब्रुवारी २०१७मध्ये हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन महापालिका अधिकारी शेख वसीम यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी शेख वसीम यांना अटक केली. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुभाष खंडागळे, प्रकाश काळे, सुनील फेपाळे यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरवठामंत्री बापट यांना हायकोर्टाची नोटीस

$
0
0

म. टा.विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

बीड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केल्याबाबतच्या याचिकेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील पी. देशमुख यांनी दिले आहेत.

दुकानाचा परवाना निलंबित करणारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा आदेश; तसेच तो आदेश कायम करणारा उपायुक्त आणि राज्य मंत्र्यांचा आदेश नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी रद्द केला होता. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चार नोव्हेंबर २०१५ रोजी दुकानाचा परवाना निलंबित केला. त्या आदेशाविरुद्धचे दुकानदाराचे अपील उपायुक्त (पुरवठा) यांनी फेटाळले. त्याविरुद्धचा पुनर्विलोकन अर्ज अन्ना व नागरी पुरवठा व ग्राहक संस्थेचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी फेटळला. त्यानंतर दुकानदाराने नागरी पुरवठामंत्री बापट यांच्याकडे पुनर्विचार याचिका दाखल केली असता त्यांनी दुकानदाराचा परवाना बहाल केला; तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी, उपायुक्त आणि राज्यमंत्र्यांचा आदेश रद्द केला.

या आदेशाविरुद्ध प्रभाकर नागरे आणि मोहनराव नागरे या शिधापत्रिकाधारकांनी खंडपीठात आव्हान दिले. राज्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध कॅबिनेट मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे मंत्र्यांचा आदेश बेकायदा आहे. दुकानदाराला व्यवसायाची पुन्हा संधी आणि फेर चौकशी करण्याचा आदेश का दिला? याची कारणमिमांसा मंत्र्यांनी आदेशात दिली नाही. दुकानदाराकडून भविष्यात अशाप्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत हमीपत्र आणि प्रतिज्ञापत्र घेऊन, दहा हजार रुपये दंड आकारून परवाना बहाल केला. जे कायद्याच्या विरुद्ध आहे, असा युक्तीवाद याचिकाकर्त्याचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला.

याचिकाकर्त्यांनी मंत्री बापट यांना व्यक्तीश: प्रतिवादी करून त्यांच्याविरुद्ध आक्षेप आहेत. खंडपीठाने मंत्री बापट यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे, मात्र वादग्रस्त दुकान सुरू असल्यामुळे खंडपीठाने मंत्री बापट यांच्या आदेशाला स्थगिती दिली नाही. या याचिकेवर चार आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसरी ड्यूटी नहीं मिली क्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'क्यो मॅडम.. आपको दुसरी ड्यूटी नही मिली क्या...?' अशा कॉमेंट करत बुधवारी (२३ जानेवारी) बससेवेच्या पहिल्याच दिवशी शहागंज भागात काही रिक्षाचालकांनी नवीन सिटी बससेवेबाबत तिरस्कार व्यक्त केला. बसच्या वाहक महिलेने या टोळक्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, अशा लोकांच्या वृत्तीमुळे पहिल्याच दिवशी महिला वाहकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने केवळ सिटी बस सेवा सुरू केल्याच्या आनंदात न राहता अशा खोडसाळ लोकांच्या पोलिसांमार्फत मुसक्या आवळण्याची गरज आहे.

शहरात विविध ठिकाणी बससेवेला प्रारंभ करण्यात आला. यामुळे शहरात सुळसुळाट असलेल्या रिक्षाचालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार असल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. सिटी बस सेवेच्या यादीमध्ये शहागंज ते रेल्वेस्टेशन तसेच रेल्वेस्टेशन - मध्यवर्ती बसस्थानक - आमखास मैदान - जिल्हाधिकारी कार्यालय - चेलीपुरा मार्गे शहागंज या मार्गावरही बस सुरू करण्यात आली. प्रवाशांसाठी अत्यंत किफायतशीर दरामध्ये प्रवास आनंदात होत असला तरी बसच्या चालक व वाहकांना मात्र रिक्षाचालकांचे टोमणे सहन करावे लागत आहेत. हर्षनगर तसेच चेलिपुरा भागात दुचाकी वाहनांसोबतच रिक्षाचालकांची मोठी गर्दी असते. बुधवारी सिटी बस सेवेला प्रारंभ झाल्यामुळे अनेक रिक्षाचालकांना प्रवाशी मिळाले नाहीत. त्यामुळे रिक्षाचालक मिळेल त्या भावामध्ये प्रवाशी शोधत होते. या रस्त्यावर प्रचंड गर्दी असल्यामुळे बसचा वेग अत्यंत कमी होतो. याच दरम्यान नवीन शहरबस समोरून येताच चार-पाच रिक्षाचालकांनी बसमध्ये बसलेल्या महिला वाहकांकडे हातवारे करून 'क्यो मॅडम, दुसरी ड्यूटी नहीं मिलती क्या?' असे म्हणत कॉमेंट पास करणे सुरू केले. यावर बसचालकाने प्रसंगावधान राखत बसचा वेग वाढविला व बस शहागंज बसस्थानकाच्या दिशेने वेगात घेऊन गेला. हा प्रकार पाहिल्यानंतर प्रवाशांनी कुजबुज केली. मात्र, यावर संयमी महिला वाहकाने केवळ 'बघा हा असा त्रास सहन करावा लागतो', असे प्रवाशांना सांगितले.

