Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रावतेंच्या उपस्थितीत मुख्य ध्वजवंदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री असून त्यांच्याकडे औरंगााबद जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. शिंदे हे ठाणे ये‌थील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पोलिस आयुक्‍तालयाच्या देवगिरी मैदानावर शनिवारी (२६ जानेवारी) सकाळी नऊ वाजून १५ मिनिटांनी ध्वजवंदन करण्यात येणार आहे. तत्कालीन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सात जानेवारी रोजी आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने १८ जानेवारी रोजी एकनाथ शिंदे यांची औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्‍ती करण्यात आली. या आदेशाने पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला तरी २६ जानेवारीच्या मुख्य कार्यक्रमाला नवनियुक्‍त पालकमंत्री येतील की नाही, असा प्रश्‍न होता. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शासनाकडून मार्गदर्शन मागवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सौर ऊर्जेचा वापर वाढविण्याची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कधी काळी महाराष्ट्र इतर राज्यांना वीज पुरवठा करणारे राज्य होते. कोळसा हा वीज निर्मितीचा सर्वात मोठा स्‍त्रोत असून तो किती दिवस पुरणार ? आजही आपण कोळसा आयात करतो. शाश्वत वीज हवी असल्यास सौर ऊर्जा हा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे आगामी काळात अधिक संशोधन होऊन सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएन ऑफ महाराष्ट्र (फेकॅम)च्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे बागडे यांच्या हस्ते शुक्रवारी (२५ जानेवारी) उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, असोसिएशनचे अध्यक्ष अरुण अवघड पाटील, तसेच दामोदर नवपुते, सर्जेराव मेटे, शीतल शहा, रामेश्वर निंभोरे, अजित सूर्यवंशी, अनिल घाडगे, वीरेंद्र धुत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बागडे म्हणाले की, वीज तेथे विकास, मोदी सरकारच्या काळात दुर्लक्षित गावांना मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा करण्यात आल्याने अनेक गावे प्रकाशमान झाली आहेत. वीज गावोगावी पोचवणे व ग्राहकांना सुविधा देण्यात कंत्राटदारांचाही मोठा सहभाग आहे. वीज निर्मितीसाठी आवश्यक कोळसा आयात करावा लागतो. मात्र दुसरीकडे आपल्या राज्यात वर्षभरातील बहुतांश दिवस उत्तम सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे. येणाऱ्या काळात सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागणार आहे. तसे झाल्यास इंधनाचा प्रश्न दूर होईल. वाहनेही सौर ऊर्जेवर धावू लागतील. यामुळे जगासमोरील प्रदूषणाची समस्याही दूर होण्यास मदत होणार आहे, असे बागडे यांनी सांगितले.

डॉ. भागवत कराड म्हणाले की, वीज क्षेत्रात मोदी सरकारने मोठे काम केल्याचे सांगत फेडरेशनच्या अडचणी हरिभाऊ बागडे यांना सांगा, ते मुख्यमंत्र्यांना सांगून तुमच्या अडचणी दूर करतील, असा सल्ला दिला. या महाअधिवेशनात इलेक्ट्रिकल्स उत्पादनाचे प्रदर्शन भरवण्यात आले असून त्यात ११० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ लाखांच्या दारुची चोरी, आरोपीला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बजाजनगरातून ३५ लाखांची दारू व दारुचा ट्रक चोरुन नेल्याप्रकरणातील आरोपी गणेश गोरखनाथ पवार याला बुधवारी (२३ जानेवारी) अटक करुन गुरुवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (२८ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणी प्रमोद यादव चोरमारे (३३, रा. वाडीबुद्रुक, ता. भोकरदन, जि. जालना, ह. मु. बजाजनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीने १८ जानेवारी रोजी दारुने भरलेला ट्रक घराजवळ उभा केला असता, दारुसह ट्रकची चोरी झाली होती. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी गणेश गोरखनाथ पवार (२०, रा. टुणकी, शिऊरबंगल्याजवळ, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) याला बुधवारी अटक करण्यात आली. आरोपीने साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीच्या वाट्याला आलेले दारुचे बॉक्स (किंमतः २ लाख ८९ हजार ४४० रुपये) लिंबेजळगावच्या शेतातून जप्त करण्यात आले. आरोपीला गुरुवारी कोर्टात हजर केले असता, फरार आरोपीला अटक करणे व उर्वरित मालाबाबत चौकशी करणे बाकी असून, आरोपीला आणखी कोणी मदत केली आहे का, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशभक्तीपर गीतांचा आज कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्र सेविका समितीतर्फे आज वंदे मातृभूमी वंदे या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. श्रेयनगर येथील सिद्धेश हॉल येथे सायंकाळी चार वाजता कार्यक्रम सुरू होईल. अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर साधना सुरडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र सेविका समितीच्या कार्यवाहिका रत्ना हसेगावकर उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्या नगर कार्यवाहिका सुनीता जोशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’ला दुष्काळाचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळाचा परिणाम केंद्रीय 'जीएसटी' कार्यालयाच्या महसूलावर झाला आहे. डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत दोन हजार ३५८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात दोन हजार २०० कोटी रुपयेच 'सीजीएसटी'च्या तिजोरीत जमा झाले आहेत. नामांकित कंपनी असलेल्या स्कोडाकडून मिळणाऱ्या करात सुमारे १७७ कोटी रुपयांची तर व्यावसायिकांकडून सिंचन साहित्य विक्रीत घट झाल्याची माहिती 'सीजीएसटी'चे आयुक्त के. व्ही. एस. सिंग यांनी दिली.

