Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सहा महिने केवळ स्तनपान करणाऱ्या माता ३८ टक्केच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाळाच्या जन्मानंतर सहा महिने बाळाला केवळ स्तनपान (एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग) करणाऱ्या ग्रामीण मातांचे प्रमाण हे फक्त ३८ टक्के आहे आणि त्यामागे मातांना करावे लागणारे भरपूर कष्ट, पौष्टिक आहाराचा अभाव, अंधश्रद्धा आदी कारणे असल्याचे घाटीत आलेल्या दीड हजार मातांच्या सर्वेक्षणावरुन स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास व संशोधन दिवी सिंग या घाटीची विद्यार्थिनीने केला असून, तिच्या संशोधन निबंधाची भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) केली आहे. तसेच इतर तीन विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधांचीही 'आयसीएमआर'ने निवड केली असून, अधिष्ठाता डॉ. कानन ये‌ळीकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

पदवीपूर्व विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी उत्तेजन मिळावे, या हेतुने दरवर्षी 'आयसीएमआर'कडून अखिल भारतीय पातळीवर शोधनिबंध स्पर्धा घेतली जाते. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) दिवी सिंग (नवजात अर्भक वैद्यकशास्त्र विभाग), सोहम बरकुले (जनवैद्यक औषधशास्त्र), दिव्यांशी बजाज (नवजात अर्भक वैद्यकशास्त्र विभाग) व विधी मालु (शरीरशास्त्र) या चार विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधांची निवड करण्यात आली आहे. दिवी सिंग या विद्यार्थीनीने स्तनपानविषयी संशोधन केले व केवळ ३८ टक्के महिलाच स्तनपान करत असल्याचे समोर आणले. नवजात शिशुशास्त्र विभागाचे प्रमुख एल. एस. देशमुख यांनी दिवी सिंग हिला मार्गदर्शन केले. सोहम बरकुले या विद्यार्थ्याने 'शेतकऱ्यांच्या ताणतणावाचे कारण व ताण वाढविणारे घटक' यावर अभ्यास केला आणि वाढते कुटुंब व घटते उत्पन्न हेच ताणामागचे मुख्य कारण असल्याचे नमूद केले. जनऔषध वैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. मोहन डोईबळे, डॉ. स्मिता अणदुरकर यांचे सोहम याला मार्गदर्शन लाभले. नियमित औषधी, व्यायाम व आहारामुळेच दुसऱ्या प्रकारचा मधुमेह नियंत्रणात राहतो, असे संशोधन विधी मालू हिने आपल्या निबंधात मांडले. तिला शेख साजिया मसूर यांचे मार्गदर्शन लाभले. दिव्यांशी बजाज हिने 'मातांमध्ये कमी वजनाच्या बाळाची काळजी घरी कशी घ्यावी' यावर संशोधन केले. त्यांना सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल जोशी यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील ज्येष्ठ नागरिकांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून, एका घटनेत मोबाइल हिसकावून नेला, तर दुसऱ्या घटनेत मिलकॉर्नर येथून दहा हजार रुपये लांबवले.

पहिली घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील पेशवा हॉटेलच्या कोपऱ्यावर घडली. या ठिकाणी कन्हैयालाल ईश्वरलाल दयालानी (वय ६१, रा. वेदांतनगर) हे मोबाइलवर बोलत जात होते. यावेळी दुचाकीवर दोन चोरटे पाठीमागून त्यांच्या जवळ आले. त्यांना तोंडाला काळ्या रंगााचा कपडा बांधला होता. यापैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने दयालानी यांच्या हातातील मोबाइल हिसकावून दोघे पसार झाले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत मंगळवारी दुपारी बारा वाजता मिलकॉर्नर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून नानूबाई सुंदरलाल तांबे (रा. हर्सूल, चेतनानगर) यांनी दहा हजार आठशे रुपये काढून पिशवीत ठेवले. ही पिशवी कंबरेला खोचून ठेवली. चोरट्याने त्याची ही पिशवी लंपास केली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडोबा मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा येथील श्री खंडोबा मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

