Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महावितरणकडे पालिकेची बाकी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने महावितरणच्या विविध सुविधांवर लावलेल्या करातून थकीत बिलाचे पैसे चुकते होतील. शिवाय महावितरणलाच पालिकेकडे अतिरिक्त रक्कम भरावी लागेल, असा दावा मंगळवारी झालेल्या जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अप्पर जिल्हाधिकारी पी. एन. सोरमारे उपस्थित होते. बैठकीत खासदार खैरे यांनी पालिकेकडे थकलेल्या वीज बिलाचा मुद्दा मांडला. यावेळी महापौर म्हणाले, 'महापालिकेने महावितरणाच्या विविध सुविधांवर कर लावला आहे. अनेक सुविधांवर कर लावायचा आहे.त्यामुळे थकबाकी, खड्डयांपोटी परत करायचे पैसे पालिकेला परत करण्याची गरज पडणार नाही. उलट पालिकेकडेच महावितरणला पैसे भरावे लागतील. या कराबाबत कायदेशीर कारवाईही केली जाईल,' असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी वीज सेवा खासगीकरणाचा मुद्दा निघाला. याबाबत खैरे म्हणाले, 'ऊर्जामंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहणार आहे. यापूर्वीचा वीज सेवा खासगीकरणाचा प्रयत्न फसला आहे. यामुळे ६०० कोटी रुपयांचा फटका कंपनीला बसला आहे. पुन्हा असे नुकसान करून घेऊ नका,' असा सल्ला देणार असल्याचे सांगितले. वीजेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आगामी जिल्हा नियोजन समितीकडे पाच कोटींची मागणी करा, अशी सूचना खैरे यांनी केली. तर मुख्य अभियंता गणेशकर यांनी जालना जिल्हा नियोजन समितीत दहा कोटींची मागणी केल्याचे सांगितले. त्यानुसार दहा कोटींची मागणी करू, असे खैरे म्हणाले.

\Bवीज रिडिंग न घेता बिल

\Bवीजेमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. वीज रिडिंग न घेता वीज बिल दिल्यामुळे अनेक भुर्दंड सोसावा लागत असल्याची माहितीही समोर आली. अशा एजन्सी चालकांवर कारवाई केल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. सौर कृषिपंप महापालिकेच्या उद्यान विभागाला मिळेल का, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. यावर गणेशकर यांनी ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे, असे सांगितले.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौक, दुभाजक पाच वर्षांसाठी दिले जाणार दत्तक फेब्रुवारी अखेरपर्यंत सुशोभीकरणाची कामे सुरू होण्याची शक्यता

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील महत्वाचे चौक आणि रस्ता दुभाजक देखभाल दुरूस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी सलग पाच वर्ष दत्तक दिले जाणार आहेत. येत्या पंधरा दिवसात याबद्दलचा अधिकृत करार केला जाणार असून फेब्रुवारी अखेरपर्यंत चौक , दुभाजकांचे हस्तांतरण संबंधितांकडे केले जाणार आहे.

शहरातील चौक आणि दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यासाठी खासगी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले होते. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पुढाकार घेतला असून या कामासाठी त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले व अन्य पदाधिकाऱ्यांना सोबत घेतले. चौक आणि रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी ४५ लोकांनी पुढाकार घेतला. या सर्वांची कार्यशाळा घेण्यात आली आणि सुशोभीकरण करु इच्छिणाऱ्यांना सादरीकरण करण्यास सांगण्यात आले. सादरीकरणानंतर आता महापालिका संबंधितांशी करार करणार आहे. या संदर्भात माहिती देताना शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले, "चौक आणि दुभाजकांचे सुशोभीकरण करू इच्छिणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना पाच वर्षांसाठी चौक किंवा दुभाजक दत्तक दिले जाणार आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांच्या ताब्यात चौक किंवा दुभाजक राहतील. सुशोभीकरण करू इच्छिणाऱ्यांशी अधिकृतपणे करार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शंभर रुपयांच्या बाँडपेपरवर करार केला जाणार आहे. या बद्दलची फाईल आयुक्तांना सादर केली आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर येत्या दहा ते पंधरा दिवसात संबंधितांशी करार करून चौक आणि दुभाजकांचे हस्तांतरण केले जाईल. सुशोभीकरण कशा पद्धतीने केले जाणार आहे, त्याची माहिती देणारे ड्रॉइंग सुशोभीकरणाचे काम करणाऱ्या संस्थेकडून महापालिकेस सादर करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकेल.

दत्तक योजनेत महत्वाचे चौक आणि दुभाजक घेण्यात आले आहेत, त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल असे मानले जात आहे. रस्त्यांची कामे येत्या काळात मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत. वारसास्थळांच्या देखभाल दुरूस्तीची कामे देखील हाती घेतली जात आहेत, त्यात चौक व दुभाजकांच्या सुशोभीकरणाची भर पडल्यास शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मटा भूमिका

'रिटर्न' ची अपेक्षा नको

चौक आणि दुभाजकांच्या सुशोभीकरणाच्या कामाचा महापालिकेने दिखावा करूनये. शहरासाठी काही तरी चांगले काम करायचे आहे हे मनात कोरुन घेवून महापालिेकच्या अधिकाऱ्यांनी किमान या तरी क्षेत्रात काम केले पाहिजे. कृष्णा भोगे महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी विविध चौकांचे सुशोभीकरण करून घेतले होते. त्या त्या परिसराचे महत्व लक्षात घेवून चौकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिकृती उभारल्या होत्या. भोगे यांची बदली झाली आणि सुशोभीकरण केलेल्या चौकांची वाट लागणे सुरु झाले. महापालिकेच्या यंत्रणेने त्याकडे लक्षच दिले नाही. चौकाचे सुशोभीकरण केल्यावर 'रिटर्न काहीच मिळणार नाही' अशी कदाचित त्यांची धारणा असावी. आता 'रिटर्न' मिळण्याची अपेक्षा न ठेवता काम केले पाहिजे. तरच शहराच्या शिरपेचात आणखीन एक तुरा रोवला जाईल, अन्यथा डॉ. निपुण विनायक यांची बदली झाल्यावर पुन्हा तेच दिवस पाहणे शहरवासीयांच्या नशीबात येईल.

