Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मुद्रांक: १०० हून अधिक नवीन उद्योग थांबले

0
0

औरंगाबाद

औद्योगिक धोरण ठरविण्यास कमालीचा विलंब केल्याच्या राज्य सरकारच्या दुर्लक्षाचा फटका उद्योजकांना बसत आहे. राज्याचे उद्योग धोरण जाहीर न केल्यामुळे नवीन उद्योजकांना मुद्रांक शुल्क माफीची मिळणारी सवलत अडली आहे. परिणामी एकट्या औरंगाबादेत १०० हून अधिक नवीन उद्योग सुरू होण्यापासून अडले आहेत.

राज्यात कुठेही नवीन उद्योग सुरू करावयाचा असल्यास त्याला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग विभागाने मुद्रांक शुल्कमाफी जाहीर केली होती. महाराष्ट्रात २०१३ पासून उद्योग धोरण राबविले जाते. पाच वर्षांनंतर त्यात बदल होणे अपेक्षित असताना आतापर्यंत काहीच हालचाल झाली नाही. दरम्यान ३० सप्टेंबर २०१८ रोजी उद्योग विभागाने मुद्रांक शुल्क माफी योजनेला दिलेली मुदत संपली. तोपर्यंत उद्योग व महसूल विभागाच्या समन्वयाने मुद्रांक शुल्क माफी योजना व्यवस्थितपणे राबविली गेली.

त्यानंतर नवीन उद्योगांची खरी अडचण सुरू झाली आहे. कारण महसूल खात्याने पत्र काढून उद्योगांना मुद्रांक शुल्कमाफीसाठी ३० सप्टेंबर किंवा नवीन उद्योग धोरण वा दोघांपैकी जे आधी असेल त्यानुसार अंमलबजावणी करावी, असे जाहीर केले.

राज्याच्या उद्योग खात्याकडून अद्याप उद्योग धोरण जाहीर केले गेले नाही. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत उद्योगासाठी नवीन जागा घेणाऱ्या नोंदणी करणाऱ्या उद्योगांना मुद्रांक शुल्कात कुठलीही सवलत मिळेनाशी झाली आहे. ही अडचण पाहून मराठवाडा असोसीएशन ऑफ स्मॉल स्केल ऑफ इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चरने (मासिआ) मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, महसूलमंत्री, विकास आयुक्त यांना सातत्याने पत्रव्यवहार करून मुद्रांक शुल्क माफीबाबत त्वरित निर्णय जाहीर करावा, अशी विनंती केली, पण चार महिने उलटून गेले तरी त्यावर निर्णय झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत याबाबत विचारणा केली असता मुद्रांक शुल्क माफीसाठी विशेष निर्णय जाहीर करण्याबाबत चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र, अंमलबजावणी पातळीवर कुठलीच हालचाल नसल्याने नवीन उद्योग थाटणारी मंडळी कमालीची अडचणीत आली आहेत.

एकट्या औरंगाबाद परिसरात गेल्या चार महिन्यांपासून उद्योगासाठी खरेदी विक्रीचे व्यवहार बऱ्यापैकी थंडावले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ११४ प्लॉटची खरेदी सरकारी धोरण निश्चित नसल्याने अडली आहे. याचा फटका शहराच्या विकासावर होत आहे.

आर्थिक फटक्याची भीती

औरंगाबाद परिसरात एमआयडीसीकडून प्लॉट खरेदी केल्यास सात टक्के मुद्रांक शुल्क लागते. गट नंबरमध्ये उद्योगासाठी प्लॉटची खरेदी केली तर सहा टक्के मुद्रांक शुल्क लागते. नवीन उद्योगांना प्रोत्साहनपर योजनेतंर्गत सरकारकडून हे शुल्क माफ केले जात होते. पण गेल्या चार महिन्यांपासून धोरण निश्चित नसल्याने आर्थिक फटका बसेल याची भीती उद्योजकांना आहे. परिणामी, खरेदीचे व्यवहार थांबले आहेत.

नवीन उद्योगांना मुद्रांक शुल्क माफीसंदर्भात आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेऊन उद्योजकांची अडचण सोडवावी.-किशोर राठी, अध्यक्ष मासिआ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद: डबे मागे सोडून एक्स्प्रेसचे इंजिन पुढे धावले!

0
0

औरंगाबाद:

औरंगाबादमध्ये शनिवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात टळला. कपलिंग तुटल्याने सचखंड एक्स्प्रेसचे इंजिन डबे सोडून काही अंतर पुढे धावले. एक्स्प्रेसचे डबे रेल्वे रुळांवरून घसरले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, सुदैवानं ती टळली.

सचखंड एक्स्प्रेस अमृतसरहून नांदेडकडे जात होती. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास औरंगाबादजवळ इंजिन आणि डब्यांचे कपलिंग तुटले. त्यामुळं डबे मागे सोडून इंजिन काही अंतर पुढे धावले. नेमकं काय झालं हे समजू न शकल्यानं काही वेळ प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. अखेर थोड्याच वेळात रेल्वेचे इंजिन पुन्हा मागे आणून एक्स्प्रेसच्या डब्यांना जोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा, १९ लाखांचा ऐवज लंपास

0
0

सेलू(प्रतिनिधी)

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सेलू येथील शाखेवर आज पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा घातला. बँकेतील सुमारे साडे एकोणीस लाखांवर रक्कम पळविली. आज पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (ग्रामीण शाखा) मुख्य दाराचे कुलूप तोडले. बँकेतील जवळपास सहा फुटाची तिजोरी आडवी पाडून चोरट्यांनी त्यामधून १९ लाख ८२ हजार १७४ रुपयांची रोकड आणि साडे सात हजार रुपये किंमतीचे इंटरनेटचे मोडेम चोरून नेले.