येथील 'सीजीएसटी' कार्यालयात आंतरराष्ट्रीय उत्पादन शुल्क दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. औरंगाबाद 'सीजीएसटी' कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मराठवाड्यातील आठ जिल्ह्याचा समावेश आहे. विभागात एकूण एक लाख आठ हजार करदाते असून त्यापैकी 'सीजीएसटी'कडे ३७ हजार करदाते आहेत. उर्वरित राज्याच्या 'एसजीएसटी'कडे आहेत. मराठवाड्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीचा फटका 'सीजीएसटी'च्या महसूलावर झाला आहे. विभागाच्या महसूल नऊ टक्के तर नागपूर झोनचा महसूलात दहा टक्क्यांनी कमी झाला आहे. स्टील उद्योगातून मिळणाऱ्या महसुलाची गतवर्षीच्या तुलनेत चांगली परिस्थिती असून सिंचन साहित्य विक्रीत घट झाल्याने महसूल ९० लाखांनी घटला आहे.

\B१८५ इनपुट क्रेडिट प्रकरणांची तपासणी \B

'जीएसटी'च्या तरतुदीनूसार करदात्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येतो. काही करदात्यांनी घेतलेला क्रेडिट व यंत्रणेतील आकडेवारीत तफावत आढळली आहे. इनपुट क्रेडिट घेणाऱ्या मराठवाड्यातील १८५ प्रकरणाची यादी तयार करण्यात आली असून यात पाच लाखांवरचा ताळेबंद चुकला आहे. अशा प्रकरणाची तपासणी केली जाईल, हा प्रश्न लवकरच निकाली लागेल, अशी माहिती आयुक्त सिंग यांनी दिली.

\Bआंतरराष्ट्रीय उत्पादन शुल्क दिन साजरा\B

सिडको परिसरातील 'सीजीएसटी' कार्यालयात आंतरराष्ट्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा करण्यात आला. आयुक्त के. वी. एस. सिंग यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी मुंबई विभागातील सहायक आयुक्त रवीकुमार यांनी 'अथोराईज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर' या विषयावर सादरीकरण केले. उत्पादन शुल्कचे सहआयुक्त अमोल केत, एस. बी. देशमुख, अधीक्षक डी. आर. गुप्ता आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध उत्‍खनन करणाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0

औरंगाबाद : तालुक्यातील चितेपिंपळगाव, आडगाव, भालगाव परिसरातील सरकारी डोंगरांचे अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर उत्‍खनन करण्यात येत आहे. यामुळे प्रदूषण तसेच सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्यामुळे हे उत्‍खनन तत्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी भीम आर्मीने विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

या भागामध्ये महसूली अधिकाऱ्यांच्या संगन्मताने अवैधरित्या खडी क्रेशरही सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी खडी क्रेशन मालकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही हे आदेश झुगारून हे खडी क्रेशर सुरू ठेवण्यात आले आहेत. अवैधरित्या सुरू असलेले उत्‍खनन आणि क्रेशर सील करावे व दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मीचे बाळू वाघमारे, बलराज दाभाडे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन कपात एप्रिलनंतर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पदनाम बदल प्रकरणातील ३४३ कर्मचाऱ्यांची वेतन कपात तूर्तास एप्रिल महिन्यापर्यंत टळली आहे. कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने वरील आदेश दिले आहेत, मात्र मार्च महिन्यापासून जुन्या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळणार आहे. याबाबत सहसंचालक कार्यालयाच्या चौकशी पथकाने शुक्रवारी (२५ जानेवारी) विद्यापीठात कागदपत्रांची तपासणी केली.

राज्यभर चर्चेत असलेल्या पदनाम बदल प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ३४३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासन आदेश डावलून नियमबाह्य पद्धतीने पाच विद्यापीठांत पदनाम बदल करण्यात आला. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर उच्च शिक्षण विभागाने कारवाई सुरू केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना जुन्या वेतनश्रेणीनुसार वेतन द्यावे आणि सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अतिरिक्त प्रदान रकमेची वसुली करावी, असे शासकीय आदेशात म्हटले आहे. पदनाम बदल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य पातळीवर शहा समिती नेमली आहे. विभागीय पातळीवर संबंधित सहसंचालक कार्यालयाचे स्वतंत्र चौकशी पथक कार्यरत आहे. या पथकाने विद्यापीठात कुलसचिव डॉ. साधना पांडे यांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासली. उच्च शिक्षण विभागाला ३१ जानेवारीपर्यंत सहसंचालक कार्यालयाचे पथक अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सहकार्य करावे अशी अपेक्षा पथकाने व्यक्त केली. तपासात पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन कुलसचिव पांडे यांनी दिले. आकृतीबंध निश्चित करण्यासाठी १७ सप्टेंबर २००९ रोजी शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यानुसार 'बामू'तील ७७७ पदांचा संवर्गनिहाय आकृतीबंध निश्चित झाला. सात एप्रिल २०११ रोजी पदनाम बदलासाठी अध्यादेश काढण्यात आला, पण पदनामासोबत वेतनश्रेणी बदलण्यात आली. वरिष्ठ लिपिक मूळ पदे ७४ होती. त्यात ५८ पदे वाढवून १३२ पदे करण्यात आली. त्यामुळे कनिष्ठ लिपिक पदाला तीन वर्षांत पदोन्नत्या देण्यात आल्या. या प्रकारात कर्मचाऱ्यांचे वेतन थेट दुप्पट झाले. परिचर पदाचा पदनाम बदल प्रयोगशाळा तंत्रज्ञ करण्यात आला, पण दहावी उत्तीर्ण पात्रतेवर नियुक्ती मिळालेल्या परिचरची 'प्रयोगशाळा तंत्रज्ञ' झाल्यानंतरही शैक्षणिक पात्रता पूर्वीचीच राहिली. वरिष्ठ लिपिक ते वरिष्ठ सहायक पदनामात सर्वाधिक नियमबाह्य निर्णय घेण्यात आल्याचे तपासात आढळले आहे.