श्री खंडोबा मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत ठेवला होता. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. शिंदे यांनी प्रस्तावात म्हटले आहे की, सातारा परिसरात खंडोबाचे ऐतिहासिक मंदिर आहे. १७६६मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरते. या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. मात्र, या मंदिराचा विकास अद्यापही करण्यात आलेला नाही. त्यामुळे मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा. जेणेकरून शासनातर्फे या तीर्थक्षेत्राचा विकास केला जाईल. पर्यटकांची व भाविकांची संख्या देखील वाढेल. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करून तो शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात यावा. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मंजूर केलेला प्रस्ताव आता पालिका प्रशासनातर्फे शासनाला सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता करात वाढ नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरवासीयांसाठी एक आनंदाची बातमी. मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे २०१२पासून पालिकेने या करात कोणतीही वाढ केली नाही.

मालमत्ता कर आकारणीचा प्रस्ताव फेब्रुवारी अखेरपर्यंत स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत मंजूर झाला पाहिजे असा नियम आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आठ फेब्रुवारी रोजीच्या स्थायी समितीच्या बैठकीत मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी तो सर्वसाधारण सभेकडे पाठवला. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव ठेवला होता. प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. माजी सैनिकाच्या एका मालमत्तेला मालमत्ता करात शंभर टक्के सूट दिली जाईल, असे महापौरांनी सांगितले.

\Bवाजपेयींचे स्मारक उभारणार

\Bमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक औरंगाबादमध्ये उभारण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या स्मारकासाठी महापालिकेची किंवा शासनाची पाच एकर जागा निश्चित करावी. स्मारकाच्या कामासाठी २५ कोटींची मागणी राज्य शासनाकडे करावी, असा उल्लेखही प्रस्तावात होता. त्यालाही सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक राजू शिंदे, गजानन बारवाल हे या प्रस्तावाचे सूचक असून सभागृहनेते विकास जैन, माजी महापौर त्र्यंबक तुपे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ प्रस्तावाचे अनुमोदक आहेत.

\Bओबेरॉय यांचा अर्धाकृती पुतळा

\Bमाजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते मनमोहनसिंग ओबेरॉय यांचा उस्मानपुरा येथील गोपाळ टी चौकात अर्धाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. नगरसेवक गजानन बारवाल यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. जिल्हाधिकारी यांची परवानगी आणि पोलिस आयुक्तांचे नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याच्या अटीवर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ओबेरॉय परिवार हा पुतळा उभारणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९१ उमेदवारी अर्ज सिल्लोडमध्ये बाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

नगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. यात तब्बल ९१ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. यात नगराध्यक्षपदाचे सहा, तर गरसेवकपदाच्या ८५ अर्जांचा समावेश आहे. अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख सोमवार (१८ फेब्रुवारी) आहे. त्यानंतरच रिंगणात किती उमेदवार राहतील, हे स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी २६, तर नगरसेवकपदासाठी २२०, असे एकूण २४६ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी २०, तर नगरसेवकपदासाठी १३५, असे एकूण १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहे. निवडणूक निरीक्षक महेंद्र हारपाळकर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रैवार, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार किरण कुळकर्णी, संजय सोनवणे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाइन शॉपमध्ये ३३ लाखांचा गैरव्यवहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाइन शॉपच्या व्यवस्थापनाचे काम दिलेल्या व्यवस्थापकाने ३३ लाख ६७ हजार २२३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणात आरोपी व्यवस्थापक अक्षय अरविंद सबनीस याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. दिग्रसकर यांनी फेटाळला.