चोरट्यांनी या गुन्ह्यात एका चारचाकी वाहनाचा वापर केल्याचीही माहिती मिळते. बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे दिसत असून चेहरा कपड्याने झाकलेला आहे. या चोरीत दोन ते तीन चोरटे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. चोरट्यांनी आधी बँकेच्या मागील भागातून देखील बँकेत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा तुटत नसल्याने पुन्हा चोरटे मुख्य दाराचे कुलूप तोडून बँकेत गेले. बँकेतील जवळपास सहा फुटाची तिजोरी आडवी पाडून चोरट्यांनी त्यामधून १९ लाख ८२ हजार १७४ रुपयांची रोकड आणि साडे सात हजार रुपये किंमतीचे इंटरनेटचे मोडेम चोरून नेले. बँकेचे शाखा व्यवस्थापक भागवत काळे हे सकाळी ८ वाजता बँकेत आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.लगेचच त्यांनी बँकेच्या वरिष्ठांना याबाबत कळविले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे,पोलीस निरीक्षक संदीपान शेळके आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसमोरील अडचणी अद्याप संपल्याच नाहीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

संत एकनाथ महाराज यांनी स्वर्गप्राप्ती व शेती करताना निर्माण होणाऱ्या अडथळ्यांची एके ठिकाणी तुलना केली असता शेती करणे हे स्वर्गप्राप्ती पेक्षाही अधिक कसरतीचे काम असल्याचे त्यांनी त्या काळी उल्लेख केलेला आहे. दुर्दैवाने शेकडो वर्षानंतरही शेतकऱ्यांसमोरील अडचणीं अद्याप संपल्या नसल्याची खंत प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव यांनी पैठण येथे व्यक्त केली.

दोन दिवसीय पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाला शनिवारी शहरातील माहेश्वरी मंगल कार्यालय येथे सुरुवात करण्यात आली. यावेळी, अध्यक्षीय भाषण करताना कवी इंद्रजित भालेराव यांनी खंत व्यक्त केली. वाचन, लेखन, वाङमय आणि शेतकरी यांचा एकेकाळी संबंध नव्हता. शेतकरी राबताना लोकगीत म्हणायचे. हे वाङमय आणि लोकगीत अक्षरबद्ध झाल्यास ते आपल्यासाठी भविष्यात पोटापाण्याचा साधन होऊ शकते हे लक्षात आल्यावर, इंग्रजांनी सर्वप्रथम शेतकरी साहित्य लिहिण्यास सुरुवात केली असल्याची माहिती संमेलनाध्यक्ष भालेराव यांनी यावेळी दिली.

सध्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व आत्महत्येवर लिहिणाऱ्यांना जातीयवादी, आक्रस्ताळ, गळाकाढू ठरवण्यात येत आहे. दुर्दैव म्हणजे हे कोणी अभिजन नव्हे तर बहुजनच करत आहेत. केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहिणे म्हणजे शेतकरी साहित्य नव्हे तर शेतकरी साहित्य लिहिताना शेतातील किडे मुंग्यासह निसर्गाच्या सर्व हालचालींसह शेत जिवंत करता आला पाहिजे, असे मत यावेळी भालेराव यांनी व्यक्त केले.

दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माहेश्वरी धर्मशाळा या मार्गावर ग्रंथ दिंडी काढून अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी, संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव, नगराध्यक्ष सुरज लोळगे, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, स्वागताध्यक्ष सतीश बोरूळकर, शेतकरी नेते कैलास तवार, गीता खांडेभराड, मनीषा रिठे, संदीप धावडे यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळी...

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माहेश्वरी धर्मशाळा या मार्गावर ग्रंथ दिंडी काढून अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी प्रदर्शनात स्वप्नांचा पेरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण रोडवरील केव्हीके मैदानावरील महा अॅग्रो कृषी प्रदर्शनाला अभ्यासक, तज्ज्ञ, शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. विविध कंपन्यांनी मांडलेले स्टॉल, बियाणांचे नाना वाण आणि तज्ज्ञांची मार्गदर्शने यामुळे दुष्काळातही शेतकऱ्यांच्या डोळ्यांत स्वप्नांचा पेरा सुरू आहे.

मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अॅग्रीकल्चर असोसिएशन, कृषी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनात वेगवेगळ्या कंपन्याची शेतीसाठी आवश्यक उपकरणे, फवारणी यंत्रे, दुग्ध व्यवसायाला उपयोगी पडणारी यंत्रे, नवनवीन बियाणे, विविध फळांची रोपे विक्री करणाऱ्या रोपवाटिका, खते, कीटकनाशके, राज्य शासनाच्या कृषीविषयक विविध योजना सादर करणारे स्टॉल, वित्तीय सहाय्य करणाऱ्या संस्थांचे स्टॉल आहेत. प्रदर्शनाचे आगळे आकर्षण ठरलेल्या 'शेतकरी बाजार'ला शहरवासीयांचा अलोट प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये औरंगाबादसह जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, जळगाव जिल्ह्यातून शंभरावर जास्त बचत गट, शेतकरी गट, वैयक्तिक प्रगतशील शेतकरी सहभागी झाले आहेत. मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, जवस, हळद, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करून त्यांचे एक ते तीन किलोचे पॅकेट करून विकण्यात येत आहेत. तीळ, मसाले, अस्सल ग्रामीण चवीच्या चटण्या, मसाले, याशिवाय घाण्यावर तयार करण्यात आलेले करडई, खोबरे आणि इतर तेल, केळी वेफर्स, काळा मनुका, आवळा सुपारी अशा अनेक वस्तू येथे उपलब्ध आहेत. बाजरी, ज्वारी, गहू, मध सेंद्रिय गूळ, पपई भाजीपाला आदीसह नागली, नाचणीचे पापड आदी स्वस्त दरात उपलब्ध करण्यात आले होते. शहरवासीय विशेषतः महिलावर्गाची येथे भरपूर खरेदी सुरू आहे. शनिवारी हवामान बदलाच्या अनुशंगाने शेतीपुढील आव्हाने आणि त्यावरील उपाय या विषयावरील चर्चासत्र झाले. या प्रसंगी कापूस संसाधन केंद्राचे खिजर बेग यांनी मार्गदर्शन केले. सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. पवार यांनी हवामान अनुकूल कोरडवाहू शेती पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात कृषी आणि कृषिपूरक व्यवसायाच्या संधी या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये डॉ. ए. टी. शिंदे यांनी शेळी पालन व कुक्कुट पालन, गोड्या पाण्यातील मत्स्य शेती या विषयावर डॉ. अमजद बालंगे, कृषी प्रकिया क्षेत्रात महिलांचा सहभाग या विषयावर प्रा. दीप्ती पाडगावकर, तर कृषी प्रक्रिया आवळा, शेवगा याबाबत यशोगाथा रेखा वाहठुळे यांनी मार्गदर्शन केले.

\Bपीक प्रात्यक्षिकाला गर्दी

\Bप्रदर्शनातील 'पीक प्रात्यक्षिका'मध्ये तब्बल १६ कंपन्यांनी विकसित केलेले वाण आहे. तीन एकरांमध्ये सुमारे अडीच ते तीन महिन्यांपूर्वी हे वाण पेरण्यात आले आहे. यात ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करण्यात आला. त्याची पाहणी करण्यासाठी, माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिले काढा अन्यथा आत्मदहन; कंत्राटदारांचा इशारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केलेल्या कामाचे बिल सोमवारपर्यंत द्या, अन्यथा कामबंद आंदोलनासह आत्मदहन करू, असा निर्वाणीचा इशारा कंत्राटदारांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि महापौरांना दिला आहे.

महापालिकेत रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठ्याची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना एक ते दीड वर्षांपासून बिल मिळालेले नाही. त्यामुळे कंत्राटदार त्रस्त झाले आहेत. पेमेंट मिळत नसल्यामुळे नवीन काम करणे देखील शक्य नाही, असे कंत्राटदार गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाला व पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत. पेमेंट न मिळल्यामुळे त्यांनी पालिकेसमोर उपोषण देखील केले होते. त्यावेळी आठ दिवसात पेमेंट करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले होते. आठ दिवसात पेमेंट न मिळाल्यामुळे शनिवारी सुमारे पन्नासावर कंत्राटदारांनी महापौर नंदकुमार घोडेले, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांची भेट घेतली व आपल्या व्यथा पुन्हा एकदा मांडल्या. यावेळी रफिक पालोदकर, बंडू कांबळे, परशुमार पात्रोट, अब्रार पठाण, शेख सलीम मोईनोद्दीन, मिश्ताक सिद्दिकी, बबन हिवाळे, फईम सिद्दिकी, बाळू गायकवाड, शेख मुर्तझा यांच्यासह अन्य कंत्राटदार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलिक हत्याप्रकरण; चौथा आरोपी अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीचा धक्का लागल्यावरून केलेल्या सुनील मंडलिक खूनप्रकरणी चौथ्या आरोपीला पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. नरेश उर्फ झेल्या गणेश पवार (वय ३२, रा. जोगेश्वरवाडी तांडा, ह. मु. भानुदासनगर) असे आरोपीचे नाव आहे.

खुनातील तिसरा आरोपी प्रतीक उर्फ बिट्टू सुभाष आडे (वय २२, रा. गारखेडा परिसर) याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. स्वामी समर्थ मंदिराच्या कमानीसमोर दुचाकीला धक्का लागल्यावरून झालेल्या वादात चौघांनी सुनील व संदीप यांना बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी सुनीलचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यावरुन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर चौघेही फरार झाले होते. त्यातील मनोज जाधव आणि शेख जावेद उर्फ टिपू मकसुद शेख यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छाजेड हल्लाप्रकरण; आरोपी सापडेनात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्योगपती पारस छाजेड यांच्या पत्नी, नातवावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे गूढ वाढले असून, तीन दिवस होऊनही पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला नाही.