बेशिस्त रिक्षाचालकांमुळे बसची कोंडी

शहरात रिक्षांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट असून नवीन बसेसच्या मार्गाला बेशिस्त रिक्षाचालकांचा अडथळा असल्याचे पहिल्याच दिवशी निदर्शनास आले. रेल्‍वेस्टेशनच्या दरवाजासमोरच मोठ्या प्रमाणावर रिक्षा उभ्या करण्यात येत असल्यामुळे बसला स्टेशनबाहेर निघण्यासाठी जागाच मिळत नाही.

रिक्षा इन बस आऊट : शहागंज बसस्थानकाची अवस्था

शहरातील सर्वात जुन्या बसस्थानाकापैकी एक असलेले शहागंज हे महत्त्वाचे बसस्थानक. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही बाजूने हे बसस्थानक वाटत नाही. सिटीट बस सेवेच्या पहिल्याच दिवशी या बसस्थानकामध्ये बसच्या जागेवर मालवाहतूक करणाऱ्या ट्रक पार्क करण्यात आलेल्या दिसल्या. तर बसस्थानकाच्या दोन्ही दरवाजांसमोर रिक्षाचालकांनी कोंडी केली होती. नवीन सुरू झालेल्या बस मात्र समोरच्या रस्त्यावरुनच पुढील मार्गाला लागत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजार विद्यार्थ्यांनी केला प्रवास

$
0
0

शहर बससेवेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर बससेवेला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कॉलेजच्या वेळापत्रकानुसार बससेवेचे वेळापत्रक न जुळल्याने अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली. मात्र, पहिल्याच दिवशी दोन हजार विद्यार्थ्यांनी प्रवास करत, बससेवेचे स्वागत केले.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बससेवेला प्रत्यक्ष बुधवारी सुरुवात झाली. शहरातील चौदा मार्गावरून धावणाऱ्या बसपैकी सात मार्ग औरंपुऱ्यातून जातात येथे बस थांबे आहेत. केंद्रावरून ठिकाणाहून शाळा, कॉलेजांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. बजाननगर, रांजनगाव, शिवाजीनगर, मुख्य बसस्थानकातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. औरंगपुरा ते रांजनगाव मार्गावर जाणाऱ्या शहर बससेवा सुरू झाली अन् ती रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, बाबा पेट्रोल पंप, ऑफिसर मेस, नगरनाका, गोलवाडी, साऊथ सिटी, एएस क्लब, सिडको महानगर, हॉटेल ओअॅसिस, मोरे चौक, प्रताप चौक, डॉ. आंबेडकर चौक आणि रांजणगाव फाटा अशा मार्गावर पोहचली. औरंगपुऱ्यातून बस निघताना बसमध्ये तुरळक गर्दी होती. बाबा पेंट्रोलपंपावर बस थांबली अन् गाडीत प्रवाशांची संख्या वाढली. पुढे सिडको महानगर, हॉटेल ओअॅसिस, मोरे चौक व प्रताप चौकात बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. येताना रांजनगावमधून बसमध्ये बसणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. बसमध्ये बसण्यासही जागा नसल्याने उभा राहणाऱ्यांची संख्या अधिक होती यात सर्वाधिक विद्यार्थी होते. बाबा चौकात काही प्रवासी उतरताच तोच पुन्हा बसमध्ये चढणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे या मार्गावर बसच्या फेरी अपुऱ्या पडल्या.

५० मिनिटमध्ये १४ किलोमीटर, सेल्फीचा आनंद

औरंगपुरा ते रांजणगाव अकरा बसथांबे आहेत. एक फेरी करायला ४० मिनीट अन् हॉल्टसाठी १० मिनीट देण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच बस पोहचली. रस्त्यात वाहतुकीची अडचणही फारसी नव्हती. मात्र, थांबे नसल्याने अडचणी समोर आल्या. त्यामुळे विद्यार्थी, एमआयडीतील विविध कर्मचाऱ्यांना रस्त्यावरच बसची प्रतीक्षा करत थांबावे लागते. त्यामुळे बसथांबे तात्काळ करण्यात यावेत असेही प्रवाशांनी सांगितले. बसमधून उतरल्यानंतर, बसमध्ये बसल्यानंतर नवीन बसमध्ये सेल्फी काढत तरुणाईने स्वागत केले.

प्रतिक्रिया

शहर बससेवेत अत्याधुनिक बस दाखल झाल्याने आनंद झाला. कॉलेजचे व शहर बससेवेचे वेळापत्रक याचा ताळमेळ असला तर आमच्यासाठी अधिक चांगले होईल.

