Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वाळूज महानगरात चोरी; लाखोचा ऐवज लंपास

$
0
0

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील साई रेजन्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यानी कडी कोयंडा तोडून कपाटातील दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी (सात जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे़

येथील साई रेजन्सी अपार्टमेटच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे स्वप्निल कुलकर्णी कंपनीत गेले होते. त्यांची पत्नी व आई नातेवाईकाना भेटण्यासाठी बाहेर गेल्या होत्या़ घराला कुलूप लावलेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील कपाटातून गंठण, गळयातील सोन्याची पोत, सोन साखळी, कानातील झुंबर असे दहा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले़ त्याची किमंत जवळपास साडेतीन लाख रुपये असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली़

पत्नी आणि आई नातेवाईकांना भेटून चारच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना कडी कोंयडा तुटलेला दिसून आला ही माहिती त्यांनी स्वप्निल कुलकर्णी यांना दिली़ त्यांनी घरी येऊन पाहणी केल्यानंतर चोरीची माहिती पोलिसांना दिली़ माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय घेरडे, डीबी पथकप्रमुख, पोलिस उपनिरीक्षक राहुल रोडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल वसंत शेळके, बंडू गोर, राजकुमार सूर्यवंशी, शैलेद्र आडियाल, फिरोज तडवी, दीपक मते यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली़

भरदिवसा चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ या सोसायटीमधील महिला व मुले प्रांगणात खेळत होते़ चोर अपार्टमेंटची माहिती असणारा किंवा ओळखीचा असावा, अशी चर्चा घटनास्थळी नागरिकांमध्ये होती़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चुलते-पुतण्याचा गाळाखाली दाबून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

शेतात गाळ टाकण्याचे काम सुरू असताना काका-पुतणे गाळाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने मरण पावले. ही घटना केज तालुक्यातील भाटुंबा येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी टिप्पर चालकाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सर्जेराव बबन धपाटे व बंटी हरिदास धपाटे असे मृत चुलत्या-पुतण्याची नावे आहेत. भाटुंबा येथील सर्जेराव धपाटे यांच्या शेतामध्ये तळ्यातील गाळ टाकला जात होता. टिप्परद्वारे (क्रमांक एम.एच.४२ टी ०८७०) तळ्यातून माती आणण्याचे काम सुरू होते. बुधवारी रात्री दहाच्या सुमरास टिप्पर गाळ आणण्यासाठी गेले होते. टिप्पर गाळ भरून येईपर्यंत सर्जेराव धपाटे व त्यांचा पुतण्या बंटी हरिदास धपाटे हे दोघेजण शेतातच झोपी गेले. टिप्पर चालक गाळ घेवून आल्यानंतर त्याने काका-पुतणे कुठे आहेत. हे न पाहताच टिप्परमधील गाळ ज्याठिकाणी काका आणि पुतण्या झोपले होते त्यांच्या अंगावर ओतून रिकामे केले. गुरुवारी सकाळी सर्जेराव धपाटे आणि बंटी धपाटे घरी आले नाहीत. शेतात पाहणी केली असता ते आढळून न असल्याने माती खाली गाडले गेले असावेत असा कयास गावकऱ्यांनी काढला. जेसीबीद्वारे मातीचे ढिगारा बाजुला केला असता गाळाच्या खाली त्या दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती युसूफ वडगाव पोलिसांनी झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परळी अवैध गर्भपात: डॉ. सुदाम मुंडेला १० वर्ष सक्तमजुरी

$
0
0

बीड:

२०१२ साली राज्यभर गाजलेल्या परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांना जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. पीडितेचा पती महादेव पटेकर यालाही याप्रकरणी दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी ठोठावण्यात आली. मात्र अन्य १० जणांची निर्दोष मुक्तता झाली.

स्त्री भ्रूणहत्या रोखणारा पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार हे तिघेही दोषी ठरले आहेत. भारतीय दंड विधानाच्या ३१२,३१३,३१४,३१५,,तसेच ३१८ एम टी पी ऍक्ट ३,५ कलम नुसार या तिघांना दोषी ठरवत दहा वर्षे शिक्षा व पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आहे. मे २०१२ मध्ये विजयमला पटेकर या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर या रुग्णालयात सुरू असलेला अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धंदा जगासमोर आला होता. दरम्यान, गेली साडेसहा वर्षे सुदाम मुंडे नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात असल्याने तो कालावधी वजा करून उर्वरित शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे. त्याची पत्नी सरस्वती मुंडे जामीनावर बाहेर होती.

धारूर तालुक्यातील महिला विजयमाला पटेकर या महिलेचा १८ मे २०१२ रोजी गर्भपात करीत असताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी परळी येथील डॉ.सुदाम मुंडे व डॉ.सरस्वती मुंडे या दाम्पत्यासह १७ आरोपींविरोधात बीड येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती. ही सुनावणी संपून शुक्रवारी न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. या प्रकरणातल्या १७ आरोपींपैकी चार आरोपी मृत झाले होते तर उर्वरीत दहा आरोपी सबळ पुराव्या अभावी निर्दोष ठरले आहेत.