छाजेड यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच त्यांच्या घरी वरिष्ठ पोलिस अधिकारी व नातेवाईकांची रिघ लागली आहे. छाजेड यांच्यावर व्यावसायिक वादातून हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, छाजेड यांच्या निकटवर्तीयांकडून त्यास दुजोरा दिला नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, छाजेड यांच्या घरी हल्ला झाला. त्यावेळी घरात नेमके काय घडले, याची देखील माहिती पोलिसांना दिली जात नसल्याने छाजेड कुटुंबियांवरच पोलिसांचा संशय वाढला आहे. उद्योगपती छाजेड यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरास पकडण्यासाठी जिन्सी पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांकडून छाजेड यांच्या व्यवसायाशी संबधित असणाऱ्या लोकांची आणि नातेवाईकांची देखील चौकशी केली जाणार असल्याचे जिन्सी पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच पोलिसांनी आसपासच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांना जास्त पैसे का हवे होते?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहतूक पोलिसांनी थांबवले तेव्हा बाबूराव चौधरी यांच्या खिशात तीन हजार रुपये होते. मात्र, तरीही त्यांनी मित्राला फोन का केला? त्यांच्यावर वाहतूक पोलिस कोणती कलमे लावणार होते. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मृत बाबूराव चौधरी यांच्या नातेवाईकांनी शनिवारी पोलिस उपायुक्त दीपाली घाटे-घाडगे यांना भेटून केली.

बाबूराव रामदास चौधरी हे ३१ जानेवारी रोजी सिडको बसस्थानक येथून मुकुंदवाडीकडे जात होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान ए.पी.आय. कॉर्नर चौक येथे वाहतूक पोलिसांनी त्यांना अडविले. त्यांची चारचाकी एसटी वर्कशॉप येथेही नेली. सायंकाळी सहाच्या दरम्यान बाबूराव चौधरी यांनी त्यांचे मित्र रमेश राजमन चौधरी यांना फोन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता रमेश चौधरी यांनी फोन केला असता पोलिसांनी बाबूराव रामदास चौधरी यांना धूत हॉस्पिटलमध्ये दाखल असून, त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या गैरवर्तवणुकीमूळे चौधरी यांना ह्रदय विकाराचा झटका आला. ते हिंदी भाषिक असल्याने त्यांच्यासोबत पोलिसांनी खालची भाषा वापरली. वाहतूक पोलिसांनी त्यांना सोडण्यासाठी जास्तीचे पैसे मागितले, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी पोलिस उपायुक्त दीपाली धाटे-घाटगे यांच्याशी भेटीत केला आहे. या प्रकरणात कितीची पावती मृत बाबूराव चौधरी यांना देण्या येणार होती, याचा खुलासा वाहतूक नातेवाईकांनी पोलिसांकडे मागितला आहे. पोलिस उपायुक्तांशी घेतलेल्या भेटीत रवी चौधरी, विजय चौधरी, शत्रुघ्न चौधरी, अवधेश चौधरी, भगवान चौधरी, अवधेस चौधरी, मनोज चौधरी, कपुरचंद चौधरी, विनोद चौधरी यांची उपस्थिती होती.

\Bपोलिसांच्या गैरवर्तवणुकीमुळे मृत्यू?

\Bवाहतूक पोलिसांच्या गैरवर्तवणुकीमूळे चौधरी यांना ह्रदय विकाराचा झटका आला. ते हिंदी भाषिक असल्याने त्यांच्यासोबत पोलिसांनी खालची भाषा वापरली. वाहतूक पोलिसांनी त्यांना सोडण्यासाठी जास्तीचे पैसे मागितले, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी पोलिस उपायुक्त दीपाली धाटे-घाटगे यांच्याशी बोलताना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन रोस्टर पद्धतीला विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यापीठ स्तरावरील भरतीसाठी लागू करण्यात आलेले '१३ पॉइंट रोस्टर' पद्धती आरक्षणाची गळचेपी करणारी आहे. नवीन प्रणाली रद्द करून जुनी लागू करावी अशी मागणी करीत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने निषेध केला. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना शनिवारी निवेदन देण्यात आले.

विद्यापीठात प्राध्यापक व सहायक प्राध्यापक यांच्या नियुक्तीसाठी नवीन २०० पॉइंट प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्व विद्यापीठात हजारो जागा रिक्त आहेत. नवीन प्रणालीनुसार एका विभागात तीन किंवा जास्तीत जास्त चार जागा निघणार आहेत. तसेच एस. सी. व एस. टी. आरक्षण लागू होणार नाही. निम्म्या जागा राखीव ठेवण्याची गरज होती. नवीन प्रणालीमुळे बहुजनांचा एकही प्राध्यापक विद्यापीठात राहणार नाही. शासनाने जुनी बिंदूनामावली पदस्थापना पद्धती लागू करावी, अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने केली. यावेळी सोनाली म्हस्के, अमोल खरात, प्रवीण चिंतोरे, बळीराम पाइकराव, निशिकांत कांबळे, गंगाधर गायकवाड, रवी गाडेकर, पवन म्हस्के आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॉलेज ऑडिट’वर प्रश्नचिन्ह

