Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अधिकारी चौकशीबाबत प्रतिज्ञापत्र द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी चालू आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी १५ फेब्रुवारीपूर्वी स्वत: प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी दिला. याचिकेची पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

महापालिकेच्या झालेल्या एक कोटी ६४ लाख रुपयांच्या नुकसानीसंदर्भात महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली आणि उपअभियंता खन्ना यांची चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनी केली. त्याचा अहवाल खंडपीठात सादर केला आहे. त्यानुसार जीएनआय कंपनीला कंत्राट देताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे एक कोटी ६४ लाखांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी विभागीय आयुक्तांच्या वतीने तत्कालीन जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी चौकशी करून असाच अहवाल दिला आहे. त्यात जाणीवपूर्वक चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करून त्यांच्याकडून नुकसानीची रक्कम वसूल करावी, अशी शिफारस केली आहे.

आज सिकंदर अली आणि खन्ना या निवृत्त अधिकाऱ्यांच्या वतीने विनंती अर्ज दाखल करून विभागीय चौकशीला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, चौकशी करणारे अधिकारी ज्यांची चौकशी करायची असते त्यांच्यापेक्षा उच्चपदस्थ असावे लागतात. प्रस्तुत प्रकरणात चौकशी अधिकारी हे महापालिकेच्या शहर अभियंत्यांपेक्षा वरिष्ठ दर्जाचे नाहीत. त्यामुळे तत्कालीन आयुक्त दीपक मुगळीकर यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीसाठी स्थापन केलेल्या चौकशी समितीकडे प्रकरण वर्ग केले.

या चौकशी समितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी संवर्गातील आहेत. त्यांचे आणि शहर अभियंत्यांचे वेतन समान आहे. त्यामुळे अशा चौकशी समितीकडून झालेली चौकशी कायद्याला धरून नाही; तसेच राज्याच्या नगरविकास सचिवांनी केलेल्या चौकशीच्या आधारे अतिरिक्त दोषारोपपत्र बजावण्यात आले. त्यामुळे चौकशी अधिकारी किमान राज्याच्या नगरविकास खात्याच्या सचिवाच्या दर्जाचा असावा, असा युक्तिवाद करण्यात आला. याचिकाकर्ता नगरसेवक विकास येडके यांच्या वतीने अ‍ॅड. बी. एल. सगर किल्लारीकर, महापालिकेतर्फे अ‍ॅड. संजीव देशपांडे, सिकंदरअली आणि खन्ना यांच्यातर्फे अ‍ॅड. आर. आर. मंत्री काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज नाही आणि सर्वात मोठे दुर्दैव्य म्हणजे जायकवाडीसारखा मोठा प्रकल्प असतानाही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नसल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पैठण येथे केली.

काँग्रेसतर्फे शहरात दुष्काळ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित सभेत अशोक चव्हाण बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, 'सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार शेतकरी, सामान्य जनतेच्या विरोधी असून, शासनाचा वतीने घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सामान्य जनता त्रस्त आहेत.'

काँग्रेस पक्ष सत्तेत असताना, आम्ही कधीही जनतेची फसवणूक केली नाही, तर शेतकऱ्यांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार, माजी खासदार एकनाथ गायकवाड, जगन्नाथ काळे, केशव तायडे , विलास औताडे, नामदेव पवार, तालुकाध्यक्ष विनोद तांबे, शहाराध्यक्ष जीतसिंह करकोटक आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, शहरातील खंडोबा चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत दुष्काळ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका आयुक्तांविरुद्ध हक्कभंगाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सहाय्यक लेखा परीक्षकाची लेखाधिकारी म्हणून केलेली नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत नगरसेवकांनी केला. नियुक्ती रद्द न झाल्यास सर्वसाधारण सभेत आयुक्तांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

महापालिकेच्या लेखा परीक्षण विभागातील सहाय्यक लेखा परीक्षक महावीर पाटणी यांची नियुक्ती आयुक्तांनी लेखा विभागात लेखाधिकारी म्हणून केली आहे. या नियुक्तीला नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. लेखा परीक्षकाचे काम पालिका प्रशासनाने केलेला खर्च तपासण्याचे आहे आणि लेखाधिकाऱ्याचे काम खर्च करण्याचे आहे. असे असताना खर्च करणारा आणि केलेला खर्च तपासणारा एकच व्यक्ती कसा असू शकतो, असा प्रश्न विचारला जात आहे. स्थायी समितीच्या तीन ते चार बैठकांत या नियुक्तीवर खल सुरू आहे. सभापती रेणुकादास वैद्य यांनी देखील पाटणी यांची लेखा विभागातील नियुक्ती चुकीची असून त्यांना त्यांच्या मूळ विभागात काम करण्यास सांगा, असे आदेश प्रशासनाला दिले होते. पण त्यावर अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे नगरसेवक गजानन बारवाल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा मांडला.

\Bपाटणींकडूनच घेतला खुलासा \B

या नियुक्तीबद्दल सभापतींनी पाटणी यांनाच खुलासा करण्यास सांगितले. पाटणी म्हणाले, शासनाच्या अध्यादेशानुसार लेखा परीक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लेखाविभागात काम करता येत नाही. महापालिका अधिनियमात या नियुक्ती संदर्भात नेमकी काय तरतूद आहे, असा प्रश्न बारवाल यांनी विचारला. सभापती वैद्य यांनी सचिव डी. डी. सूर्यवंशी व विधी सल्लागार अपर्णा थेटे यांच्याकडे खुलासा मागितला. या दोघांनीही लेखा परीक्षण विभागातील अधिकाऱ्याला लेखाविभागात नियुक्ती देता येत नाही, असे स्पष्ट केले.

\Bनियमानुसार काम करा: सभापती \B

सभापती म्हणाले, पाटणींच्या नियुक्ती संदर्भात शासनाचे नियम, कायदे पाळण्यात आले नाहीत. नियमांची पायमल्ली झालेली आहे. नियम व महापालिका अधिनियमानुसार काम करा, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. गजानन बारवाल म्हणाले, पाटणी यांची लेखा विभागातील नियुक्ती रद्द न झाल्यास सर्वसाधारण सभेत आयुक्तांच्या विरोधात आपण हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणार आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाला तरुण दिशा देतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समाजाला दिशा देऊन देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. तरुण विद्यार्थी वर्ग हाच देशाला योग्य दिशा देऊ शकतो,' असे प्रतिपादन 'अभाविप'चे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांनी केले. ते विद्यार्थी संमेलनात बोलत होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या औरंगाबाद शाखेने 'संकल्प युवा नेतृत्वाचा' हे मराठवाडास्तरीय विद्यार्थी संमेलन घेतले. श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी संमेलन झाले. या संमेलनाचे उदघाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. यावेळी मंचावर 'अभाविप'चे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान, महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्निल बेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. युवकांच्या कार्यावर बागडे यांनी भाष्य केले. 'देशाविषयी आपले योगदान लक्षात घेऊन व राष्ट्रभक्ती जागी ठेऊन युवकांनी काम करावे. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले मन विद्यार्थी परिषदेत तयार होते. नैसर्गिक आपत्तीवर मात करणासाठी विविध माध्यमातून समोर आले पाहिजे. मराठवाड्याचे दुःख दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून दूर करा' असे बागडे म्हणाले.

आशिष चौहान यांनी देशविरोधी ताकदींविरोधात लढण्याचे आवाहन केले. 'देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये देश तोडण्याचे काम सुरू आहे. अशा ताकदींविरोधात लढण्याचे व देशासाठी काम करण्याचे मोठे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. मराठवाड्यातील युवकांनी समाजातील प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व देण्याचे काम केले आहे. तसेच नेतृत्व यापुढे देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून होईल असे चौहान म्हणाले. प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी 'अभाविप'चे कार्यावलोकन केले.

समारोप सत्रात पश्चिम क्षेत्रीय संघटनमंत्री देवदत्त जोशी यांनी मार्गदर्शन केले. 'समाजातील प्रत्येक क्षेत्रात तरुण नेतृत्व समोर आले पाहिजे. प्रत्येकाने स्वतःपासून त्याची सुरुवात करावी. आपल्या मातीची जाणीव ठेऊन परिसरासाठी योगदान देणे अपेक्षित आहे. मराठवाड्यातील तरुणांनी परिवर्तन घडवून आणण्यासाठी विविध क्षेत्रात काम करावे' असे जोशी म्हणाले. यावेळी अभाविपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांचे मार्गदर्शन

मराठवाडास्तरीय विद्यार्थी संमेलनात ग्रामविकास, दुष्काळ, उद्योजकता विकास, साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक चळवळ, शिक्षण, आरोग्य, पाणी व पर्यावरण, सोशल मीडिया, विद्यार्थी परिषद निवडणूक या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या भवितव्यावर सविस्तर चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून, बलात्काराचे शंभर टक्के गुन्हे उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खून, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे शंभर टक्के उघडकीस आणण्यामध्ये औरंगाबाद शहर पोलिस दल राज्यात प्रथम क्रमांकावर आले आहे. २०१८मध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब समोर आली आहे; तसेच 'एमपीडीए'चे गुन्हे दाखल करण्यामध्ये देखील औरंगाबाद पोलिस आयुक्तालय राज्यात प्रथम क्रमांकावर आले आहे.

खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये राज्यात औरंगाबादनंतर नागपूर, पुणे, मुंबई आणि ठाणे शहरांचा क्रमांक लागतो; तसेच बलात्काराचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये औरंगाबादनंतर पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि नाशिक शहराचा क्रमांक आहे. गंभीर स्वरुपाचे एक ते पाच प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये औरंगाबाद शहराचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. दुखापतीच्या गुन्ह्याच्या आकडेवारीमध्ये औरंगाबाद शहर पहिल्या पाच क्रमांकात आले असून, औरंगाबाद शहराचा तिसरा क्रमांक आहे. भाग सहा क्रमांकाचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये औरंगाबाद शहरात राज्यात चौथ्या क्रमांकावर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपला मोदी होता कामा नये..

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लोकांना काय पाहिजे हे लक्षात घ्या, अशाच घोषणा द्या ज्या पूर्ण करू शकू. आपला मोदी होता कामा नये', असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिला कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत दिला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीतर्फे आयोजित 'निरोगी जीवन हक्क माझा' या कार्यशाळेचा शुक्रवारी (आठ फेब्रुवारी) पाटील यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण यांच्यासह उषा दराडे, जिल्हाध्यक्ष छाया जंगले यांची उपस्थिती होती. 'देशातील कोणत्याही पक्षाने आरोग्य विषयक असा कार्यक्रम घेतला नाही,' असे म्हणत जयंत पाटील यांनी महिला राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की, लोकांना जाहिरनाम्यात नेमके काय पाहिजे याबाबत आपण चर्चा केली पाहिजे. तसेच याबाबत अभ्यास करून सूचना केल्या पाहिजेत. अशाच घोषणा करा ज्या आपण पूर्ण करू शकू, आपला मोदी होता कामा नये,' असा टोला लगावत पाटील यांनी निवडणूक काळात हवेत गप्पा न मारण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. 'लोकांना नेमके काय हवे आहे याचा विचार करा, लोकांना काय पाहिजे याबाबतची प्राथमिकता ठरवण्यामध्ये भाजप सरकारचे अंतर पडले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गरिबांच्या हाती काहीच पडले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची प्राथमिकता ओळखून काम करा. गावोगावी ग्रामसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी बसावे व व्यवस्थेचे ऑडिट करावे,' असे आवाहन त्यांनी केले.

\Bतर, दुप्पट काम करावे लागेल\B

येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे. निवडणुकांमुळे प्रत्येक महिला कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यावे, तसेच दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या, तर दुप्पट काम करावे लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

\Bलोकसभा, विधानसभा एकत्र होण्याची शक्यता\B

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ पाच दिवसांचे असल्यामुळे विधानसभा भंग करण्यात येईल, असा अंदाज असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा शुल्कावरुन वादावादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ असूनही माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात सर्रास शुल्क वसूल करण्यात आले. या प्रकाराला विरोध केल्यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन कर्मचारी यांच्यात वाद झाला. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाकडे तक्रार केली.

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क राज्य शासनाने माफ केले आहे. या सवलतीसाठी जाचक अटी नाहीत. मात्र, उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाने दिलेल्या पत्रात जाचक अटी आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सवलतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची गरज आहे. शासकीय नियमांच्या फेऱ्यात विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढवू नका, अशी मागणी मराठवाडा लॉ कृती समितीने केली. याबाबत उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांना निवेदन देण्यात आले.

माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या वसुलीला काही विद्यार्थ्यांनी विरोध केल्यामुळे प्रचंड वाद झाला. मराठवाडा लॉ कृती समितीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क खिडकी बंद पाडून जोरदार विरोध केला. याबाबत समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना निवेदन दिले. परीक्षा शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नवनाथ देवकते, रवी गिते, शेख अब्दुल माजिद, सचिन कुंटे, विकी कामिटे, दत्ता पाटील, दीपक डोईफोडे, अरविंद पाटील, बाबासाहेब अपशिंदे, अर्जुन डुकरे, अश्फाक पठाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेची घाई, निकाल ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा १५ ऑक्टोबरपासून होण्याची शक्यता आहे. चार जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक घेतल्यानंतर परीक्षा विभागाने संभाव्य वेळापत्रक निश्चित केले. समाजकार्य आणि अभियांत्रिकी परीक्षांचे निकाल रखडले आहेत. निकाल शेवटच्या टप्प्यात असून लवकरच जाहीर करण्यात येतील असे विभागाने स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापूर्वी परीक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा विभागाने केले आहे. पदवी अभ्यासक्रमाची मार्च-एप्रिल सत्राची परीक्षा येत्या १५मार्चपासून होण्याची शक्यता आहे. याबाबत परीक्षा विभागाने नुकतीच प्राचार्यांची बैठक घेतली. एकूण पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर वर्गाची परीक्षा यांचा आढावा घेत संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले. वेळेत परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करण्यासाठी विभागाने काटेकोर नियोजन केले आहे. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या काही परीक्षांचे निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष वाढला आहे. समाजकार्य अभ्यासक्रमाची पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झाली आहे. या परीक्षेचा निकाल दोन महिन्यात जाहीर होणे अपेक्षित होते. विद्यापीठाच्या कार्यकक्षेत एकूण सात समाजकार्य महाविद्यालये आहेत. पदवीचे सातशे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सतराशे विद्यार्थी आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांचे एकूण दोन हजार ४०० विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने उत्तरपत्रिका मूल्यांकन गतिमान केले नाही. विद्यार्थी संघटनांनी निवेदने देऊन निकाल लवकर मागणी केली होती. परीक्षा विभागाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांना पाठ‌वण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मंगळवारपासून सात प्राध्यापक रुजू झाले आहेत. त्यामुळे दहा ते पंधरा दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकीच्या सर्व विषयांच्या एकूण एक लाख ६० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी आहे. अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा जानेवारीत झाल्या आहेत. त्यानंतर प्रथम वर्षाच्या निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, द्वितीय आणि तृतीय वर्षाचा निकाल रखडलेला आहे. चार ते पाच दिवसात हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधी शाखेच्या परीक्षेतील समान प्रश्नांच्या मुद्द्यावर परीक्षा विभागाने पाच प्राध्यापक आणि माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र पाठवले आहे. याबाबत सखोल चौकशी सुरू असून योग्य निर्णय घेतला जाईल असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

\Bपरीक्षा मंडळाची बैठक बुधवारी

\Bपदवी आणि पदव्युत्तर परीक्षेच्या नियोजनाबाबत परीक्षा मंडळाची बुधवारी बैठक होणार आहे. याबाबत परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी गुरुवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेऊन चर्चा केली. ११ आणि १२ फेब्रुवारीला व्यवस्थापन परिषदेची बैठक आहे. त्यानंतर परीक्षा मंडळाची बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक साहित्य संमेलन आज

$
0
0

औरंगाबाद : अॅक्टिव टिचर्स सामाजिक प्रतिष्ठानतर्फे रविवारी पहिल्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले साहित्यनगरी, महसूल प्रबोधिनी येथे हे संमेलन सकाळी साडेआठ वाजता क्रांती चौकातून ग्रंथदिंडी काढून सुरू होईल.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अधिव्याख्याता प्रा. डॉ. विशाल तायडे, तर स्वागताध्यक्षपदी ज्योती बेलवले आहेत.

