Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एटीएम कार्ड बदलून दोघांचे ३६ हजार लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगााद

एटीएमकार्ड बदलून लुटणारी टोळी शहरात सक्रिय झाली असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन भामट्यांनी दोन व्यक्तींना ३६ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.

पहिल्या घटनेत उस्मानपुरा भागातील शेख ईसाक शेख जाफर (२८, रा. शहानुरवाडी) हे दुपारी आई-वडिलांच्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी दशमेशनगरातील एटीएम सेंटरवर गेले. यावेळी एटीएममधून पैसे निघत नसल्याने ते हैराण होते. त्यावेळी भामट्यांनी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या कार्डची अदलाबदली करून २० हजारांची रोकड लांबविली. दुसऱ्या घटनेत याच भामट्यांनी बन्सीलालनगरातील एसबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये अल्ताफ हुसेन आबेद हुसेन (२०, रा. हमीद कॉलनी) यांच्या कार्डची अदलाबदल करून १६ हजार रुपये लंपास केले. हुसेन पैसे काढत असताना एक भामटा त्यांच्याजवळ आला. त्याने मशीनमध्ये कार्ड असे टाकतात, असे म्हणत बाजूला झाला. तेवढ्यात दुसरा भामटा त्यांच्याकडे आला. त्याने हिरवा लाइट लागल्यानंतर कार्ड मशीनमध्ये टाक असे सांगितले. यावेळी अल्ताफने मशीनमध्ये कार्ड टाकून एक हजार रुपये काढले. त्यावेळी दोन्ही भामट्यांनी त्यांना पैसे काढल्याचा मेसेज मोबाईलवर आला का पहा, असे विचारले. मोबाइल पाहत अल्ताफ यांनी पुन्हा पाचशे रुपये काढण्यासाठी एटीएममध्ये कार्ड टाकले. यावेळी पासवर्ड चुकीचा असल्याचा मेसेज संगणकाच्या स्क्रिनवर आला. तेवढ्यात तिसरा भामटा त्यांच्याकडे आला. त्याने लवकर पैसे काढ असा तगादा लावला. दोन्ही भामट्यांनीही घाई, गोंधळ सुरू केला. याच दरम्यान, भामट्यांनी त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदली केली. पैसे न निघाल्याने अल्ताफ तेथून निघून गेले. त्यांनी थेट बँक गाठली. तेव्हा बँकेने त्यांना हे कार्ड रोहिदास दुबे या नावाचे असून त्यांच्या खात्यातून साडेसोळा हजार रुपये गायब झाल्याचे सांगितले. यानंतर अल्ताफ यांनी सायबर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यापाऱ्याला चौदा लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील व्यापाऱ्याला तामिळनाडूतील व्यक्तीने बनावट सहीचा चेक देऊन तब्बल १४ लाख सात हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कुंदन अनिल कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलासा अग्रो प्रोसेसर प्रा. लि. या कंपनीचे अरविंदन आणि भास्करन कुमारन यांनी आपण कर्मचारी असल्याचे कुंदन कुलकर्णी (रा. समाधान निवास, बंजारा कॉलनी, औरंगाबाद) यांना सांगितले. आमचे कार्यालय तामिळनाडूतील तिरूचिंगोडे पल्लिपलायम नामाक्कल येथे आहे असे भासवून त्यांनी २१ टन तुरदाळीची ऑर्डर इंडियामार्टद्वारे दिली. त्याप्रमाणे हा माल तामिळनाडू येथे पाठविण्यात आला. मात्र, हा माल कंपनीत न उतरवता त्यांनी परस्पर लंपास केला. कुलकर्णी यांना महिंद्रा बँकेचा बनावट सहीचा चेक दिला. त्यामुळे याप्रकरणी कुलकर्णी यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक पाटील हे करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वाशे कोटींच्या रस्त्यांना गुपचूप मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सव्वाशे कोटींच्या रस्त्यांच्या ठरावाला महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी गुपचूप मंजूरी दिली आहे. हा ठराव आयुक्तांमार्फत 'पीएमसी'कडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे.

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी यापूर्वीच शंभर कोटींचे विशेष अनुदान दिले आहे. या अनुदानातून काही रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. तीस रस्त्यांची कामे शंभर कोटींच्या अनुदानातून केली जाणार आहेत. रस्त्यांच्या कामांसाठी आणखी सव्वाशे कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निधी दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या निधीतून कोणत्या रस्त्यांची कामे करायची हे ठरविण्यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली होती. पालिका प्रशासनातर्फे यासाठी संभाव्य रस्त्यांची यादी तयार करण्यात आली. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील स्वतंत्रपणे रस्त्यांची यादी तयार केली. रस्त्यांच्या यादीबद्दल पालिकेत दोनवेळा बैठका देखील झाल्या. या बैठकांमध्ये रस्त्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार महापौरांना देण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी महापौरांनी रस्त्यांची यादी अंतिम केली आणि ती ठरावाच्या स्वरुपात आयुक्तांकडे पाठवली. महापालिकेने रस्त्यांच्या कामासाठी 'पीएमसी' नियुक्त केली आहे. 'पीएमसी'च्या माध्यमातूनच रस्त्यांच्या यादीला तांत्रिक मान्यता घेण्याची सूचना देखील आयुक्तांना करण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्त पुढील आठवड्यात रस्त्यांची यादी 'पीएमसी'कडे पाठवतील असे मानले जात आहे. तांत्रिक मान्यतेसह रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शासनाला सादर केला जावा, असा प्रयत्न पालिकेचे पदाधिकारी करीत आहेत. महापौरांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने रस्त्यांची यादी अंतिम झालेली असल्यामुळे सर्वसाधारण सभेत यादी सादर करण्याची गरज नाही, असेही मानले जात आहे.