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यांकन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया सुरू असली तरी मूल्यांकनाचे २० हजार रुपये शुल्क रद्द करण्याची मागणी प्राचार्यांनी केली आहे. त्यामुळे प्र-कुलगुरूंनी उत्साहाने हाती घेतलेले 'कॉलेज ऑडिट' प्रभावीपणे होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांच्या 'शैक्षणिक मूल्यांकना'ची प्रक्रिया सुरू केली आहे. संलग्नित ४१७ महाविद्यालयांना पाच फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची सूचना केली आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांच्या संख्येची सरासरी निश्चित करून मूल्यांकन होणार आहे. या प्रक्रियेसाठी महाविद्यालयांना २० हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. शुल्क भरण्यास अनेक महाविद्यालयांनी नकार दिला आहे. याबाबत गुरुवारी काही प्राचार्यांनी अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांची भेट घेऊन चर्चा केली. ही प्रक्रिया रास्त असली तरी शुल्क अधिक आहे असा मुद्दा प्राचार्यांनी उपस्थित केला. कॉलेज ऑडिटचे शुल्क रद्द करण्याबाबत फारुकी यांना निवेदन देण्यात आले. नॅकनंतर विद्यापीठ पातळीवर पहिल्यांदाच कॉलेज ऑडिट करण्यात येत आहे. मात्र, महाविद्यालयांची भूमिका लक्षात घेता ऑडिट सुरळीत होण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयांच्या आर्थिक उलाढाल लक्षात घेता २० हजार रुपये शुल्क नाममात्र आहे. तरीसुद्धा महाविद्यालये अडवणूक करणार असल्यास प्रशासकीय पातळीवर कडक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

\Bवेळापत्रक जाहीर होणार

\Bमूल्यांकनाच्या पहिल्या टप्प्यात ३० टक्के महाविद्यालयांचे मूल्यांकन होणार आहे. आगामी दोन वर्षांत सर्व महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्याचे नियोजन आहे. येत्या ११ फेब्रुवारीला मूल्यांकनासाठी निवडलेल्या महाविद्यालयांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता तपासताना विद्यार्थ्यांची उपस्थिती, नियमित तासिका, निकषानुसार पात्र कर्मचारी, कायम नेमणूक असलेले प्राध्यापक, ग्रंथ देवघेव प्रमाण, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, किमान कौशल्य विकास कार्यक्रम अशा मुद्द्यांचा विचार होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरळे बंधू यांचा जामीन मंजूर

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात शस्त्र बाळगल्यासंबंधी अटकेत असलेला अजिंक्य सुरळे आणि शुभम सुरळे यांचा हत्याप्रकरणी संबंध नसल्याचे पत्र सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केले. त्या दोघांचा प्रत्येकी ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने प्रथम सचिन अंदुरे याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अंदुरे याने लपविण्यासाठी दिलेली शस्त्रे ही शुभम व अजिंक्य सुरळे यांच्याकडे दिले असल्याचे सांगितल्यामुळे सीबीआयच्या पथकाने सुरळे बंधूंना ताब्यात घेतले. सीबीआयचे उपअधीक्षक मारुती शंकर पाटील यांच्या तक्रारीवरून २२ ऑगस्ट २०१८ रोजी सुरळे बंधूविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम आणि अजिंक्य हे दोघ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा सीबीआयने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्या दोघांचा नियमित जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या निर्णयाविरोधात त्या दोघांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान सीबीआयच्या वतीने त्या दोघांचा दाभोळकर खून खटल्याशी काही संबध नसल्याचे पत्र खंडपीठात दिले. हे पत्र खंडपीठात प्राप्त झाल्यानंतर त्या दोघांचा प्रत्येक ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. महिन्याच्या प्रत्येक सोमवारी संबधित पोलिस ठाण्यात हजेरी द्यावी, तपासामध्ये हस्तक्षेप करू नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये, अशा अटी घालण्यात आहेत. सुरळे बंधूंची बाजू सुरेश कुलकर्णी व बलराज कुलकर्णी यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपोस्ट पिटवर कचऱ्याचे डोंगर

0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

कचराकोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या कोट्यवधींच्या निधीची महापालिकेकडून अक्षरश: नासाडी सुरू आहे. जागोजागी उभारलेल्या कंपोस्ट पिटवरच आता कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागून झाली, कचराकोंडीची वर्षपूर्ती (१६ फेब्रुवारी) फक्त तेरा दिवसांवर आली, तरीसुद्धा सत्ताधारी आणि प्रशासन मात्र हा प्रश्न गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.

नारेगाव डेपोत कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध केल्यामुळे निर्माण झालेल्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत विविध पर्याय तपासले. मात्र, अद्याप अपेक्षित यश मिळाले नाही. कोंडीच्या अगदी सुरुवातीच्या काळात ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी कंपोस्ट पिट बांधण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी पालिकेने सुमारे साडेतीन कोटी खर्च केले. मध्यवर्ती जकात नाका, मजनू हिल परिसर, सिडको एन १२, शहागंज भाजी मंडई, औरंगपुरा भाजी मंडई, पडेगाव येथील प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेसह अन्य ठिकाणी पिटचे बांधकाम केले.