दरम्यान, पदनाम बदल प्रकरणातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अतिरिक्त प्रदान वेतनाची वसुली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता, मात्र काही कर्मचाऱ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. यावर तीन एप्रिलपर्यंत वसुली करण्यात येऊ नये, असे आदेश हायकोर्टाने बुधवारी दिले. शासकीय पातळीवर अतिप्रदान वसुली निर्णय रद्द करुन दरवर्षीची एक वेतनवाढ लक्षात घेत जुन्या वेतनश्रेणीनुसार वेतन देण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत २०११पासूनचा वेतनश्रेणीचा अभ्यास करण्यात येत आहे. मार्च महिन्याचे वेतन जुन्या वेतनश्रेणीनुसार असेल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

\Bकुलगुरूंच्या 'पीए'च्या वेतनाचा वाद

\Bपदनाम बदलात कुलगुरूंच्या स्वीय सहायकांना जास्तीची वेतनश्रेणी दिल्याचे चौकशीत आढळले आहे. लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी) गटातील स्वीय सहायक (पीए) यांना पदोन्नती देताना ४४०० वेतनश्रेणीवरून थेट ५४०० वेतनश्रेणी देण्यात आली. ४४०० ग्रेड पे नंतरच्या तीन वेतनश्रेणी डावलून ५४०० वेतनश्रेणी दिल्यामुळे अधिकाऱ्यांनी विशेष नोंद केली. पदनाम बदलात वेगळा गट करून अधिक वेतनश्रेणी देण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न अधिकाऱ्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी बॅकवॉटर परिसरात भारनियमन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी प्रकल्पात कमी पाणीसाठा असल्यामुळे सदरील पाणी जायकवाडी धरणात नवीन पाणीसाठा उपलब्ध होईपर्यंत पुरविणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात गंभीर पाणीटंचाई उद्भवणार नाही. बॅकवॉटर परिसरात भारनियमन करण्याचे गरजेचे असल्यामुळे या भागात दररोज केवळ चार तास वीजपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. भारनियमनासंदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग तसेच लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाला आदेश दिले आहेत.

सध्या जायकवाडी प्रकल्पामध्ये केवळ १८ टक्के पाणीसाठा उपलब्‍ध आहे. हा पाणीसाठा जाकवाडी धरणात नवीन पाणीसाठा उपलब्‍ध होईपर्यंत साठवून ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात गंभीर पाणीटंचाई उद्भवणार नाही. यासाठी अधिकृत व अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याने हे भार नियमन आवश्यक असल्याचे जिल्हाधिकऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटलेले आहे.

जायकवाडी प्रकल्प पैठण धरणात कमी पर्जन्यमानामुळे पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रकल्पात ६५ टक्के पेक्षा कमी प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा झाल्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानंतर उर्ध्व भागातील धरण समुहातून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यात आले होते. स्ट्रॅटर्जी ३ मध्ये नमुद केल्याप्रमाणे या वर्षी पिण्याचे पाणी, औद्योगिक पाणी वापर व रब्बी हंगामा करीता फक्त ५२ टक्के पाणी वापर करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलकुंभ सुरक्षेसाठी सुरक्षा बलाचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आयएस'च्या दहशतवाद्यांनी शहरातील दोन जलकुंभाची टेहळणी केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याकडे लक्ष वेधत जलकुंभांना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सहाय्यक आयुक्त सत्यनारायण जैस्वाल यांनी शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांना प्रस्ताव सादर केला.

घातपात घडविण्याचा कट रचणाऱ्या नऊ संशयित दहशतवाद्यांना 'एटीएस'ने नुकतीच अटक आहे. अटक झालेल्या दोघांनी शहरातील दोन जलकुंभाची टेहळणी केल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. सुरक्षा बलाचे सहाय्यक आयुक्त सत्यनारायण जैस्वाल यांनी महापौरांची भेट घेतली. राज्यात अनेक शासकीय संस्था, वास्तुंना संरक्षण देणारी ही संस्था आहे. घाटी रुग्‍णालयातही सुरक्षा बलाचे जवानच सुरक्षेचे काम करतात. जैस्वाल यांनी महापौरांना प्रस्ताव सादर करत जलकुंभांना सुरक्षा पुरविण्याची तयारी दर्शवली. या प्रस्तावावर आयुक्तांसोबत लवकरच महापौर चर्चा करणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

जलकुंभाच्या सुरक्षेबद्दल नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एका सदस्याने विविध वर्तमानपत्रांचा हवाला देत लक्ष वेधले व पाण्यातून घातपात घडवण्याचा डाव असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शहरातील १५ लाख नागरिकांच्या जीवितांचा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सभापतींनी तत्काळ सर्व जलकुंभावर सुरक्षा रक्षक नेमावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, गरज असेल तर पोलिस संरक्षण घ्यावे, असे निर्देश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार नियुक्तीपत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शनिवारी महापालिकेतील १२ वर्षे कालबद्ध सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केल्याचे नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. यासंबधी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली असून ध्वजवंदनानंतर आयोजित कार्यक्रमात या कर्मचाऱ्यांना महापौरांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.