\Bयादीत ६५ रस्त्यांचा समावेश

\B'पीएमसी'ने तांत्रिक मान्यता दिल्यावर यादी शासनाला पाठवली जाईल. त्यानंतर ती नागरिकांसाठी प्रसिद्ध केली जाईल. यामुळे वाद होणार नाहीत आणि शासनाकडून निधी देखील लवकर मिळेल असे मानले जात आहे. सव्वाशे कोटींमध्ये ६५ रस्त्यांची कामे करण्याचे ठरविण्यात आले आहे. यातील बहुतेक रस्ते विकास आराखड्यातील आहेत. काही रस्ते परस्पराला समांतर असणारे आहेत, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्य उत्पादन, विक्रीत मेळ नाही; माहिती सादर करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

कमी पर्जन्यमानामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा अत्यल्प राहिला असताना, यातील पाणी मोठ्या प्रमाणावर मद्य उत्पादनासाठी वापरले जात आहे. याला आक्षेप घेणाऱ्या कोपरगाव येथील संजय काळे यांनी २०१५मध्ये दाखल जनहित याचिकेवर शनिवारी झालेल्या सुनावणीत, मद्य उत्पादन, त्याचा खप, परवानेधारकांची संख्या तसेच निर्यात या बाबींचा काहीही हिशेब लागत नसल्याने गैरप्रकार वाढल्याचे म्हणणे याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आले.

२०१६मध्ये जायकवाडी धरणात केवळ सहा टक्के जिवंत पाणीसाठा असताना मद्य उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना नियमित पाणीपुरवठा सुरू होता. वास्तविक राष्ट्रीय आणि राज्य पाणी धोरणानुसार प्रथम पिण्यासाठी, दुसरे शेतीसाठी आणि तिसरे उद्योगांसाठी असा पाणीपुरवठ्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. अत्यंत कमी पाणीसाठा असताना मद्य कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी पुरविणे चुकीचे आहे. कारण एक लिटर लिकर तयार करण्यासाठी २९८ लिटर तर एक लिटर वाइन तयार करण्यासाठी तब्बल ८७० लिटर पाणी वापरले जाते. एप्रिल २०१८मध्ये संबंधित विभागातर्फे सादर करण्यात शपथपत्रात १०५ दिवस पुरेल इतके पाणी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर पाऊस न आल्यास काय, असा प्रश्न उपस्थित करीत खंडपीठाने मद्य कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात ६० टक्के कपात करण्याचे अंतरिम आदेश दिले होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला. मात्र, याला तीन वर्षे होऊनही या संदर्भात काहीही ठोस निर्णय झाला नाही.

प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे प्रज्ञा तळेकर आणि अजिंक्य काळे, तर शासनातर्फे अमरजितसिंह गिरासे आणि सिद्धार्थ यावलकर यांनी काम पाहिले.

\B...किती मृत्यू झाले?

\Bयाचिकाकर्त्यांच्या वतीने जायकवाडी धरणात आजघडीला केवळ १० टक्के जिवंत पाणीसाठा असल्याचे निदर्शनास आणून देत, मद्य उत्पादन, मद्य सेवन परवाने, मद्याची निर्यात आदींचा कोणताही मेळ उपलब्ध आकडेवारीवरून बसत नसल्याचे निदर्शनास आणले. यात अधिक उत्पादित होणाऱ्या मद्याचा अबकारी कर मिळत नाही तसेच त्याच्या दर्जाही संशयास्पद असू शकतो. यामुळे असे मद्य सेवन करणाऱ्यांचा मृत्यूही ओढवतो, असे सांगण्यात आले. यावर असे उत्पादन किती होते. यामुळे किती मृत्यू झाले याबाबत माहिती सहा मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने शासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑइल सांडल्याचे सांगून पाच लाखांची बॅग लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कारमधून जाणाऱ्या व्यापाऱ्याला गाडीतील ऑइल सांडत असल्याचे सांगून पाच लाखांची बॅग लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता मोंढा नाक्याजवळ घडली.