संमेलनाला प्रजित नायर, डॉ. पवन सुधीर, दिनकर टेमकर, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, शिक्षणाधिकारी सुरजकुमार जैस्वाल, रमाकांत काठमोरे, संयोजक विक्रम अडसूळ यांची उपस्थिती राहिल. सकाळी ११.३० वाजता 'आजच्या शिक्षकांचे वाचन प्रेम' या परिसंवादात जेष्ठ बालसाहित्यीक राजीव तांबे, गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, उपक्रमशिल शिक्षिका अलका रसाळ, संतोष मुसळे सहभागी होतील. दुपारी १२.३० 'विद्यार्थ्यांमधील लेखकाला घडविण्यात शिक्षकाची भूमिका' या परिसंवादात उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, ज्येष्ठ कवी तथा शिक्षक साहित्यिक बालाजी इंगळे, उपक्रमशील शिक्षक वेच्या गावित सहभागी होतील. दुपारी २.३० वाजता कथाकथन आयोजित केले असून यात अध्यक्षस्थानी उपक्रमशिल शिक्षिका मंगल पवार असतील तर, शिवदास पोटे, ज्ञानेश्वर झगरे व धनंजय गुडसूरकर हे सहभागी होणार आहेत. अखेरचे सञ ३.३० वाजता कविसंमेलनाचे असणार आहे. यात नाशिकचे कवी व शिक्षण विस्तार अधिकारी असणारे प्रमोद चिंचोले यांच्या अध्यक्षतेखाली ५० निमंत्रित कवींचे कविता वाचन होणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रादेशिक विद्याप्राधिकरण संचालक डॉ. सुभाष कांबळे, माहिती जनसंपर्क संचालनालयाचे संचालक यशवंत भंडारे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डी. डी. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असेल. संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक विक्रम अडसूळ यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५हजारांची पोत महिलेकडून लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना-औरंगाबाद एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेची सोन्याची पोत एका प्रवासी महिलेनी लंपास केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा प्रदीप लखदीवे (बारटक्के, रा. महालक्ष्मीनगर वारजे, पुणे) या जालना येथून सकाळी दहाच्या सुमारास शुक्रवारी बसने औरंगाबादकडे निघाल्या. त्यांनी आपली ३४ ग्रॅम ४१० मिली वजनाची पोत अंदाजे ही त्यांच्या कॉलेज बॅगमध्ये ठेवली होती. तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या तीन महिलांपैकी एकीने ही बॅग उघडून कॅरिबॅगमध्ये ठेवलेली सोन्याची पोत लंपास केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यासाठी ६०० कोटींचा ‘डीपीआर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा-देवळाईवासीयांसाठी एक आनंदाची बातमी. या भागात विकाकामे सुरू करण्यासाठी उशिरा का होईना महापालिकेने पावले उचलली असून, ६०० कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा देवळाई भागाचा समावेश पाच वर्षांपूर्वी महापालिकेत करण्यात आला. मात्र, त्यानंतर या भागात कोणतीही विकास कामे करण्यात आली नाहीत. रस्ते, वीज, पाणी आणि ड्रेनेज लाइनच्या सुविधा मिळाव्यात अशी या भागातील नागरिकांची अपेक्षा आहे, पण निधीच नसल्यामुळे ही कामे करणे पालिकेला शक्य नाही. एखादी नवीन वसाहत महापालिकेत सामील झाल्यावर त्या वसाहतीच्या विकासासाठी राज्य शासन निधी देईल, असे शासनातर्फे एका अध्यादेशाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. या अध्यादेशाचा आधार घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी सातारा-देवळाई परिसरात विकास कामे करण्यासाठी शासनाकडून निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी 'डीपीआर' तयार करणे गरजेचे असल्यामुळे हे काम यश इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स या संस्थेला काम देण्यात आले. या संस्थेने ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्याच्या काळात डीपीआर तयार करण्याचे काम केले. प्रामुख्याने पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइन टाकण्याच्या कामाचा 'डीपीआर' तयार करण्याकडे लक्ष देण्यात आले. या दोन्ही लाइन कुठून आणि कशा टाकायच्या यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने फोटो घेण्यात आले. त्यामुळे अचूक 'डीपीआर' तयार झाल्याचे मानले जात आहे. पाणी पुरवठ्याच्या कामाचा ४२० कोटींचा तर ड्रेनेजसाठीचा १८० कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. हा डीपीआर पालिका प्रशासनातर्फे मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या बद्दलची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर 'डीपीआर' शासनाकडे पाठवला जाणार आहे.

पालिका निवडणुकीचे गणित

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होईल. त्यानंतर सहा महिन्याने महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे वेध औरंगाबादला आतापासूनच लागले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने 'डीपीआर' मंजूर करावा आणि सातारा - देवळाईसाठी विशेष निधी द्यावा, यासाठी पालिकेचे पदाधिकारी व राजकीय नेते प्रयत्नात आहेत. हा निधी मिळाल्यास त्याचा लाभ राजकीय पक्षांना मिळेल, असे बोलले जात आहे. या श्रेयासाठी आतापासून शिवसेना आणि भाजपचे नेते - पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखीन सात सिटी बस धावणार

$
0
0

औरंगाबाद :

येत्या सोमवारपासून आणखी सात सिटी बस शहरात धावणार असून, त्यांची संख्या ३०वर जाणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत ४३ बस धावतील.

स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून महापालिकेने सिटी बससेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत २३ जानेवारीरोजी २३ सिटीबस सुरू करण्यात आल्या. त्यानंतर वीस सिटी बस टाटा कंपनीकडून प्राप्त झाल्या आहेत. यापैकी सात सिटी बसचे आरटीओ पासिंग झाल्यामुळे या बस सोमवारपासून शहरवासीयांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारपासून तीस बस शहरात धाऊ लागतील. या बस बीड बायपास, विद्यापीठ, टी.व्ही. सेंटर येथून सुरू होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. आणखीन १३ सिटी बस फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू केल्या जाणार आहेत. सध्या २३ सिटी बस १४ मार्गांवरून सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यउद्योग, ऊस, केळीचे पाणी बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात भयावह दुष्काळ आहे. त्यामुळे मद्यनिर्मिती उद्योग, ऊस, केळी पिकाचे पाणी बंद करा, असा ठराव शनिवारी झालेल्या दुष्काळ निवारण व निर्मूलन निर्धार परिषदेत तज्ज्ञांनी पारित केला.

महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळातर्फे भानुदास चव्हाण सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दांडा नसलेले फावडे, रिकामा माठ दाखवत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी परिषदेचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा होते.

उद्घाटनपर भाषण करताना पुरंदरे म्हणाले, 'कोल्हापुरी बंधारे, तलाव असे छोटे मोठे मिळून राज्यात सुमारे ७० हजार प्रकल्प कामे झाली. मराठवाड्यात त्यापैकी सुमारे १४ हजार कामे आहेत. मग या कामाचा उपयोग का होत नाही,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'गळती आहे, बाष्पीभवन होते, असे प्रशासकीय उत्तर त्यावर दिले जाते. पण खरी बाब म्हणजे व्यवस्थापनाची सोयच नाही. पाण्याचा वापर कसा व्हावा, त्याचे नियोजन कसे हवे, याचा विचार केला जात नाही. केवळ योजना, प्रकल्प असून चालत नाही, तर त्याचे योग्य व्यवस्थापन, नियमित देखभाल दुरुस्ती आवश्यक असते. समन्याय पाणी मिळावे, पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून चळवळ उभी राहावी,' अशी अपेक्षा पुरंदरे यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात देसरडा यांनी सिंचन प्रकल्प आणि त्यातील गैरप्रकारावर तोफ डागली. 'दुष्काळमुळे शेतकरी ग्रस्त आहे. सर्वसामान्य जनता त्रस्त, तर सत्ताधारी मस्त अशी परिस्थिती आहे. पाण्यासाठी स्थलांतर होत आहे. हा बुद्धी व नितीचा ही दुष्काळ आहे. राज्यातील दुष्काळ हा अस्मानी, नव्हे तर सुलतानी आहे,' असा आरोपही त्यांनी केला. 'आमच्या माठात पाणी द्या, दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना करा, असे सांगण्यासाठी असे प्रतिकात्मक उद्घाटन केले,' असे यावेळी संयोजन समितीचे सदस्य कृष्णा हरिदास यांनी सांगितले. परिषदेला मारोती तेगमपुरे, उमाकांत राठोड, सुभाष काकुस्ते, चंद्रकांत चव्हाण, विकास शिंदे, मधुकर खिल्लारे उपस्थित होते.

\Bकुलगुरूंचा निषेध

\Bदुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेवण देण्याच्या मुद्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी 'विद्यार्थ्यांना फुकट खाण्याची सवय लागेल,' असे विधान केले होते. वक्त्यांनी परिषदेत या विधानाचा निषेध केला. मारोती तेगमपुरे यांनी 'दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. दानशूर व्यक्ती, शैक्षणिक संस्थांनी अशा परिस्थिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेवणाची सोय करायला हवी, पण कुलगुरू त्या उलट भाषा करतात,' अशा शब्दांत संताप व्यक्त केला.

'समन्यायी पाण्यासाठी आपल्याकडे राजकीय नेतृत्व नाही, लोकसहभाग नाही, आंदोलन नाही. पाणी कोणी दान म्हणून देत नसते ती सत्ता आहे. ती हिसकावून घ्यावी लागते. पाण्यासाठी काम करताना तुमच्या जवळच्या प्रकल्पापासून सुरुवात करा, सर्वांना पाणी कसे मिळले ते पाहा.

- प्रदीप पुरंदरे, जलज्ज्ञ

\Bपरिषदेतील ठराव

\B- दुष्काळ निर्मूलनाचा बृहत आराखडा तयार करा

- ऊस, केळी, मद्यनिर्मिती उद्योगाचे पाणी बंद करा

- बांधकामे थांबवा, ऊस चारा म्हणून वापरावा

- धान्य पुरवठा व्यवस्था गतिमान करा.