महापालिकेतील अनेक वर्षांपासून रिक्त असलेली अनुकंपाची ४० पदे महिन्याभरापूर्वीच श्रेष्ठता यादीनुसार भरण्यात आली, तर पालिकेतील दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. शासनाकडून निर्देश येताच यासंबधीची कार्यवाही केली जाणार आहे. लाड समितीच्या प्रकरणाची पालिका प्रशासनाकडून छाननी सुरू असून त्यांनाही लवकरच नियुक्ती दिली जाणार आहे. तत्पूर्वी गेल्या १२ वर्षांपासून पालिकेच्या सेवेत असलेल्या जवळपास दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंबधी कर्मचाऱ्यांची यादीही प्रशासनाने अंतिम केली असून ध्वजवंदनानंतर महापौर नंदकुमार घोडेले याची घोषणा करणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मावस बहिणीवर बलात्कार; भावाला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मावस बहिणीला घरातून पळवून नेऊन विविध ठिकाणी बलात्कार करणारा उल्साहनगर येथील २३ वर्षीय आरोपी भावाला गुरुवारी (२४ जानेवारी) अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (२८ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दिले.

या प्रकरणी शहरातील पीडित १५ वर्षीय मुलीच्या पित्याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १८ नोव्हेंबर २०१८ रोजी फिर्यादीच्या दोन्ही मुली घरात एकट्याच होत्या व फिर्यादीची पत्नी किराणा आणण्यासाठी बाहेर गेली होती. फिर्यादीची पत्नी घरी आल्यावर मोठी मुलगी दिसली नाही म्हणून लहान मुलीला विचारले असता, तिने लघुशंकेसाठी गेल्याचे सांगितले. बऱ्याच वेळानंतरही मुलगी घरी आली नाही म्हणून तक्रार दिल्यावरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३ जानेवारी रोजी संबंधित मुलगी घरी आल्यावर तिच्या आई-वडिलांनी तिला पोलिस ठाण्यात हजर केले. त्यावेळी तिने दिलेल्या जबाबानुसार, शिर्डीला फिरायचे जायचे म्हणून आरोपी मुलीला घेऊन गेला. तिथे दर्शन घेऊन बाजारातून मंगळसुत्र आणून जबरदस्ती गळ्यात घातले. त्यानंतर आरोपी मुलीला उल्हासनगर येथे घेऊन आला. त्यानंतर आरोपी मुलीला उल्हासनगरजवळील बुवापाडा येथे घेऊन गेला आणि भाड्याच्या खोलीत राहिला. कुणाला न सांगण्याची धमकीही दिली. मुलीने शरीर संबंधाला नकार दिला असता आरोपीने मुलीला मारहाणही केली. ३० डिसेंबर २०१८ रोजी मुलीच्या आई-वडिलांना फोन करुन मुलीला घरी आणून सोडत असल्याचे सांगितले. २ जानेवारी २०१९ रोजी आरोपीने मुलीला शहरात आणून सोडले व रिक्षाने पळून गेला, असा जबाब मुलीने दिल्यावरुन पोक्सो व भादंवि ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला सुतगिरी चौकातून अटक करण्यात आली.

\Bअत्याचाराबाबत तपास बाकी

\Bआरोपीला शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, गुन्हा गंभीर असून, आरोपी पीडित मुलीला कुठे-कुठे घेऊन गेला, कुठे-कुठे अत्याचार केला, आरोपीला कुणी मदत केली का आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतुलनीय सेवा, सुवर्णभेदाचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपूर्ण देशाच्या शासकीय वैद्यकीय तसेच आरोग्य सेवेमध्ये सन्मानपूर्व मातृत्व सेवेची निराळी मोहोर उमटवून दर्जात्मक प्रसुतीची पद्धत तसेच नवनवीन तंत्र व आदर्श मातृत्व सेवेचा वस्तुपाठ घालून दिला आहे तो घाटीच्या स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाने. याच विभागाच्या सूचना प्रसुती सेवेसाठी देशपातळीवरील मार्गदर्शक तत्व ठरले आहेत. या सेवेचे खरे शिल्पकार आहेत विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा. तर, पुण्यात झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी राज्यातील एकमेव नेमबाज ठरली आहे औरंगाबादची हर्षदा निठवे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पदके जिंकणारी आणि ज्युनिअर, सिनिअर वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेतही हर्षदाने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या दोन्ही रत्नांचा यशोचित गौरव 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयात गुरुवारी (२५ जानेवारी) करण्यात आला.