या प्रकरणी प्रशांत तेजराव वाघ (३३, रा. म्हाडा कॉलनी, सिडको) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादी हा अमरदिपसिंग त्रिलोकसिंग सेठी यांच्या सिडको एन तीन परिसरातील 'सत्यम स्पिरिट प्रायव्हेट लिमिटेड' येथे लेखापाल म्हणून काम करतो. 'सत्यम'मार्फत परवानाधारक दारुच्या दुकानांना मद्याचा पुरवठा केला जातो. अमरदिपसिंग सेठी यांचे मित्र अनिल प्रल्हाद नागराणी व किशोर मार्तंड कळकर (रा. भुसावळ, जि. जळगाव) यांच्या मालकीच्या देवळाई परिसरातील 'थ्री स्टार वाइन शॉप'चे व्यवस्थापन करण्याची विनंती नागराणी व कळकर यांनी सेठी यांना केली. त्यामुळे सेठी यांनी त्यांच्याकडे कामाला असलेला आरोपी अक्षय अरविंद सबनीस (२३, रा. सातारा) याच्याकडे 'थ्री स्टार'च्या व्यवस्थापनाचे काम दिले. त्यानंतर आरोपी अक्षय याने मद्यविक्रीचा वेळोवेळी हिशेब दिला. तसेच सहा एप्रिल २०१८ ते २५ डिसेंबर २०१८ पर्यंतचे पैसेही सेठी यांना दिले. मात्र नंतरचे पैसे दिले नाही. त्यामुळे सेठी यांनी अक्षय याला अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचे दोन्ही दूरध्वनी क्रमांक बंद होते. हिशेबाची तपासणी केली असता, अक्षय याने ३३ लाख ६७ हजार २२३ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिल्यावरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी अक्षय याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असता, आरोपीकडून अपहाराची रक्कम जप्त करणे बाकी असून, आरोपीला कोणी-कोणी मदत केली, याचा तपास करणे बाकी आहे. तसेच आरोपीकडून हिशेबाचे रजिस्टर जप्त करणे बाकी असल्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळवून नेऊन बलात्कार; आरोपीस ठोकल्या बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणात आरोपी अमोल सीताराम चव्हाण याला मंगळवारी (१२ फेब्रुवारी) अटक करून बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (१८ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी दिले.

इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीच्या पित्याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आठ फेब्रुवारी २०१९ रोजी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पुणे जिल्ह्यातील भाबोली येथून संबंधित मुलीसह आरोपी अमोल सीताराम चव्हाण (२६, रा. भीवधानोरा, ता. गंगापूर, जि. आरोपी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी मुलीने दिलेल्या जबाबानुसार, आरोपी अमोल हा मुलीच्या भावाचा मित्र होता व खेळाच्या निमित्ताने त्याचे पीडितेच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे त्याच्यासोबत ओळख झाली होती व ओळखीतून मैत्रीत व मैत्रीतून प्रेमात रुपांतर झाले होते. आरोपीने मुलीला एक छोटा मोबाइलही दिला होता व दोघांचे फोनवर बोलणे होत होते. सहा फेब्रुवारी रोजी आरोपीने मुलीला फोन करून 'पळून जाऊन लग्न करू' असे सांगितले व त्यासाठी सात फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजता विशिष्ट ठिकाणी बोलावले. मुलगी तिथे आली असता जीपमध्ये आलेला आरोपी हा मुलीला पुण्यात घेऊन गेला व भाबोली (चाकण) येथे आधीच बघून ठेवलेल्या खोलीत आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. दुसऱ्या दिवशीही अत्याचार केल्याचा जबाब मुलीने दिल्यावरून भादंवि ३७६, ३६६, ३६६ (अ), ३६३ सह पोक्सो व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

साथीदारांचा शोध सुरू

प्रकरणात आरोपीला अटक करून कोर्टात हजर केले केले असता, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का, याच्या तपासासह आरोपीने पीडित मुलीला कुठे-कुठे नेऊन तिच्यावर अत्याचार केला, त्या ठिकाणी जाऊन तपास करावयाचा आहे. तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणीही करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अजित अंकुश यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालिका आयुक्त हाजीर हो’; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सलीम अली सरोवराला जैवविविधता वारसास्थळ म्हणून जाहीर करावे, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेत महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी खंडपीठात हजर व्हावे, असे आदेश न्या. संभाजी शिंदे व न्या. आर. जी. अवचट यांनी दिले.