- रोजगार हमीची कामे द्या, अथवा ५००रुपये भत्ता

- दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करा

- विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन द्या

- शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार द्या

- सेंद्रीय शेतीची कास धरण्यात यावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रगीतातून ‘अमेझिंग’ औरंगाबाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रगीतातून औरंगाबादची ओळख जगभर सांगणाऱ्या ऐतिहासिक वास्तू...विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती यांच्यासह 'अमेझिंग औरंगाबाद - जन गण मन' हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (१४ फेब्रुवारी) आयोजित केल्याची माहिती औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेला अॅड. स्वप्नील जोशी, स्वप्नील खरे, अमित देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. 'अमेझिंग औरंगाबाद - जन गण मन' ही संकल्पना साकारण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवून शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या मान्यवरांना सोबत घेऊन, विविध ऐतिहासिक स्थळात चित्रिकरण करण्यात आले आहे. पहाटे सहा ते सातच्या दरम्यान हे चित्रिकरण करण्यात आले असून, यासाठी सोसायटीच्या सदस्यांच्या परिश्रमाला औरंगाबादच्या मान्यवरांनी साथ दिली, अशी माहिती अॅड. स्वप्नील जोशी दिली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात पद्मश्री डॉ. के. के. मुहम्मद यांच्या हस्ते या व्हिडिओचे लोकार्पण होणार आहे. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडलाचे उपअधीक्षक डॉ. शिवाकांत बाजपेयी यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या बीबी-का- मकबऱ्यावरील चित्रकथारूप पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन अपर्णा बाजपेयी आणि वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारा निधी स्वमग्म मुलांसाठी कार्य करणाऱ्या आरंभ ऑटिझम सेंटरला दिला जाणार आहे.

'बॅटल ऑफ बटेश्‍वर' मांडणार

मध्य प्रदेशात चंबळच्या खोऱ्यातील डाकूंच्या इलाख्यात असलेल्या बटेश्‍वर या २०० उद्‌ध्वस्त पुरातन मंदिरांच्या वारसास्थळाचे जतन करण्याचे काम डॉ. के. के. मुहम्मद यांनी केले. या वारसा जतनाचे काम करत करावा लागणारा संघर्षाची माहिती डॉ. के. के. मुहम्मद हे गुरुवारच्या कार्यक्रमात देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपला इतिहास म्हणजे भाकडकथा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'वेदकाळापासून भाषांतराची परंपरा नसल्यामुळे जगभरातील ज्ञान भारतात पोहचले नाही. भारतात फक्त पुराण असून चांगले इतिहास विश्लेषक घडले नाही. संकल्पना व सिद्धांताचा योग्य वापर केल्याशिवाय दर्जेदार इतिहास लेखन होणार नाही,' असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. आनंद पाटील यांनी केले. ते चर्चासत्रात बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटी, अंबाजोगाई यांच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य - इतिहास, साहित्य आणि सद्यकालीन परिस्थिती' या विषयावर आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. मौलाना आझाद संशोधन केंद्रात शनिवारी चर्चासत्र झाले. या चर्चासत्राचे उद्घाटन प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी केले. यावेळी 'महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी' या पुस्तकाचे लेखक-समीक्षक प्रा. डॉ. आनंद पाटील, राज्य मागासवर्गाचे सदस्य डॉ. राजेश करपे, प्रदीप सोळुंके, प्रा. श्रीराम जाधव, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ. राम चव्हाण, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. महेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. आनंद पाटील यांनी इतिहास लेखनाच्या पद्धतीवर बीजभाषणात विचार मांडले. 'आपल्या देशात इतिहास म्हणून भाकडकथा सांगितल्या जातात. इतर देशातील ज्ञान भाषांतरीत होऊन आले नसल्यामुळे आपण कुठे आहोत याचे भान राहिले नाही. इतिहासात नेहमीच अज्ञानाचे उत्पादन केल्यामुळे सांस्कृतिक गळचेपी झाली. महाराष्ट्रात सत्य बोलणे म्हणजे न जगण्याची सोय करणे असे इतिहासकार शेजवलकर यांनी म्हटले होते. त्याची प्रचिती आजही येते. सिद्धांत व संकल्पना ठावूक नसल्यामुळे आजच्या काळाला जोडून भाकडकथा सांगतात. नव्या पिढीने व्यासंग वाढवून तटस्थ व मोलाचे इतिहास लेखन करावे' असे पाटील म्हणाले. 'जो समाज इतिहासात रमतो त्याचे भविष्य अंधकारमय असते. इतिहासातून धडा घेऊन वर्तमानकाळ जिंकायचा असतो. मोठ्या समाजाला अंकित ठेवण्यासाठी इतिहासाची मोडतोड करतात असे ग्रामचीने म्हटले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अतिरंजित सांगितला गेला. हिंदू-विरुद्ध मुस्लिम वादासाठी इतिहास वापरला गेला. त्याला छेद देण्याचे काम वास्तववादी अभ्यासकांनी केले' असे श्रीमंत कोकाटे म्हणाले. डॉ. महेश वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. या चर्चासत्रात ११० संशोधकांनी सहभाग घेतला. डॉ. अनिल अब्दुल यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हुसेन शेख, प्रा. कृष्णा आगे, प्रा. राजाराम जेवे, डॉ. अशोक हुंबे आदींनी चर्चासत्रासाठी परिश्रम घेतले.

\Bशिवाजीराजे 'सम्राट'

\B'शिवाजीराजांना 'महाराज', 'छत्रपती' अशा पदव्या महाराष्ट्रातील इतिहासकार वापरतात. या पदव्या फार महत्त्वाच्या नसून 'सम्राट' म्हटले पाहिजे. जो राजा आपण जन्मलेल्या हद्दीच्या बाहेर राज्ये जिंकतो आणि क्षात्रधर्माचा अत्युच्च बिंदू गाठतो त्याला सम्राट म्हणतात. पाश्चात्य इतिहासकारांनी शिवरायांचा उल्लेख सम्राट केला आहे. आपणही त्यांच्या कार्याचे मोठेपण समजून घेऊन सम्राट म्हणावे' असे डॉ. आनंद पाटील म्हणाले. त्यांनी 'सम्राट शिवाजी' पुस्तकाचा लेखन प्रवास सांगितला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचऱ्याची पोळी, निधीचे तूप!

$
0
0

…vijay.deulgaonkar@timesgroup.com

@vijaydeulMT

औरंगाबाद : सत्ताधारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादकरांची माफी मागून आणि शहरात कचराकोंडी निर्माण होऊन तब्बल वर्ष पूर्ण होत आले. मात्र, अजूनही सगळ्या घोषणा, वायदे वाऱ्यावर आहेत. राज्य सरकारने कोट्यवधींचा निधी देऊनही कचराकोंडीचा प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे काही वार्डातच कचरा संकलन नियमित असून, त्या विल्हेवाटीचे करायचे काय, याची उपायोजना अजूनही मार्गी लागली नाही.

महापालिकेच्या झोन एक अंतर्गत चौदा वॉर्डांचा समावेश आहे. यात पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भीमनगर उत्तर, पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा, भीमनगर दक्षिण, नंदनवन कॉलनी, शांतीपुरा, जयसिंगपुरा, आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी, जयभीमनगर, आसेफिया कॉलनी, बुढीलेन, कबाडीपुरा, लोटाकारंजा, भडकलगेट, कोतवालपुरा, गरमपाणी आणि खडकेश्वर भागाचा समावेश आहे. या झोनची एकूण लोकसंख्या सुमारे एक लाख ४५ हजार आहे. या झोन अंतर्गत दररोज ४० ते ४२ टन कचरा संकलन करण्यात येतो. मात्र, त्याचे करायचे काय, याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत प्रशासनाला, कारभाऱ्यांना सापडले नाही. सिद्धार्थ गार्डन आणि पडेगाव येथील कंपोस्ट पिटवर ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणे सुरू केले. मात्र, हे प्रमाणही खूप कमी आहे. पडेगाव भागातही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. त्यासाठी अनेकदा जाळपोळीचा मार्ग अवलंबण्यात येतो. या भागातील नागरिकांशी संवाद साधला गेल्या काही दिवसापासून कचरा संकलन करणारी वाहने सकाळी नियमित येत असल्याचे समोर आले. काही वॉर्डात याबाबतीत अनियमितता जाणवली. भावसिंगपुरा, भीमनगर वॉर्डात कचरा संकलन व्यवस्थित होत आहे. मात्र, एक जानेवारीपासून पडेगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या वाहनांना नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे या वॉर्डातच जमा होत असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट सध्या 'साई'च्या मैदानावर लावण्यात येत आहे. या झोन अंतर्गत संकलन करण्यात येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट पडेगाव भागातील सिल्लेखाना परिसरातील मोकळ्या जागेत लावण्यात येते. या ठिकाणी कचरा डंपिंग न करता मोठ्या प्रमाणावर जाळण्यात येतो. यामुळे धुराचे मोठे लोट उठत असून, दुर्गंधी पसरत आहे. या धुराच्या लोटामुळे केवळ पडेगावच नाही, तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देखील श्वसनाचे त्रास जाणवत आहेत. हा कचरा डेपो येथून हटवण्याची या भागातील नागरिकांची मागणी आहे. …पहाडसिंगपुरा भागात बीबी-का-मकबराच्या मागे रेणुकामाता नगर, ताजमहल कॉलनी तसेच इतर मोठा परिसर आहे. या भागातील कचरा संकलन करणारी वाहने येत नसल्याने येथील नागरिकांचा कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक नागरिक येथील नाल्यातच घरगुती कचऱ्याची विल्हेवाट लावत आहेत.