कल्याण बोरुडे

अनुभव अतिशय चांगला होता. मात्र, वेळेप्रमाणे बस सुरू राहाव्यात अन् संख्या अधिक वाढावी जेणेकरून प्रवाशांचा जास्तीचा वेळ खर्ची लागणार नाही.

पवन काळवणे

मी, बीएस्सीचे शिक्षण घेतो. कॉलेजमध्ये सकाळी नऊ वाजता तासिका सुरू होते. त्यामुळे रांजणवहून येण्यासाठीचा विचार केला तर बसची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

अनिल लोमटे

अतिशय कमी पैशात ही सेवा सुरू झाली याचा आनंद आहे. यातील सातत्य अन् बसगाड्यांची संख्या, वेळापत्रक याबाबत अधिक स्पष्टता हवी.

अश्विनी तुपे

आमच्याकडे बससेवेचा मार्ग साजापूर, जोगेश्वरी अशा भागात नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. याचा विचार प्रशासनाने करायला हवा.

कुणाल गायकवाड

बससंख्या कमी असल्याने उभा राहून येण्याची वेळ येते. विद्यार्थी संख्या विचारात घेत नियोजन व्हायला हवे. दर कमी झाल्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला.

ऋषिकेश धनवटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय विद्यार्थी हरिश्चंद्रगडावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय अभ्यासामध्ये छोटासा ब्रेक घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १३ पदवीस्तरीय विद्यार्थ्यांनी ट्रेकिंगचा भन्नाट आनंद लुटला. महाराष्ट्रातील सर्वांत कठीण मानण्यात येणाऱ्या हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून तब्बल १४२२ मीटर उंच आहे. विद्यार्थ्यांचे येथील ट्रेकिंग संस्मरणीय ठरले. हा उपक्रम 'उमंग' या संघटनेमार्फत आयोजित करण्यात आला.

अहमदनगर, ठाणे व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हरिश्चंद्रगड नयनरम्य व भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. या गडावर चढाई करण्यासाठी विद्यार्थी १४ जानेवारी रोजी खिरेश्वर येथे पहाटे तीन वाजता धडकले. कच्चा रस्ता आणि कडाक्याच्या थंडीत खिरेश्वर येथील हॉटेलात उपलब्ध एकाच खोलीत झोप काढून सर्वजण सकाळी गडावर जाण्यासाठी सज्ज झाले. एका गाइडला घेत चढाई सुरू झाली. हसत खेळत आणि मनसोक्त फोटोसेशन करत निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटला. शिवाच्या मंदिरात विद्यार्थ्यांनी थकवा दूर केला. येथील पुजाऱ्याने मंदिराविषयीच्या दंतकथा सांगितल्या. आजुबाजुच्या गुंफांनीही भुरळ घातली आणि तिथून विद्यार्थी कोकण कड्याकडे निघाले. तेथील दृश्य विद्यार्थ्यांसाठी विस्मयकारक होते. तिथे थोडा वेळ घालवत आणि चहा-जेवण आटोपून परतीच्या प्रवासाला सुरवात झाली. सायंकाळी सहापर्यंत विद्यार्थी खाली पोहोचले. रात्री तंबूत राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तंबूत राहण्याचा, शेकोटीचा आणि ज्वारीची भाकरी, मुगाची भाजी, साळीचा भात, वरणावर ताव मारण्याचा मनसोक्त आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. परत येताना हिवरेबाजार या आदर्श गावाला दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. या ट्रेकिंगचे नियोजन शारंगधर कदम व पल्लवी राजपूत यांनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागणी जास्त, कर्ज प्रकरणे मंजुरीचे प्रमाण कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

मागणी जास्त आणि बँकांकडून कर्ज मंजुरीचे प्रमाण कमी, अशी अवस्था साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अनेक कल्याणकारी योजनाची झाली आहे. त्यातच राज्य शासनाची हमी नसल्याने तीन वर्षांपासून केंद्र सरकार पुरकृत योजनांचीही अंमलबजावणी ठप्प झाली आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत दारिद्रय रेषेखालील मातंग समाजातील नागरिकांचे जीवनमान उंचविणे, शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासात मदत होण्यासाठी व्यवसाय-उद्योग उभारण्यास अर्थसाह्य केले जाते. महामंडळामार्फत मातंग समाजाच्या बारा पोट जातीतील नागरिकांना अर्थसाह्य केले जाते. पण, गेल्या काही वर्षात यात सातत्य राहिलेले नाही. आर्थिक गैरव्यवहारामुळेही महामंडळ चर्चेत आहे.