शहरातील ज्येष्ठ मेंदुविकारतज्ज्ञ डॉ. नंदकुमार उकडगावकर, 'मटा'च्या औरंगाबाद आवृत्तीचे वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने यांच्या उपस्थितीत या दोन्ही रत्नांचा गोरव करण्यात आला. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वाधिक प्रसुती सेवा देणाऱ्या घाटीच्या स्त्रीरोग विभागाने गेल्या वर्षी तब्बल १८ हजार प्रसुती केल्या आहेत. दररोज ६० ते ७० प्रसुती होणाऱ्या स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाला खऱ्याअर्थाने आधुनिक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला असेल तर तो डॉ. गडप्पा यांनी. 'लेबर रुम'मध्ये काळानुरुप बदल करीत 'स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर' कशी असावी, प्रसुतीसाठी आलेल्या प्रत्येक गर्भवती महिलेला 'लेबर रुम'सह संपूर्ण स्त्रीरोग विभाग केवळ सुसह्य नव्हे तर आरामदायी, सुखद व पूर्णपणे तणावमुक्त कसा वाटेल, प्रत्येक गर्भवतीची संपूर्ण प्रसुतीची प्रक्रिया आनंददायी कशी होईल या व अशा अनेक बाबींचा सखोल अभ्यास करुन डॉ. गडप्पा यांनी प्रसुतीसाठीची मार्गदर्शक तत्वे तयार केली व ती प्रत्यक्षात आमलात आ‍णली. ही मार्गदर्शक तत्वे संपूर्ण देशातील शासकीय रुग्णालयांला लागू करण्यात येत आहे. खुद्द केंद्र सरकारने या सर्व मार्गदर्शक सूचना स्वीकारल्या आहेत. घाटीच्या स्त्रीरोग विभागाने प्रत्यक्षात अमलात आणलेली नवनवीन तंत्रदेखील स्वीकारत केंद्र सरकारने देशातील सर्व रुग्णालयांसाठी लागू केली आहेत. वैद्यकीय गर्भपाताचे 'मॉडेल सेंटर' म्हणूनही या विभागाकडे पाहिले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विभागाची वेळोवेळी पाहणी करुन डॉक्टर-परिचारिका-कर्णचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केला आहे. या सर्व टप्प्यांची मूळ कल्पना, संकल्पना डॉ. गडप्पा यांची आहे. अर्थात, अख्ख्या विभागाने या कामांसाठी झोकून दिले आहे. यानिमित्त 'मटा' कार्यक्रमात डॉ. गडप्पा यांचा सत्कार करताना डॉ. उकडगावकर यांनी गौरवोद्गार काढले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

पुण्यात झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी औरंगाबादची हर्षदा निठवे ही राज्यातील एकमेव नेमबाज ठरली आहे. हर्षदाने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पदके जिंकली आहेत. ज्युनिअर, सिनिअर वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत हर्षदाने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. २०१२ मध्ये हर्षदाने १४ वर्षांखालील राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत पदक जिंकले. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही. हर्षदाने दहा मीटर एअर पिस्तुलमध्ये सोनेरी वेध घेत नेमबाजीमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. तिने २१ वषार्खालील मुलींमध्ये २३६.३ गुणांची नोंद केली. ती औरंगाबाद येथील एमजीएम नेमबाजी अकादमीत संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आहे. हर्षदा हिने आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत भरघोस पदकांची कमाई केली आहे. तिने शालेय गटाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही पदकांची लयलूट केली आहे. दररोज पाच तास सराव करणाऱ्या हर्षदाच्या वडिलांची खानावळ असून त्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारेच तिच्या नेमबाजीसाठी खर्च केला जात आहे. हर्षदा हिला लहानपणापासून नेमबाजीची आवड होती. शाळेत असताना ती नेमबाजी स्पर्धा पाहण्यासाठी जात असे. तिथुनच तिने नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिला आंतरशालेय स्पर्धांमध्ये यश मिळाल्यानंतर तिला घरच्यांकडून या खेळासाठी सहकार्य मिळाले आहे. ती सध्या अंबड येथील मत्स्त्योदरी महाविद्याालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे.

महिलांचे आरोग्य हे पुरुषांइतकेच महत्वाचे असून, महिलांच्या आरोग्याची काळजी पुरुषांसह संपूर्ण कुटुंबाने घेतली पाहिजे. ती सर्वांचीच जबाबदारी आहे.

\Bप्रा. डॉ. श्रीनिवास गडप्पा, \Bस्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी

खेळांसाठी मुलींना घरातून प्रोत्साहन मिळाल्याशिवाय मुली पुढे येणे शक्य नाही. आई-वडिलांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

\Bहर्षदा निठवे\B, राष्ट्रीय नेमबाज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट बक्षीसपत्र तयार करून प्लॉटवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंद होताच दुसऱ्या दिवशी हे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. दरम्यान, यावेळी एका तरुणाला विष पाजल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे सांगितले.

मिथुन व्यास (वय ३६, रा. पानदरिबा) यांनी गुरुवारी जवाहर नगर पोलिसांना तक्रार दिली होती. त्यात मौजे गारखेडा भागात भूमापन क्रमांक १५१८७/ अ / ६६ यावर राहुल चाबुकस्वार, वसीम खान, इम्रान खान, मुदस्सीर खान, शेख रहीम, शेख सलीम आणि इतर दोन महिलांनी संगनमत करून बोगस कागदपत्र तयार करून बेकायदा कब्जा केला. या लोकांनी सदर प्लॉटवर पत्र्याचे शेड टाकून ठाण मांडले आहे. त्यांना समजाविण्यासाठी गेलो असता या लोकांनी खंडणीची मागणी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली, अशी तक्रार व्यास यांनी केली होती. त्यावरून चाबुकस्वार सह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

शुक्रवारी जवाहरनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद इंगळे, चार पोलिस अधिकारी, २० कर्मचाऱ्यांसह या प्लॉटवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेले होते. दरम्यान, अतिक्रमण केलेले साहित्य हटविण्याचे काम सुरू असतानाच प्लॉटवर असलेल्या शेख तरबेज व एकास मारहाण झाली तसेच व्यास व त्यांच्या साथीदारांनी तरबेजला बळजबरी काहीतरी विषारी औषध पाजल्याचा आरोप केला जात आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्तात आम्ही गेलो होतो. कायदेशीर कारवाई सुरू असताना अतिक्रमणधारकांनी विरोध केला. त्यामुळे किरकोळ वाद झाला. पण, पोलिसांसमोर कुणीही मारहाण केली नाही किंवा विष पाजलेले नाही. ते सर्व आरोप निराधार आहेत.