\Bबेगमपुऱ्यात स्मशानभूमी; गरमपाणीत रस्त्यावर डेपो

\Bबेगमपुरा, पहाडसिंगपुरा, जयसिंगपुरा आसेफिया कॉलनी आदी भागात कचरा संकलन रोज करण्यात येते. मात्र, जमा झालेला कचरा विल्हेवाट लावण्यापूर्वी बेगमपुरा स्मशानभूमीतील एका ठिकाणी जमा करण्यात येतो. यामुळे स्मशानभुमीचा एक भाग कचऱ्याने व्यापला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे या ठिकाणी मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. गरमपाणी भागात मध्यवर्ती बसस्थानकाच्या भिंतीला खेटून कचरा टाकण्यासाठी मोठी कुंडी ठेवण्यात आली आहे. जवळपास जमा झालेला कचरा संकलन करणारी वाहने या ठिकाणी जमा करतात. या कचराकुंडीमधून मोठ्या ट्रकमध्ये हा कचरा टाकून विल्हेवाटीसाठी नेण्यात येतो. भररस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार होत असल्यामुळे या भागात नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

---

\Bआरोग्य संकटात, कारभारी सुखात

\B---

झोन एक अंतर्गत चौदा वॉर्ड येतात. या सर्व वॉर्डातून दररोज सुमारे ४० ते ४२ टन कचऱ्याचे संकलन करण्यात येते. पडेगाव आणि सिद्धार्थ गार्डन येथील कंपोस्ट पिटमध्ये कचऱ्यापासून खत तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटेल.

- वॉर्ड अधिकारी, झोन १

आमच्या कॉलनीत रोज कचरा जमा करतात. हा जमा केलेला कचरा आमच्या घरामागे म्हणजे तोरणागड हौसिंग सोसायटीच्या मागील बाजूला आणून टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी वाढली आहे. फिरणे मुश्किल झाले आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. रहावे कसे, असा प्रश्न आहे.

- रोहित गवळी, पडेगाव

पडेगाव, मिटमिटा भागात कचऱ्याची समस्या तीव्र आहे. दुर्गंधीमुळे राहणे कठीण झाले आहे. कुत्र्यांची झुंडी वाढल्या आहेत. लहान मुलांमध्ये साथीचे रोग पसरत आहेत. लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात शहरवासीयांना रस्त्यावर उतरावे लागेल.

- ऋषिकेश पगार, पडेगाव

कचऱ्याच्या वाढत्या दुर्गंधीमुळे लहान मुले आजारी पडत आहेत. एक एक पैसा गोळा करून मेहनतीने बांधलेल्या घरात आता राहायलाही नको वाटते आहे. यावर लवकर तोडगा काढला पाहिजे. अन्यथा नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. ते कशापद्धतीने व्यक्त होतील, सांगता येत नाही.

- योगेश पाडळकर, पडेगाव

पडेगाव, मिटमिटा परिसरातील कचरा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ नये म्हणून प्रशासनाने लवकरच काहीतरी पावले उचलावीत. परिसरातील घरांमधील लहान मुले सारखी आजारी पडत आहेत. त्यांच्याकडे तरी पाहावे.

- आशिष कांबळे, पडेगाव

बेगमपुरा भागातील रहिवाशांना कचऱ्याची अक्षरश: सवय झाली आहे. आम्हाला माहित आहे की, महापालिकेचे कर्मचारी रोज कचरा उचलत नाहीत. परिसरात दुर्गंधी पसरते, हे सगळे आम्ही स्वीकारले आहे. वारंवार घरातल्या मुलांना दवाखाना करावा लागतो. ज्येष्ठ आजारी पडतात.

- शुभम पुसे, बेगमपुरा

आमच्या प्रगती कॉलनीतला कचरा गोळा केला जातो. मात्र, हाच कचरा कॉलनीतला मुख्य रस्त्यावर टाकला जातो. त्यामुळे सगळ्या कॉलनीत दुर्गंधी येते. कोणी पाहुणे घरी आले की आम्हालाच लाज वाटते. लहान मुले सारखी आजारी पडत आहेत. सत्ताधारी हा प्रश्न कधी सोडवतील.

- कुणाल गिल, प्रगती कॉलनी

आमच्या घरातला कचरा उचलला जातो. मात्र, घरासमोरच्या गल्लीत असलेला कचरा उचलला जात नाही. त्यामुळे आम्ही त्रस्त आहोत. आता कचरा समस्या निर्माण होऊनही वर्ष पूर्ण होत आले. मात्र, त्यावर अजूनही तोडगा काढण्यात आला नाही. काय सुरू आहे, कळत नाही हो.

- संगीता हिवराळे, जय भीमनगर

गेल्या काही दिवसांपासून आमचा परिसर महापालिकेचे कर्मचारी स्वच्छ करतात. हे चांगले वाटते. मात्र, या पुन्हा खंड पडतो. हे काम सातत्याने व्हायला हवे. नियमितपणे कचरा उचलला जावा. त्याची विल्हेवाट योग्य लावावी. तरच आपले शहर स्वच्छ, सुंदर होईल.

- गौरव जाधव, भडकल गेट

आमच्या परिसरात घंटागाडी नियमित येत नाही. आठ दिवसांतून कधीतरी एकदा ही गाडी येते. त्यामुळे कचरा टाकायचा कुठे, हा प्रश्न निर्माण होतो. अनेकदा लोक रात्री-अपरात्री रस्त्यावरच कचरा टाकतात. त्यामुळे सगळीकडे कुत्रे फिरतात. दुर्गंधी पसरते. हे दुष्टचक्र थांबावे आता.

- कांचन पुसे, बेगमपुरा

आमच्या भागात कचरा संकलनाला पूर्वीपासून काही अडचण नव्हती. सकाळी नियमित घंटागाडी येते. ओला आणि सुका कचरा वेगळा जमा करण्यात येतो. त्यामुळे परिसरात सध्यातरी स्वच्छता आहे. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतात. ते उचलावेत.

- गीता गुणवाणी, नंदनवन कॉलनी

बेगमपुरा परिसरात कचऱ्याचे संकलन रोज करण्यात येते. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याकरिता नागरिकांनीही सहकार्य करणे, पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यांनी ओला कचरा वेगळा जमा करावा आणि सुका कचरा वेगळा जमा करावा. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे जाईल.

- विनायक पांडे, बेगमपुरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसतोड कामगारांच्या मुलांची विमानसफर

$
0
0


आशिष चौधरी, औरंगाबाद
ashish.choudhari@timesgroup.com

पिढ्या न पिढ्या विमानतळही पाहिलेल नाही. ज्यांचे आई-वडिल पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षभर भटकंती करतात अन् कुटुंबाचा चरितार्थ चालवितात अशा कामगारांची मुलं विमानाची सफर करणार आहेत. औरंगाबादपासून पंधरा किलोमीटरवर अंतरावर असलेल्या वरवंडी तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांची ही अभ्यास सहल थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अन् अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत.

औरंगाबादपासून जवळ असलेल्या वरवंडी तांडा गाव तसं २७ कुटुंबाच अन् दोनशे लोकसंख्या असलेलं. गावात सगळी ऊसतोड कामगारच. सरकारी शाळा म्हटले की, नाक मुरडणाऱ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर पूर्वीच चपराक दिलेली आहे. त्याच शाळेतील शिक्षकांनी अन् विद्यार्थ्यांनी एक स्वप्न पाहिलं अन् ते पूर्णत्वास जात आहे. कधी विमानाने प्रवास न केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल थेट मुंबईल जाणार आहे. येत्या २४ ला विमानाने हे विद्यार्थी मुंबईला जाणार आहेत. सहलीचा खर्च पालकांसह शिक्षकांनीही उचलला आहे. शाळेतील शिक्षकांचा प्रयत्न लक्षात घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भेटीसाठी वेळ दिला आहे. ३३ विद्यार्थ्यांचा हा चमू २५ फेब्रुवारी रोजी हे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री, शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत शिक्षणातील बदल, आव्हाने, अडचणी याबाबत संवाद साधतील. त्यांच्यासोबत एक तास संवाद साधणार असून त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. अधिवेशनाचे कामकाज कसे चालते, लोकप्रतिनिधी कशाप्रकारे प्रश्न मांडतात, विधीमंडळातील नियमावली याबाबतची माहिती विद्यार्थी घेणार आहेत. त्यानंतर मंत्रालयातील कामकाजाची ही माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. मंत्रालयातील विभाग, विविध मंत्र्यांची दालने अन् कामकाजाची पद्धत याबाबत ही ग्रामीण भागातील सरकारी शाळेतील विद्यार्थी घेणार आहेत. ३३ विद्यार्थ्यांसह सहा शिक्षकही त्यांच्यासोबत जाणार असून विद्यार्थ्यांमध्ये १८ विद्यार्थिंनीचा समावेश आहे. आकाशातून ऊडणारे विमान पाहणाऱ्या अन् विमानप्रवास ज्यांच्या कुटुंबात माहिती नाही अशा या मुलांमध्ये सहल विमानाने जाणार असल्याने मोठा उत्साह आहे. विद्यार्थ्यांचा हा उत्साह पाहत मुंबईतील निवास अन् तेथील व्यवस्थेसाठी पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांनीही विद्यार्थ्यांना मदत केली.

