Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यायचायः भाजप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

शिवसेना वर्तमानपत्रातून आणि जाहीर सभेत जरी आरोप-प्रत्यारोप करीत असली तरी शिवसेना आमचा जुना मित्रपक्ष आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ते आमच्या सोबत आहेत. सरकारमध्ये कसल्याही प्रकारची अडचण आली नाही. कुठल्याही कामाला त्यांनी विरोध केला नाही. त्यामुळेच आम्ही त्यांच्याकडून युतीची अपेक्षा करतोय. निर्णय शेवटी शिवसेनेलाच घ्यायचा आहे, या शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी युतीच्या संदर्भातील चर्चेचा चेंडू पुन्हा एकदा शिवसेनेच्या अंगणात टोलावला.

जालन्यातील प्रदेश कार्यकार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत सोमवारी ते बोलत होते. आम्ही शिवसेनेसोबत युती करू, अशी आमची अपेक्षा आहे. समविचारी पक्षांनी एकत्र यावे ही भाजपची स्पष्ट भूमिका आहे. मतविभाजन टाळावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होऊ नये म्हणून भाजपने यापूर्वीच जाहीर केलं आहे. एनडीएमधील सगळे घटकपक्ष मिळून ही निवडणूक लढावी हे भाजपचे मत आहे. मात्र निर्णय शेवटी शिवसेनेलाच घ्यायचा आहे, असं दानवे म्हणाले. जागावाटपाचा कोणताही प्रस्ताव आमच्या समोर आलेला नाही. बंद दाराआड काही चर्चा झाली नाही. लोकसभेच्या निम्म्या निम्या जागावाटून घ्यायच्या असा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही. जेव्हा केव्हा चर्चेला बसू तेव्हा दोन्ही बाजूंनी प्रस्ताव येतील. ते आम्हाला त्यांचा प्रस्ताव देतील आम्ही आमचा प्रस्ताव त्यांना देऊ. मग त्यावर चर्चा होईल, या निर्णयाची डेडलाईन तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत चालेल, असं दानवे यांनी स्पष्ट केलं. कोणीतरी हात पुढे करेल आणि दुसरा त्याच्या हातात हात मिळवेल किंवा दोघे एकदम हात पुढे करतील, असं ते म्हणाले.

आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी हात पुढे करणार. निर्णय शेवटी शिवसेनेलाच घ्यायचा आहे. आमच्या हातात हात द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवायचं, असं दानवे यांनी सांगितलं. शिवसेनेकडून सातत्याने भाजपवर कठोर टीका होतेय. तरी आपण युतीसाठी चर्चा करणार का? असा प्रश्न दानवे यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देत दानवे यांनी युतीच्या निर्णयाचा चेंडू शिवसेनेकडे टोलवला आहे. भाजपने घेतलेल्या या पत्रकार परिषदेला प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्ये आणि शिरीष बोराळकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युतीसाठी भाजप लाचार नाही; मुख्यमंत्र्यांचे सेनेला खडे बोल

$
0
0

जालनाः

'जो आयेगा उसके साथ और नही आयेगा उसके बिना', अशी टोलेबाजी करताना भारतीय जनता पक्ष युतीसाठी लाचार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेला सूचक शब्दांत इशारा दिला.

जालना येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत शिवसेनेने घेतलेल्या ताठर भूमिकेचा यथेच्छ समाचार घेतला. 'आम्हाला युती हवी आहे. देशाच्या कल्याणाकरिता युती हवी आहे. हिंदुत्व मानणारे एकत्र राहिले पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चोरांच्या हाती सत्ता जाऊ नये. या देशाला फक्त लुटण्याचे काम ज्यांनी केले, ज्यांची डोकी हॅक झाली आहेत, त्यांच्या हातात पुन्हा सत्ता जाऊ नये, म्हणून आम्ही युतीसाठी प्रयत्न करीत आहोत. याउपरही भारतीय जनता पक्ष लाचार आहे, असं जर कुणाला वाटत असेल, तर हा त्यांचा भ्रम आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पक्ष आहे. भाजप कधीच लाचार होऊ शकत नाही. आम्ही शून्यातून जग उभे करणारे लोक आहोत,' असे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला सुनावले.

'युतीची काळजी करू नका. जे हिंदुत्व मानतात, ते आमच्यासोबत येतील. हिंदुत्व नकोय, ते विरोधात जातील. मात्र, कोणत्याही परिस्थितीत या देशात मोदींचे सरकार पुन्हा स्थापन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही', असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मविभूषणसाठी पुरंदरेंनी कोणता पराक्रम केला?: डॉ. श्रीपाल सबनीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कोणता पराक्रम केला की, त्यांना सरकारने पद्मविभूषण दिला असा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला. औरंगाबादमध्ये आयोजित ‘फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेत ते बोलत होते.

देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित या व्याख्यानात बोलताना डॉ. सबनीस म्हणाले, 'महात्मा फुले यांना हे सरकार भारतरत्न देणार होते असे आम्ही ऐकले होते. मात्र, कुणीकडे कसं फिरलं गेले माहिती नाही. अनेक जणांना पद्मविभूषण दिले गेले त्यांनी काय पराक्रम केले माहिती नाही.'

बाबासाहेब पुरंदरेंना मिळालेल्या पद्मविभूषण सन्मानाबाबतही सबनीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'बाबासाहेब पुरंदरेनी कोणते पराक्रम केले की, त्यांना हा पुरस्कार दिला गेला? सरकारला ते स्वातंत्र्य आहे. तुम्हीच निवडून दिलेले सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला आपल्याला आडवं जाता येणार नाही. बाबासाहेब हे इतिहासकार नाहीत मात्र, ते चांगले शाहीर आहेत त्यामुळे आपण ते विवेकाने घेऊ.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडताळणी समित्यांच्या बरखास्तीची मागणी

$
0
0

औरंगाबाद : राज्यातील अनुसुचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या बरखास्त करा अशी मागणी आदीवासी कोळी समाज समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण करण्यात येत आहे. प्रमाणपत्र जाणूनबुजून प्रलंबित ठेवण्यात येत असल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार भरडले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात सखाराम बिऱ्हाडे, काशीनाथ कोळी, सुनिता मोदीराज, पद्मा शेळके, तुळसाबाई बावस्कर, गंगाधर बाणदार, लक्ष्मण गायकवाड, राजू जाधव, विजेंद्र इंगळे यासह अनेक जण उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण पोलिस गुन्हे प्रकटीकरणात अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागण्याच्या प्रमाणामध्ये औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाचा मराठवाड्यात पहिला क्रमांक आहे. गंभीर गुन्ह्यांमध्येही २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाच्या माहितीनुसार मराठवाड्यातील पोलिस अधीक्षक दलाच्या कार्यालयातंर्गत घडलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण जास्त आहे. औरंगाबाद ग्रामीण कार्यालयाने ४६.४६ टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. नांदेड मध्ये ३७.३०, बीड ३५.६८, उस्मानाबाद ३०.४१, हिंगोली २८.८८, जालना २३.६६ आणि परभणी मध्ये २१.०८ टक्के शिक्षा होण्यात यश आले आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत वर्ष २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये घडलेल्या घटनेमध्ये घट झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यात वर्ष २०१७मध्ये खुनाच्या ४६ झाल्या. वर्ष २०१८मध्ये ३९ खून झाले. खुनाच्या प्रयत्नाची प्रकरणे २०१७मध्ये ४४ झाली असून, २०१८ मध्ये हा आकडा ३८वर गेला. दरोड्याच्या घटना २०१७मध्ये नऊ घडल्या. तर २०१८मध्ये दरोड्याची संख्या नऊ इतकीच आहे. घरफोडीची १७१ प्रकरणे २०१७मध्ये दाखल झाले. तर २०१८मध्ये ११६ होते. याशिवाय बलात्काराच्या घटना २०१७मध्ये ६० घडल्या. २०१८मध्ये अशा ४७ घटना घडल्या आहेत.

\Bचोरीच्या गुन्हे

\Bजिल्हयाचे नाव उघडकीस येण्याचे प्रमाण

औरंगाबाद ग्रामीण ८१.५३ टक्के

सोलापूर ग्रामीण ५८.९१ टक्के

जालना ४८.१९ टक्के

अकोला ४८.८३ टक्के

अमरावती ग्रामीण ४६.९१ टक्के

………………

\Bगुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण

\Bजिल्ह्याचे नाव उघडकीस येण्याचे प्रमाण

हिंगोली ८५.७० टक्के

अकोला ८५.५१ टक्के

औरंगाबाद ग्रामीण ८४.५९ टक्के

बीड ८३.७२ टक्के

नांदेड ८३.२४ टक्के

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीपूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी पोलिस ठाण्यात तीन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहर पोलिस विभागातील २० पोलिस निरिक्षकांमधून १४ जणांची बदली करण्यात येणार आहे. बदल्याची यादी पोलिस आयुक्तालयाकडून तयार करण्याची कारवाई सुरू आहे.

एप्रिल व मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनेप्रमाणे या बदल्या होणार आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्हयातील पोलिस अधीक्षकांपासून ते पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांची यादी मागविण्यात आली आहे. या माहितीमध्ये मूळ जिल्हयातील नियुक्ती, मागील चार वर्षांत खंडित, अखंडित सेवेचा तपशील, पदोन्नती पूर्वीच्या कालावधीसह तीन वर्षे एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारीऱ्यांची यादी ३० जानेवारीपूर्वी मागविली आहे. औरंगाबाद पोलिस विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महासंचालकांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे शहरात २० पोलिस निरीक्षकांपैकी १४ पोलिस निरीक्षकांना जिल्ह्यात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर अन्य पदावरील ७८ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक विवंचनेतून कामगाराची आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद : आर्थिक विवंचनेतून कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सिडको एन-९ भागातील संत ज्ञानेश्वरनगर येथे घडली. अविनाश बबनराव फोके (वय ४०) असे या कामगाराचे नाव आहे.