अर्थसाह्य योजनेते २०१८-१९ या वर्षासाठी पाचशे प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्हा कार्यालयास देण्यात आले आहे. महामंडळाकडे एक हजार ६५ जणांनी योजनेचा लाभ मिळण्याकरिता अर्ज केला आहे. त्यापैकी बँकांनी २०२ कर्ज प्रकरणे मंजूर केले असून अनुदानापोटी महामंडळाने २० लाख रुपये लाभार्थ्यांना दिले आहेत. उर्वरित अर्ज बँकांकडे प्रलंबित आहेत. बीज भांडवल योजनेची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. या योजनेत ९० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून ६८० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ४४ प्रकरणांना बँकांनी मंजुरी दिली असून २४४ अर्ज प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी १४०० प्रकरणांपैकी केवळ ८२ प्रकरणांना मंजुरी दिली गेली. कर्जाची वसुली नाही, अर्जदार कर्ज कसे फेडणार, यासह अन्य कारणे सांगत बँका अर्ज अमान्य करतात. परिणामी महामंडळाचा उद्देश सफल होत नाही.

\Bशिष्यवृत्ती कोणाला द्यावी ?\B

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मातंग समाजातील दहावी, बारावी, पदवी व पदविका, अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेतील ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हानिहाय निवड केली जाते. त्यांना अनुक्रमे एक हजार, दीड हजार, दोन आणि अडीच हजार याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. पण, ही योजना निधीअभावी असून नसल्यास सारखीच आहे. २० लाख रुपयांच्या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजातून ही योजना राबविली जाते. यंदा ७० गुणवत्तांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. पण, जिल्हा कार्यालयास केवळ पाच हजार रुपये प्राप्त झाल्याने शिष्यवृत्ती कोणाला द्यावी, असा प्रश्न दरवेळेस निर्माण होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासन निर्णयातील त्रुटींचा अनाथांना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासन निर्णयातील किष्टतेमुळे अधिकाऱ्यांमना अनाथ प्रमाणपत्र देणे अवघड झाले आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी अनाथांकरिता आरक्षण जाहीर केले असले तरी ६ जून २०१६च्या शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश आहेत. या निर्णयातच स्पष्टता नसल्याने अधिकारी आपापल्या सोयीनुसार अर्थ लावतात किंवा कारण पुढे करून प्रमाणपत्र नाकारले जात आहे.

अनाथ प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी ६ जून २०१६च्या शासन निर्णयात बाल न्याय अधिनियम २०००च्या अंतर्गत बाल कल्याण संस्थांत दाखल मुले, असे नमूद केले आहे. मात्र सध्या बाल न्याय अधिनियम २०१५ लागू आहे. प्रमाणपत्र देण्याकरिता नेमक्या कोणत्या अधिनियमाचा नमुना घ्यायचा वापरायचा हे नमूद नाही. ज्यांच्या कागदपत्रांत जातीऐवजी धर्माचा उल्लेख केला आहे, त्यांच्याबद्दल प्रस्तावावर स्पष्टता नाही. एखाद्या अनाथ मुलाची जात माहिती असली तरी जात प्रमाणित करण्याचे अधिकार विभागास नाहीत असे अधिकारी सांगतात. प्रमाणपत्र वाटप झाल्यानंतर पालक किंवा नातेवाईक सापडले, तर काय करायचे याचा उल्लेख नाही. शासन निर्णयातील या त्रुटींमुळे प्रमाणपत्र वाटप करणे कठीण झाले आहे.

\Bविधीमंडळात प्रश्न \B

जुलै २०१८ मध्ये झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विभागाने घातलेल्या अटींमुळे अनाथ प्रमाणपत्र मिळण्यास अडचण असून मराठवाड्यातील अनाथ मुलांवर अन्याय होत आहे. याची शासनाने चौकशी केली काय, चौकशीत काय आढळले, अनाथ विद्यार्थ्यांना जातीचा दाखला देण्याबाबत कारवाई झाली का, प्रमाणपत्र विलंबाची कारणे कोणती, याची विचारणा केली होती. 'प्रमाणपत्र वाटपाची कारवाई महिला व बाल विकास उपआयुक्तांमार्फत होत असून अशा कोणत्याच समस्या नाहीत,' असे उत्तर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते.

पाच टक्के आरक्षण देऊ असे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात २०१३ मध्ये सांगितले होते. प्रत्यक्षात केवळ एक टक्का आरक्षण २०१७ मध्ये जाहीर केले. प्रमाणपत्र देण्याकरिता आमचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवायला हवे होते. याची काळजी संस्था व यंत्रणेने घेतली नाही. प्रमाणपत्र मिळत नसल्याने आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही.

-आदित्य चारेगावकर, अनाथ मुलांचे अभ्यासक

हे शासन फक्त निर्णय घेते, अंमलबजावणी करत नाही. निर्णय जाहीर करताना आरक्षण प्रत्यक्षात कसे येईल याची काळजी घ्यायला हवी होती. तांत्रिक अडचणींकडे दुर्लक्ष करून आरक्षण जाहीर झाले. म्हणूनच आरक्षण भेटूनही अनाथ मुलांना प्रमाणपत्र काढण्यासाठी मनस्ताप होत आहे.

-सतीश चव्हाण, आमदार

अनाथ मुला-मुलींना आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ पोचवण्याची पुरेशी काळजी घेण्यात आली नाही. महिला बालविकास खात्यातील अधिकाऱ्यांनाही अंमलबजावणी करता येत नाही. अनाथ मुलांना जात असो वा नसो त्यांना अनाथपत्र मिळायला हवे.