या सगळ्या कंपोस्ट पिटचा बोजवारा उडाला आहे.

मध्यवर्ती जकात नाका परिसरात बांधलेले पिट पूर्णपणे पडले आहेत. भिंती ढासळल्या असून, बांधकामासाठी वापरलेल्या विटा उघड्या पडल्या आहेत. पिटमध्ये कचरा साचवणे व त्यावर प्रक्रिया करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर पिट शेजारीच खुल्या जागेवर कचऱ्याचे डोंगर उभारण्यात आले आहेत. हे डोंगर रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरेस पडू नयेत म्हणून पत्रे लावून हा परिसर झाकून टाकला आहे. येथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही. ओला-सुका कचऱ्यात मृत प्राण्यांचे अवशेष देखील आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरात मोठमोठी हिरवीगार झाडे होती. ती कचऱ्याच्या डोंगरामुळे जळून गेली आहेत.

ऐतिहासिक मजनू हिलच्या परिसरात तटबंदीच्या आडोसा घेऊन केलेले कंपोस्ट पिटचे बांधकाम पूर्णपणे उखडले आहे. पिटवर टाकलेले काही पत्रे चोरीला गेले असून, शिल्लक राहिलेले पत्र वापरा योग्य नाहीत. मजनू हिल आणि तटबंदीच्या परिसरात कचरा अस्ताव्यस्तपणे टाकण्यात आला आहे. त्यामुळे या संपर्क परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. मुख्य रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्यांचा त्रास आणि कचऱ्याची दुर्गंधी सहन करावी लागत आहे. सिडको एन १२ भागात सत्यविष्णू रुग्णालयासमोरच्या बाजूला डॉ. सलीम अली सरोवराला लागून कंपोस्ट पिटचे बांधकाम केले आहे. या ठिकाणी पिटच्या भिंतीच गायब आहेत. फक्त शेड तेवढे बाकी आहेत. या ठिकाणी देखील कचऱ्याचे ढीग पाहण्यास मिळतात. कचऱ्यावर प्रक्रिया होतच नाही, अशी माहिती या ठिकाणी भेटेलल्या नागरिकांनी दिली. साचलेल्या कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांबरोबरच जनावरांचाही मुक्त संचार या परिसरात वाढला आहे. मुख्य रस्त्यापासून काही फुटाच्या अंतरावर तुटलेले पिट, साचलेला कचरा आणि कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा हैदोस असे चित्र पाहण्यास मिळते. शहागंज भाजी मंडईतील पिटचा मागमूस राहिलेला नाही, अशीच स्थिती औरंगपुरा भाजी मंडईच्या परिसरातील पिटची तिच अवस्था आहे. कोट्यवधी खर्चून बांधलेल्या पिटचा काहीच उपयोग होत नसल्यामुळे महापालिकेने हा पैसा का खर्च केला, असा प्रश्न निर्माण होत आहे.

---

\Bकंपोस्ट पिट बांधकामाचे अंदाजपत्रक

\B---

झोन क्रमांक - अंदाजपत्रक (रुपयांमध्ये) - प्रस्तावित पिट

१ ४२४७५५० ५८

२ १९०६७४४ १५

३ ९०६२९०३ ७९

४ ४३७८८०० ४१

५ ३९११७७१ ०१

६ ९८५५८३७ ४५

७ ५३५१५७० ९८

८ ४९४१०१९ १८

९ ५१०३७२१ ७८

---

एकूण ४८७५९९१५ ४३३

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांसाठी क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्स्पो सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी खास पोलिस आयुक्तालयाच्या मैदानावर शनिवारी दोन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पोला सुरुवात झाली. या एक्स्पोमध्ये अनेकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पोलिस कल्याण कार्यक्रमांतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाई संस्थेचे सहकार्य लाभले असून, शहर आणि परिसरातील जवळपास ३००प्रकल्पामधील वाजवी भावात असलेली हजारो घरे, फ्लॅट, रो हाऊस, आदीची माहिती या एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष पोलिस उप महानिरीक्षक प्रकाश मुतयाल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस उपायुक्त दीपाली घाटगे, क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, नरेंद्रसिंग जबिंदा, क्रेडाई औरंगाबादचे अध्यक्ष रवी वट्टमवार, नितीन बगाडिया, रमेश नागपाल, संग्राम पटारे, विकास चौधरी, गोपेश यादव, बालाजी येरावार आदी उपस्थित होते. प्रदर्शनामध्ये बांधकाम व्यावसायिकाचे २५ दालने असून, प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक सवलतीही जाहीर केल्या आहेत. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनास पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह भेट देत गृहप्रकल्पाची माहिती जाणून घेतली.