गुणवत्तेत शाळेचा दबदबा..
शाळेचा प्रवास अतिशय प्रेरणादायी असा आहे. नुकत्याच देशपातळीवरी ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा शाळेतील चार विद्यार्थी पात्र ठरले. मागील वर्षीही चार विद्यार्थी ४८ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. यासह शिष्यवृत्ती परीक्षेत ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. २७ कुटुंबाच्या या गावातील शाळेत जवळपासच्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यामुळे शाळेचा पट १८३ वर पोहचला आहे. त्यासाठी शाळेतील शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेली मेहनत कामी आहे. १५ जून २०१५ रोजी राज्यातील पाच शाळांमधील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. तर, आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आजपर्यंत लोकसहभागातून पाच लाख रुपयांची रक्कम शाळेला जमा करून दिलेली आहे.

आमच्या शाळेतील मुले गुणवत्तेत कोठेच कमी नाहीत. गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून आम्ही विविध उपक्रम राबवितोच त्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांचे एक स्वप्न होते की विमानाने अभ्यास सहल काढण्याचे. त्यानुसार आम्ही प्रयत्न केले आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वेळ दिली. अधिवेशनाचे कामकाज, मंत्रालयातील कामकाज जवळून पाहता येईल. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना भरपूर शिकता येईल.
भरत काळे,
शिक्षक,
जिल्हा परिषद शाळा, वरवंडी तांडा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉर्डाचे ‘नारेगाव’ करू नका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून संकलित केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. विविध वसाहतीत नियमित कचरा संकलित होतो, पण प्रक्रियेअभावी रस्त्यांच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यातून दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी महापालिका प्रशासनाकडे काय आराखडा आहे. किमान शहराचे 'नारेगाव' करू नका असे नागरिकांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील कचराकोंडी कायम असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग कायम दिसत आहेत. घरोघरी तयार होणारा कचरा कुठे टाकणार असा पेच होता. काही ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले. पण, व्यवस्थापन नसल्यामुळे कचराकोंडी सुटली नाही. झोन क्रमांक दोनमध्ये एकूण १२ वॉर्ड आहेत. जवळपास तीन लाख लोकसंख्या असलेले हे वॉर्ड मध्यवर्ती शहरात आहेत. या वॉर्डात चेलीपुरा, काचीवाडा, नवाबपुरा, राजाबाजार, गुलमंडी, नागेश्वरवाडी, औरंगपुरा, गांधीनगर, खोकडपुरा, भवानीनगर, संजयनगर, सिल्लेखाना, समर्थनगर, समतानगर, कोटला कॉलनी, पैठण गेट हा मुख्य परिसर आहे. या भागात फेरफटका मारल्यानंतर अंतर्गत वसाहतीत कचरा दिसत नाही, पण भोवताली कचऱ्याचे ढीग आहेत. समर्थनगर वॉर्ड नीटनेटका आणि स्वच्छ आहे. नियमित स्वच्छतेसाठी हा परिसर परिचित आहेत. पण, विभागीय शासकीय ग्रंथालयाच्या संरक्षक भिंतीजवळ दररोज कचरा टाकण्यात येतो. हा कचरा सायंकाळी इतरत्र हलवला जात आहे. परिणामी, दिवसभर कचराकोंडी होऊन वाहनधारकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. कचरा इतरत्र साठवा, अशी मागणी वारंवार होऊनही त्रास कमी झाला नाही. कोटला कॉलनीत अगदी रहिवाशांचा विरोध असूनही रहिवासी इमारतीलगत कचरा साठवला जात आहे. दोन-चार दिवसांनी कचरा उचलतात. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला, असे रहिवाशांनी सांगितले. क्रांती चौक पोलिस ठाण्याजवळील चौकात आणि पैठण गेट परिसरातील पार्किंगमध्ये दररोज कचरा फेकला जात आहे. हा कचरा कधीतरी उचलला जात असल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. शहर कचरामय झाल्यानंतरही अनेक वसाहतीत नागरिकांच्या सवयीत बदल झाला नाही. दुभाजकावर कचरा फेकून नामानिराळे राहणारे नागरिक प्रशासनाच्या नावाने ओरड करीत आहेत. गांधीनगर, नूतन कॉलनी, सिल्लेखाना या भागात दुभाजकावर कचरा फेकला जात आहे. भवानीनगर, कैलासनगर या दाट वसाहतीतही कचरा प्रश्न कायम आहे. वखारीच्या परिसरात सर्वाधिक कचरा आहे. या वसाहतीत घंटागाड्या नियमित येत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. काही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन कचरा निर्मूलन करण्याबाबत जनजागृती केली. त्यामुळे वॉर्ड कचरामुक्त झाले आहेत. नागेश्वरवाडी, भोईवाडा, राजाबाजार, गुलमंडी, नवाबपुरा भागात तुलनेने अधिक स्वच्छता दिसली. कचरा व्यवस्थापनाचे काम सोपवलेल्या रेड्डी कंपनीचे कामगार कचरा संकलन करीत आहेत. एक रिक्षा, एक कर्मचारी आणि एक हेल्पर अशी रचना असलेले संकलनाचे व्यवस्थापन आहे. मात्र, अधिक वर्दळ असलेल्या वॉर्डात रिक्षांची संख्या वाढवण्याची मागणी आहे. चार रिक्षांची आवश्यकता असलेल्या भागात फक्त दोन रिक्षा असून नियमित काम करीत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

\Bऔरंगपुरा 'डम्पिंग ग्राउंड'

\Bशहरात कचरा समस्या निर्माण झाल्यानंतर प्रत्येक मोकळ्या मैदानाचे 'डम्पिंग ग्राउंड' झाले आहे. औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावर दररोज शेकडो गाड्या कचरा टाकण्यात येतो. परिणामी, मैदानाचे 'डम्पिंग ग्राउंड' झाले असून, दुर्गंधी वाढली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बिकट स्थिती झाल्यामुळे कचरा समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. या ठिकाणी डुकरं, भटके कुत्रे आणि मोकाट जनावरांचा उच्छाद वाढला असून पादचाऱ्यांची गैरसोय झाली आहे. जवळच चार शाळा आणि महाविद्यालय असून विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या मैदानावर कचरा का साठवता याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. भाजी मंडई येथील सुराणा बिल्डींगलगतच्या नाल्यातही कचरा टाकण्यात येतो.

\Bकचरा संकलनाचे नियोजन करा\B

कचरा प्रक्रिया केंद्र उपलब्ध नसल्यामुळे कचऱ्याची समस्या संपली नसल्याचे पाहणीत आढळले. कचरा समस्येची वर्षपूर्ती असल्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल याची महापौर, आयुक्त व इतर पदाधिकाऱ्यांना पुरेशी कल्पना आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून कचरा संकलन वाढवले आहे. पण, प्रक्रियेचा प्रश्न कायम असल्याने कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार असा पेच आहे. महापालिकेने कचरा संकलन करणारे कामगार कमी केले आहेत. कंपनीच्या कामगारांमार्फत कचरा उचलत आहेत. पण, कामाचे योग्य नियोजन अपेक्षित आहे. सध्या प्राथमिक पातळीवर असलेले नियोजन कचरा हटविण्यात कमी पडले आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिका प्रशासन पुरेसे लक्ष देत नसल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे.

सद्यस्थितीत एका वॉर्डात चार घंटागाड्या आवश्यक आहेत. कचराकुंड्या पुन्हा सुरू झाल्यास हटवणे शक्य होणार नाही. त्यामुळे कचरा व्यवस्थापनात प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे. नागरिकांचे सहकार्य असल्यामुळे वॉर्ड कचरामुक्त ठेवणे शक्य झाले.

- कीर्ती शिंदे, नगरसेवक, नागेश्वरवाडी वॉर्ड

औरंगपुरा, कुंभारवाडा, भाजी मंडई भागात नियमित रिक्षा सुरू झाल्यामुळे पूर्वीपेक्षा कचरा समस्या कमी झाली. मात्र, तरीही नीट व्यवस्थापन करावे. दिवसातून दोन वेळेस कचरा गोळा करण्याची गरज आहे. कचरा आणि फेकलेल्या भाज्यांची विल्हेवाट लावणे आव्हानात्मक आहे.

- अॅड. नूतन जैस्वाल

दिवसातून दोन वेळेस कचरा उचलण्याची गरज आहे. नागरी वसाहतीतून कचरा उचलला जात असला तरी अंतर्गत भागात साठवतात. परिणामी रोगराई पसरण्याची भीती आहे. रासायनिक प्रक्रिया करून योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावावी. अन्यथा, शहरात ठिकठिकाणी 'नारेगाव' तयार होईल.

- राजीव जावळीकर

ऐतिहासिक औरंगाबाद शहरात कचरा समस्येवर जास्त चर्चा सुरू आहे. झोपडपट्टी भागात तर कचऱ्याचे ढिगारे आहेत. या समस्येला प्रशासन आणि नागरिक सारखेच जबाबदार आहेत. 'आपला कचरा आपली जबाबदारी' याचे भान नाही. यातून आजाराची भीती वाढली आहे.