फोके एका दैनिकाच्या कार्यालयात कामाला होते. मात्र, त्यांना दारूचे व्यसन होते. आर्थिक अडचणीमुळे ते अनेक दिवसांपासून तणावात होते. सोमवारी दुपारी पत्नी कामासाठी बाहेर गेली असताना त्यांनी राहत्या घरी पत्र्याच्या खोलीमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. पत्नी घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी अविनाश यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर सिडको पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अविनाश यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओएलएक्सवर ५५ हजारांचा गंडा

$
0
0

औरंगाबाद : ओएलएक्सवर बुलेट विकण्याची जाहिरात देऊन ५५ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसाकडे तक्रार नोंदविली आहे.

इब्राहिम खान नाजीम खान (रा. रशीदपुरा) यांना ओएलएक्सवर पश्चिम बंगाल येथील बिमल गोपाल सरकार यांची बुलेट विक्रीसाठी असल्याचे दिसून आले. इब्राहिम खान यांनी बिमल यांना मोबाइलवरून संपर्क केला. ५५ हजारांत बुलेट विक्रीचा व्यवहार ठरला. बिमल याने पैसे जमा करण्यास सांगितले. १७ जानेवारी रोजी इब्राहिम खान यांनी २५ हजार रुपये भरले. बिमल सरकार याने २१ जानेवारी रोजी ट्रान्सपोर्टद्वारे बुलेट पाठवू असे सांगितले. तशी पावती व्हॉटसअॅपवर पाठविली. त्यावर विश्वास ठेवून इब्राहिम खान याने २० हजार रुपये त्याच्या खात्यात जमा केले. गाडीच्या कागदपत्रांसाठी पुन्हा दहा हजार रुपये जमा केले. ही रक्कम जमा केल्यानंतरही संबंधिताने गाडी पाठविली नाही. याबाबत कॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोबाइलही बंद होता. दरम्यान, ओएलएक्सवर टाकलेल्या गाडीच्या फोटोवरून या बुलेटचे रजिस्ट्रेशन पंजाबमधील जालंधर शहरातील होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलवाहिनीसाठी तीनशे कोटी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाची निविदा काढण्याची परवानगी द्या, या कामासाठी तीनशे कोटींची मदत करा, असे साकडे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे.

मुख्यमंत्री शहरात आले होते तेव्हा पालिका पदाधिकाऱ्यांनी त्यांची विमानतळावर जावून भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा करून निवेदन देखील सादर केले. प्रामुख्याने समांतर जलवाहिनीच्या संदर्भात (गंगा गोदावरी पेयजल योजना) मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. मुख्य सरकारी वकिलांच्या अभिप्रायानुसार कंपनीने समांतर जलवाहिनीचे काम करण्यास नकार दिला आहे. उन्हाळा लक्षात घेता पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करावी लागेल. ही बाब लक्षात घेता जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मान्यता द्या, या कामाची निविदा काढण्यास मंजुरी द्या व निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता निविदेचा कालावधी कमी करण्यास देखील मंजुरी द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे महापौर म्हणाले. जलवाहिनीच्या कामासाठी पालिकेकडे ३६० कोटी जमा आहेत. जलवाहिनी टाकण्यासाठी ६६० कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनशे कोटींची मदत शासनाने करावी अशी मागणी देखील केल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे १५ कोटींची केली मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी पुरवठ्याच्या कामांसाठी पंधरा कोटींचे अनुदान द्या, अशी विनंती करणारे पत्र महापालिकेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

पालिका पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह उपमहापौर विजय औताडे व आयुक्त डॉ. निपुण विनायक उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात पालिकेने म्हटले आहे की, औरंगाबादची लोकसंख्या पंधरा लाख आहे. दररोज पाणी देण्यासाठी २०५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे, परंतु सध्या १२५ दशलक्ष लिटर पाणीच मिळते. त्यामुळे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त सदस्य सचिव राजेंद्र होलानी यांची पालिकेने तांत्रिक तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे. होलानी यांनी पाणीपुरवठा योजनेचा अभ्यास करून काही सुधारणा सुचविल्या आहेत. त्यानुसार काम करण्यासाठी दहा कोटींची गरज आहे. त्याशिवाय दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पुरवठ्याची आवश्यक कामे करण्यासाठी जास्तीचा पाच कोटींचा निधी लागेल. त्यामुळे एकूण पंधरा कोटी विशेष अनुदान म्हणून द्यावे, अशी मागणी केली आहे.