या प्रकरणी शवविच्छेदन करणारे डॉक्टर, पोलीस निरीक्षक गाडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वाती भोर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉक्टर गौरी राठोड तसेच जळगाव येथील वैद्यकीय अधिकारी शासकीय पंच यांची साक्ष गुन्हा शाबूत करण्यास महत्वाची ठरली. तिन्ही दोषींना एकूण साडेचार लाख दंड ठोठावला असून तो मृत विजयमाला पटेकर हिच्या चार अनाथ मुलींच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचे आदेश ही न्यायालयाने दिले

दया दाखवावी... मुंडे दाम्पत्याची मागणी

याप्रकरणी डॉक्टर मुंडे दाम्पत्याने आमचे वय खूप आहे, आम्ही आजारी आहोत, वरिष्ठ नागरिक असल्याने न्यायालयाने निकाल देताता दया दाखवावी व शिक्षा कमी करावी असा युक्तिवाद केला. मात्र सरकारी पक्षाने असा युक्तीवाद केला की, 'तुम्ही तुमच्या कृत्याने चार लहान मुलींना अनाथ केले. मातृछत्र हिरावून घेतले. वयोमानाच्या नावाखाली हे दया मागत असतील तर असे चुकीचे कृत्यही करू शकत नाहीत. गर्भपात करण्याची परवानगी नसताना डॉक्टर मुंडे यांनी दवाखान्यात दहा बेडची परवानगी असताना ६० रुम आणि १२० बेड सुरू ठेवले. परवानगी नसताना एमटीपी कायद्यानुसार गर्भपात करण्याची परवानगी नसताना गर्भपात केले. त्यामुळे त्यांना खरे तर आणखी कठोर शिक्षा द्यायला हवी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहागंजला अतिक्रमणाचा विळखा कायम

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या मे महिन्यात शहागंज येथील फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर येथील अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा अतिक्रमणांनी तसेच हातगाडीधारकांनी शहागंज भागाला विळखा घातला आहे. पोलिस आणि मनपा प्रशासनाचे या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असून यामुळे पुन्हा वाद भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहागंज चमन ते शहागंज जुने एसटी बसस्टँड या भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच फळविक्रेते तसेच इतर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यकालात हे अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यात आले होते. त्यांची बदली झाल्यानंतर या अतिक्रमणांनी पुन्हा ठाण मांडले. हे अतिक्रमण हटविण्याची राजाबाजार प्रभागाच्या नगरसेविका यशश्री बाखरीया यांनी सातत्याने मागणी केली आहे. मे २०१८ अतिक्रमणधारक फेरीवाले आणि स्थानिक नागरिक यांच्यात वाद होऊन हाणामाऱ्या झाल्या होत्या. सिटीचौक पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. ११ मे २०१८ रोजी नवाबपुरा भागात दोन गटात दंगल झाली होती. या दंगलीच्या मागे शहागंज येथील अतिक्रमणधारकांचा वाद असल्याचे देखील एक कारण असल्याचे समोर आले होते. यानंतर येथील अतिक्रमण काही काळापुरते हटविण्यात आले होते. सध्या शहागंज भागात फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे.

वाहनधारकांना अडचण

फळविक्रेते तसेच फेरीवाले अतिक्रमण करताना रस्त्याच्या मध्यभागी गाड्या उभ्या करतात. त्यामुळे या भागात पूर्ण रस्ता जाम होऊन जातो. दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनांना येथून वाहन नेताना कसरत करावी लागते. या फेरीवाल्यांना काही बोलल्यास फेरीवाले एकत्र येऊन वाहनधारकांनाच दमदाटी करतात.

शहागंज येथील अतिक्रमण पुन्हा वाढले आहे. येथील फेरीवाल्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. पोलिस आणि मनपा प्रशासनाला वारंवार सांगूनही या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अतिक्रमणामुळे रस्ता जाम होत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

लक्ष्मीनारायण बाखरिया, समाजसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रूरकर्मा डॉ. मुंडे दाम्पत्याला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

देशभरात गाजलेल्या स्त्री भ्रूण हत्याप्रकरणी बीड येथील जिल्हा न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे, त्याची पत्नी डॉ. सरवस्ती मुंडे, मृत विजयमाला पटेकर यांचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवत दहा वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी ठोठावली. या प्रकरणी एकूण १७ आरोपी होते. त्यातील चारजण मृत झाले असून, उर्वरित दहा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.

धारूर तालुक्यातील विजयमाला पटेकर या महिलेचा १८ मे २०१२ रोजी गर्भपात करीत असताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी परळी येथील डॉ. सुदाम मुंडे व त्याची पत्नी डॉ. सरस्वती मुंडेसह १७ आरोपींविरोधात बीड येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती. शुक्रवारी न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. आज झालेल्या सुनावणीत डॉ. मुंडे दाम्पत्याने आमचे वय खूप झाले आहे. आम्ही सतत आजारी आहोत. ज्येष्ठ नागरिक असल्याने न्यायालयाने निकाल देताना दया दाखवावी व शिक्षा कमी करावी असा युक्तिवाद केला. मात्र, सरकारी पक्षाने चार लहान मुलींना यांच्या कृतीने अनाथ केले. त्यांचे मातृछत्र हिरावून घेतले. जेष्ठ नागरिक नावाखाली हे दया मागत असतील तर ते असे चुकीचे कृत्य करू शकत नाहीत. गर्भपात करण्याची परवानगी नसताना डॉ. मुंडे यांने दवाखान्यात दहा बेडची परवानगी असताना ६० रूम आणि १२० बेड सुरू ठेवले. परवानगी नसताना 'एमटीपी' कायद्यानुसार गर्भपात करण्याची परवानगी नसताना गर्भपात केल्याने जास्त शिक्षा करण्याची मागणी केली. या प्रकरणी महत्वाची साक्ष शवविच्छेदन करणारे डॉक्टर, पोलिस निरीक्षक गाडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वाती भोर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर गौरी राठोड तसेच जळगाव येथील वैद्यकीय अधिकारी, शासकीय पंच यांच्या साक्षी गुन्हा शाबूत करण्यास महत्वाच्या ठरल्या.