- शरद इंगळे, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामुदायिक विवाह सोहळा येत्या तीन मार्च रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील धर्मादाय संस्थांनी स्थापन केलेल्या सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे तीन मार्च २०१९ रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यासाठी नावनोंदणी सुरू करण्यात आली असून, २० फेब्रुवारी २०१९ नावनोंदणीची अंतिम मुदत आहे.

सर्व जाती, धर्म, समाजातील वधु-वरांनी आपली नावे नोंदवावीत. समितीतर्फए लग्नसोहळा पार पाडला जाईल. यासाठी नोंदणी अर्ज एन-नऊ, सिडकोतील रेणुका माता मंदिर, एन-एक सिडकोतील भक्ती ट्रस्ट गणेश मंदिर, चिकलठाणा येथील हनुमान मंदिर, किराडपुरा भागातील श्रीराम मंदिर, समर्थनगरमधील वरद गणेश मंदिर, औरंगपुरा येथील सिमंत मंगल कार्यालय, राजाबाजारमधील दिगंबर जैन मंदिर, धुपखेडा येथील साईबाबा मंदिर वेरूळ येथील घृष्‍णेश्वर मंदिर, जनार्धन स्वामी महाराज आश्रम, खुलताबाद येथील भद्रा मारोती मंदीर, बालाजी मंदीर बाबरा, एकनाथ महाराज समाधी मंदीर पैठण, बिडकीन येतील हनुमान मंदिर, सरला बेट येथील गंगागिरी महाराज आश्रम, उंडणगाव येथील बालाजी मंदिर उंडणगाव, अजिंठा येथील अबरीष ऋषी संस्थान, लासूरगाव येथील देवी दाक्षायणी मंदिर, औरंगपुरा येथील नाथ मंदिर, लासूर स्टेशन येथील गणपती मंदिर येथे उपलब्‍ध आहेत.

सज्ञान वधु-वरांनी भरलेले अर्ज सिमंत मंगल कार्यालय, अंबा अप्सरा टॉकिजजवळ, औरंगपुरा येथे २० फेब्रुवारी २०१९पर्यंत जमा करावे. विवाहासाठी नोंदणी करण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष आमदार संदीपान भुमरे, उपाध्यक्ष दीपक अग्निहोत्री, सचिव दयाराम बसय्ये, सहसचिव राजू कुलकर्णी, कोषाध्यक्ष डॉ. प्रदीप वक्ते व समितीचे सदस्य, विश्वस्त संस्थांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत ध्वजवंदन

$
0
0

औरंगाबाद: प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (२६ जानेवारी) सकाळी आठ वाजून ५ मिनिटांनी महापालिका मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात येणार आहे. या समारंभाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयुक्त डॉ़ निपुण विनायक यांनी केले आहे़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरात दारुविक्री, महिलेला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात देशी-विदेशी दारुची चोरटी विक्री करणारी महिला आरोपी कल्पना ग्यानसिंग मळके हिला गुरुवारी (२४ जानेवारी) अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरेपीला शुक्रवारपर्यंत (२५ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