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांसाठी नगरसेवकांचा रेड्डी कंपनीवर दबाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कामगारांच्या नियुक्तीसाठी काही नगरसेवक रेड्डी कंपनीवर दबाव टाकत असल्याची माहिती मिळाली असून, कचऱ्याच्या क्षेत्रात पूर्वी काम केलेल्या नगरसेवकांचा व काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेने बेंगरुळू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीशी करार केला आहे. एक टन कचरा वाहतूक करण्यासाठी पालिका कंपनीला १८६४ रुपये देणार आहे. सुमारे सातशे कामगारांची नियुक्ती कंपनी करणार आहे. त्यामुळे काही नगरसेवक व पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. रेड्डी कंपनीने आपण सुचवू त्या कामगारांची नियुक्ती करावी यासाठी दबाव वाढवण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. थोडे थोडके नाही, तर शंभर - दोनशे कामगार आमच्या शिफारशीने कंपनीत नोकरीला घ्या, असेही कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले जात आहे. या कामगारांचा ठेका नगरसेवक किंवा पदाधिकारी घेणार आणि कंपनीच्या माध्यमातून आर्थिक लाभ लाटणार असे बोलले जात आहे. नगरसेवक - पदाधिकाऱ्यांनी कामगाराच्या भरतीत हस्तक्षेप केल्यास रेड्डी कंपनीची 'रॅमकी' होईल अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या या धडपडीची दखल आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी घेतली आहे. कामगारांच्या नियुक्तीसाठी दबाव टाकणाऱ्या नगरसेवक - पदाधिकाऱ्यांची नावे सांगा, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे डॉ. विनायक यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

रेड्डी कंपनीने येत्या दोन दिवसांत ३० वॉर्डांमध्ये कचऱ्याचे डोअर टू डोअर कलेक्शन सुरू करावे, असे आदेश मंगळवारी कंपनीचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांना दिले आहेत.

- नंदकुमार घोडेले, महापौर

सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कचरा वाहतुकीचे मार्ग समजवून घेण्याच्या सूचना कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पाच फेब्रुवारीपासून कंपनीतर्फे काम सुरू होईल.

- श्रीकृष्ण भालसिंग, अतिरिक्त आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छता अॅप’साठी पालिका अधिकारी कॉलेजमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वच्छता अॅप डाऊनलोड करून घ्या, अशी विनवणी करत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी शहरातील महाविद्यालये गाठली. त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अॅप डाऊनलोड करा, असे आवाहन केले.

शहरातील ३६ हजार नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड करावे, असे टार्गेट शासनाकडून पालिकेला मिळाले आहे. हा आकडा गाठण्यासाठी ७२२० अॅप गुरुवारपर्यंत (३१ जानेवारी) डाऊनलोड करावयाची आहेत. त्यामुळे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी - शिक्षकांना आवाहन करा, अॅप डाऊनलोड करून घ्या, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार मंगळवारी सर्व प्रमुख अधिकारी शहरातील विविध महाविद्यालयात पोचले, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या माध्यमातून स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचे काम सुरू झाले आहे. अॅप डाऊनलोड करण्याचे काम बचत गटांच्या माध्यमातून देखील केले जाणार आहे. महापालिकेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी देखील स्वच्छता अॅप मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड करावा अशा सूचना दिल्या आहेत, असे भालसिंग यांनी सांगितले.

---

\Bमटा भूमिका

\B---

आधी कचरा उचला

---

कागदोपत्री शहर चकाचक. अॅप डाऊनलोड करून भरले की झाले, असे होऊन जर शहरातील कचरा खरेच हटला असता, तर मजा आली असती. खरे तर कचरा निर्मूलनासाठी सरकारने निधी दिला. मात्र, यंत्र खरेदी लवकर केली नाही. अजून अनेक ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली नाही. रेड्डी कंपनीबरोबर कचरा संकलन, वाहतुकीचा करार केला. महापौरांनी उद्याच काम सुरू होईल, अशी घोषणा केली. ही घोषणा आणि उद्घाटनाचा थाटबाट केवळ दिखावा असल्याचे उघड झाले. त्यामुळे रेकॉर्ड म्हणून कितीही अॅप डाऊनलोड करा. त्यात नंबर मिळवाही. तत्पूर्वी शहरही चकाचक करा, म्हणजे मिळवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडाईकडून पोलिसांसाठी प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईने खास पोलिसांसाठी प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन केले आहे. पोलिस आयुक्तालय परिसरात आयोजित या दोन दिवसीय एक्स्पोला शनिवारी (२ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे.

पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या पुढाकाराने पोलिस कल्याण कार्यक्रमांतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरातील जवळपास ३०० प्रकल्पामधील वाजवी भावात असलेली हजारो घरे, फ्लॅट, रो होऊस आदीची माहिती या एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी दिली. प्रदर्शनामध्ये बांधकाम व्यावसायिकाचे ३० दालने राहणार असून, घर खरेदी करू इच्छिणारांकरिता साइटवर लगेचच भेट देण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक सवलतीही जाहीर केल्या आहेत. अनेक वित्तीय संस्थांही प्रदर्शनात सहभागी होणार असून विविध कर्ज योजना, सवलती यांची माहिती ग्राहकांना मिळेल. क्रेडाईचे वट्टमवार यांच्यासह सचिव आशुतोष नावंदर, एक्स्पो प्रकल्प प्रमुख नीलेश अग्रवाल, संदेश झांबड, गौरव मालपाणी आदी एक्स्पो यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, पोलिस आयुक्तालय, ग्रामीण विभागातील पोलिस अधिकारी, कर्मचारी, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्त वार्ता, नागरी हक्क संरक्षण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य राखीव पोलिस बल, एटीएस तसेच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आ‌वाहन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसईबीसी’मु‌ळे संभ्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा समाजाला 'एसईबीसी'अंतर्गत आरक्षण दिल्यानंतर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलमध्येही समावेश आला. आरक्षणानंतर समाजातील विद्यार्थ्यांना अर्जातील दुरुस्ती करण्यासाठी वेळ दिला गेला. त्यानुसार दुरुस्तीही झाली. त्यानंतर आता अर्ज 'नॉट सर्टिफाइड' असे संदेश आल्याने राज्यातील ३४ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी दुरुस्तीसाठी शिक्षण विभागात रांगा लावल्या आहेत. प्रशासन तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत आहे, तर योग्य उत्तरे मिळत नसल्याने संधी हुकणार का, असा प्रश्न बेरोजगार विद्यार्थ्यांना सतावत आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागास प्रवर्गांतर्गत (एसईबीसी) आरक्षण जाहीर केले. भरती प्रक्रियेत त्याचा उल्लेख करण्यात आला. शिक्षक भरतीसाठीची प्रक्रिया 'पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टिचर रिक्रुटमेंट' (पवित्र) पोर्टलद्वारे होणार आहे. 'शिक्षक पात्रता परीक्षा' (टीईटी), 'अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी' पात्र विद्यार्थ्यांना त्यावर नोंदणीची प्रक्रिया करावयाची आहे. आरक्षणानंतर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दुरुस्तीसाठी कालावधी वाठवून देण्यात आला. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्जातील बदल केले. त्यानुसार अर्ज अधिकृतची प्रक्रिया झाली. त्यानंतर अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असताना या प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जावर 'नॉट सर्टिफाइड' असे संदेश आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे स्वत:च्या 'लॉग इन'वर जाऊन विद्यार्थ्यांना अर्जही पाहता येत नाही. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न लक्षात येताच शिक्षण विभागही गोंधळात सापडला आहे. तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत या दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. औरंगाबाद विभागासाठी उपसंचालकस्तरावर या दुरुस्ती केल्या जात आहेत. अनेक विद्यार्थ्यांना याबाबत कल्पना नाही. सुरुवातीला अधिकृत अर्ज झाल्याने बदल नसतील म्हणून अनेकजनांचे अर्ज बाद होतील, अशी भीतीही डीटीएड, बीएडधारक बेरोजगार व्यक्त करत आहेत.

\B'शिक्षणाधिकारी'स्तरावरूनही दुर्लक्ष

\Bशिक्षणाधिकारी स्तरावर अर्जातील या बदलांकडे दुर्लक्ष झाल्याचेही सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; अनेक शिक्षणाधिकाऱ्यांच्या 'लॉग इन'ला हे अर्ज 'ड्राफ्ट'मध्येच राहिले. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बदल पुढे आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता हे बदल उपसंचालक स्तरावर करण्यात येत आहे, मात्र विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना विभागीय पातळीवर येऊन अर्ज योग्य आहे की, नाही हे पहावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो आहे.

\Bविद्यार्थ्यांच्या रांगा

\Bअर्जामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयात गर्दी केली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातूनही योग्य उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. अर्जातील त्रुटी दूर करून तात्काळ दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या निश्चित कालावधीत कराव्यात, असे काही नाही विद्यार्थी येऊन आपला अर्ज दुरुस्त करू शकतात, असे उपसंचालक कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी 'मटा'ला सांगितले. दुसरीकडे आधीच राज्यात आठ वर्षांपासून शिक्षक भरती नसल्याने या भरतीकडे लक्ष असलेला डीटीएड, बीएडधारक बेरोजगार विद्यार्थी या प्रकारामुळे आणखी गोंधळात सापडला आहे.

प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांची संख्या… : ३४०००

आरक्षणाच्या निर्णयानंतर अर्जातील प्रवर्ग बदलण्याबाबत संधी देण्यात आली. त्यानुसार बदल केले त्याच्या छायांकीत प्रती काढल्या, मात्र आता 'लॉग इन'मध्ये अर्ज अधिकृत झाला नसल्याचा 'मेसेज' येत आहे. विभागीयस्तरावर विचारणा केली तर योग्य उत्तरे दिली जात नसल्याने सगळा संभ्रम आहे. त्यांच्या गोंधळाला विद्यार्थ्यांनी काय करायचे हे सांगा.

- भगवान जाधव

तांत्रिक अडचणी आहेत की, अर्जातील गोंधळ आहे याबाबत प्रशासनाकडून कोणतीच उत्तरे दिली जात नाहीत. अर्ज ऑनलाइन भरला आता तो अधिकृत आहे की, नाही यासाठी औरंगाबदला यायचे म्हणजे हा खर्चाचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर आहे. अनेकांना तर याची कल्पनाच नाही. त्याचे अर्ज बाद झाले तर त्यांची संधी हुकणार याची भीती वाटते.