सलीम अली सरोवर संवर्धन समितीचे समन्वयक अरविंद पुजारी यांनी ही याचिका २०१३ मध्ये दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत वेळोवेळी पालिकेच्या भूमिकेवर कोर्टाने कडक ताशेरे ओढले होते. औरंगाबाद खंडपीठाने दोन जानेवारी २०१४ रोजी जैवविविधता कमिटी नेमली. सरोवरातील जैव विविधतेच्या संवर्धनासंदर्भात शिफारशींसह दोन महिन्यांत राज्य शासनास अहवाल सादर करावा, असे आदेश या समितीला देण्यात आले होते. या सरोवराला बाधा येईल, असे कोणतेही काम करू नये, असा अंतरिम आदेश खंडपीठाने ऑक्टोबर २०१३ मध्ये दिला होता. हे आदेश आजही लागू आहेत. सरोवरातील जैवविविधतेचे रक्षण करण्याआधी पालिका सरोवर परिसरात बांधकाम करून ते नष्ट करीत असल्याचा आक्षेप समितीतर्फे घेण्यात आला आहे. राज्य जैवविविधता मंडळाने औरंगाबाद महापालिका आयुक्तांना मार्च २०१३ मध्ये समिती स्थापन करण्यास सांगितले होते. महापालिका हद्दीतील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे समजली जाणारी ठिकाणे शोधून त्यांच्या शाश्वत व्यवस्थापनासंबंधी आराखडा तयार करण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली होती. पालिकेने समिती स्थापन करण्यासंबंधी गांभीर्य घेतले नव्हते. हे सरोवर औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. या सरोवरात देश-विदेशातून १९६ प्रकारचे पक्षी येतात. यामुळे या तलावाला वेगळेच महत्त्व आहे. या सरोवरात ड्रेनेजचे पाणी सोडले जात असल्यामुळे तलावातील जीवजंतू, मासे व त्यावर अवलंबून असणाऱ्या पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

८ जानेवारी २०१४ च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळेच सध्याचे पालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना शुक्रवारी खंडपीठात हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेची सुनावणी १५ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. याचिकाकर्त्यांची बाजू महेश भारस्वाडकर यांनी मांडली. पालिकेतर्फे राजेंद्र देशमुख, आनंद कुलकर्णी तर राज्यशासनातर्फे एस.बी. यावलकर यांनी काम पाहिले.

आदेशाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

या जैवविविधता समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश असावा. तसेच कायद्याप्रमाणे ही समिती असावी, असे आदेशात म्हटले होते. त्यात जीवशास्त्र, वन आणि मासे या क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असावा, असेही ८ जानेवारी २०१४ च्या आदेशामध्ये म्हटले होते. ही समिती दोन महिन्यांत अहवाल तयार करून तो राज्यशासनाकडे पाठवेल, असे या आदेशात म्हटले होते. राज्यशासनाने हा अहवाल प्राप्त होताच तो दोन महिन्यांत केंद्र शासनाकडे पाठवावा, असेही या आदेशात म्हटले होते. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लिफ्ट देऊन वृद्धेचे दागिने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

'आजी माझ्या मोटारसायकलवर बसा, मी तुम्हाला तुमच्या घरी डोंगरगावला सोडतो,' असे म्हणत एका दुचाकीस्वार भामट्याने आजीला पालफाटा परिसरात नेऊन तिच्या कानातील पाच ग्रॅमच्या बाळ्या, तीन ग्रॅमची सोन्याची पोत व सोन्याचे मणी हिसकावून पोबारा केला. ही घटना मंगळवारी (१२ फेब्रुवारी) घडली. यात रुख्मणबाई रंगनाथ भोपळे (वय ७५) यांचे २४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव कवाड येथील रुख्मणबाई रंगनाथ भोपळे या दवाखान्याच्या कामानिमित्त फुलंब्री येथे आल्या होत्या. दवाखान्याचे काम आटोपल्यानंतर फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावर गाडेकर हॉस्पिटलमोर दुपारी दोन वाजेच्या सुमारास रिक्षाची वाट पाहत असताना एक अनोळखी दुचाकीस्वार येऊन त्यांच्यासमोर थांबला. 'मी डोंगरगावला जात आहे. तुम्हाला तुमच्या घरी सोडतो,' असे त्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन रुख्मणबाई या त्या अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीवर बसल्या. पुढे पाल फाटा परिसरातील जंगल भागात दुचाकी उभी करून त्याने त्यांच्या गळ्यातील दागिने बळजबरीने काढून घेतले व त्यांना तेथेच सोडून पळ काढला. कानातील बाळ्या ओढल्याने त्यांच्या कानास दुखापत झाली आहे. त्यावेळी रुख्मणबाई यांनी आरडाओरड केली पण, आसपास कोणीच नव्हते. रुख्मणबाई भोपळे यांनी नातू मंगेश रघुनाथ भोपळे यांना ही घटना सांगितली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातवाने आजीला घेऊन फुलंब्री पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव हे करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेष्ठाचा मोबाइल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील जेष्ठ नागरिकांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून, एका घटनेत मोबाइल हिसकावून नेला, तर दुसऱ्या घटनेत मिलकॉर्नर येथून दहा हजार रुपये लांबवले.