-हेमंत टकले, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजपथवर ‘एनसीसी’चे नेतृत्व औरंगाबादच्या सागरकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रजासत्ताक दिनी दिल्लीला होणाऱ्या संचलनात यंदा 'एनसीसी'च्या संघाचे देशपातळीवर नेतृत्व औरंगाबादचा सागर खंडू मुगले करणार आहे. देवगिरी कॉलेजमधील बीए अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या सागरने आपल्या आवाज, एकाग्रता, मेहनतीच्या बळावर हे यश मिळविले.

प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलनात सहभागी होण्याची संधी मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना आणि 'एनसीसी'मधून परेडमध्ये सहभागी होणासाठी मोठी स्पर्धा देशपातळीवर असते. यंदा औरंगाबादसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, 'एनसीसी'च्या तुकडीच्या पथसंचालनाचे नेतृत्व औरंगाबादचा विद्यार्थी करणार आहे. पथसंचलनातून देशाच्या सामर्थ्याचे, संस्कृतीचे दर्शन घडते अशा या सोहळ्यात सहभागी होणे हे अतिशय अभिमानास्पद असल्याची भावना सागरने 'मटा'कडे व्यक्त केली. तो १४८ जणांच्या तुकडीचे नेतृत्च करणार आहे. त्याचा अंतिम सराव बुधवारी येथे पार पडला. देशभरातील विविध राज्यातून दोन हजार एनसीसीचे कॅडेड आले होते. अतिशय खडतर मानल्या जाणाऱ्या तयारीतून अंतिम परेडसाठी विद्यार्थी निवडले जातात. त्या तुकडीचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली आहे. मुळ कन्नड तालुक्यातील वासडी गावचा असलेला सागर याने २०१६मध्ये एनसीसीमध्ये सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीड जिल्ह्यातील चारा संपला, पशुधन जगवण्याचे संकट

$
0
0

बीड :

बीड जिल्ह्यातील चाऱ्याचा साठा संपला असून, जिल्ह्यातील पशूधनाला जगविण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. बीड जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या ५० टक्के पाऊस पडला. पशुसंवर्धन विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात दोन लाख २५ हजार छोटी, पाच लाख ९६ हजार मोठी जनावरे, चार लाख दोन हजार शेळया-मेंढ्या असे ११ लाख ४७ हजार ६०४ पशुधन आहे. मोठ्या जनावरास प्रतिदिन सहा किलो लहान जनावरास तीन किलो आणि शेळी-मेंढ्यांना प्रतिदिन ६०० ग्राम चारा असा रोज चार हजार ४९८ टन चारा लागतो.

जिल्ह्यात उपलब्ध चारा केवळ २२ जानेवारीपर्यंत पुरेल एवढाच असल्याचा अहवाल जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांनी जिल्हा प्रशासनाच्याकडे पाठवला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील चारा संपल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास दुजोरा देऊन तो अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात दारुविक्री, महिलेला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात देशी-विदेशी दारुची चोरटी विक्री करणारी महिला आरोपी कल्पना ग्यानसिंग मळके हिला गुरुवारी (२४ जानेवारी) अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरेपीला शुक्रवारपर्यंत (२५ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

या प्रकरणी आरोपी महिला कल्पना ग्यानसिंग मळके (४५, रा. नारेगाव) ही राहत्या घरात देशी-विदेशी दारुची चोरटी विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकला असता एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत अर्धा किलो नवसागर व ५ लिटर पांढऱ्या रंगाचे द्रव्य मिळून आले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला कोर्टात हजर केले असता, तिला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीला गेलेला मुद्देमाल परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

घरात चोरी झाली की, आपला चोरीला गेलेला मुद्देमाल मिळतच नाही, अशी काहीशी धारणा नागरिकांमध्ये असते. मात्र शहर पोलिसांनी थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल १३८ नागरिकांना त्यांचा चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून दिला आणि या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. काहींच्या डोळ्यातून तर आनंदाश्रूही ओघळले. ४६ लाख ६२ हजार १०८ रुपयांचा मुद्देमाल परत देणाऱ्या पोलिसांचे नागरिकांनी मनोमन आभार मानले.

शहर पोलिस आयुक्त कार्यालय येथे पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते परत करण्यात आला. यात सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाइल, टॅब, दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. यावेळी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाटगे, पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर तसेच सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्यासह १५० ते २०० नागरिक उपस्थित होते.