- खान अलमास अंजुम

शहरात अनेक रस्त्यावर, रस्त्याच्या दुतर्फा कचरा उडताना दिसतो. बाहेरील शहरातून आलेल्या नागरिकांच्या मनात काय प्रतिमा तयार होत असेल? आपल्या शहराची प्रतिमा उजळ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

- कोमल पोळ

औरंगाबाद शहरात कचरा साठण्याच्या घटनेला एक वर्ष होत आहे. तरीसुद्धा कचरा समस्या पूर्णपणे हटविण्यात यश आले नाही. पायाभूत सुविधा पुरविण्यात प्रशासनाने अधिक जागरुक राहिले पाहिजे. नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करुन योग्य ठिकाणी कचरा टाकावा.

- राहुल बनसोड

पर्यटननगरी औरंगाबाद शहराची प्रतिमा कचरानगरी झाली आहे. वर्षभरानंतरही कचरा साचलेला दिसतो. मुख्य रस्त्यांच्या बाजूला कचऱ्याचे ढीग दिसतात, तेव्हा वाईट वाटते. वॉर्डाच्या नियोजनात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा.

- अजय भुजबळ

शहराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी खर्च करण्यात आला. कचरा व्यवस्थापनासाठी पुरेसा खर्च नियोजन करुन झाला असता तर कचऱ्याची समस्या निर्माण झाली नसती. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद शहर कचऱ्याने पूर्ण वेढलेले असणे निश्चित खेदजनक आहे.

- अभिलाषा शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धम्माल, मस्ती अन् जल्लोष...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धम्माल, मस्ती आणि जल्लोषपूर्ण वातावरणात औरंगाबादकरांनी 'हॅपी स्ट्रीट'चा रविवारी आनंद लुटला. 'महाराष्ट्र टाइम्स'ने उपलब्ध करून दिलेल्या या पर्वणीत बच्चे कंपनीपासून, आजी-आजोबांपर्यंत सर्वांनीच सहभागी होत एक वेगळा अनुभव घेतला. प्रत्येक रविवारी अशीच धम्माल करण्यासाठी 'मटा'ने हॅपी स्ट्रीटचे नियमित आयोजन करावे, अशी सादही यावेळी त्यांनी घातली.

\Bचाय पे चर्चा, झुंबा डान्स, लोकप्रतिनिधींचे गायन\B

'हॅपी स्ट्रीट'चा आनंद घेण्यासाठी औरंगाबादकरांसह आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, सतीश चव्हाण आणि इम्तियाज जलील हेही उपस्थित होते. औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर हे लोकप्रतिनिधी झुंबा डान्सवर थिरकले. झुंबा डान्स शिकण्यासाठी तुम्हाला उत्तम डान्स आलाच पाहिजे, अशी कोणतीच अट नाही. हा एक प्रकारचा फिटनेससाठी व्यायाम प्रकार असल्याचे त्यांनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले. त्यानंतर सावे, चव्हाण, शिरसाट व जलील यांनी 'चाय पे चर्चा' केली. देवगिरी कॉलेजच्या म्युझिकल क्लबला त्यांनी भेट दिली. गायकांनी सादर केलेल्या गाण्यांना त्यांनी दाद दिलीच, सोबत गायनाची हौसही त्यांनी पूर्ण केली. प्रारंभी आमदार सावे यांनी 'कभी कभी मेरे दिल मे' हे गाणे सादर केले. त्यानंतर ~है अपना दिल तो आवारा', 'न जाने किस पे आयेगा' ही गाणी आमदार जलील, सावे यांनी गायकासमवेत सादर केली. त्यावेळी जलील यांनी आमदार शिरसाट यांच्याकडे गाण्याचा आग्रह धरताच उपस्थितांनी मोठी दाद दिली. 'क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें' हे गाणे सादर केले. त्याला सर्व आमदारांनीही साथ दिली. एवढेच नव्हे तर त्यावेळी आमदार चव्हाण यांनी आमदार जलील यांच्याकडे पहात हे गाणे सादर केल्याने जलील यांनी कोणते वचन पूर्ण केले नाही, असा प्रश्न अनेकांना पडला. उपस्थितींनी आपल्या या लोकप्रतिनिधींच्या या कला सादरीकरणा भरभरून दाद देत आनंद लुटला.

आमदार सावे, जलील, शिरसाट आणि चव्हाण यांनी हॅपी स्ट्रीटमधील विविध क्रीडा प्रकार, पारंपारिक खेळाचाही नागरिकांसमवेत आनंद लुटला. आपल्या आमदारांना क्रिकेट, बॅडमिंटन खेळताना, गाणे गाताना; तसेच झुंबा डान्स करताना पाहून हा क्षण आपल्या कॅमेरात कैद करण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही, तर अनेकांनी या लोकप्रतिनिधींसह सेल्फी घेतली.

\Bबॉक्सिंग, स्वीसबॉल, स्पॉट रनिंग

\Bआगळी वेगळी पर्वणी असलेल्या या हॅपी स्ट्रीटमध्ये नागरिकांना व्यायाम, फिटनेसची गोडी लागावी, यासाठी अल्टिमेट लाइफ स्टाइलच्या सदस्यांनी खास प्रयत्न केले. ट्रेनर रिझवान हाश्मी, शेख हबीब, अब्दुल रेहमान; तसेच त्यांच्या सहकार्यांनी व्यायामासाठीच्या विविध साहित्याची मांडणी केली होती. त्यात सँडबॅग, स्किपिंग रोप, केटल बेल, स्वीस बॉल, बुलजेरियन बॅक, स्टायपर, टायर पुलिंग, स्पॉट रनिंग वॉल बॉलचा समावेश होता. हॅपी स्ट्रीटचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या बच्चेकंपनीपासून अगदी आजी-आजोबापर्यंत अनेकांनी व्यायामासाठीचे हे वेगवेगळे साहित्य हाताळण्याचा प्रयत्न केला. ट्रेनिंग देण्यामध्ये शेख माजेद, सय्यद शोयब, सय्यद शेख, शेख तारेख, शेख फैसल यांचा पुढाकार होता.

\Bपथनाट्यातून प्रबोधन\B

एन-नऊ, सिडको परिसरातील अभिश्री ग्रुपच्या कलाकरांनी संदीप लोखंडे लिखित बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या आणि महिला सक्षमीकरण या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले. तेजस्विनी ग्रुपच्या सदस्यांनी महिला सुरक्षा व समानता या विषयावर सुरेख पथनाट्य सादर करत उपस्थितांचे प्रबोधन केले. अंजली अयाचित, अंबिका राऊत, श्रद्धा वाघचौरे, शीतल सुरडकर, पूजा राठोड, गीता राऊत आदींनी यात सहभाग घेतला होता. या दोन्ही पथनाट्यास औरंगाबादकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे कौतुक केले.

\B'देवगिरी'चा म्युझिकल क्लबच्या कलाकारांनी केले बेधुंद\B

देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत म्युझिकल क्लब स्थापन केला आहे. या क्लबच्या सदस्यांनी हॅपी स्ट्रीटमध्ये मराठी, हिंदी चित्रपटातील 'है अपना दिल तो आवारा' यासह एकापेक्षा एक सरस गीते सादर केली. अनेक रसिकांनाही गाणे गाण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी थेट व्यासपीठवर जाऊन गायकांना साथ देत गायन सादर करण्याची इच्छाही पूर्ण केली. त्यात एका वयोवृद्ध जोडप्याने सादर केलेल्या गाण्यास सर्वांनी टाळ्या वाजवत मोठी दाद दिली. कार्यक्रमाच्या शेवटी गायकांनी सादर करण्यात आलेल्या 'झिंग झिंग झिंगाट' गाण्यावरच सारेच थिरकलेही. सिद्धेश दाफणे, समीर जोशी, आदित्य गायकवाड, अद्वैत देशपांडे, श्रेया देशपांडे, संजना कासलीवाल, कृणाल वानखेडे, पंकज गवई, पार्थ मसलेकर, श्रवण इनामदार, मयुरी लहाने आदी गायक व वादकांनी आपली कला येथे सादर केली.

\Bवुमन रॅलीसाठी नोंदणी\B

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त 'ऑल वुमन पॉवर रॅली'चे आयोजन केले जाते. या 'रॅली'साठीची नोंदणी 'हॅपी स्ट्रीट'च्या माध्यमातून सुरू करण्यात आली. नोंदणीला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. नोंदणी करणाऱ्यांमध्ये तरुणींची संख्या अधिक होती.

\Bरांगोळ्यातून प्रबोधन\B

रांगोळी कलेच्या माध्यमातून निकीता तांबे, श्रद्धा सोनवणे, विजयश्री लोखंडे, निकीता देसले यांनी मुलगी वाचवा, स्त्री भ्रूणहत्या; तसेच पाणी वाचवा आदी संदेश देत नागरिकांचे प्रबोधन केले.