डॉ. मनोहर रतनलाल अग्रवाल (रा. एन. १, सिडको) यांचे नेहा फर्निचर नावाचे दुकान लक्ष्मण चावडी भागात आहे. शनिवारी सकाळी १०.४० वाजता ते इनोव्हा कारमधून (एमएच २० ईजे ८१०९) घरातून दुकानाकडे निघाले. त्यांनी आपल्या सोबत पाच लाख रुपये असलेली बॅग कारमध्ये ठेवली होती. मोंढा नाका येथील सिग्नल सुटल्यानंतर त्यांच्या कारने मोंढ्याकडे वळण घेतले. त्याच वेळी एका व्यक्तीने गाडीतून ऑइल सांडत असल्याचे हिंदीतून ओरडून सांगितले. त्यावेळी चालक ज्ञानेश्वर औताडे (४३, रा. नेहानगर, दुर्गामाता कॉलनी) याने काच खाली घेऊन ठिक असल्याचे संकेत देत गाडी पुढे नेली. काही अंतरावर दुसऱ्या व्यक्तीनेही गाडीतून ऑइल लिक होत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी थोड्या अंतरावर कार उभी केली. औताडे आणि अग्रवाल दोघेही कारमधून बाहेर आले. गाडीचे बोनेट उघडून पाहिले तेव्हा ऑइल सांडत नसल्याचे लक्षात आले. ते कारमध्ये येऊन बसले तेव्हा पाच लाखांची बॅग लंपास होती. याप्रकरणी त्यांनी

क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली.

\Bआरोपी सीसीटीव्हीत, रिक्षातून फरार

\Bअग्रवाल यांच्या कारमधून बॅग लंपास केल्यानंतर एकजण रिक्षातून बसून आकाशवाणी चौकाकडे जाताना दिसून येत आहे. या प्रकरणातील आरोपी मोंढा नाका भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या आधारे पोलिसांचा शोध सुरू आहे. दरम्यान, अशीच घटना बुधवारी रात्री मोंढा नाका येथेच घडली. कारमधून धूर येत असल्याचे सांगत व्यापारी सुमतीलाल गुगळे यांची अडीच लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाखांच्या डायची चोरी, तिघा आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

कंपनीतून सव्वा लाखाचे डाय व फिक्चर चोरून नेणाऱ्या दोन महिलांसह ते विकत घेणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. त्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी शनिवारी दिले.

विजयमाला जालिंदर त्रिभुवन (३५, रा. कबीरनगर, उस्मानपुरा), शालिनी शहाजी पिसुळे (२५, रा. छोटा मुरलीधरनगर, उस्मानपुरा) व असलम हसन शहा (२८, रा. पोलिस कॉलनी, पंढरपूर, ता. जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात राजेसाहेब सोपानराव सोळंके (३४, रा. वडगांव कोल्हाटी) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीत, पाच फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास राजेसाहेब सोळंके व लीलाधर सोळंके हे कंपनीतून बाहेर चहा घेण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना कंपनीच्या पाठीमागील बाजूस कंपनीतील डायचे सुटे भाग पडलेले दिसले. त्यामुळे राजेसाहेब सोळंके यांनी कंपनीतील सीसीटीव्ही चित्रण तपासले. एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान चार महिलांनी कंपनीची भिंत व पत्र्याच्या उघड्या फटीतून कंपनीत शिरून कंपनीमधील वापरात असणाऱ्या व काही वापरात नसलेल्या अशा एक लाख २५ हजार रुपये किमतीचे ३७ डाय व फिक्चर चोरून नेले. या प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून कंपनीत चोरी करणाऱ्या दोन महिलांसह ते खरेदी करणाऱ्या तिघा आरोपींना शुक्रवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले. आरोपींच्या साथीदारांना अटक करायची आहे. गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल कोठे विक्री केला याचा तपास करणे, तसेच आरोपीने विकलेला माल

जप्त करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

अश्लिल छायाचित्र व्हाट्सअपवरुन व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन तरुणीवर विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील नालेगाव येथे उघडकिस आली. याप्रकरणी पोलिसांनी परसराम मन्साराम बिघोत याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध विनयभंगासह बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

पीडित तरुणी ही वैजापूर तालुक्यातील संजरपुरवाडी येथील रहिवासी असून नालेगाव येथील महाविद्यालयात ती बारावीचे शिक्षण घेत आहे. तिची क्रीडा स्पर्धेत रनिंगसाठी निवड झाली होती. प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी भरत निंबाळकर यांनी पीडित तरुणीसोबत असलेल्या इतर तरुणींना रनिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी परसराम बिघोतला ठेवले होते. प्रशिक्षणाच्या निमित्ताने परसरामची तरुणीसोबत ओळख झाल्यानंतर ती स्कुटीवर महाविद्यालयात येत असताना परसराम तिची छेड काढत होता. तरुणीने याबाबत घरी सांगण्याची धमकी देऊन विरोध केल्यावरसुद्धा त्याने माझ्यासोबत फोटो काढ नाही तर तुझ्या आई वडील व भावाचा काटा काढेन अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित तरुणीने फोटो काढले. मात्र, त्यानंतर हे फोटो व्हाट्सअपवर व्हायरल करण्याची धमकी देत परसरामने ८ फेब्रुवारी रोजी तरुणी महाविद्यालयात आली असतांना तिला धमकावत नालेगाव येथील एका मित्राच्या घरी नेऊन बळजबरीने अत्याचार केला, अशी तक्रार पीडित तरुणीने दिली आहे. त्यावरून परसराम बिघोत याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय डांगे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगाव येथील बंद ऑईल मीलमध्ये स्फोट