\Bआज समारोप

\Bअनेकांनी घरासाठी पसंती दिली असून चांगला प्रतिसाद असल्याचे रवी वट्टमवार यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. एक्स्पो यशस्वी होण्यासाठी वट्टमवार यांच्यासह सचिव आशुतोष नावंदर, नीलेश अग्रवाल, संदेश झांबड, गौरव मालपाणी आदी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आज प्रदर्शनाचा समारोप असून पोलिस आयुक्तालय, ग्रामीण विभागील पोलिस अधिकारी, कर्मचारी, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्त वार्ता, नागरी हक्क संरक्षण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य राखीव पोलिस बल, एटीएस तसेच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय शिक्षण संचालकपदी डॉ. लहाने

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. प्रवीण शिनगारे हे ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे एक फेब्रुवारी रोजी रिक्त होणाऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. लहाने यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत सोपविण्यात आल्याचे पत्र उपसचिव संजय कमलाकर यांनी दोन फेब्रुवारी रोजी काढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोंदी घेण्यातच संपली बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पहिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकाही मुद्द्यावर परिपूर्ण चर्चा झाली नाही. नोंद घेतो, कानावर घालतो अशा सूचना देत शिंदे यांनी जुजबी चर्चा करीत बैठक संपवली. काही आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर 'आपल्याला दुसरे सभागृह आहे' असे सांगत शिंदे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियेाजन समितीची बैठक झाली. बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांवर शिंदे यांनी माहिती दिली. 'विविध योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी बँकांमध्ये कर्ज प्रस्ताव दाखल केले आहेत. तत्काळ कार्यवाही करून ३१ मार्चपूर्वी प्रस्ताव मार्गी लावावे. विभागीय व्यवस्थापकांनी नोंद घ्यावी. महावितरणच्या कार्यपद्धतीवरील आक्षेपांवर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यापूर्वी आमदारांची बैठक घेण्यात येईल. जनतेला सुलभ पद्धतीने वीज मिळण्यासाठी महावितरणने जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीचा वापर करावा' असे शिंदे यांनी सांगितले. घाटी रुग्णालयाच्या समस्यांवर आमदार इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित केला. घाटी आणि दंत रुग्णालयाचे काम निधीअभावी अर्धवट आहे. ही कामे कधी पूर्ण होणार ? तसेच मर्च्युरी इमारतीच्या बांधकामाची चौकशी करावी. या ठिकाणी ठराविक ठेकेदार वारंवार काम कसे करता असा प्रश्न जलील यांनी विचारला. घाटीच्या अधिष्ठातांशी चर्चा केली असून मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.

पाणचक्की आणि बीबी-का-मकबरा परिसरातील जुन्या दरवाज्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. पर्यायी रस्ता दिल्यास समस्या दूर होतील असे जलील यांनी सांगितले. याबाबत गुरुवारपर्यंत प्रस्ताव सादर करा, अशी सूचना शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. शाळाबाह्य मुलांसाठी दहा नवीन वसतिगृहे तयार केली आहेत. त्यामुळे दोन हजार मुले स्थलांतरीत होण्यापासून वाचली असे पवनीत कौर यांनी सांगितले. याबाबत जिल्हा परिषदेच्या वतीने तयार केलेल्या व्हिडिओचे सादरीकरण करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परिपूर्ण चर्चा अपेक्षित होती. पण, जुजबी चर्चेवरच जिल्हा नियोजन समितीची बैठक संपली. प्रत्येक प्रश्नावर नोंद घेतो, संबंधित मंत्र्यांशी बोलतो असे उत्तर शिंदे यांनी दिले. त्यामुळे नंतर प्रश्नांचा ओघ कमी झाला.

\Bनिधीचे नियोजन

\B२०१९-२० च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेकरिता २५८ कोटीच्या वित्तीय मर्यादेत आराखडा तयार करण्याबाबत शासनाकडून सूचना होत्या. शासनाच्या सूचनांनुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी १५ टक्के, नावीन्यपूर्ण योजनेकरिता ३.५० टक्के, मूल्यमापन, संनियंत्रण व डेटा एन्ट्री आणि जिल्हा नावीन्यता परिषदेकरीता निधीची तरतूद आहे. वृक्षक्रांती अभियानांतर्गत जिल्ह्याने ९६ लाख झाडे लावून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे २५ कोटी रुपये अधिक निधीची मागणी करण्यात आली आहे.

\Bसमृद्धीचे काम मार्गी

\Bसमृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कामाचे उदघाटन करण्यात येईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. भूसंपादन, निधी, कामाचा आराखडा, आचारसंहिता या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य टाळले. त्यामुळे समृद्धीचे उदघाटन होण्याबाबत साशंकता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशाला मारहाण; तृतीय पंथीयांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अजमेर शरीफ ते हैदराबाद रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला शनिवारी (दोन फेब्रुवारी) पूर्णा येथे रात्री दहाच्या सुमारास मारहाण करत लुटल्याप्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी सूरज अजय गायकवाड उर्फ रोशनी जया बाकस व शौर्य प्रकाश जाधव उर्फ प्रज्ञा जया बकास या तृतीय पंथीय आरोपींना रविवारी अटक करून कोर्टात हजर केले. या दोघांना मंगळवारपर्यंत (पाच फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी दिले.