पहिली घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील पेशवा हॉटेलच्या कोपऱ्यावर घडली. या ठिकाणी कन्हैयालाल ईश्वरलाल दयालानी (वय ६१, रा. वेदांतनगर) हे मोबाइलवर बोलत जात होते. यावेळी दुचाकीवर दोन चोरटे पाठीमागून त्यांच्या जवळ आले. त्यांना तोंडाला काळ्या रंगााचा कपडा बांधला होता. यापैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने दयालानी यांच्या हातातील मोबाइल हिसकावून दोघे पसार झाले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत मंगळवारी दुपारी बारा वाजता मिलकॉर्नर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून नानूबाई सुंदरलाल तांबे (रा. हर्सूल, चेतनानगर) यांनी दहा हजार आठशे रुपये काढून पिशवीत ठेवले. ही पिशवी कंबरेला खोचून ठेवली. चोरट्याने त्याची ही पिशवी लंपास केली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या आमिषाने बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार केला आणि पाच वेळा गर्भपात देखील केला. २०१४मध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरेापीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी बलात्कार आणि गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गारखेड्यातील महिलेचा परिचय शेख अजहर शेख गणी याच्यासोबत झाला. या परिचयातून त्याने महिलेला तुझ्यासोबत लग्न करतो, तुझ्या मुलीला सांभाळतो असे सांगत विश्वास संपादन केला. यानंतर या महिलेसोबत जबरदस्तीने बलात्कार केला. या प्रकारातून गर्भवती राहिलेल्या महिलेचा त्याने पाच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गर्भपात केला. पीडितेने आरोपीला लग्नासंदर्भात विचारणा केली असता त्याने शिविगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी शेख अजहर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूतनीकरणाचा खर्च वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचा खर्च वाढत चालला आहे. सहा कोटींमध्ये होणारे नूतनीकरणाचे काम आता नऊ कोटींवर पोचले आहे. तीन कोटींच्या वाढीव खर्चाला मंजुरी मिळाली आहे. नऊ कोटी खर्च करून रंगमंदिराचे नूतनीकरण किती दिवस टिकेल, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम म्हणजे पालिकेच्या कारभाऱ्यांसाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे का? असा सवाल देखील विचारला जात आहे.

उस्मानपुरा भागातील संत एकनाथ रंगमंदिर महापालिकेचे सर्वात जुने रंगमंदिर आहे. किमान तीन दशकांपासून हे रंगमंदिर रसिकांच्या सेवेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; दर पाच वर्षांनी महापालिकेने रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम केले आहे. हे काम करताना कोट्यवधींचा खर्च झाला आहे. कोट्यवधींचा खर्च करून देखील रंगमंदिराची अवस्था दयनीय अशीच आहे. त्यामुळे नऊ महिन्यापूर्वी रंगमंदिराच्या पुन्हा एकदा संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. रंगकर्मींनी रंगमंदिराच्या दुरवस्थेबद्दल ओरड केल्यानंतर थेट 'मातोश्री'हून आदेश आल्यामुळे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना रंगमंदिराच्या नूतनीकरणाच्या कामात लक्ष घालावे लागले. तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नूतनीकरणाच्या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला. त्याच वेळी महापालिकेने ५० लाख रुपयांची तरतूद केली. अडीच कोटी रुपये हाताशी असताना एवढ्या कमी रक्कमेत नूतनीकरणाचे काम होऊ शकणार नाही. जुजबी काम होऊ शकेल, त्यामुळे आणखीन आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुन्हा दोन कोटींची तरतूद करण्यात आली. साडेचार कोटी रुपयांमध्ये रंगमंदिराचे रुप पालटले जाईल असे वाटत असतानाच पुन्हा अतिरिक्त तीन कोटींच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. म्हणजे साडेसात ते आठ कोटी रुपये नूतनीकरणाच्या कामावर खर्च केले जाणार आहेत.