\Bतीन दिवसांत निविदा काढणार

\B'पाणीपुरवठ्याची अत्यावश्यक कामे करण्यासाठी शासनाकडून निधी येण्यास उशीर लागत असेल तर स्मार्ट सिटी योजनेतून या कामासाठी पंधरा कोटींचा निधी वापरण्याची महापालिकेची तयारी आहे, तसा विचार महापालिका करीत आहे. यासाठी आयुक्त दिल्लीला जावून संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी आणतील, अत्यावश्यक कामांच्या निविदा तीन दिवसात काढा असे आयुक्तांना सांगितले आहे,' असे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांसाठी आता २०० कोटींचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रस्त्यांसाठी महापालिका आता २०० कोटींचा प्रस्ताव तयार करणार आहे. या निधीतून कोणत्या रस्त्यांची कामे करायची याची यादी येत्या तीन - चार दिवसात तयार केली जणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी यापूर्वी शंभर कोटींचे विशेष अनुदान दिले. त्यातून येत्या काही दिवसांत रस्त्यांची कामे सुरू केली जाणार आहेत. याशिवाय सव्वाशे कोटी रुपयांचे आणखी अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार कोणत्या रस्त्यांची कामे करायची याबद्दल पालिकेत खल सुरू आहे. त्याशिवाय ७५ कोटींचे रस्ते डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र, डिफर्ड पेमेंटच्या कामांसाठी कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सव्वाशे कोटी आणि ७५ कोटी असे एकूण दोनशे कोटी रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव तयार करण्याचे काम पालिकेत सुरू करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’शी काडीमोडचा प्रस्ताव आठ दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समांतर'शी काडीमोड घेण्याचा प्रस्ताव येत्या आठ दिवसांत शासनदरबारी सादर केला जाणार आहे. समांतर जलवाहिनीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या कंपनीने काम करण्यास असमर्थता दाखवली आहे. यापार्श्वभूमीवर हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिकेने 'एसपीएमएल' या कंपनीबरोबर करार केला होता. कराराचे पुनरुज्जीवन झाल्यावर 'एसपीएमएल'ऐवजी एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार करण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली. या मागणीवर सरकारी वकीलांचा अभिप्राय महापालिकेने मागवला. एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार करता येणे शक्य नाही, असा अभिप्राय सरकारी वकिलांनी नोंदवला. यानंतर कंपनीने समांतर जलवाहिनीच्या कामातून माघार घेण्याची तयार दाखवली. 'महापालिकेने १३५ कोटी रुपये द्यावेत, आम्ही विनाअट माघार घेतो,' असे कंपनीच्या प्रतिनिधींनी महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगितले होते. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मात्र यासंदर्भात कंपनीकडून लेखी पत्र आल्यावर योग्य ती भूमिका घेऊ, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार कंपनीने २१ जानेवारी रोजी आयुक्तांना पत्र पाठवून समांतर जलवाहिनीच्या कामातून माघार घेत असल्याचे कळविले आहे. १३५ कोटी रुपये महापालिकेने दिल्यास लवाद आणि सर्वोच्च न्यायलयातील प्रकरणे मागे घेऊ, असेही कंपनीने पत्रात नमूद केले आहे.

यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले,'कंपनीच्या पत्राबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही दिली आहे. कंपनीच्या प्रस्तावाच्या आधारे प्रस्ताव तयार करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. येत्या आठ दिवसांत प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवा, अशी सूचना आपण आयुक्तांना केली आहे. समांतर जलवाहिनी आणि कंपनीबद्दल शासनाशी सल्लामसलत करूनच निर्णय घेतला जाईल, असे महापौर म्हणाले.

कंपनीने १३५ कोटींची मागणी केली आहे. या मागणीची तांत्रिकदृष्ट्या छाननी केली जात आहे. कंपनीची बँक गॅरंटी आणि कंपनीने टाकलेली पाच किलोमीटरची पाइपलाइन एवढे पैसे महापालिका कंपनीला देऊ शकते. या उपरही कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.

- नंदकुमार घोडेले, महापौर, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मडी विद्यार्थी आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'डॉक्टर ऑफ फार्मसी' (फार्मडी) अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांचे करिअर अडचणीत सापडले आहे. अभ्यासक्रमाच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील विद्यार्थी एकजूट झाले आहेत. येत्या बुधवारपासून 'फार्मसी ऑफ कौन्सिल'समोर ठिय्या मांडणार आहेत. औरंगाबादमधील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात पुढाकार घेतला आहे.