$
0
0

परळी वैजनाथ (जि. बीड) :

तळेगाव येथील बंद ऑईल मीलमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी बीड राज्य रस्त्यावरील तळेगांव येथील गजानन एक्सट्रसन लिमिटेड ही बंद ऑईलमिल या कंपनीत रविवारी सकाळी ९:३०वाजता अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज जवळपास तीन किलोमीटर पर्यंत आला. परिसरातील लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. या स्फोटात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान गोपाळ गनगे यांचा मृत्यू तर ज्ञानोबा लुंगेकर (वय ४०) व गोपाळ घोटाळ (वय ३८) दोन जखमींनाआंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे व त्यांचे तपासणी पथक दाखल झाले आहे. दरम्यान ही ऑईलमिल मागील दोन वर्षांपासून बंद आहे. या ऑईलमध्ये या अगोदरही अशा स्वरूपाच्या दोन घटने मध्ये चार लोकांचा मृत्यू झाला होता. स्फोटाचे कारण मात्र कळू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद: मुलीला गळफास देऊन आईचीही आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद :

तीन वर्षांच्या मुलीला गळफास देऊन आईनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवारी (१७ फेब्रुवारी) संध्याकाळी पाचच्या सुमारास बेगमपुरा परिसरातील थत्ते हौदाच्या समोर घडली. अमृता किशोर मुळे (वय २२) आणि अवंतिका मुळे (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. अमृताच्या वाढदिवशीच ही घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता मुळे यांचा रविवारी वाढदिवस होता. तो साजरा करण्याचा निर्णय किशोर आणि अमृता यांनी घेतला होता. रोजच्या प्रमाणे अमृता ही दुपारी दीडच्या सुमारास मुलीला घेऊन दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेली होती. किशोरदेखील हॉलमध्ये झोपला होता. संध्याकाळी पाच वाजले तरी अमृता आणि आवंतिका या उठल्या नाहीत म्हणून कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर किशोर आणि कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. समोरील दृश्य बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अवंतिका आणि अमृता दोघीही लटकलेल्या अवस्थेत होत्या. छताला असलेल्या लोखंडी हुकाला साडीच्या साह्याने गळफास घेतला होता. या घटनेची माहिती तात्काळ बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद बदक आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोघींनाही पावणे सातच्या सुमारास घाटीत उपचारासाठी आणण्यात आले. घाटी रूग्णालयातील डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अकस्मात मृत्युची नोंद केली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

मुळे कुंटबीय या भागात सर्वांशी मिळून-मिसळून राहतात. घरात कधीही भांडणं झाली नाहीत, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. घटनास्थळी चिठ्ठी किंवा अन्य काही वस्तू सापडल्या नाहीत. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलाल कमी झाल्याने बँक कर्ज देईनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. अर्ज भरण्यापासून ते पात्रता प्रमाणपत्र मिळण्यापर्यंत सर्वच प्रक्रिया ऑनलाइन असून त्यात दलालांना स्थान नाही. मात्र, 'दलाली' कमी झाल्यानेच बँका कर्ज देत नाहीत,' असा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. आता बँकेच्या प्रत्येक शाखेला २२ प्रकरणे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी (१७ फेब्रुवारी) औरंगाबाद आणि फुलंब्री येथील शेतकऱ्यांना महामंडळाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, कर्जवाटप प्रकरणे निकाली काढण्यात औरंगाबाद जिल्ह्याची प्रगती चांगली आहे. राज्यात आतापर्यंत २५०० प्रकरणे मंजूर झाली असून यात एकट्या औरंगाबादची २८६ प्रकरणे आहेत. राज्याच्या तुलनेत औरंगाबाद सर्वाधिक पुढे आहे. माझ्या कार्यकाळात १८ कोटी २३ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे, तर बँकांना १६ लाख ५५ हजार रुपयांचा परतावादेखील दिला आहे. ३१ मार्चपूर्वी औरंगाबादमधून ६ हजार प्रकरणांचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी आता जिल्ह्यातील बँकेच्या प्रत्येक शाखांना २२ प्रकरणे करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

कर्जमंजुरी प्रकरणात अडचणी आहेत, मात्र आम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. किती प्रकरणे मंजूर, नामंजूर झाली, याची आकडेवारी बँकाकडून प्राप्त होत नाही. अर्जदारांकडून माहिती घेतल्यानंतर आणि बँकांच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, कागदपत्रांच्या त्रुटीमुळे कर्जप्रकरणात अडथळा येण्याची प्रकरणे सर्वाधिक आहेत. मात्र, ज्यांचा प्रकल्प अहवाल चांगला असतो त्यांना कर्ज मिळते. एकूणच यासाठी बँकांनी जनजागृती करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात महामंडळही जनजागृती करणार आहे. विविध पक्ष संघटनांनीही तरुणांना याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. महिला बचत गटांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