असा मिळाला माल

पोलिस ठाणे गुन्हे मिळालेला मुद्देमाल

सिडको २५ ११ लाख १ हजार ५००

एमआयडीसी सिडको १० २ लाख ८ हजार ५७०

जिन्सी ०९ २ लाख १६ हजार ९००

हर्सूल ०४ २० हजार ८००

मुकुंदवाडी ०६ ६९ हजार ५००

जवाहर नगर ०६ ५९ हजार ९२०

उस्मानपुरा ०८ २ लाख ३२ हजार ५००

सातारा ०३ ८२ हजार ९००

पूंडलिकनगर ०४ ७४ हजार २००

सिटीचौक ०४ ७८ हजार ६७६

क्रांतीचौक १५ १४ लाख ७३ हजार २५०

छावणी १२ २ लाख १५ हजार १००

वेदांतनगर ०८ २ लाख २१ हजार ५९२

वाळूज ०३ २ लाख ४० हजार ७००

एमआयडीसी वाळूज ११ २ लाख ५३ हजार ७००

बेगमपुरा ०६ १ लाख १३ हजार

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार तासात पकडला टायर चोर

$
0
0

औरंगाबाद :

लोडिंग रिक्षाचे टायर चोरून नेल्याची घटना जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भवानीनगर येथे घडली. या प्रकरणाचा तपास करून अवघ्या चार तासात टायर चोराला पकडण्यात जिन्सी पोलिसांना यश आले आहे.

रामदास ताराचंद गुरुभैये (५४) रा. भवानीनगर यांच्या घरसमोर लोडिंग रिक्षा (एमएच २३-६२४७) लावली होती. अज्ञात चोरट्याने २२ जानेवारी रोजी ७ ते २३ जानेवारीच्या सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान रात्रीतून रिक्षाच्या मागील डाव्या बाजूचे टायर व डिक्स अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिन्सी गुन्हे शोध पथकाने चौकशी सुरू केली. या चौकशीत संशयित व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हेशोध पथकाने शेख मकबूल (३५) रा. तक्षशिलानगर, शबनम मशीद, गफूर वस्ती येथून ताब्यात घेतले. त्याच्याशी विचारपूस केली असता, त्याने टायर चोरल्याचे कबुल केले. त्याच्या जवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरिक्षक दत्ता शेळके, उपनिरिक्षक अय्युब पठाण, शेख हारून, संपत राठोड, संजय गावंडे, धनंजय पाडळकर, गणेश नागरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याचा प्लॉट बळकावला; दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

$
0
0

औरंगाबाद :

गारखेडा परिसरात असलेला एका व्यपाऱ्याचा कोट्यावधी रुपये किमतीचा प्लॉट बळकाविल्याचा गुन्हा जवाहर नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणात राहुल चाबुकस्वारसह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी राहुल हा भाजपचा सदस्य असून त्याच्यावर यापूर्वी देखील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़

या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पानदरिबा भागात राहणारे मिथून सतीश व्यास (३६) यांनी तक्रार दिली. या तक्रारीत त्याची जवाहारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे गारखेडा भागात भूमापन क्रमांक १५१८७/ अ / ६६ यावर राहुल चाबुकस्वार, वसीम खान, इम्रान खान, मुदस्सीर खान, शेख रहीम, शेख सलीम आणि इतर दोन महिलांनी संगनमत करून बोगस कागदपत्र तयार करून बेकायदा कब्जा केला़ या लोकांनी सदर प्लॉटवर पत्र्याचे शेड टाकून ठाण मांडले होते. व्यास त्यांना समजाविण्यासाठी गेले असता या लोकांनी त्यांना खंडणीची मागणी केली. तसेच व्यास यांना जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे़ या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या स्थितीचे सर्वेक्षण करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशपातळीवर शेतकरी विषयक धोरण ठरविण्यासाठी व त्यानुसार कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि समाजिक परिस्थितीचे सर्वेक्षण करून माहिती संकलित केली जात आहे. या कामाचे प्रशिक्षण अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयात पार पडले. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभराच्या काळात ही पाणी नॅशनल सँपल सर्व्हेच्या ७७व्या फेरीअंतर्गत करण्यात येणार आहे. ही माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे औरंगाबाद विभागाचे सहसंचालक किरण जोशी यांनी दिली आहे.

या पाहणीमध्ये शेतकरी कुटुंबाचे वार्षित उत्पन्न, कुटुंबाचे राहणीमान, त्यांच्या ताब्यात असलेली शेतजमीन, पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, शेतीपासून मिळणारे उत्पन्न,त्यासाठी होणारा खर्च, शेतमालाला मिळणारी आधारभूत किंमत, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे स्त्रोत, शेतकरी कुटुंबाकडे असलेली दुभती जनावरे, शेतीकामासाठी लागणारी जनावरे, पशूधनापासून मिळणारे उत्पन्न अशा स्वरुपाची माहिती संकलित केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी या पाहणीसाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेने नक्की कोणाला जोडे मारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सरकारला जोडे मारो आंदोलन' म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेना नेत्यांवर, शिवसेनेच्या मंत्र्यांवर दाखविलेला अविश्वासच आहे. सरकारमध्ये सेनेचे मंत्री आहेत. मग शिवसेना कार्यकर्त्यांनी नक्की कोणाला जोडे मारले?, असा सवाल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केला. खासदार चंद्रकांत खैरे आता निवडून येणार नाहीत', असा दावाही त्यांनी केला. तर 'धमक असेल तर सत्तेतून बाहेर पडा', असे आव्हान आमदार अतुल सावे यांनी सेनेला दिले.