या प्रकरणी आरोपी महिला कल्पना ग्यानसिंग मळके (४५, रा. नारेगाव) ही राहत्या घरात देशी-विदेशी दारुची चोरटी विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकला असता एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत अर्धा किलो नवसागर व ५ लिटर पांढऱ्या रंगाचे द्रव्य मिळून आले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला कोर्टात हजर केले असता, तिला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी घाटीत प्रसूतींचे अर्धशतक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा परिसरातील मिनी घाटी अर्थात जिल्हा सामान्य रुग्णालयाने उशिरा का होईना काहीअंशी वेग घेतला असून, रुग्णालयामध्ये सद्यस्थितीत विविध विभागांच्या माध्यमातून अनेक सोयी-सुविधा सुरू झाल्या आहे आणि नजिकच्या काळात आणखी अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार आहेत. अवघ्या सात महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या 'ओपीडी'मध्ये सध्या दररोज ७०० ते ८०० रुग्णांवर उपचार होत आहेत; तसेच प्रसूती विभाग सुरू झाल्यापासून केवळ दीड महिन्यांत ४८ प्रसुती झाल्या आहेत, ज्यामध्ये तीन सिझेरियन प्रसुतींचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी नवजात शिशुंसाठी 'एनबीएसयू' हा विभाग सुरू झाला असतानाच कमी वजनाच्या, मुदतपूर्व प्रसुती झालेल्या, जंतुसंसर्गासह व इतर आजारी शिशुंसाठी 'एसएनसीयू' हा विभागही लवकरच सुरू होणार आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय हे दशकभर ताटकळल्यानंतर २५ जून रोजी एकदाचे सुरू झाले. अर्थात, रुग्णालय सुरू झाले म्हणजे पूर्ण क्षमतेने नव्हे तर केवळ बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) आधी सुरू करण्यात आला. त्यावेळी सुरुवातीच्या टप्प्यात केवळ बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण 'ओपीडी'मध्ये येत होते. त्यानंतर हळुहळु ही रुग्णसंख्या वाढत गेली आणि दहा ऑक्टोबर रोजी आंतररुग्ण विभाग (आयपीडी) सुरू झाला आणि त्यासोबतच छोट्या-छोट्या व किरकोळ स्वरुपाच्या शस्त्रक्रियाही सुरू झाल्या. त्यापुढच्या टप्प्यात चार डिसेंबर रोजी प्रसुती विभाग सुरू झाला. २०० खाटांच्या रुग्णालयात सध्या ४० ते ५० खाटा उपयोगात येऊ लागल्या आहेत. 'ओपीडी'चा आकडा वाढत जाऊन आज ७०० ते ८०० वर गेला आहे आणि प्रसूतींचा आकडाही ४८पर्यंत गेला आहे. यामध्ये तीन सिझेरियन शस्त्रक्रियांचा समावेश आहे आणि यातील एक केस क्लिष्ट व काही प्रमाणात आव्हानात्मक होती आणि ती केस यशस्वीरित्या हाताळण्यात आली. रुग्णालयात जन्मलेल्या नवजात शिशुंमधील काविळीवर उपचार करण्यासाठी 'न्युबॉर्न स्टॅबिलायझेशन युनिट'ही (एनबीएसयू) नुकतेच सुरू झाले आहे. यात तीन वॉर्मर व एक फोटोथेरपी युनिट आहे. त्यापुढे जाऊन आता विशेष नवजात शिशू काळजी कक्ष (स्पेशल न्युबॉर्न केअर युनिट, एसएनसीयू) सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या स्वतंत्र अद्ययावत विभागासाठी यंत्रसामुग्री, उपकरणे व आणखी मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे आणि लवकरात लवकर हा विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न आहे, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. व्ही. भोसले यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\B'एसएनसीयू' असेल १६ खाटांचे

\Bया विभागात सहा खाटा या रुग्णालयात जन्मलेल्या शिशुंसाठी (इन बॉर्न), सहा खाटा या जिल्हा सामान्य रुग्णालयाबाहेर जन्मलेल्या शिशुंसाठी (आऊट बॉर्न) आणि चार खाटा या उपचारानंतर अपेक्षित सुधारणा झालेल्या शिशुंना त्यांच्या मातांसह राहण्यासाठी (मदर न्यूबॉर्न केअर युनिट) राखील असतील. या अद्ययावत विभागात मुदतपूर्व प्रसुती झालेल्या, कमी वजनाच्या, श्वासाचा त्रास असलेल्या, जन्मावेळी गुदमरण्याचा त्रास झालेल्या, जंतुसंसर्ग, कावीळ व इतर आजार झालेल्या शिशुंना दाखल केले जाणार आहे. पहिल्या मजल्यावर लेबर रुमजवळ हा नवीन विभाग सुरू होईल, असे बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. भारती नागरे यांनी सांगितले. 'एसएनसीयू' विभाग सुरू झाल्यावर 'एनबीएसयू' विभाग हा त्यामध्येच समाविष्ठ होईल, असेही डॉ. नागरे म्हणाल्या.

जिल्हा सामान्य रुग्णालयात ४८ प्रसुती झाल्या आहेत आणि विविध सेवा-सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत.नजिकच्या काळात आणखी आधुनिक सेवा उपलब्ध होतील. त्याचाच भाग म्हणून 'एसएनसीयू' हा विभागही लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न आहे.

\B- डॉ. सुंदर कुलकर्णी\B, जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर बलात्कार; पोलिसाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस असल्याचे सांगत व लग्नाचे आमीष दाखवून १६ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार करणारा आरोपी व सीआरपीएफ जवान कल्याणसिंग धरमसिंग बैनाडे याला शुक्रवारी (२५ जानेवारी) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपी जवानाला सोमवारपर्यंत (२८ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दिले.

या प्रकरणी औरंगाबाद तालुक्यातील एका १६ वर्षीय मुलीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी मुलगी ही इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. ४ मे २०१७ रोजी संबंधित मुलगी तिच्या चुलत बहिणीच्या लग्नात गेली असता, तिची ओळख आरोपी व 'सीआरपीएफ'चा पोलिस कॉन्स्टेबल कल्याणसिंग धरमसिंग बैनाडे (२५, रा. जालना) याच्याशी झाली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये आरोपी मुलीच्या घरीही येऊन गेला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये मुलीच्या मैत्रिणीसमोर 'तू मला आवडते' असे आरोपी तिला म्हणाला होता व त्याने तिला एक मोबाईल दिला होता. या मोबाईलवर तो तिच्याशी नेहमी संभाषण करीत असे. १० जून २०१८ रोजी फोन करुन 'मी तुझ्या गावात आलो आहे, घरी कोण-कोण आहे' असे आरोपीने मुलीला फोन करुन विचारले होते. घरी कोणी नसल्याने मुलीने सांगितल्यानंतर आरोपी तिच्या घरी गेला आणि लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेळोवेळी पोलिस असल्याचे सांगत व लग्नाचे आमीष दाखवून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी फिर्यादी मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोक्सो कायद्याची विविध कलमे तसेच भादंवि ३७६ कलमान्वये करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली.