\Bकागद फेकून कर्ज मंजूर होते का?\B

महामंडळाच्या वेबसाइटवरून पेपर डाउनलोड करून तेच पेपर कार्यालयात येऊन फेकायचे. हा काय प्रकार आहे. अंगावर पेपर फेकून कर्ज प्रकरणे मंजूर होतात?, असा प्रश्‍न नरेंद्र पाटील यांनी विचारला. गेल्या आठवड्यात काही जणांनी कार्यालयात केलेल्या आंदोलनावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक भरती ‘राम भरोसे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक भरतीची जाहिरात महिना अखेरपर्यंत निघण्याची शक्यता आहे. मात्र, निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याबद्दल शिक्षण विभाग मूग गिळून गप्प आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षणाची प्रक्रिया सुरू असून त्याची मुदत शनिवारी संपली. हे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही.

डीटीएड, बीएडधारक विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर गतीने सुरू झाली आहे. मात्र, त्याबद्दल शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत अनेक विषयांवर माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. रोस्टर तपासणीमुळे विलंब लागत असल्याचे सांगितले जात आहे. रिक्त जागांमध्ये ग्रामविकास विभाग, नगरविकास, समाजकल्याण तसेच खासगी संस्थामधील पदभरती संबंधित संस्थेशी निगडीत आहे. त्यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्याने गोंधळ उडण्याची शक्यता आहे. बिंदुनामावली पूर्ण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती पूर्ण झाल्याशिवाय प्रवर्गनिहाय जागांचे चित्र स्पष्ट होणार नाही. मागासवर्गीय कक्षाकडून पुन्हा सर्व संस्थांचे रोस्टर तपासणीची प्रक्रिया केली जात आहे. त्यानंतर पोर्टलवर माहिती भरली जाणार आहे. त्या प्रक्रियेला मुदत देण्यात आली. त्याचा आढावा पुढच्या आठवड्यात घेतला जाणार आहे. त्यानंतर जागा निश्चित केल्यानंतरच भरतीची प्रक्रिया पुढे जाऊ शकेल.

\Bरिक्त जागा गुलदस्त्यात \B

बिंदुनामावली तपासणी व पडताळणी करून तातडीने पवित्र पोर्टवर अपलोड करण्याची करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे निश्चित रिक्त पदांची आकडेवारी उपलब्ध नाही, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. भरती प्रक्रिया ३० सप्टेंबर २०१८च्या पटसंख्येनुसार होणार की, कोणत्या याबाबत साशंकता आहे. भरती प्रक्रिया दिवसेंदिवस लांबणीवर पडत असल्याने बेरोजगारांत प्रचंड रोष आहे. २०१० पूर्वी राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया झाली. आठ वर्षात मराठी शाळांमधील पटसंख्या कमी झाल्याने शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यांचे समायोजन, कमी झालेल्या रिक्त जागा यामुळे किती जागांसाठी भरती होणार याबाबत बेरोजगार साशंक आहेत.

\B'पवित्र'वर बेरोजगारांची नोंदणी...... १२३६३०

'टीईटी-१' (प्राथमिक) नोंदणी १९०८४

'टीईटी-२' (माध्यमिक) नोंदणी १८९२६\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाहीचा शिवनेरीला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद-पुणे मार्गावरील 'व्हॉल्वो' बसद्वारे सुरू असलेली शिवनेरी सेवेतून मिळणाऱ्या उत्पनामुळे एस. टी. महामंडळासाठी हा 'गोल्डन रूट' म्हणविला जातो. पण, या मार्गावर महामंडळाच्या वरिष्ठांनी भाडेतत्वावरील शिवशाही बस सुरू केल्यामुळे शिवनेरीद्वारे मिळणारे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत वेगाने कमी होत आहे.

एस. टी. महामंडळाने कमी दरात आरामदायी प्रवासासाठी पुर्ण, नाशिक, नागपूर, अकोला, बोरीवली, मुंबई, लातूर, बीड, यवतमाळ, अलिबाग, कोल्हापूर, विजापूर आदी मार्गावर शिवशाही बस सुरू केल्या आहेत. औरंगाबाद-पुणे मार्गावर शिवशाहीच्या २८ फेऱ्या चालवल्या जातात. जानेवारी २०१८ मध्ये शिवशाहीतून चार लाख ६२ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यावेळी मोजक्याच मार्गावर या बस चालवल्या जात होत्या. पुणे मार्गावर शिवशाहीची सेवा नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. त्यावेळी या सेवेतून औरंगाबाद विभागाला एक कोटी ३१ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. शिवनेरीचे जानेवारी २०१८ मध्ये ३४ लाख ३१ हजार रुपये असलेले उत्पन्न कमी होऊन जानेवारी २०१९ मध्ये २२ लाख ८० हजार रुपयांवर आले आहे. ही घट ११ लाख ५१ हजार रुपयांची घट असल्याची माहिती एस. टी. विभागातून देण्यात आली. जानेवारी २०१८मध्ये मध्यवर्ती बस स्थानकातून शिवशाहीची दोन नियते सुरू होती. यातून त्या महिन्यात ४७२४ जणांनी प्रवास केला होता, तर जानेवारी २०१९ मध्ये ३८ नियते सुरू असून ८५ हजार ५३६ प्रवाशांनी प्रवास केला.