युरोपीय देशांच्या धर्तीवर देशपातळीवरील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांमध्ये 'फार्मडी'चा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. राज्यात २०११-१२ या शैक्षणिक वर्षापासून औरंगाबाद व अमरावती येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. दोन बॅच बाहेर पडल्या तरी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधांसह अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, पात्र शिक्षकांच्या नियुक्तीच करण्यात आलेल्या नाहीत. स्थानिक रुग्णालयांशी करार नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही कागदावरच राहते. अशीच काहीशी परिस्थिती देशपातळीवर असल्याने आणि शैक्षणिक करिअर अडचणीत सापडल्याने या प्रकरणात विविध राज्यातील विद्यार्थी एकत्र आले आहेत. विविध महाराष्ट्रामध्ये औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांचे याप्रकरणी आंदोलन सुरू आहे. त्यासह विविध राज्यांमधील विद्यार्थीही रस्त्यावर उतरले आहेत. आता हे विद्यार्थी एकत्र येत दिल्ली येथे लढा देणार आहेत. 'फार्मसी ऑफ कौन्सिल'समोर येत्या ३० जानेवारीपासून देशभरातील हे विद्यार्थी एकत्र येत आंदोलन करणार आहेत.

\Bमहाराष्ट्राकडे नेतृत्व

\Bराज्यात विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपासून या प्रश्नावर विविध मार्गाने आंदोलन केले आहे. मागील महिन्यात सहा दिवस उपोषण ही केले. त्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र ते पूर्ण करण्यात आले नाही. तंत्रशिक्षण विभागाकडून या प्रश्नावर पाठपुरावा सुरू असल्याचेच सांगण्यात येते. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केले. त्यानंतर आता देशपातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी औरंगाबादच्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत देशपातळीवर विद्यार्थ्यांची एकजूट केली आहे.

देशभरात कॉलेज संख्या : २३३

विद्यार्थी संख्या............ : ४२६७०

विविध राज्यांतील विद्यार्थी

राज्य.... कॉलेज.... विद्यार्थी

महाराष्ट्र ७ ११९०

आंध्र प्रदेश ६० १०२००

तेलंगाणा ५९ १००३०

कर्नाटक ४३ ७३००

तमिळनाडू २४ ४०८०

केरळ १९ ३२३०

पंजाब ३ ९१०

देशपातळीवर 'डॉक्टर ऑफ फार्मसी' अभ्यासक्रम सुरू एकत्र विचार, नियोजन केले गेले नाही. अभ्यासक्रम सुरू केल्यानंतरही सात-सात वर्षे सोयीसुविधांबाबत दुर्लक्ष होते. यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचे करिअर अडचणीत सापडले. राज्यात तंत्रशिक्षण विभागापासून सरकार दरबारी आम्ही त्याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर आता देशपातळीवर आम्ही विद्यार्थी एकत्र येत लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.

- रामप्रसाद नागरे, विद्यार्थी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही २१४ शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात यंदाही अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरादाराला दुष्काळी परिस्थितीमुळे अवकळा आली आहे. बोंडअळी, दुष्काळी अनुदानाची सरकारने वेळेत घोषणा केली असली तरी शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्यापही संपले नाही. दुष्काळ जाहीर झाल्यानंतही मराठवाड्यातील तब्बल २१४ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे वास्तव आहे.

दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्यातील बहुतांश भागात सरकारने ३१ ऑक्टोबर रोजी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. या भागामध्ये शासनाच्या उपाययोजनाही सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये सरकारी नियमाप्रमाणे दुष्काळी अनुदानही शेतकऱ्यांच्या पदरात पडणार हे निश्चित, तरीही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्यास तयार नाही. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यात ९९, डिसेंबर महिन्यामध्ये ९०, तर जानेवारी महिन्यामध्ये २५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून मराठवाड्यात सातत्याने पर्जन्यमान कमी होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. हाती अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. कर्ज कसे फेडरणार या विवचनेतून यंदाही मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या गेल्या वर्षभरात ९४७ झाली आहे, मात्र नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, नवीन वर्षांच्या २० दिवसांतच तब्बल २५ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. या कालावधीत आत्महत्यांची सर्वाधिक नऊ प्रकरणे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत.

विभागातल्या आठही जिल्ह्यांत गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यानंतर फक्त उन्हाळाच सुरू आहे. यंदा ७७९ मिलीमीटर सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ ५०१.७४ मिलीमीटर. (६४.४१ टक्के) पाऊस झाला. कसाबसा कापूस जगवलेल्या शेतकऱ्यांच्या नशीब बोंडअळीने पोखरले यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडला आहे. जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या २५ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एक, जालना व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी तीन, बीड जिल्ह्यात सहा, तर उस्मानाबाद जिल्ह्यात नऊ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळवले.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकरी आत्महत्या