\Bपटेकर फरार

\Bस्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी डॉ. मुंडे दाम्पत्य, महादेव पटेकर यांना न्यायाल्याने भारतीय दंड विधानाच्या ३१२, ३१३, ३१४, ३१५ तसेच ३१८ एमटीपी अॅक्ट ३, ५ कलम नुसार या तिघांना दोषी ठरवत दहा वर्षे शिक्षा व पन्नास हजार रुपये दंडासह एकूण साडेचार लाखांचा दंड ठोठावला. ही रक्कम मृत विजयमाला पटेकर यांच्या चार अनाथ मुलींच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे महिलेचा पती महादेव पटेकर हा फरार आहे.

\Bनातेवाईक झाले फितूर

\Bस्त्री भ्रूण हत्या प्रकरणात तीन मुख्य आरोपींना शिक्षा झाल्याने मृत विजयमाला पटेकर यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे, अशी भावना सरकारी वकील मिलिंद वाघिरकर यांनी व्यक्त केली. याप्रकरणी मृत विजयमाला पटेकर हिचे नातेवाईक फितूर झाले. अंगणवाडी कार्यकर्ती व नातलग मंगल शिंदे हिने माझी भावजय विजयमाला ही गर्भवती होती हे आपणास माहीत नाही. आदल्या दिवशी बाथरूममध्ये पडल्याने गर्भपात झाला असा जवाब दिला.

\B'लेक लाडकी'चे स्टिंग

\Bपरळी येथे डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयात अवैध गर्भपात, गर्भलिंगनिदान, स्त्री भ्रूण हत्या सुरू असल्याची माहिती 'लेक लाडकी' अभियानाच्या प्रमुख डॉ. वर्षा देशपांडे आणि अॅड शैलजा जाधव यांना मिळाली होती. त्यांनी सातारा येथून बनावट रुग्ण आणला होता. प्रेरणा भिल्लारे नावाच्या गर्भवतीला १९ सप्टेंबर २०१० रोजी मुंडेच्या रुग्णालयात पाठवले होते. तेव्हा डॉ. मुंडेने तिची पाचशे रुपयांमध्ये सोनोग्राफी केली. एका चिठ्ठीवर '१ बी' म्हणजेच गर्भात मुलगा असल्याचा उल्लेख केला होता. हे स्टिंग जाहीर झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली होती.

\Bस्त्री भ्रूण कुत्र्याला टाकायचा\B

डॉ. सुदाम मुंडेने स्त्री भ्रूण नष्ट करण्यासाठी चार कुत्रे पाळल्याचा खळबळजनक प्रकार तपासात समोर आला होता. त्याच्या रुग्णालयात गर्भलिंग चिकित्सा आणि मुलीचा गर्भ पाडण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून रिघ लागत होती. गर्भात स्त्री भ्रूण असल्याचे समजल्यानंतर डॉ. मुंडे रुग्णालयात गर्भपात करायचा. या स्त्री भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी डॉ. मुंडे याने चार कुत्रे पाळले होते. त्यांना हे अर्भक खायला दिले जायचे. हा प्रकार उघड होताच राज्यभर संतापाची लाट उसळली होती.

डॉ. मुंडेचे स्त्री भ्रूण हत्येचे पहिले प्रकरण आम्हीच उघड केले होते. निकाल लागलेल्या या दुसऱ्या प्रकरणातही आम्ही डॉक्टरला अटक होईपर्यंत रुग्णालयासमोर बोंबमारो आंदोलन केले होते. हे प्रकरणही पैसे देऊन दडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आजचा निकाल हा संपूर्ण राज्यसाठी आशादायी आहे. स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात बीड जिल्हाच आगामी काळात नेतृत्व करेल. बायका गर्भपात करतात. त्यात नवरा, सासरा, सासू सारेच सहभागी असतात. त्यांनाही या प्रकरणाने धडा मिळाला आहे. डॉक्टरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला या प्रकाराने आळा बसेल.

- वर्षा देशपांडे, सदस्य, राष्ट्रीय महिला आयोग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडाप्रकरणी आरोपीला अटक, पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धोंडराई (ता. गेवराई, जि. बीड) व परिसरातील गावांत दरोडा टाकणाऱ्या टोळीतील आरोपी यासीन उर्फ पल्या उर्फ पप्प्या रहेमान चव्हाण याला गुरुवारी (७ फेब्रुवारी) अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (१२ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी दिले.