- मच्छिंद्र शेळके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅसेंजरच्या वाहतुकीवर पुलाच्या कामामुळे परिणाम

$
0
0

औरंगाबाद : कोडी ते रंजणी आणि पेरगाव ते परभणी या स्थानकांदरम्यान रेल्वे पूल उभारण्यासाठी आरसीसी बॉक्सेस बसविण्यात येणार आहे. त्यासाठी दोन आणि आठ फेब्रुवारी रोजी तीन तासांचा लाइन ब्लॉक घेण्यात येत आहे. या तीन तासाच्या लाइन ब्लॉकचा परिणाम औरंगाबाद मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेवर होणार आहे. रेल्वे पुलाच्या कामामुळे दोन फेब्रुवारी (रेल्वे क्रमांक ५७५६१) काचीगुडा ते मनमाड पॅसेंजर गाडी परभणी ते रांजणी रेल्वेस्थानका दरम्यान ६३ मिनिटे उशिरा धावणार आहे. दोन फेब्रुवारीपासून (रेल्वे क्रमांक ५७५५०) औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर रेल्वे ५० मिनिटे उशिरा धावेल. आठ फेब्रुवारी रोजी (रेल्वे क्रमांक संख्या ५७५४९) हैदराबाद ते औरंगाबाद पॅसेंजर रेल्वे परभणी स्थानकावर एक तास थांबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौर कृषिपंपासाठी प्रतिसाद अल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत राज्यात ५० हजार शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाची वीज जोडणी देण्यात येणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत फक्त ३१२अर्ज आले आहेत.

शाश्‍वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा भागातील शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाची वीज जोडणी देण्यात येणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी महावितरणतर्फे क्षेत्रीयस्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सोशल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहे. या संवादामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद या योजनेला लाभत आहे. औरंगाबाद - जालना परिमंडळातंर्गत मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी जालना जिल्ह्यातून २५०० शेतकऱ्यांनी महावितरण विभागाच्या वेबपोर्टलवर कृषिपंप मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले आहे. यातुलनेत औरंगाबाद जिल्ह्यातून फक्त ३१२ अर्ज आले आहेत. राज्यभरातून या योजनेतंर्गत कनेक्शन घेण्यासाठी आठ हजार ६६५ अर्ज आले असून, यात मराठवाड्यातून पाच हजार ४४६ अर्ज आले असल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली आहे.

\Bसौर योजनेचा लाभ घ्यावा

\B'मुख्यमंत्री सौर कृषियोजनेचा लाभ औरंगाबादमधील शेतकऱ्यांनी घ्यावा. सौर कृषिपंपासाठी वीज जोडणी इतकाच खर्च लागत असून, तीन वर्ष मेन्टेनन्स संबंधित एजन्सीकडे राहणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी चांगली असून त्याचा लाभ घ्यावा,' असे आवाहन जिल्हा विद्युतीकरण समितीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.

\Bअसे आले अर्ज

\B- ८६६५ राज्यभरातून

- ५४४६ मराठवाडा

- २५०० जालना जिल्हा

- ३१२ औरंगाबाद जिल्हा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तांत्रिक कारणामुळे जेटचे विमान मुंबईहून रद्द

$
0
0

औरंगाबाद : मुंबईहून औरंगाबादकडे निघालेले जेट एअरवेजचे विमान तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले. यामुळे औरंगाबाद ते मुंबई हे विमान रद्द करण्यात आले.

मुंबई विमानतळावरून मंगळवारी (२९ जानेवारी) दुपारी चारच्या सुमारास औरंगाबादकडे १४५ प्रवासी घेऊन निघालेले जेट एअरवेजचे विमान क्रमांक ९ डब्ल्यू ६९१ हे रद्द करण्यात आले. हे विमान औरंगाबादला सातच्या सुमारास पोचणार असल्याची माहिती जेट विमानाच्या प्रवाशांना देण्यात आली. यामुळे औरंगाबाद विमानतळावर जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईला जाणारे १२३ प्रवाशी विमानतळावर थांबले होते. अखेर सातच्या सुमारास मुंबई ते औरंगाबाद विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. यानंतर जेट विमानाने जाणाऱ्या १२३ प्रवाशांमधील २० प्रवासी एअर इंडियाच्या विमानाने पाठविण्यात आले. काही प्रवासी रेल्वेने, काही प्रवाशांनी अन्य वाहनांतून, तर काही प्रवाशांनी दुसऱ्या दिवशी विमानाने मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. पक्ष्याने धडक दिल्याने हे विमान रद्द करण्यात आले असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांकडून देण्यात आली. मंगळवारी देशभरात चार विमानांचे उड्डाण रद्द केले. यामुळे २१ फेऱ्या रद्द झाल्या. या चार विमानांमध्ये मुंबई-औरंगाबाद-मुंबई या विमानाचा समावेश नव्हता, अशी माहिती जेट एअरवेजच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक मंचात तक्रारदारास दंड

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सार्वजनिक जागेवर अस्वच्छता केल्याप्रकरणी महापालिकेने ठोठावलेल्या दंडाला आव्हान देणारा अर्ज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने प्राथमिक अवस्थेतच शंभर रुपये दंडासह फेटाळण्याचा आदेश मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य, संध्या बारलिंगे आणि किरण ठोळे यांनी दिले.