जिल्हा................ आत्महत्या

औरंगाबाद............४१

जालना.................१८

परभणी...................२२

हिंगोली..................१४

नांदेड...................१८

बीड......................४८

लातूर....................२४

उस्मानाबाद.............२९

एकूण..................२१४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमसी’ची नसती उठाठेव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय निधी हे संस्थांच्या उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे उत्पन्न या सदराखाली ते गृहीत धरता येणार नाही, असे स्पष्टकरण केंद्र सरकारच्या अवर सचिवांनी केले आहे. त्यामुळे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला बजावलेल्या प्राप्तिकर नोटीसबद्दल आता 'पीएमसी' व अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला केंद्र सरकारकडून सुमारे २८५ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. या अनुदानावर प्राप्तिकर विभागाने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला चार कोटी ५८ लाख रुपये भरण्याची नोटीस बजावली. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची नोंदणी कंपनी म्हणून केली आहे. नोंदणी करताना 'लिमिटेड' शब्द लावण्यात आल्यामुळे प्राप्तिकर विभागाने पैसे भरण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीसच्या विरोधात पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी पालिका आयुक्त तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निपुण विनायक यांच्याकडे तक्रार केली. राज्यातील दहा शहरांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत केला आहे, पण त्यापैकी फक्त औरंगाबादच्या स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाली आहे. हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कंपनीची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे चार कोटी ५८ लाख रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे ही रक्कम स्मार्ट सिटीसाठी नियुक्त केलेल्या 'पीएमसी' व संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र, याकडे डॉ. विनायक यांनी विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे वैद्य यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांशी संपर्क साधून तेथील माहिती जाणून घेतली. पुणे महापालिकेने याच संदर्भात केंद्र सरकारच्या नगरविकास व घरबांधणी मंत्रालयाचे अवर सचिव कुणालकुमार यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे लक्षात आले. शासनाने दिलेला निधी किंवा अनुदान त्या संस्थेचे उत्पन्न म्हणून गृहित धरता येणार नाही, असे असे कुणालकुमार यांनी पुणे महापालिका व पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला कळविल्याचे वैद्य यांना पुण्याहून लेखी पत्राद्वारे लक्षात आणून देण्यात आले. या पत्राचा संदर्भ घेऊन वैद्य यांनी प्राप्तिकर विभागाकडे भरावी लागलेली रक्कम 'पीएमसी' व संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी केली आहे.

\Bसाडेचार कोटींची वसुली

\Bपुणे महापालिकेकडून मिळालेल्या संदर्भानुसार वैद्य यांनी पुन्हा महापालिका आयुक्त तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. स्मार्ट सिटीची पीएमसी आणि संबंधित वित्त अधिकारी यांच्या चुकीच्या धोरणामुळे स्मार्ट सिटीचा निधी चार कोटी ५८ लाख रुपयांनी कमी झाला. शासनाच्या निधीवर जमा झालेल्या व्याजाची रक्कम उत्पन्न म्हणून गृहित धरता येत नाही. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडे भरलेले चार कोटी ५८ लाख रुपये 'पीएमसी'कडून व संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करावेत व स्मार्ट सिटी योजनेच्या बँक खात्यात जमा करावेत अशी मागणी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राची प्रत केंद्र सरकारच्या नगरविकास आणि घरबांधणी सचिवांना, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याच्या सचिवांना आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कार्यकारी मंडळाला दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहावी-बारावीला साडेतीन लाखांवर विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जवळ आल्या तशी परीक्षेची लगबग सुरू झाली आहे. विभागातून यंदा तीन लाख ५४ हजार ४९० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एक हजार चार परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने स्पष्ट केले असून, एक फेब्रुवारीपासून या परीक्षा सुरू होतील, तर दहावीचा बदलेला अभ्यासक्रानंतर यंदा पहिली परीक्षा असणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमधील दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या निश्चित झाली आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातून एक लाख ८६ हजार ६६ हजार विद्यार्थी दहावीची, तर एक लाख ६८ हजार ४२४ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. दहावीची परीक्षा ६१६, तर बारावीची परीक्षा ३८८ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा एक मार्च ते २२ मार्चपर्यंत होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या वेळापत्रकात दोन दिवस अलिकडे आणले गेले आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्र आणि परीरक्षक केंद्रही मंडळाने निश्चित केली आहे. औरंगाबाद विभागात दहावी, बारावीसाठी प्रत्येकी ६१ परीरक्षक केंद्र असतील तेथे प्रश्नपत्रिका ठेवण्यात येतील. मागील वर्षी उत्तरपत्रिका जळण्याचा प्रकार बीडमध्ये झाल्याने यंदा मंडळाने खबरदारी म्हणून जिल्हा सभांमध्ये नियमावली, गैरप्रकार रोखण्यासाठी अधिकाधिक उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्याचे सांगण्यात आले. यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलला. प्रश्नत्रिकेचे अन् मूल्यांकनाचे स्वरुपही बदलले. त्यामुळे निकालातील फुगवटा कमी होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बदललेल्या स्वरुपानंतर प्रथमच दहावी विद्यार्थ्यांची 'परीक्षा' पाहणारी परीक्षा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

\Bप्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक\B

दहावी, बारावी लेखी परीक्षेसह मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तशा सूचना शाळा, कॉलेजांना ही देण्यात आल्या आहेत. बारावी परीक्षेसाठीच्या साहित्याचे वितरण ३० जानेवारी रोजी जिल्हास्तरावरील निश्चित केलेल्या वितरण केंद्रावर केले जाणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा एक फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीदरम्यान घेतली जाणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा ११ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.