या प्रकरणी ब्रदिनाथ रामलाल निकम (२५, रा. धोंडराई, ता. गेवराई) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ११ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी शेतात झोपण्यासाठी गेला असता, रात्री साडेअकराच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोर लोखंडी गजांसह आले व त्यांनी फिर्यादीला मारहाण करुन बांधून ठेवले आणि मोबाइल हिसकावून नेला. त्यानंतर आसपासच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेकांना मारहाण करुन दरोडेखोरांनी सुमारे ७० हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. प्रकरणात गेवराई पोलिस ठाण्यात दरोडेखोरांविरुद्ध मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सवद्या व्यंकट उर्फ आळकुट पवार, सोमनाथ उर्फ सोम्या मजल्या भोसले व बटाट्या उर्फ निकम रहेमान चव्हाण या आरोपींना अटक करण्यात आली होती व तिघांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. उर्वरित चार दरोडेखोर अजूनही फरार आहेत. प्रकरणात यासीन उर्फ पल्या उर्फ पप्प्या रहेमान चव्हाण (२५, रा. खंडाळा, ता. पैठण) याला गुरुवारी अटक करुन शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपी घटना घडल्यापासून फरार होता. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीने आणखी दोन गुन्हे केले आहेत. आरोपीच्या फरार साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे बाकी आहे. अटक आरोपीच्या ताब्यातून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व उर्वरित ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती विशेष सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धार्थ उद्यान पार्किंग कंत्राटदाराकडे ३२ लाखांची थकबाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिद्धार्थ उद्यानाच्या पार्किंग कंत्राटदाराकडे दोन वर्षांपासून ३२ लाख रुपये शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले. या कंत्राटदाराकडून थकबाकी दंडासह आठ दिवसांत वसूल करा, अन्यथा कंत्राट रद्द करून नव्याने निविदा काढा, असे आदेश सभापती रेणुकादास वैद्य यांनी दिले.

सिद्धार्थ उद्यानाच्या पार्किंगबद्दल नगरसेवक गजानन बारवाल काही महिन्यांपासून प्रश्न विचारत आहेत, पण त्यांना उत्तर दिले जात नाही. बारवाल यांनी शुक्रवारच्या बैठकीत हा विषय पुन्हा उपस्थित केला. त्यानंतर सभापतींनी उपअभियंता शेख खमर यांना खुलासा करण्यास सांगितले. खमर म्हणाले, सिद्धार्थ उद्यानाचे पार्किंग 'बीओटी' पद्धतीचे आहे. २०१४ मध्ये पार्किंगची निविदा काढली होती. खाजा उस्मानोद्दीन यांची निविदा स्वीकारण्यात आली. प्रतिवर्ष १४ लाख रुपये या दराने त्यांना दहा वर्षांसाठी पार्किंगचे कंत्राट दिलेले आहे. या दराप्रमाणे कंत्राटदाराने तीन वर्षांची रक्कम महापालिकेकडे जमा केली, पण दोन वर्षांपासून रक्कम दिलेली नाही, असे खमर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीची छेडछाड; आरोपीस सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करणारा, प्रेमपत्र पाठवून छेडछाड काढणारा आरोपी राम अशोक झिरपे याला एक वर्ष सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी शुक्रवारी (आठ फेब्रुवारी) ठोठावली.

या प्रकरणी १७ वर्षांच्या पीडित मुलीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, घटनेवेळी संबंधित मुलगी ही इयत्ता बारावीमध्ये शिकत होती; तसेच कॉलेज-क्लासेसमध्ये जाता-येता आरोपी राम अशोक झिरपे (२६, रा. पैठण तालुका, जि. औरंगाबाद) हा मुलीचा पाठलाग करायचा. याबाबत मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितले होते. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपीच्या काकाला बोलावून प्रकार सांगितला होता व छेडछाडीचा प्रकार काही महिन्यांसाठी थांबला होता, मात्र पुन्हा छेडछाडीचा प्रकार सुरू झाला होता. २५ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी साडेसहाला फिर्यादी, तिची आई व वडील घरी बसलेले असताना, आरोपीने एका पाच-सहा वर्षांच्या मुलीच्या हाताने पीडित मुलीला प्रेमपत्र पाठवले होते. ते पत्र मुलीने आई-वडिलांना दाखविल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पैठण पोलिस ठाणे गाठून मुलीने तक्रार दिली होती. त्यावरून भारतीय दंड संहितेच्या ३५४ (अ), ३५४ (ड) तसेच पोक्सो कायद्याच्या १२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bहस्ताक्षरतज्ज्ञांचा अहवाल ठरला महत्त्वाचा

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी नऊ साक्षीदरांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व हस्ताक्षरतज्ज्ञाचा अहवाल; तसेच इतर पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ३५४ (अ) कलमानव्ये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिवा कारावास, ३५४ (ड) कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास, तर 'पोक्सो'च्या १२ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पन्नास तोळे सोने लंपास; दोन आरोपींना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगरातील व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये अवघ्या आठ मिनिटांत फ्लॅट फोडून केलेल्या पन्नास तोळे सोन्याच्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी मेहकर येथे दोघांना बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे ही कारवाई केली. दरम्यान, सीसीटीव्हीत कैद झालेले दोन आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.