…………

कमी रकमेत आरामदायी प्रवास

औरंगाबाद-पुणे मार्गावर शिवनेरीचे प्रति व्यक्ती प्रवास भाडे ७८० रुपये होते. शिवशाही सुरू झाल्यानंतर ते भाडे निम्म्यावर आले आहे. त्यामुळे कमी भाड्यात आरामदायी प्रवास होत असल्याने प्रवासी शिवनेरीऐवजी शिवशाहीला प्राधान्य देत आहेत.

शिवनेरीवर स्थलांतराची वेळ

शिवनेरी सेवेला तोटा झाल्यास किंवा या सेवेचे उत्पन्न घटल्यास औरंगाबाद-पुणे मार्गावरील सेवा हळुहळु बंद केली जाईल. या बस दादर-पुणे किंवा इतर मार्गावर सुरू करण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

………

\Bपुणे मार्गावरील उत्पन्न (रक्कम लाखांत)

सेवेचा प्रकार जानेवारी २०१८ जानेवारी २०१९ फरक\B

शिवशाही ४.६२ १३६.३० १३१.६८

व्हॉल्वो ३४.३१ २२.८० ११.५१

साधी १९८६.७६ २२५९.६५ २७२.८९

एकूण २०२५.६९ २४१८.७५ ३९३.०६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरातील चांदीचा मुकुट चोरला; जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मंदिराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून मूर्तीच्या डोक्यावर ठेवलेला १७ हजार रुपये किंमतीचा ५०० ग्राम वजनाचा चांदीचा मुकूट चोरल्याप्रकरणात आरोपी प्रल्हाद रघुनाथ जोजारे याने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी रविवारी (१७ फेब्रुवारी) फेटाळला.

या प्रकरणी रवी रामदास जामकर (३४, रा. उस्मानपुरा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास फिर्यादी हा घरी असताना फिर्यादीचे काका बालाजी जामकर हे घरी आले. त्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडीकोंडा उचकटत चोरट्याने हनुमान मूर्तीच्या डोक्यावर ठेवलेला १७ हजार रुपये किंमतीचा ५०० ग्राम वजनाचा चांदीचा मुकूट चोरुन नेल्याचे फिर्यादीला सांगितले. त्यानंतर फिर्यादीने सीसीटीव्हीचे फुटेज तपासले त्यात मुकूट चोरताना चोरटा दिसून आला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी प्रल्हाद रघुनाथ जोजारे (५०, रा. जयभवानीनगर, मुकुंदवाडी) याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. आरोपीला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले. आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, कोर्टाने तो फेटाळला. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साइड न दिल्याच्या कारणावरून एसटी चालकांना मारहाण

$
0
0

औरंगाबाद : लातूर ते औरंगाबाद ही एसटी बस घेऊन येणाऱ्या एसटी चालक आणि वाहकांना साइड न दिल्याच्या कारणावरून मोटार सायकल चालकांनी मारहाण केल्याची घटना कचनेर रोडवर दुपारी सव्वाचार वाजता घडली.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी लातूर ते औरंगाबाद बस (क्रमांक एमएच २० बीएल ३७८९) घेऊन चालक बालाजी उत्तम गिरी (रा. लातूर) हे औरंगाबादकडे येत होते. कचनेर फाट्याजवळून जात असताना पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकल चालकाने बससमोर उभी केली आणि केबीनमध्ये प्रवेश करून बस चालकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या बसचे कंडक्टर सुरेश रामचंद्र गरगटे हे भांडण सोडविण्यासाठी पुढे आले. मात्र, कंडक्टलाही मोटारसायकलस्वारांनी मारहाण केली. या प्रकरणी एसटी बसचे चालक आणि वाहक यांनी चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची माहिती दिली. या माहितीवरून मोटारसायकल चालकांच्या विरोधात चिकलठाणा पोलिस गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एआरव्ही’च्या तुटवड्याने रुग्णांचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 'अँटी रेबिज व्हॅक्सिन'चा (एआरव्ही) तुटवडा कायम असून, या तुटवड्याचा फटका गोरगरीब रुग्णांना सातत्याने बसत आहे. इंदिरानगर परिसरातील एका आठ वर्षीय श्वानदंशाच्या रुग्णाला याच इंजेक्शनसाठी इकडून तिकडे पाठवण्यात आले आणि शेवटी तेच इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगण्यात आल्याची तक्रार कुटुंबियांनी 'मटा'कडे केली. अशीच स्थिती विविध औषधांच्या बाबतीत कमी-अधिक प्रमाणात रोजच अनुभवायला मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या एका आठ वर्षीय मुलाला कुत्रा चावल्यामुळे उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्या मुलाच्या कुटुंबीयांना 'एआरव्ही' इंजेक्शनसाठी चक्क एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात पाठवण्यात आले आणि नंतर ते इंजेक्शन घाटीत उपलब्ध नसल्याचे सांगून बाहेरून विकत आणण्यास सांगण्यात आले. 'आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळेच आम्ही घाटीत आलो, नाहीतर खासगीत गेलो नसतो का', असेही संबंधित मुलाच्या कुटुंबीयांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घाटीमध्ये 'एआरव्ही'चा तुटवडा मागच्या कितीतरी दिवसांपासून कायम असून, बहुतांश रुग्णांना हे इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगण्यात येते. अधून-मधून महापालिकेकडून या इंजेक्शनचा तुटपुंजा पुरवठा होतो; परंतु हा पुरवठा अवघ्या काही दिवसांत संपतो. त्यातच हाफकिनकडून तर गेल्या कित्येक दिवसांत पुरवठाच झाला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