\Bक्रिक्रेट, बॅडमिंटनसह लगोरचा\B

सँडबॅग, स्किपिंग रोप, केटल बेल व्यायामासाठीचे हे वेगवेगळे साहित्य हाताळण्याचा प्रयत्न केल्यानंतर औरंगाबादकांनी पारंपारिक खेळाचाही आनंद लुटला. यामध्ये दोरीवरच्या उड्या, गोट्या, लगोरचा समावेश होता. क्रिकेट, बॅडमिंटन, स्केटिंग हे खेळ खेळण्याचा आनंद देखील उपस्थितांनी लुटला. सकाळच्या वातावरणामध्ये सायकलिंगचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक सायकलस्वार 'हॅपी स्ट्रीट'मध्ये सहभागी झाले होते. यात औरंगाबाद जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे डॉ. सुजीत खाडे व त्यांच्या सहकार्यांनी यावेळी नागरिकांना मार्गदर्शन केले, तर काही लोकांनी अनेक दिवसांपासून सायकल चालविली नसल्याने रविवारी सायकल चालविण्याची संधी घेतली. तर अनेक लहान मुलांनी त्याची आवडती सायकल सोबतच आणली होती.

\Bरचितने दिली इतरांनी प्रेरणा\B

जिद्द व संघर्ष करत आनंदी जीवन जगणाऱ्या रचित कुलश्रेष्ठ या पुण्याच्या युवक सायकलिंग यात्रेनिमित्ताने शहरात आला. 'हॅपी स्ट्रीट'ची माहिती मिळताच तो डॉ. सुजीत खाडे यांच्या समवेत यात सहभागी झाला. वयाच्या पाचव्या वर्षी कर्करोग त्याला जडला. एक हात त्यास गमवावा लागला, मात्र त्याने जिद्द कधी सोडली नाही आणि कर्करोगाला पराभूत केले. कठोर परिश्रमाच्या जिद्दीवर त्याने नुकतीच सहा दिवसांत ६०० किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा पूर्ण केली. क्रिकेट, टेबल टेनिसमध्येही अव्वल असलेल्या या रचित कुलश्रेष्ठने 'हॅपी स्ट्रीट'मधील सहभागी नागरिकांना सायकलिंगचे महत्त्व पटवून देत प्रेरणा दिली.

\Bझुंबावर थिरकले औरंगाबादकर\B

'हॅपी स्ट्रीट'मध्ये पारंपारिक खेळासोबतच आकर्षण ठरले ते झुंबा डान्स. हा झुंबा डान्स शिकण्यासाठी तुम्हाला उत्तम डान्स आलाच पाहिजे अशी कोणतीच अट नाही. तर हा एक प्रकारचा फिटनेस डान्स आहे. डान्सला जर झुंबाची जोड मिळाली तर आनंद हा द्विगुणीत झाल्याशिवाय राहत नाही आणि याचाच अनुभव औरंगाबादकरांनी 'हॅपी स्ट्रीट'मध्ये घेतला. लॅटीन अमेरिकन डान्स पद्धत असलेल्या या झुंबा नृत्यप्रकारामध्ये लॅटीन, पॅपे नंबर्स सोबतच ट्रेडिंग साँग वाजविण्यात आले. यामध्ये अनेक बॉलिवूड; तसेच हॉलिवूडच्या चित्रपटांमधील गाण्यांचा समावेश होता. अल्टिमेट ट्रेनर्स ग्रुपने सादर केलेल्या या डान्स प्रकारामध्ये जान्हवी जाजू, प्रणाली अंभोरे, ऋत्विका गायकवाड, वृषाली, उत्कार्षा या ट्रेनर्सचा सहभाग होता. दिलखेचक गाण्यांवर तरुणाईने झुंबा डान्सचा आनंद घेतला. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी यामध्ये सहभागी होत एक वेगळा अनुभव घेतला. प्राजंली कागवटे हिनेही हॉलीवूड-बॉलीवूडच्या गाण्यावर दिलखेचक झुंबा नृत्याचा आनंद लुटण्यास औरंगाबादकांना भाग पाडले. सळसळता उत्साह असणाऱ्या तरुणाईने; तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी झुंबाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या जोशपूर्ण वातावरणात धमाल मजा करत आपला आनंद लुटला.

\Bआकर्षण विंटेज कारचे\B

सुरेंद्रसिंह (लाला) चौहान आणि डॉ. रमेश मालाणी यांच्या विंटेज कारने साऱ्यांनाच आकर्षित करून घेतले होते. १९२८मधील फोर्ड टी मॉडेल, स्पोक व्हील असलेल्या या गाडी भोवती उपस्थितांनी गराडा घालत गाड्याविषयी माहिती जाणून घेतली तर अनेकांना गाडीत बसण्याचा व स्लेफी काढण्याचा मोह आवरता आला नाही. या गाडीला मॅकेनिकल ब्रेक असल्याने ब्रेक केल्यानंतर गाडी थोडी उशिराने थांबते. यामुळे या गाडीला १४ हॉर्न बसवण्यात आले आहेत. या गाडीबद्दल चौहान उपस्थितांना अभिमानाने माहिती देत होते. या शिवाय डॉ. मालाणी यांची १९४६मधील शेवरोले फ्लिटमास्टर ही कनव्हर्टिबल गाडीही हॅपी स्ट्रीटमध्ये खास आकर्षणाचा विषय होता. आकर्षक रंग आणि अत्यंत सुस्थितीत ठेवलेल्या या विंटेज कारसोबत सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. सायमन आव्हाड यांची लँडरोव्हर ही १९७३ ची गाडी देखील 'हॅपी स्ट्रीट'मध्ये सहभागी झाली होती.

\Bसेल्फी पॉइंटवर झुंबड\B

व्हिंटेज कार सोबतच 'मटा'च्या सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. सकाळपासून फोटो घेण्याचा हा धडाका हॅपी स्ट्रीट संपेपर्यंत सुरुच होता. तरुण, तरुणी, महिलांसह बच्चे कंपनी; तसेच विविध ग्रुप, मित्र- मैत्रिणी तसेच हॅपी स्ट्रीटमध्ये एकत्र आलेल्या कुटूंबांनाही मटाच्या सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

\Bसिटी बसची सेवा\B

हॅप्पी स्ट्रीटसाठी शहराच्या विविध भागातून असंख्य नागरिक आले होते. कार्यक्रमानंतर त्यांना जाण्यासाठी खास शहर बससेवेची सोय करण्यात आली होती. दरम्यान, या नव्या बसला लुक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बसमध्ये बसून अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमेरात कैद केला.

सायकल यात्रेनिमित्ताने औरंगाबादेत आलो असता 'मटा'च्या या उपक्रमबाबत माहिती समजली. यात सहभागी होऊन खंरच खूप मज्जा आली. नियमित सायकलिंगचे महत्त्व लोकांना शेअर करता आले. 'मटा'ने हा उपक्रम असाच नियमित ठेवावा, फिटनेसबाबत अधिक जागरुकता निर्माण होण्यास मदत मिळेल.

- रचित कुलश्रेष्ठ, सायकलपटू

'मटा'चा उपक्रम असलेला 'हॅपी स्ट्रीट'मध्ये खूप धम्माल करता आली. सायकलिंग, क्रिकेटचा आनंद लुटता आला. आमचा रविवार खऱ्या अर्थाने आनंदीमय झाला. बाबांनीही माझ्यासोबत झुंबा डान्स केला

- आमोद लिंगायत, विद्यार्थी

म्युझिकल क्लबची सदस्य म्हणून 'मटा'च्या या उपक्रमात आम्हाला कला सादर करण्याची संधी मिळाली. औरंगाबादकरांनी मोठा प्रतिसाद दिला. 'मट'चे व रसिकाचे खूप खूप धन्यवाद.

- श्रेया देशपांडे, विद्यार्थिनी

'हॅपी स्ट्रीट' या 'मटा'च्या उपक्रमामुळे उपस्थिती सर्व औरंगाबादकरांचा रविवार आनंदी झाला. कलाकारांनाही आपली कला दाखविण्यासाठी एक व्यासपीठही यानिमित्ताने मिळाले आहे.

- जयश्री जाधव, विद्यार्थिनी

आमच्या म्युझिकल क्लबच्या सर्व सदस्यांनी धम्माल केली. आम्ही सादर केलेल्या प्रत्येक गाण्यास रसिकांची मोठी दाद मिळाली. 'मटा'ने एक व्यासपीठ करून दिल्याबद्दल धन्यवाद.

- समीर जोशी, विद्यार्थी

झुंबा डान्स, पारंपारिक खेळ, योगा यासह बरेच काही धम्माल करण्यासाठी 'हॅप्पी स्ट्रीट' या उपक्रम होते. खूप मज्जा आली.

- संजना कासलीवाल, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रेकर आज रुजू होणार

$
0
0

म. टा .प्रतिनिधी, औरंगाबाद

आपल्या बेधडक कार्यपद्धतीने प्रशासनात वेगळा ठसा उमटवलेले सुनील केंद्रेकर हे सोमवारी (११ फेब्रुवारी) विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रेकर यांची शुक्रवारी विभागीय आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली, तर डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे क्रीडा आयुक्तपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. केंद्रेकर हे सोमवारी दुपारनंतर आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images