\Bसुधारित अर्थसंकल्पात तीन कोटी\B

अतिरिक्त तीन कोटींच्या तरतूदीचा प्रशासकीय प्रस्ताव पालिकेच्या प्रशासनानेच सर्वसाधारण सभेत ठेवला. संत एकनाथ रंगमंदिरात वॉल पॅनलिंग, छतासाठी पथ शीट, एलईडी नामफलक, कलर पॉलिस्टर फायबर बसवणे, ध्वनीक्षेपण व्यवस्थेतील उर्वरीत कामे करणे, स्टेज आणि पडद्यावर विद्युतीकरणाचे काम करणे, अन्य यांत्रिकी कामे करणे या कामांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे तरतूद उपलब्ध होणे गरजेचे आहे. या सर्व कामांसाठी सुमारे तीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या तरतूदीला सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेवून अल्प मुदतीची निविदा काढून ही कामे तातडीने सुरू करण्यात येतील असे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे २०१८-१९च्या सुधारित अर्थसंकल्पात तीन कोटींची तरतूद उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार लाखांचे बनावट चष्मे जप्त

$
0
0

औरंगाबाद : नामांकित कंपन्यांचा चष्म्याचा बनावट माल विक्रीसाठी ठेवणाऱ्या दुकानदाराविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बुधवारी दुपारी कुंभारवाडा भागात करण्यात आली. याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली होती. कुंभारवाडा भागातील स्टार ऑप्टिकल्स या चष्म्याच्या दुकानात रेबॅन आणि लॉयस्टिक या कंपन्याचा बनावट माल विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. या माहितीवरून कंपनीचे अधिकारी रेवननाथ विष्णू केकाण (रा. हडपसर, पुणे) यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बुधवारी या दुकानावर छापा टाकला. यावेळी या कंपन्याचे सन ग्लास व त्याचे कव्हर याचा बनावट माल दुकानात पोलिसांना आढळला. अंदाजे चार लाखांचा हा माल आहे. हा माल पोलिसांनी जप्त केला असून, दुकानदार शेख फईम शेख नजीर, नदीम अख्तर सिकंदर बख्त (दोघे रा. आरेफ कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पीएसआय पाथरकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणमध्ये २३ कोटींची कामे; रविवारी भूमिपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

विविध योजनेअंतर्गत शहरात २३ कोटींच्या विकास कामांना सुरुवात होणार असून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा हस्ते रविवारी (१७ फेब्रुवारी) भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी दिली.

स्टेट बँक ऑफ इंडिया ते नेहरू चौक, गागाभट्ट चौक ते बौद्ध विहार, डॉ. लोंढे हॉस्पिटल ते नवीन तहसील रोड हे सिमेंट रस्ते, विविध प्रभागातील सिमेंट रस्ते व सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार संदीपान भुमरे, आमदार अतुल सावे, भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी लोळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपनगराध्यक्षा सुचित्रा जोशी, गटनेते आबा बरकसे, तुषार पाटील, कल्याण भुकेले, अजित पगारे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, उपमुख्याधिकारी चौधरी व नगरसेवकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा महिने केवळ स्तनपान करणाऱ्या माता ३८ टक्केच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाळाच्या जन्मानंतर सहा महिने बाळाला केवळ स्तनपान (एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग) करणाऱ्या ग्रामीण मातांचे प्रमाण हे फक्त ३८ टक्के आहे आणि त्यामागे मातांना करावे लागणारे भरपूर कष्ट, पौष्टिक आहाराचा अभाव, अंधश्रद्धा आदी कारणे असल्याचे घाटीत आलेल्या दीड हजार मातांच्या सर्वेक्षणावरुन स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास व संशोधन दिवी सिंग या घाटीच्या विद्यार्थिनीने केला असून, तिच्या संशोधन निबंधाची निवड भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) केली आहे. तसेच इतर तीन विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधांचीही 'आयसीएमआर'ने निवड केली असून, अधिष्ठाता डॉ. कानन ये‌ळीकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