शिवसेनेने बुधवारी सरकार विरोधात विभागीय आयुक्तालयावर प्रचंड घोषणा देत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत हल्लाबोल आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, संजय केणेकर, बसवराज मंगरुळे, कचरू घोडके, दिलीप थोरात, प्रा. राम बुधवंत, प्रमोद राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

खासदार चंद्रकांत खैरे यांनी ३० वर्षांत जनतेच्या लक्षात राहील असे कोणते एक काम केले, हे दाखवून द्यावे, असे आव्हान कराड यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी दिलेला असतानाही सेनेकडून येथील कामात कोणतीच प्रगती नाही. नियोजनाचा अभाव व टक्केवारी यात तर हा विकास रखडला नाही ना, अशी शंका नागरिकांना येऊ लागल्याचेही त्यांनी नमूद केले. खैरे यांनी शहराचे मोठे नुकसान केले असून युती झाली तरीही आता खैरे हे निवडून येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

सेनेचे मंत्री झोपा काढतात का?

सत्ता उपभोगत असलेल्या शिवसेनेत धमक असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान आमदार सावे यांनी दिले. कॅबिनेट बैठकीत सेनेचे मंत्री डुलक्या घेतात का, असा सवालही त्यांनी केला. तर जनतेचे पैसे व्यर्थ खर्च झाले तर नाही ना. यासाठी महापालिकेतील सेनेच्या कारभाराची चौकशी व्हायलच पाहिजे, अशी मागणी बोराळकर यांनी केली. शहराच्या विकासप्रश्नांवर सेनेचे असेच काम सुरू राहिले भाजप महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडेल, असा इशाराही नेत्यांनी यावेळी दिला.

औरंगाबादसाठी भाजपचा दबाब

सत्तेत शिवसेनाही सहभागी आहे, मग शिवसैनिकांनी कोणाला जोडे मारले, असा सवाल शहराध्यक्ष तनवाणी यांनीही उपस्थित केला. या आंदोलनामुळे संतप्त झालेल्या तनवाणी यांनी सेनेसोबत युती होईल किंवा नाही हे माहिती नाही पण, औरंगाबाद लोकसभेची जागा भाजपने लढवावी, असा ठराव शहर कोअर कमिटीने केल्याची माहिती दिली. येत्या २८ तारखेला होऊ घातलेल्या प्रदेश कार्यकारणीत तो मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यावर कौतुकाची थाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अध्यापन, सांस्कृतिक, क्रीडा, कला क्षेत्रात वर्षभरात शाळेतून अव्वल ठरलेल्या विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप गुरुवारी पडली. शाळेच्या 'माजी विद्यार्थी संघटना', 'एलआयसी'च्या यांच्या पुढाकाराने अशा दहा विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

शासकीय विद्या निकेतनमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४० एवढी आहे. अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा कौतुक सोहळा गुरुवारी शाळेत रंगला. भारतीय आयुर्विमा मंडळाने अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. शाळेच्या सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर 'एलआयसी'चे शाखा व्यवस्थापक महेश कांबळे, प्राचार्य अरुणा भूमकर, अनंत पंडित, प्रमोद पाटील, माधुरी निकाळजे, दुष्यंत आठवले, राजेंद्र परदेशी, केशव काळे, मानसिंग पाटील, संध्या खंदारे, नंदा कांबळे, डॉ. ज्योती खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महेश कांबळे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उर्जा असते, विचार असतात त्यांना दिशा देण्याची गरज असते. विद्या निकेतनमधील विद्यार्थ्यांमधील क्षमता गौरवास्पद आहेत. अनंत पंडित म्हणाले, जग घडविण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आहे. यावेळी दुष्यंत आठवले, केशव काळे, प्राचार्य भूमकर यांनी विचार मांडले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपल्यातील कलांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता तांदळे यांनी तर आभार कैलास श्रावणे यांनी मानले.

..

आदर्श विद्यार्थी.... गजानन गायकवाड

कला क्षेत्र......... रितेश गोरे

गायन क्षेत्र......... नितीन जंजाळ

क्रीडा क्षेत्र......... नितीन इंगळे

उत्कृष्ट मंत्री..... राजपाल खोडा

यश रुद्रके.............सहावीतून पहिला

जय औटे............. सातवीतून पहिला

गोविंद वाघमारे आठवीतून प्रथम

करण चोरमोरे नववीतून प्रथम

माधव संकाळे दहावीत प्रथम

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

वीजबिल थकविणाऱ्या साडेसहा हजारांहून अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून तोडण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या व वारंवार सूचना देऊनही विजबिल न भरणाऱ्या ग्राहकांवर वीज पुरवठा तोडण्याची कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली.