बारावीचे विभागातील परीक्षार्थी : १६८४२४

दहावीचे विभागातील परीक्षार्थी : १८६०६६

\Bदहावीचे विद्यार्थी\B

जिल्हा… परीक्षा केंद्र विद्यार्थी संख्या

औरंगाबाद २२० ६५४७७

बीड १५२ ४३७०१

जालना ९७ २८८२४

परभणी ९४ ३१४०६

हिंगोली ५३ १६६५८

\Bबारावी परीक्षार्थी

\Bजिल्हा…. परीक्षा केंद्र… विद्यार्थी संख्या

औरंगाबाद १३६ ६२२२१

बीड ९५ ३९२४१

जालना ६७ २९५१५

परभणी ५६ २४१६३

हिंगोली ३४ १३२८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रातिनिधिक स्वरुपात कचरा उचलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करण्याचे काम अद्याप सुरू केले नाही. त्यामुळे वाहने आमची आणि कर्मचारी तुमचे असे गणित जुळवून प्रातिनिधीक स्वरुपात काम सुरू करण्याची सूचना महापालिकेने कंपनीला केली आहे.

कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करण्याच्या कामाचे पालिकेने खासगीकरण केले आहे. बेंगरुळू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दहा वर्षांसाठी हे काम दिले आहे. कंपनीने कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेली वाहने शहरात आणली. मात्र, या वाहनांचे आरटीओ पासिंग अद्याप झालेले नाही. त्यामुळे कंपनीने काम सुरू केले नाही. ही बाब लक्षात घेवून महापालिकेने वाहने आमची, कर्मचारी तुमचे असे गणित जुळवून कचरा संकलन व वाहतुकीचे काम प्रातिनिधीक स्वरुपात सुरू करण्याची सूचना कंपनीच्या प्रतिनिधींना केली आहे. नवीन वाहनांचे आरटीओ पासिंग होण्यासाठी आठ ते दहा दिवस लागण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेच्या वाहनांबरोबर जावून कचरा संकलनाचे व वाहतुकीचे काम करण्याची सूचना कंपनीला केली आहे. या संदर्भात सोमवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. उद्या मंगळवारी महापौर कंपनीतर्फे केल्या जाणाऱ्या संपूर्ण कामाचा आढावा घेणार आहेत.-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'हे मृत्यूंजय'चे प्रयोग आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अंदमानातील छळ, मृत्यू आणि सावरकर या अद्वितीय संघर्षाची कहाणी म्हणजे 'हे मृत्यूंजय' हे नाटक. थोड्याच कालावधीत अफाट प्रसिद्धी मिळवलेले हे नाटक आता मंगळवारपासून (२९ जानेवारी) औरंगाबादकरांच्या भेटीला येत आहे.

कलारंग आणि स्वतंत्र ते भगवतीद्वारे यांच्यावतीने या प्रयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे. २९ ते ३१ जानेवारीदरम्यान विविध ठिकाणी या नाटकाचे प्रयोग खास शहरवासीयांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. २९ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता संत तुकाराम नाट्यगृह, २९ रोजी संध्याकाळी सात वाजता जालना येथील फुलंब्रीकर नाट्यगृह, ३० व ३१ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता औरंगाबादमधील तापडिया नाट्यमंदिर, तर एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा आणि दुपारी तीन, तसेच रात्री आठ वाजता मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रयोग होतील. संपूर्ण प्रयोग हे विनामूल्य असून, स्वागतमूल्य देऊ शकता, अशी माहिती पत्रकार परिषदेत पार्थ बावस्कर, भाऊ सुरडकर, सुनील वालावलकर, विजय जहागीरदार, किरण सराफ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हॉट्सअॅप’वर केली बदनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बेवडा दादा मित्रमंडळ' या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शहरातील एका २५ वर्षीय विवाहितेचा फोटो अश्लील चित्रफितींसोबत अपलोड करून तिची बदनामी करणारा परमेश्वर जालिंदर दौंड, तर ग्रुप अॅडमीन हरी भरात दौंड व सोमिनाश सुभाष दौंड या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी सोमवारी (२८ जानेवारी) फेटाळला.

या प्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, पाच नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादीच्या चुलत भावाने फिर्यादीला फोन करून सांगितले की, सुलतानपूर (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथे बेवडा दादा मित्रमंडळ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप असून, त्या ग्रुपचा तो सदस्य आहे. त्या ग्रुपवर परमेश्वर जालिंदर दौंड (२७) याने फिर्यादीचा फोटो अश्लील चित्रफितींसोबत अपलोड केला आहे. या ग्रुपचे ३०-३५ सदस्य आहेत व ग्रुपचे अॅडमिन हरी भारत दौंड (२८) व सोमिनाथ सुभाष दौंड (३२, तिघे रा. सुलतानपूर) हे आहेत, अशी माहिती त्याने फिर्यादीला दिली. या प्रकाराची माहिती फिर्यादीने तिच्या पतीला दिली आणि फिर्यादीच्या सूचनेवरुन तिच्या भावाने त्या पोस्टचे स्क्रिनशॉट फिर्यादीच्या पतीला पाठवले. प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सायबर सेलमध्ये आरोपींविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या ६७, ६७ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bफोटो कुठून आणला?