व्यंकटेश अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक पाच येथे सुनीता धर्मेंद्र पुराणिक या बँक अधिकारी राहतात. सोमवारी पुराणिक बँकेत गेल्या असता दुपारी दीडच्या सुमारास चष्मा व पांढरा शर्ट, गळ्यात गमछा घातलेल्या चोरट्याने त्यांच्या फ्लॅटचा कडीकोंडा तोडून कपाटातील पन्नास तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग पळवली. त्याचा एक साथीदार दुचाकीवर खाली उभा होता. हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. गुन्हे शाखेची पथके गेल्या चार दिवसांपासून युद्धपातळीवर या गुन्ह्याचा तपास करीत होते. या गुन्ह्यामागे बाराई (ता. मेहकर, जि. बुलढाणा) येथील टोळीचा हात असल्याची माहिती मिळाली. यावरून शुक्रवारी पहाटे टोळीतील संशयित किरण सोपान चव्हाण (वय १९) आणि कर्मा प्रकाश पवार (वय २०, दोघे रा. बाराई, ता. मेहकर) यांना अटक केली. हे दोघे घरफोडी करणाऱ्या मुख्य आरोपींच्या सोबत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतींच्या वॉर्डातही कचरा पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कचरा संकलन आणि वाहतुकीचे खासगीकरण केल्यानंतरही वॉर्डांमध्ये कचरा साचलेलाच आहे. चार दिवसांपासून कचरा उचललेला नाही,' अशा तक्रारी नगरसेवकांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत केल्या. सभापतीही म्हणाले, माझ्या वॉर्डातही कचरा पडून असून संकलनाचे नियोजन योग्य प्रकारे झालेले नाही.

महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला कचरा संकल व वाहतुकीचे दहा वर्षांचे कंत्राट दिले आहे. या कंपनीने तीन जानेवारीपासून काम सुरू केले आहे. पण, कामात अद्याप सुसूत्रता आली नसल्याचे पडसाद बैठकीत उमटले. नगरसेवक गजानन बारवाल यांनी हा मुद्दा मांडला. 'चार दिवसांपासून वॉर्डातील कचरा उचलला नसून पूर्वी पाच वाहने वॉर्डात यायची आता तीन येतात. त्यापैकी दोन वाहनेच सुरू आहेत. कंपनी 'डीपीआर'नुसार काम करीत नाही,' अशी तक्रार त्यांनी केली. नगरसेविका शिल्पाराणी वाडकर म्हणाल्या, चार दिवसांपासून वॉर्डातील कचरा उचललेला नाही, पूर्वी चार येत होती, आता दोनच वाहने चालवली जात आहेत. सभापती रेणुकादास वैद्य यांनीही त्यांच्या वॉर्डात हीच स्थिती असल्याचे सांगितले. सभापतींच्या निर्देशानंतर घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना स्पष्टीकरण दिले. भोंबे म्हणाले, कंपनीमार्फत सध्या तीन प्रभागात काम सुरू असून ते सुरळीत होण्यासाठी थोडा अवधी लागेल. नियोजनानुसार काम व पूर्ण क्षमतेने वाहने सुरू होण्यासाठी कंपनीने थोडा वेळ मागितला आहे. योग्य प्रकारे काम न केल्यास दंडाची तरतूद आहे. त्यामुळे दंड देखील आकारला जाईल.

कचरा संकलन व वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे करा. कंपनी योग्य प्रकारे काम करीत आहे की नाही हे पाहण्यासाठी आपले स्वच्छता निरिक्षक नियुक्त करा. कंपनीची नियुक्ती केली याचा अर्थ आपली जबाबदारी संपली असा होत नाही.

-रेणुकादास वैद्य, सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेमेंट थकल्याने कुत्रे पकडण्याचे काम बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेमेंट थकल्यामुळे मोकाट कुत्रे पकडण्याचे काम खासगी एजन्सीने बंद केले आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थायी समिती बैठकीत आणि सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून सातत्याने मागणी होत होती, शिवाय नागरिकसुद्धा ही समस्या घेऊन पालिकेत येत असल्याने कुत्रे पकडण्याच्या कामाचे खासगीकरण करून पुणे येथील ब्ल्युक्रॉस एजन्सीला कुत्रे पकडण्याचे कंत्राट देण्यात आले. या संस्थेला रोज ५० कुत्रे पकडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. संस्थेने काही महिने त्यानुसार काम केले, मात्र केलेल्या कामाचे पैसे संस्थेला वेळेवर देण्यात आले नाहीत. पालिकेकडे डिसेंबरपासून साडेआठ लाख रुपये थकले आहेत. ही रक्कम मिळवण्यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा केला, पण थकबाकी मिळाली नसल्याने कुत्रे पकडण्याचे काम बंद केले आहे.