या संदर्भात सिडको एन- २, महाजन कॉलनी येथील रहिवासी ताराचंद बाबूराव जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. सार्वजनिक जागेवर अस्वच्छता केल्याप्रकरणी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने त्यांना जागेवरच शंभर रुपये दंड करून तो वसूल केला आणि त्यांना पावती दिली. आपल्याला १५ जानेवारीची पावती देण्यात आली. मात्र, १६ जानेवारीला पाठीमाहून फोटो काढून आपल्याकडून दंड घेण्यात आला. आपल्याला झालेला मानसिक त्रास आणि आर्थिक अडचणीकरिता ३० हजार रुपये भरपाई मिळावी, अशी विनंती त्यांनी मंचात केली होती. मंचात दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अर्जदाराची कृती ही कायद्यान्वये दंडास पात्र असल्याचे मंचाचे मत झाले. तसेच तसेच तक्रारदार आणि गैरअर्जदार हे ग्राहक आणि सेवा पुरवठादार या संज्ञेत येत नसल्याने अर्जदारास १०० रुपये दंड करीत अर्ज फेटाळून लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटी देण्याला अंतरिम स्थगिती

$
0
0

औरंगाबाद: शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी पाचशे कोटींचा निधी देण्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी ४ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. संस्थानच्या निधीचा निळवंडे प्रकल्पासह इतर कुठल्याही कामासाठी वापर करू नये, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. दैनंदिन खर्चास संस्थानला मुभा देण्यात आल्याचे याचिकाकर्त्याचे वकील प्रज्ञा तळेकर यांनी सांगितले.

शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी पाचशे कोटींचा निधी का दिला? आणि कसा जाहीर केला? अशा प्रकारे अन्य कामासाठी संस्थानचा निधी वापरण्याची तरतूद आहे का, अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाने २५ जानेवारीच्या सुनावणीच्या वेळी केली होती. निळवंडे धरणाचे काम पुर्ण झाले आहे.कालव्यांचे काम सुरु आहे. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकरी या कामात अडथळा आणीत आहेत. काम वेळेत पुर्ण न झाल्यास २५६ कोटींचा निधी लॅप्स होईल असा दिवाणी अर्ज अ‍ॅड. अजीत काळे यांनी खंडपीठात दाखल केला आहे. त्या अर्जासह निळवंडे धरणाशी संबंधीत सर्व याचिकांवर बुधवारी एकत्रित सुनावणी झाली.

सुनावणी दरम्यान शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी देऊ केलेल्या पाचशे कोटींच्या निधीबाबत विचारणा केली असता संस्थानतर्फे ५०० रुग्णावाहीका खरेदी करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तर संस्थानने औरंगाबादेतील घाटी रुग्णालय आणि इतर संस्थांना सुद्धा निधी देऊ केला असल्याचे वकीलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर संस्थानकडे जमा होणारा पैसा हा भाविकांचा आहे असे (तोंडी) मत खंडपीठाने व्यक्त केले होते .

याचिकाकर्त्यांच्या वतीनं अजीत काळे, प्रज्ञा तळेकर, अकोले तालुक्यातील हस्तक्षेपकांतर्फे सचिन देशमुख व शेख माजीद, शिर्डी संस्थानतर्फे नितीन भवर हे काम पाहत आहेत. या याचिकेची सुनावणी ४ फेब्रुवारीला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराला हुडहुडी; पारा सात अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मकर संक्रांतीनंतर गायब होणाऱ्या थंडीचा मुक्काम यंदा औरंगाबाद शहरात वाढला आहे. आज कमी होई, उद्या कमी होईल असे वाटत असताना उलट शहराचे तापमान घसरत असल्यामुळे शहरात थंडीचा कडाका आहे. बुधवारी (३० जानेवारी) शहराचे किमान तापमान सात अंश सेल्सियसपर्यंत घसरले, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सियस होते.

गेल्या काही दिवसांपासून शहरात तापमानाचा चढ, उतार सुरू आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ओसरलेल्या थंडीने गेल्या आठवड्यापासून पुन्हा जोर धरला आहे. पहाटे, सायंकाळी वातावरणात प्रचंड गारवा; तसेच थंड वारे वाहत असल्यामुळे संपूर्ण शहर गारठले आहे. गेल्या आठवड्यात काही दिवस शहराचे तापमान १३ अंशाच्या आसपास होते, मात्र थंड वारे वाहत असल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी सूर्य मावळताच प्रचंड थंडी जाणवत आहे. पहाटे थंडीचा असलेला जोर दहापर्यंत राहत आहे. हवामान अभ्यासकांनुसार शहरात तापमानाचा चढउतार कायम असला तरी थंडीचा हा मुक्काम फेब्रुवारी अखेरपर्यंत राहणार आहे. हवामान विभागानुसार येत्या आठवड्यात तापमानात पुन्हा घट होणार असल्यामुळे शहरात थंडी वाढण्याचा अंदाज आहे.

\Bआजही थंडीची लाट

\Bहवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारीही (३१ जानेवारी) शहरात थंडीची लाट कायम राहणार आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये किमान तापमान ११ अंश सेल्सियसपर्यंत राहणार असून, किमान तापमानासोबचत कमाल तापमानातही घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेमेंट द्या, नाहीतर आत्मदहन करतो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पेमेंट द्या, नाहीतर आत्मदहन करतो', असा निर्वाणीचा इशारा कंत्राटदारांनी बुधवारी महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिला आहे. आयुक्तांना भेटल्यावर कंत्राटदारांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन थकीत पेमेंटबद्दल चर्चा केली.