'एआरव्ही'सह 'अँटी रेबिज सिरम'चाही (एआरएस) घाटीत पुरवठा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेही श्वानदंशाच्या गंभीर रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शहरभर कुत्र्याने चावा घेतल्याचे रुग्ण वाढत असताना घाटीसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात दोन्ही प्रकारचे इंजेक्शन नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

\Bकर्मचाऱ्यांनी जमवले पैसे

\Bघाटीच्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) औषधी मिळाली नाही म्हणून एक महिला अक्षरश: रडत बसली होती. तिच्याकडे बाहेरून औषधी आणण्यासाठी पैसे नव्हते म्हणून ती हतबल अवस्थेत अश्रू ढाळत होती. हे दृश्य पाहून घाटीच्या कर्मचाऱ्यांनी पैसे जमा केले आणि तिला औषधांची रक्कम सुपूर्द केली. असे दृश्य आता घाटीमध्ये सामान्य होत आहे.

सद्यस्थितीत रुग्णालयात 'एआरव्ही'चा कमी साठा आहे आणि 'एआरएस' सध्या उपलब्ध नाही. याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

\Bडॉ. कैलास झिने\B, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विरोधी पक्षनेत्याचे ‘एसीबी’ला निवेदन

$
0
0

औरंगाबाद: महापालिकेच्या लेखा विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात आहे. प्रामुख्याने कंत्राटदारांची बिले देताना आर्थिक व्यवहार घडतात. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी महापालिकेचे विरोधीपक्ष नेते जमीर अहेमद कादरी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कंत्राटदारांची बिले दाखल झाल्यावर ज्येष्ठता यादीनुसार बिले न काढता मर्जीतील कंत्राटदारांची बिले काढली जातात. या गैरव्यवहारात लेखा विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा महिन्यांत नऊ हजार वीज चोरांवर कारवाई

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

महावितरणच्या औरंगाबाद विभागात गेल्या दहा महिन्यांत ९ हजार २२७ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली आहे. या ग्राहकांनी ७ कोटी २९ लाख रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून २२४ वीज चोरांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीज चोरी पकडण्यासाठी महावितरण सातत्याने वीज चोरी विरोधात मोहीम राबविते. एप्रिल-२०१८ ते जानेवारी-२०१९ या तीन महिन्यांत औरंगाबाद विभागात मोठ्या संख्येने वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली आहे. यात औरंगाबाद शहर विभागात १०३७, औरंगाबाद ग्रामीण विभागात ६४३० तर जालना विभागात वीज चोरीची १७६० प्रकरणे उघडकीस आली. एकूण ९२२७ प्रकरणांत विजेच्या अनधिकृत वापराची ४८७ प्रकरणे उघडकीस आली. तर मीटरमध्ये छेडछाड करून, आकडा टाकून थेट वीज चोरी केल्याची ८७४० प्रकरणे आहेत. या सर्व ग्राहकांना सात कोटी २९ लाख रुपये वीज चोरीची बिले देण्यात आली. तर २२४ प्रकरणांमध्ये वीज चोरांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात औरंगाबाद शहर विभागातील पाच, औरंगाबाद ग्रामीण विभागातील ५० व जालना विभागातील १६९ वीज चोरांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाचा तपासासाठी डीएनए चाचणीचा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

तीन महिन्यांपूर्वी अजिंठा घाटात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची डीएनए चाचणी करून या खुनाचा उलगडा केला जाणार आहे. हे सॅम्पल डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

१६ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी अजिंठा घाटात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील ही महिला असल्याचे शवविच्छेदनातून समोर आले. मारहाण झाल्याच्या खुणा मृतदेहावर होत्या. अजिंठा पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाच्या अहवालात हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला. व्हिसेरा जपून ठेवत महिलेचा मृतदेह बेगमपुरा परिसरातील दफन करण्यात आला. तीन महिने ग्रामीण पोलिसांनी राज्यभर मृतेदहाचे छायाचित्र पाठवून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मृतदेहाचे अवयव आता मुंबईला पाठवणार असून थ्रीडी सुपरइम्पोजिशन टेक्निकद्वारे अववयांच्या मदतीने चेहरा तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर आणि त्यांच्या टीमने सर्व दिशांनी तपास सुरू केला आहे़ या प्रकरणी परिसरात आणि इतर भागातील बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती मिळविली आहे.