वैद्यकीय तपासणी करणे बाकी

आरोपीला कोर्टात हजर केले असता, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करणे, मुलीला दिलेला मोबाईल कुणाच्या नावावर आहे आदींबाबत तपास करणे बाकी आहे. तसेच कोणी साथीदार आहे का, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूंनी सामाजिक परिवर्तन घडवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सामाजिक न्यायाशिवाय सामाजिक प्रतिष्ठा वाढत नाही, हे राजर्षी शाहू महाराजांना चांगलेच ठावूक होते. म्हणून त्यांनी सामाजिक न्यायाची पहिली पायरी म्हणून शिक्षणाकडे बघितले आणि त्यातूनच परिवर्तन घडवले. परिवर्तनाचा रथ सामाजिक न्यायाच्या दिशेने नेणारा पहिला राजा म्हणून शाहू महाराजांचेच नाव घ्यावे लागते,' असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. उत्तम कांबळे यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभाग व विदयार्थी विकास विभागाच्या वतीने राजर्षी शाहू व्याख्यानमाला घेण्यात आली. महात्मा फुले सभागृहात शुक्रवारी 'राजर्षी शाहू यांचा सामाजिक न्याय' या विषयावर डॉ. उत्तम कांबळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंचावर कुलगुरू प्रोफेसर बी. ए. चोपडे, विभागप्रमुख प्रो. सुधाकर शेंडगे, प्रो. संजय नवले यांची उपस्थिती होती. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायावर कांबळे यांनी विचार मांडले. 'न्याय आणि सामाजिक न्याय यात मूलभूत फरक असून, शाहूंनी सामाजिक न्यायासाठी शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. जातीनिहाय वसतिगृहे उभी केली. देवदासीचे, तळागाळातील व्यक्तींचे पुनवर्सन केले. आंतरजातीय विवाहाची सुरूवात आपल्या घरापासून केली. स्त्री-पुरूष समानतेसाठी प्रयत्न केले म्हणून ते जगावेगळे राजे ठरले,' असे कांबळे म्हणाले.

'शाहू महाराज सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा जगातील हा एकमेव राजा आहे. म्हणूनच केंब्रीज विदयापीठाने त्यांचा गौरव केला होता. युवकांनी त्यांचे विचार समजून घेऊन वाटचाल करावी' असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. प्रो. संजय नवले यांनी प्रास्ताविक केले. दत्ता किटाळे यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रो. सुधाकर शेंडगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला प्राचार्या राजकुमारी गडकर, बी. व्ही. जोंधळे, डॉ. भगवान गव्हाडे, डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी चौदा कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसामुळे यंदाही औरंगाबाद जिल्ह्याच्या नशिबामध्ये दुष्काळ असून शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर प्रशासनाकडून दुष्काळात करावयाच्या उपाययोजनांची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये दुष्काळी उपाययोजनांची कामे सुरु करण्यात आली असून जिल्ह्यासाठी १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून यातील यातील अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत.

मराठवाड्यात यंदाही भीषण दुष्काळ असून दुष्काळाच्या सर्वाधिक झळा औरंगाबाद जिल्ह्याला बसत आहेत, जिल्ह्यात सर्वाधिक टँकर सुरु असून जवळपास सर्वच तालुक्यात पाण्यासाठी वनवन सुरु आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ५९४ टँकर सुरु असून यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ८५, फुलंब्री ३६, पैठण ९०, गंगापूर १३१, वैजापूर ११४, खुलताबाद १६, कन्नड २४, सिल्लोड ९७ तर सोयगाव तालुक्यामध्ये १ टँकरद्वारे तहान भागवण्यात येत आहे.

प्रशासनाकडून पाणीटंचाई उपाययोजनांसाठी १४ कोटी रुपये मंजूर केले असून यामध्ये जिल्ह्यातील ४४ नळयोजनांचा समावेश आहे. तर ६ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांसाठी १२ कोटी ६४ लाख रुपये तर चर घेण्यासाठी १९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातील अनेक कामे पुर्णही करण्यात आली आहेत.

तात्पुरत्या पाणीपुरवठ्यासाठी १२ कोटी

तात्पुरत्या पाणीपुरवठ्याच्या ६ योजनांसाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील १३ लाख २८ हजार, फुलंब्रीत ३ लाख ७ हजार, वैजापूरमधील दोन योजनांसाठी ९२ लाख ६६ हजार, खुलताबादमधील एका योजनेसाठी ११ कोटी ५५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातील बहुताश कामे पूर्णही झाली आहेत. चर खोदण्यासाठी १९ लाख ७७ हजार रुपयांची कामे होत असून यामध्ये वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे १४ लाख ८७ हजार तर सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील प्रकल्पासाठी ४ लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मंजूर कामाचा गोषवारा

तालुका........... नळ योजना.... रक्कम

औरंगाबाद...........०३.................७.८६

फुलंब्री................०५................१२.३४

पैठण................०४...................११.१७

वैजापूर..............०३..................८.१७

गंगापूर...............०१...................१.२६

खुलताबाद..........०४..................८.२७

सिल्लोड............०४....................९.७६

कन्नड..............१९..................५९.६७

सोयगाव............०१................५.९१

एकूण.............४४.....................१ कोटी २४ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images