\Bतिन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असता, आरोपी परमेश्वरचा मोबाइल हँडसेट, सिम कार्ड व त्यातील डेटा, रेकॉर्ड जप्त करावयाचे आहेत. तसेच आरोपीने फिर्यादीचा फोटो कुठून आणला, तिघांनी यापूर्वी असे प्रकार किती, कुठे व कुणाकुणासोबत केले, किती महिलांना त्रास दिला आदींचा तपास करणे बाकी असल्याने आरोपींचा जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषेवरून भारतीय नकाशात नवी फूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पूर्वेकडील राज्य फुटीरतेपणाच्या पातळीवरती गेली आहेत. दक्षिण आणि उत्तर भारत या दोन भारतात भाषेचा संघर्ष आहे. ही नवीन फूट भारताच्या नकाशात पडते आहे,' असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. ते सोमवारी देवगिरी कॉलेजमध्ये 'फुले-शाहू-आंबेडकर' व्याख्यानमालेत बोलत होते.

रवींद्रनाथ टागोर सभागृहात झालेल्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर विकास समितीचे पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे, डॉ. अनिल आर्दड यांची उपस्थिती होती. यावेळी 'सामाजिक प्रबोधन व परिवर्तनाची नवी दिशा' विषयावर डॉ. सबनीस म्हणाले, 'आज समाजात वेगवेगळे विचार प्रवाह असताना धार्मिक, सामाजिक, अध्यात्मिक गुन्हे घडत आहेत. हे पाप कोणाचे आहे? संताना जात -पात नसते, ज्या देशात ज्याचा जन्म झाला, त्याने त्या देशावर व मातीवर मनापासून प्रेम करावे. तेव्हाच समाजातील, धार्मिक, कट्टरतेचे भूत निघून जाईल. आपल्या डोक्यात असणारे धर्मातील गैरसमज निघत नाहीत तो पर्यंत विचारवंताना, समाजप्रबोधकांना अपेक्षित समाज परिवर्तन येणार नाही. प्रत्येक समाजातील धार्मिक कट्टरता आणि धार्मिक अंधश्रद्धा व बुवाबाजी ही धर्माला लागलेली कीड आहे. ती कीड जो पर्यंत निघत नाही तो पर्यंत समाज परिवर्तनातील अडथळे निघणार नाहीत. महाराष्ट्रातील वारकरी परंपरा ही याला अपवाद आहे. समाजासमाजतील जातीअंताच्या भिंती तोडत एक उदार समाज परिवर्तनाकडे वाटचाल करून ही परंपरा प्रबोधन करत आहे,' असे ते म्हणाले. डॉ. अनिल आर्दड यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. राहुल साळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

\Bमीटूमध्ये नेते, शिक्षक, साहित्यिक

\B'मीटूमध्ये बाहेर न आलेली प्रकरणे कोणाची किती असा प्रश्न पडतो. यामध्ये राजकीय, सामाजिक नेतृत्व करणारे, साहित्यिक, कवी अन् शिक्षकांचाही नंबर असू शकतो. दारूची बाटली आण म्हणणारे आणि विद्यार्थ्यांच्या सोबतीने समाजवादी विचाराचा प्रभाव म्हणून एकाच ग्लासामध्ये दारू पिणारे अनेक शिक्षक आहेत. काही मास्तर तर अनेक पुढारलेले आहेत. ही नीतीभ्रष्टता शैक्षणिक क्षेत्राला परवडणारी नाही,' असेही डॉ. सबनीस म्हणाले.

\Bपुरंदरेंनी कोणता पराक्रम केला?

\Bडॉ. सबनीस म्हणाले, 'महात्मा फुले यांना हे सरकार भारतरत्न देणार होते, असे आम्ही ऐकले होते. मात्र, कुणीकडे कसे फिरले गेले माहिती नाही. अनेक जणांना पद्मविभूषण दिले गेले. त्यांनी काय पराक्रम केले माहिती नाही. बाबासाहेब पुरंदरेनी कोणता पराक्रम केला की, त्यांना हा पुरस्कार दिला गेला. सरकारला ते स्वातंत्र आहे. तुम्हीच निवडून दिलेले सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला आपल्याला आडवे जाता येणार नाही. बाबासाहेब हे इतिहासकार नाहीत मात्र, ते चांगले शाहीर आहेत. त्यामुळे आपण ते विवेकाने घेवू. बाबासाहेबांनी घराघरात राजा शिवाजी पोहचवला मात्र, त्यांनी कोणता शिवाजी पोहचवला. त्यांनी मुस्लिमविरोधी, गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी पोहचवला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images