स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मांडला. कुत्रे पकडले जात नसल्याने शहरात दहशतीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले. सभापतींच्या निर्देशानंतर बोलताना अधिकाऱ्यांनी संस्थेचे पेमेंट रखडल्यामुळे कुत्रे पकडण्याचे काम थांबवल्याची कबुली दिली. लवकरच पेमेंट अदा करून संस्थेचे काम सुरू केले जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या जाचाला कंटाळून मक्रणपुरात पतीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

मक्रणपूर शिवारात (ता. कन्नड) लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी मृताच्या पत्नीविरोधात कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड शहरातील शिवाजीनगरातील राहिवाशी रतन पांडुरंग उचित (वय ४८) यांनी मक्रणपूर शिवारातील शेतातील (गट क्रमांक १३) लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी (सात फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आले होते. या घटनेची माहिती विठ्ठल लोंढे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिस उप निरीक्षक सतीश दिंडे, पोलिस नाईक रामचंद्र बोंदरे व आंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली असता मृताच्या खिशात दोन चिठ्ठ्या मिळून आल्या. या दोन्ही चिठ्ठ्यांमधील मजकूर सारखाच असून, दुसऱ्या पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख या चिठ्ठ्यामध्ये असल्याचे पोलिसांना आढळून आले.

मृताच्या पहिल्या पत्नीचे काही दिवसा पूर्वीच निधन झाले आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ शंकर पांडुरंग उचित यांच्या फिर्यादीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारवाडी, गुजराती समाजाची मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिटमिटा परिसरातील कमललीला नगरमध्ये बांधलेल्या श्री शक्तिधाम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुक्रवारी श्री संस्थान गणपती येथून सकल मारवाडी, गुजराती समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. खडकेश्वर महादेव मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप झाला. दोन्ही समाजांनी मिळून देवता नगरभ्रमण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ग्रामदैवत संस्थान गणपतीची आमदार अतुल सावे, डॉ. सुशील भारूका, आनंद भारूका आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती झाली. गांधी पुतळा येथे जैन आचार्य श्री देवनंदजी महाराज यांनी णमोकार मंत्राने मिरवणुकीची सुरुवात झाली. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, मारवाडी महासभेचे डॉ पुरषोत्तम दरक, महावीर पाटणी, जुगलकिशोर तापडिया, भांगसीमाता गडाचे स्वामी परमानंदगिरी महाराज, आदिशक्ती गुरुमाई महाराज यांच्यासह मारवाडी आणि गुजराती समाजाचे पदाधिकारी, शक्तिधाम ट्रस्टचे सर्व विश्वस्त यांच्या उपस्थितीत जयघोषाने मिरवणुकीस सुरुवात झाली. श्री शक्तिधाम येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या १५ देवतांच्या प्रतिमा रथांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. गुलमंडी, औरंगपुरा ते खडकेश्वर महादेव मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप झाला. या वेळी शक्तिधाम ट्रस्टच्या विश्वस्तांचे स्वागत करण्यात आले. परमानंद स्वामी व गुरुमाई महाराज यांनी मार्गदर्शन केले. मिरवणुकीत उंट, घोडे, रथ आकर्षण ठरले. मिरवणुकीमुळे शहरात कचरा होऊ नये म्हणून माहेश्वरी समाजाने खबरदारी घेत कचरा संकलन केले.

आज, उद्या कार्यक्रम

शक्तिपीठ मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शनिवारी व रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी नऊपासून यज्ञ, होमहवन, पूजा विधी व सायंकाळी साडेसहा वाजता सतवारो खाटूश्यामरो हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा भक्ती संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी सकाळी साडेसात वाजता कलशपूजन, ध्वजवंदन, सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा, महाप्रसाद आणि महामंगल पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. पाठामध्ये २१०० महिलांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमासाठी दोन्ही दिवस सकाळी साडेसातपासून सिडको ते शक्तिपीठ मंदिरापर्यंत सिटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफारी पार्कची ‘पीएमसी’ ठरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव-मिटमिटा भागात शंभर एकर क्षेत्रावर विकसित करण्यात येणाऱ्या सफारी पार्कसाठी प्रकल्प सल्लागार संस्था (पीएमसी) ठरविण्यात आली आहे. महर्षि दयानंद चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे म्युरल्स लावण्याचे काम व कंत्राटदाराला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सफारी पार्क व सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाच्या मास्टर प्लानची अंमलबजावणी करण्याकरिता 'पीएमसी' नियुक्तीकरिता निविदा काढण्यात आली होती. पहिल्या प्रयत्नात चार निविदा प्राप्त झाल्या, पण संस्थांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे फेरनिविदा काढण्यात आली. फेरनिविदेत नवी दिल्ली येथील ब्रिजराज शर्मा अँड असोसिएटस् प्रा. लि., ग्रीनप्रो इंडिया (मुंबई), जैन अँड असोसिएटस् (गुडगाव) या तीन संस्थांनी निविदा सादर केल्या. यापैकी ब्रिजराज शर्मा अँड असोसिएटस् प्रा. लि.ची निविदा पात्र ठरली. ही निविदा मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समिती बैठकीत होता. त्याला मंजुरी देण्यात आली.