पदवीपूर्व विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी उत्तेजन मिळावे, या हेतुने 'आयसीएमआर'कडून दरवर्षी अखिल भारतीय पातळीवर शोधनिबंध स्पर्धा घेतली जाते. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) दिवी सिंग (नवजात अर्भक वैद्यकशास्त्र विभाग), सोहम बरकुले (जनवैद्यक औषधशास्त्र), दिव्यांशी बजाज (नवजात अर्भक वैद्यकशास्त्र विभाग) व विधी मालु (शरीरशास्त्र) या चार विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधांची निवड करण्यात आली आहे. दिवी सिंग या विद्यार्थीनीने स्तनपानविषयी संशोधन केले व केवळ ३८ टक्के ग्रामीण महिला स्तनपान करत असल्याचे समोर आणले. नवजात शिशुशास्त्र विभागाचे प्रमुख एल. एस. देशमुख यांनी दिवी सिंग हिला मार्गदर्शन केले. सोहम बरकुले या विद्यार्थ्याने 'शेतकऱ्यांच्या ताणतणावाचे कारण व ताण वाढविणारे घटक' यावर अभ्यास केला आणि वाढते कुटुंब व घटते उत्पन्न हेच शेतकऱ्यांच्या ताणतणावामागचे मुख्य कारण असल्याचे नमूद केले आहे. जनऔषध वैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. मोहन डोईबळे, डॉ. स्मिता अणदुरकर यांचे सोहम याला मार्गदर्शन लाभले.

\Bमधुमेहाची त्रिसुत्री महत्वाची

\Bनियमित औषधी, व्यायाम व योग्य आहाराच्या त्रिसुत्रीद्वारेच दुसऱ्या प्रकारचा (टाईप टू) मधुमेह नियंत्रणात राहतो, असे संशोधन विधी मालू हिने आपल्या निबंधात मांडले. तिला शेख साजिया मसूर यांचे मार्गदर्शन लाभले. तर, दिव्यांशी बजाज हिने 'कमी वजनाच्या बाळाची काळजी घरी कशी घ्यावी' या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. त्यांना सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल जोशी यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गळा चिरला; आरोपीला अटक, पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोडवर गाडी उभी केल्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर तरुणाचा गळा वस्तऱ्याने चिरुन गंभीर जखमी करणारा आरोपी श्याम शंकर गंगातिरे याला गुरुवारी (१४ फेब्रुवारी) अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरोपीला शनिवारपर्यंत (16 फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

प्रकरणात जखमी शेख अरबाज याचे वडील शेख अब्दुल शेख मखबुल पटेल (४७, रा. माणिकनगर, नारेगांव) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ११ फेब्रुरवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेख अरबाज हा घराजवळ गाडी घेऊन उभा होता. त्यावेळी आरोपी श्याम शंकर गंगातिरे (२२, रा. माणिकनगर, नारेगाव) व त्याच्या सोबत सचिन अंभोरे, सिचन जैस्वाल, वाघ व आणखी एकजण तिथे आले. त्यांनी अरबाजला 'रोडवर गाडी का उभी केली, तुझ्या बापाचा रस्ता आहे का' असे म्हणत अरबाजसोबत वाद घातला. मात्र काही वेळाने वाद निवळला. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेतीनला अरबाजचे वडील शेख अब्दुल यांना फोन आला व अरबाज याला गंगातिरे याने वस्तऱ्याने जखमी केल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच शेख अब्दुल यांनी धाव घेत अरबाजला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन आरोपी गंगातिरे याला गुरुवारी अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरोपीने गुन्हा कोणत्या हेतुने केला याचा तपास करणे बाकी असून, आरोपीला कोणी मदत केली, त्याचे साथीदार कोण आहेत, याबाबत तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः केबल ऑपरेटरांचे आंदोलन मागे

$
0
0

औरंगाबाद :

शहरातील केबल ऑपरेटर आणि मुख्य कंट्रोल रूम यांच्यात सुरू असलेला वाद अखेर गुरुवारी (१४ फेब्रुवारी) रोजी मिटला. केबल ऑपरेटरकडून मुख्य कंट्रोल रूमकडून आलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला असल्याची घोषणा केबल ऑपरेटर असोसीएशनचे अध्यक्ष निशीकांत देशमुख यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील केबल टीव्ही पाहणाऱ्या दर्शकांच्या टीव्हीवर ब्लॅक आऊट करण्याचे आंदोलन केबल ऑपरेटरने सुरू केले होते. या आंदोलनामुळे शहरातील ८० हजार केबल टीव्ही पाहणाऱ्या दर्शकांचे टीव्ही बंद होते. याबाबत गुरुवारी हॅथवे एमसीएनचे अधिकारी आणि केबल ऑपरेटर यांच्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत हॅथवे केबलने दिलेला ६०-४० चा प्रस्ताव कायम ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव तूर्तास मान्य करण्याचा निर्णय केबल ऑपरेटरने घेतला आहे.