या प्रकरणी महोम्मद रहमत अली मोहम्मद साहेब (वय २६, रा. टोळी चौकी, हैदराबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादी एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मित्र गौस चाँद शेख (वय ३५, रा. हैदराबाद) यांच्यासह जयपूर-हैदराबाद एक्स्प्रेसने अजमेर शरीफ ते हैदराबाद, असा प्रवास करीत होते. दोन फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास पूर्णा येथून रेल्वे निघाली असता त्यात सूरज अजय गायकवाड उर्फ रोशनी जया बाकस (वय २०, रा. लालवाडी, काडकपुरा नांदेड) व शौर्य प्रकाश जाधव उर्फ प्रज्ञा जया बकास (वय २४, रा. एमआयडीसी वाळूज) हे तृतीय पंथीय शिरले. त्यांनी फिर्यादीला पैसे मागितले असता दहा रुपये दिले. मात्र तृतीय पंथीयांनी २० रुपयांची मागणी करत फिर्यादीच्या गालाला बोचकारले व त्यांच्या खिशातील पाकिटातील ७२० रुपये, आधार कार्ड काढून घेतले. फिर्यादीने त्यांना पैसे व आधारकार्ड मागितले असता, आरोपींनी फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी व बेल्टने मारहाण केली. या प्रकरणात नांदेड रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोघांना रविवारी अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणी सहायक सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधू-संत हे समाजाचे शिक्षक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'साधू-संत, महात्म्यांनी समाजाला पूर्वीपासून समतेचा विचार दिला आहे. सर्व संतांनी भेदभाव पाळणे चुकीचे असल्याची शिकवण दिली. आईने बाळाला चालविण्यास शिकवावे, त्याप्रमाणे साधू-संत समाज शिक्षणाचे काम करत आहेत. संत हे समाजाचे शिक्षक आहेत,' असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल कमिटी, नवी दिल्ली व लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जगतगुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात संत गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, मौलाना मोईनोद्दीन फारुखी, आनंद चैतन्य महाराज भांमरवाडी, स्वामी रामेश्वर सरस्वती, संत निरंकारी संप्रदाय डी. जी. दळवी, भाई खडक सिंहजी महाराज, भदन्त नामदेव महाथेरो, संतोष मुनी कपाटे यांच्यासह अरिहंत महाराजांचे प्रतिनिधी मनोज सावजी यांचा सत्कार विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री गंगाधर गाडे, सूर्यकांता गाडे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच मिलिंद पाटील यांच्या आई निर्मला पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी श्रीमंत कोकाटे म्हणाले की, साधू-संत हे समाजात समता प्रस्थापित करणे व अंधश्रद्धा निर्मूलनाने काम ७०० ते ८०० वर्षांपासून करत आहेत. देशाच्या संविधानात हा साधू-संताचा विचार प्रवाहित झाला आहे. साधू-संतांनी मानवतेचा विचार दिला आहे. या मानवतेच्या विचारांची आज गरज आहे. देशातील वाढलेली असहिष्णूता कमी करण्यासाठी सर्व संप्रदायाच्या साधू-संतांना एकत्र आणून मानवतेचा विचार रुजविण्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले.

ग्रामसेवकालाही असं पदावरून हटविले नसेल

सध्याच्या राजकीय व्यवस्थेबाबत बोलताना कोकाटे म्हणाले की, 'सीबीआय'प्रमुखाला रात्री दीड वाजता व्हॉटसअॅपवरून पत्र पाठवून हटविण्यात आले. अशी कारवाई ग्रामसेवकासोबतही कधी झाली नाही. 'आरबीआय'च्या गर्व्हनरपदी इतिहास अभ्यासक नेमला आहे. म्हणजे 'आरबीआय'आगामी काळात इतिहास जमा होणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थिती केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडीतून ३५ हजारांची चोरी, आरोपीला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झोपडीत शिरून टेबलावरील ३५ हजार रुपयांची बॅग चोरीप्रकरणात आरोपी दत्ता त्रिबंक भाईंद (वय २८, मूळ रा. मुटाळ फाटा, ता. भोकरदन, जि. जालना, ह.मु. एमआयडीसी चिकलठाणा) याला रविवारी (तीन फेब्रुवारी) अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. त्याला मंगळवारपर्यंत (पाच फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहंमद यांनी दिले.

या प्रकरणी ललन सुदेश भारती (वय ४६, रा. विजय नेट फोम कंपनी, एमआयडीसी चिकलठाणा) यांनी फिर्याद दिली होती. ते विजय फोम कंपनीत नोकरीस असून कंपनीच्या मोकळ्या जागेतील झोपडीत कुटुंबासह राहतात. १२ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी त्यांनी कामावर जाण्यापूर्वी त्याचे व त्याच्या दोन मुलांच्या वेतनाचे सुमारे ३५ हजार रुपये काळ्या हॅण्डबॅगमध्ये ठेवले होते. ती बॅग झोपडीतील टेबलावर ठेवली होती. त्याच रात्री बॅगची चोरी झाली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी दत्ता त्रिबंक भाईंद याला रविवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी सहायक सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील भालगाव परिसरातील शेतात मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना रविवारी (तीन फेब्रुवारी) घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये चंद्रभान दामोदर शिंदे (वय ९०) व नर्मदाबाई तात्या रोहिंज (वय ५५, दोघे रा. भालगाव) यांचा समावेश आहे. उपचारानंतर नर्मदाबाईंना सुटी देण्यात आली, तर चंद्रभान शिंदे यांच्यावर वॉर्ड क्रमांक १४ मध्ये उपचार सुरू आहेत, असे घाटी रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images