महापालिकेत विविध विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांचे सुमारे १८५ कोटी रुपयांचे पेमेंट थकले आहे. वारंवार मागणी करूनही दोन-दोन वर्षांपासून कंत्राटदारांना त्यांचे पेमेंट मिळत नाही. काही कंत्राटदारांना मात्र नियमित पेमेंट केले जाते, अशा बहुसंख्य कंत्राटदारांच्या तक्रारी आहेत. दोन-दोन वर्ष पालिकेच्या लेखा विभागातून पेमेंट मिळत नसल्यामुळे काम करणे अवघड झाल्याची भावना कंत्राटदार व्यक्त करीत आहेत. थकीत पेमेंट मिळावे यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी पालिका मुख्यालयाच्या समोर उपोषण देखील केले होते. पेमेंट करण्याचे आश्वासन देऊन प्रशासनाने त्यांचे उपोषण सोडविले होते. आश्वासनानंतरही पेमेंट न मिळाल्यामुळे सुमारे ५० कंत्राटदारांनी बुधवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची भेट घेतली. येत्या तीन दिवसांत पेमेंट न मिळाल्यास आत्मदहन करू असा, इशारा काही कंत्राटदारांनी आयुक्तांना दिला. काही कंत्राटदार आपली व्यथा मांडताना आयुक्तांच्या समोर अक्षरश: रडले. 'पेमेंट करण्यासाठी लवकरात लवकर मार्ग काढतो, जरा धीर धरा', असे आयुक्तांनी या सर्वांना सांगितले.

आयुक्तांच्या भेटीनंतर सर्वच कंत्राटदार महापौर नंदकुमार घोडेले यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले. अधिकाऱ्यांना टिकू दिले जात नाही, त्यांच्यावर दबाव टाकला जातो. अधिकाऱ्यांना काम करू द्या, असे कंत्राटदारांनी महापौरांना सांगितले. कंत्राटदारांचे थकीत पेमेंट निघावे यासाठी महापौरांनी लक्ष घालावे, अशी विनंती कंत्राटदारांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट असेल तरच सुरू होते गाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हेल्मेट वापऱ्याबाबतच्या जनजागृतीसाठी, मद्यपान गाडी चालवू नका या विषयांच्या जाहिरातींसाठी लाखो रुपयांचा खर्च होतो, मात्र यावर औरंगाबादेत नववीमध्ये विस्मय विनोद तोतलाने 'स्मार्ट हेल्मेट'चा उपाय शोधला. हेल्मेट घातलेले असेल तरच तुमची गाडी सुरू होते. दारू पिऊन गाडी चालवत असाल तर थेट घरी संदेश, लोकेशन जाते आणि गाडी सुरू होत नाही. त्याचा हा प्रकल्प देशपातळीवर विज्ञान प्रदर्शनासाठी निवडला गेला आहे.

नाथ व्हॅली हायस्कूलचा इयत्ता नववीचा हा विद्यार्थी. त्याने हा 'स्मार्ट हेल्मेट' तयार केला आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघात. त्यातून होणाऱ्या मृत्यूची संख्या पाहिली की, हेल्मेटचे महत्त्व लक्षात येते. हेच महत्त्व लक्षात घेत त्याने हे हेल्मेट तयार केले. 'सीबीएसई' शाळांच्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट विज्ञान प्रकल्प म्हणून हा प्रकल्प निवडला गेला आहे. पुणे येथे झालेल्या या प्रकल्प प्रदर्शनात एकूण १७५ प्रकल्प होते. त्यामध्ये राज्यातील ७२ 'सीबीएसई' शाळांनी सहभाग घेतला. स्मार्ट हेल्मेट तयार करण्यासाठी विस्मय याला एक महिन्याचा कालावधी लागला त्यात त्याने आरएफ ट्रान्समीटर रिसिव्हर, आल्कोहोल सेंसर, लिमेट स्वीचेच, जीएसएम, जीपीएस अँटेनाचा वापर करण्यात आला आहे. त्याचा हा प्रकल्प सात व आठ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या देशपातळीवर विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र ठरला आहे. डॉ. विनोद तोतला, डॉ. शिल्पा तोतला यांचा तो मुलगा आहे.

\Bया हेल्मेटचे असे आहेत फायदे\B

या हेल्मेटचे तीन मुख्य फायदे आहेत. दुचाकी चालकाने जर हेल्मेट घातले नसेल तर गाडी सुरू होत नाही. दुचाकी चालकाने मद्य प्राशन केलेले असेल तर गाडी पुढे जाणार नाही आणि चालू होणार नाही. त्याचबरोबर त्याच्या घरी कुटुंबीयांना लोकेशनही कळते. दुचाकी चालकाचा अपघात झाल्यास अपघातस्थळाचे 'लोकेशन' नातेवाईकांना मोबाइलवर पाठवले जाते. त्याबरोबरच रुग्णवाहिकेही संदेश पाठवला जातो. याचबरोबर त्याने स्मार्ट हेल्मेट अॅपही त्याने विकसित केले आहे.

हा प्रोजेक्ट एक उत्तम प्रयोग आहे. त्यामुळे अपघातात हजारो लोकांचे प्राण वाचू शकतात आणि दुचाकीचालकांना हेल्मेट घालणे अनिवार्य होऊ शकते. यात आणखी सुधारणा करण्यास वाव आहे त्यानुसार माझा तसा प्रयत्न असेल. राष्ट्रीय पातळीवर प्रकल्प सादरीकरणाची संधी मिळतेय, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

- विस्मय तोतला विद्यार्थी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी अनुदानाचे सोमवारपासून वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला अखेर दोन दिवसांपूर्वी दुष्काळी अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून, रक्कम जिल्हानिहाय पाठविली आहे. आता चार फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदाची रक्कम मिळण्यास सुरुवात होणार असल्याने दुष्काळामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे.