औरंगाबादमधील २९ हजार ७९६ वीज ग्राहकांकडे ४७ कोटी १० लाख रुपये थकबाकी आहे. यात औरंगाबाद शहरात ७ हजार ५९२ ग्राहकांकडे २१ कोटी १ लाख, औरंगाबाद ग्रामीण भागात १३ हजार ८२५ ग्राहकांकडे १३ कोटी ८१ लाख तर जालनामध्ये ८ हजार ३७९ ग्राहकांकडे १२ कोटी २७ लाख रुपये थकबाकी आहे. या महिन्यात यातील ८७६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी तोडण्यात आला आहे. त्यांच्याकडे २ कोटी ६५ लाख रुपये थकबाकी आहे. तसेच ५८२७ ग्राहकांचा वीजपुरवठा ९ कोटी ६० लाखांच्या थकबाकीसाठी तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या मोहिमेत ८२०६ ग्राहकांकडून चार कोटी ६७ लाख रुपये वसुलीही करण्यात आली.

दरम्यान, थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अ‍ॅपचा वापर करा…

वीजबिलांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या ऑनलाइन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे, असे महावितरणच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.

मुख्य अभियंत्यांनी जप्त केले वीज मीटर

एक लाखांवर वीज बिल राहिलेल्या वीज ग्राहकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले किंवा नाही. हे पाहण्यासाठी महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना तपासणी करण्याचे आदेश दिले. यासाठी कर्मचारी आणि अधिकारी हे स्वत: रस्त्यावर उतरून कनेक्शनबाबत माहिती घेत आहेत. या कारवाईत मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे स्वत: पाहणी करीत आहे. बुधवारी मुख्य अभियंता गणेशकर यांनी सकाळच्या सत्रात तीन ग्राहकांचे कनेक्शन चेक केले. एका ग्राहकाचे वीज मीटर स्वत: गणेशकर यांनी काढून आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगाला गांधी विचारांची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

' महात्मा गांधी केवळ व्यक्ती नसून माणुसकीची शिकवण देणारी मोठी संस्था आहे. हिंसेच्या गर्तेत सापडलेल्या जगाला आज गांधी आणि त्यांचा विचार समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही' असे प्रतिपादन गांधी अभ्यासक प्राचार्य विश्वास पाटील यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. 'म. गांधींचा विचार आणि सद्यस्थिती' या विषयावर प्राचार्य पाटील यांचे गुरुवारी महात्मा फुले सभागृहात व्याख्यान झाले. यावेळी प्र-कुलगुरू प्रो. अशोक तेजनकर, विभागप्रमुख प्रो. सुधाकर शेंडगे व संयोजक डॉ. संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

गांधी विचारावर डॉ. पाटील यांनी मांडणी केली. 'तरुणांनी गांधी विचार मुळापासून समजून घेण्याची गरज आहे. लोक गांधींना 'अधनंगा फकीर' म्हणतात. पण, गांधी चुकांची कबुली देणारा, चुकातून शिकविणारा आणि सामान्य माणसासाठी भारताचीच नव्हे तर जगाची वकिली करणारा अवलिया होता. गांधी विचार भारतीयांनी समजून घेतला नाही. पण, विदेशातील लोकांनी समजून घेतला. बराक ओबामा किंवा नेल्सन मंडेला यांना गांधीवादाने प्रभावित केले आणि राष्ट्रप्रमुखपदापर्यंत नेले. धर्म वाचवण्यासाठी अधर्माने चालता येणार नाही, हा त्यांचा विचार आजही प्रासंगिक ठरतो' असे पाटील म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. तेजनकर यांनी गांधी विचारांची आवश्यकता विषद केली. 'निःस्वार्थ सेवा, त्याग आणि समर्पण शिकवणारा, भौतिक सुविधेला तिलांजली देणारा गांधी एक विचार आहे. प्रेम, सत्य आणि अहिंसा हीच त्यांची त्रिसूत्री होती. अनेक देशांच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा गांधी होते. जे देश गांधी विचारापासून दूर गेले त्या देशांची वाताहत झाली. म्हणूनच द्वेषाने झपाटलेल्या जगाला गांधी विचारांची गरज आहे' असे तेजनकर म्हणाले.

डॉ. संजय राठोड यांनी प्रास्ताविक केले. गजानन सर्वज्ञ यांनी सूत्रसंचालन केले आणि बनसिंग बोई यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राचार्य राजकुमारी गडकर, प्रो. संजय नवले, प्रो. भारती गोरे, डॉ. भगवान गव्हाडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंपहाउसमध्ये स्पार्किंग; जुन्या शहरात आज निर्जळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी येथील पंपहाउसच्या वायरिंगमध्ये गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास स्पार्किंग झाल्यामुळे ५६ दशलक्ष लिटर रोज (एमएलडी) पाणी पुरविणारी जुनी योजना बंद पडली. दुरुस्तीचे काम करण्यासाठी किमान चार ते पाच तास लागणार असल्यामुळे जुन्या योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दुरुस्तीचे काम झाल्यावर रात्री उशिरा पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले. चार ते पाच तास पाणीपुरवठा बंद राहिल्यामुळे शुक्रवारी जुन्या औरंगाबाद शहरात पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाही. काही भागात उशिराने पाणीपुरवठा होणार आहे. १०० एमएलडीची पाणीपुरवठा योजना सुरू असल्यामुळे उर्वरित शहरात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - महेंद्र गिरगे, अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images