………कागजीपुऱ्यातील खूनाचाही शोध लागेना

दौलताबाद परिसरातील कागजीपुराच्या घाटात १ मे २०१७ रोजी एका बुरखाधारी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनात हा प्रकार देखील खुनाचा असल्याचे समोर आले़ सदरील महिलेचे रेखाचित्र जारी करण्यात आले होते. अद्यापही या प्रकरणाचा सुगावा लागलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. दौलताबाद पोलिसांनी या मृत महिलेच्या अंगठ्यांचे ठसे घेतले होते. या ठशांचा डाटा आधार कार्डमध्ये तपासण्यात आला होता. त्यातूनही काहीच माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही.

………तपास सर्व दिशेने सुरू

आम्ही या प्रकरणात सर्व बाजूने तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलेच्या मृतदेहाचे अवयव मुंबई येथील प्रयोग शाळेला पाठवून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे चेहरा कसा असेल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या शिवाय परिसरातील बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती मागविली आहे. त्या पैकी दोन पालकांचे डीएनए चाचणीसाठी पाठविले आहेत. या खुनाचा उलगडा करण्यासाठी सर्व दिशांनी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक किरण अहेर यांनी दिली.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता गावोगावी चाराछावण्या

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेसंबंधी गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने शासनाने महिनाभरापूर्वी मंडळनिहाय चारा छावण्या उघडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निकषांमध्ये बदल करण्यात आला असून आता मंडळामध्ये एकापेक्षा अधिक गावांमध्ये चारा छावण्या उघडता येणार आहेत. मंडळात एकापेक्षा अधिक ठिकाणी चारा छावण्या उघडण्याची गरज असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची खात्री पटल्यानंतरच यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे आता अनेक गावांमध्ये चारा छावण्या उघडण्याचा मार्ग खुला झाला आहे.

महिन्याभरापूर्वी शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मंडळस्तरावर चाराछावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये प्रती छावणी ३०० ते ५०० जनावरांना ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडे महिन्याभराच्या कालावधीमध्ये दुष्काळ असलेल्या तालुक्यांमधुनही चारा छावण्यांसाठी फारशी मागणी आली नाही. शिवाय मंडळस्तरावरील गावामध्ये परिसरातील गावांमधील जनावरे ठेवणेही अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे सरकारने आता दुष्काळी भागातील कोणत्याही गावामध्ये चारा छावण्या उघडण्यास परवानगी दिली आहे. मराठवाड्यात नेमक्या किती चारा छावण्या सुरू कराव्या लागतील तसेच मराठवाड्यात मुबलक चारा उपलब्ध असल्याची आकडेवारी प्रशासनाकडे तयार आहे. मात्र, आता जिल्ह्यामध्ये नेमक्या कोणत्या भागात किती चारा छावण्या सुरू करण्याची गरज आहे, याबाबत निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावा लागणार आहे. यासाठी जिल्ह्यातील मोठ्या व लहान पशुधन संख्येस अनुसरून, पशुधनासाठी वेगवेगळ्या नियमित योजनांमधून उपलब्ध असलेला चारा तसेच अतिरिक्त चारा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अतिरिक्त वैरण विकास कार्यक्रम तसेच गाळपेर योजना कार्यक्रमामधुन उपलब्ध होणारा चारा याबाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावा लागणार आहे.

चारा छावण्या सुरू करण्यासाठी शासनाकडून घालून दिलेले नियम नवीन आदेशामध्येही कायम राहणार आहेत. यानुसार एका छावणीमध्ये किमान ३०० ते ५०० जणावरे दाखल करता येणार आहेत. मराठवाड्यात लहान मोठी अशी एकूण ६७ लाख जनावरांची संख्या असून यामध्ये ३६ लाख २५ हजार ४९० मोठी जनावरे, ११ लाख ३६ हजार लहान जनावरे आहेत. तर विभागात शेळ्या मेढ्याची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात जनावरांच्या संख्येच्या तुलनेत दररोज २६ हजार ३३० टन चाऱ्याची आवश्यकता आहे.

सहा गोशाळेसाठी दहा कोटी

दरम्यान, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, बीड व परभणी या पाच जिल्ह्यातील सहा गोशाळेमध्ये पशुसंवर्धन विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या 'पशुधन मदत व चारा शिबिर' या प्रयोजनासाठी पशुसंवर्धन विभागास दहा कोटी रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक वादातून आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

कौटुंबिक वादातून सफाई कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना टीव्ही सेंटर भागातील सिद्धार्थनगर घडली. प्रमोद संतोष दाभाडे (वय ३४) सिद्धार्थनगर हडको एन-१२ असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सिद्धार्थनगर भागात प्रमोद दाभाडे हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि भाऊ तर वरच्या मजल्यावर प्रमोद राहत होते. शनिवारी त्यांचे पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नी शहरातील समता नगर भागातील माहेरी निघून गेली. सकाळी बराच वेळ प्रमोदच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्यामुळे त्यांचा भाऊ नितीनने वरच्या मजल्यावर जाऊन दरवाजा ठोठावला. आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी प्रमोदने छताच्या लोखंडी हुकला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images