\Bशिवसेनाप्रमुखांचे म्युरल्स लागणार \B

जालना रोडवरील महर्षि दयानंद चौकातील वाहतूक बेटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प (म्युरल्स) लावण्याच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली. संजीवनी डहाळे यांना हे काम अंदाजपत्रकीय दरानुसार २९ लाख २१ हजार ३२१ रुपयांमध्ये देण्यात आले आहे. निविदा मंजुरीमुळे हे काम लवकर सुरू होईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश जयंती सोहळा उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अर्थवर्शीर्ष पठण, गणेश याग, महाआरती, पालखी सोहळा अशा विविध कार्यक्रमांसह शुक्रवारी शहरातील सर्व गणेश मंदिरात गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिरात सकाळी आमदार अतुल सावे, डॉ. सुशील भारूका, आनंद भारूका यांच्या हस्ते आरती झाली. त्यानंतर २१ जोडप्यांच्या हस्ते गणेश याग, होमहवन करून पूर्णाहुती देण्यात आली. सायंकाळी गणरायास ५६ भोग नैवैद्य दाखवून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. रात्री संगीतमय सुंदरकांडचे सादरीकरण विनोद चौंडिये व साथीदारांनी केले. केळीबाजार येथील श्री जय चतुर्थी गणेश मंडळ येथे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी अंबादास दानवे, नगरसेवक सचिन खैरे, बंडू ओक, पृथ्वीराज पवार, राजेश मुथा, सचिन ढोकरट, युवराज झुंजरकर, गणेश काथार उपस्थित होते. साडेअकरा वाजता अथर्वशीर्ष पठण, बारा वाजता गणेश जन्म सोहळा व महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. समर्थनगर येथील वरद गणेश मंदिरात श्री गणेश जयंती निमित्ताने मंदिर खास रोषणाईने सजविण्यात आले होते. सकाळी सात वाजता मंदिरातून श्री गणेशाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. चंद्रकांत मुळे, मनोज पाडळकर, सुभाष खोचे, मयुरेश पोतनीस, पंकज कुलकर्णी आदी उपस्थित होते. त्यानंतर दोनशे भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केले. मनोहर दीक्षित यांचे कीर्तन झाले. कर्णपुरा येथील सिद्धीविनायक मंदिरात श्याम पाटील व लखमजी जाधव यांच्या हस्ते महाआरती झाली. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.

आज, उद्या कार्यक्रम

शनिवारी एकदिवसीय गणेशयाग व पुर्णाहुती सकाळी नऊ ते दुपारी तीनदरम्यान होणार आहे. रविवारी सकाळी सात वाजता तुळजाभवानी व श्री बालाजी महाअभिषेक होणार असून, जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव व त्यानंतर दुपारी १२ वाजता महाआरती होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सिद्धीविनायक मंदिर संस्थानतर्फे देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रेन डेड बालकाचा अखेर अंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआर लसीकरणानंतर प्रकृती बिघडल्याने डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आलेला दोन वर्षीय बालक हा गुरुवारी (सात फेब्रुवारी) ब्रेन डेड झाला आणि त्यानंतर अवघ्या काही वेळेत त्याचा मृत्यू झाला. त्याचे शुक्रवारी घाटीत शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणात डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, पोलिसांनी तक्रार अर्ज स्वीकारला असला तरी गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे कोर्टात दाद मागणार असल्याचा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.

यश कैलास भातपुडे याला राजनगर परिसरातील महापालिका आरोग्य केंद्रात ३१ जानेवारी रोजी गोवर-रुबेला लस देण्यात आली होती. त्यानंतर त्याला ताप, थंडीचा त्रास होऊन झटके येत होते. त्याच्यावर अमृत बाल रुग्णालय व डॉ़ हेडगेवार रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि प्रकृती बिघडल्याने चार फेब्रुवारी रोजी रात्री हेडगेवार रुग्णालयात दाखल केले होते. तीन दिवसांच्या उपचारादरम्यान गुरुवारी त्याला ब्रेन डेड जाहीर करण्यात आले व साडे अकराच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. 'डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, वेळीच दाखल करून घेतले नाही व वेळोवेळी नीट माहितीही दिली नाही', असा आरोप मृत यश याचे काका अविनाश अशोक भातपुडे यांनी केला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली असता, त्यांनी तक्रार अर्ज स्वीकारला; परंतु गुन्हा दाखल केला नाही म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

\Bनमुने 'एनआयव्ही'कडे

\Bशवविच्छेदनावरून बालकाचा मृत्यू लसीकरणामुळे झाला आहे किंवा नाही हे सांगता येत नाही, असे घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी सांगितले. 'सहा फेब्रुवारी रोजी झालेल्या 'एईआयएफ' या विविध तज्ज्ञांच्या समितीच्या बैठकीत या बालकाला 'व्हायरल इन्सिफलायटिस' असून, लसीकरणाशी त्याचा संबंध नाही, असा सूर व्यक्त झाला. संबंधित बालकाचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठवले आहेत. अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल' असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नो नेटवर्क एरियात जलवाहिन्या टाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पाणी उपलब्धतेच्या आधीन राहून नो नेटवर्क एरियात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू करा,' असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. दूषित पाण्याच्या तक्रारी तातडीने सोडवा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापन या विषयावर महापौरांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य उपस्थित होते. बैठकीनंतर महापौरांनी माहिती दिली. 'नो नेटवर्क एरियाच्या सुमारे ८० ते ९० संचिका प्रलंबित आहेत. त्या निकाली काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. नो नेटवर्क एरियात जलवाहिन्या टाका, पाणी उपलब्ध झाल्यानंतर या जलवाहिन्यांसाठी क्रॉस कनेक्शन केले जाईल, असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे,' असे महापौरांनी सांगितले. दूषित पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत. पाणी पुरवठ्याच्या कामाचे पेमेंट करण्यात आले असल्याने कंत्राटदाराकडून काम करून घ्या, असे अधिकाऱ्यांना सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करून रिक्त जागांवर कर्मचारी द्या, असे आदेश उपायुक्तांना देण्यात आले.

पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीने कचरा संकलन व वाहतूक करण्यात येत आहे, पण हे काम अद्याप समाधानकारक होत नाही. रिक्षा आणि मजूर वाढवण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुखांना देण्यात आले. कचरा संकलन व वाहतूक तीन शिफ्टमध्ये करण्याचे नियोजन करा. रात्रीच्या शिफ्टमध्ये कचरा संकलन करून वाहतूक करण्याची सूचना कंपनीला करा, असे कक्ष प्रमुखांना आदेश दिल्याचे महापौर यांनी सांगितले.

\Bचिकलठाण्यात जनरेटर

\B

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रासाठी अद्याप वीज पुरवठा मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेने स्वखर्चाने जनरेटरची खरेदी केली आहे. ते शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. जनरेटरच्या साह्याने २० टन क्षमतेची बेलिंग मशीन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सुक्या कचऱ्याचा प्रश्न संपुष्टात येईल, असा दावा महापौरांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० मालमत्ता जप्त; ३० लाख वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने आठ दिवसांत ४० मालमत्ता जप्त केल्या. जप्त केलेल्या मालमत्तांकडे ४० लाख ३५ हजार ३२६ रुपयांची थकबाकी होती, त्यापैकी ३० लाख ४६ हजार ९४६ रुपये वसूल झाल्याचे कळविण्यात आले आहे.

पालिकेतर्फे एक फेब्रुवारीपासून सक्तीने मालमत्ता कर वसुली सुरू करण्यात आली आहे. झोन १ मध्ये ५, झोन २ मध्ये १२, झोन ५ मध्ये ४, झोन ५ मध्ये ४, झोन ७ मध्ये ९ तर झोन ९ मध्ये ६ मालमत्ता जप्त करण्यात आल्या. जप्त मालमत्तांचा लिलाव करण्याबद्दल महापालिका विचार करीत आहे, असे महापालिकेच्या कर निर्धारक व संकलक विभागाने स्पष्ट केले आहे. याबद्दल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून धोरण जाहीर केले जाईल असे कळवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्माते सुभाष घई यांना जिल्हा कोर्टाचा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कथा चोरून त्यावर चित्रपट निर्माण केल्याच्या आरोपात कोर्टामार्फâत प्रोसेस इश्यू झालेले चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांना कोर्टात हजर राहण्याच्या आदेशास जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश अनिल साळुंखे यांनी पुढील तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे.

शहरातील कथा लेखक मुश्ताक मोसीन मुबारक हुसैन सिद्दिकी यांनी १९८३ मध्ये 'श्रीमती' या नावाने एक चित्रपट कथा लिहिली होती. या कथेचे त्यांनी फिल्म रायटर असोसिएशनमध्ये रजिस्ट्रेशन केले होते. दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना त्यांनी ही कथा सांगितलेली होती. त्यावर चित्रपटही होणे अपेक्षित होते. मात्र २० जुलै २००९ मध्ये त्यांनी शहरातील चित्रपटगृहात 'पेर्इंग गेस्ट' हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा चित्रपट 'श्रीमती'ची कथा चोरून केलेला आहे. मुश्ताक मोसीन यांनी कोर्टात खासगी तक्रार दाखल केली. प्राथमिक सुनावणी होऊन त्यात 'पेर्इंग गेस्ट'चे निर्माते दिग्दर्शक सुभाष घई यांच्या विरोधात प्रोसेस इश्यू करण्याचे व कोर्टात हजर राहण्याचे आदेश झाले. त्यानंतर घई यांच्यातर्फेâ अ‍ॅड. सागर लड्डा यांनी जिल्हा कोर्टात कनिष्ट न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी, अ‍ॅड. लड्डा यांनी युक्तीवाद केला की, सुभाष घई यांनी कधीही कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच प्रकरणात त्यांनाच यश मिळेल, अशी खात्री आहे. कथालेखक मुश्ताक मोसीन यांच्यातर्फे नवीन अग्रवाल यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने पुढील तारखेपर्यंत घई यांना हजर राहण्याच्या आदेशास स्थगिती दिली. पुढील सुनावणी सात मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रेकर नवे विभागीय आयुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेवानिवृत्तीसाठी अवघे २० दिवस शिल्लक असताना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची शुक्रवारी बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे क्रीडा आयुक्तपदाची सूत्रे देण्यात आली आहेत, तर आपल्या बेधडक कार्यपद्धतीने प्रशासनात वेगळा ठसा उमटवलेले सुनील केंद्रेकर यांची औरंगाबाद विभागीय आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील झरी येथील मूळ रहिवासी असलेल्या केंद्रेकर यांनी यापूर्वी औरंगाबाद प्रभारी जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. वर्षभरापूर्वी केंद्रेकर यांची बदली औरंगाबाद विभागीय आयुक्तपदी करण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसांत त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती. केंद्रेकर यांना मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड जिल्ह्यांतील कामाचा अनुभव आहे. ऐन दुष्काळात मराठवाड्याला त्यामुळे त्यांच्या रुपाने मराठवाड्याची जाण असलेला अधिकारी मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images