एक मार्चपर्यंत केबल चॅनेलचे प्रसारण पूर्वीप्रमाणे होणार आहे. एक मार्च नंतर ग्राहकांकडून ट्रायच्या निर्देशानुसार फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. एक मार्चनंतरच ग्राहकांना त्यांच्या चॉईसनुसार पॅकेजप्रमाणे चॅनेल दिले जाणार असल्याची माहिती निशीकांत देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीसाठी भाजपचा जुनाच फॉर्म्युलाः दानवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भाजप-शिवसेना युतीसाठी २०१४चा जागा वाटपाचा फॉर्म्युला यंदाही कायम ठेवावा. निवडणुकीसाठी भाजप सज्ज असून युती झाली तर ठिक नाही तर सेनेशिवाय लढू,' असा इशारा गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 'मटा'शी बोलताना दिला.

दानवे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीसाठी मायक्रोप्लॅनिंगवर भर दिला आहे. युतीबाबत शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून अद्याप तरी अवाजवी असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जुन्या फॉम्युल्याप्रमाणेच जागा वाटप व्हावे, अशी अपेक्षा आहे. या प्रस्तावावर सेनेकडून निर्णय झालेला नाही. आमची युती होईलच. नाही झाली तर शिवसेनेशिवाय लढू,' असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढविणार असल्याचे शिवसेना नेते व पशूसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांनी जाहीर केले आहे. यापार्श्वभूमीवर विचारले असता दानवे म्हणाले, 'युती झाली तर त्यांना आमचे, तर आम्हाला त्यांचे काम करावे लागेल. युती नाही झाली तर समोरासमोर उभे राहू. आमच्यात कोणताही व्यक्तिगत वाद नाही. खोतकर त्यांच्या पक्षाची बाजू घेतात. मी माझ्या पक्षाची बाजू घेतो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'महाखादी'चे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

$
0
0

औरंगाबाद : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा मार्फत 'महाखादी' वस्तूचे भरविण्यात आलेल्या भव्य प्रदर्शनाचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. समता दर्शन महिला मंडळ हॉल, चुन्नीलाल पेट्रोल पंपासमोर, अदालत रोड, क्रातीचौक, औरंगाबाद येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हा समिती अध्यक्ष संतोष माने पाटील, उपसंचालक, उद्योग संचालनालय दीपक शिवदास, महाव्यवस्थापक करूणा खरात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधाऱ्यांच्या कामात गैरव्यवहार; कारवाई न झाल्यास ‘गोंधळ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जिल्हा परिषदेच्या सिल्लोड सिंचन उपविभागातील दोन अधिकाऱ्यांनी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत 'सीएनबी', कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, सिंचन तलाव दुरुस्ती आदी केलेली कामे बोगस केली असून शासनाच्या दोन कोटी ६५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे,'असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश असतानाही प्रकरण 'जैसे थे' आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे अन्यथा १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ करणार असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री तालुक्यांमध्ये सिमेंट नाला बांध, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, सिंचन तलाव दुरुस्तीच्या कामांबाबत तक्रार आहे. ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे यावेळी गव्हाणे यांनी सांगितले. अनेक कामांची ग्रामपंचायतींमध्येही नोंद नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. 'या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध दोन कोटी ४२ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची त्रयस्त यंत्रणेद्वारे महिन्याभराच्या आत तत्काळ चौकशी करून अहवालानुसार त्यांच्या सेवा संपुष्टीची कार्यवाही करून गैरव्यवहाराची रक्कम त्यांच्याकडून शासन खाती जमा करावी, तसेच शासनास फसवल्याप्रकरणी प्रशासनाच्या वतिने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे,' असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला पाठवल्याचा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images