मंजूर झालेले दुष्काळी अनुदानाच्या ५२५ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत केंद्र सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी अनुदनाची चार हजार ७१४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे आता इतर टप्प्यातील रक्कमी मराठवाड्याला लवकरच मिळण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील प्राप्त झालेले ५२५ कोटी रुपये संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यात आले असून येत्या सोमवारपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामार्फत वाटप करण्यात येणार आहे.

अत्यल्पल्प पावसामुळे मराठवाड्यातील ३६ लाख २७ हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकरी कुटुंब दुष्काळामुळे होरपळत असून, सरकारकडून दुष्काळ जाहीर झाल्यापासून हे शेतकरी अनुदानाची वाट पाहत होते. सध्या मराठवाड्यात बोंडअळी अनुदानाचे वाटप सुरू असून, त्यासोबतच दुष्काळी अनुदानाचेही वाटप करण्यात येणार आहे.

\Bबागायती पिकांबाबत संभ्रम\B

दुष्काळी अनुदान वाटप करण्यासंदर्भात शासनादेश काढण्यात आला आहे, मात्र प्राप्त रक्कम ही केवळ शेतीपीक आणि फळबागा या दोनच टप्प्यांतर्गत द्यावयाचा आहे. त्यामुळे आता बागायती पिके असलेल्या खातेधारकांना रक्कम कशी द्यावी, असा संभ्रम असून, यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात येणार असल्याचे कळते.

\B५० टक्के मदत वाटपाचा फंडा

\Bमराठवाड्याल पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात येणारी रक्कम ही कोणत्याही एका गावामध्ये संपूर्ण वाटप करण्याऐवजी ५० टक्के या स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांच्या पदरात नुकसान भरपाई मिळणार आहे. आता केंद्र सरकारनेही अनुदानाची रक्कम जाहीर केल्यामुळे उर्वरित भरपाईही लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळण्याची शक्यता आहे.

\Bजिल्हानिहाय मिळणारी रक्कम

\Bजिल्हा.....................पहिला हप्ता

औरंगाबाद................१११.६२

जालना.....................९७.९०

बीड........................१२६.९४

लातूर.........................३.३१

उस्मानाबाद................६९.९८

नांदेड.......................२५.७५

परभणी......................५३.७७

हिंगोली......................३५.९७

एकूण.......................५२५.२९

(रुपये कोटीमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राँगसाइड येऊन धडक दिल्याने चार हजार दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राँगसाइडने येऊन ५२ वर्षांच्या स्कुटरचालकाला जोराची धडक देत जखमी केले. अपघातात स्कुटरचे १२ हजारांचे नुकसान केल्याप्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी २१ वर्षांच्या आरोपी दुचाकीस्वार सय्यद मोहसीन अली सय्यद साबेर अली याला चार हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी (३० जानेवारी) ठोठावली.

याप्रकरणी अनंत रामचंद्र बोकडे (५२, रा. सुराणा नगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, दहा ऑगस्ट २०१५ रोजी सायंकाळी सातला फिर्यादी हा त्याच्या स्कुटरवरून (एमएच २४ यू ८७२९) क्रांतीचौकातून पैठणगेटकडे जात होते. नूतन कॉलनी परिसरातील मुनलाइट हॉटेलसमोर राँगसाइडने भरधाव वेगात दुचाकीवरून (एमएच २० एपी ८४५२) येणारा आरोपी सय्यद मोहसीन अली सय्यद साबेर अली (२१, रा. सिल्कमिल कॉलनी, औरंगाबाद) याने फिर्यादीच्या स्कुटरला जोराची धडक दिली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले, तर स्कुटरचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम २७९, ४२७, तर मोटारवाहन कायद्याच्या १३४ व १८७ कलमान्वये क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले.

\Bतीन हजार रुपये भरपाई

\Bदोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या २७९ कलमान्वये एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक दिवस कारावास, भारतीय दंड संहितेच्या ४२७ कलमान्वये २५०० रुपये दंड व दंड न भरल्यास तीन दिवस कारावास, तर मोटारवाहन कायद्याच्या १३४ व १८७ कलमान्वये ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा कोर्टाने ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी तीन हजार रुपये नुकसान भरपाई पोटी फिर्यादीला देण्याचे आदेशही कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री. श्री. रविशंकर यांच्या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी आज वाहन फेरी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते व आध्यात्मगुरू श्री. श्री. रविशंकर यांचे सहा फेब्रुवारीला शहरात आगमन होत आहे. त्यांच्या "विठ्ठला महासत्संग व "अमृतधारा या आध्यात्मिक व्याख्यानाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी गुरुवारी (३१ जानेवारी ) वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतीचौकातून सकाळी साडेदहा वाजता फेरी निघणार आहे. सतीश मोटर्स, विवेकानंद कॉलेज, निरालाबाजार, गुलमंडी, टीव्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर मार्गे मोंढानाका येथे फेरीचा समारोप करण्यात येईल. रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य मैदानात…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्यापूर्वी एक फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहेत. त्यासाठी शैक्षणिक साहित्य मंडळाकडून बुधवारी कॉलेजांना वितरित करण्यात आले. हे साहित्य ठेवण्यासाठी मंडळाकडे जागा नसल्याने चक्क मैदानात साहित्य थाटण्यात आले होते.

बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान होणार आहेत. त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा एक ते १८ फेब्रुवारीदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांना घ्यायची आहे. त्यासाठी लागणारे साहित्य कॉलेजांना बुधवारी जिल्हा केंद्रावरून वितरीत करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील साहित्य मंडळाच्या कार्यालयातूनच वितरित करण्यात आले. मंडळाच्याच कार्यालयात वितरित करण्याची नवीन पद्धत पहायला मिळाली. चक्क हे साहित्याचे गठ्ठे मैदानात ठेवून त्यांचे वितरण करण्यात आले. बारावीला विभागातून एक लाख ६८ हजार ४२४ विद्यार्थी ३८८ परीक्षा केंद्राहून परीक्षा देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पे चॅनल्सचे उद्यापासून ब्लॅक आऊट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

गुरुवारी मध्यरात्रीपासून पे चॅनल्ससोबत फ्री टू एअर चॅनल्सचाही टीव्हीवर ब्लॅक आऊट होणार आहे. स्वत:च्या पसंतीचे चॅनल्स निवडण्यासाठीही गुरुवार (३१ जानेवारी) हा शेवटचा दिवस राहणार आहे.

टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) सर्वसामान्य टीव्ही दर्शकांना आपल्या पसंतीचे चॅनल्स निवडण्याचा अधिकार दिला आहे.

ट्रायने दिलेल्या निर्णयामध्ये ३१ जानेवारीपूर्वी केबल चॅनल्सची निवड करण्याची मुदत देण्यात आली आहे. याआधी औरंगाबाद शहरात केबल ऑपरेटर ४०० चॅनल्सच्या पॅकेजचे ३५० रुपये घेत होते. मात्र, आता पे चॅनल्स निवडण्याच्या अधिकारामध्ये १०० फ्री टू एअर चॅनल्स पाहण्यासाठी १३० रुपये आणि २३ रुपये जीएसटी असे फक्त १५३ रुपये भरावे लागणार आहेत. याशिवाय पे चॅनल्ससाठी वेगळे पैसे द्यावे लागणार आत्त. यात विविध चॅनलचे पॅकेज ठरवून देण्यात आले आहे. पॅकेज स्वस्त असून या पॅकेज व्यतिरिक्त पसंतीचे प्रत्येक चॅनल घेण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. ग्राहकांनी ३१ जानेवारीपूर्वी पसंतीच्या चॅनल्सचे पैसे भरले नाही तर १ फेब्रुवारी पासून टीव्हीवर दिसणारे सर्व फ्री टू एअर चॅनल्स बंद पडणार आहेत.

केबल ऑपरेटरला फटका

ट्रायच्या या निर्णयानंतर चॅनल्स सर्व्हिसकडून चॅनल्स निवडून त्याप्रमाणे सेवा देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, केबल ऑपरेटरर्सकडून याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नाही. केबल चालकांना या योजनेचा मोठा फटका बसत आहे. ट्रायने दिलेल्या निर्णयामुळे केबल चालकांना फार कमी रक्कम यातून मिळणार आहे. पूर्वी केबल चालकांना ४५० रुपयाच्या पॅकेज मागे १०० ते १२५ रुपये वाचत होते. त्यातून मेन्टेनन्स कर्मचाऱ्यांचे वेतन करावे लागत होते. मात्र, आता नवीन नियमांमध्ये केबल ऑपरेटरचे उत्पन्न कमी होणार आहे. यामुळे विविध ठिकाणी या निर्णयाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये पुण्यात याचिका दाखल करण्यात आली असून कोलकोत्ता हायकोर्टाने १५ दिवसांची मुदत वाढवून दिल्याची माहिती शहरातील केबल ऑपरेटरकडून देण्यात आली आहे.

असे घ्यावे लागतील चॅनल्स

औरंगाबाद शहरात हॅथवे केबल नेटवर्कचे ८० हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांना त्यांच्या संबंधीत केबल ऑपरेटरकडे जाऊन त्यांच्या पसंतीचे चॅनल्स निवडावे लागणार आहेत. त्यांचा अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

ग्राहकभिमुख निर्णय

टीव्ही दर्शकांच्या हिताचा निर्णय ट्रायने घेतला आहे. याचा थेट लाभ ग्राहकांना होणार आहे. यात ग्राहकांना सेवा देणाऱ्या केबल ऑपरेटरांना काही प्रमाणात नुकसान होणार आहे. जर ग्राहकांनी ३१ जानेवारीपूर्वी त्यांच्या पसंतीचे चॅनल्स निवडले नाही तर ट्रायच्या आदेशाप्रमाणे दिलेल्या मुदतीनंतर ब्लॅक आऊट करावा लागणार आहे.

विरेंद्र सिंह पवार, संचालक हॅथवे एमसीएन केबल प्रा. लिमीटेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक फेब्रुवारीला आरटीओत लेखणी बंद आंदोलन

$
0
0

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटना, सलंग्नित मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना यांच्या वतीने एक दिवसाचे आरटीओ कार्यालयात लेखणी बंद आंदोलन केले जाणार आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या अधिपत्याखाली राज्यातील परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी आकृतीबंध व कार्यालयीन रचना या बाबत अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटनेच्या वतीने एक फेब्रुवारी रोजी लेखणी बंद आंदोलन करणार असल्याचे आरटीओ कार्यालयाला एका निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमेश सोमवंशी, तुषार बावस्कर, मनीष बनकर, विक्रमसिंग राजपूत, रेखा कदम, विश्वा राऊत यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी हे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांना देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images